श्री समर्थ रामदास भाग ६, (२६ ते ३२)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


संतवाड्ःमयाच्या अभ्यासकाला समर्थ वाड्ःमय टाळुन पुढे जाताच येत नाही. इतर संतापेक्षा अगदी वेगळी वाट चोखळलेला हा शस्रधारी संत! स्वान्तुसुखाय अध्यात्ममार्गाच्या बरोबरी नं पुरुषार्थ घडणार भक्कम समाजरचनेची आलोचना करणारा हा संत! माणुस-माणुस अंतर्बाह्य पारखुन शिवकारणासाठी जोडण्याचा प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरु!

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!श्री समर्थ रामदास !!

श्री समर्थ रामदास

भाग  –  २६.

      समर्थ शोध घेत फिरत असतांना उंब्रजच्या पश्चिमेला चाफळवाडीचा परिसर त्यांच्या डोळ्यांत भरला.सर्वांच्या उत्स्फुर्त मदतीने चाफळला आश्रमाची निर्मिती झाली, पण हे सर्व होत असतां समर्थ उदास होते, कारण महाराष्र्टात  उभ राहणारं स्वराज्याचं रोपटंच उध्वस्त होणार की काय, असं राजकीय वातावरण निर्माण झालं. स्वकीय बाजी घोरपड्यांनी बेसावध शहाजीराजांना कैद केले. स्वधर्मावर व स्वराज्यावरच्या संकटाने त्यांच मन बेचैन झाले की, मनी ची चिंता, तडफड, आर्तपणे एकांतात बसुन समर्थ प्रभु रामाला सांगायचेत.   “उदासीन हा काळ जातो गमेना।सदा सर्वदा थोर चिंता शमेना।। उठे मानसी सर्व सांडुनि जावे। रघुनायका काय कैसे करावे?” रामराया  रामराज्य स्थापन व्हाव म्हणुन हा तेजस्वी तरुण शिवबा अहोरात्र धडपडतो आहे, आणि स्वकीय च शत्रु होऊन उभे ठाकताहेत.एकीकडे  विजापुर ज्यानं शहाजींना दंडबेडी घातली, तर आग्र्याचा मोगल,आदिल शहा कोवळ्या शिवबाला पाताळांत घालायला टपुन बसलेत.

       हरघडी सुन्न करणार्‍या वार्ता ऐकुन रामराया! लोकांना विवेक सांगणारा मी… स्वतःचाच विवेक सुटु लागला. स्वराज्य, स्वधर्म, आत्मप्रतीष्ठा नसेल तर  हा सारा संसारच व्यर्थ आणि वायफळ होइल. स्वराज्यमंदिराच्या वीटा ठणठणी त,आघात सहण करणार्‍या मोहामुळे विरघळुन न जाणार्‍या वीटा तयार करुन  शिवबाकडे पाठवायला हव्यात. जिजाई चं कुंकु शहाजीराजेंना शिवबाने अदिलशाहाला कटशह देऊन कैदेत असलेल्या पित्याची बिनशर्त सुटका केल्याची आनंद वार्ता सिंघणवाडीच्या एका विशाल वृक्षाखाली ध्यानस्थ असले ल्या समर्थांना मिळाली म्हणुन, तिथेच एका रुद्राची स्थापना करायचे निश्चित केले. उरलेल्या दोन रुद्राची स्थापना प्रभूच्या आगे मागे करायचे ठरविले.

       समर्थांची अचानक भावसमाधी लागली. अंगापुरच्या डोहात अतिशय आखीव रेखीव सुबक सुंदर लोभसवाणी रामरायाच्या मूर्तीचे दर्शन झाले. दुसर्‍या दिवशी विनम्र भावाने रामाला आळवित  तेराक्षरी मंत्राचा पुनरुच्चार करीत डोहात उडी मारली, वरच्या पायरीवर कुणी ब्राम्हण प्रातःसंध्या करीत असतां समर्थांनी डोहात उडी मारल्याचे पाहिले तो तसाच आरडा ओरडा करत गांवात शिरला. सारं गांव घाटावर लोटलं. समर्थांचा शोध घेत कल्याण, उध्वव पण डोहाकडे आलेत. घडला प्रकार कळल्यावर लोकांना शांत करत म्हणाले चिंता करु नका. गुरुमाऊली योग्यवेळी डोहातुन नक्की वर येतील.थोड्या वेळाने प्राचीन शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना असलेली पाषाण मुर्ती मस्तकावर धारण करुन सुस्नात समर्थ घाटाच्या पायर्‍यांकडे येऊ लागले. सार्‍या समर्थ शिष्यांनी उत्स्फुर्तपणे जयजय रघुवीर समर्थ असा जयघोष केला.

सार्‍या गावकर्‍यांनी समर्थापुढे लोटांगण घातले. पाटलांना समर्थ म्हणाले, चाफळवाडीला या रामाची प्रतिष्ठापना झाल्यावर निशाणीची काठी धरायचा मान तुमचा राहील, मात्र ही काठी साधी नाही, धर्मदंड आहे तो, त्याचा उपयोग राजदंडाच्या रक्षणासाठी करायचाय!

         क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री समर्थ रामदास

भाग  –  २७.

       आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरात देहुचे तुकाराम महाराजांचे किर्तन संपल्यावर शिवबा त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर तुकाराम म्हणाले, राजे! राजदंडाच्या आधाराला धर्मदंडा  ची फार गरज असते. दुष्टांचं परिमर्जन, गो-ब्राम्हण आणि मंदिरांचं संरक्षण, राज दंडाबरोबर धर्माची प्रतिष्ठा वाढवण आपल्याला करायचं आहे. त्यासाठी कृष्णेकाठी एक महामानव लोक जागरण रामभक्ती बरोबर रामाच्या पराक्रमाचा प्रसार करीत आहे. त्यांचा धर्मदंड आपल्या राजदंडाला मिळाला तर या मर्‍हाट देशी आपल्याकरवी राम राज्य उभं राहण्यासाठी त्यांच्या अनुग्रहा ची स्वराज्याला गरज आहे. त्या समर्थ रामदासांची बारा वर्षाची तपश्चर्या आणि अवघ्या भारत वर्षाचं आसेतुहिमाचल पदभ्रमण करुन सध्या ते कृष्णातीरी असुन चाफळवाडीला रामाच्या प्रतीष्ठाप नेचा उत्सव करीत आहे.शिथिल समाजावर फुंकर घालुन जागं करण्याचा अखंड प्रयत्न ते करीत आहेत.

       टाकळी क्षेत्री कठोर साधना केललं परसत्तेने पिडलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झपाटलेले. मनातला निद्रिस्त राम जनात उभा करण्याचा खटाटोप करणारे अशा या समर्थाची भेट हा हिंदवी स्वराज्याचा अरुणोदय असेल

न लगे मुक्ती धनसंपदा, संतसंग देई सदा तुका म्हणे गर्भवासी! सुखे घालावे आम्हासी।। ज्ञानोबा माऊलीच्या साक्षीनं तुकोबारायांनी रंगवलेलं हे मराठी स्वातंत्र्यभूमीचं चित्रण  ऐकुन शिवबा चे सारे अष्टसात्विक भाव जागृत झाले. नेत्रातुन आनंदाश्रु येऊ लागले. तुकारामा च्या रुयानंं मारुतीनचं राजांना गुरुकृपेची खुण सांगीतली,

     सिंघणवाडीचा मारुती, चाफळवाडी च्या नव्या मंदिरामागचा व पुढचा!  ठरले ल्या अकराही रुद्रांची स्थापना झाल्याने समर्थ समाधान पावले. येणार्‍या चैत्र नवमीला मान नदीच्या किनारी समर्थांनी स्वतःच्या कल्पनेने उभारलेल्या नवीन मंदिरात प्रतीष्ठापना, तेराक्षरी नामाचा मंत्रजप व नौबतीच्या गजरांत ग्रामसीमे वर सजवलेल्या रथात रामरायाची षोडोपचार करुन पुजिलेली मूर्ती विराजमान करुन अंगापूरच्या पाटलांनी निशानाची काठी धरुन, भक्तांचा समुदाय, टाळकरी, भक्तमेळावा,शिष्य मेळाव्यासह दमामे, सनई-चौघड्याच्या गजरात हळुहळु रथ नवीन मंदिराकडे निघाला.

          समर्थ कल्याणासह गाभार्‍यात अनावश्यक कर्मकांड न करतां अत्यंत विनम्रपणे समर्थांनी राममूर्ती आसनावर उभी केली.चाफळचा प्रभुराम अवघ्या परिसराची आई झाला.ही सर्व किर्त ऐकुन शिवबांच्या मनीसमर्थांच्या भेटीची ओढ लागल्यास काय नवल? आपल्या खड्ःगाच्या धारेला विवेकविचारांची मुठ हवीच, त्यांच्या सलहाची गरज आहे. आणि समर्थांनाही शिवबांच्या भेटीची ओढ लागलेली होतीच….

        परशुरामक्षेत्री आल्यावर समर्थांची तळमळ आणखी वाढली. परशुरामाचा डोंगर व त्यातील एकांतवास करण्यासाठी असलेली गुहा त्यांना अतीशय भावली. या गुहेत चिंतन करीत असतां समर्थ अधिकच विमनस्क झाले.

संपुर्ण माणुसपण हरवलं की, युगांत होतो परत अवताररुपाने माणुस धर्माच्या पुनर्स्थापना, मानसातल्या पशूत्वाचा विनाश, पुनः पुनः हे चक्र सुरु राहते. या सह्यागिरीच्या कुशीत क्रोर्याचा नाश करुन समाजाला स्थैर्य देण्याचं… सध्दर्मसंस्थापनेचं एक स्वप्न नांदतय! शिवबाच्या खड्गाला तुझ्या परशुच्या धारेची, तपसामर्थ्याची, दिव्यास्रांची नितांत गरज आहे. या कलीयुगात “राजा कालस्य कारणम् हे सूत्र विचारात घेणे ही राजाची गरज आहे.

         क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री समर्थ  रामदास

भाग  – २८.

          शिवबाने चाफळकडे जायचे निश्चित केले असतांनाच दिवाकर गोसावी आल्याचे त्यांना कळले. दिवाकरांनी समर्थांनी दिलेले पत्र शिवबां च्या हाती देऊन विनाविलंब स्वामींना भेटण्याचा सांगावा दिला.स्वामींच्या पत्रा मधल्या फक्त एका ओळीतच त्यांच्या सार्‍या विचाराचं मर्म दडलेलं आहे.

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षा ऐसा नाही। महाराष्र्ट धर्म राहिला काई। तुम्हा करतां ।। दुहीचे राजकारण रक्त सबंध जोडल्यावरही क्षुद्र स्वार्थापायी यवनांना  मिळणे, दत्तक यशवंतरावांना “चंद्रराव” किताब मिळाल्यावरही तो ऊपकर्त्या शिवबांवर उलटला. सारे अस्तिनातले निखारे शिवबाच्या स्वराज्य स्वप्नाला वणवा लावण्यासाठी टपून बसलेले,असे निखारे वेळीच विझवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही राजनीती अवलंबव ल्याशिवाय रयतेला स्वकीय राजा मिळणार नाही. स्वराज्याची द्वाही फिरली की, धर्मस्थानं निर्भय होतील!हे सर्व सांगण्या-बोलण्यासाठी शिवबाची प्रत्यक्ष भेट होणे आवश्यक आहे.

       शिवबा खासे स्वारांसह चाफळकडे

निघाले असतां सप्ताहभरांत त्यांचे मनी विचार आले, सह्याद्रीसारखं ताठ उभं राहावे यासाठीच आबासाहेबांनी दूर डोंगरमूलखात पाठवले असावे, पुरातन काळी असुरांची जी वर्णने ऐकली होती तीच यवनांची जातकुळी, कुलाचार तोच दानवी यांचा धर्म! गेल्या २००-२५० वर्षे या दानवी धर्मानं अवघ्या भरतभूमीवरच बलात्कार केला. त्यांना शासन करण्या साठी अधुन मधुन पेटुन उठलेही, पण या मोठ्या भयानक वादळात निखारा फुलण्याआधीच ठीणगी बनुन विझुन गेली. पण अवघ्या भरतखंडावर मशाल पेटवण्याचा नवा विचार घेऊन गोदा कृष्णेच्या परिसरांत महाराष्र्टधर्माचे एक अभिनव स्वप्न साकारण्यासाठी महा मानव अवतरला. यासाठी समर्थांचा उपदेश, अनूग्रह, आदर्श, राजधर्म सांगणार्‍या या तेजस्वी शक्तीपुढे पदर पसरुन भीक मागायची…..

        सिंधनवाडीच्या रानांत समर्थ आत्मचिंतनांत मग्न असतांना, उध्दवाने सांगीतले की, प्रत्यक्ष शिवाजी राजे एकटेच आपल्या भेटीला येत आहे. शिवबा सारे उपचार, देहभान विसरुन, अष्टसात्विक भाव जागृत होऊन, जसे पाडस हरणीकडे, पिलू पक्षिणीकडे, प्रकाश ज्योतीकडे धावते, तद्वतच ते समर्थांच्या अलिंगपाशात बध्द झाले. उपदेशाची याचना नेत्री दाटली. समर्थ म्हणाले, तुम्ही प्रत्यक्ष शिवाचे अंश आहात! बाह्य लक्ष तुम्ही सांभाळा, आम्ही अंतरलक्ष्याची उपासना करुंं!    

        शिवबांनी सुवर्णमुद्रांनी भरलेली पिशवी समर्थचरणी ठेवुन म्हणाले, ही गुरुदक्षिणा! आमच्यावर शिष्य म्हणून अनूग्रह करावा…समर्थांनी निस्पृहपणे थैलीतील सुवर्णमुद्रा जनतेवर उधळुन म्हणाले, जे जनतेचे होते ते त्यांना दिले. आतां या रिकाम्या थैलीत काय भरुन देऊ ते सांगा! शिवबा अत्यंत नम्रपणे म्हणाले, मी अज्ञानी, आपण सर्वज्ञ! जे द्याल ते प्रासादिकच असेल… राजे! देणाराही व घेणाराही तोच प्रभू रामचंद्र! भोजनोत्तर रात्री जे जे रामचंद्र देईल ते ते थैलीत भरुन घ्या. आपण अनुग्रहीत आहात. आम्ही तर जोग घेतलेला! पण तुम्हाला प्रपंच करायचाय, स्वतःचा आणि राजे म्हणुन पुर्ण महाराष्र्टाचा…!” तुम्हाला विविध पंथ, विचारप्रणाली, आचारविचारांनी युक्त सनातन धर्माचा विकास, सार्वत्रिक सौख्य साधुन अधर्माला हाकलायच आहे.

           क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री समर्थ  रामदास

भाग  –  २९.

        समर्थाकडे शिवबा बघत असतांना तपःसामर्थ्याचं तेजोवलय समर्थाभोवती प्रकाशलेलं त्यांना जाणवलं. समर्थ तळमळीने शिवबाला अनूग्रहित करत होते, “देवद्रोही तितुके कुत्ते।मारुन घालावे परते। देवदास पावती फत्ते। यदर्थी संदेह नाही. म्लेच्छं दुर्जन उदंड। बहुता दिसांचे माजले बंड। याकारणे अखंड सावधान असावे।। तिर्थक्षेत्र मोडिली। ब्राम्हणस्थळे भ्रष्ट झाली।सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला।।” शिवरायांच्या अंगावर सहस्रावधी रोमांच उभे राहिले. राजे आल्याचे कळल्याने पंचक्रोशीतील जनतेने गर्दी केली. रात्री समर्थांनी केलेल्या रसाळ, ओघवती भाषेत किर्तन, निरुपण ऐकुन खुप दिवसांनी शिवरायांना निरामय आनंदा ची अनुभुती आली. रात्रभर शिवबांना झोप आलीच नाही. सद्गुरुंचा पुर्ण अनुग्रह झाल्याशिवाय हा परिसर सोडायचा नाही. बस ठरल! रात्रीच्या किर्तनानंतर समर्थांचे दर्शन न झाल्याने अस्वस्थ शिवबांना दिवाकरने निरोप दिला की, रामघळीत एकांतात समर्थ भेटु इच्छितात. बलभीमासारख्या कल्याणस्वीमी सोबत मशालाच्या उजेडांत शिवबा डोंगर दर्‍या, खाच खळगे, खडकाळ पायवाटेवरुन चालत रामघळीत पोहचले. ध्यानस्थ समर्था समोर शिवबा गुडघे टेकुन बसले असतां त्यांचेही देहभान हळुहळु हरपायला लागुन जाणिवेतुन सुक्ष्मदेहानं नेणिवेत प्रवेश केला. मिटलेल्या नेत्रापुढे ब्रम्हांड,अववघं सृष्टीचक्र,दहाही अवतार फिरुं लागले. ध्यानस्थ समर्थांच्या मुद्रेवर गुढ हास्य पसरलं. शिवराया अजुनही भावावस्थेत चक्राकार गतीने फिरत होते त्यांना सहज स्थितीत आणण्यासाठी समर्थांनी त्यांच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवुन मृदु स्वरात म्हणाले… उठा राजे, मी-तू पणाचा भेद संपला. सार ब्रम्हस्वरुप आहे याची जाणीव म्हणजेच अत्मारामाची जाणीव! राजे! उत्तम शिष्याची सारी लक्षणे एकट्या तुमच्यात समावली आहेत. रयतेची तुमच्याकडुन निरामय स्थिर जीवनाची अपेक्षा आहे. रामधर्म आणि राजधर्म एकत्रीत करुन जे राजकारण कराल ते या मर्‍हाट देशाचं शिवकरण होईल.

         समर्थासह भैरववाडी, बोरगेवाडी

उतरुन शिंगणवाडीवरुन चाफळजवळ आले. संपुर्ण दिवस शिवबा कांहीशा ऊन्मनी अवस्थेत होते. समर्थ मठामधे बसुन ओवीबध्द करीत असलेल्या रचना, मोत्यासारख्या टपोर्‍या अक्षरात कल्याणस्वामी झरझर उतरवुन घेत होते कल्याणस्वामी म्हणाले, स्वामी आजवर चं सारं आपण सांगीतलेलं अभिनव चिंतन लिहुन झालेलं संप्रदायाला बोध देणारा “दासबोध” ग्रंथ तयार होईल.! देवालयाच्या सभामंडपात खासे राजे, अमात्य  व त्यांचे डावे उजवे जिवलग मंडळी, समर्थ आज कांहीतरी नाविण्य सांगतील या उत्सुकतेने जमली होती. समर्थ बोलु लागले…. राजे आपण लोक नेते असल्यामुळे लोकसंग्रह ही अनिवार्य गरज आहे. लोकनेत्यावर विश्वास बसण्यासाठी परमेश्वरावर अनन्य विश्वास, निष्कलंक चारित्र्य, अखंड सावधपणा व चौफेर असणं हे अत्यंत आवश्यक आहे. लोकनेता दीर्घौयोगी असावा. लोकशंकेचं निरसन, अलिप्त आणि नितिन्यायानं वागुन कार्यक्षेत्र व्यापक असावं. जो जनसमुहाचं संपुर्ण समाधान करुं शकतो तोच खरा आदर्श नेता! आज भारतवर्षाला अशाच राजा ची नितांत गरज आहे. यापुढे आपल्या शी सतत संपर्कात राहण्यासाठी वाघजाईच्या एकांत घळीत आमचा मुक्काम असुन तिथेच ग्रंथनिर्मिती सुध्दा होईल.

        क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री समर्थ  रामदास

भाग  –  ३०.

       समर्थाबरोबर कल्याण, अनंत आणि चिमणाबाई आक्का घनदाट झाडीतुन अवघड डोंगर दर्‍या ओलांडुन शेवळावरुन पाय घसरत होते तरी सांभा ळत एकदाचे घळामुखाशी पोहोचले. सह्यांद्रिच्या कुशीतील निसर्गरम्य घळ समर्थांनी पुर्वीच हेरुन ठेवली होती. अनंतस्वामीच्या मदतीने आक्काने घळी व सारा परिसर स्वच्छ केला.सकाळी  सर्व आवरुन समर्थ आजुबाजुच्या गांवां मधे  माधुकरीच्या निमित्याने जाऊन अनेक प्रकारच्या लोकांना भेटुन माहिती गोळा करावी, त्यांचे संवर्धन करावे.

       समर्थ फक्त स्नानसंधेपुरते बाहेर पडायचे बाकीचा सर्व वेळ ध्यान,चिंतन!

 ठरल्याप्रमाणे शिवथर खोर्‍यात समर्थ आल्याचे शिवरायांना कळली. राजकार णासाठी व जावळीच्या चंद्रराव मोरेची माजलेली पुंडाळी मोडण्यासाठी समर्थां च्या उपदेशाची सल्ल्याची अत्यंत निकड वाटली. कल्याणस्वामीलाही चंद्रराव मोरेच्या मग्रुरीचा अनुभव  आल्याने ते शिवथर घळीत आल्यावर गुरुशिष्याचा संवाद झाला. समर्थांनी शिवबासाठी दिवाकरजवळ गुप्त पत्र दिले, त्यात अमर्याद आणि फितवेखोरां चा संहार करावा  असा स्पष्ट विचार सांगुन समर्थ पुढे म्हणाले….. गनिमांच्या देखता फौजा रणशूरांच्या फुर्फुरती भुजा ऐसा पाहिजे का राजा। कैपक्षी परमार्थी तयास देखता दुर्जन धाके। बैसवी प्रचीतीचे तडाखे। षंड पाषांडाचे वाखे सहजची होती।। हे धूर्तपणाची कामे।राजकारण करावे नेमे। ढिलेपणाच्या संभ्रमे। जाऊ नये।। लौंडीचे दूरी घालावे मारावे राजकरणा।।  पत्र वाचुन शिवबां ना मोरेचा बिमोड कसा करायचा हे सुचले. जावळीवर चौफेर चढाई करुन जावळी व बहादुर मुरारबाजी देशपांडे सारखा हिरा स्वराज्यास मिळाला. पण या धुमचक्रीत चंद्रराव रायरीगडात लपुन बसला. शिवबाने गडाला वेढा घालुन चंद्रराव व रायरीगड ताब्यात आला. रायरीचे नामकरण झाले राजगड! चंद्र रावाची गर्दन मारली गेली. जावळीच संरक्षण, देश आणि कोकण दोन्हीकडे गरुड दृष्टीने पाहण्यासाठी भोरप्याच्या गडाची निवड झाली, त्याचे नामकरण केले प्रतापगड! पाठोपाठ मायभवानी, असूर मर्दिनी तुळजाभवानीच ठाणही प्रतापगडावर आलं.

          समर्थाच्या प्रेरणेने प्रतापगडा भोवतीच्या सार्‍या मोक्याच्या ठीकाणी दिवाकरने बलभीमाची उपासना आणि प्रभुरामचंद्राची महती समाजाच्या मनी रुजवत मारुतीची मंदिरे व रामदासी मठाचे जाळे विणण्यास सुरुवात केली.परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसेच समर्थांच्या वास्तव्याने छोट्याशा घळीचे मठात रुपांतर झाले.निसर्गाचं सुंदर लेणं लाभलेल्या मठाला “सुंदरमठ” म्हणुन प्रसिध्द झाला. या खोर्‍यातील रयत दरिद्रीने व अन्याय अत्याचाराने पिडलेली, त्यांची तृप्ती झाल्याशिवाय त्यांना स्वराज्याची महती कळणार नाही. राजा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची जाणीव रयतेला होण्या साठी कांहीतरी अभिनव कल्पना या खोर्‍यात राबवयाला हवी, असा विचार माचीवरुन सारा परिसर निरखत रात्रभर समर्थ विचार करीत होते.

         पुढे भाद्रपद, अश्विन, कार्तिक येणारे तीन्ही मास आपल्या सणावारांचे गणपती, नवरात्र, दिपावली या तिन्ही सणांचा आनंद रयतेला घेता आला तरच त्यांच आजवरचं दुःख, वेदना कमी होतील! ठरल तर! सुंदर मठात शिवबां ना बोलावुन त्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरल्यावर कांही दिवस दासबोधाचं लिखान स्थगीत ठेवुन सर्व शिष्य गणेशोत्सावा च्या तयारीला लागलेत. शिवथर खोर्‍या तील जनतेला गणेशोत्सावासाठी आमंत्रण देण्याविषयी शिवबाला समर्थांनी पत्र दिले

            क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री समर्थ  रामदास

भाग  –  ३१.

‌    भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी ला प्रत्यक्ष राजे खडकेश्वराचं दर्शन घेऊन, खालची शिवथर, वरचं चेराव समोरचं सुनेभाव, त्यामागे माझेरी, वाकी, पडवी,बारसगांव,वरंध, आलं. रयत, पाटील, देशमुख, खोत सारे वतनदार रुमालानं हात बांधुन शिवराया समोर नम्र झाले. राज्यांच्या हस्ते गणेशपुजन झाल्या नंतर पगती उठल्या. रात्री कुंडावर च्या खडकावर बसल्यावर शिवरायां नी मनांतील शंका समर्थांना विचारली, स्वामी! अकरा मुठी भिक्षे वर एवढा मोठा महोत्सव कसा व्हावा?

‌      शिवबा! या शिवथर खोर्‍यांत अकरा गांव आहेत. ही सारी गांव स्वराज्यात आल्यामुळे स्वराज्याची पहिली खुण म्हणुन त्यांचा वर्षभर सारा माफ केल्यास रयतेचं शारीरीक व मानसिक बळ वाढेल, हेच आम च्या अकरा मुठी।” राजे! आम्हाला अकरा मुठीचं आश्वासन देऊन रयते चा दुवा घेतला, त्याबदल्यात आम्ही आपल्याला अकरा  ओव्यांचा राम प्रसाद देतो….

‌       अफझल खानाने शिवबाला गिरफ्तार करण्याचा विडा उचलला.  अफझलखानाने मांडलेला उत्छेद आणि स्वराज्याला चिरडण्यासाठी ची शक्ती ही समग्र माहिती दिवाकर ने समर्थांना दिल्यावर समर्थ म्हणाले   दिवाकरा! संकट तर भयानक आहे.अफझल विजापुरला निघाल्या चे गुप्त पत्र  राजांना देऊन म्हणाले, खान पिसाळला, स्वराज्यावर चाल करुन येत आहे. जशास तसे, खटास खट होऊन, विवेकाने इष्ट योजना आखुन त्याचा निःपात करावा.

‌        शिवरायांची भवानी तलवार आदिलशाहीच्या प्रांतावर पडुन अवघ्या पंधरा दिवसांत सारा मुलुख जिंकुन कोल्हापूरला आलेत.अदिल शहाचं नाक कापुन मिळालेली अगनित लूट बंदोबस्तात पुण्याकडे रवाना केली. सिध्दीजोहर आणि अफझलखान हे शिवरायांनी डिवच लेले अग्निबाण पन्हाळ्यावर सोडले.राजांनी हिकमतीने पन्हाळ गडाचा वेढा फोडुन  शूर बाजीप्रभूंनी पावनखिंड लढविल्यामुळे राजे विशाल गडावर सुखरुप पोहोचले. पण? बाजीसारखं मोलाचं व महत्वाचं रत्न खर्ची पडलं….

           शिवराय राजकारण आणि समर्थ समाजकारण, धर्मकारण करीत होते. दासबोधाचे अभिप्रत असलेले संकलन जवळजवळ पुर्ण होत आले होते. त्यामुळे समर्थ फक्त सुंदरमठात न राहतां सतत वेगवेगळ्या मठात संचार करीत होते. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही धारणा समर्थ प्रत्यक्ष आचरत होते. त्यांना स्वतःचं ब्रम्हरुप उमगलं…

        राजकारणाचे फासे उलटे पडले. नाइलाजाने पुरंदरचा तह करुन मना विरुध्द मोगलाची मनसबदारी पत्करुन शिवबांनी मिर्झाराजे जयसिंहाशी बोलणी सुरु केली, पण दिल्लीला जाऊन औरंगजेबाची भेट घेण्याचा एक च घोषा मिर्झाराजांनि लावला. शिवबा अस्वस्थ झाले.कुणाचा सल्ला घेणार? सासवड वरुन आलेले शिवबा राजगडावर पोहचल्यावर हताश मनाने अस्वस्थ होऊन त्यांनी कळवळुन सद्गुरुचे स्मरण केले.त्याचवेळी कानावर “जयजय रघुवीर समर्थ” अशी साद आली. दिवाकरने समर्थांचे पत्र त्यांच्या हाती दिले. पत्रात लिहिले होते की….

         आल्या प्रसंगाला तोंड देत, स्वतः चा अहंकार कुरवाळीत न बसतां संकटा ला समोर जाऊन विवेकाने सामना करावा. उत्तरप्रांती जाणे ही काळाची गरज! नको तिथं जावं लागेल, नको ते खावं लागेल, नको ते बोलावं लागेल हीच श्रींची इच्छा ! दिवाकरने समर्थांचा संदेश देऊन म्हणाले यापुर्वी केलेल्या उपदेशाचे स्मरण करुन आचरण करावे.औरंग्या कपटी व धूर्त! येणारा प्रसंग व संकट पार पाडण्याची व्यवस्था समर्थ पाहतीलच, आपण सुध्दा हेराकरवी त्यांच्या संपर्कात असावे.

         क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री  समर्थ  रामदास

अंतिम भाग -३२.

       मर्‍हाटदेश सोडुन आगर्‍यास येऊन पुरते फसलो याची महारांजाना जाणीव झाली. कैदेत एकाच ठीकाणी बसुन काय साधणार? अशा विचारांच्या आवर्तनात रात्रभर राजांना झोप नाही आली.पहाटे राजांच्या अंतःकरणावर समर्थांची धीरगंभीर वाणी ऊमटली… “येके ठीकाणी बैसोनि राहिला। तरी मग व्यापच बुडाला। सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी।” शिवाजीराजांच्या अटकेने अवघी रयत भयग्रस्त झाली.रायगड विवंचनेत पडला. समर्थ रामाला विनवित होते, तुकाराम विठ्ठला ला साकडं घालीत होते. मोरया गोसाव्याने सहस्रावर्तन सुरु केले.. या सर्वांच्या पुण्याईने शिवकल्याण राजा गोसावी वैराग्याच्या वेषात रायगडी सुखरुप पोहोचले.

      शिवरायांनी अवघ्या मुगली मुलखां त धुमाकुळ घातला. गेलेला पुरंदर, सिंहगड जिंकला. कल्याण, भिवंडी, लोहगड, हिंदोळा, माहुलु क्षेत्र, कर्नाळा रोहिडा पुनः स्वराज्यात आले. रामदासां ची भव्य मुर्ती नलवडे पठारावर वारंवार दिसु लागली. काळनदीच्या शिवथर खोर्‍यातील अकरा गांवानी या पठारांचं नवीन बारसं करुन “रामदास पठार” असं नामकरण केलं. मार्गदर्शनाच्या अपेक्षेने असंख्य भक्तजन आपपाल्या समस्या घेऊन समर्थाकडे येऊं लागले.अवघा मर्‍हाटदेश रामनामाच्या गजराने दुमदुमला. समर्थांना आता एकच तळमळ होती, मराठी राज्याच्या सिंहासनावर बसलेल्या रामस्वरुप शिवरायाच्या राज्यभिषेकाची….

        शालीवाहन शके १५९६ जेष्ठ शुध्द त्रयोदशीला गागाभट्टाच्या उपस्थितीत शिवाजीराजे छत्रपती झाले… दुरित संपलं. चारी पातशह्यांना शह देऊन सह्यांद्रीच्या कुशीत एक नवी शाही, शिवशाही, शिवराज्य निर्माण झालं. मर्‍हाटदेशी शतकाशकांनंतर ऐक स्वकीय राजा छत्रपती झाला. क्षत्रियकुलावतंस गोब्राम्हण प्रतिपालक” हे बिरुद अभिमानाने मिरवु लागले.

      अचानक समर्थासमोर निळसर प्रकाश पसरला. त्यांच्या अंतर्दृष्टीसमोर कोंडदधारी प्रभू रामचंद्र प्रगटले.मूर्तीच्या चेहर्‍यावर गूढ हास्य विलसत होते. आजवरची तपःश्चर्या फळाला आली.अरे नारायणा! तो छत्रपती मीच आहे.तू विचार केलास, मी कृती केली. आपण दोघेही दोघही सारीपाटाचा डाव खेळलो दोघांचीही सरशी झाली. मी म्हणजेच तू. तू म्हणजेच मी…वर्तमानात मांडलेला डाव आता संपला. भविष्याचा डाव मांडायचं आतां नियतीच्या हाती आहे आपण फक्त प्रेक्षक..! प्रसंग पडल्यास सावरण्याची सूचना देंणारे… समर्थ भानावर आले. आणि अभावितपणे गरजले, “जयजय रघुवीर समर्थ…!”

        कालपुरुष म्हणाला,” समर्था! तू कालातीत, तू देहधारी नाहीसच! तू एक सुविचार, स्फुल्लिंग, चेतना आहेस.पृथ्वी पादाक्रांत करणारी प्रेरणा आहेस. माणसांतील देवपण जागवणारी… पंचमहाभूतांना ओलांडून सुर्यमंडलाला भेदून जाणारी…तुझ्या श्वासानिःश्वासात च तो महारुद्र समावला आहे.तो शून्य मंडलाला भेदून पलीकडे गेला. तु त्या सुर्यमंडलाचा भेद करशील….तुझ्या विचारांचे स्फुल्लिंग भविष्यकाळातही तुझ्या या रुपाचं स्मरण ठेवतील.आणि प्रत्येक प्राणीमात्राला सांगतील..नरामधी ल नारायण रामरुप झाला. त्यांनी विपुल वाडःमय मिर्मिती केली. रोखठोक विचार,साधीसरळ भाषा, स्पष्ट निर्भिड मांडणी! दासबोध, मनाचे श्लोक. करुणाष्टके, भीमरुपी स्तोत्र, अनेक आरत्या इत्यादी लेखनकृति प्रसिध्द आहे. जनी वाद वेवाद सोडुन द्यावा।जनी सूख संवाद सूखे करावा।। जगी तोचि तो शोक संताप हारी। तुहे वाद संवाद तो हितकारी।।

     अश्या या श्री स्वामी समर्थांना कोटी कोटी प्रणाम!”

जय जय रघुवीर समर्थ !”

                  समाप्त!
                  क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

                         

श्री समर्थ रामदास संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading