47. शंकरपार्वती कुळ दैवत 96 कुळी मराठा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता ह्या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या या साठी आपल्या कुळाचा कुळवृतांत ची फाईल बनवून घेणे.

कुळाचे कुळदेवता :> गणपती, महादेव, विठ्ठल, ज्योतिबा, बोरोबा, म्हसोबा. खंडोबा, खंडोबाची महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने:
महाराष्ट्र:
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा
४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद)
५) शेंगुड (अहमदनगर)
६) सातारे (औरंगाबाद)
७) माळेगाव

कर्नाटक:
१) मैलारपूर-पेंबर (बिदर)
२) मंगसूल्ली (बेळगाव)
३) मैलारलिंग (धारवाड)
४) देवरगुडू (धारवाड)
५) मण्मैलार (बल्ळारी).

शंकर-पार्वती तथा उमा-महेश्वर हे ९६ कुळी मराठा वंशातील अनेक कुळ, व उपकुळांचे कुलदेवता व कुलदैवत आहे. अनेक कुळातील लोकांना आपले कुलदेवता-कुलदैवत-कुळदेवी माहित नाही, त्यांचा पूजाविधीच्या वेळा पाळल्या जात नाहीत. परिणामी त्या कुळातील अनेकांना दु:ख, दारिद्र्य, अपयश, निराशा, व्यभिचार, मनोविकार, इत्यादींची फळे त्या कुटुंबातील अनेकांना भोगावी लागतात.

यात अनेकवेळा कुटुंबातील लोकांची काहीएक चूक नसून देखील त्यानां या प्रसंगाला सामोरे जावे लागते.

कुलदेवता-कुलदैवत यांना पैसे लागत नाहीत. अनेकांना मोठा भ्रम आहे कि कोणतीही पूजा करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो, प्रत्यक्षात तसे काही नाही.

तुमच्या कुलदेवता-कुलदैवत यांना त्यांच्याप्रती फक्त तुमचा आदर हवा असतो, जसे लहान मुलाला आईबापाकडून प्रेम हवे असते तसे देवाला आपल्या कुळातील लोकांकडून त्यांनी शुभप्रसंगी, सणवाराला, भीतीदायक परिस्थितीतही कुलदेवता-कुलदैवत यांची आठवण व आवाहन म्हणजे त्यांना बोलवावे व आम्ही तुमचे आहोत, हा पवित्र वंश तुमचा कृपेने वाढला आहे, तुम्हीच याचे रक्षण करा, आम्हाला सद्बुद्धि द्या व तुमची सेवा वंशपारंपारिक घडू द्या, आमच्या व परिवारातील लोकांकडून झालेल्या चुका क्षमा करा.

हे कुलदेवता आमच्या कुलाचे रक्षण करून आम्हाला यश दे.

जवळ काहीच पैसे नसतील तर फक्त प्रार्थना केली तरी चालते, परिस्थिती चांगली असल्यास पंचोपचारी, दशोपचारी, षोडशोपचारी पूजा करावी. व काही मंगळवारी किंवा शुक्रवारी सुवासिनी गोड पदार्थ (शक्यतो पुरणपोळी) चा स्वयंपाक करून ७ सुवासिनी म्हणजे ७ वर्षाच्या आतील लहान मुलींना सकाळी हळदीकुंकू सोबत नेऊन त्याना हळदीकुंकू लावून जेवण्याचे आमंत्रण द्यावे, व दुपार नंतर घरी आपल्या कुलदेवता-कुलदैवत यांची फोटो, किंवा मूर्ती असल्यास त्याची पूजा आपण स्वताः करून व त्या ७ सुवासिनींना हळदीकुंकू अर्पण करण्यास सांगावे, त्या नंतर त्या कुलदेवता-कुलदैवत नैवद्यसह त्या ७ सुवासिनींना जेवण देऊन त्यांना कमीतकमी प्रत्येकी १!सव्वा रुपया दक्षिणा द्यावी, शक्य असल्यास कपडे, धान्य, फळे, मिठाई, इत्यादी द्यावी. व नंतर त्या कुलदेवता-कुलदैवत व सुवासिनींना आठवणीने न लाजता व कोणतीही मनात शंका न आणता शुद्ध अं:तकरनाने त्याना नमस्कार करावा, व बोळवण करण्यासाठी घराबाहेर ५ पावले तरी त्यांचे मागे चालावे.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading