101.कुळी मराठा प्रकल्प, 96 KULI MARATHA PRAKALP

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हर… हर… महादेव….96 कुळी मराठा प्रकल्प. हा संपूर्ण 96 कुली मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांचा उज्वल इतिहास जपून त्यांच्या कुळाची संपूर्ण इतिहास त्यांच्या पर्यंत पोहोचविणे हा उद्देश आहे. 

प्रकल्प, अनुक्रमणिका.

प्रकल्पा, अनुक्रमणिका.

प्रकल्पाच्या निर्मितीचे कारण.

प्रकल्पाचे ध्येय व उद्दिष्ट.

प्रकल्पाला लागणारी साधनसामुग्री.

प्रकल्पाला लागणारा संभावित निधी.

प्रकल्पाला लागणारे मनुष्यबळ.

<><><><><><><><> हर… हर… महादेव…<><><><><><><><>

प्रकल्पाच्या निर्मितीचे कारण.

“96 कुळी मराठा” या प्रकल्पाची गरज भासण्याचे कारण असे की. जगातील सर्वात क्लीन कास्ट. म्हणजे सर्वात शुद्ध झी जात आहे. ही मराठ्यांची मानले गेले आहे. च्या संदर्भात. विकिपीडियावरसुद्धा. हि माहिती उपलब्ध आहे.

            एवढे सारे असूनही. मराठ्यांचे. आत्ताच्या काळामध्ये मराठा समाजाचे शेकडो नेते झाले व आहेत. अर्थात राजकारणी आहेत. वेगवेगळ्या कालखंडामध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्तानं मराठा समाजातील. नेते हे सत्तेच्या जवळ राहिलेली आहे.

असे असूनही. मराठ्यांचा इतिहास. गड किल्ल्याच्या पलीकडे आम्हाला जोपासता आला नाही. जसे गड आणि किल्ले. हे महत्वाचे आहेत. आणि त्यांचा इतिहास महत्त्वाचा आहे. नाना युद्ध, लढाया, यांच्या इतिहास जोपासला गेला आणि त्यांची चरित्रं सुद्धां जोपासला गेले. त्याबद्दल ज्यांनी हे केलं त्यांना विशेष धन्यवाद.

            परंतु आजच्या. 96 कुळी मराठा प्रकल्पाच एक वेगळं कारण. येथे मांडतो.

ते कारण म्हणजे. “96 कुळी मराठ्यांचे”
गोत्र,
देवक,
वंश,
मुख्यकुळ,
उपकुळ,
पोटकुळ,
कुळदेवता,
कुळदेवी,
लग्नामधल्या विविध परंपरा,
विजयशस्त्र,
कुळध्वज,
कुळनिशाण,
अश्व,
रंग,
छत्र,
सिंहासन,
गादी,
कुळ भाट,
कुळ हेळवी,
कुळ पुरुष,
 इत्यादी बद्दलची माहिती बरीचश्या कुळांना नाही, भारतात 96 कुळी मराठ्यांना नाही.

म्हणूनवरील जी माहिती आहे. ती जोपासन्याचे काम. व समाजापर्यंत पोचवण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करावयाचे आहे.

<><><><><><><><> हर… हर… महादेव…<><><><><><><><>

प्रकल्पाचे ध्येय व उद्दिष्ट.

  1. “या 96 कुळी मराठा” प्रकल्पाची वर जी माहिती दिली आहे. ती व संपूर्ण मराठा समाजातील मुख्यकुळ, उपकुळ, आणि पोटकुळ. यांची संपूर्ण माहिती गोळा करून. ती परत समाजापर्यंत पिढ्यानपिढ्या पोहचवणे.
  2. सध्या आमच्या संशोधनाप्रमाणे 6500, च्या आसपास. आडनांवे (उपनाम-Surname) उपलब्ध आहेत,  ती मराठा व कुणबी. अशी दोन्ही मिळूनचे आहेत.
  3. सध्या कुळांची माहिती उपलब्ध उपलब्ध असणारे आडनावे. फक्त चार हजाराच्या आसपास आहेत.
  4. ज्या कुळांची माहिती उपलब्ध आहे त्या फुलांना. अत्यल्प. फी भरून उपलब्ध करून देणे,  प्रसंगी ती जर मोफत देता आली. तर अजून चांगले.
  5. मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी, 96 कुळी मराठा, इत्यादी हे एकच आहेत का? वेगवेगळे याचे संशोधन. करून नक्की तसा शासन दरबारी निर्णय घेणे.
  6. आमच्या माहितीप्रमाणेतरी. मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत. परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की सर्वच. रेकॉर्डवर असलेले कुणबी हे मराठा नाहीत.

    कारण मुळात “कुणबी” हा शब्द जातीवाचक नाही.  व्यवसायवाचक आहे.  “कुणबी” शब्द म्हणजे शेती करणे, ज्याला आता अलीकडे. फार्मर आपण म्हणतो.

    परंतु फार्मर अनेक जातीमध्ये असू शकतात.

    “कुणबी” हा शब्द मराठा जातीशिवायही इतर लोकांचे रेकॉर्डवर ( कागदपत्री ) असण्याची दाट शक्यता आहे. परंतु त्या काळामध्ये या गोष्टीकडे फारसं महत्वाच्या दृष्टीने, पाहिले न गेल्यामुळे थोडासा. कागदपत्रामध्ये. बदल पाहायला मिळतो. अनेक मराठ्यांच्या कागदपत्रावर कुणबी आहे, परंतु त्यांचे संपूर्ण नाते मराठा समाजाशी आहेत.

    यातल्या काही मराठय़ांचे रेकॉर्डवर. (कागदपत्री) मराठा नोंद आहे व त्यांच्याच नातेवाईकांची नोंद कुणबी आहे. या सगळ्यावरून लक्षात येतं की मराठा आणि मराठा कुणबी हे एकच आहेत. यात संशय नाही.

    याची खात्री शासन दरबारी करून घेणे. आणि या सर्वांचा. माहिती (डेटा) आडनाव. याचा संग्रह करून तो ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही समाजापर्यंत पोचवणे.
  7. सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या अर्थात 2023 ला साडेचार कोटीच्या आसपास आहे. आणि संपूर्ण जगामध्ये. साधारण साडेसात कोटीच्या आसपास मराठा समाज लोकसंख्या उपलब्ध आहे.
     
  8. यातील अनेक मराठ्यांच्या. आडनावांची माहिती उपलब्ध नाही.
  9. अनेकांचे आडनाव काळाच्या ओघामध्ये बदल्या गेलेले आहेत. आणि त्यामुळे त्या सर्व आडनावांची. माहिती गोळा करून. ती पुन्हा समाजाला देणे.
  10. आपल्या कुळाचे गोत्र. देवक आणि लग्न परंपरा. जोपासण्यासाठी. उपायोजना करणे. यासाठी
  11. ऑनलाइन. संसाधनांची निर्मिती करणे,
  12. चार मोबाईल नंबर ऑनलाइन मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून देणे.
  13.  “96 कुळी मराठा प्रकल्पाची” माहिती करून देणारी वेबसाइट निर्माण करणे.
  14. “96 कुळी मराठा प्रकल्पाची” वा. त्या संबंधात संपूर्ण माहिती देणारी वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित. करण्यासाठीं. यूट्यूब चॅनलची निर्मिती करणे.
  15. व्हॉट्सअॅपवर? “96 कुळी मराठा प्रकल्पाची” माहिती देणारे ग्रुप तयार करणे.
  16. इन्स्टाग्राम व फेसबुक पेज निर्माण करणे. व त्याची कार्यकारिता वाढवणे.
  17. अधिकृत “96 कुळी मराठा आडनावांची नोंद”  घेणारी (ऑफिस) अर्थात कार्यालय निर्माण करणे,
  18. अधिकृत प्रत्येक जिल्ह्यात, व तालुक्यात अधिकारी “96 कुळी मराठा आडनावांची नोंद” नेमणे.
  19.  

प्रकल्पाला लागणारी साधनसामुग्री.

  1. चार लॅपटॉप,
  2. ऑनलाइन होस्टिंग
  3. “या 96 कुळी मराठा” ऑफिस टेबल.
  4. संगणक कक्ष.
  5. संशोधन कक्ष.
  6. ग्रंथालय व त्याला लागणारी साधनसामुग्री.
  7. जनसंपर्कासाठी चार मोबाईल नंबर.
  8. ऑफिस स्टॉप किमान सहा लोकांचा.
    1, प्रकल्प प्रमुख.
    2, जनसंपर्क अधिकारी.
    3, १ डेटा एंट्री ऑपरेटर.
    4, १ डेटा एंट्री ऑपरेटर.
    5, ऑनलाइन संशोधन अधिकारी.
    6, व्हिडिओ, ऑडिओ, रेकॉर्डिंग, एडिटिंग, प्रकाशक.

प्रकल्पाला लागणारा संभावित निधी.

सुरुवातीचा खर्च (एकदाच होणारा)

  1. ऑफिस फर्निचर ₹ 100,000 (1 लाख)
     ग्रंथालय ₹ ₹1,00,000 (1 लाख)
    चार लॅपटॉप ₹ 2,00,000 (२ लाख)
    चार मोबाईल ₹ 40,000
    मोबाईल ॲप बनविणे वार्षिक खर्चासह 30, 000/
    वेबसाईट बनविणे वार्षिक खर्चासह 50, 000/
    एकूण = 5,30,000 (पाच लाख तीस हजार)

मासिक खर्च

  1. ऑफिस भाडे ₹ 5000 महिना, १२ महिन्याचा, (60,000 वार्षिक)
  2. सहा लोकांचा पगार प्रत्येकी ₹ 10,000 ₹ महिना, (60,000)
  3. लाईट बिल ₹ 2000 मासिक (₹ 24,000 वार्षिक)
  4. ईतर खर्च 1000 रुपये

वार्षिक खर्च

  • व्हिडिओ रेकॉर्डिंग व एडिटिंग सॉफ्टवेअर ₹ 10,000,
  • वेबसाइट होस्टिंग वार्षिक ₹ 21,000.
  • चार मोबाईल सिमकार्ड वार्षिक रिचार्जसह ₹ 12,000 ₹.}
  • मोबाईल ॲप वार्षिक खर्चासह 12, 000/
  • एकूण खर्च
    सुरवातीचा 5,30,000/
    + वार्षिक खर्च 55,000/
    + मासिक खर्च ,1,45,000/ (१२ महिन्याचा)
    = 7,30,000/ (पहिल्या वर्षी)
     किमान एव्हढी रक्कम पहिल्या वर्षी प्रकल्प सुरुवात करण्यासाठी आपल्याला हवी आहे,

    यातील वेबसाइट, मोबाईल अॅप, यूट्यूब चॅनल, हे मागील अनेक वर्षापासून मी स्वतः चालवत आहे, परंतु आता मात्र व्याप वाढला कामही आणि लोकांचा प्रतिसाद वाढत आहे, त्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता असून चार लॅपटॉप अर्जंट हवे आहेत,

     कृपया ज्या 96 कुळी मराठ्यांना शक्य असेल त्यांनी कृपयानी तसे कळवावे. 9422938199

प्रकल्पाला लागणारे मनुष्यबळ.

प्रत्येक गावामध्ये 196 स्कूल 96 कुळी मराठा प्रकल्पाचा एक प्रतिनिधी असेल.
 प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी असेल.
जिल्ह्याचा एक प्रतिनिधी असेल.

प्रतिनिधींचे कर्तव्य
 जिल्हा प्रतिनिधींची कर्तव्य
 प्ले जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधींची नेमणूक करणे त्यांना त्यांची कर्तव्य समजावून सांगून त्यांच्याशी कायम संपर्क ठेवून तालुक्यातून येणारा डेटा मुख्य शाखेला पाठविणे मुख्य कार्यालयाला पाठवविणे.

तालुका प्रतिनिधीचे कर्तव्य

तालुका प्रतिनिधीने आपल्या तालुक्यातील संपूर्ण एकूण गावामध्ये किती गावात 96 कुळी मराठा कुणबी समाजासह राहतात त्याची नोंद ठेवणे व त्या त्या गावातील ग्राम प्रतिनिधींकडून त्यांची माहिती घेणे कुटुंबप्रमुख व कुटुंबातील सर्वांची माहिती अर्जाच्या माध्यमातून गोळा करणे वत यांची माहिती वंशावळी साठी वंशावळ निर्मितीसाठी कार्यालयाला पाठविणे वली माहिती 96 कुळी मराठाचीच आहे याची खात्री करणे.

ग्राम प्रतिनिधीचे कर्तव्य
 ग्राम प्रतिनिधीने आपल्या गावातील संपूर्ण 96 कुळी मराठा, कुणबी समाजासह जे असतील त्यांची ती माहिती उपलब्ध आहे ती त्यांच्या घरी जाऊन तयार करून त्यांचा वार्षिक फी प्रत्येकी प्रति व्यक्ती ₹10 याप्रमाणे गोळा करून ती कार्यालयाला पाठविणे पहिल्या वर्षी सुरुवातीला प्रथम नोंदणीचे प्रतिव्यक्ती ₹10 व नंतर दरवर्षी फक्त ₹1 याप्रमाणे जी गोळा करावी.

गावात 96 कुळी मराठा सेवा मंडळ स्थापन करावे या मंडळाचा प्रमुख ग्राम प्रतिनिधीने स्वत: न होता त्यासाठी गावातील इतर संबंधित कर्तव्यशील व्यक्तीची निवड ग्राम प्रतिनिधीने करायची आहे.

 ग्राम प्रतिनिधीला गावातील 96 कुळी मराठा सेवा मंडळ स्थापन करणे आणि बरखास्त करण्याचे अधिकार मुख्य कार्यालयाच्या सहमतीने असतील.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

2 Comments

  1. आपन मराठा mahasagh पासून किंवा कोणी मराठा नेत्या पासून मदत का घेत नाही. एकादी मराठा संघटनां ही आपली मदत करेल

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading