आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
१. किर्तनाचा तमाशा का झाला ?
** आपला दासानुदास**
ह.भ.प.नाना महाराज कापडणीस.
सोयगाव,मालेगाव. जि.नाशिक.
. मुख्य प्रवर्तक तथा मुख्य संकल्पक ” निरपेक्ष कीर्तन सेवा ” समूह.
९५४५४२०९३८.
किर्तनाचा तमाशा का झाला ?😢 ह्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे.
किर्तनाचा तमाशा का झाला ?😢
ब-याच महाराजांचं म्हणणं असं आहे की, गावातील सप्ताहांमध्ये राजकारणी लोकांचा समावेश झाला म्हणून परमार्थाचं बाजारीकरण करणा-या व किर्तनाचा तमाशा करणा-या किर्तनकारांचा मान व भाव वाढला.
मी ह्या गोष्टीला शंभर टक्के सहमती देतो.
परंतू आपल्याला ह्या गोष्टीचाही विचार करावा लागणार आहे की २०-२५ वर्षापुर्वी सप्ताहाचं नियोजन गावातील भजनी मंडळ करित होतं.
त्यामुळे कीर्तनकारही ज्ञानाचे डोस पाजणारा मिळायचा, आलेला कीर्तनकार खुश असायचा व ऐकणारी जनताही आनंदी असायची.देण्या-घेण्याचा विषय ९९ टक्के नसायचाच.
मग असं का घडावं ? सप्ताह कमिटीमध्ये राजकारण्यांचा शिरकाव का झाला असावा ? का म्हणून राजकारण्यांनी राजकारण करता करता परमार्थकारणही त्यांच्या हातात घेतलं ?
का म्हणून आजच्या काळात पारमार्थिक राजकारण्यांच्या दावनीला बांधला गेला ? ह्या व अशा अनेक प्रश्नांचा उहापोह झाला पाहिजे.
ह्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे.
ह्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी विचारविमर्ष होऊन काहितरी उपाययोजना केली पाहीजे.
ह्याकरीता ” निरपेक्ष कीर्तन सेवा ” समूहातील व महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंत किर्तनकारांनी कामाला लागले पाहिजे.त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या मी मांडण्याचा प्रयत्न करतो.
१ ) महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकाराने आपल्या तालुक्यात किती गावांना सप्ताह चालू आहेत व किती गावांना सप्ताह बंद आहेत ह्याचा आढावा घेऊन तशी यादी बनवली पाहिजे.
२ ) आपल्या तालुक्यात ज्या गावांना सप्ताह होत होते पण आता बंद पडले आहेत व ज्या गावांना सप्ताहच होत नव्हते अशा दोन्ही प्रकारांच्या दोन याद्या तयार करायला हव्यात .*बंद पडलेल्या सप्ताहांची एक व साप्ताहच होत नव्हते अशी एक.
३ ) बंद पडलेल्या सप्ताहातील गावांच्या भजनी मंडळाच्या सदस्यांची भेट घेऊन गावातील सप्ताह का बंद पडला? ह्या कारणांचा मागोवा घ्यायला हवा.
४ ) ज्या गावामध्ये सप्ताह होतच नाही त्या गावातील भजनी मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करायला हवी. त्यांना सप्ताहचं महत्व समजावून सांगायला हवे. व त्या गावात सप्ताह सुरू करण्यासाठी त्यांना उद्युक्त करून, त्यांना राजी करायला हवं.
आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे ? माझं एकच उत्तर असेल की दुर्दम्य अशी ईच्छाशक्ती घेऊन जर आपण मैदानात उतरलो ना ! ह्या सर्व अवघड वाटणा-या गोष्टी अतिशय सोप्या वाटतील.
वरील सर्व प्रश्नांना आपल्याजवळ प्रत्येक समस्येवर उपाय आहे असा विश्वास घेऊन कामाला लागावं म्हणजे मार्ग आपोआपच सापडतील.
१. ज्या ठिकाणी पैश्यांची अडचण असेल त्या ठीकाणी फुकट सप्ताह करण्याचं अश्वासन द्या.
२. ज्या ठिकाणी जास्त पैसे घेणा-या कीर्तनकारांमुळे सप्ताह बंद पडले असतील अशा ठिकाणी महाराष्ट्रातील निरपेक्ष किर्तनकारांची माहिती देवून कमी पैशात सप्ताह घडवून आणू असं आश्वासन द्यायला हवा .
३. ज्या गावात कलाकारांमुळे सप्ताह बंद पडले असतील त्या गावात महाराष्ट्रातील निरपेक्षपणे सेवा देणारे कमी खर्चाचे कलाकार उपलब्ध करुन देवू असं आश्वासन द्यायला हवं .
४. ज्या गावातील सप्ताहांमध्ये राजकारणी लोकांमुळे गावातील भजनी मंडळात दुफळी निर्माण झाली असेल तर अशा गावातील भजनी मंडळाशी संपर्क करुन त्यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांच्यात एकी घडवुन आणण्याचा प्रयत्न करायला हवा व सप्ताह नियोजन भजनी मंडळाकडे घेण्यासाठी उद्युक्त करायला हवं .
मला माहिती आहे हे सर्व करण्यासाठी भरपूर त्रास होणार आहे कदाचित काही ठिकाणी विरोधही पत्करावा लागणार आहे परंतू अजिबात घाबरु नका,
आपण त्या निर्गुण निराकार पंढरीश पांडुरंगाचं कार्य हातात घेवून ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा वारसा घेऊन, आजपासून आपल्याला फक्त परमार्थधर्म वाढवायचा असा धृढ निश्चय मनाशी बाळगून कामाला लागलो तर मला नाही वाटत की आपल्याला अपयश येईल आणि आलंच तर पहिल्यापेक्षा जास्त जोरात काम करण्याची ईच्छाशक्ती आपल्यामध्ये जागृत होईल.
मला विश्वास आहे की आपल्या ” निरपेक्ष कीर्तन सेवा ” ग्रृपच्या सर्व सहकार्यांची व महाराष्ट्रातील समविचारी कीर्तनकारांची एकमेकांना साथ मिळाल्याशिवाय रहाणार नाही.फार काही सांगायचं आहे,सुचवायचं आहे तुर्तास विस्तारभयास्तव थांबतो.
🙏🌹👏🚩👏🌹🙏🌹👏🚩🙏
** आपला दासानुदास**
ह.भ.प.नाना महाराज कापडणीस.
सोयगाव,मालेगाव. जि.नाशिक.
. मुख्य प्रवर्तक तथा मुख्य संकल्पक ” निरपेक्ष कीर्तन सेवा ” समूह.
९५४५४२०९३८.
🙏🌹👏🚩👏🌹🙏🌹👏🚩🙏


