आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

संत गाडगेबाबा संपुर्ण भाग ६, (२६ ते ३०)
अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – २६.
बाबांचा मुक्काम नाशिक पुण्यास असले की,त्यांनी झोपडीकडे येऊ नये म्हणून कुंताबाई प्रयत्न करायच्या,पण व्यर्थ!झोपडीत साठलेले सामान दिसले की,बाबांनी ते सर्व सामान झाडुवाले, कामगारांना वाटून द्यायचे.बाबांच्या शेवट च्या दुखण्यात अमरावतीस इर्विन हाॅस्पिटला असतांना कुंताबाईला वाटे शेवटच्यावेळी तरी नवर्यासोबत असावे, पण निःस्पृह बाबा शेवटच्या प्रवासास निघाले तेव्हा मोटारीत बसलेल्या पत्नीस उतरवून म्हणाले,इथेच राहून भाकरी मागून खा…अशी शेवटची व्यवस्था त्यांनी कुंताबाईची केली.शेवटपर्यत त्या बाबांच्या समाधीजवळील झोपडीत अमरावती सोडून कुठेही न जातां राहील्या.बाबांच्या दहनस्थळाला दाखव लेले नैवद्याचे ताट कुंताबाईकडे पोहचत असे.कधी कधी खंतावून कुंताबाई म्हणायच्या साधुबुवाने अवघ्यासाठी कांही ना कांही केले,लोकांसाठी राजवाडे सारख्या धर्मशाळा,आंधळ्या पांगळ्या साठी सदावर्ते,गाईंसाठी गोरक्षणे,पण आमच्यासाठी काय?पांडवांची आई कुंती ने तर दुःख मागून घेतले होते,जन्मभर तिला दुःखच सहन करावे लागले,पण कुंताबाईचे काय?
डाॅक्टर आंबेडकरांना बाबांबद्दल फार आस्था निष्ठा होती.बाबांना गुरुसम मान देई.दोघांचे विचार जुळल्यामुळे मैत्री जुळली.पंढरपूरची चोखोबा धर्मशाळा डाॅ आबेडकरांच्या स्वाधीन करण्याचा बाबां चा मानस होता. १४ जुलै १९४९ ला दादरला महाजनीकडे वास्तव्याला असतांना त्यांना सडकून ताप आला, अगदी हलवेना.त्यावेळी महानंदस्वामी बाबांजवळ होते.बाबांच्या न कळत आंबेडरांकडे जाऊन म्हणाले,बाबांना धर्मशाळेसंबंधीचा कागद करायचा होता पण ते भयंकर आजारी आहेत,त्यावेळी डाॅ.आंबेडकर भारताचे कायदेमंत्री होते. त्यांना दिल्लीला जाणे अगदी अगत्याचे होते,पण बाबांच्या तब्बेतीबद्दल कळल्या वर सर्व व्यवस्था रद्द करुन महानंदस्वामी सोबत तात्काळ दोन घोंगड्या घेऊन बाबांना भेटायला आले.ते आल्यावर उठून बसत बाबा म्हणाले,आपला एक एक मिनिट लाखमोलाचा.माझ्यासारख्या फकीरासाठी कशाला तसदी घेतली? गदगदून आंबेडकर म्हणाले,आमचा अधिकार दोन दिवसाचा..उद्या खुर्चिवरुन
उतरलो की कोण पुसतो?आपण कष्टाने मिळविलेला आपला अधिकार अजरामर आहे.आपली योग्यता कसोटीवर घासून सिध्द झाली आहे.ती योग्यता,अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. आपण दुसरं कांही स्विकारणार नाही, म्हणून या आणलेल्या दोन घोगड्यांचा स्विकार करावा.येवढ्या तापातही धर्म शाळेसंबंधीचा कागद तयार करवून आपला अंगठा उठवून त्याचवेळी कर्मवीर भाऊराव पाटील व दिवान बहाद्दुर जगताप भेटीस आले असतां त्यांच्या समक्ष डाॅ.आंबेडकरांच्या स्वाधीन केला.आदराने भारावलेल्या त्यांना बाबां नी प्रेमाने निरोप दिला.
डाॅ.आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतरा चा निर्णय घेतला तेव्हा प्रथम बाबांचा सल्ला घ्यायला आले.हिंदु धर्मातील उच्च निचतेशी जन्मभर झगडले,महाडचा चवदार तळ्यावरील सत्याग्रह,नाशिकच्या श्रीराममंदिरात प्रवेश मिळण्यासाठी केलेला सत्याग्रह केला,पण…शेवटी क्षोम पाऊन म्हणाले,मी हिंदू म्हणून जरी जन्मास आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.त्यांची ही घोषणा जाहीर होताच मोठमोठ्या रकमांच्या थैल्या घेऊन मुसलमान व ख्रिश्चनांनी आपल्या धर्मात खेचण्यासाठी निकराचे प्रयत्न केले, कारण आंबेडकरांच्या बरोबर असलेले हजारो अनुयायांचे त्यांच्याबरोबर धर्मांतर होणार होते.त्यावेळी बाबा जे.जे. हाॅस्पिटलजवळच्या धर्मशाळेत चालले ल्या कामावर देखरेख करीत होते.डाॅक्टर आंबेडकर येत असल्याचे कळतांच लगेच बाबाच आंबेडकरांकडे पोहचले.तिथे आधीच जोरदार चर्चेचा कीस पडत होता तेवढ्यात बाबा आल्याचे कळतांच त्यांना आदराने बैठकीत आणले.डाॅक्टर म्हणाले आपण कां कष्ट घेतले?मी येतच होतो ना आपण भारताची घटना बनवली.चहूकडे विद्येचा प्रकाश पाडला.दलितांसाठी रात्रं दिवस खटपट करताहात.विनयाने हात जोडून आंबेडकर म्हणाले,आपण माझे गुरु आहात.एक महत्वाचा सल्ला हवाय! मी हिंदूधर्म सोडून दुसरा धर्म स्विकारायचा विचार केलाय!खूप प्रयत्न केला बाबा!जन्मभर धक्के खात आलोय घटना बनवली म्हणून कौतुक झाले. शिकून डाॅक्टर झालो तरी मला इतका त्रास भोगावा लागला.अन् हे माझे जाती बांधव…ज्यांच्या जवळ विद्या नाही,पैसा नाही,मान प्रतिष्ठा नाही,त्यांंना किती सहन करावे लागत असेल बाबा?माझा निर्णय पक्का झालाय!कोणता धर्म स्विकारायचा त्याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ३०-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – २७.
डाॅ.आंबेडकरांचा धर्मांतराचा निश्चय ऐकून,क्षणभर बाबा गंभीर झाले. म्हणाले,मला धर्माचं काय कळते? मी अडाणी धोबी!नाही… नाही..बाबा आपण जे सागाल तेच करेन.आंबेडकर साहेब!सगळे पददलित तुमच्या मागे आहे.त्यांची तुमच्यावर नितांत श्रध्दा आहे.तुम्ही जो रस्ता दाखवाल तिकडे हे सगळे येतील.तुमच्या एका शब्दाखातर जीव ओवाळून टाकतील.तेव्हा त्यांना भलत्या वाटेने नेऊ नका.तुम्हाला हवे ते करा फक्त दोन रस्ते वगळून,ख्रिश्चन बनू नका,त्याने देशाला धोका आहे.आणि मुसलमान बनू नका त्याने सत्यानाश होईल.बाबा आपली आज्ञा शिरसावंद्य.मी सगळ्या महारांसह बौध्द स्विकारतोय. नागपूरास हा दीक्षाविधी होणार त्यासाठी आपला आशिर्वाद हवाय!आशिर्वाद द्यायला न थांबता,शब्दही न बोलतांं बाबा
सर्वाना नमस्कार करुन बाहेर पडले.
पंढरपूरला मराठा धर्मशाळेच्या बांधकामावर देखरेख करीत असतां पंढरपूरचे डाॅ.गुणेंचा भाचा बाळ गंगाधर खरे,हुशार तरतरीत विद्यार्थी कांही कामा साठी बाबांकडे आले.त्यांच्या मनांत साधू बुबाबाजी विषयी अत्यंत चीड असे व त्याबद्दल ते निर्भयपणे बोलून दाखवत.ते धर्मशाळेच्या बांधकामाजवळ आल्यावर त्यांना कित्येक यात्रेकरुं बाबांना नमस्कार करतांना बघून खेरांच्या कपाळाची शीर उठली.बाबांजवळ येऊन त्यांची निर्भत्सना करीत म्हणाले,अशा थोतांड बुवाबाजीने देव भेटतो का?नम्रपणे बाबा म्हणाले,आपण सुशिक्षित माणसं!माझ्या सारख्या अडाण्याला काय कळते?कांही चुकलं असेल तर माफ करा.
एका बुवाची कशी जिरवली या समाधानात खेर परतले.पुढे ते साॅलिसिटर झाले.खेर ॲण्ड अंबालाल साॅलिसिटर्स नावाची मुंबई फोर्टमधे फर्म प्रसिध्दिस आली.राजकारणात भाग घेऊन काॅंग्रेसचे नामवंत पुढारीही झालेत. मराठा धर्मशाळा बांधून पूर्ण झाल्यावर त्याची व्यवस्था नीट लावून पंतांच्या स्वाधीन करण्याच्या उद्देशाने कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी कुणीतरी या फर्म चे नांव बाबांना सुचवले.सर्वमंडळींसह फोर्टला खेरच्या फर्ममधे आले.ते खाली थांबून बाकीचे वर जाऊन मनोदय खेरांना सांगीतल्यावर पार्टीची चौकशी केल्यावर खाली उभे असल्याचे सांगतांच त्यांना वर बोलावले.बाबा वर आल्य क्षणी दोघांनी एकमेकास ओळखले. पश्चातापाने खेरांचे मन भरुन आले.क्षमा मागून आग्रहाने घरी नेले.त्याक्षणा पासून बाबांवर जडलली श्रध्दा शेवटपर्यंत किंचितही कमी न होतां कायम राहिली.पुढे बाबांची अनेक कायदेविषयक कामे पैसाही न घेता करुन दिली.पंढरपुर धर्म शाळेचे ट्रस्टपत्र त्यांनीच करुन दिले.पुढे बाळासाहेब खेर राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही बाबांनी कांही सुचवल्यास गुरुज्ञा मानून त्यांनी त्या पूर्ण केल्या.
योगायोगाने कर्मवीर भाऊराव पाटीलांशी बाबांची गाठ पडली.बाबांची निःस्पृहता,गरीब,अनाथ,अंध,लुळे, पांगळे विषयींचा कळवळा बघून बाबां विषयी त्यांच्या मनांत अतिशय आदर निर्माण झाला.त्यांनी रयत शिक्षणसंस्था काढून खेडोपाडी शिक्षणाचा प्रचार प्रसार चालवला.शाळा काॅलेजचे जाळे खेड्या पाड्यात पसरवले हे पाहून त्यांचे कौतुक करत बाबा म्हणाले,ही मशाल अशीच पेटती ठेवा.अज्ञान जळून गेलं पाहिजे. बाबांचा हा उपदेश कायम ठेवून खूप पसारा वाढला.स्वातंत्र्य मिळाल्यावर कांही तांत्रिक चुक झाल्याने,शासनाने रयत शिक्षण संस्थेची ग्रॅंट बंद केली. भाऊराव तातडीने बाबांकडे नाशिकला येऊन अडचण कानावर घालीत म्हणाले, बाबा! कांही तरी करा नाहीतर हे लावले ले रोपटे सुकुन जाईल.बाबा म्हणाले, रोपटे जगलेच पाहिजे,तुमचे काम सुरु ठेवा.
शोधांती खरे पुण्यास असल्याचे कळल्यावर बाबा पुण्यास गेले.खरेंना भेटून भाऊरावांची समस्या त्यांना सविस्तर सांगीतल्यावर त्यांनी बाबांना आश्वास्त केले.आणि लवकरच शासनाने रयत संस्थेची ग्रॅंट परत सुरु केली.
तुकाराम महाराजांमुळे प्रसिध्दीस आलेले देहू हे लहानसे गांव!दरवर्षी १-२ लाख यात्रेकरु देहूस येतात.इंद्रायणीवर फक्त दोन फुटाचा लहान पूल बांधलेला. अलिकडे पलिकडे जाण्याचे साधन फक्त पूल.त्यावरुन जातांना माणसे गुरं पाय घसरुन जायबंदी होत.स्रीयांची तर जास्तच फजिती होत असे.बाबा दरवर्षी बीजयात्रेस येत असल्यामुळे ही होत असलेली फजिती बघून अतिशय दुःख होत होते.खेरांना भेटून बाबांनी ही समस्या त्यांच्या कानी घातली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ३०-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – २८.
देहूच्या यात्रेकरुंचे होणारे हाल ऐकून खेरांचेही मन गलबलले.त्यांनी लगेच इंजिनिअरला बोलावून मुंबई चाकण रस्त्याला मिळणारा जोडरस्ता आखुन पुलाचे एस्टीमेट वगैरेची आखणी करुन स्वतः लक्ष घालून धडक्याने कामाला सुरुवात केली.तसेच बाबांच्या आज्ञेनुसार तुकाराम गाथा आणि तुकाराम चरित्र पु.मं. लाड यांनी अथक परिश्रम व संशोधन करुन दोन्ही पुस्तकें शासनाची मदत व स्वतः धस सोसून कमी किंमतीत बहुजनांना उपलब्ध करुन दिली.
गेल्या कित्येक वर्षापासून नाशिक पंचवटीमधे उघडी गटारे होती.संबंध गावातून गलिच्छ पाण्याचे उघडे प्रवाह वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरवीत गोदे ला जाऊन मिळत.हा संगम बाबांच्या धर्मशाळेजवळच होता.नाशिकला वर्षभर यात्रा सुरु असायच्या.पण पर्व व राम नवमीच्यावेळी जास्त गर्दीमुळे होत असलेल्या मलमुत्राच्या घाणीने जीव नकोसा होई.गोदावरीच्या दोन्ही बाजूस बांधलेला कोट ढासळला होता.खालील बाजूस स्मशान,पावसाळ्यात प्रेते नेतांना अतिशय त्रास होत होता.बाबांनी ही दुरावस्था खेरांच्या कानी घातली.काॅंग्रेस अधिवेशनासाठी ते नाशिकला आले होते तेथील परिस्थितीचे स्वतः अवलोकन करुन लगेच नगरपालिकेच्या अधिकार्या ला बोलावून कामाची आखणी केली. शासनाकडून ग्रॅंट देववली.अतिशय तातडीने भूमीगत गटारे,स्मशानचा काॅॅंक्रीट रस्ता व नदीला कोट बांधला. बाबांनी अशा प्रकारच्या समस्या सांगाय चा अवकाश की,खेरांनी लगेच कार्यान्वीत करावे.
स्वातंत्र आंदोलनाचेवेळी ऑर्थर रोड जेल मधून खेरांची सुटका झाल्या बरोबर बाबांचा शोध घेऊन पंढरीच्या विठोबाठायी समजून प्रथम बाबांच्या दर्शनाला गेले होते.
बाबांचे विशुध्द आचरण,निस्पृह ता,बहुजनांविषयीचा कळवळा,त्यांची समाजातील लोकप्रियता,सेवाकार्य,साधे पणा इत्यादी गुणांचा प्रभाव जसा इतरां वर होता अत्र्यांवरही पडला.अत्रेही वीर पूजक होते.त्यांची व बाबांची गाठ फार उशीरा पडली.पण अत्रे शेवटपर्यत बाबां चे प्रशंसक राहिले.ते म्हणतात…बाबांचे कीर्तन श्रवण एक महान अनुभव आहे ज्याने घेतला नाही तो कपाळकरंटाच! गाडगेबाबा स्वतः निरक्षर,सहीच्या ठीकाणी अंगठा!समाजातील दुःख बघून द्रवणारे,अनाथांचे अश्रू पुसुन त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारे साक्षात ‘भगवंताची मूर्तीच’! गेली ५० वर्षे बाबा महाराष्र्टाच्या सर्व भागातून अहोरात्र संचार,गरिबांची व दुखीतांची अनेक प्रकारे सेवा करीत आहेत.झाडूचे तंत्र या देशात महात्मा गांधीनी आणले असे कांहीचे म्हणने आहे पण तसे मुळीच नाही.डोक्यावर खापर व हातात झाडू घेऊन पन्नास वर्षापासून अक्षरशः बाबा हिंडताहेत.कोणत्याही गावांत प्रवेश केला की प्रथम त्यांचा झाडू चालतो ते बघून मग लोकही त्यांचे अनुकरण करतात. सकाळी गावांतील घाण साफ झाली की, रात्री आपल्या कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत.
हा महान समाजसेवक तब्बल अर्ध्या शतकापासून लोककल्याणास्तव देहाचा कण न् कण घासून चदनासारखा झिजवतोय!चमत्कार,बुवाबाजीवर बाबां चा अजिबात विश्वास नाही.ते स्वतःच चालता बोलता चमत्कार आहे.कोणत्या ही गावी दोन दिवसांच्यापेक्षा जास्त थांबत नसे की कोणाच्या घरी मुक्कामा ला जात नसत.नदीसारखे अष्टप्रहर झुळ झुळ वाहत होते.रात्री रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली झोपत.आग्रहाने कोणी घरांत नेलेच तर,सतरंजीवर न बसतां एका बाजूला बसत.एखादा भाकरीचा तुकडा मागून तेवढाच खायचा व खापरातून पाणी प्यायचे.गेल्या चार वर्षापासून तेही बंद केले.नुसते वरणाचे किंवा आमटीचे पाणी अन् थोडीशी भाजी एवढ्यावर ते जगताहेत.
आज त्यांचे वय ८०-८५ च्या घरांत आहे.एवढे वय झाले असूनही डोक्यावर चे पांढरे केस सोडल्यास म्हातारपणाचे कोणतेच लक्षण दिसत नाही.रात्री २॥ तास झोप घेऊन,बाकीचा सारा वेळ उभे असतात.३-३ तास खड्या आवाजांत कीर्तन करतात.त्यांची वेशभूषा म्हणजे देशाच्या दारिद्र्याचे मूर्तिमंत प्रतिनिधीच! सहसा बाबा कुणाशी बोलत किंवा गप्पा मारीत नसत पण एकदा का ते जनसमुहा पुढे उभे राहिले की,मेघगर्जना करीत साहित्याचा,सद्भावनेचा,सद्विचारांचा असा कांही मारा करत की,श्रोते अक्षरशः कीर्तनाच्या सरोवरांत देहभान विसरुन डुंबुन जात.बाबा निरक्षर असूनही तुकारामांचे सारे अभंग मुखोद्गत!जनतेची भाषा बोलणारा प्रभावी व जबरदस्त वक्ता महाराष्र्टात दुसरा मिळणार नाही.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
३०-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – २९.
आचार्य अत्रे पुढे सांगतात…एकदा मुंबईहुन शासनाने दिलेल्या गाडीने अत्रे सोबत आळंदी यात्रेस निघाले.तोपर्यंत बाबांची मोटार सर्वांच्या परिचयाची, पोलीस बाबांचे दर्शन झाल्यावरच वाट मोकळी करत.बाबा कधीच कोणला पद वंदन करु देत नसत.दुसर्याने करण्या आधीच समोरच्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करीत.
पनवेलला जाणार्या रस्त्यावर शीळफाट्यापासून मैलांच्या अंतरावर विठोबाची यात्रा भरते.बाबांना तिथले बोलवणे असल्यामुळे बाबांची मोटार तिकडे वळली.यात्रेनिमित्याने मैदानात तुफान गर्दी!बाबा खाली उतरण्याआधीच कडे वाजण्यास सुरुवात झाली.बाबांनी भजनकर्यांना ओळीने उभे केले.इशारा केल्याबरोबर बाबांचे आवडते भजन देवकी नंदन गोपालाचा गजर वातावरणा त घुमला.यात्रेचा एवढा मोठा समुदाय पण सर्वजन टाळ्या वाजवून मुक्त कंठाने गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.. बाबा पुढे व शेकडो स्री पुरुष मागून टाळ्या वाजवत भजन करत मेळावा गर्जत विठोबा देवळाच्या टेकडीवर चढला.एक प्रदक्षिणा मारुन भजन करीतच खाली उतररुन मोटारीत बसले. परत येतांना खंडाळ्याच्या घाटावर गाडी अडवली पण बाबांची गाडी म्हणून दर्शन घेऊन जाऊ दिले.अत्रे बाबांना म्हणाले, बाबा!फार रात्र झाली बंगल्यावर चलावे, पिठलं भाकरीची व्यवस्था करतो,पण ऐकले तर बाबा कसले?खंडाळ्याच्या भर बाजार रस्त्यात उतरुन भजन सुरु केले. चहूबाजूंनी भराभर लोकं जमा झाले. बाया पाया पडायला आल्या तसे बाबा रस्त्याच्या दुसर्या बाजूने पळाले.बायकां ना विनोदाने म्हणाले जी बाई पाया पडेल तीची सासू लवकर मरणार नाही.
भजन संपल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बाबांनी उपदेशाचे दोन शबद सांगीतले.नंतर प्रत्येक बाईला १-१ भाकर व चटणी आणायला सांगीतले.१० मिनिटांत भाकरींची चवड जमा झाली. एका मारवड्याने आणलेली चपात्या परत केल्या.एकाने पेढे आणले ते आंधळ्या भिकार्यास दिले.एका मोकळ्या जागेत बाबांची पंगत बसली. गरीब लोकांनी दिलेली ती मेजवानी बघून बाबांंचे ह्रदय प्रेमाने उचंबळून आले. अलिकडे बाबा भाकर खात नव्हते पण त्या दिवशी खाल्ली.सर्वजणं बंगल्यावर झोपले.४॥ ला बाबा उठल्याबरोबर सर्व उठून बाबांबरोबर बंगल्याभोवतालचा सारा परिसर झाडून स्वच्छ केल्यावर अत्रे लज्जेने अर्धमेले झाले.
बाबांन चालवलेली जनताजनार्दन च्या पूजेचे विराट आंदोलन बघून समतानंद गद्रे आकृष्ट झाले.९ एप्रीलला बाबा दौर्यावरुन आले त्यावेळी त्यांचा पाय सुजला होता.४-५ दिवस विश्रांती घेण्याचा डाॅक्टरांचा सल्ला बाबांनी धुडकावून लावून पायाच्या जखमेची पर्वा न करतां एका पायावर ८५ वर्षाचे बाबा उभे राहून १॥ तास कीर्तन केलेच. विश्रांती न घेता कीर्तनाचा दौरा सुरुच होता.बाबांचे चरित्र म्हणजे निष्काम कर्माचा आदर्श होय!
कर्मवीर भाऊरावांचे कार्य मोठे अफाट होते.त्यांनी सांगली,सातार्या जिल्ह्यात शिक्षणाचे जणूं जाळेच अंथरले दोन्ही जिल्ह्यातून ६०० शाळा चालवल्या सातार्या जिल्ह्यातील विद्यार्थी संघाने एक लाखाची थैली मं.गांधीच्याहस्ते देण्याचे ठरवले होते पण त्याचवेळी नौखालीमधे हिंदूवर अत्याचार होऊ लागल्याने ते तिकडे गेल्यामुळे,त्यांच्या तोलामोलाचा न आढल्याने बाबांच्याहस्ते ती थैली सातार्याच्या धनिणी बागेत भव्य कार्यक्रमात भाऊरावास अर्पण करण्यांत आली.त्या रात्री राजवाड्या समोर प्रचंड समुदायापुढे बाबांचे कीर्तन झाले.शिक्षणक्षेत्रात बाबांचे चिरंतर स्मारक व्हावे हा त्यांच्या मनांत आलेला विचार कार्यान्वित करुन कराडला कृष्णा कोयनांचे प्रीतिसंगमाजवळ काॅलेज सुरु करुन “सद्गुरु गाडगे महाराज” नांव दिले
पंढरपूरच्या चोखामेळा धर्मशाळे जवळ असंख्य मुलांसाठी बोर्डींग सुरु केले.त्या संस्थेचे ट्र्स्टी शेवटपर्यत भाऊराव होते.बाबांच्या निधनाची वार्ता कळल्यावर ते ढसाढसा रडले.एका पालखीत बाबांची प्रतिमा ठेवून हजारों विद्यार्थ्यांनी कराडातून मूकपणे मिरवणूक काढली होती.ती पालखी स्वतः भाऊरावांनी वाहिली.त्यारात्री त्यांचे पाय सुजले,पण औषधोपचारास नकार दिला.बाबांच्या निधनाने ते खचले. आपला पाठीराखा,गुरुच गमावल्याचे अतोनात त्यांना दुःख झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. १-१०-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ३०.
बाबांच्या अनुयायांच्या माळेत एक एक अलौकिक हिर्याची भर पडत होती.बंडो गोपाळ मुकादम पांच वर्षाचे असतांनाच अनाथ झाल्यावर,शिक्षणाचे वय,पण मुलाची सोय लावण्यासाठी फाटक्या कपड्यानिशी मुंबईची गोदी गाठली.धंद्यात चांगलीच प्रगती झाली पण दारुच्या व्यसनापायी सारे गमावले. पश्चातापदग्ध होऊन पंढरीची वारी धरली बाबांच्या सानिध्यात आल्यावर बाबांनी शिक्षणाचा पुण्यपद मार्ग दाखवल्यावर ते कर्मवीर भाऊरावांकडे आले.त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन १० एकर पिकाऊ जमीन अर्पण केली.तसेच श्री सद्गुरु गाडगेमहाराज फ्री हायस्कुल बांधण्याचा खर्चही उचलला.
श्री बाळासाहेब खेर राज्याचे मुख्यमंत्री असतांना,जेवढे शक्य तेवढे बाबांच्या कार्यास सहाय्य तर केलेच पण अनेक महत्वांच्या व्यक्तींशी बाबांचा परिचय करुन दिला.इतिहास काळा पासून प्रत्यक्ष शिवाजी महारांशी नाते संबंध असलेले मंत्रीमंडळातील फलटण चे मालोजीराजे निबांळकरांनी बाबांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेकप्रकारे सहाय्य केले.शेवटच्या आजारांत निंबाळकरांनी बाबांसाठी खूप केले. मुंबईला हाॅस्पिटलमधे बाबा असतांना रोज त्यांच्या दर्शनाला जात असत!
तसेच कर्तुत्ववान मंत्री गणपतराव तापसेंचा परिचय खेरांनी बाबांशी करुन देऊन हरप्रकारचे सहाय्य करण्यास सांगीतल्याप्रमाणे वरवंडी,पंढरपूर इ. ठीकाणी चाललेल्या उपक्रमांमधे बाबांना मोलाचे सहाय्य केले.बाबा आजारी असतांना ते कुणाचेही न ऐकता सतत प्रवास सुरुच असे.शेवटी बाबांना हाॅस्पिटलमधे भरती केले.एके दिवशी बाबा हाॅॅस्पिटलमधून अचानक गायब झाल्याचे कळताच सारेच हादरले. शोधांती भायखळ्यास एके ठीकाणी सांपडले.तापसेंनी कळवळून हाॅस्पिटल कां सोडले म्हणून विचारल्यावर बाबा म्हणाले,मी फकीर माणूस,एवढे बील कुठून भरणार?१९५६ ला गाडगेमहाराज मिशनच्या कामापैकी कांही भार तापसें कडे सोपवला व त्यांनीही मोठ्या निष्ठेने सांभाळला.
पश्चिश महाराष्र्टात कर्मवीर भाऊरावांनी जसे कार्य केले तसेच कार्य डाॅ.पंजाबराव देशमुखांनी केले.कित्येक प्रशाला,महाविद्यालये,विशेषतःअमरावती जिल्ह्यात त्यांच्या कार्याचे जाळे पसरले. अमरावतीजवळील वलगावापाशी रेवसा गावी त्यांचे मित्र बियाणीशेटच्या गुरुंची समाधी,तिथे दरवर्षी भरणार्या यात्रेत बाबांशी त्यांची गाठ पडली.केंद्रीयमंत्री होऊन पंजाबराव अमरावतीस आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी बाबा उपस्थीत होते.बरेचदा महाविद्यालयांमधे बाबांना बोलवून,पंजाबरावांनी विद्यार्थ्यां चे प्रबोधन करण्याची विनंती केली.
सौराष्र्टात जामनगरला जन्मलेले, वकीलीची सनद घेतलेले,मुक्या प्राण्यांची वकीली करणारे जयंतीलाल मान्सुरकरांची गाठ कान्हूरच्या यात्रेत प्रचार करीत असतां त्यांची गाठ बाबांशी पडली.बाबांचे व्यक्तीमत्व,प्रचार पध्दती,
कीर्तने या सर्वांचा फार मोठा प्रभाव मान्सुरकरांवर पडला.१९३५ ला त्यांनी जीवदया मंडळाकडून दूरवर प्रवास करावा लागणार्या बाबांच्या भजनी मंडळीस गाडी देववली.
बुवाबाजी आणि इतर सामाजिक ढोंगावर तिखट लेखणी व वाणीचे प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या निरिक्षणात बाबांमधे किंचितही ढोंग आढळले नाही.हाती गाडगे व चिंध्या पांघरलेल्या या संताचे प्रबोधनकार समर्थक बनले.त्याचवेळी ‘जनता जनार्दन’ पाक्षिक पुढे रुपांतर झालल्या मासिकमधे नांदगावचे श्री कवडेंनी खूप परिश्रम घेऊन,स्वतः विदर्भात हिंडून, समकालिकांच्या मुलाखती घेऊन बाबां विषयी माहिती गोळा केली.त्याचे मनन व नवनविन माहिती मिळवून प्रबोधनकारां नी बाबांचे उत्तम चरीत्र लिहून प्रसिध्द केले.शेवटी बाबांची प्रकृती बिघडत गेली. डाॅक्टरांचे उपचारही बाबांच्या तुफानी दौर्यापुढे फोल ठरले.कितीही वेदना असो,शरीराचा तोल जात,पण कीर्तनाचे कार्यक्रम क्षणाची उसंत न घेतां अविरत चालूच राहत.झंझावती कार्यक्रमामुळे नियमित औषधोपचार कसा होणार?
नाशिकला सुमारे २० वर्षानंतर कीर्तन झाले.तिथून पैठण,औरंगाबाद जिल्हा,नगरहून मुंबईला आले तेच गळवाच्या भयंकर वेदना घेऊनच!मधूमेहात गळू होणे चिंतेची बाब!त्यांची अस्वस्थ प्रकृती बघून अनेकांच्या आग्रहा ने सेंट जार्ज हाॅस्पिटलमधे भरती केले. दिनदुबळ्यांना निदान फाटकी कांबळी, खाण्यास कमीतकमी कळण्याकोंड्याची भाकर,पिण्यास स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ज्या महात्म्याने आयुष्याची साठ वर्षाच्यावर स्वतः काटेकुटे,झाडाझुडपा खाली,दगडाच्या उशीवर डोके ठेवून रात्री काढल्या,स्थापन केलेल्या अन्नसत्रात शेकडो लोक अन्न ग्रहण करत असतांना स्वतः रोज भाकरीचा तुकडा मागून खाल्ला.हजारों यात्रेकरु राजतुल्य धर्म शाळेत वास्तव्य करीत असतांना हा योगी कुठेतरी चिखलमातीत वास्तव्य करणारा हा असामान्य पुरुषोत्तम हाॅस्पिटलच्या आरामदायी पलंगावर कसा झोपणार?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-१०-२०२१.









