सावित्रीच्या बाललिलांनी महाराज आणि महाराणी अगदी तृप्त तृप्त होत होते. इतर बालकांपेक्षा सावित्रीची प्रगती फारच जास्त होती, वर्षाची होत नाही तर पुर्ण वाक्य बोलु लागली, एकदा वाटीकेतील झुल्यावर बसुन सावित्री छोटी वीणा वाजवत असतांना तीचे नखं डाळींबीचे दाणे समजुन एक रावा चोच लावुन परत जात होता, पण तीला भितीचा लवलेशही नव्हता. ती चार वर्षाची होत नाही तोच तीला अनेक स्तवने मुखोद्गत झाली.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सती सावित्री चरित्र !!!
!! सावित्री !!
भाग – ११.
सावित्रीच्या बाललिलांनी महाराज आणि महाराणी अगदी तृप्त तृप्त होत होते. इतर बालकांपेक्षा सावित्रीची प्रगती फारच जास्त होती, वर्षाची होत नाही तर पुर्ण वाक्य बोलु लागली, एकदा वाटीकेतील झुल्यावर बसुन सावित्री छोटी वीणा वाजवत असतांना तीचे नखं डाळींबीचे दाणे समजुन एक रावा चोच लावुन परत जात होता, पण तीला भितीचा लवलेशही नव्हता. ती चार वर्षाची होत नाही तोच तीला अनेक स्तवने मुखोद्गत झाली. तीची स्मरणशक्ती अतिशय तिव्र होती.
रात्री शय्यागारात महाराज आल्यावर आज युवराज्ञी सावित्रीने ज्ञानी व गुरुजनांचा सत्कार करुन प्रजाजनांना भोजन घातल्याचे महाराणींनी त्यांना सांगीतल्यावर ते अत्यंत समाधानी होऊन मनोमन धन्य झालेत.
एकदा बराच वेळ झाला तरी जवळपास राजकुमारी नाही, सर्व घाबरलेत, सगळीकडे शोधाशोध, धावपळ सुरु झाली. शेवटी उपवनाच्या टोकाला एका डेरेदार वृक्षाच्या पारावर पद्मासन घालुन, ज्ञानमुद्रेत डोळे मिटुन तेजस्वी व आनंदमय चेहेर्याने बसलेली दिसली.आणि तिच्या समोर पिवळाधमक नाग फडा उभारुन डोलत होता. त्याच्या दोन्हीही बाजुंनी दोन मयुर पिसारा फुलवुन नाचत होते. असंख्य रंगी बेरंगी पक्षी सुध्दा सामिल होते, दासीने हे भयंकर दृष्य बघीतल्यावर घाबरुन जीवाच्या आतंकाने धावत राणीमहालात पोहचुन बघीतलेला वृतांत कथन केला.
ऐकल्याबरोबर धावतच सोबत सैन्य, सेवक घेऊन उपवनातीव ती बसलेल्या वटवृक्षाजवळ पोहोचलेत. शांंतपणे सावित्री ध्यानस्थ होती पण सर्वांच्या हालचालीने व चाहुल लागल्याने नाग निघुन गेला. मोर पिसारा मिटवुन केकारव करत झुडपात गायब झाले. पक्षी कलरव करत उडुन गेलेत. या सर्व आवाजाने सावित्रीचे ध्यान उत्थान झाले. समोर शस्र सरसावलेले सैनिक, हातात मोठमोठे बगड घेतलेले सेवक व घामाघूम झालेल्या मातोश्री व दासी पाहुन सावित्री खळवळून हसु लागली. व विचारले, काय झाले? शत्रु आक्रमण झाले का? मातोश्रींनी पुढे झेप घेऊन मायेच्या ममतेने तीला कवेत घेऊन तीच्या सर्वांगावर हात फिरवु लागल्यात.
महाल्यात आल्यावर महाराज व राजगुरुंना ताबडतोब बोलावणे पाठविले. ते आल्यावर त्यांना सविस्तर घटना सांगुन राजगुरुंना अर्थ विचारल्यावर गंभीरपणे म्हणाले,”महाराणीजी, भितीचे कांहीच कारण नाही. सावित्री ‘देवांशसंभूत’ असुन जन्मतःच परमार्थाचे ज्ञानधन घेऊन आलेली आहे, ती खोल ध्यानावस्थेत परमात्मपदी लीन झालेली बघून नाग, मयूर तिच्यासमोर निर्भय होऊन, वैरभाव, द्वेशभाव विसरुन तिच्यासमोर आनंदोत्सव साजरा करुं लागले. हिंस्र श्वापदे सुध्दा अशा विभूतीपुढे र्क्रौर्य विसरुन नम्र, लीन, नतमस्तक होतात.
लवकरच शुभ मुहुर्त पाहुन सात वर्षाच्या सावित्रीला विद्या, ज्ञानशाखा व क्षत्रिय असल्यामुळे शस्रशास्राचे शिक्षण देण्याचे ठरविले. प्रथम लेखन, वाचन निसर्गनिरिक्षणापासुन सुरुवात करावी असे ठरविले.
राजगुरुंचे प्रस्थान झाल्यावर महाराज व महाराणी अंतर्कक्षात गेल्यावर दोघांनाही खुप भरुन आले. अशी गुणी कन्या मिळाल्याबद्दल खुप खुप धन्य! धन्य वाटले. तीला शिघ्रताशिघ्र उत्तम शिक्षण देण्याचा दोघांनीही संकल्प केला.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
……………………………………………………………………………………………………………………
!!! सावित्री !!!
भाग – १२.
राजा द्युमत्सेन आणि महाराणी शैब्यादेवीला सत्यवानासह तपोवनात येऊन एक वर्ष झाले. सत्यवान वनवासी जीवनांत चांगलाच रुळला. सत्यवान हा रुपसुंदर, सामर्थ्यवान, खेळण्यांतही चापल्य, चातुर्य व निगर्वी असुन सर्वांमधे ऊठुन दिसत होता. बरोबरीच्या सर्व मुलांशी समानतेने, सहिष्णुतेने व प्रेमाणे वागत असल्यामुळे सर्वांचा तो अत्यंत प्रिय झाला होता. तो आठ वर्षाचा झाल्यामुळे त्याला योग्य शिक्षण देण्याविषयी द्युमत्सेन शैब्यादेवीचा विचार निश्चित झाला.
एके दिवशी मित्रांसोबत नदी किनार्यावर गेले असतां तिथल्या मऊ मातीचे सुंदर सालंकृत पांच अश्व बनविले. सायंसंधेसाठी नदीवर आलेल्या गौतममुनींना सत्यवानाने मातीचे डौलदार बनविलेले सुंदर पांच अश्व पाहुन चकित झालेत. मुनींनी “चित्राश्व” असे आणखी एक नांव ठेवले. ही वार्ता संकुलभर पसरली. मधुर आणि प्रेमळ शब्दांद्वारे आर्य व देवींनी सत्यवानावर अनेक उत्तम संस्कार करीत होते.सर्वांशी मैत्रीपुर्ण प्रेमाने वागावे, मदतीचा हात सदैव पुढे असावा अभिमान, क्रोध यांच्या आहारी न जाता विवेक व संयम बाळगुन सर्वांशी विनय आणि आदराने वागावे, सत्यवान दिवसेंदिवस गुणसंपन्न घडत होता.
सत्यवानाला वनाची पुर्ण माहिती झाली. वनांत जाऊन मधुर फळे, कंदमुळे, समिधा आणण्यात पारंगत झाला. आश्रमकुमारांना गौतममुनी शिकवित असतांना हा मनःपुर्वक जसेच्या तसे स्मरणात ठेवत असे. अत्यंत बुध्दीमान असुन तो एकपाठी होता. एकदा गौतमत्रृषी शिष्यांना अथर्व वेदातील एकोणिसाव्या कांडातील पहिली त्रृचा शिकवित होते. उदात्त स्वरांचे उच्चारण कसे म्हणावे, स्वरीत स्वरातील आणि अनुदत्त स्वरातील अक्षरे कशी म्हणायची हे पाठांतर सांगुन त्यांना कांही काम आठवले म्हणुन ते बाहेर गेलेत.
हे सर्व सत्यवानाचे मुखोद्गत झाले. त्रृषी बाहेर गेल्यावर मुलं चुकीचं म्हणत आहे हे पाहुन हे पाहुन तो मुलांना म्हणाला, वेदत्रृचांचे सामर्थ्य अचूक आणि स्पष्ट असते. शब्दांचा उच्चार निर्दोष, योग्य व कर्णमधूर असावा, असे म्हणत त्याने वेदत्रृचा स्पष्ट, स्वच्छ, उदात्त, स्वरीत, अनुदात्ता स्वरांचा उपयोग करुन बिनचुक म्हणु लागला. शिष्य आवाक होऊन ऐकत असतांना गौतमत्रृषींचे आगमन दाराजवळ झाले. चकीत होऊन सत्यनाची ओजस्वी, तेजस्वी हस्तमुद्रा, योग्य ताल, व स्पष्ट उच्चार ते बघतच राहिले. आता याचे शिक्षण सुरु करण्याची वेळ आली आहे, हा विचार करुन त्याच्या माता-पित्याकडे जाऊन मनोदय व्यक्त केला.
गौतमांचा मनोदय ऐकुन त्यांना अतिशय आनंद झाला. गौतम म्हणाले, शिक्षण सुरु करण्यापुर्वी एका शुभ मुहुर्तावर त्याचा उपनयन विधी, स्वतः गौतमत्रृषी, प्रमुख आचार्य, इतर त्रृषी त्यांच्या पत्निसह, मंत्रोच्चारांच्या ध्वनीत संपन्न झाला. आचार्यांनी त्याच्या कानात गायत्रीमंत्र सांगीतला. नंतर या बालब्रम्हचारीने “भिक्षां देही” म्हणत मातेपुढे झोळी पसरली. सरस्वतीचा आशिर्वाद असावा म्हणुन मेधाजनन विधि झाल्यावर मौजीबंधन कार्यक्रम पुर्ण झाला. बारा वर्षानंतर समावर्तन संस्कार अर्थात सोडमुंज करण्याचे ठरविण्यात आले.
नियोजीत दिवशी शुभ मुहुर्तावर सत्यवानाचा विद्यारंभ सुरु झाला. तिव्रबुध्दीचा सत्यवान लवकरच पाठशाळेत रमला. दोन वर्षाचा कालावधी वायु वेगाने सरला. त्यानंतर त्याला शस्रास्राचे शिक्षण सुरु झाले.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
……………………………………………………………………………………………………………………
!! सावित्री !!
भाग – १३.
तपोवनातील वास्तव्याला १२ वर्षे पुर्ण झालीत. आर्य द्युमत्सेन या कालावधीत मोठ मोठी तपं करण्यात मग्न असे व देवी शैब्या पतीची सेवा, सत्यवानावर योग्य संस्कार, तो शक्तीवान, बलवान व्हावा यासाठी आहार बनवणे, यांत मग्न असत. सत्यवान बारा वर्षात अनेक विद्या संपादन करत नाना विषयात जसे— औषधी वनस्पती, आरोग्यव्यवहार पध्दती, निसर्गज्ञान मधे पारंगत झाला. वेदादी अनेक ग्रंथाचे प्रथम संथा आणि १२व्या वर्षापासुन अर्थसंस्कार पध्दतीने ज्ञान मिळवले.
तसेच धनुर्विद्या, खड्गविद्या, मल्लयुध्द या क्षत्रिय तसेच अस्र विद्येतही तो पारंगत झाला, तो देखणा राजबिंडा, पीळदार सामर्थ्यसंपन्न शरीर, मुखावर ज्ञानाचे तेज असा रुपसंपन्न तरुण दिसत होता, लहान थोरांशी नम्रतेने प्रेमाने वागत असल्यामुळे सर्वच आश्रमवासीयांचा अत्यंत प्रिय असुन तो जगन्मित्र, सर्वगुणसंपन्न सर्व विशारद असा श्रेष्ठ वाटत होता.
एकदा पवनत्रृषींचा वृषभ उधळुन सर्वीकडे नुकसान, मोडतोड करीत, दोघांतिघांना शिंगे मारत दक्षिणेकडे धावत गेल्याचे २-३ घाबरलेले आश्रमकुमार सांगत आले. जनतेचे रक्षण करणें या क्षात्रधर्मानुसार सत्यवान कटीबंध होऊन माता-पित्याला वंदन करुन पुष्ठ उधळलेल्या बैलाला आवरायला त्वरेने निघुन गेला. दक्षिणेकडे थोड्याच अंतरावर रागाने बेभान झालेल्या वृषभाला सत्यवान दिसल्याबरोबर शिंगे उभारुन वेगाने सत्यवानाकडे धावला. तयारीत असलेल्या सत्यवानाने पवित्रा घेऊन वृषभाचे दोन्ही शिंगे घट्ट पकडुन मानेला हिसडा देत गोल गोल वेगाने फिरवू लागला, शेवटी वृषभ थकला, डोळ्यांतील हिंस्र, कृध्द भाव जाऊन, दया, याचना दिसु लागली. निर्बल झाला तो, सत्यवानाने त्याची शिंगे सोडली व प्रेमाने कुरवाळून पाणी पाजले व कासरा बांधला. पवनत्रृषींच्या आश्रमाच्या प्रांगणात आणुन बांधले. मोठ्या संकटातुन वाचवल्याबद्दल पवनत्रृषींनी कृतज्ञता व्यक्त करुन सत्यवानाची पाठ थोपटली. आणि सुवर्णी वेलबुटीचा रेशमी शेला, जो त्यांना यज्ञास्तव एका राजाने दिला होता तो आशिर्वादपर म्हणुन त्याला भेट दिला, गौतमांनी सुध्दा साधु! साधु! साधु! म्हणत कौतुक करत आशिर्वाद दिला,
त्रृषी द्युमत्सेनला म्हणाले, आता सत्यवानाचा समावर्तन अर्थात सोडमुंजीचा कार्यक्रम उरकवुन टाकुया! आश्रमांतील सर्व त्रृषीपत्नींनी स्वतःच्या घरचेच कार्य समजुन हिरीरीने भाग घेऊन कामे करुं लागल्यात. दुसर्या दिवशी पहाटेच सडासंमार्जन, रांगोळ्या, तोरणे सजावट केली. दिवसाच्या पहिल्या प्रहराला सोडमुंजीचा विधी सुरु झाला. पुण्याहवाचन,भातृकापुजन! समावर्तीय हवन होऊन मंत्रोच्चारात अग्निला समिधा अर्पण केली. सर्व विधी आटोपल्यावर मिष्टांन्नाचे जेवण करुन सर्व तृप्त झालेत.
सत्यवान आता गृहस्थधर्म स्विकारण्या योग्य झाला.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख,
……………………………………………………………………………………………………………………
!! सावित्री !!
भाग – १४.
इकडे अश्वपतींनी सावित्रीला विविध शाखेचे शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या आचार्यांची नेमणुक केली व त्या सर्वांनी सुध्दा अशा गुणवान कन्येला शिकवण्याची सहर्ष अनुमती प्रदान केली. जसे… वेदांची संथा — अचार्य ज्ञानानंदश्री, गायनादी करितां — नामांकित सुरगंधर्व, वादन — अचार्य शिवानंदश्री, शस्त्रास्र — गुरुवर्य श्री समर्थ्य, चौसष्ट कलातील विद्येसाठी आचार्य कुलभुषण!
पुढील महिण्याच्या वर्षप्रतिपदेच्या शुभमुहुर्तावर प्रथम सर्व गुरुवर्यांचे सन्मानपुर्वक गुरुपुजन करुन राजगुरुंशी सल्लामसलत करुन तीच्या शिक्षणास सुरुवात करण्याचे ठरविले. विद्याजर्नाचा आरंभ गुरुपुजनाने होईल म्हणुन सावित्रीला अतिशय आनंद झाला. वर्षप्रतिपदा हा सावित्रीच्या जीवनांतील भाग्यदिन! सावित्री सालंकृत सजुन पुजेला सज्ज झाली. पांचही गुरुंचे शास्रानुसार यथासांग गुरुपुजन झाले.सर्व आचार्यांनी प्रत्येकी कोणती विद्या शिकवणार या बद्दलची थोडक्यांत माहिती सावित्रीला दिली.
सर्व विद्या मनापासुन आत्मसात करीनच असे आश्वासन सर्व गुरुंना देऊन राजगुरु, राजपुरोहित, सर्व आचार्य, माता-पिता या सर्व वडीलधार्यांना नतमस्तक होऊन नमन केले. सर्वांनी आशिर्वाद दिला. शुभं भवतु! शुभं भवतु! शुभं भवतु!
पांचही आचार्यांची खास त्यांच्यासाठी बांधलेल्या भव्य प्रासादात कुटुंबासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली, सावित्रीचा सर्व विषयांचा नियमित विद्याभ्यास सुरु झाला. वेदशिक्षण, गायनकला, वाद्यवादनकला, कला, असे नियमित वर्ग सुरु झालेत. चार वेदांचे गुरुवाणी ऐकता ऐकता सावित्री इतकी तल्लीन झाली की, तीच ज्ञानरुपीणी दिसुं लागली. सावित्रीच्या शिक्षणाला चार वर्षे पुर्ण झाली.
आजपासुन सावित्रीला शस्र-अस्र विद्या शिकवण्यास आचार्य श्रीसमर्थांनी आरंभ केला. ती क्षत्रिय कन्या असल्यामुळे तीला या विद्येचे विशेष अकर्षण आणि ओढ होती. तिच्या शस्र शिक्षणाची व्यवस्था एका बंदिस्त प्रांगणातील विशाल कक्षात, जिथे सर्वच प्रकारची शस्रे होती तिथे केली. गुरु आचार्य समर्थ व सावित्रीने शस्रागारात प्रवेश केल्यावर ते आपल्या कणखर वाणीत सांगु लागले, “सावित्री! शिष्ये! ही सर्व शस्रे आणि शस्रविद्या निरपराध, अपंग! शरणार्थी, दिनदुबळे व पशु यांचेवर कधीही चालवू नये. उलट स्वरक्षण, सज्जनांचे रक्षण, सामान्य जनतेचे, पशुपक्षी, चराचर यांच्या रक्षणासाठी चालवल्यास क्षात्रधर्माचे रक्षण होईल ही शपथ घेऊनच शस्रांना स्पर्श कर!
नंतर त्यांनी खड्ग,तोमर, गदा, भल्ल,भृशुंडी, मुसल, शतहनी, परिघ, अग्निकंकण, चक्र, शरचाप या सर्व शस्रांचा केव्हा उपयोग करायचा बद्दल विसृत माहिती दिली. तसेच वेगवेगळ्या शरां(बाण) बद्दल—सूची, जिध्म, गजास्थी, चंद्रमुख, बास्तीक याबद्दलचेही बारकावे तीला समजावुन सांगीतले.
आतां अस्रांबद्दल ऐक! अस्रे ही शस्रांपेक्षांही प्रभावी असतात. मंत्रसिध्दीने ही शक्ती न भूतो न भविष्यति असा परिणाम होऊन युध्दभुमीवर वरुण, वायु, अग्नि, पाशुपत, नारायण आणि ब्रम्हास्र ही अस्रे वापरली जातात. याशिवाय अश्वारुढ होऊन वायुप्रमाणे, अश्वगतीने सारथ्य करणे, रथनडीत बैठक कशी असावी, हातात वेग घेऊन कितपत व किती खेचले म्हणजे रथ गतिमान होईल याचीही माहिती असणे अवश्यक आहे. शस्रांचा उपयोग म्हणजे प्राणांशी गाठ! म्हणुनच शस्रांचा वापर विचार पुर्वक, धर्मबुध्दीने, विवेकपुर्णतेने करणे आवश्यक आहे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
……………………………………………………………………………………………………………………
!! सावित्री !!!
भाग – १५.
सावित्रीला शस्र, अस्रांबद्दल आचार्य विसृत माहिती देत होते. आणि सावित्री मात्र सर्व शस्रे, आयुधे हाताळून पाहत होती. तीने सर्व सामार्थ्य एकवटवून एक गदा उचलेली पाहुन ते अचंबीत झाले. सावित्रीच्या शिक्षणाला दहा वर्षे पुर्ण झालीत. या कालावधीत तीने वेद, वेदांगे ब्राम्हण अरण्यके, उपनिषदे यांचे उत्तम ज्ञान प्राप्त केले. सतरा वर्षाची सावित्री इतर विद्यार्थ्यांपेक्षा दोन वर्षे आधीच वेदादीविद्यापारंगत, सर्वाकला संपन्न, वादन विद्याप्राविण्य अणि शस्रादापी पारंगत झाली.
सतरा वर्षाची सावित्रीच्या शिक्षणाला दहा वर्षे पुर्ण होऊन सर्व विद्याविभूषित झाल्यामुळे त्याप्रित्यर्थ विशाल मध्यमहालात सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात अक्षय तृतीयेला शिक्षण समाप्तीच्या घोषनेने गुरुपुजन करण्यासाठी तीने दासीच्या मदतीने विशेष साजश्रृंगार केला. सावित्रीने प्रथम ज्ञानानंद आचार्य, नंतर आचार्य सूरगंधर्व, कलाभूषण, शिवानंद! श्रीसमर्थ यांचे क्रमाने मनोभावे पुजन करुन सर्वांना भरगच्च फुलांचे हार घातले, सुवर्ण जरीचे वस्र व दक्षिणेच्या धनपोटल्या दिल्यात.
आचार्य ज्ञानानंद उभे राहुन बोलु लागले, काळ कोणासाठीही थांबत नाही. दहा वर्षाचा काळ संपला असे वाटतच नाही. प्रत्येक दिवस आनंदमयी होता, एकीकडे उद्यापासुन सावित्री शिष्योत्तमेची ज्ञानमयी मुर्ती दिसणार नाही याचा खेद, तर सावित्री परिपुर्ण ज्ञानवंत झाली हा आनंद!
एकदा सावित्रीने रसाळ मसालेदार पदार्थ बनवला. तीची परिक्षा बघायच्या उद्देशाने तीच्या नकळत त्या पदार्थात लवण घातले व तीला चव घेण्यास सांगीतले. पदार्थ खारट झाल्याचे लक्षात आल्यावर तीने तुपावर कांदा परतला, थोडे पाणी वाढवुन थोडे पोहे घातले. त्यामुळे रस्सा तर घट्ट झालाच पण निराळाच चविष्ट पदार्थ तयार झाला. पदार्थ बिघडल्यावर हताश, निराश, दुःखी न होता बुध्दी कौशल्याने त्यात नाविन्य निर्माण केले. आचार्य ज्ञानानंदांनी तीला “कलारत्न” ही पदवी बहाल केली.
हातात खड्ग घेऊन, अश्वारुढ सावित्री वायुवेगाने जातांना बघुन असे वाटे की, ही गती वायुची? अश्वाची? की, अश्वारुढ सावित्रीचा? खड्ग चालवतांना तिचे चापल्य, भल्लफेकीत अचुक लक्ष गाठणारी, सुक्ष्म लक्षावरही अचुक शरसंधान करणारी, लिलया गदा फिरवणारी सावित्रीचे विविध रुपे, तसेच व्यूहरचना, डावपेच, साम, दाम, दंड, भेद इत्यादी विशेष युध्दनितीमधेही ती निपुन झाल्यामुळे ” सदरक्षणाय खलनिग्रहणाय” ही पदवी मिळाली. श्री विजयी भव! असा आशिर्वाद समर्थांनी तीला दिला.
महाराज अश्वपतींनी पांचही आचार्यांना त्यांच्यासाठी बांधलेले महाल त्यांना अर्पन करुन त्यांना तिथेच राहण्याची विनंती केली. त्यांची स्विकृती मिळाल्यावर सावित्रीने पांचही अचार्यांसमोर एक प्रस्ताव ठेवत म्हणाली, आपण तर मला विद्यावती, कलावती केले, पण अशा अनेक भगिनी आहेत की, त्यांना गृहस्थी सोडुन उच्च शिक्षण घेणे अवघड जाते, म्हणुन इथेच नगर, ग्राम मधील भगिनींना सर्व विषयाचे शिक्षण घेता यावे म्हणुन इथेच विद्यालय व त्यांना राहण्यासाठी वसतीगृहाची सोय करुन ज्यांना ज्या कलेत आवड, रुची असेल ती विद्या देऊन त्यांना सुशिक्षित आणि समर्थ करावे.
तिचे हे अनोखे रुप, आणि विचार पाहुन येत्या चार मासात विद्यालय तयार होईल अशी घोषणा केली. महाराजांच्या निर्णयाने भावी सावित्री विद्यापीठाची” जणुं नांदीच झाली. कांही महिन्यांतच “सावित्री विद्यापीठ” उभारले जाऊन त्याचे भव्य उद् घाटन झाले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
!!! सती सावित्री !!!
*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे
–

