भारुड 4 :- नाथांच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, संपूर्ण भारुड संत एकनाथ

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

नाथांच्या घरची उलटी खूण|
पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आत घागर बाहेर पाणी|
पाण्याला पाणी आले मिळोनी
हे संपूर्ण भारुड पहा

सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
संत एकनाथांचे सर्व भारुड पहा व लिहून घ्या.
Sant Eknathanche Sarv Bharud Paha V Lihun Ghya.
See and Write Down All The Bharudas of Saint Eknath.
Bharud 4 :- Nathachya Gharchi Ulati Khun Sampoorn Bharud Sant Ekanaath

भारुड 3 :-
नाथांच्या घरची उलटी खूण|
पाण्याला मोठी लागली तहान

नाथांच्या घरची उलटी खूण|
पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आत घागर बाहेर पाणी|
पाण्याला पाणी आले मिळोनी ॥2॥
आज मी ऐक नवल देखिले |
वळचणीचे पाणी आढयाला लागले॥3॥
शेतकऱ्याने शेत पेरिले|
राखणदाराला त्याने गिळिले ॥4॥
हंडी खादली भात टाकिला |
बकऱ्यापुढे देव कापिला॥5॥
एका जनार्दनी मार्ग उलटा |
जो जाणे तो गुरूचा बेटा
॥6॥

अर्थ :-

अभंगाचे महत्त्व
संत एकनाथांचा हा कोडे या प्रकारातील प्रसिद्ध अभंग आहे या अभंगात ते म्हणतात “नाथांच्या घरची खुण उलटी आहे. पाण्याला मोठी तहान लागली आहे. घागर पाण्यात बुडाली आहे.घागरीत पाणी आहे. आणि घागरीच्या बाहेरही पाणी आहे. हे घागरीतील पाणी बाहेरच्या अथांग पाण्यात मिसळून गेले.

मी आज एक नवल पहिले. वळचणीला असणारे पाणी अढयाला गेले शेतकऱ्याने शेत पेरले. पण राखणदाराने त्याला गिळून टाकले खापराच्या हंडीत भात शिजवला पण जीवाने भात टाकून हंडी खाल्ली बकऱ्यापुढे देवाचा बळी दिला. हा मार्ग उलटा आहे हे वास्तव ज्याने जाणले तो गुरूचा बेटा होय.

या अभंगातील भावार्था मागे आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.तो अर्थ समजला की अभंगातील कोडेही उलगडते.

परमेश्वर सर्व पिंडापिंडात भरलेला आहे. त्याला न ओळखता जीव देहात अडकला आहे. देहाचा संकुचीतपण संपला कि ईश्वरी चौतन्याचा अनुभव यावा लागतो. म्हणजे जीवरूपी पाण्यला समष्टीरूप पाण्याची तहान लागते .जिवातील चैत्यण्याला देहाचे बंधन आहे. म्हणून त्याला घागरीतील पाणी सर्वस्व आहे. असे वाटते हे . घागर अथांग पाण्यात बुडाली तर घागरीच्या आतही पाणी असते आणि बाहेरही वळचणीचे पाणी आढयाच्या पाण्याशी म्हणजे विश्वात्मक चैत्यन्याशी एकरूप झाले.

शेतानेच राखणदाराला गिळून टाकले. म्हणजे काय?
विधात्याने हे विश्व निर्माण केले.त्याने विश्वरूप शेताची पेरणी केली म्हणून अनेक जिवांची निर्मिती झाली .तो देहाच्या शेताची राखणदारी करतो. पण अज्ञानामुळे जीव ईश्वराला विसरला. त्याने ईश्वररुपी राखणदाराला गिळून टाकले. असे म्हणले आहे. देहरूपी खापराच्या हंडीत भात शिजवला. सुज्ञान माणुस भात खाऊन हंडी फेकून देतो. पण मायामोहामुळे जीवाचा विवेक सुटला. ईश्वररुपी भात टाकून देहरूपी हंडी तो खात बसला.

नेहमी देवापुढे बळी दिला जातो. पण येथे जीवाने उलटेच काम केले. म्हणजे बकऱ्या पुढे देवाचा बळी दिला जातो. जीवाने अंगिकारलेला उलटा मार्ग टाकून सरळ मार्गाने चालण्याची जाणीव झाली की गुरूचे बळ मिळाले असा अर्थं होतो. त्याच्यावर गुरूची पूर्ण कृपा होते.एकेक शब्दाचा गूढ अर्थ जसजसा स्पष्ट होत जातो तसतसे अभंगातील कोडे उलगडते. मनाला एका वेगळ्याच समाधानाची अनुभूती येते.

आमचे युट्युब चॅनल पहा

सर्व संतांचे “भारुड” एकाच ठिकाणी

 संत सोपानदेव चरित्र सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, एप्रिल नित्य पारायण सूची, ऑक्टोबर नित्य पारायण सूची, ऑगस्ट नित्य पारायण सूची, किर्तन म्हणजे काय?, गणपती सर्व, ग्रामगीता सर्व, जानेवारी नित्य पारायण, जुलै नित्य पारायण, जून नित्य पारायण सूची, डिसेंबर नित्य पारायण सूची, दत्त संपूर्ण, देव जन्माचे अभंग, धनंजय महाराज मोरे, नाना महाराज कापडणीस, निरपेक्ष किर्तन समूह, नोव्हेंबर नित्य पारायण सूची, पौराणिक सर्व, भ.श्रीकृष्ण चरित्र सर्व, भक्त प्रल्हाद संपूर्ण चरित्र, भजनी मालिका, भागवत पुराण महात्म्य १, भागवत महापुराण, भारुड, मारुती-हनुमान, मार्च नित्य पारायण सूची, मुक्ताबाई संपूर्ण चरित्र, मे नित्य पारायण सूची, वारकरी ग्रंथ, वारकरी जलद चाली, वारकरी संत, वारकरी सर्व, श्री भ. दतात्रय प्रभू सर्व, श्री समर्थ रामदास संपूर्ण चरित्र, संत कान्होपाठक, संत गजाजन महाराज, संत गाडगेबाबा सर्व भाग, संत गोरा कुंभार गोरोबाकाका, संत चरित्र सर्व, संत चोखामेळा चरित्र सर्व भाग, संत ज्ञानेश्वर सर्व, संत तुकडोजी महाराज साहित्य, संत तुकाराम म. चरित्र सर्व, संत तुकाराम संपूर्ण सूची, संत तुकाराम सार्थ गाथा, संत मीराबाई चरित्र सर्व, संत समाधी अभंग, संत ज्ञानेश्वर म. चरित्र, सप्टेंबर नित्य पारायण सूची, सर्व संत अभंग गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय, स्तोत्र-अष्टके, १२ महिने पारायण सूची, VIDEO

धार्मिक साहित्य सूची

धार्मिक साहित्य सूची List of religious literature
भारुड, भजनी मालिका, वारकरी सर्व

122.सर्व धार्मिक व वारकरी संत साहित्य एकाच ठिकाणी पाहा

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।। आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ? ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे? गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
भारुड, भजनी मालिका

भारुड 4 :- नाथांच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, संपूर्ण भारुड संत एकनाथ

नाथांच्या घरची उलटी खूण| पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥ आत घागर बाहेर पाणी| पाण्याला पाणी आले मिळोनी ॥2॥
भारुड, भजनी मालिका

भारुड 3 :- सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला, संपूर्ण भारुड संत एकनाथ

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥ सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
भारुड

भारुड 2 :- विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला, संपूर्ण भारुड संत एकनाथ

विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥ पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ….हे संपूर्ण भारुड पहा
भारुड

भारुड १ :- अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना संपूर्ण भारुड संत एकनाथ

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।। आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ? ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे? गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading