महालय श्राद्ध कसे करावे ?

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

श्रीमद् भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जन्म आणि मृत्यूचे चक्र चालूच राहते. आत्मा कधीही मरत नाही आणि निश्चित वेळेसाठी वेगवेगळे शरीर धारण करते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा यमलोकात जातो, तेथे त्याने केलेल्या पाप-पुण्याचा हिशोब होतो आणि आत्मा स्वर्गात किंवा नरकात पाठवला जातो. यमलोकाचे राजा यमदेव आहेत. यमदेव सूर्यदेवाचे पुत्र आणि शनिदेवाचे भाऊ आहेत. यमुना यांची बहीण आहे.

हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या गावात यमदेवाचे एक अनोखे हे मदिर आहे.

“मृत्यूनंतर सर्वात पहिले याच मंदिरात पोहोचतो आत्मा, यमदेव करतात फैसला

हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या गावात यमदेवाचे एक अनोखे हे मदिर आहे. हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. या मंदिराजवळ पोहचल्यानंतरही अनेक लोकांना मंदिरात जाण्याचे धाडस होत नाही. मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करून निघून जातात. कारण या मंदिरात स्वतः धर्मराज यमदेव राहतात.

मंदिरासंदर्भातील इतर काही खास गोष्टी….
या विश्वातील हे एकमेव मंदिर यमदेवाला समर्पित आहे. या मंदिरात एक खोली आहे, जी चित्रगुप्त देवाची मानली जाते. चित्रगुप्त यमदेवाचे सचिव आहेत. हे जीवात्म्यांच्या कर्माचा हिशोब ठेवतात.

येथील मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा यमदेवाचे दूत त्या व्यक्तीचा आत्मा सर्वात पहिले या मंदिरात चित्रगुप्तसमोर घेऊन येतात. चित्रगुप्त या जीवात्म्याला त्याच्या पूर्ण कर्माची माहिती देतात आणि त्यानंतर चित्रगुप्त देवाच्या खोलीतून यमदेवाच्या खोलीत त्याला नेले जाते. या खोलीला यमदेवाचे न्यायालय म्हटले जाते. याठिकाणी यमदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

या मंदिरात सोने, तांब, चांदी आणि लोखंडाचे चार अदृश्य दरवाजे असल्याचे मानले जाते. यमदेवाने आदेश दिल्यानंतर दूत याच दरवाजांमधून आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरुड पुराणातही यमदेवाच्या दरबारात चार दरवाजे असल्याचा उल्लेख आहे.

संकलन :- सतीश अलोणी @

महालय म्हणजे काय ?

मनुष्यमात्रावर देव-ऋण, ऋषि-ऋण आणि पितृ-ऋण अशी तीन ऋणे असतात, असे शास्त्रात सांगितले आहे. यांपैकी पितृऋण आपण श्राद्ध करून फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आयुरारोग्याच्या आणि सुखसौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणामधून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्‍न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ होय. त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो, असेही नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मृत्युतिथीला सर्वांस सहज प्राप्त होणार्‍या जल, तीळ, तांदूळ, कुश (दर्भ) आणि पुष्प एवढ्या साधनांनी त्यांचे श्राद्ध घालावयाचे, गोग्रास वाढावयाचा आणि यथाशक्ती एक तीन, पाच ब्राह्मणांना भोजन घालावयाचे, एवढे केल्याने आपल्या वरचा पितृऋणभार हलका होतो. म्हणून अशा सहजसाध्य होणार्‍या गोष्टीची आपण उपेक्षा करू नये. यासाठी ज्या महिन्याच्या त्या तिथीस आपल्या मातापितरांचा मृत्यू झाला असेल, त्या महिन्याच्या त्या तिथीस श्राद्धदी कर्म करणे, शिवाय भाद्रपद व. पक्षात (महालय पक्षात ) सुद्ध त्याच तिथीला श्राद्ध, तर्पण, गोग्रास आणि ब्राह्मणभोजनादी करणे अथवा करविणे आवश्यक आहे. हे श्राद्ध, पितृत्रयी – पिता, पितामह, प्रपितामह; मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही, सापत्‍नमाता, मातामह, मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही, मातृपितामही, मातृपतिपामही, पत्‍नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्य – पुत्र, जावई, बहिणीचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. असे केल्याने मातापितरांच्या मृत्युतिथीला मध्यान्हसमयी मुलाने पुन्हा स्नान करून श्राद्धादी कर्म करावे आणि ब्राह्मणभोजन घालून स्वत: भोजन करावे. ज्या स्त्रिला पुत्र नाही, तिने आपल्या पतीचे श्राद्ध त्या तिथीला स्वत: केले तरी चालते. भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत सोळा दिवस पितृतर्पण आणि तिथीच्या दिवशी श्राद्ध अवश्‍य करावे. याप्रमाणे केल्याने ‘पितृव्रत’ यथासांग पूर्ण होते.
या पक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे
‘यावद् वृश्‍चिकदर्शनम्
म्हणजे सूर्य वृश्‍चिकराशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो. महालयासाठी आप्तेष्टांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

श्राद्ध तिथीनुसार का करावे ?

प्रत्येक गोष्ट त्या त्या तिथीला आणि त्या त्या मुहूर्ताला करणे महत्त्वाचे आहे; कारण या दिवशी त्या त्या घटनात्मक कर्मांचे कालचक्र आणि त्यांचा प्रत्यक्ष घटनाक्रम, त्यातून उत्पन्न होणारा परिणाम या सर्वांची स्पंदने एकसारखी म्हणजेच एकमेकांना पूरक असणे‘प्रत्येक गोष्ट ही त्याच्या कार्यकारण-भावासहित जन्माला येते. प्रत्येक गोष्टीची परिणामकारकता ही त्याचा कार्यमान कर्ता, कार्यातील योग्य घटिका आणि कार्यस्थळ यांवर अवलंबून असते. या सर्वांच्या पूरकतेवर कार्याची फलनिष्पत्ती, म्हणजेच परिपूर्णता ठरून कर्त्याला विशिष्ट फलप्राप्ती होते. ही गोष्ट ज्या वेळी ईश्वरी नियोजनाच्या म्हणजेच प्रवृत्ती आणि प्रकृती यांच्या संगमाने घडते, त्या वेळी ती प्रत्यक्ष इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवरीलशक्तीच्या साहाय्याने सगुण रूप धारण करून साकार होते.तिथी ही प्रकृतीला आवश्यक, म्हणजेच बळ देणारी म्हणजेच मूळ ऊर्जा स्वरूप आहे, तर त्या तिथीला त्या त्या जिवाच्या नावाने घडणारे कर्म हे त्यातून उत्पन्न होणार्या प्रवृत्तीला, म्हणजेच फलनिष्पत्तीस पोषक आहे. प्रत्येक गोष्ट त्या त्या तिथीला आणि त्या त्या मुहूर्ताला करणे महत्त्वाचे आहे; कारण या दिवशी त्या त्या घटनात्मक कर्मांचे कालचक्र आणि त्यांचा प्रत्यक्ष घटनाक्रम, त्यातून उत्पन्न होणारा परिणाम या सर्वांची स्पंदने एकसारखी म्हणजेच एकमेकांना पूरक असतात. ‘तिथी’ ही तो तो घटनाक्रम पूर्णत्वास नेण्यास आवश्यक असणार्या लहरी कार्यरत करणारी असते.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय श्राद्ध भाग १

मनुष्यमात्रावर देव-ऋण, ऋषि-ऋण आणि पितृ-ऋण अशी तीन ऋणे असतात, असे शास्त्रात सांगितले आहे. यांपैकी पितृऋण आपण श्राद्ध करून फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आयुरारोग्याच्या आणि सुखसौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणामधून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ होय. त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो, असेही नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मृत्युतिथीला सर्वांस सहज प्राप्त होणार्या जल, तीळ, तांदूळ, कुश (दर्भ) आणि पुष्प एवढ्या साधनांनी त्यांचे श्राद्ध घालावयाचे, गोग्रास वाढावयाचा आणि यथाशक्ती एक तीन, पाच ब्राह्मणांना भोजन घालावयाचे, एवढे केल्याने आपल्या वरचा पितृऋणभार हलका होतो. म्हणून अशा सहजसाध्य होणार्या गोष्टीची आपण उपेक्षा करू नये. यासाठी ज्या महिन्याच्या त्या तिथीस आपल्या मातापितरांचा मृत्यू झाला असेल, त्या महिन्याच्या त्या तिथीस श्राद्धदी कर्म करणे, शिवाय भाद्रपद व. पक्षात (महालय पक्षात ) सुद्धा त्याच तिथीला श्राद्ध, तर्पण, गोग्रास आणि ब्राह्मणभोजनादी करणे अथवा करविणे आवश्यक आहे. हे श्राद्ध, पितृत्रयी – पिता, पितामह, प्रपितामह; मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही, सापत्नमाता, मातामह, मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही, मातृपितामही, मातृपतिपामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्य – पुत्र, जावई, बहिणीचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. असे केल्याने मातापितरांच्या मृत्युतिथीला मध्यान्हसमयी मुलाने पुन्हा स्नान करून श्राद्धादी कर्म करावे आणि ब्राह्मणभोजन घालून स्वत: भोजन करावे. ज्या स्त्रिला पुत्र नाही, तिने आपल्या पतीचे श्राद्ध त्या तिथीला स्वत: केले तरी चालते. भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत सोळा दिवस पितृतर्पण आणि तिथीच्या दिवशी श्राद्ध अवश्य करावे. याप्रमाणे केल्याने ‘पितृव्रत’ यथासांग पूर्ण होते.
या पक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे
‘यावद् वृश्चिकदर्शनम्
म्हणजे सूर्य वृश्चिकराशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो. महालयासाठी आप्तेष्टांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय श्राद्ध भाग २

समर्थ असेल त्याने भाद्रपदातील कृष्णपक्षी प्रतिपदेपासून आरंभ करून अमावास्येपर्यंत महालय करावे. तिथीची वृद्धि असेल तर सोळा महालय करावे, वृद्धि अथवा क्षय यांचा अभाव असेल तर पंधराच महालय करावे. तिथीचा क्षय असेल तर चवदाच करावे. सर्व करण्यास असमर्थ असेल त्याने, षष्ठी, अष्टमी, दशमी, एकादशी इत्यादिकापैकी एका तिथीचे दिवशी आरंभ करून अमावास्येपर्यंत महालय करावे. इतकेही करण्यास असमर्थ असेल त्याने निषिद्ध नाही अशा एका दिवशी एकदाच महालय करावा. प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत सर्व दिवशी महालय करण्याचा जो पक्ष सांगितला त्याविषयी चतुर्दशी वर्ज्य नाही. पंचमीपासून अमावास्येपर्यंत महालय करण्याचे जे निरनिराळे पाच पक्ष सांगितले त्यांमध्ये चतुर्दशी वर्ज्य करून इतर तिथींचे दिवशी महालय करावे. एकदा महालय करण्याच्या पक्षीही चतुर्दशी वर्ज्य करावी. एकदा महालय करण्याविषयी प्रतिपदा, षष्ठी, एकादशी, चतुर्दशी, शुक्रवार, जन्मनक्षत्र, जन्मनक्षत्रापासून दहावे आणि एकोणिसावे नक्षत्र, रोहिणी, मघा, रेवती ही वर्ज्य करावी. त्रयोदशी, सप्तमी, रविवार, मंगळवार हे देखील वर्ज्य करावे असे क्वचित ग्रंथामध्ये सांगितले आहे. पित्याचे मृत तिथीचे दिवशी एकदा महालय करणे असेल तर त्याविषयी प्रतिपदा इत्यादि निषेध नाही. कारण, ‘पंधरा दिवस महालय करण्याविषयी अशक्त असेल त्याने पितृपक्षामध्ये एका दिवशी- निषिद्ध दिवशीही – यथाविधि पिंडदान करावे’ असे वचन आहे. मृततिथीचे दिवशी श्राद्धाचा असंभव असेल तर निषिद्ध तिथि इत्यादि वर्ज्य करून महालय करावा. त्यामध्येही द्वादशी, अमावास्या, अष्टमी, बरणी, व्यतीपात इत्यादि दिवशी मृततिथि नसली तरी सकृन्महालयाला तिथि इत्यादिकांचा कोणताही निषेध नाही. संन्यासी यांचा महालय अपराह्णव्यापिनी द्वादशीचे दिवशीच सपिंडक करावा. इतर तिथीचे दिवशी करू नये. चतुर्दशीचे दिवशी मृत झालेल्यांचा महालय चतुर्दशीचे दिवशी करु नये शस्त्राने हत झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करावे असा नियम सर्वाहून बलिष्ठ आहे. याकरिता प्रतिवार्षिक श्राद्धावाचून इतर श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करण्याबद्दल निषेध आहे. याप्रमाणे पौर्णिमेचे दिवशी मृत झालेल्याचाही महालय पौर्णिमेचे दिवशी करू नये. कारण कृष्ण पक्ष नसल्यामुळे पौर्णिमेचे दिवशी महालय प्राप्त होते नाही. यामुळे चतुर्दशी अथवा पौर्णिमा या दिवशी मरण पावलेल्यांचा महालय द्वादशी, अमावास्या इत्यादि तिथीचे दिवशी करावा. महालयाविषयी कन्यास्थ रवि प्राशस्त्यसंपादक आहे, निमित्त नाही. कारण आरंभी, मध्ये अथवा अंती जेव्हा रवि कन्या राशीला जातो तेव्हा तो सकल पक्ष सोळा श्राद्धांविषयी पूज्य आहे असे स्मृतिवचन आहे. अमावास्येपर्यंत तिथींचे ठिकाणी महालयाचा असंभव असेल तर वृश्चिक संक्रांतीपर्यंत व्यतीपात, द्वादशी इत्यादि सर्व दिवशी करावा. (हे श्राद्ध मलमासात करू नये असे भृगूचे वचन आहे.) मृतदिवस, महालय इत्यादिक श्राद्ध पक्वानेच करावे. आमान्नाने करू नये. “महालय, गयाश्राद्ध, मातापितरांचा मृतदिवस, यांचे ठिकाणी विवाहिताने देखील यथाविधि पिंडदान करावे.”

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय श्राद्ध भाग
महालयविधि

भाद्रपद कृष्णपक्षातलय प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत दररोज जो महालय करायचा त्यात-पित्याची, त्रयी, मातेची त्रयी व मातेच्या पित्याची त्रयी (सपत्नीक), पत्नी वगैरे जे एकोद्दिष्ट पितृगण म्हणजे (बायको, मुले, चुलता, मामा, भाऊ (सपत्नीक), आत्या, मावशी, बहीण (सभर्तृक व ससुत), सासरा व गुरु वगैरे सर्व पितर येतात; यास्तव, तो त्या सर्वांच्या उद्देशाने करावा असा एक पक्ष आहे. सपत्नीक अशी जी पितृत्रयी, व सपत्नीक अशी जी मातामहादि त्रयी त्या सहा देवतांच्याच मात्र उद्देशाने दररोजचा महालय करावा असा दुसरा पक्ष आहे. सपत्नीक पितृत्रयी, सपत्नीक मातामहत्रयी आणि पत्नी वगैरे जे एकोद्दिष्ट गण त्यांच्या उद्देशाने दररोज महालय करावा असा तिसरा पक्ष आहे. दररोज महालय करण्याच्या बाबतीत असे एकंदर तीन पक्ष आहेत. ‘पंचमीपासून अमावास्येपर्यंत महालय करण्यासंबंधाने जे पक्ष आहेत, त्याबाबतितही वरीलप्रमाणेच निर्णय समजावा. एकदाच जर महालय करायचा असेल, तर तो मात्र सर्व पितरांच्या उद्देशाने केला पाहिजे. अशा महालयाच्या प्रसंगी देवतांचा संकल्प-
‘पितृपितामहप्रपितामहानां मातृतत्सपत्नीपितामही तत्सपत्नीप्रपितामहीतत्सपत्नीनां यद्वास्मत्सापत्नमातुरिति पृथगुद्देशः मातामहमातृपितामहमातृप्रपितामहानां सपत्नीकानां यथानामगोत्राणांवस्वादिरूपाणां पार्वणविधीना पत्न्याः पुत्रस्य कन्यकायाः पितृव्यस्य मातुलस्य भ्रातुः पितृष्वसुर्मातृष्वसुरात्मभगिन्याः पितृव्यपुत्रस्य जामातुर्भागिनेयस्य श्वशुरस्य श्वश्र्वा वा आचार्यस्योपाध्यायस्य गुरोःसख्युःशिष्यस्य एतेषां यथानामगोत्राणां पुरुषविषये सपत्नीकानां स्त्रीविषये सभर्तृकसापत्यानामेकोद्दिष्टविधिना महालयापरपक्षश्राद्धमथवा सकृन्महालयापरपक्षश्राद्धं सदैवं – सद्यः करिष्ये’ –
याप्रमाणे करावा. यामध्ये जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्याच नावांचा उच्चार करावा. मातामह इत्यादिकांच्या पत्नी जिवंत असल्यास ‘सपत्नीक’ आणि स्त्रियांचा पति जिवंत असेल तर ‘सभर्तृक’ असे उच्चार करू नयेत. महालय, गयाश्रद्ध, नान्दीश्राद्ध आणि अन्वष्टका ही नऊ देवतांचे (पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी) उद्देशाने करावीत. इतर श्राद्धे (पितृत्रयी व मातामहत्रयी सपत्नीक) या सहा देवतांच्या उद्देशाने करावीत. अन्वष्टका, नान्दीश्राद्ध, प्रतिसांवत्सरिक श्राद्ध, महालय आणि गयाश्राद्ध यांच्या ठिकाणी सपिंडी करण्याच्या पूर्वी मातेचे श्राद्ध निराळे करावे. इतर ठिकाणी पतीसह करावे. स्मृतींच्या अनुरोधाने इत्यादि तीन पार्वणेच सांगितली आहेत. मातामही इत्यादि त्रयीचा पृथक् उच्चार करून, बारा देवतांची मिळून चार पार्वणे करावीत, असेही काही ग्रंथकारांनी सांगितले आहे. गयाश्राद्ध, तीर्थश्राद्ध आनि नित्य तर्पण यांत याच देवता घ्याव्यात. महालयातही ‘धूरिलोचन’ नावाचे विश्वेदेव घ्यावेत. ज्याला सामर्थ्य असेल त्याने देवांकरिता दोन, तीन पार्वणांपैकी प्रत्येकाला तीन प्रमाणे नऊ आणि पत्न्यादि एकोद्दिष्टगणाला प्रत्येक देवतेला एकेक याप्रमाणे ब्राह्मणांना आमंत्रण द्यावे. ज्याला सामर्थ्य नसेल त्याने देवांकरिता एक, तीन पार्वणांना प्रत्येकी एक मिळून तीन आणि सर्व एकोद्दिष्ट गणांना मिळून एक असे ब्राह्मण सांगावे. देवाकरता दोन ब्राह्मण सांगावेत असे सांगणारा जर पक्ष असेल, तर प्रत्येक पार्वणाला तीन तीन ब्राह्मण सांगितलेच पाहिजेत. देवांकरिता दोन आणि प्रत्येक पार्वणाला एक, किंवा देवांकरिता एक व प्रत्येक पार्वणाला तीन असे विषम प्रमाण घेऊ नये. अमावास्यादि श्राद्धांच्या ठिकाणिही याप्रमाणेच करावे. जो कोणी अत्यंत असमर्थ असेल, अशाने दोन पार्वणांना एकच ब्राह्मण सांगितला तरी चालेल. महालयाच्या अंती महाविष्णूच्या उद्देशाने एक ब्राह्मण अवश्य सांगावा असा कौस्तुभात विशेष सांगितला आहे. ज्याची आई जिवंत असेल त्याने सापत्न मातेचे एकोद्दिष्टश्राद्ध करावे, पार्वणश्राद्ध करू नये. ज्याच्या अनेक सापत्न माता असतील अशाने सार्‍या आर्यांच्या उद्देशाने एकच ब्राह्मण सांगावा आणि पिंडही एकच करावा. अर्घ्यपात्रे मात्र निरनिराळी करावीत. आपल्या मातेबरोबरच अनेक सावत्र मातांचे जर कोणाला श्राद्ध करणे असेल, तर त्याने आपल्या मातेसह इतर सावत्र आयांच्या उद्देशाने एकच ब्राह्मण, एकच पिंड व एकच अर्घ्य, असे पार्वणश्राद्ध करावे. सापत्न मातांचे निराळे असे एकोद्दिष्ट करू नये असा जो एक पक्ष आहे तरी सर्व सापत्न मातांचे पृथक्‍ एकोद्दिष्ट करावे असेही दुसरा पक्ष सांगतो. महालयात पार्वणाकरता अग्नौकरण केले पाहिजे. एकोद्दिष्ट गणांसाठी अग्नौकरण कृताकृत आहे. एकोद्दिष्टासाठी अग्नौकरण केल्यास, अग्नौकरणाचे अन्न वेगळाल्या पात्रात घ्यावे. महालयात सर्व पार्वणांकरिता व एकोद्दिष्टासाठी एकदा छिन्न केलेला असा एकच दर्भ घ्यावा. दर्शश्राद्धादिकांतील प्रत्येक पार्वणाला निराळा दर्भ घ्यावा. अवशिष्ट श्राद्धप्रयोग आणि अनेक माता असता अभ्यंजनादिकाविषयी जे मंत्रोच्चार करायचे असतात, त्यांची माहिती श्राद्धसागरात आणि आपापल्या शाखांना उक्त अशा प्रयोगग्रंथात पाहावी. एकदाच जर करणे असेल, तर श्राद्धाच्या अंगभूत जे तिलतर्पण ते, दुसर्‍या दिवशीच सर्व पितरांच्या उद्देशाने प्रातःसंध्येच्या पूर्वी अथवा प्रातःसंध्येच्या नंतर ब्रह्मयज्ञाच्या अंगभूत करावयाच्या तर्पणाहून निराळेच करावे. प्रातिपदिक आणि पंचम्यादिक जे पक्ष करायचे त्यांच्या ठिकाणि ब्राह्मणांचे विसर्जन झाल्यावर, श्राद्धामध्ये पूजित अशा पितरांच्या उद्देशाने तर्पण करावे. पत्नी विटाळशी असताना एकदा करायचा महालय करू नये; कारण त्यासाठी दुसरा उक्तकाल ठरविला आहे. अमावास्येच्या दिवशी जर स्त्री रजस्वला असेल, तर आश्विन शुद्ध पंचमीपर्यंतचा काळ महालयाला गौण आहे. प्रातिपदादि अन्य पक्षाचे ठिकाणी प्रारंभाचे दिवशी पाकाला आरंभ होण्याच्या आधी जर पत्नी रजस्वला होईल, तर एकाच्या पुढचा दुसरा याप्रमाणे पक्षांचा स्वीकार करावा. (अशा वेळी जर सुतक येईल,तर त्या बाबतीतला निर्णय तिसर्‍या परिच्छेदात सांगितला आहे.) पाकाला आरंभ झाल्यानंतर जर स्त्री रजस्वला होईल, तर तिला दुसर्‍या घरी ठेवून महालयाला प्रारंभ करावा. विधवेने करायच्या श्राद्धासंबंधानेही हेच जाणावे. अपुत्र अशा विधवेने, अशा प्रसंगी
‘मम भर्तृतत्पितृपितामहानां भर्तुर्मातृपितामहीप्रपितामहीनां मम पितृपितामहप्रपितामहानां मम मातृपितामहीप्रपितामहीनां मम मातामहमातृपितामहमातृप्रपितामहानां मम मातामहीमातृपितामहीमातृप्रपितामहीनां तृप्त्यर्थंसकृन्महालयपरपक्षश्राद्धंकरिष्ये’
असा स्वथ संकल्प करून, ब्राह्मणांकडून अग्नौकरणासह सर्व प्रयोग यथाविधि करवावा. ब्राह्मणाने
‘अमुकनाम्न्य यजमानायाः भर्तृतत्पितृपितामह०’
वगैरे वरीलप्रमाणे उच्चार करून, प्रयोग करावा. असमर्थ असल्यास – भर्तृत्रयी, स्वपितृत्रयी, स्वमातृत्रयी, स्वमातामहत्रयी सपत्नीक याप्रमाणे चार पार्वणांच्या उद्देशाने महालय करावा. अत्यंत असमर्थता जर असेल, तर स्वभर्तृत्रयी आणि स्वपितृत्रयी अशी दोनच पार्वणे करावीत.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय भाग ४

पिता संन्यासी असल्यास अथवा पातित्याने युक्त असल्यास जीवत्पितृक पुत्राने देखील पित्याचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने पिंडदानरहित असा सांकल्पविधि करून महालय करावा. कारण, “पिता संन्यस्त अथवा पतित असेल तर नांदीश्राद्ध व तीर्थश्राद्ध यांचे ठिकाणी पित्याने ज्यांचे श्राद्ध केले असते त्यांच्या उद्देशाने पुत्राने श्राद्ध करावे,” “मुंडन, पिंडदान, सर्व प्रकारचे प्रेतकर्म, ही जीवत्पितृकाने आणि गर्भिणीपतीने करू नयेत” इत्यादि प्रकारची वचने आहेत. पिंडदान इत्यादि विस्ताराने करण्यास अशक्त असेल त्यानेही सांकल्पविधि करावा. सांकल्पविधीमह्ये अर्घ्यदान, समंत्रक आवाहन, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान,
“स्वधा वाचयिष्ये ॐ स्वधोच्यताम्”
 इत्यादि स्वधावाचन प्रयोग ही वर्ज्य करावी. अनेक ब्राह्मण न मिळतील तर देवाचे स्थानी शालिग्रामादिक देवमूर्तीची स्थापना करून श्राद्ध करावे. सर्वथा ब्राह्मण न मिळेल तर दर्भाचा बटु करुन श्राध करावे. पिता मृत झाला असता प्रथम वर्शी महालय कृताकृत आहे. महालय मलमासात करू नये. दुसर्‍या पक्षी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध प्राप्त झाले असता मृततिथीचे दिवशी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करून दुसर्‍या तिथीचे ठिकाणी सकृन्महालय करावा. प्रतिपदेपासून दर्शापर्यंत दररोज महाल्य करण्याचा पक्ष असेल तर मृततिथीचे दिवशी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करून निराळा पाक करून महालय करावा. अमावायेचे दिवशी प्रतिसांवत्सरिक श्राद्ध व महालय प्राप्त होतील तर अगोदर प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करून नंतर महालय आणि त्यानंतर दर्शश्राद्ध ही प्रत्येक प्रसंगी निराळा पाक करून करावी. अमावास्येचे दिवशी महालय प्राप्त होईल तेव्हाही याप्रमाणेच अगोदर महालय करून नंतर दर्शश्राद्ध करावे. मृततिथीचे दिवशी सकृन्महालय करण्याचे पक्षी त्या त्या तिथीच्या ग्राह्यत्वाचा निर्णय अपराह्णकालाच्या व्याप्तीच्या अनुरोधाने दर्शाचे निर्णयाप्रमाणेच घ्यावा असे मला वाटते. या दुसर्‍या पक्षी भरणीश्राद्ध केल्याने गयाश्राद्धाचे फल प्राप्त होते. भरणीश्राद्ध अपिंडक षड्‌देवतांच्या उद्देशाने सांकल्पविधीने करावे. याला धूरिलोचन अथवा पुरूरवार्द्रव हे देव घ्यावे. भरणी श्राद्ध काम्य आहे. गयाश्राद्धाचे फल इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे. काही लोक भरणीश्राद्ध पित्या इत्यादिकांच्या मरणोत्तर पहिल्या वर्षी मात्र करतात. दुसर्‍या इत्यादि वर्षी करीत नाहीत. याविषयी मूळ निर्णय शोधला पाहिजे. “जोपर्यंत एक वर्ष पूर्ण झाले नाही तोपर्यंत दैव अथवा पित्र्य कर्म करू नये.” इत्यादि वचनावरून दर्शादि सर्व श्राद्धांचा पहिल्या वर्षी निषेध आहे. याकरिता एक वर्षे पूर्ण झाल्याम्तरच पितृत्व प्राप्त होते; म्हणून दुसर्‍या इत्यादि वर्शीच भरणीश्राद्ध करणे योग्य आहे असे मला वाटते. पित्याहून भिन्न जो जो कोणी मरण पावतो त्याचे त्याचे भरणीश्राद्ध पहिल्या वर्षी कोणी करतात त्याविषयीही काय आधार आहे तो मला समजत नाही. गयाश्राद्धाचे फळाच्या इच्छेने आचाराला अनुसरून करावयाचे असेल तर मृत माणसाच्या एकच त्रयीच्या उद्देशाने पार्वण करून देवांसहवर्तमान करावे. या श्राद्धामध्ये पिंडदान करण्याचा आचार आहे तोही चिंत्य आहे.

अशोककाका कुलकर्णी

महालय भाग ५
अष्टकाविधि

या अपरपक्षामध्ये सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवशी
“मादावर्षश्राद्धं कर्तु पूर्वेद्युः श्राद्धं करिष्ये माध्यावर्षश्राद्धं करिष्ये अन्वष्टक्यश्राद्धं करिष्ये’
असा क्रमाने संकल्प करून, आश्वलायनांनी सर्व अष्टकाविधि करावा. हे अष्टकाविकृतिरूप श्राद्ध आश्वलायनांनी एकाष्टकाकरणपक्षीही करावे. इतर शाखीयांनी अष्टकारूपच करावे. पंचाष्टकाकरणपक्षे  ‘अष्टकाश्राद्धं करिश्ये’ अशा संकल्पाने करावे. एकाष्टकापक्षी करू नये. नवमीला नऊ देवतांच्या उद्देशाने अन्वष्टक्यश्राद्ध सर्व शाखीयांनी करावे. अष्टमीला अष्टकाश्राद्ध जरी केले नसले, तरी गृह्याग्नीसंबंधाने जो विधि सांगितला आहे, त्याच विधीने करावे. कारण, त्या दिवशी अन्वष्टक्यश्राद्धच मुख्य आहे. जे कोणी गृह्याग्निरहित असतील त्यांनी, आणि माता आधी मरण पावून मागाहून ज्याचा बाप मरण पावला असेल त्याने म्हणजे मृतमातापितृकांनी नऊ देवतांच्या उद्देशाने पाणिहोमादि विधीने करावे. आई मेली असून, बाप जिवंत असता जरी अनुपनीतता असली, तरी- आई, आजी व पणजी- त्रयीच्या उद्देशाने एकपार्वणरूप पुरूरवर्द्रदेवसहित सपिंडक श्राद्ध करावे. स्वतःची आई जिवंत असून सावत्र आई मेलेली असल्यास, सापत्न मातृत्रयीच्या उद्देशाने करावे. स्वतःची आई आणि सावत्र आई अशा दोघीही मेलेल्या असल्यास द्विवचनप्रयोगाने, सापत्न माता जर अनेक असतील, तर स्वमातेसह बहुवचनप्रयोगाने एका ब्राह्मणाला एकच क्षण द्यावा आणि अर्घ्य व पिंडही एकेकच द्यावा. पितामही व प्रपितामही यांच्या श्राद्धांना दोन ब्राह्मण व दोन पिंड द्यावे- असे पार्वण आवश्यक आहे. माता जर अनेक असतील तर तितके ब्राह्मण व तितके पिंड द्यावे असेही कोणी ग्रंथकार म्हणतात. स्वमाता व सापत्न माता जर जिवंत असतील, तर गृह्याग्नीने रहित व ज्याचा बाप मेला आहे अशानेही करू नये. कारण, अन्वश्टक्य श्राद्धामध्ये मातृयजन हेच मुख्य असल्याने, त्या ठिकाणी मातृपार्वणच आधी करावे असे काही ग्रंथकारांनी सांगितले आहे असे वाटते. बाप मेल्यानंतर जर आई मेली असेल तर गृह्याग्नीने युक्त असणारांनी या नवमीला अन्वष्टक्य श्राद्ध अवश्य करावे. कारण, ते नित्य आहे. गृह्याग्निरहित असे जे कोणी असतील, त्यांची माता पित्याच्या निधनानंतर जर मृत झाली असेल, तर त्यांना हे श्राद्ध आवश्यक नाही. बापाच्या आधी मेलेल्या आईच्या श्राद्धाचा, बापाच्या मरणानंतर लोप होतो, हे वचन प्रमाण मानुन कोणी नवमीचे श्राद्ध पितृमृत्यूनंतर करीत नाहीत. भर्त्याबरोबर सती गेलेल्या मातामही, भगिनी, कन्या, मातृष्वसा इत्यादि जर निपुत्रिका असतील तर व पिता आणि माता यांच्या कुलात उत्पन्न झालेल्या इतरही सर्व सौभाग्यवती सतींचे श्राद्ध या नवमी तिथीलाच करावे. नवर्‍याच्या आधी मेलेल्या स्त्रियांचे श्राद्ध भर्तृनिधनानंतर करू नये, म्हणूनच ही अविधवा नवमी या नावाने प्रसिद्ध आहे. याकरिता पत्नीचे देखील नवमीश्राद्ध करावे. या अविधवानवमीचे श्राद्धाचा महालयाप्रमाणेच वृश्चिक राशीमध्ये सूर्य प्रवेस करीपर्यंत गौणकाल आहे. याप्रमाणे दौहित्रप्रतिपदेच्या श्राद्धाचाही वृश्चिक राशीला सूर्य जाईपर्यंत गौणकाल आहे असे कालतत्त्वविवेचन ग्रंथात सांगितले आहे. या अविधवानवमी श्राद्धाचे ठिकाणी आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्धादिकांचे ठिकाणी सुवासिनीभोजन देखील द्यावे. ‘भर्त्याचे अगोदर मरण पावलेली स्त्री व भर्त्यासह सती गेलेली स्त्री यांचे उद्देशाने त्यांचे श्राद्धामध्ये ब्राह्मण व सुवासिनी यांना भोजन घालावे इत्यादि मार्कंडेयाचे वचन आहे. या नवमीचे दिवशी जीवत्पितृकांनी अथवा गर्भिणीपतींनींही पिंडदान करावे. नवमीश्राद्धाचा असंभव असेल तर 
‘ममान्वष्टक्याकरणजनितप्रत्यवायपरिहारार्थ शतवारं’ एभिर्द्युभिः सुमना०’ इति मंत्रजपं करिष्ये’
असा संकल्प करून त्या मंत्राचा जप करावा. अन्वष्टक्य श्राद्धामध्ये सामवेदी यांनी पितृपार्वणमात्र करावे; मातृपार्वण व मातामहपार्वण ही करू नयेत असे निर्णयसिंधूमध्ये सांगितले आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय भाग ६
त्रयोदशी निर्णय

मघानक्षत्राने युक्त अथवा केवल त्रयोदशीचे दिवशी श्राद्ध नित्य आहे. केवल मघानक्षत्रीही श्राद्ध करावे. या श्राद्धविधीसंबंधाने बहुत ग्रंथात बहुत पक्ष आहेत. अपुत्र अथवा पुत्रवान अशा गृहस्थाश्रमी याने सपत्नीक पितृपार्वण व मातामहपार्वण यांसह चुलता, भ्राता, मामा, आत्या, मावशी, भगिनी, श्वशुर इत्यादिकांच्या पार्वणासह पिंडरहित असे सांकल्पविधीने श्राद्ध करावे. अथवा पिता व माता यांची दोन पार्वणे आणि महालयाप्रमाणे पितृव्य इत्यादि एकोद्दिष्ट गणांचे उद्देशाने सांकल्पविधीने श्राद्ध करावे. अथवा दर्शश्राद्धाप्रमाणे सहा देवतांचे उद्देशाने अपिंडक श्राद्ध करावे. अथवा निष्काव व पुत्रवान अशाने श्राद्धविधीने श्राद्ध करू नये, पण पितृत्रयी व मातृत्रयी अशी दोन पार्वणे केवल पितृव्य इत्यादिकांसहित उद्देशून
“एतेषां तृप्त्यर्थं ब्राह्मणभोजनं करिष्ये”
 असा संकल्प करून “पितृरूपिणे ब्राह्मणाय गन्धं समर्पयामि”
 इत्यादि पंचोपचार समर्पण करून उच्चार करून “ब्रह्मार्पण” 
इत्यादि पाठ म्हणून 
“अनेन ब्राह्मणभोजनेन पित्रादिरूपीश्वरः प्रीयताम्”
 असा उच्चार करून अन्नाचे उत्सर्जन करावे व खीर इत्यादि मधुर अन्नाने ब्राह्मणांना भोजन घालावे. दक्षिणा वगैरे देऊन त्यांचा संतोष केल्यानंतर स्वतः भोजन करावे, इतकाच प्रयोग करावा. अपुत्रिक व सकाम अशा गृहस्थाने पिंडदानरहित अशा श्राद्धविधीने श्राद्ध केले असता दोष नाही. अपुत्रिकाने पिंडदानही करावे असे क्वचित ग्रंथांमध्ये सांगितले आहे. या सांगितलेल्या पक्षांपैकी एका पक्षाचा आश्रय करून मघात्रयोदशी श्राद्ध अवश्य करावे. कारण न केल्यास दोष सांगितला आहे, करिता हे श्राद्ध नित्य आहे. हस्तनक्षत्री सूर्य असता मघायुक्त त्रयोदशी आल्यास तिला गजच्छाया असे नाव आहे. या दिवशी श्राद्ध केले असता पुष्कळ फळ मिळते. या दिवशी महालय युगादि येतील तर
“मघात्रयोदशीमहालययुगादिश्राद्धानि तन्त्रेण करिष्ये”
 असा संकल्प करून सर्व श्राद्धे तंत्राने करावी. दर्शश्राद्धाने नित्य श्राद्धासारखी कोणत्याही श्राद्धाची प्रसंगसिद्धि होत नाहि. याविषयी मला असे वाटते- अंगभूत कर्मे एक असून प्रधानकर्मामध्ये भेद असणे याचे नाव तंत्र. विश्वेदेव, पाक इत्यादि अंगे सर्वांची एक आहेत करिता ब्राह्मण, अर्घ्य,पिंड इत्यादि अपरपक्षीय आहे म्हणून या ठिकाणी धूरिलोचनसंज्ञक विश्वेदेव घ्यावे असे श्राद्धसागरग्रंथामध्ये सांगितले आहे. एकत्र राहणार्‍या भ्रात्यांनी मघात्रयोदशी श्राद्ध प्रत्येकाने निराळे करावे असे निर्णयसिण्धु, कौस्तुभ इत्यादि ग्रंथात सांगितले आहे. विभक्त असले तथापि हे श्राद्ध सर्वांनी एकत्र करावे असे श्राद्धसागरग्रंथामध्ये सांगितले आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय भाग ७
चतुर्दशीश्राद्ध

बाप, आजा आणि पणजा यांपैकी कोणी जर शस्त्र, विष, अग्नि, जल, शिंगाचे प्राणी, वाघ, सर्प, विद्युत्पात वगैरे निमित्तांच्या दुर्मरणांपैकी कशानेही मरण पावला असेल, तर एकोद्दिष्टविधीने श्राद्ध करावे. बाप व आजा यांचे मृत्यु जर शस्त्रादिकांनी झाले असतील तर दोन एकोद्दिष्टे करावीत. तिघेही शस्त्रादिकांनी मृत्यु पावले असल्यास पार्वणच करावे. तीन एकोद्दिष्टे करावीत, असेही काही ग्रंथकारांचे मत आहे. सहगमन, प्रयाग वगैरे ठिकाणि विधिप्राप्त असे अग्नि, जल वगैरेपासून जर मृत्यु आला असेल तर चतुर्दशीश्राद्ध करू नये. प्रायोपवेशन म्हणजे जे उपवास करून स्वेच्छेने मरण पावणे ते, आणि युद्ध यांनी जर विधिप्राप्त मृत्यु आला असेल तर चतुर्दशीश्राद्ध करावे. या श्राद्धाने निपुत्रिक चुलता, भाऊ वगैरेंचे देखील एकोद्दिष्ट करावे हे श्राद्ध धूरिलोचन नावाच्या विश्वेदेवांसह करावे. संबंध, गोत्र नाव इत्यादिकांचा उच्चार करून,
‘अमुकनिमित्तेन मृतस्य चतुर्दशीनिमित्तमेकोद्दिष्टंश्राद्धं सदैवं सपिंडं करिष्ये’
असा संकल्प करावा आणि प्रत्येक उद्दिष्टाला एक अर्घ्य, एक पवित्रक व एक पिंड यांनी युक्त असे श्राद्ध करावे. पित्रादि अथवा भ्रात्रादि यांपैकी जर कोणी शस्त्रापासून मृत झाला असेल, तर महालयाप्रमाणे निराळा पाक करून, अथवा सहतंत्राने दोन एकोद्दिष्टे करावीत. याप्रमाणे चतुर्दशीच्या दिवशी एकोद्दिष्ट करून बाप वगैरे सर्व पितृगणांच्या उद्देशाने इतर तिथीचे दिवशी सकृन्महालय अवश्य करावा. या चतुर्दशीच्या दिवशी शस्त्रादिकांपासून मृत झालेल्या मातापितरांचा जर मृत्युदिन असेल, तर चतुर्दशीश्राद्धानिमित्त एकोद्दिष्ट करून त्याच दिवशी पुन्हा मृताच्या त्रयीच्या उद्देशाने सांवत्सरिक श्राद्ध पार्वणविधीने करावे असे श्राद्धसागरग्रंथात सांगितले आहे. सांवत्सरिक श्राद्धाच्या पार्वणानेच चतुर्दशीश्राद्धाची सिद्धी होते, ते निराळे करायला नको, असे कौस्तुभ वगैरे ग्रंथातून सांगितले आहे. इतर दिवशी सकृन्महालय करावा. या चतुर्दशीश्राद्धाला काही विघ्न आल्यास, याच पक्षात अथवापुढील पक्षात इतर कोणत्या तरी दिवशी, हे श्राद्ध पार्वणविधीनेच करावे, एकोद्दिष्ट करू नये. या श्राद्धाच्या एकोद्दिष्टाविषयी अपराह्णव्यापिनी चतुर्दशीच घ्यावी. इतर एकोद्दिष्टांप्रमाणे मध्याह्नव्यापिनी तिथि घेऊ नये, असे कौस्तुभात सांगितले आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय भाग ८
दौहित्रनिर्णय

सूर्य हस्तनक्षत्री असता, चंद्र हस्तनक्षत्राने युक्त अशा अमावास्येला गजच्छाया असे नाव आहे. या दिवशी श्राद्धदानादि कर्मे करावीत. याप्रमाणे, अमावास्येच्या दिवशी गजच्छायापर्वणिचा निर्णय सांगितला. आश्विन शुद्ध प्रतिपदेला दौहित्राने म्हणजे मुलीच्या मुलाने, त्याचे जरी उपनयन (मुंज) झाले नसले, तरीही मातुल (मामा) जिवंत असतानाही सपत्नीक मातामहाचे (आईच्या बापाचे) पार्वणश्राद्ध अवश्य करावे. आईची आई जर जिवंत असेल, तर फक्त मातामहपार्वण करावे. हे श्राद्ध ज्याचा बाप जिवंत आहे अशानेच करावे. हे सपिंडक अथवा अपिंडक केले तरी चालते. या श्राद्धाला पुरूरवार्द्रनावाचे विश्वेदेव घ्यावेत. कोणी ग्रंथकार धूरिलोचन घ्यावेत असेही म्हणतात. ही प्रतिपदा अपराह्णव्यापिनी घ्यावी असे अनेक ग्रंथकारांचे म्हणणे आहे. संगवकालव्यापिनी घ्यावी असेहि काही ग्रंथकारांचे मत आहे. या श्राद्धाचा गौण काल, सूर्य वृश्चिकराशीला जाईपर्यंत आहे, असे कालतत्वविवेचन नावाच्या ग्रंथात सांगितले आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय भाग १०
श्राद्धादिकांचे अधिकारी निर्णय

सांवत्सरिकादिक श्राद्धें व दहन इत्यादिक और्ध्वदेहिक क्रिया कर्तव्य असतां औरस पुत्र मुख्य अधिकारी; औरस पुत्र बहुत असतील तर ज्येष्ठ पुत्रच अधिकारी. ज्येष्ठ पुत्राचा अभाव असेल, तो सन्निध नसेल किंवा पातित्यादि करणानें त्यास अधिकार नसेल, तर ज्येष्ठाहून कनिष्ठ अधिकारी समजावा. ज्येष्ठ पुत्र सन्निध नसतां सर्वत्र कनिष्ठ पुत्रच अधिकारी. मध्यम अधिकारी नाहींत असे जे म्हणतात तें निर्मूल आहे. पुत्र विभक्त असतील तर कनिष्ठापासून धन घेऊन ज्येष्ठ पुत्रानेंच सपिंडीकरणापर्यंत क्रिया करावी. सांवत्सरिकादि श्राद्ध निरनिराळें करावें. अविभक्तपणा असेल तर सांवत्सरिकादिक श्राद्ध एकानेंच करावें. एकानें केलें असतांही सर्व फलभागी होतात. म्हणून सर्व पुत्रांनीं ब्रह्मचर्य, परान्नवर्जन इत्यादि नियम धारण करावेत. पुत्र एकाच देशांत राहात नसतील व देशांतरीं किंवा दुसर्‍या घरीं राहातील तर त्या अविभक्तांनीं निराळेंच वार्षिकादिक श्राद्ध करावें. ज्येष्ठ सन्निध नसल्यामुळें कनिष्ठानें दहन इत्यादिक केलें असल्यास कनिष्ठानें षोडश श्राद्धापर्यंतच क्रिया करावी. सपिंडीकरण करुं नये. एक वर्षपर्यंत ज्येष्ठ भ्रात्याची वाट पहावी. एक वर्षाचे आंत ज्ञात झाल्यास ज्येष्ठानेंच सपिंडी करावी. तसें नसेल तर वर्षांतीं कनिष्ठानेंही करावी. वर्षाच्या पूर्वी पुत्रावांचून इतरानें मासिक, अनुमासिक इत्यादि क्रिया केली असली तरी पुत्रानें ती पुनः करावी. याचप्रमाणें कनिष्ठ पुत्रानें केली असली तरी ज्येष्ठ पुत्रानें पुनः करावी. 
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महालय भाग ९
सपिंडक मातामह श्राद्ध

जीवत्पितृकदौहित्र्यानें आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशीं सपिंडक मातामह श्राद्ध करावें. तसेंच भ्रात्याच्या पुत्रानें पुत्रहीन चुलत्याचे सपिंडक प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावें. त्याप्रमाणें कनिष्ठ भ्रात्यानींही पुत्ररहित ज्येष्ठ भ्रात्याचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावें. सवतीच्या पुत्रानें सापत्‍न मातेचें श्राद्ध करावें. दौहित्रानें पुत्ररहित मातामहाचें प्रतिसांवस्तरिक श्राद्ध करावें. याप्रमाणें पितृव्यादिक चार श्राद्धें करण्याविषयीं जीवत्पितृकांसही अधिकार आहे. पुत्ररहित पितृव्य, भ्राता इत्यादिकाची स्त्री असेल तर तीच श्राद्धास अधिकारिणी आहे. भ्रातृपुत्रादिकांस श्राद्धाधिकार नाही. याप्रमाणें पुत्र नसेल तर पतीनेंच स्त्रियेचें श्राद्ध करावें. सवतीचा पुत्र असेल तर त्यानेंच श्राद्ध करावें. पतीने करुं नये. दौहित्र व भ्रात्याचा पुत्र असतां मृत झालेला विभक्त असेल तर दौहित्रच अधिकारि. विभक्त नसल्यास भ्रात्याचा पुत्र अधिकारी. भ्राता व भ्रातृपुत्र हे दोघेही असतां भ्रात्यानेंच श्राद्ध करावें, असें कित्येक ग्रंथकार म्हणतात. जीवत्पितृकांस पिता, पितामह इत्यादि मनुष्यपतिरांचे तर्पणास निषेध असला तरी अग्निष्वात्तादिक देवऋषि पितरांचे तर्पणास निषेध नसल्यामुळें स्नानांगतर्पण व ब्रह्मयज्ञांगभूत देवऋषि पितृतर्पण याविषयीं अधिकार आहे. याप्रमाणें ज्याचें श्राद्ध करण्याचा अधिकार आहे, त्याचें श्राद्धांगतर्पण करण्याविषयींही अधिकार आहे. यम व भीष्म यांचें तर्पण जीवत्पितृकांनींही करावें. जीवत्पितृकानें श्राद्धांगतर्पणाहून इतर तर्पण तिलांनीं करुं नये व श्राद्ध प्रयोगामध्यें वामजानूखालीं करुं नये व वस्त्राचा नीवीबंधही करुं नये. नदीत्यादिकांत स्नान करुन तर्पण केल्यावर समंत्रक वस्त्र निर्बाडन करुं नये. तसेंच खडग मौक्तिक हस्तांत धारण करुन पितृतर्पण करावें. या वचनानें प्राप्त असलेलें खडग धारण करुं नये. द्विजाग्र्यांनीं पित्र्यकर्माचे वेळीं अपसव्य करावें असें सांगितलें आहे. म्हणून जीवत्पितृकानें प्रकोष्ठापर्यंत म्हणजे कोपराच्या खालच्या भागापर्यंत अपसव्य करावें. पिता संन्यासी इत्यादि स्वरुप जिवंत असतां व ज्याची माता व मातामह मृत आहेत अशा पुत्रानेंही “पितुः पितृ पितामह प्रपितामहानाम्‌ ” ही तीन पार्वणें एकोद्दिष्टगण आपल्या मातेचा उच्चार ’पितुःपत्‍न्याः’ असा, आपल्या पितृव्याचा उच्चार ’पितुर्‌भ्रातुः’ असा व आपल्या मातामहाचा उच्चार ’पितुः श्वशुरस्य’ इत्यादि पितृसंबंध पुरस्कारें करुन उद्देश करुन महालय श्राद्ध करावें. याचप्रमाणें दर्शादि श्राद्धाविषय़ीं जाणावें. पिता संन्यासी नसला तरीही जीवत्पितृकानें तीर्थ श्राद्ध करणें तें असेंच करावें. नांदीश्राद्धाविषयींही असाच निर्णय जाणावा. ब्रह्मयज्ञाच्या अंतीं नित्य पितृतर्पण करावयाचें तें ज्याचा पिता संन्यासी इत्यादि स्वरुप असा जिवंत आहे त्यानेंही तें असेंच करावें असें म्हणतात.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

धर्मशास्र
तर्पण

देवांचें तर्पण सव्यानें, देवतीर्थानें (अंगुलीच्या अग्रांनीं) व दर्भाच्या अग्रांनीं करावें. अक्षतायुक्त उदकानें देवर्पीचें तर्पण करावें. तिलयुक्त उदकानें आचार्य व पितर यांचें तर्पण करावें. देवांचें तर्पण असें —–
“प्रजापतिस्तृप्यन्तु १ ब्रह्मा० तृप्य० २ वेदास्तृप्यन्तु ३ देवास्तृप्यन्तु ४ ऋषयस्तृप्यन्तु ५ सर्वाणि छन्दांसि तृप्यन्तु ६ ॐकारस्तृप्य० ७ वषट्कारस्तृप्य०८ व्याहृतयस्तृप्यं ९ सावित्री तृप्य० १० यज्ञास्तृप्यं० ११ द्यावापृथिवी तृप्यतां १२ अंतरिक्षं तृप्यं० १३ अहोरात्राणि तृप्यन्तु १४ सांख्यास्तृप्यं० १५ सिद्धास्तृप्यं० १६ समुद्रास्तृप्यं० १७ नद्यस्तृप्यं० १८ गिरयस्तृप्यं १९ क्षेत्रौषधिवनस्पतिगंधर्वाप्सरसस्तृप्यं० २० नागास्तृप्यं० २१ वयांसि तृप्यं० २२ गावस्तृप्यं० २३ साध्यास्तृप्यं२४ विप्रास्तृप्यं० २५ यक्षास्तृप्यं० २६ रक्षांसि तृप्यं० २७ भूतानि तृप्यं० २८ एवमन्तानि तृप्यन्तु २९. “
ऋषींचें तर्पण निवीती (गळ्यामध्यें सरळ यज्ञोपवीत) करुन कनिष्ठिकेच्या मूलानें दर्भांच्या मध्यभागांनीं करावें. तें असें —
“शतर्चिनस्तृप्यं० माध्यमास्तृप्यं० गृत्समदस्तृप्यं० विश्वामित्रस्तृप्यं० वामदेवस्तृप्य० अत्रिस्तृप्य० भरद्वाजस्तृप्य० वसिष्ठस्तृप्य० प्रगाथास्तृप्यं० पावमान्यस्तृप्यं० क्षुद्रसूक्तास्तृप्यं० महासूक्तास्तृप्यं० १२”
एकवचन, द्विवचन अथवा बहुवचन जसें असेल त्याप्रमाणें तृप्यतु, तृप्यतां, तृप्यन्तु इत्यादि उच्चार करावा. नंतर प्राचीनावीती करुन पितृतीर्थानें द्विगुणित केलेल्या दर्भाच्या मूलाग्रांनीं पितृतर्पण करावें. तें असें —-
सुमन्तु जैमिनी वैशंपायन पैलसूत्र भाष्य भारत महाभारत धर्माचार्यास्तृप्यन्तु १ जानन्तिबाहविगार्ग्य गौतमशाकल्य बाभ्रव्यमाण्डव्यमाण्डूकेयास्तृप्यन्तु २ गर्गी वाचक्रवी तृप्य० ३ वडवा प्रातीथेयी तृप्य० ४ सुलभामैत्रेयी तृप्य० ५ कहोळं तर्पयामि ६ कौषीतकं त० ७ महाकौषीतकं त० ८ पैङ्ग्यं त० ९ महा पैङ्ग्यं० १० सुयज्ञं तर्प० ११ सांख्यायनं त० १२ ऐतरेयं त० १३ महैतरेयं त० १४ शाकलं त० १५ बाष्कलं०१६ सुजातवक्त्रं त० १७ औदवाहिं त० १८ महौदवाहिं त० १९ सौजामिं त० २० शौनकं त० २१ आश्वलायनं त० २२ ये चान्ये आचार्यास्ते सर्वे तृप्यंन्तु २३”
नंतर मृतपितृक असेल त्यानें पितृत्रयी, मातृत्रयी, सपत्नीक मातामहत्रयी० पत्नी इत्यादि एकोद्दिष्ट गण इत्यादि महालय प्रकरणांमध्यें सांगितलेल्या सर्व मृतांच्या उद्देशानें तर्पण करावें. तर्पण करितांना संबंधाचा उच्चार प्रथम करुन नंतर नाम व गोत्र यांचा उच्चार करावा; आणि त्यानंतर रुप (वस्वादिरुप, वसुरुद्रादित्यस्वरुप, वसुरुप) इत्यादिकांचा उच्चार करावा. देवांना एकेक अंजलि, ऋषींना दोन दोन आणि पितरांना तीन तीन याप्रमाणें संख्याविशेष आश्वलायनांना वैकल्पिक आहे. कारण त्यांच्या सूत्राम्ध्यें संख्या सांगितली नाहीं. ज्यांच्या सूत्रामध्यें संख्या सांगितली आहे त्यांना नित्य आहे असें माधवाचें मत आहे. मातृत्रयीखेरीजकरुन इतर स्त्रियांना एक अंजलि द्यावा. इतकें विस्तारानें तर्पण करण्यास असमर्थ असेल त्यानें “आब्रह्मस्तंबपर्यन्तं देवर्षिपितृमानवाः । तृप्यन्तु पितरः सर्वे मातृमातामहादयः ॥ अतीतकुलकोटीनां सप्तद्वीप निवासिनाम् । आब्रह्मभुवनाल्लोकादिदमस्तु तिलोदकम् ॥”
याप्रमाणें तीन तीन वेळ उदक द्यावें. नंतर
“ये के चास्मत्कुले जाता अपुत्रा गोत्रिणो मृताः । ते गृह्नन्तु मया दत्तं वस्त्रनिष्पीडनोदकम् ॥”
याप्रमाणें परिधान केलेलें वस्त्र भूमीवर पिळून उदक द्यावें. याविषयीं आश्वलायनांनीं प्राचीनावीती करावी, इतरांनीं निवीती करावी. हें निप्पीडनोदक घरामध्यें निषिद्ध आहे. ब्रह्मयज्ञ गांवाच्या बाहेर उदकासन्निध करावा. गांवांत करणें असल्यास मनांत उच्चार करुन करावा. डावा हात लावलेल्या उजव्या हातानें अथवा अंजलीनें तर्पण करावें. तर्पण दर्भानें आच्छादिलेल्या स्थलीं करावें, उदकांत करुं नये; अथवा अंजलीणें तर्पण करावें. तर्पण दर्भानें आच्छादिलेल्या स्थलीं करावें, उदकांत करुं नये; अथवा एका पात्रामधून उदक घेऊन तें दुसर्या शुद्ध पात्रांत सोडावें. उदकानें भरलेल्या जमिनीच्या खाचेंत सोडावें, पण दर्भविरहित भूमीवर सोडूं नये. सुवर्ण, रौप्य, ताम्र, कांसें यांच्या पत्रांत सोडावें, मृत्तिकेच्या पात्रांत सोडूं नये. जर भूमि अशुद्ध असेल तर नदीच्या उदकामध्यें तर्पण करावें. अनामिकेमध्यें सुवर्ण, तर्जनीमध्यें रौप्य आणि कनिष्ठिकेमध्यें खडग हीं धारण केल्यानें मनुष्य शुचिर्भूत असतो. अंगुलीचें अग्र तें देवतीर्थ, अनामिका व कनिष्ठिका यांचें मूल तें कायतीर्थ (प्रजापतितीर्थ) अंगुष्ठ व तर्जनी यांचा मध्य तें पितृतीर्थ आणि अंगुष्ठाचें मूल तें ब्राह्म तीर्थ. बाहेर काढलेल्या उदकानें पितृतर्पण करणें असेल तर उदकामध्यें तिळांचें मिश्रण करावें. बाहेर उदक काढलेलें नसेल तर डाव्या हातामध्यें तीळ घ्यावे. तिलतर्पण गृहामध्यें निषिद्ध आहे. रविवार, शुक्रवार, सप्तमी, नन्दातिथि, कृत्तिका, मघा, भरणी, मन्वादि, युगादि यांचे ठिकाणीं पिंडदान, मृत्तिकास्नान व तिलतर्पण हीं करुं नयेत. पितरांच्या श्राद्धदिवशीं नित्यतर्पणाविषयीं तिल निषिद्ध आहेत. पर्वदिवशीं व निषिद्ध तिथि, वार यांचे ठिकाणींही तिलतर्पण करावें. विकिर, पिंडदान, तर्पण व स्नानकर्म हीं केल्यानंतर आचमन करुन ज्ञात्या माणसानें दर्भांचा त्याग करावा. दर्भांचा त्याग करण्याचा मंत्र —“येषां पिता न न भ्राता न पुत्रो नान्य गोत्रिणः । ते सर्वे तृप्तिमायान्तु मयोत्सृष्टैः कुशैस्तथा ॥”

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading