अंजनीपुत्र हनुमान चरित्र भाग ६, (२१ ते २४)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! अंजनीपुत्र हनुमान !!!

!!!  हनुमान  !!!

                    भाग – २१.

             जेव्हा बिभिषणावर विश्वास बसला तेव्हा वेळ निघून गेली होती.हनुमानाकडून फार मोठी गलती झाली होती. परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात आल्यावर हनुमानाने आपली शेपटी आवरुन  तटबंदीत दोघांनीही प्रवेश केला तेव्हा सुग्रीव,अंगदसह सर्व वानरसेना बेशुध्द पडलेले दिसले.आणि रामलक्ष्मण जीथे ते विश्रांती घेत पहुडले होते, तिथे भूयार दिसत होते.बिभिषण शोकग्रस्त झाले,दुःख हनुमानालाही कमी झाले नव्हते. पण स्वतःला आवरुन सर्व वानरसेनेच्या तोंडावर पाणी शिंपडले. सत्यस्थीती कळताच तेही आकांत करु लागले. शेवटी जांबुवंत म्हणाला, कोणत्याही लोकात जाण्यास हनुमानाला बंधन नसल्यामुळे तो सगळीकडे स्वैर संचार करुं शकतो. रामलक्ष्मणाचा शोध घेण्यास सर्वांचे आशिर्वाद घेऊन शोधमोहिमेवर  भूयारात उडी घेतली.पहिले कांही योजनं दिशा हिन होते. पण कांही वेळाने कुठल्यातरी अनाकालनीय शक्तीने बाहेर फेकल्या जाऊन जमीनीवर आपटले.पुनः सामान्य आकार घेऊन प्रयत्न सुरु ठेवला. पाताळलोकातील माया नगरीत असल्याचे लक्षात आल्यावर ते एका झाडाच्या फांदीवर उडी मारल्याबरोबर फांदी तुटून खाली पडले.सगळ्यांंचे लक्ष माकडाकडे गेले.तेवढ्यात एक म्हातारी पुढे येऊन म्हणाली, आपला राजा आतां वाचत नाही आणि हे नगर सुध्दा उध्वस्त होणार आहे.

            सर्वांनी कारण विचारल्यावर ती म्हणाली, राजाने एक गुपित आपल्या सर्वां पासून लपविले आहे, राजा शापित आहे. या शापानुसार ज्यावेळी या नगरीत माकड आणि मनुष्यप्राणी येतील तेव्हा राजावर मरण ओढवेल व नगर नेस्तनाबूत होईल. ऐकून हनुमान अतिशय आनंदीत झाले.थकल्यामुळे व तहानल्यामुळे पाणी पिण्यासाठी एका सुंदर तलावाजवळ पोहचले असतां तिथे कांही स्रीयां  च्या गप्पा सुरु होत्या. त्यातील एक वयस्क स्री म्हणाली, आज राजवाड्यात कांहीतरी गडबड सुरु आहे.मोठ्या संख्येने दक्षीणेच्या आशेने ब्राम्हण जात आहेत. गुप्त खबर आहे, आज सायंकाळी देवी महामायेसमोर दोन मानवी बळी दिल्या जाणार आहे. राजाने अतिशय देखणे दोन मनुष्यप्राणी अपहरण करुन आणले  खबर गुप्त ठेवण्याची सूचना देऊन निघून गेली. हनुमानांना कळले आपली शर्यत आतां काळा बरोबर आहे.पण या मायानगरीचा ठावठीकाणा माहित नव्हता. रामलक्ष्मणाला कुठे बंदिवान करुन ठेवले असेल? सर्वीकडे शोध घेत होते पण तो राजवाडा म्हणजे खरच मोहजाल होता.

            तिथल्या भिंती ठराविक लोकांसाठीच उघडत होत्या.अचानक एक दार उघडले गेले. साखळदंडांनी बंदिस्त एका राजघराण्यातील स्रीला  पकडून सैनिकांचा लवाजमा तलावाकडे घेऊन जात असलेला दिसला. एका सैनिकाच्या हाती माठ होता. तलावाजवळ पोहचल्यावर तो माठ तिच्या हाती दिल्यावर तिने कसाबसा पकडून त्या सैनिकाशी कांहीतरी बोलली. नंतर एक सैनिक पुढे होऊन तिच्या हातातल्या बेड्या काढल्या.हात मोकळे झाल्यावर ती तलावा जवळ जाऊन बाजूला माठ ठेवून तिने हात जोडले.

           हनुमानांनी सुक्ष्मरुप घेऊन त्या माठावर बसले व तीचे हळूच पुटपुटने हनुमानाच्या तिक्ष्ण कानांना ऐकायला आले, काय परिस्थीती  आली माझेवर? माझा भाऊ राक्षसप्रवृत्तीचा व नालायक आहे यावर विश्वासच बसत नाही. आज सुंदर दोन सुकुमार राजपुत्रांना बळी देणार आहे. हे परमेश्वरा! दोघांचे रक्षण कर!

लगेच हनुमानाने हळूच विचारले कुठे आहेत दोघे? तुम्हाला माहित असेल तर मला मदत कराल का? आवाज कुठून येतोय म्हणून इकडे तिकडे बघू लागली तर तिला माठाच्या काठावर अगदी छोटेसे माकड बसलले दिसले.संशयाने विचारले, माझ्यावर लक्ष ठेवायला वेश बदलवून

 तुला पाठवले तर नाही ना? माते! मी प्रभू रामां चा नम्र सेवक आहे. संशय नको घेऊस.त्या दोघांच्या सुटकेसाठी इथे आलोय.

             ऐकून तिला  कितीतरी वर्षात ऐवढा हर्ष अनुभवला नव्हता.तूं जर प्रभू रामास सोडवले तर, माझे व माझ्या मुलाचे प्राण वाचतील.

मी त्या निच महिरावणाची बहिण दुरतंडी! मी माझ्या घरातच कैद आहे. माते तुझी मला मदत झाली तर, नक्की तुझी सुटका करेन विश्वास ठेव. पण तूं महिरावणाची बहिण व राजघराण्यातील असल्यावर कां हा प्रसंग तुझ्यावर आला? खूप वर्षापूर्वी माझा पुत्र नीलमेघ जन्माला आला तेव्हा आकाशवाणी झाली, हा पुत्र महिरावणाच्या मृत्युनंतर पाताळ लोकाचा राजा होईल. तेव्हापासून महिरावणाने आम्हाला कैदेत ठेवले. मुलगा आतां मोठा झाला. त्याचे जन्मापासून आतांपर्यतचे  आयुष्य बंदीवासात गेल्यामुळे बाहेरच्या जगाचा अनुभव बिलकुल नाही.पण महिरावणाने तिला कडेकोट बंदोबंस्तात पाणी आणायला कां पाठवले? हे जाणून घ्यायचे होते.

                  क्रमशः
 संकल,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. २६-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                    भाग – २२.

           माते! तूं राजस्री व महिरावणाची बहिण असल्यावर तुला पाणी भरण्यासारखं हलकं काम कां सांगीतले? माझ्याकडे खास ‘वर’ आहे कोणत्याही समारंभासाठी मी स्वतः पाणी भरुन आणले तर, तो समारंभ यशस्वी होतो. म्हणून राम-लक्ष्मणाचा बळी देण्याचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मला पाणी आणायला पाठवले. हनुमान म्हणाले, माठात पडलेल्या आम्रपाना मागे लपून महालात प्रवेश करेन. पण महालात शिरणार्‍याला महिरावणाबद्दल किती द्वेष आहे हे तंतोतंत जाणण्यासाठी द्वेषशोधक यंत्रातून जावे लागते. माते, काळजी नको करुस.

             तिने पाण्याने माठ भरला. माठाच्या तोंडावर आंब्याचे पान ठेवले. त्या पानाआड हनुमान बसले. डोक्यावर माठ घेऊन ती सैनिंकांच्या बंधनात महालांकडे चालु लागली. महालात शिरतांना हनुमानाने हळूच डोकावून बघितले तर सैनिक द्वेषशोधक यंत्राकडे जात होते. त्यांनी महिरावणाविषयी सकारात्मक भावना निर्माण करायचा प्रयत्न केला पण दुरतंडी जशी यंत्रात शिरली तसे भोंगे वाजू लागले. सैनिक घाबरले. दूरतंडीतर भीतीने गर्भ गळितच झाली.महिरावणाचा इतका द्वेष करणार दुसरं कोण आहे? तूं एवढी थफथर कां कापत आहेस? तुला तुझा भाऊ आवडत नाही हे माहित आहे पण आतांपर्यत द्वेषाची पातळी इतकी वर कधीच गेली नव्हती. बोलणे सुरु असतांनाच यंत्र एकदम बंद पडलं. अरेऽ एवढं परिपूर्ण यंत्र अचानक कस बंद पडल? नक्कीच माठात कुणीतरी लपलं आहे.तिच्या डोईवरचा माठ खाली घेतला. पण माठात कांहीच न दिसल्यामुळे, यंत्राच बिघाड झाला असेल असं समजून तिला माठासह आत जायला अनुमती मिळाली.

          सेनिक थेट तिला बळी द्यायच्या ठीकाणी घेऊन गेले. माठ खाली ठेवताक्षणी माठातून एक गांधीलमाशी बाहेर येऊन तिच्या भोवती  घोंगावू लागली.नंतर ती माशी महा मायाकडे जाऊन तिच्या भोवती उडत राहिली. दुरतंडीला कारागृहात बंद करण्यात आले.माशी च्या रुपात हनुमान तिच्या मागावर होतेच. तिच्या कडून महिरावणाविषयी सविस्तर माहिती घेऊन माशी उडून गेली.शोध घेतल्यावर

जिथे रामलक्ष्मणाला ठेवले होते तिथे येऊन प्रभू रामाच्या पायाजवळ आल्याबरोबर रामांनी लगेच ओळखले. आवश्यक सुचना मिळाल्या वर हनुमान तिथून उडत निघून गेले.

            दुरतंडीने दिलेल्या महिरामाविषयीच्या माहितीची शहानिशा करायची होती.हनुमान थेट महिरावणाच्या खाजगी महालाजवळ पोहचले तेव्हा त्यांना तिथे एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. महालासमोर फक्त एकच सुरक्षा पहारेकरी जो अर्ध वानर व अर्धे मगराचे रुपात  दिसला. हनुमानाने सुक्ष्म रुप घेतले असल्या मुळे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. महालाच्या प्रवेशदाराच्या फटीतून जातांना नेमका सुरक्षा रक्षकाचा पाय त्या फटीसमोर आल्याने पकडल्या गेल्यामुळे सुक्ष्म रुपात राहण्यास अर्थ नसल्यामुळे मुळ रुपात प्रकटले.त्या सुरक्षा रक्षकाचा परिचय विचारल्यावर  तो म्हणाला, मी मकरध्वज, हनुमानपुत्र! काऽऽय? तू माझा पुत्र कसा असू शकतोस? मी तर कधीही कोणत्याही स्रीकडे कामुक भावनेने बघितले नाही तर विवाह व पुत्रप्राप्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. आपला पुत्र असल्याचे ऐकून हनुमानाला धक्काच बसला.

               मकरध्वज सांगू लागला…लंका जाळल्यावर हनुमान समुद्रावरुन परत जात असतांना त्यांच्या घामाचा पडलेला थेंब एका मगरीने गिळला आणि तिच्या पोटी माझा जन्म झाल्यामुळे तुम्ही माझे पिता आहात.नाते जरी असले तरी, मी महिरावणाचा सुरक्षारक्षक आहे

त्यामुळे त्यांच्या अनुमतीशिवाय तुम्हाला आंत जाऊ देऊ शकत नाही. आपण ऐकलेच नाही तर युध्दात हरावं लागेल.

              हनुमानजवळ जास्त वेळ नसल्यामुळे

दोघांमधे घनासाम युध्द झाले. मकरध्वज हरल्यावर त्याचे हातपाय, तोंड बांधून परत  सुक्ष्मरुप धारण करुन महिरावणाच्या महालात प्रवेश केला. तो बेसावध असतांना तलवारीच्या एकाच घावात ठार झाला.सर्वीकडे रक्ताचा सडा झाला.एवढा प्रचंड बलवान राक्षस एका झटक्यात कसा ठार झाला या विचारात जायला निघाले असतां महिराम तलवार घेऊन हनुमाना च्या अंगावर धावत येत असलेला दिसला. हनुमानांनी प्रतिहल्ला करुन त्याचे तुकडे तुकडे केले. एकदाचा एवढा बलाढ्य राक्षस संपल्या च्या समाधानात कांही पावले टाकत नाही तोच पुन्हा जिवंत होऊन परत युध्दास सज्ज झाला. हनुमानास प्रश्न पडला इतके तुकडे केल्यावरही हा पुन्हा पुन्हा कसा जिवंत होता. रहस्याचा शोध लावण्यास सुक्ष्मरुप घेऊन महालाबाहेर पडले.

            राम-लक्ष्मणांची सुटका करण्यास हनुमान आल्याचे पाहतांच, महिरावण धावतच बळीमंडपात आला व बळी देण्याचा कार्यक्रम विनाविलंब उरकवण्यासाठी धडाधड सैनिक व नोकरांना हुकूम सोडू लागला.

                    क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                     दि. २६-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                   भाग – २३.

           राम लक्ष्मणाला खांबाला बांधण्यात आले. नियोजित वेळे आधी नेत असलेले बघून हनुमान पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्याचे रामाच्या लक्षात आले. आतां पुढचं सगळं हनुमानाच्या वेगावर अवलंबून होते. बळी देण्याची तयारी जोरात होती, तिकडे शेकडो योजन दूर  एका गुहेत हनुमान पोहोचले. दुरतोंडीने सांगीतल्यानुसार आणि स्वतः देवी महामायाने खात्री दिल्यामुळे गुहेत कांही महत्वाच्या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. पांच प्रवेशदार असलेलीती गुहा अद्वितिय होती. त्या प्रत्येक दारावर असलेल्या पांच ज्वाला   विझवायच्या होत्या.वेळ फार कमी होता. त्या प्रत्येक दारावरील ज्वाळा एकएक करत वायुवेगाने जाऊन विझवल्यावर परत फिरणार तोच त्या ज्वाला प्रज्वलित झालेल्या दिसल्या. पुन्हा तेच आवर्तन सुरु झाले असे बरेचदा झाल्यावर हनुमान वैतागले. मन एकाग्र व डोळे मिटून पिता वायूदेवांना आव्हान करुन त्यांना सल्ला मागितला. ह्या ज्वाळा एकाचवेळी विझावल्या तरच कार्यसिध्दी होईल असे सांगून अदृष्य झाले. हनुमान पुन्हा सज्ज झाले.

              ते गुहेच्या मध्यभागी राहून डोळे मिटले.तत्क्षणी त्यांच्या खांद्यावर चार डोकी तयार झाली.पहिलं शिर क्रूर सिंहाचं, दुसरं गरुडाचं, तिसरं काळ्या वराहाचं, चौथं अश्वाचं व पांचवं स्वतःच.! नंतर हनुमानाने केलेल्या गर्जनेने पर्वतही हादरले. मग त्यांनी मोठी फुंकर मारली की, नुसत्या पांचही ज्वाळा विझल्याच नाही तर गुहेची मागची बाजू पूर्ण उध्वस्त झाली वेळ फारच कमी असल्यामुळे कामाला वेग देणे अति आवश्यक होते.

            तिकडे महिरावणाने राम-लक्ष्मणाला बंधन बंधनमुक्त करुन त्यांना पुढे वाकायला सांगून बळी जायला तयार रहायला सांगीतले. निरागस भाव चेहर्‍यावर आणून राम म्हणाले, मी राजपुत्र राजवाड्यात वाढलो असल्यामुळे कसं वाकायच ते माहित नाही. तू करुन दाखवले की, अनुकरण करेन. स्वतः प्रात्याक्षिक करुन दाखवण्यासाठी महिरावण गुडघ्यावर वाकून डोकं लाकडी वेदीवर ठेलले व डोळे मिटले श्रीरामांनी क्षणाचाही विलंब न लावता तलवारीने तिचा शिरच्छेद केला. लगेच लक्ष्मण तिथून बाहेर जाऊन भिंतीवर चढून दरवाजा उघडला. बंद दरवाज्यात ठेवलेला हिरा फोडला. आणि हनुमानाने प्रवेश केला.तिन्ही कामं  यशस्वी झाल्यामुळे महिरावण जिवंत होऊ शकला नाही.शेवटी त्याचा अंत झाला.

                तिघांनी एकमेकांना दृढ अलिंगन  दिले. खरच तो क्षण आनंदाचा होता.अचानक ती संपूर्ण इमारत हादरु लागली. हनुमानानं दिव्य रुप धारण करुन रामलक्ष्मणाला खांद्यावर बसवून वार्‍याच्या वेगाने पडणार्‍या खांब आणि भिंती पासून वाचत कसेबसे बाहेर पडले.आणि क्षणात महाल उध्वस्त झाला.हनुमान तरीही वायुवेगाने पळतच राहिले. कारण संकट अजूनही संपले नव्हते. आतां तर संपूर्ण शहरच हादरुं लागले. हनुमानांनी ज्या भूयारातून प्रवेश केला होता त्या ठीकाणाकडे झेप घेतली. अचानक ते वरवर खेचल्या जाऊं लागले. भूयारातुन बाहेर पडताच भूयार कायमचे बंद झाले.डोळे उघडले तेव्हा ते आपल्या हजारो मित्र आणि हितचिंतकांमधे उभे होते. सर्वांना अतिशय आनंद झाला.

             जेव्हा युध्द सुरु होते व लक्ष्मणाला शक्ती लागून बेशुध्द झाल्यावर त्यांच्या उपचारासाठी  हनुमान औषध आणण्यास  द्रोणागिरी पर्वतावर गेल्याचे रावणाला कळल्या वर हनुमानाला विलंब व्हावा म्हणून त्यांना वाटेत अडवण्याचे काम कालनेमी राक्षसावर सोपवले. कालनेमीने त्याला समजावण्याचा केलेला प्रयत्न आवडला नाही.त्याची निर्भत्सना करत रावण म्हणाला, तू शत्रूकडून आहेस की माझ्याकडून? आपल्या स्वामीचे जीवन धोक्यात आहे ,ते वाचवण्याच्या सद्हेतून सल्ला दिला तर त्याचा विपरित परिणाम झाला.

          शेवटी मारीच्याच्या बलिदानाची आठवण ठेवून त्याच्या पावलावर पाऊल टाकायचे ठवले. उत्तरेकडे द्रोणाचलाच्या मार्गा वर नदीकिनारी एक सुंदर मठ उभारला.इथूनच हनुमान पुढे जाणार होता. तिथे कालनेमीने यज्ञ  विधी सुरु केली. हनुमानाला देखावा खरा वाटावा म्हणून, कांही राक्षसांना ब्राम्हणवेशात यज्ञकुंडाभोवती बसवून मंत्रोच्चर करु लागले.

                      क्रमशः
   संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. २७-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                 भाग – २४.

          हनुमान परत येत असतांना त्यांना यज्ञाचा धूर दिसला.जातांना तर हा सुंदर आश्रम दिसला नव्हता.आपला मार्ग तर चुकला नसेल? शिवाय अतिशय तहान लागल्यामुळे,ते आश्रमा च्या प्रवेशद्वारा जवळ आल्यावर, ब्राम्हण प्रार्थनेत तल्लीन झालेले दिसले. एक साधु काय हवं म्हणून विचारल्यावर हनुमानाने पाणी मागीतले. त्यांना पाणी देऊन तो ढोंगी साधु गोड गोड बोलत म्हणाला, काळजी करुं नकोस मी त्राकाल ज्ञानी असून मला भूत वर्तमान व भविष्य सगळं सहज दिसते. तुझ्या युध्दतळावर रामाच्या नुसत्या कटाक्षाने लक्ष्मण शुध्दिवर आल्याने तिथे आनंदोत्सव सुरु आहे.त्यामुळे घाईने जाण्याचे कारणच नाही.कांही वेळ विश्रांती व आमचा पाहूणचार घे. इतके पाणी पिऊनही तहान भागत नव्हती. हनुमानांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

               हनुमानाचे एक वैशिष्ट होतं.त्यांना तहानभूक लागली की,त्याचवेळी भरपूर खाऊन पिऊन घ्यावे. त्यांना खूप पाणी प्यायचे असल्या  मुळे साधूने दाखवलेल्या तलावाकडे निघाले असता साधू म्हणाला पाणी पितांना घट्ट डोळे मिटून घेतलेस तर तुझी तहाण कायमची भागेल परत आल्यावर एक वर देतो ज्यायोगे द्रोणागिरी पर्वतावरील  ती विशेष औषधी लगेच ओळखू शकतील.

            साधूच्या सांगण्यानुसार तलावात शिरुन डोळे मिटून पाणी पित असतांना प्रचंड मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीशी झुंज देत तिचा जबडा फाडून ठार केले.आणि काय

आश्चर्य! त्या मेलेल्या मगरीतून एक सुंदर अप्सरा बाहेर पडली. हनुमानाला वंदन करुन म्हणाली, मी स्वर्गातली अप्सरा असून

एका साधुला फसवल्याबद्दल त्यांनी मगरी होण्याचा शाप दिला होता.आपल्यामुळे मी शाप मुक्त झाले. तुम्ही या साधुपासून सावध रहा. तुम्हाला फसवण्यासाठी कट रचला आहे. अप्सरा नाहीशी झाली.

             हनुमान जीवंत परत आश्रमात आलेले बधून आश्चर्य वाटले.मगरीच्या हल्ल्यातून वाचले तरी दुसरा कट तयार होता. साधूवेशातील कालनेमीने त्यांना जवळ बोलावून म्हणाला तुमच्या कानात एक गुप्त मंत्र सांगायचा आहे. हनुमान म्हणाले त्याआधी तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. तो सज्ज झालेला बघून हनुमाना ने आपली वज्रमुठ त्याच्या जबड्यावर हाणल्या बरोबर तो मुळ राक्षसी रुपात प्रकटल्या बरोबर हनुमानाने जबरदस्त दुसरा ठोसा हाणला आणि ठार झाला.वनौषधीचा पर्वत घेऊन त्वरेने पोहचल्यामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले.

           लक्ष्मणासाठी औषधी वनस्पती आणाय साठी हनुमानाने आकाशात झेप घेतल्याबरोबर त्यांना संकटाची चाहूल लागली आणि जांबुवंतानी सांगीतले की, सुर्योदयापूर्वी औषधी आणायची ताकीद दिली होती.सूर्योदयानंतर प्राण वाचण्याची शक्यता नव्हती. म्हणूनच घाईने हनुमानाने उड्डान भरले. पण मध्यरात्री सूर्य कसा उगवू शकतो?त्यांनी खाली लंकेकडे कटाक्ष टाकला तर रावण खदाखदा हसतांना दिसला. निसर्गक्रमामधे ढवळाढवळ केली जात होती. हनुमान सरळ सूर्याकडे निघाला असतां बालपणीचा प्रसंग आठवला. फळ समजून सूर्यालाच गिळले होते. हनुमान सूर्याजवळ पोहचून एका लाथेच्या प्रहारात सूर्याचा सारथी अरुणला खाली पाडले.सूर्याला त्याच्या लहान पणाचा प्रताप आठवल्याने संताप भीतीत परिवर्तीत होऊन सूर्य म्हणाले,तुला काय हवे ते सांग पण त्रास देऊ नकोस. मी फक्त कर्तव्य करीत आहे. साफ खोटे! मध्यरात्री उदयास येणे आपले कर्तव्य कसे? निसर्गनियम बदलू कसे शकता?

             खरं म्हणजे मला रामांंनाच मदत करायची आहे पण रावणाच्या क्रोधाला खूप घाबरतो.देव सुध्दा घाबरतात. हनुमानाने क्षण भर विचार करुन, हसून म्हणाले, मी सांगीतलेली  युक्ती वापरली तर दोन्ही बाजूंनी आनंद देऊ शकता.रावणही क्रोध करणार नाही व रामही प्रसन्न होतील. कानात सांगतो म्हणून त्यांना जवळ बोलावले. सूर्यदेवांनी विचार न करतां हनुमानाजवळ गेल्याबरोबर त्यांच्या गळ्यात अशा रितिने हनुमानाने विळखा घातला की, जणूं त्यांच्या कानात सांगत आहे. त्यांची मान आवळून बाहूमधे जेरबंद केले. सूर्यदेव सुटके साठी धडपडू लागले पण कांही चालले नाही. सूर्यदेवाला काखेत पकडून पर्वताजवळ पोहचले.हनुमानाने काळालाच बंदी केल्यामुळे त्यांचे काम वेळेत झाले.आणि लक्ष्मणाचे प्राण वाचू शकले. रावणासकट सर्वांनीच हे दृष्य बघून निःशब्द झाले. सूर्यदेव बंधनात असले तरी ते आनंदी होते.चुकीच्या मार्गाने जाण्याचे टळले आणि सत्याच्या बाजूने वागल्याचे त्यांना समाधान वाटले.

                     क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि. २७-७-२०२२.

                             

 

अंजनीपुत्र हनुमान चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading