छत्रपती राजाराम म.चरित्र भाग ८, (३६ ते ४०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  – ३६.

        या चार दिवसांत बाजीने वशिष्ठ नदीवरील नावाड्याला भरपूर लालूच देऊन तारव्याची व्यवस्था केली.त्याने खटपटी लटपती करुन फसवुन बेशुध्द करुन मिराला तारवावर आणले.शुध्द आल्यावर आपण एका जहाजात असून समोर बाजी दिसला.ती शुध्दीवर आलेली पाहुन तो पुढे येतांना बघुन,अब्रुचे धिंडवडे निघण्यापेक्षा एक किंकाळी फोडुन अथांग सागरात धाडकन उडी टाकली. त्याचवेळी समोरुन मराठ्याचे भगवे निशान असलेले जहाज येत होते.जहाजा तील लोकांनी मीराची किंकाळी व समुद्रात टाकलेली उडी पाहिल्याने त्यांनी तिला वाचवुन आपल्या जहाजावर घेतले त्या जहाजात सर्व स्रीयाच होत्या.जहाजा वरील मुख्य स्रीने काय झाले म्हणुन विचारल्यावर सुरुवातीपासुनची सारी हकिकत कथन केल्यावर त्या स्रीने बाजी असलेल्या तारव्यावर तोफ डागली. ते छोटे जहाज बुडले.त्यातील लोकांना व बाजीला आपल्या जहाजावर घेऊन बाजीच्या गळ्यात ओंडके बांधुन समुद्रात लोटुन दिले.तो जहाजापासुन दूर गेल्या वर ती स्री मीराला म्हणाली,आज तुमच्या मुळे महाराष्र्टातील बर्‍याच गोष्टी कळल्या.ती स्री म्हणजे कान्होजी आंग्रेची पत्नी हंसा उर्फ लक्ष्मी होय.मोठ्या पत्नीचे नांव मथुराबाई व धाकटीचे नांव गहनाबाई होते.

       चार दिवसांपुर्वीच संभाजीराजेंच्या वधानंतर प्रथमच कान्होजी आंग्रेना राज स्रीयांना सुरक्षित पोहचवण्याबद्दलचा अमात्य रामचंद्रपंतांचा हुकुम आला होता

कान्होजी आंग्रे हुकमानुसार खाश्या स्रीयांना आणण्यासाठी यशवंत गडावर गेल्यामुळे,लक्ष्मीबाई जहाज घेऊन परशुरामक्षेत्री स्वामींच्या दर्शनार्थ निघाली असतां मधे मीरा त्यांना मिळाली.

       संभाजीराजेंच्या कारकिर्दीत मराठ्यांचा जास्त झगडा कोकणात घडल्यामुळे लढाईचे बहुतेक ओझे आंग्र्यावर होते.संभाजींच्या वधानंतर आंग्र्यांची बरीच पिछेहाट झाली.त्यांच्या ताब्यातील बहुतेक प्रदेश व किल्ले मोगलांनी जिंकले,शेवटी तह होऊन मराठे सरदार व मोगलांनी वसूली अर्धी अर्धी वाटुन घेतली.माणकोजी सुर्यवंशी, सुभानजी खराटे व उदाजी पडद प्रबळ गडास गेले आणि भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे कुलाबा व खंदेरीला राहिले.गुजर मुख्य असून कान्होजी त्यांच्या हाताखाली होता.सिद्दी -आंग्रेचा तंटा सुरुच होता.कान्होजी आंग्रेंनी शत्रू वर वचक बसवुन त्रावणकोरपासुन मुंबई पर्यंत किनार्‍यावरचे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात करुन सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथे आरमाराच्या साहित्याचे कोठारे व ‘कुलाबा’ आरमाराचे मुख्य ठाणे कले.

           कान्होजींची दुसरी पत्नी लक्ष्मी बाई धाडसी व हिंमतबहाद्दर होती.तिने  कोळी व भंडारी जातीच्या स्रीया जमवुन स्वतःच्या जहाजाने बाहेरुन आलेल्या जहाजावर हल्ले करुन लुटीत असे. वास्तविक कान्होजी आंग्रे छत्रपतींच्या आरमारातील सरदार होते तरी ते चाचागिरीचा धंदा करुन लूट करीत असे.

       लक्ष्मीबाईचे जहाज किनार्‍याला लागल्यावर,लक्ष्मीबाईने कैदी नावाड्यांना तंबी देऊन सोडुन दिले.त्या तिघी स्रीया व मीरा देवळात पोहचल्या.तिथे असलेल्या स्वामींना पाहुन मीराला आश्चर्ययुक्त आनंद झाला.ते ब्रम्हेंद्रस्वामी होते.

          स्वामी! ही स्वराज्यनौका निर्विघ्न होऊन पैलथडीला सुखरुप केव्हा पोहचेल? खरा कर्णधार येईल तेव्हा!हा कर्णधारच स्वराज्याच्या झेंडा दिल्ली पर्यंत फडकवील.सध्या स्वराज्यनौका वादळांत सांपडली आहे.हा कर्णधार तर सध्या बादशहाच्या कैदेत आहे.होय!पण तिथेही त्याची तपश्चर्या सुरु आहे.ती कैद नसून राजयोग्याची तपश्चर्या!

       स्वामी मी शपथ घेऊनही माझेकडुन स्वराज्यसेवा होत नाही याचे अतिशय दुःख वाटते.असं कां म्हणतेस?तुझी स्वराज्यसेवा तर फार उच्चप्रतिची होत आहे.अशी सेवा फारच थोड्यांकडुन होते मीराला स्वामींच्या गुढ बोलण्याचा अर्थ न कळल्याने नुसतीच त्यांच्याकडे बघत राहिली,हे पाहुन स्वामी म्हणाले,यवन जसे स्वराज्याचे शत्रू आहेत तसे स्वजनही!हे स्वजन शत्रूच फार भयंकर आहे.तुझ्या अभिलाषेने हे दोन शत्रू तुझ्या  प्राप्तीसाठी अहर्निश प्रयत्नात असल्या  मुळे त्यांना स्वराज्याचं नुकसान करण्यास अवसरच मिळत नाही.हीच तर तुझी स्वराज्यसेवा.एवढ्यात स्वामींच्या अनुयायांनी वार्ता आणली,शिरगांवच्या वेशीवर बेशुध्दावस्थेत तीन माणसं आढळलीत.ती कोण्या बाईच्या शोधात आहे.स्वामी मीराला म्हणाले,स्वराज्य रक्षणार्थ पुढे येणार्‍या संकटाला तोंड देण्यास मन खंबीर कर!

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  ३-६-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  – ३७.

           मीराच्या आयुष्यात जीवावरचे प्रसंग व संकटमालिका भोगण्याचेच योग होते की काय?दुसर्‍या दिवशी दोन प्रहरी  प्रवास करुन मीरा आपल्या गांवी पोहोचल्यावर आई गेल्याचे व वीरा बाळ राजेंच्या सेवेत असल्याची बातमी कळली आईची भेट न होता गेल्याचे तिला अतोनात दुःख झाले.मीरा योगीनीसारखी एकटीच दिवस काढत स्वराज्यसेवा घडावी ही एकच तळमळ होती.नेहमी प्रमाणे समाधीवर फुले वाहत असतां बंकी गायकवाड भेटला.चंदीला राजाराम महाराजांचा कबिला सुरक्षित पोहचवल्या बद्दल चिटणीसांचा योग्य गौरव करुन राजापूरजवळचे एक गांव बक्षिस दिल्या बद्दल सांगीतले.परंतु त्यांच्या पत्नीचे देहावसन झाल्याचे ऐकुन मीराला खुप वाईट वाटले.महाराज त्यांचे लग्न तुझ्या सोबत आलेल्या पोतनीसांच्या मुली कामाक्षी व कैकईशी लावुन देणार आहेत

          आपले लहान मोठे सरदार व संताजी,धनाजी तर प्रलय मांडला.चंदीला महाराजांवर बादशहाने पाठविलेल्या झुल्फिकार सरदाराचा बिमोड करीत संताजी कर्नाटकांत अंमल बसवित चालले.संताजींचा प्रतिकार करण्यासाठी सुभेदार कासीम व दुसरे अनेक सरदार पाठवले.तीन दिवस निकराची लढाई चालली.दुढोरी गडीच्या आश्रयाने लढणार्‍या कासमखानचे हत्ती,उंट संताजीच्या हाती पडली.पांचव्या दिवशी कासमच्या मदतीला हिंमतराव येत असल्याची बातमी आली,पण इतर सरदारांनी त्याला पार पिटाळुन लावले. आपला बचाव करण्यासाठी कासमखान, रुहुल्लाखान,सफ् शिकन् खान,मुराद खान लपुन बसले होते,पण मराठ्यांच्या तंग वेढ्यामुळे अन्न न मिळाल्याने त्यांनी घोडे फाडुन खावे लागले.शेवटी निराशेने कासमखानने आत्महत्या केल्यामुळे बाकीचे सरदार संताजींच्या स्वाधीन झाले.

          ह्या दुढेरीच्या संग्रामात ५०-६० लाखांची मिळकत झाली.ही सर्व वार्ता कळवुन बंकी निघुन गेला.

    एके दिवशी अशीच समाधीवर फुले वाहुन निवांत बसली असतां तिचे दोघे बंधु रुपाजी व बाबाजी तिला भेटायला तुळापुरी आले.मीराने त्यांना आतांपर्यंत घडलेली आपबिती सांगुन वीरा बाळराजे शिवाजी व राणीसाहेबांजवळ असल्याचे सांगीतले.नंतर संताजी धनाजीने शत्रूला कसे जेरीस आणले,दोघांत आतांपर्यंत कशी एकता होती,पण आतां दोघांमधुन विस्तव जात नाही,एकमेकांचे दोघे कट्टर वैरी बनलेत.सेनापती संताजी शत्रूकडुन दंड व लाच घेतात,हाती पडलेल्या शत्रूला सोडुन देतात अश्या तक्रारी धनाजींनी हुकुमपन्हा रामचंद्रांकडे आणि चंदीला महाराजांकडे केल्यात.महाराजांनी संताजीची निर्भत्सना केल्यामुळे ते खुपच चिडले व तितकेच त्यांना वाईटही वाटले.

आपल्या खोट्या कागाळ्या केल्याबद्दल त्यांनी धनाजीला दोषी ठरवले.महाराजां च म्हणण की,दंड घेऊन शत्रूला सोडण्या पेक्षा नामोहरण करावं,पण संताजी थोरल्या महाराजांच्या शिस्तीतले असल्या मुळे शरण आलेल्या शत्रूला दंड घेऊन सोडण्याचा परिपाठ होता.असे असले तरी खजीन्यात भर पण पडते ना!

          पण,भाऊराया!धनाजी असे नीच काम करतील असे वाटत नाही.यात नक्कीच कपट कारस्थान आहे.तीने विशाळगडी सुभानजीने आणलेल्या लखोट्याची हकिकत सांगुन म्हणाली, संताजी लाच घेऊन शत्रूला फितूर होणे कल्पांतीही शक्य नाही.

        आतांपर्यंतची संताजीची स्वराज्य सेवा,स्वामीनिष्ठा,शत्रूच्या सूडाशिवाय दुसरं कोणतंही ध्येय नसतांना महाराजां नी त्यांना फितूर ठरवावं हे आश्चर्यच आहे

ताराबाई समोरच हे लखोटा प्रकरण झाले होते.त्या चंदीला गेल्यावर त्यांनी महाराजांना लखोटा प्रकरण सांगुन त्यांचे मन कलुषित केले.महाराजांजवळ कोण करणार खुलासा? संताजी धनाजी ह्या दोन अजिंक्य स्वराज्यसेवकांत फुट पाडुन,या दोन योध्यात परस्पर झुंज लावुन बादशहा आपला डाव साधणार!ं

        संताजी थोरल्या महाराजांची शिस्त अमलांत आणित.त्यांच्या हुकुमाशिवाय फौजेत पान सुध्दा हलत नाही.सुतळीचा तोडाही उचलण्याची कोणाची हिंमत नाही.याउलट धनाजीची शिस्त फार ढीली.त्यांचे सैन्य स्वैर वर्तन करीत.त्यांचा दाब नव्हता,असे असले तरी धनाजीची योग्यता रणांगणी कमी नव्हती.शत्रूचा घोडा पाणी पिईनासा झाला तर,पाण्यात धनाजी दिसतो कां? असे प्रश्न मोगल आपल्या घोड्यास विचारी,इतकी जरब धनाजीची शत्रूमधे होती.दोघांमधे हा मोठा फरक असल्यामुळे धनाजीचे लोकं संतुष्ट,पण संताजीचे तसे नव्हते.बरेच दिवसांपासुन दोघांमधे चुरस चालु होती. कारण कांही का असेना,राजारामांचे मन कलुषित झाल्यामुळे,संताजीची खरी योग्यता न ओळखता त्यांचा पदोपदी अपमान करुं लागले.त्यात औरंगजेबाने कपटविद्या वापरुन नाना प्रयत्नानू मराठ्यांतील ही दुफळी वाढण्यास खत पाणी मिळाले.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ३-६-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  – ३८.

         मीराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिच्या भावांनी तीला सातार्‍याच्या किल्ल्यात सुभेदार प्रयागजींच्या स्वाधीन केले.तिथे आधिच सगळे ओळखीचे असल्यामुळे तिचा काळ सुखात जाऊं लागला.

         इकडे बाजीला समुद्रात लोटल्या वर धुपाळ्यांच्या जहाजाने त्याला वाचवुन घाटावर आणुन सोडले.त्यापुर्वी सुभानजीने बाजीविषयी खोट्या चहाड्या करुन नागोजी मानेचे मन कलुषित करुन ठेवले होते.त्यामुळे बाजी आल्यावर त्याला मानेच्या म्हसवड गढीतील तळघरांत भयंकर अशा अंधार कोठडीत रवानगी झाली,तिथे तो चार वर्षे होता.

         मीरा सातार्‍याच्या किल्ल्यात राहुन स्वतःजवळच्या वनौषिधीने जखमी सैन्यां चा उपचार करुन एकप्रकारे ती स्वराज्य सेवाच करीत होती.मधुन मधुन मीराची खोजखबर घेण्याकरितां भावांकडुन ग्यानोबा व सख्याबा येत व चंदीची माहिती पण कळत असे.

       झुल्फिकारखानाच्या मदतीला बादशहाने स्वतःचा मुलगा कामबक्ष, झुल्फिकारखानचे वडिल आसदखान, व वजीर बुंदेला दलपतराय यांना चंदीस पाठवले पण त्यांच्या आपसातील वैमन्यस्यामुळे,व या प्रांतातील सर्व मुलखी अधिकार आसदखानकडे असणे कामबक्षाला सहन होईना.त्यातच बादशहा मरण पावल्याची भुमका उठल्यामुळे राजपुत्राच्या तोंडाला पाणी सुटुन मराठ्यांशी सलोखा करण्याचे विचार चालु होते.तेवढ्यात संताजी घोरपडे पाठीवर आल्याची वार्ता आल्याने मोगली सैन्यात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे बादशहास चंदीची बातमी व चंदीस बादशहाची खरी बातमी मिळेनासी झाली.मराठे कामबक्षाला लालूच दाखवत होते.अखेर दोन्ही खानांनी त्याला कैद केले त्यामुळे मोगल फौजेत एकच गोंधळ उडाल्याने त्यांना घेरणे सोपे झाले.आसदखान व संताजी मधे तात्पुरता तह झाल्यामुळे चिडुन फौजेने चंदीवरुन कुच केले.ह्या सर्व गोष्टी बादशहाला कळल्यावर रागाने बेभान होऊन कामबक्ष व आसदखानला बोलावुन घेतले व झुल्फिकारखानला चंदी काबिज करण्याचे काम नेटाने करण्याचा हुकुम दिला.

        कांही दिवसांनी दोन बातम्या आल्या.राजारामांची दुसरी पत्नी राजस बाईस पुत्ररत्न झाले.त्यांचे नांव संभाजी ठेवले.दुसरी वाईट बातमी,स्वराज्याचा एक निष्ठ सेवा करणारा,राजारामांना सल्लामसलत देणारा थोर मुत्सद्दी, प्रतिनिधी प्रल्हाद निराजीचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सेनापती संताजींची बाजु सांभाळणारा कोणी उरला नाही. अलिकडे महाराजांचं मन संताजीविषयी फारच कलुषित झाले होते.संताजी तह करुन शत्रूला मोकळे सोडणे म्हणजे त्यांनी मोठी लाच घेत असावे असा गैर समज झाला.त्यात धनाजी उघड उघड फटकुन वागत असल्यामुळे त्यांच अनुकरण इतर सरदारही करु लागले.

प्रल्हादपंतांच्या मृत्युबातमीने सुभेदार प्रयागजींना अतिशय दुःख झाले.

       स्वराज्याची विस्कटलेली घडीचा जम बसतो न बसतो,तोच थोर मुत्सद्दी प्रल्हादपंताच्या मृत्युने स्वराज्याची मोठी हानी झाली.आतांपर्यंत मराठ्यांना यश मिळत होते ते राजारामांना वेळोवेळी प्रल्हादपंत व रामचंद्रपंत या थोर मुत्सद्यां च्या योग्य सल्ल्यामुळेच!त्यांच्यामुळेच संताजी धनाजी मधील घुमसत असलेला कलहाग्नी थंड होता.प्रल्हादपंताच्या मृत्यु मुळे स्वराज्याची तर हानी झालीच पण दुसरी महत्वाची हानी झाली ती, राजारामांजवळ चंदीला कोणी योग्य सरदार नसल्यामुळे कारभारात चुका होत गेल्या,ज्या स्वराज्याला भोवल्या.

         ‘लालूच’ हा नवीन रोग मराठ्यांत उत्पन्न झाला.शिवछत्रपतींनी प्रत्येक मराठी मनात उत्पन्न केलेली राष्र्टीय भावना,स्वराज्य,स्वदेश,स्वधर्माचे रक्षण करणे प्रत्येकाचे पहिले कर्तव्य ही भावना लोप पावुन लहान शिपायापासुन मोठ्या सरदारापर्यंत प्रत्येकजण स्वार्थासाठी धडपडु लागला.हा रोग बळावण्याचे कारण,राजारामांनी सुरु केलेली सरंजाम पध्दत होय.पण स्वराज्यरक्षणासाठी नाईलाजाने ही पध्दत सुरु करणे काळाची गरज होती.संभाजीराजेंच्या वधानंतर बादशाही फौजेचा संचार सर्व महाराष्र्टात झाल्यामुळे,मोगलांवर हल्ले करुन तो जिंकलेला मुलुख पराक्रम करणार्‍याला जहागिर म्हणुन दिल्या जाई

त्यावेळी बरेचसे सरदार बादशहाच्या प्रलोभनाला बळी पडल्यामुळे,त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी वतनाची व फितूर होऊ नये म्हणुन लालूच देणे गरजेचे झाल्यामुळे वतनदारी पध्दत सुरु झाली.त्यामुळे मराठ्यांमधे जबरदस्त स्वार्थ उत्पन्न झाला.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि. ३-६-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  – ३९.

          मीरा सातार्‍याच्या किल्लात असल्याचे कळल्यावर सुभानजी कुटील डावपेच सुरु केले.नागोजी मानेच्या मनात तिची अभिलाषा जागृत करुन तीला हस्तगत करण्याच्या कार्यासाठी चार वर्षापासुन तळघरांत कैदी असलेल्या बाजीची सुटका करवली. तो सातार्‍याच्या किल्ल्याजवळ पोहचुन अनेक युक्त्या,शकले लढवुन मीराला किल्ल्याबाहेर काढलेच.समोर बाजीला पाहुन आपली फसगत झाल्याचे तीच्या लक्षात आले पण फार उशीर झाला होता

आपण किल्ल्यातुन नाहीसे झालेले पाहुन सुभेदार नक्कीच शोधाशोध सुरु करतील,पण तीला इतक्या दूरवर आणले होते की,शोध लागणे अशक्य होते.परंतु मीराचा परमेश्वरावर,ब्रम्हेंद्रस्वामी व समाधीवर पूर्ण भरवसा होता.आणि झालेही तसेच.बाजी तिला घेऊन जात असतां खरोखरच मीराच्या सहाय्याला देव धावुन आला.इतक्यावेळ दोन व्यक्ती लपुन बसलेल्यापैकी एक झटकन पुढे आला.त्याला पाहतांच सर्वांची भीतीने गाळण उडाली.कसेबसे घोड्यावर बसुन सर्वांनी पळ काढला.

        कोण होती ती व्यक्ती? भूत दिसल्या सारखे बाजीने स्वारांसहित पळ कां काढला?ते होते संताजी घोरपडे.होय संताजी!ज्याची दहशत सार्‍या शत्रूत होती,ज्याने स्वराज्यासाठी जीवाचे रान केले,घरादाराची,जीवाची,कशाकशाची पर्वा न करतां,रात्रंदिवस शत्रूला तलवारी चे पाणी पाजत,काट्याकुट्यातुन,अनेक वेळा जीव संकटात टाकुन,ज्याने प्रत्यक्ष बादशहाच्या डेर्‍याचे कळस कापुन आणले,त्याच संताजीवर प्रत्यक्ष राजारामांनी फितूरीचा आळ घेऊन सेनापती पदावरुन काढुन टाकले. महाराजांच्या ताटाला बसून शपथक्रीया केली,भाऊपणा जोडला तो काय स्वराज्याशी निमकहराम होण्यासाठी? थोरल्या महाराजांची शिस्त अमलांत आणली ही चुक झाली कां?धनाजी बरोबर खांद्याला खांदा भिडवुन शत्रुशी झुंज घेतली तोच जीवाभावाचा मित्र उलटला,फौज विरुध्द उठवली.त्या फौजेचा बिमोड करुं शकत नाही कां?पण!आपल्याच स्वबांधवाबरोबर आपसात लढलो तर शत्रूचा जोर वाढेल. तेवढ्यासाठीच पंत मी माघार घेतली.पंत माझं सेनापतीपद काढल्याचं दुःख मला मुळीच नाही.दुःख आहे ते फितूरीचा डाग लागल्याचं!पंत!राजाराम महाराज मला आज ओळखतात का?त्यांचे मन इतके कसे कलुषित झाले याचे दुःख आहे.पंत ही तलवार स्वकियांसाठी नसून स्वराज्य शत्रूसाठी आहे.

        संताजीला फितूर ठरवुन सेनापती पदावरुन काढल्यावर तो हुकुमपन्हा रामचंद्रपतांच्या भेटीस विशाळगडला येऊन त्यांच्याजवळ आपले ह्रदगत मोकळे केले.त्यांचा निरोप घेऊन संताजी निघाला,मागावर धनाजीचे सैन्य होते. स्वबांधवावर शस्र चालवायचे नाही म्हणुन तो रणझुंजार योध्दा लपतछपत, फक्त जिवाला जीव देणार्‍या नारोबासह विशाळगडावरुन कसातरी जीव वाचवत राजमार्ग टाळुन  डोंगरपठारावरुन चालले होते.उर्वरीत आयुष्य एखाद्या निवांत स्थळी घालवावे,महाराष्र्टात ठीक ठीकाणी मराठ्यांचे लष्कर पसरले असल्यामुळे जीव वाचवत दोघेही मेढोशी च्या डोंगरपायथ्याशी आले असतां,बाजी चे स्वार दिसल्यामुळे ते जाईस्तोवर मोठ्या शिळेच्या आड लपले होते.

         त्या जागेवरुन संताजीने बाजीला व मीराला ओळखले होते.याच नारोबाने बेशुध्दावस्थेतील मीराला व दोन कैद्यांना छावणीत आणले असतां,पैकी या बाजीला आसुडाची शिक्षा दिलेली त्यांना आठवले.बाजीने मीराशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतांच सर्व प्रकार लक्षात आला आणि मीराच्या रक्षणार्थ ते समोर आले.मुली तूं निर्भयपणे जिथे जायचे तिथे जाऊ शकतेस.आतां तुझे रक्षण केले पण,पुढे माझ्याच रक्षणाची भ्रांत,तिथे तुझे काय रक्षण करणार? एक असाह्य बहिण म्हणुन स्वराज्यरक्षणार्थ आपल्यापुढे याचना करते असे दिनवाणे मीराने म्हटल्यावर, अरेरे!एकेकाळी आयाबहिणी या संताजीवर स्वजीवीताचा भार टाकुन निश्चिंत असत!पण आज…

        काय? संताजी घोरपडे?होय माजी सेनापती,स्वराज्याचा अभिमानी आतां एक शुल्लक शिपाईगडी झाला.उद्वग जनक  स्वरांत संताजी म्हणाले.महाराजां च्या दृष्टीने  फितूर संताजीच्या नांवाने  शत्रूस पळवणार्‍या,आज तोच स्वबांधवा पासुन पळत आहे.नाही ..नाही!या महान स्वराज्यसेवकाला सोडुन जाणे म्हणजे राजद्रोहच ठरेल.मी आपल्याला एकटं नाही सोडणार!

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि.  ३-६-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  –  ४०.

         इकडे राणीसाहेब व बाळराजे बादशहाच्या कैदेत असल्याला जवळ जवळ आठ वर्षे लोटली.या अवधीत बेगमला आपलीशी करुन घेतले होते. बादशहाच्या मनांत किंचितही किल्मिष राहिले नव्हते. राजे वयस्क झालेले पाहुन राणीसाहेबांनी बेगमजवळ त्यांच्या विवाहाचा विषय काढला.बेगमने बादशहाच्या कानावर घातले तेव्हा उध्दव चक्रदेव राजाज्ञा,मोरोपंत सबनीस, ज्योत्याजी केसकर वगैरे शाहूजवळ असलेल्या मंडळींना त्याच्या पदरी असलेल्या मराठे उमराव,सरदारांत शोध घेऊन राजेंच्या योग्य वधू निवडुन विवाह जुळवण्याची आज्ञा केली.त्याप्रमाणे सरदार रुस्तमराव जाधवांची कन्या अंबिकाबाई व कन्हेरखेडकर शिंदेची कन्या सावित्रीबाई ह्या दोन मुली पसंत करुन,त्यावेळी बादशहाची छावणी  ब्रम्हपुरीस होती तिथे थाटामाटात पुष्कळ खर्च करुन शाहूचे लग्न लावुन दिले.

         राजे!तुमच्या मनासारखा लग्न सोहळा झाला ना?बादशहाने विचारले. तुमच्या काकांनी यापेक्षा जास्त चांगल्या रितिने लग्न केले असते.हुजुर!त्यांच नांव नका काढु.आपल्याला आमचा कंटाळा आला असेल तर पाठवा.आणि राजाराम बद्दल जेवढे बोलतां येईल तेवढे बोलले.प्रथम त्यांचं पारिपत्य करुन मगच  राजे म्हणुन राज्यावर बसवावे.बादशहा एकदम खुष!बादशहाला खुष करण्या साठी आपला चुलता शत्रू आहे असे भासवत असे.खरी गोष्ट ते बादशहाला कळूं देत नसे.

          बादशहाने राजेंची पत्नी बघण्याची इच्छा व्यक्त केल्यावर येसूबाई समोर मोठा पेच पडला.त्या शहजादी झेबुन्निसा बेगमला म्हणाल्या,आमच्यात पडदापध्दत असल्यामुळे दाखवण्याची अडचण आहे.बेगमला याची कल्पना नव्हती.तिला वाटले राजेंच्या पत्नीला बघीतल्यावर तिला इतमाम(मुलीच्या खाजगी खर्चासाठी मुलुख तोडुन देणे) देईल.पण दाखवायला वधूला नेले नाही तर बादशहाची मर्जी खपा व्हायची.शेवटी वीरा शाहूंची वधू म्हणुन दाखवण्याचा बेत निश्चित झाल्यावर योजना बाहेर फुटणार नाही ही खबरदारी घेऊन उंची वस्रालंकाराने वीराला सजवुन शाहूंची वधू म्हणुन बादशहाकडे पाठविली.खुष होऊन उभयंतांना अक्कलकोट,इंदापूर, सुपे,बारामती आणि नेवासे या पांच परणगण्यांची जहागिरी,सोन्याची एक तलवार,रायगडाचा पडाव करुन आणलेली शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि अफझलखानाची अशा तीन तलवारी बक्षिस दिल्यात.

        अशा रितीने येसूबाईचा पडदपोशी चा मान व वीराची शपथ पूर्ण झाली.

         संताजीसोबत मीरा असल्यामुळे, संकेतस्थळी ठेवलेल्या आपल्या कबिल्या गेले.तिथुन कबिल्यासह ते कापशीकडे लपतछपत सैनेला चुकवित म्हसवड हद्दीत डोंगराळातील कारखाळ्याच्या जंगलात सुरक्षित जागा पाहुन तिथे तळ दिला.तेवढ्यात टेहाळणीवर असलेल्या नारोबाने घाबर्‍या घाबर्‍या येऊन सांगीतले,मराठी फौजेने जंगलाला वेढा दिला.संताजीनी नारोबाला शेवटचा आदेश दिला,कबिला घेऊन बहिरजी व मालोजीकडे जाऊन राणोजी व धिराजी सांभाळ.त्यांना त्यांच्या पित्याचा निरोप दे कधीही राजद्रोह न करतां अखेरपर्यंत स्वराज्यसेवा करा! मी घेतो माझी काळजी म्हणुन झटकण निघुन गेले.

        तोच हणमंतरावाच्या स्वारांनी नारोबा व कबिल्याला वेढा देऊन म्होरक्या पुढे येऊन संताजी कुठे आहे? व कबिल्यासंगे बेअदबीने बोलु लागल्या वर नारोबा त्याच्या अंगावर धावुन गेलेला पाहुन बाकीचे स्वारही नारोबाच्या अंगा वर धावुन आले.तेवढ्यात हणमंतराव पुढे येऊन कबिल्याला अपशब्द बोलल्या बद्दल फटकारले व स्वारांसह निघुन गेले. 

        तोच सुभानजीने स्वारासहित येऊन गराडा घातला व एकट्या नारोबावर सर्व तुटुन पडले.नारोबा जखमी होऊन बेशुध्द झाले असतां,त्याला वाचवण्यासाठी मीराने सुभानजीच्या सार्‍या अटी मान्य करुन त्याच्या बरोबर जाण्यास तयार झाली.जवळची दिव्य औषधीने त्याच्या वर उपचार केल्यावर तो शुध्दीवर आला. मीरा म्हणाली,माझी काळजी नका करुं. माझ्यापाठी परमेश्वर आहे.तुम्ही कबिला घेऊन निघुन जा.सुभानजीने मीराला नागोजी मानेच्या ऐषारामी ऐनेमहालात आणुन ठेवले.

        संताजी कारखाळ्याच्या घनदाट जंगलात जिथे सूर्यकिरणांचा स्पर्शही झाला नाही अशा ठीकाणी लपून बसले. पण ते जंगल नागोजीच्या हद्दीतील व नेहमी शिकारीला येत असल्यामुळे त्याला त्या जंगलाची पूर्ण माहिती होती. दोन दिवस झाले तरी संताजीचा माग नाही,पाण्याकरीतां झर्‍यावर येईलच म्हणुन,झर्‍यावर पाळत ठेवुन दबा धरुन बसला.संताजी आजुबाजुला कोणी नाहीसे पाहुन झर्‍यावर येऊन काठावर कपडे ठेवुन स्नानासाठी झर्‍यात उतरले असतां,नागोजीने पाठीमागुन वार करुन त्यांचा शिरच्छेद केला.

             क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि.  ४-६-२०२१.

छत्रपती राजाराम म.चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading