आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

द्वादशी व क्षिरापती अभंग Dwadashi & Kshirapati Abhang
Ekadashi Abhang, भजनी मालिका , वारकरी भजनी मालिका
द्वादशी व क्षिरापती अभंग Dwadashi & Kshirapati Abhang
🕉130. व्दादशीचे अभंग 🕉
अभंग संख्या :९.
१ झाले ज्ञानदेव वाणी । आले
२ झाली पाकसिध्दि वाट पाहे रखुमाई
३ माझा हा विठोबा येईल गे जेव्हा
४ उठोनि प्रात:काळी ओढिता कांचोळी
५ रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद
६ नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव सदन
७ क्षीरसागरींचे नावडे सुख
८ पाहे प्रसादाची वाट
९ पावला प्रसाद आता विठो निजावे ।
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
निवडक अभंग हरिपाठ वाराचे
झाले ज्ञानदेव वाणी । आले 1
झाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेऊनि ॥१॥ पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हासी ॥२॥ ज्ञानदेवाच्या चरणी । शरण एका जनार्दनी ॥३॥
झाली पाकसिध्दि वाट पाहे रखुमाई 2
झाली पाकसिध्दि वाट पाहे रखुमाई । उदक तापले डेरा चीकसा मर्दू द्या पायी ॥१॥ उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनी ॥ उभ्या आंचवणा गोपिका कळस घेऊनि ॥२॥ अवघ्या सावचित्त सेवेलागी सकळा । उध्दव अक्रूर आले पाचारू मूळा ॥३॥ सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटी वाळा विडीया विनोदा ॥४॥ तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळ जना ॥५॥
माझा हा विठोबा येईल गे जेव्हा 3
माझा हा विठोबा येईल गे जेव्हा । जेवीन मी तेव्हा गोणाबाई ॥१॥ जाऊनि राउळा तयासी तू पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥ भरलिया रागे क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥३॥ ज्ञानेश्वरा घरी असेल बैसला । जाऊनि विठ्ठला पाहे तेथें ॥४॥ जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा । खोळंबला नामा भोजनासी ॥५॥
उठोनि प्रात:काळी ओढिता कांचोळी 4
उठोनि प्रात:काळी ओढिता कांचोळी । जातो वेळोवेळी महाद्वारा ॥१॥ अहो जी दातारा विनंती अवधारा । तुम्ही यावे घरा भोजनासी ॥२॥ रखुमाई माते तुम्ही यावे तेथे । सामुग्री सांगाते चालवावी ॥३॥ सडे संमार्जन हे माझे करणे । उदक भरीन सुगंधेसी ॥४॥ शेष पत्रावळी काढीन उष्टावळी । नित्य वेळोवेळी हाचि धंदा ॥५॥ नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा । प्रसाद तो द्यावा सेवकासी ॥६॥
रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद 5
रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥१॥ अंबऋषीकारणे द्वादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥२॥ प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥३॥ एकाजनार्दनी एकविध छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥४॥
नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव सदन 6
नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव सदन आवडले ॥१॥ रमा म्हणे कैसी नवल परी । देव भुलले वैष्णवा घरी ॥२॥ जो नातुडे ध्यानी समाधिसाधनी । तो स्वानंदे कीर्तनी नाचतसे ॥३॥ जो यज्ञावदानी काही नेघे माये । तो द्वादशी क्षीराब्धी उभउभ्या खाये ॥४॥ लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणे बुद्धी । वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धी ॥५॥ वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी । एका जनार्दनी देव दास्यत्व करी ॥६॥
द्वादशी अभंग समाप्त
क्षिरापतीचे अभंग
क्षीरसागरीचे नावडे सुख 1
क्षीरसागरींचे नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥ कवळ कवळ पाहा हो । मुख पसरुनि धावतो देवो ॥२॥ एकाद्शी देव जागरा आला । क्षीरापतीलागी टोकत ठेला ॥३॥ व्दादशी क्षीरापती ऐकोनी गोष्टी । आवडी देव देतसे मिठी ॥४॥ क्षीरापती घालिता वैष्णवा मुखी । तेणे मुखे देव होतसे सुखी ॥५॥ क्षीरापती सेविता आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥ क्षीरापती सेविता वैष्णवा लाहो । मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥ क्षीरापती चारा जनार्दनमुखी । एका एकी तेणे होतसे सुखी ॥८॥
पाहे प्रसादाची वाट 2
पाहे प्रसादाची वाट । द्यावे धुवोनिया ताट ॥१॥ शेष घेऊनी जाईन । तुमचे झालिया भोजन ॥२॥ झालो एकसवा । तुम्हा आळवोनी देवा ॥३॥ तुका म्हणे चित्त । करुनि राहिलो निवांत ॥४॥
पावला प्रसाद आता विठो निजावे । 3
पावला प्रसाद आता विठो निजावे । आपुलाले श्रम कळो येताती भावे ॥१॥ आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा ॥२॥ तुम्हासी जागवू आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हराया पीडा ॥३॥ तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन । नाही निवडिले आम्हा आपुलिया भिन्न ॥४॥
बहुडविले जन मन झाले निश्चळ 4
बहुडविले जन मन झाले निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥ पर्यंकी निद्रा करावे शयन । रखुमाई आपण समवेत ॥२॥ घेऊनिया आलो हाती टाळ वीणा । सेवेसी चरणा स्वामीचिया ॥३॥ तुका म्हणे आता परिसावी सादरे । बोबडी उत्तरे पांडुरंगा ॥४॥
क्षिरापतीचे अभंग समाप्त
द्वादशी व क्षिरापती अभंग Dwadashi & Kshirapati Abhang













