अभिनव रामायण  संपूर्ण भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्‍या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

अभिनव रामायण

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  २१.

            श्रीराम आणि लक्ष्मण संत्रस्त मनाने पर्णकुटीत आल्यावर सीता गायब!

जवळपास आजुबाजुला कुठेच न दिसल्याने दोघांना अनावर दुःख झाले. सीतेचा माग घेत रामलक्ष्मण निघाले.थोडे अंतर चालल्यावर एका ठीकाणी गवता वर फुले विखुरलेली दिसले,सीतेच्या केसात माळलेली फुले होती.आणखी पुढे कांही अंतरावर गोदावरी नदीजवळ ओल्या मातीत वाशाल पदचिन्ह व पुढे नाजुक पावलांची ठसे दिसले.ठशांचा मागोवा घेत आणखी पुढे गेल्यावर सीते च्या गळ्यातील तुटलेल्या माळासुध्दा दिसल्या.पुढील दष्य पाहुन रामाचे अवसानच गळले.जमीनीवर रक्ताचा सडा व विमानाचा कांही तुटलेला भाग दिसल्यावर,सीतेला कुणा राक्षसाने किंवा हिंसक श्वापदाने खाल्ले की, कुणी हरण केले?रामाचे मन शोकाने व उद्वेगाने भरुन आले.

           रामांची अवस्था पाहुन लक्ष्मणाने त्यांना परोपरीने समजावल्यावर राम थोडे सावरले.मग दोघेही त्या रक्ताचा माग घेत असतांना एके ठीकाणी,तोंडाला फेस आलेला,रक्तबंबाळ जखमी जटायूपक्षी दिसला.रामलक्ष्मण जवळ आलेले पाहतांच,कसेबसे अडखळत,जीवाच्या कराराने सांगु लागला.रामा!दुरात्मा राक्षसराज रावणाने सीतेला पळवले आहे.मी अडवण्याचा प्रयत्न केला तर माझे पंख छेदुन सीतामाईला दक्षिणेकडे घेऊन गेला.रावण विश्रावसऋषीचा पुत्र व वैश्रवणाचा भाऊ…कंठाशी प्राण आणुन कसेबसे बोलला आणि जटायूचे प्राणोत्कमण झाले.

         अति दुःखाने राम लक्ष्मणाला म्हणाले,माझ्यासाठी ह्या गृध्रराजाने आपले प्राण दिले.सौमित्रा!चित्ता तयार कर!त्यााचे अग्निसंस्कार केल्यावर गोदा वरी नदीवर जाऊन रामलक्ष्मणांनी मृत पक्षीराजाला जलांजली दिली.

       जटायूच्या सांगण्यानुसार रावणाने सीतेला दक्षिणेकडे घेऊन गेला ही माहिती मिळाल्यावर रावणाच्या तावडी तुन सीतेची सुटका करणे मुख्य काम राम लक्ष्मणाकडे होते.तीच्या शोधासाठी पंचवटी सोडुन शोध घेत घेत ते दक्षिण – पुर्व दिशेला  सरकु लागले.जातां जातां दोघे राजकुमार जनस्थानासुन तीन कोसां वरील क्रौंच्यारण्यांत शिरुन निबिड अरण्य पार करुन मतंगऋषीच्या आश्रमा जवळ आले.जवळच असलेल्या एका पर्वतावर एक भयान असलेल्या दरी जवळ एक विक्राळ चेहर्‍याची अवाढव्य शरीराची अयोमुखी नांवाची राक्षसीन समोर उभी होती.

             अय  म्हणजे मिळकत,व्यय म्हणजे खर्च! भ्रष्ट व्यापारी वृत्ती म्हणजे केवळ पैशांचे येणे,म्हणुनच अयोमुखी नावाने पैसे ओढण्याची राक्षसी वृत्ती!

         लक्ष्मणाने वेळीच अयोमुखी राक्षसीनीचे हात छाटले.राम लक्ष्मण थोडे पुढे जातांच,बाजुच्या वनांत फार मोठी गडबड उडाल्याचे लक्षात आल्यावर शस्रे सरसावुन पुढे गेले तो त्यांना फार चमत्कारी दृष्य दिसले.एक भला मोठा विस्तीर्ण कबंध राक्षस,ज्याचे हात लांबवर पसरलेले,त्या हातांनी मिळेल ते सावज पकडुन आपल्या पोटात टाकत होता.

          अर्थवादी(Materialistic)वृत्ती ची ही पराकाष्ठा आहे.सर्वकांही स्वतःच्या च पोटात घालण्याचा अर्थवादी माणसाचा प्रयत्न असतो.स्वार्थाखेरीज या लोकांना दुसरं काहीच दिसत नाही.अयोमुखी वृत्तीशी संलग्न ही अर्थवादी प्रवृत्ती आहे. अयोमुखीप्रमाणे कबंधाचेही हात लांबवर पसरलेले होते.प्रमाण थोडे जास्त इतकेच पण वृत्ती तीच!हा भयानक अर्थवाद पुर्वी होता,आज आहे,आणि उद्यासुध्दा असणारच आहे.

        कबंधराक्षस मुळात सुंदर होता,पण वेळप्रसंगी निर्माण होणारे त्याचे राक्षसी रुप लोकांना त्रस्त करीत होते.अर्थवादा चा तोंडवळासुध्दा वरपांगी गोंडस, लाघवी असतो.पण जेव्हा अर्थवाद आपले भयान दात दाखवतो,तेव्हा अर्थ वादाचे मूळ क्रुर रुप प्रगट होते,नाहीतर सर्वच छान दिसले असते.

          कबंधराक्षस सुध्दा मुळात सुंदर होता,पण  आंतुन अतिशय क्रुर होता. त्याचे खरे स्वरुप स्थिरशिरा ऋषिंना कळले आणि मग कबंध राक्षसीरुपात प्रगट झाला.रामायणात स्थिरशिरा ऋषीं  च्या शापाने कबंध पोटात डोके असलेला राक्षस बनला.अर्थवादी भ्रामकरुप स्थिर शिर असलेल्या ऋषीला तो चकवुं शकला नाही.कबंधराक्षसाचे लांबवर पसरलेले हात रामलक्ष्मणाने छाटुन टाकल्यावर त्याच्याच सांगण्यावरुन त्याचे धडरुपी अस्तित्व जाळुन टाकले.म्हणजेच माणसांतील वर्चस्व संपुन त्याच्यातील दानव नष्ट झाला.कबंधराक्षसाची देह बुध्दी जळतांच त्याच्यातील खरा मानव बाहेर आला आणि त्यानेच सांगीतले की, पंपासरोवरावर राहणारा वानर प्रमुख सुग्रीव रामासारखाच दुःखी आहे.

                   क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
         दि.  १०-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  २२.

        कबंध पुढे म्हणाला,सुग्रीवाचा भाऊ वालीने त्याची बायको रुमाला बळजबरी ने पळविले.वालीविरुध्द जर रामाने सुग्रीवाला मदत केली तर,वानरांच्या सहाय्याने सीतेला शोधणे सोपे होईल.

         कबंधच्या सुचनेनुसार रामलक्ष्मण पंपासरोवराकडे निघाले.पंपासरोवरा जवळ त्यांना मातंगवनात शबरीचा आश्रम लागला.शबरी महान तपस्विनी होती.श्रीरामांचा शबरीने यथोचित सत्कार करुन म्हणाली, हे प्रभो!आज तुझ्या दर्शनाने माझा जन्म सफल झाला. नंंतर दोघे भाऊ मातंगवनाजवळील पप्मा सरोवरावर गेले असतां,तेथील मनोहारी दृष्य पाहुन श्रीरामाचे मन प्रिय पत्नीसाठी व्याकुळले.सीतेच्या आठवणींनी राम दुःखी होऊन डोळ्यांतुन अश्रू वाहुं लागले श्रीरामांची मनःस्थिती पाहुन लक्ष्मण त्यांना धीर देत म्हणाला,हे पुरुषोत्तमा! रावण पाताळात किंवा कुठेही दूर गेला असला तरी त्याचा विनाश निश्चित आहे. तो जिवंत राहणार नाही,तरी तूं शोक आवरुन बुध्दी स्थीर ठेवल्यावरच आपण आपले कार्य नीट करुं शकु.

लक्ष्मणाने धीर देत समजावल्याने रामाने स्वतःस आवरुन दोघेही आपले शस्रास्र घेऊन ऋष्यमूक पर्वताकडे निघाले,त्या वेळी सुग्रीव ऋष्यमूक पर्वतावर आपल्या सहाय्यक वानरश्रेष्ठींसह बसला होता. दूरुन आयुधासह दोन वीर येतांना पाहुन, वालीची धास्ती घेतलेल्या सुग्रीवाला वाटले,सन्यासाच्या छद्मी वेशात हे दोन मारेकरी वालीनेच पाठवले असावे ही भिती मनांत निर्माण झाल्याने त्याने तात्काळ आपल्या सहाय्यकांना व अंगरक्षकांना धोक्याची सुचना दिल्या बरोबर क्षणात त्याच्या भोवती संरक्षण कडे केल्या गेले.

          सुग्रीवाच्या या सहाय्यकांमधे हनुमान होता.हनुमान म्हणाला,हे वानर शिरोमणी सुग्रीवा!वालीचे भय मनांतुन काढुन टाक.वाली या मलय पर्वतावर येऊच शकत नाही.या पर्वतावर तो आल्यास त्याचा तात्काळ मृत्यु होईल, असा शाप आहे त्याला.आपल्यासारख्या राज्यप्रमुखाने विज्ञाननिष्ठ बुध्दीचा उपयोग करुन,लोकांचे मनोगत,इंगीत जाणुन व्यवहार करावा.बुध्दीबलाचा उपयोग न केल्यास प्रजेवर शासन करणे कठीण होते.सुग्रीव म्हणाला,स्वतः वाली जरी येऊ शकत नसला तरी,कटकारस्था नांत प्रविण वालीने हे दोन वीर माझ्या नाशासाठी कशावरुन पाठवले नसेल?तूं साध्या वेशात जाऊन त्यांचे खरे स्वरुप जाणुन घे!वानरांवर सहसा कोणी विश्वास ठेवत नसल्यामुळे हनुमानाने कपीरुप टाकुन भिक्षुरुप धारण करुन त्या अपरिचितांची प्रशंसा करुन वळणा वळणाने ते कोण हे काढुन घेण्याचा प्रयत्न केला,पण ते कांहीच सांगत नसल्यामुळे नाईलाजाने हनुमानाने आपली ओळख देत म्हणाला,मी वानरां चा राजा सुग्रीवचा प्रतिनिधी,हनुमान!सुग्रीवाला त्याच्या भावाने त्याला त्याच्या राज्यावरुन हुसकावुन दिले.

      हनुमानाची शुध्द भाषा,दोषरहित अंगविक्षेप,हावभाव,बोलण्यातील स्पष्टता,सफाई,वाणी ह्रदयाला प्रसन्न करणारी,असा गुणवान कार्यसाधक दूत ज्या राजाजवळ आहे,त्यामुळे आपला हेतू  नक्कीच सिध्दीस जाणार हे रामाने ओळखले.श्रीरामाचे असे अनुकुल मत पाहुन,लक्ष्मण हनुमानाला म्हणाला म्हणाला,हे विद्वान दूता!वानरश्रेष्ठ सुग्रीवा बद्दल आम्हाला ज्ञात झाल्यामुळे आम्ही सुग्रीवाशी मैत्री करण्याच्या हेतूनेच आलो आहोत.येण्याचे प्रयोजन सांगुन इक्ष्वाकू कुळाच्या इतिहासापासुन सीताहरणा पर्यंतची सर्व माहिती थोडक्यात विदित करुन लक्ष्मण म्हणाला,आम्ही सुग्रीवाच्या आश्रयाला मदतीसाठी आलो आहोत. कुशल वक्ता हनुमान म्हणाला,राजकुमार हो! वानरराज सुग्रीव आपल्यासारख्या बुध्दीवान,जितेंद्रीय आणि क्रोध काबुत असणार्‍यांच्याच मैत्रीच्या शोधात होते.

        सुग्रीवचे स्वतःचे राज्य,भाऊ वालीने राज्य व पत्नी दोन्हीही बळकावुन बसला.वालीच्या भीतीने सुग्रीव रानां वनांत लपुन छपुन हिंडत आहे.सीतामाई च्या शोधात सुग्रीवची मदत तुम्हाला नक्कीच मिळेल.याप्रमाणे बोलणे झाल्या वर मोठ्या विनयाने स्निघ्दपणे दोघांनाही ऋष्यमूक पर्वतावर मलरगिरीवरील सुग्रीवाच्या निवासस्थाकडे घेऊन गेला.

                  क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
         दि. १०-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  २३.

         हनुमानाने राम लक्ष्मण व सुग्रीवा ची ओळख करुन दिल्यावर,सुग्रीवने त्यांचे यथोचित  स्वागत करुन म्हणाला, आपण तपाचरणी तर मी वानर,आपल्या बरोबर मैत्री हा माझा मोठाच सन्मान आहे.रामाने सुग्रीवाला गाढ अलिंगन दिले.हनुमानाने भिक्षुवेश टाकुन पुर्ववत रुपात आला.अग्नि प्रज्वलित करुन अग्निच्या साक्षीने दोघांची मैत्री दृढ झाली सर्व स्थिरस्थावर झाल्यावर सुग्रीव म्हणाला,रामा! माझा भाऊ वालिने राज्यातुन हुसकावुन माझ्या पत्नीला बळजबरीने आपल्या ताब्यात घेतली. भयाने त्रस्त होऊन दुर्गम पहाडांच्या आश्रयाने रानोमाळ भटकत दिवस कंठत आहे. तरी माझे भय नाहीसे करावे.राम दृढ स्वरात म्हणाले,वालीचा वध करुन तुझे राज्य व पत्नी मिळवुन देईन,प्रत्युत्तरा दाखल सुग्रीवने सीतेच्या शोधमोहिमेत मदत करण्याचे वचन दिले.

         नंतर सुग्रीव सांगु लागला,हे नर श्रेष्ठा एक दिवस मी चार मंत्र्यांसोबत शैल शिखरावर बसलो असतां,एक राक्षस एका स्रीला बळजबरीने विमानात घेऊन जातांना दिसला,बहुधा ती सीतामाईच असावी.तीने एक अलंकाराची पोतडी आमच्या दिशेने फेकली.आम्ही ते अलंकार सांभाळून ठेवले.ते अलंकार बघुन रामाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. श्रीरामांची शोकग्रस्त अवस्था बघुन, समजुत घालत,धीर देत म्हणाला, हे पराक्रमी रामा!मी प्रयत्नपुर्वक,हर प्रयत्नाने आपल्याला सीता मिळवण्यास मदत करीन.मी सुध्दा पत्नी विरहाने त्रस्त आहे आपण धैर्य धरुन अश्रू आवरावे.

           सुग्रीवाच्या समजवण्याने,रामांचे मन हलके झाले.सावरुन त्यांनी सुग्रीवाला त्याची हकिकत विचारल्यावर, सुग्रीव सांगु लागला…वाली आणि सुग्रीव सख्खे भाऊ.वाली मोठा व जेष्ठपुत्र, शिवाय योग्यता असल्याने मंत्रीमंडळाने किष्किंधा नगरीच्या सिंहासनावर बसविले.एकदा झटपटीत मायावी राक्षसाचा पाठलाग करीत वाली एका गुहेत शिरला व मला गुहेच्या तोंडाशी त्याच्या मदतीसाठी पहार्‍यावर ऊभे केले होते.गुहेत चाललेली झटपट बाहेर ऐकु येत होती.थोड्याच वेळात रक्ताचा पाट बाहेर वाहत आला.खुप कालावधी उलटला तरी वाली किंवा राक्षस कोणीच बाहेर न आल्याने वालीचा मृत्यु झाला असावा असे वाटुन गुहेचे दार मोठ्या शिळांनी बंद करुन मी किष्किंधेत परतलो.आणि राज्यकारभार स्विकारला.

परंतु इकडे गुहेत वाली मेलेला नव्हताच. झटपटीत मायावी राक्षस ठार झाला व वाली जखमी झाला होता. नंतर बाहेर पडण्यासाठी वालीने बराच प्रयत्न केला पण जडशील शिळांनी बंद केलेले दार मोठ्या शर्थीचे प्रयत्न करुन गुहेच्या बाहेर आला.त्याला वाटले आपले राज्य बळकावण्यासाठीच सुग्रीवने आपल्याला गुहेत अडकवले.वाली किष्किंधात परत आल्यावर सुग्रीवाने त्याचे राज्य परत केले,पण वालीचे समाधान झाले नाही. त्याने सुग्रीवाला किष्किंधेतुन हुसकावुन तर लावलेच व त्याच्या बायकोला ताब्यात घेतले.एकप्रकारे वालीने तिचे अपहरणच केले होते.सुग्रीवाची हकिकत ऐकल्यावर राम त्याला अश्वास्त करत म्हणाले,लवकरच वालीला परास्त करु.

        सुग्रीवाला हुशार,बोलण्यात चतूर, बहुश्रुत,धूर्त राजनितिज्ञ सचिव हनुमाना च्या रुपात लाभला होता.हनुमान जसा इतर वानरांसारखा,तसेच इतर वानरे सुध्दा माणसांसारखीच!या वानरांची राजधानी किंष्किंधात घरेदारे थाटुन राहतात.यांच्यामधे पती-पत्नी,माता पिता भाऊ-बहिण अशी नाते होते.ही वानरे चांगली हुशार,शिक्षित,भल्याबुर्‍यांची जाण असणारी होती.यावरुन रामायणा तील वानरे म्हणजे माकडे नसुन ती वनवासी माणसे होती.चपाळीने डोंगर चढणे,निबिड रानांवनातुन सहजगत्या हिंडणे अथवा रावणसारखे अहंमन्य लोक वनवासी लोकांना तुच्छतेने वानरे म्हणत असावीत.इतिहासात नाही कां विजापुरचा आदिलशाहीचा सरदार अफझलखान, शिवाजी महारांजाना “पहाड का चुहा” असे तुच्छतेने म्हणायचा ना?

       श्रीरामाची पत्नी रावणाने व सुग्रीवाची पत्नी त्याच्या भावाने अपह्रत केल्यामुळे दोघेही समदुःखी होते. राजकिय दृष्ट्या समदुःखी आणि समशत्रु असलेला पक्ष एकत्र येऊन सत्ताधारी पक्षाला खेचायला एक होतात,तसेच एकच तत्वप्रणालीची वा एकच शल्य असणारी माणसे एकवटतात.

               क्रमशः
 संकलन ©® मिनाक्षी देशमुख.
          दि.  १०-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  – २४.

          ”  त्वं वयस्योsसि ह्रद्यो मेहयेकं दुखं सुखंच नौ” या सुग्रीवच्या श्रीरामाच्या मैत्रीच्या संदर्भातील उद्गारावरुन ही वस्तु स्थिती स्पष्ट होते.पराक्रमी रामाशी मैत्रीने खुष झालेला सुग्रीव त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रामाला विनवल्यावर राम म्हणाले,आजच आपण किष्कींधेला जाऊ,तूं पुढे जाऊन वालीला युध्दासाठी ललकार.ठरल्याप्रमाणे श्रीराम इतर लोकांसह किष्कींधेच्या बाहेर दाट झाडीत लपून राहिले आणि सुग्रीवाने भली मोठी गर्जना करत वालीला बाहेर बोलावले.सुग्रीव राजधानीत आलेला पाहुन त्वेषाने वाली बाहेर येऊन सुग्रीव च्या अंगावर धावून गेला.दोघेही सारखेच बलिष्ठ,त्यामुळे त्यांचे युध्द चांगलेच जुंपले.वालीचे पारडे भारी पडत होते. वाली आणि सुग्रीव दोघांचीही शरिरयष्टी, शारिरीक हालचाली,वेष,आवाज,रुप, दृष्टी,पराक्रम या सर्वात इतके साम्य होते की,वालीला मारण्यासाठी बाजुच्या झाडीत लपलेल्या रामांना वाली व सुग्रीव  मधला फरक न समजल्यामुळे ते वाली वर बाण सोडु शकत नव्हते.त्यामुळे भरपुर मार खाल्लेला सुग्रीव रणांगण सोडुन मातंगवनांत पळुन गेला.रडकुंडीस आलेला सुग्रीव म्हणाला,हे रघुनंदना! आपल्या भरवशावर मी वालीशी लढण्या स तयार झालो,पण आपण मात्र कांहीच केले नाही,असे कां केले?तुमच्या दोघांतील साम्यामुळे,माझ्या बाणाने तुलाच मृत्यु आला असतां तर,मी स्वतःला कधीच माफ करुं शकलो नसतो

         यावेळी डोळ्यात ठळच भरणारी गर्द रंगाची गजपुष्पी वेलीच्या फुलांची माळ सुग्रीवाने खुणेसाठी गळ्यात घालुन  परत वालीच्या नावाने शंख करत निघाला. राम धनुष्य सज्ज ठेवुन पुर्वी प्रमाणेच झाडीत लपुन राहिले.ज्यावेळी सुग्रीव गर्जना करत किष्कींध नगरींत शिरला त्यावेळी वाली अंतःपुरात होता. सुग्रीवाची ललकारी ऐकुन रागाने खळबळुन सुग्रीवाशी सामना करण्यास वाली निघाला,तेव्हा त्याची पत्नी तारा, जीला पुढील घडणार्‍या घटनांची जाणीव होत असे,ती वालीला जाण्यापासुन अडवत म्हणाली,हे महाबली!आपल्या क्रोधाला आवरा!आपण बलवान पराक्रमी वीर असलांत तरी,यावेळी एकदम बाहेर पडणे मला ठीक दिसत नाही.सुग्रीव नुकताच पराभूत होऊन परत गेलेला,तोच सुग्रीव कांही वेळातच पुन्हा परत येऊन आपल्याला लढण्यास उद्युक्त करीत आहे हे संशयास्पद वाटते. कोणाच्यातरी प्रबळ मदतीशिवाय तो धाडस करुं शकत नाही.शिवाय राजपुत्र अंगद व गुप्तहेरांकडुन असेही कळले की अयोध्येचे राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण बाजुच्या वनात आलेले आहेत.ते दोघेही दुर्जय आहेत.त्यांच्या सहाय्याने जर सुग्रीव लढत असेल तर,श्रीरामा बरोबर संघर्ष करणे ठीक नाही.त्यापेक्षा सुग्रीवाशी समझौता करावा.

         ताराचा बौध्दीक सल्ला वालीला पटला,पण बलहीन सुग्रीवासमोर युध्दाला न जाणे भ्याडपणाचे आहे.समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे राम त्याच्या पाठी असले तरी ते अन्याय करणार नाही.काळजी करुं नकोस.सुग्रीवाला परास्त करुन लवकरच परत येतो….

        सुग्रीव वालीची घनघोर युध्द सुरु झाले.सुग्रीवाची ताकद कमी पडुं लागली.  सुग्रीव संकटांत आहेसे पाहुन,श्रीरामांनी आपला अमोघ बाण नेम धरुन वालीवर  सोडलेला बाण जळत्या उल्केसारखा प्रज्वलित रामबाण वालीच्या छातीत रुतल्याने वाली धरणीवर कोसळला.

        मृत्युमुखी वाली,श्रीराम त्याचजवळ आल्यावर म्हणाला,रामा! तुम्ही दशरथ राजाचे सुविख्यात पुत्र,सगळ्यांना प्रिय, तुमचे माझे कांहीही वैर नसतांना,पाठी मागुन वार करुन मला ठार करण्याने काय मिळविले?यात तुमचा काय मोठेपणा?तुम्ही व्यक्तीगत आणि राज्य शास्रांच्या गुणांनी श्रेष्ठ आहांत ही ख्याती ऐकुन,माझी पत्नी ताराने,सुग्रीवाशी युध्द करण्यास मनाई करीत असतांनासुध्दा, आपल्यावर असलेल्या विश्वासाने मी लढाईत गुंतलो असतां,आपण मला वेधले.आज समजले की,धार्मिकपणाचे केवळ आपले ढोंग आहे.मी आपल्या प्रदेशाला,नगराला कधी उपद्रव दिला नाही की,अवहेलना केली नाही असं असतां माझ्यासारख्या निरपराध्यास मारुन सत्षुरुषांना कसे तोंड दाखवुं शकाल?

       आपण केवळ सुग्रीवसाठीच मला मारले ना?सीताच्या शोधाचे काम मला सांगीतले असते तर एका दिवसांत शोधले असते.मी मरणाला भीत नाही,पण तुम्ही मला कां मारावे याचे स्पष्टीकरण देता येत असल्यास पहा….

               क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
         दि.  ११-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग – २५.

        वालीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत श्रीराम म्हणाले, हे वाली!तूं आपल्या सनातन धर्माचा त्याग करुन स्वतःच्याच लहान भावाच्या पत्नीचे अपहरणच केले नाही तर,शारिरीक सहवास केला,हे सर्वात मोठे पाप आहे,आणि म्हणुनच तूं शिक्षेस पात्र आहेस.

           वालीचा पक्ष चुकीचा होता म्हणजेच पापाचरणाचा होता.राजनैतिक दृष्ट्या सिंहासनारुढ बलाढ्य वालीचा पक्ष घेऊन त्याचेशी सख्य करुन मदत घेतली असती तर,पर्यायाने पापाचरणाला मदत केल्यासारखे झाले असते,आणि सुग्रीवाला स्री-अपहरणाच्या न्यायापासुन वंचित व्हावे लागले असते.इथे रामाने साधन सूचिता पाळली.रामावर निष्ठा असलेल्या गांधीजींनीसुध्दा राजकारणांत साधनसूचितेवर भर दिला होता.

       श्रीरामाने लपुन केलेल्या हल्याला वाली आक्षेप घेतो,पण महाभारतातील धर्मयुध्दाच्या कल्पनेला धरुन तो बोलत नाही.महाभारतांतील युध्द आपसांतील कौरवपांडवांचे,एकाच वंशातील असलेले त्यांचे आजोबा भीष्माचार्यांनी युध्दाचे कांही नियम घालुन दिले होते.भ्रातृव्दारा परिग्रह  हा न्याय समजला असतां तर, रामाने वालीवर उगाच हल्ला केला असे म्हणण्याचे धाडस झाले नसते.वालीला आपल्या भ्रातृभार्येशी रत होण्याचा अपराध समजुन आल्याने,पश्चातापदग्ध वाली म्हणाला, रघुनंदना!माझा पुत्र अंगदाआणि भाऊ सुग्रीव यांना सांभाळावे असे म्हणुन वालीने आपले प्राण सोडले.

          वालीच्या मृत्युनंतर सुग्रीवाचा राज्याभिषेच होऊन किष्कींधाचे वानर राज्य सांभाळायला सुरुवात केली.वाली पुत्र अंगदला सुध्दा युवराजपद देण्यात आले.लवकरच पावसाळा सुरु होत असल्यामुळे, लढाईस हा काळ योग्य नसल्यामुळे,रामलक्ष्मणाने ऋष्यमूक पर्वतराजीतील प्रस्रवणगिरीवर एका प्रशस्त गुहेत वर्षाकाळ घालवण्याचे ठरवुन,पावसाळा संपल्यावर कार्तिक मासाच्या सुरुवातीला रावणाचा पाडाव व सीताचा शोध घेण्याचे ठरविले.गुहेबाहेर सपाट शिळा असल्याने विश्रांतीसाठी मोकळ्या हवेत बसण्याची छान सोय होती.जवळच्या त्रिकुट पर्वताजवळ तुंग भद्रा नदी वाहत होती.अर्जुन व चंदनाच्या वृक्षांनी सृष्टी रमणीय होती,अशा वातावर णांत वास्तव्य आंददायी असले तरी,  श्रीरामाचे मन खिन्न,अस्वस्थ होते.त्यांची प्राणप्रिय प्रिया हरवली होती.शोकमग्न व चिंतातूर रामांना वारंवार समजावत लक्ष्मण म्हणाला,प्रभो!मनांतील शोक नष्ट करुन,चित्त सुस्थिर असले तरच पुढील उपाययोनांचे बेत केल्यास आपल्याला रावणाचा व राक्षसांचा नाश करतां येईल.रामाने स्वतःला सावरले.

         पावसाळा संपला तरी,ऐषारामात मग्न सुग्रीवाने रामांना मदत करण्याचे दिलेल्या वचनाचे विस्मरण झाल्यामुळे, लक्ष्मणाने कडक शब्दात सुग्रीवाची कान उघाडणी केल्यावर मात्र,सुग्रीवाने हनुमानामार्फत सर्व दिशांकडुन वानरांना किष्किंधात एकत्र जमण्याचा आदेश दिल्यावर, सर्व वानर यूथपती आपापली सेना घेऊन दाखल झाली.सुग्रीव म्हणाला

श्रीरामा!ही सर्व सेना आपल्या आज्ञेत राहतील.रामांना खुप आनंद झाला.प्रेमाने सुग्रीवाचे हात हातात घेऊन म्हणाले, प्रथम सीतेचा शोध लागल्यावर तीची सुटका आणि रावणाचा पराभव यावर आपण सर्व एकत्रीत बसुन विचारपुर्वक निर्णय घेऊं.

        श्रीरामाच्या आदेशानुसार वानरां च्या तुकड्या चारही दिशेने सीतेच्या शोधासाठी पाठविण्यात आल्या.यासाठी सुग्रीवाने संपुर्ण पृथ्वीचा नकाशाच समोर ठेवला.पूर्व दिशेकडे जाणारी तुकडी गंगा यमुना काठचा प्रदेश,विदेह,मालव,काशी, कोशल,मगध,ब्रम्हमाल(ब्रम्हदेश) असे जाऊन पुढे यवद्वीप(जावा) सुवर्णद्वीप (सुमात्रा) असे जात सुदर्शन द्वीप म्हणजे सध्याचा जपानपर्यंत पूर्वेला शोध घेणार.जपानला आतां सुध्दा Land  of Rising Sun असे म्हणतात.यापुढे मात्र जातां येणार नाही कारण पुढे ॲटलांटिक महासागर आहे.

         दक्षिणेकडे जाणारी वानर तुकडी विदर्भ,वंग,कलिंग,कौशिक,दंडकारण्य,आंध्र,पुंड्रु,चोल,केरळ, असा प्रवास करुन लंकेत सीतेचा शोध घ्यायचे ठरले.

                  क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
         दि.  ११-३-२०२१.

                         

अभिनव रामायण  संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading