Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

ग्रामगीता अध्याय दहावा – 10 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषयओवी संख्या
ग्रामगीता अध्याय दहावा- 10
Gram Gita Chapter १० – 10
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
१०८
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजनेहिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १० संघटन – शक्ती
संघटन-शक्ति

॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
Gram Gita Chapter I Beginning
ग्रामगीता अध्याय दहावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १०

—-🕉ग्रामगीता अध्याय १० संघटन – शक्ती


संघटन-शक्ति
॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥
एक सेवानुभवी श्रोता । गहिवर दाटोनिया चित्ता । म्हणे माझी ऐका शोककथा । एकदा कानी ॥१॥
सेवावृत्तीने वागता । ग्रामोध्दाराचे फळ ये हाता । लोकवशीकरणाचा सेवेपरता । मंत्र नसे कोणी ॥२॥
हे आहे सर्वचि खरे । अनुभवासहि ये निर्धारे । परि काही लोक स्वार्थभरे । व्देषी होती सेवेचे ॥३॥
त्यात काही विद्वान काही श्रीमान । राजदरबारीहि काहीचे वजन । त्यांना गावाचे हवे पुढारीपण । स्वार्थासाठी जेथे तेथे ॥४॥
लोक राहावेत पंखाखाली । म्हणजे आपुली पोळी पिकली । म्हणोनि खेळती अनेक चाली । सोंग घेवोनि सेवेचे ॥५॥
देती मिळवोनि दुर्मिळ सामान । कोणास काही प्रलोभन । व्यसनी गुंडास देती प्रोत्साहन । करिती संपादन प्रेम ऐसे ॥६॥
तेथे आमुची सेवा सगळी । प्रसंगी होऊनि पडे दुबळी । जनता फसते भोळीभाळी । जाऊनि जाळी तयाच्या ॥७॥
आमुच्या गावी हेचि झाले । गाव सेवकांनी उत्तम केले । परि पुढे दुर्भाग्य ओढवले । याच मार्गे ॥८॥
सुंदर वेली लावल्या अंगणी । घालोनिया परिश्रमाचे पाणी । फुलाफळांनी गेल्या बहरोनि । गगनभेदी ॥९॥
तैशात सोसाटियाने आणावे वादळा । गळावा फळे फुले पाचोळा । त्यासवे वेलींचाहि चोळामेळा । व्हावा क्षणी ॥१०॥

कैसे दु:खी न होईल मन । ज्याने वाढविले करोनि जतन । गेले घराचेचि सुंदरपण । एकाएकी ॥११॥
तैसे गाव नीतीने जतन केले । मुलांबाळासहि सांभाळिले । परस्परात प्रेम नांदले । सेवागुणे खेळीमेळी ॥१२॥
परि घुसले गावचे भेदी । लाविली स्वार्थासाठी उपाधि । उगीदुगी करोनि भ्रमविली बुध्दि । पाडली फूट ॥१३॥
सेवेचे सोंग उभे केले । आपले स्तुतिपाठक घुसविले । वाईट झाले ते ते माथी मारले । खर्‍या सेवकांच्या ॥१४॥
नथीतून जैसा मारावा तीर । तैसे असती बहादूर । परि गाव केला चकनाचूर । द्वैत पाडोनि ॥१५॥
नाना तर्‍हेचे वाद वितंड । नाना पक्षांचे माजविले बंड । कधी आड कधी उघड । सुरू झाले कार्य त्यांचे ॥१६॥
गोंधळवोनि टाकिले जनमना । झाला प्रेम-शक्तीचा धिंगाणा । जिकडे पाहावे तिकडे कल्पना । फुटीर वृत्तीच्या ॥१७॥
काही सज्जनांनी गाव जमविले । काही गुंडानी गाव नाशविले । नाना तर्‍हेचे तमाशे झाले । गावी आमुच्या ॥१८॥
व्यक्तिस्वार्थ बोकाळला । जो तो मनाचा राजा झाला । वेगवेगळया प्रलोभनी गुंतला । समाज सारा ॥१९॥
आमिषामाजी लपला गळ । परि माशासि दिसे आमिषचि केवळ । तैसे भ्रमिष्ट झाले लोक सकळ । प्रलोभनापायी ॥२०॥

काही अतिनम्रता दाखविती । साहेबांचे जोडेहि पुसती । मनी वासना वाईट धरती । अधिकारी व्हाया गावाचा ॥२१॥
नाही कोणा सेवेचे भान । घालिती सत्तेसाठी थैमान । गाव केले छिन्नभिन्न । निवडणुकी लढवोनि ॥२२॥
गावी होती निवडणुकी । माणसे होती परस्परात साशंकी । कितीतरी पक्षोपक्षांनी दु:खी । व्यवहारामाजी ॥२३॥
तैसीच येथे गति झाली । कोणी जातीयतेची कास धरिली । कुचेष्टा करोनि प्रतिष्ठा मिळविली । वचने दिली हवी तैसी ॥२४॥
काहीकांनी मेजवानी दिली । दारू पाजूनि मते घेतली । भोळी जनता फसवोनि आणिली । मोटारीत घालोनिया ॥२५॥
ऐसा सर्व प्रकार केला । गुंडगिरीने निवडून आला । म्हणे संधि मिळाली सेवकाला । सेवा करीन सर्वाहूनि ॥२६॥
साधन ज्याचे मुळात अशुध्द । त्याचा परिपाक कोठूनि शुध्द ? लोका पोळोनि व्हावे समृध्द । गावी दुफळी माजवोनि ॥२७॥
सत्तेसाठी हपापावे । वाटेल तैसे पाप करावे । जनशक्तीस पायी तुडवावे । ऐसे चाले स्वार्थासाठी ॥२८॥
याने गावाची होय दुर्दशा । मतमतांतराचा वाढे तमाशा । सज्जनांची होय निराशा । मरणापरी ॥२९॥
आता सांगा काय करावे ? कासयाने गाव सुधारावे ? जे जे होईल ते ते पाहावे । ऐसे वाटे निराशपणे ॥३०॥

ऐसा श्रोतयाने प्रश्न केला । मी तो मनापासोनि ऐकला । मित्रहो ! उपाययोजना तुम्हाला । सांगतो माझेपरी ॥३१॥
परिस्थिती ही साचचि आहे । परि निराश होणे काम नोहे । दुर्जनांचे बळ वाढाया हे । कारण होई निराशा ॥३२॥
आपणास काय करणे । ऐसे बोलती लोक शहाणे । तरि समजावे गाव या गुणाने । नष्ट होईल सर्वस्वी ॥३३॥
मग तो मुखंडहि नव्हे । ऐसे का न समजावे ? निर्धाराने प्रयत्न करावे । सर्व मिळोनि जाणत्यांनी ॥३४॥
ऐसे असावे धोरण । तेचि कार्यकर्त्यासि भूषण । गाव निर्मावया आपुले प्राण । पणा लावावे ॥३५॥
विरोध येता बसावे घरात । ऐसे नोहे सेवेचे व्रत । गंगा घाबरती पाहोनि पर्वत । तरी सागरा न मिळती ॥३६॥
कोरडया हौदामाजी तरावे । याने गौरव कोणा पावे ? पुराच्या लाटातूनि पोहूनि जावे । यातचि वैशिष्टय आपुले ॥३७॥
म्हणोनि कर्तव्य सांभाळावे । गावशील जतन करावे । सोसाटयाने झडपू न द्यावे । गावचे कोणी ॥३८॥
ग्रामसेवाचि ईश्वर-सेवा । ऐसे समजावोनि जीवा । गाव सेवेसि तत्पर करावा । सर्वतोपरी ॥३९॥
नि:पक्षपणे बौध्दिके द्यावी । सर्वाची समजून पटवावी । बुध्दि गावाची सांभाळावी । प्रचाराद्वारे ॥४०॥
जनजागृति झालियाविण । न संपेल गावाचे दैन्य । दृष्टि येता लोकासि, दुर्जन । मेख गडवू न शकती ॥४१॥
या कार्यासि मिळावी जोड । म्हणोनि हाती काही मुखंड । तेणे शक्ति लाभे तोडीस तोड । पटती फिके ग्रामशत्रु ॥४२॥
असो नसो साथ सत्तेचा । सहयोग मिळवावा सज्जनांचा । जनसेवकांनी ग्रामराज्याचा । पाया रचावा सत्यावरि ॥४३॥
ज्यांना ज्यांना न्यायाची चाड । आणि गाव-सेवेची आवड । त्यांचीच संघटना व्हावी दृढ । करावी वाढ दिसंदिस ॥४४॥
जाणता दिसेल तो निवडावा । जिव्हाळयाचा पुरुष वेचावा । थोरांचिया नेतृत्वे चालवावा । कारभार ग्रामोन्नतीचा ॥४५॥
श्रोता म्हणे तेहि झाले । महाप्रयासे सज्जन जमविले । परंतु एकदा चुकले । ते सुधरेचना की ॥४६॥
अहो ! एक कमेटी बसली । गावी सुंदरता आणाया भली । म्हणे पाहिजे निवडणूक केली । पुढार्‍यासाठी ॥४७॥
कोण गावाचा पुढारी ठरवावा ? आधी मान कोणास द्यावा ? कोणाच्या हाते चालवावा । कारभार गाव-सेवेचा ? ॥४८॥
म्हणोनि निवडणूक ठरविली । ती जणु आगीत बारूद पडली । अथवा राकेलाची टाकीच ओतली । अग्निमाजी ॥४९॥
तेणे जाहला अग्निबंबाळ । मतामतांचा हलकल्लोळ । एकमेकासि पाहती महाकाळ । शहाणे गडी ॥५०॥

जो तो म्हणे मीच शहाणा । कोणीच कोणाचे ऐकेना । अरे ! तोबातोबा ! आरडाओरडांना । सुमारचि नाही ॥५१॥
घरोघरी मारामारी । बायको उठूनि नवर्‍यासि मारी । मुले म्हणती आम्ही शहाणे भारी । पुस्तके सारी शिकलो की ॥५२॥
कोण पुढारी समजावा ? विचार झाला सगळया गावा । एकएकाच्या न मिळे भावा । सांगा काय करावे ? ॥५३॥
श्रोतयाचा हा अनुभव । येत आहे गावोगाव । परंतु येथे मुळातचि ठेव । चुकली सारी ॥५४॥
गढूळ पाणी ढवळो जाता । घाणचि उफाळोनि ये हाता । जेथे सेवेची नाही आत्मीयता । तेथे गोंधळ सहजचि ॥५५॥
यासाठी आधी सेवाभावी । लोकांचीच संघटना व्हावी । तेथे रीघचि नसावी । अन्य कोणासि ॥५६॥
गावातील एकेक सज्जन । शोदूनि घ्यावे त्यासि जोडून । सेवाभावी मंडळचि संपूर्ण । तयार करावे प्रयत्ने ॥५७॥
त्याचे प्रामाणिक सत्कार्य । लोकापुढे येता निर्भय । आपोआपचि होईल निश्चय । लागेल सोय गावासि ॥५८॥
सेवेची ही नैतिक सत्ता । वजन मिळवील गावहिता मग कोणी विरोध तत्त्वता । न टिके तेथे ॥५९॥
टाकूनि दाब कोणावरि । लालुच दावूनि करिती फितुरी । विघ्ने आणिती सत्कार्यावरि । होतील दुरी ते सर्व ॥६०॥
सेवासंघटनेचा प्रमुख । तो निवडोनि देता चोख । हळुहळू गाव होईल सुरेख । सर्वतोपरी ॥६१॥
श्रोता म्हणे ठीक हे सारे । परि गावी आले निवडणुकीचे वारे । तेणे गाव आमचे भरी भरे । भलतैशाचि ॥६२॥
स्वार्थापायी सेवा-विरोध । करणारे जे गावचे मैंद । ते नाना मार्गे करिती बुध्दिभेद । जनतेचा तयेवेळी ॥६३॥
तेथे आम्ही काय करावे ? गाव कैसे सुधारावे ? याचे समाधान ऐकावे । श्रोतेजनी ॥६४॥
सांगितले ते साचचि आहे । गावोगावी अनुभवा ये । यासाठी सरळ दावावी सोय । विचाराने गावलोका ॥६५॥
निवडणुकीची चालू प्रथा । हीच मुळी सदोष पाहता । म्हणोनि योग्य दृष्टि द्यावी समस्ता । गाववासिया ॥६६॥
जीवनाची जबाबदारी । किती आहे निवडणुकीवरि । हे पटवोनि निवडणूक खरी । करवावी न गोंधळता ॥६७॥
विचार केलिया हळूहळू । आपैसाचि मार्ग ये कळू । निवडणुकीचे तत्त्व जाता आकळू । मिटेल गोंधळ सहजचि ॥६८॥
अहो ! पुढारीपण कशाला ? सेवा गावाची करावयाला । मग सेवेची कसोटी लावा की आपुला । समजेल पुढारी कोण तो ॥६९॥
कोण गावासाठी झटे । कोण उठतो रोज पहाटे । घेऊनि हातामाजी खराटे । झाडतो कोण ॥७०॥
साध्या राहणीने दिवसभरि । कोण गरीबाचे काम करी । कोण पायी फिरोन करी वारी । गावाची आमुच्या ॥७१॥
कोण नीतीने असे चांगला । पक्षपात न आवडे कोणाला । छदामासि नसे लाजीम झाला । गाव-निधीच्या ॥७२॥
कोण सर्वाचे पाहतो सुख:दुख । कोणाचे दिसे सेवेसाठी मुख । हीच त्याची जाणावी ओळख । निवडावया ॥७३॥
किंवा सकळांना सांगा काम । सोडा हुकूम आपुला बेफाम । कोण पहा न करिता आराम । काम करी गावाचे ॥७४॥
मग तोचि म्हणावा पुढारी । आंधळाहि त्याची निवड करी । येथे कासयास ही टिमकी भरजरी । जाहिरातींची ? ॥७५॥
गावचा जो प्रत्येक घटक । त्यासि ठाऊक असावा माणूस एकेक । कोण चुकार, कोण सेवक । चालक कोण ? ॥७६॥
कोण गावाची सेवा करतो । कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो । सांगावा प्रसंग येता स्पष्ट तो । गावामाजी ॥७७॥
तेथे नसावी लाजशरम । त्याने बिघडेल गावाचे काम । म्हणोनि सर्वानी द्यावे त्याचेच नाम । न गोंधळता ॥७८॥
ज्यासि गावाचा जिव्हाळा । जो कार्यज्ञानाचा पुतळा । तोचि सुखी करील गाव सगळा । निवडोनि देता ॥७९॥
ऐसे न करता भांडणे माजती । गावची होईल अनावर स्थिति । मग फावेल स्वार्थीजनाप्रति । सज्जन राहती वेगळेचि ॥८०॥

यासाठी उत्तम गुणी निवडावा । ज्याची सर्व करिती वाहवा ! गावाचा बागडोर त्यासि द्यावा । आपुला पुढारी म्हणोनिया ॥८१॥
नाहीतरि गावचे म्हणविती पुढारी । दांत बसला सवाई-दिढीवरि । आपण होऊनि वाघापरी । गाव मारिती उपवासी ॥८२॥
काही लोक भाषणे करिती । बोलूनि पक्षभेद पाडिती । जुळल्यांची तोडूनि मति । भरती करिती झगडयांची ॥८३॥
ऐसा नकोच पुढारी । ज्याने नाही केली कर्तबगारी । तो मित्र नव्हे, वैरी । समजतो आम्ही ॥८४॥
ज्याने केले असेल उन्नत ग्राम । अथवा समुदायाचे आदर्श काम । तोचि बोलण्याचा अधिकारी उत्तम । समजतो आम्ही ॥८५॥
एरव्ही पैशाचे मिळाले तीन । देती भरभरा भाषण । न बसावे कोणाचेहि मन । तयावरि ॥८६॥
ऐसे पुढारेपण जेथे दिसे । गावाने लावूनि न घ्यावे पिसे । जो इमानदार सेवक असे । तोचि समजावा गावधनी ॥८७॥ .
बोलणे एक चालणे एक । लपविणे एक दाखविणे एक । हे गावासि होईल घातक । समजावे श्रोती ॥८८॥
भिडेखातरहि विष खादले । किंवा चोरूनिहि सर्पा दूध पाजले । वाघाशी सोईरपणहि संपादले । तरी नाश होईल निश्चये ॥८९॥
ऐसे न करावे वर्तन । असतील जे इमानदार सेवकजन । तेचि द्यावेत निवडोन । एकमते सर्वानी ॥९०॥
सर्वास असावी चिंता समाजी । कोण आहे लायक जनामाजी । कोण घेई गावाची काळजी । सर्वकाळ ॥९१॥
तोचि करावा पुढारी । एरव्ही पडो नये कुणाच्याहि आहारी । धन वेचतो म्हणोनि गावाधिकारी । करू नये कोणासि ॥९२॥
पुढारीपण सेवेनेच मिळे । हेचि बोलावे मिळोनि सगळे । तेथे पक्षबाजीचे चाळे । वाढोचि न द्यावे ॥९३॥
नाती गोती पक्ष-पंथ । जातपात गरीब-श्रीमंत । देवघेव भीडमुर्वत । यासाठी मत देऊचि नये ॥९४॥
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे । आपुल्या मतावरीच साचे । एकेक मत लाख मोलाचे । ओळखावे याचे महिमान ॥९५॥
मत हे दुधारी तलवार । उपयोग न केला बरोबर । तरि आपलाचि उलटतो वार । आपणावर शेवटी ॥९६॥
दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार । सर्व गावास करितील जर्जर । न देता सत्पात्री मतदान ॥९७॥
मतदान नव्हे करमणूक । निवडणूक नव्हे बाजार-चुणूक । निवडणूक ही संधि अचूक । भवितव्याची ॥९८॥
निवडणूक जणु स्वयंवर । ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर । त्यासि लावावी कसोटी सुंदर । सावधपणे ॥९९॥
फोड चोखाया लावोनि जैसे । शिष्य निवडिले रामदासे । मृत्यूच्या कसोटीवरि पाहणे तैसे । गुरु गोविंदसिंहाचे ॥१००॥ .

गडी पळावयासि लागले । कोण थकले कोण बाद झाले । कोणाचे नंबर पुढे आले । सहजचि कळे या रीती ॥१०१॥
तैसेचि आहे निवडणुकीचे । कामचि पाहावे सगळयांनी त्यांचे । ज्याचे काम अधिक मोलाचे । तोचि निवडावा मुख्य ऐसा ॥१०२॥
ऐसे सकळा पटवोनि द्यावे । तेणे गोंधळ मिटती आघवे । कार्यकर्त्यासीच संधि पावे । ऐसे होते यायोगे ॥१०३॥
मग त्याचेचि म्हणणे ऐकावे । सगळे गाव पुन्हा जमवावे । बाष्कळ बोले त्यास दाटोनि द्यावे । गावकर्‍यांनी ॥१०४॥
ऐसे झाले की झाली संघटना । लागली सुरू गाव-सुधारणा । झाला मुलामाणसांचा बाग पुन्हा । जिताजागता प्रेमळपणे ॥१०५॥
तेथे नवनवी योजना-फुले । विकसोनि देतील गोड फले । ग्रामराज्याचे स्वप्नहि भले । मूर्त होईल त्या गावी ॥१०६॥
कोणी उडवू लागे धुरळा । तरि तो त्याचेचि जाईल डोळा । सुखे नांदेल गाव सगळा । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला ग्रामराज्याचा निर्वाचन-पथ । दहावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥

ग्रामगीता अध्याय दहावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

Exit mobile version