आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

भाग :-२ पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)
पितामह भीष्माचार्यः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण २५ भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या ५ भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography
पितामह भीष्म संपूर्ण चरित्र
भागः-६
सायंकाळी जान्हवी आणि क्षीरसागराच्या मीलनस्थळावर भीष्म पोहोचले. त्यांनी सिध्दासनात पुर्वाभिमुख बसुन प्रणवाचा जप सुरु केल्यावर ते निर्विचार झाले. जप झाल्यावर डोळे उघडताच रावणाचे पुर्वज तेजपुरुष ऋषी पुलस्य त्यांचेसमोर प्रगट झाले. अचंबीत होऊन प्रश्न पडला की इतक्या काळानंतरही हे जिवंत कसे ? त्यांच्या मनातला भाव ओळखुन पुलस्य ऋषी म्हणाले, “कर्मयोग पुर्ण झाला की, हिमालयातील बद्रीकाश्रमात जाऊन तेथे नर नारायण अनादी काळापासुन सृष्टीच्या संतुलनासाठी तपश्चर्येत मग्न असतांना त्यांच्या कृपाछायेत आमचं संचीत जाळुन परमात्मात विलीन व्हायचे असते, पण श्रीनारायण तसं करु न देता विश्वकल्याणाकरिता नियुक्ती करीत असतात.”
निःसंग होऊन श्रेष्ठत्वाची कवचं उतारुन, उणीवांची व्यथा बाजुला सारुन पुलस्य ऋषींनी त्यांना तिर्थाटनाचा सल्ला दिला. भीष्म गंगेत उभे राहुन मातेशी संवाद सुरु केला. त्यांना गंगा म्हणाली, “या घडीला संपुर्ण भारतवर्षात तुझ्यासारखा धर्मशील पुरुष दुसरा नाही परंतु तुझा धर्म व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षाशी बांधलेला मर्यादित धर्म आहे.”
व्यक्तीधर्म सर्वांनाच पाळावा लागतो. समष्टीधर्मचरणांत व्यक्तीधर्मामुळे विक्षेप होत असल्याने व्यक्तीधर्म रुढीग्रस्त होतो. तिर्थयात्रा करतांना वाटेत यमुना, सरस्वती, कौशिकी तसेच अनेक सिध्द साधक विदेही आत्मे भेटतील त्यांचेकडुन ज्ञान आत्मसात करुन भगवान कपिलांच्या आज्ञेनुसार वागावे. नंतर अष्टवसुंचे आशिर्वाद व शुभेच्छा घेऊन कण्वाश्रमाला निघाले.
भीष्मांचे कण्वाश्रमात स्वागत झाल. दुसर्या दिवशीपासुन होम हवनाला सुरुवात झाली. यज्ञ सुरु असतांनाच भीष्मांचे पुर्वज ययातींना मुक्ती मिळाली.
पुढील प्रवास सुरु असतांना भीष्म अगनित पारंब्यांनी वेढलेल्या विशाल वटवृक्षाखाली विसावले, तीन दिवसांची समाधी संपल्यानंतर वशिष्ठांची पत्नि अरुंधतीतीची भेट झाली. त्या म्हणाल्या, धर्म समजुन तिर्थयात्रा केल्याने उन्नती होईल. लवकरच पित्याचे दर्शन होईल. क्षुधा निमाल्या म्हणजे साधकाचं मन स्थीर होत असतं, इश्वरतत्व तर लक्षलक्ष लक्षणांनी खुललेलं दिसतं! कधी भाऊक होतं! कधी उन्मादक, तर कधी संगीतमय, तर कधी सुंगधमय, कधी स्वराविष्कार, कधी शब्दाविष्कार होत असते. या सर्वातुन जाऊन यदृच्छा मान मिळवायचाय! वसु असल्यामुळे पुनर्जन्म नाही, त्यामुळे तुझा जन्म धर्म इशावास्यम् आहे.
ज्या वटवृक्षाखाली भीष्म होते, ते अरुंधती तीर्थस्थान होते. त्यांनी प्रदक्षिणा पुर्ण करुन पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवास सुरु असतांना ते लोकांना उपदेश करुन मार्ग दाखवीत. गुरुकृपेने भीष्माजवळ अनुभवाचा न संपणारा कोष होता. तत्वज्ञान, इतिहासांतील असंख्य उदाहरणं, वाणीवर वाल्मिकी रामायणाचे संस्कार, शब्द पसारा अफाट असल्यामुळे लोकांची धर्मनिष्ठा वाढुन धीरता येऊ लागली, आणि भीष्मांकरवी श्रेष्ठ ब्राम्हणाचं कार्य घडु लागलं!
क्रमश
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्म
भागः-७
भद्रवरास रुद्राभिषेक करुन भीष्म वराह तीर्थाला आले. त्यांचे गुरुही महान कृषक होते. त्यांनी शुर्पारक देश कृषिज्ञानाने निर्माण केला. नागवंशाची वस्ती असलेल्या कपिल वटास आले. तीथे त्यांना विविध नागांनी घेरले असतां अचल उभे असलेल्या भीष्माजवळ वृध्द नागदेव येऊन म्हणाले, “एव्हाना कोणत्याही वीरानं वैनतेयास्राचं केलं असतं, पण तुझा संयम पाहुन आणि कपिल ऋषींच्या आज्ञेन कधीही विषबाधा होणार नाही” असा वर दिला.
व्रतस्थ्य भीष्म अनेक तिर्थांना जाऊन हिमालयात कौशिकीच्या उगमस्थानावरील आश्रमात पोहोचले. दक्षिणेला भृंगुतुंग तिर्थ होते. ते स्थळ भृगुपुत्र तपस्वी ऋचिक आणि पत्नी सत्यवतीच समाधीस्थान होतं. तीचा बंधु ब्रम्हर्षि विश्वामित्र ! त्यांनीही तीथेच सभाधी घेतली होती. कौशिकीचा नातु भगवान परशुराम ! अशा ठीकाणी तिथेच थांबायचे ठरविले. स्वप्नात विश्वामित्र आले. त्यांनी भीष्माच्या मनांतील प्रश्नांना उत्तरे देत म्हटले की, “तुला पुनरपी जन्म नाही. तू जे कर्म करीत आहेस ती विसर्जीत करुन निष्कामतेचं शिक्षण मिळेल. परिणामांचा त्याग या तिर्थाद्वारे होईल.”
“कर्तव्य म्हणजे निश्चितपणे करण्याचा संकल्प ! परंपरेने राज्यकर्तव्य निश्चित केलं आहे. प्रत्येक कर्तव्याच्या स्तंभामधुन जीवनरथ पुढे हाकायचा आहे.”
पुढे ते भीष्मांना म्हणाले, “तुझ्या हातुन घडलेले तीन प्रमाद, अंबेची वाताहात, गुरुंशी युध्द कर्म, आणि त्यातुन झालेली निसर्गाची हानी हे सर्व प्रदिर्घ तिर्थयात्रेनं पापातुन मुक्त झालास. त्यामुळे हस्तीनापुरला जातांना कुरुक्षेत्रावर परशुरामांनी तयार केलेली पांच सरोवर जी रामर्हद म्हणुन संबोधतात त्यात स्नान करुन पितरांच तर्पन करुन पुढे गेल्यावर ललितक तिर्थ जे सम्राट कुरुंचं स्थान आहे.”
त्यानुसार त्यांनी तीथे भेट दिली. तिर्थाटन पुर्ण करुन ते हस्तीनापुरला परतले.
विचित्र विर्याची खंगलेली हालत पाहुन त्यांना फार वाईट वाटले. विचित्रविर्याने भीष्मांना याच वंशात पुनः जन्म व्हावा, आणि गुरु, पालक, मार्गदर्शक म्हणुन स्मृती बरोबर नेण्याबद्दल आशिर्वाद मागुन त्याने देह ठेवला.
विचित्रविर्याच्या देहावसनाने प्रजाजन शासंकीत झाल्यामुळे प्रजाजनाचे मानस जाणुन घेण्यासाठी, त्यांची कुरुवरची निष्ठा ढळु नये, श्रेष्ठ नृपतीची कर्तव्य पुर्णपणे आचारीत करुंचा प्रभाव अधिक दाट करीत भीष्मांनी संपुर्ण राज्यात फेरफटका मारला आणि स्थिती नियंत्रणांत आणली.
सत्यवती भीष्मकक्षात येऊन त्यांना म्हणाली की, “तुला धर्माची सुक्ष्मता, व्यापकता, वेदवेदांचे सखोल ज्ञान असल्यामुळे धर्माचा, पितृ-मातृ वंशाचा विचार करणे आवश्यक आहे. विचित्रवीर्य अचानक निपुत्रिक स्वर्गस्थ झाल्यामुळे कुलवृध्दीसाठी अंबीका, अंबालिकेला अपत्यदान द्यावं.”
त्यावर भीष्म म्हणाले, “मी प्रतिज्ञाबध्द असल्याने पृथ्वीवरील कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होईल पण प्रतिज्ञा कधीही भंग होणार नाही.” भरतकुलाची वृध्दी नियोग पध्दतीने होण्यासाठी व्यासांची नियुक्ती झाली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्म
भागः-८
सत्यवतीने लग्नाआधीचे कुमारी अवस्थेतील व्यासजन्म रहस्य भीष्मासमोर उघड केले. व्यासजन्म ही इश्वरीय व्यवस्थापना होती. सर्वसामान्यांमधे निश्चीतच घटना नव्हती. ती भूतकाळात हरवुन गेली. ती यमुनेच्या पैलतीरावर निर्जनस्थानी मासळी आणण्यासाठी नौका वल्हवित होती, तेवढ्यात हिमालयातुन उग्र साधना करुन विध्यात्याचं कार्य त्यांच्या उरात धगधगत होतं. व्यक्त रुप देण्यासाठी साधन शोधत होते. त्यांना ही विकाररहित बालिका दिसली. त्यांनी धूकं निर्माण केलं. तिकडे पिता आणि इकडे हा तेजस्वी ऋषी! ती सुन्न झाली. जेव्हा ती भानावर आली, धुकं विरलेलं होत. पराशर ऋषींनी तीला आशीर्वाद देत म्हणाले भीऊ नकोस. तुझी मत्स्यगंध त्वचा यापुढे स्वर्गीयगंध उधळेल ! तु अत्यंत रुपसंपन्न कुमारी होशील. तुझ्या उदरीचा जीव या बेटावरच ठेव.
योग्य कालावधीनंतर सत्यवतीने कृष्णर्णीय व्यासांना जन्म दिला. त्यांनी प्रगट होऊन सांगीतले, “संकटसमयी माझे स्मरण केल्याबरोबर प्रगट होऊन संकट निवारण करीन.”
भीष्मांशी चर्चा झाल्यावर तीने व्यासांचे स्मरण करतांच ते तीच्या समोर प्रगटले. ती त्यांची पुजा करीत असता ते तीला म्हणाले, “मातेकडुन कां कोणताही पुत्र पुजा स्विकारीत असतो ?” ती लटक्या रागाने व्यथीत होत म्हणाली, “त्यावेळी अल्लड विकारशुन्य बालिका असल्यामुळे आपल्याला वात्सल्य, प्रेम देऊ शकली नाही.”
व्यासांनी बोलावण्याचे कारण विचारल्यावर सत्यवती म्हणाली, “आपण सर्वज्ञ आहात. तीला जे हवं होतं त्यासाठी सृष्टीधर्म बाजुला सारला गेला. राजा नसला की प्रजेचा नाश होतो, सर्व क्रीया नष्ट होतात. पर्जन्य पडत नाही, देवता अप्रसन्न होतात, राज्यात अराजकता माजते. राजाशिवाय राष्ट सैरभैर होते, म्हणुन माझ्या दोन्ही सुनांना आपल्या शक्तीनं गर्भधारणा करण्यास योग्य करावं!”
त्यांनी सांगीतले की, “एक वर्षाच्या व्रताचे पालन केल्यानंतर दोन्ही सुना शुध्द होतील. विकारविरहित भावनेने माझ्या माध्यमातुन त्या असामान्य जीव जन्मास घालतील. फक्त त्यांनी माझी निरुपता सहन करावी. रक्तवर्णी नेत्र, न शोभणारं जटाबंध! दाढी, अंगाला उग्र गंध, त्वचा रुक्ष, दक्षिणी द्राविडांचा वेश, अशा रुपात सहन करणं महाव्रत आहे.”
ज्यावेळी व्यासांनी भीष्म कक्षेत प्रवेश केला, भीष्मांना सृष्टीनिर्मितीचं तत्वच व्यासांच्या रुपानं कक्षेत आल्याचा भास झाला. त्यांना वाटल परमेश्वर असेल तर हाच असावा. व्यास जर सृष्टीत नसतील तर गुरुत्वशक्ती नसल्यासारखीच आहे ! सर्व व्यवहार ठप्प होतील. व्यास भीष्मांना म्हणाले, “तू या भुलोकीचा धर्म असुन धनुष्याच्या प्रत्यंचेच्या टणत्कारानं सृष्टीतल्या सर्व देवता निमुटपणे भात्यात प्रविष्ट होतील, पराक्रमी शिरोमणी असुनही काती ऋजु आहे, तिर्थयात्रेनं पुनित झालेलं, व्रत निष्ठेनं अत्यंत शिलवान असे माझे बंधु असण्याचा अभिमान आहे.”
भीष्मांनी त्यांची षोडपोचारे यथासांग पुजा केली. व्यासांनी त्यांना नारळपोर्णिमेनिमित्य विश्वबंधु भव म्हणुन नारळ दिले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्मः
भागः-९
बंद कक्षामधे व्यास आणि भीष्मांची अति गूढ चर्चा सुरु होती. व्यास म्हणाले, “इश्वर सर्वत्र आहे, आपल्यातही आणि परक्यातही भरलेला आहे. जी भावना आपली तीच दुसर्याची असेल असे समजुन कृतीत आणनं म्हणजे धर्माचरण, सामान्य इच्छा, विकारी, निष्कृष्टही असु शकते म्हणुन उच्च व्यापक सृष्टीतत्वाशी जुळणारी विचारधारा रुजवणं हेच श्रेष्ठ धर्माचरण ! राजधर्मात दास्यतव हा संस्कृतीला अभिषाप आहे.”
भीष्मांनी त्यांना विचारले की, “श्रीनारायण कोणत्या उद्देशाने येत आहेत ?” व्यास उत्तरले, “दास्य विमोचनार्थ ! धर्म रुढीच्या दास्यात जातोय, मानव्य हे अहंकार आणि विकारांच्या दास्यात अडकतय. तत्वज्ञान, बुध्दी शुन्याच्या दास्यात फसतय ! संस्कृती असुरांच्या दास्यग्रहात आहे. त्या निराकारणार्थ येत आहेत. परमेश्वराच्या कृतिवरुन थोडी जरी एकाग्रता भंगली तरी अनर्थ ओढवेल.” एवढ बोलुन व्यास निघाले, त्यांना अंबाच्या कक्षेत जायचय ना !
सत्यवतीने अंबाला व्यवस्थीत सजवले, पण ती भितीग्रस्त होती. आपध्दर्म कळला नाही. तीची काया भुकेली होती, आई व्हायचे होते, राज्याला राजा हवा होता, या सर्व विचारांनी तीचं अंतरंग पेटलं होतं. तिच्या मनांत प्रणयभाव जागृत होऊन मनापेक्षा शरीर पुलकीत झाल्याने व्यासांची उत्सुकतेने वाट बघत राहिली.
व्यासांची उग्र पण अलौकीक तेज फाकणारं रुप तीला सहन न होऊन घट्ट डोळे मिटुन घेतले. व्यासांनी आपले धर्म्यकर्म पुर्ण करुन बाहेर आल्यावर उत्सुकतेने सत्यवतीने विचारताच त्यांनी सांगीतले, “हा मुलगा दशसहस्र हत्तीचं बळ, विद्वान, उत्तम राजा, महाबुध्दीमान आणि वीर्यवान असेल, परंतु मातृदोषामुळे जन्मांध होईल.” योग्यवेळी अंधपुत्र जन्मास आला. राजपदासाठी व्यंग असलेला नृपती चालणार नाही म्हणुन अंबालीकेसाठी व्यासांना पुनश्च पाचारण करण्यात आले.
या कालावधीत अंबालीकेकडुन आवश्यक विधि करण्यास अवधी असुनही कुणी कांही केल नाही की, अंबीकेने धाकट्या बहिणीस तयार केलं नाही. भीष्म तठस्थ होते. त्यांना हा विषय स्वतःस स्पर्शु द्यायचा नव्हता. व्यास अंबालीकाच्या कक्षेत प्रवेशले, त्यांचे उग्र रुप पाहुन ती पांढरीफटक पडली. व्यासांनी आपले कार्य आटोपल्यावर अंबालीकेला म्हणाले “तुझा पुत्र पांढर्या रंगाचा होऊन लोक त्याला पांडु म्हणुन ओळखतील.” सत्यवतीला सांगीतले, “हा पुत्र दैदीप्यमान, सरळ स्वभावाचा, दिग्विजयी, पांढर्या रंगाचा होईल.” योग्य वेळी पांडुचा जन्म झाला. अंध धृतराष्ट पांडुच्या बाललिला सुरु झाल्या.
दोघांपेक्षा निरोगी व चांगला पुत्र व्हावा म्हणुन सत्यवतीने अंबीकेचा होकार घेऊन पुनः व्यासांना बोलावले. अंबीकेने मागील अनुभव लक्षात घेऊन दासीला सजवुन स्वतःऐवजी तीला कक्षात बसविले. व्यास आल्यावर दासीने त्यांची पुजा केली. त्यांना मिटलेल्या डोळ्यापुढे साक्षात धर्मदेव दिसले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्म
भागः-१०
व्यासांनी धर्मदेवाला पाहुन विचारले, “मी तर चिरंजीवी आहे, मग आपल्या आगमनाचे प्रयोजन ?” यमदेव व्यासांना म्हणाले, “पुर्वी तपश्चर्या करणार्या मांडव्य ऋषींना चोर समजुन राजाने त्यांना सुळावर चढविले होते. तीथे ते वेदगान करीत जीवीत राहिले. पुढे मांडव्यांनी घोर तपश्चर्या करुन सगळे लोक प्राप्त केले. त्या बळावर त्यांना शुद्रवर्णात मानव जन्म मिळेल असा शाप मिळाला. ही दासी शुद्र आहे. तुझ्याकरवी मला मानव जन्म मिळेल.”
दासीबरोबर व्यासांनी निसर्गनियमाप्रमाणे आपलं कार्य झाल्यावर प्रसन्नपणे तीला म्हणाले, “तुझ्या पोटी येणारा मुलगा धर्मात्मा, बुध्दी आणि ज्ञानाच्या बाबतीत अजोड असेल.”
यथावकाश विदूराचा जन्म झाला. तो व्यासांवर गेला. धृतराष्ट पांडुसह तो मोठा होऊ लागला. त्याच्या रुपानं कुरुच्या अंगणात धर्म आणि अर्थ खेळू लागले. त्याला लोभ, क्रोध स्पर्शतही नव्हतं. त्याची दूरदृष्टी व निग्रह भीष्मांच्या लक्षात आल्यावाचुन राहिली नाही.
तीन्हीही मुलं कलाकलानं वाढत होती. भीष्मातला परशुरामीय पुरुष जागृत झाला. तिघांना घडवण्यासाठी भीष्म राबु लागले. पांडुचं व विदुराचं ठीक होतं पण जन्मांध धृतराष्टाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीष्मांनी त्याच्या आहारात शिलाजिताची वाढती मात्रा ठेवली. त्याला पाषाण शिळावर आघात करण्याचे शिकविले. परिक्षा घेतेवेळी पांच बलदंड गदाधारी सोबत धृतराष्टाची चुरस ठेवली आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. पृथ्वीतलांरच्या सर्व मुष्ठीयोध्यांमधे सर्वश्रेष्ठ ठरला.
भीष्म तिघांही मुलांना कठीणातील कठीण शस्रविद्या शिकवित होते. भीष्म प्रत्येक विषयांत रस घेत चिंतन करुन कृती करत तेव्हा धर्म समजुन त्यात तन्मयता आणत, मग ते धर्मशास्र, युध्दशास्र असो की संगोपन असो.
राजकुमार तरुण झाले. त्यांचा विवाह करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घेऊन त्यांनु धृतराष्टासाठी गांधारी, आणि यादव कुळातील शूरसेनाची पुत्री जी कुंतीभोजाकडे वाढली आणि मद्रदेशाची माद्री पांडुसाठी निश्चीत केल्या. विदुरासाठी ब्राम्हण राजा देवकालाला शुद्र स्रीपासुन झालेली मुलगी पारसवी निश्चीत केली.
यथावकाश तीघांचेही त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या वधुंबरोबर विवाह मोठ्या थाटामाटात सपन्न झाला. कांही दिवसांनी पांडुराजा दिगविजयासाठी बाहेर पडले. दशार्ण, मगधचा राजा जरासंघ, दीर्घ, यांचा पराभव करुन, अनेक राज्य जिंकुन विजयी पांडुराजा हस्तीनापुरला परतले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.










