3 हनुमान जयंती उत्सव कसा साजरा करावा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हनुमान जयंती उत्सव कसा साजरा करावा
Hanuman Janma Utsav Kasa Sajra karawa
Hanuman Janmache Abhang

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*दरवर्षी सकाळी पहाटे सूर्योदयेच्या वेळी श्रीराम भक्त हनुमंताचा जन्म उत्सव “हनुमान जयंती” उत्सव संपूर्ण देशात आणि काही परदेशात साजरा केला जातो.

हनुमंताचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा ११ वा रुद्र अवतार आहे.
*महाप्रतापी, शक्तिदेता आणि दासभक्तिप्रेरकही! या उपाधी लावून ज्या रामसेवक हनुमंताची आजही निस्सिम भावनेने पूजा-आराधना केली जाते ते दैवत म्हणजे हनुमंतरायआहेत.

*, भक्ती, शक्ती, युक्ती आणि त्याग ही चारही महामूल्ये मारुतीरायाच्या ठायी एकवटली आहेत. आजच्या काळासहित कायमच सर्वांनाच आदर्श वाटावे असे हे दैवतआहे.
*श्रीसंत तुकाराम महाराज हे प्रभू श्रीरामाच्या दासाला, अर्थात हनुमंतरायाला उद्देशून लिहितात….*
शरण शरण हनुमंता ।
तुम्हा आलो रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ॥२॥
शूर आणि धीर ।
स्वामी कार्या पै सादर ॥३॥
तुका म्हणे रुद्रा ।
अंजनिचीया कुमरा ॥४॥

काय कारण असेल बरं ! तुकाराम महाराजांनी हनुमंत रायाला शरण जावं? ज्यांनी समाजाला भक्तीच्या वाटा दाखवल्या, नैतिकतेचे धडे दिले, अध्यात्माची ओळख करून दिली, ज्यांनी समाज उन्नतीसाठी साडेचार हजारांहून अभंग लिहिले. ते तुकाराम महाराज हनुमंताला शरण जाऊन विचारतात की,”काय भक्तीच्या त्या वाटा ।मज दावा ह्या सुभटा ॥” असे हनुमंतरायामध्ये काय वेगळेपण होते? आणि का ! हनुमंतरायाच्या हृदयी राम आणि प्रभू रामाच्या हृदयी हनुमंतराय असे स्थान पटकावले म्हणून विचारतात?
त्याला कारणही तसेच आहे…
रावणाशी युद्ध करून परतल्यावर सीतामाईने हनुमंतरायाला अनमोल नवरत्नाचा हार सदिच्छा भेट म्हणून दिला आणि तो हार हनुमंतरायाने चक्क दाताने फोडून त्यात श्रीरामाचा शोध घेतला! हनुमंतरायाच्या अशा वागण्यावर नाराज होऊन सीतामाईने हनुमंतरायाला स्वतःच्या हृदयातला राम दाखवायला सांगितला, तेंव्हा हनुमंतरायाने हृदयसिंहासनावर विराजित झालेले संपूर्ण रामपंचायतन दाखविले. असे हनुमंतरायाचे भगवद्भक्तीचे प्रेम, वेड सर्वसामान्यांनाही कळावे, म्हणून तुकाराम महाराजांनी हनुमंताकडे या गोष्टींवर मार्गदर्शन मागितले!

हनुमंताच्या शक्तीला युक्तीची जोड होती. म्हणून त्याची शक्ती वेळोवेळी धर्मकार्यासाठी, संतसज्जनांच्या रक्षणासाठी वापरली गेली. त्यासंदर्भात हनुमंतरायाचे रामायणातले अनेक दाखले पाहायला मिळतात.
समुद्र पार करत असताना हनुमंतरायाला गिळंकृत करू पाहणाऱ्या राक्षसिणीसमोर हनुमंतराय सुक्ष्म रूप धारण करतात. तर कुंभकर्णाशी युद्धात चार हात करताना महाकाय रूप धारण करतात. आपली शक्ती कुठे, कशी वापरली पाहिजे याचा वस्तुपाठ ते घालून देतात. हनुमंताचे सामर्थ्य जाणून आणि त्याची भक्ती, प्रेम पाहून अनेक मोठ्या प्रसंगात रघुरायांनी हनुमंतरायाची वेळोवेळी मदत घेतली आहे.

हनुमंतराय बल-बुद्धी संपन्न होते. त्यांना मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्वज्ञान इ. विषयांचे सखोल ज्ञान होते. व्यायामाचे महत्त्व जाणून हनुमंतरायाने कमावलेले शरीर तरुणांसाठी आदर्श ठरावे, म्हणून समर्थ रामदासांनीदेखील गावोगावी हनुमंताची मंदिरे बांधली आणि त्याला लागूनच व्यायामशाळा सुरू केल्या. हनुमंतराय हे अकरावे रुद्रावतार! म्हणून शेवटी तुकाराम महाराज लिहितात……

तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥
हनुमंतरायाच्या ठायी असलेली निष्ठा हे गुण तुकोबारायांना दिसले आणि म्हणूनच ते हनुमंतरायाला शरण गेले. अशी निष्ठा आज कोणत्याही व्यक्तीची दुस-या कुणावरही राहिलेली नाही. म्हणून हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याची गरज आहे. केवळ कीर्तन, प्रवचन करून हा उत्सव साजरा करण्यातही अर्थ नाही आणि तो विसरून त्याकडे दुर्लक्ष करण्यातही उपयोग नाही. त्यासाठी हनुमंतरायाच्या ठायी असणा-या अनेकविध गुणांचा आपल्याला उपयोग करून घेण्याची गरज आहे.


संपूर्ण रामायणात श्रीराम भक्त हनुमंतरायाकडे शिकण्यासारखे एकच आहे ते म्हणजे त्यांची आपल्या स्वामीवर असलेली भक्ती व निष्ठा!! ती कशी असावी याचा उत्तम आदर्श !!
र्वारिष्टनिवारकं शुभकरं पिङ्गाक्षमक्षापहं ।
सीतान्वेषणतत्परं कपिवरं कोटीन्दुसूर्यप्रभम्।
लंकाद्वीपभयंकरं सकलदं सुग्रीवसम्मानितं ।
देवेन्द्रादिसमस्तदेवविनुतं काकुत्स्थदूतं भजे ॥१॥
ख्यातः श्रीरामदूतः पवनतनुभवः पिङ्गलाक्षः शिखावन् ।
सीताशोकापहारी दशमुखविजयी लक्ष्मणप्राणदाता।
आनेता भेषजाद्रेर्लवणजलनिधेः लङ्घने दीक्षितो यः ।
वीरश्रीमान् हनूमान्मम मनसि वसन्कार्यसिद्धुं तनोतु॥२॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां वरिष्ठम्।
वातत्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि ॥३
बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता।
अजाड्यं वाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणाद्भवेत् ॥४॥

म्हणून नमन……….
अतुलित बलधामं, हेमशैलाभदेहमं.
दनुजवनकृशानुं, ज्ञानिनामग्रगण्यम्.
सकलगुण निधानं, वानराणामधीशम्.
रघुपतिप्रिय भक्तं वातजातम् नमामि..


हनुमंतराय यांच्या जन्मासंबंधी थोडक्यात वर्णन पाहू!

भक्त हनुमंतराय कोणत्या दिवशी जन्माला आले.याबाबत भिन्न भिन्न मते आहेत. प्राचीन काळापासून वैदिक, तांत्रिक, पौराणिक, ललित सर्व प्रकारच्या वाङमयात हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा आहेत. वाल्मिकी रामायणानुसार हनुमान जन्माची कथा पुढील प्रमाणे सांगण्यात आली….

हनुमंतराय हे माता अंजनी व पिता केसरी यांचा पुत्र असून त्याची माता अंजना ही मूळची शापित अप्सरा होती. अत्यंत लावण्यवती असलेल्या या अप्सरेचे नाव पुंजिकस्थला' होते. एकदा एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे त्या ऋषींकडून 'तू वानरी होशील' असा शाप तीला मिळाला. तिने पुष्कळ विनवणी केल्यावर तिलाइच्छेनुसार वारी किंवा मानुषी रूप धारण करण्यास समर्थ होशील’ असा उ:शाप मिळाला. त्यामुळे ही अप्सरा कपियोनीत ‘कुंजर’ या वानराची मुलगी `अंजना’ म्हणून जन्माला आली.

पुढे अंजनाचा विवाह वानरराज केसरी यांच्याबरोबर झाला. एकदा सुमेरू पर्वतावर विहार करण्यासाठी वानरराज केसरी हा पत्नी अंजनीसह गेला असता तिथे मंदपणे वाहत असलेल्या वायूने तिचे अप्रतिम लावण्य पाहिले आणि तो काममोहित झाला. त्याने केसरीच्या शरीरात प्रवेश केला. यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला बालरवि उदयाला आला आणि त्यावेळी अंजनेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. मरुताचा पुत्र म्हणून बाळाचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. ते हनुमंतराय!!
वाल्मिकी रामायण’ हे सर्व रामायणात आद्य मानले जाते. यात हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख नाही. परंतु जन्मकथेचा उल्लेख तीन वेळेस आला आहे. यात हनुमंतरायाने जन्मानंतर पंधरा दिवसांनी सुर्वोदय झाल्या बरोबर सुर्य हे फळ समजून सूर्याचा ग्रास घेण्याचा यत्न केला असे वर्णन आहे. म्हणजेच हनुमंतरायाचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला अरणोदयेच्या वेळी झाला. असा निष्कर्श निघतो.

म्हणून रामसंस्कृतचे रक्षण करणा-या दास मारुतीची, हनुमंतरायाची आज तुम्हा – आम्हांला गरज आहे. समाज बलवान, सुसंस्कृत व्हावयास हवा. याची प्रेरणा घेण्यासाठी व आदर्श रामभक्तीचे स्मरण करण्यासाठी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करावयाचा असतो.

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ३ वाजता उठून संपूर्ण पुजेची तयारी करावी व ५ वाजता मंदिरात जाऊन मंदिर झाडून अगोदर हनुमान चालीसा स्तोत्रे इत्यादी म्हणावे व व नंतर मंदिरात राहून सुर्योदयाच्या वेळी सामुहिक हनुमंतरायाच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे. पुजनासाठी हया वेळेस शेंदूर, रुईची पाने-फुले वगैरे नाही मिळाली तरी हरकत नाही. मानसपुजेने पुजा करून प्रसन्नतेसाठी हनुमान चालिसाचा अवश्य पाठ करावा.* पुढे दिलेले अभंग म्हणून जन्म साजरा करावा म्हणजे म्हणजे सूर्योदयाच्या वेळेनुसार हनुमंत रायाच्या मूर्तीवर किंवा मूर्ती नसल्यास इतर मंदिर असल्यास हनुमंत रायाच्या फोटोवर म्हणजे प्रतिमेवर पुष्प फुलांच्या पाकळ्या, गुलाल, अक्षद, याचा वर्षाव करून हनुमंत नावाचा गजर करून जन्म साजरा करावा.

त्यासाठी पुढे अभंग दिलेले आहेत, ते अभंग म्हणावे. व नंतर हनुमान चालीसा, स्तोत्र, पाळणा, आणि रामप्रभूच्या नामाचा आवश्यक जयघोष करावा. “राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की” हा सामूहिक जप करावा शक्य असल्यास नंतर प्रसादाचे वाटप करावे. किंवा नंतर साखर मूळ इत्यादी हातावर देणारा प्रसाद वाटावा. विशेष करून गावातील परिसरातील सर्वांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करावं.

हनुमान जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
१ देवांगना हातीं आणविला
२ आनंदोनी म्हणे राया धन्य केलें
४ विभाग सत्वर वसिष्ठानें केले
५ पिंड घारीनें झडपिला

हनुमान जन्माचे अभंग प्रारंभ

देवांगना हातीं आणविला

देवांगना हातीं आणविला शृंगी ।
यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
विभांडका क्रोध आला असे भारी ।
अयोध्या भीतरीं वेगीं आला ॥२॥
राजा दशरथ सामोरा जाऊनी ।
अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
पुत्र स्नुषा दोन्हीं देखतां नयनीं ।
आनंदला मनी म्हणॆ नामा ॥४॥

आनंदोनी म्हणे राया धन्य केलें

आनंदोनी म्हणे राया धन्य केलें ।
इच्छिलें सोहळे पुरवीन ॥१॥
यज्ञाचा आरंभ करी लवलाह्मा ।
पुसोनी आचार्या वसिष्ठांसी ॥२॥
सर्व ऋषीजन मिळाले सकळ ।
मंत्रांचा कल्लोळ करिताती ॥३॥
नामा म्हणे शृंगी मुख्यत्वें शोभला ।
यज्ञ आरंभिला तेणें जेव्हां ॥४॥

आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र

आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र ।
आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला ।
प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥
पायस तें पात्र घेऊनियां करीं ।
शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करितां विघ्न ओढवेल ।
सत्वर वहिले भाग करा ॥४॥
नामा म्हणे देव येईल पोटासीं ।
ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥

विभाग सत्वर वसिष्ठानें केले

विभाग सत्वर वसिष्ठानें केले ।
राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥
प्रथम तो भाग कौसल्यसी दिला ।
तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें ।
मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥
आसडोनी पिंड घारीनें पै नेला ।
नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना ।
ब्रह्मशापें जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती ।
यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं ।
त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं ।
दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥
कैकई रुसली तेथें विघ्न झालें ।
घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां ।
पुढें झाली कथा श्रवण करा ॥६॥

पिंड घारीनें झडपिला
पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥

ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी ।
आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न ।
मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र ।
ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी ।
बैस माझे ध्यानीं सावधान ॥४॥
वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला ।
भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥
एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड ।
वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥

घारीमुखींचा पिंड अंजनीच्या
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं ।
पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥
नवमास होतां झाली ती प्रसूत ।
दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन ।
दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥
जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें ।
इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी ।
पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला ।
अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं ।
वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ ।
देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण ।
एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥

हनुमानाचे सर्व काही

 संत सोपानदेव चरित्र सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, एप्रिल नित्य पारायण सूची, ऑक्टोबर नित्य पारायण सूची, ऑगस्ट नित्य पारायण सूची, किर्तन म्हणजे काय?, गणपती सर्व, ग्रामगीता सर्व, जानेवारी नित्य पारायण, जुलै नित्य पारायण, जून नित्य पारायण सूची, डिसेंबर नित्य पारायण सूची, दत्त संपूर्ण, देव जन्माचे अभंग, धनंजय महाराज मोरे, नाना महाराज कापडणीस, निरपेक्ष किर्तन समूह, नोव्हेंबर नित्य पारायण सूची, पौराणिक सर्व, भ.श्रीकृष्ण चरित्र सर्व, भक्त प्रल्हाद संपूर्ण चरित्र, भजनी मालिका, भागवत पुराण महात्म्य १, भागवत महापुराण, भारुड, मारुती-हनुमान, मार्च नित्य पारायण सूची, मुक्ताबाई संपूर्ण चरित्र, मे नित्य पारायण सूची, वारकरी ग्रंथ, वारकरी जलद चाली, वारकरी संत, वारकरी सर्व, श्री भ. दतात्रय प्रभू सर्व, श्री समर्थ रामदास संपूर्ण चरित्र, संत कान्होपाठक, संत गजाजन महाराज, संत गाडगेबाबा सर्व भाग, संत गोरा कुंभार गोरोबाकाका, संत चरित्र सर्व, संत चोखामेळा चरित्र सर्व भाग, संत ज्ञानेश्वर सर्व, संत तुकडोजी महाराज साहित्य, संत तुकाराम म. चरित्र सर्व, संत तुकाराम संपूर्ण सूची, संत तुकाराम सार्थ गाथा, संत मीराबाई चरित्र सर्व, संत समाधी अभंग, संत ज्ञानेश्वर म. चरित्र, सप्टेंबर नित्य पारायण सूची, सर्व संत अभंग गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय, स्तोत्र-अष्टके, १२ महिने पारायण सूची, VIDEO

धार्मिक साहित्य सूची

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading