योग दर्शन 1, अष्टांग योग, पंचप्राण, पंच-उपप्राण, अष्टभाव, षड्चक्रे, संपूर्ण माहिती

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

पंच मुख्य प्राण, सविस्तरपणे माहिती

  पंचप्राण अष्टांग योग

आपल्या देहात पाच मुख्य प्राण व पाच उपप्राण असुन, प्रत्येक प्राणाचे कार्य भिन्न भिन्न आहे.

पाच मुख्य प्राण….

*१) प्राण  २) अपान  ३) व्यान  ४) उदान ५) समान
*१) प्राण* :- हा वायु हृदयात राहतो व श्वासोच्छवास करतो.
*२) अपान* :- हा वायु मोठया आतडयात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतो.
*३) व्यान* :- हा सर्व शरीरव्यापुन राहतो.
*४) उदान* :- हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो.
*५) समान* :- हा नाभी कमलात राहतो व सर्व नाडयांना अन्नरस पुरवितो.

————————-

पाच उपप्राण आहेत….

*१) नाग  २) कूर्म  ३) कृकल  ४) देवदत्त  ५) धनंजय
*१) नाग* :- हा वायु ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्वे बाहेर टाकतो.
*२) कृर्म* :- हा वायु पापण्यांची उघडझाप करतो.
*३) कृकल* :- हा वायु शिंक व खोकला निर्माण करतो
*४) देवदत्त* :- हा वायु जांभई निर्माण करतो.
*५) धनंजय* :- हा वायु मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातील पिशाच्चे शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतो.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल की. प्रेत जाळणे ही गोष्ट शास्त्रीयद्रुष्टया अतिशय चांगले आहे. कारण प्रेत जाळल्याने धनंजय वायू शरीरात अडकून राहत नाही व जीवात्म्याचीही मायेतून त्वरीत सुटका होते.

*सिद्धपुरुषांचे देह चिन्मय असतात*, त्यांचे देह पुरावेत व त्यावर समाधी बांधावी व त्या समाधीची पूजा करावी. अर्थात तेही सिद्धपुरुषाच्या इच्छेनुसार करावे.

प्राणायाम ध्यान धारणा, ईश्वरभक्ती, ईत्यादी साधनांनी आपल्या देहात असणारी *कुंडलिनी* व *षड्चक्रे* जागृत होतात व ध्यानामध्ये अतिशय दिव्य अनुभव येऊ लागतात.

षड्चक्रे

सर्व विश्वाला संचालित करणारी जी एक दिव्यमहतशक्ती ब्रह्मांडरूपाने स्थित आहे तीच पिंडरूपाने शरीरातमध्येही स्थित आहे. तिलाच ‘कुंडलिनी’ असेही म्हटले जाते. हरएक शरीरात ही शक्ती सुषुप्तावस्थेत असते. पण जेव्हा ती जागृत होते तेव्हा मानवाला ती महामानव बनवते. ही शक्ती शरीरात साडेतीन कुंडले अर्थात वेटोळ्यांसहीत मुलाधार चक्राच्या खालच्या भागात अधोमुख स्थित असते. मानवी शरीरात इडा , पिंगला व सुषुम्ना अशा तीन नाड्या असतात. पैकी इडा ही डावी नाडी (श्वासनलिका) तर पिंगला उजवी नाडी असते. सुषुम्ना ही ह्या दोन्हींच्या मध्ये स्थित असून ती अत्यंत सूक्ष्म असते. कुंडलिनी जेव्हा आसन, प्राणायाम,बंध, मुद्रा इ. च्या अभ्यासाने जागृत होते तेव्हा ती शरीरातील सहा योगचक्रांचे भेदन करते. ह्या चक्रांना योगात कमळ असे म्हणतात. ह्या कमळांच्या पाकळ्यांवर गण म्हणजेच वर्ण असतात.
आता ती चक्रे कोणती, त्यांच्या पाकळ्या किती, शरीरातील त्यांचे स्थान, त्यांच्या अधिष्ठात्री देवता आणि त्यांच्या जागृतीने प्राप्त होणाऱ्या शक्ती / सिद्धी कोणत्या हे बघूया-

षड्चक्रे
१) मुलाधार चक्र (pelvie plexus) २) स्वाधिष्ठान चक्र (Hypogastric plexux) ३) मणिपूर चक्र (Epigastric plexus)४) अनाहत चक्र (Cardiac plexus)५) विशुद्ध चक्र (Carotid plexus)६) आज्ञाचक्र (Medula plexus) हि नरदेेहातील षट्चक्रे होत.

*मूलाधारचक्र*:- मूलाधारचक्र जागृत झाल्यावर साधकाला मूलाधारचक्रामध्ये ऐरावताचे दर्शन होते. अथवा  ॐ काराचे दर्शन होते. हे चक्र जागृत झाल्यावर साधक विद्वान बनतो. कवी बनतो गद्य-पद्याची रचना त्याच्या कडून होतात. ह्या चक्राची अधिष्ठात्री देवता ‘गणेश’ असून हे चार पाकळ्यांचे कमळ आहे. ह्याच्या चारी पाकळ्यांवर अनुक्रमे वं, शं, षं आणि सं हे चार गण असतात. शरीरात हे चक्र गुदास्थानापासून दोन बोटे वरती आणि लिंगस्थानापासून दोन बोटे खाली स्थित असते. ह्या चक्राच्या जागृतीने मनुष्याला कवित्व करण्याची क्षमता प्राप्त होते. तसेच आरोग्य, आनंद, वाक्यदक्षता इ. गुण प्राप्त होतात. ह्या चक्राचे बीज ‘लं’ हे आहे. ह्याचा रंग गणपतीच्या शरीराप्रमाणे रक्तवर्ण आहे. कुण्डलिनी शक्तीचा आधार असल्याने यास ‘मुलाधार’ असे म्हणतात.

*स्वाधिष्ठानचक्र* :- स्वाधिष्ठानचक्र जागृत झाल्यावर ध्यानामध्ये एक मोठा देवमासा समुद्रात विहार करत आहे. असे दिसते. स्वाधिष्ठानचक्र ह्याचे स्थान मुलाधारचक्रापासून दोन बोटे वर असते. ह्या चक्राची अधिष्ठात्री देवता प्रजापती आहे. हे सहा पाकळ्यांचे कमळ आहे. ह्याच्या पाकळ्यांवर अनुक्रमे बं, भं, मं, यं, रं आणि लं हे गण असतात. ह्याचे बीज ‘बं’ आहे. ह्या चक्राच्या जागृतीने सृजन,पालन तसेच जीभेवर सरस्वती आरूढ होणे हे गुण प्राप्त होतात.

देवता *ब्रम्हदेव* असुन, येथे साधकांना ब्रम्हदेवाचे दर्शन घडते.

*मणिपुरचक्र* :- मणिपुरचक्र जागृत झाल्यानंतर एक मेंढा अंगावर चाल करून येत आहे. असे दिसते, मणिपुरचक्राची देवता *विष्णू* असुन, येथे साधकांना भगवान विष्णुंचे दर्शन घडते.हे चक्र शरीरात नाभीस्थानी स्थित असते. ह्याची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. हे दहा पाकळ्यांचे कमळ असून त्यावर अनुक्रमे डं, ढं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं आणि फं हे दहा गण असतात. ह्याचे बीज ‘रं’ आहे. ह्या चक्राच्या जागृतीने शरीरातील सर्व नाडीसमूहांचे ज्ञान प्राप्त होते. तसेच पचनशक्ती वाढून अजीर्ण दूर होते.

*अनाहतचक्र* :- अनाहतचक्र जागृत झाल्यानंतर दशविध नाद ऐकू येतात. या नादावरच नंतर अनुसंधान ठेवायचे असते. या चक्राची देवता *रूद्र (शंकर)* ही असुन, येथे साधकास साक्षात शंकराचे दर्शन घडते.ह्याचे स्थान हृदयाजवळ असते. ह्याची अधिष्ठात्री देवता ‘सदाशिव’ आहे. तत्वबीज ‘यं’ आहे. हे बारा पाकळ्यांचे कमळ असून त्यावर अनुक्रमे कं ,खं,गं,घं,ङं,चं,छं,जं,झं,ञं,टं आणि ठं हे गण असतात. ह्या चक्राच्या जागृतीने ‘ अनाहत ‘ ध्वनी ऐकू येतो. तसेच प्रेम करण्याची सिद्धी प्राप्त होते. कविता सुचणे हा सुद्धा ह्याच चक्राच्या जागृतीचा गुण आहे.

*विशुद्धचक्र* :- विशुद्धचक्र जागृत झाल्यावर आपल्या म्हणजेच स्वस्वरूपाचे दर्शन होते. या चक्राची देवता *जीवात्मा* म्हणजे आपण स्वताःच येथे आपल्याला आरशात प्रतिबिंब पाहिल्याप्रमाणे आपलेच रुप दिसते, तसेच काही लोकांना येथे निळ्या रंगाचा हत्ती दिसतो, अथवा निळा प्रकाश दिसतो.हे चक्र कंठात स्थित असते. ह्याची अधिष्ठात्री देवता वायु आहे. ह्याचे तत्वबीज ‘हं’ आहे. हे चक्र सोळा पाकळ्यांचे असून त्यावर अनुक्रमे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, लृ,लृ, ए, ऐ, ओ, औ, अं आणि अः हे सोळा गण असतात. ह्याच्या जागृतीने तहान- भुकेवर नियंत्रण प्राप्त होते. तसेच आरोग्य लाभते.

*आज्ञाचक्र* :- आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर *अर्धनारीश्वराचे* दर्शन होते. काही साधकांना *हंसाचे* दर्शन होते. आकाशात हंस विहार करतांना दिसतो. काही साधकांना येथे अनेक देव-देवतांचीही दर्शने होतात. व महत्वाचे म्हणजे आपल्या सदगुरूंचे दर्शन होते.हे चक्र कपाळी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थित असते. ह्याचे तत्वबीज ‘ओ३म्’ आहे. अधिष्ठात्री देवता विष्णू आहे. हे दोन पाकळ्यांचे कमळ असून त्यावर हं आणि क्षं हे दोन गण असतात. वरील सर्व चक्रांच्या जागृतीने जे फळ प्राप्त होते ते सर्व ह्या एका चक्राच्या जागृतीने प्राप्त होते. ह्या स्थानावर मन आणि प्राण स्थिर झाल्यावर समाधी लागते.

*सहस्त्रारचक्र* :- सहस्त्रारचक्र जागृत झाल्यानंतर साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. साधक जीवनमुक्त सिद्धपुरुष बनतो. येथे साधकाला *परमेश्वराचे दर्शन* होते. व तो परमेश्वराशी एकरूप *(शिवरूप)* होतो.ह्या सर्व चक्रांव्यतिरिक्त टाळूच्या वरती मस्तकात ‘ सहस्त्रार ‘चक्र असते. त्याची अधिष्ठात्री देवता ‘शिव’ आहे. हे हजार पाकळ्यांचे कमळ आहे. ह्याच्या पाकळ्यांवर ‘अ’ पासून ‘क्ष’ पर्यत सर्व गण असतात. ह्याचे तत्वबीज ‘विसर्ग (ः) ‘ आहे. कुंडलिनीचे ह्या चक्राशी तादात्म्य पावणे म्हणजेच ‘शिवाचे शक्तीशी मिलन’ होणे होय.

 अष्टभाव

भक्त किती वर्षे मार्ग मध्ये आहे.

त्याच्या जेष्ठतेवरून त्याचा भक्ती मार्गातील – प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत यावरून त्याच्यी अध्यात्मिक प्रगती ओळखली जाते….

१, प्रथमभाव-स्वेद :-

मंत्र ,स्तोत्र,जप करताना ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याच्यी  सेवा पूर्व जन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.

२, दुसरा भाव-कंप :-

या भावात पोहचवलावर भक्ताला शरीराला कंप सुटतो.शरीरात कंप जाणवते.

३,तिसरा भाव- रोमांच :-

स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेत तिसरा भावात समजवा.

४,चतुर्थ भाव- अश्रू :-

महाराजांचे आठवणीने ह्यूदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेकऱ्याची ह्यूदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकऱ्याकडून स्वामी काव्य ही निर्माण होते. खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. निदान एकच आसनवर बसून एका तासावर जप करायला हवा.अशी दीड वर्ष साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.

५,पंचम भाव -सत्वापत्ती :-

याभावात प्रवेश केल्यावर  अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. स्वामी मय होऊन जातो. पण सर्व सामान्य माणसे चवथा भावापर्यंत या जन्मात पोहचतात व पुढच्या जन्मात पुढचा अध्यात्मिक प्रवास सुरू होतो. 

६,षष्ट भाव-समाप्ती :-

या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख दु:ख मान अपमान निंदा स्तुती सर्व समान वाटु लागतात. अभिमान अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सतगुण वाढू लागतात.

७,सप्तम भाव- असंसक्ती :-

सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांची दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षटचकरे जागरूक होतात-इतरांच्या भूत भविष्य समजत, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरु दुर्लक्ष करतात साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते. व जन कल्याणाचे कार्य करावे.

८,अष्टमभाव-प्रलय :-

या भावात साधक ईश्वराशी एकरुप होतो.  सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात.


योग

योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योग हे वैदिक षड्दर्शनांमधील एक दर्शनसुद्धा आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांत दिसून येतात.

योग शब्दाचा अर्थ
योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे‌. पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ ‘जोडणे, एकत्र आणने, जुळवणे’ असा अनेक प्रकारे होतो.”

योगाचे प्रकार
भारतीय योग शास्त्रामध्ये पाच योग सांगितले आहेत –

ज्ञान योग — आत्मज्ञान, सद्गुरुनी दिलेल्या ज्ञानदृष्टीच्या आधारे आत्मतत्त्वाचे अखंड अनुसंधान आणि त्याखेरीज बाकी सारे अनात्म, क्षणभंगुर हे जाणून विवेकाने त्याचा त्याग करत जाण्याचा हा मार्ग आहे. या मार्गाला विहंगम मार्ग असेही म्हणतात.[१]
हठ योग — आसन आणि कुंडलिनी जागृति, प्राणवायूचा निरोध करून चित्तवृत्तीची एकाग्रता करणे इ. चा समवेश होतो.
कर्म योग — योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग) – राजा जनक आणि याज्ञवल्क्य हे निष्काम कर्मयोगाचे आदर्श पुरुष मानले जातात.
भक्ति योग — भजनं कुर्याम्-भजन करावे.
राजयोग — योगः चित्तवृत्तिनिरोधः (चित्तातील वृत्तींवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)
पूर्णयोग – श्रीअरविंद यांनी वरील योगमार्गांचा समन्वय करून, त्यात स्वानुभवाच्या आधारे भर घातली आणि पूर्णयोग या मार्गाचे प्रतिपादन केले. याला Integral Yoga असेही म्हणले जाते.
पतंजली आणि अष्टांग योग
पतंजलीने योगाचा अर्थ चित्तातील वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्याच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत: यालाच अष्टांग योग असे म्हणले जाते.

यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
नियम (स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता, आणि ईश्वराप्रती चिंतन) बाहेरचे अंग
योगासन / आसन – बाहेरचे अंग – सहज आणि स्थिर बसण्याची पद्धत
प्राणायाम बाहेरचे अंग – प्राणवायूच्या गतीचे नियमन
प्रत्याहार बाहेरचे अंग – इंद्रियनिवृत्ती
धारणा आतले/मानसिक अंग – एकाच विषयावर मन स्थिर ठेवणे.
ध्यान आतले/मानसिक अंग – अखंड चिंतन
समाधी आतले/मानसिक अंग – तद्रूपता, बाह्य जगाची विस्मृती [२]
योगश्चित्तवृत्ति निरोधः। या सूत्राचा अर्थ आहे – योग तो आहे, की जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो• चित्तवृत्तींच्या निरोधाने (दमनाने) नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे होय•

योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये – महाभारत, उपनिषद, पतञ्जलीचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात•

योगाचे महत्त्व

योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे• योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय• चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होऊ शकतात• व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे• योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनि आविष्कृत केले होते• महर्षि पतंजलिनी अष्टांग योगच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले•

अर्थ आणि परिभाषा
जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मीलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी ‘योगा’ संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे.

योग वैदिक/हिंदू तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनांमध्ये एक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे. तो एक ब्रह्मन्‌ मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे.

हिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकारपण आहेत, उदा० निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान).

योगावर पतञ्‍जलि मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलींच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते . याच अष्टांग पथा ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला.

ASHTANG YOG PANCHAPRAN UPAPRAN ASHTBHAV SHADCHAKRA1
ASHTANG YOG PANCHAPRAN UPAPRAN ASHTBHAV SHADCHAKRA1

अष्टांग योग Ashtang Yog

महर्षि पतंजलींनी योगाची व्याख्या ‘मनाच्या अंतःप्रेरणेचा संयम’ ( योगः चित्तवृत्तिनिरोधः ) अशी केली आहे. त्यांनी ‘योग सूत्र’ नावाचा योग सूत्रांचा संग्रह संकलित केला ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण आरोग्य आणि शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी अष्टांग योग (आठ अंगे असलेला योग) मार्ग तपशीलवार सांगितला. अष्टांग योग हा आठ स्वतंत्र चरणांचा मार्ग समजू नये; हा एक आठ-आयामी मार्ग आहे ज्यामध्ये सर्व आठ परिमाणांचा एकाच वेळी सराव केला जातो तसेच आठ आयमांचे पालन करायला हवे. अष्टांग योगाचे हे आठ भाग आहेत.;

  1. यम, 02. नियम, 03. आसन, 04. प्राणायाम, 05.प्रत्याहार, 06. धारणा 07. ध्यान 08. समाधि
    परिचय
    महर्षी पतंजलीच्या प्रमाणे, मनाच्या अंतःप्रेरणेवर नियंत्रण ठेवण्याचे नाव योग आहे. त्याच्या स्थितीसाठी आणि सिद्धीसाठी, काही उपाय आवश्यक आहेत ज्यांना ‘अंग’ म्हणतात आणि त्यांची संख्या आठ मानले जाते. अष्टांग योग अंतर्गत, पहिली पाच अंगे ( यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ) ‘बहिरंग’ म्हणून ओळखली जातात आणि उर्वरित तीन अंगे ( धारणा, ध्यान, समाधी ) ‘अंतरंग’ म्हणून ओळखली जातात. जेव्हा बाह्य साधना योग्य प्रकारे केली जाते तेव्हाच साधकाला आंतरिक साधनेचा अधिकार प्राप्त होतो. ‘यम’ आणि ‘नियम’ हे खरे तर नम्रता आणि तपश्चर्याचे प्रतीक आहेत.

यम म्हणजे संयम जो पाच प्रकारचा मानला जातो :
(१) अहिंसा, (२) सत्य, (३) अस्तेय (चोरी न करणे म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेची लालसा न बाळगणे), (४) ब्रह्मचर्य आणि (५) अपरिग्रह. त्याचप्रमाणे
पाच प्रकारचे नियम आहेत : शौच, तृप्ती, तपश्चर्या, स्वाध्याय (मोक्षशास्त्राचे पठण किंवा प्रणवचा जप) आणि ईश्वर प्रणिधान (सर्व कर्मांचे देवाला समर्पण).
आसन म्हणजे स्थैर्य आणि आनंद देणारे बसण्याचा प्रकार (स्थिर सुख्मासनम) जो शरीराच्या स्थिरतेचा सराव आहे.
प्राणायाम हे आसनांचा जप करताना श्वासोच्छ्वास आणि उच्छवासाच्या हालचाली बंद होण्याचे नाव आहे. बाहेरील हवा श्वास घेण्यास श्वासोच्छ्वास म्हणतात आणि अंतर्गत हवा बाहेर काढण्याला उच्छवास म्हणतात. प्राणायाम म्हणजे चैतन्य टिकवून ठेवण्याचा सराव. त्याच्या सरावाने जीवनात स्थिरता येते आणि साधक त्याच्या मनाच्या स्थिरतेकडे जातो. शेवटचे तीन भाग म्हणजे मानसिक स्थिरतेचा सराव. जीवनाची स्थिरता आणि मनाची स्थिरता या दरम्यानच्या अभ्यासाचे नाव ‘प्रत्याहार’ आहे. प्राणायामाने जेव्हा प्राण तुलनेने शांत होतो तेव्हा मनाची बाह्य भावना स्वाभाविकपणे कमी होते. याचा परिणाम असा होतो की इंद्रिये त्यांच्या बाह्य वस्तूंपासून दूर जातात आणि अंतर्मुख होतात. त्याचे नाव आहे प्रत्याहार (प्रति = प्रतिकूल, आहर = अंतःप्रेरणा).

आता मनाची बाह्यगती थांबते आणि ते अंतर्मुख आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नाच्या प्रारंभिक अवस्थेचे नाव आहे धारणा. शरीराच्या कोणत्याही भागावर (हृदय, नाकाच्या टोकावर) किंवा बाह्य वस्तूवर (जसे की देवतेची मूर्ती इ.) मन स्थिर करणे याला ‘धारणा’ (देशबंधश्चितस्य धारणा; योगसूत्र ३.१) म्हणतात. . ध्यान ही या पलीकडची स्थिती आहे. जेव्हा त्या विशिष्ट देशात उद्दिष्टाचे ज्ञान एकसारखे वाहते तेव्हा त्याला ‘ध्यान’ म्हणतात. ग्रहण आणि ध्यान या दोन्ही अवस्थांमध्ये अंतःप्रेरणेचा प्रवाह असतो, पण फरक असा आहे की धारणेत, विरुद्ध प्रवृत्ती देखील एका अंतःप्रेरणेतून निर्माण होतात, परंतु ध्यानात, केवळ समान प्रवृत्ती प्रवाहित होतात, भिन्न नसून. ध्यानाच्या परिपक्व अवस्थेला समाधी म्हणतात. आधाराच्या आकाराने मन तेजस्वी होते, त्याचे स्वरूप शून्य होते आणि केवळ आधारच प्रकाशमान होतो. याला समाधी अवस्था म्हणतात. शेवटच्या तीन भागांचे एकत्रित नाव ‘सायमा’ आहे, जे जिंकण्याचा परिणाम म्हणजे ज्ञान आणि कीर्तीचा प्रकाश किंवा प्रकाश. समाधीनंतर बुद्धी प्राप्त होते आणि हे योगाचे अंतिम ध्येय आहे.

योगाच्या अष्टांगांचा परिचय
यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोsष्टावङ्गानि ॥
यम
अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरग्रहाः यमा ॥

पाच सामाजिक नैतिकता

(1.) अहिंसा – अहिंसाप्रतिष्ठायांतत्सन्निधौ वैरत्याग: ॥ पातंजलयोगदर्शन 2/35॥
म्हणजेच जेव्हा योगी अहिंसेमध्ये स्थापित होतो तेव्हा तो वैरातून मुक्त होतो.
शब्द, विचार आणि कृतीतून कोणाचेही अनावश्यक नुकसान न करणे.

(2.) सत्य -सत्यप्रतिष्ठायां क्रियाफ़लाश्रययत्वम् ॥ पातंजलयोगदर्शन 2/36 ॥
म्हणजेच जेव्हा साधक सत्याशी प्रस्थापित होतो (विवादांचा अभाव स्थिर असतो) तेव्हा साधकाला कृती आणि त्यांचे परिणाम यांचा आश्रय मिळतो.

म्हणजेच जेव्हा साधक सत्याच्या आचरणात स्थिर होतो, तेव्हा त्याच्या कृतीचे चांगले फळ मिळते आणि या सत्य आचरणाचा परिणाम इतर प्राणिमात्रांवर होतो.

विचारांमध्ये सत्यता, अंतिम सत्यात स्थित राहणे, मनातील विचारांनुसार अस्सल गोष्टी बोलणे.

(3.) अस्तेय – अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् ।। पातंजलयोगदर्शन 2/37 ।।
म्हणजेच जेव्हा अस्तेय स्थापित होते तेव्हा सर्व रत्ने उपस्थित होतात.

अस्तेय म्हणजे चोरी करण्याची प्रवृत्ती नसणे.

(4.) ब्रह्मचर्य – ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभ: ।। पातंजलयोगदर्शन 2/ 38 ।।
म्हणजेच ब्रह्मचर्य प्रस्थापित झाल्यावर वीर्य (शक्ती) चा लाभ होतो.

ब्रह्मचर्याचे दोन अर्थ आहेत-

ब्रह्माच्या ज्ञानात चैतन्य स्थिर करणे
सर्व कामुक सुखांमध्ये संयम बाळगणे

(5.) अपरिग्रह – अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथन्तासंबोध :।। पातंजलयोगदर्शन 2/ 39।।
म्हणजेच जेव्हा अपरिग्रह स्थिर असतो, तेव्हा माणसाला (अनेक, वर्तमान आणि भविष्यकाळातील) जन्म आणि त्यांच्या प्रकारांची जाणीव होते.

अपरिग्रह म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त जमा न करणे आणि इतरांच्या गोष्टींची इच्छा न करणे.

नियम
शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा: ।। पातंजलयोगदर्शन 2/32 ।।

शौच, तृप्ती, तपश्चर्या, आत्मअध्ययन आणि भगवंताची भक्ती याला नियम म्हणतात.

पाच वैयक्तिक नैतिकता

(1) शौचा – शरीर आणि मनाचे शुद्धीकरण

(2) संतोष – समाधानी आणि आनंदी असणे

(3) तप – स्वयंशिस्त असणे

(4) स्वाध्याय – आत्मचिंतन

(5) ईश्वर-प्रणिधान – देवाप्रती पूर्ण समर्पण, पूर्ण श्रद्धा असावी.

आसन
योगासनातून शरीरावर नियंत्रण
आसन हा शरीरावर नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग आहे.
पतंजलीने स्थिर आणि आरामात बसण्याच्या कृतीला आसन म्हणले आहे ( स्थिरसुखमासनम ll46ll ). पतंजलीच्या योगसूत्रात आसनांच्या नावांचा उल्लेख नाही. पण नंतरच्या विचारवंतांनी अनेक आसनांची कल्पना केली आहे. खरं तर, आसन हा हठयोगाचा मुख्य विषय आहे. यासंबंधीचे तपशीलवार वर्णन ‘ हठयोगप्रदिपिका’, ‘ घेरंडा संहिता’ आणि ‘ योगशिखोपनिषद’ मध्ये आढळते.

प्राणायाम
तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेद: प्राणायाम: ।। पातंजलयोगदर्शन 2/49 ।।

प्राणायाम म्हणजे ते (आसन) पूर्ण झाल्यानंतर श्वासोच्छवासाची हालचाल थांबवणे.

प्राणायाम म्हणजे मज्जातंतूंच्या योग्य भूमिकेसाठी आणि योगाच्या योग्य भूमिकेसाठी त्यांचे प्रबोधन करण्यासाठी केले जाणारे श्वासोच्छवास आणि उच्छवासाचे नियमन. मनाची अस्वस्थता आणि चंचलता दूर करण्यासाठी प्राणायाम खूप उपयुक्त आहे.

प्रत्याहार
महर्षी पतंजलींच्या मते, इंद्रियांना अंतर्मुख करणे, मनाला त्रासदायक असलेल्या इंद्रियांच्या वस्तूंपासून दूर जाणे आणि एकाग्र चित्ताचे अनुकरण करणे म्हणजे प्रत्याहार होय. प्रत्याहाराने इंद्रिये नियंत्रणात राहून त्यांच्यावर पूर्ण विजय प्राप्त होतो. म्हणून जेव्हा मन संयम पावते तेव्हा इंद्रियांचाही संयम होतो, ज्याप्रमाणे राणी मधमाशी एका ठिकाणी थांबली की इतर मधमाशाही त्याच ठिकाणी थांबतात.

धारणा
लक्ष्य विषयावर मन एकाग्र करावे लागेल. एक विषय मनात ठेवण्यासाठी. मनाला एकाच विचाराशी बांधून ठेवण्याच्या प्रक्रियेला धारणा म्हणतात. पतंजलीच्या अष्टांग योगाचा हा सहावा भाग आहे. मागील पाच भागांना यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार असे म्हणतात, जे योगामध्ये बाह्य साधन मानले जातात. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे योगाचे आंतरिक भाग किंवा साधन आहेत असे म्हणले जाते. धारण हा शब्द ‘ध्री’ या मूळापासून बनला आहे. याचा अर्थ पकडणे, हाताळणे, धरून ठेवणे किंवा आधार देणे. योग दर्शनानुसार – “देशबंधश्चितस्य धारणा” (योगसूत्र ३/१) म्हणजेच धारणा म्हणजे मनाला एका विशिष्ट ठिकाणी (मनाच्या आत किंवा बाहेर) स्थिर करण्याचे नाव, म्हणजेच यम, नियम, आसन, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे. प्राणायाम आणि प्रत्याहार. ते वस्तूंमधून (स्वरूप, चव, गंध, आवाज आणि स्पर्श) काढून टाकले जाते आणि मनात स्थिर केले जाते. धारणा म्हणजे स्थिर आणि एकाग्र मनाला एका विशिष्ट ठिकाणी थांबवणे. प्रिन्स कुमार यांनी

ध्यान
ध्यान म्हणजे एका ठिकाणी किंवा वस्तूवर मनाची सतत एकाग्रता. वस्तूचा विचार करताना मन एकाग्र होते, त्याला ध्यान म्हणतात. पूर्ण ध्यानाच्या अवस्थेत, इतर कोणत्याही गोष्टीचे ज्ञान किंवा स्मृती मनात प्रवेश करत नाही. गौरव कुमार आर्य यांनी केले.

समाधी
ही मनाची अशी अवस्था आहे ज्यामध्ये मन वस्तुनिष्ठ वस्तूच्या चिंतनात पूर्णपणे गढून जाते. योग तत्त्वज्ञान समाधीद्वारेच मोक्षप्राप्ती शक्य मानते. समाधीचेही दोन वर्ग आहेत : सांप्रज्ञा आणि असमप्रज्ञा. संप्रज्ञा समाधीमध्ये पृथक्करण, चिंतन, आनंद आणि आत्मसात होणे यांचा समावेश होतो. असमप्रज्ञात सर्व सात्विक, राजसिक आणि तामसिक प्रवृत्ती रोखल्या जातात.

षडंग योग
षडंग योग – म्हणजे “सहा अंगांचा योग”. त्याचे वर्णन मैत्रायणी उपनिषदात आले आहे. हे सहा भाग आहेत – प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी.

प्राणायामस्तथा ध्यानं प्रत्याहारोsथ धारणा ।
तर्कश्चैत्र समाधिश्च षडङ्गो योग उच्यते ॥
त्यात अष्टांग योगातील यम, नियम आणि आसन यांना स्थान दिलेले नाही हे विशेष. त्यापेक्षा ‘वाद’ नावाचा एक अवयव त्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

धार्मिक महत्वाची माहिती

Granth Sagar

अभंग शेअर 📿 अभंग पाहण्यासाठी ॲप उघडा खालील बटनावर क्लिक करा 📲 ॲप उघडा ⬇️…

test 3

संपूर्ण काकड आरती MP3 हिंदू धर्म ज्ञान सेतू | Hierarchical Quiz Application धर्म सेतू निर्माता…

TEST 05

संपूर्ण काकड आरती MP3

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading