आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
अक्करमाशे, कडू, गोळक, लेकावळे, कृष्णपक्षी, अक्करमाशी म्हणजे काय ? ९६ कुळी मराठा
अक्करमाशे म्हणजे काय ? ९६ कुळी मराठा
अक्करमाशी म्हणजे = कमी अस्सल असलेलेला – हे विशेषण शिवी म्हणुन वापरले जाते.
सोने, चांदी, केशर, कस्तुरी इत्यादी किंमती आणि मुल्यवान वस्तुंचे किंवा पदार्थांचे वजन माप करण्याचे परिमाण म्हणुन अगोदरच म्हणजे पुर्वीपासून ‘तोळा’ शब्द वापरात होता. त्यानंतर मासा, गुंज, तोळा (पाव-अर्धा-पाऊण) शेर अशी वजनमाप श्रेणी होती. आता नवीन दशमान पद्धतीत ‘ग्रॅम’ हे परिमाण प्रचलित आहे.
बारा- मासे=१ तोळा- एक मासा कमी म्हणजे अकराच मासे =अकरा मासी / अक्करमाशी, तसेच म्हणुन अक्करमाशी म्हणजे : वजनात कमी असणारा माल, म्हणजे खोट, लबाडी, फसवणुक, धोका, फ्राड इत्यादी. मग शिवीचा अर्थ होईल कम अस्सल, उर्दूत कमजाद , हीन कुळातला, म्हणजे ज्याला बाप असूनही बापाच नांव गांव पत्ता नसलेला, बिन बापाचा, अनैतिक संबंधातून जन्मलेला, नाजायज औलाद, वेश्येची संतती असे अनेक शब्द काळाच्या ओघात वापरल्या जातात.
‘अक्करमाशी’ हा शब्द अकरा मासे ह्यापासून झाला आहे. अकरा मासे म्हणजे पूर्ण बारा मासे नसलेला. काहीतरी कमीपणा असणारा. अनौरस संततीला उद्देशून हा शब्द मराठीत वापरला जातो
ज्यांचे विधिपूर्वक लग्न झाले नाही अशांच्या मुलांना लेकावळे, अक्करमासे अशी मराठीमध्ये संज्ञा आहे. ही संज्ञा जेव्हा निर्माण झाली तेव्हा आपला permissive society शी परिचय झालेला नव्हता. अनौरस संतती होतीच, एवढेच नव्हे तर तिचे आपल्या समाजातील स्थान स्पष्ट होते. स्वतःला पाराशर ब्राह्मण असे म्हणविणार्या जातीसुद्धा निर्माण झाल्या होत्या. आपली पुराणे पाहिली तर कोणत्या जातींची उत्पत्ति ही कोणकोणत्या जातींच्या संकराने झाली आहे हे त्यात लिहिलेले आढळेल. थोडक्यात काय तर हा प्रश्न नवीन नाही. कारण काही थोड्या जातींमधले अनुलोम विवाह सोडले तर भिन्नजातीयांमध्ये विवाहच संभवत नव्हता. त्यामुळे संकरज प्रजा ही विवाहबाह्य प्रजा होती असे मानावयाला प्रत्यवाय नाही. पण ही दूरच्या इतिहासातली गोष्ट झाली.
ती कडू, गोळक, लेकावळे, कृष्णपक्षी, अक्करमाशी अशा नावाने ओळखली जात असे.
बारा मासे म्हणजे एक तोळा. बारा माशाला थोडे कमी म्हणजे अकरामासे (अक्करमाशा /शी/शे).हा शब्द जातीसाठी,गुणासाठी अशा गोष्टींच्या वर्णनासाठी थोडे कमी अशा अर्थाने वापरला जातो.
तुम्हाला हे पटत नसेल तर “पेशवे घराण्याचा इतिहास” या विषयावर, तुम्हाला प्रमोद ओक यांचे पुस्तक “पेशवे घराण्याचा इतिहास” त्यतील हा उतारा पहा.
परिशिष्ट सहावे
नाटकशाळा आणि लेकावळे
[ एक-‘ संदर्भग्रंथ ‘ असे या पुस्तकाचे स्वरूप ठेवल्यामुळे ऐतिहासिक नोंदीमध्ये उपलब्ध झालेली ही माहिती समाविष्ट केली आहे. अशा संकलनात कोणाचेही चारित्र्यहनन करावे किंवा कोणालाही दुखवावे असा हेतु बिलकूल नाही. केवळ ऐतिहासिक नोंद एवढाच मर्यादित हेतू नजरेसमोर ठेवला आहे. सामाजिक परिवर्तनाचे दृष्टीनेही ही माहिती अभ्यासकांना कदाचित उपयुक्त ठरावी. ]
विवाहित स्त्रियांखेरीज इतर उपस्त्रिया, दासी यांचेपासून झालेल्या संततीला ‘ लेकावळा ‘ ही संज्ञा आहे. या संततीला कौटुंबिक व कायदेशीर अधिकार, वारसा हक्क याबद्दल स्थान नसे. राजघराण्यात किंवा श्रीमंत हिंदू घराण्यांत बहुभार्यात्वाची व इतर उपस्त्रिया (नाटकशाळा) ठेवण्याची चाल खूपच प्रचलित होती. तत्कालिन समाजरचना व रूढी यांनुसार यात काहीही गैर, अनाचारी, मानले जात नसे.
एक गोष्ट मात्र नक्की की, त्या काळी अनौरसांना तुच्छ मानून वान्यावर सोडले जात नसे. त्यांची लग्नेकार्य व इतर सर्व जबाबदान्या व्यवस्थित पार पाडल्या जात. घरच्या कुटुंबियातच त्यांची गणना करून ऐपतीप्रमाणे त्यांचा परामर्श घेतला जाई. सर्व पेशवे मंडळींनीसुद्धा आपआपल्या कारकीर्दीत सर्व लेकावळया संततीचा परामर्श घेतल्याचे दाखले मिळतात. याचबरोबर संबंधित उपस्त्रिया, नाटकशाळा यांचाही योग्य परामर्श घेतला जाई.
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचा एक लेकावळा भिकाजी शिंदे या नावाचा असल्याची माहिती मिळते. याची जी वंशावळ व माहिती उपलब्ध आहे तीवरून या भिकाजीला राणोजी हा एक भाऊ असल्याचा उल्लेख आढळतो. इतिहास संशोधक श्री. य. न. केळकर यांचेकडून समजले की, व्यक्तिनाम हे त्या त्या लेकावळ्याचे स्वतःचे असे. आडनाव एक तर जन्मदात्या आईचे लावले जाई किंवा लेकावळयांना सरसकट शिंदे आडनाव लावले जाई. * हा भिकाजी आपल्या वडिलां प्रमाणेच शूर व पराक्रमी निपजला. हा थोरल्या बाजीरावांबरोबर अनेक मोहिमां-……….
विशेष आणि महत्वाची टीप :-
अनौरस संततीला शिंदे आडनाव लावले जाई हे खरे असले, तरी केवळ आडनाव “शिंदे” एवढयावरून अनौरसपणा गृहीत धरणे अन्यायमूलक आहे. (संदर्भ : इतिहासातील सहली खंड २ केळकर य. न. ) ………..








