आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

एकादशी महात्म्य व संदर्भ 7+14 अभंग Ekadashi Mahatmya Abhang
Ekadashi Abhang, भजनी मालिका , वारकरी भजनी मालिका
एकादशी चे अभंग १
एकादशी चे अभंग
१ जागा रे गोपाळांनो रामनामी जागा
२ दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन
३ एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन ।
४ पंधरा दिवसा एक एकादशी ।
५ एकादशी व्रत सोमवार न करिती
६ एकादशी एकादशी । जया छंद
७ आम्हा देणे धरा सांगतो ते कानी
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
निवडक अभंग हरिपाठ वाराचे
एकादशी महात्म्य व संदर्भ अभंग Ekadashi Abhang
अभंग गाथा 1190.
जागा रे गोपाळांनो रामनामी जागा 1
जागा रे गोपाळांनो रामनामी जागा । कळिकाळ आकळा महादोष जाती भंगा ॥१॥ सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनि उठी । नामाचेनि बळे पापे रिघाली कपाटी ॥२॥ दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन । एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण ॥३॥ द्वादशी साधन कोटीकुळे उध्दरती । नामा म्हणे केशव ठाव देईल वैंकुठी ॥४॥
1191.
दशमी व्रताचा आरंभु । दिंडी 2
दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥ एकादशी जागरण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥ ऐसे व्रत तीन दिन । करी जो आदरे परिपूर्ण । एकाजनार्दनी बंधन । तया नाही सर्वथा ॥३॥
1192.
एकादशीस अन्नपान । जे नर 3
एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥ ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसी ॥२॥ अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षिता तांबुल । सांपडे सबळ । काळाहाती न सुटे ॥३॥ सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥ आपण नवजे हरिकीर्तना । आणिका वारी जाता कोणा । त्याच्या पापे जाणा । ठेंगणा तो महोमेरु ॥५॥ तया दंडी यमदुत । झालेस तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकाद्शी चुकलिया ॥६॥
1193.
पंधरा दिवसा एक एकादशी 4
पंधरा दिवसा एक एकादशी । का रे न करिसी व्रतसार ॥ धृ १॥ काय तुझा जीव जातो एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ॥२॥ स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवाचे ॥३॥ थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी का रे मरसी जाता ॥४॥ तुका म्हणे का रे सुकुमार झालासी । काय जाब देसी यमदूता ॥५॥
1194.
एकादशी व्रत सोमवार न करिती 5
एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥१॥ काय करू बहु वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ॥२॥ हरिहरासी नाही बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥३॥ तुका म्हणे नाही नारायणी प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणो ॥४॥
1195.
एकादशी एकादशी । जया छंद 6
एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशी ॥१॥ व्रत करी जो नेमाने । तया वैकुंठीचे पेणे ॥२॥ नामस्मरण जागरण । वाचे गाय नारायण ॥३॥ तोचि भक्त सत्य साचा । एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥
1196.
आम्हा देणे धरा सांगतो ते कानी 7
आम्हा देणे धरा सांगतो ते कानी । चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥ तेणे माझे चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न नलगे सोने ॥२॥ व्रत एकादशी द्वारी वृंदावन । कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥ तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥४॥
एकादशी संदर्भ असलेलेल अभंग
अभंग क्र. ४९
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥१॥
काय करू बहु वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ॥धृपद॥
हरीहरा नाही बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥२॥
तुका म्हणे नाही नारायणी प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणो ॥३॥
अर्थ
जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल काय माहित? काय करावे सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते परंतु हे सर्वच संसारिक लोक आंधळी व बहिर्मुख आहेत. हरी व हर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक बोटभर वातीने देखील ओवाळत नाही त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला नारायणा विषयी आवडच नाही त्यांची गती काय होईल ते काही मला कळतच नाही.
अभंग क्र. 170
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरीकीर्तन । ते समान विष्णूशी ॥धृपद॥
अशुद्ध विटाळसीचे खळ । विडा भिक्षता तांबूल । सापडे सबळ । काळाहाती न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग । करी कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना । अणिका वारी जाता कोणा । त्याच्या पापे जाणा । ठेंगणा तो महामेरु ॥४॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥
अर्थ
एकादशीला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे. एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत. एकादशीला जो पाणाचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल. त्याला काळ खाऊन टाकिल. या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जडतील. या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पापापुढे मेरु पर्वतही लहान वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही ते शिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो.
अभंग क्र. 171
करविता व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडविता दोघे नरका जाती ॥१॥
शुद्धबुद्धि होय दोघा एक मान । चोरासवे कोण जिवे राखे ॥धृपद॥
आपुले देऊनी आपुलाचि घात । शन करावा थीत जाणोनिया ॥२॥
देऊनिया वेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासि चंद्रबळ ॥३॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग मोडू नये ॥४॥
अर्थ
एखाद्या व्यक्तीने दुसर्याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरि होतो, पण व्रत मोडवले गेले की ते दोघेही नरकात जातात. सद्बुद्धि असलेल्या माणसाची संगती केली की मानसंन्नमान मिळतो, चोरांची संगती केली तर शिक्षा मिळते. आपल्या जवाळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करुण घेऊ नये, आपले हित ओळखावे. सद्बुद्धि असलेल्या माणसाला काशी-वाराणसीला जाण्यास मदत करावी-पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ (चोरीची वेळ) सांगू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तप, तीर्थ, व्रत, यज्ञयाग हे भक्तीमार्ग आहेत. हे कधी सोडु नये.
अभंग क्र. ७६९
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥१॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥धृपद॥
बरे जाले देवा बाईल कर्कशा । बरी हि दुर्दशा जन मध्ये ॥२॥
बरे जाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥३॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥४॥
बरे जाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥५॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥६॥
अर्थ
देवा बरे झाले माझे दिवाळे निघाले आणि दुष्काळानेही मला चांगलाच त्रास दिला आहे ते खूप चांगले झाले. देवा मला पश्चाताप येत आहे आणि त्या पश्चातापाच्या निमित्तानेच मला तुझे चिंतन घडत आहे आणि संसार तर मला ओकलेल्या अन्ना प्रमाणेच वाटत आहे संसाराची मला आता घृणा येत आहे. देवा बरे झाले मला बायको देखील कर्कश मिळाली आणि जगामध्ये देखील माझी दुर्दशा होत आहे हे देखील चांगले झाले. देवा जगामध्ये पावलोपावली माझा अपमान होत आहे हे देखील बरे झाले माझे गुरे-ढोरे धन हे सगळे गेले तेही चांगले झाले. देवा बरे झाले मी लोकलज्जा धरली नाही वेळेच तुला शरण आलो हे फार बरे झाले. देवा मी माझे सर्वस्व तुला अर्पण केले व बायकोचा लेकरांचा त्याग केला हे फार बरे झाले. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी एकादशीव्रत धरले त्या दिवशी उपवास धरला आणि हरीचे भजन करून जागरण केले हे फार बरे झाले.
अभंग क्र. १४५९
बोळविला देह आपुलेनि हाते । हुताशिली भूते ब्रह्माग्नीस ॥१॥
एकवेळे जाले सकळ कारण । आता नारायण नारायण ॥धृपद॥
अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगे तये ठायी हारपली ॥२॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥३॥
अवघी कर्मे जाली घटस्पोटापाशी । संबंध एकेसी उरला नाही ॥४॥
तुका म्हणे आता आनंदी आनंदु । गोविंदी गोविंदु विस्तारला ॥५॥
अर्थ
मी माझ्या हाताने माझ्या देहाची बोळवण केली आहे आणि सोहंम या ज्ञानाग्नीने पंचमहाभूते जाळून टाकले आहे आता सर्व कार्य पूर्ण झाले असून फक्त नारायणा नारायणा नाम चिंतन करणे बाकी आहे. ज्ञानाग्नीने पेटलेली चिता मोक्ष रुपी अमृत संजीवनी व योगाने शांत केली आहे. एकादशीच्या दिवशी उपवास व हरी जागरण केले व बाराव्या दिवशी भोजन केले. देवाच्या पायाजवळ देहरुपी घट सोहंम या बोधाने फोडला त्यामुळे सर्व देहाची कर्मे समाप्त झाली. आता केवळ हरीच्या नामाशी संबंध राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता सगळीकडे आनंदीआनंद झाला असून जिकडेतिकडे मला गोविंदच गोविंद दिसत आहे.
अभंग क्र. १७४८
गाता ऐकता कांटाळा जो करी । वास त्या अघोरी कुंभपाकी ॥१॥
रागे यमधर्म जाचविती तया । तु दिले कासया मुख कान ॥धृपद॥
विषयांच्या सुखे अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥
वेचूनिया द्रव्य सेवी मद्यपान । नाही दिले अन्न अतीतासी ॥३॥
तीर्थाटण नाही केले उपकार । पाळिले शरीर पुष्ट लोभे ॥४॥
तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितले ॥५॥
अर्थ
हरीचे किर्तन भजन करण्यासाठी गाण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जो कंटाळा करतो तो अघोरी अशा कुंभपाकी नरकामध्ये वास करतो. मग यम त्याच्यावर रागावतो त्याचा छळ करतो आणि त्याला विचारतो अरे नालायका तुला देवाने मुख आणि कान कशासाठी दिले तर केवळ हरीचे गुणगान गाण्यासाठी व ऐकण्यासाठीच. विषयाच्या सुखाकरता तू अखंडपणे जागतोस परंतू कधी एकादशीच्या दिवशी हरी जागरण करण्यासाठी तू कधीही जागला नाहीस. अरे तू पैसे कमवून केवळ मद्यपान सेवन केलेस परंतू घरी आलेल्या देवरुपी अतिथ्याला कधीही अन्नदान केले नाहीस. तू केव्हाही तीर्थाटन केले नाहीस केव्हाही कोणावरही परोपकार केले नाहीस केवळ शरीराच्या लोभाने तू निषिध्द अन्न खावून त्याला पाळले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा निर्लज्ज लोकांना संतांनी कितीही चांगले वचने सांगितले तरीही ते ऐकत नाहीत मग पुढे यांना यमाने केलेला दंड सहन करावा लागतो. ”
अभंग क्र. २०५०
पंधरा दिवसा एक एकादशी । का रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ॥धृपद॥
स्वहित कारण मानवेल जन । हरीकथा पूजन वैष्णवाचे ॥२॥
थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी का रे मरसी जाता ॥३॥
तुका म्हणे का रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूता ॥४॥
अर्थ
सर्व व्रताचे सार म्हणजे एकादशी आहे आणि ती पंधरा दिवसातून एकदा येते तरी देखील तु एकादशी हे व्रत का करत नाहीस? अरे एकादशी धरताना तुझा जीव जातो काय आणि धरली तरी एकादशीच्या दिवशी फराळाच्या निमित्ताने चांगले पोट भरून नेहमीपेक्षा जास्त खातोस. त्या दिवशी खरे तर हरी कथा करावी वैष्णवांची पूजा करावी हेच खरे तुझे स्वहित आहे त्या निमित्ताने तुला जन माणसात मान सन्मान देखील मिळेल. अरे तुझ्या घरी तु कोणत्याही कारणानिमित्त काही थोडे जागरण केले आहेस काय मग एकादशीच्या दिवशी देवळात जाऊन जागर केला तर काय तु मरशील की काय ते सांग? तुकाराम महाराज म्हणतात अरे एकादशीच्या दिवशी मला भूक सहन होत नाही मला खूप त्रास होतो असे तु म्हणतोस एवढा तु नाजूक झाला आहेस की काय आणि यमदुतानी तुला यमसदेने गेल्यावर काय काय पुण्य तु आजवर केले आहे असे विचारले तर तु त्यांना काय उत्तर देशील?
अभंग क्र. २०६७
न कळता कोणी मोडियेले व्रत । तया प्रायिश्चत्त चाले काही ॥१॥
जाणतिया वज्रलेप जाले थोर । तयास अघोर कुंभपाक ॥धृपद॥
आता जरी कोणी नाइके सांगता । तया शिकविता ते चि पाप ॥२॥
काय करू मज देवे बोलविले । माझे खोळंबिले काय होते ॥३॥
तुका म्हणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनी ते चि करा ॥४॥
अर्थ
नकळता जर एकादशी किंवा सोमवार व्रत मोडले गेले तर त्याला काहीतरी प्रायचित्त देता येते. पण एखाद्याला जर माहित आहे की आज एकादशी आहे किंवा सोमवार हे व्रत आहे तरीही त्याने जाणून व्रत मोडले तर त्याच्या हातून वज्रलेपासारखे पाप होते आणि अघोर असा कुंभीपाक नरकाला प्राप्त होतो. तर एखाद्या व्यक्तीला व्रत मोडणे हे पाप आहे हे शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तरीदेखील ते ऐकले नाही तर पुन्हा पुन्हा त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला तर शिकवणार्याला देखील पाप लागते. आता मी काय करू मी जे काही बोलतो आहे ते मला देवच बोलत आहे नाहीतर माझे उपदेश करण्यावाचून काही खोळंबले होते काय कशाला? तुकाराम महाराज लोकहो मी तुम्हाला जो काही उपदेश केला आहे तो चांगला आहे की वाईट आहे याविषयी तुमचे तुम्हीच विचार करून पहा आणि तुम्हाला ज्या कारणाने सुख वाटेल त्याचविषयी मनात विचार करा तोच उपदेश तुम्ही करा.
अभंग क्र. २२४०
संपदा सोहळा नावडे मनाला । करी ते टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरिसी आवडी मनासी । कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
अर्थ
संपदा सोहळा मनाला आवडत नाही तर केवळ पंढरीचा ध्यास मनाला लागलेला आहे. पंढरीला जाणे मनाला फार आवडते आणि कधी एकादशी आषाढी येईल आणि मी पंढरपूरला जाईल असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशी आर्त इच्छा ज्याच्या मनात असते त्याची चक्रपाणि हरी वाट पाहत असतो.
अभंग क्र. २२४१
पंढरीची वारी आहे माझे घरी । आणीक न करी तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखी नाम ॥२॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे । बीज कल्पातीचे तुका म्हणे ॥३॥
अर्थ
पंढरीची वारी माझ्या घरीच आहे या वाचून मी दुसरे कोणतेही तीर्थ आणि व्रत करीत नाही. मी एकादशी व्रत करून त्या दिवशी उपवासी राहिल आणि रात्रंदिवस हरिनाम घेत त्याचे गुणगान गाईन. तुकाराम महाराज म्हणतात कल्पंतीचे बीज असलेले विठोबाचे नाम मी माझ्या मुखाने सतत गात राहील.
अभंग क्र. ३००८
आम्हा देणे धरा सांगतो ते कानी । चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणे माझे चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोने ॥धृपद॥
व्रत एकादशी दारी वृंदावन । कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥२॥
तुका म्हणे त्याचे घरीची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥
अर्थ
आम्हाला जर काही दयायचेच असेल तर ते मी तुमच्या कानामध्ये सांगतो ते म्हणजे असे की, तुम्ही विठोबाच्या पायाचे चिंतन मनामध्ये करत राहा. एवढे जरी तुम्ही मला दिले तर त्या योगाने माझ्या चित्ताला समाधान होईल मग मला तुमचे मिष्ठान्न विलास सोने वगैरे काहीच नको. तुम्ही एकादशी व्रत करा, दारामध्ये तुळशी वृंदावन राहू दयावे, कंठामध्ये हरीनाम धारण करा आणि गळयामध्ये तुळशीमाळेचे लेणे परिधान करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “जर असे या नियमाने कुणी वागले तर माझ्यासाठी तो दिवाळी दसरा सणच वाटेल. ”
अभंग क्र. ३०६९
कैसी करू आता सांग तुझी सेवा । शब्दज्ञाने देवा नाश केला ॥१॥
आता तुझे वर्म न कळे अनंता । तुज न संगता बुडू पाहे ॥धृपद॥
संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासी म्हणती एक ॥२॥
बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचे पाळण स्थापुनिया ॥३॥
न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥
न जावे देउळा म्हणती देवघरी । बुडविली या परी तुका म्हणे ॥५॥
अर्थ
देवा या शब्दज्ञानी लोकांनी सर्व भक्तीचा नाश केला आहे तुझी सेवा आता मी कशी करु ते तू सांग ? हे अनंता आता तुझ्या प्राप्तीचे वर्म कोणते आहे हे मला काही कळेनासे झाले आहे तूच जर आता सांगितले नाहीस तर मी या भवसागरात बुडून जाईन. या शब्दज्ञानी लोकांनी तर संध्यास्नान इत्यादी शुध्द आचरणाचा नाशच केला आहे ते म्हणतात की, संध्यास्नानापाशी असे एवढे काय आहे ? अहो काही नास्तिक लोक तर म्हणतात की, देवळातला देव दगड आहे आणि पिंडाचे म्हणजे देहाचे पालन पोषण करावे हीच खरी भक्ती आहे असा नवीन धर्मच त्यांनी स्थापन करुन भक्तीच बुडवून टाकली आहे. अहो हे लोक म्हणतात की, हरीकथा करु नये एकादशी देखील धरु नये आणि भजनाचा तर यांनी पूर्णच नाशच करुन टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे हे नास्तिक लोक तर म्हणतात की देव देवळात नाही तर देव आपल्या ह्दयमंदीरात आपल्या घरीच आहे असे म्हणून यांनी भक्तीचा आणि सत्मार्गाचा नाश करुन भक्तीच बुडवली आहे. ”
अभंग क्र. ३३९०(श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
नाही देवापाशी मोक्षाचे गांठोळे । आणूनि निराळे द्यावे हाती ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनिया मन । निर्विषय कारण असे तेथे ॥धृपद॥
उवपास पारणी अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटी असे फळ ॥२॥
आदरे संकल्प वारी अतिशय । सहज ते काय दुःख जाण ॥३॥
स्वप्नींचिया घाये विळवसी वाया । रडे रडतियासवे मिथ्या ॥४॥
तुका म्हणे फळ आहे मूळापाशी । शरण देवासी जाय वेगी ॥५॥
अर्थ
देवाजवळ मोक्षाचे गाठोडे नाही की ते देवाने तुझ्या हातामध्ये आणून दयावे. इंद्रियांवर विजय मिळवून मनाला निर्विषय कर तरच मोक्षाची प्राप्ती होईल. उपवास म्हणजे एकादशी सोमवार हे व्रते करणे नंतर पारणे सोडणे त्यानंतर वेदशास्त्राचा अभ्यास करणे आणि सत्कर्म करणे याचे तुला शेवटी मोक्षरुपी फळ मिळेल. संसारामध्ये तू अनेक प्रकारचे संकल्प करतोस ते संकल्प करणे सोडून दे दुराग्रह म्हणजे अभिमानपणा सोडून दे असे केल्याने तुला सहजस्थिती प्राप्त होईल व सहजस्थिती प्राप्त झाली की मग तुला दु:ख जाणवणार नाही. स्वप्नामध्ये तुझ्यावर कोणी घाव केला तर तू विनाकारणच तळमळ करतोस कारण हे घाव खोटे आहे हे तू जाणतच नाहीस आणि मनुष्य रडू लागला की त्याच्याबरोबरही तू व्यर्थ रडत बसतोस. तुकाराम महाराज म्हणतात, “तुला मी वरती जे काही साधने सांगितली आहेत ते मूळ आहे आणि त्या मुळाजवळच तुला इच्छित असलेले फळ देखील आहे त्यामुळे मी सांगितलेले साधने.
अभंग क्र. ३४२१(शिवाजीमहाराजांनीतुकाराममहाराजांनानेण्याकरताघोडाकारकूनअबदागिरीपाठविलीत्यावेळीकारकुणाबरोबरपाठविलेलानिरोप)
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥
तुमचे येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥धृपद॥
कंठी मिरावा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥
अर्थ
हे शिवराय तुम्ही मुखाने “विठ्ठल विठ्ठल” असे म्हणा आम्ही त्यायोगाने सुखी होऊ. तुमचे वित्त, धन हे आम्हाला मातीच्या समान आहे. कंठामध्ये तुळशीची माळ घाला व त्याचे भूषण सर्वत्र मिरवा आणि एकादशी सारखे पवित्र व्रत करा. तुकाराम महाराज म्हणतात, “स्वत:ला मी हरीदास आहे असे म्हणून घ्या एवढीच एक अपेक्षा मला तुमच्यापासून आहे.
अभंग क्र. ३६६६( कलियुगा मधील लोकांचे वर्तन )
पाहा हो कलिचे महिमान । असत्यासी रिझले जन।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥
ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।
केले धर्माचे निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥धृपद॥
थोर या युगाचे आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार ।
सांडूनिया द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥
ऐसे यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ ।
नाही ऐसी झाली नीत । हा हा भूत पातले ॥३॥
शांति क्षमा दया । भावभक्ती सित्क्रया ।
ठाव नाही सांगावया । सत्त्वधैर्य भंगिले ॥४॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।
म्हणविता रामराम । महा श्रम मानिती॥५॥
थेर भोरप्याचे विशी । धावती भूते आविसा तैसी ।
कथा पुराण म्हणता सिसी । तिडीक उठी नक त्याची ॥६॥
विषयलोभासाठी । सवार्थेसी प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठी । मागता उठती सुनींसीं॥७॥
धनाढ्य देखोनि अनामिक । तयाते मनिती आवश्यक ।
अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्त्विक संपन्न ॥८॥
पुत्र ते पितियापाशी । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनांचिया दासी । सासा झाल्या आंदण्या ॥९॥
खोटे झाले आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी ।
भ्रतारे ती भार्यासी । रंक तैसी मानिती ॥१०॥
नमस्कारावया हरीदासा । लाजती धरिती काही गर्वसा ।
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छाया॥११॥
बहुत पाप झले उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ।
अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥
कैसे झाले नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदने दासीची चुंबिती ।
सोवळ्याच्या स्फीती । जगी मिरविती पवित्रता ॥१४॥
मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी ।
केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥
केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता ।
पुण्य धुडावोनी संता । तीर्था हरी आणिली ॥१६॥
भेणे मंद जाल्या मेघवृष्टि । आकांतली कापे सृष्टि ।
देव रिगाले कपाटी । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥
अपीक धान्ये दिवसे दिवसे । गाई म्हैसी चेवल्या गोरसे ।
नगरे दिसती उध्वंसे । पिकली बहुवसे पाखांडे ॥१८॥
होम हरपली हवने । यज्ञयाग अनुष्ठाने ।
जपतपादिसाधने । आचरणें भ्रष्टली ॥१९॥
अठरा यातीचे व्यापार। करिती तस्कराई विप्र ।
सांडोनिया शुद्ध शुभ्र । वस्त्रे निळी पांघरती ॥२०॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्री ।
अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची ।
आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२२॥
मुख्य सर्वोत्तम साधने । ती उच्छेदुनि केली दीने ।
कुडी कापटे महा मोहने । मिरविताती दुर्जन ॥२३॥
कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायी ।
विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसी नाडली ॥२४॥
जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होता वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी ।
कामक्रोधे व्यापिले भारी । इच्छाकरी न सुटती ॥२५॥
कैसे विनाशकाळाचे कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघाते वर्त्तती ॥२६॥
केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविले अवघे जन ।
याती अठरा चार्ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥
पूवा अहो ते भविष्य केले । संती ते यथार्थ जाले ।
ऐकत होतो ते देखिले ।प्रत्यक्ष लोचनी ॥२८॥
आता असो हे आघवे । गति नव्हे कळीमध्येवागवरावे ।
देवासी भाकोनि करुणावे । वेगे स्मरावे अंतरी ॥२९॥
अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका ।
धांव कलीने गांजिले लोका । देतो हाका सेवक तुकयाचा ॥
अभंग क्र. ४०८२(आरत्या)
काय तुझा महिमा वर्णु मी किती । नामे मात्रे भवपाश तुटती ।
पाहाता पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळा सहित जडजीव उद्धरती ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिराया, श्रीपंढरिराया । करुनिया कुरवंडी सांडीन काया ॥धृपद॥
मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाही उपमा ।
श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी ।
विष्णूचे पूजन एकाभावेंसी । नित्यमुक्त पूज्य तिही लोकांसी ॥३॥
न वजे वाया काळ जे तुज ध्याती । अखंड तुझा वास तयांच्या चित्ती ।
धाले सुखे सदा प्रेमे डुल्लती । तीर्थे मलीन वास तयांचा पाहाती ॥४॥
देव भक्ती तूचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ती हे जनी ।
जड जीवा उद्धार व्हावया लागोनी । शरण तुका वंदी पाउले दोन्ही ॥५॥
अर्थ
देवा तुझा महिमा मी काय आणि किती वर्ण करू तुझे नाम घेतले तरी भवपाश तुटतात. विष्णूच्या मूर्तीची पाऊले पाहिले असता जड जीवासहीत कोटीकुळाचा उध्दार होतो. हे पंढरीराया तुझा त्रिवार जयजयकार असो. मी माझ्या देहाची कुरवंडी करुन तुझ्यावरुन ओवाळून टाकीन. देवा तुझ्या मंगल आरतीचा थोर महिमा आहे त्याला देण्यासाठी दुसरी कोणतीही उपमा नाही. देवा तुझी मंगल आरती जो कोणी तुझ्या श्रीमुखासहीत पाहतो तो जसे सूर्य उगवल्यानंतर अंधकार नाहीसे होतो तसा त्याच्या सर्व कर्मबंधनाचा नाश होते. एकादशी हे व्रत आणि हा काळ अतिशय धन्य आहे आणि ज्याला कोणाला त्या दिवशी हरीजागरण आणि उपवास घडेल, आणि ज्याच्या हातून त्या दिवशी विष्णूचे एकनिष्ठ भक्तिभावाने पूजा घडते तो त्रैलोक्यात नित्य मुक्त असून स��
एकादशी महात्म्य व संदर्भ अभंग Ekadashi Abhang













