संत तुकाराम महाराज चरीत्र भाग २, (६ ते १०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


         तुकोबाची पत्नी जिजाई हिच्याबद्दल ती खाष्ट आहे म्हणुन प्रचार होता. पण ती कां संतापत असे ? कारण तीला घर चालवावं लागे आलेल्या अतिथीचं पहावं लागे, आणि तुकोबाचे घराकडे अजिबात लक्ष नव्हते. वरुन दिनदुबळ्यांना, आल्यागेल्यांना घरांत जे असेल ते वाटुन देण्याची प्रवृत्ती, त्यामुळे तीची फारच ओढातान व्हायची ! तीला तुकोबांची योग्यता कळल्यावर ती त्यांची एकनिष्ठ शिष्या झाली.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! संत तुकाराम महाराज चरित्र  !!!

!!! संत तुकाराम !!!

 भाग-६

 तुकोबांना संसारी सुख नाही म्हणुन ते भक्त झाले नाही, तर पुर्णविचारांती परसेवेसाठी त्यांनी वैराग्याची कास धरली. त्यांचा त्याग, भक्ती व असामान्य साधुत्व यांची प्रभा महाराष्टभर फाकली. त्यांना अनेक प्रकारची मदत, खुद्द छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या योगक्षेमेसाठी मोठी देणगी पाठवली, पण या महात्म्याने साधी नजर सुध्दा फिरविली नाही.

कारण “बुडती हे जन पहावेना डोळा । म्हणुन येतो कळवळा तारावयासी ।।” याच तत्वासाठी उभे आयुष्य परमेश्वरभक्ती व जनहितातच खर्च करण्याचा निर्धार केला. समाजाच्या निरंतर उपयोगासाठी जी अनमोल अभंगवाणी करुन ठेवली त्या शक्तीचे मुळ ज्या दिवशी संसार सोडला त्याच वेळी हाती लागले.

धर्म रक्षावयासाठी ।

करणें आटी आम्हासी ।। वाचा बोलो वेदनीती ।

करुं संत केलें तें ।।

 तुकोबाची पत्नी जिजाई हिच्याबद्दल ती खाष्ट आहे म्हणुन प्रचार होता. पण ती कां संतापत असे ? कारण तीला घर चालवावं लागे आलेल्या अतिथीचं पहावं लागे, आणि तुकोबाचे घराकडे अजिबात लक्ष नव्हते. वरुन दिनदुबळ्यांना, आल्यागेल्यांना घरांत जे असेल ते वाटुन देण्याची प्रवृत्ती, त्यामुळे तीची फारच ओढातान व्हायची ! तीला तुकोबांची योग्यता कळल्यावर ती त्यांची एकनिष्ठ शिष्या झाली.

 वास्तविक जिजाई ही पुण्यांतील एका धनाढ्य सावकाराची मुलगी ! बापाने थाटांत लग्न लावुन दिले. सासरची देखील सांपतिक स्थिती चांगली होती. पुढे वाईट दिवस येऊन सासरची संपन्नावस्था ढासळली.सासु सासरे, जाऊ मृत्युमुखी पडलेत, दीर घर सोडुन गेला, धंदा बसला. संपत्ती नाहीशी झाली, तरी ती डगमगली नाही की, माहेरी जाऊन राहिली नाही. स्वतः जामीन राहुन तुकोबांच्या धंद्याला सहाय्य व प्रोत्साहन दिले. परंतु तुकोबांचा भोळसटपणा व कनवाळुपणामुळे तीला अपयश येत गेले.

 तुकोबा आणि जिजाई यांचे आराध्य दैवत, उपासनेचा मार्ग भिन्न असल्यामुळे त्यांच्यांत मतभेद होत असे. तुकोबा विठोबाचे भक्त होते तर जिजाई  मेसाई, जाखाई, जोखाई, राहु केतु शनिदेव वगैरे जिजाईचे उपास्थे होती. तीचा समज होता की, विठोबा हा घरघेणा देव आहे. तो आपल्या भक्तांना सुखाने नांदु देत नाही. संसाराची राखरांगोळी करणार्‍या विठ्ठलाविषयीची तेढ वाढु लागल्याने विठोबाला सोडुन द्या म्हणुन तीचे सारखे टुमणे असे. तुकोबा एरवी धीरगंभीर व शांत स्वभावाचे, परंतु प्रत्यक्ष पत्नीनेच विठोबाची नालस्ती करावी हे त्यांना खपत नसे.

 संसारांत जी संकटे येतील त्यांना धेर्याने तोंड देऊन केवळ देवावर भार ठेवुन तीने निश्चिंत असावे, निष्काम धर्माचे आचरण करावे असे तुकोबांना वाटे, परंतु कर्मठपणांत मुरलेल्या, लौकीक धर्मात वाढलेल्या साधारण स्रीस हे असिधारे प्रमाणे कठीण व्रत आचरणांत आणणे सोपे नव्हते.

 तुकोबा पत्नीस उपदेश करुन म्हणायचे क्षणभंगुर सुखाचा ध्यास न धरतां परमेश्वर प्राप्तीची आयास केला व त्याच्यावर भार टाकला तर तो भक्ताची ऊपेक्षा कधीच करत नाही. याचा जिजाईवर परिणाम होऊन ती त्याप्रमाणे  तीच्यावर परिणाम होउ झाल्यामुळे तीची आध्यात्मिक उन्नती झाली.

          क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 भाग-७

 विश्वंभरबोवापासुन तुकाराम महाराजांच्या घराण्यांतील सर्वांना भागवत धर्मीय संताबद्दल अत्यंत आदर होता. महाराजांनी संसारत्याग करुन भक्ती मार्ग धरला. परंतु बायको-पोरांची ओळख विसरले नाही. फक्त ते गुंतुन राहिले नाही. संसारात असतांनाच त्यांच्या भक्तीमुळे व आचरणामुळे परमेश्वर त्यांच्या घरी भेटला. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुळ पुरुषाने खर्‍या भक्तीच्या जोरावर पंढरपुरच्या विठोबास देहुस येण्यास भाग पाडले. प्रत्येक अवतारी पुरुष हा स्वतः पुर्वजांच्या प्रतिनिधीरुप असतो.

 देहुगांवचे क्षेत्रमहात्म्य वाढते असल्यामुळे आसपासचे लोक येऊन इंद्रायणीत तिर्थ म्हणुन स्नान करीत, हे पाहुन त्यांच्या धार्मिक भावना उचंबळुन येत. आपल्या पुर्वजांनी इथे भक्तीचा वृक्ष लावुन भक्तीमार्गाने जाण्यासाठी मोठी कमाई करुन ठेवल्याने आपण त्याच मार्गानेच गेले पाहिजे असा त्यांनी निश्चय केला.

 संसाराचा सारा भार परमेश्वरावर टाकुन भक्ती हेच आयुष्याचे मुख्य ध्येय ठरविले. जिजाऊने त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न वाया गेला. त्यांचा निश्चय कोणीच फिरवु शकलं नाही. घरांत राहिल्याने मन विचलीत होत असल्यामुळे दिवसा गृहत्याग करुन सायंकाळी घरी यावे. रात्री भजन करावे नंतर एखादा दुसरा दिवस रानांत मुक्काम करावं. कांही दिवसांनी संसाराबद्दल पुर्ण उदासीन झाले.

 सर्व संगी वीट आला !

तूं एकला आवडसी ।

दिली आतां पायी मिठी ।

 जगजेठी न सोडी ।।

 दुःख वांदडी आहे हा संसार।

येके सार भगवंता ।।

 महाराज आपल्या ध्येयाचा मार्ग आक्रमु लागले. ते पंधरा दिवस घरी न आल्याने जीजाईला काळजी वाटु  लागली. कान्होबांनी त्यांना नेहमीच्या सर्व ठीकाणी शोधले पण न सांपडल्याने निराश होऊन घरी परतले. तेवढ्यात माहिती मिळाली की, ते भांडारा डोंगरावर आहेत. हा डोंगर देहुपासुन तीन मैलावर आहे. तीथे पुर्वीच्या त्यागी लोकांच्या गुहाही आहेत. तिथुन महाराजांना घरी चलण्यासाठी कान्होबाने हट्टच धरल्यामुळे गावाजवळच्या इंद्रायणी नदीच्या पैलतीरी येऊन बैठक  मारली. आणि कान्होबास त्यांनी सावकारीची खतपत्रे आणण्यास सांगीतले.

 तुकाराम कान्होबास म्हणाले ही खतं संसारांतील पाश असल्यामुळे सर्व इंद्रायणीस अर्पन करतो. त्यावर कान्होबाने हरकत घेतल्यावर त्याच्या हिश्शाची निम्मी खतं देऊन बाकीची खतपत्रे स्वहस्ते इंद्रायणीच्या पाण्यांत बुडवली आणि निर्विकार मनाने तिथेच बसुन राहिलेत

 ही हकीकत जीजाईला कळल्यावर खतपत्रे पाण्यांत गेल्याचे दुःख न करतां महाराज सांपडले याचाच आनंद झाला. तीने त्यांना घरी आणले.

 सावकारीची खतपत्रे पाण्यात टाकणे म्हणजे “संसाराचे पिंडदान स्वहस्ते पिंडदान स्वहस्ते करणें होय”

 तुका म्हणे जो या संसारांत रुसला ।

तेथे ठाकीला सिध्दपंथा ।।

 महारांजांनी संसाराचे पिंडदान केल्यावर इश्वरप्राप्तीसाठी भक्ती हेच औषध घेऊन द्रव्यास स्पर्श न करण्याचे पथ्य सांभाळल्यामुळे त्यांच्या हातुन महाराष्टाच्या उध्दाराचे महान कार्य घडले.

       क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 भाग-८

 तुकोबांनी वैराग्य धारण केल्याने देहुचे महत्व वाढले. जनता देहुक्षेत्री महारांजांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी शिवाजी महारांजाचे वास्तव्य पुणे प्रांतांत होते.

 राष्टममाता जिजाबाईंनी शिवाजी राजेंना राष्टप्रेमाबरोबरच धर्मप्रेमाचे धडे दिले होते. त्यांना देहुचे महात्म्य अनेकवेळा सांगण्यांत आल्याने ते वरचेवर तुकाराम महाराजांच्या दर्शनाला येऊन उपदेशाचा फायदा घेत. अशा श्रेष्ठ संताची कांही तरी सेवा घडावी म्हणुन सोन्याच्या मोहरा घेऊन करंजईच्या बेटावर एका दगडी शिळेवर  नामस्मरणांत तल्लीन असलेल्या तुकोबासमोर ठेवले. त्यांचे भजन आटोपल्यावर समोर ताटभर सोन्याच्या मोहरा पाहुन त्यांना अतिशय दुःख ते पुनः त्या ताटाकडे व शिळेकडे न पाहतां निघून गेले. भजन करण्याची पवित्र शिळा द्रव्याच्या स्पर्शाने विटाळली परत त्या शिळेला त्यांनी स्पर्शही केला नाही.

 तुकाराम महाराज भजनासाठी कोठेही रानांत बसत. त्यांना खाण्यापिण्याचीही शुध्द नसायची.

 त्यांची पत्नी जीजाई त्यांच्या आधी कांही न खाता पिता उपाशीपोटी त्यांचे जेवण घेऊन त्यांना शोधत दिवसभर रानांत भटकत असे. त्यासाठी तीने संसाराकडे दुर्लक्ष केले. पोरांबाळांच्या होणार्‍या अव्यवस्थेची पर्वा केली नाही.

 संसाराचा गाडा हाकण्यास तीला कोणाचीही मदत नव्हती. सुरुवातीला त्यांची चोहोकडुन झालेली उपेक्षा स्वतःच्या देहाची बेपर्वाही अशा वेळी जर जिजाईने दुर्लक्ष केले असते तर महाराज कदाचित संत होऊ शकले नसते. अशावेळी या मातेने पतिव्रता धर्माच्या ज्योतीवर महाराजांस त्यांच्या  भावी मार्गाने जाण्यास खरी मदत केली.

 जिजाई बद्दल बर्‍याच आख्यायिका प्रसिध्द आहेत की, ती खाष्ट, खट्याळ, रागीट, कर्कश, तोंडाने फटकळ होती, पण हे खरे वाटत नाही. कारण खतपत्रे तुकोबांनी नदीत बुडवण्यासारखी दुसरी मोठी चुक असुं शकेल ? पण त्या माऊलीने शब्दानेही त्यांना दुखवले नाही की, राग धरला नाही. दुष्काळ संपल्यावर तुकोबांनी पुर्ण लक्ष संसारातुन काढल्यामुळे जिजाबाईची किती ओढातान झाली असेल? तरी ती पतिनिष्ठ स्री नवर्‍याची प्रत्येक आज्ञा तंतोतंत पाळीत असे.

 घरांत गाडग्यामडक्याचा संसार, मुलंबाळं ऊघडी, अशी  तुकोबांच्या संसाराची उडालेली दुर्दशा पाहुन शिवाजी महाराजांनी मदत पाठविली परंतु एवढी विपन्न अवस्था असुनही तुकोबांच्या आज्ञेने तीने सर्व परत पाठविले. फाटक्या संसाराला त्या परधनाचा विटाळ होऊ दिला नाही.

 संसारात प्रतिदिनी निर्माण होणारी संकटे, मुलांबाळांची आबाळ, तुकोबांची काळजी, त्यांच्या आज्ञा व्रतासारख्या पाळणे अशा अनेक त्रासांमुळे एखादेवेळी सात्विक संताप होणे अशक्य नाही! पण ती खाष्ट, कर्कश, फटकळ, वगैरे विशेषणें लावणे म्हणजे तिच्यावर अन्याय केल्यासारखे नाही का ?

 महाराजांच्या हस्तलेखातील  वही ( चोपडी)  पारगांवकरांनी मागीतल्यावर त्यांना नकार मिळाल्यामुळे त्यांच्या घरच्यांवर त्यावेळच्या कलेक्टरांकरवी दबाव आणला होता, पण ही वही आमच्या घराण्याचा सन्मान, प्रसाद असुन आमच्या पुर्वजांनी जिवापाड जपलं आहे, ही वही या घरांतुन जाणे म्हणजे घराण्याचे सर्वस्व गेल्यासारखे होईल  असे म्हणुन तुकोबांच्या वंशजाने कलेक्टरलाही जुमानले नाही.

 तुकाराम महाराज यांचे एकंदर अवतार कार्य, महाराष्टासाठी केलेली धार्मिक, सामाजिक जागृती अशा अशा अनेक कार्यामुळे महाराष्ट त्यांचा निरंतर ञृणी राहील. अशा या थोर महात्म्याच्या धर्मपत्निविषयी साधी कृतज्ञताही कोणी दाखविली नाही यासारखे दुर्दैव कोणते ?

        क्रमशः
 संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 भाग-९

 एकदा एका पाटलाने तुकोबांना घरच्यासाठी ऊसाचा भारा दिला. ऊस घरी आणतां आणतां रस्त्यात भेटणार्‍या मुलांना वाटत वाटत फक्त एक ऊस घरी घेऊन आलेत, ते पाहुन संतापाने जिजाईने तो ऊस त्यांच्या पाठीत जोराने मारल्याने ऊसाचे तीन तुकडे झाले अस नमुद आहे, पण  ही अगदी असंभव गोष्ट वाटते. खेड्यात, जुन्या संस्कारांत वाढलेल्या, अतिशय धार्मिक वृत्तीची पतिनिष्ठ, पतीसाठी वाटेल तेवढे हाल अपेष्टा सहन करणार्‍या जिजाई कडुन अस घडण्याची कल्पनाही करु शकत नाही, अगदी अशक्य आहे.

 खरी गोष्ट अशी होती की, तुकौबांनी राहिलेला एकच ऊस जिजाईच्या हाती दिल्यावर पुर्ण मोळीतुन एकच ऊस घरी आणला हे पाहुन एवढा तरी कशाला आणला म्हणुन सात्विक संतापाने ऊस जमीनीवर आपटला त्याचे तीन तुकडे झाल्याचे पाहुन तुकोबा म्हणाले “वाहवा ! तु बरोबर वाटणी केली !

 तुकाराम महाराजांच्या अंतःकरणांत भक्ती आणि वैराग्याची कोवळी  कोंब नुकतेच जन्मास येण्याची सुरुवात झाली होती, अशावेळी जिजाईने स्रीधर्मास अनुसरुन आपल्या देहाचे कांटेरी कुंपन करुन त्यांचे रक्षण करुन ते कोंब वाढीस लावले, इतकेच नाही तर त्या कोंबाचा मोठा वृक्ष बनवण्यासाठी अपार कष्ट केले, अशा या थोर माऊलीच्या एकंदर पतिनिष्ठेचे  महत्व न ओळखणे म्हणजे तीच्यावर अन्यायच नाही का ?

 महाराज आपल्या अभंगात म्हणतात “पतिव्रतेची देवाघरी सभा”। सर्वस्वाचा त्याग करुन निरहंकार वृत्तीने गिरिकंदात राहणे एकवेळ सोपे, पण पतिव्रताधर्म पाळणे महाकठीण व्रत आहे. तीने कायावाचा मनोभावे पतिसेवा केल्यामुळे तीला वाचासिध्दी प्राप्त झाली असावी हे पुढील ऊदाहरणावरुन लक्षात येईल.

 देहुपासुन कांही अंतरावर चिंचवड गांव आहे. तुकोबांच्या काळी तेथे मोरया गोसावी( चिंतामणी देव) हे महान सिध्दीसामर्थ्य असलेले गणपती भक्त म्हणुन त्यांची प्रसिध्दी होती. त्याच काळी पुण्यात अनगडशहा मुसलमान इश्वरभक्त फकीर मोठे सिध्दीप्राप्त अवलिया होते. परीक्षा घेण्याच्या ऊद्देशाने ते चिंतामणींच्या वाड्यासमोर येऊन कटोराभर भिक्षा मागीतली असतां धान्याचे पेवेच्या पेवे त्या कटोर्‍यात ओतुनही कटोरा भरत नव्हता. चिंतामणींनी स्वतःच्या सिध्दीसामर्थ्याने कटोरा भरला पण तात्काळ रिकामा झाला हे पाहुन त्या अवलियाचे खरे सामर्थ्य ओळखुन वाड्यात बोलावुन त्यांचा सन्मान केला.

 नंतर ते तुकाराम महाराजांचे साधुत्व व किर्ति अनगडशहाने ऐकल्याने त्यांचीही परीक्षा पहावी म्हणुन देहुला त्यांच्या घरी येऊन भिक्षेची आरोळी ठोकली. घरी आलेल्या कोणासही रिक्त हस्ते परत पाठवु नये हे जिजाबाईस महाराजांचे सांगणे ती तंतोतंत पाळीत असे, त्याप्रमाणे तीनं मुलगी गंगुला फकीराच्या कटोर्‍यांत पीठ वाढण्यास सांगीतले. गंगुने आपल्या चिमुकल्या हाताच्या ओंजळीने कटोर्‍यांत पीठ टाकतांच कटोरा भरुन पीठ खाली सांडु लागले. आश्चर्यचकीत होऊन तुकोबाला शरण गेले, शेवटचे दिवस देहुत राहुन तीथेच देहाचे विसर्जन केले.

 कांही तपे, तपश्चर्या, योगसाधना करुनही चिंतामणी देवास फकीराचा कटोरा भरणे अशक्य झाले, त्यांचे ज्यांच्यापुढे सिध्दिसामर्थ्य लुळे पडले, तोच कटौरि जिजाईच्या नुसत्या शब्दाने भरला गेला, याचे मुख्य व महत्वाचे कारण तीने पाळलेल्या पतिधर्मात आहे.

       क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 भाग-१०

 परमेश्वराचे नामस्मरण करुन प्रत्यक्ष प्राप्ती करुन घ्यावी या उच्च ध्येयासाठी बाह्यगोष्टीतुन सर्व प्रकारे मन काढुन लोकांचा सहवास शक्यतो टाळून जास्तीत जास्त रानावनांत एकांतात वेळ घालवू लागले. भामनगर डोंगरावर जाऊन परमेश्वराच्या भेटीचा निश्चय करुन नामस्मरणाच्या भक्तीयुक्त अंतःकरणाने भगवंतास आळवले. तो भक्तवत्सल तुकोबांच्या साध्या सरळ भक्तीने वश होऊन त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. त्यानंतर ते शरीरानेच राहिले पण मनाने व कृतिने वेगळ्या जन्मात गेले. त्यामुळेच त्यांच्याकडुन भागवत धर्म प्रसाराचे व समाजोध्दाराचे महान कार्य झाले.

 सर्व संगपरित्यागानंतर त्यांनी अभंगाचे गाथे, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवताचा अभ्यास, शक्य तेवढी पुराणे धुंडाळली. अंतःकरणाचे पावित्र्य, इश्वरभक्तीचे सहाय्य व जनहिताची खरी तळमळ यांची जोड मिळाल्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यामुळे समाजास मार्ग दाखवण्याचे कार्य करु लागले.

 वर्णभेदाच्या विषारी विचारप्रणालीमुळे समाजात ऐक्य नवहते. जातीभेदाच्या चिखलांत समाज घट्ट रुतला होता. जातीची कृत्रिम उच्चनिचता धर्ममार्गात आडवी येत होती. इश्वर प्राप्तीचा मार्ग सर्वांना खुला नाही असे शास्राज्ञेच्या नांवाखाली उघड उघड सांगीतल्या जाई. तुकोबांनी समाजऐक्यासाठी व धर्मप्रसारास्तव वर्णाभिमानाच्या तटास अभंगवाणीचे सुरुंग पध्दतशीरपणे पेरण्यास सुरुवात केली. त्यामुळे भागवतधर्माची सत्य तत्वें झपाट्याने प्रसार पावु लागली.

 वर्णाश्रमधर्माचा जुलुम, कर्मठांची कठोर वृत्ती याबद्दल प्रतिकाराची भावना समाजांत रुजू लागली. उच्चनिचतेचा कृत्रीम भेदभाव गाडला जाऊन समाज एकसुत्रात येऊ लागला. परधर्माची लागलेली आग विझुन नकली खरी खोटी धार्मिक तत्वे पारखण्याचे खरे साधन समाजास लाभले. त्यामुळे महाराष्ट जनता श्रृतिस्मृतीचा चक्रव्युह, कर्मकांडाचा तट, वर्णाश्रमरुपी काटेरी कुंपण यांच्यातुन सुटु लागली.

 महाराष्टातील जनता नव्या दमाने, नव्या विचाराने भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेसे पाहुन कर्मठांस सहन होईना! कारण तुकोबांनी अभंगवाणीने खालच्या थरास हात घालुन संबंध महाराष्ट ढवळुन जागा केला.

 महाराजांचे साधुत्व व किर्ती वाघोली येथील रामेश्वर भटांच्या कानी गेली. त्यांनी तुकोबांना बोलावुन, “तू शुद्र आहेस, अभंगात श्रृतीचा अर्थ स्पष्ट उमटतो म्हणुन यापुढे किर्तन करायचे नाही.” अभंगाच्या सर्व वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यासाठी आणायला लावल्यात. रामेश्वर भट्टांनी वह्या डोहात बुडवल्यावर तुकोबांनी अन्नपाणी सोडुन देवाचा धावा सुरु ठेवून, शरीरधर्मास रजा देऊन  तीथेच बसले. त्यांच्या आर्त हाकेला भक्तवत्सल धावुन आला. तेराव्या दिवशी बुडवलेल्या वह्या तरंगतांना दिसल्यात. त्या वह्या वाजत गाजत मंदिरांत आणुन ठेवल्यात.

 देवाची स्तुती करतांना  देवाची साऊली, माऊलीहुन मवाळ, चंद्राहुन शीतल, पाण्याहुन पातळ असा प्रेमाचा कल्होळ सुरु केला.

        क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

८/११/२०, सकाळ १०:५७ – Akola Minakshi Deshmukh: तुकाराम


९/११/२०, सकाळ ११:०१ – Akola Minakshi Deshmukh: तुकाराम

संत तुकाराम म. चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading