संत गोरा कुंभार अर्थात गोरोबाकाका चरित्र, व अभंग गाथा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

संत गोरा कुंभार अर्थात गोरोबाकाका चरित्र, व अभंग गाथा

कुंभार कोण आहेत ?

कुंभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद कालापासून कुंभार अस्तित्वात आहेत.

तेर अर्थात सत्यपुरी
तेरचे महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
तेर हे धाराशिव जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे. हे ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला १८ किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. या नगराला प्राचीन काळी तगर या नावाने ओळखले जात होते. त्या पुर्वि सत्यपुरी हे नाव प्रचलित होते.
तेरच्या बसस्थानकासमोरील उत्खनन केलेली जागा (३० जुलै, २०१२ चेछायाचित्र)
तेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.

प्राचीन उल्लेख
‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या इ. स. ५० ते इ. स. १३० या काळात एका ग्रीक प्रवाशाने लिहिलेल्या ग्रंथाच्या ५१व्या प्रकरणामध्ये तेरचा तगर असा उल्लेख आलेला आहे. या प्राचीन महत्त्वपूर्ण ग्रंथात हा ग्रीक प्रवासी म्हणतो-
दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. यातील पहिले बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच-भडोच) पासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे पैठणहून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोहोचता येते. पैठणहून बॅरिगाझा येथे माळरानातून मार्ग काढीत दगड आणला जातो. याउलट तगर येथून साधे कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरिगाझा येथे पाठविले जाते. त्याचप्रमाणे समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगाझा येथे पाठविला जातो. [१]
पेरिप्लसव्यतिरिक्त तेरचा प्राचीन उल्लेख प्टॉलेमीने इ. स. च्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही आढळतो. या प्रवासवर्णनात त्याने तगर ही नगरी समुद्रकिनाऱ्यापासून आत असून अरियके प्रदेशात आहे असे सांगितले आहे. [२]
इ. स. ६१२ या काळातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखात ज्या ज्येष्ठशर्मन याला दान दिले तो तगरनिवासी होता असा उल्लेख आहे. अकोला जिल्ह्यात मिळालेल्या राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या इ. स. ६९३च्या सांगळूद ताम्रपटात उम्बरिकाग्राम आणि वटपूरग्राम या दोन खेड्यातील जमीन तगरनिवासी हरगण द्विवेदी याला दान दिल्याचा उल्लेख आहे.

संत गोरा कुंभार चरित्र

संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर
संत गोरा कुंभार चरित्र
 (१२६७ – २० एप्रिल, १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा. श. ११८९ (इ. स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.
त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.
तेर नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. तेर येथील ‘काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली सातही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिले.

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून, संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.

संत गोरोबा अभंग गाथा

अभंग गाथा
१. अंतरीचे गुज बोलू ऐसे काही वण
२. एकमेकामाजी भाव एकविध
३. कवण स्तुति कवणिया वाचे
४. काया वाचा मन एकविथ करी
५. कासयासी बहू घालसी मळण
६. केशवाच्या भेटी लागलेसे पीस
७. कैसे बोलणे कैसे चालणे
८. जो आवडी निर्गुणाचा संग धरिला
९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्‍न
१०. देवा तुझा मी कुंभार
११. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा
१२. निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी
१३. निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
१४. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले
१५. मुकिया साखर चाखाया दिधल
१६. रोहिदासा शिवराईसाठी
१७. वंदावे कवानासी निंदावे कवनासी
१८. श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी
१९. सरितेचा ओघ सागरी आटला
२०. स्थूळ होते ते सूक्ष्म पै जहाल

सकळ संत गाथ्यात उपलब्ध असणारे गोरोबांचे सध्या हे २३ अभंग.
संत गोरा कुंभार अभंग
अभंग १ ते २०
१.
केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥१॥
विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ । नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥२॥
कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ॥३॥
 
२.
वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं ॥१॥
सर्व हस्त करिती वरी । गोरा लाजला अंतरीं ॥२॥
नामा म्हणे गोरोबासी । वरती करावें हस्तासी ॥३॥
गोरा थोटा वरती करी । हस्त फुटले वरचेवरी ॥४॥
 
३.
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी ॥१॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥२॥
एकत्व पाहतां अवघेंचि लटिकें । जें पाहें तितुकें रूप तुझें ॥३॥
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव । तुह्मा आह्मा नांव कैचे कोण ॥४॥
 
४.
अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य ॥१॥
जयजय झनकूट जयजय झनकूट । अनुहात जंगट नाद गर्जे ॥२॥
परतल्या श्रुति म्हणती नेती । त्याही नादा अंतीं स्थिर राहे ॥३॥
म्हणे गोरा कुंभार सत्रावीचें नीर । सेवी निरंतर नामदेवा ॥४॥
 
५.
एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित ॥१॥
तूं मज ओळखी तूं मज ओळखी । मी तुज देखत आत्मवस्तु ॥२॥
आत्म वस्तु देहीं बोलता लाज वाटे । अखंडता बिघडे स्वरूपाची ॥३॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा । प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी ॥४॥

६.
सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥१॥
कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥२॥
नाहीं दिवस राती नाहीं कुळ याती । नाहीं माया भ्रांति अवघेची ॥३॥
म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा ॥४॥
 
७.
निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥१॥
मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥२॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली कैसी ॥४॥
 
८.
कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥१॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥२॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे । आम्हांतें राशी राहाणें असे नामा ॥३॥
 
९.
मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥१॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥२॥
आनंदी आनंद गिळूनि राहणें । अखंडित होणें न होतिया ॥३॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें । जग हें करणें शहाणें बापा ॥४॥
 
१०.
कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥१॥
मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥२॥
दृष्टीचें पहाणें परतले मागुती । राहिली निवांत नेत्रपाती ॥३॥
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें । जीवें ओवाळावें नामयासी ॥४॥

 
११.
काया वाचा मन एकविध करी । एक देह धरी नित्य सुख ॥१॥
अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडीं । आहे तें ब्रह्मांडीं रूप तुझें ॥२॥
निर्वासना बुद्धि असतां एकपणें । सहज भोगणें ऐक्य राज्य ॥३॥
म्हणे गोरा कुंभार नाहीं रूप रेख । तेंचि तुझें सुख नामदेवा ॥४॥
 
१२.
स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥१॥
माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥२॥
म्हणे गोरा कुंभार नवल झालें नाम्या । भेटी तुह्मां आह्मां उरली नाहीं ॥३॥
 
१३.
केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥१॥
झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥२॥
न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥३॥
म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेव ॥४॥
 
१४.
वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥१॥
नाहीं जया रूप नाहीं जया ठाव । तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥२॥
जीवनीं चंद्रबिंब विंबलें पैं साचें । परि नाहीं तें नितंबिलें जवळें जेवीं ॥३॥
म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा । आलिंगन देगा मायबापा ॥४॥
 
१५.
नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥१॥
तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥२॥
याही शब्दामाजी वाचा न लागे । मार्ग पैं गा लागे निर्धारिता ॥३॥
म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा । चिद्रूप अवघा दिससी साच ॥४॥

 
१६.
कायसास बहु घालिसील माळ । तुज येणेविण काय काज ॥१॥
एकपणें एक एकपणें एक । एकाचें अनेक विस्तारिलें ॥२॥
एकत्व पाहतां शिणलें धरणीधर । न चुके येरझारा संसाराची ॥३॥
म्हणे गोरा कुंभार कोणी नाहीं दुजें । विश्वरूप तुझें नामदेवा ॥४॥
 
१७.
देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥१॥
ऐशा संतप्ते हो जाती । घडे साधूची संगती ॥२॥
पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेंचि ॥३॥
 
१८.
श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥१॥
मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा । मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥२॥
रामनामें गणिका तरली अधम । अजामिळ परम चांडाळ दोषी ॥३॥
म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा । एक वेळा बापा उच्चारीरे ॥४॥
 
१९.
रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥१॥
पुंडलिका झाला अनुताप । धन्य सत्य गुरु माय बाप ॥२॥
जन्मा येऊनियां काय केली करणी । व्यर्थ शिणविली जननी ॥३॥
नऊ महिने ओझें वागऊन । नाहीं गेला तिचा शीण ॥४॥
ऐसा झालो अपराधी । क्षमा करा कृपानिधी ॥५॥
ऐसा पुंडलिका भाव । उभा केला पंढरीराव ॥६॥
भक्त पुंडलिकासाठी । उभा भिंवरेच्या तटी ॥ ७ ॥
कटावरी ठेवूनी कर । उभा विटेवरी नीट ॥ ८ ॥
ऐसा भाव धीर म्हणे गोरा । तीर्था जा फजितखोरा ॥ ९ ॥
 
२०.
निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥१॥
एक पुंडलिक जाणे तेथील पंथ । तुझा आम्हां चित्त भाग्य योगें ॥२॥
सभाग्य विरळे नामा पाठीं गेले । अभागी ते ठेले मौन्यजप ॥३॥
म्हणे गोरा कुंभार नामया भोगितां उरल्या उचिता सेवूं सुखें ॥४॥

चरित्रे व ग्रंथ

चरित्रे व ग्रंथ

संत गोरा कुंभार (लेखक – अशोकजी परांजपे)
श्री विठ्ठलाच्या संत मेळाव्यात श्रीसंत गोरा कुंभार (लेखक – धोंडीराम दौलतराव कुंभार).
संत गोरा कुंभार (लेखक – निवृत्ती वडगांवकर)
संत गोरा कुंभार वाङमय दर्शन (लेखक – बाबुराव उपाध्ये)
गोरा कुंभार (लेखक – प्रा. बाळकृष्ण लळीत)
संत गोरा कुंभार (लेखक – महादेव कुंभार)
संत गोरा कुंभार (लेखक – मा. दा. देवकाते)
श्री गोरा कुंभार चरित्र (लेखक – वीणा र. गोसावी)
विलास राजे यांनी लिहिलेला संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, ’जीवनमुक्त’ हा २५-५-२०१३ रोजी, डॉ. रामकृष्णदास लहिवतकर यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला.
म्हणे गोरा कुंभार (लेखक – वेदकुमार वेदालंकार)
गोरा कुंभार (लेखक – स. अ. शुक्ल)


चित्रपट

केएस गोपालकृष्णन यांनी १९४८ मध्ये ‘चक्रधारी’ नावाचा ‘तेलुगू चित्रपट’ दिग्दर्शित केला होता. यात व्ही. नागय्या आणि एस. वरलक्ष्मी यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच याच नावाचा तमिळ चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. यात व्ही. नागय्या आणि पुष्पवल्ली यांनी भूमिका केल्या होत्या.
१९७४ कन्नड चित्रपट भक्त कुंभरा ज्यात राजकुमार अभिनीत होते.
व्ही. मधुसुधन राव यांनी १९७७ मध्ये चक्रधारी नावाचा आणखी एक तेलगू चित्रपट दिग्दर्शित केला. यात अक्किनेनी नागेश्वर राव यांनी भूमिका केली होती आणि हा १९७४ च्या कन्नड चित्रपट भक्त कुंबराचा रिमेक होता.
१९६० च्या दशकात कन्नड चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आणि त्याचे नाव गोरा कुंभरा असे ठेवण्यात आले.
१९६७ मराठी चित्रपट गोरा कुंभारा, ललिता पवार आणि इतरांनी अभिनय केला.
दिनेश रावल यांनी १९७८ मध्ये गुजराती चित्रपट भगत गोरा कुंभार दिग्दर्शित केला, ज्यात अरविंद त्रिवेदी, सरला येवलेकर, कल्पना दिवाण, श्रीकांत सोनी, महेश जोशी आणि इतर कलाकार होते.
संत गोरा कुंभार नावाचे मराठी नाटक होते. त्यात प्रसाद सावकार यांनी गोरोबांची भूमिका केली होती. लेखन अशोकजी परांजपे यांचे होते.
‘संत गोरा कुंभार’ मराठी चित्रपट (दिग्दर्शक – राजा ठाकूर)


बाह्य दुवे

संत गोरा कुंभार माहिती

महती संताची, संत गोरा कुंभार
गोरा कुंभार (gora kumbhar)(इ. स. १२६७ – १० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा. श. ११८९ (इ. स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा. संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे(पांडुरंग) मोठे भक्त होते.

संत गोरा कुंभार – जन्म (sant gora kumbhar information marathi)
“तेर’ नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर’ येथील “काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे “तेर’ गावात माधव बुवांना “संत‘ म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती आठही मुले जिवंत कशी झाली. यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका(gora kumbhar) चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे. ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात, ””श्री माधवबुवा “तेर’ येथील काळेश्वराची उपासना करीत होते.
त्यांना आठ पुत्र होते. त्यांना आठ पुत्र झाले. परंतु ते सर्व एकामागून एक निर्वतले. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले की, तुम्ही दुःखी का?’ माधबुवांनी सांगितले की, ”आमची आठही मुले देवाने नेली, म्हणून दुःखी आहोत’ नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सागितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले, व देवास आठही मुले कोठे पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी त्याप्रमाणे आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला.

तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, ‘तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले. ’ 
या आख्यायिकेच्या मागे चमत्काराचा भाग असलेला दिसून येतो. संतांच्या चरित्रात असे अनेकविध चैतन्याचे चमत्कार वर्णिलेले आहेत. चमत्काराचे चैतन्य असते. पण ब-याचदा समृध्द समाजाला अशा चमत्कारातून चेतना मिळण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी अंधश्रध्दा बळावताना दिसते. संतांचे जीवन दर्शन घडविताना सुध्दा केवळ चमत्कार हे त्यांचे साध्य नव्हते तर साधन होते, याचे भान राखावे.
म्हणून फक्त तो त्यांच्या जीवनातील एक चमत्काराचा भाग समजावा. फार तर त्याचा सरळ सरळ अर्थ घेणे योग्य नाही. याबाबत असे म्हणता येईल की माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रध्दा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा (gora kumbhar) जिवंत राहिला. म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रध्देचा, भक्तीचा, महिमा वाटला. यावरुन एवढाच तर्क करता येतो किंवा अंदाज बांधता येतो की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गारोबांचा जन्म झाला आहे.


दिनक्रम – संत गोरा कुंभार (sant gora kumbhar story)
गोरोबांच्या (gora kumbhar) मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते. गोरोबांना (gora kumbhar) लिहायला वाचायला येत होते. ज्ञानदेव, नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे/भक्तांचे केंद्र होते. अनेक शिवभक्त त्याठिकाणी आपली साधना करीत होते. ते भक्त होते, योगी होते. सिद्ध, साधकही होते. गोरोबा (gora kumbhar) जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेंव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाचं दर्शन होई.
त्यांच्या योगसाधनेचं त्यांना कौतुक वाटे, आकर्षण वाटे असे करता करता गोरोबांचा (gora kumbhar) प्रपंच आता परमार्थमय झाला होता. गोरोबा (gora kumbhar) सकाळी उठून अंघोळ करून, देवाची पूजा करणे. नंतर नामस्मरण करावं आणि ध्यानात पांडुरंगाचं रूप साठवून त्याला मनी-मानसी मुरवून घ्यावं आणि मग न्याहारी करुन कामाला लागावं, असा त्यांचा सकाळचा दिनक्रम असे.
दुपारचे जेवण झाल्यावर गोरोबा जरा विश्रांती घेत. ही विश्रांती म्हणजे झोप घेणे नव्हते. तर घराच्या ओसरीवरच्या खांबाला टेकून देवाचे नामस्मरण करीत, अभंग म्हणीत विश्रांती घेत. त्यामुळे त्यांच्या चित्ताला एक समाधानही मिळत असे.
पुन्हा लगेच मोठ्या जोमाने कामाला लागत. ते दिवस मावळेपर्यंत. दिवस मावळल्यानंतर हातपाय धुऊन पुन्हा घराच्या ओसरीवर एकतारीवर चिंपळ्याच्या साथीने भजन सुरू होई आणि रात्रीच्या जेवण्याचेवेळी ते थांबे. अन् रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरु होई. शेजारपाजारची मंडळीही त्यात सामील होत असत. नंतर परमेश्वराचे नामस्मरण करीत झोपी जात.


 मूल चिखलात तुडविले (sant gora kumbhar)

 मूल चिखलात तुडविले 
एके दिवशी गोरोबा (gora kumbhar) पायाने चिखल तुडवित होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. गोरोबा (gora kumbhar) जरी संसारात दंग होते. तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे (gora kumbhar) जीवन झाले होते. संत जन्मतःच ईश्वरभक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहानभूक हरपून जात. स्वदेहाचे भानच त्यांना राहत नसे. गोरोबाकाका (gora kumbhar) विठ्ठल भक्तीत कसे तल्लीन होत हे सांगताना संत नामदेव गोरोबा काकांच्या तन्मय वृत्तीबद्दल लिहितात.
प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत ।
प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा । । १ । ।
असे घराश़मी करीत व्यवहार
न पडे विसर विठोबाचा । । २ । ।
कालवुनी माती तुडवीत गोरा ।
आठवीत वरा रखुमाईच्या । । ३ । ।
प्रेमे अंगी असे झाकुनी नयन
करीत भजन विठोबाचे । । ४ । ।
स्वतः नामदेवांनी गोरोबांच्या तन्मयवृत्तीबद्दल वरील अभंगात दिलेली स्पष्ट कबुली महत्त्वाची वाटते. गोरोबाकाकांच्या चरित्रातील हे तन्मयवृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे. अशाप्रकारे एके दिवशी गोरोबा (gora kumbhar) देहभान हरपून अभंग म्हणत माती तुडवीत होते. त्यांचे सर्व ध्यान ईश्वरचरणी लागले होते.
अशावेळी त्यांची बायको-संती मुलाला मकरेंद्राला ठेवून पाणी आणण्याकरिता जाते आणि त्यावेळी ती म्हणते, धनी, बाळावर जरा लक्ष ठेवा. घरी त्याला सांभाळण्याकरता कोणी नाही. असे सांगून ती पाणी आणण्याकरिता निघून गेली. पण तिचे सांगणे गोरोबांनी ऐकले का? त्यावेळी गोरोबा (gora kumbhar) देहभान हरपून गेले होते. पण संतीला याची काय कल्पना! इकडे भक्त गोरोबा (gora kumbhar) पांडुरंग चरणी लीन होऊन अभंगातून विठ्ठलाचे स्मरण, जप करीत होते.
असे गोरोबा (gora kumbhar) विठ्ठल नामस्मरणात रममाण झाले होते. गोरोबा चिखल तुडवित आहेत आणि बाळ, रांगतरांगत पित्याकडे धावत आहे. अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसतहसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. श्री. गोरोबा-काका (gora kumbhar) डोळे मिटून भाव समाधीत होते. हृदयी अनंतास आठवीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला. त्याविषयी एकनाथ महाराज सांगतात,
नेणेवेचि बाळ की हे मृत्तिका
मन गुंतलेले देखा पांडुरंगी । । १ । ।
मृतिकेसम जाहला असे गोळा ।
बाळ मिसळला मृतिकेत । । २ । ।
रक्तमांस तेणे जाहला गोळा लाल
नेणवे तात्काळ गोरोबासी । । ३ । ।
एका जनार्दनी उदक आणुनी कांता
पाहे तवं तत्वता बाळ न दिसे । । ४ । ।
अशाप्रकारे मुलाचे रक्तमांस, हाडे चिखलात मिसळली. मुलाचा प्राण ताबडतोब गेला. मुलाच्या रक्तमांसाने चिखल रंगला. परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही. जणु मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि अखेर देह मातीतच तुडविला गेला.
संती पाणी घेऊन घरी आली. पण तिला दारात मूल दिसले नाही. पाण्याची एक घागर डोईवर व दुसरी कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली. पण बाळाचा शोध कुठे लागेना! तिने गोरोबांना विचारले, धनी, आपला बाळ कुठे आहे? परंतु गोरोबांचे लक्ष संतीच्या विचारण्याकडे नव्हते. ते परमेश्वराच्या नामस्मरणात दंगच.
संतीने गोरोबांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही. शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली. आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे, हे तिच्या लक्षात आले. संतीने आक्रोश सुरु केला. बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली. ती रागाच्या भरात गोरोबांना काय म्हणते?ह्याचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित शब्दात वर्णन करतात.
जळो हे भजन तुझे आता ।
डोळे असोनिया जाहलासी आंधळा ।
कोठोनी कपाळा पडलासी ।
कसाबासी तरी काही येती दया ।
का रे बाळराया तुडविले ।
संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडविलेले गेले आहे हे गोरोबांच्या लक्षात येते. गोरोबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. त्यांच्या अंत:करणाला खूप वेदना होतात. पण हातून झालेली चूक दुरुस्त करता येणारी नव्हती. परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्गार काढले. त्यांनी गोरोबा खवळले. त्यांनी तिला हातातील चिपळ्या फेकून मारल्या आणि चाकाचे दांडके काढून मारायला धावले. त्यावेळी संतीने गोरोबांना विठ्ठलाची आण (शपथ) घातली. याप्रसंगाचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित असे वर्णन करत
हातबोट मज लावशील आता
आण तुला सर्वथा विठोबाची ।
ऐकतांचि ऐसे ठेवियेली काठी
राहिला उगाचि गोरा तेव्हा । ।
संतीने विठ्ठलाची शपथ घातल्याने गोरोबा मारता मारता तिथेच थांबले. संतीचा आकांत सुरुच होता. शेजार-पाजारचे पुरुष बायका जमा झाल्या. त्या गोरोबांना दूषण देऊ लागल्या. संती माझा बाळा कुठे आहे? माझा बाळा कुठे आहे, म्हणून छाती बडवून घेत होती. हा सगळा प्रकार आता गोरोबाला चांगलाच उमजला अन् गोरोबा संतीला म्हणाले, कारभारणी, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. कर्माची गती वेगळीच असते. देवाचे नामस्मरण करता करता त्या नामाशी एकरूप कधी झालो ते कळलेच नाही असे म्हणून गोरोबांनी आपल्या बायकोची क्षमा मागितली. संतीने देखील याप्रसंगी अखेर मनावर ताबा ठेवला.
येथे भाविकांनी, रसिकांनी गोरोबाकाकांनी मुलाला चिखलात तुडवून मारले. ह्या घटनेचा अर्थ गोरोबांच्या भावभक्तीचा प्रकार मानवा असे वाटते. कारण संतजीवनात, चरित्रात अशा अनेक चमत्कारिक घटना येतात. त्यामागे संतचरित्रे ही सर्वसामान्य माणसाहून वेगळी वाटावी. संत चरित्राचे महत्त्व वाढावे असाच भाव असलेला दिसून येतो. आणि या घटना साधकांना चेतना देणाऱ्या म्हणूनच रेखाटल्या आहेत. म्हणून अशा घटनांचा आजच्या जीवनात अर्थ घेताना भक्तिभावा चा हा प्रकार समजावा.
काही दिवस गोरोबा-संतीचा अबोला चालला, कोणीही कोणाशीच बोलेना चालेला. एके दिवशी संतीने असा विचार केला की, असा अबोला धरून आपला संसार कसा चालणार? संतीला मुलाची आणि मातृत्वाची ओढ होती. “आण ना बाण उगीचच संसारात ताण’ निर्माण झाला. उगाउगी आपण धन्याला विठ्ठलाची आण घातली. त्यामुळेच त्यांनी प्रपंचा विषयी विरक्ती स्विकारली, संसारापासून दूर जाऊ लागले असे तिला वाटू लागले. गोरोबा संसारात उदास राहून परमेश्वरात आणि त्याच्या नामस्मरणात अधिक एकरूप होऊ लागले. गोरोबांची संसाराविषयीची उदासीनता संतीला सहन होत नव्हती.


एक वंशाचा दिवा गेला आता वंशाला दुसरा दिवा हवा. संत गोरोबांनी तर संसारात पूर्णपणे वैराग्य पत्करलेले. शेवटी संतीने मनाशी विचार केला अन् ती एके दिवशी गोरोबांचे पाय धुण्याकरिता गेली असता गोरोबा म्हणतात, खबरदार, माझ्या अंगाला स्पर्श करशील तर! अग तू मला विठ्ठलाची शपथ घातली आहेस ना? मग माझ्या अंगाला हात का लावतीस! जर माझ्या अंगाला हात लावशील तर तुलाही पांडुरंगाची शपथ! अग सूर्य पश्चिमेस उगवेल! समुद्र आपली मर्यादा सोडील परंतु विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही.
अशाप्रकारे असे बरेच दिवस गेले. गोरोबांची अवस्था असोनि संत नसोनी संसारी अशीच झाली होती. अखंड नामस्मरण देवाची भक्ती आणि आपला कामधंदा एवढेच त्यांना माहीत होते. एक वर्ष होऊन गेले तरी त्यांनी संतीच्या अंगाला स्पर्श केला नाही. दुरुनच बोलणे, वागणे. संतीसारखी भावूक मनाची प्रेमऴ, संसारी स्त्री हा दुरावा किती दिवस सहन करणार? तिने गोरोबाची काळजी परोपरीने घ्यायला सुरुवात केली. तिची ही पतिसेवा दिवसेंदिवस एखाद्या व्रतासारखी होऊ लागली.
ती गोरोबांना जीवापलीकडे जपू लागली. तरीही गोरोबा तिच्याशी अलिप्तवृत्तीने वागू लागले. त्यामुळे संतीच्या जीवाला एकप्रकारची काळजी लागून गेली. आपण भावनेच्या, दु:खाच्या भरात आपण वाटेल तसे मनाला येईल तसे बोलून जातो. पण त्याचा केवठा मोठा विपरित परिणाम भोगावा लागतो. यातून संतीच्या मनातील संसाराची चिंता आणि गोरोबांच्या मनाची विरक्ती दिसून येते. या सर्व प्रसंगातून गोरोबांच्या कुटुंबाची मानसिकताही स्पष्ट होते.


गोरोबांनी दोन्ही हात तोडले

रामी ऊर्फ राणी आणि गोरोबा यांचा विवाह आनंदात पार पडला. परंतु गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. रामीच्या हितासाठी संतीने एक युक्ती योजिली. ती आपल्या बहिणीला रामीला म्हणाली, हे बघ रामी, आता मी सांगेन तसं वागायचं आपण त्यांना विठोबाची शपथ मोडण्यास भाग पाडू. संतीचे हे बोलणे ऐकून रामी म्हणाली, पण आक्का, ते कसं? 
असं नाही तसं नाही. असं म्हणायचं नाही. मी सांगेन तसंच वागायचं! असे संतीने रामीला सांगितले.
संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला. आणि गोरोबा दिवसभर नामस्मरण व भजन करून शांतपणे झोली गेले. अन् संती आणि रामी गोरोबाच्या दोन्ही बाजूस झोपल्या उजव्या हाताला संती आणि डाव्या हाताला रामी झोपली आणि संतीने ठरल्याप्रमाणे गोरोबाचा डावा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला रामीनेही गोरोबांचा उजवा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला. अन् दोघीही शांतपणे झोपी गेल्या.

गोरोबा स्नान, पूजा, नामस्मरण, भजन करण्यासाठी लवकर उठत असत. पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत. अंधारात त्यांना काही कळेनासे झाले. एवढ्यात बांगड्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना शंका आली
गोरोबा झटकन् उठले. त्यांना संती व रामी यांचा अत्यंत राग आला गोरोबांचा राग-संताप पाहून रामी व संती मनातल्या मनात फार घाबरून गेल्या गोरोबांचा संताप पाहून संतीने त्यांना दोघींनी केलेला सारा प्रकार सांगितला. तेव्हा गोरोबा म्हणाले, यात तुमचा काही दोष नाही तो माझ्या हातांचाच दोष आहे. अरेरे! घात झाला. मी माझ्या हातांनी विठ्ठलाची शपथ मोडली. विठ्ठल मला भेटायला आला नाही. मी एवढा भाग्यवान नाही मी त्याची शपथ मोडली म्हणून तो तर आणखी दूर गेला.
गोरोबांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला, दुःख झाले अन् ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही माझ्या विठ्ठलाची आण मोडली संती, मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला अन् रामीला मी उगीच त्रास दिला. असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. रामी आणि संती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात. नवऱ्यावर त्यांचा अधिकारही आहे. पण आता मी काय करु! मी विठ्ठलाची आण मोडली! नामदेव महाराजांनी गोरोबांच्या या स्थितीचे पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे,
विठोबाची माझ्या मोडियेली आण ।
गोरोबा स्नान, पूजा, नामस्मरण, भजन करण्यासाठी लवकर उठत असत. पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत. अंधारात त्यांना काही कळेनासे झाले. एवढ्यात बांगड्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना शंका आली, पाहिले तर त्याच्या शेजारी रात्री संती व रामी झोपल्या होत्या.
घेऊनिया शस्त्र तोडियले कर ।
आनंदला फार गोरा तेव्हा । ।
गोरोबांनी शस्त्र घेऊनी आपले दोन्ही हात मनगटापासून तोडून घ्यायचे ठरविले. झाल्या चुकीबद्दल संती-रामी यांनी गोरोबांची खूप क्षमा मागितली, अन् त्या दुःखाने व्यथित होऊन गोरोबापासून दूर निघून गेल्या अन् घरकामाला लागल्या. आणि इकडे गोरोबांनी धारदार शस्त्रावर दोन्ही हात आपटून घेतले. गोरोबांचे हात तुटले. त्यांना शारीरिक वेदना खूप झाल्या. पण प्रायश्चित घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते. हा प्रसंग वर्णन करताना संत नामदेव अमृतवाडी ग्रंथामध्ये लिहितात,
लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा ।
दोघासही पाळा समानची । ।
न पाळीता आण तुम्हा विठोबाची ।
धराया शब्दाची आठवण ।
अवश्य म्हणोनिया निघाला तो गोरा ।
आला असे घरा आपुलिया । ।
कनिष्ठ स्त्रियेशी आले असे न्हाण ।
न करी भाषण तिसी काही । ।
संतीला आपला नवरा आपल्याशी अन् रामीशी संभाषण करीत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यावर गोरोबा सांगतात की, मला सास-यांनी विठ्ठलाची शपथ घातली आहे. दोघींना मी सारखेच वागवणार आहे. संतीला या गोष्टीचे वाईट वाटते आपला वंश कसा वाढणार? ही संतीला काळजी होती. दोघी गोरोबांना न सांगता, न कळता त्यांच्या शेजारी झोपण्याचे ठरवितात त्यातून पुढील अनर्थ घडतो आणि विठ्ठलाची आण मोडल्याने गोरोबा आपले हात तोडून टाकतात संती अन् रामी हे दृश्य पाहतात अन् कावऱ्याबावऱ्या होतात.
कारण गोरोबांनी हात तोडले तिथे रक्ताचा थेंबही दिसला नाही. अन् शारीरावर जखमही कोठे दिसेना. गोरोबा संतीला व रामीला म्हणाले, तुम्हा दोघींना दोन हात दिलेत ते घ्या आणि तेरणा नदीच्या पलीकडे टाका.
त्याप्रमाणे त्या दोघी गोरोबांच्या आज्ञेप्रमाणे हात तेरणा नदीपलिकडे टाकतात. अन् पाहतात तर नवल दोन्ही हात गुप्त झाले. भाविकांनी व रसिकांनी घटनेचा अर्थ असा घ्यावा, की गोरोबांनी संसाराचा त्याग करून परमेश्वर भक्तीचाच मार्ग स्वीकारला आणि आपले दोन्ही हात दोघी बायकांना दिले म्हणजे आता संसाराची धुरा तुम्ही दोघीच व्हा असे सांगितले.
अन् आपला पती परमेश्वर भक्त आहे याची संतीला खात्री झाली. गोरोबांचे श़ेष्ठत्व तिच्या लक्षात आले आणि तिच्या मनाचे परिवर्तन झाले. तसेच गोरोबांनी हात तोडले याचा अर्थ असा घ्यावा की, गोरोबा संसार पाशातून विरक्त वृत्तीने राहू लागले. विठ्ठल भक्ती व नामस्मरण यासाठी हात वर्ज्य केले असा हा हात तोडले याचा अर्थ लक्षात घेता येईल. गोरोबांच्या या सर्व कृतीतून आपल्या माणसाबद्दलची आत्मीयता आणि भक्तीमार्गावरील अढळ श़द्धा किती प्रभावी होती हे स्पष्ट होते.
गोरोबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा त्याग केला, संतीने आणि रामीने गोरोबांचे मोठेपण मान्य केले अऩ् त्या दोघी संसार करू लागल्या, पण गोरोबांनी वैराग्यवृत्ती धारण केल्याने घरात धन-धान्य याची कमतरता भासू लागली. दोघी चिंतातुर होऊन कसाबसा संसार सावरू लागल्या. पण शेवटी भक्ताच्या संसाराची काळजी परमेश्वरालाच असते


पांडुरंगे धरिला कुंभारवेष – (sant gora kumbhar)

गोरोबांनी हात तोडून घेतले त्यामुळे संती-रामी यांना फार दुःख झाले. गावातील दुष्ट चांडाळ होते ते गोरोबांची निंदा करु लागले. हात तोडायची काय गरज होती. आता आम्हाकडे जर मदत मागायला आला तरी आम्ही तिळमात्र मदत करणार नाही. पण गोरोबांनी निंदकाचे घर असावे शेजारी या न्यायाने त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. क्षेमकुशल आणि कल्याण याची काळजी परमेश्वराला असते. आपला भक्त गोरोबा याच्या संसाराची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलाला काळजी वाटते. ते गोरोबांच्या घरी भक्ताचे येथे जावयाचे ठरवतात.
विठ्ठलाबरोबर रुक्मिणी आणि गरुडही जावयास तयार होतात. ते तिघेही वेष पालटून ढोकीस निघाले. विठ्ठल स्वतः विठू कुंभार झाले. विठ्ठलाच्या सांगण्यावरून रुक्मा कुंभारीण झाली. गरुड गाढव झाले. विठ्ठलाने कुंभाराचे रूपधारण केले. डोक्यावर वेडेवाकडे पागोटे घातले. अंगात बंद नसलेली बाराबंदी घातली. जीर्ण धोतर नेसले. रुक्मिणीने जीर्ण-जुने असे लुगडे नेसले. कपाळावर आडवे कुंकू लावले. नाकात मोत्याची झुपकेदार नथ घातली. गरुड गाढव झाले.
अशाप्रकारे तिघे वेष पालटून तेर गावात आले. अन् आम्ही कुंभार आहोत आणि आम्हाला काम मिळावे म्हणून ते गावात फिरू लागले. गावातल्या लोकांना कुंभाररूपी विठ्ठल सांगू लागले, मी नावाचा विठू कुंभार. रुक्मा माझी बायको. आमचे कुटुंब मोठे आहे. कामधंदा करुन पोट भरण्यासाठी आम्ही आपल्या गावी आलो आहे. कारण आमच्या गावी दुष्काळ पडलेला आहे. आम्ही मन लावून काम करु. आम्हाला मडकी घडावयास व भाजावयास येतात. आमचे काम तरी बघून मग आम्हाला ठेवून घ्या. असे चक्रपाणीचे हे सत्य बोलणे कोणाला कळेना तेर गावातील प्रत्येक जण म्हणू लागला हा गरीब कुंभार आहे.
त्याला गोरोबांच्या घरी पाठवूया. आणि गावकरी विठू कुंभाराला सांगू लागले, आमच्या गावचा गोरा कुंभार त्याने आपले हात तोडून घेतले आहेत तेथे तुम्हाला कामधंदा मिळेल. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे देव गोरोबाच्या घरी जातात अन् गोरा कुंभारला म्हणतात, आम्हांला काहीतरी काम द्या. आम्हांला पैश्याची अपेक्षा नाही. आपण जे सांगाल ते काम करु. यावर गोरोबा काका विचारतात आपण कोण? कुठले? आपले नांव गाव सांगा? तुम्ही कोणता कामधंदा करु शकता? त्यावर देव म्हणाले, मी विठू कुंभार माझी बायको रुक्मा कुंभारीण. आम्हां दोघांची एकमेकाला साथ आहे. हे गाढव (गरुड) आमचे कामधंद्याचे वाहन.
आम्ही कारगीर आहोत. मडकी घडणे भाजणे हा आमुचा व्यवसाय आहे. आम्ही पंढरपूर भागातील रहिवासी. आमच्या भागात दुष्काळ पडलेला आहे. म्हणून आम्ही कामधंद्याच्या शोधार्थ, पोट भरण्यासाठी देशोदेशी फिरत आहोत पण हे सांगताना आपण देव आहोत हे कळून दिले नाही. अन् म्हणाले, आपण द्याल ते काम करु आणि मिळेल ते पोटाला खाऊ. गोरोबांनी त्यांना आनंदाने कामाला ठेऊन घेतले. तिघेही आनंदाने गोरोबांच्या घरी राहिले. अन् भक्ताच्या घरी देव माती वाहू लागले.
नानाप्रकारची मडकी घडू लागले. प्रेमाने भक्ताच्या घरी काम करु लागले (भाविकांनी ही मूळ कथा ब्रह्म-वैवर्त पुराणात पहावी) गरुड माती वाही. विठ्ठल चिखल तुडवी. रुक्मिणी पाणी भरी. अन् विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी-मडकी तयार करु लागला. भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नानाप्रकारची कलाकुसरीची मडकी तयार करु लागला आणि ती गाडगी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या गावी बाजारात गाडगी मडकी विकू लागले. विठ्ठलाने कुंभारवेषात तयार केलेली मडकी घेण्यासाठी आसपासच्या गावातील व तेरमधील स्त्रिया मडकी घेऊ लागल्या. स्त्रिया विठ्ठलरुपी कुंभाराचे कौतुक करु लागल्या.
हे वाचा:- संत एकनाथ महाराज यांची पूर्ण माहिती 


जगदात्मा भक्तमुकी घास घाली – संत गोरा कुंभार (sant gora kumbhar)
कुंभारवेष धारण केलेले पांडुरंग आणि रुक्मिणी दिवसभर कुंभारकाम करीत असत. उभयतांना कामाचा कंटाळा असा नसे. संध्याकाळी रुक्मिणी स्वयंपाक करी. गोरोबा आणि विठ्ठल एका पात्रात जेवत असत. संती-रामी यांना वेगवेगळ्या पात्रात वाढी आणि गरुडासाठीही स्वतंत्र पात्र करीत असत. रुक्मिणीने केलेल्या स्वयंपाकाचा सर्वजण आस्वाद घेऊ लागले. एके दिवशी गोरोबा व विठ्ठल एका पात्रात जेवू लागले. विठ्ठल गोरोबाच्या मुखी घास घालून भक्ताला भरवू लागला गोरोबाही विठ्ठलला भरवू लागला.
आणि संतीही गोरोबांची सेवा करु लागली. लोकही गोरोबाचे हात नसल्याने त्यांच्याकडून आता गाडगी-मडकी मिळणार नाहीत म्हणून स्त्रिया विठ्ठलरूपी कुंभाराकडून तयार झालेली मडकी विकत घेऊ लागल्या. आणि स्त्रिया गाडगी मडकी घेत असत पण त्याच्या मोबदला देत नसत आणि विठ्ठल व गरुड शेवटी कौशल्याने सर्वांकडून धनधान्याच्या रूपात बैते गोळा करून गोरोबाच्या घरी आणून टाकीत असत.

अशाप्रकारे परमभक्त गोरोबांच्या घरी सेवेसाठी विठ्ठल-रुक्मिणी आले. ते गोरोबांची आणि त्यांच्या कुटुंबाची ही सेवा करु लागले. इतर भक्तांना विठ्ठल कुठेही दिसेना म्हणून विठ्ठलाच्या शोधार्थ संतपरिवार गोरोबाच्या गावी जायचे ठरवतात. तेर नगरीत पांडुरंग सात महिने सव्वीस दिवस राहिले.


संत गोरा कुंभार यांच्या कार्याची महती : sant gora kumbhar
श्री. संत गोरा कुंभार यांचे जीवन एका सर्वसाधारण कुटुंबात व्यतीत झाले परंतु त्यांनी आपला भक्तीभाव जपला अन् आपला प्रपंच परमार्थमय करुन टाकला. संसार आणि परमार्थ त्यांनी वेगळा मानला नाही.
श्री. संत गोरोबाकाका यांनी भक्ती आणि नामस्मरण या साधनांच्याद्वारे करणी करे तो नरका नारायण’ होईल म्हणजेच “विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले’ अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची किमया त्यांनी सर्वांना पटवून दिली. संत गोरोबा संत-मंडळात “वडील’ होतेच इतकेच नव्हे तर महाभागवतानाही आदरणीय, वंदनीय होते. संत गोरोबा विरागी पुरुष होते. अनंत, निर्गुण, निराकार अश परब्रह्माचे लौकिक रुप म्हणजे “गोरोबा’ म्हणून सर्व संत त्यांना “काका’ उपाधी बहाल करतात. पंढरीच्या पांडुरंगाचे नाम महात्म्य सांगताना संत गोरोबा म्हणतात,

तूझे रुप चित्ती राहो । मुखी तुझे नाम ।
देह प्रपंचाचा दास । सुखे करी काम । ।
देहधारी जो तो त्याचे । विहीत नित्यकर्म । ।
तुझ्या परी वाहिला मी । देहभाव सारा । ।
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा । ।
नाम तुझे गोरा । होऊनि निष्काम । । ’
गोरोबांच्या ह्या अभंगातून कोणीही अनन्य भावांनी वारकरी पंथात यावे कपाळी अबीर बुक्का लावावा. गळ्यात माळ घालावी आणि पांडुरंगांच नामस्मरण करीत आपला जीवनक्रम चालू ठेवावा. शुध्द अंतःकरणात फक्त भक्तीभावावरुन कळी फुलून द्यावी म्हणजेच त्या भक्तीचा परिमल सर्वत्र दरवळतो. इतकेच नव्हे तर तो
“देवाचा लाडका पुत्र म्हणून सन्मानित होतो ‘ त्यापैकीच गोरोबाकाका होत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे “संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे सदोदीत. ’ संत गोरोबा संसारात राहत होते. तरीही त्यांची पांडुरंग चरणी एकनिष्ठा होती. “कासयासी बहु घालिसी मळण. तुज येणेविण काय काज. एकपणे एक एकपणे एक. एकाचे अनेक विस्तारले’ हा त्यांचा पारमार्थिक भाव होता
मराठी संतांनी भक्तिमार्गाची कास धरुन भागवत धर्माचा पुरस्कार केला. माणसे सुधारावीत त्यांच्यातील मानवाची, माणुसकीची पातळी उच्चतम करावी, याच तळमळीने संत उपदेश करीत असतात. सात्त्विकपणा, शुध्दाचरण, सद्गुण यांचा विकास आणि श़ध्दामय जीवन याविषयी सर्व संतमंडळींचा स्थायीभाव होता. स्वतः संत व्हावे सभोवतालच्या लोकांवर संतपणाचे संस्कार करावेत. संतपण समाजात पसरावे अशी तळमळ मराठी संतांना होती. आणखी संतांचे विशेष सांगावयाचे म्हणजे
“संत जनहिताची मनोगते, संत श़ध्देची अंतःकुजिते, सदा संत देती स्फुर्ती, संत निर्वाणीचे सोबती, संत निर्गुणाचे गुणाकार, संत भवरोगाचे भागाकार, संत पाप तभसी भास्कर, संत वैद्य सर्वांना हे सर्व विशेषभाव इ. ज्यांच्या जीवनचरित्रात आढळतात. त्यापैकी संत शिरोमणी गोरोबाकाका एक होत. संत गोरोबांनी भागवत धर्माची प्रतिज्ञा भक्तीचा प्रचार व प्रसार करणे.
त्यांनी स्वतःचा पारंपारिक कुंभार व्यवसाय करीत संसारही केला आणि संतपणाही सांभाळीत भागवत धर्माची प्रतिज्ञा पार पाडली. भागवत धर्माच्या या प्रतिज्ञेशिवाय पंढरीचा वारकरी मनुष्यच ठरत नाही. जो उगवला दिवस देवाला स्मरुन सार्थकी लावतो तोच वारकरी ठरतो. मग तो आपल्या घरीदारी, नियत कर्तव्यकर्मात, अरण्यात, डोंगर द-याखो-यात कोठेही असो. जे स्वार्थनिष्ठ, लोभी ते वारकरी संत नाहीत.
निरनिराळ्या सांप्रदायिक स्वरुपाचे कोणी मानवमात्राच्या कल्याणाचा ध्यास घेणारे, त्याचाच सतत विचार करतात तेच साधुसंत होत. अशा साधुसंतांच्या पुण्याईने समाज साजिवंत राहत असतो. असा महाभाग संसारीही असू शकतो. आपल्या अश़ितांचे भयापासून संरक्षण करावे हा क्रम गृहस्थाश़मी संत सतत पाळत असतात संत गुणदोषांची पारख करुन जनसामान्यातला परमेश्वर जागा करण्याचा प्रयत्न श़ध्देने करतात. याचबरोबर जनकल्याणाचे कार्य निरपेक्ष भावनेने करतात. या कार्यालाच यज्ञ म्हणतात. “जे जे आपणाशी ठावे. ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करुन सोडवे सकळ जन. .  ‘ या उक्तीप्रमाणे ते संत ज्ञानयज्ञ करतात. जनयज्ञ करतात तो त्यांचा पुरुषार्थ अपूर्वच होय.
संतांचे अभंग वाङ्मय जे अभंग असते. ते भाविकांस भेटले की, तो आपण होऊनच संतांचा गुणगौरव करतो. संत मात्र रसिक, भाविक, वाचक, अभ्यासक आणि समिक्षकांच्या “निंदा स्तुतीवर लावोणी फाटी’ म्हणजे त्यांच्या टीका टिपणीचा विचार न करता त्यांचा ज्ञानयज्ञ आणि जनयज्ञ आपण असेतोपर्यंत व पश्चातापही सातत्याने पाळलेला असतो. संत शिरोमणी गोरोबाकाका यांची अभंग संख्या कमी असली तरी अभंगवाणीत आढळणारी उत्कटता, भावसमृध्दी यामुळे संतमेळ्यातील त्यांची अभंगरचना त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देणारी आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे अभंग त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांच्या अभंगवाणीतून साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, उत्कट भक्तीचा अनुभव, अनुभवाची संपन्नता, पवित्र
आणि समृध्द असा ज्ञानानुभूतीचा प्रत्यय ही त्यांच्या अभंगवाणीतून प्रत्ययास येतो नुसतीच व्यर्थ बडबड करणा-यांच्या निरर्थकतेला रामराम करुन अशा आजच्या जमान्यात “देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. ’ अशा “निश्चयाचा महामेरु’, “आवडता डिंगरु केशवाचा’ असे संतशिरोमणी गोरोबाकाका समाजाच्या खालच्या थरातला एक कुंभार आपण ब्रह्मांडाशी एकरुप झाल्याचा असा विलक्षण अनुभव घेतो की, जो योग्यानासुध्दा दुर्मिळ असतो. अद्वैताचा हा अवर्णनीय आनंद आपल्या दरिद्री प्रपंचात राहूनच त्यांनी प्राप्त केला आहे. अभेदाचे बौध्दिक ज्ञान वेगळे, हे सुखाचे सुख, हे भाग्याचे सौभाग्य, हा अत्यानंदाचा आनंदकंद, गोरोबाकाका आपल्या भक्तिभाव बळावर मिळवू शकले.
अन् “मौनं सर्वार्थ साधनम्’ असे ब्रीद उरी बाळगणाऱ्या शीलवान कर्मयोग्यास अवघे पन्नास वर्षाचे आयुष्यमान लाभले होते. संत गोरोबाकाकांनी अनंत काळाला आपल्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा, कर्तृत्वाचा जो आदर्श निर्माण केला होता तो इतिहासाला कदापिही विसरता येणार नाही.


तेर गावी गोरोबाकाका समाधीस्त – sant gora kumbhar

गोरोबाकाका समाधी
शालीवाहीन शके ११०० मध्ये अनेक संतांनी अवतार घेतले. अन् भक्तीच्या मार्गाचा प्रसार करुन त्यांनी जनकल्याणाचे दैदीप्यमान असे कार्य केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आजही जनमाणसांच्या मनावर उमटलेला आहे. “ईष्वरनिष्ठांच्या मांदियाळी’ ने जनकल्याणासाठी तीर्थयाख केल्यानंतर ते धन्य पावले. त्यानंतर अनेकांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर, सोपानदेव, चांगदेव, निवृत्तीनाथ, इ. नी समाधी घेतली. मुक्ताई ग्रह्मस्वरुप लीन झाली. या संतांच्या समाधी सोहळ्यास पांडुरंगासंगे गोरोबाकाकाही होते. त्या समाधी प्रसंगांचे वर्णन नामदेव गाथेत नामदेवांनी केलेले आहे ते वाचकांनी वाचावे. पांडुरंगाच्या हस्ते सावतामाळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, कुर्मा, विसोबा खेचर इ. चारही समाधी सोहळा पांडुरंग हस्ते पार पडला. अशा प्रकारे वैष्णव समुदायाचा समाधी सोहळा संपन्न झाला.
अन् सकल संत समाधीस्त झाल्याने दुरावले. सकलसंत निजधामा गेल्याने गोरोबाकाका मनाने खिन्न झाले. सकल संतांचे अभंग गाऊन पांडुरंग गोरोबाकाकांचे (gora kumbhar) सांत्वन करु लागले. पण गोरोबाकाका विठ्ठलाला म्हणू लागले. संतसंगविना माझे कशातही लक्ष लागत नाही, मनाला समाधान लाभत नाही, संतसंगाशिवाय मला कशाचीही गोडी वाटत नाही, उदा, खिन्न गोरोबाकाका (gora kumbhar) पांडुरंगाच्या मुखाकडे पाहत आणि व्याकुळ होत होते. चैत्र वैद्य दशमी दिवशी गोरोबाकाका खिन्न मनाने विचार करु लागले, “”संतदर्शनाला आता मी पारखा झालो.
संताशिवाय माझे दुसरे कोणीही सोयरे नाहीत. संतसंगतीशिवाय मला दुसरे काही आवडत नाही. संत प्रेमानी मला वेडे केले आहे. संतांच्या प्रेमात मी बांधला गेलो आहे. त्यांच्या प्रेमामुळे मला मी विसरलो आहे. पांडुरंगाने गोरोबाची (gora kumbhar) ही स्थिती जाणली आणि गरुडाला सांगून पंढरपुरातून रुक्मिणीसह ज्येष्ठ-श़ेष्ठ अशा वैष्णव भक्तांना तेरला आणावयास सांगितले. भक्त पुंडलिकासह रुक्मिणी सनकदीक, नारद इ. ची दाटी झाली. पांडुरंगाने गोरोबास अलिंगन दिले. भक्त आणि पांडुरंगाची ही भेट पाहून सकलसंतांच्या डोळ्यात आनंदाश़ू उभे राहिले.
पताका, टाळ, दिंडीसह संतमंडळीही गंध, चंदन, बेलाची पाने, अक्षता, अर्पूण, निरंजन लावू लागले. प्रत्येकजण संत गोरोबाकाकांना (gora kumbhar) प्रेमभरे भेटू लागले आणि समाधीसाठी आवश्यक असणारी शेज पांडुरंगाने तयार केली. नामाचा गजर करुन इ. स. १३१७ (शके १२६७)साली कृष्णपक्ष त्रैयोदशीस दुपारच्या समयी तेर येथे पांडुरंगानी गोरोबाकाकांना (gora kumbhar) समाधीस्थळी बसविले. तेर येथे कालेश्वर लिंगाशेजारी गोरोबांची समाधी आहे. अशारितीने श्री गोरोबाकाका (gora kumbhar) यांचे व्यक्तिमत्व, जीवन चरित्र अलौकिक असेच होते. ते परग्रह्म होऊन जीवनमुक्तांचे जीवन जगले. गोरोबाकाकांच्या (gora kumbhar) जीवनचरित्र वाचनाने या जगातील अज्ञानी लोक जितके शहाणे
होतील तितके अधिक या भूमंडळातील लोकजीवनातील दुःखे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर रामनाम जपाने गणिकेचा उध्दार झाला अजामिळाला मुक्ती मिळाली. पापी लोक हरिनामाने तरले हे आपणां सर्वांना ज्ञात आहेच. म्हणून संतशिरोमणी गोरोबाकाका (gora kumbhar) यांच्या जीवनचरित्रातून एकच संदेश घेता येईल, असे वाटते तो म्हणजे, “विठ्ठलमंत्र सोपा असुनी एकेवळी तरी उच्चारावा’ या मंत्राने साधक व भाविक भक्तांचे, जनसामान्यांचे जीवनतंत्र सुधारेल. जनसामान्यांना त्यांचे जीवन आदर्श भक्त कसा असावा? यासाठी प्रेरणादायी चैतन्यदायी असे वाटते.

संत गोरोबा काकांचा चरित्र ग्रंथ गोरोबाकाकांच्या चरणी अर्पण

तेर : संत गोरोबा काकांची जीवनगाथा असलेला चरित्र ग्रंथ, ‘ वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काका ‘ आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर गोरोबा काकांच्या समाधी स्थानी त्यांच्या चरणी अर्पण करण्यात आला. या ग्रंथाचे लेखक, संत वाङ्मयाचे अभ्यासक व कथा प्रवक्ते तथा संत चरित्र निरूपणकार श्री दीपक महाराज आणि या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे योगदान असलेले, श्रीराम हॉस्पिटल मुरुडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश रणदिवे यांच्या हस्ते सदरील ग्रंथ गोरोबाकाकांच्या समाधीस अर्पण करण्यात आला. याप्रसंगी कला शिक्षक नवनाथ पांचाळ, लातूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ चिरे, ह. भ. प. अविनाश तपिसे इत्यादींची उपस्थिती होती.


संत परीक्षक श्री गोरोबाकाकांचे हे जीवन चरित्र समग्र प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आले असून या पुस्तकामध्ये कवी राजेंद्र अत्रे, धाराशिव व नवनाथ पांचाळ, तेर यांची रेखाटने टाकण्यात आली आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ फोर्टीफाय कम्युनिकेशन मुंबई यांनी तयार केले असून मुद्रण व्यवस्था शिवानी प्रिंटर्स पुणे यांनी पाहिली आहे. अक्षर जुळणीचे काम श्री नेताजी जावीर आणि पुस्तकातील छायाचित्रे राज फोटो स्टुडिओ यांच्या वतीने देण्यात आली आहेत. या पुस्तकामध्ये 80 GSM चा कागद वापरण्यात आला असून, 130 GSM च्या आर्ट पेपरवर 12 पृष्ठांवरती या विषयाने रंगीत छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. संत गोरोबाकाकांच्या चरित्र व वाङ्मयाचा प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेला, सुमारे 270 पृष्ठांचा हा ग्रंथ, वाचकांसाठी केवळ 80 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. परफेक्ट व पुठ्ठा किंवा गॅली बाइंडिंग प्रकारात तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे वितरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती वैराग्य महामेरू प्रबोधिनीचे प्रसिद्धी प्रमुख यांच्याकडून देण्यात आली आहे.


कुंभार १

चाकावर मडक्याला कुंभार आकार देताना(srikakulam townकुंभार
ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो, मात्र त्या भाजायची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही(बुलाबाई-बुलोजी) बनवतो. कुंभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद कालापासून कुंभार आहेत. त्यांच्या देवता पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, हर्दिया या असतात.
पोटजाती
महाराष्ट्रातील कुंभारांमध्ये २२ पोटजाती आहेत. त्या अशा : अहिर, कडू, कन्‍नड, कोकणी, खंभाटी, गरेते, गुजर, गोरे, चागभैस, थोरचाके, पंचम, बळदे, भांडू, भोंडकर, भोंडे, मराठे, लडबुजे, लहानचाके, लाड, लिंगायत, हातघडे आणि हातोडे. कुमावत
कुंभाराची माती
कुंभारकलेसाठी तलावातली किंवा गाळातली विशिष्ट प्रकारची माती लागते. माती आधी उन्हात वाळवतात आणि मग कु्टून बारीक करतात. त्यानंतर तिच्यात घोड्याची लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे वगैरे कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे गोळे बनवून ते कलाकृतीसाठी वापरतात.
कुंभाराचे चाक
कुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते. या चाकाचा व्यास ३० ते ३८ सेंटिमीटर असतो. चाकाला दहा ते बारा आरे असतात. चाकाखाली दगडात बसवलेला एक खुंट असतो. चाकाच्या लाकडी माथ्यावर (तुंब्यावर) मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिली जाते. हे चाक ५-१० मिनिटे फिरते. चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो. तयार झालेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यावर भांडे हळूच काढून आधी सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते, आणि नंतर अशी तयार झालेली अनेक भांडी आवा(कुंभाराची भट्टी) पेटवून तीत भाजली जातात.
अन्य अवजारे
आवा : म्हणजे कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी. पाचसहा विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा, अशी आव्याची रचना असते. भाजलेल्या वस्तूंना तांबडा रंग हवा असेल तेर, आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात. वस्तू काळ्या रंगाच्या हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्या आत कोंडून वस्तूंना काळा रंग येतो. [१]
गंडा किंवा गुंडा : हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो. वस्तूच्या आतून, वस्तूवर हा एका हाताने फिरवला की वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते.
चोपणे : ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते. जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते. त्यामुळे वस्तू पक्की होते.
बांबूचा दांडा : हा चाक फिरवायला लागतो. चाकाच्या दोन आ‍ऱ्यांमध्ये बांबू घुसवून कुंभार चाकाला गती देतो.
मण्यांची माळ : ही वस्तूला चकाकी आणण्यासाठी वस्तूवरून फिरवली जाते. [१]
साचे : विटा, मूर्ती वगैरेंसाठी लाकडी साचे असतात. [२]

संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
Sant Goroba Kaka Punyatithi 2025: संत गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणून ओळखले जाते. पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या, संतमहात्म्य आणि कार्य. . .

संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
sant goroba kaka punyatithi 2024 know about sant gora kumbhar on remembrance | संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महतीSant Goroba Kaka Punyatithi 2024: महाराष्ट्राला मोठी वारकरी परंपरा लाभलेली आहे. पैकी एक म्हणजे संत गोरा कुंभार. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. यंदा २०२४ मध्ये ०६ मे रोजी संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी आहे. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर धाराशिव जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.
गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. तेर येथील ‘काळेश्वर’ या ग्रामदैवताचे त्यांचे घराणे उपासक होते. त्यांचे आई-वडील कुंभारकाम व काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात त्यांचे वडील माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिले.
संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते
संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले. निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून, संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें ।
तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥१॥
 
मज रूप नाहीं नांव सांगू काई ।
झाला बाई बोलूं नये ॥२॥

बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥

म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखी मिठी पडली कैसी ॥४॥

हा संत गोरा कुंभार यांचा अभंग प्रसिद्ध आहे. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग रचना केल्या आहेत. संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर नाटक, चित्रपट निर्मिती झालेली आहे. मराठीतील संत गोरा कुंभार हा चित्रपट अतिशय गाजला होता. गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते. गोरोबांना ज्ञानदेव, नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे/भक्तांचे केंद्र होते. अनेक शिवभक्त त्याठिकाणी आपली साधना करीत होते. ते भक्त होते, योगी होते. सिद्ध, साधकही होते. गोरोबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेंव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाचं दर्शन होई. गोरोबाकाकांच्या चरित्रातील हे तन्मयवृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे.
विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले
एके दिवशी गोरोबा पायाने चिखल तुडवित होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. गोरोबा जरी संसारात दंग होते. तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले होते. संत जन्मतःच ईश्वरभक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहानभूक हरपून जात. असे गोरोबा विठ्ठल नामस्मरणात रममाण झाले होते. गोरोबा चिखल तुडवित असताना त्यांचे बाळ रांगतरांगत पित्याकडे धावत आहे. अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसतहसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. गोरोबा काका डोळे मिटून भाव समाधीत होते. हृदयी अनंतास आठवीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला, ही कथा प्रचलित आहे.
जम्मू शहरात संत गोरोबा काका यांचे मंदिर
संत नामदेव उत्तर भारतात खूपच प्रसिद्ध आहेत. संत नामदेवांनी महाराष्ट्रासह उत्तर भारतातही मोठे कार्य केले आहे. संत नामदेव यांच्याप्रमाणेच संत गोरा कुंभार यांचीही ख्याती उत्तर भारतात असल्याचे सांगितले जाते. जम्मू शहरात आजपासून ३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या संत गोराजी कुंभार यांच्या मंदिराला आता हजारो भाविक नित्य भेट देत आहेत. महिन्याच्या पहिल्या रविवारी या मंदिरात भाविकांसाठी लंगरदेखील लागतो. जम्मू शहरातील इंदिरा गांधी चौकातील गोराजी कुंभार यांचे मंदिर आता देशभरातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण म्हणून हळूहळू उजेडात येऊ लागले आहे. जम्मू शहरात प्रजापती कुंभार समाज वास्तव्यास आहे. समाजाचे संघटन मोठे आहे. त्यातून त्यांना समाजाच्या संघटनाला चालना देण्यासाठी एक मंदिर निर्माण करण्याची कल्पना सुचली. महाराष्ट्रात संत नामदेव यांचे समकालीन असलेले संत गोरोबा कुंभार होऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली. व्यवसायाने अभियंता असलेले समाजाच्या सोसायटीचे अध्यक्ष अयोध्याकुमार मनावा यांनी पुढाकार घेतला. उत्स्फूर्तपणे अनेकांनी आर्थिक हातभार लावला आणि जानेवारी १९८६ साली जम्मू शहरात पहिल्यांदा या मंदिराच्या माध्यमातून संत गोराजी कुंभार यांची प्रत्यक्ष ख्याती पोहोचली.


Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती


संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ. स. 1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे  नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते.  त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते. यांचे कुटुंबीय ‘काळेश्वर’ या ग्राम देवतांचे उपासक होते. त्यांचे आई वडील कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांचे वडील गावात संत माधव बुवा म्हणून ओळखले जायचे. त्यांना आठ अपत्ये झाली पण दुर्देवाने ते फार काळ जगली नाही. आपल्या आठही मुलांना त्याने दारुण हृदयाने पुरले. पण ईश्वराची किमयाच वेगळी पांडुरंग साक्षात माधवबुवांच्या घरी ब्राह्मणाचे वेष घेऊन आले

आणि त्यांना दुखी होण्याचं कारण विचारले. त्यावर माझ्या मुलांना मी माझ्या हाताने पुरले आहे आणि माझे आठही मुलं देवाने नेले. असे सांगितल्यावर पांडुरंगाने माधवबुवांना ज्या जागी मुलांचे मृतदेह पुरले आहे ते दाखवण्यास सांगितले आणि प्रेत बाहेर काढण्यास सांगितली. पांडुरंगाने सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रेत काढले आणि पांडुरंगाने त्या सात ही मुलांना जिवंत केले आणि स्वर्गात पाठवणी केली. नंतर त्यांनी आठव्या मुलाला देखील जिवंत केला आणि तो देखील स्वर्गाकडे जायला निघाला तेवढ्यात पांडुरंगाने त्यांना थांबविले आणि माधवबुवा आणि रखुमाईच्या हातात दिले आणि म्हणाले गोरीतून काढल्यामुळे ह्याचे नाव गोरोबा असेल. अशी आख्यायिका आहे.   
 
गोरोबा पेशाने कुंभार होते. संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते, संत गोराबा हे ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, मुक्ताबाई, सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडीलधारी होते.
 
त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत. संत गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदि संताची, ‘कोणाचे मडके(डोके)किती पक्के’अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली. तेव्हा संत नामदेवांना या गोष्टीचा राग आला होता, त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरूपदेश घ्यावयास सांगितले. तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले.

संत गोरा कुंभार यांचा विवाह संतीशी झाला. त्यांना एक गोंडस बाळ झालं. नंतर त्यांनी रामी यांच्याशी लग्न केले.   
संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत, भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात. त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवयास सांगून पाणी आणवयास गेली असता, श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना, लहानग्या बाळास मडकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडविण्यासाठी चिखलात रांगणारे लहानगे बाळ जवळ आले आणि मातीत त्यांच्याच पायाखाली  गाडले गेल्याचे समजले नाही. त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यत लहानगे बाळ गतप्राण झाले होते. तिच्या हंबरड्याने गोरोबांना जाग आली व ते पश्चाताप करु लागले. नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मुल जिवंत झाले. (अशी अख्यायिका सांगितली जाते. )

संत गोरोबांनी शके 1239 मध्ये 20 एप्रिल 1317 रोजी समाधी घेतली. संत गोरोबा कुंभारांची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी गावात आहे. या समाधी जवळ एक मंदिर आहे.
 
संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडी आहे. त्यांचे सुमारे 20 अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट केले आहेत. त्यांची उपलब्ध असलेली काव्यरचना अत्यंत गोड अशी आहे.
 
संत गोरोबांचे अभंग-
संत गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत. निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.
 
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥१॥
 
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥२॥
 
एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥३॥
 
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥४॥
 
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
 
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥
 
मज रूप नाहीं नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥२॥
 
बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥
 
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखीं मिठी पडली कैसी ॥४॥
 
संत गोरा कुंभार-
 

श्री संत गोरोबा काकांची मूळ पारंपारिक आरती

संत गोरोबा काका आरती १

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

संत गोरा कुंभार आरती 1
सत्तावीस युगे सत्यपूर नगरी । न वर्णवे त्या हरी हरा थोरी ।
अखंड ध्यातो पूजा विस्तारी । शुक सनकादीक जय जय हाकारी ।
जय देव जय देव जय गोरोबा । आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा । जय देव जय देव … । । धृ । ।
धन्य कवित्व अनुपम्य केले । ऐकता जीव शिव संतुष्ट झाले ।
पाहता पाऊले विश्व मावळले । अनुभव घेता सद्गुरू भेटले ।
जय देव जय देव जय गोरोबा । आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा । जय देव जय देव … । । १ । ।
दूरपण उघडे तुजपाशी केले । अनुभव घेता तापसी झाले ।
म्हणुनी नामा ओवाळी भावे । त्यापाशी देव कैवल्य साचे ।
जय देव जय देव जय गोरोबा । आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा । जय देव जय देव … । । २ । ।

श्री क्षेत्र तर येथील श्री संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिरातही हीच आरती घेतली जाते.
(
याबाबत काही बोलायचे असल्यास संपर्क :- तेर मो. क्र. ९४२१३५७३३८. )


संत गोरोबा काका आरती 2


श्री संत गोरा कुंभार आरती.
आरती गोरोबा काका, संत शिरोमणी राजा ।
वंदती साधू संत, चरणी ठेविला माथा ।
॥ आरती गोरोबा काका. . . .  संत. . .
॥ कुलाल वंशी जन्माला, तिर्थ तेर ढोकीला ।
पांडूरंग लीन झाला, कुंभार वंश उध्दरीला । ।
आरती गोरोबा काळा. . . संत. . .
प्रतिज्ञा केली थोर, तोडीले दोन्ही कर ।
देव सावरला संसार, मडके घडले चाकावर । ।
॥ आरती गोरोबा काका. . . संत. . .
 संत नामदेव किर्तना हरि नामाची गर्जना
कर केले वर थोटे, हाता फुटली बोटे । ।
आरती गोरोबा काका. . . संत. . .
अशी तुझी थोर भक्ती बाळ तुडविले माती ।
शेषानंद मागे मुक्ति, द्यावी अशी ही शक्ती । ।
आरती गोरोबा काका. . . संत. .


गोरोबांच्या संदर्भखुणा


संत गोरा कुंभारांचा प्रभाव खूप मोठा. मात्र त्यांच्यावर तुलनेनं खूपच कमी लिहिलं गेलंय. आजदेखील त्यांच्यावर एकही पीएचडी झालेली नाही. असं असलं तरी गोरोबांविषयी असलेले हे काही संदर्भ. पुस्तकं, लेख, कोशांमधल्या नोंदी, सिनेमे आणि नाटकही.
एमफिल प्रबंधिका
संत गोरा कुंभार : चरित्र व अभंग, विलास तुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, १९९८
पुस्तकं
श्री गोरा कुंभार चरित्र, प्रा. र. रा. गोसावी, वीणा गोसावी, सारथी प्रकाशन, पुणे, १९८४
संत गोरा कुंभार चरित्र व वाङ्मय, किसन महाराज साखरे, तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, १९८५
गोरोबा चरित्रामृत, सदाशिवराव पाटील – पिंपरीकर, १९८९
श्री संत गोरोबाकाका अभंगमाला, प्रकाशक : संत गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्ट, तेर, १९९९
म्हणे गोरा कुंभार, प्रा. वेदकुमार वेदालंकार, विकास प्रिंटर्स, उस्मानाबाद, २००१
श्री संतशिरोमणी गोरा कुंभार चरित्र, प्रकाश कुंभार, ज्योती प्रकाशन, कोल्हापूर, २००२
संत गोरा कुंभार : वाङ्मय दर्शन, डॉ. बाबूराव उपाध्ये, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २००८
संत गोरा कुंभार : कार्य, अभंग व चमत्कार कथांचा अन्वयार्थ, महादेव कुंभार, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २००८
श्री विठ्ठलाच्या संतमेळाव्यात श्री संतगोरा कुंभार, डॉ. धों. दौ. कुंभार, मुक्ताई प्रकाशन, कोल्हापूर२००९
श्री संत गोरोबा काका भावदर्शन गाथा, हरिश्चंद्र मंदिलकर, अनुराधा प्रकाशन, पैठण/शेवगाव, २०११
संत गोरा कुंभार व इतर, लीला पाटील, ऋचा प्रकाशन, नागपूर, २०१२
वैराग्यमहामेरू (चरित्रपर कादबंरी), दीपक खरात, जनशक्ती वाचक चळवळ, २०१३ (पुस्तकरूपाने येण्याआधी ही कादबंरी २००४ साली ऑडियो सीडी स्वरूपात)
जीवनमुक्त (चरित्रपर कादंबरी), विलास राजे, संवेदना प्रकाशन, चिंचवड, २०१३
संतांचं थापटणं, डॉ. ललिता गुप्ते, पुणे, २०१३
तगर तेतेर (ई-बूक), दीपक खरात, ईसाहित्य प्रतिष्ठान, ठाणे, २०१४
संत गोरा कुंभार (पुस्तिका), डॉ. अशोक कामत, गुरुकुल प्रतिष्ठान, पुणे, २०१४
अभंगरूप संतपरीक्षक गोरोबाकाका, दीपक खरात, वैराग्यमहामेरू प्रकाशन, तेर, २०१५
श्री संत गोरा कुंभार चरित्र, प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत, अमोल प्रकाशन, पुणे २०१५
श्री संतगोरा कुंभार जीवन दर्शन, सोमनाथ मोरे, औरंगाबाद, २०१६
संत गोरा कुंभार चरित्र, प्रा. विमल वाणी, सुकृत प्रकाशन, सांगली, २०१६
श्री संत गोरा कुंभार, संपादक : संजय रुईकर, पुष्पांजली प्रकाशन, नांदेड (प्रकाशनवर्ष उपलब्ध नाही)
संत गोरोबाकाका चरित्र व अभंग, बबनराव अंधारे, पुणे (प्रकाशनवर्ष उपलब्ध नाही)
तेर, डॉ. शां. भा. देव, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग संचालक, मुंबई (प्रकाशनवर्ष उपलब्ध नाही)
दक्षिणेतील मथुरा तेर, राज कुलकर्णी, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
संत गोरोबा व संत विसोबा, म. वि. गोखले, कुलकर्णी प्रकाशन, पुणे
विशेषांक 
संत गोरा कुंभार विशेषांक, स्वस्तिश्री दिवाळी अंक, संपादक : किसनमहाराज साखरे, आळंदी, १९८४
तेर गौरवग्रंथ, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद, २००१
संत गोरा कुंभार विशेषांक, ज्ञानेश्वर त्रैमासिक, संपादक : प्रा. प्र. द. पुराणिक, पुणे, नोव्हेंबर २००३
कुंभार दर्शन, (स्मरणिका), महाराष्ट्र राज्य कुंभार समिती, संपादक : महादेव खटावकर, २००९
श्री संतगोरा कुंभार दिवाळी विशेषांक, साप्ताहिक पंढरीसंदेश, संपादक : एकनाथ थावरे, पंढरपूर, २०१६
विचारशलाका, संत गोरोबा काका सप्तशताब्दी पुण्यतिथी अभिवादन ग्रंथ, संपादक : प्रा. नागोराव कुंभार, २०१७
संत गोरोबाकाका समाधी उत्सव विशेषांक, दैनिक संघर्ष, उस्मानाबाद
सिनेमा आणि नाटकं 
भक्त गोरा कुंभार (सिनेमा – मूकपट), दिग्दर्शक : दादासाहेब फाळके, हिंदुस्तान फिल्म कंपनी, १९२३
गोरा कुंभार (मराठी सिनेमा), दिग्दर्शक : आनंदकुमार, छाया फिल्म्स, १९४२
संत गोरा कुंभार (मराठी सिनेमा), दिग्दर्शक : राजा ठाकूर, भागिरथी चित्र, १९६७
भक्त कुंबारा, (कन्नड सिनेमा), दिग्दर्शक : हुन्सूर कृष्णमूर्ती, लक्ष्मी फिल्म कंबाईन्स, चेन्नई, १९७४
चक्रधारी (तेलुगू सिनेमा), दिग्दर्शक : व्ही. मधुसूदन राव, लक्ष्मी फिल्म कंबाईन्स, चेन्नई, १९७७
चक्रधारी (तमिळ सिनेमा), दिग्दर्शक : व्ही. मधुसूदन राव, लक्ष्मी फिल्म कंबाईन्स, चेन्नई, १९७७
संगीतसंतगोरा कुंभार, (नाटक), लेखक :अशोकजीपरांजपे, दिग्दर्शक : दिलीप कोल्हटकर, साहित्य संघमंदिर, मुंबई, १९७८
भगत गोरा कुंभार (गुजराती सिनेमा), दिग्दर्शक : दिनेश रावल, जय फिल्म्स, १९७८
भक्त गोरा कुंभार (डब हिंदी सिनेमा), दिग्दर्शक : दिनेश रावल, जय फिल्म्स, १९८१
संत गोरा कुंभार (मराठी व्हिडीयोपट), दिग्दर्शक : राजू फुलकर, सुमित म्युझिक, २००६
संत गोरा कुंभार (मराठी व्हिडीयोपट), दिग्दर्शकः विनय गिरकर, व्हिनस, २०१३
संत गोरा कुंभार (मराठी व्हिडीयोपट), दिग्दर्शक : अशोक कोर्लेकर, टी सिरीज, २०१६
पुस्तकांतले लेख
गोरोबाख्यान (कीर्तन संहिता), वा. ल. पाठक, संपादन : यशवंत, पहिली आवृत्ती १९२७
गोरोबा (नोंद), भारतीय संस्कृतिकोश, खंड ३, पं. महादेवशास्त्री जोशी, १९६५
गोरा कुंभार (नोंद), मराठी वाङ्मयकोश, प्राचीन खंड, अ. ना. देशपांडे, १९७४
गोरा कुंभार (नोंद), विश्वकोश खंड ५, वि. दा. फरांडे, १९७६
गोरोबाकाकांची एक नवी आख्यायिका (कविता), संतोष पद्माकर, पिढीपेस्तर प्यादेमात, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, २००८
संत गोरोबांची विठ्ठलभक्ती (‘मराठवाड्यातील संत महंत’ या पुस्तकातला लेख), प्रा. भगवान काळे, २०१०
विठ्ठला तू वेडा कुंभार (‘संतपटांची संतवाणी’ या पुस्तकातला लेख), इसाक मुजावर, प्रतीक प्रकाशन, पुणे, २०११
संत गोरा कुंभार (‘मानवमुक्तीची संत चळवळ’ या पुस्तकातला लेख), डॉ. नागोराव जाधव, लातूर, २०१६
गोरा लाजला अंतरी (‘संत परंपरा आणि कृषिसंस्कृती’ या पुस्तकातला लेख), प्रा. वामन जाधव, हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१७



गोराकुंभारचरित्र – अभंग ३६३३ ते ३६६३ संत एकनाथ महाराज गाथा

३६३३सत्यपुरी ऐसे म्हणती तेरेसी. ३६३३
सत्यपुरी ऐसे म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥
नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजी ॥२॥
उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार । भाजन अपार घडितसे ॥३॥
एका जनार्दनी ऐका सविस्तर । पुढील प्रकार आनंदाने ॥४॥

३६३४प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । . ३६३४
प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥१॥
मृत्तिका भिजवी भाजनाकारणे । प्रेमयुक्त नाचणे नाममुखी ॥२॥
एके दिनी कांता ठेवुनी जवळी बाळ । उदकालागी उताविळ जाती जाहली ॥३॥
एका जनार्दनी मूल ते रांगत । आले असे त्वरित मृत्तिकेजवळी ॥४॥
 
३६३५लावूनिया नेत्र सदा समाधिस्थ । आठवी. ३६३५
लावूनिया नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजी ॥१॥
नाही देहावरी रुपी जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामे ॥२॥
अज्ञान ते बाळ धरित ते पाया । चित्त देवराया समरसले ॥३॥
एका जनार्दनी नाचता समरसे । बाळ पायांसरसे चिखली आले ॥४॥

३६३६. नेणवेची बाळ की हे मृत्तिका३६३६
नेणवेची बाळ की हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगी ॥१॥
मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ मिसळला मृत्तिकेंत ॥२॥
रक्त मांस तेणे जाहला गोळा लाल । नेणवे तात्काळ गोरोबासी ॥३॥
एका जनार्दनी उदक आणुनी कांता । पाहे तव तत्वता बाळ न दिसे ॥४॥

३६३७. येवोनिया जवळी बोभाट तो केला ३६३७
येवोनिया जवळी बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली ॥१॥
ठेवूनिया बाळ जीवनालागी गेले । तुम्ही काय केले बाळ माझे ॥२॥
परि तो समाधिस्थ नायकेचि बोल । वाचे गाय विठ्ठल प्रेमभरित ॥३॥
नाचे आनंदाने गाय नामावळी । एका जनार्दनी बोली कोण मानी ॥४॥

३६३८. अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा ३६३८
अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढे बाळ होते ॥१॥
जळो ते भजन आपुलेनि हाते । बाळ मृत्तिकेंत तुडविले ॥२॥
ऐकोनिया शब्द जाहला पै सावध । एका जनार्दनी क्रोध आला मनी ॥३॥

३६३९. अहा गे पापिष्टे भजन भंगिले । ताडनालागीं३६३९
अहा गे पापिष्टे भजन भंगिले । ताडनालागी घेतले काष्ठ हाती ॥१॥
नेणवेची बाळ आपण तुडविले । भजनाचे वाटले दु:ख मनी ॥२॥
घेऊनिया काष्ठ तांतडी धावला । का गे त्वां भंगिला नेम माझा ॥३॥
एका जनार्दनी मारुं जाता घाय । तेव्हा कांता बोले काय गोरोबासी ॥४॥

३६४०स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची. ३६४०
स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकताचि वचन मागे फ़िरे ॥१॥
जनमुखे सर्व कळाला समाचार । परि अंतरी साचार व्यग्र नोहे ॥२॥
ह्रदयी ध्यातसे रखुमाईचा पती । निवारिली भ्रांती संसाराची ॥३॥
एका जनार्दनी चालविला नेम । परि पुरुषोत्तम नवलपरी ॥४॥

३६४१. संसाराचा हेत राहिला मागे । ३६४१
संसाराचा हेत राहिला मागे । अंगसंग वेगे नोहे कांते ॥१॥
एकांती राहाती परि न लिंपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥
माझ्या विठोबाची घातलीसे आण । नहोचि संतान वंशासी या ॥३॥
एका जनार्दनी ऐसे चालत आले । परि स्त्रियेने केले नवल देखा ॥४॥

३६४२. आपुल्या पित्यासी तिणे बोलाविलें३६४२
आपुल्या पित्यासी तिणे बोलाविले । जाहले ते कथिले वर्तमान ॥१॥
पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥
महाजन शेटे सर्व मेळविले । विचारी बैसले कुल्लाळ सर्व ॥३॥
धाकुटी ती मूल आपण पै द्यावी । संतती चालवावी गोरोबाची ॥४॥
एका जनार्दनी करुनी विचार । विवाह प्रकार केला दुजा ॥५॥

३६४३विधियुक्त पाणिग्रहण पै जाहले । . ३६४३
विधियुक्त पाणिग्रहण पै जाहले । जामातालागी वहिले काय बोले ॥१॥
तुम्ही हरिभक्त दुजा नाही भाव । चालवा गौरव उभयता ॥२॥
एक एकपणे न धरावे भिन्न । पाळावे वचन वडिलांचे ॥३॥
एका जनार्दनी सांगूनिया मात । घातली शपथ विठोबाची ॥४॥

३६४४गोरियाने केला मनासी विचार । हाचि. ३६४४
गोरियाने केला मनासी विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥
लिगाड ते आपोआप मावळले । विषयांचे जाहले तोंड काळे ॥२॥
विठ्ठले करुणा केली सर्वपरी । तारियेले भवपुरी संसाराचे ॥३॥
एका जनार्दनी खुंटला वेव्हार । नाही आन विचार प्रपंचाचा ॥४॥

३६४५. उपवर ती कांता जाहली असे जाण३६४५
उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्‍याची वासना नाही कामी ॥१॥
विठोबाची आण घालोनि निरविले । उभयता ते वहिले पाळा तुम्ही ॥२॥
सांगूनिया बध्द आपुल्या ग्रामा गेला । पुढे काय विचार जाहला परियेसा ॥३॥
एका जनार्दनी सुखरुप तिघें । कामधाम वेगे करिताती ॥४॥

३६४६. ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । ३६४६
ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयता कळले गुज त्याचे ॥१॥
स्त्रियेचे चरित्र न कळे ब्रम्हादिका । उभयता विचार देखा करिताती ॥२॥
दोघी दो बाजूंस करिती शयन । कर उचलोनि धरती ह्रदयी ॥३॥
सावध होउनी पाहे कर चोरी गेला । एका जनार्दनी त्याला शिक्षा करु ॥४॥

३६४७. चोरासी खंडन करावे हाचि धर्म ३६४७
चोरासी खंडन करावे हाचि धर्म । आणीक नाही वर्म दुजे काही ॥१॥
माझ्या विठोबाची आज्ञा पै मोडिली । शपथ पाळिली नाही दुष्टे ॥२॥
घेऊनिया शस्त्र केले पै ताडन । खंडिले कर जाण उभयता ॥३॥
एका जनार्दनी करिता सुपरीत । तो घडले विपरीत स्त्रियेसी हे ॥४॥

३६४८. कामाचिया आशें घडला प्रकार । राहि३६४८
कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥
भाजन घडणे राहिले सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥
उदरानिमित्त कष्ट बहु करिती । निर्भय तो चित्ती असे गोरा ॥३॥
एका जनार्दनी न सोडीच भजन । पाहूनि नारायण काय करी ॥४॥

३६४९. रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी३६४९
रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग ॥१॥
माझियाकारणे कर तोडियेले । सांकडे पडिले मज त्याचे ॥२॥
माझिया भक्ताची मज राखणे लाज । म्हणोनिया गुज तुज सांगितले ॥३॥
एका जनार्दनी उभयता निघाले । सांगाते घेतले गरुडासी ॥४॥

३६५०वेष पालटोनी देव कुंभार पै जाहले. ३६५०
वेष पालटोनी देव कुंभार पै जाहले । गरुडासी केले गाढव तेव्हा ॥१॥
येऊनिया तेरे पुसतसे लोका । कुल्लाळ तो देखा गोरा कोठे ॥२॥
आम्ही परदेशी जातीचे कुंभार । नाम विठु साचार मज म्हणती ॥३॥
एका जनार्दनी गोरियाचिया वाडा । आलासे उघडा देवराव ॥४॥

३६५१पाहूनिया गोरा दंडवत घाली । म्हणे. ३६५१
पाहूनिया गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळी वस्ती तुम्हा ॥१॥
पंढरीसी राहतो परदेशी आम्ही । नाम तरी स्वामी विठु माझे ॥२॥
सांगतो कांता आहे बरोबरी । परिवार तरी एवढाचि ॥३॥
ऐकोनिया मात गोरा संतोषला । रहावे कामाला माझे घरी ॥४॥
विठु म्हणे हाचि हेतु धरुनी आलो । एका जनार्दनी जाहलो निर्भय आता ॥५॥

३६५२राहिला हरि लक्ष्मीसहित घरी । दैन्य. ३६५२
राहिला हरि लक्ष्मीसहित घरी । दैन्य सहपरिवारी पळोनी गेले ॥१॥
उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका वहिली वरी आणी ॥२॥
भाजने ती नानापरी करी । नाटकी मुरारी चाळक जो ॥३॥
ऐसे सुखरुप राहिले निर्धारे । न कळे विचार गोरोबासी ॥४॥
एका जनार्दनी पुढे काय जाहले । सर्व दैन्य गेले गोरोबाचे ॥५॥

३६५३आषाढीची यात्रा आला पर्वकाळ. ३६५३
आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥
येता त्याची मार्गे तेरेसी ते आले । तिही पुशियेले गोरोबासी ॥३॥
गावातील जन सांगती प्रकार । गोरियाचा विचार जाहला सर्व ॥४॥
परदेशी कुंभार पंढरीचा विठा । राहिलासे वाटा करुनिया ॥५॥
ज्ञानदेव खूण आणितली मनी । एका जनार्दनी पाहू त्याते ॥६॥

३६५४. इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर ३६५४
इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पै सत्वर पंढरीये ॥१॥
गरुडासहित वेगे पै निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचा कैवारी । ऐसे करुनी हरी उभा विटे ॥३॥

३६५५. गोरियाच्या वाडा संत प्रवेशले ३६५५
गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टी सर्व ॥१॥
देउनी आसन बैसविले संता । तव ज्ञानदेव पुढता होउनी बोले ॥२॥
कर ते तुटले प्रपंच चाले कवणे परी । येरु म्हणे वांटेकरी पंढरीचा ॥३॥
ज्ञानदेव म्हणती तयासी बोलवा । तव ते लगबगा धावे कांता ॥४॥
स्त्रियेसहित नाही तेथे कुंभकार विठा । एका जनार्दनी वाटा गेला कवणे ॥५॥

३६५६. येऊनिया कांता सांगे गोरियासी३६५६
येऊनिया कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाही ॥१॥
मृत्तिका आणावयाची नाही जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टी ॥२॥
ऐकताचि ऐसी ज्ञानदेवे गोठी । गोरियासी कंठी धरियेले ॥३॥
परदेशी नोहे पंढरीपणा । केलेसे कारणा कार्य तुझे ॥४॥
आमुते न भेटे जाहला असे गुप्त । एका जनार्दनी मात प्रगटली ॥५॥

३६५७ ज्ञानदेव म्हणे भाजने आणावीं. ३६५७
ज्ञानदेव म्हणे भाजने आणावी । तव ती देखिली अवघीं दिव्यरुप ॥१॥
उचलोनी करी घेतले भाजन । विठ्ठल विठ्ठल जाण शब्द निघे ॥२॥
सकळ ते संत गोरियासी म्हणती । धन्य तुझी भक्ति त्रैलोक्यात ॥३॥
एका जनार्दनी पाक सिध्द जाहला । बैसलासे मेळा भोजनासी ॥४॥

३६५८ सारुनी भोजने कीर्तनी बैसले । थोरीव. ३६५९
सारुनी भोजने कीर्तनी बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे ॥१॥
प्रात:काळी स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा पंढरीये ॥२॥
संतसमुदाय सवे पै असती । पावले त्वरित भीमातीरी ॥३॥
एका जनार्दनी करुनिया स्नान । घेतिले दरुशन पुंडलिकाचे ॥४॥

३६५९. संत ती मंडळी महाद्वारा आली । ३६५९
संत ती मंडळी महाद्वारा आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥
चरणावरी माथा ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥
महाद्वारी नामा कीर्तनी उभा ठेला । मिळालासे मेळा सकळ संत ॥३॥
सद्रदित कंठ कीर्तन करता । एका जनार्दनी सर्वथा भक्त होती ॥४॥

३६६० कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव. ३६६०
कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥
टाळी बाहुनी होते मुखी वदा नाम । ऐकता सकाम भक्त जाहले ॥२॥
गोरियाचे मना संकोच वाटला । कर नाही आपुल्याला टाळी वाहता ॥३॥
वाटलेंसे दु:ख नयनी नीर आले । एका जनार्दनी बोले नाम मुखी ॥४॥

३६६१. मुखी नाम वदे करे वाहे टाळी३६६१
मुखी नाम वदे करे वाहे टाळी । कीर्तनाचे मेळी सद्रदित ॥१॥
भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनी गोरियाप्रती कर आले ॥२॥
टाळी पिटूनिया नामाचा उच्चार । करीत साचार गोरा तेव्हा ॥३॥
एका जनार्दनी पुरला मनोरथ । मूलही कीर्तनांत देखियेले ॥४॥

३६६२ गोरियाचे कांता आनंदली चित्तीं. ३६६२
गोरियाचे कांता आनंदली चित्ती । वंदिली माता ती रुक्मादेवी ॥१॥
रुक्मादेवी म्हणे न करा काही चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय ॥२॥
ऐसे भक्तचरित्र ऐकता कान । होतसे नाशन महापापा ॥३॥
एका जनार्दनी पुरले मनोरथ । रामनाम गर्जत आनंदेसी ॥४॥

३६६३ कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । . ३६६३
कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेले ॥१॥
प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥
नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तयाचे काय वानू ॥३॥
एका जनार्दनी भक्ताचा कैवारी । भाजने ती करी घरी त्याच्या ॥४॥

संत जनाबाई अभंग गाथा वर्णन

११२ दोहीकडे दोही जाया
दोहीकडे दोही जाया । मध्ये गोरोबाची शय्या ॥१॥
गोरा निद्रिस्थ असता । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
गोरोबाचे दोन्ही हात । आपुल्या ह्रुदयावरी ठेवित ॥३॥
जागा झाला गोरा भक्त । जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥


प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा

विवेक मराठी    12-Jul-2024 

@स्नेहा शिनखेडे 9823866182
नामस्मरण भक्तीमध्ये आत्मसाक्षात्कार शक्य आहे हेच संत गोरा कुंभार यांचे चरित्र आणि अभंगांतून लक्षात येते. नामस्मरणात तल्लीन झालेल्या गोरोबाकाकांना देहभान उरले नाही. पांडुरंग आणि गोरोबा एकरूप झाले. म्हणूनच तर संत गोरा कुंभारांचे स्थान विठोबाच्या मांडीवर आहे. देह प्रपंचाचा दास असला तरी देहबुद्धी नाहीशी करून आत्मबुद्धीकडे जाणारे संत गोरा कुंभार म्हणजे सर्वसामान्य मनुष्यासाठी असामान्य साधक होण्याकरिता उजळत जाणारी प्रकाशमय पाऊलवाट आहे.

 स्त्रियांना माहेरची ओढ जन्मजात असते. सद्यकाळातदेखील गावामधल्या मुली जगभरात कुठेही गेल्या तरी त्यांना माहेरच्या गंधओल्या सुगंधी आठवणींची सोबत असते. केवळ स्मरणांनी त्यांचे डोळे भिजतात. मग जुन्या काळातल्या सासुरवाशिणींबद्दल काय बोलावे? त्यातल्या त्यात त्यांचे माहेर ही जर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असेल, तर त्यांचे मन अभिमान आणि प्रेमाने भरून येते. संत गोरा कुंभार हे तेर-ढोकीचे राहणारे होते. आजूबाजूला बारा छोट्या वाड्या आणि मध्ये तेरावे म्हणून तेर. तेथे वाहणारी तेरणा नदी. जात्यावर दळण दळणार्‍या मायबहिणींनी गहिवरून आपल्या माहेरच्या भूमीत नांदत गावाचे नाव अजरामर करणार्‍या गोरोबाकाकांवर ओव्या रचल्या आहेत. एक मालन म्हणते-
विठ्ठल म्हणीतो भर रुक्मिणी केर ।
आले वाळवंटी भक्त माझे तेरकर॥
 
गोरोबाकाका जेव्हा चंद्रभागेच्या कडेकडेने पंढरीपर्यंत आले तेव्हा मोराने केका देऊन त्यांचे स्वागत केले. चंद्रभागेच्या कडेने बाका वाजतो मोराचा । विठ्ठलाचा भक्त आला गोरोबा तेरचा॥ गोरोबांचे तेर हे गाव पंढरपूरपासून 60-70 किलोमीटरवर आहे. पंढरीला जाताना येवली हे गाव लागते म्हणून ओवी अशी आहे-
पंढरीला जाता आडवी लागली येवली ।
काका माझ्या गोरोबाची दिंडी मळ्यात जेवली ॥

 
 तेरणा नदीचे आणि गोरोबाकाकांचे नाते ओव्या गाणार्‍या मालनच्या दृष्टीने जगावेगळे, अनोखे आहे. काय झाले? तर- दोन प्रहरी रात्र झाली, तेरणा झोपी गेली । काका माझ्या गोरोबांनी, शेला टाकुनी जागी केली॥ तेरणा नदी काळोखात गुडूप झोपली तेव्हा माझे गोरोबाकाका साक्षात सूर्यरूप घेऊन आकाशात अवतरले आणि रामप्रहरी तांबूस, भगवा-लाल शेल्याचा लालिमा तिच्या अंगावर टाकून त्यांनी तिला जागे केले. मालनची प्रतिभा येथे बहरून येते. तेरणा जिथे वाकड्या वळणाने वळते तिथे- तेरणाबाईचं हिचं वाकडं वळण । काका माझ्या गोरोबाचं डगरी दुकान॥ डगरी म्हणजे उंचावर वास्तव्य आहे या अर्थाने. एक सासुरवाशीण तेर या आपल्या माहेरच्या गावाच्या भरभराटीचे गुपित सांगते. ती म्हणते, शिवच्या शेतामधी हाय पाचुंद्याचा हरि । गोरोबाकाका माझा तुम्हाला दैवाचा शेजारी॥ जिथे गावाची सीमा असते तेथील शेतामध्ये पाचुंद्याचा हरि आहे म्हणजे शेतामध्ये उगवून आलेले संपत्तीरूप जे धान्य आहे त्यांच्या पाच पेंड्या करून उभ्या केल्या आहेत. ही समृद्धी म्हणजे जणू विठ्ठलच आहे. भूमीने भरभरून हे दान कुणामुळे दिले?- तर तिथे भाग्याने गोरोबाकाका विठ्ठलनाम घेत नांदत आहेत.
 
ऐतिहासिक वारसा लाभलेले तेर हे गोरोबाकाकांचे समाधिस्थळ. हे जागृत आहे. तेर या गावाची थोरवी सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात,
सत्यपुरी ऐसे म्हणती तेरेसी । हरिभक्तराशी कुंभार गोरा ।
नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ हृदयामाजी॥


संत जनाबाई यांचा ’विठू माझा लेकुरवाळा’ हा अभंग म्हणजे संतांची जणू मोक्षवाटेवरची यात्रा आहे. विठुराया आपल्या अंगाखांद्यावर संतमंडळींना घेऊन प्रेमाने मिरवतो आहे. त्यात संत गोरा कुंभारांचे स्थान विठोबाच्या मांडीवर आहे. ’गोरा कुंभार मांडीवरी’ असे संत जनाबाई म्हणतात. परमात्म्याच्या मांडीवर बसलेले गोरोबाकाका काय बरे सुचवतात? मांडी या अवयवाचे विशेष गुण कोणते? स्वामी माधवानंद म्हणतात, स्नेह आणि गुणविकासांचा वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिला जाताना ममत्वासाठी मांडी हे माध्यम आहे. पुढील पिढ्यांप्रति स्नेह, ममता आणि संस्कृती यांचे संक्रमण म्हणजे मांडी. संत, थोर मंडळी, विभूती यांच्या मांडीवर लहान मुलाला बसवणे हा आयुष्यातला मोठा भाग. भगवंताच्या मांडीवर शक्तिस्थान आहे. श्री रामरक्षेत म्हटले आहे- सीता शक्ती: प्रभू रामचंद्रांची शक्ती ही सीतामाता आहे. सीता आदिशक्ती आहे. ही शक्ती श्रीरामांच्या डाव्या अंकावर अर्थात मांडीवर आरूढ झाली आहे. ’वामाङ्कारूढ सीता’. श्रीदत्तप्रभूंची शक्ती अनघारूपामध्ये मांडीवर स्थित आहे. श्री गोरोबाकाका हे समाजाचे शक्तिस्थान आहे म्हणून विठोबाने त्यांना मांडीवर बसवले आहे. एकाग्रता, संयम आणि निष्ठा यांचे प्रतीक म्हणजे संत गोरोबाकाका. गोरोबाकाकांनी विठुरायाच्या मांडीवर बसून स्नेह, ममता व संस्कृतीचा दिलेला वारसा म्हणजे अखंड नामस्मरण आणि त्यातूनच होणारा देहबुद्धीचा विनाश होय. कलियुगामध्ये आचारशुद्धी संभवत नाही, त्यामुळे योगमार्ग साधणे फार कठीण आहे. साधेसोपे परमेश्वराचे नाम कधीही, कुठेही सोवळेओवळे न बाळगता अखंड घेतल्याने परमेश्वर प्रसन्न होतो आणि भक्ताभोवती व्यापून उरतो. याची प्रचीती गोरोबाकाकांचे चरित्र वाचताना येते. 
  
संत नामदेव महाराजांनी संत गोरा कुंभार यांचे चरित्र लिहिले आहे. रसाळ, गोड शब्दांचा रस त्यातून स्रवतो आहे. ओज आणि भक्ती यांचे अनोखे दर्शन त्यातून होते. प्रेम अंगी सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा । असे गृहस्थाश्रमी करीत व्यवहार । न पडे विसर विठोबाचा॥ असे संत नामदेव महाराज म्हणतात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असे म्हणतात की, संतांचा अधिकार खूप मोठा असूनसुद्धा त्यांनी आपला व्यवहार सोडला नाही. चरितार्थाचा दैनंदिन व्यवसाय करीत असतानाच ते लोकांना अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन करीत होते. मुमुक्षुजनांना काही सांगत होते. सांसारिक, पारमार्थिक उपदेश करीत होते. त्याबरोबरच आपण सामान्य माणसांमधील एक अशीस्वतःची भूमिका घेत व्यवसायामध्ये देवाला पाहत होते. ’देवा, तुझा मी कुंभार’ म्हणणारे गोरोबाकाका मातीमध्ये विठ्ठलाला स्मरत होते. विठ्ठलनामात देहबुद्धीचा विसर पडल्यामुळे त्यांनी अजाणतास्वतःच्या बाळाला माती-चिखलात तुडवले. रक्तामांसाचा चिखल बघून त्यांच्या पत्नीने जो आक्रोश केला तो एका सामान्य स्त्रीचा आहे. संत नामदेव महाराज त्यांच्या कांतेचे बोल सांगतात. ती म्हणाली, पिटियेले तेव्हा आपुले वदन । जळो हे भजन तुझे आता । डोळे असोनिया जाहलासी आंधळा । कोठोनी कपाळा पडलासी॥ नंतर ती आपल्या पतीला वेड लावणार्‍या विठोबावर संतापते. त्याला वाटेल ते बोलते. निर्दय, अधर्मी, अन्यायी, चांडाळ असे काहीबाही बोलते. एका आईचे जळते हृदय संत नामदेव व्यक्त करतात. विठोबाला गांजल्यामुळे गोरा कुंभार पत्नीच्या अंगावर धावून जाताच तिला स्पर्श न करण्याची ती त्यांना विठोबाची शपथ घालते. त्या क्षणी काय झाले? राहिला उगाची गोरा तेव्हा । न करी तो काही तयासी भाषण । वर्जियेली तेणे कांता तेची॥ आधीच विरक्त, त्यात विठोबाची आण. गोरोबा पुरते विठोबाच्या नामस्मरणात स्वतःला विसरून गेले. गोरा कुंभारांचा एक अभंग आहे-
ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जना ।
ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवणी । नाम घेता वदनी दोष जाती ।
हो का दुराचारी विषयी आसक्त । संतकृपे त्वरित उद्धरती ।
अखंडित गोरा त्याची वाट पाहे । निशिदिनी ध्याये संतसंग॥


संत गोरोबांना केशवाचे पिसे लागून त्यांचे देहभान हरपले.
 
 संत गोरोबाकाकांच्या कांतेने आपल्या विठुप्रेमी नवर्‍याचे लग्न स्वतःच्याच लहान बहिणीशी लावून दिले. अखंड विठोबामय असलेल्या गोरोबांनी ’दोघींना एकसमान वागवा’ या सासर्‍यांच्या शब्दाचा अर्थ स्वभावानुसार अनुकूल लावून घेतला. यात पुन्हा त्यांची भक्ती आणि विरक्ती दिसते. दोघी बहिणींनी गोरोबा निद्रावस्थेत असताना त्यांना स्पर्श केला. ज्यांच्या रोमारोमांत अंतर्बाह्य विठोबा रुजला आहे तिथे काम कसा राहणार? त्यामुळे झाले भलतेच. दोघींनी त्यांचे हात आपल्या ऊरस्थळी ठेवले म्हणून गोरोबांनीस्वतःच्या हातांनाच शिक्षा दिली आणि स्वतःचे दोन्ही हात तोडून टाकले. संत नामदेवांनी लिहिलेले चरित्र वाचताना त्यांनी वर्णन केलेले स्वभावचित्र मन अंतर्मुख करते. गोरोबांची कांता स्वाभाविकपणे विठोबावर चिडते. ती काय म्हणाली संतापाने? तर,
पुरविली पाठी विठोबाने । वंश बुडविला या मेल्या काळ्याने ।
जळो थोरपण याचे आता । वेडे येले लोक घेती दरुशन ।
नसावे भाषण यासी काही ।


परंतु जेव्हा तिला आपला भक्त, निश्चयी नवरा खर्‍या अर्थाने कळतो तेव्हा ती विठोबाला शरण जाते. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. ती म्हणते,
शरण जाऊ तया पांडुरंगा आता । करील तो चिंता आमुचीये ।
शरणागता हरी नेदीच अंतर । वर्णिताती शास्त्रे मोठी मोठी ।
संत हे गाताती बाई सदोदित । पाहू तो अनंत कैसा असे॥ –


हा त्या दोघींच्या अंतरात झालेला बदल आहे. एका स्त्रीचे हृदय स्त्रीशिवाय कुणाला कळणार? म्हणून गोरोबाच्या दोन्ही कांता रुक्मिणी मातेजवळ गेल्या. तिचे वचन विठोबा ऐकणार नाही असे कसे होईल? रुक्मिणीला त्या म्हणतात,
करी माते आम्हा एवढा उपकार । न पडे विसर जन्मोजन्मी॥
रुक्मिणीमातेने विठोबाला सांगून पुनश्च गोरोबाला प्रपंचात आणले.
  
हात या शब्दाचे अनेक अर्थ, वाक्प्रचार रूढ आहेत. उगीचच एखाद्या गोष्टीत नाक खुपसणे म्हणजे न पेलवणार्‍या, न सांभाळता येणार्‍या गोष्टीत हात घालणे, तर भानावर येताच एखाद्याचा हात काढून घेणे. संत गोरोबांनी प्रपंचातून हात काढून घेतले तेव्हा चिंता कुणाला? अर्थात विठोबाला. गोरोबांचे अखंड नामस्मरण आणि विठूचा ध्यास त्यामुळे त्याचा प्रपंच विठूला सांभाळणे ओघाने आले. ‘संत गोरा कुंभार’ चरित्रात एक गोष्ट आहे, की विठोबा, रखुमाई, गरुड, सुदर्शन चक्र आणि शंख हे पाच जण वेश पालटून गोरोबाकाकांच्या गावी आले. विठुराया कुंभार, रखुमाई कुंभारीण, गरुड, गाढव, सुदर्शन चक्र मडके बनवण्याचे चाक झाले आणि शंख चाक फिरवण्याचा मधला दांडा झाला. गोरोबाकाकांच्या दारी जाऊन ते म्हणाले, ओळखले का आम्हाला? आम्ही तुमचे अमुक तमुक नातेवाईक. आमच्या गावी दुष्काळ पडला म्हणून इथे पडेल ते काम करायला, पोट भरायला आलो. गोरोबाकाका म्हणाले, राहा इथेच. नंतर परमात्मा गोरोबाकाकांच्या कुटुंबाचा योगक्षेम चालवू लागला. एक दिवस काही संत मंडळी विठोबाला शोधत गोरोबांच्या घरापर्यंत आली. त्यांना येताना बघून आपले बहुरूपी व्यक्तिमत्त्व सार्‍यांनी आवरते घेतले आणि ते अदृश्य झाले. विठोबा गेला कुठे? विठोबाला संत नामदेवांनी कीर्तन करीत हाक मारली. सगळे जण भजन करीत होते. देहभान विसरलेल्या गोरोबांनी आपल्या थोट्या हातांनी टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य!!! गोरोबांना नवे हात फुटले. गोरोबांच्या कांतेच्या मनावरही विठोबाने फुंकर घातली आणि तिचे बाळ विठोबाच्या पायातून रांगत रांगत आले. या कथेचा असा अर्थ घ्यायचा आहे की, प्रपंचाविषयी गोरोबाकाकांना आसक्ती नव्हती. त्यांची वृत्ती निर्लेप होती. त्यांच्या भक्तिसामर्थ्यामुळे त्यांच्या दोन्ही कांताही उद्धरल्या. त्यांचा प्रपंच सुरू झाला, कारण रुक्मिणीला वंदन करताच ती म्हणाली,
रुक्मादेवी म्हणे न करा काही चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय॥

संत एकनाथ महाराज म्हणतात,
ऐसे भक्तचरित्र ऐकता कान । होतसे नाशन महापापा ।
एका जनार्दनी पुरले मनोरथ । रामनामी गर्जत आनंदेसी॥
 
 
 नामस्मरण भक्तीमध्ये आत्मसाक्षात्कार शक्य आहे हेच संत गोरा कुंभार यांचे चरित्र आणि अभंग वाचताना लक्षात येते. नामस्मरणात तल्लीन झालेल्या गोरोबाकाकांना देहभान उरले नाही. पांडुरंग आणि गोरोबा एकरूप झाले. ‘आधुनिक वाल्मीकी’ अशी ज्यांची ख्याती ते ग. दि. माडगूळकर यांनी ‘गोरा कुंभार’ चित्रपटात अप्रतिम गीत लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा, नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयाम… अष्टौप्रहर संत गोरा कुंभार नामस्मरणात दंग असत. संत नामदेव महाराज म्हणतात, कैसे येणे ऋणी केला पंढरीनाथा । आहे सदोदित याचे हृदयी॥ संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तयांचे काय वानू? देह प्रपंचाचा दास असला तरी देहबुद्धी नाहीशी करून आत्मबुद्धीकडे जाणारे संत गोरा कुंभार म्हणजे सर्वसामान्य मनुष्यासाठी असामान्य साधक होण्याकरिता उजळत जाणारी प्रकाशमय पाऊलवाट आहे हे निश्चित!


कुम्हार जाति का इतिहास-गोत्र, उत्पत्ति, वर्ण,श्रेणी, सामाजिक, राजनितिक स्थिति Kumbhar Jati ka itihas


कुम्हार जाति का इतिहास:
कुम्हार जाति का सम्पूर्ण इतिहास मानव सभ्यता के विकास में परिचय का मोहताज नहीं है। पाषाण काल से लेकर आधुनिक काल तक विश्व पटल पर कुम्हार समुदाय का एक विशेष स्थान रहा है। प्रस्तुत लेख में हम आप को कुम्हार जाति का परिचय, उत्पत्ति, कुम्हार राजवंश, महत्वपूर्ण कार्य, सामाजिक एवं राजनितिक स्तर, कुम्हार जाति की जनसंख्या आदि  की जानकारियों  का विवरण विस्तार से देंगे।  Kumbhhar Jati Jankari.

कुम्हार जाति के गोत्र
कुम्हार जाति के गोत्र:   कोहार  जाती के मुख्य गोत्र छाया, बुहेचा, दाभी, डोडिया, फतनिया, गढेर, गढ़िया, गिरनार, गोला, जोगिया, कटारिया, कुकाडिया, मंडोरा, नेना, परमार, राठौड, सवानिया, टांकी, वर्दना, विसवादिया, भारद्वाज, चंदेग्रा, चित्रोदा, देवलिया, धवरिया, गढ़वाना, गोहिलो, जगतिया, कमलिया, खोलिया, लाडवा, मवादिया, ओझा, पिथिया, रावती, शिंगड़िया, वढेर आदि कुम्हार जाती के मुख्य है।


कुम्भार वंशावली

कुम्हार जाति का इतिहासकुम्हार जाति का शानदार और भव्य इतिहास
कुम्हार जाति उत्पत्ति;शास्त्रों के अनुसार कुम्हार जाति की उत्पत्ति भगवान ब्रम्हा के द्वारा हुई।
वंशकुम्हार वंश
कुम्हार वंशावलीकुम्हार वंशावली को प्रजापत, कुंभकार, कुंभार, कुमार, कुभार, भांडे आदि नामों से भी जाना जाता है
कुम्हार जाति की कुलदेवी व कुलदेवताकुम्हार वंश की कुलदेवी श्रीयादे माता है

कुम्हार जाति के कुल देवताकुम्हार जाति के कुल देवता भगवान विट्ठल एवं देवी रेणुका माता (येलम्मा मंदिर) जी है।
कुम्हार जाति का गीतकोहरौही गीत कुम्हार जाती का ऐतिहासिक/ सामाजिक, सांस्कृतिक लोकगीत है
कुम्हार जाति के गोत्रफतनिया, छाया, सवानिया, गिरनार, वर्दना, चित्रोदा, जोगिया, कटारिया, गोला, कुकाडिया, परमार, नेना, राठौड, टांकी, विसवादिया,मंडोरा भारद्वाज, चंदेग्रा, देवलिया,बुहेचा धवरिया, गढ़वाना, गोहिलो, जगतिया, दाभी खोलिया, लाडवा, मवादिया, ओझा, पिथिया, रावती, शिंगड़िया, वढेर,गढेर, गढ़िया, डोडिया, कमलिया
कुम्हार जाति का पेशासामान्यतया कुम्हार समाज के लोगो का मुख्य पेशा मिट्टी के बर्तनो को बनाना।
धर्मकुम्भकार प्रजापति जाति सम्पूर्ण भारत में हिन्दू /मुस्लिम/सिख सभी धर्म में पाई जाती है
प्रजापति दिवस कब मनाया जाता है?महाराज दक्ष प्रजापति की जयंती 27 जुलाई को मनाई जाती है.
हिन्दू धर्म में कुम्हार जाति का स्थानअन्य पिछड़ा जाति और अनुसूचित जाति
कुम्हार, कुम्भकार शब्द का उद्भवकुम्भकार शब्द का उद्भव संस्कृत के शब्द “कुंभ”+”कार” से हुआ है. “कुंभ” का अर्थ होता है घड़ा या कलश. “कार’ का अर्थ होता है निर्माण करने वाला या बनाने वाला अर्थात कारीगर इस तरह से कुम्भकार का अर्थ है- “मिट्टी से बर्तन बनाने वाला”.
कुम्हार समुदाय का प्रमुख निवास स्थानभारत, नेपाल और पाकिस्तान
सभ्यता की शुरुआत से ही दैनिक उपयोग में इनका योगदानमिट्टी की सभी वस्तुओं का निर्माण इन्ही के द्वारा ही किया जाता रहा है
कुम्हार जाति की विवाह प्रथासहगोत्रीय विवाह एवं समगोत्रीय वैवाहिक प्रथा
राजनैतिक स्थितदेश में कुम्हार जाति की राजनैतिक स्थित जनसँख्या के आधार पर ठीक नहीं है राजनैतिक छेत्र में कुम्हार जाति का प्रतिनिधित्व न के बराबर है।
सामाजिक स्थितकुम्हार समाज में अत्यधिक गरीबी व अशिक्षा के कारण सामाजिक छेत्र से भी उनकी स्थिति बहुत दयनीय अवस्था में है।
पसंदीदा भोजनकुम्हार समाज के लोग सामान्यतया शाकाहारी और माँसाहारी दोनों प्रकार की होती है।
कुम्हार समाज के लोग क्या मदिरापान करते है।हाँ , अक्सर लोगों को मदिरापान करते देखा गया है।
वस्तु निर्माण प्रसिद्धिकुम्हार समाज के लोगों द्वारा मिट्टी के बर्तन ,मिट्टी के खिलौने ,मिट्टी के सजावटी सामान ,मिट्टी की मूर्तियां आदि बहुत सी चीजें बनायी जाती है।
कुम्हार वंश की उत्पति मिश्रित विवाह द्वाराब्रह्म वैवर्त पुराण में कुंभकार की उत्पत्ति ब्राह्मण पिता और वैश्य माता से हुई है। इस विवाह को मिश्रित विवाह कहा गया । यद्यपि इसको ज्यादा अहमियत नहीं दी जा सकी।

कुम्हार के जन्मदाता ?
कुम्हार जाति की उत्पत्ति: धर्म शास्त्रों में ऐसा लिखा गया है कि सृष्टि की रचना करते समय अनुष्ठान करने हेतु त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णु और महेश को मंगल कलश बनाने के लिए एक मूर्तिकार कुम्हार को प्रजापति ब्रह्मा ने उत्पन्न कर उसे मिट्टी का घड़ा बनाने का हुक्म दिया। कुम्हार के कलश निर्माण के लिए भगवान विष्णु ने अपना सुदर्शन चक्र चाक के रूप में, शिव जी ने अपने पिंडी को धुरी के रूप में ब्रह्मा जी ने धागा (जनेऊ), पानी के लिए कमंडल और चक्रेतिया प्रयोग करने के लिए दिया। कुम्हार ने इन वस्तुओं से मंगल कलश का निर्माण किया जिससे अनुष्ठान का कार्य पूर्ण हुआ।
कुम्हार जाति में प्रजापति शब्द कब से आया?
कुम्भकार स्वयं को सम्मानपूर्वक प्रजापति क्यों कहते हैं:
एक बार प्रजापति ब्रह्मा ने अपने समस्त बालकों को गन्ना बांटा। जिसे सभी बालकों ने खा लिया, लेकिन कुम्हार ने कार्य में व्यस्तता की वजह उसको वही रख दिया और खाना भूल गया। कुछ दिन बीत जाने पर जिस गन्ने को उसने मिट्टी के ढेर के पास रख दिया था, वह छोटा पौधा बन गया, कुछ समय पश्चात ब्रह्मा जी के द्वारा मांगने कुम्हार ने गन्ने का पूरा पौधा उन्हें भेंट स्वरूप उपहार में दिया। कुम्हकार के इस भेंट से ब्रह्मा जी अत्यधिक हर्षित हो उठे और उन्होंने कुम्हार के कार्य के प्रति लगाव का अवलोकन करके उसे प्रजापति की पदवी से सम्मानित किया. इस तरह से ही कुम्हार समाज को प्रजापति की उपाधि मिली।
कुम्हार जाति की कथा
यह लोककथा पंजाब, राजस्थान और गुजरात में ज्यादा प्रचलित है। कुम्हारों की उत्पत्ति के विषय में मालवा क्षेत्र में भी ऐसी ही कहानिया जानी जाती है। लेकिन यहां मान्यता है कि ब्रह्मा जी ने गन्ने की जगह पान बांटा था।
कुम्हार जाति की गाथा
एक लोककथा के अनुसार जिस प्रकार प्रजापति ब्रह्मा जी ने पंचतत्व आकाश, वायु, अग्नि, जल और पृथ्वी (पदार्थ) से सृष्टि की रचना की थी ठीक उसी प्रकार से कुम्हार भी इन्हीं तत्वों‌ से से अपना कार्य करता है। इन्हे प्रतिष्ठित रूप से रचनात्मक कला के बादशाह के रूप में प्रजापति की उपाधि मिली।

दक्ष प्रजापति का ब्राह्मण वंश से विनाश की कथा
प्रजापति/ कुम्हार जाति पतन के कारण: एक यह भी मान्यता है की, दक्ष प्रजापति ब्रह्मा जी की संतान और भगवान भोलेनाथ के श्वसुर थे। ब्रह्मा जी के द्वारा एक सुयोग्य पद पर राज करते हुए वे अत्यंत अभिमानी बन गए। एक कथा के अनुसार एक बार दक्ष प्रजापति ने यज्ञ का आयोजन किया जिसमें ब्रह्मा, नारायण, शिव सहित सभी देवी देवताओं का शुभागमन हुआ जब दक्ष प्रजापति पधारे तो सभी ने खड़े होकर उनका नमन किया। लेकिन ब्रह्मा जी और भगवान भोलेनाथ नहीं खड़े हुए। यह देखकर दक्ष प्रजापति अत्यधिक कुपित होकर बोले ब्रह्मा जी ने तो हमें जन्म दिया है, लेकिन शिव हमारे जमाई हैं उन्हें अपने आसान से उठ जाना चाहिए था उन्होंने शिव जी का भरी सभा में अत्यंत अनादर किया। जिससे क्रुद्ध होकर नंदी ने दक्ष प्रजापति को अभीशाप दिया कि आपके कुल का ब्राह्मण वंश से विनाश हो जाएगा। इस तरह से ही राजा दक्ष के वंशज को ब्राह्मण वंश से अलग कुम्हार या प्रजापति के नाम से जाना जाने लगा।
कुम्हार लोककथा
एक लोककथा के अनुसार जिस प्रकार प्रजापति ब्रह्मा जी ने पंचतत्व आकाश, वायु, अग्नि, जल और पृथ्वी (पदार्थ) से सृष्टि की रचना की थी ठीक उसी प्रकार से कुम्हार भी इन्हीं तत्वों‌ से से अपना कार्य करता है। इन्हे प्रतिष्ठित रूप से रचनात्मक कला के बादशाह के रूप में प्रजापति की उपाधि मिली।
वर्ग 
कुम्हार जाती का वर्गीकरण: राज्य सरकार एवं केंद्र सरकार के शासनादेश के अनुसार कुम्हार संप्रदाय को अन्य पिछड़ी जाति एवं कई राज्यों में अनुसूचित जाती के श्रेणी में रखा गया है। । सम्पूर्ण भारत में कुम्हार जाति की जनसंख्या लगभग 60 लाख से ज्यादा है।
कुम्हार जाति विवाह प्रथा
कुम्हार जाति की समगोत्रीय विवाह प्रथा कुम्हार समाज के अंतर्गत सहगोत्रीय/ समगोत्रीय विवाह की प्रथा है लेकिन एक ही कुल में विवाह निषेधित है।


कुम्हार जाति का मुख्य पेशा
कुम्हार समाज के लोगो का मुख्य पेशा मिट्टी के बर्तनो को बनाना।सदियों से ये गगनस्पर्शी शिल्पकार के रूप में जाने जाते है। 
कुम्हार जाति के विषय में महत्वपूर्ण जानकारियां
कुम्हार गगनस्पर्शी शिल्पकार/कारीगर: पाषाण काल से लेकर आधुनिक काल तक विश्व पटल पर कुम्हारो का एक विशेष महत्त्व रहा है। सदियों से मानव के विकास में कुम्हारों का अत्यधिक सहयोग दिखा है। ऐसा माना जाता है की कुम्हार जाति से ही शिल्‍प और अभियांत्रिकी की शुरूआत हुई है। कला का जन्मदाता कुम्हार जाति को ही माना जाता है। कुम्हार जाति को गगनस्पर्शी शिल्पकार या कारीगर वर्ग का जाना जाता रहा है क्यों कि सभ्यता की शुरुआत से ही दैनिक उपयोग के सभी वस्तुओं का निर्माण इन्ही के द्वारा ही किया जाता रहा है। 
कुम्हार जाति का इतिहास/कुम्हार की कुंडली

भारत में लोहार जाति/उपजाति को राज्य की संस्कृति, भौगोलिक स्थिति, कर्म एवं भाषा के आधार पर विभिन्न क्षेत्रों में अनेक नाम/ उपनाम/ गोत्र/ सरनेम से जाना जाता है जो की इस प्रक्रार से हैं:-
राज्यजाति का नाम एवं उपनामवर्ग/श्रेणी
पश्चिमी उड़ीसाभांडे
पूर्वी मध्य प्रदेशभांडे
कश्मीर घाटीकराल
अमृतसरकुलाल या कलाल
आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरल और तमिलनाडुकुलाल
पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, उड़ीसा, बंगाल,प्रजापत, कुंभकार, कुंभार, कुमार, कुभार, भांडेअन्य पिछड़ा वर्ग (OBC)
गुजरातमहतो, पाल, भगत, भकत, बेज, बेसरा, माझी, तुम्बलिया, सलबनिया, कुराल, कुम्भकार दास ,प्रजापत, कुंभकार, कुंभार, कुमार, कुभार, भांडेअन्य पिछड़ा वर्ग (OBC)
उत्तर प्रदेशप्रजापत, कुंभकार, कुंभार, कुमार, कुभार, भांडेअन्य पिछड़ा वर्ग (OBC)
बिहारप्रजापत, कुंभकार, कुंभार, कुमार, कुभार, भांडेअन्य पिछड़ा वर्ग (OBC)
मध्य प्रदेश के छतरपुर, दतिया, पन्ना, सतना, टीकमगढ़, सीधी और शहडोलअनुसूचित जाति

कुम्हार जाति का इतिहास- Kohar Jati ka itihas
कुम्हार वंश के अतीत सम्बन्धी प्रश्न उत्तर
कुम्हार जाति की उत्पत्ति कब और कैसे हुई ?
कुम्हार वंश की उत्पत्ति भगवान ब्रम्हा से हुयी है।
कुम्हार वंश का क्या इतिहास है?
कुम्हार वंश के तेजस्वी इतिहास का सम्बन्ध मानव सभ्यता में पाषाण काल से आधुनिक काल तक अलौकिक एवं अतुलनीय रहा है।
कुम्हार जाति किस श्रेणी में आती है?
कुम्भकार जाति OBC श्रेणी में आती है।
कुम्हार जाति के मुख्य कार्य क्या हैं?
कुम्हार वंश का मुख्य कार्य मिट्टी के बर्तनो को बनाना है।
कुम्हार वंश के संस्थापक कौन हैं ?
राजा प्रजापति दक्ष को कुम्हार जाति का संस्थापक माना जाता है।
कुम्हार वंश की स्थापना कब हुई थी?
ऐसा माना जाता है की कुम्हार वंश की स्थापना राजा प्रजापति दक्ष के समय के पश्चात हुई थी।
कुम्हार वंश का सभ्यता की शुरुआत से आधुनिक काल तक क्या योगदान रहा है?
कुम्हार वंश की सभ्यता की शुरुआत से आधुनिक काल तक मिट्टी के बर्तनो को बनाने का महत्वपूर्ण योगदान रहा है।
कुम्हार वंश के कुल देवी कौन हैं?
कुम्हार जाति की कुलदेवी श्री यादे माता है।
कुम्हार जाति के कुल देवता कौन हैं?
कुम्हार वंश के कुल देवता भगवान् विट्ठल एवं देवी रेणुका माता (येलम्मा मंदिर)जी है।
कुम्हार वंश के कुलगुरु कौन हैं ?
कुम्हार जाति के कुल गुरु श्री संत गोरा कुम्भार जी हैं।
कुम्हार वंश के कौन कौन से गोत्र हैं?
Kumbhkar Jait ki katha/ kumbhkar jati ka sampurn itihas
Kumhar jati ke gotra: छाया, बुहेचा, दाभी, डोडिया, फतनिया, गढेर, गढ़िया, गिरनार, गोला, जोगिया, कटारिया, कुकाडिया, मंडोरा, नेना, परमार, राठौड, सवानिया, टांकी, वर्दना, विसवादिया, भारद्वाज, चंदेग्रा, चित्रोदा, देवलिया, धवरिया, गढ़वाना, गोहिलो, जगतिया, कमलिया, खोलिया, लाडवा, मवादिया, ओझा, पिथिया, रावती, शिंगड़िया, वढेर आदि है ।


कुंभार समाजाचा इतिहास आणि सद्यस्थिती?

काय आहे कुंभार समाजाचा इतिहास, कुंभार समाजातील जाती किती? औद्योगिक क्रांतीनंतर कुंभार समाजाच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? कुंभार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती नक्की काय आहे वाचा प्रा.डॉ. सचिन भास्कर कुंभार यांचं विशेष विश्लेषण
 प्रा.डॉ. सचिन कुंभार |  25 May 2021 3:34 PM

भारतात विविध वंश, धर्म आणि संस्कृतीचे लोक राहतात तसेच त्यांची भाषा व बोली भाषा या देखील आपल्याला विविधता आढळून येते. त्यामुळे भारतीय समाजामध्ये विविधता आहे. हा समाज विविध जातींमध्ये विभाजित झालेला असला तरी अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व एकोप्याने राहतात. सामाजिक तणाव निर्माण होऊ न देण्याचा प्रयत्न करतात. भारतात एकूण 655 जाती आहेत, यातील महाराष्ट्रात 285 जाती आहेत. प्रत्येक धर्मामध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्या जातींमध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या काही प्रगत जाती आहे तर काही अप्रगत अवस्थेतील जाती आहेत.

ज्या प्रगत जाती आहेत. त्यांना भारतीय राज्यघटनेने शासनाच्या सवलती नाकारलेल्या आहेत आणि अप्रगत असणाऱ्या जातीस शासनाने अनेक निर्णयांतर्गत सवलती दिल्या आहेत. या सवलतीमध्ये शैक्षणिक सवलती, नोकरीविषयक सवलती, औद्योगिक विषयक धोरणात सवलती, निवडणूक विषयक सवलती अशा अनेक क्षेत्रात सवलती देऊन अप्रगत जातीतील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न शासनामार्फत देऊ केलेले आहे.
अनादिकाळापासून वैदिक समाजरचनेत जाती व्यवस्थेची निर्मिती झालेली आहे. प्रत्येक जातीचा व्यवसाय ठरविण्यात आलेला होता, त्या वेळच्या प्रचलित रूढीप्रमाणे व्यवसायावरून जात ठरविण्यात आली. चातुवर्ण व्यवस्था निर्माण झाली. तेव्हा तत्त्वज्ञान सांगणारे व पूजा पाठ करणारे ब्राम्हण ही एक वर्णव्यवस्था, आक्रमकता ठेवून इतरांचे रक्षण करणारे क्षेत्रीय ही दुसरी वर्णव्यवस्था, व्यापार करणारे वैश्य तिसरी वर्णव्यवस्था, या तीनही वर्णव्यवस्थांची कनिष्ठ प्रकारची कामे करणारी चौथी वर्णव्यवस्था म्हणजे शूद्र वर्णव्यवस्था होय.

जास्तीत जास्त अप्रगत जाती शूद्र वर्ण व्यवस्थेतील आहे. ग्रामीण व शहरी भागातील बारा बलुतेदारांच्या जातीचा एक गट चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या शूद्र वर्णव्यवस्थेत आहे. त्यामध्ये सुतार, लोहार, धोबी, न्हावी, माळी, जंगम, महार, सोनार, कुंभार, कोळी, गुरव आणि तेली इत्यादी जातींचा समावेश यात आहे.
जंगमाने धार्मिक विधी क्रिया करावी, कुंभाराने मातीच्या वस्तू तयार कराव्यात, सोनाराने दागिने तयार करावे, लोहाराने लोखंडाच्या वस्तू तयार कराव्यात, सुताराने लाकडी काम करावे, धोब्याने कपडे धुण्याचे काम करावे, न्हाव्याने केस कापण्याचं काम करावे. या कामाबद्दल बलुतेदारांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, मीठ, दाळी,मिरची या जीवनावश्यक वस्तू वरील तीनही वर्णव्यवस्थेचे लोक देत असत, म्हणजे प्रत्येक जातीचे उदरनिर्वाहाचे साधन त्यांचा व्यवसाय हा बनलेला होता,

औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, आधुनिक जीवन पद्धती, निरक्षरता आणि या साऱ्याची सुरुवात करणारी औद्योगिक क्रांती यामुळे अनेक जाती अक्षरशः उध्वस्त झाल्या होत्या. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी अनेक पिढ्या खर्ची पडल्या. रेल्वे आल्याने बैलांवरून वाहतूक करणारे बंजारा देशोधडीला लागले, कापड गिरण्या मुळे कोष्टी-साळ्यांची अवस्था अंगठे तोडल्यासारखी झाली, रॉकेलवर चालणारे दिवे आल्याने तेलाचा व्यवसाय निम्म्यावर आला. या जातीबरोबरच कुंभार समाजावर देखील याचा परिणाम झाला. जी मातीची भांडी होती. त्यांची जागा स्टील व प्लास्टिक ने घेतली असे चित्र आपल्या समोर दिसून येते

शेतकऱ्यांच्या प्रापंचिक उपयोगाचा अत्यंत महत्त्वाचा बलुतेदार म्हणजे कुंभार होय. कुंभार शब्द संस्कृत ‘कुंभ-कार’ या शब्दावरून आला असेही काही जण मानतात, कुंभार राहतात त्या भागाला कुंभारवाडा असं म्हटलं जातं. कुंभार माती व सरपन यांची वाहतूक करणे. या कामाशिवाय विटा, कौल, रांजण, माठ इत्यादी तयार करून धान्याच्या मोबदल्यात किंवा रोख स्वरुपात विकणे असा त्यांचा व्यवसाय असतो.
महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या पोट जाती या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. थोर संशोधक आर. के. गुलाटी यांनी महाराष्ट्रात कुंभाराच्या पोटजाती सांगितलेल्या आहेत (इरावती कर्वे हिंदू समाज अन्वयार्थ पृ 119)
१) मराठा कुंभार- या देशात सर्वत्र आढळतो. या जातीच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ते मराठी बोलतात. कोल्हापुरात यांची मोठी वस्ती आहे. त्यांचा पोषाख कुणब्या सारखा असतो. ते मडके, विटा, कौले, खेळणी व मुर्त्या तयार करतात, पुरुष चाक वापरतात तर स्त्रिया हाताने भांडी घडवतात.
२) गुजराती कुंभार- महाराष्ट्र व गुजरात यांच्या समुद्रकिनारी भागात राहतात व त्यांनाच लाड किंवा प्रजापती अशी नावे आहे तसेच घरघडे व ओझा अशी ही नावे आहेत. घरघडे म्हणजे मडकी घडविणारे ओझा (संस्कृत उपाध्याय) म्हणजे धर्मगुरू हे कुंभार यांचे पुरोहित म्हणून काम पाहतात.
३) कोकणी कुंभार- रत्नागिरी, कारवार अशा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आढळतात
४) राणा कुंभार- नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात यांची वस्ती आहे
५) अहीर कुंभार- यांना लहान चाके असेही म्हणतात. ते खानदेशातील धुळे जिल्ह्यात यांचा वास्तव्य असून ते थोर चाक कुंभार पासून वेगळे झालेअशी त्यांची समजूत आहे
६) लाड कुंभार- यांना थोर चाके म्हणतात, त्यांच्या चाकाचा व्यास सुमारे चार फूट किंवा अधिक असतो. ते जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
७) परदेशी कुंभार- महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्या व बाहेरून वस्ती करून राहणाऱ्यांना परदेशी कुंभार म्हणतात.
८) तेलंगी कुंभार- हे मराठवाडा व चांदा जिल्ह्यात राहतात.
९) लिंगायत कुंभार- कर्नाटक राज्य आणि सोलापूर, कोल्हापूर व मराठवाडा येथे त्यांची वस्ती आहे. लिंगायत असल्यामुळे ते गळ्यामध्ये लिंग अडकवतात.
१०) कुरेरे कुंभार- विदर्भ रत्नागिरीचा काही भाग या भागात राहणारे कुंभार माती कुटण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी दगडी पाट्याचा वापर करतात त्यांची संख्या महाराष्ट्रात अत्यल्प आहे.
११). हातघडे कुंभार- सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भागात आढळतात. घागरी, कुंड्या, रांजण इत्यादी वस्तू ते हाताने तयार करतात म्हणून त्यांना हातघडे कुंभार असे म्हणतात
१२). गधेरिया कुंभार- कुंभार कामासाठी स्वतःची गाढवे पाळणारा कुंभार हा चंद्रपूर, नागपूर, बीड इत्यादी जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात आढळतो यांची संख्या अत्यल्प आढळते.

अशा बारा प्रकारात कुंभार समाजाची पोटजाती आढळून येतात, महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून २०१२ पर्यंत ८० लाख लोकसंख्या ही पाहणीतून समोर आली आहे.
(शासन दफ्तरी कुंभार समाजाच्या लोकसंख्ये सबंधी कोणतीही नोंद नाही) या समाजात साक्षरतेचे प्रमाण कमी व असंघटित असल्याने अनेक सामाजिक व आर्थिक समस्यांना संघर्ष करताना आजही आपल्याला दिसून येतो.
त्यामुळे या समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उन्नतीला मुकलेल्या आहेत, दारिद्र यामध्ये व अशिक्षित जीवन जगत आहे. याचे कारण म्हणजे गाडग्या-मडक्यांचा वापर हळूहळू कमी होत गेला, रांजनाचा वापर अन्नधान्य साठविण्यासाठी होत असे, परंतु याचाही वापर कमी झाला, सिमेंटच्या शेगड्या घरगुती गॅस आणि रॉकेल वर चालणारे स्टोव्ह मातीच्या चूलीला स्पर्धा करू लागले
निमशहरी व तालुक्याच्या गावांमध्ये गॅस एजन्सी सुरू झाल्यावर मातीच्या चुली कमी होत जाण्याचा वेग आणखी वाढला, प्लास्टिकच्या भांड्यांनी मडकी अधिक निरर्थक ठरवली. पारंपारिक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचे मोठे प्रमाण शिक्षणविषयक जागृतीचा अभाव यामुळे या बदलत्या आधुनिक समाज जीवनाचा धक्का हा कुंभार समाजाने कसा सोसला? खरे तर कसा पचवत असेल?,
गॅझेटिअर्सच्या जुन्या आवृत्त्या आपण पाहिल्या तर विसाव्या शतकाच्या प्रारंभी नेमकी काय परिस्थिती होती? याचा आपल्याला अंदाज करता येतो. तो म्हणजे विदर्भाच्या गॅझेटमध्ये कुंभारांचा उल्लेखच आपल्याला आढळत नाही. याचा अर्थ तेथील कुंभाराची परिस्थिती फारच दयनीय असली पाहिजे, मराठवाड्यात फक्त औरंगाबादचे गॅझेटिअर्स आहे. त्यात कुंभारांचा आर्थिक परिस्थितीचा असा उल्लेख नसून मूर्तिकार म्हणून वर्णन केलेलं आपल्याला आढळते. याचा अर्थ त्याची परिस्थिती ही काही प्रमाणात बरी असावी असे कळते.
पश्चिम महाराष्ट्रात मात्र, प्रत्येक जिल्ह्यात कुंभार गरीब आहे. त्यांची घरे गवताच्या छपराची आणि मातीची असतात असे वर्णन केलेलं आपल्याला सापडते. तर नाशिक विभागातील काही जिल्ह्यांच्या गॅझेटिअर्स मध्ये कुंभार समाजाच्या पोट जातीचा उल्लेख केलेला आढळतो. तसेच मराठी विश्वकोश मध्ये कुंभार व्यवसायाचा मृत्तिका उद्योग यात उल्लेख केलेला आहे.
यात मातीची भांडी तयार करण्याबद्दल सखोल माहिती दिलेली आढळते. भाजलेल्या विटांची घरे नसणे इतरांसाठी कवले करणाऱ्यांची घरे मात्र गवताने साकारली जाणे हे गरिबीचे लक्षण असावे, या गरिबीमुळेच कुंभारांना सामाजिक बदलाचे धक्के पचविता आले असावे हे त्या समाजालाच माहित.

सर्व कुंभार समाजाचा व्यवसाय हा उघड्यावर चालत असल्याने पावसाळ्यात काम करणे त्यांना शक्य नसते, मातीची भांडी मडकी करणे, तिला वाळविणे, नंतर भाजणे आणि विटा, कवले करणे. अंतर वाळवणे, भाजणे ही कामे पावसाळा सोडून इतर काळात करावी लागतात. त्यामुळे सहा महिन्यातच वर्षभराची कामे करून मिळवलेल्या संचितावर (उत्पन्न) वर्षभर भागवावे लागत असल्याने काटकसरी, योग्य खर्च करुन कुंभार समाज गरीबी पचवून नव्या बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात आहे.
यामुळेच हा कुंभार समाज कसं जीवन जगत असवे? सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पारंपारिक व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि उत्पादित केलेली मातीची भांडी यांना मिळणारा मोबदला तसेच व्यवसायातील मागासलेपणा, शासनाकडून कोणतीही सवलत न मिळणे अशा अनेक समस्या या कुंभार समाजासमोर आजही निर्माण झालेल्या दिसून येतात. तसेच मागील वर्षापासून जो संपूर्ण जगावरती COVID-19 हा संसर्गजन्य आजार पसरलेला आहे. याचाही परिणाम या कुंभार समाजाच्या उदरनिर्वाहवर परिणाम झालेला दिसून येत आहे.
अभ्यासक
प्रा.डॉ.सचिन भास्कर कुंभार
अर्थशास्त्र विभाग
डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय,जळगाव

कुंभार,माळी आणि तेली समाजाचे कुलदैवत कोणते आहे?

🌹🌹कुंभार जातीची कुलदेवी योगमाया संतोषीमाता आहे, या देवीचे मंदिर जोधपुर येथे आहे.शुक्रवारी व्रत करुन गूळ, चणे यांचाप्रसाद वाटप करण्यात येतो. तसेच महालक्ष्मी ,तुळजाभवानी आणि शीतला देवी ही कुंभार जातीची कुलस्वामिनी आहे.शीतला देवीचे मोठे मंदिर जयपूर येथे आहे. शीतला,दुर्गा,काली,चंडी,फूलमती,बड़ी माता चमरदेवी, देवी भानमती या सात बहिणींची पूजा अर्चा केली जाते. शीतला देवीचा पुजारी कुंभार जातीचा असतो.अनेक रोगांसाठी कुंभार पुजारी झाड़ा उतारा करतो.

शीतला देवी कुंभार, गुर्जर,जाट,यादव, राजपूत या जातींची कुलदेवी आहे.

कुंभार जातीचे कुलदेवता भगवान विश्वकर्मा आणि भगवान शिवशंकर आहेत.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading