गणपतीला दुर्वाच का वाहतात?.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

कोकणातला गणपती भांडणे मिटवतो ! GANPATILA DURWACH KA PRIYA 96 KULI MARATHA

गणपतीला दुर्वाच का वाहतात?.
गणपतीला दुर्वा अर्पण करणाऱ्याला काय फळ मिळते?..

*🔸दूर्वा प्रिय गणपती.🔸*

गणपतीला दुर्वाच का प्रिय ?.
गणपतीला दुर्वाच का वाहतात?.
गणपतीला दुर्वा अर्पण करणाऱ्याला काय फळ मिळते?.

एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य चालू होते. यमाला ती अप्सरा खूप आवडली. तेव्हा नृत्य चालू असताना यमाने मध्येच तिचे नृत्य थांबवले आणि यम तिला म्हणाला, “हे तिलोत्तमे, तू मला खूप आवडलीस.”

“पण म्हणून आपण माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराच्या रंगाचा बेरंग कशाला?” तिने रागाने विचारले.

यम पुढे काही बोलणार, तोच त्या अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. त्याने हसून गडगडाट केला आणि तो म्हणाला, “हे यमधर्मा, माझे नाव अनलासूर. तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस म्हणून मी तूला खाऊन टाकतो.” त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पळून गेला.

तो राक्षस समोर जे दिसेल ते खाऊन टाकू लागला. सर्व देव घाबरले व सैरावैरा पळू लागले. एका उडीत अनलासूराने त्यातील काही देवांचा फडशा पाडला. उरलेले देव विष्णूकडे धावले. विष्णूनी देवांना अभय दिले. तोच राक्षस विष्णूपुढे दाणदाण पावले टाकत येऊन उभा राहिला.

विष्णूदेखील घाबरले आणि त्यांना काय करावे ते सुचेना. म्हणून त्यांनी गणपतीचे मनात स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूपुढे प्रकट झाला आणि विचारू लागला, “हे विष्णू, तुम्ही माझे का स्मरण केलेत?” पण विष्णूनी काही सांगायच्या आतच त्या राक्षसाने आणखी काही देवांना आपल्या पंजात पकडले. त्यातील बरेच देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. काही जण त्याच्या डोळ्यातून निघणाऱ्या ज्वाळात होरपळून निघाले.

पण गजानन मात्र जागचा हलला नाही. तेव्हा अनलासूराने आपला मोर्चा गजाननाकडे वळवला. तो गजाननावर चालून गेला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंजाने उचलले आणि तो गणपतीला आपल्या तोंडात टाकू लागला.

सर्व देवांनी हाहाकार केला. तोच एक आश्‍चर्य घडले. अनलासूराच्या हातातील त्या बाल गजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले. ते रूप फारच विराट होते. त्याचे डोके आभाळाला भिडले होते. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात त्याने अनलासूराला सोंडेत पकडले आणि त्याला सबंधच्या सबंध गिळून टाकले.

पण प्रत्यक्ष आगीचा लोळ असलेला तो राक्षस गजाननाने गिळून टाकल्यामुळे त्याच्या सर्वांगाची आग आग होऊ लागली. इंद्राने गजाननाच्या डोक्‍यावर अमृत शिंपडले. पण गणपतीच्या अंगाची होणारी आग काही थंड होईना.

विष्णूनी आपले कमळ गणपतीस दिले. वरुणाने पावसाची मुसळधार वृष्टी गजाननावर केली. पण छे! गजाननाच्या अंगाची लाहीलाही होत होती. शंकराने आपल्या नागाची सावली त्याच्यावर धरली तरी गणपतीच्या अंगाची लाहीलाही होत होती.

तेव्हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी गणपतीच्या मस्तकावर ताज्या हिरव्यागार दूर्वा वाहिल्या. त्याबरोबर त्याच्या अंगाची होणारी आग एकदम नाहीशी झाली.

गजानन म्हणाला, “माझ्या अंगाची आग या दूर्वांनी नाहीशी झाली. म्हणून आजपासून मला दूर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्‍तींची सर्व पापे नष्ट होतील. ती व्यक्ती बुद्धिमान होईल. दूर्वा मला अत्यंत प्रिय आहेत.
स्रोत: आंतरजाल.

——————————————–
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
———————————————

गणपतीचे सर्व काही

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading