आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

119.शुद्ध वारकरी हरिपाठ :- संत ज्ञानेश्वर महाराज व गुरुपरंपरा अभंग, पहा, लिहा, ऐका
Sant Dnyaneshwar Maharaj Haripath
शुध्द वारकरी हरिपाठ पाहा ऐका वाचा
संत ज्ञानेश्वर महाराज कृत
शुध्द हरिपाठ
संपादक-प्रकाशक-लेखक
ह.भ.प. धनंजय महाराज मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
सूची
प्रस्तावना
हरीपाठाचे नियम
हरिपाठ अभंग सूची
गुरुपरंपरेचे अभंग
विनवणी व उपसंहार
वारकरी सांप्रदाय म्हणजे काय(मराठी)
वारकरी सांप्रदाय म्हणजे काय (हिंदी)
आमचे ईतर सॉफ्टवेअर
प्रस्तावना
आज च्या या घडीला मानव, संत विचारापासून दूर जात असल्याने त्याला सामाजिक भाना बरोबर आध्यात्मिकभान हि नाही, त्यामुळे सुख, समाधान, दया, करुणा, सेवा, ममता, कर्तव्य, जबाबदारी, इत्यादींच त्याला काही देण घेण नाही अस दिसून येत. कारण त्यान भौतिक साधनांचा अंगीकार करून तो त्यात गुरफटून गेला आहे. (उदा. MOBILE, TAB, COMPUTER, LAPTOP, FABLET, FACEBOOK, WHATSUP, ETC.)
ती साधन त्याला शाश्वत वाटतात त्या मुळे तो परमार्थ साधना कडे वळत नाही आणि आजच्या गतिमान युगात त्याला सवड हि नाही.
म्हणून आज मानव ज्या भौतिक साधनाच्या आहारी गेला त्यातून त्याला बाहेर हि काढण्यासाठी त्याच साधनाचा उपयोग करता येईल का? असे संशोधन वारकरी डिजिटल लॅब (Warkari Digital Lab) व्दारे करण्यात येऊन त्याचे फलित म्हणजे हा शुद्ध हरिपाठ.
आजच्या कुणाला घडीला मोबाईल वापरू नका असे सांगितले तर लोक सांगणाराला वेड्यात काढतात.कारण आज चा मोबईल हा स्मार्ट आहे.
म्हणून जसे कुपखनक न्याया प्रमाणे विहीर खोदणारे जसे विहिरीतील माती, दगड, चिखल, धूळ, ई. व्दारे जसे मळून जातात व मग विहिरीला पाणी लागल्यावर त्याच विहिरीच्या पाण्याने परत स्वच्छ होतात , तसे आज हा समाज भौतिक साधनाच्या मागे लागला म्हणून त्या भौतिक साधना व्दारे हि शुध्द हरिपाठ सर्वांना ईश्वर प्राप्तीसाठी उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त करतो.
आपला
धनंजय महाराज मोरे (B.A./D.J./D.I.T.)
* हरिपाठाचे नियम *
- आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.
- विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.
- स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत बसू द्यावे.)
- शक्यतो सर्वांच्या अंगात पांढरा वारकरी पोशाख असावा.
- चाली वारकरीच म्हणाव्या. (फिल्मी संगीताच्या) चाली विणेकऱ्याने स्वतः म्हणू नाही, व ईतर भजन्यांना म्हणू देऊ नाही.
- हरिपाठ हा वैयक्तिक, आणि सामुहिक, म्हणता येतो.
- हरिपाठ हा खाली बसून, उभ्याने, चालताना, पाउल्या खेळत, घरात, अंगणात, रस्त्यात, मंदिरात, दिंडीत चालतांना, ईतर काम करतांना सुद्धा म्हणता येतो.
- हरिपाठात पाउल्या खेळतांना स्त्री, पुरुष यांनी सोबत न खेळता पुरुषांनी पुरुषाबरोबर आणि स्त्रियांनी स्त्रिया बरोबर खेळाव्यात.
- हरिपाठात ईतर भजने, भावगीते, कविता, म्हणू नाही.
- स्त्रिया आपला नित्यनेमाचा हरिपाठ मासिक पाळीच्या काळात सुद्धा (ग्रंथाला हात न लावता) स्वतः किंवा मागे मागे म्हणू शकतात.
- हरिपाठात कुणाच्याही तोंडात पान, मावा, गुटखा, खर्रा, तंबाखू, बिडी, सिगारेट, नसावे, (तशी जाहीर सुचना हरिपाठ सुरु होण्यापूर्वीच विणेकऱ्याने द्यावी.)
- हरिपाठ ज्या देवतेच्या मंदिरात/समोर असेल तर त्या देवतेची शेवटी आरती म्हणावयास हरकत नाही. आणि स्थानिक देवतेचा गजर सुद्धा करता येतो.
- प्रत्येक अभंगाचे शेवटी धृपद (दुसरे चरण) म्हणावे, तशी प्रथा आहे.
गजर
बोला… पुंडलिक वरदे हरी वि..ठ्ठ…ल…..
पंढरीनाथ भगवान कि जय..!
श्री…. ज्ञानदे….व….. तुका….राम..
ज्ञाने….श्वर… महाराज की…. जय.!
जगद्गुरू तुका…राम महाराज कि जय..!
“शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की जय”
गजर झाल्यावर पुढीलप्रमाणे …….
जय जय राम कृष्ण हरी
चे भजन म्हणावे.ऐका :>
कसे म्हणावे व्हिडिओ पहा व शिका :
येथे क्लिक करा.
हरिपाठ-सूची
रूप पाहता लोचनी
१ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
२ चहूं वेदीं जाण षड्शास्त्री कारण ।
३ त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
४ भावेंविण भक्ति भक्तिविंण मुक्ति ।
५ योगयागविधि येणे नोहे सिद्धि ।
६ साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला
७ पर्वताप्रमाणे पातक करणे
८ संतांचे संगती मनोमार्ग गति ।
९ विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान
१० त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी
११ हरि उच्चारणी अनंत पापराशी
१२ तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धि
१३ समाधि हरीची समसुखेविण
१४ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी
१५ एक नाम हरि द्वैत नाम दुरी
१६ हरिनाम जपे तो नर दुर्लभ
१७ हरिपाठकीर्ति मुखी जरी गाय
१८ हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन
१९ वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन
२० नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी
२१ काळ वेळ नाम उच्चारिता नाही
२२ नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ
२३ सात पांच तीन दशकांचा मेळा
२४ जप तप कर्म क्रिया नेम धर्म
२५ जाणीव नेणीव भगवंती नाही
२६ एक तत्व नाम दृढ धरी मना
२७ सर्व सुख गोडी साही शास्त्रे निव
नामसंकीर्तन साधन पैं सोपें ।
देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी
रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी ।
सुख जाले वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥धृपद॥
बहुता सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठली आवडी ॥
सर्व सुखाचे आगर ।
बाप रखुमादेवीवर ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥ धृपद ॥
(विठोबा रखुमाई भजन म्हणावे.)
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
(सर्व अभंगाच्याशेवटीलाल रंगाने असलेले चरण हे धृपद आहे, ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे.)
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥१॥
तुळसीहार गळा कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर हेची ध्यान ॥२॥
मकरकुंडले तळपती श्रवणीं ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका ह्मणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥
तुळसी हार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥
१ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवा घरी ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२ चहूं वेदीं जाण षड्शास्त्री कारण ।
चहूं वेदी जाण साहि शास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
एक हरी आत्मा जीवशिवसमा ।
वाया तू दुर्गमा न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
३ त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
हरिविणे मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथोनि चराचर हरिसी भजे ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
४ भावेंविण भक्ति भक्तिविंण मुक्ति ।
भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति ।
बळेविण शक्ति बोलू नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥
सायास करिशी प्रपंच दिननिशी |
हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
तुटेल धरणे प्रपंचाचे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
५ योगयागविधि येणे नोहे सिद्धि ।
योगयागविधि येणे नोहे सिद्धि ।
वांयाची उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेविण देव न कळे नि:संदेह ।
गुरुविणे अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।
गुजेविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरणोपाय ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
६ साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायीच समाप्ति झाली जैसी ॥२॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
७ पर्वताप्रमाणे पातक करणे
पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी ॥१॥
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैचा गोपाळ पावे हरी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटी पूर्ण एक नांदे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
८ संतांचे संगती मनोमार्ग गति ।
संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन ।
द्वैताचे बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगिया साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रह्लादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना …..
९ विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान
विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।
रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैचे कीर्तन घडेल नामी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
*रामकृष्ण हरी* भजन म्हणावे लागते
कसे म्हणावे, व्हिडिओ पाहून शिका. त्या साठी येथे क्लिक करा.
१० त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥१
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरिवीण धावया नपवे कोणी ॥२॥
पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक |
नामे तिन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
११ हरि उच्चारणी अनंत पापराशी
हरि उच्चारणी अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरी ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणे तेथे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
१२ तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धि
तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धि ।
वायाचि उपाधि करिसी जना ॥१॥
भावबळे आकळे येऱ्हवी नाकळे ।
करतळी अवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेता भूमीवरि ।
यत्न परोपरी साधन तैसे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
१३ समाधि हरीची समसुखेविण
समाधि हरीची समसुखेविण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशीराजे सकळसिद्धि ॥२॥
ऋद्धिसिद्धिनिधि अवघीच उपाधि ।
जंव त्या परमानंदी मन नाही ॥३॥
ज्ञानदेवा रम्य रमले समाधान ।
हरीचे चिंतन सर्वकाळ ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
१४ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी । १
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
पापाचे कळप जळती पुढे ॥२॥
हरि हरि हरि मन्त्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
१५ एक नाम हरि द्वैत नाम दुरी
एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुद्धि घेता समान श्रीहरी ।
शमदमा वैरी हरी झाला ॥२॥
सर्वांघटी राम देहादेही एक ।
सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
१६ हरिनाम जपे तो नर दुर्लभ
हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
रामकृष्णनामी उन्मनी साधिली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले ।
प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवा नाम रामकृष्णी ठसा ।
तेणे दशदिशा आत्माराम ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
१७ हरिपाठकीर्ति मुखी जरी गाय
हरिपाठ कीर्ति मुखी जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझ्या हाती ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
१८ हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे काही ॥१॥
त्या नरा लाधले वैकुण्ठ जोडले ।
सकळही घडले तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गे गेला तो येथे मुकला ।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
*विठोबा रखुमाई*
चे भजन म्हणावे लागते,
चाल कशी म्हणावी,
पाऊली कशी खेळावी,
यासाठी व्हिडिओ पहा आणि शिका.
जय जय विठोबा रखुमाई त्या साठी
येथे क्लिक करा.
१९ नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापे अनंत कोडी (कोटी) गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योगयागक्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरिविणे नेम नाही दुजा ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२० वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जपा ॥१॥
जप तप कर्म हरिवीण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवा मन्त्र हरिनामाचे शस्त्र ।
यमे कुळ गोत्र वर्जियेले ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२१ काळ वेळ नाम उच्चारिता नाही
काळ वेळ नाम उच्चारिता नाही ।
दोन्ही पक्ष पाहे उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जडजीवा तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिह्वा या नामाची ।
उपमा त्या दैवाची कोण वाणी ॥३॥
ज्ञानदेवी सांग झाला नामपाठ ।
पूर्वजा वैकुण्ठ मार्ग सोपा ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२२ नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तया जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि ।
भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥२॥
हरिविणे जन्म नरकचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसि चाड ।
गगनाहुनि वाड नाम असे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२३ सात पांच तीन दशकांचा मेळा
सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एकतत्वी कळा दावी हरि ॥१॥
तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।
येथे काही कष्ट न लगती ॥२॥
अजपा जपणे उलट प्राणाचा ।
तेथेही मनाचा निर्धारु असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२४ जप तप कर्म क्रिया नेम धर्म
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटी राम भावशुद्ध ॥१॥
न सोडी रे भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुळ शीळ मात ।
भज का त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
वैकुण्ठ भुवनी घर केले ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२५ जाणीव नेणीव भगवंती नाही
जाणीव नेणीव भगवंती नाही ।
हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीव जंतूसी केवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुण्ठ केले असे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२६ एक तत्व नाम दृढ धरी मना
एक तत्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधी ॥२॥
नामापरते तत्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिक पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरूनि श्रीहरि जपे सदा ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
२७ सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी।
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिवीण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
इन्द्रिया सवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
हरि मुखे म्हणा हरि…….. ॥धृपद॥
विणेकऱ्याणे खालील सुचना (मोठ्याने द्यावी)
वारकरी सांप्रदायिक पद्धतीनुसार विणेकऱ्याणे खाली बसलेल्या सर्वाना ही चाल म्हणेपर्यंत उठून उभे राहण्यास सांगावे.
शक्यतो पायात बूट/चप्पल, तोंडात बिडी, सिगारेट, तंबाखू, पान, गुटखा, मावा, खर्रा, इत्यादीचा त्याग करण्याची स्पष्ट पण आदरपूर्वक (द्वेषपुर्वक नको) सुचना पुन्हा द्यावी.
चाल म्हणण्यासाठी १ व्यक्ती गुणवान असावा (बाहेरून आमंत्रित) जोडीदार स्थानिक (शक्यतो त्याच गावातील) कारण या कृतीने वारकरी सांप्रदायिक सद्भावना वाढते, आणि गुणवानाच्या संगतीने गुणवान तयार होतो. (दररोजच्या हरीपाठासाठी)
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
ही चालीसाठी व्हिडिओ पहा. येथे क्लिक करा.
नामसंकीर्तन साधन पैं सोपें ।
नामसंकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरीची॥1॥
न लगे सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ॥धृपद॥
ठायीच बैसोनि करा एकचित्त ।
आवडी अनंत आळवावा ॥2॥
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ॥3॥
याविण असता आणीक साधन ।
वाहातसे आण विठोबाची ॥4॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनि ।
शाहाणा तो धणी घेतो येथे ॥5॥
देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी
देवाचिया द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ॥
पुण्याची गणना कोण करी ॥२॥धृपद॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ॥
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे ॥
द्वारकेचा राणे पांडवां घरी ॥४॥
चाली साठी व्हिडिओ पहा :
येथे क्लिक करा.
॥इति श्री ज्ञानदेव महाराज कृत हरिपाठ समाप्त॥
गुरुपरंपरेचे अभंग प्रारंभ
- सद्गुरूराये कृपामज केली
- माझिये मनीचा जाणोनिया भाव
- घालुनिया भार राहिलो निश्चितीं
- माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव
- आदिनाथ उमा बीज प्रगटले
- आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
- अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आतां
- अवघाची संसार सुखाचा करीन
सुचना:
या पुढील सर्व अभंगाचे धृपद हे पिवळ्या रंगातील आहे,ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे. जसे विठ्ठल हा शब्द आहे.
१ सद्गुरूराये कृपा मज केली ।
सत्य गुरुराये कृपा मज केली ।
परी नाही घडली सेवा कांही ॥१॥
सांपडविले वाटे जाता गंगास्नाना ।
मस्तकी तो जाणा ठेविला कर॥ध्रु॥
भोजना मागती तूप पावशेर ।
पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥
कांही कळे उपजला अंतराय ।
म्हणोनिया काय त्वरा जाली ॥३॥
राघव चैतन्य कैशव चैतन्य ।
सांगितली खुण माळिकेची ॥४॥
बाबाजी आपुले सांगितले नाम ।
मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥५॥
माघशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार ।
केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥
२ माझिये मनींचा जाणोनियां
माझिये मनीचा जाणोनिया भाव ।
तो करी उपाव गुरुराजा ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणे गुंफ़ा कांही कोठे ॥ध्रु.॥
जाती पुढे एक उतरले पार ।
हा भवसागर साधुसंत ॥२॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।
उतार सांगडी तापे पेटे ॥३॥
तुका म्हणे मज दावियेला तारू ।
कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥
३ घालुनिया भार राहिलों निश्चितीं
घालुनिया भार राहिलो निश्चिती ।
निरविले संती विठोबासि ॥१॥
लावूनिया हात कुरवाळिला माथा ।
सांगितली चिंता न करावी ॥ध्रुपद॥
कटी कर समचरण साजिरे ।
राहिला भीवरे तीरी उभा ॥२॥
खुंटले सायास आणिक या जीवा ।
धरिले केशवा पाय तुझे ॥३॥
तुज वाटे आता ते कर अनंता ।
तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥
४ माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ।
आपणचि देव होय गुरू ॥1॥
पढिये देहभाव पुरवी वासना ।
अंती ते आपणा पाशी न्यावे ॥धृ.॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत ।
आलिया आघात निवाराया ॥2॥
योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी ।
वाट दावी करी धरूनिया ॥3॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी ।
पाहावे पुराणी विचारूनी ॥4॥
५ आदिनाथ उमा बीज प्रगटले
आदिनाथ उमा बीज प्रगटले ।
मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ।।१।।
तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ।।२।।
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला ।
ठेवा जो लाधला शांतीसुख ।।3।।
निर्व्दंव्द नि:शंक विचरता मही ।
सुखानंद हृदयी स्थिरावला ।।४।।
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख ।
देऊनी सम्यक अनन्यता ।।५।।
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण ।
कुळ हे पावन कृष्ण नामे ।।६।।
६ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।१।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।२।।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजाविले ।।3।।
आमचे सर्व ग्रंथ डाऊनलोड करा.
येथे क्लिक करा
७ अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां
अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां ।
चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ ।
अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥
एका जनार्दनी एकपणे उभा ।
चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥
आमचे सर्व ग्रंथ डाऊनलोड करा.
येथे क्लिक करा
८ अवघाची संसार सुखाचा करीन
अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।।
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ।।3।।
बापरखुमादेवीवरू विठ्ठालाची भेटी ।
आपुल्या संवसाठी करुनी ठेला ।।४।।
आमचे सर्व ग्रंथ डाऊनलोड करा.
येथे क्लिक करा
९ श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा
श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा |
इतरांचा लेखा कोण करी ||१||
राजयाची कांता काय भीक मागे |
मनाचिया जोगे सिध्दी पावे ||२||
कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला |
काय ऊणे त्याला सांगा जोजी ||३||
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |
आता उद्धरलो गुरुकृपे ||४||
गुरुपरंपरेचे अभंग समाप्त
ज्ञाने..श्वर माउली….
ज्ञानराज ..माउली.. तुकाराम
कसे म्हणावे: व्हिडिओ पहा.
विनवणी भजन म्हणावे
हेचि दान देगा देवा ।
तुझ्या विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि सम्पदा ।
संत संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ॥४॥
भजन – जय विठ्ठल जयजय विठ्ठल ।
बोलिलीं लेंकुरें
बोलिली लेकुरे । वेडी वाकुडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥
नाही विचारिला । अधिकार म्या आपुला॥३॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पाया पै किंकरा ॥४॥
भजन – ज्ञानदेव तुकाराम ।
१ झाले समाधान
(सर्वाना उभे राहण्यास सांगावे व आरतीची तयारी करावी.)
झाले समाधान । तुमचे देखिले चरण ॥१॥
आतां उठावेसे मना । येत नाही नारायणा ॥२॥
सुरवाडिकपणे । येथे सापडले केणे ॥३॥
तुका म्हणॆ भोग । गेला निवारला लाग ॥४॥
करुनी आरती
(देवाच्या समोर उभे राहून आरती ओवाळन्यास सांगावे.)
करुनी आरती । चक्रपाणि ओवाळिती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य काळ हा दीवस ॥२॥
पाहा वो सकळा । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥
तुका वाहे टाळी । उभा सन्निध जवळी ॥४॥
प्रेम सप्रेम आरती
प्रेम सप्रेम आरती । गोविंदाते ओवाळीती ॥१॥
धन्य धन्य ते लोचनी । नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओवाळिती परमानन्दा ॥३॥
नामा म्हणे केशवाते । देखुनी राहिलो तटस्थे ॥४॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिका भेटी परब्रम्हा आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा । पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ॥ तुळसीमाळा गळां कर ठेऊन कटीं । कांसे पीताबंर कस्तुरी लल्लाटीं । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ॥२॥ जयदेव जयदेव ॥धृ॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती । दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥३॥
आरती ज्ञानराजा १
आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा । सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥ आरती ज्ञानराजा ॥धृ॥ लोपले ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नांव ठेविले ज्ञानी ॥२॥ आरती ज्ञानराजा ॥धृ॥ प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केले । रामा जनार्दनीं । पायीं टकचि ठेले ॥३॥ आरती ज्ञानराजा ॥धृ॥
संत तुकोबारायांची आरती तुकारामा
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा । सच्चिदानंद मूर्ति । पाय दाखवी आम्हां ॥१॥ आरती तुकारामा ॥धृ॥ राघवे सागरांत । पाषाण तारिले । तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले ॥२॥ आरती तुकारामा ॥धृ॥ तुकिता तुळनेसी । ब्रह्म तुकासी आले । म्हणोनि रामेश्वरे । चरणीं मस्तक ठेविले ॥३॥ आरती तुकारामा….
एकनाथा आरती महाराजा समर्था १
आरती एकनाथा । महाराजा समर्था ।
त्रिभुवनी तूचि थोर। सदगुरु जगन्नाथा ॥१॥ आरती एकनाथा.॥धृ॥
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचे गुज ।
संसार दु:ख नासे । महामंत्रांचे बीज ॥२॥
आरती एकनाथा.॥धृ॥
एकनाथ नाम घेता । सुख वाटले चित्ता ।
अनंत गोपाळ दासा । धणी न पुरे गाता॥३॥
आरती एकनाथा.॥धृ॥
(देवाला आरती द्यावी. व नंतर विणेकऱ्यास, नंतर ईतरांना. )
(कर्पूरगौरं इत्यादी वारकरी सांप्रदायात म्हणत नाहीत.)
घालीन लोटांगण
(उभे असलेल्या सर्वांना उजव्या बाजूने स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घालावी, तशी सुचना द्यावी.)
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ॥१॥
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन । भावे ओवाळीन म्हणे नामा ॥२॥
वारकरी संप्रदायात मंत्र पुष्पांजली म्हटल्या जात नाही,
भजन – विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई
१ कृपाळु सज्जन तुम्ही सन्तजन
कृपाळु सज्जन तुम्ही सन्तजन ।
हेचि कृपादान तुमचे मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।
कीव माझी सांगा काकुळती ॥२॥
अनाथ अपराधी पतित आगळा ।
परि पाया वेगळा नका करु ॥३॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी ।
मग मजहरी उपेक्षिना ॥४॥
1 हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं
हेचि व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास ॥१॥
पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी ॥२॥
संतसंग सर्वकाळ ।
अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥
चंद्रभागे स्नान ।
तुका मागे हेंचि दान ॥४॥
अजून माहिती पाहिजेत
येथे क्लिक करा
1 आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणे काळी।
ही संतमंडळी सुखी असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।
माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नाम म्हणे तया असावे कल्याण ।
ज्या मुखी निधान पांडुरंग ॥४॥
2 मागणें ते तुजप्रती आहे ।
मागणे ते तुजप्रती आहे ।
देशील तरी पाहे पांडुरंगा ॥१॥
या संतासी निरवी हेचिमज देई ।
आणिक दुजेकांही न मागो देवा ॥२॥
तुका म्हणे आता उदार तू होई ।
मज ठेवी पायी संतांचिया ॥३॥
आमचे सर्व ग्रंथ डाऊनलोड करा.
येथे क्लिक करा
ज्ञानदेव तुकारा….म तुकाराम… तुकाराम… तुकाराम
गजर
बोला… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…..
श्री…. ज्ञानदे….व….. तुका….राम..
पंढरीनाथ भगवान की.. जय..!
ज्ञाने….श्वर… महाराज की…. जय.!
जगद्गुरू तुका…राम महाराज की… जय..!
“शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की.. जय”
धर्म की.. जय हो,
अधर्म का.. नाश हो…,
प्राणियों में.. समभाव हो,
विश्व का.. कल्याण हो…,
गोहत्या.. बंद हो !
जय…. श्री….राम,
हर-हर महा……देव..
सर्वांनी विणेकऱ्याचे दर्शन घ्यावे.
(हरिपाठ समाप्त.)
नवीन सुचना, अपेक्षा, तक्रारी, प्रश्न, इत्यादी साठी:
येथे क्लिक करा.
वारकरी कोण असतात ?
वारकरी कुणाला होता येत ?
वारकरी काय असतात ?
वारकरी कसे असतात ?
वारकरी कशासाठी असतात?
वारकरी का व्हावे?
वारकरी नाही झालो तर !
उत्तरासाठी येथे क्लिक करा
-:संपर्क:-
आपला संत सेवक
धनंजय विश्वासराव मोरे (B.A./D.J./D.I.T.)
किर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार,
मोबा. नं 9422938199 // 9823334438
Email : more.dd819@gmail.com
……………………………………..
आमचे ईतर तयार ग्रंथ मिळविण्यासाठी
येथे क्लिक करा.
ग्रंथ डाऊनलोड करा
ग्रंथ यादी
संत तुकाराम गाथा (संपूर्ण ४५८३) :>> डाउनलोड करा
वारकरी भजनी मालिका (000) :>> डाउनलोड करा
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ सार्थ:>> डाउनलोड करा
अमृतानुभव (अनुभवामृत) :>> डाउनलोड करा
भगवद्गीता (गीताप्रेस सार्थ प्रत) :>> डाउनलोड करा
पञ्चिकरणं ग्रंथ (संस्कुत श्लोकात) :>> डाउनलोड करा
पञ्चदशी (संस्कृत श्लोकात) :>> डाउनलोड करा
श्री संत ज्ञानेश्वराष्टकम् :>> डाउनलोड करा
श्रीकृष्णाष्टकम्:>> डाउनलोड करा
श्री पांडुरंगाष्टकम्:>> डाउनलोड करा
मधुराष्टकम्:>> डाउनलोड करा
काकड आरती (संपूर्ण) :>> डाउनलोड करा
श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्रम्:>> डाउनलोड करा
हनुमान चालीसा सार्थ:>> डाउनलोड करा
एकात्मता स्तोत्र:>> डाउनलोड करा
ताटीचे अभंग (संत मुक्ताबाई (१२)
चर्चा:वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदायाचा इतिहास :
वारकरी संप्रादायाचा उगम – वारकरी संप्रादायाचा उगम निश्चितपणे सागणे कठिण आहे, कारण हा स्वतंत्र संप्रदाय अथवा नवीन बंडखोर विचारधारा नसुन भारत वर्षात वेद काळापासुन चालत आलेल्या औपनिषदिय तत्वज्ञान परंपरेची वाटचाल आहे. वारकरी संप्रादायाचे आराध्य दैवत श्री पांडूरंग परमात्मा म्हणजेच वेदामध्ये आढळणारे विष्णू देवता अथवा पुरूष सुक्तातील देवतेची स्वरूप मानण्यात येते. श्री विठठल भगवान म्हणजेच वेद बोधीत जगताची स्थिती राखणारी विष्णु देवता असेही सिदध करता येते.
वेदकाळ व वेदोत्तर काळात कर्म काळात प्राधाण्याने प्रतिपादन करण्यार्या परंपरेसोबत ज्ञानाची परंपरा होती. वेदाच्या अंतिम भागातील उपनिषदामध्ये आढळणारे परिपुर्ण तत्वज्ञान हे वारकरी संप्रादायाचे मुळ उगम स्त्रोत म्हणता येईल. वेदामधील किचकट कर्म कांडाविरोधात उसळलेल्या बौदध धर्माच्या लाटेत वेदामधील ज्ञानप्रधान तत्वज्ञानही नाकारले जावु लागले. हिंदू धर्मातील औपनिषदीय तत्वज्ञानाची पुनर्स्थापना करण्याचे आसेतु हिमाचल वेदांत तत्वज्ञानाची सिंह गर्जना पसरविण्याचे कार्य भगवान शंकराचे अवतार मानल्या गेलेल्या श्रीमत् आद्य शंकराचार्यानी केले. आद्य शंकराचार्यानी अव्दैत वेदांत शास्त्राचे पुनरूज्जीवन केले.
आचार्यानी श्रीक्षेत्र पंढरपुरला दिलेली भेट व पांडूरंगाष्टकम् ची निर्मिती आचार्याच्या काळातील श्री विठठल भक्तीची वैभव शाली परंपरा – वाटचाल दाखवते वारकरी संप्रादायाच्या मुळ तत्वज्ञान परंपरेचा मागोवा जरी उपनिषद् काळापंर्यत घेता येत असला, श्री विठठल भक्तीच्या पाउल खुणा इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यत प्रकट रुपाने आढळत असल्यातरी वारकरी संप्रदाय हे नामभिधान धारण करुन वारकरी संप्रदाय श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेवराय याच्या काळातच नावारुपाला आला. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक व आंधप्रदेशातही ही संप्रदायाची परंपरा पसरली. आद्य शंकराचार्याच्या अव्दैत तत्वज्ञान पुनर्स्थापनेनंतर ही व्दैताव्देत शुध्दाव्दैत, केवलाव्दैत अशी परंपरा चालु राहिली. या परंपरामध्येही श्री विठठल उपासना स्विकारली गेली, म्हणुनच वारकरी संप्रादायाप्रमाणे श्री विठठल उपासना करणारी परंपरा कर्नाटकात, आंध्रात निर्माण झाली. तत्वज्ञान दृष्टया भेद स्विकारून ही सर्व श्री विठठलाचे भक्त झाले. मात्र या परंपरांचा व वारकरी संप्रादायाचा संबंध श्री विठठल भक्ती व सगुणोपासना या सारख्या ठराविक मुदयावरच सारखा आढळतो. मात्र विस्तार संत परंपरा व विकसीत होत गेलेली. भक्तीची परंपरा या गोष्टीत भिन्न आढळते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपान महाराज, ब्रहमचित्कला मुक्ताबाई या चार भावंडाबरोबरच भक्त शिरोमणी नामदेवराय, श्री संत सावता माळी महाराज, श्री संत चोखोबा व या संत प्रभावळीतील अनेक संतानी बाराव्या शतकात वारकरी सांप्रदाय समृध्द केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीभगवतगीतेवर केलेली मराठी टिका-भावार्थ दिपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व अभंग गाथा व इतरही संतांचे साक्षात्कारी अनुभूतीप्रधान अभंग हे मराठी भाषेचे अक्षर वैभव ठरले. याच काळात महाराष्ट्रात सर्वदूर तळागाळापर्यत श्री विठठल भक्ती पोहचली. वारकरी सांप्रदयाची सर्वसमावेशकता आचरण सुलभता व अभंगाची भाषा यामुळे सांप्रदायाचा विस्तार झाला. मात्र याच काळातील परकीय आक्रमणे व परकीय सत्तेच्या टाचेखाली चिरडलेली जनता स्वसामर्थ्य हरवून बसली. परधर्मियांच्या आक्रमणामुळे धर्माच्या बाहय गोष्टी पुन्हा बळावल्या. तत्वज्ञान व अंतरंग गोष्टी बंदिस्त झाल्या. हा सुमारे तीनशे वर्षाचा कालावधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अंधकारमय रात्र ठरली.
16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात चैतन्य जागृत झाले. महाराष्ट्रांच्या बुध्दीच्या तलवारीला व शौर्याच्या समशेरीला पुन्हा धार चढली. महाराष्ट्रात वारकरी सांप्रदयात अवतरलेल्या शांतीब्रहम एकनाथ महाराज व त्यानंतर लगेच अवतीर्ण झालेल्या जगदगुरू तुकोबारायांनी वारकरी सांप्रदायावर झळझळीत सुवर्णाचा कळस चढवला. या वारकरी सांप्रदायाच्या दुसर्या लाटेने संपुर्ण महाराष्ट्र ढवळुन काढला. या महाराष्ट्राच्या मातीत, माणसाच्या मनात बीजरुपाने पुर्वीपासुन बसणार्या वारकरी भक्तीभावाला खतपाणी मिळुन महाराष्ट्रा व्यापी वारकरी सांप्रदायाचा वटवृक्ष फोफावला. विविध जातीत, विविध भागात अवतरलेल्या संतांनी वटवृक्षाच्या पारब्याप्रमाणे सांप्रदायाचे तत्वज्ञान त्या भागात पोहचवलेच व सांप्रदायाला खंबीर आधार दिला. या कालावधीत जगदगुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील चौदा टाळकर्यांनी व शिष्य निळोबारायांनी सांप्रदायाचा ध्वज फडकवत ठेवला. जगदगुरू तुकाराम महाराजांचे पुत्र संत श्री नारायण महाराजांनी यांनी सुरू केलेल्या पंढरी वारी-पालखी सोहळयाने सांप्रदायाला एक नविन सहभागाचे परिमाण लाभले. शिंदे सरकारचे सरदार श्री हैबतबाबा आरफळकर यांनी पालखी सोहळयात सुसूत्रता आणुन पालखी सोहळयाची भव्यता वाढवली.
आज ही महाराष्ट्रातील प्रमुख पालख्या आषाढी वारीस पंढरपुरला जातात. यात लक्षावधी वारकरी उन-पावसाची तमा न बाळगता सहभागी होतात. या पालखी सोहळयात श्री संत ज्ञानेश्वर महाराज माउली, जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्यांप्रमाणे वारकरी सांप्रदायातील प्रमुख संतांच्या पालख्या दिंडी सोहळा आषाढी वारीस पंढरपुरास जातो. सहयाद्रीच्या दर्याखोर्यातुन तळागाळातुन श्री पांडूरंगाच्या चरणी अनन्य निष्ठा असलेला वारकरी घरदार सोडून उन्हापावसाची पर्वा न करता अनंत गैरसोयी सोसुनही पायी पंढरपुरला जातो व तेथे गेल्यावर त्याच्या डोळयातून तनामनातून ओसंडून वाहणारी कृतकृत्यता, भक्तीचा आनंद वारकरी सांप्रदाय किती जनमाणसाच्या अंत-करणापर्यंत पोहचला आहे याची साक्ष देतो.
वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.
अशा प्रकारच वाक्य लेखात आलं आहे. वारकरी धर्म या शब्द समूहा बद्दल काळजी नाही. परंतु भागवत संप्रदाय सर्व भारतात आहे आणि सर्व भारतातील भागवत संप्रदाय वारकरी नाही म्हणून “वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.” या वाक्याचे अधिक वस्तुनिष्ठ लेखन करण्यास वाव आहे असे वाटते.
वारकरी सम्प्रदाय हिंदी
वारकरी सम्प्रदाय का उद्भव दक्षिण भारत के ‘पंढरपुर‘ नामक स्थान पर विक्रम संवत की तेरहवीं शताब्दी में हुआ था। वारकरी का अर्थ है कि ‘वारी’ तथा ‘करी’ अर्थात ‘परिक्रमा करने वाला’। इस सम्प्रदाय के प्रवर्तकों में संत ज्ञानेश्वर का स्थान महत्त्वपूर्ण है। उन्होंने ‘ज्ञानेश्वरी‘ और ‘अमृतानुभव’ नाम के दो महत्त्वपूर्ण ग्रंथों की रचना कर वारकरी सम्प्रदाय के सिद्धांतों को स्पष्ट कर दिया था। इस सम्प्रदाय में ‘पंचदेवों’ की पूजा की जाती है।
संत पंरम्परा
ऐसा माना जाता है कि ज्ञानेश्वर ‘कश्मीरी शैव सम्प्रदाय‘ के ‘शिवसूत्र’ से प्रत्यक्षत: प्रभावित थे। उनकी योग-साधना का प्रभाव भी संत ज्ञानेश्वर पर पड़ा था। सम्भवत: इसी कारण उन्होंने शंकराचार्य के ‘मायावाद’ का खण्डन भी किया। ज्ञानेश्वर ने निराकार परमात्मा की भक्ति का प्रतिपादन अद्वैतवाद की भावना के अनुसार किया। उनके शिष्यों में संत नामदेव (संवत 1327-1407) का नाम विशेष रूप से उल्लेखनीय है, जिनकी अनेक रचनाएँ हिन्दी भाषा में भी उपलब्ध हैं और जिन्होंने ज्ञानेश्वर की तीर्थ यात्राओं का वर्णन ‘तीर्थावली’ में किया है। इस सम्प्रदाय में संत एकनाथ (संवत 1590-1656) तथा संत तुकाराम (संवत 1666-1707) जैसे संत भी हुए हैं। इन्होंने संतों ने इस मत का प्रचार करने में महत्त्वपूर्ण योगदान दिया था। आगे चलकर यह सम्प्रदाय ‘चैतन्य सम्प्रदाय’, ‘स्वरूप सम्प्रदाय’, ‘आनन्द सम्प्रदाय’ तथा ‘प्रकाश सम्प्रदाय’ जैसी शाखाओं के माध्यम से अपने सिद्धान्तों का प्रचार करने लगा।
इष्टदेव
वारकरी सम्प्रदाय में ‘पंचदेवों’ की पूजा का विधान है, किन्तु इनके प्रधान इष्टदेव ‘विट्ठल’ भगवान हैं, जो श्रीकृष्ण के प्रतीक हैं। यद्यपि इस सम्प्रदाय में ब्रह्मा को निर्गुण मान गया है, किन्तु इसके अनुयायी भक्ति साधना को विशेष महत्व देते हैं। निर्गुण की अद्वैतभक्ति के लिए इसके अनुयायी ब्रह्मा के सगुण रूप को भी एक साधन मानते हैं।
पूजा विधान
‘वारकरी’ शब्द से तात्पर्य है कि ‘वारी’ तथा ‘करी’ अर्थात ‘परिक्रमा करने वाला’। इस सम्प्रदाय के लोग पंढरपुर के मन्दिर में स्थापित विट्ठल भगवान की परिक्रमा करते हैं और संयमित जीवन व्यतीत करते हैं। वे भजन-कीर्तन, नाम-स्मरण तथा चिन्तन आदि में सदा लीन रहते हैं। वे नृत्य तथा गान करते हुए कभी-कभी भावावेश में भी आ जाते हैं। उन्होंने वर्णाश्रम धर्म के नियमों का बहिष्कार करते हुए प्रयत्ति मार्ग को मान्यता प्रदान की है। वे लोग सम्प्रदायिक परम्पराओं का भी विरोध करते हैं।
विठ्ठलभक्त वारकरी
सारणी
- १. वारकरी
- २. पंढरपुर वारीका व्रत
- ३. पंढरपुरकी वारीकी कथा
- ४. पंढरपुरकी वारी
- ५. वारकरी संप्रदायके बारेमें
- ६. वारकरी संप्रदायकी रचना एवं गठनमें संतोंका योगदान
- ७. विभिन्न प्रांतोंमें एकादशी मनाना
१. वारकरी
भगवान श्री विठ्ठलके भक्तको वारकरी कहते हैं । इस संप्रदायको वारकरी संप्रदाय कहा जाता है । वारकरी शब्दमें वारी शब्द अंतर्भूत है । वारीका अर्थ है यात्रा करना, फेरे लगाना । जो अपने आस्था स्थानकी भक्तिपूर्ण यात्रा पुन: पुन: करता है उसे वारकरी कहते हैं । सामान्यत: उनकी वेशभूषा इस प्रकार होती है । धोती, अंगरखा, उपरना तथा टोपी इसीके साथ कंधेपर भगवे रंगकी ध्वजा, गलेमें तुलसीकी माला, हाथमें वीणा तथा मुखमें हरिका नाम लेते हुए वह वारीके लिए निकलता है । वारकरी मस्तक, गले, छाती, छाती के दोनों ओर, दोनों भुजाएं ,कान एवं पेटपर चंदन लगाता है ।
२. पंढरपुर वारीका व्रत
पंढरपुरकी वारी कलियुगमें सामान्य जनोंके लिए आचरणमें लानेयोग्य सरल मोक्षदायी व्रत है । यह व्रत आषाढ शुक्ल एकादशीसे आरंभ करते हैं । इसमें मुख्य रूपसे आषाढ, कार्तिक, माघ एवं चैत्र महीनेकी शुक्ल एकादशीको पंढरपुरकी यात्रा करते हैं । इसे ‘वारी’ कहते हैं । एकादशीके महत्त्वमें हमने देखा कि एकादशीके दिन भगवान श्री पांडुरंग अर्थात विठ्ठल पुंडलिकको मिलनेके लिए पंढरपुर आते हैं ।
३. पंढरपुरकी वारीकी कथा
भक्त पुंडलिकको दिए वरके अनुसार पंढरपुरमें भगवान श्रीविष्णु विठोबाके रूपमें कमरपर हाथ धरे र्इंटपर युगोंसे खडे हैं एवं अनेक अज्ञात जीवोंका उद्धार कर रहे हैं । भगवान शिवजीने पंढरपुरकी श्रेष्ठ महिमाको जाना एवं उन्होंने ही प्रथम पंढरपुरकी वारीका आरंभ किया । ऐसी मान्यता है कि शिवजी अपने परिवार के साथ पंढरपुर आते हैं । संत ज्ञानेश्वर महाराजजी, संत नामदेवजी जैसे संतोंने इस स्थानकी महिमाको सामान्य जनोंतक पहुंचाया । तबसे सामान्य जनोंकी पंढरपुरकी वारीमें सम्मिलित होनेकी परंपरा आजतक अखंड रूपसे चल रही है ।
४. पंढरपुरकी वारी
आषाढ एकादशी कहते ही आंखोंके सामने उभर आता है पंढरपुरकी यात्राका दृश्य ! भगवान श्रीविष्णुका जागृत देवस्थान! पिछले आठ सौ से भी अधिक वर्षोंसे भक्तिभावसे सैंकडों किलोमीटर पैदल चलकर लाखों श्रद्धालु पंढरपुरमें एकत्रित होते हैं । माथेपर चंदन का तिलक धारण किए, गलेमें तुलसी माला पहने, हाथोंमें ध्वजा लिए एवं झांझ-मृदंग बजाते हुए भजन करनेवाले पुरुष तथा सिरपर तुलसी लिए महिलाएं ‘पुंडलिक वरदे हारि विठ्ठल … का जयघोष करते हुए अपने आराध्य देवताके दर्शन करने चल पडते हैं । ये हैं विठ्ठलभक्त ‘वारकरी’! आषाढ एवं कार्तिक एकादशीको वारकरी संप्रदायके लाखों लोग तथा अन्य विठ्ठलभक्त इस वारीमें समिल्लित होते हैं । भारतके आध्यात्मिक इतिहासकी यह एक वैशिष्ट्यपूर्ण घटना है । कई लोग इसे विज्ञानयुगका चमत्कार मानते हैं ।
५. वारकरी संप्रदायके बारेमें
वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदायोंमेंसे एक प्रमुख संप्रदाय है । पंढरपुरमें वास करनेवाले विठोबा देवता, वारकरी संप्रदायके साथ महाराष्ट्र राज्यके आराध्य देवता भी हैं । इस संप्रदायके अनुयायी, प्राप्त दीक्षाके अनुसार वार्षिक अर्थात प्रतिवर्ष, छः माहकी अर्थात वर्षमें दो बार, मासिक, पाक्षिक, साप्ताहिक अथवा नित्य पंढरपुरकी यात्रा करते हैं । इस यात्राको ‘वारी’के नामसे जानते हैं । तथा वारी करनेवालोंको ‘वारकरी’ कहते हैं । सामान्यतः सभी वारकरी पैदलही वारी करते हैं । पैदल वारी करनेसे शारीरिक तप होता है । पंढरपुरकी इस वारीके कारण, हिंदु परिवार एवं समाजमें मेल-जोल तथा संगठनमें सौहार्दपूर्ण वातावरण की वृद्धि हुई है ।
६. वारकरी संप्रदायकी रचना एवं गठनमें संतोंका योगदान
संतोंकी कृपासेही वारकरी संप्रदायकी रचना एवं गठन हो पाया है । संत ज्ञानेश्वर महाराजजीने वारकरी संप्रदायकी नींव डाली । उन्होंने इस संप्रदायको तत्त्वज्ञानके आधारपर गठित किया । संत नामदेवजीने महाराष्ट्रके साथही भारत भ्रमण किया एवं सेवकभावसे विठ्ठल भक्तिका विस्तार किया । जनार्दनस्वामीजीके शिष्य संत एकनाथजी इसके आधार स्तंभ बने । उनकी रचना श्रीमदभागवतकी टीकाको एकनाथी भागवतके नामसे जानते हैं । यह लोगोंके लिए पथप्रदर्शक बनी तथा संत तुकाराम महाराजजी इसके मुकुटमणि बने; अर्थात उन्होंने इस संगठन एवं परंपराको बलशाली बनाया । इस कारण देव एवं धर्मके प्रति सामान्य जनोंके मनमें अभिमानकी वृद्धि हुई । नए उत्साहसे लोग ईश्वरका भजन-पूजन करने लगे ।
इसी कालखंडमें अनेक बाह्य आक्रमण तथा परकीय सत्ताके प्रभावसे समाज भयग्रस्त था । परकीय अत्याचारोंके कारण सामान्य जनता भी त्रस्त थी । ऐसे समयपर संतोंद्वारा दिखाए गए भक्तिमार्गका अनुसरण करनेसे यहांके समाजमें नई चेतना जागृत हुई । उनमें देव, धर्म एवं हिंदु राष्ट्रकी रक्षा करनेका साहस, बल एवं धैर्य प्रखर हुआ । परिणामस्वरूप छत्रपति शिवाजी महाराजद्वारा हिंदवी स्वराज्य स्थापनाका प्रयत्न सफल हुआ तथा हिंदवी स्वराज्यकी स्थापना के रूपमें महाराष्ट्रकी जनताको इसका फल प्राप्त हुआ ।
‘जय जय राम कृष्ण हरि’, इस मंत्रका उच्चारण करनेवाले, विविध संतोंके रूपमें अवतरित होकर समाजका दिशादर्शन करनेवाले साक्षात श्रीविष्णु भगवानके रूप श्रीविठ्ठलकी भक्ति करनेवाले वारकरी आज भी भक्तिपथपर चलते हुए सनातन हिंदु धर्म एवं धर्मस्थानोंकी रक्षाके कार्यमें अग्रसर हैं ।
७. विभिन्न प्रांतोंमें एकादशी मनाना
देशके विभिन्न प्रांतोंमें भगवान श्रीविष्णु विभिन्न नाम एवं रूपोंमें वास करते हैं । इन स्थानोंका महत्त्व भी पूरे संसार में माना जाता है । इन सभी स्थानोंपर भी एकादशीका व्रत एवं उत्सव श्रद्धाभाव तथा उत्साहसे मनाया जाता है । वृंदावन एवं मथुरामें विशेष रूपसे परिक्रमाएं की जाती हैं । यह परिक्रमा घडीकी सूइयोंकी दिशामें की जाती है । परिक्रमामार्गमें आनेवाले भगवान श्रीकृष्णसे संबंधित सभी मंदिर, वन एवं कुंड आदिके भी दर्शन करते हैं तथा कुंडमें कुछ विशिष्ट कालतक स्नान भी करते हैं । काशीमें पतित पावनी गंगामैयाके पवित्र जलमें स्नान करते हैं । पुरी, उडीसामें भगवान जगन्नाथ, श्रीरंगम, तमिलनाडुमें श्रीरंगनाथ, तिरुपति, आंध्रप्रदेशमें श्रीबालाजीके मंदिरोंमें भी विशेष रूपसे एकादशी मनाते हैं । साथ ही विभिन्न महीनोंमें आनेवाली एकादशीपर इन स्थानोंपर विशेष उत्सव भी मनाए जाते हैं ।
समाप्त














