शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 17: SHRADDHATRAY YOG:
Sartha Dnyaneshwari Adhyay 17 SHRADDHATRAY YOG:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥ अथ सप्तदशोऽध्यायः अध्याय सतरावा ॥ श्रद्धात्रयविभागयोग ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-28॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 433॥
अध्याय सतरावा
ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ सप्तदशोऽध्यायः – अध्याय सतरावा॥। श्रद्धात्रयविभागयोगः ।
1-17
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा । तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥1॥
ज्या जीवांवर तुझ्या स्वरूपसमाधीचा प्रसाद होत नाही त्यास हे चराचर विश्व सत्य वाटते, असे सर्व गणाधीशरूप श्रीगुरुराया जे तुम्ही, त्या तुम्हास प्रणाम असोत. 1
2-17
त्रिगुणत्रिपुरी वेढिला । जीवत्वदुर्गी आडिला । तो आत्मशंभूने सोडविला । तुझिया स्मृती ॥2॥
श्रीशंकर त्रिपुरासुराचा वध तुझ्या स्मरणानंतरच करू शकले, त्याप्रमाणे, त्रिगुणात्मक मायारूप असुराने वेढलेला जीवदशेमध्ये अडकलेला जो आत्मरूपी शंकर तो ह्या संकटांतून गणाधीश, जो तू, त्या तुझ्या स्मरणाने मुक्त झाला. 2
3-17
म्हणौनि शिवेसी काटाळा । गुरुत्वे तूचि आगळा । तऱ्ही हळु मायाजळा- । माजी तारूनि ॥3॥
आपल्या स्मरणाने आत्मशंभूते माया त्रिपुराचा वध केला असल्यामुळे तुलनेने आपण (गुरुत्वांत) शंकरापेक्षांही श्रेष्ठ असून, जीवांस मायानदींतून पैलतीरावर नेणारे म्हणून नौके पेक्षांही हलके आहां. 3
4-17
जे तुझ्याविखी मूढ । तयांलागी तू वक्रतुंड । ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥4॥
ज्यांना तुझ्या स्वरूपाचे ज्ञान नाही त्यांना तु वक्रतुंड आहेस असे वाटते, पण तत्त्ववेत्यांन तू सदैव उजु अथवा समच आहेस. 4
5-17
दैविकी दिठी पाहता सानी । तऱ्ही मीलनोन्मीलनी । उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥5॥
हे गुरु गणपते, आपली दृष्टि (नेत्र) स्वभावतःच लहान आहे खरी, पण त्यांच्या मीलनोन्मीलनाने (उघडझांपीनें) जगाचा उत्पत्ति प्रलयादि व्यवहार सहज व्हावा असे तिचे सामर्थ्य आहे. 5
6-17
प्रवृत्तिकर्णाच्या चाळी । उठली मदगंधानिळी । पूजीजसी नीलोत्पली । जीवभृंगांच्या ॥6॥
आपल्या प्रवृत्तिरूप कर्णाच्या चलनाते गंडस्थलांतून वाहणाऱ्या मदाचा सुगंध आसमंतात पसरून, त्यायोगे जीवरूपी नील भ्रमर तेथे जमा होतात व जणू काही नीलकमलांनीच आपले पूजन केल्याप्रमाणे आपण शोभतां. 6
7-17
पाठी निवृत्तिकर्णताळे । आहाळली ते पूजा विधुळे । तेव्हा मिरविसी मोकळे । आंगाचे लेणे ॥7॥
मागाहून निवृत्तिरूप कर्णाच्या गतीने ती बांधलेली पूजा उधळून गेली (अंतर्मुखता आली) म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन होते. 7
8-17
वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडवमिसे कळासु । दाविसी तू ॥8॥
आपली वामांगा सरस्वती (आदिमाया) तिचा नृत्यविलासाचा प्रभाव, तोच हा जगदाभास होय; व ते तांडवकौशल्य प्रकाशन तुम्ही करितां. (तुमच्या प्रकाशाने होते) 8
9-17
हे असो विस्मो दातारा । तू होसी जयाचा सोयरा । सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥9॥
हे असो; दयाळा, आपला दुसरा चमत्कार काय सांगावा ? की, तुझ्याशी सोयरीक जोडतो तो सोयरिकीच्या व्यवहारांतून कायमचा मुक्त होतो. ( त्वद्रूप होतो, भिन्नत्वाने उरत नाही. ) 9
10-17
फेडिता बंधनाचा ठावो । तू जगद्बंधु ऐसा भावो । धरू वोळगे उवावो । तुझाचि आंगी ॥10॥
बंधनांतून मुक्त करणारे असे जगद्बंधु आपण आहां, ह्या भावनेने जो तुला शरण येऊ पहातो (त्याच्या ठिकाणी तुझ्याच आनंदाचा आविर्भाव होतो). 10
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-17
तव दुजयाचेनि नांवे तया । देहही नुरेचि पै देवराया । जेणे तू आपणपया । केलासि दुजा ॥11॥
त्या योगे, हे गुरुराया, ज्या देहामुळे मी एक व तू एक असा दैतव्यवहार सिद्ध होतो तो त्याचा देहच (देहात्मभावच) आपण दुजेपणाने उरू देत नाही. (देहबुद्धि बाधित होते) 11
12-17
तूते करूनि पुढे । जे उपाये घेती दवडे । तया ठासी बहुवे पाडे । मागांचि तू ॥12॥
तुला दृश्य विषय मानून जे तुझ्या दर्शनार्थ अनेक प्रकारचे उपाय योजून धावाधाव करितात, त्यांच्या तर तू प्रायः मागेच असतोस. ( त्यांना तुझे दर्शन होतच नाही ) 12
13-17
जो ध्याने सूये मानसी । तयालागी नाही तू त्याचे देशी । ध्यानही विसरे तेणेसी । वालभ तुज ॥13॥
जे ध्यान करून तुला चित्तांत आणू पहातात, त्यांन तर तुझा पत्ताच लागत नाहीं; उलट ध्यानासह ज्यांना देहबुद्धीचा विसर पडतो ते तुला फार प्रिय असतात. 13
14-17
तूते सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणे । वेदांही येवढे बोलणे । नेघसी कानी ॥14॥
ज्याची सिद्धि केली जावी असा तू नसून तू स्वतःसिद्ध आहेस हे न जाणतांही जो वेद सर्वज्ञ म्हणून गणला जातो त्याने (वेदाने ) केलेले एवढे मोठे वर्णनही तुम्ही कानावर घेत नाही. 14
15-17
मौन गा तुझे राशिनांव । आता स्तोत्री के बांधो हाव । दिसती तेतुली माव । भजो काई ॥15॥
पत्रिकेवरून ” मौन ” हे तुझी राशिनाम आहे, मग अशा वस्तूची स्तुति करण्याची का हाव धरावी ? शिवाय जेवढे म्हणून दृश्यजात आहे ही आपली माया होय; मग भजावे तरी कसे ? 15
16-17
दैविके सेवकु हो पाहो । तरी भेदिता द्रोहोचि लाहो । म्हणौनि आता काही नोहो । तुजलागी जी ॥16॥
तुम्हाला सेव्य मानून सेवक होऊ असे म्हणावे तरी ह्या भेदभावनेने मी एकप्रकारे द्रोहीच ठरेन, म्हणून ” तुझा मी अमुक ” असे नाते लावण्याच्या भानगडत न पडणेच बरे. (त्वद्रूप होणे उत्तम) 16
17-17
जै सर्वथा सर्वही नोहिजे । तै अद्वया तूते लाहिजे । हे जाणे मी वर्म तुझे । आराध्य लिंगा ॥17॥
हे आराध्य गुरुराज ह्या सर्व दृश्याचा तत्त्वतः मजपाशी काहीही संबंध नाही असे जेव्हा मी पूर्णपणे जाणेन तेव्हांच मला आपल्या अद्वयस्वरूपाचा लाभ होईल हे आपल्या स्वरूपाचे वर्म मी ओळखतों. 17
18-17
तरी नुरोनि वेगळेपण । रसी भजिन्नले लवण । तैसे नमन माझे जाण । बहु काय बोलो ॥18॥
तरी दुजेपणाने न राहता मीठ जलाशी जसे एकरूप होते त्याचप्रमाणे तुला खरे नमन करणे म्हणजे तुझ्या स्वरूपाहून भिन्नत्वे न उरणे हे होय; मी आणखी काय बोलावे ? 18
19-17
आता रिता कुंभ समुद्री रिगे । तो उचंबळत भरोनि निगे । का दशी दीपसंगे । दीपुचि होय ॥19॥
असे पहा की, रिकामा कुंभ समुद्रांत बुडविला असता जसा भरून बाहेर येतो किंवा सुताची दशी ही दीपसंगानं दीपत्व पावते. 19
20-17
तैसा तुझिया प्रणिती । मी पूर्णु जाहलो श्रीनिवृत्ती । आता आणीन व्यक्ती । गीतार्थु तो ॥20॥
त्याप्रमाणे हे निवृत्तिनाथ श्रीगुरुराया, तुम्हाला प्रणाम केल्याने माझे अपूर्णत्व फिटले; ( मी पूर्ण झालो ) आता गीतार्थ स्पष्टपणे मांडतो. 20
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-17
तरी षोडशाध्यायशेखी । तिये समाप्तीच्या श्लोकी । जो ऐसा निर्णयो निष्टंकी । ठेविला देवे ॥21॥
तरी षोडशाध्यायाच्या अखेरच्या श्लोकात देवांनी जो असा असंदिग्ध निर्णय दिला आहे; 21
22-17
जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥22॥
की अर्जुना, कर्तव्य काय किंवा अकर्तव्य कोणते हे जाणणे तर शास्त्रप्रामाण्यावरूनच ती व्यवस्था तू ठरविली पाहिजे. 22
23-17
तेथ अर्जुन मानसे । म्हणे हे ऐसे कैसे । जे शास्त्रेवीण नसे । सुटिका कर्मा ॥23॥
तेव्हा अर्जुन मनात म्हणतो, कर्मालाही शास्त्रावाचून सुटका नसावी असे का असावे ? 23
24-17
तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कै तो मणि काढे । कै नाकीचा केशु जोडे । सिंहाचिये ? ॥24॥
पण सर्वाच्या फणेला हात घालून त्यावरील मणि काढणार कसा ? किंवा सिंहाच्या नाकांतील केस कोणी उपटून आणू शकतो काय ? 24
25-17
मग तेणे तो वोविजे । तरीच लेणे पाविजे । एऱ्हवी काय असिजे । रिक्तकंठी ? ॥25॥
पण, हे घडेल तेव्हा त्या केसांत तो मणि ओवून मगच ते भूषण गळ्यात घालावे आणि एऱ्हवी गळा काय रिकामा ठेवावा ? 25
26-17
तैसी शास्त्रांची मोकळी । या कै कोण पा वेटाळी । एकवाक्यतेच्या फळी । पैसिजे कै ? ॥26॥
त्याप्रमाणे अनेक शास्त्रे एकत्र आणून ती वाचावी कोणीं ? व वाचली तरी त्यांची एकवाक्यता कशी करणार ? 26
27-17
जालयाही एकवाक्यता । का लाभे वेळु अनुष्ठिता । कैचा पैसारु जीविता । येतुलालिया ॥27॥
कदाचित् एकवाक्यता होऊ शकली तरी, अनुष्ठानाला वेळ कोणाला आहे ? आणि जीवाच्या आयुष्याचा तरी तस काय नेम सांगावा ? 27
28-17
आणि शास्त्रे अर्थे देशे काळे । या चहूही जे एकफळे । तो उपावो के मिळे । आघवयांसी ? ॥28॥
आणि समजा, शास्त्र, द्रव्य, देश, काल, ह्या सर्वाचा जरी क्वचित् एकत्र योग आला, तरी सर्वाना तो उपाय कसा साध्य व्हावा ? 28
29-17
म्हणौनि शास्त्राचे घडते । नोहे प्रकारे बहुते । तरी मुर्खा मुमुक्षा येथे । काय गति पा ? ॥29॥
अशा अनेक प्रकाराने शास्त्रवचन पाळून कर्म करणे अशक्य ठरते, मग अज्ञ जे मुमुक्षुजन ह्यांना काय तरणोपाय आहे ? 29
30-17
हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो । तो सतराविया ठावो । अध्याया येथ ॥30॥
अर्जुनाने मनातील हा अभिप्राय विचारण्यासाठी प्रस्तावना केली तोच ह्या सतराव्या अध्यायाचा मूळ विषय होय. 30
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-17
तरी सर्वविषयी वितृष्णु । जो सकळकळी प्रवीणु । कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वे जो ॥31॥
तरी सर्व विषयांविषयी निरिच्छ असून सकलकलानिपुण असणारा व देवांना आनंद देणारा असा अर्जुनरूपाने अवतरलेला जो दुसरा कृष्णच असा. 31
32-17
शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु । सुखादि उपकारु । जयाची लीला ॥32॥
जो शौर्याचा आधार जो सोमवंशाचे भूषण, ज्याची लीला म्हणजे सुखालाही उपचाररूप होय. (सुख रूप) 32
33-17
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु । सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ॥33॥
जो बुद्धिमंतांमध्ये बुद्धिमंत असा प्रज्ञेचा लाडका, ब्रह्मविद्येचे विश्रांतिस्थान, व देवांच्या चित्तांत नित्य असणारा सहचर असा जो अर्जुन, 33
अर्जुन उवाच ।
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥17. 1॥
34-17
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रिया फांवलिया ब्रह्मा । तुझा बोलु आम्हा । साकांक्षु पै जी ॥34॥
तो अर्जुन म्हणतो, हे तमालश्यामप्रभो, हे इंद्रियविषय ब्रह्ममूर्ते, आपण सांगितले खरे, पण त्यावर एक शंका येते ती अशी. 34
35-17
जे शास्त्रेंवाचूनि आणिके । प्राणिया स्वमोक्षु न देखे । ऐसे का कैपखे । बोलिलासी ॥35॥
प्राणिमात्राला शास्त्रज्ञानावाचून मोक्षाचा अनुभव अन्य कशानेही येणारच नाही असे आपण कैपक्षाने म्हणजे ” अन्यकशानेही नव्हे ” असे सांगितले ते का ? 35
36-17
तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु । जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ॥36॥
समजा; शास्त्राध्ययनाला अनुकूल असा देश लाभला नाही, आयुष्यही भरपूर नाही, असेल अध्यापक. 36
37-17
आणि अभ्यासी विरजिया । होती जिया सामुग्रिया । त्याही नाही आपैतिया । तिये वेळी ॥37॥
व अभ्यासाला आवश्यक सामुग्रीही प्राप्त अशी होण्यासारखी नसेल अशा वेळी. 37
38-17
उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन । ऐसे ठेले आपादन । शास्त्राचे जया ॥38॥
किंवा अदृष्ट अनुकूल नाहीं, बुद्धीचीही तेवढी धारणा नाही अशी शास्त्राविषयी ज्याची स्थितिअसेल, 38
39-17
किंबहुना शास्त्रविखी । एकही न लाहातीचि नखी । म्हणौनि उखिविखी । सांडिली जिही ॥39॥
किंबहुना, शास्त्राचे अमुक एक निश्चित प्रमेय आहे ह्याचा निर्णय न झाल्यामुळे ज्यांनी त्याचा विचारच सोडून दिला आहे. 39
40-17
परी निर्धारूनि शास्त्रे । अर्थानुष्ठाने पवित्रे । नांदताति परत्रे । साचारे जे ॥40॥
पण, ज्यांनी त्यांचा अभ्यास करून, यथाविधि पवित्र अनुष्ठानाने परलोक गाठून तेथे जे खरोखर नांदत आहेत. 40
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-17
तया {ऐ}से आम्ही होआवे । ऐसी चाड बांधोनि जीवे । घेती तयांचे मागावे । आचरावया ॥41॥ ऐसे
त्याप्रमाणे आपणही व्हावे अशी इच्छा मनात बाळगून जे जीवेभावे त्यांच्या मार्गाचे अवलंबन करतात. 41
42-17
धड्याचिया आखरा । तळी बाळ लिहे दातारा । का पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥42॥ पुढासूनि
म्हणजे प्रभो, धडयातील अक्षरे पाहून बाल जसा तशी अक्षरे खाली काढितो, किंवा डोळस मनुष्य पुढे घेऊन त्याच्या आधाराने जसा स्वतः असमर्थ अंधही चालतो 42
43-17
तैसे सर्वशास्त्रनिपुण । तयाचे जे आचरण । तेचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥43॥
त्याप्रमाणे, सर्वशास्त्रनिपुण अशा लोकांचे जे आचरण हे प्रमाण मानून, त्यावर जे श्रद्धा ठेवितात. 43
44-17
मग शिवादिके पूजने । भूम्यादिके महादाने । आग्निहोत्रादि यजने । करिती जे श्रद्धा ॥44॥
आणि शिवादि देवतांचे पूजन, भूमीसारखे महादान देणे, अग्निहोत्रादि यज्त्रयाग करणे इयदि कर्म जे श्रद्धेने आचरतात. 44
45-17
तया सत्त्वरजतमा- । माजी कोण पुरुषोत्तमा । गति होय ते आम्हा । सांगिजो जी ॥45॥
त्यांना, हे प्रभो, सत्व, रज, तमापैकी कोणत्या कर्माची गति प्राप्त होते ते कृपा करून सांगावे होय. 45
46-17
तव वैकुंठपीठींचे लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हे जग । अंगच्छाया ॥46॥
तेव्हां, जो वैकुंठाधिपति असून वेदरूपी कमलाचा जणु परागच, व अंगाचा आधार जसा छायेला असतो तसे ज्याच्या सत्तेवर हे सर्वं जग जगते; 46
47-17
काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु । आद्वितीय गूढु । आनंदघनु ॥47॥
व जो प्रत्यक्ष कालरूपच असून सहजच मोठा प्रौढ, लोकोत्तर, अद्वितीय, गूढ आणि आनंदघन आहे. 47
48-17
इये श्लाघिजती जेणे बिके । ते जयाचे आंगी असिके । तो श्रीकृष्ण स्वमुखे । बोलत असे ॥48॥
आणि हे सर्व गुण जिच्या आधारावर वर्णिता येतात अशी जी शक्ति, तीही ज्यांच्या सत्तेवर नांदते, असा जो श्रीकृष्णश्रीकृष्ण भगवान तो स्वमुखाते सांगता झाला. 48
श्री भगवानुवाच ।
त्रिविध भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति ता शृणु ॥17. 2॥
49-17
म्हणे पार्था तुझा अतिसो । हेही आम्ही जाणतसो । जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि की ॥49॥
श्रीभगवान म्हणतात पार्था, शास्त्राभ्यासाला अनेक अडचणी असणे शक्य आहे असा तुझ्या शंकेचा भाव आम्ही जाणतो. 49
50-7
नुसधियाची श्रद्धा । झोंबो पाहसी परमपदा । तरी तैसे हे प्रबुद्धा । सोहोपे नोहे ॥50॥
केवल श्रद्धेच्या जोरावर मोक्षप्राप्ति व्हावी असे तुला वाटते, पण ही गोष्ट काही इतकी सोपी नाही. 50
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-17
श्रद्धा म्हणितलियासाठी । पातेजो नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टी । अंत्यजु नोहे ? ॥51॥
केवल श्रद्धेने त्याची (मोक्षाची) प्राप्ति होणार नाही; हे पहा, ब्राह्मण खरा, पण अत्यंजाच्या संगतीने पतित होणार नाही काय ? 51
52-17
गंगोदक जरी जाले । तरी मद्यभांडा आले । ते घेऊ नये काही केले । विचारी पा ॥52॥
विचार कर की, गंगोदक जरी असले तरी, ते मद्याच्या भांड्यात भरले असता केव्हांही सेवनीय रहात नाही. 52
53-17
चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तै हाती धरिता जाळू । न शकेकाई ? ॥53॥
चंदन अंगाने शीतळ खरा, पण त्याच्या काष्ठाला अग्निसंबंध झाला तर, त्याने हात भाजणार नाही काय ? 53
54-17
का किडाचिये आटतिये पुटी । पडिले सोळे किरीटी । घेतले चोखासाठी । नागवीना ? ॥54॥
किंवा हिणकस सोन्याच्या आटणीत उत्तम सोने पडले आणि, नंतर अर्जुना, ते सर्व चोख सोन्याच्या भावाने खरेदी केले तर नुकसान होणार नाही काय ? 54
55-17
तैसे श्रद्धेचे दळवाडे । अंगे कीर चोखडे । परी प्राणियांच्या पडे । विभागी जै ॥55॥
त्याप्रमाणे, श्रद्धा ही स्वरूपतः चांगली खरी, पण ती जेव्हा कोणा जीवांच्या वाटयास येते. 55
56-17
ते प्राणिये तव स्वभावे । आनादिमायाप्रभावे । त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥56॥
तेव्हा ते जीव स्वभावतःच अनादि मायेच्या शक्तीने त्रिगुणांचेच बनलेले असल्यामुळे. 56
57-17
तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती । तै तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥57॥
व त्या त्रिगुणांतही नेहमी दोन गुण दबले जाऊन एकाच उन्नतगुणाचा प्रभाव सुरू असतो, तेव्हा जीवांची वृत्ति त्या गुणानुरोधाची असते. 57
58-17
वृत्ती{ऐ}से मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहे ॥58॥
वृत्तिप्रमाणे मनाची घडण, मनाप्रमाणे क्रिया, आणि क्रियेप्रमाणे मेल्यावर पुन्हा देह असे चक्र सुरु असते. 58
59-17
बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजी सामाये । ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ॥59॥
बीजाचे स्वरूप बदलून झाड होते आणि पुन्हा झाड नाश पावून त्याचा बीजांत अंतर्भाव होतो असे कल्पच्या कल्प गेले तरी, वृक्षत्वजातीचा काही नाश होत नाही. 59
60-17
तियापरी यिये अपारे । होत जात जन्मांतरे । परी त्रिगुणत्व न व्यभिचरे । प्राणियांचे ॥60॥
ह्या क्रमाने, कित्येक जन्मच्या जन्म जरी गेले, तरी प्राण्यांचे त्रिगुणत्व नष्ट होत नाही. 60
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-17
म्हणूनि प्राणियांच्या पैकी । पडिली श्रद्धा अवलोकी । ते होय गुणासारिखी । तिही यया ॥61॥
म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली श्रद्धा ही ह्या तीन गुणांपैक, एका कोणत्या तरी एका उन्नतगुणाच्या अनुरोधाची असते. 61
62-17
विपाये वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हा ज्ञानासी करी साद । परी एका दोघे वोखद । येर आहाती ॥62॥
कदाचित् शुद्ध सत्व गुणाचा जोर असेल तर त्याला ज्ञानाची इच्छा होते; पण त्याला दुसरे दोन गुण जे आहेत ते प्रतिबंधक आहेत. 62
63-17
सत्त्वाचेनि आंगलगे । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे । तव रज तम उगे । का पा राहाती ? ॥63॥
सत्वाच्या आधाराने ती श्रद्धा मोक्षफलाचा मार्ग धरिते; पण त्यावेळी रज व तम हे स्वस्थ कसे बसणार ? 63
64-17
मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशे जाये । तेव्हा तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥64॥
सत्व गुणाचे रक्षण मोडून जेव्हा रजोगुण उंचावतो तेव्हा तीच श्रद्धा कर्ममार्गाला लागते. 64
65-17
मग तमाची उठी आगी । तेव्हा तेचि श्रद्धा भंगी । हो लागे भोगालागी । भलतेया ॥65॥
मागून तमोगुणाची आग भडकली की, तीच श्रद्धा भंग पावून वाटेल ते भोग भोगण्यास प्रवृत्त होते. 65
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यछ्रद्धः स एव सः ॥17. 3॥
66-17
एवं सत्त्वरजतमा- । वेगळी श्रद्धा सुवर्मा । नाही गा जीवग्रामा- । माजी यया ॥66॥
ह्याप्रकारें, अर्जुना, ह्या अगत जीवांच्या वाट्यास आलेल्या श्रद्धेचे स्वरूप ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणासारखे असते; त्यावांचुन केवल श्रद्धा अशी असतच नाही. 66
67-17
म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पै त्रिगुणात्मक । रजतमसात्त्विक । भेदी इही ॥67॥
म्हणून श्रद्धा स्वभावतः सत्व, रज किंवा तम ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणभेदाची असते. 67
68-17
जैसे जीवनचि उदक । परी विषी होय मारक । का मिरयामाजी तीख । उसी गोड ॥68॥
जसे पाणी हे जीवन खरे, पण विषयुक्त झाले तर मारक होते, मिरचीत किंवा मिऱ्यात तिखट व ऊसात गोड होते. 68
69-17
तैसा बहुवसे तमे । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परीणमे । तेचि होऊनि ॥69॥
त्याप्रमाणे ज्याचे मन नित्य तमोगुणा ग्रासलेले असते त्याच्या ठिकाणची श्रद्धाही तसाच परिणाम पावून तमोगुणरूपच असते. 69
70-17
मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवी श्रद्धा तामसी । सिनी नाही ॥70॥
मग, काजळ आणि मस ह्यात जसः भेदाभेद करिता येत नाही, तसा तो तमोगुणी मनुष्य व त्याची तामसी श्रद्धा ह्यात भेद नसतो. 70
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-17
तैसीच राजसी जीवी । रजोमय जाणावी । सात्त्विकी आघवी । सत्त्वाचीच ॥71॥
त्याचप्रमाणे राजस स्वभावाच्या प्राण्याच्या ठिकाणची श्रद्धा राजस व सात्विक पुरुषाच्या अंगची श्रद्धा सत्वरूप असते. 71
72-17
ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु । श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ॥72॥
ह्याप्रमाणे हा सर्व जगद्रूपी पसारा केवळ श्रद्धेचाच ओतला आहे. 72
73-17
परी गुणत्रयवशे । त्रिविधपणाचे लासे । श्रद्धे जे उठिले असे । ते वोळख तू ॥73॥
परंतु, गुणत्रयवश असणाच्या या श्रद्धेवर तीन गुणांचे भिन्न भिन्न ठसे (चिन्हें) उठलेले तुला ओळखता येतील. 73
74-17
तरी जाणिजे झाड फुले । का मानस जाणिजे बोले । भोगे जाणिजे केले । पूर्वजन्मीचे ॥74॥
कारण, झाड ही त्याच्या फुलावरून, मन हे त्यांच्या द्वारा होणाऱ्या भाषेवरून व पूर्वकर्मे कसे होते हे सांप्रतच्या भोगावरून ओळखता येते. 74
75-17
तैसी जिही चिन्ही । श्रद्धेची रूपे तीन्ही । देखिजती ते वानी । अवधारी पा ॥75॥
त्याप्रमाणे ज्या चिन्हावरून श्रद्धेची तिन्ही रूपे ओळखता येतात तो प्रकार कसा ते श्रवण कर. 75
यजन्ते सात्त्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥17. 4॥
76-17
तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तया बहुतकरूनि मेधा । स्वर्गी आथी ॥76॥
तर ज्यांचे अंत:करण सात्विक श्रद्धयुक्त असते, त्यांच्या बुद्धीचा ओढा प्रायः स्वर्गादि प्राप्तीकडे असतो. 76
77-17
ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकी ॥77॥
ते सर्व विद्या शिकतात, यज्ञक्रियेविषयी चर्चा करतात व आपण कोणता करावा हे ठरवितात; किंबहुना, ते देवलोकाला जातात. 77
78-17
आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा । ते भजती राक्षसा । खेचरा हन ॥78॥
आणि अर्जुना, ज्यांच्या ठिकाणी राजस श्रद्धेचा पगडा आहे ते राक्षस पिशाचादिकांच्या भजनी लागतात. 78
79-17
श्रद्धा जे का तामसी । ते मी सांगेन तुजपाशी । जे का केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वे ॥79॥
आणि तामस श्रद्धेचे जे लोक त्यांचे लक्षण तुला सांगावयाचे तर ते केवळ पापाची राशि, कठोर व निर्घृण (दयाशून्य) असतात. 79
80-17
जीववधे साधूनि बळी । भूतप्रेतकुळे मैळी । स्मशानी संध्याकाळी । पूजिती जे ॥80॥
ते प्राणिवध करून बळी देतात आणि स्मशानांत सायंकाळी भूतप्रेतादि अमंगळ देवतांची पूजा करतात. 80
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-17
ते तमोगुणाचे सार । काढूनि निर्मिले नर । जाण तामसियेचे घर । श्रद्धेचे ते ॥81॥
ते तमोगुणचा अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे माहेरघरच होय. 81
82-17
ऐसी इही तिही लिंगी । त्रिविध श्रद्धा जगी । पै हे ययालागी । सांगतु असे ॥82॥
अशी या तीन श्रद्धांची तीन चिन्हे ह्या जगात दिसून येतात; पण तुला अशाकरिता सांगत आहे की, 82
83-17
जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा । येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ॥83॥
त्यातील जी सात्विक श्रद्धा तिचे जतन करून अन्य तद्विरुद्धा ज्या दोन त्यांचा तू त्याग करावा. 83
84-17
हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया । बागुल नोहे तया । कैवल्य ते ॥84॥
अर्जुना, ज्याला अशा सात्विक बुद्धीचे संरक्षण किंवा आधार आहे त्याला ते कैवल्यपद म्हणजे काही बागुलबुवा (कठीण) नव्हे. 84
85-17
तो न पढो का ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र । सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हाती ॥85॥
तो, वेद, ब्रह्मसूत्रादि न पढो, शास्त्रो अवगाहन (चर्चा) न करो, किंवा त्याला शास्त्रसिद्धांत हस्तगत नसोत. 85
86-17
परी श्रुतिस्मृतीचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त । अनुष्ठाने जगा देत । वडील जे हे ॥86॥
परंतु जे श्रेष्ठ विद्वान श्रुतिस्मृतींच्या अर्थाची जणू मूर्तीच बनून त्यांचा अनुष्ठानाचा जगाला कित्ता घालून देतात. 86
87-17
तयांची आचरती पाउले । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले । तो तेचि फळ ठेविले । ऐसे लाहे ॥87॥
त्यांच्या आचरणाच्या पावलावर टाकून जो सात्विक श्रद्धावान् चालतो, त्याला, त्यांना जे फल मिळते, तेच फल प्राप्त होते. 87
88-17
पै एक दीपु लावी सायासे । आणिक तेथे लाऊ बैसे । तरी तो काय प्रकाशे । वंचिजे गा ? ॥88॥
हे पहा, एकाने सर्व सामग्री जमा करून खटपटने दिवा लावला व तेथे दुसरा आयता येऊन बसला, तर प्रकाश काय त्याच्याशी प्रतारणा करील ? 88
89-17
का येके मोल अपार । वेचोनि केले धवळार । तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ? ॥89॥
किंवा एखाद्याने पुष्कळ द्रव्य खर्च करून घर बांधले आणि कोणी वाटसरू तेथे वस्तीस आला तर त्याला त्या घरातील सुखसोईचा काय भोग घडत नाही ? 89
90-17
हे असो जो तळे करी । ते तयाचीच तृषा हरी । की सुआरासीचि अन्न घरी । येरा नोहे ? ॥90॥
हे असो; जो तलाव बांधील त्याचीच तेवढी तृषा ते हरण करणार काय ? किंवा घरात सिद्ध झालेले अन्न एका स्वयंपाक्यापुरतेच असते आणि इतरास नाही असे का होते ? 90
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-17
बहुत काय बोलो पै गा । येका गौतमासीचि गंगा । येरा समस्ता काय जगा । वोहोळ जाली ? ॥91॥
फार काय सांगावे ? गौतमांनी दीर्घ प्रयत्नांनी आणिलेली गंगा काय त्यांनाच तेवढी गंगा ? आणि इतर जगाला ती ओहोळ होते काय ? 91
92-17
म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी । जाणे तयाते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे ॥92॥
म्हणून, स्वतःसाठीच जे दक्षतेने (कुशलतेने) शास्त्रानुष्ठान करितात, त्यांचे जो श्रद्धाळू जाणून अनुकरण करतो, तो मूर्खही तरून जातो. 92
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दंभाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥17. 5॥
93-17
ना शास्त्राचेनि कीर नांवे । खाकरोही नेणती जीवे । परी शास्त्रज्ञाही शिवे । टेको नेदिती ॥93॥
ज्याला आवाजी साफ करण्यासाठी ‘‘ हा हुं” ” वगैरे खाकरावे कसे इतकेच कळत नाही तो गाणार काय ? त्याप्रमाणे शास्त्राच्या नांवाने ज्याला स्वतःला काडीचेही ज्ञान नाही, पण कोणी शास्त्रज्ञ आला तर त्याला नुसता थाराही देत नाहीत. 93
94-17
वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया । पंडिता डाकुलिया । वाजविती ॥94॥
वडिल माणसांचे आचरणादि पाहून जे त्यांच्या चेष्टा करतात व पंडित काही सांगू लागले तर ते टाळ्या किंवा टिमक्या वाजवितात. 94
95-17
आपलेनीचि आटोपे । धनित्वाचेनि दर्पे । साचचि पाखंडाची तपे । आदरिती ॥95॥
आपल्याच शहाणपणाच्या तोऱ्यात आणि धनाच्या गर्वात जे पाखंडी जनांच्या तपाचा व आचरणाचा आदर करतात. 95
96-17
आपुलिया पुढिलांचिया । आंगी घालूनि कातिया । रक्तमांसा प्रणीतया । भर भरु ॥96॥
आपल्या समोरील जीवांच्या अंगावर शस्त्र चालवून, रक्तमांसने यज्ञपात्र भरभरून, 96
97-17
रिचविती जळतकुंडी । लाविती चेड्याच्या तोंडी । नवसिया देती उंडी । बाळकांची ॥97॥
जळत्या अग्नीकुडांत आहुति देतात; तसेच चेड्यादि देवतांना आहुति देऊन व नवस करून त्यांच्यापुढे बालकांचे बळी देतात. 97
98-17
आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवता वरीया । अन्नत्यागे सातरीया । ठाकती एक ॥98॥
आग्रहास पेटून क्षुद्र देवतांचा प्रसाद व्हावा म्हणून अन्नत्यागपूर्वक सात दिवस जे स्वतः अनुष्ठान करितात. 98
99-17
अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्री सुहाडा । पेरिती मग पुढा । तेचि पिके ॥99॥
अरे, स्वतःला व अन्याला पीडा देऊन जे बीज तमोरूप भूमीत पेरतात तेच पुढेही पिकास येते. 99
100-17
बाहु नाही आपुलिया । आणि नावेतेही धनंजया । न धरी होय तया । समुद्री जैसे ॥100॥
स्वतःला तरून जाण्यासारखे समर्थ बाहु नाहींत आणि नावे चाही आश्रय करावयास तयार नाही याची सागरांत जी स्थिति होते. 100
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-17
का वैद्याते करी सळा । रसु सांडी पाय खोळा । तो रोगिया जेवी जिव्हाळा । सवता होय ॥101॥
किंवा वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेने उडवितो असा रोगी जसा मरणार जसे निश्चित. 1
102-17
नाना पडिकराचेनि सळे । काढी आपुलेचि डोळे । ते वानवसा आंधळे । जैसे ठाके ॥102॥
किंवा डोळस माणसाचा द्वेष करून जो स्वतःचेच डोळे फोडून घेतो, तो जसा घरात आंधळा होऊन बसतो. 2
103-17
तैसे तया आसुरा होये । निंदूनि शास्त्रांची सोये । सैंघ धावताती मोहे । आडवी जे का ॥103॥
त्याप्रमाणे, शास्त्रीय मार्गाची निंदा करून स्वैराचाररूपी अरण्यात जे भटकतात त्या आसुरांची तशी स्थिति होते. 3
104-17
कामु करवी ते करिती । क्रोधु मारवी ते मारिती । किंबहुना माते पुरिती । दुःखाचा गुंडा ॥104॥
इच्छेस येईल ते करतात, ज्यावर क्रुद्ध होतील त्याला मारतात किंबहुना नसती पीडा म्हणून माझी मूर्तीही गाडून टाकतात. 4
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्ध्यासुरनिश्चयान् ॥17. 6॥
105-17
आपुला परावा देही । दुःख देती जे जे काही । मज आत्मया तेतुलाही । होय शीणु ॥105॥
स्वतःच्या व दुसऱ्याच्या देहाला ते ह्याप्रमाणे जी पीडा करितात, ती सर्व सर्वातर्यामी जो मी, त्या मलाच होते. 5
106-17
पै वाचेचेनिही पालवे । पापिया तया नातळावे । परी पडिले सांगावे । त्यजावया ॥106॥
ह्या पाप्यांच्या वर्णनाने वाणी विटाळणेही बरे नव्हे; पण, त्यांचा त्याग करावा हे सांगण्यासाठी वर्णन करावे लागले. 6
107-17
प्रेत बाहिरे घालिजे । का अंत्यजु संभाषणी त्यजिजे । हे असो हाते क्षाळिजे । कश्मलाते ? ॥107॥
प्रेत घराबाहेर काढावे लागते, ‘दूर हो ” असे बोलूनच अंत्यजापाशी भाषण टाळावे लागते किंवा घाण ही हातनेच धुवून टाकावी लागते. 7
108-17
तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । तयाते सांडावया तैसा । अनुवादु हा ॥108॥
येथे शुद्धतेचा हेतु असल्यामुळे ह्या अमंगल गोष्टी केल्या असे जसे कोणी समजत नाही, म्हणून त्यांच्या त्यागार्थ केलेला अनुवाद (वर्णन) दूषणीय म्हणता येत नाही. 8
109-17
परी अर्जुना तू तयाते । देखसी तै स्मर हो माते । जे आन प्रायश्चित्त येथे । मानेल ना ॥109॥
तर अर्जुना, तुला त्यांचे दर्शन झाले (असुर=तामस) तर माझे स्मरण करत जा; येथे दुसरे प्रायश्चित्त कामाचे नाही. 9
110-17
म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पै येकी । जतन करावी निकी । सर्वापरी ॥110॥
तरी जी एक सात्विक श्रद्धा तिचेच इतःपर दक्षतेने सर्वाच्यावर जतन करावे. 110
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-17
तरी धरावा तैसा संगु । जेणे पोखे सात्त्विक लागु । सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपे ॥111॥
म्हणून ज्यायोगे सत्वबुद्धीची वाढ होईल असाच संग धरावा आणि आहारही सत्वाची वृद्धि करील असाच सेवन करावा. 11
112-17
एऱ्हवी तरी पाही । स्वभाववृद्धीच्या ठाई । आहारावाचूनि नाही । बळी हेतु ॥112॥
अरे, पाहू गेले तर स्वभावामध्ये पालट अगर वृद्धि व्हावी अशी इच्छा असेल तर त्याला आहारावाचून अन्य बलवान हेतु नाही. 12
113-17
प्रत्यक्ष पाहे पा वीरा । जो सावध घे मदिरा । तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणी ॥113॥
ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, शुद्धीवर असलेला जो मनुष्य त्याने दारूचे सेवन केले तर तो तत्क्षणी माजून बरळतो. 13
114-17
का जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावी । काय ज्वरु जालिया निववी । पयादिक ? ॥114॥
किंवा जो मर्यादेबाहेर अन्नसेवन करतो त्याला वात व कफ ह्यांचा विकार होतो किंवा ज्वर आला असता दुधाच्या सेवनाने तो निघेल काय ? 14
115-17
नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी । का आपुलिया{ऐ}से करी । जैसे विष ॥115॥
नाहीतर, अमृतसेवनाने जसे मरण टळते, किंवा विष घेतले असता त्याने मृत्यु येतो. 15
116-17
तेवी जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु । आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥116॥
त्याप्रमाणे जसा किंवा ज्या प्रकारचा आहार असेल त्या प्रकारची धातु शरीरांत उत्पन्न होते व जशी धातु असेल त्याप्रमाणे अंतःकरणाचा (मनाचा) स्वभाव पोसला जातो. 16
117-17
जैसे भांडियाचेनि तापे । आंतुले उदकही तापे । तैसी धातुवशे आटोपे । चित्तवृत्ती ॥117॥
भांडे तापले म्हणजे आतले उदकही जसे तापते, त्याप्रमाणे धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ति बनत असते. 17
118-17
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तै सत्त्वाची वाढी पाविजे । राजसा तामसा होईजे । येरी रसी ॥118॥
म्हणून सात्विक अन्नसेवनाने सत्वगुणाची व दुसऱ्या दोन जातीच्या अन्नाने रजोगुण व तमोगुण ह्यांची वाढ होते. 18
119-17
तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु । हे सांगो करी आदरु । आकर्णनी ॥119॥
तरी, कोणता आहार सात्विक आहे, राजस व तामस आहाराचे स्वरूप अगर लक्षण काय ते सांगतो, नीट श्रवण कर. 19
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिम शृणु ॥17. 7॥
120-17
आणि एकसरे आहारा । कैसेनि तिनी मोहरा । जालिया तेही वीरा । रोकडे दाऊ ॥120॥
आणि अर्जुना, सामान्य अन्नाचे तीन प्रकार (सत्व, रज, तम) कसे झाले ते स्पष्ट करून दाखवितों. 120
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-17
तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति की बोनियांची । आणि जेविता तव गुणांची । दासी येथ ॥121॥
हे पहा, भोक्त्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार होत असते आणि भोक्ता तर, गुणांचा ताबेदार आहेच. 21
122-17
जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता । पावोनिया त्रिविधता । चेष्टे त्रिधा ॥122॥
कर्ता भोक्ता जो जीव, तो स्वभावतःच तीन गुणांप्रमाणे तीन प्रकारचा व्यवहार करीत असतो. 22
123-17
म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु । तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ॥123॥
म्हणून आहार तीन प्रकारचा आहे; यज्ञही तीन प्रकारचे आहेत व तप, दान व इतर क्रियाही तीन प्रकारच्या आहेत. 23
124-17
पै आहार लक्षण पहिले ? । सांगो जे म्हणितले । ते आईक गा भले । रूप करू ॥124॥
परंतु आधी प्रथम सांगितलेल्या आहाराचे लक्षण सांगतो, ते नीट श्रवण कर. 24
आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥17. 8॥
125-17
तरी सत्त्वगुणाकडे । जे दैवे भोक्ता पडे । तै मधुरी रसी वाढे । मेचु तया ॥125॥
तरी, दैवयोगाने, जेव्हा भोक्ता सत्वगुणी असतो तेव्हां, मिष्टान्न सेवनाकडे त्याचा विशेष ओढा असतो. 25
126-17
आंगेचि द्रव्ये सुरसे । जे आंगेचि पदार्थ गोडसे । आंगेचि स्नेहे बहुवसे । सुपक्वे जिये ॥126॥
जे पदार्थ अंगानेच उत्तम रसभरित, गोड बव्हंशी स्निग्ध, आणि सुपक्व असतात. 26
127-17
आकारे नव्हती डगळे । स्पर्शे अति मवाळे । जिभेलागी स्नेहाळे । स्वादे जिये ॥127॥
जे आकाराने अवजड नसतात, स्पर्शाला मऊ असतात, जिभेला स्निग्ध रुचीचे असून जे स्वादिष्ट असतात. 27
128-17
रसे गाढी वरी ढिली । द्रवभावी आथिली । ठाये ठावो सांडिली । अग्नितापे ॥128॥
रसयुक्त वरून मऊ, पाणीदार (सुकलेली नव्हेत) व अग्नितापादिकांनी कसलेली नव्हेत. 28
129-17
आंगे साने परीणामे थोरु । जैसे गुरुमुखींचे अक्षरु । तैशी अल्पी जिही अपारु । तृप्ति राहे ॥129॥
गुरूपदेशाची अक्षरे थोडी असली तरी अर्थ फार थोर असतो, तसा जो आहार आकाराने स्वल्प, पण परिणामाच्या दृष्टीने थोर असून ज्याचे अल्प सेवन करूनही तृप्ति टिकून असते. 29
130-17
आणि मुखी जैसी गोडे । तैसीचिहि ते आंतुलेकडे । तिये अन्नी प्रीति वाढे । सात्त्विकासी ॥130॥
आणि जे रुचीने गोड तसेच परिणामानेही गोड अशा अन्नाविषयी सात्विक जीवाचे प्रेम असते. 130
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-17
एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचे त्राण । नीच नवे हे ॥131॥
सात्विक अन्नाचे लक्षण असे असते; ह्याच्या सेवनाने नित्य आयुष्यवर्धन होत असते. 31
132-17
येणे सात्त्विक रसे । जव देही मेहो वरीषे । तव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा ॥132॥
अशा सात्विक अन्नांचा वर्षाव देहावर होत असता दिवसेंदिवस त्या देहाच्या आयुष्य नदीला पूर येतो. 32
133-17
सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती । दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ॥133॥
दिवसाच्या वृद्धीला जसा सूर्य कारण आहे त्याप्रमाणे सत्ववृद्धीस व रक्षणास हाच आहार कारण आहे. 33
134-17
आणि शरीरा हन मानसा । बळाचा पै कुवासा । हा आहारु तरी दशा । कैची रोगा ॥134॥
आणि शरीराला व मनाला बल अर्पण करणाऱ्या ह्या आहाराचा आश्रय असल्यावर तेथे रोगाचा प्रवेश कसा होणार ? 34
135-17
हा सात्त्विकु होय भोग्यु । तै भोगावया आरोग्यु । शरीरासी भाग्यु । उदयले जाणो ॥135॥
असा सात्विक आहार भोग्य म्हणून प्राप्त असेल तरच आरोग्याच भोग घडण्याचे शरीराचे भाग्य उदयाला आले आहे असे म्हणावे. 35
136-17
आणि सुखाचे घेणे देणे । निके उवाया ये येणे । हे असो वाढे साजणे । आनंदेसी ॥136॥
आणि त्याचे सर्व व्यापार या आहाराने सुखमय होतात; फार काय सांगावे ? त्याची वृत्ति सदा आनंदी असते. 36
137-17
ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु । करी हा उपकारु । सबाह्यासी ॥137॥
ऱ्ह्याप्रमाणे सात्विक आहाराचा फार थोर परिणाम असून तो अंतर्बाह्य सर्वप्रकारे उपकारक आहे. 37
138-17
आता राजसासि प्रीती । जिही रसी आथी । करू तयाही व्यक्ती । प्रसंगे गा ॥138॥
आता प्रसंगवशांत ज्या रसांची राजस वृत्तीच्या माणसाला आवड असते त्याचेही वर्णन करू. 38
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥17. 9॥
139-17
तरी मारे उणे काळकुट । तेणे माने जे कडुवट । का चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥139॥
फक्त मरण आणीत नाही इतकेच काय ते कमी; बाकी कडूपणाला काळकूट विषासारखे; चुन्याहून दाह करणारे जे आंबट असते. 39
140-17
कणिकीते जैसे पाणी । तैसेचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥140॥
कणीक भिजविण्यास लागणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने आत मीठ व अन्य खारट तुरट रस मिळविणे. 140
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-17
ऐसे खारट अपाडे । राजसा तया आवडे । ऊन्हाचेनि मिषे तोंडे । आगीचि गिळी ॥141॥
असे अत्यंत खारट पदार्थ राजस प्रकृतीच्या पुरुषाला आवडतात व तो इतके कढत पदार्थ सेवन करितो की, तोंडाने जणु अग्नीच गिळतो ! 41
142-17
वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे । तैसे उन्ह मागे । राजसु तो ॥1142॥
त्या पदार्थातून निघणाऱ्या वाफांवर जणु दिव्याची वातही पेटवित येईल असे उष्ण पदार्थ तो मागत असतो. 42
143-17
वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसे तीख तो खाये । जे घायेविण रुपे ॥143॥
वावटळीपेक्षांही तुफान उडविणारे व प्रहार करील असे तिखट तो खातो की, ज्याने प्रत्यक्ष घावाशिवाय जणु जखम झाली आहे असे वाटावे. 43
144-17
आणि राखेहूनि कोरडे । आत बाहेरी येके पाडे । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥144॥
आणि आत बाहेर सारखे कोरडे व रूक्ष असे तोंडी लावणे त्याला फार आवडते. 44
145-17
परस्परे दाता । आदळु होय खाता । तो गा तोंडी घेता । तोषो लागे ॥145॥
जे पदार्थ खाऊ गेले असता दांतावर दात आदळावे असे कडक पदार्थ खाण्यात त्याला संतोष वाटतो. 45
146-17
आधीच द्रव्ये चुरमुरी । वरी परवडिजती मोहरी । जिये घेता होती धुवारी । नाकेंतोंडे ॥146॥
जातीनेच पदार्थ झणझणीत, त्यात वर मोहरीसारखी फोडणी की, जी खातांना नाकातोंडातून श्वास अगर शिंका येतात. 46
147-17
हे असो उगे आगीते । म्हणे तैसे राइते । पढिये प्राणापरौते । राजसासि गा ॥147॥
हे असो; आगीलाही मागे टाकणारे असे सणसणीत रायते त्या राजसाला प्राणापेक्षां आवडते. 47
148-17
ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा । अन्नमिषे अग्नि भडभडा । पोटी भरी ॥148॥
ज्याची कितीही भक्षण केले तरी तृप्ति होत नाही असा जिभेचा वेडा झालेला मनुष्य, अन्नाच्या मिषाने जणू पोटात अग्नीच सांठवितो. 48
149-17
तैसाचि लवंगा सुंठे । मग भुई गा सेजे खाटे । पाणियाचे न सुटे । तोंडोनि पात्र ॥149॥
त्याचप्रमाणे लवंगा, सुंठ वगैरे खाऊन भुईवर अंथरुणावर किंवा खाटेवर जो लोळतो व तोंडापुढील पाण्याचे भांडे दूर करीत नाही. 49
150-17
ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले । ते चेववावया घातले । माजवण पोटी ॥150॥
तो त्यांनी आहार केला असे न म्हणता शरीरांत सुप्त असलेले रोगरूपी सर्प जागे करण्यासाठी पोटात जणू माजोरी पदाथच भरले आहेत. 150
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-17
तैसे एकमेका सळे । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखे ॥151॥
तसेच एकमेकांची स्पर्धा करीत सर्व रोग एकेच वेळी उद्भवतात, असा राजस आहाराचा दुःखदायक परिणाम होतो. 51
152-17
एवं राजसा आहारा । रूप केले धनुर्धरा । परीणामाचाहि विसुरा । सांगितला ॥152॥
याप्रमाणे राजस आहाराची लक्षणे सांगून त्यांचा परिणाम कसा होतो हेही सांगितलें. 52
153-17
आता तया तामसा । आवडे आहारु जैसा । तेही सांगो चिळसा । झणे तुम्ही ॥153॥
आता त्या तामसाला कोणता आहार प्रिय असतो ते सांगतो की, जो ऐकून तुम्हास खंतीच वाटेल. 53
154-17
तरी कुहिले उष्टे खाता । न मनिजे तेणे अनहिता । जैसे का उपहिता । म्हैसी खाय ॥154॥
तरी सडलेले अगर उष्टे अन्न खातांना हे अहितकर आहे अशी मुळीच शंका न येता जशी म्हैस आंबलेले आंबण तसा जो आहार आहे. 54
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥17. 10॥
155-17
निपजले अन्न तैसे । दुपाहरी का येरे दिवसे । अतिकरे तै तामसे । घेईजे ते ॥155॥
त्याप्रमाणे सकाळचे अन्न दुपारी किंवा दुस-या दिवशी शिळे करून खाणे तामसाला फार आवडते. 55
156-17
नातरी अर्ध उकडिले । का निपट करपोनि गेले । तैसेही खाय चुकले । रसा जे येवो ॥156॥
किंवा अर्धे कच्चे अथवा करपून निःसत्व झालेले अन्नही तो खातो. 56
157-17
जया का आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । ते अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाही ॥157॥
जे पुरे शिजलेले आहे किंवा रसपूर्ण आहे ते अन्न खरे, ” ह्या तामसाला माहितही नसते. 57
158-17
ऐसेनि कही विपाये । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तव राहे । व्याघ्रु जैसा ॥158॥
एखादेवेळी अकस्मात् अशा अन्नाची व त्याची गाठ पडलीच तर वाघाप्रमाणे तो त्याला ( त्या अन्नाला) घाण सुटेपर्यंत शिळे होऊ देतो. 58
159-17
का बहुवे दिवशी वोलांडिले । स्वादपणे सांडिले । शुष्क अथवा सडले । गाभिणेही हो ॥159॥
किंवा फार दिवसांचे शिळे, रुचि गेलेली, शुष्क किंवा सडलेले किंवा आत जीव उत्पन्न झालेलें. 59
160-17
तेही बाळाचे हातवरी । चिवडिले जैसी राडी करी । का सवे बैसोनि नारी । गोतांबील करी ॥160॥
व तेही मुलांनी चिखल चिवडून राड करावी त्याप्रमाणे चिवडलेले व गोतांबील ( सर्व पदार्थाची एक रास) केलेले असे बायकांमुलांसह एकत्र खातो. 160
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-17
ऐसेनि कश्मळे जै खाय । तै तया सुखभोजन ऐसे होय । परी येणेही न धाय । पापिया तो ॥161॥
अशी घाण जेव्हा तो भक्षण करील तेव्हा आज सुखभोजन झाले असे त्यास वाटते; पण त्या पाप्याचे एवढयानेच समाधान होत नाही. 61
162-17
मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा । जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥162॥
चमत्कार असा की, जो घाणेरडे अन्न सदोष व शास्त्रदृष्टीने निषिद्ध अथवा त्याज्य आहे. 62
163-17
तया अपेयांच्या पानी । अखाद्यांच्या भोजनी । वाढविजे उतान्ही । तामसे तेणे ॥163॥
तशा अपेय पदार्थाचे पान करण्याची व अभक्ष्य पदार्थांचे भक्षण करण्याची त्या तामसाला फार इच्छा होते. 63
164-17
एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा । तयाचे फल दुसरा । क्षणी नाही ॥164॥
ह्याप्रमाणे तामसाचा आहार असतो; त्याचे फल मिळण्यास त्यास पुढला क्षण लागत नाही. 64
165-17
जे जेव्हाचि हे अपवित्र । शिवे तयाचे वक्त्र । तेव्हाचि पापा पात्र । जाला तो की ॥165॥
कारण ज्या क्षणी हे अपवित्र अन्न तो तोंडात घालतो तेव्हांच तो पापी ठरतो. 65
166-17
यावरते जे जेवी । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ॥166॥
याउपर जे जेवणे ते जेवण न म्हणता पोटात यातना भरण्यासारखेच होय असे जाणावे. 66
167-17
शिरच्छेदे काय होये । का आगी रिघता कैसे आहे । हे जाणावे काई पाहे । परी साहातुचि असे ॥167॥
शिरच्छेद केला तर कसे काय होते, आगीत शिरले तर काय वाटते, हे प्रत्यक्ष का पहावयाचे असते ? पण त्यालाही याची तयारी असते. 67
168-17
म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना । न सांगोचि गा अर्जुना । देवो म्हणे ॥168॥
म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाही असे देव म्हणाले. 68
169-17
आता ययावरी । आहाराचिया परी । यज्ञुही अवधारी । त्रिधा असे ॥169॥
असे आहाराचे प्रकार झाल्यावर यज्ञाचेही तीन प्रकार आहेत ते ऐक. 69
170-17
परी तिहीमाजी प्रथम । सात्त्विक यज्ञाचे वर्म । आईक पा सुमहिम – । शिरोमणी ॥170॥
तर, ह्या तीन प्रकारापैकी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म, हे कीर्तिमंत शिरोमणे, तू ऐक. 170
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ॥
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥17. 11॥
171-17
तरी एकु प्रियोत्तमु- । वाचोनि वाढो नेदी कामु । जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा ॥171॥
तरी, एक पति, किंवा पतीची इच्छा ह्यापलीकडे पतिव्रतेला जशी स्वतःची अशी इच्छाच नसते. 71
172-17
नाना सिंधूते ठाकोनि गंगा । पुढारा न करीचि रिगा । का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ॥172॥
किंवा समुद्राला मिळाल्यावर गंगेचा आणखी पुढे प्रवेश असा नसतो, अथवा आत्मदर्शन होताच वेद जसा मौनावतो. 72
173-17
तैसे जे आपुल्या स्वहिती । वेचूनिया चित्तवृत्ती । नुरवितीचि अहंकृती । फळालागी ॥173॥
त्याप्रमाणे, जे स्वहितार्थ सर्व चित्तवृत्तींचा व्यय किंवा वेचं करून जे फलाशेने अहंकार बाळगीत नाहीत. 73
174-17
पातलेया झाडाचे मूळ । मागुते सरो नेणेचि जळ । जिराले गा केवळ । तयाच्याचि आंगी ॥174॥
पाणी जसे झाडाचे मूळ गांठल्यावर परत न फिरता त्याच्याच अंगांत जिरतें. 74
175-17
तैसे मने देही । यजननिश्चयाच्या ठायी । हारपोनि जे काही । वांछितीना ॥175॥
त्या प्रमाणे मनाने व देहाने निश्चयपूर्वक यज्ञांत फलेच्छा न करिता निमग्न होतात. 75
176-17
तिही फळवांच्छात्यागी । स्वधर्मावाचूनि विरागी । कीजे तो यज्ञु सर्वांगी । अळंकृतु ॥176॥
केवल स्वधर्म म्हणून, अन्य कशाच्याही इच्छेकरिता नव्हे अशा वैराग्यवृत्तीने ते तो यज्ञ सर्वागाने सालंकृत म्हणजे यथासांग करतात. 76
177-17
परी आरिसा आपणपे । डोळा जैसे घेपे । का तळहातीचे दीपे । रत्न पाहिजे ॥177॥
परंतु, आरशांत आपले स्वरूप जसे आपल्या डोळ्यांना दिसते किंवा तळहातावरील रत्नाची दिव्याने परीक्षा करावी. 77
178-17
नाना उदिते दिवाकरे । गमावा मार्गु दिठी भरे । तैसा वेदु निर्धारे । देखोनिया ॥178॥
किंवा सूर्योदय झाल्यावर आपला इच्छित अगर कोणताही मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदाज्ञेचा निर्णय पाहून. 78
179-17
तिये कुंडे मंडप वेदी । आणीकही संभारसमृद्धी । ते मेळवणी जैसी विधी । आपणपा केली ॥179॥
कुंडे, मंडप, वेदी व आणखी लागणाऱ्या सामग्रीची सिद्धता करितात; ती अशी की, जणू विधीने मूर्तरूपाने अवतरून ती स्वतःच केली आहे असे वाटावे. 79
180-17
सकळावयव उचिते । लेणी पातली जैसी आंगाते । तैसे पदार्थ जेथिचे तेथे । विनियोगुनी ॥180॥
सर्व देहाचे अवयव यथा योग्य आभरणांनी जसे श्रृंगारावे तशी यज्ञाची सर्व सामग्री जेथीच्या तेथे मांडतात. 180
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-17
काय वानू बहुती बोली । जैसी सर्वाभरणी भरली । ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषे ॥181॥
त्याचे आणखी किती वर्णन करावे ? यज्ञाच्या निमित्ताने, सर्व साहित्यासह साक्षात् यज्ञविद्याच तेथे अवतरली आहे असे वाटते. 81
182-17
तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु । नुठऊनिया लागु । महत्त्वाचा ॥182॥
याप्रमाणे कोणताही विशिष्ट हेतु न बाळगता जो सांगोपांग यज्ञ केला जातो. 82
183-17
प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडी कीजे तुळसीचा । परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाही ॥183॥
फल, पुष्प, छाया यांपैकी काहीही प्राप्ति नसलेली तुळशीची झाडं लोक जशी पाटाच्या पाण्यावर रक्षण करतात. 83
184-17
किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥184॥
किंबहुना, फलाशेवीण अशा दक्षतेने जो यज्ञ केला जातो तो सात्विक म्हणावा. 84
अभिसन्धाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥17. 12॥
185-17
आता यज्ञु कीर वीरेशा । करी पै याचि{ऐ}सा । परी श्राद्धालागी जैसा । अवंतिला रावो ॥185॥
अर्जुना, दुसरा जो राजस यज्ञ तोही विधि असाच असतो, पण श्राद्धाच्या दिवशी इष्ट पंगतीला राजाला आमंत्रण देण्यासारखे हे असते. 85
186-17
जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥186॥
राजा जर भोजनास आला तर पुष्कळच उपयोग होण्यासारखा असतो, लौकिकही वाढतो आणि श्राद्धही पार पडले 86
187-17
तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका । दीक्षितु होईन मान्यु लोका । घडेल यागु ॥187॥
तसा तिहेरी हेतु मनात बाळगून तो मनात समजतो की, यज्ञफल म्हणून स्वर्ग ठेवलेलाच; दीक्षित म्हणून लोकात मान मान्यता होणारच; आणि यज्ञासारखे महत्कार्य घडल्याचे श्रेयही मिळाले. 87
188-17
ऐसी केवळ फळालागी । महत्त्व फोकारावया जगी । पार्था निष्पत्ति जे यागी । राजस पै ते ॥188॥
असा केवल फलाशेने व लोकात प्रसिद्धि व्हावी म्हणून जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय. 88
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्दाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥17. 13॥
189-17
आणि पशुपक्षिविवाही । जोशी कामापरौता नाही । तैसा तामसा यज्ञा पाही । आग्रहोचि मूळ ॥189॥
आणि पशु व पक्षी ह्यांच्या विवाहांत कामेच्छेवाचून दुसरा जस कोणी जोशी म्हणून लागत नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला एक आग्रहावाचून अन्य काही कारण लागत नाही. 89
190-17
वारया वाट न वाहे । की मरण मुहूर्त पाहे । निषिद्धांसी बिहे । आगी जरी ॥190॥
वाऱ्याला वाहण्यास काय मार्ग लागतो ? मरणाला काय मुहूर्त पाहिजे ? किंवा अग्नि काय पवित्र अपवित्र यास भितो ? हे जर होत असेल तर- 190
191-17
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा । म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥191॥
तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा लागेल; पण अर्जुना, तो स्वतःच निर्बंधरहित आहे. 91
192-17
नाही विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड । अन्नजाता न सुये तोंड । मासिये जेवी ॥192॥
त्याला विधिची चाड नसते, मंत्राची गरज लागत नाही आणि त्या मंडपांत माशीच्या तोंडालाही अन्न लागत नाही. 92
193-17
वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ के रिगेल दक्षिणा । अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा ॥193॥
ब्राह्मण जेथे डोळ्यासमोर नको, तेथे दक्षिणेचा प्रश्न कोठून येणार ? आणि आगीला जसे वाऱ्याचे सहाय्य व्हावे. 93
194-17
तैसे वायाचि सर्वस्व वेचे । मुख न देखती श्रद्धेचे । नागविले निपुत्रिकाचे । जैसे घर ॥194॥
त्याप्रमाणे पुष्कळ द्रव्य खर्च होऊनही तेथे श्रद्धेचा लेशही नसतो; म्हणजे निपुत्रिकाचे घर त्याच्यामागून वाटेल त्याने बळकवावे तसेच हे होय. 94
195-17
ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु । आइके म्हणे निवासु । श्रियेचा तो ॥195॥
देव म्हणाले अर्जुना, ऐक बरे ! असा जो यज्ञाभास ‘ (नाममात्र यज्ञ ) तो तामस यज्ञ. 95
196-17
आता गंगेचे एक पाणी । परी नेले आनानी वाहणी । एक मळी एक आणी । शुद्धत्व जैसे ॥196॥
अरे, गंगोदक तेच; परंतु निरनिराळ्या प्रकाराने उपयोग केला म्हणजे गटारात सोडलेले अपवित्र होते, व दुसऱ्याने तीर्थ म्हणून शुद्धता येते. 96
197-17
तैसे तिही गुणी तप । येथ जाहले आहे त्रिरूप । ते एक केले दे पाप । उद्धरी एक ॥197॥
त्याप्रमाणे तपही तीन गुणांनी त्रिधा झाले आहे. त्यातील एकाचा आचार पापाला कारण होतो, तर एकाचा उद्धाराला कारण होतो, 97
198-17
तरी तेचि तिही भेदी । कैसेनि पा म्हणौनि सुबुद्धी । जाणो पाहासी तरी आधी । तपचि जाण ॥198॥
तरी त्याचेच तीन भेद कोणते हे जाणावयाची इच्छा असेल तर, प्रथम तप म्हणजे काय हे समजून घे. 98
199-17
येथ तप म्हणजे काई । ते स्वरूप दाऊ पाही । मग भेदिले गुणी तिही । ते पाठी बोलो ॥199॥
आता, तप म्हणजे काय ते प्रथम सांगून तीन गुणांनी ते त्रिविध कसे झाले आहे हे मग सांगू 99
200-17
तरी तप जे का सम्यक् । तेही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ॥200॥
तरी यथार्थ तपाचे, शरीर, मानसिक आणि शाब्द असे तीन भेद आहेत. 200
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-17
आता गा तिही माझारी । शारीर तव अवधारी । तरी शंभु का श्रीहरी । पढियंता होय ॥201॥
आता या तीहींतील प्रथम शारीर तप कोणते ते ऐक; त्या तपस्व्याचे उपास्य शंकर असो किंवा विष्णू असो. 1
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ॥
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥17a14॥
202-17
तया प्रिया देवतालया । यात्रादिके करावया । आठही पाहार जैसे पाया । उळिग घापे ॥202॥
त्या आपापल्या प्रिय देवतांच्या दर्शनार्थं अगर त्यांच्या यात्रादिकांसाठी, आठही प्रहर जणू त्याच्या पायात भोंवरे बांधले आहेत. (जो सारख्या यात्रा करीत राहतो) 2
203-17
देवांगणमिरवणिया । अंगोपचार पुरवणिया । करावया म्हणिया । शोभती हात ॥203॥
देऊळ वाडा स्वच्छ ठेवून व सुशोभित करून, पूजासाहित्य व अलंकारादि पुरवून तसेच देवसेवा करून ज्याचे हात शोभत आहेत. 3
204-17
लिंग का प्रतिमा दिठी । देखतखेंवो अंगेष्टी । लोटिजे का काठी । पडली जैसी ॥204॥
शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती ह्यांचे दर्शन होताच जो दंडायमान भूमीवर साष्टांग नमस्कार घालतो. 4
205-17
आणि विधिविनयादिकी । गुणी वडील जे लोकी । तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे ॥205॥
आणि विधिपालनाने वा विनयादिकाने गावात जे कोणी श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांची जो सेवा करितो. 5
206-17
अथवा प्रवासे का पीडा । का शिणले जे सांकडा । ते जीव सुरवाडा । आणिजती ॥206॥
अथवा प्रवासादिक किंवा अन्यपीडेने संकटांत असलेले जे कोणी, त्यांची सुखसोय अथवा लावतो. 6
207-17
सकल तीर्थांचिये धुरे । जिये का मातापितरे । तया सेवेसी कीर शरीरे । लोण कीजे ॥207॥
अथवा सकल तीर्थाचे तीर्थ जी मातापितरे त्यांच्या, जो सेवेपुढे आपले शरीरही तुच्छ लेखण्याची ज्याची तयारी आहे. 7
208-17
आणि संसारा{ऐ}सा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानी सकरुणु । भजिजे गुरु ॥208॥
आणि संसारासारखा घोर शीण हरण करणारे व ज्ञानदानाविषयी सदैव सकरुण असलेले जे श्रीगुरु त्यांची जो सेवा करितो. 8
209-17
आणि स्वधर्माचा आगिठा । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटी सुभटा । झाडी कीजे ॥209॥
आणि अर्जुना, जडदेहाभिमानरूपी जे बुद्धीवर कीट आलेले आहे ते झडून जावे म्हणून जो नित्य स्वधर्माचरणावृत्तिरूप अग्नीचा त्याला ताव देतो. 9
210-17
वस्तु भूतमात्री नमिजे । परोपकारी भजिजे । स्त्रीविषयी नियमिजे । नांवे नांवे ॥210॥
सर्वातर्यामी एकच परमात्मा आहे ह्या बुद्धीने जो भूतमात्राच्या ठिकाणी लीन असतो, नित्य परोपकाररत असतो, आणि स्त्रीविषयींची गोष्टही ऐकणेस जो तयार नसतो. 210
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-17
जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणे आंगे । तेथूनि जन्म आघवे । सोवळे कीजे ॥211॥
जन्माच्या वेळी जो मातेच्या देहाच स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्रीजातीचा स्पर्श; तेथून पुढे त्या विषयासंबंधी शरीर आजन्म सोवळे आहे. 11
212–17
भुतमात्राचेनि नांवे । तृणही नासुडावे । किंबहुना सांडावे । छेद भेद ॥212॥
गवतालाही जीव आहे म्हणून तेही उपटू नये, किंवा अन्य छेदक वा भेदक कायिक वाचिक क्रिया जो टाळतो. 12
213-17
ऐसैसी जै शरीरी । रहाटीची पडे उजरी । तै शारीर तप घुमरी । आले जाण ॥213॥
असे वागण्याचे जे शरीराला सहज वळण पडलेले असते ते मूर्त अथवा खरे शारीर तप असे समज. 13
214-17
पार्था समस्तही हे करणे । देहाचेनि प्रधानपणे । म्हणौनि ययाते मी म्हणे । शारीर तप ॥214॥
अर्जुना, ह्याला शारीर तप म्हणण्याचे कारण असे की ह्या सर्व क्रिया देहाच्या आश्रयाने होत असतात. 14
215-17
एवं शारीर जे तप । तयाचे दाविले रूप । आता आइक निष्पाप । वाङ्मय ते ॥215॥
ह्याप्रमाणे शारीरतपाचे लक्षण सांगितले; आता निष्पाप वाणीचे तप कोणते ते ऐक. 15
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥17. 15॥
216-17
तरी लोहाचे आंग तुक । न तोडिताचि कनक । केले जैसे देख । परीसे तेणे ॥216॥
परिस हा लोखंडाचा आकार, वजन वगैरे कशालाही न्यूनता न आणिता जसे याचे सुवर्ण करितो. 16
217-17
तैसे न दुखविता सेजे । जावळिया सुख निपजे । ऐसे साधुत्व का देखिजे । बोलणा जिये ॥217॥
शेजाऱ्याला अगर जवळ येणाराला न दुखविता त्याला सुख होईल अशी ज्याच्या भाषणात साधुता दिसेल. 17
218-17
पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेचि जिये । तैसे एका बोलिले होये । सर्वाहि हित ॥218॥
पाणी झाडाना म्हणून दिले जाते, पण, याच्या ओलाव्यावर गवत सहजच बाढते, त्याप्रमाणे एकापाशी केलेले भाषण सर्वाना हितकर असते. 18
219-17
जोडे अमृताची सुरसरी । तै प्राणांते अमर करी । स्नाने पाप ताप वारी । गोडीही दे ॥219॥
अमृतगंगा प्राप्त झाली तर अमरत्व येते, स्नानाने पाप व ताप जातात व प्राशनालाही गोड असते. 19
220-17
तैसा अविवेकुही फिटे । आपुले अनादित्व भेटे । आइकता रुचि न विटे । पीयुषी जैसी ॥220॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
त्याप्रमाणे त्यांच्या बरोबरच्या भाषणाने अज्ञान नाहीसे होते, आत्मस्वरूपदर्शन (अनादित्व) होते आणि ते ऐकत असता, जसा अमृताचा वीट येत नाही तसा कधी वीटही येत नाही. 220
221-17
जरी कोणी करी पुसणे । तरी होआवे ऐसे बोलणे । नातरी अवर्तणे । निगमु का नाम ॥221॥
जर कोणी काही प्रश्न केला तर भाषणाचा हा प्रकार असतो नाहीतर स्वाध्याय (वेदपाठ) अथवा हरिस्मरण चालू असते. 21
222-17
ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनी । केली जैसी वदनी । ब्रह्मशाळा ॥222॥
ऋग्वेदादि तिन्ही वेदांची वाग्मंदिरांत प्रतिष्ठा करून वदन म्हणजे जणु ब्रह्मशाळाच बनवितात ! 22
223-17
ना तरी एकाधे नांव । तेचि शैव का वैष्णव । वाचे वसे ते वाग्भव । तप जाणावे ॥223॥
किंवा, शिव अथवा विष्णु ह्यांपैकी एकाद्या देवतेचे नांव मुखात सारखे असते, तेच वाचिक तप होय. 23
224-17
आता तप जे मानसिक । तेही सांगो आइक । म्हणे लोकनाथनायक । नायकु तो ॥224॥
लोकनाथ नायक भगवान म्हणाले, आता मानसिक तप कथन करितों, तेही ऐक. 24
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥17. 16॥
225-17
तरी सरोवर तरंगी । सांडिले आकाश मेघी । का चंदनाचे उरगी । उद्यान जैसे ॥225॥
तरी तरंगावाचून सरोवर, अभ्रांवाचून आकाश अथवा सर्पावाचून चंदनवन अथवा उद्यान. 25
226-17
नाना कळावैषम्ये चंद्रु । का सांडिला आधी नरेंद्रु । नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळे ॥226॥
किंवा कलाहीन चंद्र, चिंतारहित राजा अथवा मंदर पर्वतावाचून समुद्र. 26
227-17
तैसी नाना विकल्पजाळे । सांडुनि गेलिया सकळे । मन राहे का केवळे । स्वरूपे जे ॥227॥
ह्याप्रमाणे सर्व दूषने अथवा विकल्परहित अशी जी मनाची केवलस्थिति. 27
228-17
तपनेवीण प्रकाशु । जाड्येवीण रसी रसु । पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ॥228॥
उष्णतेवाचून प्रकाश, जडत्वावाचून अन्न किंवा पोकळीवाचून आकाश, अशी जी स्थिति. 28
229-17
तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके । हिंवली जैसी आंगिके । हिवो नेदी निजांग ॥229॥
तसे आपण आहो असे जाणून जे मन आपला स्वभाव टाकते (चंचलता, संकल्प, विकल्प) म्हणजे थंडीलाच जशी थंडीची बाधा होत नाही, तसे ते स्वरूपस्थितीला पावले. 29
230-17
तैसे न चलते कळंकंवीण । शशिबिंब जैसे परीपूर्ण । तैसे चोखी शृंगारपण । मनाचे जे ॥230॥ बु
अचल, कलंकरहित परिपूर्ण चंद्रबिंब जसे असावे त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपी मनाची जी विश्रांति किंवा स्थापना. 230
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-17
जाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥231॥
या स्थितीत वैराग्याची इच्छा नाहीशी होऊन, मनाचे चांचल्य मोडून आमबोधाचे अंकुर यावे असा वाफसा त्या मनाच्या ठिकाणी तयार असतो. ( ते आत्मबोधाचे अधिकारी होते ) 31
232-17
म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावे जे वक्त्र । ते वाचेचेही सूत्र । हाती न धरी ॥232॥
म्हणून, अशा स्थितीत ज्या वाणीने शास्त्राध्ययन व विचार करावयाचा ती एक शब्दही उच्चारण्यास प्रवृत्त होत नाही. 32
233-17
ते स्वलाभ लाभलेपणे । मन मनपणाही धरू नेणे । शिवतले जैसे लवणे । आपुले निज ॥233॥
व मिठाने आपले मूल तत्त्व जे पाणी त्याला पावून जसे निजस्वरूप टाकावे, त्याप्रमाणे, आत्मलाभाच्या लाभलेपणाने संतुष्ट होणाऱ्या त्या मनाला मनपणाही उरत नाही इत्यर्थः 33
234-17
तेथ के उठिती ते भाव । जिही इंद्रियमार्गी धाव । घेऊनि ठाकावे गाव । विषयांचे ते ॥234॥
अशा स्थितींत, इंद्रियद्वारा धाव घेऊन विषयग्राम गांठावे, इत्यादि विकार तेथे उत्पन्न होण्याला अवसरच कोठला ? 34
235-17
म्हणौनि तिये मानसी । भावशुद्धिचि असे अपैसी । रोमशुचि जैसी । तळहातासी ॥235॥
म्हणून तळहात जसा रोमरहित सहजच असतो, त्याप्रमाणे अशा स्थितींतील मन सहजच शुद्ध किंवा विकल्प रहित असते. 35
236-17
काय बहु बोलो अर्जुना । जै हे दशा ये मना । तै मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥236॥
अर्जुना, फार काय सांगावे ? मनाची जेव्हा अशी स्थिति होते तेव्हा ते मानसतप ह्या संज्ञेला पात्र होते. 36
237-17
परी ते असो हे जाण । मानस तपाचे लक्षण । देवो म्हणे संपूर्ण । सांगितले ॥237॥
पण, ते असो; हे सांगितले ते मानसतपाचे संपूर्ण लक्षण असे जाण. 37
238-17
एवं देहवाचाचित्ते । जे पातले त्रिविधत्वाते । ते सामान्य तप तूते । परीसविले गा ॥238॥
असे कायिक, वाचिक व मानसिक अशा तीन रूपांचे तप म्हणजे काय हे तुला सामान्यत्वे ऐकविले. 38
239-17
आता गुणत्रयसंगे । हेचि विशेषी त्रिविधी रिगे । तेही आइक चांगे । प्रज्ञाबळे ॥239॥
आता तीन गुणांच्या संगाने हेच तप तीन प्रकारचे कसे होते तेही लक्ष्य देऊन ऐक. 39
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥17. 17॥
240-17
तरी हेचि तप त्रिविधा । जे दाविले तुज प्रबुद्धा । तेचि करी पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ॥240॥
तरी, अर्जुना, जे हे तीन प्रकारचे कायिक, वाचिक व मानसिक तप तुला सांगितले त्याचेच फलशारहित पूर्ण श्रद्धेने आचरण कर. 240
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-17
जै पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी । तै तयातेचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ॥241॥
अरे, पूर्ण शुद्ध मनाने ज्या वेळी ह्या तपाचे श्रद्धायुक्त आचरण केले जाते, तेव्हां, त्याला ज्ञाते सात्विक तप असे म्हणतात. 41
सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ॥17. 18॥
242-17
नातरी तपस्थापनेलागी । दुजेपण मांडूनि जगी । महत्त्वाच्या शृंगी । बैसावया ॥242॥
किंवा तपाच्या निमित्ताने, इतरांपेक्षा आपले वैशिष्टय दाखविण्याची व मोठेपणा मिरविण्याची व मिळविण्याची जे महत्त्वाकांक्षा धरितात. 42
243-17
त्रिभुवनीचिया सन्माना । न वचावे ठाया आना । धुरेचिया आसना । भोजनालागी ॥243॥
जगांतील सर्व मानमान्यता अन्य कोणाच्या वाट्यास न जाता आपल्याच वाट्यास यावी व भोजनादि समारंभांत आपल्यालाच अग्रस्थान असावे. 43
244-17
विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा । विश्वे आपलिया यात्रा । कराविया यावे ॥244॥
साऱ्या जगाने आपली स्तुति करावी अशी आपली पात्रता दाखवितो व सर्वानी आपल्या भेटीस यावे अशी जो इच्छा करितो. 44
245-17
लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा । भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ॥245॥
लोकांनी नानाप्रकारे आपलीच स्तुति करावी, इतरांचा आश्रय करू नये, व सर्व महत्त्वाचे भोग आपल्यासच घडावे असे जो इच्छितो. 45
246-17
अंग बोल माखूनि तपे । विकावया आपणपे । अंगहीन पडपे । जियापरी ॥246॥
अंगहीनता म्हणजे कुरूपता झांकण्यासाठी ज्याप्रमाणे एखादा मनुष्य भांगपट्टा थाटमाट करितो, त्याप्रमाणे खरे स्वरूप झांकून आपली लोकात तपी म्हणून प्रसिद्धि व्हावी ह्यासाठी वरून तपाचा खूप आव आणतो. 46
247-17
हे असो धनमानी आस । वाढौनी तप कीजे सायास । तै तेचि तप राजस । बोलिजे गा ॥247॥
हे असो, द्रव्य व मानमान्यतेसाठी सायासाने जे तप केले जाते ते राजस तप होय असे म्हणतात. 47
248-17
परी पहुरणी जे दुहिले । तै ते गुरू न दुभेचि व्याले । का उभे शेत चारिले । पिकावया नुरे ॥248॥
किंवा पहुरणी नामक रोगाने ज्या गाईचे दूध आटते ती गाय व्याली तरीही तिला दूध येत नाही किंवा शेतात उभे असलेले पीक जर गुरांकडून खावविले तर पीक कसे येणार ? 48
249-17
तैसे फोकारिता तप । कीजे जे साक्षेप । ते फळी तव सोप । निःशेष जाय ॥249॥
त्याप्रमाणे, केवल प्रसिद्धीसाठी जे तप केले जाते त्याचे काहीही फल मिळत नसते. 49
250-17
ऐसे निर्फळ देखोनि करिता । माझारी सांडी पंडुसुता । म्हणौनि नाही स्थिरता । तपा तया ॥250॥
शिवाय तप फळाला येत नाही असे दिसतांच ते मध्येच सोडून देतो ह्यामुळे त्याला स्थिरताही नसते. 250
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-17
एऱ्हवी तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ? ॥251॥
अभ्रांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट उडवून दिला तरी असा अकाली येणारा मेष काय फार काळ टिकतो ? 51
252-17
तैसे राजस तप जे होये । ते फळी कीर वांझ जाये । परी आचरणीही नोहे । निर्वाहते गा ॥252॥
त्याप्रमाणे हे राजस तप त्याला फल तर येत नाहीच, पण, ते अखेरपर्यंत पुरे होण्याचीच मारामार असते. 52
253-17
आता तेचि तप पुढती । तामसाचिये रीती । पै परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे ॥253॥
आता याच्यापुढे वर्णिले जाणारे जे तामस तप त्याला स्वर्गफल तर नाहीच, पण राजसा सारखी कीर्ती मिळण्याचाही संभव नाही. 53
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥17. 19॥
254-17
केवळ मूर्खपणाचा वारा । जीवी घेऊनि धनुर्धरा । नाम ठेविजे शरीरा । वैरियाचे ॥254॥
अर्जुना, केवळ मूर्खपणाच्या भरी भरून शरीर हा जणू आपला वैरी आहे अशा जीवाची समजूत करून घेतो. 54
255-17
पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागी । का इंधन कीजे हे आगी । आंतु लावी ॥255॥
ते शरीर म्हणजे जसे काही काष्ठ आहे असे मानून त्याला सर्व बाजूनी पंचाग्नीची धग लावतो. 55
256-17
माथा जाळिजती गुगुळु । पाठी घालिजती गळु । आंग जाळिती इंगळु । जळतभीता ॥256॥
माथ्यावर गुगुळ जाळतात, पाठीला गळ टोचतात व भोवताली अग्नि पेटवून मध्ये आपले शरीर जाळतात. 56
257-17
दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायाचि उपवास । का घेपती धूमाचे घास । अधोमुखे ॥257॥
श्वासोछवास बंद करून व्यर्थ उपवास करितात अथवा उलटे टांगून घेऊन धूम्रपान करतात 57
258-17
हिमोदके आकंठे । खडके सेविजती तटे । जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥258॥
थंडीत गळयाइतक्या थंडगार पाण्यात उभे राहतात, तटावरील कातळावर बसतात व जिवंत मांस चिमट्याने तोडतात ! 58
259-17
ऐसी नानापरी हे काया । घाय सूता पै धनंजया । तप कीजे नाशावया । पुढिलाते ॥259॥
असे नानाप्रकारचे क्लेश शरीराल देऊन दुसऱ्याचा घात व्हावा हा हेतु बाळगून तप करितात. 59
260-17
आंगभारे सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । का आड जालियाते रगडा । करी जैसा ॥260॥
भारानेच स्वतःच्या कडयाचा सुटणारा धोंडा खली पडून स्वतःचे शतशः तुकडे तर करून घेतोच, पण पडतांना मध्ये येणाऱ्या वस्तूही रगडून जसा चूर करितो ! 260
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-17
तेवी आपलिया आटणिया । सुखे असतया प्राणिया । जिणावया शिराणिया । कीजती गा ॥261॥
त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खाली ओढण्याची उत्कट इच्छा बाळगतात. 61
262-17
किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी । तप निफजे ते किरीटी । तामस होय ॥262॥
अर्जुना, ह्याप्रमाणे व्यर्थ व दुष्ट तपाचरण ज केले जाते हे तामस तप होय. 62
263-17
एवं सत्त्वादिकांच्या आंगी । पाडिले तप तिही भागी । जाले तेही तुज चांगी । दाविले व्यक्ती ॥263॥
एवं, सत्वादिक तीन जातीचे जे तप ते तुला । स्पष्टपणे सांगितले. 63
264-17
आता बोलता प्रसंगा । आले म्हणौनि पै गा । करू रूप दानलिंगा । त्रिविधा तया ॥264॥
आत – ओघानेच आले म्हणून त्रिविध दानाचे लक्षण सांगू. 64
265-17
येथ गुणाचेनि बोले । दानही त्रिविध असे जाले । तेचि आइक पहिले । सात्त्विक ऐसे ॥265॥
तीन गुणांच्या योगे ह्या दानाचेही तीन प्रकार होतात त्यातील सात्विक प्रकार प्रथम श्रवण कर. 65
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ॥
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥17. 20॥
266-17
तरी स्वधर्मा आंतौते । जे जे मिळे आपणयाते । ते ते दीजे बहुते । सन्मानयोगे ॥266॥
तर स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळेल ते जो सम्मान पूर्वक दुसऱ्याला अर्पण करतो. 66
267-17
जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । तैसाचि दानाचा हा लागु । देखतसे ॥267॥
दैवयोगाने उत्तम व बियाणे मिळाले तरी जसे उत्तम क्षेत्र (शेत ) व वाफसा ह्यांची उणीव भासते, तशाच अडचणी दानांतही आहेत असे दिसून येते. 67
268-17
अनर्घ्य रत्न हाता चढे । तै भांगाराची वोढी पडे । दोनी जाली तरी न जोडे । लेते आंग ॥268॥
अमूल्य रत्न प्राप्त झाले तरी सोन्याची गरज असते ( कोंदण वगैरेसाठी ) व सोनेही प्राप्त झाले तरी तो रत्नालंकार शोभावा असे सुंदर शरीर मिळणे कठीण. 68
269-17
परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकी मिळती । जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयी ॥269॥
परंतु आपल्या भाग्याचा उत्कर्ष असतो तेव्हांच सणासारखा दिवस, जीवाचे आप्तेष्ट व द्रव्यानुकूलता असा एकत्र योग येतो. 69
270-17
तैसे निफजावया दान । जै सत्त्वासि ये संवाहन । तै देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ॥270॥
त्याप्रमाणे हातून सात्विक दान घडण्याचा योग असेल तेव्हांच योग्य देश, काल व सत्पात्र व द्रव्यानुकूलता ह्यांची जोड लाभते. 270
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-17
तरी आधी तव प्रयत्नेसी । होआवे कुरुक्षेत्र का काशी । नातरी तुके जो इहीसी । तो देशुही हो ॥271॥
म्हणून दानार्थ प्रथम प्रयत्ने करून, कुरुक्षेत्र किंवा काशी अथवा ह्यांच्या तोडीचे एखादे क्षेत्र असा देश पहावा. 71
272-17
तेथ रविचंद्रराहुमेळु । होता पाहे पुण्यकाळु । का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला ॥272॥
तेथे सूर्यग्रहण वा चंद्रग्रहणासारखा पुण्यकाल अथवा तत्सम दुसरा पुण्यकाल असावा, 72
273-17
तैशा काळी तिये देशी । होआवी पात्र संपत्ती ऐसी । मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेचि का ॥273॥
तशा मुहूर्तावर या देशात असे सत्पात्र मिळावे की, जो शुचित्वाचा मूर्तीमंत अवतार होय. 73
274-17
आचाराचे मूळपीळ । वेदांची उतारपेठ । तैसे द्विजरत्न चोखट । पावोनिया ॥274॥
तो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान, वेदाचे वसतिस्थान, शुद्ध विद्वद्रत्न असा असावा. 74
275-17
मग तयाच्या ठाई वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता । परी प्रियापुढे कांता । रिगे जैसी ॥275॥
मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी; पण तीही, पतीपुढे कांता जशी लीन असते तशा लीनतेने व संतोषावै करावी. 75
276-17
का जयाचे ठेविले तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपे विडा राया । दिधला जैसा ॥276॥
किंवा, जशी काही त्याची अ । पल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उतराई व्हावे अथवा राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी भावना असवी. 76
277-17
तैसेनि निष्कामे जीवे । भूम्यादिक अर्पावे । किंबहुना हावे । नेदावे उठो ॥277॥
अशा निष्कामबुद्दीने भूमि आदिक दान ब्राह्मणास अर्पण करावे, पण त्याबद्दल मनात मुळीच फलेच्छा नसवी 77
278-17
आणि दान जया द्यावे । तयाते ऐसेया पाहावे । जया घेतले नुमचवे । कायसेनही ॥278॥
आणि ज्याला दान द्यावयाचे तो असा असावा की त्याला आपल्या दानाची उलटफेड करण्याची कधी संधि येणार नाही. 78
279-17
साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा । का पाहिला आरसा । येरीकडे ॥279॥
आकाशाकडे मुख करून हाक मारिली असता जसे प्रत्युत्तर मिळत नाही, किंवा आरशाच्या मागील बाजूने पाहता प्रतिबिंब दिसत नाही, 79
280-17
नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुके । उधळौनि कवतिके । न येईजे हाता ॥280॥
किंवा कौतुकाने पाण्यावर चेंडू आपटला असता जसा तो प्रत्याघाताने परत आपल्या हात येत नाही. 280
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-17
नाना वसो घातला चारू । माथा तुरंबिला बुरू । न करी प्रत्युपकारू । जियापरी ॥281॥
किंवा चारलेला पोळ अथवा उपकार केलेला कृतघ्न मनुष्य हे जसे केव्हांही प्रत्युपकार करीत नाहीत. 81
282-17
तैसे दिधले दातयाचे । जो कोणेही आंगे नुमचे । अर्पिलया साम्य तयाचे । कीजे पै गा ॥282॥
त्याप्रमाणे दिलेले दान कोणत्याही रीतीने परत होण्याचा संभव नाही, असे जे दान तेच श्रेयशसकर दान होय. 82
283-17
ऐसिया जे सामग्रिया । दान निफजे वीरराया । ते सात्त्विक दानवर्या । सर्वाही जाण ॥283॥
अशा तजवीजीने केलेले जे दान ते, अर्जना, सात्विक सर्वश्रेष्ठ दान होय. 83
284-17
आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु । दानभागुही निर्मळु । न्यायगतु ॥284॥
आणि तो देश काल पात्र जसे योग्य असतात तसे दिले जाणारे द्रव्यही न्यायनिष्ठ व धामिक आचाराने मिळविलेले असावे. 84
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥17. 21॥
285-17
परी मनी धरूनि दुभते । चारिजे जेवी गाईते । का पेव करूनि आइते । पेरू जाइजे ॥285॥
मनात दुधाची आशा धरून गाईला चारतात किंवा आधी पेवाची तयारी करून मग जसे शेत पेरतात. 85
286-17
नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतु जाइजे सोयिरा । का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥286॥
किंवा आहेर मिळेल ही पोटात आशा धरून मग जसे लग्नकार्यात सोयऱ्याला आमंत्रण देतात, किंवा जेथून वाण परत येईल अशाकडेच ते पाठवावयाचे. 86
287-17
पै कळांतर गाठी बांधिजे । मग पुढिलांचे काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ॥287॥
किंवा लांच अगर मोबदला घेऊन दुसऱ्याचे काम करावे अथवा द्रव्य घेऊन आर्त औषध जनांस द्यावे. 87
288-17
तैसे जया जे दान देणे । तो तेणेचि गा जीवने । पुढती भुंजावा भावे येणे । दीजे जे का ॥288॥
तसे दान ज्याला द्यावयाचे, त्या दानाच्या आधारावरच स्वतः पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेता येईल अशी बुद्धि आत ठेवावयाची. 88
289-17
अथवा कोणी वाटे जाता । घेतले उमचो न शकता । मिळे जै पंडुसुता । द्विजोत्तमु ॥289॥
अथवा, सहज वाटेने जातांना एखादा पवित्र पण प्रत्युपकार न करणारा ब्राह्मण भेटला, 89
290-17
तरी कवड्या एकासाठी । अशेषा गोत्रांचीच किरीटी । सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी । तयाचिये ॥290॥
तर अधेल्या पैशाचे दानाकरिता त्याच्या हाता वर सर्व आप्तेष्टांच्या प्रायश्चित्तार्थ जे उदक सोडतात, 290
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-17
तेवीचि पारलौकिके । फळे वांछिजती अनेके । आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ॥291॥
त्याचप्रमाणे, अनेक पारलौकिक फळांची इच्छा बाळगून जे दान देतात व तेही इतके की त्याने एक वेळची भूकही भागू नये 91
292-17
तेही ब्राह्मणु नेवो सरे । की हाणिचेनि शिणे झांसुरे । सर्वस्व जैसे चोरे । नागऊनि नेले ॥292॥
आणि ते दान ब्राह्मण नेवू लगला की, चोरांनी नागविल्याप्रमाणे जणू आपली हानि झाली, असे मानून त्याबद्दल मनात झुरतात. 92
293-17
बहु काय सांगो सुमती । जे दीजे या मनोवृत्ती । ते दान गा त्रिजगती । राजस पै ॥293॥
अर्जुना, फार काय वर्णावे ! अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान सर्व जगात राजसदान म्हणून प्रसिद्ध आहे 93
अदेशकाले यद्दनमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥17. 22॥
294-17
मग म्लेंच्छांचे वसौटे । दांगाणे हन कैकटे । का शिबिरे चोहटे । नगरींचे ते ॥294॥
मग म्लेच्छांच्या वस्तीची जागा, अथवा अरण्य किंवा अपवित्र स्थळ किंवा शिबिर, नगरांतले चव्हाटे, 94
295-17
तेही ठाई मिळणी । समयो सांजवेळु का रजनी । तेव्हा उदार होणे धनी । चोरियेच्या ॥295॥
अशा ठिकाणी बसून सायंकाळी अथवा रात्री चोरीने मिळविलेले द्रव्य उदारपणाने दान करितात. 95
296-17
पात्रे भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी । जिये मूर्तिमंते भुररी । भुले तया ॥296॥
हे द्रव्य ज्यांना दिले जाते ते लोक म्हणजे भाट, तमासगीर, वेश्या, जुगारी, भुताटक्या, अथवा भूल घालणारे असे असतात. 96
297-17
रूपानृत्याची पुरवणी । ते पुढा डोळेभारणी । गीत भाटीव तो श्रवणी । कर्णजपु ॥297॥
त्यातील रूपवानांनी त्यांच्यापुढे नृत्यगानादि प्रकार करून त्यास नेत्रकटाक्षाने वगैरे भुरळ पाडून त्याच्या कानांत जाईल असा स्तुतीचा जप केला; 97
298-17
तयाहीवरी अळुमाळु । जै घे फुलागंधाचा गुगुळु । तव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ॥298॥
म्हणजे तल्लीन होऊन, अत्तर गुलाब वगैरे सुगंधी द्रव्यांचा चवीने भोग घेऊन मूर्तीमंत वेताळच बनतात ! 98
299-17
तेथ विभांडूनिया जग । आणिले पदार्थ अनेग । तेणे घालू लागे मातंग । गवादी जैसी ॥299॥
मग लोकांना लुटून आणलेल्या अनेक पदार्थानि तेथे मांग गारोडीसारख्यांना अन्नछत्र घालतात. 99
300-17
एवं ऐसेनि जे देणे । ते तामस दान मी म्हणे । आणि घडे दैवगुणे । आणिकही ऐक ॥300॥
एकूण असा जो द्रव्याचा व्यय होतो त्याला मी तामसदान म्हणतो; आणि त्यातही एखादेवेळी कसा प्रकार घडतो, ते ऐक. 300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-17
विपाये घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसा पर्व जोडे । पुण्यदेशी ॥301॥
भुंग्याने कोरलेल्या लांकडावर कदाचित् अक्षरा कृति उठावी अथवा टाळी मारीत असता त्यात कावळा सहज सापडावा, त्याप्रमाणे ह्या तामसदान करणाराला पुण्यक्षेत्रांत पर्वणीचा काळ लाभतो. 1
302-17
तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोही आला । तोही दर्पा चढला । भांबावे जरी ॥302॥
तेथे ह्याचे ऐश्वर्य पाहून सहज सत्पात्र ब्राह्मण दान मांगूआला, तेव्हा हा गर्वाने फुगून त्यास काही द्यावे असेही त्यास वाटले. 2
303-17
तरी श्रद्धा न धरी जिवी । तया माथाही न खालवी । स्वये न करी ना करवी । अर्घ्यादिक ॥303॥
तरी त्याजबद्दल मनात श्रद्धा न धरिता किंवा त्याला नमस्कार न करिता स्वतः किंवा अन्याकडूनही त्याच्या हातावर दानाचे उदक सोडीत नाही. 3
304-17
आलिया न घली बैसो । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो । हा अप्रसंगु कीर असो । तामसी नरी ॥304॥
त्याला आसनही देत नाही, मग गंधअक्षतादिकांची गोष्ट कशाला ? असा तो त्याचा अपमान करितो 4
305-17
पै बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तू करणे याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥305॥
व एखाद्या ऋणकऱ्याची जशी बोळवण करावी त्याप्रमाणे, त्याच्या हातावर थोडेसे द्रव्य देतो व तेव्हांही त्याची ‘अरे तुरे ” अशा भाषेनेच संभावना करितो. 5
306-17
आणि जया जे दे किरीटी । तयाते उमाणी तयासाठी । मग कुबोले का लोटी । अवज्ञेच्या ॥306॥
आणि ज्याला जे थोडे बहुत देतो, तेवढयाच्या जोरावर त्याचा अपमान करून त्याला अपशब्द बोलण्यासही कमी करीत नाही. 6
307-17
हे बहु असो यापरी । मोल वेचणे जे अवधारी । तया नांव चराचरी । तामस दान ॥307॥
हे पुरे; असे जे दान त्याला लोकात तामस दान असे म्हणतात. 7
308-17
ऐशी आपुलाला चिन्ही । अळंकृते तिन्ही । दाने दाविली अभिधानी । रजतमाचिया ॥308॥
ह्याप्रमाणे त्या त्या दानांची तिन्ही लक्षणे तुला सांगितली 8
309-17
तेथ मी जाणत असे । विपाये तू गा ऐसे । कल्पिसील मानसे । विचक्षणा ॥309॥
अर्जुना, मी समजतो की तुझ्या मनात ह्यावर अशी शंका येणे संभवनीय आहे की, 9
310-17
जे भवबंधमोचक । येकले कर्म सात्त्विक । तरी का वेखासी सदोख । येर बोलावी ? ॥310॥
संसारबंधापासून मुक्त करणारे जे एक सात्विक कर्म त्याचेच वर्णन मी करावयाचे होते, अन्य सदोष कर्माचे का केले ? 310
311-17
परी नोसंतिता विवसी । भेटी नाही निधीसी । का धू न साहता जैसी । वाती न लगे ॥311॥
परंतु भूतसमंधादिकांची अडचण दूर केल्याशिवाय जसे जुने ठेवने प्राप्त होत नाही, किंवा, धूर सोसल्याशिवाय जसा अग्नि पेटत नाही. 11
312-17
तैसे शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचे कवाड । ते भेदणे याते कीड । म्हणावे का ? ॥312॥
त्याप्रमाणे शुद्ध सात्विक गुणाच्या आड रज व तम ह्यांचा प्रतिबंध आहे; अरे, त्यांचा नाश करणे चुकीचे ठरेल काय ? 12
313-17
आम्ही श्रद्धादि दानात । जे समस्तही क्रियाजात । सांगितले का व्याप्त । तिही गुणी ॥313॥
श्रद्धे पासून दानापर्यंत जेवढया क्रिया सांगितल्या त्या सर्व ह्या तीन गुणांनी युक्त असतात. 13
314-17
तेथ भरवसेनि तिन्ही । न सांगोचि ऐसे मानी । परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलो येरे ॥314॥
खरोखर त्या तीहीचे वर्णन आम्ही केलेच नसते हे ध्यानात ठेव; पण, सत्वगुणाची स्पष्ट कल्पना येण्यासाठी दुसऱ्या दोन गुणांची लक्षणे सांगणं प्राप्तच झाले. 14
315-17
जे दोहीमाजी तिजे असे । ते दोन्ही सांडिताचि दिसे । अहोरात्रत्यागे जैसे । संध्यारूप ॥315॥
ज्याप्रमाणे दिवस नाही व रात्र नाही अशा दोहीच्या त्यागाने संध्याकाळचे स्पष्टरूप ध्यानात येते; त्याप्रमाणे रज व तम ह्या दोहोंहून निराळा असा जो तिसरा गुण तो सत्व होय, हे स्पष्टपणे ध्यानात येते. 15
316-17
तैसे रजतमविनाशे । तिजे जे उत्तम दिसे । ते सत्त्व हे आपैसे । फावासि ये ॥316॥
तसेच रज तम ह्यांच्या नाशाने (त्यागाने) तिसरा जो सत्वगुण तो आपोआप उत्तमपणे लक्ष्यात येतो. 16
317-17
एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिले तम रज । ते सांडूनि सत्त्वे काज । साधी आपुले ॥317॥
ह्याप्रमाणे तुला सत्वाची स्पष्ट कल्पना यावी म्हणून रज व तम ह्यांचे निरूपण केले; त्यांचा त्याग करून सत्वाने आपले कार्य साधून घे. 17
318-17
सत्त्वेचि येणे चोखाळे । करी यज्ञादिके सकळे । पावसी तै करतळे । आपुले निज ॥318॥
या सत्वाच्याच सहाय्याने यज्ञादि सर्व क्रियाजात आचर. म्हणजे तुला आपल्या स्वरूपाची करतळावरील वस्तूप्रमाणे प्राप्ति होईल. 18
319-17
सूर्ये दाविले सांते । काय एक न दिसे तेथे । तेवी सत्त्वे केले फळाते । काय नेदी ? ॥319॥
सूर्यच स्वतः सहाय झाल्यावर कोणती वस्तु दिसणार नाही ? तसे सात्विक आचाराला कोणते फल येणार नाही ? 19
320-17
हे कीर आवडताविखी । शक्ति सत्त्वी आथी निकी । परी मोक्षेंसी एकी । मिसळणे जे ॥320॥
सत्वाच्या आंगी असे वाटेल तितके सामर्थ्य असले तरी, मोक्षप्राप्ति म्हणून जो एक स्थिति आहे. 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-17
ते एक आनचि आहे । तयाचा सावावो जै लाहे । तै मोक्षाचाही होये । गावी सरते ॥321॥
तिचे एक निराळेच तंत्र आहे; त्यांचे सहाय्य जेव्हा ह्या सत्वाला मिळेल तेव्हा त्या सत्वगुणाला मोक्षापर्यंत मजल मारिता येईल. 21
322-17
पै भांगार जऱ्ही पंधरे । तऱ्ही राजावळीची अक्षरे । लाहे तैचि सरे । जियापरी ॥322॥
पंधरा दराचे उत्तम सुवर्ण असले तरी त्यावर जेव्हा राजसत्तेचा शिक्का पडेल तेव्हांच हे जसे चालते. 22
223-17
स्वच्छे शीतळे सुगंधे । जळे होती सुखप्रदे । परी पवित्रत्व संबंधे । तीर्थाचेनि ॥323॥
स्वच्छ, शीतळ व सुगंध असे आल्हादकारी उदक असले तरी, त्यास तीर्थासंबंधावाचून पवित्रता येत नाही. (आंत तीर्थ घालावे लागतं. ) 23
324-17
नयी हो का भलतैसी थोरी । परी गंगा जै अंगीकारी । तैचि तिये सागरी । प्रवेशु गा ॥324॥
सामान्य ओढयाला स्वतः थोरवी नसो; पण गंगेला तो मिळाला म्हणजे त्याला समुद्र प्रवेशाची योग्यता येते. 24
325-17
तैसे सात्त्विका कर्मा किरीटी । येता मोक्षाचिये भेटी । न पडे आडकाठी । ते वेगळे आहे ॥325॥
त्याप्रमाणे, अर्जुना, सात्विक कर्माचरणाने मोक्ष प्राप्तीकडे जात असता, ज्याचा प्रतिबंध होऊ नये ते एक वेगळेच आहे. 25
326-17
हा बोलु आइकतखेवी । अर्जुना आधि न माये जीवी । म्हणे देवे कृपा करावी । सांगावे ते ॥326॥
हे भाषण ऐकतांच, अर्जुनाच्या चित्ताला असह्य तळमळ लागली व तो म्हणाला, देवांनी कृपा करून ते सांगावेच. 26
327-17
तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती । जेणे सात्त्विक ते मुक्ती- । रत्न देखे ॥327॥
तेव्हा कृपाळ व चक्रवर्ती भगवान म्हणाले ज्याच्या योगे सात्विक गुणाला मुक्तिरत्नाचा लाभ होतो त्याचे लक्षण ऐक. 27
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥17. 23॥
328-17
तरी अनादि परब्रह्म । जे जगदादि विश्रामधाम । तयाचे एक नाम । त्रिधा पै असे ॥328॥
तरी, परब्रह्म हे अनादि असून जगदादिकांचे विश्रांतिस्थान आहे; हे त्यांचे एकच नांव तीन प्रकारचे आहे. 28
329-17
ते कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती- । माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥329॥
खरोखर पहाता वस्तुतः त्याला नाम किंवा जाति नाही, परंतु अज्ञानी जीवांना त्याची ओळख अथवा कल्पना व्हावी म्हणून वेदांनी खूण म्हणून त्याचे ‘ब्रह्म ” असे नांव ठेविले. 29
330-17
उपजलिया बाळकासी । नांव नाही तयापासी । ठेविलेनि नांवेसी । ओ देत उठी ॥330॥
मुलाला जन्मतः काही नांव नसते, पण नंतर त्याला जे नांव द्यावे त्या नांवाने हाक मारली असता ‘ ओ ‘देते. 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-17
कष्टले संसारशीणे । जे देवो येती गाऱ्हाणे । तया ओ दे नांवे जेणे । तो संकेतु हा ॥331॥
संसाराच्या कष्टाने शीण पावलेले लोक जेव्हा वेदाकडे आपले गाऱ्हाणे सांगतात तेव्हा त्यांना ज्या नांवाने तो ‘ओ’ देतो. तो हा संकेत किंवा ती ही ब्रह्मनामक खुण होय. 31
332-17
ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वे तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदे बापे ॥332॥
ब्रह्मावरील अनिर्वाच्यतेचा आळ फिटावा व त्याची ऐक्यरूपाने भेट व्हावी अशा हेतूने वेदाने सकृप होऊन जीवांसाठीहे मंत्ररूप नाम शोधून ठेविले. 32
333-17
मग दाविलेनि जेणे एके । ब्रह्म आळविले कवतिके । मागा असत ठाके । पुढा उभे ॥333॥
मग ह्या खुणेच्या मंत्राने त्याला (ब्रह्माला) कौतुकाने हाक मारिलो असता, जे मार्ग म्हणजे दृष्टीआड असल्यासारखे असते ते प्रत्यक्ष पुढे उभे रहतें. 33
334-17
परी निगमाचळशिखरी । उपनिषदार्थनगरी । आहाति जे ब्रह्माच्या येकाहारी । तयांसीच कळे ॥334॥
पण, वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदरुपी नगरांत ज्यांचा ब्रह्माशी सहसमागम असतो त्यासच हे नाम महात्म्य कळतें. 34
335-17
हेही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥335॥
हेही असो; ब्रह्मदेवाला सृष्टि उत्पन्न करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झाले ते ज्या एका नामाच्या आवृत्तीने म्हणजे जपाने च होय. 35
336-17
पै सृष्टीचिया उपक्रमा- पूर्वी गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥336॥
अर्जुना, सृष्टि उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेव एकटाच वेडयासारखा (काही न सुचून ) बसला होता. 36
337-17
मज ईश्वराते नोळखे । ना सृष्टिही करू न शके । तो थोरु केला एके । नामे जेणे ॥337॥
त्याला माझी ओळख नव्हती किंवा सृष्टि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ही नव्हते, पण, त्या वेदसांकेतिक नामाने त्याला एवढे सामर्थ्य आले. 37
338-17
जयाचा अर्थु जीवी ध्याता । जे वर्णत्रयचि जपता । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥338॥
ज्या मंत्राच्या अर्थाचे मनात ध्यान करून व ज्या मंत्राच्या तीन अक्षरांचा जप करून त्याला विश्व निर्माण करण्याची योग्यता आली. 38
339-17
तेधवा रचिले ब्रह्मजन । तया वेद दिधले शासन । यज्ञा ऐसे वर्तन । जीविके केले ॥339॥
प्रथम ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना वेदाज्ञरूपी आचाराचे बंधन लावून, निर्वाहार्थं यज्ञादि साधने स्वाधीन केली. 39
340-17
पाठी नेणो किती येर । स्रजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्ही भुवने ॥340॥
मग आणखी किती लोक निर्माण केले त्याची गणतीच नाही; तसेच त्रिभुवन निर्माण करून त्यास व्यवहारार्थं बक्षीस करून दिले. 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-17
ऐसे नाममंत्रे जेणे । धातया अढंच करणे । तयाचे स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥341॥
ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला अशी प्रचंड शक्ति प्राप्त झाली, त्याचे स्वरूप तू आता श्रवण कर, असे श्रीनिवास भगवान् म्हणाले. 41
342-17
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥342॥
तरी सर्व मंत्रांचा राजा जो ” प्रणव ” तोच “ॐ ” आदिवर्ण म्हणजे मूळ अक्षर असे जाण व ‘तत् ” हे दुसरे व ” सत्” हे या मंत्राचे तिसरे अक्षर होय. 42
343-17
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हे त्रिप्रकारु । हे फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचे ॥343॥
ह्याप्रकारे “ॐ तत्सत” आकाराचे हे त्रिप्रकारक ब्रह्मनाम हेच कोणी उपनिषदांचे सुंदर पुष्प त्याचा सुगंध तू सेवन कर. 43
344-17
येणेसी गा होऊनि एक । जै कर्म चाले सात्त्विक । तै कैवल्याते पाइक । घरीचे करी ॥344॥
ह्या वर्णत्रयाच्या ऐक्याने सात्विक कर्माचरण केले असता मोक्ष त्याचा दास होतो. 44
345-17
परी कापुराचे थळीव । आणून देईल दैव । लेवो जाणणेचि आडव । तेथ असे बापा ॥345॥
दैवयोगाने, कापुराचे अलंकार जरी मिळाले, तरी ते ल्यावे कसे हे समजणेच मोठे कठीण असते. 45
346-17
तैसे आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचे ॥346॥
तसे, सत्कर्माचे आचरण व ब्रह्मनामाचा उच्चार जरी केला, तरी जर त्याच्या उपयोगाचे वर्म माहीत नसेल, 46
347-17
तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानू नेणता परवडी । मुद्दल तुटे ॥347॥
तर, साधुसंत प्रेमाने घरी आले तरी त्यांचे आदरातिथ्य कसे करावे हे न जाणता जर अपमान झाला तर पुण्य लागण्याऐवजी पाप मात्र लागते. 47
348-17
का ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधिली मोट । गळा जेवी ॥348॥
किंवा सोन्याचे उत्तम टीक वगैरे दागिने एकत्र गाठोडे करून जसे गळ्यात बांधावे 48
349-17
तैसे तोंडी ब्रह्मनाम । हाती ते सात्त्विक कर्म । विनियोगेवीण काम । विफळ होय ॥349॥
तसे मुखाने ब्रह्म नामोच्चार, हाताने सात्विक कर्म, पण त्याचा विनियोग मात्र माहीत नाही असे असेल तर ते व्यर्थ जाते. 49
350-17
अगा अन्न आणि भूक । पासी असे परी देख । जेऊ नेणता बालक । लंघनचि की ॥350॥
अरे, पोटात भूक आहे, जवळ अन्नही आहे, पण कसे जेवावे ते माहित नसलेल्या बालकाला जसा उपवास घडतो. 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
351-17
का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणता वीरा । प्रकाशु नोहे ॥351॥
किंवा तेल, वात व अग्नि वगैरे सामग्री असली तरी त्यांचे एकत्रीकरण करण्याची पद्धति माहीत नसेल तर, जशी प्रकाशाची प्राप्ति होत नाही. 51
352-17
तैसे वेळे कृत्य पावे । तेथिचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ ते आघवे । विनियोगेवीण ॥352॥
त्याप्रमाणे, योग्य वेळी कर्म घडून त्यावेळचे मंत्रही जरी स्मरले तरी त्याच्या विनियोगाचे वर्म माहीत नसेल तर ते सर्व व्यर्थ होते. 52
353-17
म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हे परब्रह्मनाम एक । विनियोगु तू आइक । आता याचा ॥353॥
म्हणून, ह्या परब्रह्माचे जे वर्णत्रयात्मक एक नाम आहे त्याचा विनियोग (उपयोग) कसा करावा ते तू आता श्रवण कर. 53
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥17. 24॥
354-17
तरी या नामींची अक्षरे तिन्ही । कर्मा आदिमध्यनिदानी । प्रयोजावी पै स्थानी । इही तिन्ही ॥354॥ नामीची
तरी ह्या ब्रह्मनामाची तिन्ही अक्षरे ” ॐ तत् सत् ” ह्यांची कर्मारंभाच्या आधी मध्ये व अंती योजना करावी. 54
355-17
हेचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी । आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥355॥
हेच विनियोगाचे वर्म जाणून, ब्रह्मवेत्ते (ब्राह्मण) ब्रह्मरूप झाले. 55
356-17
ब्रह्मेसी होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकी । जे चावळले वोळखी । शास्त्रांचिया ॥356॥
ब्रह्मरूप होण्याची ज्यांना इच्छा आहे ते, ज्यांचे यथार्थ स्वरूप शास्त्रांत सांगितले आहे अशा, यज्ञादिक क्रियांचा त्याग करीत नाहीत. 56
357-17
तो आदि तव ओंकारु । ध्याने करिती गोचरु । पाठी आणिती उच्चारु । वाचेही तो ॥357॥
ते प्रथम ॐकाराची ध्यानाने सिद्धि करून नंतर त्याचा वाणीने उच्चार करतात. 57
358-17
तेणे ध्याने प्रकटे । प्रणवोच्चारे स्पष्टे । लागती मग वाटे । क्रियांचिये ॥358॥
असे ध्यान करून नंतर प्रकट प्रणवोच्चार करून मग सर्व कर्माना आरंभितात. 58
359-17
आंधारी अभंगु दिवा । आडवी समर्थु बोळावा । तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभी ॥359॥
अंधारांत दिव्याचा, अरण्यात शूर सोबत्याचा जसा आधार असतो तसा ‘प्रणवाचा’ कर्मारंभांत रक्षक म्हणून उपयोग असतो. 59
360-17
उचितदेवोद्देशे । द्रव्ये धर्म्ये आणि बहुवसे । द्विजद्वारा हन हुताशे । यजिती पै ते ॥360॥
योग्य देवतांच्या उद्देशाने धर्माजित पुष्कळ द्रव्याने ते ब्राह्मणद्वारा अग्नींत यजन करतात. 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-17
आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपी हवनी । यजिती पै विधानी । फुडे हौनी ॥361॥
आहवनीय, गार्हपत्य व दक्षिण ह्या तीन अग्नींत, हवनीय आज्यादि (तूप वगैरे) द्रव्यांनी ते हवन करतात. 61
362-17
किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग । करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥362॥
किंबहुना अनेक यज्ञ करण्याच्या संकल्पाने आपल्यास न आवडणाच्या इतर उपाधींचा त्याग करितात (सांसारिक उपाधि) 62
363-17
का न्याये जोडला पवित्री । भूम्यादिकी स्वतंत्री । देशकाळशुद्ध पात्री । देती दाने ॥363॥
आणि न्यायाजित पवित्र द्रव्य व भूमि वगैरे दाने शुद्ध देशकाल पाहून सत्पात्र ब्राह्मणास देतात. 63
364-17
अथवा एकांतरा कृच्छ्री । चांद्रायणे मासोपवासी । शोषोनि गा धातुराशी । करिती तपे ॥364॥
अथवा एक दिवस आड भोजन करून किंवा कृच्छचांद्रायणादि मासिक उपवासाने शरिरांतील सप्त धातूचे शोषण करून जे तप करितात. 64
365-17
एवं यज्ञदानतपे । जिये गाजती बंधरूपे । तिहीच होय सोपे । मोक्षाचे तया ॥365॥
याप्रमाणे, जी यज्ञ, दान, तपे बंधरूप आहेत, अशी प्रसिद्धि आहे त्यांनीच, आरंभाला केलेल्या प्रणवोच्चाराच्या हातवटीने, त्यांना मोक्ष सुलभ होते. 65
366-17
स्थळी नावा जिया दाटिजे । जळी तियांचि जेवी तरीजे । तेवी बंधकी कर्मी सुटिजे । नामे येणे ॥366॥
जमिनीवर जी नाव मोठे ओझे अशी वाटते तीच पाण्यात लोटल्यावर हलकी वाटून तरणोपाय होते. त्याप्रमाणे कर्म बंधनकारक खरी, पण प्रणवोच्चाराने ती बंधनकारक होत नाहीत. 66
367-17
परी हे असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया । ओंकारे सावायिलिया । प्रवर्तती ॥367॥
परंतु हे राहो; ह्या यज्ञदानादि क्रिया ॐकाराच्या सहाय्याने मोठ्या योग्यतेस चढतात. 67
368-17
तिया मोटकिया जेथ फळी । रिगो पाहाती निहाळी । प्रयोजिती तिये काळी । तच्छब्दु तो ॥368॥
ती कर्मे फलीभूत होण्याच्या वेळेस ” तत ” शब्दाचा ते प्रयोग करितात. 68
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥17. 25॥
369-17
जे सर्वाही जगापरौते । जे एक सर्वही देखते । ते तच्छब्दे बोलिजे ते । पैल वस्तु ॥369॥
जे सर्व जगाच्या पलीकडले असून सर्वसाक्षी आहे व ज्याचा ‘तत् ” ह्या । शब्दाने निर्देश करितात ते सर्वश्रेष्ठ परब्रह्म होय. 69
370-17
ते सर्वादिकत्वे चित्ती । तद्रूप ध्यावूनिया सुमती । उच्चारेही व्यक्ती । आणिती पुढती ॥370॥
अर्जुना, ते सर्वाच्याही आधीचे असे त्याच्या रूपाचे चित्तांत ध्यान करून नंतर त्याचा ‘तत् ” शब्द मे स्पष्ट निर्देश करितात. 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-17
म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेसी क्रिया इया । तेचि होतु आम्हा भोगावया । काहीचि नुरो ॥371॥
आणि म्हणतात तत् शब्दवाच्य जे ब्रह्म त्याला ह्या सर्व क्रिया त्यांच्या फलांसह अर्पण असोत, व त्या तद्रूपच होवोत; त्यांचा अगर त्यांच्या फळांचा आम्हास कोणत्याही प्रकारे भोग न घडो. 71
372-17
ऐसेनि तदात्मके ब्रह्मे । तेथ उगाणूनि कर्मे । आंग झाडिती न ममे । येणे बोले ॥372॥
ह्याप्रमाणे तद्रूप जे ब्रह्म त्याला सर्व कर्मे समधून “न मम” (माझे काहीही नव्हे) असा उच्चार करून अंग झाडून मोकळे होतात. 72
373-17
आता ओंकारे आदरिले । तत्कारे समर्पिले । इया रिती जया आले । ब्रह्मत्व कर्मा ॥373॥
आता प्रणब म्हणजे ॐ काराच्या उच्चाराने आरंभून जे कर्म ‘तत् ” शब्दाच्या उच्चाराने ब्रह्मसमर्पण करून त्याला ब्रह्मत्व आणिलें. 73
374-17
ते कर्म कीर ब्रह्माकारे । जाले तेणेही न सरे । जे करी तेणेसी दुसरे । आहे म्हणौनि ॥374॥
पण ते कर्म ब्रह्माकार झाले, एवढयानेच केवल भागत नाही. कारण त्यांचा कर्ता म्हणून एक दुसरेपणाने शिल्लक आहेच. 74
375-17
मीठ आंगे जळी विरे । परी क्षारता वेगळी उरे । तैसे कर्म ब्रह्माकारे । गमे ते द्वैत ॥375॥
मीठ पाण्यात विरून जरी रूपाने नष्ट झाले तरी क्षार ह्या स्वभावाने त्याचे पृथकत्व उरतेच, त्याप्रमाणे कर्म ब्रह्मरूप आहे किंवा झाले असे म्हणण्यातच त्याचे द्वितीयत्व सिद्ध होते. 75
376-17
आणि दुजे जव जव घडे । तव तव संसारभय जोडे । हे देवो आपुलेनि तोंडे । बोलती वेद ॥376॥
आणि जोपर्यंत द्वैत नांदत असेल तोपर्यंत संसारदुःख होणारच, हे देवानी मुख्यतः सांगितले व वेदवचनही तसेच आहे. 76
377-17
म्हणौनि परत्वे ब्रह्म असे । ते आत्मत्वे परीयवसे । सच्छब्द या रिणादोषे । ठेविला देवे ॥377॥
म्हणून कर्मकर्त्याहून भिन्नत्वाने असणारे जे ब्रह्म त्याचे पर्यवसान कर्तृस्वरूपात व्हावे (कर्त्याला स्वयंब्रह्मत्व यावे) ह्या उद्देशाने अंती ” सत् ” म्हणजे त्रिकालाबाध्यत्व म्हणजेच नित्यत्व व एकत्व दर्शविणाऱ्या शब्दाची योजना देवांनी केली आहे. 77
378-17
तरी ओंकार तत्कारी । कर्म केले जे ब्रह्मशरीरी । जे प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिले ॥378॥
तरी ” ॐ तत ” ह्या दोन शब्दांनी आरंभिलेले व ब्रह्मरूप झालेले जे कर्म तेच प्रशस्त (स्तुत्य) होय असे वाखाणिले आहे. 78
379-17
प्रशस्तकर्मी तिये । सच्छब्दा विनियोगु आहे । तोचि आइका होये । तैसा सांगो ॥379॥
असे जे प्रशस्त कर्म त्याचे ठिकाण “ सत्” ” शब्दाचा कसा विनियोग करावा तो ऐकण्यासारखा आहे, तोच आता सांगतो. 79
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥17. 26॥
380-17
तरी सच्छब्दे येणे । आटूनि असताचे नाणे । दाविजे अव्यंगवाणे । सत्तेचे रूप ॥380॥
तरी ह्या अखेरच्या “ सत शब्दाने जगदादि सर्व असत् पसारा आटून म्हणजे बाध करून (तात्विक दृष्या त्रैकालिक अत्यंताभाव) अव्यंग म्हणजे शुद्ध, चोख, निर्भेळ सत्स्वरूप दर्शविले. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-17
जे सत् तेचि काळे देशे । होऊ नेणेचि अनारिसे । आपणपा आपण असे । अखंडित ॥381॥
जी सद्वस्तु ती देशाचे व कलाने बाधित न होता अखंड आपली आपण जशीच्या तशी असते. 81
382-17
हे दिसते जेतुले आहे । ते असतपणे जे नोहे । देखता रूपी सोये । लाभे जयाची ॥382॥
हे जेवढे म्हणून दृश्य आहे ते सर्वे असत् आहे म्हणून त्यासारखी जी सद्वस्तु नाही तर ज्या सद्रूपाचे दर्शन अथवा अपरोक्षत्व म्हणजे आत्मदर्शनच होय. 82
383-17
तेणेसी प्रशस्त ते कर्म । जे जाले सर्वात्मक ब्रह्म । देखिजे करूनि सम । ऐक्यबोधे ॥383॥
त्या सत् शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप होणारे जे प्रशस्त कर्म ते करूनही ऐक्यबोधदृष्टीने त्याजबद्दल समत्व म्हणजे ब्रह्मदृष्टि असावी. 83
384-17
तरी ओंकार तत्कारे । जे कर्म दाविले ब्रह्माकारे । ते गिळूनि होईजे एकसरे । सन्मात्रचि ॥384॥
म्हणजे, ॐ कार व तत् ह्या शब्दोच्चाराने ब्रह्मरूप होते असे सांगितलेले जे कर्म, त्याजविषयींही सन्मात्र ब्रह्मत्वदृष्टीच्या उदयाने कर्मत्वदृष्टि हारपून जावी (त्रिपुटी संभवत नाही अशी दृष्टि उगवावी) 84
385-17
ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणे हो ॥385॥
अखेरच्या सत् शब्दाचा अंतस्थ हेतु असा आहे, असे भगवान् श्रीरंगच म्हणतात; मी सांगतो असे समजू नका हो. 85
386-17
ना मीचि जरी हो म्हणे । तरी श्रीरंगी दुजे हेचि उणे । म्हणौनि हे बोलणे । देवाचेचि ॥386॥
कारण, “ देव म्हणतात व मीही तसेच म्हणतो ” असे म्हणणे म्हणजे श्रीरंग आणि मी असे द्वैत उत्पन्न करणे होय, म्हणून हे सर्व भाषण देवांचेच होय. (यात मी आलोंच) 86
387-17
आता आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारी । सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो ॥387॥
आता आणखी एक प्रकाराने, हा सत् शब्द सात्विक कर्मात कसा कामाला येतो तेही ऐक. 87
388-17
तरी सत्कर्मे चांगे । चालिली अधिकारबगे । परी एकाधे का आंगे । हिणावती जै ॥388॥
तरी सत्कर्मे यथाविधि व यथाधिकार उत्तम रीतीने चालू असता कदाचित् एखाद्या गोष्टीचे त्यात वैगुण्य उत्पन्न झाले, 88
389-17
तै उणे एके अवयवे । शरीर ठाके आघवे । का अंगहीन भांडावे । रथाची गती ॥389॥
एखाद्या अवयवाच्या व्यंगतेमुळे जसे सर्वं शरीर पंगु होते किंवा रथाच्या एखाद्या अंगाच्या उणीवेने जसा त्याच्या गतीला प्रतिबंध होतो. 89
390-17
तैसे एकेचि गुणेंवीण । सतचि परी असतपण । कर्म धरी गा जाण । जिये वेळे ॥390॥
तसे, सत्कर्मच खरे; पण एखाद्या गुणाने विकल झाले तरी त्याला जेव्हा असतत्व येऊ पहाते. 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-17
तेव्हा ओंकार तत्कारी । सावायिला हा चांगी परी । सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ॥391॥
तेव्हा “कार व तत् कार” ह्यांच्यासहवर्तमान उच्चारलेला सत् हा शब्द कर्माला आलेल्या वैगुण्याचा उद्धार करितो. 91
392-17
ते असतपण फेडी । आणी सद्भावाचिये रूढी । निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा ॥392॥
आणि सत् शब्द हा आपल्या ठिकाणच्या सामर्थ्याने कर्माच्या ठिकाणी आलेले ते असंतपण फेडून त्याला सद्भावाला आणितो. 92
393-17
दिव्यौषध जैसे रोगिया । का सावावो ये भंगलिया । सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ॥393॥
एखाद्या रोग्याला दिव्यौषधाची जोड व्हावी किंवा पराभूताला सहाय मिळावे, त्याप्रमाणे व्यंग पावलेल्या कर्माला सत्कर्माचा अत्यंत उपयोग होतो. 93
394-17
अथवा काही प्रमादे । कर्म आपुलिये मर्यादे । चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ॥394॥
किंवा प्रमादाने कर्म मर्यादा चुकल्यामुळे त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली; 94
395-17
चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरे पडे । राहाटीमाजी न घडे । काइ काइ ? ॥395॥
नेहमी जाणाराही रस्ता चुकतो, किंवा परीक्षकालाही क्वचित् भ्रम होतो; अहो, ह्या व्यवहारांत कोणती गोष्ट होणार नाही असे निश्चयाने म्हणवेल ? 95
396-17
म्हणौनि तैसी कर्मा । राभस्ये सांडे सीमा । असाधुत्वाचिया दुर्नामा । येवो पाहे जे ॥396॥
तशी अविचाराने (अवधान न राहून) जर कर्माच्या विधीचे उल्लंघन केले गेले आणि त्याची निषिद्धत्वांत गणना होण्याची पाळी आली; 96
397-18
तेथ गा हा सच्छब्दु । येरा दोहींपरीस प्रबुद्धु । प्रयोजिला करी साधु । कर्माते यया ॥397॥
अशावेळी दुसऱ्या ॐ व तत् ह्या शब्दांपेक्षां प्रबुद्ध (सावध) असलेला हा सच्छब्द त्याची योजना केल्याने त्या कर्माला साधुता येते. 97
398-18
लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी । का मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ॥398॥
लोखंडाला परिसाची भेट व्हावी, ओहोळाला गंगेची भेट व्हावी किंवा मृतावर जसा अमृतवर्षाव व्हावा; 98
399-17
पै असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा । हे असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ॥399॥
त्याप्रमाणे, अर्जुना, विकल कर्माला ‘सत् ” ह्या शब्दप्रयोगाचा उपयोग होतो; हे असो; अरे, त्याच्या नामाची अशी प्रौढीच आहे. 99
400-17
घेऊनि येथिंचे वर्म । जै विचारिसी हे नाम । तै केवळ हेचि ब्रह्म । जाणसी तू ॥400॥
ह्यांचे वर्म जाणून त्या नामाचा विचार केला असता तुला तेच ब्रह्मरूप आहे असे कळून चुकेल 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
401-17
पाहे पा ॐतत्सत् ऐसे । हे बोलणे तेथ नेतसे । जेथूनि का हे प्रकाशे । दृश्यजात ॥401॥
अरे, असे पहा, ‘ॐ तत्सत ” हा उच्चार तो करणाराला त्या स्थलाप्रत नेतो की जेथून किंवा ज्यायोगे ह्या दृश्यजाताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त होते. 1
402-17
ते तव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट । तयाचे हे आंतुवट । व्यंजक नाम ॥402॥
सर्व विशेषभावरहित जे केवल शुद्ध परब्रह्म त्यांचे ‘ॐ तत्सत्’ हे अखेरच्या खुणेचे वाचक नांव आहे. 2
403-17
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा । या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥403॥
परंतु, आकाश अन्य कोणाच्या आधारावर नसून जसे स्वतःच्याच आधारावर स्थित आहे तसे ॐ तत्सत् नाम व नामी परब्रह्म ही अभेदत्वाने स्वरूपतः स्वाश्रयावरच किंवा आश्रयरहित स्थित आहेत. 3
404-17
उदयिला आकाशी । रवीचि रवीते प्रकाशी । हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी ॥404॥
आकाशात सूर्योदय झाला हे सूर्यप्रकाशानेच जाणले जाते; तसे हे नाम व नामी परब्रह्म हे स्वप्रकाशत्वाने अभेदरूपाने प्रकाशित आहे. 4
405-17
म्हणौनि त्र्यक्षर हे नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म । ययालागी कर्म । जे जे कीजे ॥405॥
म्हणून ॐ तत्सत् हे तीन अक्षरी नाम नांव नसून शुद्ध ब्रह्मच होय, म्हणून जे जे कर्म करिशील, 5
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥17. 27॥
406-17
ते याग अथवा दाने । तपादिकेंही गहने । तिये निफजतु का न्यूने । होऊनि ठातु ॥406॥
ते यज्ञकर्म असो, दान असो, अथवा तपादिकासारखे गहन कर्म असो; व ही सर्व कर्मे यथाविधि पार पडोत किंवा विकल होवोत. 6
407-17
परी परीसाचा वरकली । नाही चोखाकिडाची बोली । तैसी ब्रह्मी अर्पिता केली । ब्रह्मचि होती ॥407॥
परंतु परिसाच्या स्पर्शाने जे लोह सुवर्णत्व पावते त्या सोन्यात चांगलावाईटपणा कसून पाहाण्याचे कारण नसते, त्याप्रमाणे ॐ तत्सत् मंत्राणे ब्रह्मार्पण केलेली कर्मे ब्रह्मरूपच होतात. 7
408-17
उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारी । निवडू न येती सागरी । जैसिया नदी ॥408॥
लक्ष्यात असावे की, त्या कर्मात उणे पुरे असे काही राहातच नाही. उदा. नद्या एकदां समुद्रास मिळाल्यावर जसा त्यांचा चांगलेवाईटपणा अथवा पवित्र अपवित्रपणा वेगळा नसतो. 8
409-17
एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती । सांगितली उपपत्ती । डोळसा गा ॥409॥
त्याप्रमाणे हे बुद्धिमंत पार्था, ब्रह्मनामाच्या अंगी असलेली शक्ति तुला दृष्टांतपूर्वक सांगितली. 9
410-17
आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा । विनियोगु नागरा । बोलिलो रीती ॥410॥
आणि त्र्यक्षरी मंत्रांतील प्रत्येक अक्षराचा वेगवेगळयास्थली कसा विनियोग करावा ती रीतही सांगितली. 410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-17
एवं ऐसे सुमहिम । म्हणौनि हे ब्रह्मनाम । आता जाणितले की सुवर्म । राया तुवा ? ॥411॥
अर्जुना, तुझ्या आता वर्म ध्यानात आले असेल की, अशी सर्वश्रेष्ठ व सुप्रसिद्ध जी वस्तु, त्याला बृहत् (मोठे) ह्या धातूच्या अर्थानुसार “ ब्रह्म ” हे नांव प्राप्त झाले. 11
412-17
तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा । जयाचे जाले बंधा । उरो नेदी ॥412॥
तरी अर्जुना, इतःपर ह्या नामावर नित्य श्रद्धा ठेवून तू कर्म केली असता ती जन्मबंधास कारणीभूत होणार नाहीत. (तू मुक्त होशील) 12
413-17
जिये कर्मी हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु । तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो ॥413॥
ज्या कर्मामध्ये ह्या मंत्राचा (प्रयोगाचा) यथाविधि विनियोग केला जातो तेथे सर्व वेदाचेच अनुष्ठान घडल्याचे श्रेय जोडले. 13
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥17. 28॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥17॥
अर्थ : ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रयविभागयोग नावाचा हा सतरावा अध्याय समाप्त झाला. ॥17॥
414-17
ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे । दुराग्रहाची त्राये । वाढऊनिया ॥414॥
नाहीतर, हा मार्ग सोडून, श्रद्धेचा त्याग करून, दुराग्रहाच्या भरी भरून 14
415-17
मग अश्वमेध कोडी कीजे । रत्ने भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठीही तपिजे । तपसाहस्री ॥415॥
मग जरी करोडो अश्वमेध केले, रत्नपूर्ण पृथ्वी दान केले, किंवा एका अंगठयावर उभे राहून हजारो वर्षे कैक तपे केली. 15
416-17
जळाशयाचेनि नांवे । समुद्रही कीजती नवे । परी किंबहुना आघवे । वृथाचि ते ॥416॥
किंवा परोपकारार्थं समुद्रासारखे महान तलावादि (जलाशय) बांधिले तरी ते जणू सर्व व्यर्थ होय. 16
417-17
खडकावरी वर्षले । जैसे भस्मी हवन केले । का खेंव दिधले । साउलिये ॥417॥
खडकावर वृष्टि व्हाव, भस्मांत हवन करावे अथवा सावलीला आलिंगन देण्यास जावे, 17
418-17
नातरी जैसे चडकणा । गगना हाणितले अर्जुना । तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ॥418॥
किंवा, अर्जुना, आकाशाला ठोसे मारावे त्याप्रमाणे ही सर्व कमे वृथा होतात. 18
419-17
घाणा गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । तैसे दरिद्र तेवढे । ठेलेचि आंगी ॥419॥
घाण्यात पाषाणगोटे घालून गाळू गेले असता जसे तेल किंवा पेड (पेंड) काहीच मिळत नाही; त्याप्रमाणे ह्या कर्माची स्थिति होऊन व्यर्थ श्रम द्रव्यादि हानि मात्र होऊन दरिद्र जोडले जाते 19
420-17
गाठी बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरी । न सरोनि जैसी मारी । उपवासी गा ॥420॥
पदरात खापऱ्या बांधून ह्या किंवा अन्य देशात गेले तरी त्यांचा द्रव्य म्हणून कोठेही स्वीकार न होऊन जशी उपाशी मरण्याची पाळी येते. 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-17
तैसे कर्मजाते तेणे । नाही ऐहिकीचे भोगणे । तेथ परत्र ते कवणे । अपेक्षावे ॥421॥
त्याप्रमाणे त्या सर्वही कर्मापासून ऐहिक भोगप्राप्तीही होणार नाहीं, तर तेथे पारलौकिक भोगांची कोणी आशा करावी ? 21
422-17
म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा । हे असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टी तो ॥422॥
म्हणून ब्रह्मनामवर श्रद्धा न ठेविता जे जे कर्म करावे ते दुष्टफलाला किंवा अदृष्टफलालाही कारण न होता केवळ शीणमात्र होय. 22
423-17
ऐसे कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी । श्रीवर वीर नरहरी । बोलिले तेणे ॥423॥
ह्याप्रमाणे, पातकरूप हत्तीचा अंतक सिंहरूप, त्रिविध तापरूपी अंधकारनाशक सूर्य, लक्ष्मीचा पति, वीर नरहरी जे भगवान् श्रीकृष्ण त्यांनी कथन केले. 23
424-17
तेथ निजानंदा बहुवसा- । माजी अर्जुन तो सहसा । हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ॥424॥
पौणिमेला शुद्ध चांदण्यात चंद्रापेक्षां चांदणेच आकर्षक होऊन, चंद्र जसा काही हरपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या भरतींत अर्जुन हरपल्याप्रमाणे म्हणजे देहभानविवर्जित झाला. 24
425-17
अहो संग्रामु हा वाणिया । मापे नाराचांचिया आणिया । सूनि माप घे मवणिया । जीवितेसी ॥425॥
अहो ! युद्धप्रसंग ही एक हिशेब घेणारी वाण्याची पेढी आहे. तेथे बाणांच्या अग्रांनी प्राणांतापर्यंत माप घेतेले जाते. 25
426-17
ऐसिया समयी कर्कशे । भोगीजत स्वानंदराज्य कैसे । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाई ॥426॥
अहो, अशा घोर प्रसगी हा स्वानंदसाम्राज्य कसे भोगीत आहे पहा ! आज ह्याच्यासारखा भाग्याचा पुतळा दुसरा कोणीही दिसत नाही ! 26
427-17
संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझो ये रिपूचिया । आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥427॥
संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, शत्रुपक्षाचा खरा, पण ह्या अर्जुनाच्या गुणाचे कौतुक वाटते, इतकेच नव्हे तर हा आम्हासही सुख देणारा गुरूच जणु भेटला आहे. 27
428-17
हा न पुसता हे गोठी । तरी देवो का सोडिते गाठी । तरी कैसेनि आम्हा भेटी । परमार्थेसी ॥428॥
ह्याने देवांना ह्या गोष्टी विचारल्या नसत्या तर देवांना हे रहस्य सांगण्याचे काय कारण पडले होते ? व मग आमच्यासारख्यांना तरी परमार्थाच्या भेटीचा योग कसा येता ? 28
429-17
होतो अज्ञानाच्या आंधारा । वोसंतीत जन्मवाहरा । तो आत्मप्रकाशमंदिरा- । आंतु आणिले ॥429॥
अज्ञानांधकारांत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात होतो, त्या मला ह्याने आत्मप्रकाशमंदिरामध्ये आणून सोडले. 29
430-17
एवढा आम्हा तुम्हा थोरु । केला येणे उपकारु । म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वे होय ॥430॥
तुमच्या आमच्यावर इतका मोठा उपकार अर्जुनाने केला आहे, म्हणून हा जणु श्रीव्यासांचा सहोदरच (बंधु) गुरुरूपाने अवतरलासा वाटतो. 430
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-17
तेवीचि संजयो म्हणे चित्ती । हा अतिशयो या नृपती । खुपेल म्हणौनि किती । बोलत असो ॥431॥
त्याचप्रमाणे संजयाला मनात असेही वाटले की, राजाला ही अर्जुनाची स्तुति खूपेल म्हणून किती बोलावी ? आता पुरे. 31
432-17
ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली । जे पार्थे का पुसिली । श्रीकृष्णाते ॥432॥
म्हणून हा स्तुतिवाद सोडून, पार्थाने देवांना विचारलेल्या अन्य प्रश्नाकडे संजय वळला. 32
433-17
याचे जैसे का करणे । तैसे मीही करीन बोलणे । ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥433॥
श्रीनिवृत्तिदास ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, अर्जुनाच्या गोड प्रश्नाचे मीही गोड व्याख्यान करितों. श्रवण करावे. 433
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां श्रद्धात्रयविभागयोग योगोनाम सप्तदशोऽध्यायः ॥17॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-28॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 433॥
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

