आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

याज्ञसेना द्रौपदी संपूर्ण भाग ४, (१५ ते २१)
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
याज्ञसेना द्रौपदी
*द्रौपदीः*
*भागः-१६*
सेनापती किचकाचा वध झाल्यामुळे कोणीही मत्सदेशाकडे वाकड्या नजरेने न पाहणारे सुध्दा आता त्रिगर्तराज सुसशर्मा विराट नगरीवर चालुन आला. त्याच्या प्रतिकारार्थ विराट राजाबरोबर युधीष्ठीर, भीम, नकुल, सहदेव हे सुध्दा त्यांचे सोबत निघालेत. माघारी शुन्यपाल *युवराज ऊत्तर* फक्त राज्याचे रक्षणार्थ थांबला होता. पण त्याचवेळी वार्ता येऊन थडकली की, गौहरणासाठी प्रत्यक्ष कौरवसेना मत्सदेशावर चालुन आलेत. युवराज काही फार विक्रमी नव्हता. परंतु पित्याच्या माघारी जबाबदारी सांभाळणे भाग होते, तो चिंतेत असतांनाच द्रौपदीच्या सांगण्यावरुन बृहन्नडाच्या वेशात अहलेल्या अर्जुनाला सारथी म्हणुन युवराज उत्तरच्या सोबत गेला. अर्जुनाला मिळालेल्या शापाचा एक वर्षाचा कालावधी सुध्दा आताच संपला होता.
कौरवांचा पराभव करुन युवराज उत्तर परत आलेत. युवराजाने अर्जुनाच्या पराक्रमामुळेच विजय प्राप्त झालेचे सांगीतले. विराट नगरी आंनदाने न्हाऊन निघाली.
एक वर्षाचा अज्ञातवास संपल्यामुळे तिसरे दिवशी सर्व पांडव प्रगट झालेत.या आनंदाप्रित्यर्थ विराट महारांजानी त्यांची कन्या उत्तरा अर्जुनाला देऊ केली. पण अर्जुनाने सांगीतले की ती माझ्या कन्येप्रमाणे आहे, त्यामुळे तिचा विवाह *अर्जुनपुत्र अभिमन्युशी* झाला. अभिमन्युसह द्रौपदीचे पाचही पुत्र आले असल्याने त्यांच्या भेटी झाल्यात. जेव्हा द्रौपदी पुत्रांनी जेव्हा आईला सांगीतले की,” आई तुझ्या अपमानाचा बदला घेऊ” याच ध्यासाने आम्ही मोठे झालोत. हे ऐकुन द्रौपदी *कृतार्थ* झाली.
*तेरा वर्षाच्या वेदना एका क्षणात नष्ट झाल्यात.*
जेव्हा कृष्ण द्रौपदीला वचन देतो की, तुझ्यावरच्या अन्यायाचा सुड नक्की घेतल्या जाईल ,तेव्हा ती कृष्णाला म्हणते की, जर द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध घेतला गेला नाही तर जगात स्री अब्रुला कवडीमोलाची किंमत राहणार नाही. द्रौपदीच्या वेदना कल्पांतापर्यंत जगाला भेडसावत राहतील. तीची धडपड होती अन्यायाचा सुड घेण्यासाठी. जेव्हा तीला कळले की, कृष्णाची शाष्टाई फसली, युध्द अटळ आहे तेव्हा तीला आनंद लपवणे अशक्य झाले.
कौरवांना त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त द्यायला कौंतेय युध्दभूमीकडे निघालेत. द्रौपदीसह सर्व राजस्रियांना उपसव्य नगरीत संरक्षणात ठेवुन सात औक्षणी सेना कुरुक्षेत्राच्या दिशेने कुच झाली. युध्दाला तोंड लागले.
नऊ दिवस घणघोर युध्द झालं. दहाव्या दिवशी पितामह भीष्मांचा वध झाला. तेराव्या दिवशी द्रोणाचार्यांनी रचललेल्या चक्रव्युहात सोळा वर्षाचा एकटा अभिमन्यु दिव्य पराक्रम करुन लढता लढता धारातीर्थी पडला. त्यातुनच दुसर्या दिवशी अर्जुनाने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे *सुर्यास्तापुर्वी जयद्रथाचा वध केला.* जयद्रथाचे मस्तक त्याच्या वडीलांच्या मांडीवरच पाडण्याबद्दल श्रीकृष्णाने अर्जुनाने सांगीतले, कारण शंकराच्या वराप्रमाणे जर मस्तक खाली पडले असते तर *ज्याच्याकडुन जयद्रथाचे मस्तक खाली पडेल त्याच्याही मस्तकाचे ५६ तुकडे पडले असते.*
हा येवढा भयानक नरसंहार पाहुन द्रौपदीचे मन आक्रंदु लागले.ती स्वतःच स्वतःला विचारु लागली! द्रौपदी….. द्रौपदी काय केलेस तू हे? स्वतःच्या अब्रुसाठी, प्रतिष्ठेसाठी तू….. तू….. या सर्वांच्या आयुष्याची दैना केलीस?
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*भागः-१७*
युध्दातील एवढा संहार पाहुन द्रौपदीच्या मनाची द्विधा स्थिती झाली. ती कृष्णाला म्हणाली, “कृष्णा, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत झालेली विटंबना तर विसरणे शक्य नाही परंतु या सर्वाचा बळी देऊन द्रौपदीची अब्रु सर्वांच्या प्राणाहुन मोठी नाही.”
तीचे बोलणे एकुन कृष्ण संतापाने ओरडुन म्हणाले, “कोण तुझे पती? कोण तुझे पुत्र? कोण तुझे पिता नी बंधु? आणि मी तरी कोण तुझा? आता हे सर्व फक्त क्षत्रीय आहेत. हा लढा *असत्याविरुध्द सत्याचा* आहे. अखिल मानवजातीचा संहार झाला तरी चालेल, पण तत्वासाठी सत्याचा ध्वज खाली पडता उपयोगाचा नाही.”
कृष्णाचे असे बोलणे ऐकुन तीने ठरविले की, यानंतर स्थितप्रज्ञासारखे निष्ठुर, पाषाणह्रदयी होऊन जे जे होईल ते फक्त निर्विकारपणे पहायचे. अश्रुंचा एकही थेंब डोळ्यातुन पाडायचा नाही.
द्वितिय सेनापती *आचार्य द्रोणाचार्य.* त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. ते आटोपत नाही असे पाहुन युक्तीने अश्वत्थामा मेला अशी आवई उवल्यामुळे त्यांनी शस्र संन्यास घेतल्यावर धृष्टद्युम्नने त्यांचा वध केला. त्याने त्याच्या वडीलांचा सुड घेतला. वास्तविक द्रोणाचार्यांना माहीत होते, अश्वत्थामा चिरंजीवी आहे. पण त्यांना विसर पडला.
त्यानंतर तृतीय सेनापती कर्ण झाला. घणघोर युध्द झाले. त्यातच भीमाने दुशाःसनाचा भीषण वध करुन प्रतिज्ञा पुर्ण केली. आणि त्याच्या रक्ताने द्रौपदीच्या केसांना अभिषेक केला. १७ व्या दिवशी कर्णाचा रथ भूमीत रुतुन बसलेला असतांना निशस्र, असहाय्य असलेल्या कर्णावर कृष्णाने अर्जुनाला शस्र चालवायला सांगीतले.आणि त्याचा अंत झाला. आता फक्त अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा शिवाय कोणीही कौरवांकडेचे शिल्लक राहिले नाहीत.
कर्ण धारातिर्थी पडल्यावर खरं म्हणजे कौरवसेनेचा धीर खचला. पण दुर्योधनाने १८ व्या दिवशी शल्याला सेनापती करुन अठराव्या दिवसाच्या निर्णायक युध्दासाठी कौरवसेनेला कसंबसं प्रेरीत केले. युध्द सुरु झाले. युधीष्ठीराने *अमोधविर्य* शक्तीने शल्याचा वध केला. त्याचवेळी सहदेवाचा बाण लागुन शकुनीचा पण अंत झाला. दुर्योधनाने पाहिले मात्र, ज्याच्या जीवावर आयुष्यभर पांडवांविरुध्द कुटील, स्वार्थी डाव खेळला, त्याचा सख्खा मामा गांधारनरेश शकुनी खाली पडलेला पाहुन त्याचा धीर खचला. दुर्योधनानं युध्दभुमीचा त्याग करुन भ्याडासारखा जवळच्याच एका जलाशयात लपुन बसला. त्याचा शोध घेऊन भीमाच्या ललकारण्याने तो बाहेर आला. दोघांचे भीषण गदायुध्द सुरु झाले. भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर जोराचा प्रहार करुन त्याची मांडी छिन्न भिन्न केली.आणि दुर्योधनाचा अंत झाला.
अखेर एकदाची युध्दाची सांगता झाल्याचे पाहुन द्रौपदीने समाधानाचा सुस्कारा टाकला. पण! तीला काय माहिती नियती पुढे काय खेळणार आहे? कोणता प्रसंग तीच्या समोर वाढुन ठेवला आहे?
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*द्रौपदीः*
*भागः-१८*
कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कृतवर्मा तिघेही एका रथात बसुन घनदाट अरण्यातील एका मोठ्या शिळेवर जाऊन बसलेत. आणि अश्वत्थामा एकाएकी ओक्सीबोक्सी जोरजोराने रडु लागला. दुर्योधनाला अधर्माने मारल्या गेले. मी माझ्या वडीलांचा व दुर्योधनाच्या वधाचा सुड घेतल्याशिवाय समाधान लाभणार नाही. अजुन कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा जिवंत आहे.
तिघांनीही त्या शिळेवर झोपण्याचा प्रयत्न केला. दोघांना तर लागली झोप. पण अश्वत्थामाला झोप येणे शक्यच नव्हते. विचार करता करता त्याच्या डोक्यात एक शैतानी विचार आला, त्याने कृपाचार्य व कृतवर्माला हलवुन उठवले, आणि सांगीतले की, हा पांडवांच्या संहारासाठी आताच निघायचेय. पांडवांना निद्रावस्थेत गाठुनच सर्वांची कत्तल करायचीय. कृपाचार्यानी त्याला परावृत्त करायचा बराच प्रयत्न केला पण तो काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
रथ तिघांना घेऊन पुनः कुरुक्षेत्राच्या दिशेने धावु लागला. रात्र जीव मुठीत घेऊन पुढच्ं संहारनाट्य बघायला बसली होती.
एकदाची युध्दाची सांगता झाली या जाणीवेने सर्वजण बिनधास्त निद्रीस्त झाले होते. सर्वप्रथम अश्वत्थामाला धृष्टद्युम्न दृष्टीस पडला. अश्वत्थामाने त्याच्या छातीवर प्रहार करुन त्याचा वध केला. युधामन्युलाही त्याने त्याच वाटेने पाठविले. उत्तमौजाने गदा घेऊन धावला असतां त्याचेही मस्तक खडगाने धडावेगळे केले. शिखंडी आणि प्रभद्रकाचेही मस्तक ऊडवले. तेवढ्यात कृतवर्माने शिबिराच्या तीन्ही बाजुंनी आग लावली. पांचालांचा पुरता संहार करुन अश्वत्थामाने प्रतिविंधच्या कुशीत तलवार खुपसुन त्याचा वध केला. सुतसोमाची छाती फोडली. शतानिकालाही सोडले नाही. श्रृतकर्म्याच्या मुखावर वार करुन त्याचा चेहरा छिन्न भिन्न केला. श्रृतकीर्ती प्रतिकार करत असता त्याचेही शीर धडावेगळे केले. आणि तिघेही जसे आले तसे अंधारात लुप्त झाले. रात्र मात्र त्यांचं हिंस्र कृत्य पाहुन आक्रंदत होती स्फुंदत होती.
हा सर्व संहार पाहणारा साक्षीदार धृष्टद्युम्नाचा सारथी विश्वसेन कसाबसा जिवंत सुटल्यामुळे ही वार्ता सांगण्यासाठी द्रौपदीकडे धावला. अश्वत्थामाने कसा निर्घुण संहार केला याचे वर्णन केले.
पांचही पांडव गलीतात्र झालेत. त्यांच्या दुःखाला तर पारावार राहिला नाही.
आणि द्रौपदी तीचे तर गात्र न् गात्र बधीर झाले. पाषाणवत होऊन निश्चल अशी शुन्य दृष्टीने बसुन राहिली.कंठाशी आभाळाएवढा हुंदका कंठाशी अडकला. खुपखुप आक्रोश करुन रडावसं वाटत होत तीला, डोक बडवुन रक्ताचं सिंपन करावं, प्राण जाईपर्यत आक्रोश करावा, पण गळा ठणकत होता. वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली झाला. पण हुंदका बाहेर पडत नव्हता.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*द्रौपदीः*
*भागः-१९*
द्रौपदीची घुसमटलेली विकल अवस्था पाहुन पांडव अतिशय चिंतेत पडले. तेवढ्यात श्रीकृष्ण तीथे आला. त्याच्या चेहर्यावरचे उपहासात्मक स्मितहास्य पाहुन तीच्या थेट दाटल्या उरात घुसलं, क्षणभर ढवळुन आलं. गळ्याची शीर तटकण ताणली पण हुंदका फुटलाच नाही. श्रीकृष्णाने युधीष्ठीराला सांगीतले चिंता करु नकोस. तीला दुःख पचवायची सवयच आहे. पुत्रांच्या नी बंधुच्या मृत्युने रडण्याइतकी कमकुवत नाही. ती जाणते की, मातृभुमीच्या रक्षणार्थ धारातीर्थी पतन पावणार्या वीरांसाठी रडायचं नसतं.
कृष्ण निर्दयपणे हसत होता. तीचे पांच पुत्र, दोन भाऊ गेल्याचे त्याला कांहीही वाटत नव्हते. हे पाहुन तीचे मन पेटुन उठले. कृष्णाच्या हसण्याची ठिणगी तीच्या हुंदक्या भरल्या उरात घुसली. एक भयंकर विस्फोट झाला. आणी ती ताडकन उठुन त्याचे उत्तरीय दोन्ही हातांनी घट्ट पकडुन त्याच्यावर ओरडली, “कृष्णा तू नीच, उलट्या काळजाचा आहेस. हे एका मातेचे, बहिणीचे ह्रदय आहे. मी रडणारच.”
आणि ती रडलीच, आकाश फाटुन पाऊस पडावा तशी रडली. त्यावेळी तीच सांत्वन करण्यास सर्व असमर्थ होते.
कृष्णाने तीच्या खांद्यावर सांत्वनपर हात ठेवला. शेवटी तीच्या शोकालाही मर्यादा होत्याच ना…!
ती म्हणाली, “ज्याने पांचही पुत्रांचा, दोन्ही भावांचा वध केला, त्याचा वध करणारे हातच माझे फक्त माझे अश्रु पुसु शकतील.”
त्यावर भीमाने गर्जना केली, “त्या पापी अश्वत्थामाला सजा देऊनच तुझे अश्रु पुसायला येईन अन्यथा हे हात जाळुन टाकीन.” असे म्हणुन भीम निघाला त्यापाठोपाठ बाकीचे निघालेत.
पांडव आपल्याला जिवंत सोडणार नाही हे जाणुन अश्वत्थामा महर्षी व्यासांच्या आश्रयाला आला. पण त्यावेळी व्यासमुनी समाधीस्त होते. या सर्वांना पाहुन त्याची अवस्था दोन्ही दरडीत सापडल्या सारखी झाली. तो ब्रम्हशिरस्र सोडतो आहे हे पाहुन कृष्णाने अर्जुनाला तेच अस्र सोडायला सांगीतले. दोन अमानवी शक्तीचं ते भीषण युध्द होत. समाधी भंग पावलेले व्यास मुनी अश्वत्थामावल कडाडले, अरे हे अस्र मानवावर सोडायचे नसते. पृथ्वी निर्वंश होईल, बारा वर्षे पर्जन्यवृष्टी होणार नाही की, धरणीला अंकुर फुटणार नाही. दोघेही अस्र मागे घ्या. अर्जुनाने मागे घेतला, पण अश्वत्थामाला अस्र मागे घेता येत नव्हते, कारण तो सोडायलाच फक्त शिकला होता, मागे घ्यायची कला त्याला अवगत नव्हती.
शेवटी ते अस्र उत्तरेतल्या गर्भावर सोडण्यात आले. संतापुन श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला, तू कधीच मुक्त होणार नाहीस, रोगराईने जर्जर होऊन हजारो वर्षे या भुतलावर भटकत राहशील. माणुस तर सोड पण पशुपक्षीही तुझ्या सावलीला उभे राहणार नाही. कृष्णाचा शाप ऐकुन अश्वत्थामा गर्भगळीत झाला. त्याने कृष्णाची माफी मागीतली. त्यावर कृष्ण त्याला म्हणाला, “तुझ्या माथ्यावरचा मणी भीमाला देऊन टाक.” त्यानुसार तो दिव्य मणी ओरबडुन काढुन भीमाच्या स्वाधीन केला. आणि
भ्रमिष्टासारखा पळत सुटला. त्याच्या दर्दभर्या आवाजातील गीत वातावरणात प्रतिध्वनीत झालं.
*रक्त नको मज मुक्ती हवी*
*तडफडणार्या या देहाला।*
*एक अनामिक तृप्ती हवी।*
*रक्त नको मज मुक्ती हवी।*
अश्वत्थामाचा असा शोकांतीक शेवट झाला. आणि द्रौपदीला समाधान मिळाले.
*क्रमशः*
*दौपदीः*
*भागः-२०*
द्युताच्या सारीपाटावर सर्वस्व गमावल्यावर पांडवासह द्रौपदी जेव्हा वनवासाला निघाली तेव्हा राजमाता कुंतीचा निरोप घेतेवेळी कुंती द्रौपदीला म्हणाली होती ” तू पांडवांची पत्नी म्हणुन नाही तर त्यांची माता म्हणुन त्यांची सोबत कर”.
पण कुंतीला ना पांडवांची, ना पुत्रांची माता होता आली.
रणदेवतेला प्रसन्न करण्याकरितां लक्षावधी योध्यांच्या प्राणांच्या समिधा युध्दाच्या होमकुंडात टाकाव्या लागल्यात. त्यात कितीतरी रक्तमासांचे, पूजनीय, आदरणीय, अवध्य होते.
आज चौदा वर्षानंतर गेलेले साम्राज्य पुनःश्च मिळवुनही आनंदापेक्षा दुःखानेच अंतःकरण दाटुन आलीत. या विजयासाठी जबरदस्त किंमत मोजावी लागली.
निष्पाप भोळ्या भाबड्या अभिमन्युचा वध, पांच पुत्रांचा वध द्रौपदी कधीही विसरणे शक्य नव्हते.श्रकुंतीदेवीच्या पायावर अश्रूंचा अभिषेक करतांना द्रौपदीला हे सर्व आठवत होते. कुंती तीला उठती करुन म्हणाल्या, “द्रौपदी तु खूप सोसलस, तुझ्याएवढं दुःख कोणत्याही स्रीच्या वाटेला आली नसतील. या समुद्र मंथनातलं अमृत तू दुसर्यांदा दिलंस आणि स्वतः हलाहल प्राशन केलस.”
“हे भाग्य, येवढी शक्ती युगांयुगांमधुन फक्त एखाद्यालाच मिळते. द्रौपदी तू आता सर्व विसरुन जा. आणि तुझ्या पतींनी स्वपराक्रमाने मिळवलेल्या सम्राजाची ऊपभोक्ती हो. सम्राज्ञी हो.”
अशाप्रकारे कुंती बोलत असतांनाच गांधारीसह धृतराष्ट प्रवेशले.
धृतराष्टानी पांडवांना भेटीला बोलावले. युधीष्ठीराची भेट झाल्यावर त्यांनी भीमाला भेटण्याचा आग्रह धरला.तिथे कृष्ण हजर असल्यामुळे भीमावरच्या जीवावरचे संकट टळले. नाहीतर भीमाऐवजी ज्या लोखंडी पुतळ्याचा भीम समजुन धृतराष्टाने चुर्ण केले तसे चुर्ण भीमाचे झाले असते. गांधारीदेवींनीही पांडवाना आशिर्वाद द्यावा असे जेव्हा कृष्ण म्हणाला तेव्हा त्या विखारी नागीणी सारखा फुत्कार टाकुन कृष्णाला म्हणाल्या, “कृष्णा या सर्व नाशाला केवळ तू कारण आहेस! तू सर्वज्ञानी होतास, तू जर मनापासुन प्रयत्न केला असता तर हे युध्द झालच नसतं. पण तुला द्रौपदीच्या विटंबनेचा प्रतिशोध घ्यायचा होता ना!”
तेव्हा कृष्ण गांधारीला म्हणाला, “तेवढ्यासाठीच हे युध्द घडवुन आणले नाही. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर मनुष्यप्राण्याची उत्पत्ती वाढते धरणीला भार होतो, माणुस उन्मत्त, बेबंद बनतो. तेव्हा निसर्गाला मनुष्य संहाराशिवाय. सर्वनाशासाठी महायुध्दांवाचुन दुसरा पर्यायच उरत नाही.”
त्यावर गांधारी म्हणाली की, “कृष्णा तुझे कार्य अपुर्ण आहे. यदुवंशाचा नाश अजुन बाकी आहे. आज पासुन ३६ वर्षांनी तुझ्या यादव कुलाचाही नाश होईल. तू तुझ्या डोळ्याने बघशील पण तो संहार तू रोखु शकणार नाहीस. जीचे शंभर पुत्र रणांगणांत उन्मळुन पाडलेस त्या मातेचा शाप आहे हा तुला.”
श्रीकृष्णाने तथास्तु तथास्तु म्हणुन डोळे मिटुन घेतले.
आणि द्रौपदी, तीचा संरक्षक, प्राणप्रीय सखाच्या बाबतीत ही घटना घडत असलेले बघुन मुक अश्रु ढाळत होती.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*द्रौपदीः*
*अंतीम भाग :- २१
ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोषात असंख्य कुरुस्रिया व पुरुष भरल्या अंतःकरणाने आपापल्या मृतवीरांना उदकांजली वाहत होते. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती गंगेच्या तीरावरल्या मंदिराच्या पायर्यावर बसुन हे सर्व बघत होते. युधिष्ठीर चारही भावांसहित तिलांजली देऊन पाण्यातुन वर येऊ लागले.
तेव्हा कुंतीने युधिष्ठीराला सांगीतले की, *कर्णाला तिलांजली दे,* युधिष्ठीराने कारण विचारल्यावर कर्णाचे जन्मरहस्य सांगावे लागले. त्यावर युधिष्ठीराने संतापुन शाप दिला, की, *समस्त स्रीजातीच्या मनात कोणतीच गोष्ट लपुन राहणार नाही.*
द्रौपदी विचार करत होती की, नियतीने ही थट्टा कोणाची केली? *कर्णाची की तीची?* जर त्यावेळी कर्ण क्षत्रिय आहे हे कळले असते तर, तीच्या आयुष्याची खिरापत तरी झाली नसती. कदाचित हा भयंकर मनुष्य संहार टळला असता.
युध्दात विजय मिळवल्यानंतर युधीष्ठीर हस्तीनापुरचे सम्राट झाले. उत्तरेच्या पोटी जन्मलेल्या मृत बालकाला कृष्णामुळे जीवदान मिळाले. पुढे हाच बालक *परिक्षीत* नावाने पांडवाच्या गादीला वारस मिळाला. युधिष्ठीरांनी अश्वमेध यज्ञ करुन तिन्ही लोकी किर्ती मिळवली.
छत्तीस वर्षे उलटुन गेलीत या सार्या गोष्टींना. अनुकुल प्रतिकुल परिस्थीतीत हस्तीनापुरची सम्राज्ञी म्हणुन द्रौपदी मिरवली होती. पन्नास वर्षापुर्वी द्युतामधे सर्वस्व गमावल्यावर जसा सर्वस्वाचा त्याग करुन अनेक दुःख, वेदना उरीपोटी घेऊन वनवासाला निघाले होते, तसेच आज पुनः सर्वस्वाचा त्याग करुन *वल्कलं* परिधान करुन पुनः एकदा *शेवटच्या महायात्रेला महाप्रस्थान* केले.
अखेरचा तो मुक्काम, काहीही न खाता पिता पुर्वेला तोंड करुन जीथे पाय थकतील, जीथं त्राण संपेल तिथे देह ठेवुन मृत्युची प्रतिक्षा करीत धरतीवर पडुन राहायचं!
यापुर्वीच धृतराष्ट्र, गांधारी, विदुर, कुंती यांनी वानप्रस्थाश्रम स्विकारला होता. सारं चैतन्य युधिष्ठीराला अर्पण करुन विदुराने देह ठेवला. ज्या अरण्यात धृतराष्ट्र ,गांधारी, कुंती वास्तव्याला होते त्या अरण्यात वणवा भडकला आणि तिघांचाही अग्नीदेवतेने बळी घेतला. बरोबर छत्तीस वर्षाने श्रीकृष्णाचा पण अंत झाला. ज्या दिवशी श्रीकृष्णाचे महानिर्वाण झाले, तेव्हाच पांडवांनी अभिमन्युपुत्र परिक्षीताला गादीवर बसवुन महाप्रस्थानाला निघालेत.
पांडवांसह द्रौपदी खुप चालुन आलेत. ती खुप थकली, पायातले त्राण संपले, प्राण कंठाशी आले आणि ती खाली कोसळली. भीमाने युधीष्ठीराला आवाज दिला, यावर ते म्हणाले या यात्रेत कुणीच कुणासाठी थांबायचे नसते. ती सर्वाआधी पडण्याचे कारण ती पक्षपाती होती. आपणांपेक्षा तीने *अर्जुनावर जास्त प्रेम केले.*
द्रौपदी मृत्युदारी असतांनाही तीच्या मनाला डागण्या दिल्या गेल्यात. मनाच्या असह्य वेदनांनी तळमळत असतांनाच सरपट येऊन अर्जुनाने तीला साद घातली. तीने मागीतलेल्या वचनानुसार पुढच्या जन्मी फक्त द्रोपदीचेच होईल असे अभिवचन देऊन मोठ्या समाधानाने दोघेही एकमेकांच्या बहुपाशात मृत्युची प्रतिक्षा करीत पडुन राहिलेत. थोड्याच अंतरावर भीम, नकुल, सहदेव पडलेले होते. आणिाएकटे युधीष्ठीर त्यांच्या प्रिय श्वानाबरोबर पुढे पुढे जात होते.
!!! समाप्त !!!
संकलन-मिनाक्षी देशमुख




