स्वामी विवेकानंद चरित्र भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्‍या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! स्वामी विवेकानंद !!!    

भाग-२१*

       स्वामी विवेकानंदाच्या झळझळीत भगव्या रंगाचा लांब अंगरखा,फेटा,ब्रास धातुसारखा वर्ण,सुडौल,रेखीव देहाकृति व्यासपीठावर अगदी लक्ष वेधुन घेत होते  आपपाली तयार करुन आणलेली भाषणे प्रतिनिधी एकामागोमाग एक वाचुन दाखवित होते. परंतु या हिंदु संन्यासाची मात्र भाषणाची तयारी कांहीच नव्हती. त्यांना पाचारण्यात आल्यावर त्यांनी अध्यक्षांना वेळ मागीतला.सकाळच्या सत्रात बोलण्याचे धाडस करुच शकले नाही.दुपारच्या सत्रात व्याख्यानासाठी उभे राहिल्यावर,अध्यक्ष डॉ.बेरोजांनी त्यांचा परिचय करुन दिला.भाषणापुर्वी मनोमन सरस्वती वंदन करुन श्रोतृवृंदा ना उद्देशुन उद्गारले, अमेरिकेतील माझ्या बंधुनो आणि भगीनींनो म्हटले मात्र, तत्क्षणी हजारो श्रोते आपपाल्या आसनावरुन उठुन टाळ्यांचा कडकडाट केला, स्वाभाविकपणे बंधुत्वभावाने बोललेले पाहुन सर्व श्रोत्यांचे अंतःकरण भारावुन गेले.ही लाट ओसरायला दोन मिनिट लागले,

       सार्वजनीन सहिष्णुता आणि परस्परांचा स्वीकार हे स्वामीजींच्या भाषणाचे सुत्र होते.अन्य देशांतुन निराश्रीत झालेल्या अनुयायांना,उदाहरणार्थ यहुदी व पारशी लोकांना भारताने कसा आश्रय दिला हे पटवुन दिले.

       भारतीय हिंदुशास्र ग्रंथातील शिव महिम्नस्तोस्र आणि भगभद् गीतेतील पुढील दोन श्र्लोकांचा उल्लेख केला… “रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनाना पथजुषाम् । नृणां एको गम्यः त्वमसि पयसां अर्णव इव।।” भिन्न भिन्न उगमां तुन निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्या प्रमाणे अंती सागरास मिळुन एक होऊन जातात,त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार सरळ वा वक्र अशा वेगवेगळ्या मार्गांनी जाणारे पथिक, हे प्रभो, अंती तुलाच येऊन मिळतात.”ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहम्। मम वत्मार्नुर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।। कोणी कोणत्या ही भावनेचा आश्रय घेऊन मजप्रत येईना का, मी त्याच भावाने त्याच्यावर  अनुग्रह करीत असतो. अर्जुना! लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेर मलाच येऊन मिळतात.” भाषणा चा समारोप करतांना सांप्रदायिकता, समतांधता, आणि धर्मवेडे यांचा पृथ्वी वरुन लवकरच नामशेष होईल अशी आशा व्यक्त करुन स्वामींनी भाषण संपविले.

       इतर प्रत्येक प्रतिनिधी फक्त आपल्या धर्माविषयीच बोलला. स्वामीजी मात्र प्रत्येक धर्माचे ईश्वप्राप्ती हेच एकमेव इप्सित असुन तेच प्रत्येक धर्माचा अंतरगाभा आहे.धर्माच्या, वर्णा च्या आणि वंशाच्या सर्व भिंती कोसळून जमीनदोस्त व्हाव्यात आणि सर्व लोकां ना मानवतेच्या एकाच सुत्रात गुंफले जावे हीच आधुनिक जगाची तळमळ स्वामीजींनी शब्दबध्द केली होती.नरेंद्र एक दिवस जग हलवुन सोडेल ही गुरु रामकृष्णांची भविष्यवाणी खरी ठरली.

       लॉस एंजेलसमधे श्रीमती एस.के. व्लाजेट यांचे आतिथ्य केल्यावर सर्व धर्म परिषदेबद्दल लिहितांना म्हणतात,  भाषणाच्या सुरुवातीलाच या तरुण सन्यासाने जेव्हा भगीनी आणि बंधुनो असे म्हटल्याबरोबर सात हजार माणसे आदराने उठुन उभे राहिलेत.भाषण संपल्यावर असंख्य स्रिया विवेकानंदा जवळ जाऊन त्या म्हणाल्य, हे तरुण मुला! जर तु या आक्रमणाचा सामना करुं शकलास, तर तुं खरोखरच देवातर आहेस असे आम्ही मानु!

      परिषदेत स्वामीजी किमान बारा वेळा तरी बोलले असतील,त्यांत त्यांनी हिंदुचे अध्यात्मशास्र,नीतीशास्र,धर्म शास्राबद्दचा उहापोह केला.आत्म्याचे दिव्यत्व,जीवांचे ऐक्य,अवतारांचे देवत्व, धर्माधर्मामधील समन्वय ही विचारसुत्रे त्यांच्या भाषणांत असे.मानवाचे अंतीम ध्येय म्हणजे इश्वरप्राप्ती ! हे त्यांनी प्रामुख्याने प्रतिपादन केले.

           क्रमशः  
संकलन – मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-२२*

     सर्व धर्म परिषदेच्या अखेरच्या सत्रात समारोपाचे भाषण करतांना स्वामी विवेकांनद म्हणाले, धर्म हा कोणा एकाचा मक्ता नाही तर,वैशिष्ट कायम राखुन इतरही धर्मातील सारभाग ग्रहण करुन त्याद्वारे समृध्द होऊन वृध्दी गंत व्हावे हाच संदेश आणि मुळ उद्देश या  परिषदेचा होता.पावित्र्य,चित्तशुध्दी, दयादाक्षिण्य गुणांचा मक्ता जगातील  कोणत्याही धर्माने घेतला नाही हेच या परिषदेने अत्यंत सुंदर रितीने सिध्द करुन दाखवले.जे धर्मांध लोकांनी कीतीही अडथळे आणले तरी स्पष्टपणे त्यांना अजिबात न जुमानता धर्मां धर्माच्या ध्वजावर लिहिले जाईल की, संघर्ष नको, परस्परांना सहाय्य करा!विनाश नको,आत्मसात करा,कलह नको,मैत्री हवी,शांती हवी!

         ज्यावेळी आपला संदेश देण्या साठी स्वामी व्यासपीठावर आलेत. त्यांच्यासमोर पाश्चात्य मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारा, श्रोतृसमुदाय तरुण,दक्ष,अस्वस्थ,जिज्ञासु,प्रामाणिक, शिस्तबध्द,भौतिक जगाशी जुळवुन घेणारा परंतु अतीद्रिंय जगाच्या गहनते विषयी संशयी असणारा आणि बुध्दी गम्य पुराव्यांशिवाय आध्यात्मिक स्विकार न करणारा होता.त्याचवेळी स्वामींच्या पाठीशी ऋषीमुनींचे,भिन्न भिन्न संप्रदायांचे आत्मसंयमन आणि ध्यानधारणेद्वारे शाश्वत सत्याची अनुभुती असणार्‍या संताचे होते.स्वामी विवेकानंदाचे शिक्षण व संगोपन वैयक्तीक अनुभुती व आध्यात्मिक भार तातील श्रीरामकृष्णांशी झालेला संपर्क यामुळेच प्रतिनिधित्व करीत असतांनाच दोन्ही जगांतील विभेद दूर करण्यास ते सुयोग्य प्रतिनिधी ठरले होते.भारतातील हा तरुण सन्यासी केवळ एका रात्रीतुन आध्यात्मिक जगातील एक असामान्य व्यक्तीमत्व म्हणुन गणला जाऊ लागला. ते अज्ञाताच्या अंधारातुन एकदम प्रसिध्दीच्या झोतात आले.त्यांच्या उंची च्या चित्रप्रतिमा व त्याखाली “स्वामी विवेकानंद” या शब्बासह शिकागो शहरा च्या रस्त्यावर झळकुं लागले व येणारे जाणारे क्षणभर अभिवादन करण्या साठी थांबु लागले.

त्यांच्या सभोवती गर्दी होत असे.त्यांचा प्रत्येक शब्द ऐकण्यास अगदी कट्टर सनातनी ख्रिश्चन देखील ऊत्सुक असत.

        न्युयार्क हेराल्ड या वृत्तपत्राने प्रसिध्दी देऊन म्हटले, सर्वधर्मपरिषदे तील हे एक निःसंशय महान व्यक्तीत्व आहे.भारतासारख्या ज्ञानसंपन्न देशात धर्मप्रसारक पाठवणे म्हणजे शुध्द वेडे  पणाच होय. “बोस्टन इव्हानिंग पोस्ट या वृत्तपत्राने म्हटले की, त्यांचे भाव-ऐश्वर्य त्यांचे व्यक्तीमत्वामुळे ते इतके प्रिय व आवडते झाले की, ते नूसते इकडुन तिकडे गेले तरी,

हजारो लोकांनी व्यक्त केलेली ही मान्यतादर्शक प्रशंसेने टाळ्या वाजवुन अभिवादन करीत असे.

एखाद्या अबोध बालकासारखे दिखाऊपणा न दाखवतां कृतज्ञता स्विकारीत.शेवट पर्यंत लोकांनी थांबावे म्हणुन विवेकानंदांचे व्याख्यान शेवटी ठेवत. कोलंबस सभागृहात चार हजार चाहते २-३ तास तिष्ठत बसत.

          अमेरिकेचे एक गुण वैशिष्ट्य आहे की, सुप्त गुणांना वाव मिळण्याची संधी उपलब्ध करुन देत.अमेरिकेने विवेकानंदाचा शोध लावला आणि भारत व संपुर्ण जगाला जणुं अनमोल देणगीच दिली. स्वामीजींनी हिंदुधर्माची जी दोषनिमुर्लनपुर्वक स्थापना केली, त्यामुळे कोलंबो, अल्मोडा आणि मुंबई ते कोलकाता अशा संपुर्ण भारतीयांचे अंतःकरणे अभिमानाने भरुन आली.सर्व धर्म परिषदेद्वारा आपला संदेश निवेदित केल्यावर मात्र त्यांना कशाचीही ददात पडली नाही. धनिकांच्या भव्यदिव्य शाही स्वागतामुळे आपल्या देशातील लोकांचे पिचुन टाकणारे दैन्यदुःख आठवले की, अंतर्यामी त्यांना खुप दुःख होत असे,

              क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-२३*

        पाश्चिमात्य देशातील लोक सुखसोयींवर कोट्यावधी रुपये उधळतात आणि भारतात घासभर अन्नासाठी, भाजी भाकरीसाठी त्यांची दुर्गती होत आहे,मग मला नांव आणि किर्तीचे काय महत्व? सत्रात बोलतांना स्वामी म्हणाले होते, भारताला धर्माची नाही तर अन्ना ची आहे.

स्वामीजींना वेगवेगळ्या संयोजक मंडळाद्वारे अमेरिकेत निमंत्रणें मिळु लागले.अमेरिकाभर हिंदु धर्म व हिंदु समाजाविषयी तेथील लोकांच्या मनांतील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांचा झंझावती दौरा सुरु झाला. लोक त्यांना “Cyclonic Hindu” म्हणजे वादळी व्यक्तिमत्वाचा हिंदु वक्ता म्हणु लागले.आयोवा सीटी,डेस,मिनेस,मेंफस इंडियानापोलीस,मिनिऑपोलीस,डेट्राईट, बफेलो,

हार्टफोर्ड,बोस्टन,केंब्रिज, न्युयार्क,बाल्टीमोर,वाशिंगटन या शहरां ना स्वामीजींनी भेटी दिल्यात.

     बरेचदा विघ्नसंतोषी अनुदार वृत्तीचे लोकं भारताबद्दल विद्वेषपुर्ण व चुकी च्या माहितीच्या आधारे चीड आणणारे प्रश्न विचारले की, स्वामीजींची प्रत्युत्तरे आकाशातील विजेप्रमाणे कडाडत आणि त्या मुर्ख प्रश्नकर्त्याचा भारतीय बुध्दीमत्तेच्या चमकत्या भाल्याने मर्मभेद  करीत.अनेक ख्रिस्ती धर्मोपदेशक विवेकानंदांना चर्चमधे बोलण्यास आमंत्रित करीत.मग ते भ्रष्ट ख्रिश्चन मता बद्दल,दांभिकतेबद्दल स्वामीजीा अत्यंत कडवट बोलत.ज्या गोष्टींचा पाया स्वार्थावर असतो,

जीच्यात स्पर्धा व सुखोपभोगाचा हेतु असतो,ती गोष्ट भविष्यात नामशेष होतेच.ख्रिस्तांवर उघड टीकाप्रहारांमुळे ख्रिश्चन मिशनर्‍यां चा फार मोठा गट त्यांच्या विरोधात तयार झाला. स्वामीजींबद्दल त्यांच्या मनात हाडवैर व द्वेषांनी भरुन ,कटुता व शतृत्व निर्माण झाल्यामुळे स्वामीजींच्या चारित्र्याविषयी खोट्या अफवा पसरवुन बदनामी करुं लागले.बदनामीच्या मोहिमेत त्यांच्या लोकप्रियतेमुळे मत्सर वाटुन कांही हिंदु संघटनांनी सुध्दा त्यांच्या अपप्रचाराच्या मोहिमेत भाग घेतला.विशेषतः थिऑसॉफी पंथीय लोक तर द्वेषबुध्दीने पेटुन जाहीरपणे बोलु लागले की,स्वामीजी सन्यास जीवनाच्या नियमांचे उल्लंघन करुन अभ्यक्षभक्षण आणि जातीपातीचे बंधने झुगारत आहेत.त्यामुळे स्वामीजींचे भारतीय पाठीराखे आणि शिष्य घाबरुन गेले. घाबरलेल्या मित्रांना स्वामीजींनी कळविले की, ख्रिस्ती उचापती करणारे भडक वृत्तपत्र असुन कोणताही सुशिक्षित अमेरिकन किंचित देखील विश्वास ठेवत नाही.अमेरिकेतील सर्व लोक व ज्ञानी ख्रिस्ती धर्मगुरु आपले प्रशंसक मित्र आहेत.

         अश्रध्द व शास्रविरोधी लोकांसोब त विवेकानंद अभक्ष्यभक्षण करतात या आरोपास प्रत्युत्तर देतांना स्वामीजी म्हणाले,मिशिनरींच्या निरर्थक लेखनाकडे कसे काय लक्ष देता?भ्याड पणाशी व उपद्रवी राजकारणाशी मला कांहीही देणेघेणे नाही.”परमेश्वर आणि सत्य” यावरच माझा विश्वास आहे. या प्रकाराने ते जराही विचलित झाले नाही. त्यांच्या धार्मिक व तात्विकतेने भरलेल्या व्याख्यानांना मान्यवर लोकांची उपस्थिती असे कित्येक लोकं व्यक्तीगत मार्गदर्शन सुध्दा घेत असत. सनातन धर्मतत्वांचा ऊपदेश व निष्ठावानांनी आपली प्रगती करुन घेण्यास सहाय्य करणे हीच ध्येये स्वामीजींसमोर होती.

स्वामींची निर्भय वृत्ती आंतरिक पावित्र्य, उच्च धेयासक्ती,आध्यात्मिक व्यक्तीमत्व आणि निष्कलंक चारित्र्य यामुळे प्रांजळ व निष्ठावान अमेरिकन शिष्यांचा गट त्यांच्याकडे आकर्षित झाला.वेदान्त प्रसाराचे कार्यकत्यांना प्रशिक्षित करण्या चे काम स्वामीजींनी सुरु केले.या तरुण सन्यासाने एक अतिप्राचिन,तरीही चैत्यन्यदायी तत्वज्ञान अमेरिकेला दिले.

          क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख

*!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-२४*

         सर्वधर्मपरिषदेची सर्व सांगता झाल्यावर, धर्मप्रवचनांच्या मोठ्या व्याख्यानमालेचे काम स्वामीजींनी अंगा वर घेतले.व्याख्यानाच्या माध्यमातुन अमेरिकेत वेदांतातील सत्याचे बीजा रोपन करणार होते,परंतु त्यांच्या लक्षात आले की, एखाद्या सर्कशीतील प्रमुख आकर्षनाप्रमाणे,प्रसिध्द पत्रकावर त्यांचे तैलचित्र छापलेल्या प्रधान गुणविशेष, दैवी हक्क प्राप्त वक्ता,आर्य वंशाचै प्रति निधिक प्रतिरुप व्यक्तिमत्व, इंग्रजी भाषे वरील प्रभुत्व,धर्मपरिषदेत गाजलेला प्रतिनिधी,त्यांची देहयष्टी,उंची,वर्ण, पोशाख,देखणेपण वगैरे वर्णन करुन त्यांना राबवुन घेत आहे,त्यामुळे त्यांचे मन उद्गिन्न झाले.म्हणुन त्यांनीसंयोजक मंडळापासुन फारकत घेऊन स्वतःच व्याख्यानांचे आयोजन करुन वेग वेगळ्या चर्चासंस्था,विविध मंडळे, खाजगी गट यांची निमंत्रणे स्विकारुन दर आठवड्याला १४-१५ व्याख्याने देत अमेरिकेच्या पूर्व व मध्यपूर्व राज्यांमधे भरपुर प्रवास केला.

          त्यांच्या व्याख्यानांना हजारो संखेने संमिश्र श्रोतृवर्ग,विद्यापीठ प्राध्या पक,उच्चकुलीन सुसंस्कृत स्रिया, सत्या चा शोध घेणारे साधक,निर्मळश्रध्दा असणारे इश्वरभक्त असत. परंतु त्याच बरोबर निंदक,हौसेगौसै नवस,उनाड लोकही असत. या सर्व अडथळ्यांचा त्यांना सामना करावा लागत असे. विशेषतः धर्मवेड्या ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रमुख अडथळा होता.त्यांना वाटायचे की, स्वामींनी फक्त  त्यांच्याच धर्माचा प्रचार व उपदेश करावा, याला स्वामींनी स्पष्ट नकार दिल्यावर,त्यांच्याविरुध्द अपप्रचार सुरु केला.तरी ते न डगमगता  ते येशुच्या उपदेशानुसार प्रेम,त्याग, सत्याची शिकवण देत ख्रिस्त हा मानवा चा तारणहार कसा आहे हे सांगणे सुरु ठेवले.इथे चर्च चा अर्थ  धार्मिक संप्रदाय असा घ्यायचाय! परत स्वामीजींना आपल्याकडे वळवुन त्यांच्या इच्छे प्रमाणे काम करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, पण स्वामीजींच्या स्पष्ट नकार दिल्यावर त्यांना दगा फटका,साम दाम,दंडाने त्यांना वळविण्याचा प्रयत्न केला पण निर्भीडपणे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरविले.स्वामींचे एकच उत्तर होते, “मी सत्याचा पाईक आहे” सत्य कधीही खोट्याशी मैत्री करुं शकत नाही.सर्व जग जरी विरोधात गेले तरी “सत्यमेव जयते” असेच मी वागेन.

        स्वामींनी याहुनही घातक शत्रुंचा सामना करावा लागला.ते शत्रु म्हणजे निरीश्वरवादी,

जडवादी,अज्ञेयवादी,बुध्दी प्रामाण्यवादी म्हणजे तथाकथित मुक्त विचारसरणीचे लोक, इश्वर आणि धर्माशी संबंधीत बाबींचे कट्टर विरोधक होते.पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि विज्ञाना तील मतांच्या आधारे, स्वामींच्या अति प्राचिन धर्माच्या सहज चिंधड्या उडवू या विचाराने न्युयार्क मधे आयोजित सभेस स्वामीनी विचार मांडण्यासाठी पाचारण केले. परंतु स्वामीजी न डगमगता त्यांच्याच शब्दशस्राचा कौशल्याने वापर करुन त्यांच्यावरच प्रतिहलला करुन स्वामींना हरवण्याचा त्यांचा प्लॅन उलटवुन नामोहरन केले.

      सर्वसामान्य धर्माविषयक,विशेषतः हिंदुधर्माचे अज्ञान, अंधश्रध्दा आणि विकृत विचार नाहीसे करण्याचे दुष्कर कार्य स्वामीजींनी केले.पण कधी कधी नैराश्य त्यांना घेरत असे. सार्वजनिक जीवनातील सहभाग,वृत्तपत्रातील भडक व निरर्थक प्रसिध्दीचा त्यांना उबग आला होता. १५ मार्च १८९४ मधे शिकागोतील हेल भगीनीला लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, मी Cyclonic (तुफानी) नाही.इथले तुफानी वातावरण सहन होत नाहीय! शांत, सौम्य, सुंदर,सखोल मर्मग्राही विचार, ज्या विचारांना शुध्द, स्वच्छ आंतरिक प्रतिसाद व शांती मिळेल असे वातावरण मला हवे आहे. श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी बडबडण्याचा मला आतां वीट आलाय!

          क्रमशः    
संकलन – मिनाक्षी देशमुख.

*!!!स्वामी विवेकानंद!!!

भाग-२५*

       अमेरिकेतील कांही लोक प्रशंसक व भक्त असुन ते स्वामीजींची सर्वतोपरी काळजी घेत.विशेषतः स्रीवर्गाची कृतज्ञता व्यक्त करत ते म्हणाले,या राष्र्टातील स्रियांसारख्या  स्रिया जगांत कुठेही नाहीत.येथील स्रिया निर्मळ अंतःकरणाच्या,स्वतंत्र बुध्दीमत्ता,आत्म निर्भर आणि दयाळु,विद्वता,संस्कृती एकवटलेली असुन ह्या या राष्र्टाचे जीवन व आत्मा आहेत. इथे स्रीयांना अतिशय मानसन्माने पाहतात.सौंदर्य संपदेच्या रुपात, त्या संपतीची देवी, लक्ष्मी, गुणांच्या बाबतीत विद्येची देवी स्वरस्वती सारख्या आहेत.त्या प्रत्यक्ष जगन्मातेचा अवतारच वाटतात.

अमेरिके सारखे स्रीदाक्षिण्य जर भारतात निर्माण होऊ शकले तरच भारताची प्रगती होऊ शकेल.

        गेल्या वर्षी दूरच्या देशातल्या, ज्याचे नांवगांव कुणाला माहित नव्हते, ज्याचे कोणी मित्र,परिचीत नव्हते, असाहाय्य,निर्धन, प्रचारकाच्या रुपात या देशी आले तेव्हा याच अमेरिकन स्रीयांनी कोणी भाऊ,मुलगा,आप्तजन म्हणुन आश्रय देऊन घराचे द्वारे खुले केले.जेव्हा त्यांच्या धर्मगुरुने या सन्यासा पासुन धोका आहे म्हणुन त्यांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला,तेव्हा देखील त्यांनी अंतर दिले नाही.हा नियम सर्वांच्याच बाबतीत लागु पडेल असेही नाही.

चांगल्याबरोबर वाईटही सर्व ठीकाणी असतेच.

      त्याचवेळी भारतीय स्रियांची दैना व स्थिती आठवुन त्यांचे मन विषन्न झाले. स्वामीजींच्या सख्या बहिणीनेच दुर्दैवी परिस्थीतीमुळे आत्महत्या केल्याचा प्रसंग आठवला.हिंदु लोकांनी आपल्या स्रीवर्गाला जी वाईट वागणुक दिली तीच भारतभुमीच्या दुःखदैन्याचे मोठे कारण  आहे.म्हणुनच स्वामीजींना मिळालेल्या पैशातुन वराहनगर येथे विधवांच्या संस्थे ला मदत पाठवली,शिवाय हिंदु स्रीयां च्या बौध्दिक पुनरुत्थानासाठी पाश्चिमा त्य राष्र्टातुन शिक्षिका पाठविण्याचा विचारही त्यांनी करुन ठेवला.

         अमेरिकेतील दानशूरता,औदार्य व भारतीय लोकांची स्वतःच्याच बांधवा विषयीची अहिष्णुता,गोरगोरीबांना व निम्नस्तरीय लोकांना पायदळी चिरडुन त्यांच्यावर केलेला अन्याय ही तुलना केल्यावर त्यांच्या मनात अतिशय चीड निर्माण होत असे.यात धर्माचा दोष नसुन,दोष आहे तो,धर्मांधांचा व धर्मा च्या कट्टर अनुयायांचा!

       सामान्यजनांच्या पुनरुत्थाना संदर्भात स्वामीजींनी आपल्या भारतीय भक्तांना १८९४ मधे एका पत्रात म्हटले की, दारिद्र्य,पुरोहितबाजी आणि अत्या चारांनी पिडित झालेल्या कोट्यावधी पददलितांसाठी आपल्यापैकी प्रत्येकाने रात्रंदिवस कार्य करण्याची गरज आहे. मी कांही तत्व,

दार्शनिक किंवा संतही नाही. परंतु मला यांच्या वेदना,दारिद्र्य, अज्ञान पाहुन अंतःकरणाला पीळ पडतो हे लोक म्हणजेच इश्वर!

         सध्या स्वामीजी अमेरिकेत उत्तमोत्तम सुखसोयी, सपन्नाता उपलब्धता असतांना उत्तरोत्तर यशाच्या शिखरावर चढतांना सुध्दा भारतातील लोकांबद्दलच्या कर्तव्याचा थोडाही विसर पडलेला नव्हता.कारण पराव्राज क अवस्थेत एक अज्ञात सन्यासी म्हणुन हिमालयापासुन कन्याकुमारी पर्यंतच्या परिभ्रणांच्या काळात या सर्वसामान्य लोकांचे दुःखदैन्य अगदी जवळुन पाहिलेले होते.सर्वधर्मपरिषदे नंतरचा पुर्ण वर्षभराचा काळ स्वामीजींनी मिसि पिसी नदीपासुन अॅटलांटिक महासागरा पर्यंत पसरलेल्या प्रदेशात सार्वजनिक सभांमधुन व्याख्याने देण्यात व्यतित केला.व्याख्यानासाठी ते डेस्टाईट शहरात सहा आठवडे श्रीमती जॉन बॅगले यांच्याकडे होते.नंतर ते जागतिक प्रदर्शनाचे अध्यक्ष,अमेरिकेचे भूतपूर्व सिनेट,स्पेनमधील परराष्र्ट मंत्रीचे पद भुषवलेल्या थॉमस डब्ल्यु पामर यांचे अतिथी म्हणुन राहिलेत.डेट्राइट मधील ग्रीनस्टायडल नंतर सिस्टर ख्रिस्तीन नावाने स्वामीजींच्या निष्ठावान शिष्या बनल्या.भारतीय स्री शिक्षण विकासा साठी जे कार्य कोलकात्यात सुरु झाले. त्यामधे भगिनी निवेदितांच्या सहकारी म्हणुन सिस्टर ख्रिस्तीन ने निरलसपणे कार्य केले.

            क्रमशः   

संकलन – मिनाक्षी देशमुख.

स्वामी विवेकानंद चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading