111.आरती १ छ. शिवाजी महाराजांची, आरती शिवराया, महाराजा वीरशौर्या ही 100% शुद्ध मराठी पहा ऐका लिहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

छत्रपती शिवाजी महाराज 100% शुद्ध मराठी आरती पहा ऐका लिहा, मराठ्यांचे विरवैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व काही एकाच वेबसाईटवर चरित्र ,गड वा किल्ले, कादंबरी, आरती, पोवाडे, महत्वाची माहिती. 96-कुळी-मराठा https://96kulimaratha.com/ हि-वेबसाईट-पहा

The glory of Marathas Everything about Chhatrapati Shivaji Maharaj in one website Biography, Forts, Novels, Aarti, Powade, Important information. 96-Kuli-Maratha https://96kulimaratha.com/ see-this-website

आरती १ :- आरती शिवराया,

१. छत्रपती शिवरायांची आरती ऐका 🔊

॥ १. छत्रपती शिवरायांची आरती ॥
आरती शिवराया, महाराजा वीरशौर्या ।
सिंहासनी छत्रपती, दिली स्वराज्याची छाया ।
आरती शिवराया ॥ धृपद ॥

पुण्यशिल माता-पिता, कुलस्वामिनी पावली ।
धन्य माय जिजाऊ ही, राजमाता प्रसवली ।
घडविण्या इतिहास, संत मूर्ती प्रगटली ।
अवतीर्ण धरेवरी, येई रयतेसी ताराया ॥१॥🔊
आरती शिवराया ॥ धृपद ॥

तलवार भवानी हाती, करी स्वराज्य रक्षण ।
नसे जाती धर्म भेद, चारी पुरुषार्थ जनत ।
राखियेली नारी लाज, दिले देवालयी स्थान ।
साकारीली राजनीती, युक्ती प्रयुक्ती लीलया ॥२॥
आरती शिवराया ॥ धृपद ॥

नीतीवंत कुलवंत, योगी श्रीमंत थोर ।
तव शूरत्वाची गाथा, सातासमुद्रापार ।
हरहर महादेव, गर्जे मावळे वीर ।
लीन स्वर संगीताचे भावे स्वीकारी कार्या ॥३॥
आरती शिवराया ॥ धृपद ॥

हि आरती ह. भ. प. संगीताताई व्यवहारे सुप्रसिद्ध कीर्तनकार यांनी गायन केलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी आरती डाऊनलोड करा


छत्रपती शिवरायांची आरती संग्रह, पहा, लिहा, ऐका

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading