कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!
!!! श्रीकृष्ण !!! भाग – २१.
मथुराशहराभोवती मजबुत कोट असुन,भोवती रुंद खोल खंदक असल्या मुळे शहर अगदी सुरक्षित,शिवाय अन्न धान्य व इतर जिवनावश्यक वस्तुंचा भरपुर साठा होता.शत्रुकडील वीर खंदक ओलांडुन तटावर चढत आहेसे पाहुन यादववीर निकराचा प्रतिकार करुं लागले भयंकर रणकंदन माजले.याप्रमाणे २७ दिवस हे घनघोर युध्द अव्याहत चालले. अठ्ठाविसाव्या दिवशी बलरामच्या नेतृत्वा खाली शिनि,अनावृष्टी,बभु,वगैरे यादव वीर आपल्या अर्ध्या सैनिकासह दक्षिण दरवाज्याबाहेर पडुन मगधसैन्यावर तुटुन पडले.तेथे स्वतः जरासंध,चेदिपती,शाल्व शल्य असे अनेक उत्तरेकडील शूर राजे होते.त्यांची व यादववीरांची भयंकर लढाई जुंपली.जरासंधाकडे असलेल्या अत्यंत बलाढ्य मल्ल हंस व डिंभकापैकी डिंभकाची व बलरामाची लढाई सुरु झाली. अखेर थकलेल्या डिंभकाला उचलुन जोराने आपटल्याने तो बेशुध्द होऊन निचेष्ट झाला.जो अजेय अवध्य डिंभक बलरामाकडुन मारल्या गेले असे वाटुन हंसाने दुःखाने व संतापाने यमुनेत उडी टाकुन आत्महत्या केल्याचे ऐकुन डिंभंक शुध्दीवर आल्यावर त्यानेही यमुने त उडी टाकुन त्यानेही जलसमाधी घेतली त्यामुळे जरासंधाचा जोर कमी झाला.
इकडे श्रीकृष्ण उरलेले अर्धे सैन्य घेऊन पश्चिम दरवाजाबाहेर पडुन समोर भिष्मक,रुक्मी,देवक इत्यादी दाक्षिणात्य राजांबरोबर न भूतो न भविष्यती असे भयंकर युध्द झाले.प्रचंड रणकंदन होऊन रक्ताच्या नद्या,प्रेतांचे ढीग पडले,जणुं पृथ्वीचा अंत होतो की काय असे वाटुं लागले.श्रीकृष्णाने नवीनच संपादन केलेल्या धनुर्विद्येने विलक्षण पराक्रम करुन रुक्मीला व इतर पराक्रमी वीरांना अशक्षरशः पळायला लावले.दोन्ही दिशां च्या रथी महारथींचा राम-कृष्णाने पराभव करुन यादववीर विजयाचा सिंहनाद करीत मथुरेत परतले.विजयाची आशा सोडुन उरलेले सैन्य व इतर राज्यांसह मगध देशाकडे पलायन केले.तब्बल २८ दिवस युध्द करुन मथुरा जरी मुक्त झाली तरी यादववीर गाफील राहिले नाहीत, कारण जरासंध परत चाल करुन येईल याबद्दल शंका नव्हती,त्यामुळे तुटफुट झालेल्या कोटाची व खंदकाची दुरीस्ती व धनधान्याचा मुबलक पुरवठा करुन ठेवुं लागले.यादवांनी कल्पना केल्याप्रमाणे थोड्याच दिवसांत जरासंधाने तयारी करुन मथुरेवर पुन्हा चालुन आला,पण यावेळी जरासंधा जवळ अगणित सैन्य व अनेक राजे अनुकुल होते,त्यामानाने याद वांची संख्या कमी असुन बाहेरील कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता नसल्यामुळे मथुरेतील जनता व यादव थोडे घाबरले,पण त्यांचा कृष्णावर दृढ विश्वास होता.तरी पुर्वी कंस बलिष्ठ असल्यामुळे,त्याच्या कारर्दीत मथुरेच्या संरक्षणाची विशेष तजविज केलेली नव्हती.नुकत्याच झालेल्या युध्दामुळे, ढासळलेली तटबंदी अजुन पुर्ण दुरुस्त झालेली नव्हती.खंदकातील पाणी स्वच्छ व्हायचे होते.हत्यारे निकामी झालेली, अशा परिस्थितीत यावेळी जरासंध अफाट सैन्यानिशी येत असल्यामुळे, मथुरेला एक दिवस देखील वेढा सहन करण्याचे त्राण उरले नाही.बाल्यावस्थेत असलेल्या व नवीन उदयास येत असले ल्या राष्र्टाचा व जनतेचा सर्वस्व नाश होईल, तेव्हा हे केशवा! तू आमचा नायक व रक्षणर्ता आहेस.तुझ्या सांगण्यानुसार आम्ही वागण्यास तयार आहोत.विकद्रु नावाच्या जेष्ठ व श्रेष्ठ सरदाराने सद्यस्थिती समोर ठेवल्यावर,वसुदेवांनी सुध्दा समर्थन केल्यावर,गंभीरपणे पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणाला,राज धर्मानुसार राजाने संधी,विग्रह,यान,आसन,दुही व आश्रय या गोष्टींचा विचार करुन दुर्बलाने बलवंता चे सानिध्य टाळावे.प्रतिकुल काळ आल्यावर पलायनाचा मार्ग अवलंबवावा. जरासंधाचे शत्रुत्व फक्त माझेशी आहे, मी समर्थ असुनही सर्वांचे हित लक्षात घेता, नितीस अवसरुन बलरामदादासह मी सह्याद्रीने युक्त असलेल्या शोभिवंत दक्षिण प्रदेशात जाऊ,त्यामुळे अनायसे करवीर व क्रौंच नगर व गोमंतक या श्रेष्ठ पर्वताचे दर्शनही होईल.
आम्ही मथुरेत नसल्याचे समजतांच, जयाच्या मदाने चढलेला जरासंध इथे न येता निश्चितच आमच्या पाठलागावर शोधत सह्यांद्रीवना पर्यत येईल,त्यामुळे मथुरा सुरक्षित राहिल.जरासंधाचा रोष माझेवर असल्याने मीच इथुन जाणे उचित ठरेल.विकद्रु म्हणाला,यदुला नाग कन्येपासुन झालेली- मुचुकुंद,पद्मवर्ण, सारस व हरित या चार पुत्रांनी विंध्याद्री च्या दक्षिणेस चार राज्य स्थापन केलीत, त्यांच्या आश्रयाने कांही दिवस तूं राहु शकतोस.मुचुकुंदाने ऋक्षवाण पर्वताच्या आश्रयाने महिष्मती व पुरिका अशी दोन शहरे वसविली.सह्यांद्रीच्या पठरावर वेणा नदीकाठी “करवी” नावाचे नगर पद्मवर्णा ने बसविलेल्या नगरास पद्मावत नांवाने ओळखल्या जाते.सारसने क्रौंचपूर नगर दक्षिणेच्या वनांत वसविलेल्या शहरास वनवासी असे म्हणतात.हरितने समुद्र किनार्यावर राज्य स्थापन केले.तेथील कोळी समुद्रातुन मोती,शंख,प्रवाळ रत्ने आणुन देतात.या देशाला रत्नदीप म्हणतात.ही चार यादव राज्ये दक्षिणेस नांदत आहे.विकद्रु व वसुदेवाच्या सल्ल्या नुसार बलराम कृष्ण दक्षिणेकडे निघालेत
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – २२.
बलराम-कृष्ण स्वतःच्या इच्छेनुसार वेगवेगळी रुपे घेऊन दक्षिण दिशेच्या अनुराधाने मार्गक्रमण करीत असतां त्यांना मार्गात अनेक राष्र्टे लागली थोड्याच अवकाशांत ते सह्याद्रीच्या सानि ध्यात सुशोभित दिसणार्या यदुवंशीय अलंकृत ‘करवीर’ नगराजवळ येऊन पोहचले.तेथे वेणा नदीच्या तिरावर जुनाट व प्रचंड विस्तारलेल्या वटवृक्षाखाली एक तेजःपुंज भार्गवराम,खांद्यावर परशु व अंगावर वल्कले धारण केलेले गौरवर्णीय तेजाने प्रतिसूर्यच! ज्याने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती ते आद्यवेद गुरु बसले होते.राम-कृष्णांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवुन हात जोडीत श्रीकृष्ण म्हणाला, भगवान! आपण जगमदाग्नि पुत्र भार्गवराम,सर्व ऋषींमधे अग्रगण्य असुन केवळ एका बाणाने समुद्रसीमा हटवुन पश्चिम समुद्राच्या तिरावर सह्यांद्री च्या निबिड अरण्यात एक थोरला अति रम्य असा एक देशच निर्माण केला.पित्या च्या वधाचा सूड घेण्यासाठी कार्तवीर्य सहस्रार्जुनाचे बाहु आपल्या परशुने छाटुन टाकले.असे आपण परशुराम आहांत. यावर किंचित हसुन परशुराम म्हणाले, सर्वशक्तीमान कृष्णा!मथुरातील इंतभूत वार्ता मला ज्ञात आहे.त्यामुळे तुमच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी सगळे शिष्य पुढे पाठवुन पश्चिम समुद्रतीरावरुन नुकताच येऊन तुमची वाट पाहत बसलो आहे.हे कमलनयना! गोकुळातील १६ वर्षाचे वास्तव्य,तिथल्या तुझ्या लीला, मथुरेतील कंसाचा व इतर दानवांचा केलेला वध हे सर्व मी जाणतो.
पुरुषोत्तमा!तुझा व बलरामाचा जरासंधाशी असलेला विरोध जाणुनच मी इथे आलो आहे.कृष्णा! तूं जगताचा प्रभु व पालक असुन देवकार्यार्थ पृथ्वीवर अवतारला आहेस.वासुदेवा!त्रिभुवनांतील तुला माहित नाही अशी एकही गोष्ट नाही. तरी मी भक्तिभावाने जे सांगतौ ते ऐक…
गोविंदा! पुरातनकाळी तुझ्याच पुर्वजांनी हे करवीरपुर व भोवतालचे राष्र्ट बसविले होते,पण शुगाल नामक राजाने सर्वांना मारुन राज्य बळकावले.तो अत्यंत रागीट,गर्विष्ठ,संयमरहित असल्या ने इथे न थांबता,वेणा नदी पलिकडे यज्ञगिरी नावाचे सह्याद्रीचे शिखर आहे तिथं आजची रात्र मुक्काम करुन उद्या खटवांग नदीचा धबधबा पाहु.तिथुन जवळच असलेल्या तपोवनातील ऋषींचे दर्शन घेऊन पुढे जाऊ या!जातां जातां तुझ्याच कुळातील महाकपी नामक मोठा धार्मिक राजा,त्याची प्रजा वानर असली तरी सुखी व संपन्न असलेल्या क्रौंचपुरला भेट देऊन पुढे आनहुड तिर्थावर जाऊन विश्रांती घेऊ या.दुसरे दिवशी त्यांनी अनेक शिखरे असलेला,प्रति मेरुच दिसत असलेला गोमंत पर्वत गाठला.
परशुराम पुढे म्हणाले,या गोमंत शिखराचा आश्रय घेऊन तुम्ही निकराने युध्द केले की,जरासंध गर्भगळीत होईल, आणि दुर्गयुध्दाच्या पध्दतीने जरासंधाला जिंकाल.त्यासाठी थोड्याच अवधीत आयुधेही प्राप्त होतील.कृष्णा! अरे इथे यादव व तुम्ही उभय भ्रात्यांबरोबर जरासंधादी राजांचे घनघोर युध्द होईल असा मला दैवी संकेत मिळाला आहे. माधवा!या संग्रामासाठी चक्र,कौमोदकी, गदा,सौनंदमुशल ही विष्णुंची चार आयुधे प्रगट होऊन भिषण संग्राम होईल.कृष्णा! हा संग्राम ‘चक्रमुशल’ संग्राम नांवाने प्रसिध्द होईल.वासुदेवा!परमेश्वरी संकेता ने व कृतांत काळाच्या आज्ञेने घडुन येणार असल्याने या संग्रामाला “काळाचे आदेश” असेही नांव प्राप्त होईल.कृष्णा! या संग्रामात तुझे मुळरुप (विष्णु)सर्वांच्या दृष्टीस पडेल.कृष्णा! जिथे ही आयुधे प्राप्त होतील ते ठीकाण इथुन जाण्यापुर्वी मी दाखवुन देईन.कृष्णा!मला जे सांगाय चे होते व ज्यासाठी मी एकटाच तुमच्या साठी थांबलो होतो,ते कार्य संपले.
कृष्णा!तू अजय असल्यामुळे कोणीही लढण्यास आले तरी जय तुमचा च आहे.एवढे बोलुन शूर्पारक नगरात दोघांनाही आशिर्वाद देऊन रवाना झाले.
परशुराम गेल्यावर राम-कृष्णांनी राहण्यासाठी आश्रमवजा झोपडी बांधुन मोठ्या आनंदाने राहु लागले.दिवस आनं दात घालवत,भाकित केल्याप्रमाणे जरासंधाची वाट पाहु लागले.आणि एके दिवशी जरासंध अफाट सैन्यासह येतांना त्यांना दिसले.
बलराम-कृष्ण रहायला आल्यावर, तिथे वस्तीला असलेले वनचर त्यांचे विश्वासु भक्त,सेवक बनले.त्यातल्या कांहीना खाली जरासंधाच्या गोटात मिसळुन तेथील इतंभुत माहिती काढुन आणायला पाठविले.दोघे विचार विनिमय करीत असतांना खाली गेलेले हेर परत येऊन जरासंधाचा बेत कथन केला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !! भाग – २३.
हेरांनी बातमी आणल्यानुसार या डोंगराच्या चारही बाजुस आग लावुन दोघांनाही जाळुन मारण्याचा सल्ला शिशु पालने दिल्याचा जरासंधाचा बेत कळल्या वर तिथल्या रहिवास्यांना पलीकडील डोंगरावर तात्काळ जाण्याचा आदेश दिला.दुसर्या दिवशी सगळी अगणित सैन्यांनी गवत,शेण्या,लाकडे गोळा करुन दुसर्या दिवशी सकाळी पर्वताच्या सभोवार रचुन आग पेटवुन दिली.चोहो बाजुंनी आगीचे प्रचंड लोट आकाशाला भिडु लागले.सगळीकडे हाःहाकार माजला. मोठाल्या शिळांचे तुकडे उल्का प्रमाणे चारही बाजुस उडु लागले.डोंगरा तील धातु वितळुन त्याचे पाट वाहु लागले मोठमोठ्या वृक्षांचे प्रचंड निखारे खाली पडु लागले. मोठमोठे साप,श्वापदं,पक्षी गुदमरुन मरुन पडुं लागले.मेरुसमान सुंदर पर्वत दोन दिवस धगधगत होता. आगीच्या भयंकर तापाने जरासंधाचे सैनिक अर्धा कोस मागे हटले.आपल्या मुळे या सुंदर पर्वताची दुर्दशा झालेली पाहुन बलराम कृष्णाला अतिशय वाईट वाटले.आणि क्रोधायमान होऊन,श्रीविष्णु चे हे दोन योध्दे आपापली आयुध्यानिशी शत्रुसैन्यावर तुटुन पडले.शेवटी पराभूत जरासंध व इतर राजांनी उरलेले सैन्य घेऊन तेथुन पळ काढला.दोघेही विजयी बंधु क्रौंचपुरला परत आलेत.
तिथले शिशुपालचे पिता दमघोष व क्रौंचपुरच्या राजाने त्यांच्या अद्वितिय पराक्रमाची तारीफ केली.चेदिपती दमघोषाला श्रीकृष्णाची सख्खी आत्या, वसुदेवाची बहिण दिली असल्याने शिशूपाल हा कृष्णाचा आतेभाऊच! या संबधाची आब राखुन दमघोषाने जरासंध ची साथ सोडली.त्याने दोघा बंधुचा सत्कार करुन उत्तम वस्रालंकार,सैन्य,रथ देऊन सन्मानाने त्याची उत्तरेला मथुरेकडे रवानगी केली.राम-कृष्णांची पदयात्रा पुर्ण झाली.
गर्वाने फुगलेला व उन्मत्त झालेल्या शृगाल राजाच्या कानी या दोघांच्या पराक्रमांच्या व गोमंत युध्दाच्या वार्ता कानी गेल्या होत्या.त्याने “सावित्री” व्रत करुन सूर्याकडुन दिव्य रथ प्राप्त केला. त्या दिव्य रथात बसुन कृष्णाला युध्दाचे आव्हान केले.दोघांचे द्वैरथयुध्द सुरु झाले त्याच्याकडुन येणारे सर्व बाण श्रीकृष्णाने सहजतेने तोडुन टाकले आणि सुदर्शन चक्राने त्याची छाती फोडली.याप्रमाणे करविरच्या शृगाल राजा आपल्या गर्वाने विनाकारण युध्द करुन मरण पावला. श्रीकृष्णाने त्याच्या सर्व राण्यांचे सांत्वन करुन पद्मावतीच्या लहान मुलाला शास्रोक्त पध्दतीने राज्याभिषेक करवुन करवीरच्या राजसिंहासनावर बसविले.
श्रीकृष्ण बलराम नुसते विजयीच नव्हेतर धनुर्धर ही श्रेष्ठ पदवी प्राप्त करुन येत असल्याचे वृत्त कळल्यावर सारी मथुरा नगरी सजवुन वसुदेवांसह उग्रसेन व सगळे राजसेवक उत्तम पोषाख करुन सीमेजवळ सामोरे गेले.सोळा श्रृंगार केले ल्या स्रीया मंगल कलश व आरती घेऊन आपपाल्या दारांत स्वागतासाठी उभ्या राहिल्यात.दुतर्फा जमलेल्या हजारों लोक जयघोष व मंगल वाद्यांच्या गजरांत बलराम-कृष्णाने प्रवेश केला.सर्वप्रथम दोघांनी आपल्या मातापितांच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.
मथुरा नगरी निर्भय झाली.उग्रसेनच्या उत्कृष्ट कारभाराने मथुरा नगरी परत भरभसाटीस येऊ लागली.पाहतां पाहतां तीन वर्षे सरली हे कळलेही नाही. सर्व स्थीर स्थावर झाल्या वर आप्तांचा शोध घेऊ लागले,कारण कंसाच्या जुलमाने बंदीवासात बरीच वर्षे गेल्यामुळे ते नातलना दुरावले होते.शोध घेत असतांना आपली आत्या पृथा(कुंती) नुकतेच पंडुराजाचे निधन झाल्यामुळे आपल्या पांच पुत्रांना घेऊन निराश्रित अवस्थेत हस्तीनापुरच्या राजगृही आले. पांडुनंतर अंध धृतराष्र्ट मंत्रीमंडळाच्या सहाय्याने राज्यकारभार चालवित होते. श्रीकृष्णाने अक्रुराला कुंतीआत्या ला अश्वास्त करण्यासाठी पाठवले.नुकती च चेदिपती दमघोषची पत्नी,शिशुपालची आई,भाऊ वसुदेवाला भेटण्यास आलेली होती. तिच्या विनंतीवरुन श्रीकृष्णाने शिशुपालचे १०० अपराध माफ करण्याचे वचन दिले.व्रज वृंदावन सोडुन सात वर्षे झाली होती.या सात वर्षात सतत युध्दात गुंतुन जुलमी राजांचा बिमोड केला. सुरु वात कंसयुध्दापासुन झाली.पराभूत जरासंध स्वस्थ बसणार नाही ही जाणीव होती कृष्णाला!
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – २४.
एक दिवस कृष्ण बलरामाला म्हणाला, दादा! गोकुळ वृंदावन सोडुन सात वर्षे झाले.तूं शक्य तेवढ्या लवकर जाऊन पिता नंद व माता यशोदेला भेटुन सर्वांचे सांत्वन करुन यावेस असे वाटते. कृष्णाच्या इच्छेनुसार बलरामाने गोपवेषा त वृंदावनमधे प्रवेश केला.नित्याच्या परि चित वेशात बरेच दिवसांनी आलेल्या बलरामाला पाहुन सर्वांना खुप आनंद झाला.बलराम वाड्यात शिरल्याबरोबर खाटेवर बसलेल्या नंद व पडवीत बसलेल्या यशोदाला खाली वाकुन नमस्कार केला.दाटल्या कंठाने त्याच्या पाठीवर हात फिरवुन जवळ घेतले.
सर्व गोपगोपींना उद्देशुन बलराम म्हणाला,तुमचे निस्सिम,निर्हेतुक प्रेम, माया व भक्ती जी देवांना दुर्लभ ती आम्हा ला मिळाली.श्रीकृष्णाच्या आठवणीने सर्वांची अंतःकरणे सद्गदीत होऊन अश्रु धारा वाहु लागल्या. दुसर्या दिवशी सर्वां चे कसेबसे सांत्वन करुन जड अंतःकर णाने निरोप घेऊन सारथ्याला रथ हाकाय ची सुचना केली,
दोघांनीही तारुण्यात पदार्पन केले असल्यामुळे वसुदेव,देवकी,रोहिणीला त्यांच्या विवाहाची काळजी लागली.पण त्यावेळच्या प्रथेनुसार क्षत्रियांचा विवाह बहुधा स्वयंवराने किंवा समान दर्जाच्या कडुन कन्या सांगुन आली तरच विवाह होत असे. त्यामुळे त्यांना वाट पाहण्या शिवाय गत्यंतर नव्हते.एक दिवस सर्वत्र फिरणार्या गुप्तहेराने बातमी आणली की कौंडण्यपुरी असलेल्या भोजराजाचा जेष्ठ पुत्र रुख्मी याने आपल्या बहिणीच्या स्वयं वराची तयारी करुन सर्व राजांना आमंत्रित केले आहे. सर्व राजांना स्वयंव राचे निमंत्रण दिले पण आपल्याला नाही हा घोर अपमान आहे.विचारविनिमय करुन असे ठरले की,मथुरेच्या रक्षणार्थ बलरामाने थांबुन,निवडक सैन्यानिशी उग्रसेनादीसह कृष्णाने कौंडण्यपुराकडे निघावे.जरी श्रीकृष्णाला स्वयंवराचे निमंत्रण नव्हते तरी श्रीकृष्ण-रुख्मिणी एकमेकांसाठीच निर्माण झाली आहे, श्रीकृष्णाची अलौकिक व अद्भुत पराक्रम रुख्मिणीच्या कानी गेलेला व आपल्या पिता व बंधुने मुद्दाम वगळले हे पाहुन तिला अतिशय वाईट वाटले.त्या क्षात्र कन्येने मनोमन श्रीकृष्णाशिवाय दुसर्या कोणाला वरणार नाही हा दृढनिश्चय केला पण त्यांना निमत्रंण गेले नाही तर येईल का?तिची घालमेल सुरु होती.मनात ती धावा करीत होती.इकडे कृष्णाची स्थिती ही स्थिती वेगळी नव्हती.त्यानेही रुख्मिणीच्या सौंदर्य,गुणांची ख्याती ऐकली होतीच.ही आपल्या साठीच निर्माण झाली आहे.विदर्भ राजाचे निमंत्रण नसले तरी,क्षत्रियांना कन्याहरण करण्याचा अधिकार आहे.
उग्रसेनासह श्रीकृष्णाचा रथ सुर्या स्ताच्या वेळी भीष्मक राजाच्या नगरांत पोहोचला.नगराबाहेर सगळीकडे असंख्य शिबिरे पसरली होती.श्रीकृष्ण आल्याची वार्ता कळतांच भीष्मकचे जेष्ठ आप्त क्रथकौशिक त्यांच्या स्वागतास सामोरे जाऊन मोठ्या आदराने व सन्मानाने सुविधायुक्त शिबिरात आणले.
श्रीकृष्ण अवचित आल्याने सर्वीकडे खळबळ उडाली.
. विचारविनिमया साठी सर्व राजांची बैठक बसली.जरासंध म्हणाला,श्रीकृष्ण केवळ रुख्मिणीसाठीच आला हे निश्चित,पण श्रीकृष्ण ससैन्य आल्याचे समजल्यामुळे सगळीर्धाभिषिका राजा नसल्याने जर त्याने स्वयंवरात भाग घेतला तर,तो कितीही पराक्रमी असला तरी त्याला आपल्या बरोबरीने कधीही बसता येणार नाही,मग
परिणामाची पर्वा न करतां आम्ही क्षात्र धर्माने मरुं,अशी सर्व राजांची चर्चा सुरु असतांना भीष्मक,पुत्राच्या भितीने कांही न बोलतां स्तब्ध बसुन होता.आपला मदन्मोत्तपुत्रला परशुरामाकडुन अस्र प्राप्त झाल्याने उन्मत्त बनला आहे.कृष्ण द्वेषी व अभिमानी आपला पुत्र कृष्णाच्या हातुन जिवंत सुटेल असे वाटत नाही.पण आपली लाडकी कन्या रुख्मिणिला श्रीकृष्णच योग्य ‘वर’ आहे.तेवढ्यात रुख्मी उठुन उन्मत स्वरात गर्जत म्हणाला कांही झाले तरी माझ्या बहिणीस कृष्णाला वरुं देणार नाही.अशा चर्चेत पहाट झाली. सुर्योदय होताच क्रथकौशिक राजाने श्रीकृष्णाला मूर्धाभिषेक करुन आपले राज्य अर्पण केले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !! भाग – २५.
श्रीकृष्णाच्या अभिषेकाची वार्ता कळताच,संतापुन बरेचसे राजे आपल्या सैन्यासह आपपाल्या देशाकडे निघुन गेले अर्थात रुख्मिणीने स्वयंवर रहित झाल्या मुळे तिने सुटकेचा निःश्वास टाकला. आणि श्रीकृष्णाशिवाय दुसर्या कुणालाच वरमाला घालणार नाही हा निर्धार पक्का झाला.क्रथकौशिकने अर्पण केलेले राज्य श्रीकृष्णाने त्या उदार राजा ला परत करुन आशिर्वाद देऊन प्रेमाने निरोप घेतला.श्रीकृष्ण मथुरेला निघाला तेव्हा बरेचसे राजांनी त्याला प्रेमाने निरोप दिला,त्यात भीष्मकही होते.रथात बसतांना मनोमनी रुख्मिणीला अभिवचन देत म्हणाला,मी लवकरच तुला घेऊन जाईन तूं फक्त माझीच आहेस.चिंता करुं नकोस
मगधाधिपती हिंदुस्थानचा सार्वभौम राजा जरासंध,विदर्भातुन अप मानीत होऊन भयंकर संतापुन देशी परतला.कालच्या पोराने,या कृष्णाने जागोजागी अवहेलना करावी? काय करावे?कसे पारिपात्य करावे?हं! त्याला कालयवनाची आठवण झाली.हा यवना धिपती यवनेंद्रच कृष्णाला भारी पडु शकतो.ठरलं तर!त्याने आपला मित्र शाल्वराजाला,कालयवनाचे मन वळवि ण्याची आग्रहाची विनंतीवजा सुचना केली.त्यानुसार शाल्वराजा कालयवना कडे जाऊन म्हणाला,पुत्रप्राप्तीच्या इच्छेने खडतर तपश्चर्या करुन शंकराकडुन वर प्राप्त करुन गार्ग्यमुनींनी मथुरा वासींना अवध्य असलेला तुझ्यासारखा पुत्र झाला.तूं अवध्य असल्यामुळे इंद्रही तुझ्यापुढे टिकुं शकले नाही,तेव्हा कृष्णाला जिंकण्यासाठी पश्चिमेकडुन तू आणि जरासंधाने पुर्वेकडुन मथुरेवर चाल केली तर कृष्णाचा सहज पराभव होईल. कालयवन मोठ्या आनंदाने तयार झाल्या वर एकमेकांना दृढांलिंगन देऊन शाल्व मार्गस्थ झाला.
ही बातमी गुप्तहेराकडुन कृष्णाला कळल्यावर,नुकतच भरभराटीस आलेल्या मथुरेस आपल्यामुळे विध्वंस होऊ नये म्हणुन ही नगरी सोडुन दुसरीकडे निघुन गेल्यास मथुरा वाचेल असा दोघा बंधुंचा विचार पक्का झाल्यावर, दुसर्या दिवशी भरलेल्या यादव सभेत एक नवी नगरी वसविण्याचा प्रस्ताव ठेवला. जरासंध सैन्यबलाने प्रबळ असल्यामुळे त्याच्याशी युध्दात आपण जिंकु शकत नाही तो अवध्य आहे आपल्याला.सर्वानु मते कृष्णासह सर्वांनी मथुरा सोडुन जाण्याचे निश्चित ठरले.तेवढ्यात कालयवन ससैन्य चढाईच्या तयारीने येत असल्याची वार्ता दुताने आणली.श्रीकृष्ण म्हणाला,आपल्याजवळ वेळ फार कमी आहे.सर्वांनी निघण्याच्या तयारीस लागावे.
पुर्ण तयारीनिशी सर्व यादव आपला परिवार,सामान,गजहत्ती,घोडे, पदाती,सैन्यासह पश्चिम द्वाराने बाहेर पडले.सर्वजण आनर्तहुन(गुजरात) पुढे सरकत समुद्रकिनार्या वर पोहोचले. तेथील नारळ,केतकीची असंख्य बने पाहुन,इथेच कुठे तरी नगर वसवावे हा विचार करीत कृष्णाने चौफेर नजर फिर वल्यावर,ताम्रमृतिकांनी युक्त चारही बाजु सागराने वेढलेला असा कुशस्थळी नावाचा विस्तीर्ण प्रदेश आढळला.जवळच रैवतक पर्वत असुन त्याची शिखरे मंदिरा सारखी प्रशस्त होती.याच पर्वतावर एकलव्य आणि द्रोणाचार्यांनी दीर्घकाल पर्यंत वास्तव्य केले होते.त्या सागरवेष्टीत रम्य प्रदेशावरच श्रीकृष्णाने “द्वारवती” नगरी वसविण्याचे ठरविले.श्रीकृष्णाने नेमुन दिलेल्या जागी सर्वांनी तात्पुरते राहण्यासाठी शिबिले बांधली.नगरा भोवती मजबूत कोट बांधण्यात आले.
द्वारवती स्थिरस्थावर होत नाही तोच कालयवन मथुरेवर चाल करुन जात असल्याची बातमी दूताने आणली.अवध्य कालयवन इथे आला तर,आतांच या नगरीचा विध्वंश करील,त्यापेक्षा त्याला मथुरेजवळ गाठावे असा विचार करुन एकटाच पायी निघुन निशस्र कृष्णाने त्याला मार्गातच घोलपुर जवळ गाठले. श्रीकृष्ण निःशस्र असल्याचे पाहुन कालयवनही रथातुन पायउतार झाला. त्याला पाहुन आपण भयभीत झाल्याचे दर्शवुन कृष्ण पळु लागला.श्रीकृष्णाचा पाठलाग करीत एकटा कालयवनही त्याच्यामागे पळू लागला.पळतां पळतां श्रीकृष्ण एका गुहेत शिरुन,तेथे त्रेतायुगा पासुन मुचुकुंद ऋषी निजलेले होते.देवा कडुन त्यांना वर मिळाला होता,जो कोणी त्यांना जागृत करेल,त्याच्याकडे पाहतांच तो भस्म होईल हे माहित असलेल्या कृष्णाने त्यांच्या अंगावर आपला शेला पांघरुन स्वतः लपुन बसला.पाठलाग करीत आलेल्या कालयवनाला हा कृष्ण आहे असे समजुन निद्रिस्त मुचुकुंद ऋषीला त्वेषाने लाथ मारल्याबरोबर ऋषी जागे झाले व संतप्त ऋषीने त्याच्याकडे पाहतांच कालयवन जळुन खाक झाला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

