आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

118.संपूर्ण काकड – काकडा आरती भजनी मालिका कार्तिक मास २०२४
संपूर्ण काकड आरती, मंगलचरण 1, 2, 3, 4, काकडा, भूपाळ्या, वासुदेव, आंधळे, पांगळे, मुका, बहिरा, गवळणी, गौळणी, पांगुळ, पिंगळा, जागल्या, जोगी, इत्यादी सर्व अभंग पहा वाचा आणि ऐका, भजनी मालिका
Watch Read and Listen to Complete Kakad Aarti, Mangalcharan 1, 2, 3, 4, Kakada, Bhupalya, Vasudeva, Andhale, Pangale, Muka, Bahira,, Ggvalani, Gavalni, Gaulani, Pangul, Pingala, Jaglya, Jogi, etc. Bhajni Malika
संपूर्ण काकड – काकडा आरती लिखित

संपूर्ण मंगलाचरण पहिले
एकूण ११ अभंग
👇आवाज 🔊
वै. बाबा म. सातारकर ऐका-वाचा-लिहा 👇
संपूर्ण मंगलाचरण पहिले
एकूण ११ अभंग
👇आवाज 🔊
विश्वनाथ म. वारिंगे ऐका-वाचा-लिहा 👇
संपूर्ण मंगलाचरण पहिले
एकूण ११ अभंग
👇आवाज 🔊
विष्णू म. कुदळे ऐका-वाचा-लिहा 👇
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
तया आठविता महापुण्यराशी |
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वरासी
-: नियम :-
विणेकऱ्याने वीणा घेत असताना वारकरी पोशाखच करावा, () पांढरेच, धोतर, टोपी/फेटा, सदरा. उपरणे, गळ्यात तुळशीचीच माळ असावी. हे. हे उपलब्ध नसता वीणा कोणत्याही वारकरी व्यक्तीकडेच द्यावा.
हा नियम सर्व वारकरी कार्यक्रमांना लागू होतो.
रामकृष्णहरि भजन
चाल १
👇आवाज 🔊
बाळकृष्ण म. शिंदे आळंदी ऐका-वाचा-लिहा 👇
रामकृष्णहरि भजन
चाल 2
👇आवाज 🔊
वै. बाबा म. इंगळे 👇 ऐका-वाचा-लिहा 👇
रामकृष्णहरि भजन
चाल 3
👇आवाज 🔊
वै. बाबा म. सातारकर 👇 ऐका-वाचा-लिहा 👇
चाल १ :- रुप पाहता लोचनी
चाल 1
👇आवाज 🔊
बाळकृष्ण म. शिंदे आळंदी 👇 👇 ऐका-वाचा-लिहा 👇
रुप पाहता लोचणी । सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥२॥
बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठली आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
राहो आता हेचि ध्यान । डोळां मन लंपट॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवे । देहभावे पूजीन ॥२॥
होईल येणे कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पाया पडो द्या ॥४॥
वचन ऐका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितों कथेकाळीं । आपण असावें जवळीं ॥२॥
घेई घेई माझी भाक । जरीं का मागेन आणिक ॥३॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥
तुज पाहता सामोरी । दृष्टी न फिरे माघारी ॥१॥
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली पंढरीराया ॥२॥
नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥३॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥४॥
तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥
माझी भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा ॥३॥
तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥
आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥
ते ते करा माझे । भार ओझे तुम्हांसी ॥२॥
वंचिले ते पायापाशी । नाही यासी वेगळे ॥३॥
तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायासी ॥४॥
लेकुराचे हित । वाहे माउलीचे चित्त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥
पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥३॥
तुका म्हणे माझे । तुम्हा संतावरी ओझे ॥४॥
करुनि उचित । प्रेम घाली हृदयांत ॥१॥
आलो दान मागायास । थोर करुनिया आस ॥२॥
चिंतन समयी । सेवा आपुलीच देई ॥३॥
तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥
न करी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥
मायबाप बंधुजन । तूचि सोयरा सज्जन ॥३॥
तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझे हित ॥४॥
गरुडाचे पायी । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
वेगीं आणावा तो हरी । मज दीनाते उद्धरी ॥२॥
पाय लक्ष्मीच्या हाती । म्हणोंन येतो काकुलती ॥३॥
तुका म्हणे शेषा । जागे करा हृषीकेशा ॥४॥
येग येग विठाबाई । माझे पंढरींचे आई ॥१॥
भिमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींची गंगा ॥२॥
इतुक्यांसहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥
माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
“”॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*
“”॥ विठोबा रखुमाई भजन म्हणावे ॥ 👇

संपूर्ण काकडा भजन लिखित
संपूर्ण भजनी मालिका लिखित
संपूर्ण वासुदेव अभंग लिखित
samourna kakda abhang lyrics in marathi
samourna bhajan malika abhang lyrics in marathi
kakda pdf
malika pdf
kakad arti pdf
(१)
रुप पाहता लोचणी । सुख झाले वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥२॥ बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठली आवडी ॥३॥ सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
(२)
राहो आता हेचि ध्यान । डोळा मन लंपट॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवे । देहभावे पूजीन ॥२॥ होईल येणे कळसा आले । स्थिरावले अंतरी ॥३॥ तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पाया पडो द्या ॥४॥
(३)
वचन ऐका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥ कर जोडितो कथेकाळी । आपण असावे जवळी ॥२॥ घेई घेई माझी भाक । जरी का मागेन आणिक ॥३॥ तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥
(४)
तुज पाहता सामोरी । दृष्टी न फिरे माघारी ॥१॥ माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली पंढरीराया ॥२॥ नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥३॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥४॥
(५)
तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत ॥१॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥ माझी भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा ॥३॥ तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥
(६)
आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥ ते ते करा माझे । भार ओझे तुम्हासी ॥२॥ वंचिले ते पायापाशी । नाही यासी वेगळे ॥३॥ तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायासी ॥४॥
(७)
लेकुराचे हित । वाहे माउलीचे चित्त ॥१॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥ पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥३॥ तुका म्हणे माझे । तुम्हा संतावरी ओझे ॥४॥
(८)
करुनि उचित । प्रेम घाली हृदयांत ॥१॥ आलो दान मागायास । थोर करुनिया आस ॥२॥ चिंतन समयी । सेवा आपुलीच देई ॥३॥ तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥
(९)
न करी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥ ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥ मायबाप बंधुजन । तूचि सोयरा सज्जन ॥३॥ तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझे हित ॥४॥
(१)
गरुडाचे पायी । ठेवी वेळोवेळा डोई ॥१॥ वेगी आणावा तो हरी । मज दीनाते उद्धरी ॥२॥ पाय लक्ष्मीच्या हाती । म्हणोंन येतो काकुलती ॥३॥ तुका म्हणे शेषा । जागे करा हृषीकेशा ॥४॥
(१०)
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥ भिमा आणि चंद्रभागा । तुझे चरणीची गंगा ॥२॥ इतुक्यांसहित त्वा बा यावे । माझे रंगणी नाचावे ॥३॥ माझा रंग तुझे गुणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
॥ विठोबा रखुमाई भजन म्हणावे ॥ 👇
संपूर्ण मंगलचरण २ रे ऐका ▶️संपूर्ण मंगलचरण दुसरे
( ८ अभंग)
🔊ऐकावाचा 👇 एकूण अभंग ८ SUNDAR TE DHYAN UBHE
(११)
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ॥१॥ तुळसीहार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥
(१२)
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥ मुकुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतले सकळही ॥३॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥ सकळही तुम्ही व्हागे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ॥५॥
(१३)
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरीया ॥१॥ गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्वकाळ ॥२॥ विठू माउलिये हाचि वर देई । संचरोनि राहीं हृदयी माझ्या ॥३॥ तुका म्हणे काही न मागो आणिक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥४॥
(१४)
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहता लोचन सुखावले ॥१॥ आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥२॥ लांचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले ॥३॥ तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापा ॥४॥
(१५)
झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा । तेणे माझ्या मना बोध केला ॥१॥ अनंत जन्मीचे विसरलो दुःख । पाहता तुझे मुख पांडुरंगा ॥२॥ योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी । तो तू आम्हांपासी मागे पुढे ॥३॥ नामा म्हणे जीवे करीन निंबलोण । विटेसहित चरण ओवाळीन ॥४॥
(१६)
पाहता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥ जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे ॥२॥ श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनी ॥३॥ महामळे मन होते जेगादले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥४॥ तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सापडले ॥५॥
(१७)
येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम । तेचि मज प्रेम देई देवा ॥१॥ डोळे भरूनिया पाहीन तुझे मुख । तेचि मज सुख देई देवा ॥२॥ कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती । ते मज विश्रांति देई देवा ॥३॥ वाहे रंगी टाळी नाचेन उदास । हे देई हातांस पाया सुख ॥४॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणिक नको ठाव चिंतू यासी ॥५॥
(१८)
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥ दावी रूप मज गोपिकारमणा । ठेवू दे चरणांवरी माथा ॥२॥ पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ॥३॥ पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥४॥ तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ॥५॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
संपूर्ण मंगलचरण तिसरे
(१९)
उंच नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्त देखोनिया ॥१॥ दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्याघरी रक्षी प्रल्हादासी ॥२॥ चर्म रंगू लागे रोहिदासा संगे । कबिराचे मागे शेले विणी ॥३॥ सजन कसाया विकु लागे मांस । माळ्या सावत्यास खुरपू लागे ॥४॥ नरहरी सोनारा घडू फुंकू लागे । चोखामेळ्यासंगे ढोरे ओढी ॥५॥ नामयाची जनी सवे वेची शेणी । धर्मा घरी पाणी वाहे झाडी ॥६॥ नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥७॥ अर्जुनाचे रथी होय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥८॥ गौळियांचे घरी अंगे गायी वळी । द्वारपाळ बळीद्वारी झाला ॥९॥ येकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी । अंबऋषींचे सोसी गर्भवास ॥१०॥ मीराबाईसाठी घेतो विषप्याला । दामाजीचा झाला पाडेवार ॥ ११ ॥ घडी माती वाहे गोऱ्याकुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी ॥ १२ ॥ पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥ १३ ॥
(२०)
श्रवणे कीर्तने झाले ते पावन । सनकादिक जाण परम भक्त ॥१॥ झाली ते विश्रांती याचका सकळा । जीवी जीवनकळा श्रीमूर्तिरया॥धृ॥ पादसेवने अक्रूर झाला ब्रम्हरूप । प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ॥३॥ सख्यपणे अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दन एकरूप ॥४॥ दास्यत्व निकट हनुमंते केले । म्हणोनी देखिले रामचरण ॥५॥ बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषणवरद चंद्रार्क ॥६॥ व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । आणिक पुंडलीक शिरोमणी ॥७॥ शुकादिक योगी रंगले श्रीरंगी । परिक्षितीच्या अंगी ठसावले ॥८॥ उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचे मेळ ब्रम्हरूप ॥९॥ अनंत भक्तराशी तरले ते वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ॥१०॥
(२१)
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥ कर्मधर्म त्यांचा झाला नारायण । त्यांचेनि पावन तिन्ही लोक ॥धृ ॥ वर्णअभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥३॥ अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥४॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहीदास ॥५॥ कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णूदास ॥६॥ कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनी अभेदु हरीचे पायी ॥७॥ चोखामेळा बंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥८॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवे ॥९॥ मैराळ जनक कोण कुळ त्यांचे । महिमान तयाचे काय सांगो ॥१०॥ यातायाती धर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥ ११॥ तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणो किती ॥ १२॥
(१)
बहु उतावीळ भक्तीचिंया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥ तुझ्या पायी मज झालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ॥ ध्रु॥ ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥ नाही नास ते सुख दिले तयास । झाले जे उदास सर्वभावे ॥३॥ तुका म्हणे सुख न माये मानसी । धरिले जीवेसी पाय तुझे ॥४॥
(२२)
पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनांची नावे ॥१॥ नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठी ॥धृ॥ विश्रांतीचा ठाव । पायी संताचिया भाव ॥३॥ तुका म्हणे पापे । जाती संताचिया जपे ॥४॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥

काकडा आरतीचे अभंग ▶संपूर्ण काकडा
( १४ अभंग)
🔊ऐकावाचा 👇
(३३)
गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ॥१॥ उठोनि वेगेसी । चला जाऊ राऊळासी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥२॥ उठोनिया पहाटे । विठ्ठल पाहा उभा विटे । चरण तयाचे ते । अमृतदृष्टी अवलोका ॥३॥ जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा । वेगे निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥४॥ पुढे वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती । होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥५॥ सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारी । केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥६॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
(२४)
उठा उठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठल माऊली । दीन जनांची साउलीं । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥ पंढरपुरी जे भीमातटी । सुंदर मनोहर गोमटी । दोन्ही कर ठेवोनिया कटी । भेटीसाठी तिष्ठतसे ॥२॥ किरीट कुंडले मंडित । श्रीमुख अतिसुंदर शोभत । गळा वैजयंती डुल्लत । हार मिरवत तुळशीचा ॥३॥ सुरेख मूर्ति सगुण सावळी । कंठी कौस्तुभ एकावळी । केशर उटी परिमळ आगळी । बुक्का भाळी विलसतसे ॥४॥ पीत पीतांबर कसला कटी । अक्षयी वीट चरण तळवटी । सकळ सौंदर्य सुखाची पेटी । हृदय संपुष्टी आठवा ते ॥५॥ अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का । तैसीच प्रीति करी भोळ्या भाविका । नामा पदपंकज पादुका । शिरी मस्तकी वंदीतसे ॥६॥
(२५)
उठा जागे व्हा रे आता । स्मरण करा पंढरीनाथा । भावे चरणी ठेवा माथां । चुकवा व्यथा जन्माच्या ॥१॥ धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥ माया विघ्नें भ्रमला खरे । म्हणता मी माझेनि घरे । हे तो संपत्तीचे वारे । साचोकारे जाईल ॥३॥ आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा । स्वहिताचा घोर वहा । ध्यानी राहा श्रीहरीच्या ॥४॥ संतचरणी भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा । मुक्ति सायुज्यता वरा । हेचि करा बापांनों ॥५॥ विष्णुदास विनवी नामा । भुलूं नका भव कामा । धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥
(२६)
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला ॥१॥ वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥२॥ शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥३॥ सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥४॥ रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात । त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥५॥ पंचप्राण आरत्या घेऊनिया देवस्त्रिया येती । भावे ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥६॥ अनंत अवतार घेसी भक्तांकारणे । कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणे ॥७॥ चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी । पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥८॥
(२७)
कांहो तुम्ही निश्र्चिंतीने । निजलाती हरी । मानियेले सुख आम्ही । वाचुं कैशापरी । ऊठा सावध व्हावे । क्षेम सकला द्यावे । जयाजी वासना । तया तैसे पुरवावे । जन्मोजन्मी सांभाळीले । क्षमा करा अन्याय । कृपा करी देवा आम्हां । तुची मायबाप । तुका म्हणे करा । वडीलपण दानासी । तेणे सुख होय । सकलही जनांसी ।
(२८)
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥ संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा । सोडा सेजसुख आता पाहुं द्या मुखकमळा ॥२॥ रंगमंडपीं महाद्वारी झालीसे दाटी । मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥ राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया । सेजेहालउनि जागे करा देवराया ॥४॥ गरुड हनुमंत पुढे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥ झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥
(२९)
उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला । हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥१॥ महाद्वारी वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन । आले द्यावे तयासी दर्शन । बंदिजन गर्जती ॥२॥ सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ विणे सुरस । आनंदे गाती हरिंचे दास । परम उल्हास करूनिया ॥३॥ चंद्रभागे वाळवंटी । प्रातःस्नानाची जनदाटी । आता येतील आपुले भेटी । उठी उठी गोविंदा ॥४॥ ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत झाले चक्रपाणी । नामा बद्धांजुळी जोडुनि । चरणी माथा ठेवितसे ॥५॥
(३०)
भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ॥१॥ ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥२॥ काय महिमा वर्णू आता सांगणे किती । कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥३॥ राही रखुमाई दोही दो बाहीं । मयूर पिच्छ चामरे ढाळिती ठायीं ठायीं ॥४॥ तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥५॥
(३१)
अवघे हरिजन मिळोनि आले राउळा । दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥१॥ उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी । पाहुं द्दा वदन वंदूं पायाची धूळी ॥२॥ उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा । कोठवरी निद्रा आता उठा परेशा ॥३॥ तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी । दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥४॥
(३२)
सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥ काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया । चराचर मोहरले तुझी मूर्ति पाहावया ॥२॥ कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख ॥३॥ आरती करिता तेज प्रकाशले नयनी । तेणे तेजेमिनला एकाएकी जनार्दनी ॥४॥
(३३)
कनकाच्या परियेळी उजळुनि आरती । रत्न दीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥ ओवाळू गे माये सबाह्य साजिरा । राही रखुमाई सत्यभामेच्या वरा ॥२॥ मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहता तेज फांकले ॥३॥ वैजयंतीमाळ गळा शोभे श्रीमंत । शंख चक्रगदा पद्म आयुधे शोभत ॥४॥ सावळा सकुमार जैसा कर्दळीचा गाभा । चरणीची नुपूरे वांकी गर्जती नभा ॥५॥ ओवाळीता मन हे उभे ठाकले ठायीं । समदृष्टी समान तुकया लागला पायी ॥६॥
(३४)
लाजले गे माय आता कोणा ओवाळू । जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥ ओवाळू मी गेले माय गेले द्वारके । जिकडे पहावे तिकडे चतर्भुज सारिखे ॥२॥ ओवाळू मी गेले माय सखिया माझारी । जिकडे पहावे तिकडे चतुर्भूज नरनारी ॥३॥ ओवाळू मी गेले माय सारंगधरा । जिकडे पहावे तिकडे चतुर्भूज परिवारा ॥४॥ वैजयंतीमाळ गळा श्रीवत्सलांछन । विष्णुदास नामा येणे दाविली खूण ॥५॥
(३५)
तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे । कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥ हाल का रे कृष्ण डोल का रे । घडिये घडिये घडिये गुज बोल का रे ॥२॥ उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरू विठ्ठलु नाहो ॥३॥
(३६)
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥ जोडोनिया कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनिया ॥३॥ तुका म्हणे काय पढियंते मागा । आपुलाले सांगा सुखदुख ॥४॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥

11 भुपाळ्याचे अभंग ▶🔊ऐका पहा 👇एकूण अभंग १५,
(३७)
योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहता पाहता मना न पुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवांचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण ॥२॥ अनंत रुपे अनंत वेषें देखिले म्यां त्यासी । बाप रखुमादेवीवरू खुण बाणली कैसी ॥३॥
(३८)
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंखचक्रगदापद्म सहित करी ॥१॥ देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे गे माये ॥२॥ सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदी चरणरज नामा विनवितसे पुढती ॥३॥
(३९)
करूनी विनवणी पायी ठेवितो माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१॥ अखंडित असावे ऐसे वाटते पायी । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥ असो नसो भाव आलो तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥३॥ तुका म्हणे तुझी वेडी वाकुडी । नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ॥४॥
(४०)
माझे चित्त तुझे पायी । राहे ऐसे करी कांही । धरोनिया बाही । भव हा तारी दातारा ॥१॥ चतुरा तू शिरोमणी । गुण लावण्याची खाणी । मुकुट सकळा मणि । धन्य तूचि विठोबा ॥२॥ करी या तिमिराचा नाश । उदय होऊनि प्रकाश । तोडी आशापाश । करी वास हृदयी ॥३॥ पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा । पायी आता राखावे ॥४॥
(४१)
ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ । का हो कळवळा तुम्हा उमटेचिना ॥१॥ अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनिया आसे चाळवुनी ठेविले ॥२॥ काय जन्मा येऊनिया केली म्यां जोडी । ऐसे घडोघडी चित्ता येतो आठव ॥३॥ तुका म्हणे खरा न पविजे विभाग । धिक्कारिते जग हाचि लाहे हिशोब ॥४॥
(४२)
बोलोनिया दाऊ का तुम्ही नेणा जी देवा । ठेवाल ते ठेवा ठायी तैसा राहेन ॥१॥ पांगुळले मन कांही नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवी धरुनि राहिलो ॥२॥ त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे । ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका ॥३॥ तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनी । न पवता जननी दुःख पावे विठ्ठले ॥४॥
(४३)
का गा केविलवाणा केलो दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ति झालिसे दिसे ॥१॥ लाज वाटे मना तुझा म्हणविता दास । गोडी नाही रस बोलिलीया सारिखी ॥२॥ लाजविलीं मागे संताची हीं उत्तरे । कळो येते खरे दुजे एकावरुनि ॥३॥ तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी । प्रसादा वांचूनि तुमचिया विठ्ठला ॥४॥
(४४)
जळो माझे कर्म वाया केली कटकट । झाले तैसे तट नाही आले अनुभवा ॥१॥ आता पुढे धीर काय देऊ या मना । ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ॥२॥ गुणवंत केलो दोष जाणायासाठी । माझे माझे पोटी बळकट दूषण ॥३॥ तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥४॥
(४५)
जळोत ती येथे उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥ आता मज साह्य येथे करावे देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी ॥२॥ भोगे रोगा जोडोनिया दिले आणिका । अरुचि ते हो का आता सकळापासूनि ॥३॥ तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी । नाही ये लौकिकी आता मज वर्तणे ॥४॥
(४६)
न सांगता तुम्हा कळो येते अंतर । विश्वी विश्वंभर परिहारचि नलगे ॥१॥ परि हे अनावर आवरिता आवडी । अवसान ते घडी पुरो एकी देत नाही ॥२॥ काय उणे मज येथे ठेविलिये ठायीं । पोटा आलो तई पासूनिया समर्थे ॥३॥ तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आता नारायणा दुसरियापासूनी ॥४॥
(४७)
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा । नको अंगी कळा राहो हरी हीन देऊ ॥१॥ सासुरवासा भीतो जीव ओढे तुजपाशीं । आता दोहींविषी लज्जा राखे आमुची ॥२॥ न कळता संग झाला सहज खेळता । प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरि ॥३॥ तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे । वचन या भावे वेचुनिया विनटलो ॥४॥
(४८)
कामे नेले चित्त नेदी अवलोकूं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥ का गा सासुरवासी मज केले भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही ॥२॥ प्रभातेसीं वाटे तुमच्या यावे दर्शना । येथे न चले चोरी उरली राहे वासना ॥३॥ येथे अवघे वाया गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥४॥
(४९)
चित्ती तुझे पाय डोळा रुपाचे ध्यान । अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥ हेचि एक तुम्हा देवा मागणे दातारा । उचित ते करा माझा भाव जाणोनि ॥धृ॥ खुंटले जाणीव माझे बोलणे आता । कळो यावी तैसी करा बाळाची चिंता ॥३॥ तुका म्हणे आता नको देऊ अंतर । न कळे पुढे काय बोलू विचार ॥४॥
(५०)
येई वो येई धावोनिया । विलंब का वाया लावियेला कृपाळे॥१॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कुठे गुंतलीस माये विश्वव्यापके ॥२॥ न करी न करी न करी आता आळस अव्हेरू । व्हावया प्रगट कैसी दूरी अंतरू ॥३॥ नेघे नेघे नेघे माझी वाचा विसावा । तुका म्हणे हावा हावा हावा साधावा ॥४॥
(५१)
आता कोठे धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥२॥ प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥३॥ तुका म्हणे आम्हां जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ॥४॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
12 वासुदेव ▶🔊ऐकापहा 👇 एकूण अभंग १४,
(५२)
बाबा ममतानिशी अहंकार दाट । रामनामे वासुदेवी वाट । गुरुकृपा वोळले वैकुंठ । तेणे वासुदेवो दिसे प्रगट गा ॥१॥ वासुदेव हरी वासुदेव हरी । रामकृष्ण हरी वासुदेवा ॥धृ॥ आला पुंडलिक भक्तराज । तेणे केशव वोळला सहज । दिधला विठ्ठल मंत्रबीज । तेणे झाले सकळही काज गा ॥२॥ रामकृष्ण वासुदेवे । वैष्णव गाताती आघवे । दिंडी टाळ प्रेमभावे । वासुदेवी मन सामावे गा ॥३॥ शांती क्षमादया पुरी । वासुदेवो घरोघरी । आनंद वोसंडला अंबरी । प्रेमे डुले त्रिपुरारी गा ॥४॥ वासुदेवी ज्ञेय ज्ञान । ध्यानी मनी नारायण । वासुदेवो परिपूर्ण । कैसे क्षरलेसे चैतन्य गा ॥५॥ वासुदेवी वाहुनि टाळी । पातके गेली अंतराळी । वासुदेवो वनमाळी । कीर्तन करू ब्रह्ममेळी गा ॥६॥ ज्ञानदेवी वासुदेवी । प्रीतीपान्हा उजळी दिवी । टाळ चिपळी धरुनि जीवी । ध्यानमुद्रा महादेवी गा ॥७॥
(५३)
घुळघुळा वाजती टाळ । झणझणा नाद रसाळ । ऊदो झाला पाहाली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ गा ॥१॥ कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळापोटी माय रिघेल । मेले माणूस जीत उठविल । वेळ काळाते ग्रासील गा ॥२॥ आता ऐसेचि अवघे जन । येते जाते तयापासून । जगी जग झाले जनार्दन । उदो प्रगटला बिंबले भान गा ॥३॥ टाळाटाळी लोपला नाद । अंगोअंगी मुराला छंद । भोग भोगितांचि आटला भेद । ज्ञान गिळोनि गावा गोविंद गा ॥४॥ गावा आंत बाहेर हिंडे आळी । देवो देवीची केली चिपुळी । चरण नसता वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांती सावळी गा ॥५॥ ज्ञानेश्वर महाराज वासुदेव अभंग ३
(५४)
ॐ नमो भगवते वासुदेवाया । द्वादशाक्षरी मंत्र न जपसि काह्या ॥ ध्रु ॥ ओडियाणा बंध घालुनि देहुडा लागसील पावो । वोतप्रोत सांडुनि मना धरसि अहंभावो । ओंकारबिंदुचा तू न पवसी ठावो । वोळगे वोळगे कृष्ण द्वारावतिये रावो ॥१॥ नागिणी उत्साहे नवहि द्वारे निरोधून । नाडित्रयामाजी सुषुम्नासंचरण । न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन । नरहरिचिंतने अहर्निशी मुक्तिस्थान ॥२॥ मोडिसी कर चरण तेणे पावसी अंतसमो । मोहो तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवी गमो । मोठा हा अन्यायो जे हरिचरणी नाही नमो । मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो ॥३॥ भांबावसी झणे हे शरीर कर्दळीस्तंभ । भस्म कृमि विष्ठा उभे आहे तो सुशोभ । भाविता कीटकी झाली भृंगी तिया क्रमिले नभ । भावे भक्ति सुलभ वोळगा पद्मनाभ ॥४॥ गति मति इंद्रिये जव आहेती समयोग । गणिता आयुष्य न पुरे जव हे नवचे भंग । गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग । गरुडध्वजप्रसादे निस्तरिजे भवतरंग ॥५॥ वनी सिंह वसता गर्जी मदु केवी धरावा । वन्हिदग्धबीज त्यासी अंकुर केवी फुटावा । वज्रपाणि कोपलिया गिरी उदधि केवी लंघावा । वदनी हरि उच्चारी तेणे संसार केवी भुंजावा ॥ ६॥ तेज नयनीचा भानु जेणे तेजेमीनले ते । त्याचे मानसीचा चंद्रमा तो शिंपोते अमृते । त्याचे नाभिकमळी ब्रह्मा तेणे सृजिली सकळही भूते । ते विराट स्वरूप ओळखावे विष्णुभक्ते ॥७॥ वाताघाते फुटे गगनी मेघांचा मेळावा । वारिबिंदु पद्मिनीपत्री केंवी हो ठेवावा । वानराच्या हाती चिंतामणी केंवी द्यावा । वासुदेवचिंतने तोचि कल्मषा उठावा ॥८॥ सूक्ष्म स्थूल भूते चाळिता हे परमहंसु । शूळपाणी देवोदेवी जयाचा रे अंशु । शुभाशुभी कर्मीं न करी नामाचा आळसु । सुखे निरंतरी ध्याई ध्याई हृषीकेशु ॥९॥ देव होउनी उदार भक्तां देतो अमरपदे । देता न म्हणे सानाथोर वैरियासी तेचि दे । देहे सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे । देखा अजामेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे ॥१०॥ वाडा सायासी मनुष्यजन्म पावावा । वियाला पुरुषार्थ तो का वाया दवडावा । वाचा मने करूनि मुरारी वोळगावा । व्रते एकादशी करूनी परलोक ठाकावा ॥ ११॥ या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवरछाया । यातायाती न चुके तरी हे भोगिसील काह्या । या हरिभजनेंवीण तुझे जन्म जाती वाया । यालागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पां रे पाया ॥ १२॥ इहीच द्वादशाक्षरी ध्रुव अढळपद पावला । प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रांपासूनी जळा । बापरखुमादेवीवरू विठ्ठलु तुम्ही ध्यारे वेळोवेळा । तो कळिकाळापासुनी सोडवील अवलीळा ॥ १३ ॥ बाबा अहंकार निशी घनदाट । गुरुवचनी फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट । तिने मार्ग दाविला चोखट गा ॥१॥ नरहरी रामा गोविंदा वासुदेवा ॥धृ॥ एक बोल सुस्पष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा । संत समागमु धरावा । तेणे ब्रह्मानंद होय आघवा गा ॥२॥ आला शीतळ शांतीचा वारा । तेणे सुख झाले या शरीरा । फिटला पातकांचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा ॥३॥ अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा ॥४॥
(५५)
वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरणव्याधी । अहं सोहं कोहं मुळ ह्या सांडी उपाधी ॥१॥ रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा । जन्म जरा तुटे वाचे आठवीत सांठवा ॥२॥ चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे । तेणे ब्रह्मानंद हृदयी आठवण नांदे ॥३॥ एका जनार्दनी वासुदेव चिंतीता । यम काळदुत पळती नाम ऐकता ॥४॥
(५६)
16एकनाथ महाराज वासुदेव अभंग ६ वासुदेवस्मरण पापहरणाचे मूळ । तीर्थाचे माहेर ब्रम्ह व्यापक निश्चळ । अघनासी मुखीस्मरता वाचा झाली निर्मळ । त्रिविध ताप शोषुनि रूपीं स्वरूपीं सुमंगळ ॥१॥ ॐनमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ॥धृ॥ जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे । तीर्थ व्रत यम नेम नलगे दैवता धरणे । आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे । केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ॥२॥ शरीरशोषण प्राणनिरोधन मनोजय हटयोग । गुदपीडन कुंडलिनी कलिमलदलभंग । ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनि करी वो वनभंग । ब्रम्हरंध्री मिसळे परि मुमुक्षु दंग ॥३॥ मनोजय वासना तोडोनि केली बिमोडी । मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी । काम क्रोध मद मत्सर अहंकार दंभ झोडी । अखंड परमानंद सेवूनी उभवी गुढी ॥४॥ भेदभाव तोडोनि घेतला प्रेमाचा गरळा । शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा । हरिस्मरणाचेनी बळे अंकित केले कळिकाळा । एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ॥५॥
(५७)
सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ । ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ ॥२॥ धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे ॥धृ॥ विषयी विरक्त जया नाही आपपर । संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार ॥३॥ जाणीव शहाणीव वोझे सांडोनिया दुरी । आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥ एका जनार्दनी नित्य हरीचे किर्तन । आसनी शयनी सदा हरीचे चिंतन ॥५॥
(५८)
जया परमार्थाची चाड । तेणे सांडावे लिगाड । धरुनी भजनाची चाड । नित्यनेम आदरे ॥१॥ सांडी मांडी परते टाकी । वासुदेव नाम घोकी । मोक्ष येईल सुखी । नाम स्मरता आदरे ॥२॥ रामकृष्ण वासुदेवा । धरी हाचि दृढ भावा । आणिकाचा हेवा । दुरी करी आदरे ॥३॥ घाली संतासी आसने । पूजा करी कायावाचामने । एका जनार्दनी जाणे । इच्छिले ते पुरवी ॥४॥
(५९)
सुखे सेऊ ब्रम्हानंदा । गाऊ रामनाम सदा । नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥ करू वासुदेव स्मरण । तेणे तुटे रे बंधन । खंडईल कर्माचे वदन । वासुदेव जपतांची ॥२॥ तीर्थ यात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊ । संता संगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥३॥ लोभ ममता दवडूं आशा । उदरव्यथेचा वोळसा । न करू आणिक सायासा । वासुदेवावांचुनी ॥४॥ मुख्य वर्माचे हे वर्मं । कळो येईल सकळ धर्म । एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥
(६०)
एकनाथ महाराज वासुदेव अभंग १०
विषय सेविता गा जन्ममरणाचा बाधु । विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधु ॥१॥ रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गळती गा । रामकृष्ण वासुदेव हरि देही विदेही झाला गा ॥२॥ गुरुवाक्य भावबळे निजबोधे पै बुद्धि । तेणे बोधे पाहता गा अखंड ते समाधि ॥३॥ जनी वनी निरंजनी वासुदेव समान । एका जनार्दनी चित्त चैतन्य घन ॥४॥
(६१)
कर जोडूनि विनवितो तुम्हा । नका करू संसारश्रमा । नका गुंतू विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१॥ रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ॥धृ॥ नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना । त्यामध्ये दुःख यातना । तुम्ही आठवा मधुसूदना ॥२॥ नलगे तीर्थाचे भ्रमण । नलगे दंडण मुंडण । न लगे पंचाग्निसाधन । तुम्ही आठवा मधुसूदना ॥३॥ हीच माझी विनवणी । जोडोनिया कर दोन्ही । शरण एका जनार्दनी । तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी ॥४॥
एकनाथ महाराज वासुदेव अभंग १२
(६२)
मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो । देखिले पाय आता मागतो दान द्या हो । सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो । पावन संतवृंदे सादरे दृष्टीं पाहो ॥१॥ रामकृष्ण वासुदेवा । हरि रामकृष्ण वासुदेवा ॥धृ॥ सांडोनि सर्व चिंता संतपदीं लक्ष लागो । मुक्त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागो । भाविक प्रेमळांच्या संगती चित्त लागो ॥२॥ अद्वैतेचि चालो अक्षयीं भक्तियोग । स्वप्नींहि मानसाते नातळो द्वैतसंग । अद्वयानंद वेधे नावडो अन्यभोग । अक्रियत्वचि वाहो सत्क्रियारुपबोध ॥३॥ पाहता विश्वमाते निज़रूप दाखवी । सत्कथा श्रवण कर्णी पीयूष चाखवी । रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्हणे बा रे घेई ॥४॥ हे दान पावले सद्गुरु शांतिलिंगा । हे दान पावले आत्मया पांडुरंगा । हे दान पावले व्यापका अंतरंगा । हे दान पावले एका जनार्दनी दोष जाती भंगा ॥५॥
तुकाराम महाराज वासुदेव अभंग १३
(६३)
राम राम दोन्हीं अक्षरे । सुलभ आणि सोपारे । जागा मागिलिया पाहारे । शेवटिचे गोड तेचि खरे गा ॥१॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवीतसे जनासी । वाजवी चिपळिया । टाळ घागर्या घोषें गा । रामकृष्ण वासुदेवा ॥धृ॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाही आणिका नांवा । दान जाणोनिया करी हांवा । न ठेवी उरी काही ठेवा गा ॥२॥ नीज घेउनिया फिरती । एकवेळा जाणविती । धरूनिया राहा चित्ती । नेघें भार सांडी कामा हाती गा ॥३॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाही ठाव गा ॥४॥ शूर दान जीवे उदार । नाही वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥
(६४)
बोल अबोलणे बोले । जागे बाहेर बोल अबोलणे बोले । जागे बाहेर तुकाराम महाराज वासुदेव अभंग १४ बोल अबोलणे बोले । जागे बाहेर आंत निजेले । कैसे घरांत घरकुल केले । नेणों अंधार ना उजेडले गा ॥१॥ वासुदेव करितो फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी काही तरी दान पुण्य करा । जाब न द्याल तरी जातो माघारा गा ॥धृ॥ हाती टाळ दिंडी मुखीनाम गाणे । गजर होतो बहु मोठ्याने । नाही निवडिलीं थोर लहाने । नका निजो भिकेच्या भेणे गा ॥२॥ मी वासुदेव तत्वता । कळो येईल विचारिता । आहे ठाउका सभाग्य संता । नाही दुजा आणीक मागता गा ॥३॥ काही जागा की निजलासी । सुने जागवूनि दारापासीं । तुझ्या हितापाठी करी वसवसी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥ ऐसे जागविले अवघें जन । होते संचित तींहीं केले दान । तुका म्हणे दुबळी कोण कोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥
(६५)
तुकाराम महाराज वासुदेव अभंग १५
रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदे आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥ जनी वनी अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव । मग वोळगा तो वासुदेव । ऐसा मनी वसूं द्यावा भाव गा ॥धृ॥ नीज नामाची थोर आवडी । वासुदेवासी लागली गोडी । मुखीनाम उच्चारी घडोघडी । ऐसी करा वासुदेवी जोडी गा ॥२॥ अवघा सारूनि शेवट झाला । प्रयत्न न चले काही केला । जागा होई सांडुनि झोंपेला । दान देई वासुदेवाला गा ॥३॥ तुका म्हणे रे धन्य त्याचे जिणे । जिहीं वासुदेवी घातले दान । तया नलगे येणे जाणे । झाले वासुदेवी राहणे गा ॥४॥
(६६)
गातो वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवूनिया ठायी भावे एका । डोळे झांकुनि रात्र करू नका । काळ करीत बैसलासे लेखा गा ॥१॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडा वाउगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥धृ॥ अल्प आयुष्य मानव देह । शत गणिले ते अर्ध रात्र खाय । पुढे बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासी उरले ते पाहे गा ॥२॥ क्षणभंगुर नाही भरंवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा । कांही न चले मग गळा पडेल फांसा । पुढे हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥ काही थोडे बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन मन ध्यान द्या लावुनिया नीट । जरी करणे असेल गोड शेवट गा ॥४॥ विनवितो सकळा जनां । कर जोडुनि थोरां लहानां । दान इतुले द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥
कान्होबा महाराज वासुदेव अभंग १७
(६७)
गेले टळले पहार तीन । काय निदसुरा अझून । जागे होउनि करा काही दान । नका ऐकोनि झाकूं लोचन गा ॥१॥ हरे रामकृष्णा । वासुदेव जाणवितसे जना । चिपळ्या टाळ हाती वीणा । मुखी घोष नारायणा गा ॥धृ॥ जेठाकेल कोणा काही । फळ पुष्प अथवा तोयी । द्या परी मीस घेऊ नका भाई । पुढे विन्मुख होता बरे नाही गा ॥२॥ देवाकारणे भाव तस्मात । द्यावे न लगे फारसे वित्त । झाले एक चित्त तरी बहुत । एवढ्यासाठी नका करू वाताहात गा ॥३॥ आलो येथवरी बहु सायास । करिता दान हेचि मागावयास । नका भार घेऊ करू निरास । धर्म सार फळ संसारास गा ॥४॥ आता मागुता येईल फेरा । हे तो न घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु भाव धरा । ओळखी नाही तरी जाल अघोरा गा ॥५॥
कान्होबा महाराज वासुदेव अभंग १८
(६८)
मनुराजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी । पुत्रपौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥ म्हणऊनी आलो या देशा । होतो नाही तरी भुललो दिशा । दाता तोही मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा ॥धृ॥ सवे घेउनि चौघे जण । आला कुमर सुलक्षण । कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली ती कोण कोण गा ॥२॥ पुढे भक्तिने धरिले हाती । मागे ज्ञान वैराग्य धर्म येती । स्थिर केलीं जीं अचपळे होती । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्में त्याच्या देखियेले पाय । दिले अक्षय अभय दान गा ॥४॥ होतो पीडित हिंडता गांव । पोट भरेना राहावया ठाव । तो येणे अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥५॥
(६९)
कान्होबा महाराज वासुदेव अभंग १९ ओले मृतिकेचे मंदिर । आंत सहा जण उंदीर । गुंफा करिताती पोखर । याचा नका करू अंगिकार गा ॥१॥ वासुदेव करितो फेरा । तू अद्यापि का निदसुरां । सावध होई रे गव्हारा । भज भज तू शारंगधरा गा ॥२॥ बा तुझे तू सोयरे । तूचि वडील बा धारे । तू तुझेनि आधारे । वरकड मिळाले ते अवघे चोर गा ॥३॥ वासुदेव फोडितो टाहो । उठी उठी लवलाहो । हा दुर्लभ मानव देहो । म्हणे तुकयाबंधु स्वहित लवलाहो गा ॥४॥
नरहरी महाराज वासुदेव अभंग २०
(७०)
उठ बा जागा होय पाहे वासुदेवाला । सुदिन उगवला दान आपुले घाला ॥१॥ आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥२॥ ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर । भक्तासी भय नाही संत संगती धर ॥३॥ संसार सार नोहे माया मृगजळ भास । क्षणांत भ्रांती यांचा काय विश्वास ॥४॥ घे करी टाळ दिंडी हो या विठ्ठलाचा दास । सावधान नरहरी मालो चरणी निजध्यास ॥५॥
सेना न्हावी महाराज वासुदेव अभंग २१
(७१)
टळोनि गेले प्रहर तीन । काय निजता झांकोन लोचन । आलो मागावया दान । नका विन्मुख होऊ जाण गा ॥१॥ रामकृष्ण वासुदेवा । जाणवितो सकळ जिवा । द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाही या गावा गा ॥२॥ आलो दुरुनि सायास । द्याल दान मागायास । नका करू माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥३॥ एक भाव देवाकारणे । फारसे नलगे देणे घेणे । करा ऐकचित्त रिघा शरण । हेचिमागणे तूम्हा कारणे गा ॥४॥ नका पाहुं काळ वेळा । दान देई वासुदेवा । व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणी लागला गा ॥५॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥
(७२)
13 आंधळे व पांगळे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारले ॥ विषयसुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले ॥ चौर्यांशि लक्ष योनी फिरता दुख भोगिले ॥ ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे ॥१॥ धर्म जागो सदैवाचा जे बा पर उपकारी ॥ आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी ॥धृ॥ संसार दुख मुळ चहुकडे ईंगळ ॥ विश्रांति नाही कोठे रात्रंदिवस तळमळ ॥ काम क्रोध लोभशूनी पाठी लागली वोढाळ ॥ कवणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ ॥२॥ माता पिता बंधु बहीणी कोणी न पवती निर्वाणी ॥ इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी ॥ एकला मी दुख भोगी कुंभ पाक जाचणी ॥ तेथे कोणी सोडविना एका सद्गुरुवाचूनि ॥३॥ साधूसंत मायबाप तीहि केले कृपादान ॥ पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान ॥ पुंडलिके वैद्यराजे पूर्वी साधिले साधन ॥ वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले ते अंजन ॥४॥ कृष्णांजन एक वेळा डोळा घालीता अढळ ॥ तिंमिर दुख गेले फीटले भ्रांती पडळ ॥ श्रीगुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ ॥ बापरुखमादेवीवरु विठ्ठल दिनाचा दयाळ ॥५॥
(७३)
देवा तुज चुकलो गा तेणे दृष्टी आले पडळदेवा तुज चुकलो गा तेणे दृष्टी आले पडळ ज्ञानेश्वर महाराज आंधळा २ देवा तुज चुकलो गा तेणे दृष्टी आले पडळ । विषय ग्रंथी गुंतलोसे तेणे होत असे विव्हळ । अंधमंद दृष्टी झालि गिळु पाहे हा काळ । अवचित दैवयोगे निवृत्ती भेटला कृपाळ ॥१॥ धर्म जागो निवृत्तीचा तेणे फेडिले पडळ । ज्ञानाचा निजबोध विज्ञानरुप सकळ ॥२॥ तिन्ही लोकी विश्वरुप दिव्य दृष्टी दिधली । द्वैत हे हरपले अद्वैतपणे माऊली । उपदेश निजब्रह्म ज्ञानांजन साऊलि । चिद्रुप दीप पाहे तेथे तनुमनु निवाली ॥३॥ दान हेचि आम्हा गोद देहि दृष्टी मुराली । देह हे हरपले विदेह वृत्ती स्फुरली । विज्ञान हे प्रगटले ज्ञेयज्ञाता निमाली । दृश्य ते तदाकार ममता तेथे बुडाली ॥४॥ प्रपंचु हा नाहि जाणा एकाकार वूत्ति झाली । मी माझे हरपले विषयांध या बोली । उपरती सद्गुरु बोधु तेथे प्रकृति संचली । धर्ममार्गे शुद्ध पंथ हाती काठि दिधली ॥५॥ वेदमार्गे मुनि गेले त्याची मार्गे चालिलो । न कळेचि विषय अंध म्हणोनि उघड बोलिलो । चालता धनुर्धरा तरंगाकारी हारपलो । ज्ञानदेवो निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो ॥६॥
(७४)
जंबु या द्वीपामाजीं एक पंढरपूर गांव । धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नांव । चलां जाऊ तया ठाया । काही भोजन मागाया ॥१॥ विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणी लक्ष लागों ॥२॥ ज्यासी नाही पंख पाय तेणे करावे ते काय । शुद्ध भाव धरोनिया पंढरपुरासी जाय । इच्छिले फळ देतो यासी नवलाव ते काय ॥३॥ सुदामा ब्राम्हण दुखे दरिद्रें पिडीला । मुष्टीभर पोहे घेऊनि त्याचे भेटिलागी गेला । शुद्ध भाव देखोनिया गांव सोनियाचा दिला ॥४॥ गण आणि गोत्रज सर्व हांसताती मज । गेले याचे मनुष्यपण येणे सांडियेली लाज । विनवितो शिंपी नामा संतचरणींचा रज ॥५॥
(७५)
पंढरपुर पाटणी गा महाराजपंढरपुर पाटणी गा महाराज एकनाथ महाराज आंधळा ४ पंढरपुर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचे ते नाम ॥१॥ आंधळ्या जीवींचे तो जाणतो धर्म । म्हणोनि आलो गा देई माझे मज वर्म ॥२॥ असोनि हात पाय डोळा जाहालो मी आंधळा । मुखी नाम तुझे लागला वाचेसी चाळा ॥३॥ देऊनि दान माते नाम सांगे ये काळी । विठोबाचे दान आले ऐसी देईन आरोळी ॥४॥ दान पावले संतसंगे भक्तीचे । एका जनार्दनी अखंड नाम वाचे ॥५॥
(७६)
मृत्युलोकी एक नगर त्याचे नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर । पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहुर ॥१॥ तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा । न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥२॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड । कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड । नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड । श्वानापरी गती झाली अवघे करिती हाड हाड ॥३॥ साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर । भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर । तिहीं केले कृपादान मस्तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुद्ध झाले कलेंवर ॥४॥ बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला निट । भ्रांति हे समूळ गेली दिसूं लागली वाट । नाचत प्रेमछंदे चालूं लागलो सपाट । एकाजनार्दनी पावलो पंढरी पेठ ॥५॥
एकनाथ महाराज पांगळा ६
(७७)
मी माझे कल्पनेने जाहलोंसे पांगुळ । चालता न चलवेंचि कोठे न मिळे स्थळ । हिंडलो दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही भ्रांती वारी कैं भेटेल गुरुदयाळ ॥१॥ धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव । निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव ॥२॥ कर्म त्या अकर्माच्या लागती वाटे ठेंसा । संपत्ती विपत्तीचा मानिला भरंवसा । कन्या पुत्र आप्त जन हा तो सहज वोळसा । या भ्रम डोही बुडालो धांवे गुरुराया सर्वेशा ॥३॥ येऊनि गरुनाथें माथां ठेविला करु । अज्ञान तिमिर गेले शुध्द मार्ग साचारु । गर्जत चालियेलो फिटला अज्ञान अंधारु । एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारु ॥४॥
(७८)
पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय । बैसलो जयावरी सैराट ते जाय । खेटिता कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाही कोणी मज बाप ना माय ॥१॥ दाते हो दान करा जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥धृ॥ हिंडता गव्हाने गा शिणलो येरझारी । न मिळेचि दाता कोणी जन्मदुःख निवारी । कीर्ति हे संतामुखीतो मज दाखवा हरी । पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी ॥२॥ या पोटाकारणे गा झालो पांगिला जना । न सरे चि मायबाप भिके नाही खंडणा । पुढारा म्हणती एक तया नाही करुणा । श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा ॥३॥ काय मी चुकलो गा मागे नेणवेंचि काही । न कळेंचि पापपुण्य तो आठव नाही । मी माजीं भुललो गा दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान संत महानुभाव काही ॥४॥ दुरोनि आलो मी गा दुःख जाले दारुण । यावया येथवरी होते हेचि कारण । दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुशन । विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून ॥५॥
(७९)
देखत होतो आधीं मागे पुढे सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसे वाढे वाढता प्रबळ । भीत मी झालो देवा काय जियाल्याचे फळ ॥१॥ आता मज दृष्टी देई पांडुरंगा मायबापा । शरण आलो आता निवारूनिया पापा । अंजन लेववुनी करी मारग सोपा । जाईन सिद्धपंथें अवघ्या चुकतील खेपा ॥धृ॥ होतसे खेद चित्ता काही नाठवे विचार । जात होतो जना मागे तोही सांडिला आधार । हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार । फिरलीं माझी मज कोणी न देती आधार ॥२॥ जोंवरी चळण गा तोंवरी म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाचिया काजा । इंद्रिये मावळलीं आला बागुल आजा । कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ॥३॥ गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध । मी माझे वाढवुनी मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसेचि केला आपुला वध । लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध ॥४॥ लागती चालता गा गुणदोषांच्या ठेंसा । सांडिली वाट मग झालो निराळा कैसा । पाहातो वाट तुझी थोर करूनि आशा । तुका म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा ॥५॥
(८०)
आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्य संचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥ धर्म गा जागो तुझा तूचि कृपाळू राजा । जाणसी जीवींचे गा न सांगता सहजा ॥धृ॥ घातली लोळणी गा पुंडलीके वाळवंटी । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटी । न देखे दुसरे गा झाली अदृश्य दृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटे । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणे धांव घातली नेटे ॥३॥ बैसोनि खोळी शुक राहे गर्भी आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा । मागील सोसिले ते ना भी म्हणे गोपाळा । पावला त्याकारणे लाज राखिली कळा ॥४॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो नाठवी धना । आपपर तेही नाही बंधुवर्ग सज्जना । तुकया तेचि परी झाली पावे नारायणा ॥५॥
(८१)
सहज मी आंधळा गा निज निराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथे । मी माझे हारपले ठायीं जेथींच्या तेथे । अदृश्य तेचि झाले काही दृश्य जेहोते ॥१॥ सुखे मी निजलो गा शून्य सारूनि तेथे । त्रिकूट शिखरी गा दान मिळे आइते ॥धृ॥ टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वोळसा । न मागे भीक आता हाचि झाला भरंवसा । वोळली सत्रावी गा तिणे पुरविली इच्छा ॥२॥ ऊर्ध्वमुखे आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपीं मेळविले नांव ठेविला भेद ॥३॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागे येतील त्यांसीं । मागोंनि आली वाट सिद्ध ओळीची तैसी । तरले तरती आणिकही विश्वासी ॥४॥ वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव । जाणीव नागवण लागों नेदी तो ठाव । म्हणोनि संग टाकी सेवी अद्वैत भाव । तुका म्हणे हाचि संती मागे केला उपाव ॥५॥
तुकाराम महाराज आंधळा पांगळा ११
(८२)
देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलो । करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहिलो । पाय डोळे म्हणता माझे तींही कैसा मोकलिलो । परदेशीं नाही कोणी अंध पांगुळ झालो ॥१॥ आता माझी करी चिंता दान देई भगवंता । पाठी पोटी नाही कोणी निरवी सज्जन संता ॥धृ॥ चालता वाट पुढे भय वाटते चित्ती । बहुत जन गेले नाही आले मागुती । न देखे काय झाले कान तरी ऐकती । बैसलो संधिभागी तुज धरूनि चित्ती ॥२॥ भाकितो करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरे पोट कधीं नाही निश्चळ पाव । हिंडता भागलो गा लक्ष चौर्यांशी गांव । धरूनि राहिलो गा हाचि वसता ठाव ॥३॥ भरवसा काय आता कोण आणि अवचिता । तैसीच झाली कीर्ति तया मज बहुता । म्हणउनि मारी हांका सोयी पावे पुण्यवंता । लागली भूक थोरी तूचि कृपाळू दाता ॥४॥ संचित सांडवले काही होते ते जवळी । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी । निष्काम झालो देवा होते माझे कपाळी । तुका म्हणे तू चि आता माझा सर्वस्वें बळी ॥५॥
तुकाराम महाराज पांगळा १२
(८३)
भगवंता तुजकारणे मेलो जीताचि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाही तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणता न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥धृ॥ भुक्ति मुक्ति तूचि एक होसि सिद्धींचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आता । कृपादान देई देवा येउनि सामोरा आता ॥२॥ संसारसागरू गा भवदुःखाचे मूळ । जनवाद अंथरुण माजीं केले इंगळ । इंद्रिये वज्रघाते तपे उष्ण वरी जाळ । सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ ॥३॥ तिही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलो वरी खोडा भाव धरूनि टेका । जाणवी नरनारी जागो धर्म लोका । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥ नाठवे आपपर आता काय बा करू । सारिखा दोहीसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥ जय जय वासुदेव हरी भजन👇 ॥ विठ्ठलविठ्ठल ॥* 14 जोगी
(८४)
जग जोगी जग जोगी । जागे जागे बोलती ॥धृ॥ जागता जगदेव । राखा काही भाव ॥१॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजावा सकळ ॥२॥ पूजापत्र काही । फल पुष्प तोय ॥३॥ बहुता दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥ नका घेऊ भार । धर्म तोचि सार ॥५॥ तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥६॥ ॥ विठ्ठलविठ्ठल ॥* 15 मुका
(८५)
मुका झालो वाचा गेली ॥ ध्रु ॥ होतो पंडीत महाज्ञानी । दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानि ॥१॥ जिव्हा लांचाविली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पातलो मुखबंधना ॥२॥ साधू संताची निंदा केली । हरिभक्तांची स्तुति नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥३॥ ॥ विठ्ठलविठ्ठल ॥* बहिरा
(८६)
बहिरा जालो या जगी ॥धृ॥ नाही ऎकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्रपठण । गर्भी बहिरा झालो त्यागुणे ॥१॥ नाही संतकीर्ति श्रवणी आली । नाही साधूसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनी त्यागिली ॥२॥ माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एका जनार्दनी स्मरेन आता ॥३॥ ॥ विठ्ठलविठ्ठल ॥* 17 बाळछंद अलक्षलक्षी मी लक्षी । तेथेअलक्षलक्षी मी लक्षी । तेथे ज्ञानेश्वर महाराज बाळछंद १
(८७)
अलक्षलक्षी मी लक्षी । तेथे दिसती दोही पक्षी । वेदशास्त्रां हे़ची साक्षी । चंद्रसूर्यासहित । मागेन स्वानुभवअंगुले । पांचा तत्त्वांचे सानुले । व्यर्थ इंद्रिये भोगीले । नाही रंगले संतचरणी ॥१॥ बाळछंदो बाबा बाळछंदो । रामकृष्ण नित्य उदो । ह्रदयकळिके भावभेदो । वृत्तिसहित शरीर निंदो । नित्य उदो तुझाची ॥२॥ क्षीरसिंधुही दुहिला । चतुर्दशरत्नीं भरला । नेघे तेथील साउला । मज अबोला प्रपंचेंसी । दानदेगा उदारश्रेष्ठा । परब्रह्म तू वैकुंठा । मुक्ति मार्गीचा चोहटा । फ़ुकटा नेघे तया ॥३॥ पृथ्वीतळ राज्यमद । मी नेघे नेणे हेंही पद । रामकृष्ण वाचे गोविंद । हाची छंद तुझ्या पंथे । मंत्र तीर्थयज्ञयाग । या न करि भागा भाग । तूचि होऊनि सर्वांग । सर्वासंग मज देई ॥४॥ वृत्तिसहित मज लपवी । माझे मन चरणी ठेवी । निवृत्ति पदोंपदीं गोवी । तुं गोसावी दीनोध्दारण ॥ सात पांच तीन मेळा । या नेघे तत्त्वांचा सोहळा । रज तमाचा कंटाळा । ह्रदयीं जिव्हाळा हरि वसो ॥५॥ श्वेत पीत नेघे वस्त्र । ज्ञानविज्ञान नेघे शास्त्र । स्वर्ग मृत्यु पाताळपात्र । नित्य वस्त्र हरी देई । चंद्रसूर्य महेन्द्र पदे । ध्रुवादिकांची आनंदे । ते मी नेघे गा आल्हादे । तुझ्या ब्रिदे करीन घोष ॥६॥ करचरणेंसे इंद्रियवृत्ति । तुझ्या ठायीं तूचि होती । मी माझी उरो नेदी कीर्ति । हे दान श्रीपति मज द्यावे ॥७॥ शांती दया क्षमा ऋध्दी । हेहि पाहाता मज उपाधी । तुझी या नामांची समाधी । कृपानिधी मज द्यावी ॥८॥ बापरखुमादेविवरु तुष्टला । दान घे घे म्हणोनि वोळला । अजानवृक्ष पाल्हाईला । मग बोलिला विठ्ठल हरी ॥९॥ पुंडलिके केले रे कोडे । ते तुवा मागीतले रे निवाडे । मीं तुज ह्रदयीं सांपडे । हे त्त्वां केले ज्ञानदेवा ॥ १० ॥ ज्ञानदेवी घेतले दान । हृदय धरुनिया ध्यान । समाधी बसला निर्वाण । कथा किर्तन करी तू ॥ ११ ॥ बाळछंदो बावीस जन्मे तोडिली भवाब्धीची कर्मे चंद्रावर तारांगणे रश्मी दान घेतला हरि ॥ १२ ॥ ॥ विठ्ठलविठ्ठल ॥* बाळछंदो प्रेमडोही मनबाळछंदो प्रेमडोही मन ज्ञानेश्वर महाराज बाळछंद २
(८८)
बाळछंदो प्रेमडोही मन । जाले मनाचे उन्मन । उपरती धरिले ध्यान । झाले ज्ञानपरब्रह्मीं ॥१॥ निमिषा निमिष छंद माझा । बाळछंदो हा तुझा । वेगि येई गरुडध्वजा । पसरुनीया भूजा देई क्षेम ॥२॥ तुटली आशेची सांगडी । ध्याने नेली पैल तडी । सुटली संसाराची बेडी । क्षणु घडी रिती नाही ॥३॥ नाठवे द्वैताची भावना । अद्वैती न बैसे ध्याना । दिननिशींची रचना । काळगणना छंदे गिळी ॥४॥ जप तप वृत्ति सहित । निवृत्ति होईन निश्चिति । समाधी बैसेन एकतत्त्व । मुखीमात नामाची ॥५॥ ज्ञानदेवी छंद ऐसा । बाळछंद झाला पिसा । दान मागतसे महेशा । दिशादिशा न घली मन ॥६॥ ॥ विठ्ठलविठ्ठल ॥* ज्ञानेश्वर महाराज गौळणी
(८९)
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळी वेणु वाजवीत आहे ॥१॥ गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो ॥धृ॥ सांवळे सगुण सकळा जिवांचे जीवन । घनानंदमूर्ति पाहता हारपले मन ॥२॥ शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बापरखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥ ज्ञानेश्वर महाराज गौळण २
(९०)
योगिया मुनिजनां ध्यानी । ते सुख आसनी शयनी ॥१॥ हरिसुख फावले रे ॥धृ॥ गोकुळीच्या गौळिया । गोपि गोधना सकळा ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठले । ते सुख सवंगडिया दिधले ॥३॥ तुजवीण एकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुवा नवल केले वेणु घेऊनि हाती । आलिये तेचि सोय तुझी ओळखिली गती ॥१॥ नवल हे वालभ रे कैसे जोडले जिवा । दुसरे दुरी ठेले प्रीति केला रिघावा ॥२॥ पारु रे पारु रे कान्हा झणे करिसी अव्हेरु । तू तंव हृदयीचा होसी चैतन्य चोरु । बापरखुमादेवीवरु विठो करी का अंगिकारु ॥३॥
(९१)
ज्ञानेश्वर महाराज गौळण ५ लक्ष लावुनि अंतरी । कृष्णा पाहती नरनारी । लावण्यसागरु हरि । परमानंदु ॥१॥ छंदे छंदे वेणु वाजे । त्रिभुवनी घनु गाजे । उतावेळ मन माझे । भेटावया ॥धृ॥ ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोवळा । श्रुति नेणवे ते लीळा । वेदां सनकादिका ॥२॥ भूतग्रामीचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु । आड धरुनि गोपवेषु । वत्सें राखे ॥३॥ रासक्रीडा वृंदावनी खेळे । इंदुवदन मेळे । उद्धरी यदुकुळे । कुळदीपके ॥४॥ निवृत्ति दासाचा दातारु । बापरखुमादेवीवरु । भक्तां देतो अभयकरु । क्षणक्षणांमाजि ॥५॥
(९२)
यातिकुळ माझे गेले हारपोनि । श्रीरंगावांचुनी आनु नेंणे ॥१॥ किती वो शिकवाल मज वेळोवेळा । मी तया गोवळा रातलिये ॥२॥ अष्टभोग भोगणे माते नाही चाड । भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ॥३॥ बापरखुमादेवीवरु जीवींचा जिव्हाळा । कांही केलिया वेगळा नव्हे गे माये ॥४॥
(९३)
माझ्या कान्हाचे तुम्ही नाव भरी घ्यावो । हृदयी धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥ भक्तांकारणे येणे घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोसिले वनमाळी ॥२॥ कल्पनेविरहित भलतया मागे । अभिमान सांडुनी दीनापाठी लागे ॥३॥ शोषिली पुतना येणे तनू मोहियेले तरु । आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥
(९४)
घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा का ॥१॥ चांद वो चांदणे । चांपे वो चंदनु । देवकी नंदनुविण नावडे वो ॥२॥ चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी वेगी भेटवा का ॥३॥ सुमनाची सेज । सितळ वो निकी । पोळे आगिसारिखी वेगी विझवा का ॥४॥ तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे । कोकिळे वर्जावे तुम्ही बाइयांनो ॥५॥ दर्पणी पाहाता । रुप न दिसे वो आपुले । बापरखुमादेवीवरे विठ्ठले मज ऐसे केले ॥६॥ पांवया छंदे तल्लीन गोविंदेपांवया छंदे तल्लीन गोविंदे ज्ञानेश्वर महाराज गौळण ९
(९५)
पांवया छंदे तल्लीन गोविंदे । नाचती आनंदे गोपाळ कैसे ॥१॥ यमुनेच्या तीरी गाई चारी हरी । गोपाळ गजरी आनंदले ॥२॥ ठायीं ठायीं मातु पे द्या पै नाचतु । वाकुल्या दावितु हरी छंदे ॥३॥ गायी ठाती उभ्या विसरल्या माया । हाकितु लवलाह्या कृष्णहरी ॥४॥ ज्ञानदेवा जीवी कृष्ण चिरंजीवी । गोपाळ रंजवी प्रेमभक्तां ॥५॥ जीवीचिया जीवाजीवीचिया जीवा ज्ञानेश्वर महाराज गौळण १०
(९६)
जीवीचिया जीवा । प्रेमभावाचिया भावा । तुज वांचूनि केशवा । अनु नावडे ॥१॥ जीवे अनुसरलिये । अजुनी का नये । वेगी आणावा तो सये । प्राण माझा ॥२॥ सौभाग्यसुंदरु । लावण्यसागरु । बापरखुमादेवीवरु । श्रीविठ्ठलु ॥३॥
(९७)
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळा बाईये वो ॥१॥ वेधले वो मन तयाचिया गुणी । क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ॥२॥ पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणां होय उणे । तैसे माझे जिणे एक विठ्ठलेवीण ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाई ये वो ॥४॥
(९८)
सावळे परब्रह्म आवडे या जीवा । मने मन राणिवा घर केले ॥१॥ काय करु सये सांवळे गोवित । आपे आप लपत मन तेथे ॥धृ॥ बापखुमादेविवरु सांवळी प्रतिमा । मने मनी क्षमा एक झाले ॥३॥
(९९)
काय सांगू तूते बाई काय सांगू तूते ॥धृ॥ जात होते यमुने पाणिया वातेत भेतला सांवला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ॥१॥ तेणे माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली । पलता पलता घसलून पलली । दोईची घागल फुतली ॥२॥ माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले । तिकुन आले शालंगपाणी मला पोताशीं धलिले ॥३॥ मला पोताशीं धलिले माझे समाधान केले । निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवा लाधले ॥४॥
(१००)
गायी चालील्या वनाप्रती । सवे पे द्या चाले सांगाती ॥धृ॥ वळी गोवळीया कान्होबा । यमुने पाण्या नेई तु बा । । १ । । पावया छंदे परतल्या गायी । विसरल्या चारा तल्लीन ठायी । । २ । । ज्ञानदेव सवे सवंगडी लाठा । गायी हाकितो गोधना तटा । । ३ । ।
(१०१)
नवल देखिले कृष्णरूप बिंब । सांवळी स्वयंभ मूर्तिं हरीची॥१॥ मन निवाले समाधान जाले । कृष्णरूपे बोधले मन माझें॥२॥ बापरखुमादेविवरू सांवळा सर्व घटी । चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो॥३॥
(१०२)
परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥ म्हणती गौळणी हरीची पाउले धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥ लपत छपत येतो हरी हा राजभुवनी । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनी ॥३॥ सांपडला देव्हारी यासी बांधा दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥ बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडले देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥ नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा । जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥
(१०३)
यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ॥ धृ० ॥ साध्या गव्हांची पोळी लाटी । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाही अडवीत गुळासाठी । मला जेवू घाल ॥१॥ तूप लावून भाकर करी । वांगे भाजून भरीत करी । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवू घाल ॥२॥ आई ग खडे साखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवू घाल ॥३॥ आई लहानच घे गे उंडा । लवकर भाजुन दे मांडा । लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवू घाल ॥४॥ आई मी खाईन शिळा घांटा । दह्याचा करून दे मठ्ठा । नाही माझ्या अंगी ताठा । मला जेवू घाल ॥५॥ भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हारपली । यशोदेने कृपा केली । मला जेवू घाल ॥६॥ आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितो नऊ लाख । गाई राखून झिजलीं नख । मला जेवू घाल ॥७॥ नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी । जाऊन सांगा यशोदेशी । मला जेवू घाल ॥ ८ ॥ नामदेव महाराज गौळण ३ गेलिया वृंदावना तेथे देखिला कान्हागेलिया वृंदावना तेथे देखिला कान्हा
(१०४)
गेलिया वृंदावना तेथे देखिला कान्हा । संवगडियामाजी उभा ध्यान लागले मना ॥१॥ हरिनाम गोड झाले काय सांगों गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठे न राहे ॥२॥ त्याचे मुख साजिरे वो कुंडले चित्त चोरे । सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरे ॥३॥ सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा । कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळा ॥४॥ सांडुनी मेघराजु कटिसूत्रीं तळपे विजू । भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥ सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज । अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिका सहज ॥६॥ वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू । भेदली हरिचरणी पायी मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥ त्याचे पायींची नेपुरे वाजती वो गंभीरे । लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरे ॥८॥ आणिक एक नवल कैसे स्वर्गीं देव झाले पिसे । ब्रम्हादिक उच्छिष्ठालागी देखा जळी झाले मासे ॥९॥ आणिक एक नवल परी करी घेऊनि शिदोरी । सवंगड्या वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥ १० ॥
(१०५)
कान्होबा निवडी आपुली गोधने ॥धृ॥ पांच पांच पोळ्या तीन भाकरी । दीड कानवला एक पुरी । आम्हा धाडिले वैल्या दुरी । आमची ठकवून खाल्ली शिदोरी ॥१॥ परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा । सांगू गेलो तुझ्या घरा । पाठी लागला तुझा म्हातारा ॥२॥ परियेसी हृषीकेशी । गाई म्हशीचे दुध पिशी । वासरे प्याली म्हणून सांगशी । उद्या ताक नाही आम्हासी ॥३॥ कान्होबा ओढाळ तुझ्या गाई । होत्या नव्हत्या कळंबा ठायीं । शिव्या देती तुझी आई ॥४॥ विष्णुदास नामा साहे । देवा तूचि बाप माये । अखंड माझे हृदयी राहे ॥५॥
(१०६)
रात्र काळी घागर काळी । यमुनाजळे ही काळी वो माय ॥१॥ बुंथ काळी बिलवार काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥ मी काळी कांचोळी काळी । कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥ एकली पाणीया नवजाय साजणी । सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥ विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी । कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
(१०७)
तळवे तळहात टेकीत । डाव्या गुडघ्याने रांगत । रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये ॥१॥ गवळण जसवंती पै सांगे । आले या कृष्णाचेनि मागे । येणे येणे वो श्रीरंगे । नवनीत माझे भक्षिले ॥२॥ एक्या हाती लोण्याचा कवळु । मुख माखिले अळुमाळु । चुंबन देता येतो परिमळु । नवनीताचा गे सये ॥३॥ येणे माझे कवाड उघडिले । येणे शिंके हो तोडिले । दह्यादुधाते भक्षिले । उलंडिले ताकाते ॥४॥ ऐसे जरी मी जाणते । यमुनापाणिया नव जाते । धरूनि खांबासी बांधिते । शिक्षा लाविते गोविंदा ॥५॥ ऐसा पुराण प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार । पंढरपुरी उभा विटेवर । भक्त पुंडलिकासाठी ॥६॥
(१०८)
बाळ सगुण गुणाचे तान्हें गे । बाळ दिसते गोजिरवाणे गे । काय सांगता गाऱ्हाणे गे । गोकुळीच्या नारी ॥१॥ श्रीरंग माझा वेडा गे । याला नाही दुसरा जोडा गे । तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळीच्या नारी ॥२॥ पांच वर्षांचे माझे बाळ गे । अंगणी माझ्या खेळे गे । का लटकाच घेता आळ गे । गोकुळीच्या नारी ॥३॥ सांवळा गे चिमणा माझा गे । गवळणींत खेळे राजा गे । तुम्ही मोठ्या ढालगजा गे । गोकुळीच्या नारी ॥४॥ तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे । आळ घेता या गोपाळा गे । तुम्ही ठाईंच्या वोढाळा गे । गोकुळीच्या नारी ॥५॥ तुम्ही लपवुनी याची गोटी गे । लागता गे याचे पाठी गे । ही एवढीच रीत खोटी गे । गोकुळीच्या नारी ॥६॥ तुम्ही लपवूनि याचा भवरा गे । धरूं पाहता शारंगधरा । तुम्ही बारा घरच्या बारा गे । गोकुळीच्या नारी ॥७॥ हा ब्रह्मविधीचा जनीता गे । तुम्ही याला धरूं पाहता गे । हा कैसा येईल हाता गे । गोकुळीच्या नारी ॥८॥ नामा म्हणे यशोदेसी गे । हा तुझा हृषिकेशी गे । किती छळितो आम्हांसी गे । गोकुळीच्या नारी ॥ ९ ॥
(१०९)
नामदेव महाराज गौळण ९ प्रातकाळी प्रहरा रात्रीं उठिल्या गौळणी प्रातकाळी प्रहरा रात्रीं उठिल्या गौळणी प्रातकाळी प्रहरा रात्रीं उठिल्या गौळणी बाळा । घुसळण मांडियेले घरोघरी सकळा । नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥ घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदे छंदे डोलती ॥ धृ० ॥ एक म्हणती साजणी तुम्ही लपवा गे लोणी । नकळे नकळे वो बाई कृष्णाची करणी । कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी । खास खांदूनि तुम्ही आता लपवा दुधाणी ॥२॥ बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला । कवणेंही नाही देव दृष्टि देखिला । सूक्ष्म रूप धरूनि डेर्यामध्ये प्रवेशला । वरच्यावरी देव लोणी खाऊनिया गेला ॥३॥ उन्हवणी शिळवणी घालिती परते लोणी येईना । काय झाले टोणे सासूबाई कळेना ॥४॥ हा हा गे बायांनो तुमचे जाणते चाळे । यश्वदेच्या मुला नेऊनि देतसां गोळे । उगेंचि मग पाहता आता फिरगे निराळे । मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥ डेर्यामधुनी मार माझा जगज्जीवन पाहे । नामा म्हणे धन्य धन्य वर्णूं मी काये ॥६॥
(११०)
गड्यांनो राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनी बैसला ॥धृ॥ पांवा मोहरी घोंगडी । आम्ही खेळू यमुने थडी । नाचा पाऊला देहुडी । कृष्ण आमुचा की रे गडी ॥२॥ खेळू हुतुतू हुंबरी । थडक हाणों टिरीवरी । आता चालिला दळभारी । आमुचा यशोदेचा हरी ॥३॥ कुस्ती खेळता कासाविसी । शेंबुड खरकटे नाकाशी । कडे घेऊ सावकाशी । आता बहु भितो यासी ॥४॥ आम्ही तुम्ही सवे जाऊ । गाई वळावया जाऊ । त्याचे मानेत बुक्या देऊ । जवळी जावयासी भिऊ ॥५॥ नामा म्हणे चला जाऊ । हात जोडूनी उभे राहूं । पाया पडून मागून घेऊ । जनी वनी तोचि कृष्णची ध्याऊ ॥६॥
(१११)
हाती घेऊनिया काठी । शिकविते श्रीपती । यमुनेची माती । खासी का का का का ॥१॥ हरी तू खोडी नको करू माझ्या बा बा बा बा ॥धृ॥ धांऊनिया धरिला करी । बैसविला मांडिवरी । मुख पसरोनि करी । आ आ आ आ ॥२॥ विष्णुदास नामा म्हणे । मरोनिया जन्मा येणे । कृष्ण सनातन पाहूं । या या या या ॥३॥
(११२)
रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा । सखीये स्वप्नीं शोभा देखियेली ॥१॥ नेत्र विशाळ भाळ दंत हिरया ज्योती । बाइये मदनमूर्ति देखियेला ॥२॥ शंख चक्र गदा शोभती चहूं करी । सखीये गरुडावरी देखियेला ॥३॥ शयन शेषापृष्ठीं नभी परमेष्ठी । गंगा वामांगुष्ठी देखियेला ॥४॥ पीतांबर कटीतटी दिव्य चंदन उटी । सखीये जगजेठी देखियेला ॥५॥ विचारीता मानसी नये जो व्यक्तीसी । नामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥६॥
(११३)
ऐकुनी वेणुचा नाद । लागला नामाचा छंद ॥१॥ निघाली लगबग पाण्याला । रिकामा घेवोनीया डेरा । गिरधर गोविंद गोविंद ॥२॥ निघाली धेनु चाराया । वासरे करोनिया गोळा । वाजवी पावा गोविंद ॥३॥ नामा म्हणे अहो केशवराज । नाम घ्या श्री कृष्ण गोविंद । गवळणी झाल्या मती मंद ॥४॥
(११४)
कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको । गवळ्याघरी बोभाट उठला । माठ दह्याचे घेऊ नको तू फोडू नको ॥१॥ रागीट तुझा पिता नंद मार तयाचा खाऊ नको ॥२॥ आली गौळण कपटी राधा, तिच्या घरात तू जाऊ नको ॥३॥ पाळण्यात घालूनी झोके देते, आता मुला, तू रडू नको ॥४॥ वरद्या वांकड्या पे द्या सुदामा, ह्यांच्या डावामध्ये खेळू नको ॥५॥ नामा म्हणे पतित पावना, ह्यांच्या नामा तू विसरू नको ॥६॥
(११५)
राधा आणि तो मुरारी । क्रीडा कुंजवनी करी ॥१॥ कृष्ण डोलत डोलत । आले राधेमंदिरांत ॥२॥ सुमनाचे शेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥ आवडीने विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥
(११६)
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ॥१॥ हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आता मज मना कोण करी ॥२॥ पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावरी तेल घाला तुम्ही ॥३॥ जनी म्हणे देवा मी झाले येसवा । रिघाले केशवा घर तुझे ॥४॥
(१)
माझे अचुडे बचुडे छकुडे गे । राधे रूपडे । पांघरूं घालिती कुंचडे ॥धृ॥ हरि माझा गे सांवळा । पायी पैंजण वाजे खुळखुळा । याने भुलविल्या गोपीबाळा ॥१॥ हरि माझा गे नेणता । करी त्रिभुवनाचा घोंगता । जो का नांदे त्रिभुवनी ॥२॥ ऐसे देवाजीचे गडी । पे द्या सुदाम्याची जोडी । बळिभद्र त्याचा गडी ॥३॥ जनी म्हणे तू चक्रपाणी । खेळ खेळतो वृंदावनी । लुब्ध झाल्या त्या गौळणी ॥४॥
(११७)
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ॥ घोंगडीवाला कांबळीवाला ॥राधे॥धृ॥ जमवुनि पोरे गेला यमुनेच्या तिरी ॥ वांटितो गोपाळकाला ॥राधे॥१॥ रात्री माझ्या मंदिरी आला ॥ निरोप सांगुनि गेला ॥ राधे ॥२॥ गळा वैजयंती माळा हाति घेऊनिया वेणू ॥ नेसुनि पितांबर पिंवळा ॥ राधे॥३॥ जनी म्हणे विठू हा धाला ॥ गळा वैजयंती माळा ॥राधे॥४॥
(११८)
गौळण म्हणती गौळणी ला । पुत्र झाला यशोदेला । । १ । । गौळण सांगे गौळणी ला । पुत्र झाला यशोदेला । । १ । । एक धांवे एकीपुढे । ताटी वाटी सुंठवडे ॥धृ॥ वाण भरोनिया ताटी । यशोदेच्या घरी दाटी । । ३ । । सुईणीची गलबल झाली । दासी जनी हेल घाली । । ४ । । ॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
(११९)
वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे । वेणुनादे गोवर्धनु गाजे । पुच्छ पसरुनि मयूर विराजे । मज पाहता भासती यादवराजे ॥१॥ तृण चारा चरूं विसरली । गाई व्याघ्र एके ठायीं जालीं । पक्षीं कुळे निवांत राहिली । वैरभाव समूळ विसरली ॥२॥ यमुना जळ स्थिर स्थिर वाहे । रविमंडळ चालता स्तब्ध होये । शेषकूर्म वराह चकित राहे । बाळा स्तन देऊ विसरली माये ॥३॥ ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती । वांकी रुणझुण रुणझुण वाजती । देव विमानी बैसोनि स्तुती गाती । भानुदासा फावली प्रेमभक्ति ॥४॥
(१२०)
यशोदे कृष्णाला सांगावे । गोकुळी रहावे का जावे ॥धृअवघ्या मिळोनी गौळणी । जात होत्या मथुरा बाजारी । उभा हा कृष्ण वाटेवरी ॥१॥अनया गवळी करी धंदा । त्याचीच गवळण मी राधा । जावूनी नंदासी सांगावे ॥२॥पे द्या सुदामाची जोडी । बळीभद्र त्याचा गडी । याला बाई उखळासी बांधावे ॥३॥ देव हा विधीचा जनिता । भानुदास चरणी ठेवी माथा । प्रभुच्या चरणासी लागावे ॥३॥
(१२१)
यशोदे कृष्णाला सांगावे । गोकुळी रहावे का जावे ॥धृ॥ अवघ्या गौळणी मिळोनी । जात होत्या मथुरा बाजारी । उभा हा कृष्ण वाटेवरी ……….॥१॥अनया गवळी करी धंदा । त्याची गौळण मी राधा । जावून नंदासी सांगावे …………॥२॥पे द्या सुदामाची जोडी । बळीभद्र त्याचा गडी । याला बाई उखळासी बांधावे……..॥३॥ देव हा विधीचा जनिता । भानुदास चरणी ठेवी माथा । चरण त्याचे वंदावे……..॥४॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
संत एकनाथ महाराज गौळण
(१२२)
गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेसी गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेसी एकनाथ महाराज गौळण १ गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेसी । दही दूध खाऊनिया पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी सांगू किती महीपत्र सिंधु आटे ॥२॥ मेळवोनि गोपाळ घरांमध्ये शिरे कान्हा । धरुं जाता पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥ ऐसे मज याने पिसे लावियेले सांगू काई । एका जनार्दनी कायावाचामने पायी ॥४॥
(१२३)
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥धृ॥ हाती घेऊनिया फूल । अंगणी रांगत आले मूल । होते सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥ माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥ संगे घेऊनि गोपाळ । बाळ खेळे आळुमाळ । पायी पोल्हारे झळाळ । गळा माळ वैजयंती ॥३॥ एका जनार्दनी माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावे ते काय । कोणी सांगा गे ॥४॥
(१२४)
नानापरी समजाविते परी न राहे श्रीहरी । दहींभात कालवोनि दिला वेगी झडकरी । कडेवरी घेऊनिया फिरले मी दारोदारी ॥१॥ राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आता झडकरी आपुलिया मंदिरा ॥धृ॥ क्षणभरी घरी असता करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरी जाता आळ घेती गौळणी । थापटोनि निजविता पळोनि जातो राजद्वारा ॥२॥ राधा घेऊनि हरिला त्वरे जात मंदिरी । हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी । एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी ॥३॥
(१२५)
तुझे श्रीमुख सुंदरतुझे श्रीमुख सुंदर एकनाथ महाराज गौळण ४ तुझे श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासे पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली करुणाघना ॥१॥ मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ॥ सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा । नाही संसारासी थारा । भेदभ्रम गेला कमलनयना ॥२॥ ध्वनि मंजुळ ऐकिली कानी । सर्व सुखां झाली धनी । एका जनार्दनी ध्यानी मनी । एकपणा जगज्जीवना ॥३॥
(१२६)
कशी जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी कान्हा ॥धृ॥ पैलतीरी हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥१॥ कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥ काय करु बाई कोणाला सांगू । नामाची सांगड आणा ॥३॥ नंदाच्या हरीने कौतुक केले । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥ एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥
(१२७)
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥ पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्चळ ॥२॥ तृणचरे लुब्ध झालीं । पुच्छ वाहुनिया ठेलीं ॥३॥ नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥
(१२८)
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहु । नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ ॥१॥ कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचुं । देहभाव ठेऊनी पायी ब्रह्मपदी नाचूं ॥२॥ सर्व गर्व सोडूनी बाई चला हरीपाशी । द्वैतभाव ठेवुनि पायी हरिरुप होसी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव ॥४॥
(१२९)
अधरी धरुनि वेणु । वाजविला कुणी नेणुं ॥१॥ प्रातकाळी तो वनमाळी । घेऊनि जातो धेनु ॥२॥ उभी मी राहे वाट मी पाहे । केव्हां भेटेल मम कान्हु ॥३॥ एका जनार्दनी वाजविला वेणु । ऐकता मन झाले तल्लीनु ॥४॥ तुझ्या मुरलीचा ध्वनीतुझ्या मुरलीचा ध्वनी एकनाथ महाराज गौळण १०
(१३०)
तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानी । विव्हळ झाले अंतःकरणी । मी घरधंदा विसरले ॥१॥ अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥ मुरली नोहे केवळ बाण । तिने हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥ तुझ्या मुरलीचा सूर तान । मी विसरले देहभान । घर सोडोनि धरिले रान । मी वृंदावनी गेले ॥३॥ एका जनार्दनी गोविंदा । पतितपावन परमानंद । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥
(१३१)
मुरली मनोहर रे माधव ॥धृ॥ श्रीवत्सलांछन हृदयी विलासन । दीन दयाघन रे ॥१॥ सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२॥ एका जनार्दनी त्रिभुवनमोहन । राखीतो गोधन रे ॥३॥
(१३२)
दुडीवरी दुडी गौळणी साते निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥ दुडीयामाझारी कान्होंबा झाला भारी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥ एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानंदु न समाये मनी ॥४॥
(१३३)
खांद्यावरी कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥ एक एक गौळणी एक एक गोपाळा । हाती धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥ एका जनार्दनी रासमंडळ रचिले । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्म कोंदले ॥४॥
(१३४)
गौळणी म्हणती यशोदेला । कोठे गे सावळा । का रथ शृंगारिला । सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजनी ॥१॥ या नंदाच्या अंगणी । मिळाल्या गौळणी ॥धृ॥ बोले नंदाची पट्टराणी । सद्गदीत होऊनि । मथुरेसी चक्रपाणी । जातो गे साजणी । विव्हळ झाले मन वचन ऐकोनि ॥२॥ अक्रुरा चांडाळा । तुज कोनी धाडिला । का घाता करु आलासी । वधिशी सकळा । अक्रुरा तुझे नाम तैशीच करणी ॥३॥ रथीं चढले वनमाळी । आकांत गोकुळी । भूमि पडल्या व्रजबाळी । कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकांने भिजली धरणी ॥४॥ देव बोले अक्रुरासी । वेगे हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी । न पहावे मजसी । एका जनार्दनी रथ गेला निघोनि ॥५॥
(१३५)
गौळणी सांगती गाऱ्हाणी । रात्री आला चक्रपणी । खाऊनी दही दूध तूप लोणी । फोडिली अवघी विरजणी । हा गे बाई कोणासी आवरेना ॥१॥ यशोदे बाळ तुझा तान्हा । कोठवर सोसू धिंगाणा ॥धृ॥ दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात । मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत । धरुं जाता सांपडेना ॥२॥ तिसरी आली धांऊनि । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देऊनी । गांठ बाई कोणासी सुटेना ॥३॥ मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणी । जातो आम्ही गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेऊनी । हे बाई आम्हांसी पहावेना ॥४॥ ऐशीं ऐकता गाऱ्हाणी । यशोदानयनी आले पाणी । कृष्णा खोडी दे टाकुनी । एका जनार्दनी चरणी । प्रेम तया आवरेना ॥५॥
(१३६)
ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगु काईऐक ऐक सखये बाई नवल मी सांगु काई एकनाथ महाराज गौळण १६ ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगु काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥ देवकीने वाहिला यशोदेने पाळिला । पांडवांचा बंदीजन होऊनियं राहिला ॥२॥ ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचे निजधन । चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥ सकळ तीर्थें जया चरणी सुलभ हा शूळपाणी । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥ शरण एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी । गाई गोप गोपीबाळा मेळविले आपुलेपणी ॥५॥
(१३७)
आवरी आवरी आपुला हरी । दुर्बळाची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाही ॥१॥ गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी । आवरी आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥ कवाड भ्रांतीचे उघडिले कुलुप मायेचे मोडिले । शिंके अविद्येचे तोडिले । बाई तुझिया कृष्णें ॥३॥ होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलीसे बळा । होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥ डेरा फोडिला दंभाचा । त्रिगुण तिवईस ठाव कैसा । प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ॥५॥ अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा । तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णें ॥६॥ संचित हे शिळे लोणी । याचि केली धूळीधाणी । संकल्प विकल्प दुधाणी । तीही फोडिली कृष्णें ॥७॥ प्रारब्ध हे शिळे दही । माझे खादले गे बाई । क्रियमाण दुध साई । तींही मुखीवोतिली ॥८॥ द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होते कामाचे ते पाळे । तेहि फोडिले कृष्णें ॥९॥ सुचित दुश्चित घृत घागरी । लोभे भरल्या अहोत्या घरी । त्याही टाकिल्या बाहेरी । तुझिया कृष्णें ॥ १० ॥ कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी । होती आयुष्याची दुरडी । तेही मोडिली कृष्णें ॥ ११ ॥ पोरे ग अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयाची । संसाराची शुद्धी नाही ॥ १२ ॥ ऐशी वार्ता श्रवनी पडे । मग मी धांवोनि आले पुढे । होते द्वैताचे लुगडे । तेही फिटोनि गेले ॥ १३ ॥ आपआपणा विसरणे । कृष्णस्वरुपीं मिळाले । एका जनार्दनी केले । बाई नवल चोज ॥ १४ ॥
(१३८)
गोकुळी चोरी करितो चक्रपाणीगोकुळी चोरी करितो चक्रपाणी एकनाथ महाराज गौळण १८ गोकुळी चोरी करितो चक्रपाणी । गौळणी येउनी सांगती गाऱ्हाणी । येणे माझे भक्षिले दही दूध लोणी । पळोनिया येथे आला शारंगपाणी वो ॥१॥ आवरी आवरी यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा । याचे लाघव न कळे चतुरानना । यासी पाहता मन नुरे मीपणा वो ॥२॥ एके दिवशीं मी आपुले मंदिरी । मंथन करिता देखिला पुतनारी । जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितो तु राहे क्षणभरी वो ॥३॥ परवा आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा । नाचले ऐकत धरे पाहे अचला । धरूं जाता तो पळोनिया गेला वो ॥४॥ ऐसे बहु लाघव केले येणे । किती सांगावे तुज गाऱ्हाणे । एका जनार्दनी परब्रह्मा तान्हें । यासी ध्याता खुंटले येणे जाणे वो ॥५॥
(१३९)
नंदनंदन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे काही । मुरलीचा नाद भरला हृदयी ॥२॥ पती सुताचा विसर पडिला । याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥ स्थावर जंगम विसरुनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥ समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐकता मना विश्रांती ॥५॥ एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सदगद ॥६॥
(१४०)
(१४१)
कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगुं काय गे ॥१॥ तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे । अर्धांगी रुक्मिणी विंझणे वारित गोपी बाळा गे ॥२॥ पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करिती पुढे निजदास गे ॥३॥ भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे । एका जनार्दनी विटे जोडीयेले पाय गे ॥४॥
(१४२)
कृष्णाला भुलविले गोपीने ॥धृ॥ यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥ नंदजी तुमचा कृष्ण लाडका । हाका मरितो मोठ्याने ॥२॥ वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवाने ॥३॥ एका जनार्दनी पूर्ण कृपेने । नाही ऐकिले मातेने ॥४॥
(१४३)
कसा मला टाकुनी गेला रामकसा मला टाकुनी गेला राम एकनाथ महाराज गौळण २२ कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥ रामाविण जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥ रामाच्या विण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥ एका जनार्दनी पाहुनी डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥
(१४४)
तुझी संगती नाही कामाची । मी सुंदरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥ कसे वेड लाविले कान्हों गोवळिया ॥ धु ॥ माझा वंश आहे मोठ्याचा । तुं तंव यातीहीन गौळ्याचा । ऐक्य जालीया नांवरुपाचा । ठावचि पुसलिया ॥२॥ तुझ्या अंगेची घुरट घाणी । तनु काय दिसती वोंगळवाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥ तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा । व्रजनारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥ सर्व सुखाची कृष्णसंगती । वेणुनादे गाई गोप वेधती । एका जनार्दनी हरिरुपी रमती । त्या व्रज सुंदरीया ॥५॥
(१४५)
गोधने चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी । कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥ यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी । येरु रुदत सांगतो मातेपाशी । माझा चेंडु लपविला निरिपाशीं ॥२॥ राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाही वो मजपाशी । परि हा लटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडिता चेंडु पडे धरणीसी ॥३॥ यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गीं बैसता क्षण एक मुरारी । एका जनार्दनी विनवी श्रीहरी । नाम घेता पातके जाती दुरी ॥४॥
(१४६)
पाहिला नंदाचा नंदन । तेणे वेधियेले मन । । १ । । मोर मुकुट पीतांबर । काळ्या घोंगडीचा भार । । २ । । गोधने चारी आनंदे नाचत । करी काला दहिभात । । ३ । । एका जनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा । गोपाळांशी खेळे कान्हा कुंजवना । । ४ । ।
(१४७)
रडते माझे बाळ तान्हे । समजाविता राहीना ॥धृ॥ नानापरी समजाविते । मागील ते खाया देते । थापटोनी निजविते । तरी हा उगा राहीना ॥१॥ नानापरी करितो छंद । रडतो हा स्फुंद स्फुंद । नेत्रावाटे वाहे बुंद । रडता हा राहीना ॥२॥ पोटी धरुनिया दम । सर्वाअंगी सुटला घाम । एका जनार्दने प्रेम यशोदेसी माईना ॥३॥
(१४८)
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दहीदुधाचा रबडा ॥२॥वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतासि झगडा ॥३॥एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥ 25 तुकाराम महाराज गौळणी तुकाराम महाराज गौळणी
(१४९)
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळा ॥१॥ काय मोकलिले वनी । सावजांनी वेढिले ॥धृ॥ येथवरी होता संग । अंगे अंग लपविले ॥२॥ तुका म्हणे पाहिले मागे । एवढया वेगे अंतरला ॥३॥ आंत हरि बाहेर हरिआंत हरि बाहेर हरि तुकाराम महाराज गौळण २
(१५०)
आंत हरि बाहेर हरि । हरिने घरी कोंडिले ॥१॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥धृ॥ हरिने जीवे केली साटी । पाडिली तुटी सकळासी ॥२॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥३॥
(१५१)
कोणी एकी भुलली नारीकोणी एकी भुलली नारी तुकाराम महाराज गौळण ३ कोणी एकी भुलली नारी । विकिता गोरस घ्या म्हणे हरी ॥१॥ देखिला डोळा बैसला मनी । तोचि वदनी उच्चारी ॥धृ॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुके ॥२॥ तुका म्हणे हांसे जन । नाही कान तये ठायीं ॥३॥
(१५२)
हरिने माझे हरिले चित्त । भार वित्त विसरले ॥१॥ आता कैसी जाऊ घरा । नव्हे बरा लौकिक ॥धृ॥ पारखियांसी सांगता गोष्टी । घरची कुटी खातील ॥२॥ तुका म्हणे निवांत राही । पाहिले पाही परतोनी ॥३॥
(१५३)
हरी तुझी कांति रे सांवळीहरी तुझी कांति रे सांवळी तुकाराम महाराज गौळण ५ हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ॥१॥ उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥धृ॥ तुझिये अंगी घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचे बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥ मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगी तुझे देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥३॥ तुज लाज भय शंका नाही । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काही । कैसी भीड नाही तुज माझी ॥४॥ वचन मोडी नेदी हात । कळले न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥
(१५४)
गाई गोपाळ यमुनेचे तटींगाई गोपाळ यमुनेचे तटी तुकाराम महाराज गौळण ६ गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनि जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहूं दृष्टी वो ॥१॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी । मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥धृ॥ चिरे चोळिया त्या धुता विसरती । ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती । कोणा नाठवे कोण कुळ याती । जालीं तटस्थ सकळ नेत्रपाती वो ॥२॥ दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात । करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥३॥
(१५५)
बाळपणी हरि । खेळे मथुरेमाझारीबाळपणी हरि । खेळे मथुरेमाझारी तुकाराम महाराज गौळण ७ बाळपणी हरि । खेळे मथुरेमाझारी । पायी घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवले आजि ॥१॥ बाळ चांगले वो । बाळ चांगले वो । म्हणता चांगले । वेळ लागे तया बोले । जीवापरीस ते वाल्हें । मज आवडते ॥धृ॥ मिळोनिया याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्ती । देहभाव काही । विसरल्या घरे । तान्ही पारठी लेकुरे । धाक सांडोनिया येरे । तान भूक नाही ॥२॥ एकी असतील घरी । चित्त तयापासीं परी । वेगी करोनि वोसरी । तेथे जाऊ पाहे । लाज सांडियेली वोज । नाही फजितीचे काज । सुख सांडोनिया सेज । तेथे धाव घाली ॥३॥ वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या । कुमर कुमारी । नाही भाव हा शरीरी । दृष्टी न फिरे माघारी । तया देखता हे ॥४॥ वैरभाव नाही । आप पर कोणी काही । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं । तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं । स्वामी माझा कवतुकी । बाळवेषें खेळे ॥५॥
(१५६)
स्वये सुखाचे झाले अनुभवस्वये सुखाचे झाले अनुभव तुकाराम महाराज गौळण ८ स्वये सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथेचि त्याचा जीव वो ॥१॥ आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल । एका मेघःश्यामे जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सखोल वो ॥धृ॥ एक विषय तो सकळाचा हरि । त्याच्या आवडीने आवडी इतरी । अंध बहिर हे प्रेत लोका चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥ स्तुति पराविया मुखे रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवी आदर । परस्परे हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाही पार वो ॥३॥ भक्तिवल्लभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी । दुरी जवळी संचिता ऐसे धरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरि वो ॥४॥ तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमे वोसंडून । पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयी चरण वो ॥५॥
(१५७)
आजि नवल मी आले येणे राणेंआजि नवल मी आले येणे राणे तुकाराम महाराज गौळण ९ आजि नवल मी आले येणे राणे । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें । गोवी सांगती वो सकळ ही जन । होते संचित आणियेले तेणे वो ॥१॥ गेले होउनि न चले आता काही । साद घालिता जवळी दुजे नाही । अंगी जडला मग उरले ते काई । आता राखता गुमान भले बाई वो ॥धृ॥ बहुत कामे मज नाही आराणूक । एक सारिता तो पुढे उभे एक । आजि मी टाकोनि आले सकळिक । तंव रचिले आणिक कवतुक वो ॥२॥ चिंता करिता हरिली नारायणे । अंगसंगे मिनता दोघेजणे । सुखे निर्भर जालिये त्याच्या गुणे । तुका म्हणे खुंटले येणे जाणे वो ॥३॥
(१५८)
होते बहुत हे दिवस मानसीहोते बहुत हे दिवस मानसी तुकाराम महाराज गौळण १० होते बहुत हे दिवस मानसी । आजि नवस हे फळले नवसी । व्हावी भेटी ते झाली गोविंदासीं । आता सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥ स्थिर स्थिर मजचि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा । येथे आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आले ते दुसरे वारा वो ॥धृ॥ मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळे होऊ एकी घडी । नाही लौकिक स्मरला आवडी । आता येणे काळे या लोभे वेडी वो ॥२॥ उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चिंतीने निश्चिंती सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥
(१५९)
आजि का वो तू दिससी दुश्चितीआजि का वो तू दिससी दुश्चिती तुकाराम महाराज गौळण ११ आजि का वो तू दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्ती । दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणों काय बैसला हरि चित्ती वो ॥१॥ सर सर परती जालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड । व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायीं जाला खंड वो ॥धृ॥ होते तैसे ते उमटले वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी । नाही मर्यादा निःसंग बावरी । मन हे गोविंदीं देह काम करी वो ॥२॥ नाही करीत उत्तर कोणासवे । पराधीन भोजन दिले खावे । नाही अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुझे देहभावं वो ॥३॥ कोठे नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवती बहुत । दोघे एकवाटा बोलावया मात । नाही लाज धरिली दिला हात वो ॥४॥ करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना । परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळो यावे जना वो ॥५॥
(१६०)
भरिला उलंडूनि रिता करी घटभरिला उलंडूनि रिता करी घट तुकाराम महाराज गौळण १२ भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट । चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥१॥ चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचे रूप जेथे तेथे । दावी बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीते खेळ मांडियेला येथे वो ॥धृ॥ मनी आवडे ते करावे उत्तर । काही निमित्ताचा पाहोनि आधार । उगा राहे का मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥२॥ धरिली खोडी दे टाकोनिया मागे । न ये विनोद हा कामा मशीं संगे । मिठी घालीन या जीवाचिया त्यागे । नाही ठाउकी पडिलीं तुझी सोंगे वो ॥३॥ सुख अंतरींचे बाह्य ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या थोरपणे जासी रे ॥४॥ करी कारण ते कळो नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्य रंग जाना । मन मिनले रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥५॥
(१६१)
नका काही उपचार माझ्या शरीरानका काही उपचार माझ्या शरीरा तुकाराम महाराज गौळण १३ नका काही उपचार माझ्या शरीरा । करू न साहती बहु होतो उबारा । मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥१॥ सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा । उमटली अंगी वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥धृ॥ नये कळो नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत । एकाएकी साक्षी येथे आपुले चित्त । कोण्या काळे होइल नेणों भाग्य उदित वो ॥२॥ स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन । अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापे आले जीवन वो ॥३॥
(१६२)
पडिली भुली धांवते सैराटपडिली भुली धांवते सैराट तुकाराम महाराज गौळण १४ पडिली भुली धांवते सैराट । छंद गोविंदाचा चोजविते वाट । मागे सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजेठेवुनि ललाट वो ॥१॥ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होते वहिले लपाला आता खांदीं । कोठे आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवी करुणा कृपानिधी वो ॥धृ॥ मागे बहुतांचा अंतरला संग । मुळे जयाचिया तेणे केला त्याग । पैल पाहाता ते हरपले अंग । खुंटली वाट नाहींसे झाले जग वो ॥२॥ शोके वियोग घडला सकळाचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार रे घडल्या दोषांचा । झाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥
(१६३)
काय उणे का करिशील चोरीकाय उणे का करिशील चोरी तुकाराम महाराज गौळण १५ काय उणे का करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी । परपरता तू पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥ माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात । न पुरे अवसरु हे चि नित्यानित्य । तूचि सोडवी करूनि स्थिर चित्त वो ॥धृ॥ बहुत कामे मी गुंतलिये घरी । जासी डोळा तू चुकवूनि हरी । करिता लाग न येसी चपळभरी । नाही सायासाची उरो दिली उरी वो ॥२॥ तुज म्हणीये मी न संगे अनंता । नको जाऊ या डोळिया परता । न लगे जोडी हे तुजविण आता । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥
(१६४)
घाली कवाड टळली वाड रातीघाली कवाड टळली वाड राती तुकाराम महाराज गौळण १६ घाली कवाड टळली वाड राती । कामे व्यापिलीं का पडिली दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवेचे हाती । आजि शून्य शेजे नाही दिसे पती वो ॥१॥ बोले दूतिकेशीं राधा हे वचन । मशीं लाघव दाखवी नारायण । म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोले कळला मज पूर्ण वो ॥धृ॥ धाडिले गरुडा आणिले हनुमंता । तैं पाचारिले होउनि येई वो सीता । लाजिन्नली रूप न ये पालटिता । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥ सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी । तुळे घालिता न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥ मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी । दिली वाट यमुने माये खरी । तुम्हा आम्हां न कळे अद्यापवरी वो ॥४॥ जाणे जीवींचे सकळ नारायण । असे व्यापूनि परी न दिसे लपून । राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथे भावचि कारण वो ॥५॥
(१६५)
धरिला पालव न सोडी माझा येणेधरिला पालव न सोडी माझा येणे तुकाराम महाराज गौळण १७ धरिला पालव न सोडी माझा येणे । काही करिता या नंदाचिया कान्हें । एकली न येते मी ऐसे काय जाणे । कोठे भरले या अवघड राणे रे ॥१॥ सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरी । सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगता नाही उरी रे ॥धृ॥ सखिया वेशिया होतिया । तुज फावले रे फांकता तयासी । होते अंतर तर सांपडते कैसी । एकाएकी अंगी जडलासी रे ॥२॥ ऐसी भागली हे करिता उत्तर । शक्ति मावळल्या आसुडिता कर । स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥
(१६६)
हरिरता चपळा नारीहरिरता चपळा नारी तुकाराम महाराज गौळण १८ हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥ अवघ्या अंगे सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥धृ॥ वाचा वाच्यत्वासि न ये । कोठे काय करावे ॥२॥ तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥
(१६७)
कोणी सुना कोणी लेंकीकोणी सुना कोणी लेंकी तुकाराम महाराज गौळण १९ कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी स्वतंता ॥१॥ अवघियांची जगनिंद । झाली धिंद सारखी ॥धृ॥ अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥ तुका म्हणे करा सेवा । आले जीवावरी तरी ॥३॥
(१६८)
मै भुली घरजानी बाट । गोरस बेचन आये हाट ॥१॥ कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरूं देखे गोपाल ॥धृ॥ कहां पग डारूं देख आनेरा । देखे तो सब वोहिने घेरा ॥२॥ हुं तो थकित भई रे तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥
(१६९)
हरिबिन रहिया न जाये जिहिराहरिबिन रहिया न जाये जिहिरा तुकाराम महाराज गौळण २१ हरिबिन रहिया न जाये जिहिरा । कबकी ठाडी देखे राहा ॥१॥ क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥धृ॥ कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥२॥ तुका प्रभु कब देखे पाऊ । पासीं आऊ फेर न जाऊ ॥३॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
मिराबाई महाराज गौळणी
(१७०)
धिरे से बजाना बन्सी बजाने वाले । मुरली सनाने वाले ॥धृ॥ हातमो लकडी खांदे कमलिया । गौवा चराने वाले ॥१॥ मोर मुकुट पितांबर शोभे । कालियामर्दनवाले ॥२॥ मीराके प्रभु गिरीधर नागर । गोकुलमे रहिनेवाले ॥३॥
(१७१)
तुम बिन मेरी कौन खबर ले । गोवर्धन गिरिधारी ॥धृ॥ मोर मुकुट पीतांबर शोभे । कुंडलकी छबी न्यारी ॥१॥ भरी सभामे द्रौपदी ठारी । राखो लाज हमारी ॥२॥ मीराके प्रभु गिरधर नागर । चरणकमल बलिहारी ॥३॥
(१७२)
हे री मैं तो प्रेमदिवानी मेरो दरद न जाणै कोय । दरद की मारी बन बन डोलूं बैद मिल्यो नही कोई॥ना मैं जानू आरती वन्दन, ना पूजा की रीत । लिए री मैंने दो नैनो के दीपक लिए संजोये॥ घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय । जौहरि की गति जौहरी जाणै की जिन जौहर होय॥ सूली ऊपर सेज हमारी, सोवण किस बिध होय । गगन मंडल पर सेज पिया की, मिलणा किस बिध होय॥ दरद की मारी बनबन डोलूं बैद मिल्या नहिं कोय । मीरा की प्रभु पीर मिटेगी जद बैद सांवरिया होय॥
॥ विठ्ठलविठ्ठल ॥*
(१७३)
मैं गिरधर के घर जाऊ । । गिरधर म्हांरो सांचो प्रीतम देखत रूप लुभाऊ । । रैण पडे तबही उठ जाऊ भोर भये उठ आऊ । रैण दिना बाके संग खेलूं ज्यूं तह्यूं ताहि रिझाऊ । जो पहिरावै सो पहिरूं जो दे सो खाऊ । मेरी उणकी प्रीति पुराणी उण बिन पल न रहाऊ । । जहं बैठावे तितही बैठूं बैचे तो बिक जाऊ । मीरा के प्रभु गिरधर नागर बार बार बलि जाऊ । ।
(१७४)
दिवानी बनी मई दीवानी बनीरात दिन मै श्याम पीया, बस तेरे खयालोमे रहती हु । सारी दुनिया, श्याम श्याम कहती हुमै तो दीवानी बनी श्याम पियाकी बनी पावो मे कंगन हाथोमे पैंजन नाक मे बुगडीया लगाने चलीआँखों मे लाली ओठो पे काजल हल्दिसे मलवट भरने चलीकैसे मे आऊ तेरे गोकुल नगरी मीरा कहे प्रभु गिरिधर नागर हरी चरनोमे लगी
(१)
निळोबाराय महाराज गौळणी १
(१७५)
एकी एकटेचि असोनि एकला । विश्वी विश्वाकार होऊनिया ठेला । जयापरी वो तैसाची गमला । नंदनंदन हा आचोज अंबुला वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या बोलती परस्परी । करूनि विस्मय आपुल्या अंतरी । विश्वलाघविया हाचि चराचरी । नेणो महिमा यासी म्हणो व्यभिचारी वो ॥२॥ गिरी गोवर्धन येणे उचलिला । काळिया महासर्प नाथूनि आणिला । जळत वणवा वो मुखेचि पाशिला । गिळिता अघासुर चिरूनि सांडिला वो ॥३॥ कपट्या माभळभटा दिले पिढे दान । शोषिली पूतना विषें पाजितांची स्तन । उखळी बांधिता उपटिले विमळार्जुन । भक्षूनि मृत्तिका वदनी दाविली भुवने वो ॥४॥ आणिखी एक येणे नवलावो केला । काला वाटिता वो विधाता ठकविला । भाग नेदिता तो वत्से गोवळ घेऊनि गेला । तैसीच आपण येथे होऊनिया ठेला वो ॥५॥ इंद्र चंद्र महेंद्र यातेचि पूजिती । श्रुति शाखे तेही यातेचि स्तविती । महासिद्ध मुनि ध्यानी आराधिती । निळा म्हणे तो हा जोडला सांगाती वो ॥६॥
(१७६)
एकले न कंठेचि म्हणोनिया येणेएकले न कंठेचि म्हणोनिया येणे निळोबाराय महाराज गौळण २ एकले न कंठेचि म्हणोनिया येणे । केली निर्माण वो चौदाही भुवने । गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे । पांचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो ॥१॥ ऐसा लाघविया माया सूत्रधारी । येकला एकटाचि झाला नानाकारी । स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी । तो हा नंदनंदन सये बाळब्रह्मचारी वो ॥२॥ याचिये नाभिकमळी जन्म चतुरानना । याचिया निजप्रभा प्रकाश रविकिरणा । याचिया महातेजे तेज हुताशना । येणेचि पढवूनि वेद केला शहाणा वो ॥३॥ याचिया द्रवपणे समुद्रासि जळ । याचिया चपळपणे पवन हा चंचळ । याचिया अवकाशे आकाश पघळ । याचिया धृतिबळे अवनी ही अढळ वो ॥४॥ येणेचि मेरुस्तंभ अचळ धरियेला । दिशा दिग्पाळासी येणेचि ठाव दिधला । विधिविधानाचा शास्त्रा बोध केला । येणेचि सुरपति स्वर्गी बैसविला वो ॥५॥ भोगूनि अंगना हा बाळब्रह्मचारी । येकला जेथे तेथे सोळा सहस्त्रा घरी । आम्हा तुम्हा भोगूनि अलिप्त मुरारी । निळा म्हणे ऐशा विवादती नारी वो ॥६॥
(१७७)
होतें बहुत दिवस आर्त वागविलेंहोतें बहुत दिवस आर्त वागविले निळोबाराय महाराज गौळण ३ ॥ १५३६ ॥ होतें बहुत दिवस आर्त वागविले । आजि अकस्मात ते फळ देऊ आले । दृष्टि श्रीहरिची देखील पाऊले । घेतले जन्म मागे सार्थक याचे झाले वो ॥१॥ धन्य हे आनंदाची सांपडली वेळ । तेणे संत सज्जन भेटले कृपाळ ॥ त्यांनी फेडियला बुद्धीचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥ नाना साधनाच्या केलिया खटपटा । परी त्या न पवति ची याच्या दारवंटा॥ जाणो जाता जाणिव घालि आडफांटा । योगाभ्यासे सिद्धी रोधीताती वाटा वो ॥२॥ यज्ञयागे स्वर्गभोग आड येती । करिता तपे काम क्रोध खवळती ॥ नित्यानित्यज्ञाने अभिमान वाढती । करिता तिर्थाटणे अहंकाराचि चि प्राप्ती वो ॥३॥ जपता मंत्रीबीजे चळचि घाली घाला । करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा ॥ सांवळे मिरविता विधि निषेध आगळा । आता हेंचि बरवे धणी पाहो याला वो ॥४॥ ऐसे शोधियले मार्ग नानापरी । न येती प्रतीति मग सांडियले दुरी ॥ आता गाउनि गीती नाचो हा मुरारी । निळा ह्मणे करु संसारा बोहरि वो ॥५॥
25 क्षेपक गौळणी
(१७८)
महत्त्वपूर्ण सुचना क्षेपक गौळणी ह्या जनसामान्याच्या ओठी कायम राहिल्या आहेत हे सत्य कदापि नाकारता येत नाही, विशेषकरून ग्रामीण भागात आपले घरकाम, शेतातील काम, ई करत असतांना या गौळणी ची रचना झालेली आहे. आणि ती एव्हढी लोकप्रिय झाली कि भल्या भल्या गायकांनाही त्या गौळणी चा माधुर्यरस चाखण्याचा मोह आवरता आलेला नाही. एव्हढ सगळ असूनही वारकरी संप्रदायाच्या संत साहित्यात याचा समावेश होत नाही, हे हि तेव्हढेच खरे. सारांश. श्रद्धेला कोणताही नियम लागू होत नाही.
(१७९)
12 चाल २
खोट नाट बोलु नका खोट नाट बोलु नका, साऱ्या जनी खर तुम्ही, सांगा मला ग कुणी………….नका ना आळ घेऊ बाळावरी. ॥धृ॥ कोणी म्हणती माठ माझा फोडीतो, । पदर माझा ओढितो, । शालू माझा फाडितो ॥१॥ नका ना आळ घेऊ बाळावरी. ॥धृ॥ तुम्ही गोपिका गवळ्याच्या नारी, । सदा ओरडत येता माझे द्वारी । बाल माझा गुणी, त्याच नांव नका घेऊ तुम्ही येथुनी जा लवकरी ॥२॥ नका ना आळ घेऊ बाळावरी. ॥धृ॥ यशोदा म्हणे मी हलविते पाळणा । पाळण्यात निजला हरि माझा तान्हा । हासू नका बोलू नका, साऱ्या जनी खर तुम्ही, सांगा मला ग कुणी ॥३॥ नका ना आळ घेऊ बाळावरी. ॥धृ॥
(१८०)
बसले मी होते रंग महालीबसले मी होते रंग महाली क्षेपक गौळण बसले मी होते रंग महाली । आरसे लावीले चार हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल ॥धृ॥ येता जाता रोखुन पाहता । वाईट तुमची चाल ॥ १ ॥ पलंगी मी केली सेज फुलांची । परीमळ सुगंध घ्याल ॥ २ ॥ तुमच्या चरणाची झाले मी दासी । एकवेळ दर्शन द्याल ॥ ३ ॥ एका जनार्दनी पुर्ण कृपेने । मोक्षपदाशी न्याल ॥ ४ ॥
(१८१)
तंबूरी मिट्टीदवतंबूरी मिट्टीदव भवाब्धि दाट्टीदव ।
तालाव ताट्टीदव सुरारोलू सेरीदव ॥
गेज्जेया कट्टीदावा खलरेदया मेट्टीदव ।
गणवा पाडिदव हरि मूरुती नोडिदव ॥
विठ्ठलान नोडिदव (पुरंदरा)
वैकुंठक्के ओडिदवा ॥
कन्नड संत पुरंदर दास अर्थ ज्याने तंबूरी
(एक वाद्य)
तोडले तोच ज्याने हे जग पार केले.
(ज्याने लय कायम ठेवली तो , स्वर्गात राहणारे देव किंवा स्वर्ग)
(सामील होण्यासाठी,)
. ज्याने पायाला बांधले त्याने दुष्ट लोकांची मने जिंकली. ज्याने गायले त्याने देवाचे दर्शन घेतले. ज्याने विठ्ठलाला पाहिले आहे तो वैकुंठाकडे धावतो. ಮೀಟಿದವ ದಾಟಿದವ ದಾಟಿದವ ತಟ್ಟಿದವ ಸೇರಿದವ ಸೇರಿದವ ಕಟ್ಟಿದವ ಮೆಟ್ಟಿದವ ಮೆಟ್ಟಿದವ ಪಾಡಿದವ ಹರಿನೋಡಿದವ ವಿಠ್ಠಲನ ನೋಡಿದವ
(ಪುರಂದರ)
ನೋಡಿದವ ವೈಕುಂಠಕೆ या गाण्याचे भाषांतर लिहिण्यापूर्वी मला वाटते की ‘दासा’ची प्रस्तावना आवश्यक आहे. दास असे लोक आहेत ज्यांनी तेथे त्याची स्तुती गाऊन, देवाच्या सेवेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते सहसा श्रुती तसेच गाण्यातील लय राखण्यासाठी तंबूरी घेऊन जातात. ते अँकलेट्स देखील घालतात याचा अर्थ त्यांनी या गाण्यांवर नृत्य केले ज्यासाठी त्यांनी संगीत लिहिले आणि संगीत दिले. पुरंदरा दासा हा असाच एक दास आहे. ते एक महान कवी आणि विठ्ठलाचे भक्त आहेत. त्यांच्या कविता कन्नडमध्ये आहेत. कन्नडमधील दासा लिटरेचर केवळ वापरलेल्या भाषेसाठीच नव्हे तर ते सुरू होण्याच्या कारणास्तव खूप महत्वाचे आहे. दास जरी मुख्यतः श्री मध्वचार्य चे अनुयायी असले तरी त्यांनी भक्ती, विष्णूचे विविध अवतार, तत्त्वज्ञान तसेच समाज आणि त्याचे आचार यासह विषयांवर कविता लिहिल्या. या गाण्यांचा उद्देश निरक्षर लोकांना भक्ती आणि तत्त्वज्ञान शिकवणे हा होता. ते संगीतासाठी देखील सेट आहेत आणि म्हणून लोक ते गाणी म्हणून शिकले. पुरंदर दासाला कर्नाटक संगीताचे जनक म्हटले जाते. त्याने कर्नाटक संगीताचे सुरुवातीचे धडे तयार केले आणि ज्या पद्धतीने ते शिकवले जाते त्याप्रमाणे रचना आणली. बहुतेक कन्नडिगांनी मंदिर, चित्रपट आणि सामाजिक मेळाव्यांमध्ये ‘दसरा पद’
(पाडा म्हणजे कविता)
ऐकली असेल. प्रत्येक दासाची स्वतःची आवडती विविधता असते. कनकदास हे कागनेलेचे
(कर्नाटकातील एक ठिकाण)
आडिकेशव आहे, वादिराजारू हे ह्यवादन आहे
(विष्णूचे घोड्यांचे प्रमुख अवतार)
आणि पुरंदरा दासा हे पुरंदरा
(कर्नाटकातील एक ठिकाण)
विट्टला आहे. या गाण्यात पुरंदर दसरू दासांबद्दल गात आहे. दासा केवळ लोकांना प्रबोधन करत नाही तर तो त्याच्या गाण्यांद्वारे मोक्ष प्राप्त करतो. पल्लवी तंबूरी भेटीदावा भवब्धि दाटीदावा ।
ज्याने तंबूरी
(एक वाद्य)
तोडले तोच ज्याने हे जग पार केले
(इथे एक दासा आहे. त्याने ऐहिक जीवन नावाचा हा महासागर पार केला आहे)
तांबोरी एक तंतुवाद्य M
(एखाद्या वाद्याची तार तोडण्यासाठी)
अवनू
(ती व्यक्ती)
भवब्धि भाव
(पृथ्वीवरील जीवन)
अबधि
(महासागर)
अनुपल्लवी तालावा ताटीदावा सुरारोलू सेरीदावा ॥ ज्याने लय कायम ठेवली तो डेमिगोड्समध्ये सामील झाला
(डेमिगोडपैकी एक झाला)
TL T T
(ताल)
(एक व्याकरणात्मक प्रत्यय)
टॅटिडावा टॅटिडावनू टॅटिडा + अवनू तट्टू टॅप करणे
(कर्नाटकी संगीतामध्ये गायकाकडून उजव्या हाताच्या तळहाताला पृष्ठभागावर टॅप करून राखले जाते. बोटांचा वापर मोजण्यासाठी केला जातो आणि त्याचप्रमाणे खालच्या दिशेने किंवा वरच्या दिशेने तळहात)
सुरारोलू सुरारा
(देवदेव, स्वर्गात राहणारे देव किंवा स्वर्ग)
ओलु
(मध्ये, सह)
सेरिडावा सेरिडा
(सामील होण्यासाठी, सामील होण्यासाठी)
अवनू चरणा 1 गेज्जेया काटीदावा खालरेडेया मेट्टीदावा । ज्याने पायाला बांधले त्याने दुष्ट लोकांची मने जिंकली
(त्याच्या नृत्य आणि गाण्याने दासा वाईट लोकांनाही जिंकू किंवा प्रभावित करू शकतो)
गेज्जेया गेज्जेयन्नू गेजे
(पायल)
अन्नू
(व्याकरणाचा प्रत्यय)
कट्टीदाव कट्टीदावनू कट्टीदा
(बांधलेला)
अवनू खलारेदेया खालारा
(दुष्ट लोकांचे)
एडेया
(हृदय)
M M M
(पाऊल ठेवले, जिंकले)
अवनू गणवा पाडिवा हरि मूरुती नोडिदावा ॥ ज्याने गायले त्याने देवाचे दर्शन घेतले
(त्याच्या गाण्यांद्वारे दास प्रत्यक्षात देव पाहतो)
गणाव गानवन्नू गाना
(गाणे)
अन्नू पाडिदाव पाडिदावनू पादिदा
(गायन)
अवनू हरी विष्णूचे नाव मुरुथी सामान्यत मूर्ती म्हणजे इथे ईश्वराचे प्रत्यक्ष रूप नोडिडाव नोडिडावनू नोडू
(पाहण्यासाठी)
अवनू चरणा 2 विठ्ठलन नोडिवा । ज्याने विठ्ठला पाहिला आहे विठ्ठल कृष्णाचे नाव
(पुरंदरा)
विठ्ठलान नोडिदावा वैकुंठक्के ओडिदवा ।। ज्याने देवाला पाहिले आहे तो वैकुंठाकडे धावतो
(ज्या दासाने देवाचे रूप पाहिले आहे त्यांना वैकुंठाकडे नेले जाते, जेथे विष्णू निवास करतात. दुसऱ्या शब्दांत, दास मोक्ष प्राप्त करतो)
पुरंदरा विठ्ठल पुरंदरा
(कर्नाटकातील एक ठिकाण)
विठलाना
(विठ्ठलनन्नू विठ्ठल + अन्नू)
(विष्णूचे स्थान)
ओडिडाव ओडिडावनू ओडिडा
(धावणे)
अवनू मला हे जोडायचे आहे की या दसरा पाड्यांचा खूप अर्थ आहे.














