वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय चौतिसावा – 34 Gram Gita Chapter 34 ओवी संख्या :- १०३ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 34
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय चौतिसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३४
Gram Gita Chapter Thirty Four Beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 34 प्रारब्धवाद
प्रारब्धवाद
जीव ईश्वराचा अंश । तो जितुका करी आपुला विकास । तितुका उच्च अवतारपदास । याच लोकी जातसे ॥१॥
करिता सेवाप्रयत्न थोर । जीव होई देवावतार । आपण आपुला करी उध्दार । शांति देई जगासहि ॥२॥
सोडूनि दुबळा निराशावाद । साधावा सत्य अवतार-बोध । म्हणोनि केले असे विशद । अवतारतत्त्व हे सारे ॥३॥
लोक करू लागतील सत्कार्य । तरि गावी नांदेल सर्व ऐश्वर्य । त्यासाठी वाढविले पाहिजे मनोधैर्य । सर्व लोकी ॥४॥
परि श्रोते बोलती त्यावरि वाचे । अहो ! भाग्यचि हीन आमुचे । म्हणोनि आमुच्याने कोणचे । सत्कार्य नोहे ॥५॥
मनात असते काही करावे । परि वेळचि जरा ना फावे । सांगा यास काय करावे । आम्ही तरी ? ॥६॥
मित्रहो ! ज्याची जयासि आवड । त्यासाठी त्या मिळे सवड । कोणी नये इच्छेआड । प्रयत्न करिता ॥७॥
गरजेपोटी जन्मे युक्ति । प्रसंग आणिता वाढे शक्ति । प्रयत्न पेरता फळे येती । आवडी ऐसी ॥८॥
श्रोते म्हणती कितीहि प्रयत्न केले । तरि काय सर्वचि राजे झाले ? यास पाहिजे भाग्य उघडले । आम्हा वाटे ॥९॥
इच्छेत जरी राज्य जडले । तरी रोजचेचि कार्य नडले । तेथे उदंड मनात आले । तरी काय होते ? ॥१०॥
इच्छेप्रमाणे सर्वास घडते । तरि काय भिकारी बनावे वाटते ? इच्छा करणारे कितीतरी येथे । फिरती बेकार सडकेने ॥११॥
कोणास सहजमार्गी चालता । धनाचा हांडा सापडे आयता । त्यांना बघा इच्छा न करिता । मिळाले धन ॥१२॥
कोणी दरिद्रयाच्या घरी जन्मले । मेंढयाबकर्या चारू लागले । अचानकचि भाग्य उघडले । गेले दत्तक राजवाडी ॥१३॥
ऐसे कोण्या उपाये होते । हेचि विचारावे वाटे आपणाते । प्रयत्न केल्यानेच फळ येते । हे तो येथे शोभेना ॥१४॥
गावी आमुच्या एक सज्जन । अति कुशल प्रयत्नवान । नाना कलांनी निपुण । परि पोटाचेहि भागेना ॥१५॥
सांगा याहूनि काय करावे ? इच्छेने फल कैसे पावे ? कोण्या परीने योजावे । कार्य आम्ही आपुले ? ॥१६॥
मित्रहो ! तुमचे सर्व म्हणणे । ऐकले मी जीवेप्राणे । म्हणोनीच आपल्या परीने । देतो उत्तर तुम्हासि ॥१७॥
भाग्याचा हा प्रारब्धवाद । उन्नतीचा करी विरोध । गावोगावच्या जीवनासि बाध । आणला याने ॥१८॥
ही दुबळी निराशा घालवून । केलाच पाहिजे प्रयत्न । तरीच भाग्य येईल जाण । उदया आपुले ॥१९॥
एरव्ही हे भाग्य कोणी देईना । प्रयत्नाशिवाय भोग येईना । त्यासि प्रयत्नचि प्रधान जाणा । लागे केव्हाचा तरी ॥२०॥
काही संस्कार असती पूर्वीचे । काही प्रयत्न या जन्मीचे । मिळोनि येई फळ भाग्याचे । उदया लोकी ॥२१॥
संत गुलाबराव बालान्ध । त्यांच्या जिव्हाग्री शास्त्रवेद । हे पूर्व जन्मीचे संचितचि सिध्द । नव्हे प्रारब्ध फुकाचे ॥२२॥
काही पूर्वसंस्कारगति । काही करणी काही संगति । काही संकल्प इच्छाशक्ति । योग्य काळी येती भाग्यफळे ॥२३॥
पाहणार्यास अचानक दिसती । याचे भाग्य उघडले म्हणती । धनवैभव लाभता ठरविती । भाग्यवंत लोकी ॥२४॥
येथे एक प्रश्न उठतो । भाग्यवंत कोण असतो ? ऐका त्याचेहि सांगतो । उत्तर आता ॥२५॥
असेल कोणी धनवंत । परि तो नव्हे भाग्यवंत । भाग्य असे सुखसंतोषांत । अवडंबरांत ते नाही ॥२६॥
भाग्यवंत त्यासचि म्हणावे । ज्याने ईश्वरास समर्पण व्हावे । अनन्यगतीने राहावे । शरण देवासि ॥२७॥
आणि सत्कार्यी असावे तत्पर । सर्व सोडोनि दुर्व्यवहार । सहजकर्म मिळे पोटभाकर । त्यातचि सुखे नांदावे ॥२८॥
आपणासीच सुख व्हावे । आणि दुसरे ते ओसरून जावे । ऐसे कधी न मानी जीवे । तोचि भाग्यवंत म्हणावा ॥२९॥
काही चोरी करोनि भाग्यवंत होती । सर्व लोक तुच्छ भावे हसती । म्हणती भाग्यवंताची गति । त्वरित पडेल दृष्टीला ॥३०॥
मग पाप आणोनि पाडी संकटा । धनभाग्य जाते भलतिया वाटा । पुन्हा राहतो करंटा । कैसा भाग्यवान म्हणावा ? ॥३१॥
कुणाचे भाग्य रात्रीतून येते । जुगारी कधी द्रव्य लाभते । दुसर्या दिनी पुन्हा धाव घेते । दरिद्रपण त्याच वाटे ॥३२॥
हा आहे पापाचा आविष्कार । नव्हे नव्हे हे भाग्य थोर । भाग्य तेचि निरंतर । लोक कीर्ति गाती मागेहि ॥३३॥
भाग्यवंत धनाने नव्हे । भाग्य सत्तेसीहि न म्हणावे । भाग्य सत्कार्यानेच पावे । जीवालागी ॥३४॥
भाग्यवंत श्रीमंत न होय । ऐसे माझे म्हणणे नोहे । परि उत्तम व्यवहारी धनिक राहे । तोचि खरा भाग्यवंत ॥३५॥
एकाची श्रीमंती दुसर्या भूषवी । एकाची श्रीमंती रक्तचि शोषवी । त्यास कैसी द्यावी पदवी । भाग्यवंताची ? ॥३६॥
माती धरिता सोने होते । चालत्या काळी भाग्यचि ते । परि अहंकारे व्यसने मुकले सेवेते । झाली शेवटी दुर्दशा ॥३७॥
म्हणोनि म्हणतो प्रयत्न करा । आपापले जीवन सुधारा । भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा । टाळा मागे ॥३८॥
भाग्यकरिता संकल्प करावे । दृढनिश्चया वाढवीत जावे । तैसेचि प्रयत्न करीत राहावे । आळस सांडोनि ॥३९॥
जेवढा करावा उच्च विचार । तेवढाचि उच्च ठेवावा व्यवहार । त्यानेच पावते भाग्य थोर । सकळ योजना साधता ॥४०॥
केल्यानेच भाग्य फळते । केल्यानेच स्वर्गसुख मिळते । केल्यानेच सर्वकाही होते । मानवाचे ॥४१॥
माणूस बसता भाग्य झोपते । चालता पुढेचि घेई झेप ते । प्रयत्नांचेचि रूपांतर होते । भाग्यामाजी निश्चयाने ॥४२॥
ऐसे बोलले ऋषिजन । संत कवीश्वर अवतार महान । धर्मग्रंथ हेचि प्रमाण । बोलले लोकी ॥४३॥
ज्याचे अचानक भाग्य उघडले । त्याचे सुकृत साचत आले । म्हणोनीच एकाएकी लाभले । भूषण तया ॥४४॥
जरि त्याने केलेचि नसते । तरि ते आज कैसे लाभते ? देवाने द्वैतभाव केला येथे । ऐसे म्हणणे शोभेना ॥४५॥
एकाएकीच भाग्य लाभते । म्हणोनि धुंडाळाल कोठे कोणते । तरि आहे हेहि जाते । मनुष्यपण हातचे ॥४६॥
तुम्ही म्हणाल मग काय करावे ? आपणहि आता प्रयत्नशील व्हावे । प्रबल इच्छेसि वाढवावे । सदभाग्याच्या ॥४७॥
काळ असेल प्रतिकूल । तरि हळू पडेल पाऊल । परि सत्कार्य वाया न जाईल । केले ते ते ॥४८॥
तीव्र इच्छेने कार्य केले । ते आज जरी नाही फळले । तरी अचानकचि भाग्य उघडले । वाटेल ऐसे फळ येता ॥४९॥
श्रोते साशंक झाले हृदयी । प्रयत्न इच्छिले फळ देई । ऐसे कथिले जे जे काही । म्हणती अजुनीहि पटेना ॥५०॥
प्रयत्ने साधती सर्व उपाय । ऐसा केला जरी निश्चय । तरी का उपाय करिता अपाय । अनुभवा येती ? ॥५१॥
सर्वचि जगण्याचे करिती प्रयत्न । कोणास वाटे घडावे मरण । येथे पूर्वी तरी केले साधन । मरणाचे कोणी ? ॥५२॥
लोक जगण्याचाचि प्रयत्न करिती । वैद्य डॉक्टर बोलाविती । तरी कय होते त्यांची स्थिति ? प्राण जाती कितीकांचे ॥५३॥
कोणी बिमार राहे वर्षोगणती । काय बिचार्याची फजीती । नाही करणाराची संगति । अंतकाळी हाल त्याचे ॥५४॥
त्याने काय बिमार पडावे इच्छिले । म्हणोनि देवाने तसे केले ? यात काय प्रयत्न नाही झाले । त्याच्या हाते स्वहिताचे ? ॥५५॥
तैसेचि कोणी मरण इच्छिती । परि मृत्यु नये वर्षोगणती । सांगा यात मानवी इच्छेला किती । मान्यता आहे ? ॥५६॥
आम्ही म्हणतो सूत्रधार हरि । त्याच्या हाती दैवाची दोरी । मानव बाहुली कळसूत्री । इच्छाप्रयत्न फोल त्यांचे ॥५७॥
मित्रांनो ! सुंदर तुमचे प्रश्न । यात मज न वाटे विचित्रपण । हे तो आहे सहज अज्ञान । रुजले लोकी ॥५८॥
सुखासाठी करिती धडपड । दु:खी देव घालिती आड । मूळ न शोधिता बोलती बोजड । सिध्दान्तवाक्ये ॥५९॥
आम्ही पाषाण फेकला वरि । तो चुकोनि पडला मस्तकावरि । येथे गुरुत्वाकर्षण काय करी । आपुल्याकडोनि ? ॥६०॥
वाफ्यात मिरची-ऊस लाविले । तिखट-गोड फळ नशिबी आले । येथे पाण्याने काय केले ? दिले फळ जैसे तैसे ॥६१॥
देवभक्ति ऐसी सर्वत्र । परि ती स्वये न चालवी सूत्र । कर्मे फळती पवित्रापवित्र । आपुलीच आपणा ॥६२॥
देवाचेच हे असते करणे । तरि लोक का निर्मिता केविलवाणे ? कशासि लाविता अल्पकाळी मरणे । जीवप्राण्यासि ? ॥६३॥
हे तो आहे आपुल्याच आधीन । जन्मा येणे आणि मरण । यात शंका घेण्याचे कारण । मुळीच नाही ॥६४॥
आपणचि इच्छा करितो । म्हणोनिया जन्माला येतो । यात कोणी कशाला पाठवितो । दुनियेवरी ? ॥६५॥
तैसेचि आहे मरणाचे । आम्ही कारण व्हावे बिघडविण्याचे । जेव्हा असह्य होय भोगणे साचे । तेव्हा म्हणावे ” वाचवा ” ॥६६॥
चोर चोरीसाठी गेला । आधी विचार नाही केला । संकटी सापडता म्हणे ” बोला । कैसे केले देवाने ? ” ॥६७॥
कितीकांचे दुखवावे मन । हिरावूनिया आणावे धन । मग भोग येता दैवावरून । बोल द्यावा देवासि ॥६८॥
माणसाला मरावे ऐसे न वाटे । परि मरणाऐसे केले ओखटे । पुढे आसक्तीने म्हणे ” मोठे । देवा ! संकट ओढवले ” ॥६९॥
मरणाऐसे करावे आचरण । सोडोनिया तारतम्यज्ञान । मग भोग येता म्हणावे ” नको मरण ” । कैसे कोण मानील ? ॥७०॥
हे म्हणणे काही इच्छा नोहे । इच्छेसाठी मार्ग आहे । तो वेळेवरीच करता नये । त्यासि पाहिजे अभ्यास ॥७१॥
जन्मणेहि इच्छेने होते । परि त्यासि गर्भधारणा लागते । अंतरीचे प्रगट करावया तेथे । वेळ लागे तैसाच ॥७२॥
अग्नि देवोनि लोखंड तापवावे । आणि लगेच म्हणे थंड व्हावे । ऐसे कैसे घडेल स्वभावे । एकाएकी ? ॥७३॥
जीव कर्म करिता स्वतंत्र । त्याचा भोग भोगता परतंत्र । केले त्याचे फळ येणार । इच्छेचाचि परिपाक तो ॥७४॥
सर्वासचि वाटे कधी न मरावे । सर्वासचि वाटे राजे व्हावे । परि इच्छा क्रियामार्गे न धावे । अचूकतेने तीव्रपणे ॥७५॥
तेणे भोगावा लागे नको तो भोग । जो पूर्वी घडला कार्य भाग । इच्छेनि व्यसनी होता झाला क्षयरोग । जगणे मग साधेना ॥७६॥
म्हणोनि सांगतो जे जे होते । ते इच्छाबळेच प्रत्यया येते । यासि कर्महि पाहिजे इच्छेपुरते । तरीच साधते कार्य पुढे ॥७७॥
एक इच्छा असते चंचल । तीत होतो नेहमी बदल । एक इच्छा असे निश्चल । जी कर्म करोनीच प्रकट होय ॥७८॥
कधी इच्छा इच्छेने प्रकट नोहे । ती कर्मानेच दिसो पाहे । नाही म्हणोनिया काय होय ? प्रत्यक्ष दिसे कार्यावरि ॥७९॥
बादशहा ” मी गरीब ” बोलला । तरी ओळखती लोकचि त्याला । तो लपल्याने न जाय लपाला । ढगाआड सूर्य जैसा ॥८०॥
तैसी इच्छा परिपाकासि आली । आता वृत्ति फळासि भ्याली । मग ऐनवेळी दुजी इच्छा केली । न टळे फळ मृत्यूचे ॥८१॥
कित्येकांची प्रमाणे दिसती । मृत्यु आपणचि प्रकट करिती । दिवस क्षण वेळा सांगती । येणार्या फळाची ॥८२॥
त्यांची आसक्ति देहातूनि सुटली । म्हणोनि स्थिति प्रकट झाली । कित्येकांनी दुसर्यांचीहि कथिली । परिपक्व फळे ॥८३॥
विचारी पुरुष जे जाणते । फळ भोगाया होती सज्ज ते । आधीच वृत्ति अविचारपंथे । जाऊ न देती ॥८४॥
अविचारी ते कुमार्गे जाती । फळ भोगता तळमळती । अति होता भलतीच घेती । विकृति मनी वेडयाऐसी ॥८५॥
आसक्तिकांची विकृति वाढली । देहबध्द वृत्ति भांबावली । दु:ख न सोसूनि धाव घाली । इच्छा त्याची मृत्यूकडे ॥८६॥
मागील कुकर्म असह्य झाले । म्हणोनि जीव द्याया धावले । आता मृत्यु येईल तरीच भले । वाटे तयासि ॥८७॥
खरोखर मरणे एक स्वप्न । शरीरपरिवर्तनाचे विरामस्थान । परि केलेल्या पापपुण्याचे निवारण । तेणे नव्हे ॥८८॥
जैसा कपडा अंगीचा बदलावा । नवीन अंगावरि ओढोनि घ्यावा । तैसाचि जीव मरणी समजावा । शरीर बदली इच्छेने ॥८९॥
कधी ती इच्छा प्रकट ना कळे । प्रकट इच्छा त्वरित ना फळे । येथेचि विचारीहि गोंधळे । निवाडा करिता ॥९०॥
इच्छेने घेतले तलम वस्त्र । मग ते टिको म्हणे वर्ष सहस्त्र । ऐशा इच्छा होवोत मिश्र । परि भोगणे लागे आधीचे ॥९१॥
एकदा इच्छेने बसल्या घोडयावरि । चाबुक मारता हौस पुरी । मग घाबरोनि म्हणे ” देवा ! आवरी । सत्वरि आता ” ॥९२॥
एकदा हातूनि गेला बाण । मग इच्छेऐसा नये परतून । पहिले इच्छाकर्म गतिमान । भोगावेचि लागे ॥९३॥
नुसती इच्छा उपयोगी नाही । ती संस्कार बनूनि कर्मपण घेई । नवी इच्छाहि याच क्रमे येई । फळासि पुढे ॥९४॥
मन बुध्दि चित्त अहंकार । पांचवे अंत:करण आधार । यात दृढ होय इच्छासंस्कार । चाले व्यवहार त्यायोगे ॥९५॥
यांचे पालटतील संस्कार । तरीच सुखाचा होय व्यापार । एरव्ही इच्छा क्षणभंगुर । उपयोगी नये तत्काळ ॥९६॥
इच्छासंस्कार कर्तव्यसंस्कार । यांचा संग्रह पूर्वापार । तेचि संचित असे थोर । पापपुण्यरूप ॥९७॥
त्यातून जे भोगायासि आले । तेचि प्रारब्ध बोलले । ते भोगणे प्राप्तचि झाले । न चुके सहजी ॥९८॥
ते भोगता केली नवी धडपड । इच्छा आणि यत्न प्रचंड । ते क्रियमाण देई संचिता जोड । लाभेल पुढे फळ त्याचे ॥९९॥
ऐसे चालले रहाटचक्र । या नांव जीवनाचा व्यापार । जन्ममरण, सुखदु:ख, व्यवहार । खेळ इच्छा-प्रयत्नाचा ॥१००॥
हे जाणोनि प्रयत्नासि लागा । याविण भाग्याचा भ्रम वाउगा । संत उपदेश देती जगा । क्रियमाण सुधारा म्हणोनि ॥१०१॥
क्रियेवीण मार्गचि नाही । कर्तव्य नरा देवपद देई । तुकडया म्हणे बना निश्चयी । प्रयत्नवादी ॥१०२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । प्रारब्ध-विचार कथिला येथ । चौतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
ग्रामगीता अध्याय चौतिसावा समाप्त
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

