आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

भाग ३ :- महारथी “कर्ण” संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)
महारथी कर्णः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण 18 भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या 4 भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography
महारथी कर्णः- संपूर्ण चरित्र
मिनाक्षीताई देशमुख या सेवानिवृत्त. सरकारी अधिकारी असून. त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर. भारतातील. महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे. चरित्र लिखाण केले सोशल मीडियावर केलेले असून आतापर्यंत. 95 व्यक्तिरेखांचे. चरित्र त्यांनी रेखाटले आहे. आणि अजूनही त्यांचे हे काम अव्याहतपणे चालू आहे. महाराष्ट्रातील. ज्यांना वाचनाची. आवड आहे. अशा लोकांना, विद्यार्थी, शिक्षक. समीक्षक या सर्वांना. कीर्तनकार, धार्मिक लोकांना या लिखाणाचा अतिशय उपयोगा आहे. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिरेखांचं. संग्रह आम्ही 96 कुळी मराठा. डॉटकॉम https://96kulimaratha.com/ या वेबसाइटवर करत आहोत. शेकडो पानांचा हा त्यांचा संग्रह आम्ही विस्तृत वर्गीकरण करून. या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यातलीच एक व्यक्तिरेखा म्हणजे. महारथी कर्ण. यांचे चरित्र.
कर्णः-
भागः-९
कर्णाला जेव्हा त्याचे जन्म रहस्य कळले तेव्हा तो उन्मळुन पडला. पण म्हणुन तो स्वार्थान्ध झाला नाही.शस्ञस्पर्धेच्या वेळी जर त्याचे जन्मरहस्य कळले असते,तर भर स्वयंवरात द्रौपदीने सूतपुञ म्हणुन उपहास केला नसता.परंतु अशा अपमानीत दोन्हीही वेळी दुर्योधनच त्याच्या लज्जारक्षणार्थ धावून आला व अंगदेशाची प्रतीष्ठा पाठीशी उभी केली.विराट नगरीत अर्जुनाकडुन पराभुत झाल्यावरही त्याची कर्णावरची निष्ठा,प्रेम, विश्वास कमी झाला नाही.ज्याने त्याच्या आधारावर दिग्विजयाचा पाया रचला त्या मिञाला तो धोका कसा देवु शकेल?
कित्येक वेळा असत्य हे भविष्यातील सत्य ठरु शकते.द्रोणाचार्यांनी अपमानीत करुन ब्रम्हास्ञ शिकविण्याचे नाकारल्यावर तो भगवान परशुरामांकडे गेला.तीथे प्रवेश मिळण्याकरिता त्याला खोट्याचा सहारा घ्यावा लागला.भृगुकुलोत्पन्न ब्राम्हण असे खोट सांगुन प्रवेश मिळवला.पण नशीबाने तीथेही त्याला धोका दिला.संयमाने घात केला व शाप पदरी पडला.
कर्ण तीथे विद्या ग्रहण करत असतांना त्याला खोट सांगीतल्याची खंत सतत खात होती.म्हणुन एके दिवशी मनस्वास्थासाठी म्हणुन मृगयेला बाहेर पडला.दैव्य तीथेही आडवे आले.शिकार समजुन चुकुन एका गरीब ब्राम्हणाच्या गायीच्या हत्तेचे पातक त्याच्या माथी आले.ब्राम्हणाने त्याला शाप दिला.”एनवेळी तुझ्या रथाचे चाक जमीनीत रुतेल”. विशन्य मनस्थीतीत तो आश्रमात परतला.
दोन्ही शाप घेऊन तो हस्तीणापुरला आला.एक दिवस कृष्णाबरोबर बोलतांना तो आपली व्यथा व्यक्त करतो.क्षञीयांचे संस्कार कधीच लाभले नाही याची जाणीव त्याला अखेरच्या पर्वात झाली.पण क्षञिय कधी मिञघातही करु शकत नाही, असे संस्कार जपतच जीवनाचा शेवट व्हावा असे त्याला वाटले तर काय चुक आहे?कृष्णाला तो विनंती करतो की हे रहस्य रहस्यच राहु दे.कर्णाच्या या तेजस्वी दर्शनाने कृष्ण भारावुन गेला.कर्ण कृष्णाला रथ थांबवायला सांगतो,जोपर्यत विचार आणी विवेक कह्यात आहेत. कर्णाने प्रखर उन्हाकडे पाहत म्हटले या सुर्यभक्ताला तेजात होरपळणे,दाहात उभ राहणे,असेच त्याचे जीवन. तो कृष्णाला विनंती करतो की,जीवन निष्कलंक राहाव,विरोचीत मरण याव, आत्पस्वकीयांचा वध घडु नये.बासरी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली.
इतके असत्य बोलुन ब्रम्हास्ञ मिळवले पण ते शापीत झाले,उपयोगशुन्य. ते कमी म्हणुन की काय ब्राम्हणाचा शाप मिळाला.यासारखे दुर्दैव ते कोणते?
एवढा सृजन,संयमी,दानी,शूर योध्दा,पराक्रमी, अर्जुनापेक्षा तसूभरही कमी नसणारा,कोणते गुण कमी होते त्याच्याकडे?अधर्माची त्याने कास धरली पण कोणत्या परिस्थीतीत? त्याच्या प्रत्येक विकट,संकट प्रसंगी दुर्यौधनाने साथ दिली मानसन्मान,रुतबा बहाल केला, अशा मिञाशी त्याने द्रोह करायचा होता का?
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख
*कर्णः-*
*भागः-१०.*
त्याच वेळी इकडे अधिरथ *रथपरीक्षण* करीत असतांना मृत्यु झाल्याचे कळले. दुःखाचा पहाड कोसळला त्याचेवर. एका राञी राधाई बाहेर पडत असलेली पाहुन कर्णाने तीला विचारले असता तीने नदीपुजेला जात असल्याचे खोटे सांगीतले. कृष्ण शिबिरात तीने प्रवेश केल्यावर कृष्णाने तीला विचालं, माते काय हवं तुला? ती म्हणाली, “जीच्या कपाळी सौभाग्य लेणं राहिल नाही व जीचा मुलगा उद्या रणांगणावर जाणार तो आपल्या कृपेने सुरक्षित राहावा.”
कृष्ण म्हणाला, “आता हे नियतीच्या हाती आहे.”
ती *काय समजायचे ते समजली* व विषण्ण मनाने परत फिरली. जगण्याची आसक्ती संपली तीची. तशीच ती कर्णाच्या रथशाळेत आली. त्याला डोळे भरुन बघीतले. अश्रू ढाळत त्याच्या गालावरुन हात फिरवला. कर्ण रणांगणातुन जिवंत परत येणार नाही हे कळल्यावर तीने स्वतःचे जिवन संपविण्यासाठी नदीला जवळ केले.
*कुरुक्षेञ ही युध्दभुमी ठरली.* हस्तीनापुरच्या नदीच्या दोन्ही किनार्यावर कौरव पाडवांची दळे सैन्यासह विसावले. नेहमीप्रमाणे कर्णाची सूर्योपासना संपल्यावर, नेहमी प्रमाणे *कोणी याचक आहे?* असे विचारले. कोणी नाही असे पाहुन कर्ण किनार्याकडे परतत असतांना त्याचेच निळे उत्तरीय घेऊन एक छाया उभी दिसली. ती *अर्जुनाची आई कुंती* होती व तीही *एकाकी दिसली.*
ती म्हणाली,”याचक म्हणुन तुझ्या लौकीकाने इथे आली आहे. तुझे दातृत्व अजोड आहे.”
कर्ण म्हणाला, “माते वीरपुत्रांची संपदा, कृष्णासारखा पाठीराखा, अग्नीच्या कृपेने मिळालेले *गांडीव धनुष्य* जिच्या पुञाजवळ आहे त्या मातेने माझी अशी क्रूर थट्टा करावी? यासारखे दुर्देव कोणते? तरी मी तुला रिक्त हस्ते माघारी जाऊ देणार नाही. मी फक्त अर्जुनाशीच युध्द करेन. *दोघांपैकी एक जिवंत राहिला तरी तुझे पांच पुञ शिल्लक राहतील.*”
“माते… ऊन खुप तापलेलं आहे माझं हे उत्तरीय घेऊन जा. जेव्हा तुझ्या या मुलाचा जीवन प्रवास संपेल त्यावेळी या *दुर्दैवी कर्णासाठी* दोन अश्रू ढाळ,समाधानाचे, सुटकेचे. कारण त्यावेळी या दुर्दैवी कर्णासाठी फार थोडे अश्रृ ढाळणारे असतील. माझी पत्नी, *वृषाली* आणि *दुर्यौधन* यांच्या डोळी अश्रृ येतीलही पण त्यांनाही स्वार्थाचा स्पर्श असेल. पण तुझे निखळ अश्रृ मला स्वर्गाची वाटचाल करण्यास बळ देतील.”
नंतर कर्ण विचार करीत बसला
” माझी आयुष्यभर होत असलेली होरपळ, अपमानीत जीवन कुंतीला दिसत होते, परंतु मर्यादापालन करण्यासाठी तिने ते चुपचाप सोसलेस. मग आजच *पुञप्रेम* कसे काय उफाळुन आले?”
“नाही! कर्णा, *पुञप्रेमात तुझा समावेश नाही.* जाणले फक्त *दातृत्व* शेवटी आईने सुध्दा *स्वार्थच* साधला.
*रणांगणावरचा मृत्यु,* त्यासोबतच येईल तो *पराजय,* मानहानी स्वीकारावी लागेल. *पांडव सुरक्षित राहतील!* दुर्योधनाला मिञप्रेमाची *प्रचिती येईल.* पण कर्ण? आता कर्ण कुणाचाच नव्हता व नाही. तो एकाकी आहे. सूर्यपुञाच्या प्राक्तनी हेच असायचं!
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*कर्णः-*
*भागः-११*
कर्ण आपल्याच विचारात गर्क असतो. ‘जीवन हे नौकेसारखे असते.
रुणानुबंधाची दोन दुबळी वल्ही हाती असली की, अहंकाराचे शीड उभारल्या जाते. अनुकुल दैवाचे वारे लाभले, तरच पैलतीर गाठल्या जाते. अशाच विचारात प्रसादात आल्यावर तो वृषालीला (पत्नी) सांगतो आज साक्षात परमेश्वर म्हणजे *इंद्राचे* दर्शन झाले व जे शिल्लक होते तेही तो घेऊन गेला. त्याच्या चेहर्यावर परमतृप्तीचे भाव होते.
कौरवांचा मुळ पुरुष *कुरु* याने ज्या भुमीवर तप केले तेच हे एक पवित्र क्षेत्र हिरण्यवतीच्या तीरावर वसलेल कुरुक्षेत्र. याच क्षेत्रावर कौरव-पांडवांची दळे रणसंग्रामासाठी जमा झालीत.
कौरवांकडुन सेनाप्रमुख म्हणुन *भीष्म यांची सेनापतीपदी* नियुक्ती झाली, पण त्यांनी दोन अटी घातल्यात. पहीली- म्हणजे *रोज दहा सहस्ञ योध्यांना मारीन पण पांडवांचा वध करणार नाही.*
दुसरी अट म्हणजे कर्ण. त्याला भीष्मांनी व द्रोणाचार्यानी अपमानीत करुन सांगीतले की, *जोपर्यंत मी आहे, तोपर्यत कर्ण माझ्या सैन्यात असणार नाही.* इथेही कर्णाचा तेजोभंग करुन त्याच्या पौरुष्याला डागाळले.
कौरव पांडवांचे *९ दिवस* तुंबळ युध्द सुरु असुनही युध्दाचा निर्णय होत नव्हता. कर्ण आपल्या दोन पुत्रांच्या वियोगात असतांनाच, युध्दाचा निर्णय होत नाहीसा पाहुन दुर्योधन कर्णाला भेटायला आला. तेव्हा कर्णाने त्याला सल्ला दिला की, भीष्मांना शस्र संन्यास घ्यावा, असे सांगीतले की, त्यांचा अहंकार जागृत होईल, व झालेही तसेच. भीष्मांनी प्रतीज्ञा केली. *”उद्या सुर्यास्तापर्यंत निष्पांडव करीन नाही तर भीष्म राहणार नाही”* .त्याप्रमाणे पितामहांनी पराक्रमाची शर्थ करीत असतांनाच पांडवांनी *शिखंडीला* त्यांच्या समोर आणले. त्यामुळे त्यांनी शस्र खाली ठेवले. *अर्जुनाच्या बाणांनी ते धारातिर्थी पडले.*
ते *स्वेच्छामरणी* असलेमुळे व *सध्या दाक्षिणायण सुरु असलेमुळे उत्तरायंणापर्यत जिवंत राहण्याचा निग्रह केला.*
आणि उघड्या भुमीवर *बाणांच्या शय्येवर* पडुन राहिलेत.
दुर्यौधनाने *कर्णाला सेनापतीपद* देऊ केले असतां, त्याचे औदार्य पहा किती! स्वतः कर्णाने द्रोणाचार्यांना सेनापतीपद देवविले.
दरवेळी भीष्मांनी कर्णाचा अपमान, मानखंडना, मानहानी केली असतांना सुध्दा मनात कोणतेही किल्मीष न ठेवता कर्ण भीष्मांना भेटायला गेला. त्यांची विकल स्थिती पाहुन त्याला गलबलुन आले, अतिशय दुःख झाले. बोलतांनी भीष्मांनी त्याला पांडवांचा पक्ष घेउन त्यांच्याशी सख्य करणेबद्दल सांगीतले. त्यावर कर्णाने त्यांना सांगीतले की, जरी दुर्योधनाचा पक्ष अधर्माचा आहे हे माहित असुनही मित्रप्रेमाला तडा जाऊ देणार नाही, मित्रद्रोह होणे नाही. कारण प्रत्येक कठीण व अपमानीत केल्या गेले असतांना त्यानेच मदतीचा हात देऊन सावरले, मानमान्यता दिली.
*अंगराज* म्हणुन ज्ञानान, चारित्र्याने, दातृत्वाने, आणि सुसंस्कारांची जपणुक त्याच्या इतकी कोणीच केली नाही. स्वतःला मिळत असलेले सेनापतीपद दुसर्याला देण्याचे औदार्य फक्त कर्णच दाखवु शकतो.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*कर्णः-*
*भागः-१२*
धारातीर्थ पडलेल्या भीष्मांची भेट झाल्यावर कर्णाचे मन उदास झाले. एकाकी झाले ,या विचारातच तो नदीकाठी आला. त्याच्या मनाची आवर्तण उठत होती. उद्याच्या रणांगणांच रौद्र दर्शन घ्यायच आहे. त्या रणयुध्दात आहुती टाकायची आहे. सुडानं आकर्ण प्रत्यंचेतुन सुटलेल्या बाणांनी क्षमा, दया, शांती यांना अवसर न देता ईर्षा, अहंकार, घात, अपघात यांचा आश्रय शोधायचा आहे. याच नदीच्या काठावर *महादानं* केलीत आणि शेवटचं दान इथेच द्यायचं आहे. एवढ्यातच कुठुनतरी बासरीचे सुर त्याच्या कानी पडले. कान व मन तृप्त झाले. थोड्या वेळाने बासरीचे सुर हवेतच विरले. त्याचप्रमाणे या देहाच्या बासरीचा सुर विरुन जाईल, मागे राहील ती आठवण, एकाकी जीवनाची, सफल दातृत्वाची, अजोड सोसण्याची. बस्स….
कर्ण विचार करत होता, *कश्यासाठी हे युध्द?* पुरुषार्थाचा अहंकार अन् सत्तेची लालसा या कारणानेच सर्वनाश ओढवला गेला ना! कृष्णाला हे सर्व सर्व थांबवता आले असते, पण तो सुख दुःख, मानापनाच्या पलीकडे गेलेला. कर्णाच्याच दातृत्वाने पांडव निर्भय झालेत, त्याच कर्णाचा त्याच्याच भावाच्या हाताने घडत असलेला मृत्यु. ज्या पांडवांना शस्रविद्या दिली त्या द्रोणाचार्याचा पांडवांकरवी मृत्यु हे सर्व घडत असलेल कृष्णाला पाहावे लागणार होते.
धर्म आणी अधर्म यांच्या काय मर्यादा आहेत? *धर्म सुध्दा स्वार्थप्रेरीतच असतो, जेव्हा त्या स्वार्थाला तडा जातो तेच कारण म्हणजे अधर्म.*
*अर्जुनाला उपदेश कृष्णाने केला, पण नकळत आचारला जातो कर्णाच्या हातुन.* सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय हे सारग मानुन युध्दात उतरणारा कर्णाखेरीज दुसरा वीर कोण असु शकेल? आता त्याचा कोणताच स्वार्थ राहीला नाही, स्वताःचे जीवन सुध्दा सुरक्षित ठेवले नाही. मित्रप्रेमासाठी, कर्तव्यासाठी उघड्या डोळ्यांनी रणकुंडात उडी घेणार. अस निर्वाज्य प्रेम करणारा फक्त कर्णच असु शकतो. स्नेहासाठी निर्विकार बुध्दीने सर्वस्व अर्पण करणारा कर्ण धन्य होय.
जसे सर्वजण कर्णाला अधर्माची बाजु घेतली म्हणुन त्याच्या नांवाने शंख करतात, तर पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सर्वजण अधर्मी कौरवांच्या बाजुने कां उभी राहिलीत? भीष्माचार्यांना स्वतःच्या कुलाचा संहार पाहण्याची सक्ती नव्हती. ते जेष्ठ होते. पण ही सर्व जणं कर्तव्याला बांधील असल्यामुळे त्यांनाही अधर्माची कास धरावी लागली. मग कर्णाच्याच नांवाने एवढा आटापिटा का?
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*कर्णः-*






