पेशवा बाजीरावची दुर्भागी ” मस्तानी ” भाग ६, (२१ ते २४)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्‍यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !! बाजीराव मस्तानी !!!

!!!  मस्तानी  !!!

                          भाग – २१.

             आणखी प्रकरण चिघळण्याआधी आप्पांनी एक तोडगा काढला. दिल्ली मोहिमेचा तपशीलवार चर्चा झाल्यावर, आप्पा म्हणाले, राऊ, आम्ही ऐकले की…. तुम्ही ऐकले ते खरं आहे. लवकरच मस्तानीला मस्तानीला नव्या महालात आणून ठेवणार आहे.याबद्दल तुम्हाला कांही म्हणायचे? राऊ, आज पर्यंत तुमच्या कोणत्याही गोष्टीत आम्ही कधी दखल दिली नाही. दखल दिली नाही? मग मस्तानीला पुण्यातून बाहेर काढायची आज्ञा तुम्हीच दिली ना? मस्तानी यवनी आहे समजून ज्या तर्‍हेने तिला वागवलं जातं त्याने आम्हाला किती मनःस्ताप होतो, ह्रदयाला घरे पडतात, तरीही तुम्हा सर्वांचा विचार करुन गप्प बसतो याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा अर्थ लावला जातो तेव्हा आम्हालाही उघडपणे सांगणे भाग पडले. निमूटपणे आप्पांनी एकून घेतले. शांत स्वरात म्हणाले, राऊ, दिल्लीच्या मोहिमेत तुम्ही मस्तानीला सोबत नेत आहात आणि मोहिम १०-११ महिने तरी चालेल, तर मस्तानीला आताच हवेलीत आणण्यापेक्षा मोहिमेवरुन आल्यावर आणलं तर, तुमच्या बोलण्याने दुखावलेल्या मातोश्रीही शांत होऊन त्यांचा क्षोम कमी होईल.राऊंनी जास्त ताणून न घेता कबुल झाल्यामुळे आप्पांनाही आजचे संकट उद्यावर ढकलल्याचे समाधान झाले.मनावरचा ताण नाहीसा झाल्याने नंतर दोघां मधे हलकासा हासपरिहास झाला.

           आप्पांच्या दुसर्‍या कुटुंबाचं फलशोभन होऊन आठ दिवस उलटले. या कार्यक्रमासाठी सातार्‍याहून आलेल्या नानांनी सवड मिळताच आप्पांची भेट घेऊन म्हणाले, काका, राऊंची आठ दिवसांपासून राऊंची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय पण फडावरचे काम आटोपले की, ते कोथरुडच्या बागेत गेलेले असतात. नानांनी एकदम मुद्यालाच हात घातला होता. नाना आतां चांगले कर्तेसवरते झाले असल्यामुळे, त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात अर्थ नव्हता. राऊस्वामी कलावंतीणीच्या इतके आहारी गेले असतील असे वाटले नव्हते. खरा प्रकार काय आहे काका? सारं खरं आहे नाना. सातार्‍यात पेशव्यांचे विरोधक नाना प्रकारच्या कंड्या उठवत होते. काका हे सारं ताईला माहित आहे? असेलच. बायका तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत असतात. मोठी बिकट समस्या निर्माण झाली काका, यातून काका यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार.

            काका एक मार्ग सुचतो. राऊंबरोबर मोहिमेत आम्ही गेलो तर त्या यवनीला त्यांच्यापासून दूर करतां येईल.नाना, राऊसारखा माणूस इष्काचा खेळ खेळतात तो असामान्य असतो, तरी प्रयत्न करायला हरकत नाही.

            मराठ्यांची पातशाहीवरील मोहिम सुरु झाली. निजामकडे आप्पांची रवानगी झाली आणि दिल्ली मोहिम पेशव्यांनी स्वतःकडे घेतली. गोदावरीपर्यत मस्तानी बाजीरावां बरोबर मेण्यात होती. पुढे घोड्यावर बसून मस्तानी सर्वांमधे सामील झाली. पेशवे दिल्लीवर चालून येत असल्याची बातमी समजताच त्यांच्या मुकाबल्यासाठी मोठी फौज पाठवली. पण पेशव्यांनी पुरा धुव्वा उडवला.

               थोरल्या महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी, पातशाहीला शेवटची धडक मारण्याच्या हेतूने सारे मराठे पेशव्यांच्या झेंड्याखाली एक दिलाने उभे राहिले. राजपुतांनी  तटस्थ राहण्याचे कबूल केले.तरी भदावरचा राजा गोपालसिंग व त्याचा मुलगा अनिरुध्दसिंग स्वराज्याच्या विरुध्द उभा ठाकला. त्यिवेळी पेशव्यांचा मुक्काम रावेरला होता.कडक थंडीमुळे त्यांनी कबिला रावेरगढीमधे ठेवला व स्वतः  फौजेमधे डेरा उभारुन राहीले. पेशवे गढीत आले तेव्हा मस्तानी बाहेर रामेश्वर मंदिरात जाणार्‍या शिपायांची गर्दी बघत होती. तिथे जाण्याची राऊंजवळ इच्छा व्यक्त करताच दोघेही दोघेही गढीतून बाहेर पडले. दोन सेवकांना पुढे पाठवून गर्दी हटवण्याची आज्ञा दिली. देवळाजवळ पोहताच पेशवे मंदिराच्या आंत गेले.थोडी मागे राहिलेली मस्तानीही आंत जायला निघाली तर पुजारी म्हणाला, बाईसाहेब हे मंदिर हिंदुंचे आहे, तुम्हाला आंत जाता येणार नाही. पेशवे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर नाराज उभी असलेल्या मस्तानीला म्हणाले, तुला मंदिर पाहायचे होते ना? नाराजी लपवित म्हणाली, इथूनच दर्शन छान झाले. दोघेही गढीत परत आले.

         सादतखानने दिलेल्या आश्वासनाने भदावरचा राजा गोपालसिंग व पुत्र अनिरीध्दसिंग अटेरच्या गढीत बेसावध होते पेशव्याननी हल्ला केला तेव्हा सादतखानची फौज शेदीडशे कोस दूर होती. जवळजवळ सर्वनाश झालेल्या व कैदी केलेल्या अनिरुध्दला  तळघरात ठेवण्याचा हुकूम दिला. फत्ते झाल्यावर निवडक सेना ठेवून कोसभर अंतरावर असलेल्या चंबळनदीच्या उतारावर पेशवे छावणी टाकून बसले.

                   क्रमशः
      संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                      दि. २१-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                      भाग – २२.

              अटेरच्या विजयाची बातमी ऐकुन मस्तानी आतुरतेने राऊंची वाट बघत असतांनाच नानासाहेब भेटीस आल्याची वर्दी आली. पुण्यात असतांना नानांना पाहण्याचा योग आला नव्हता तो आता आला.ते आल्यावर मस्तानी म्हणाली, चिरंजीवांच्या भेटीची कित्येक दिवसांची इच्छा आज या रण मैदानावर पुरी होत आहे. दमला असाल.थोडी विश्राती घ्या. पेशवे दोन घटकांनी येणार हे माहित झाल्याने नाना मस्तानीच्या भेटीला आले होते. डेर्‍यात प्रवेश करताच नाना विस्फारल्या नजरेने तिचे अनुपम सौंदर्य पाहत होते. साक्षात या स्रीसौंदर्या ला राऊ आहारी गेलेली मूर्ती पाहत होते. मनातल्या असंख्य उद्भवलेल्या प्रश्नांनी नानांचा गोंधळ उडाला होता. मस्तानीच्या बोलण्याकडे त्यांचे लक्षच नव्हते. राऊ आले की आपल्याकडे वर्दी पाठवीन तोवर आपण विश्रांती घ्या.

             राऊ गढीवर आल्यावर नानांना समोर पाहून विचारले अचानक आलात? होय! बर्‍याच दिवसांपासून आपली भेट झाली नाही म्हणून आलोय. आमच्या की मस्तानीच्या? झाली भेट? होय क्षणमात्र. आपण आल्यावर भेट होईल असे सांगीतल्यामुळे आपली वाट पाहत थांबलो. आपण आल्याचे तीर्थरुपांना आवडले नाही हे नानांच्या लक्षात आले. पेशव्यां समोर कामाचा डोंगर पडला होता. नानांना म्हणाले, युध्दाला तोंड लागले आहे त्यासाठी कसलेले सरदार आमच्या मदतीला आहेत. तुमच्यावर एक नाजूक कामगिरी सोपवत आहोत. आज्ञा करावी

             नाना,आमच्या या गढीत कुटुंब कबिला, शागिर्दपेशा, कुणबीणी, दासी बरेच आहेत त्यांना बुंदेलखंडात पोहचवावे  जेणेकरुन सड्या स्वारानीशी आम्हाला लढाईत भाग घेता येईल. ज्या संधीची नाना वाट पाहत होते, मस्तानीशी त्यांना बरंच बोलायचं होतं ती संधी अशी अचानक आलेली पाहून नानांना मनातून आनंद झाला, मात्र चेहर्‍यावर दिसू दिला नाही.

पण त्यांचा आनंदावर राऊंच्या दुसर्‍याच वाक्याने पाणी पडले. आणि त्यांना आप्पांकाकांचे शब्द आठवले. राऊ म्हणाले, कुटुंबकबिला बुंदेलखंडात पोहचवा मस्तानी आमच्या सोबत राहील.जीथं आम्ही तीथं मस्तानी. संध्याकाळी कुटुंबकबिला  घेऊन नानासाहेब बुंदेलखंडाकडे रवाना झाले. तळावर मस्तानी दासी बसंती आणि बाजीरावांचे विश्वासू सेवक कुंवर एवढीच मंडळी थांबली.

              दिल्लीची मोहिम आटोपून तेशवे पुण्यात आले. स्वराज्याची स्थापना झाल्यापापासून दिल्लीत जाऊन बादशहासमोरच त्यांचे मनसबदार कापण्याचे धाडस कुणी केले नव्हते. बाजीरावांनी केलेले ते अचाट कर्तृत्व पाहून पुरा हिंदुस्थान थक्क झाला. छत्रपती शाहूमहाराज व धावडशीचे  परमहंस बाबांनी स्वहस्ते पत्र पाठवून पेशव्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. विजयी फौजेसह पेशवे पुण्याजवळ आल्यावर अवघा दक्षिण स्वागतासाठी पुण्यात गोळा झाला. त्यांच्यावर फुले उधळत, विजयाचे नगारे वाजवत पेशवांचा पुण्यात प्रवेश झाला. त्यांना हत्तीच्या रुपेरी अंबारीत बसवले.आप्पा खवाशित बसून बंधूवर चवर्‍या ढाळीत होते. कसब्याच्या गणपतीचे दर्शन घेऊन पेशव्यांची स्वारी गणेश दरवाज्याने हवेलीत प्रवेशले. आपल्या विजयी पुत्राला बघून राधाबाना त्यांचे किती कौतुक करु असे झाले. मातोश्रींचे दर्शन झाल्यावर राऊ काशीबाईंच्या महाली आले.काशीबाई पतीची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होत्या.

               आपल्या प्रचंड कीर्ती गाजवलेल्या पतीला सोन्याच्या पंचारतीने ओवाळले. जवळ जवळ ८-९ महिन्यांनी पतीची गाठ पडत होती. काशीबाईंनी दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून म्हणाले, एवढ्या आनंदीक्षणी डोळ्यात अश्रू? आनंदाचे अश्रू असू शकत नाही का? तलवारीच्या टोकावर पातशाहीचे बळ जोखणार्‍या पेशव्याला आनंद आणि दुःख यातला फरक समजत नाही असं म्हणायचे आहे का? त्यांच्या शब्दाने जीव कुरतडणारी वेदना डोळ्याबाहेर आसवांच्या रुपाने ओघळायला लागली. बाजीरावांनी त्यांचा मृदु हात हाती घेऊन हळूवार आवाजात म्हणाले, मनातील दुःख आम्हाला सांगायचे नाही का? दहा महिन्यापूर्वी मोहिमेवर जातांना इकडून साधा निरोपही घेणं झाल नाही. आम्हाला पंचारतीने ओवाळायचे होते. वाटलं निदान बोटभर चिठ्ठी तरी आमच्या नांवे येईल, जीव आसूसला होता, पण तेवढही भाग्य आमच्या नशीबात नव्हतं. ओवाळतांना अचानक आमच्या दुर्भाग्याची आठवण झाली. त्या आठवणीचे हे अश्रू आहेत.

                         क्रमशः
 संकलन  व ©®  मिनाक्षी देशमुख.
               दि. २२-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                             भाग – २३.

               काशीबाईंच्या शब्दांनी बाजीराव मनोमन ओशाळले मोहिमेत असतांना ते एकप्रकारे धुंदीतच होते. धूंद होती शौर्याची आणि इश्काची. अवघडलेल्या स्वरात म्हणाले, काशी, आम्हाला माफ नाही करणार? बर्‍याच कालावधीनंतर ‘काशी ‘

 शब्द ऐकून त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत व्हावे तस संबंध काया विलक्षण भावनेनं थरारुन उठली. विजयी वातावरण एकाएची विषादाने कुंद झालं. पतीच्या चर्येकडे तृप्त मनाने पाहत,  राहिलेला अर्धा दुधाचा पेला हाती देत म्हणाल्या, पेला अर्धा ठेवूं नये. आमचे बोलणे विसरुन जावे.

            तिसर्‍या प्रहरी बाजीराव कोथरीड बागेत मस्तानीकडे आले.थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर बाजीराव म्हणाले, हवेलीत जायची तयारी कर. दिवस मावळला अन्  मस्तानीचा मेणा शनिवारवाड्याच्या दिशेने निघाला. व उत्तरे कडील दरवाज्यासमोर आला तेव्हा मस्तानीच्या स्वागताला खाजगीकडचे कारकुन आणि चार सेवक हजर होते. मस्तानी आपल्या महली आली.

         विजयवार्ता चहुबाजुंनी येत होत्या आतां हिंदुस्थानात मराठ्यांना कुणी शत्रु उरला नव्हता. श्रीमंत पेशवे छप्रतींच्या दर्शनाला सातार्‍याला गेले. छत्रपतींनी दुरर्‍या दिवशी दरबार भरवून त्यांनी मानाची साडेतीन वस्र, हिर्‍याचा शिरपेच आणि बोराएवढे पांच टपोरे मोती त्यांना देऊन म्हणाले, आम्ही पेशव्यांवर टाकलेला विश्वास त्यांनी मोठे श्रम,साहस व तलवार गाजवून दौलतीची सेवा करुन सार्थ केला. दरबार आटोपून पेशवे बाहेर आले तोच जनाखान्यातून खोजा धावत आला व  धाकट्या राणीसाहेब बिरुबाईंनी बोलावल्याचा निरोप दिला.

पेशव्यांनी त्यांना मुजरा केल्यावर राणीसाहेब म्हणाल्या, पेशव्यांचा सत्कार दरबारात महाराजांनी केला, पण आम्हाला पेशव्यांचे कुटुंब बोलावून राजवाड्यात करायचा आहे. पण राणीसाहेब…. आम्ही कांही ऐकणार नाही.त्यांना मानाची साडी चोळी करायची आहे. त्यांना पाठवून द्या. पण.. ते सांगायचा प्रयत्न करत होते पण त्यांना कांहीच बोलू दिले नाही. बिरुबाईंनी पेशव्यांना कोड्यात टाकले. काशीबाई सोबत नव्हत्या. मस्तानीला आणले ही गोष्ट जनानखान्यात सांगणे रास्त नव्हते.तरी बाजीरावांनी बोलण्याचा प्रयत्न करताच पडद्याआडून आवाज आला, पेशव्यांना निरोप दिला आहे. पेशवे मुक्कामावर पोहचले.

          महाराजांबरोबर शिकार खेळून बाजीराव सातार्‍यास  परत आले त्यावेळी त्यांच्यापुढे वेगळाच पेचप्रसंग वाढून ठेवला होता. विरुबाईबाईंच्या आग्रहाने, पेशशे शिकारीला जातांना सुब्बाराव जेठीला तपशीलवार सुचना देऊन बंद मेण्यातुन मस्तानीला राजवाड्यात पाठवले होते. काशीबाई ऐवजी मस्तानी राजवाड्यात आलेली पाहून दोन्ही राण्यांनी  आकांड तांडव केले. विरुबाईंनी मस्तानीची भेट न घेताच मेणा तसाच परत पाठवला

             झाला प्रकार मस्तानीने बाजीरावांना सांगीतल्यावर झालेल्या अपमानाने पेशवे संतप्त झाले. आम्ही मस्तानीला लग्नाच्या कुटुंबाहून थोडेही कमी समजत नाही. शाहूमहाराजां नी जोशी व अनगळ या दोन सावकारांना पेशव्यांना समजावया ला व कानउघाडणी करायला पाठवले. ते म्हणाले, गंगा, सिंधु सरस्वची च यमुना या जयघोषात ब्राम्हणाने अक्षता डोक्यावर उधळल्यावरच लोक पती-पत्नी समजतात एरवी… दोन्ही सावकारांचे  आतापर्यतचे वरकरणी बोलणे शांतपणे ऐकणारे बाजीरावांचा संताप अनावर होऊन म्हणाले, “गंगा,सिंधु, सरस्वती च यमुना” हे शब्द इथं कोणाच्याच तोंडी शोभत नाही. कालपर्यत ह्या नद्या यवनाच्या ताब्यात होत्या. जीवाची बाजी लावून या नद्यांच्या पाण्यामधे आमचा घोडा थयथय नाचवला या नद्यांची मातब्बरी तुम्ही आम्हाला काय सांगता? या नद्यांना त्यांच पावित्र्य आणून देणार्‍या आम्ही, मस्तानीला धर्माच्या बायकोप्रमाणे मानून तिला जवळ बाळगले आहे. तिचा अपमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही. सावकार समजूत घालत म्हणाले, आपल्या पराक्रमाणे महाराज आनंदी पावले. अशा किरकोळ गोष्टींनी त्यांची मर्जी पेशव्यांनी घालवू नये. मस्तानीचा अपमान आम्ही किरकोळ समजत नाही. ज्या राजवाड्यात आमचा सन्मान झाला त्याच राजवाड्यात मस्तानीचा अपमान झाला हे शल्य आम्ही विसरुं शकत नाही. छत्रपतींस्वामींना आमचा मानाचा मुजरा सांगून सांगा, पेशवे उद्या सकाळीच पुण्याकडे निघणार आहे.ज्या शहरात मस्तानीचा अपमान झाला तिथे एक दिवसही थांबणे शक्य नाही. तुम्हाला निरोप दिला आहे.

              सातार्‍याच्या दरबारात छत्रपतींनी पेशव्यांचा केलेल्या सन्मानाची वार्ता कदाचित कुणाला समजली नसेल पण मस्तानीला राजवाड्यात पाठवले व राजवाड्यातून मेणा तसाच परत पाठवला ही वार्ता मात्र ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. या वार्तेचे पडसाद पेशवे पुण्यात पोहचण्याआधीच दूरवर पसरले होते.

                       क्रमशः
  संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. २२-५-२०२२

!!!  मस्तानी  !!!

                        भाग – २४.

          वसई जिंकून चिमाजीअप्पा आले ते अंगात ताप घेऊन तापाने फणफणतच.त्यांना ताबडतोब हवेलीत नेण्यात आले. त्यांनी फिरंग्याच्या चार मोठ्या घंटा जिंकून आणल्या. त्या थेऊर,जेजूरी,नाशिक आणि चासेतल्या सोमेश्वराच्या मंदिरात पाठवल्या. आप्पांची तब्बेत थोडी सुधारली. एके दिवशी नाना त्यांच्या भेटीस आल्यावर म्हणाले, काकाश्री, राऊस्वामींचे वागणे दिवसेंदिवस अधिकच बेताल होत आहे.सातारा प्रकरण कानावर आलं असेलच. सातार्‍यात आम्ही छत्रपतींचे मन वळवण्याचे प्रयत्न वर्षानुवर्षे केले ते राऊंच्या अशा वागण्याने पाण्यात गेले. त्यामुळे दौलतीचे केवढे नुकसान होईल हे राऊंना कसं समजत नाही? दीर्घ निःश्वास टाकत आप्पा म्हणाले, एकीकडे विजयाचा डिंडिम घुमतो त्याचवेळी काळजात दुःखाची कळ उठते आणि सार्‍या आनंदावर विरजण पडते. नाना म्हणाले, सातार्‍याची हकिकत ऐकल्या पासून ताईच्या डोळ्यातील पाणी खळले नाही.निदान त्यांचा तरी राऊंनी विचार करावा ना? काका, राऊ ऐकतील तर फक्त तुमचेच, तुम्हीच एकदा त्यांचेशी स्पष्टपणे बोलावे.

              गुंतागुंत अधिकच वाढत होती. आप्पांचा विजयाचा आनंद केव्हाच मावळला होता. आम्ही बोलूच राऊंशी पण आम्ही ऐकले की, तुमची आणि मस्तानीची चांगली ओळख झाली आहे तेव्हा ती मागेल त्या अटीवर, आडवळणाने सुचवून, तिला राऊंचा नाद सोडण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न करा. तोवर आम्ही  राऊंसाठी प्रयत्न करतो.

            आप्पांच्या तब्बेतीची विचारपुस करायला बाजीराव त्यांच्या महाली आले. दोघा बंधूची अनेक विषयांवर बोलणी झाली. शेवटी आप्पांनी मनातल्या दुःखाला वाचा फोडली. राऊ आमच्या सार्‍या विजयाला एकाच गोष्टीने गालबोट लागत आहे

राऊ आमच्या विरोधाला न जुमानता, तिला हवेलीत आणून ठेवल्याने कितीजनांची मने दुखवल्या गेलीत हे तुम्हाला माहित असूनही तिला सोडत नाही. आप्पा शेवटचे निक्षूण सांगतो या कुडीत प्राण असेस्तोवर आम्ही मस्तानीला दूर करणार नाही.

स्वरांत कडवटपणा आला,म्हणाले, आप्पा तुम्हा सार्‍यांचं नवल वाटते. आम्ही प्राणांची बाजी लावून रणांगणांत विजय मिळवला की, छत्रपतींपासून तर अगदी सेवकांपर्यत सारे आनंदित होतात. तुम्हा सर्वांच्या आनंदासाठी जीव वेचतो आणि  आम्ही थोडं आमच्या मनासारख वागतो तर सर्वांनाच एवढ अवघड कां वाटावं? आतापर्यंत तुम्हा सर्वांच्या भावनेची कदर करुनच मस्तानीला दूर ठेवले पण आतां नाही. मस्तानी आमचा दुसरा प्राण आहे तिच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही.हेच ते! आप्पा उसळून म्हणाले, अंगवस्र कोणतं व महावस्र कोणतं याच भान सुटलय!

              राऊ ऐकत नाहीसे बघून आप्पांनी दुसरं शस्र काढलं राऊ, आम्ही  कांही काळ जगावेसे वाटत असेल तर, एक वचन द्या. मस्तानीचा नाद सोडा.त्रिवार अशक्य! बरं! निदान हा चातुर्मास संपेपर्यंत तरी तुम्ही मस्तानीच्या महाली जाऊ नये , जेणेकरुन आपल्या विरुध्द ओरडत असलेल्या ब्रह्मवृंद तेवढा काळ तरी गप्प बसतील. मनातील कढ दाबत राऊ म्हणाले, ठीक आहे आप्पा.

            नानासाहेब मातोश्रींच्या भेटीस आल्यावर, किरकोळ गोष्टी बोलून झाल्यावर काशीबाई म्हणाल्या, नाना, आम्हाला ऐकवार मस्तानीला बघायचे आहे. मोठं अवघड काम सांगीतलं ताई! आम्ही राऊपासून तिला तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही तिला पाहयचा म्हणता, कसा मेळ जमावा? ते तुम्ही बघा. आम्ही इकडच्या स्वारीला चांगलं ओळखतो. या महापुराला आपल्या काबून ठेवणारी ही नदी आहे तरी कशी हे एकदा आम्हाला पाहूं द्या.

             जन्माष्टमीचा उत्सव लवकरच येत आहे.गेल्या वर्षा पासून मस्तानी आपल्या महालात उत्सव साजरा  करते व त्यात ती नाचते तेव्हा फक्त राऊच तिथं असतात. यावर्षी आप्पास्वामींना दिलेल्या वचनानुसार राऊ तिथे जाणार नाही तेव्हा जन्माष्टमी समारंभानिमित्य तुम्हाला तिच्या महालात घेऊन जाऊ पण तुम्हाला मनस्ताप होईल.

            नानासाहेब मस्तानीच्या महालात मनाशी कांही निश्चय करुन आले. विषय कसा काढावा त्यांना सुचेना.ते म्हणाले, आमच्या मातोश्रींची तुम्हास भेटण्याची इच्छा आहे. जरुर! काशीबाईसाहेबांची भेट घेण्यात मला परम आनंद होईल.पण भेट कशी होणार? जन्माष्टमीला तुम्ही इथे उत्सव करता ना तेव्हा गाठ पडु शकेल. चालेल. त्या इथे येतील त्यावेळी त्यांच्या सोवळ्या ओवळ्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेईन. पण पेशव्यांच्या कानावर घाला. त्याची जरुरी नाही.ते बरेच दिवस इकडे येतील असे वाटत नाही.ऐकुन तिचे डोळे भरुन आले. भरल्या आवाजात म्हणाली, राऊ माझ्या महालात येणार नाही ही शिक्षा मला का? कांही न बोलतां नानांनी मस्तानीचा निरोप घेतला.

                     क्रमशः
  संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि. २३-५-२०२२.

मस्तानी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading