शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 15: PURUSHOTTAM YOG:
Sartha Dnyaneshwari Adhyay 15 PURUSHOTTAM YOG:
Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ॥ अथ पञ्चदशोऽध्यायः अध्याय पंधरावा ॥ पुरुषोत्तमयोग ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 20॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 599॥
॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ॥ अथ पञ्चदशोऽध्यायः अध्याय पंधरावा ॥ पुरुषोत्तमयोग ॥
अध्याय पंधरावा
1-15
आता हृदय हे आपुले । चौफाळुनिया भले । वरी बैसऊ पाउले । श्रीगुरूंची ॥15-1॥
( सद्गुरुस्तवन)
आता आपले अंत:करण शुद्ध करुन त्या चौरंगावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करु.
2-15
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेद्रिय कुड्मुळी । भरूनिया पुष्पांजुळी । अर्घ्यु देवो ॥2॥
श्रीगुरू व आपण एक आहोत, अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण कर्मेद्रिय- ज्ञानेद्रियरूपी फुलाच्या अनंत भावरुपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजुळीचे अर्घ्य श्रीगुरुचरणांवर देऊ.
3-15
अनन्योदके धुवट । वासना जे तन्निष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचे ॥3॥
एकनिष्ठतारूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून, श्रीगुरूंच्या विषयी एकनिष्ठ असलेली जी वासना, तेच जणुकाय चंदन आहे असु मानुन श्रीगुरूस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लावू.
4-15
प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळूनि नूपरे । लेवऊ सुकुमारे । पदे तिये ॥4॥
श्रीगुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार चरणकमलामध्ये घालू.
5-15
घणावली आवडी । अव्यभिचारे चोखडी । तिये घालू जोडी । आंगोळिया ॥5॥
अनन्य भावाने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम हीच जणु रणजोडवी, ती सद्गुरूंच्या पायांच्या बोटात घालू.
6-15
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचे मुकुळ । ते उमलले अष्टदळ । ठेऊ वरी ॥6॥
आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरूंच्या चरणावरी वाहू.
7-15
तेथे अहं हा धूप जाळू । नाहं तेजे वोवाळू । सामरस्ये पोटाळू । निरंतर ॥7॥
देहादिकाचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती हाच कोणी एक धूप, तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी एक तेज, त्या तेजाने श्रीगुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ.
8-15
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊ श्रीगुरुचरण । करू भोगमोक्ष निंबलोण । पाया तया ॥8॥
श्रीगुरूच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूलशरीर व लिंगशरीर) या दोन खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकु
9-15
इया श्रीगुरुचरणसेवा । हो पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥9॥
ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्रीगुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होवो.
10-15
ब्रह्मीचे विसवणेवरी । उन्मेख लाहे उजरी । जे वाचेते इये करी । सुधासिंधु ॥10॥
ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-15
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापे कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षराते ॥11॥
✏कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते.
12-15
सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ॥12॥
✏ज्याप्रमाणे सूर्याने पूर्वदिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे (ज्या दैवाच्या योगाने) वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.
13-15
नादब्रह्म खुजे । कैवल्यही तैसे न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणे दैवे ॥13॥
✏ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्ष सुद्धा तसा (व्याख्यानासारखा) शोभत नाही
14-15.
श्रवणसुखाच्या मांडवी । विश्व भोगी माधवी । तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥14॥
✏श्रवणसुखाच्या मांडवामधे सर्व जगाला वसंतऋतुचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते.
15-15
ठावो न पवता जयाचा । मनेसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥15॥
✏ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो (शब्दाने त्याचे वर्णन करता येते) हे केवढे आश्चर्य आहे ?
16-15
जे ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जे नागवे । ते अगोचर फावे । गोठीमाजी ॥16॥
✏जे ज्ञानाला कळत नाही ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते.
17-15
येवढे एक सौभग । वळघे वाचेचे आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जै का ॥17॥
✏गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते.
18-15
तरी बहु बोलू काई । आजि ते आनी ठाई । मातेवाचूनि नाही । ज्ञानदेवो म्हणे ॥18॥
✏तर या संबंधाने फार काय सांगू ? आज ते दैव माझ्याशिवाय दुसर्या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
19-15
जे तान्हेनि मिया अपत्ये । आणि माझे गुरु एकलौते । म्हणौनि कृपेसि एकहाते । जाले तिये ॥19॥
कारण की मी श्रीगुरूचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एकपुत्री आहेत. (म्हणजे मी माझ्या गुरूंना एकटाच मुलगा आहे). म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाण झालो.
20-15
पाहा पा सरोवरी आघवी । मेघ चातकासी रिचवी । मजलागी गोसावी । तैसे केले ॥20॥
पहा चातक पक्ष्याकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. त्यांनी आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-15
म्हणौनि रिकामे तोंड । करू गेले बडबड । की गीता ऐसे गोड । आतुडले ॥21॥
म्हणून माझे रिकामे, शास्त्र वगैरे न शिकलेले, तोंड बडबड करू गेले, तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले.
22-15
होय अदृष्ट आपैते । तै वाळूचि रत्ने परते । उजू आयुष्य तै मारिते । लोभु करी ॥22॥
दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो.
23-15
आधणी घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥23॥
श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात.
24-15
तयापरी श्रीगुरु । करिती जै अंगीकारु । तै होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥24॥
त्याप्रमाणे श्रीगुरू जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात, तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन रहाते.
25-15
पाहा पा श्रीनारायणे । तया पांडवाचे उणे । कीजेचि ना पुराणे । विश्ववंद्ये ? ॥25॥
गुरुस्तवनांतर्गत श्रीकृष्ण स्तवन असे पहा की त्या
पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असताही जगास पूज्य अशी त्यांची (त्या पांडवांच्या वैगुण्यांची) पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत काय ?
26-15
तैसे श्रीनिवृत्तिराजे । अज्ञानपण हे माझे । आणिले वोजे । ज्ञानाचिया ॥26॥
(निवृत्तिनाथांच्या गुरुकृपेचे महत्व) त्याप्रमाणे श्रीनिवृत्तिनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले.
27-15
परी हे असो आता । प्रेम रुळतसे बोलता । के गुरुगौरव वर्णिता । उन्मेष असे ? ॥27॥
पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलीन होते. श्रीगुरूचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे ?
28-15
आता तेणेचि पसाये । तुम्हा संताचे मी पाये । वोळगेन अभिप्राये । गीतेचेनि ॥28॥
आता त्याच श्रीगुरूच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृद्गत सांगाण्याच्या साधनाने मी (ज्ञानदेव) तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन.
29-15
तरी तोचि प्रस्तुती । चौदाविया अध्यायाच्या अंती । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥29॥
चौदाव्या अध्यायाचा सिद्धांत ‘ज्ञानान्मोक्ष: ” तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला
30-15
जे ज्ञान जयाच्या हाती । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गीचिये ॥30॥
की ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य (इंद्रपद) मिळावण्य़ास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे, तोच मोक्ष मिळवण्य़ास समर्थ होतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-15
का शत एक जन्मा । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आन नोहे ॥31॥
अथवा जो शंभर जन्म, ब्रह्मकर्म करत करत घालवतो, तोच काय तो निश्चितपणे त्यास ब्रह्मदेवाचे पद भेटते दुसरे कुणासही ही नाही.
32-15
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवी डोळसु । तेवी ज्ञानेचि सौरसु । मोक्षाचा तो ॥32॥
ज्याप्रमाने डोळे चांगले असणार्या माणसाला जसा सुर्यप्रकाशाचा फायदा होतो.
तसेच आत्मज्ञान असणार्या माणसासच मोक्षप्राप्तिचा आनंद घेता येतो.
33-15
तरी तया ज्ञानालागी । कवणा पा योग्यता आंगी । हे पाहता जगी । देखिला एकु ॥33॥
ज्याप्रमाने ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाच्या अंगी पाञता आहे. याचा काही प्रमानात विचार करुन पाहिले असता, संपुर्ण जगामध्ये तोच एक योग्य आधिकारी दिसुन येतो.
34-15
जे पाताळीचेही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥34॥
ज्याप्रमाने जमिनीमध्ये असलेली साधन सामुग्री अर्थात द्रव्य डोळ्यात अंजन घातल्यास दृष्टीस पडते, परंतु ते अंजन घालण्यास डोळे सुद्धा पायाळू मनुष्याचेच पाहिजेत.
35-15
तैसे मोक्ष देईल ज्ञान । येथे कीर नाही आन । परी तेचि थारे ऐसे मन । शुद्ध होआवे ॥35॥
त्याप्रमाणे आत्मज्ञाना- पासुन मोक्ष प्राप्त होतो. यामध्ये शंका घेण्यास तिळमाञ जागा नाही. पंरतु ते ज्ञान आत्मसाथ करावयाचे झाल्यास प्रथमतःहा अंतकरणाची शुद्धता ही खुप महत्वाची आहे.
36-15
तरी विरक्तीवाचूनि कही । ज्ञानासि तगणेंचि नाही । हे विचारूनि ठाई । ठेविले देवे ॥36॥
ज्ञान टिकण्यास वैराग्याची आवश्यकता तर वैराग्यावाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही, हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे.
37-15
आता विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनाते वरी । हेही सर्वज्ञे श्रीहरी । देखिले असे ॥37॥
आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील ? हे देखील सर्व जाणणार्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे.
38-15
जे विषे रांधिली रससोये । जै जेवणारा ठाउवी होये । तै तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥38॥
(पंधराव्या अध्यायाची प्रस्तावना संसार क्षणभंगुर आहे हे कळेल तर वैराग्य निर्माण होईल )
ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणार्यास माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो.
39-15
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जै अनित्यता । तै वैराग्य दवडिता । पाठी लागे ॥39॥
त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्यावेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागते.
40-15
आता अनित्यत्व या कैसे । तेचि वृक्षाकारमिषे । सांगिजत असे विश्वेशे । पंचदशी ॥40॥
आता या संसाराला क्षणभंगुरता कशा प्रकारे आहे, याचेच उदाहरण भगवान श्रीकृष्ण पंधराव्या अध्यायामध्ये वृक्षाची उपमा देऊन त्याचे वर्णन करत आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-15
उपडिले कवतिके । झाड येरिमोहरा ठाके । ते वेगे जैसे सुके । तैसे हे नोहे ॥41॥
सहज उन्मळून पडलेले झाड, शेंडा खाली व बूड वर असे पडले असते, तेव्हा ते लवकर सुकते, त्याप्रमानेच हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली फांद्या असे जरी असले, तरी ते लवकर सुकुन जाणारे नाही. अर्जुना हे माञ लक्षात ठेव.
42-15
याचि एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥42॥
ज्याप्रमाने संसारविषयी झाडाचे कौशल्याने रुपक करुन भगवंतानी या जन्म आणि मृत्युच्या चक्रव्युहातुन संसाररुपी येरझार संपवुन टाकली आहे.
43-15
करूनि संसार वावो । स्वरुपी अहंतेचा ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥43॥
संसार हा एक मिथ्या आहे हे सिद्ध करुन दाखवून आत्मस्वरूपामध्ये मी पणाचा अंतर्भाव व्हावा हाच ह्या पंधराव्या अध्यायाचा मुख्य विषय आहे.
44-15
आता हेचि आघवे । ग्रंथगर्भीचे चांगावे । उपलविजेल जीवे । आकर्णिजे ॥44॥
आता हेच ग्रंथातील सर्व चांगले उत्तमोत्तम सिद्धांत विस्तारपुर्वक स्पष्ट करुन सांगण्यात येतील तरी ते तुम्ही श्रोत्यांनी तन मन लावून एकाग्रचित्ताने हे ज्ञान श्रवण करावे.
45-15
तरी महानंदु समुद्र । जो पूर्ण पूर्णीमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसे म्हणे ॥45॥
तर अनंत असणारा ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा, जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला. (संसारवृक्ष)
46-15
अगा पै पंडुकुमरा । येता स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥46॥
अरे बाबा अर्जुना, आपण आपल्या ब्रम्हरुपी स्वरुपाच्या घरी येताना जे भ्रमरुपी द्वैत समोरुन झपाटणार्या वार्याप्रमाने अडवणुक करीत असते.
47-15
तो हा जगडंबरु । नोहे, येथ संसारु । हा जाणिजे महातरु । थांबला असे ॥47॥
ते हे भले मोठे अवाढव्य विशालकाय जगत् दिसत आहे, यालाच संसार असे म्हणतात. या विवेचनामध्ये हा संसार मुळीच नसुन सगळ्या बाजुनी पसरलेला मोठा वृक्ष असे, असे जानुन घेण्यास परमात्मा अर्जुनास सांगतात.
48-15
परी येरा रुखांसारिखा । हा तळी मूळे वरी शाखा । तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥48॥
परंतु इतर सर्वसामान्य वृक्षांसारखा, खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही. हा अलौकिक असा वृक्ष आहे म्हणून या वृक्षाचे कोणासही वर्णन करता येत नाही कोणाला अंत लागत नाही.
49-15
आगी का कुऱ्हाडी । होय रिगावा जरी बुडी । तरी हो का भलतेवढी । वरिचील वाढी ॥49॥
ज्यावेळेस झाडाच्या बुडापाशी आग लावली असता अथवा कुर्हाडीचे कितीही घाव घातले असता तरी ही त्याचे कार्य बंद न पडता त्या झाडाची वाढ ही होतच असते.
50-15
जे तुटलिया मूळापाशी । उलंडेल का शाखांशी । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥50॥
ज्याप्रमाने सर्व साधारण असणारी झाडे ज्यावेळेस मुळासकट उपटले असता ते झाड फांद्यासकट उन्मळुन पडते. पंरतु तशा प्रकारे या संसाररुपी वृक्षाची अवस्था नसते कारण हा संसाररुपी वृक्ष तोडण्यास बोलण्या इतका सोप्पा नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-15
अर्जुना हे कवतिक । सांगता असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥५१॥
अर्जुना, या संसारवृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे. कारण की या संसारवृक्षाची वाढ खालच्या बाजुस आहे.
52-15
जैसा भानू उंची नेणो के । रश्मिजाळ तळी फाके । संसार हे कावरुखे । झाड तैसे ॥५२॥
ज्याप्रमाणे सूर्य आकाशात किती उंच आहे हे कळत नाही, परंतु सुर्याच्या किरणसमुदाय संपुर्ण जग प्रकाशमय करते(यावरुन त्याची अथांगपणा जाणवेल) त्याचप्रमाने हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली शाखा पसरलेल्या असल्यामुळे विचिञ आश्चर्य आहे.
53-15
आणि आथी नाथी तितुके । रुंधले असे येणेचि एके । कल्पांतीचेनि उदके । व्योम जैसे ॥५३॥
ज्याप्रमाणे या विक्ष्वामध्ये जेवढ्या वस्तु आहेत, तेवढ्या सर्व वस्तु वृक्षाने व्यापुन टाकलेल्या आहेत. ज्याप्रमाने कल्पातांच्या वेळेस संपुर्ण आकाश पाण्याने व्यापुन टाकले जाते.
54-15
का रवीच्या अस्तमानी । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनी । मांडला असे ॥५४॥
अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे.
55-15
यया फळ ना चुंबिता । फूल ना तुरंबिता । जे काही पंडुसुता । ते रुखुचि हा ॥५५॥
अर्जुना या संसारवृक्षाचे फळ खाण्याकरता पाहवयास गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहयला गेले तर याला फूलही नाही मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे.
56-15
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेचि हा होये । शाड्वळु गा ॥५६॥
हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. या वृक्षाचे मुळ हे परब्रम्ह आहे. याच कारणाने अर्जुना हा संसारवृक्ष नेहेमी हिरवागार आणि टवटवित आहे.
57-15
आणि ऊर्ध्वमूळ ऐसे । निगदिले कीर असे । परी अधीही असोसे । मूळे यया ॥५७॥
आणि हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत.
58-15
प्रबळला चौमेरी । पिंपळा का वडाचिया परी । जे पारंबियांमाझारी । डहाळिया असती ॥५८॥
झपाट्याने वाढणार्या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसाररुपीवृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत.
59-15
तेवीचि गा धनंजया । संसारतरु यया । अधीचि आथी खांदिया । हेही नाही ॥५९॥
त्याचप्रमाणे अर्जुना ! या संसारवृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही.
60-15
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडे । सासिन्नले ॥६०॥
तरी याला वरच्या बाजूसही या संसारवृक्षाला फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-15
जाले गगनचि पा वेलिये । का वारा मांडला रुखाचेनि आये । नाना अवस्थात्रये । उदयला असे ॥61॥
✏ह्या विशालमय वृक्षाचा विस्तार होण्यासाठी ज्याप्रमाने संपुर्ण आकाश आश्रयभुत कारण असुन संपुर्ण वारा या वृक्षाच्याच सामर्थ्याने वाहत असतो, हा संसाररुपी वृक्ष उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन अवस्थाच्या रुपाने प्रगट झाला आहे.
62-15
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयाला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥62॥
✏असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज.
63-15
आता ऊर्ध्व या कवण । येथे मूळ ते किं लक्षण । का अधोमुखपण । शाखा कैसिया ॥63॥
✏आता या संसारवृक्षाचा वरचा भाग काय आहे ? संसारवृक्षाचे जे मूळ आहे, त्याचे लक्षण कोणते आहे ? या वृक्षाच्या फांद्याना खाली मुख असणे आणि ते पसरणे, याचे कारण काय आहे ? व याच्या फांद्या कशा प्रकारच्या आहेत ?
64-15
अथवा द्रुमा यया । अधी जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥64॥
✏अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत, त्यांचे स्वरुप काय आहे ? त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा प्रकारच्या आहेत ?
65-15
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासी । निर्णयो केला ॥65॥
✏आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशाकरता प्रात्त झाली आहे ? आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे.
66-15
हे आघवेचि बरवे । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगो सोलिवे । विन्यासे गा ॥66॥
✏अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला किंवा ध्यानात येतील अशा निर्मळ भाषेत विवरण करुन तुला सांगत आहे.
67-15
पंरतु ऐके गा सुभगा । हा प्रसंगु असे तुमचिजोगा । कानचि करी हो सर्वांगा । हिंये आथिलिया ॥67॥
✏परंतु हे भाग्यवान अर्जुना, हे गितारुपी अमृत पिण्यास तुच योग्य आहेस. म्हणुन तुझ्या सर्व इंद्रियाचे कान करुन अंतकरणापासुन ऐक.
68-15
ऐसे प्रेमरसे सुरफुरे । बोलिले जव यादववीरे । तव अवधान अर्जुनाकारे । मूर्त जाले ॥68॥
✏जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने मृतरुपी अवधान प्रगटले असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे,
69-15
देव निरूपिती ते थेंकुले । येवढे श्रोतेपण फाकले । जैसे आकाशा खेंव पसरिले । दाही दिशी ॥69॥
✏ज्याप्रमाणे आकाश जसे विशाल असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे. त्याप्रमाने श्रीकृष्णाने जे विस्तारपुर्वक निरुपण केले. ते अर्जुनाच्या श्रोतेपणामुळे कमी पडले.
70-15
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हनौनि घोटु भरो पाहे एकसरा । अवघेयाचा ॥70॥
श्रीकृष्णाच्या विचाररूपी समुद्रास गायब करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-15
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनी देवे देखिली । तेथ जालेनि सुखे केली । कुरवंडी तया ॥71॥
श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली, तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली
श्रीभगवानुवाच ।
उर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥15. 1॥
*श्लोकार्थ :- श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ उर्ध्वभागी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो *विनाशी* आहे, तरी ज्याला अविनाशी असे (सामान्य जन) म्हणतात, वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, त्याला जाणणारा (या वृक्षाला मूलकारण परम पुरुष असून वृक्षरूपी विस्तार ही माया आहे व त्यापासून वस्तुत: भिन्न नाही असे जाणणारा) तो खरा वेदवेत्ता अथवा ज्ञानी हो संसारावरील वृक्षरूपक भगवंतांनी कशाकरता सांगितले ?
72-15
मग म्हणे धनंजया । ते ऊर्ध्व गा तरू यया । येणे रुखेचि का जया । ऊर्ध्वता गमे ॥15-72॥
मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसारवृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसारवृक्षामुळे वाटत आहे.
73-15
एऱ्हवी मध्योर्ध्व अध । हे नाही जेथ भेद । अद्वयासी एकवद । जया ठायी ॥73॥
(ब्रह्म) वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे ? ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशाविषयी एकवाक्यता आहे.
74-15
जो नाइकिजता नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥74॥
जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादि साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय.
75-15
जया जे आऱ्हा परौते । जया जे पुढे मागौते । दिसतेविण दिसते । अदृश्य जे ॥75॥
ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पहाणार्यावाचून जे पहाणे आहे व स्वभावत: इंद्रियांना जे अगोचर आहे.
76-15
उपाधीचा दुसरा । घालिता वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयाते ॥76॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो.
77-15
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेचि जे ज्ञान । सुखा भरले गगन । गाळीव जे ॥77॥
जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय यावाचून केवळ ज्ञानमात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे.
78-15
जे कार्य ना कारण । जया दुजे ना एकपण । आपणया जे जाण । आपणचि ॥78॥
जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसर्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज.
79-15
ऐसे वस्तु जे साचे । ते ऊर्ध्व गा यया तरूचे । तेथ आर घेणे मूळाचे । ते ऐसे असे ॥79॥
(माया) अशी जी सत्यवस्तू (ब्रह्मवस्तू), ती या संसारवृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिचे ठिकाणी संसारवृक्षाच्या मुळाचे अंकूर निघाले ते असे आहे. (तो प्रकार पुढीलप्रमाणे आहे.
80-15
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । का वांझेची संतती । वानणे जैशी ॥80॥
तर या संसारवृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आहे किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-15
तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचे नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥81॥
त्याप्रमाणे जी माया ब्रम्हज्ञानाने बाधित असल्यामुळे खरी आहे म्हणता येणार नाही व ‘नाही ” म्हणता पण येत नाही कारण ‘आहे ” म्हणावे तर विचाराने तिचा बोध होतो व नाही ” म्हणावे तर जगत्कार्यावरून ती असावी, असे तिचे अनुमान करता येते ज्या मायेस ब्रम्हविचाराचे नाव सहन होत नाही, अशा प्रकारची ती आहे व तिला अनादि (आरंभरहित) असे म्हणतात.
82-15
जे नानातत्त्वांची मांदुस । जे जगदभ्राचे आकाश । जे आकारजाताचे दुस । घडी केले ॥82॥
जी अनेक तत्वं मिळुन तयार झालेली शक्तिची पेटी आहे. ती विक्ष्वरुप अभ्राला आधार आहे. आणि ती विक्ष्वाकाररुपी असणार्या वस्ञाची ती एकप्रकारे घडी आहे.
83-15
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका । विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥83॥
संसाररुपी असणारी जी माया आहे ती संसारवृक्षाचे बीज असुन ती संसारविस्ताराची आधारभुमी आहे. अथवा जे काही विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित अशी मशाल आहे.
84-15
ते माया वस्तूच्या ठायी । असे जैसेनि नाही । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होय ॥84॥
ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाहीच, अशा स्वरुपानेच ती असते. मग तीब्रम्ह तेजाच्या योगाने ब्रम्हाच्या तेजाने ती विक्ष्वरुपाने प्रगट होते.
85-15
जेव्हा आपणया आली निद । करी आपणपे जेवी मुग्ध । का काजळी आणी मंद । प्रभा दीपी ॥85॥
जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा निजरुप करते अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी (जशी) दिव्याचा प्रकाश मंद करते.
86-15
स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी । निदेली चेववूनि वेगी । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥86॥
स्वप्नात आपल्या नवर्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवर्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर सकाम करते.
87-15
तैसी स्वरूपी जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया । तेचि रुखा यया । मूळ पहिले ॥87॥
त्याप्रमाणे स्वरूपाच्या धनजंया, ब्रम्हस्वरुपाच्या ठिकाणी जमा झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप, त्याच्या ठिकाणी नेणतेपणा किंवा अज्ञान आणते, आणि ब्रम्हस्वरुपालाच विषय करते. अशा प्रकारची माया संसारवृक्षाचे पहिले मूळ आहे.
88-15
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदु । वेदांती हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥88॥
जीवाला आपले वास्तव स्वरुप ब्रम्ह आहे. हे जिवास कळत नाही. जसे ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसारवृक्षाचा, ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांसा आहे आणि उपनिषदांमध्येही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे.
89-15
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥89॥
पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था, तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात व इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्तिरूपी अंकुराची फलावस्था आहे असे म्हणतात.
90-15
ऐसी यया वेदांती । निरूपणभाषाप्रतीती । परी ते असो प्रस्तुती । अज्ञान मूळ ॥90॥
ज्याप्रमाने अशा प्रकारे वेदांतामध्ये सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती यांचे निरुपण करावयाची जी परिभाषा आहे, त्यावरुन बीज, अंकुर व फल याचा बोध प्राप्त होतो. पण ते आत्ता राहु दे. संसारवृक्षाचे मुळ घन अज्ञानात आहे, पार्था ते तु निश्चित जाणुन घे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-15
ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचिती मूळे । बळिया बांधोनि आळे । मायायोगाचे ॥91॥
ज्याप्रमाने स्वच्छ आणि निर्मळ आत्म्याशी मायेचा म्हणजे अज्ञानाचा काल्पनिक सबंध आहे. ते एकप्रकारे संसारवृक्षाचे बळकट असे जाळे असुन ते आळेच संसारवृक्षाचे मुख्य कारण आहे. असे मायासंबधीचे आळे झाल्यावर,
92-15
मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । ते चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥92॥
मग त्या मुळातच सुरुवातीला देह निर्माण होऊन खालच्या बाजुस चार प्रकारचे अंकुर निर्माण होतात.
93-15
ऐसे भवद्रुमाचे मूळ । हे ऊर्ध्वी करी बळ । मग आणियांचे बेंबळ । अधी दावी ॥93॥
असे जे संसारवृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस स्वरुपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर म्हणजे मग त्याला खाली अंकुराचे झुपके खाली येतात
94-15.
तेथ् चिद्वृत्ति पहिले । महत्तत्त्व उमलले । ते पान वाल्हेदुल्हे । एक निघे ॥94॥
त्या अंकुरात, चिद्वृत्ती म्हणजे माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच काय ते एक उमलेले कोवळे लुसलुशीत पान निघते.
95-15
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥95॥
मग त्या पानास महत् तत्वापासुन अंहकार तयार होतो. तो अहंकार मुळात एकच असुन सात्विक, तामस, राजस असा तीन प्रकारचा होतो. त्यामुळे महत् तत्वाला सत्व, रज, तम अशी तीन पाने असलेला आणि मुळाशी विस्तारलेला अहंकाररुपी कोंब किंवा अंकुर फुटतो.
96-15
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणे ॥96॥
तो त्रिगुणात्मक अहंकाररुपी सत्वापासून उपन्न होणार्या बुद्धीचे शेंडा निर्माण करुन सर्व प्रकारच्या भेदभावांची वृद्धी करतो, त्याच वेळी तो अहंकाररुपी मनाची डहाळी विकसितपणाने धारण करतो.
97-15
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥97॥
याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकाररूपी कोवळ्या फांद्या, या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात.
98-15
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हे पांच फोंक । महाभूतांचे सरोख । सरळे होती ॥98॥
मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणार्या आकाश, वायू, अग्नि, पाणी आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचे पाचही फोक वेगाने सरळ निघतात.
99-15
तैसी श्रोत्रादि तन्मात्रे । तिये अंगवसा गर्भपत्रे । लुळलुळिते विचित्रे । उमळती गा ॥99॥
त्याचप्रमाणे राजस अहंकारापासुन महाभुत स्वरुप अशी श्रोञादी दहा इंद्रिये तयार होतात. शरिराच्या आश्रयाखाली राहतात, इकडे तिकडे डोलणारी, चिञविचिञ अशी लुसलुशीत पानाप्रमाने आहेत.
100-15
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी । होता करित कांडी । आकांक्षेची ॥100॥
ज्याप्रमाने त्या पंचमहा भुतांमध्ये एकमेकाबद्दल पंचीकरण झाल्यानंतर आकाशापासुन शब्दाचा अंकुर तयार होतो. त्या अकुंराला भेटण्याकरता श्रोञेंद्रियांची दिडपट वाढ होत असताना ती वाढ अपेक्षेचे पेरे करीत असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-15
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरी घेती धाव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचे ॥101॥
शरीरातील त्वचेइंद्रियांचे वेल आणि पाने स्पर्श रुपी अंकुर येतो. त्यावेळी नव्या नव्या विकारांची खुपच पुष्कळ वाढ होते.
102-15
पाठी रूपपत्र पालोवेली । चक्षु लांब ते कांडे घाली । ते वेळी व्यामोहता भली । पाल्हाळी जाय ॥102॥
ज्याप्रमाने पुढे रुप नावाचे पान फुटते. आणि मग डोळा हा भ्रमाने त्याची गोडी चाखण्यासाठी धाव घेत असतो.
103-15
आणि रसाचे आंगवसे । वाढता वेगे बहुवसे । जिव्हे आर्तीची असोसे । निघती बेंचे ॥103॥
आणि पाण्यापासुन तयार झालेल्या रसांच्या साली खुप वेगाने वाढत असतात. त्यावर जिभेच्या इच्छारुपी पानांचे पुष्कळ झुंबाडे निघत असतात.
104-15
तैसेचि कोंभैलेनि गंधे । घ्राणाची डिरी थांवु बांधे । तेथ तळु घे स्वानंदे । प्रलोभाचा ॥104॥
त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो, तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो.
105-15
एवं महदहंबुद्धि । मने महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासन्निजे ॥105॥
याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते.
106-15
किंबहुना इही आठे । आंगी हा अधिक फाटे । परी शिंपीचियेवढे उमटे । रुपे जेवी ॥106॥
फार काय सांगावे ? या आठ अंगांनी हा संसारवृक्ष अधिक वाढतो, परंतु (हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही). जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जी शिंप तेवढेच भासते.
107-15
का समुद्राचेनि पैसारे । वरी तरंगता आसारे । तैसे ब्रह्मचि होय वृक्षाकारे । अज्ञानमूळ ॥107॥
अथवा समुद्रावर तयार होणार्या लाटा ज्याप्रमाने समुद्राएवढ्याच असतात. त्याप्रमाणे ब्रह्मच हे अज्ञानमूळ असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराने तयार होते.
108-15
आता याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपे स्वप्नी परिवारु । येकाकिया ॥108॥
अर्जुना संपुर्ण विक्ष्व हे अज्ञानाचा विस्तार असुन त्यावर त्याचा सर्व पसारा भासत आहे. ज्याप्रमाने स्वप्नात मनुष्य एकटा असुन जेवढे काही तो स्वप्न पाहतो.
ते सर्व आपणच होऊन जातो.
109-15
परी ते असो हे ऐसे । कावरे झाड उससे । यया महदादि आरवसे । अधोशाखा ॥109॥
परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तर्हेने हा भ्रमात्मक संसारवृक्ष वाढत असून, महत्-तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात.
110-15
आणि अश्वत्थु ऐसे ययाते । म्हणती जे जाणते । तेही परिस हो येथे । सांगिजेल ॥110॥
या वृक्षाला अश्वत्थ म्हणण्य़ाचे कारण आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय ? तेही येथे सांगण्यात येईल, ऐक.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-15
तरी श्व: म्हणिजे उखा । तोवरी एकसारिखा । नाही निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥111॥
तर क्ष्व: म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूपी वृक्षाची एकसारखी स्थिती नाही. म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात.
112-15
जैसा न लोटता क्षणु । मेघु होय नानावर्णु । का विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥112॥
ज्याप्रमाने एक क्षण लोटला नाही तोच मेघ विविध रंगांचा होतो अथवा वीज ही निमिषभर देखील पुर्णपणे टिकत नाही.
113-15
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाही जळा । का चित्त जैसे व्याकुळा । माणुसाचे ॥113॥
ज्याप्रमाने कमळाच्या हालणार्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते.
114-15
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययाते म्हणती । अश्वत्थु हा ॥114॥
त्याप्रमाणेच या संसारवृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात.
115-15
आणि अश्वत्थु येणे नांवे । पिंपळु म्हणती स्वभावे । परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥115॥
आणि अश्वत्थ या नावाने स्वभावत: पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही.
116-15
एऱ्हवी पिंपळु म्हणता विखी । मिया गति देखिली असे निकी । परी ते असो काय लौकिकी । हेतु काज ॥116॥
एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा मला ती चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या, आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे ? भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे.
117-15
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥117॥
म्हणून आता या संसारवृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रामध्ये अश्वत्थ असे म्हटले जाते.
118-15
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥118॥
आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजेच नित्य या नावाने प्रसिद्ध आहे; परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे.
119-15
जैसा मेघांचेनि तोंडे । सिंधु एके आंगे काढे । आणि नदी येरीकडे । भरितचि असती ॥119॥
(संसारवृक्ष विनाशी असून याला अविनाशी का म्हणतात)
ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचे बाष्पिकरण होऊन वाफेद्वारे मेघाना जाऊन मिळतात. व तेच मेघ पाऊसाचा वर्षाव करुन नदीपाञात ओढे, नाल्या द्वारे ते नद्याना भेटुन त्या सर्व नद्दा पुन्हा समुद्रास जाऊन भेटतात.
120-15
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जव नुघडे । मेघा नदींची ॥120॥
त्याचप्रमाने तो समुद्र कमी होत नाही अथवा जास्त होत नाही, असा चारही बाजुंनी परिपूर्णच आहे, असे वाटते, परंतु त्याचे परिपूर्णत्व, जोपर्यंत मेघ आणी नदी यांचे उपसने आणि भरणे, हे स्वरुप स्पष्ट झालेले नाही. तेवढ्या पुरताच समुद्र भरलेला आहे असेच वाटते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-15
ऐसे या रुखाचे होणे जाणे । न तर्के होतेनि वहिलेपणे । म्हणौनि ययाते लोकु म्हणे । अव्ययु हा ॥121॥
त्याप्रमाणे या संसारवृक्षाची वाढ व लय अति प्रचंड गतीने होत असल्यामुळे त्याचा तर्क करता येत नाही, म्हणून सामान्य लोक याला अविनाशी असे म्हणतात.
122-15
एऱ्हवी दानशीळु पुरुषु । वेचकपणेचि संचकु । तैसा व्ययेचि हा रुखु । अव्ययो गमे ॥122॥
ऐरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्यसंचय करतो, तसा हा संसारवृक्ष नाश पावत असताही अविनाशी असा भासतो.
123-15
जाता वेगे बहुवसे । न वचे का भूमी रुतले असे । रथाचे चक्र दिसे । जियापरी ॥12॥
ज्याप्रमाने रथाचे चाक अती वेगाने फिरत असताना देखील ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते.
124-15
तैसे काळातिक्रमे जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे । तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥124॥
त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसारवृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यवधी अंकुर या संसारवृक्षास फुटतात.
125-15
परी येकी केधवा गेली । शाखाकोडी केधवा जाली । हे नेणवे जेवी उमलली । आषाढ अभ्रे ॥125॥
ज्याप्रमाने आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यवधी (शरीररूपी) शाखा केव्हा उत्पन झाल्या हे कळत नाही
126-15.
महाकल्पाच्या शेवटी । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेचि आणिखीचे दांग उठी । सासिन्नले ॥126॥
उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने, कल्प संपण्याचे वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात.
127-15
संहारवाते प्रचंडे । पडती प्रळयातीची सालडे । तव कल्पादीची जुंबाडे । पाल्हेजती ॥127॥
संहारकारक प्रचंड वार्याने महाप्रलयकाळाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसारवृक्षाची साली गळून पडतात न पडतात तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदायचे समुदाय उत्पन्न होतात.
128-15
रिगे मन्वंतर मनूपुढे । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडे । जिंके जेवी ॥128॥
कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसर्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो.
129-15
कलियुगांती कोरडी । चहु युगांची साले सांडी । तव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥129॥
कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची नविन अतिशय रसरशीत अशी मोठी सालपटे जोमाने उत्पन्न होण्यास लागतात.
130-15
वर्तते वर्ष जाये । ते पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात की येत आहे । हे चोजवेना ॥130॥
चालू असलेले जे वर्ष संपुन जाते ते पुढच्या वर्षास आमञंन देते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो कळत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-15
जैशा वारियाच्या झुळका । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणो किती ॥131॥
ज्याप्रमाणे वार्याच्या झुळुकांमागून झुळुका वहात असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाच्या उत्पन्न होणार्या व नाश पावणार्या फंद्यांचा आदि व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही.
132-15
एकी देहाची डिरी तुटे । तव देहाकुरी बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥132॥
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला (संसारवृक्षाला) फुटतात, अशातर्हेने हा संसारवृक्ष अव्यय, अविनाशी आहे असा वाटतो.
133-15
जैसे वाहते पाणी जाय वेगे । तैसेचि आणिक मिळे मागे । येथ असंतचि असिजे जगे । मानिजे संत ॥133॥
जसे वहाणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वहाणारे पाणी मिळात असते, त्यामुळे पहाणारास एकसारखे तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसासरवृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात.
134-15
का लागोनि डोळा उघडे । तव कोडीवरी घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥134॥
अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट, कोट वेळा घडते व मोडते, परंतु त्या लाटेचे कोटीवेळा होणे-जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते.
135-15
वायसा एके बुबुळे दोहींकडे । डोळा चाळीता अपाडे । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवी जगा ॥135॥
एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत बसल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो.
136-15
पै भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥136॥
भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते, तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते, याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो.
137-15
हे बहु असो झडती । आंधारे भोवंडिता कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥137॥
हे राहू दे, अंधारामधे कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंडचक्राच्या आकाराची दिसते.
138-15
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥138॥
त्याप्रमाणे हा संसारवृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे, हे जगास न कळाल्यामुळे भ्रमिष्ट लोक याला अविनाशी असे मानतात.
139-15
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळा निमिखे । होत जात ॥139॥
परंतु जो याचा वेग पहातो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यवधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते,
140-15
नाही अज्ञानावाचूनि मूळ । ययाचे असिलेंपण टवाळ । ऐसे झाड सिनसाळ । देखिले जेणे ॥140॥
या संसारवृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे, असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भासमात्र आहे असे ज्याने जाणले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-15
तयाते गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणे जाणता । पै वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥141॥
अर्जुना, त्याला संसारवृक्षाचे क्षणिकत्व जाणणार्याला मी जो सर्वज्ञ तोच ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे.
142-15
योगजाताचे जोडले । तया एकासीचि उपेगा गेले । किंबहुना जियाले । ज्ञानही त्याचेनी ॥142॥
✏सर्वप्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे ? ज्ञान-उपदेशाचा संप्रदाय देखील त्या जिवनमुक्त पुरुषाच्या योगानेच सुरु असतो.
143-15
हे असो बहु बोलणे । वानिजैल तो कवणे । जो भवरुखु जाणे । उखि ऐसा ॥143॥
✏हे फार बोलणे राहू दे. अशा प्रकार हा संसारवृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल ?
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥15. 2॥
श्लोकार्थ:- ज्याप्रमाने ह्या सात्विक, राजस, आणि तामस या गुणांच्या पाण्याने वाढलेल्या विषयभोगरुपी अंकुरांच्या देव, मनुष्य आणि तिर्यक आदि योनिरुप फांद्दा खालचया बाजुस व वर सर्वञ पसरल्या आहेत. तसेच मानव योनीमध्ये कर्माप्रमाने बांधनारी अहंता, ममता आणि वासनारुपी मुळे खाली आणि वर तिन्ही लोकामध्ये सामावली आहेत.
144-15
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥144॥
✏मग याच खाली असलेल्या या संसाररुपी झाडाला वरच्या बाजुस सुद्धा पुष्कळ फांद्या तयार होतात.
145-15
आणि अधी फांकली डाळे । तिये होती मूळे । तयाही तळी पघळे । वेल पालवु ॥145॥
✏आणि तळाशी पसरलेल्या संसारवृक्षाच्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्या पारंब्यांप्रमाणे मूळे होतात व त्या मुळांपासून खालच्या भागास वेल व पाला फुटुन त्याची विस्तार होत जातो.
146-15
ऐसे जे आम्ही । म्हणितले उपक्रमी । तेही परिसे सुगमी । बोली सांगो ॥146॥
✏असे जे आम्ही सुरुवातीला (ओवी 57 ते 64 मधे) म्हटले होते तेच अजुन सोप्या भाषेत सांगतो ऐक.
147-15
तरी बद्धमूळ अज्ञाने । महदादिकी सासिने । वेदांची थोरवने । घेऊनिया ॥147॥
✏तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने अष्टदा प्रकृती तयार होऊन वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसारवृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो.
148-15
परी आधी तव स्वेदज । जारज उद्भिज अंडज । हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥148॥
परंतु प्रारंभी झाडाच्या बुडापासुन तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे बुडापासून (मुळापासून) चार मोठ्या मोठ्या फांद्दा उत्पन्न होतात.
149-15
यया एकैकाचेनि आणगटे । चौऱ्यांशी लक्षधा फुटे । ते वेळी जीवशाखी फाटे । सैंघचि होती ॥149॥
✏या एकेक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौर्यांशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे तयार होतात.
150-15
प्रसवती शाखा सरळिया । नाना सृष्टि डाहाळिया । आड फुटती माळिया । जातिचिया ॥150॥
✏मागे सांगितलेल्या चार खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात. आणि अनेक जातिरूपी आडव्या फांद्या ह्या संसारवृक्षाला उत्पन्न होतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-15
स्त्री पुरुष नपुंसके । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिके । विकारभारे ॥151॥
स्त्री, पुत्र व नंपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामादिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात.
152-15
जैसा वर्षाकाळु गगनी । पाल्हेजे नवघनी । तैसे आकारजात अज्ञानी । वेली जाय ॥152॥
✏ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामधे नव्या नव्या मेघांच्या रूपाने दिसु लागतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी जगातील विविध आकारमात्राचा वेल पसरतो.
153-15
मग शाखांचेनि आंगभारे । लवोनि गुंफिती परस्परे । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥153॥
✏मग शाखेच्या स्वाभाविक ओझ्याने त्या शाखा आपआपल्या अंगभाराने खाली लवून एकमेकांमधे गुंततात व हे सर्व ञिगुणरुपी वाहु लागल्याने होत असते.
154-15
तेथ तेणे अचाटे । गुणांचेनि झडझडाटे । तिही ठायी हा फाटे । ऊर्ध्वमूळ ॥154॥
✏ते गुण अती वाढल्यामुळे त्या ऊर्ध्वमूलाच्या वृक्षास खाली, वर व मध्ये असे तीन भेद तयार होऊन फाटे फुटतात.
155-15
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडिता आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥155॥
✏रजोगुणाचा वारा वहात असताना होणारी वाढ रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्यजातीरूपी फांद्या जोराने वाढतात.
156-15
तिया ऊर्ध्वी ना अधी । माझारीचि कोंदाकोंदी । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥156॥
✏त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन, त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात.
157-15
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचे अभिनव । पालव डोलती बरव । नीच नवे ॥157॥
✏विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते.
158-15
अर्थु कामु पसरे । अग्रवने घेती थारे । तेथ क्षणिके पदांतरे । इहभोगाची ॥158॥
✏ज्याप्रमाने मनामध्ये अर्ध आणि कामाचा विस्तार होऊ लागतो. इहलोकात क्षणभंगुर असलेल्या जिवनास सुखाचे कोंभ फुटु लागतात.
159-15
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभे । खांकरेजती शुभाशुभे । नानाकर्मांचे खांबे । नेणो किती ॥159॥
✏️त्य़ावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभ आणि अशुभ कर्मांचे फाटे किती फुटतात हे कळत नाही.
160-15
तेवीचि भोगक्षीणे मागिले । पडती देहातींची बुडसळे । तव पुढा वाढी पेले । नवेया देहांची ॥160॥
✏त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की मागची देहरुपी सुकलेली जुनी बुडे पडुन जातात. तोच पुन्हा पुढे नव्या देहाच्या नव्या सालीच्या शाखा तयार होऊन वाढु लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-15
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगे हवावे । विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥161॥
ज्याप्रमाने त्या संसारवृक्षाला मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आवड तयार करणारे आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दादिक विषयरूप पालवी ती नेहेमीच नवनव्याने तयार होत असते.
162-15
ऐसे रजोवाते प्रचंडे । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥162॥
याप्रमाणे रजोगुणाचा प्रचंड वारा सुटल्यावर मनुष्यशाखांचे समुदाय जेव्हा तयार होतात. त्यास या संसारवृक्षाचे ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रघात आहे.
163-15
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजो लागे घोरा । तमाचा तो ॥163॥
तमोगुणाचा वारा वहात असतांना होणारी वाढ) त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वहाण्याचा बंद होतो तेव्हा तमोगुणाचा भयंकर वारा वहाण्यास लागतो.
164-15
तेधवा याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधी देखा । पाल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥164॥
तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना भोगाची निच वासना जेव्हा उत्पन्न होते. तेव्हा त्याच वाईट कर्माच्या डहाळ्या विस्ताराला पावतात असे समज.
165-15
अप्रवृत्तीचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे । घेत पान पालव डाळे । प्रमादाची ॥165॥
ज्याप्रमाने वाईट मार्गाचे बळकट सरळ फोक निघुन (मनुष्यरूपी शाखेला) प्रमादरूपी पाने व फांद्या उत्पन्न करीत फुटतात.
166-15
बोलती निषेधनियमे । जिया ऋचा यजुःसामे । तो पाला तया घुमे । टकेयावरी ॥166॥
यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे (अमूक आहेत असे) सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर फुटु लागतो.
167-15
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तिही पानी घेती प्रसार । वासना वेली ॥167॥
दुसर्याच्या नाशाकरता जारण, मारण स्तंभन, मोहन, , उच्चाटन, वशीकरण इत्यादी प्रतिपादन करणारी अविचाररुपी कर्मे आगम ग्रंथांनी सांगितलेली आहेत.
ती करण्याची ‘इच्छारुपी’ पानाची वेल विस्तार पावु लागते.
168-15
तव तव होती थोराडे । अकर्मांची तळबुडे । आणि जन्मशाखा पुढे पुढे । घेती धाव ॥168॥
मागील ओवीत सांगितल्या प्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे वाढत जातात. अर्थात श्रेष्ठ योनीतून नीच योनीच्या जन्मास प्राप्त होतात.
169-15
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फाटा । जाळ पडे कर्मभ्रष्टा । भुलोनिया ॥169॥
तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादि निकृष्ट पाप योनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते.
170-15
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥170॥
ज्याप्रमाने जसजसा अधर्माची वाढ होऊ लागेल तसतसे पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप ह्या आडव्या शाखांचे समुदाय विस्तार पावु लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-15
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगीहि नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ॥171॥
परंतु अर्जुना, (तमोगुणाच्या उत्कर्षात) अशा या मनुष्यशाखांना सर्व अंगांचे ठिकाणी नित्य नवी नरकभोग हीच फलाची प्राप्ती होते.
172-15
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगे धुर धुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥172॥
आणि तेथे हिंसा व मैथुन ह्या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादि निषिद्ध कर्मांचे अंकूर अनेक जन्मातून वाढतच असतात.
173-15
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवी जाण । फळेही हेची ॥173॥
(ज्या माणसांमधे तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे) ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत, लोखंड, माती, दगड अशा जड योनीत जातात. येथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच.
174-15
अर्जुना गा अवधारी । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥174॥
(मनुष्यरूपी डहाळ्या ह्या खालच्या शाखांची मुळे आहेत. ) अर्जुना, ऐक. याप्रमाणे या संसारवृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते.
175-15
म्हणौनि जी मनुष्यडाळे । तिये जाणावी अधीचि मूळे । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥175॥
म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत, ह्याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे. कारण की मग तेथून संसारवृक्ष विस्ताराला पावतो.
176-15
एऱ्हवी ऊर्ध्वीचे पार्था । मुद्दल मूळ पाहता । अधीचिया मध्यस्था । शाखा इया ॥176॥
एरवी अर्जुना, संसारवृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्यप्राणी ह्या मध्यावर असलेल्या शाखा होत.
177-15
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या शाखी । अधोर्ध्वींचिया ॥177॥
परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्यारूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात.
178-15
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागो अर्जुना । जे मनुष्यावाचूनि विधाना । विषय नाही ॥178॥
अर्जुना तीन वेदरूपी पाने ह्या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसर्या ठिकाणी लागत नाहीत, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही.
179-15
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळे ॥179॥
म्हणून मनुष्यतनु ह्या जरी संसारवृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज.
180-15
आणि आनी तरी झाडी । शाखा वाढता मुळे गाढी । मूळ गाढे तव वाढी । पैस आथी ॥180॥
आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात. आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमधे खोल बळावलेली असतात, तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-15
तैसेचि इया शरीरा । कर्म तव देहा संसारा । आणि देह तव व्यापारा । ना म्हणोचि नये ॥181॥
या मनुष्यशरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. (ते असे की) जेथेपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे रहाणे आहे आणि जेथेपर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येत नाही,
182-15
म्हणौनि देहे मानुषे । इये मुळे होती न चुके । ऐसे जगज्जनके । बोलिले तेणे ॥182॥
म्हणून मनुष्य देह ही (या संसारवृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची) मुळे आहेत. यात चूक नाही असे त्या जगाच्या जनकाने (श्रीकृष्णाने) सांगितले.
183-15
मग तमाचे ते दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥183॥
(सत्वगुणाची वावटळ सुटल्यावर होणारी वाढ) मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते.
184-15
तै याचि मनुष्याकारा । मुळी सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरी ॥184॥
त्याचवेळी ह्याच मनुष्याकाररूपी मुळांस सुवासनारूपी मोड निघतात व ते मोड कोंबास येऊन (म्हणजे त्यास सद्वासना दृढ होऊन जातात), नंतर त्यास (त्या कोंबास) सत्कर्मरूपी अंकुर फुटतात.
185-15
उकलतेनि उन्मेखे । प्रज्ञाकुशलतेची तिखे । डिरिया निघती निमिखे । बाबळैजुनी ॥185॥
विकासणार्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात.
186-15
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवे । बुद्धि प्रकाश घे धावे । विवेकावरी ॥186॥
बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते. म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो.
187-15
तेथ मेधारसे सगर्भ । अस्थापत्री सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ॥187॥
त्यावेळी मेधारस म्हणजे धारणाशक्तिरूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था (आदर) रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात.
188-15
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥188॥
सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात.
189-15
शिष्टागमविधाने । विविधयागविधाने । इये पानावरी पाने । पालेजती ॥189॥
श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात.
190-15
ऐशा यमदमी घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कोवळिया । वेल्हाळपणे ॥190॥
अशा यमदमांचे घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-15
विशिष्टा व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख । जन्मवेगे ऊर्ध्वमुख । उंचावती ॥191॥
आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे, उंच वाढतात. श्रेष्ठव्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात.
192-15
माजी वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥192॥
जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो, तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मधे असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांची, ज्ञानांची {झडझडाट} गर्जना करतो.
193-15
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळी । स्वर्गादिकी ॥193॥
तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गादिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात.
194-15
पुढा उपरति रागे लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥194॥
पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुशित पालवी नित्य नवीन येऊन वाढतच रहाते.
195-15
पै रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥195॥
नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषी, विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात.
196-15
याहीपासून उंचवडे । गुढले फळाचेनि बुडे । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥196॥
ह्याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुबके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात.
197-15
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानी उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥197॥
मग त्याही डहाळ्यांवर (इंद्रादि शाखेवर) तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीचि-कश्यपादि वरल्या शाखा आहेत.
198-15
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडी साना अग्री थोरु । फळाढ्यपणे ॥198॥
याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे.
199-15
वरी उपरिशाखाही पाठी । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटी । कोंभ निघती ॥199॥
अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसारवृक्षाला जे फळभार येतात, ते ब्रह्मदेव आणि शंकररूपी अणकुचीदार कोंब येतात. अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत. कोंबही तेच व फळही तेच.
200-15
फळाचेनि वोझेपणे । ऊर्ध्वी वोवांडे दुणे । जव माघौते बैसणे । मूळीचि होय ॥200॥
हा संसारवृक्ष, मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा (सत्कर्मांच्या) फळांच्या भाराने, मूळ जे माया, त्याला पुन्हा येऊन टेकते. ब्रह्माच्या जवळ येते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-15
प्राकृताही तरी रुखा । जे फळे दाटली होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥201॥
आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाचेही असेच आहे. तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते.
202-15
तैसे जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तिये मूळी टेकती पांडवा । वाढतेनि ज्ञाने ॥202॥
त्याप्रमाने अर्जुना येथून या संसारवृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणार्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात.
203-15
म्हणौनि ब्रह्मेशानापरौते । वाढणे नाही जीवाते । तेथूनि मग वरौते । ब्रह्मचि की ॥203॥
म्हणून ब्रह्मदेव आणि देवाचे देव महादेव यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे.
204-15
परी हे असो ऐसे । ब्रह्मादिक ते आंगवसे । ऊर्ध्वमुळासरिसे । न तुकती गा ॥204॥
परंतु हे असू दे. ब्रम्हादिक कितीही मोठे झाले. तरी उर्ध्वमुळ जे माया विशिष्ट ब्रम्ह म्हणजे ईश्वर, हे याच्या बरोबरीच्या तुलनेला येऊ शकत नाही. प्रलयाच्यावेळी ब्रम्हादिक संपुन जातील पण, ईश्वर कधीही नष्ट पावत नाही.
205-15
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामे विख्याता । तिया फळी मूळी नाडळता । भरलिया ब्रह्मी ॥205॥
सनकादिक नावांनी वरच्या (निवृत्ति मार्गाच्या) सनकादिरुपी प्रसिद्ध शाखा आहेत, त्या या संसारवृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी एकरुप झालेल्या असतात.
206-15
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पै ॥206॥
याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक, ही जी (संसारवृक्षाची) शेवटची पालवी तेथपर्यंत, या संसारवृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज.
207-15
पार्था ऊर्ध्वीचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इये अधी । म्हणितली मूळे ॥207॥
अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच (मनुष्यपणा) मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे
म्हटल आहे.
208-15
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥15-208॥
याप्रमाने वर खाली फांद्या असलेला व वर मुळ असलेला हा अलौकिक भववृक्ष सांगितला आहे.
209-15
आणि अधीची ही मूळे । उपपत्ती परिसविली सविवळे । आता परिस उन्मूळे । कैसेनि हा ॥209॥
ह्या प्रमाणे या वृक्षाच्या अधोर्ध्व मुळाचे आम्ही तुला सविस्तर कथन केले, आता ह्याचे उन्मूलन (उच्छेद) कसे होवू शकेल ते ऐक.
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेण छित्त्वा ॥15. 3॥
श्लोकार्थ
परंतु (वर जसे वर्णन केले) त्याप्रमाणॆ इहलोकी याचे स्वरूप उपलब्ध होत नाही. याला अंत नाही, आदिही नाही व स्थितीही नाही, अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थवृक्षाला बळकट अशा असंगरूपी वैराग्यजन्यज्ञानरूपी शस्त्राने छेदून संसारवृक्षाचा नाश होण्याचा उपाय
(संसारवृक्षाची विशालता)
210-15
परी तुझ्या हन पोटी । ऐसे गमेल किरीटी । जे एवढे झाड उत्पाटी । ऐसे कायि असे ? ॥210॥
परंतु अर्जुना, तुझ्या मनाला कदाचित असे वाटेल की या एवढ्या मोठ्या विशाल विस्तार पावलेल्या संसाररुपी झाड उपडले जाईल असे एवढे साधन काही आहे काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-15
के ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तव निराकारी । ऊर्ध्वी असे ॥211॥
कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ (कोठे) वर निराकार ब्रह्मामधे आहे.
212-15
हा स्थावराही तळी । फांकत असे अधींच्या डाळी । माजी धावतसे दुजा मूळी । मनुष्यरूपी ॥212॥
हा संसारवृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादि स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसर्या मनुष्यरूपी मुळांनी मधे विस्तारतो.
213-15
ऐसा गाढा आणि अफाटु । आता कोण करी यया शेवटु । तरी झणी हा हळुवटु । धरिसी भावो ॥213॥
असा हा संसारवृक्ष बळकट व अमर्याद आहे, तर आता याचा शेवट (उपटून टाकणे) कोण करील ? असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस.
214-15
परी हा उन्मूळावया दोषे । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ? ॥214॥
(संसारवृक्ष खरा नाहीच)
परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत ? (म्हणजे श्रम नाहीतच). मुलाकरता (लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून) बागुलबुवास खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय ?
215-15
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावे । होआवे मग तोडावे । खपुष्प की ? ॥215॥
ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहेत काय ? सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय ? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे का ?
216-15
तैसा संसारु हा वीरा । रुख नाही साचोकारा । मा उन्मूळणी दरारा । कायिसा तरी ? ॥216॥
त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष जर खरा नाही (केवळ मिथ्याभास आहे) तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली ?
217-15
आम्ही सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेची घरभरी । लेकुरे जैशी ॥217॥
आम्ही संसारवृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा (विस्ताराचा) जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांझेची घर भरून लेकरे आहेत (असेच सांगण्याच्या प्रकारापैकीच होय).
218-15
कय कीजती चेइलेपणी स्वप्नीची तिये बोलणी । तैशी जाण ते काहाणी । दुगळीचि ते ॥218॥
जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची ? त्याप्रमाणे ह्या संसारवृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज.
219-15
वाचूनि आम्ही निरूपिले जैसे । ययाचे अचळ मूळ असे तैसे । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥219॥
याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसारवृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच (स्वरूपे करून) खरा असता.
220-15
तरी कोणाचेनि संताने । निपजती तया उन्मूळणे । काय फुंकिलिया गगने । जाइजेल गा ॥220॥
तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल ? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे (एवढे) आकाश उडून जाईल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-15
म्हणौनि पै धनंजया । आम्ही वानिले रूप ते माया । कासवीचेनि तुपे राया । वोगरिले जैसे ॥221॥
म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसारवृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. (कसे तर) जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे.
222-15
मृगजळाची गा तळी । तिये दिठी दुरूनि न्याहाळी । वाचूनि तेणे पाणिये साळी केळी । लाविसी काई ? ॥222॥
बा अर्जुना मृगजळाची तळी आहेत ती दृष्टीने दुरूनच पहा, याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय ?
223-15
मूळ अज्ञानचि तव लटिके । मा तयाचे कार्य हे केतुके । म्हणौनि संसाररुख सतुके । वावोचि गा ॥223॥
बा अर्जुना, या संसारवृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे ? (काय किंमतीचे असणार ?) म्हणून संसारवृक्ष खरा कोठून असणार ? तर तो मिथ्याच आहे.
224-15
आणि अंतु यया नाही । ऐसे बोलिजे जे काही । तेही साचचि पाही । येके परी ॥224॥
आणि या संसारवृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज.
225-15
तरी प्रबोधु जव नोहे । तव निद्रे काय अंतु आहे ? । की रात्री न सरे तव न पाहे । तया आरौते ? ॥225॥
संसारवृक्ष कोठपर्यंत खरा वाटतो ? तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे काय ? अथवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही.
226-15
तैसा जव पार्था । विवेकु नुधवी माथा । तव अंतु नाही अश्वत्था । भवरूपा या ॥226॥
त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही.
227-15
वाजते वारे निवांत । जव न राहे जेथिचे तेथ । तव तरंगता अनंत । म्हणावीचि की ॥227॥
जोपर्यंत वहाणारा वारा जागच्या जागी शांत रहात नाही, तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे.
228-15
म्हणौनि सूर्यु जै हारपे । तै मृगजळाभासु लोपे । का प्रभा जाय दीपे । मालवलेनि ॥228॥
(ज्ञानाने अविद्या नाहीशी झाली की संसारवृक्षाचा नाश होतो. ) येवढ्याकरता सूर्य जेव्हा मावळतो, तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो
229-15
तैसे मूळ अविद्या खाये । ते ज्ञान जै उभे होये । तैचि यया अंतु आहे । एऱ्हवी नाही ॥229॥
त्याप्रमाणे संसारवृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे (नाहीसे करणारे) ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार-वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही.
230-15
तेवीचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोलाते या ॥230॥
(संसारवृक्ष अनादि कसा ?) त्याप्रमाणे हा संसारवृक्ष अनादि, (आरंभरहित) आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसारवृक्षावर आरोप नाही तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसारवृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-15
जे संसारवृक्षाच्या ठायी । साचोकार तव नाही । मा नाही तया आदि काई । कोण होईल ? ॥231॥
कारण की संसारवृक्ष तर स्वरूपाने खरा नाही. तर मग जो (स्वरूपाने खरा) नाही त्याला कोणी आरंभ असेल काय ?
232-15
जो साच जेथूनि उपजे । तयाते आदि हे साजे । आता नाहीचि तो म्हणिजे । कोठूनिया ? ॥232॥
जो खरोखर जेथून (कोठून तरी) उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपेकरून नाहीच, त्याचा आरंभ कोठून म्हणावयाचा ?
233-15
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगो कवण माये । यालागी नाहीपणेचि होये । अनादि हा ॥233॥
म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही, तशाला कोण आई आहे म्हणून सांगू ? {अर्थात त्याचा आरंभ काय सांगावयाचा ?}
234-15
वांझेचिया लेका । कैची जन्मपत्रिका । नभी निळी भूमिका । के कल्पू पा ॥234॥
वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची ? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची ?
235-15
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणे देठु तोडावा । म्हणौनि नाही ऐसिया भवा । आदि कैची ? ॥235॥
अर्जुना आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा ? म्हणून स्वरूपेकरून जो नाही, अशा संसाराला आरंभ कसला ?
236-15
जैसे घटाचे नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥236॥
ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा (प्रागभाव) हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसारवृक्ष अनादि आहे असे समज.
237-15
अर्जुना ऐसेनि पाही । आद्यंतु ययासि नाही । माजी स्थिती आभासे काही । परी टवाळ ते ॥237॥
(संसारवृक्षाचे भासणे मिथ्या आहे तरी भासतो) अर्जुना याप्रमाणे पहा की या संसारवृक्षाला आदि व अंत नाही, मध्ये स्थितीकाली तो काही भासत आसतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे.
238-15
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रीही कीर न रिगे । माजी दिसे वाउगे । मृगांबु जैसे ॥238॥
ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही तरी मध्येच मृगजळ दिसते.
239-15
तेसा आद्यंती कीर नाही । आणि साचही नोहे कही । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥239॥
त्याप्रमाणे हे अर्जुना, संसारवृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही. परंतु खोटेपणाचे नवल असे आहे की तो नसून भासतो.
240-15
नाना रंगी गजबजे । जैसे इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥240॥
ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञान्याला हा संसारवृक्ष आहे असे भासते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-15
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥241॥
अशा रीतीने स्थितीकाली हा संसारवृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून (साधूची सोंगे आणून) लोकांना फसवतो तसा.
242-15
आणि नसतीचि श्यामिका । व्योमी दिसे तैसी दिसो का । तरी दिसणेही क्षणा एका । होय जाय ॥242॥
आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो, तसा दिसेना का ? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते.
243-15
स्वप्नीही मानिले लटिके । तरी निर्वाहो का एकसारिखे । तेवी आभासु हा क्षणिके । रिताचि गा ॥243॥
स्वपनातील खोटे पदार्थ वस्तुत: नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात का ? तर टिकत नाहीत. (ते जसे क्षणिक भासणारे आहेत) तशा क्षणिक भासणार्या पद्धतीचा हा संसारवृक्षाचा आभास आहे.
244-15
देखता आहे आवडे । घेऊ जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडे । जळामाजी ॥244॥
आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे, (तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही) त्याप्रमाणे हा संसारवृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर (म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर) तो सापडत नाही.
245-15
तरंगभंगु सांडी पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणे पाडे । होणे जाणे गा ॥245॥
बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे (ह्या संसारभासाच्या होण्या-जाण्याच्या उपमेला) कमी पडते. विजेचा उदयास्त जरी अती त्वरित असतो तरी वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने (त्वरेने) संसारभासाचे होणे-जाणे आहे.
246-15
जैसा ग्रीष्मशेषीचा वारा । नेणिजे समोर की पाठीमोरा । तैसी स्थिती नाही तरुवरा । भवरूपा यया ॥246॥
ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वहातो हे कळत नाही (त्याची स्थिती जशी एकच नसते) त्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. म्हणजे संसाराला स्थितीही नाही.
247-15
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी । आता कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥247॥
याप्रमाणे संसारवृक्षाला आदि, अंत व स्थिती ही नाहीत व याला रूपही नाही. आता असे जर आहे तर हे अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय ?
248-15
आपुलिया अज्ञानासाठी । नव्हता थांवला किरीटी । तरी आता आत्माज्ञानाच्या लोटी । खांडेनि गा ॥248॥
या संसारवृक्षाच्या नाशाचा उपाय म्हणजे आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार
अर्जुना हा नसलेला वृक्ष (केवळ) आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे. तर आता त्याला आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारीने नाहीसा कर.
249-15
वाचूनि ज्ञानेवीण ऐके । उपाय करिसी जितुके । तिही गुंफसि अधिके । रुखी इये ॥249॥
याशिवाय एका ज्ञानावाचून त्याच्या नाशाकरता जितके उपाय तू करशील त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू या संसारवृक्षात अधिक अडकशील.
250-15
मग किती खांदोखांदी । यया हिंडावे ऊर्ध्वी अधी । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदी । सम्यक् ज्ञाने ॥250॥
मग या संसारवृक्षाच्या फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे ? त्या फिरण्याला अंतच नाही. म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाक.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-15
एऱ्हवी दोरीचिया उरगा । डांगा मेळविता पै गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥251॥
या संसारवृक्षाच्या नाशाकरता आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर साधने म्हणजे ओझेच सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणार्या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते.
252-15
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागी धावता दांगा- । माजी वोहळे बुडिजे पै गा । साच जेवी ॥252॥
मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी (होडी) रानोमाळ धावावयास लागले तर त्याने खर्या ओढ्यात सापडून बुडावे,
253-15
तेवी नाथिलिया संसारात्र । उपाई जाचतया वीरा । आपणपे लोपे वारा । विकोपी जाय ॥253॥
अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमधे खटपट करणार्याला साधनांचे जिवापाड श्रम होऊन तो खटपट करणारा आपण स्वत: मरतो.
254-15
म्हणौनि स्वप्नीचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया । तेवी अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥254॥
म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे.
255-15
परी तेचि लीला परजवे । तैसे वैराग्याचे नवे । अभंगबळ होआवे । बुद्धीसी गा ॥255॥
(ज्ञानखड्ग फिरवण्यास वैराग्याची आवश्यकता) परंतु अरे तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरवता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे.
256-15
उठलेनि वैराग्ये जेणे । हा त्रिवर्गु ऐसा सांडणे । जैसे वमुनिया सुणे । आताचि गेले ॥256॥
ज्या वैराग्याचा उठाव झाला असता ह्या त्रिवर्गाचा (स्वर्ग, मृत्यू व पाताळाचा) असा त्याग होतो की जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे.
257-15
हा ठायवरी पांडवा । पदार्थजाती आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥257॥
अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थमात्रसंबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दांडगे वैराग्य पाहिजे.
258-15
मग देहाहंतेचे दळे । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धी करतळे । हातवसावे ॥258॥
(हे ज्ञानखड्ग कसे चालवावे ?) मग त्या ज्ञानखड्गावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे
259-15
निसळे विवेकसाहणे । जे ब्रह्माहमस्मिबोधे सणाणे । मग पुरतेनि बोधे उटणे । एकलेचि ॥259॥
ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व ‘अहं ब्रह्मास्मि ” (मी ब्रह्म आहे ” अशा बोधाची त्यास सणसणीत (तीक्ष्ण) धार असावी व मग ते एकट्या पूर्णबोधाने घासावे.
260-15
परी निश्चयाचे मुष्टिबळ । पाहावे एकदोनी वेळ । मग तुळावे अति चोखाळ । मननवरी ॥260॥
परंतु (मी ब्रह्म आहे अशा) निश्चयरूपी मुठीचे बळ एकदोन वेळ पहावे (आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अती शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे (म्हणजे अद्वैतबोधाचे अती शुद्ध असे चिंतन करावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-15
पाठी हतियेरा आपणया । निदिध्यासे एक जालिया । पुढे दुजे नुरेल घाया- । पुरते गा ॥261॥
नंतर (ज्ञानरूपी) हत्यार व आपण निजध्यासाने एक झाल्यावर (आपण ज्ञानरूप झाल्यावर) अर्जुना, आपल्यापुढे घाव मारण्यापुरते दुसरे (हत्यार) उरणार नाही.
262-15
ते आत्मज्ञानाचे खांडे । अद्वैतप्रभेचेनि वाडे । नेदील उरो कवणेकडे । भववृक्षासी ॥262॥
ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसारवृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही.
263-15
शरदागमीचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोटु भरी ॥263॥
शरद् ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो,
264-15
नाना उपवढ होता खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसे ॥264॥
अथवा जागे होताक्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठावठिकाणा उरत नाही. त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रहार करील (म्हणजे संसारवृक्षाचा ठावठिकाणा उरू देणार नाही).
265-15
तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ । का अधीचे हन शाखाजाळ । ते काहीचि न दिसे मृगजळ । चादिणा जेवी ॥265॥
तेव्हा या संसारवृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही.
266-15
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळाते ॥266॥
अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तलवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसारवृक्ष, तो छेदून (म्हणजे आत्मविचाराने त्याचा निरास करून)
ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥15. 4॥*
श्लोकार्थ
👉 नंतर त्या (आपल्या) रूपास पहावे, की ज्या ठिकाणी गेले असता (मुमुक्षु) पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही (विश्व) परंपरा वाढली, अशा त्या आद्य पुरुषास आत्मस्वरूपास ज्ञानाच्या अंगाने ) शरण जावे.
(आत्मस्वरूपानुभव कसा घ्यावा ?
267-15
मग इदंतेसि वाळले । जे मीपणेवीण डाहारले । ते रूप पाहिजे आपले । आपणचि ॥267॥
(संसारवृक्षाच्या नाशानंतर येणारी आत्मानुभूती कशी घ्यावी) वर सांगितल्याप्रमाणे आत्मविचाराने देहादि अनात्मतत्वरूप प्रपंचाचा निरास झाल्यावर मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते, त्यासंबंधाने इदंभाव (हे ते पणा) स्फुरतो त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व (इदंच्या सापेक्ष आपल्यासंबंधाने अहंभाव (मीपणा) असतो. आत्मस्वरूप एकरस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदं स्फुरण नाही आणि इदं स्फुरण नाही म्हणून) अहंस्फुरणही जेथे नसते असे जे अहं-इदं-वृत्तिशून्य, प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे.
268-15
परी दर्पणाचेनि आधारे । एकचि करून दुसरे । मुख पाहाती गव्हारे । तैसे नको हो ॥268॥
परंतु आरशाच्या आधाराने समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तर्हेने आपणच आपल्याला पहातात. तसे हे आत्मस्वरूपाला दृश्य-द्रष्टा करून पहाणे नको.
269-15
हे पाहाणे ऐसे असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा । मग आपलिया उगमी झरा । भरोनि ठाके ॥269॥
अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर उकरण्याच्या पूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्याने भरलेला असतोच, तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच.
270-15
नातरी आटलिया अंभ । निजबिंबी प्रतिबिंब । निहटे का नभी नभ । घटाभावी ॥270॥
अथवा पाणी आटाल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-15
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवी आपणपया । तैसे आपेआप धनंजया । न्याहाळणे जे गा ॥271॥
अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नि:शेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळातो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पहाणे आहे.
272-15
जिव्हे आपली चवी चाखणे । चक्षू निज बुबुळ देखणे । आहे तया ऐसे निरीक्षणे । आपुले पै ॥272॥
जिभेने जशी आपलीच चव चाखावी, अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पहाणे आहे.
273-15
का प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरले खोळे । पाणियाचिये ॥273॥
अथवा तेज तेजात मिसळावे, अथवा आकाशाने आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे
274-15
आपणचि आपणयाते । पाहिजे जे अद्वैते । ते ऐसे होय निरुते । बोलिजतु असे ॥274॥
आपणच आपल्याला द्वैतभावाने जे पहावयाचे ते असे (वर सांगितल्याप्रमाणे) आहे हे मी खरे सांगतो.
275-15
जे पाहिजतेनवीण पाहिजे । काही नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष का म्हणिजे । जया ठायाते ॥275॥
जे आत्मस्वरूप पहाणेपणा घेतल्याशिवाय पहावे, (दृश्यसापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पहावे), काही न जाणणे, हेच त्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला (ज्या आत्मस्वरूपाला) आद्य (आरंभीचा) पुरुष असे म्हणतात.
276-15
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वाया ॥276॥
त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात.
277-15
पै भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यो इया निगाले । पैजा जेथ ॥277॥
संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग (अष्टांग योग) व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्य़ास निघाले.
278-15
संसाराचिया पाया पुढा । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागा ॥278॥
ते वैराग्यशील पुरुष (संसार त्यांचा पाठलाग करीत असतांना) त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जे ब्रह्मपद (सत्यलोक) हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात,
279-15
अहंतादिभावा आपुलिया । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥279॥
आपल्या अहंकारादि सर्व अनात्मवृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात.
280-15
पै जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥280॥
ज्या वस्तूच्या अज्ञानाने, जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मीतूपण जगात प्रचारात आणले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-15
जिये का वस्तूचे नेणणे । आणिले थोर जगा जाणणे । नाही ते नांदविले जेणे । मी तू जगी ॥281॥
ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्वपरंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते.
282-15
पार्था ते वस्तु पहिले । आपणपे आपुले । पाहिजे जैसे हिंवले । हिंव हिंवे ॥282॥
अर्जुना, ती आपली पहिली वस्तू (आपले मूळ आत्मस्वरूप) आपण आपल्याच ठिकाणी पहावी. ती कशी तर जसे थंडीने थंडी व्हावी, त्याप्रमाणे (अभिप्राय असा की या हिंवाच्या (थंडीच्या) दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे, हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पहाणे होय).
283-15
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया का भेटलिया । येणेचि नाही ॥283॥
अर्जुना, त्याला (आत्मवस्तूला) ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही.
284-15
परी तया भेटती ऐसे । जे ज्ञाने सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसे । भरलेपण ॥284॥
परंतु महाप्रळयकाळच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरलेपण असते, तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो. असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात.
निर्माणमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥15. 5॥
श्लोकार्थ :-
मोहमानरहित, संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्य स्थिती आहे असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख व दु:खनामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात.
(आत्मस्वरूपात कोण मिसळतात ?
285-15
जया पुरुषांचे का मन । सांडोनि गेले मोह मान । वर्षांती जैसे घन । आकाशाते ॥285॥
वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वत: टाकून गेले.
286-15
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवी सोयरा । तैसे नागवती विकारा । वेटाळू जे ॥286॥
ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत.
287-15
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभे प्रबळे । तयाची क्रिया ढाळेढाळे । गळती आहे ॥287॥
ज्याप्रमाणे फळे आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे (आत्मानुभावामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळू हळू (आपोआप) सुटत आहे.
288-15
आगी लगलिया रुखी । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसे सांडिले अशेखी । विकल्पी जे ॥288॥
ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून (त्या वृक्षावर असलेले पक्षी) जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले.
289-15
आइके सकळ दोषतृणी । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाही जयाते ॥289॥
अर्जुना, ऐक. ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते.
290-15
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहअहंता तैसी । अविद्येसवे ॥290॥
सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-15
पै आयुष्यहीना जीवाते । शरीर सांडी जेवी अवचिते । तेवी निदसुरे द्वैते । सांडिले जे ॥291॥
किंवा आयुष्य संपलेल्या जीवाला शरीर ज्याप्रमाणे अवचित सोडतो, त्याप्रमाणे अविद्यात्मक द्वैताने ज्यांना एकदम सोडले आहे.
292-15
लोहाचे सांकडे परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥292॥
परिसाला लोखंडाचा सदा दुष्काळ, सूर्याला जसे अंधाराचे दर्शन नाही, तसा ज्याच्या बुद्धीत द्वैताचा सदा दुष्काळ म्हणजे कधी उदयच नाही. 92
293-15
अगा सुखदुःखाकारे । द्वंद्वे देही जिये गोचरे । तिये जया का समोरे । होतीचिना ॥293॥
अर्जुना, देहाच्या ठायी अनुभवाला येणारी जी सुखदुःखादि द्वंद्वे ती ज्याच्या समोर येतच नाहीत 93
294-15
स्वप्नीचे राज्य का मरण । नोहे हर्षशोकासि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥294॥
स्वप्नात मिळालेले राज्य किंवा आलेले मरण हे जसे जागृतीत हर्षशोकाला कारण होत नाही. 94
295-15
तैसे सुखदुःखरूपी । द्वंद्वी जे पुण्यपापी । न घेपिजती सर्पी । गरुड जैसे ॥295
गरुड जसे सर्पाकडून धरले जात नाहीत, त्याप्रमाणे, सुखदुःख व पापपुण्यादि द्वंद्वांकडून ज्यांना धक्का पोचू शकत नाही. 95॥
296-15
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचे क्षीर । चरताति जे सविचार । राजहंसु ॥296॥
आणि, (सत्य व अनृत ह्यांच्या मिश्रणाने उद्भवलेल्या जगद्व्यवहारातील) अनृत म्हणजे अनात्मवर्णरूप पाणी टाकून, जे विचारी ज्ञानी, राजहंसाप्रमाणे सत्य म्हणजे आत्मरसरूप दुग्ध सेवन करतात. 96
297-15
जैसा वर्षोनि भूतळी । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळी । बिंबासीचि ॥297॥
सूर्य, आपला रस, म्हणजे तेजाचे कार्य जे पाणी, त्याचा पृथ्वीवर वर्षाव करून, पुन्हा ते पाणी किरणद्वारा आपल्या ठिकाणी जसे आकर्षण करून घेतो. 97
298-15
तैसे आत्मभ्रांतीसाठी । वस्तु विखुरली बारावाटी । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥298॥
त्याप्रमाणे, जे सर्वाधिष्ठान आत्मरूप, तद्विषयक भ्रांतीमुळे किंवा अनोळखी मुळे, अनेक अनात्मवस्तुरूपाने पसरलेले आहे ते, ज्यांची अखंड यथार्थ- ज्ञानदृष्टि आहे त्यांच्या दृष्टीने एकरूपाला येते. (म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पिलेले अनंतत्व जाऊन ” सर्व खल्विदं ब्रह्म ” असे अनुभवास येते. ) 98
299-15
किंबहुना आत्मयाचा । निर्धारी विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजी जैसा ॥299॥
किंबहुना, गंगेचा ओघ सागरांत जसा सागररूप होतो, तसा आत्मनिर्धारविषयक ज्यांचा विवेकही आत्मरूपच होतो. 99
300-15
पै आघवेचि आपुलेपणे । नुरेचि जया अभिलाषणे । जैसे येथूनि पऱ्हा जाणे । आकाशा नाही ॥300॥
आणि, सर्वव्यापक आकाशाला जसे अलीकडे किंवा पलीकडे जाणे संभवत नाही, त्याप्रमाणे, सर्वात्मभावामुळे त्याने अभिलाष (इच्छा ) धरावा अशी दुसरी वस्तूच उरत नाही. 300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-15
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनी जया विकारु । उदैजेना ॥301॥
आगीमध्ये जसे कसलेही बी रुजणे शक्य नाही, तसा ज्याच्या मनात विकार (सत्यत्वाने) उत्पन्नच होत नाही. 1
302-15
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जया सळु । कामोर्मीचा ॥302॥
रवि (मंथा) म्हणून योजलेला मंदारपर्वत काढल्यावर समुद्र जसा स्थिर झाला त्याप्रमाणे, सदैव शांत असल्यामुळे ज्याच्या चित्तात कामाची उर्मी उठत नाही. 2
303-15
चंद्रमा कळी धाला । न दिसे कोणे आंगी वोसावला । तेवी अपेक्षेचा अवखळा । न पडे जया ॥303॥
षोडषकलापूर्ण चंद्र जसा कोणत्याही अंगाने अपूर्ण नसतो, तसा पूर्णस्वरूप ह्याला कसलीच अपेक्षा असणे शक्य नाही. 3
304-15
हे किती बोलू असांगडे । जेवी परमाणु नुरे वायूपुढे । तैसे विषयांचे नावडे । नांवचि जया ॥304॥
ह्या पुरुषाच्या निरुपम गोष्टी तुला किती सांगाव्या ? वायूपुढे जसे परमाणूचे नावही घेण्याची सोय नाही, तसे ह्याला विषयाचे नांवही आवडत नाही. 4
305-15
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशे । ते तेथ मिळती जैसे । हेमी हेम ॥305॥
ह्याप्रमाणे जे किंवा ज्ञानाग्नीने शुद्ध झाले आहेत, ते, सुवर्णातिसुवर्ण मिळावे त्याप्रमाणे क्षेत्रं प्राप्त होतात. 5
306-15
तेथ म्हणिजे कवणे ठाई । ऐसेही पुससी काही । तरी ते पद गा नाही । वेचु जया ॥306॥
तेथे म्हणजे कोठे असे म्हणशील तर, ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही अशी जी परमात्मवस्तु तेथे प्राप्त होतात. (तदरूप होतात) 6
307-15
दृश्यपणे देखिजे । का ज्ञेयत्वे जाणिजे । अमुके ऐसे म्हणिजे । ते जे नव्हे ॥307॥
जे दृष्टीचा विषय होईल, किंवा जे जाणले जाईल, जे असे किंवा तसे आहे असे म्हणता येईल, असे जे नाही (ते, ते पद होय. ) 7
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥15. 6॥
308-15
पै दीपाचिया बंबाळी । का चंद्र हन जे उजळी । हे काय बोलो अंशुमाळी । प्रकाशी जे ॥308॥
दिव्याच्या भडक तेजांत किंवा चंद्रप्रकाशात जे स्पष्ट दिसते, इतकेच काय सांगावे ? तर सूर्य ज्याचे प्रकाशन करितो. 8
309-15
ते आघवेचि दिसणे । जयाचे का न देखणे । विश्व भासतसे जेणे । लपालेनी ॥309॥
हा सर्व दिसण्याचा व्यवहार, म्हणजे ज्याचे अदर्शन किंवा अज्ञान आहे; कारण, त्या वस्तूच्या अदर्शन स्थितीतच (अज्ञानांतच) विश्वाभास होत असतो. 9
310-15
जैसे शिंपीपण हारपे । तव तव खरे होय रुपे । का दोरी लोपता सापे । फार होइजे ॥310॥
शिपीचा शिंपीपण जसा जसा नजरेआड होतो तसे तसे रुपे खरे वाटू लागते, किंवा दोरीचा दोरपणा लोपेल तोंवरच सापाची प्रतिष्ठा असणार. 310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-15
तैसी चंद्रसूर्यादि थोरे । इये तेजे जिये फारे । तिये जयाचेनि आधारे । प्रकाशती ॥311॥
त्याचप्रमाणे, हे चंद्रसूर्यादि प्रकाशित थोर पदार्थ जिच्या अंधारांत म्हणजे (अज्ञानांत) प्रकाशित होतात. 11
312-15
ते वस्तु की तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याच्या मानसी । प्रकाशे जे ॥312॥
ती वस्तु तेजोराशि (तेजाची खाण) खरी; ती सर्व भूतांचा आत्मा असून सर्वत्र सम आहे, आणि चंद्र- सुर्यांनाही तिचाच प्रकाश आहे. 12
313-15
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसा । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागी तेज जे तेजसा । ते वस्तूचे आंग ॥313॥
(अशी वस्तुस्थिति आहे) म्हणून, वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र व सूर्य हे कवडशासारखे क्षुद्र होत; यास्तव तेजिष्ठ वस्तूंच्या ठिकाणचे तेज ती वस्तुप्रभा होय. 13
314-15
आणि जयाच्या प्रकाशी । जग हारपे चंद्रार्केंसी । सचंद्र नक्षत्रे जैसी । दिनोदयी ॥314॥
सूर्योदय झाल्यावर चंद्रासह सर्व नक्षत्रे जशी लोप पावतात, त्याप्रमाणे, जी आत्मवस्तु स्वप्रकाशत्वाने प्रकाशित झाली असता (आत्मानुभवकाली) चंद्रसूर्यासह जगाचा लोप होतो, 14
315-15
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नीची डिंडीमा मावळे । का नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥315॥
किंवा जागृतीत स्वप्नातील सर्व व्यवहार मावळतो अथवा संध्याकाळ झाल्यावर ज्याप्रमाणे मृगजल आपोआप नाहीसे होते. 15
316-15
तैसा जिये वस्तूच्या ठायी । कोण्हीच का आभासु नाही । ते माझे निजधाम पाही । पाटाचे गा ॥316॥
त्याप्रमाणे, ज्या वस्तूच्या ठिकाण अन्य कसलाही आभास नाही ते, अर्जुना, माझे मुख्यस्थान म्हणजे स्वरूप होय. 16
317-15
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौती पाउले । महोदधी का मिनले । स्रोत जैसे ॥317॥
महासागराला मिळून सागररूप झालेले ओढे जसे माघारे येणे संभवत नाही, त्याप्रमाणे त्या स्थानाला जे गेले त्यांची पुन्हा जन्माला येण्याची गोष्टच नको. 17
318-15
का लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरी । होयचि ना माघारी । परती जैसी ॥318॥
किंवा मिठाची केलेली हत्तीण लवण सागरांत सोडली असता, जशी परत येणे शक्य नाही. 18
319-15
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाही तप्तलोहौनि जळा । निघणे जेवी ॥319॥
अथवा आकाशांत गेलेल्या अग्निज्वाला जशा परत फिरत नाहीत किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी परत पाणीरूपाने आढळणे शक्य नाही. 19
320-15
तेवी मजसी एकवट । जे जाले ज्ञाने चोखट । तया पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥320॥
त्याप्रमाणे, यथार्थज्ञानाने जे माझ्याशी ऐक पावले म्हणजे मद्रूप झालेत्यांना पुन्हा मागे येण्याला रस्ता नाही. (पुनर्जन्म नाही) 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-15
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥321॥
(येथून 342 ओवी पर्यंतच्या ओव्या ह्या पुढील श्लोकाचे अवतरण जाणाव्या)
हे भाषण ऐकून सर्व बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ असा जो अर्जुन, तो म्हणाला, हो हो ! मजवर आपला केवढा प्रसाद आहे म्हणून सांगावे ! पण, प्रभो, आणखी एक शंका येते, तिचे निरसन व्हावे अशी इच्छा आहे. 21
322-15
तरी देवेसि स्वये एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेसि भिन्न आथी । की अभिन्न जी ॥322॥
ती अशी – जे आपल्याशी एकवट झाले, म्हणजे ऐक्य पावले म्हणून माघारे येत नाहीत, ते, प्रभो, आपल्याहूनमूळचे भिन्न आहेत की अभिन्न आहेत ? 22
323-15
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हे असंबद्ध । जे फुला गेले षट्पद । ते फुलेचि होती पा ॥323॥
जर ते अनादिसिद्ध म्हणजे मूळचेच भिन्न असतील तर माघरे येत नाहीत हे म्हणणे जुळत नाही; पहा कि मधु सेवनार्थं पुष्पांशी ऐक्य पावलेले भ्रमर काय पुष्परूपच होतात म्हणावयाचे ? 23
324-15
पै लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यी शिवोनि जैसे । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥324॥
दुसरे असे की नेम मारावयाच्या वस्तुहून भिन्न असलेले बाण त्याला स्पर्शून जसे मागे खाली पडतात, तसे भिन्न असून आपल्याला मिळालेले परत आलेच पाहिजेत. 24
325-15
नातरी तूचि ते स्वभावे । तरी कोणे कोणासि मिळावे । आपणयासी आपण रुपावे । शस्त्रे केवी ? ॥325॥
नाहीतर तुम्ही तेच ते अशी जर वस्तुस्थिति असेल, तर, कोणी कोणास मिळावयाचें ? शस्त्र आपले आपल्यालाच कसे खोचणार ? 25
326-15
म्हणौनि तुजसी अभिन्ना जीवा । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलो अवयवा । शरीरेसी ॥326॥
देवा, अवयवांचा शरीराशी संयोग किंवा वियोग म्हणणे जसे अप्रस्तुत, तसे, तुझ्याशी अभिन्न असलेले जीव ह्यांचा तुझ्याशी संयोग किंवा वियोग होतो ही भाषा बोलण्याची सोय नाही. 26
327-15
आणि जे सदा वेगळे तुजसी । तया मिळणी नाही कोणे दिवशी । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥327॥
आणि जे तुमच्याहून नित्य वेगळे आहेत त्यांचे तुमच्याशी कधींही ऐक्य होणार नाही. मग, ते परत येतात आणि येत नाहीत व्यर्थ उठाठेव कसली ? 27
328-15
तरी कोण गा ते तूते । पावोनि न येती माघौते । हे विश्वतोमुखा माते । बुझावी जी ॥328॥
असा दुहेरी पेंच असल्याने तुझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे ते आहेत तरी कोण, ह्याविषयीं, हे विश्वतोमुखा, माझी समजूत करावी. 28
329-15
इये आक्षेपी अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनिया ॥329॥
अर्जुनाच्या ह्या शंकेने, सर्वज्ञशिरोमणि भगवान् श्रीकृष्ण, शिष्याची धारणाबुद्धि पाहून मनात संतुष्ट झाला. 29
330-15
मग म्हणे गा महामती । माते पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥330॥
मग भगवान् म्हणाले, अर्जुना, मोठा बुद्धिमान् आहेसरे ! अरे, माझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे सांगितले ते दृष्टि भेदाने माझ्याहून भिन्नही आहेत व अभिन्नही आहेत 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-15
जै विवेके खोले पाहिजे । तरी मी तेचि ते सहजे । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥331॥
खोल विचार करून पाहिला, तर, त्यांचे व माझे स्वभावसिद्ध ऐक्य आहे; आणि वरवरच्या (उथळ) दृष्टीने पाहिले तर ते भिन्न आहेत असेही म्हणावे लागले. 31
332-15
जैसे पाणियावरी वेगळ । तळपता दिसती कल्लोळ । एऱ्हवी तरी निखिळ । पाणीचि ते ॥332॥
जशा पाण्यावरील लाटा ह्या पाण्याहून वेगळया आहेतशा दिसतात, पण वस्तुतः या जलरूपच असतात 32
333-15
का सुवर्णाहुनि आने । लेणी गमती भिन्ने । मग पाहिजे तव सोने । आघवेचि ते ॥333॥
अलंकार हे सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते; पण विचार केला म्हणजे ते सर्व सोनेच आहे असे ठरतें; 33
334-15
तैसे ज्ञानाचिये दिठी । मजसी अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण ते उठी । अज्ञानास्तव ॥334॥
त्याचप्रमाणे अर्जुना, शुद्ध ज्ञानदृष्टया, त्यांच्यात व माझ्यात भेद नाहीच; पण भिन्न आहेत अशी जी बुद्धि होते, तो सर्व अज्ञानाचा प्रभाव होय. 34
335-15
आणि साचोकारेनि वस्तुविचारे । कैचे मज एकासि दुसरे । भिन्नाभिन्नव्यवहारे । उमसिजेल ॥335॥
सम्यकवस्तुविचारदृष्टीने, अद्वितीय एक जो मी, त्या माझ्यापुढे दुसरे येणार कोठून कीं. ते भिन्न आहे की अभिन्न आहे हे तुला सांगावे ? 35
336-15
आघवेचि आकाश सूनि पोटी । बिंबचि जै आते खोटी । तै प्रतिबिंब के उठी । के रश्मि शिरे ? ॥336॥
सूर्यबिंबानेच सर्व आकाश व्यापून पोटांत घातले तर, प्रतिबिंब होण्याला स्थलच कोठलें ? किंवा किरण तरी कोठे पडणार ? 36
337-15
का कल्पांतीचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? । म्हणौनि कैचे अंश अविक्रिया । एका मज ॥337॥
अर्जुना, प्रलयकाळचे उदक, हे काय नदीनाले ह्यांच्या पाण्याने भरले जातें ? त्याचप्रमाणे सर्वव्यापक, अविक्रिय, अपरिच्छिन्न जो मी एक, त्या मला अंश कोठेच ? 37
338-15
परी ओघाचेनि मेळे । पाणी उजू परी वाकुडे जाले । रवी दुजेपण आले । तोयबगे ॥338॥
परंतु, उजू असलेले पाणीही ओघाच्या योगाने जसे वाकडे वाटू लागते, किंवा सूर्यबिंबालाच जलामुळे प्रतिबिंबरूप दुजेपणा येतो. 38
339-15
व्योम चौफळे की वाटोळे । हे ऐसे कायिसयाही मिळे । परी घटमठी वेटाळे । तैसेही आथी ॥339॥
आकाश चौकोनी की वाटोळे ? ह्याचे उत्तर ते कसल्याही आकाराचे आहे हे होय; पण, घटमठादि उपाधीमध्ये ते बाटोळे व चतुष्कोण असेही असते. 39
340-15
हा गा निद्रेचेनि आधारे । काय एकलेनि जग न भरे ? । स्वप्नीचेनि जै अवतरे । रायपणे ॥340॥
अरे, निद्रेच्या आधारावर पडणाच्या स्वप्नात, जेव्हा हा ‘राजा ” होतो तेंव्हा त्या अवस्थेतील राज्यादि सर्व प्रपंचरूपाने हा एकटाच नटलेला नसतो काय ? 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-15
का मिनलेनि किडाळे । वानिभेदासि ये सोळे । तैसा स्वमाये वेटाळे । शुद्ध जै मी ॥341॥
किंवा, उत्तम सोने हिणकस धातूच्या मिश्रणाने जसे कसाला कमी भरते त्याप्रमाणे, शुद्धस्वरूप जो मी, त्या माझ्याशी स्वमायेचा जेव्हा योग किंवा संबंध घडतो (उपाधियुक्त होतो) 41
342-15
तै अज्ञान एक रूढे । तेणे कोऽहंविकल्पाचे मांडे । मग विवरूनि कीजे फुडे । देहो मी ऐसे ॥342॥
तेव्हा एका अज्ञानाचाच प्रादुर्भाव होऊन ‘मी कोण ?’ असा विकल्प उत्पन्न होतो व मग खऱ्या स्वरूपाचा विसर पडून ‘ देहच मी ” असा निश्चय ठरतो. 42
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥15. 7॥
343-15
ऐसे शरीराचि येवढे । जै आत्मज्ञान वेगळे पडे । तै माझा अंशु आवडे । थोडेपणे ॥343॥
ह्याप्रमाणे सर्वव्यापक आत्म्याचे शरीर तोच मी, असे वेगळे किंवा मर्यादित ज्ञान होते, त्यावेळी परिच्छिन्नत्वामुळे जीव हा माझा अंश आहे असे भासतें. 43
344-15
समुद्र का वायुवशे । तरंगाकार उल्लसे । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवी ॥344॥
वायूच्या योगाने समुद्रावर लाटा उठतात तेव्हा त्या समुद्राचाच लहानसा अंश आहे असे जसे दिसतें. 44
345-15
तेवी जडाते जीवविता । देहाहंता उपजविता । मी जीव गमे पंडुसुता । जीवलोकी ॥345॥
त्याप्रमाणे, जडदेहाला चेतना देणारा व तद्विषयक अहंभाव उत्पन्न करणारा असा जो चैतन्यस्वरूप मी, तोच ह्या मृत्युलोकी जीवभावाने नांदतो. 45
346-15
पै जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥346॥
जीवाच्या ज्ञानाचा विषय असणारी जी ही जगतांतील घडामोड, तो ” जीवलोक ” शब्दाचा अभिप्राय होय. 46
347-15
अगा उपजणे निमणे । हे साचचि जे का मानणे । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥347॥
आपण देहाबरोबर जन्माला आलो व देहाबरोबर मरणार हा व्यवहार जो सत्य मानतो तोच जीवलोक (जन्ममृत्यु सत्य मानणे ही जीवसृष्टि) व संसारही तोच. 47
348-15
एवंविध जीवलोकी । तू माते ऐसा अवलोकी । जैसा चंद्रु का उदकी । उदकातीत ॥348॥
उदकांत प्रतिबिबित झालेल्या चंद्राचा जसा उदकाला स्पर्शही नसतो, तसा ह्या जीवलोकाच्या ठिकाणी मी असंगत्वाने आहे असे तू समज. 48
349-15
पै काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥349॥
किंवा कुंकुमावर ठेवलेला स्फटिकमणि, पहाणाराला जरी तांबडा वाटला तरी, तो खरोखर तांबडा नसतो. 49
350-15
तैसे अनादिपण न मोडे । माझे अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसे आवडे । ते जाण गा भ्रांती ॥350॥
त्याप्रमाणे माझे अनादिसिद्धत्व न मोडता, व अक्रियत्वाला बाध न येता, मी कर्ता भोक्ता आहे असे जे वाटते, ती, अर्जुना, भ्रांति आहे असे समज. 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
351-15
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपया ॥351॥
काय सांगावे ! आत्मा चोखट खरा ! (शुद्धअसंग ) पण, प्रकृतीपाशी ऐक्य पावून तिच्या सर्व धर्माचा भार आपल्या माथ्यावर घेतो. 51
352-15
पै मनादि साही इंद्रिये । श्रोत्रादि प्रकृतिकार्ये । तिये माझी म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥352॥
मन धरून होणारी सहा ज्ञानेंद्रिये ही वस्तुतः प्रकृतिकार्ये आहेत, ती माझी असे म्हणून, त्यांच्याकडून होणाच्या व्यापाराचा हाच कर्ता होतो. 52
353-15
जैसे स्वप्नी परिव्राजे । आपणपया आपण कुटुंब होईजे । मग तयाचेनि धाविजे । मोहे सैरा ॥353॥
ज्याप्रमाणे स्वनांत एखाद्या संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनून त्यांच्या मोहाने इतस्ततः धावावे, 53
354-15
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥354॥
याप्रमाणे, स्वस्वरूपाच्या विस्मृतीमुळे (स्वप्नातील कुटुंबाप्रमाणे) आत्मा हा आपणच प्रकृतीसारख बनून पुन्हा तिचींच कार्यं करू लागतो. 54
355-15
मनाच्या रथी वळघे । श्रवणाचिया द्वारे निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजी ॥355॥
ती अशी-मनाच्या रथावर आरूढ होऊन, श्रवणेंद्रियद्वारा बाहेर पडून शब्दारण्यात प्रवेश करितो;
356-15
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥356॥
मग त्या रथाचा मोर्चा बदलून त्वगिंद्रियद्वारा स्पर्शरूपी घोर वनांत शिरतो. 56
357-15
कोणे एके अवसरी । रिघोनि नेत्राच्या द्वारी । मग रूपाच्या डोंगरी । सैरा हिंडे ॥357॥
कधी नेत्रद्वारा बाहेर पडून रूपविषयरुपी पर्वतावर स्वैर संचार करितो. 57
358-15
का रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोचि लागे ॥358॥
किंवा, अर्जुना, जिव्हेच्या द्वाराने निघून रसांची दरी जे उदर तेच भरु लागतो. 58
359-15
नातरी येणेचि घ्राणे । जै देहांशु करी निघणे । मग गंधाची दारुणे । आडवे लंघी ॥359॥
किंवा घ्राणेंद्रियद्वारा, माझा अंश जो हा जीव तो जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा गंधाची मोठाली अरण्ये ओलांडतो. 59
360-15
ऐसेनि देहेंद्रियनायके । धरूनि मन जवळिके । भोगिजती शब्दादिके । विषयभरणे ॥360॥
अशारीतीने देहेंद्रियांचा स्वामी जो जीव तो, मनाला हाताशी धरून शब्दस्पर्शादि पंचविषयांचा भोग घेतो. 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥15. 8॥
361-15
परी कर्ता भोक्ता ऐसे । हे जीवाचे तैचि दिसे । जै शरीरी का पैसे । एकाधिये ॥361॥
पण जीवावे हे कर्तुत्व, भोक्तृत्व, तो जेव्हा एखाद्या शरीराचा आश्रय करील तेव्हांच अनुभवाला येतं. 61
362-15
जैसा आथिला आणि विलासिया । तैचि वोळखो ये धनंजया । जै राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥362॥
पुरुषाची संपन्नता किंवा त्याचा विलासीपणा, हीं, तो जेव्हा एखाद्या राजवाडासारख्या बंगल्यात रहावयास येतो, तेव्हांच प्रत्ययाला येतात. 62
363-15
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । का विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तै निवाडु । जै देह पाविजे ॥363॥
जीवाला जेव्हा देह प्राप्त होतो तेव्हांच त्याच्या अहंकर्ता ह्या बुद्धीची वाढ, व विषयेंद्रियांचा धुमाकूळ ह्याचा निवाडा (स्पष्टता) होतो. 63
364-15
अथवा शरीराते सांडी । तऱ्ही इंद्रियांची तांडी । हे आपणयांसवे काढी । घेऊनि जाय ॥364॥
अथवा, शरीरत्याग करतांना जीव आपल्याबरोबर येथील मन व ज्ञानेंद्रिये ह्यांचा समुदाय बरोबर घेऊन अन्य शरीरांत जातो. 64
365-15
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति । का साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥365॥
अपमान करून अतिथीला विन्मुख केल्यास तो आपल्याबरोबर जसे यजमानाचे आणखी पुण्यही हरण करून नेतो, अथवा कळसूत्री खेळाचा दोरा काढून नेल्यास त्याबरोबर त्या चित्रांची गतीही जाते. 65
366-15
नाना मावळतेनि तपने । नेइजेती लोकांची दर्शने । हे असो द्रुती पवने । नेईजे जैसी ॥366॥
अथवा सूर्य अस्तास जातांना बरोबर जशी लोकांची दृष्टीही नेतो, किंवा हे असो वारा आपल्याबरोबर जसा गंध (वास) नेतो. 66
367-15
तेवी मनःषष्ठा यया । इंद्रियाते धनंजया । देहराजु ने देहा- । पासूनि गेला ॥367॥
त्याप्रमाणे, अर्जुना, हा देहस्वामी जो जीव, तो, हा देह सोडून जातांना, आपल्याबरोबर, मनासह असणाच्या सहा ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो. 67
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥15. 9॥
368-15
मग येथ अथवा स्वर्गी । जेथ जे देह आपंगी । तेथ तैसेचि पुढती पांगी । मनादिक ॥368॥
मग येथे असो, अथवा स्वर्गात असो; त्याला जेथे जो देह प्राप्त होईल या देहांत ह्या मनादिकांची तशीच व्यवस्था लावतो. 68
369-15
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवा । तैसाचि फाके ॥369॥
अर्जुना, दिवा मालविला असता जसा आपल्या प्रभेसह जातो व पुन्हा लावला तर प्रभेसहच लावावा तेथे प्रकट होतो. 69
370-15
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी । येतुले हे किरीटी । गमेचि गा ॥370॥
असे आहे, तरी, अर्जुना, हा क्रम चालू असता अविवेकी जनाला एवढे तरी वाटणारच: 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-15
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हे साचचि मानिती ॥371॥
की, आत्माच जन्माला आला, आणि विषयही त्यानेच भोगिला, तसेच आत्माच मेला; त्यांच्या दृष्टीने हा सर्व व्यवहार सत्य आहे. 71
372-15
एऱ्हवी येणे आणि जाणे । का करणे हा भोगणे । हे प्रकृतीचे तेणे । मानियेले ॥372॥
एऱ्हवी विचारदृष्टीने पाहता, येणे, जाणे, करणं, भोगणे हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत; पण तो ते आत्मधर्म असे मानतो. 72
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥15. 10॥
यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥15. 11॥
373-15
परी देहाचे मोटके उभे । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभे । आला म्हणती ॥373॥
देहाच्या आकाराच लहानसा पिंड उत्पन्न होऊन तेथे चेतना दिसू लागली की आत्मा आला असे म्हणतात. 73
374-15
तैसेचि तया संगती । इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणे जया ॥374॥
त्याच प्रमाणे, अर्जुना, त्याच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयांचा व्यापार करू लागली की तो त्याच भोग चालू आहे असे म्हणतात. 74
375-15
पाठी भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे । तेथे गेला गेला ऐसे । बोभाती गा ॥375॥
भोग घेण्याचे संपून, आपोआप देह गेल्यावर चेतना दिसेनाशी झाली की, आत्मा गेला रे गेला अस एकच गिल्ला करितात. 75
376-15
पै रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथे पांडवा । नाही तो गा ? ॥376॥
पण अर्जुना, असे पहा की, वृक्ष हलत असला म्हणजेच वारा वहात असल्यामुळे आहे असे म्हणावे ? आणि जेथे वृक्षच नसेल तेथे वारा नाहीच असे का समजावयाचें ? 76
377-15
का आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपे तेथ देखिजे । तरी तेधवांचि जाले मानिजे । काय आधी नाही ? ॥377॥
किंवा, आरसा समोर ठेवून आपण आपले रूप त्यात पाहिले, म्हणजे मूळरूपही तेव्हांच झाले असे का समजावयाचे ? ते आधी नव्हते का ? 77
378-15
का परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपे नाही ऐसा । निश्चयो करावा ? ॥378॥
किंवा आरसा परत नेला, आणि त्यातील आभासाचा लोप झाला म्हणजे आपलाच लोप झाला असा का निश्चय करावयाचा ? 78
379-15
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळी पिटे मेघाचा । का चंद्री वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥379॥
वस्तुतः शब्द हा आकाशाच गुण आहे, पण ( मेघांचा ) गडगडाट झाला म्हणजे तो ध्वनि मेघांचा आहे असे सर्व लोक म्हणतात, किवा अभ्रांच्या गतीचा आरोप चंद्रावर करून चंद्रच चालतो आहे असे म्हणतात. 79
380-15
तैसे होइजे जाइजे देहे । ते आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहे । आंधळे ते ॥380॥
उत्पन्न होणे किवा नष्ट होणे हे वस्तुतः देहाचे धर्म आहेत, पण, ज्यांची विचारशक्ति लोपली आहे असे अज्ञजन मोहाने, ते धर्म, अविक्रिय व सत्तास्वरूप जो आत्मा त्याचेच आहेत असा निश्चय करितात. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-15
येथ आत्मा आत्मयाच्या ठायी । देखिजे देहीचा धर्मु देही । ऐसे देखणे ते पाही । आन आहाती ॥381॥
ह्या व्यवहारांत ( होणे जाणे ) आत्म्याचा काहीही संबंध नसून, तो स्वसत्तेनेच असंगत्वाने स्थित आहे; व हे केवल देहधर्म होत, अशी ज्यांची दृष्टि ( निश्चय ) आहे ते निराळेच अगर विरळा आहेत. 81
382-15
ज्ञाने का जयाचे डोळे । देखोनि न राहती देहीचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मी जैसे ॥382॥
ग्रीष्म ऋतूतील सूर्याचे तीक्ष्ण किरण मेघांतून पार निघून खालील पृथ्वीतलापर्यंत जसे पोंचतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टि ( बुद्धि ) ज्ञानामुळे पांचभौतिक देहखोळ पाहून तेथेच कुंठित होत नाही. 82
383-15
तैसे विवेकाचेनि पैसे । जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसे । आत्मयाते ॥383॥
तर, वरील दृष्टांताप्रमाणंविवेकाच्या प्रकाशने ती दृष्टि देहाच्या पलीकडील जी आत्मवस्तु तेथवर पोचू शकते, असे जे ज्ञानी, ते, आत्म्याला असा पहातात. 83
384-15
जैसे तारांगणी भरले । गगन समुद्री बिंबले । परी ते तुटोनि नाही पडिले । ऐसे निवडे ॥384॥
जसे अनंत नक्षत्रयुक्त आकाश समुद्रात प्रतिबिंबित झाले असता, ते काही वरून तुटून पडले नाही असेच सर्व मानतात. 84
385-15
गगन गगनीचि आहे । हे आभासे ते वाये । तैसा आत्मा देखती देहे । गंवसिलाही ॥385॥
व आकाश होते तसेच आपल्या ठिकाणी आहे, हा दिसणारा केवळ मिथ्याभ्यास आहे असे म्हणतात; त्याचप्रमाणे देहस्थ वाटणारा आत्माही वस्तुतः देहस्थ नाही (तो स्वस्वरूपस्थित आहे) अशी ज्ञान्यांची दृष्टि असते 85
386-15
खळाळाच्या लगबगी । फेडूनि खळाळाच्या भागी । देखिजे चंद्रिका का उगी । चंद्री जेवी ॥386॥
पाण्याच्या खळाळीची चंचलता, त्यात प्रतिफलित झालेल्या चंद्राचीही आहे असे जरी दिसले तरी, ती चंद्राची नसून केवळ पाण्याची आहे, चंद्र अचलच आहे असे जसे मानतात, 86
387-15
का नाडरचि भरे शोषे । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होता जाता तैसे । देखती माते ॥387॥
डबक्यातील सूर्याचे प्रतिबिंब दिसणे अगर लोपणे हा केवळ त्यात पाणी असणे अगर नसणे ह्याचा खेळ होय; सूर्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसून तो स्वस्थानी जसाच्या तसाच असतो, तसाच देहाच्या होण्याजाण्याने मला काहीही विकार होत नाही असे जे ज्ञानी पाहातात. 87
388-15
घटु मठु घडले । तेचि पाठी मोडले । परी आकाश ते संचले । असतचि असे ॥388॥
घट, मठ घडले आणि मागून मोडले तरी तेथील आकाश असते तसेच स्थित असते. (विकार पावत नाही. ) 88
389-15
तैसे अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पिते । हे देहचि होते जाते । जाणती फुडे ॥389॥
तसेच, अखंड जी आत्मसत्ता तिच्या आधारावर अज्ञान्यांनी कल्पिलेले हे देहच होतात जातात, त्याने (वरील आकाशाच्या दष्टांताप्रमाणे आत्मसत्तेत वर काहीही विकार नाही असे ते स्पष्ट जाणतात. 89
390-15
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसे आत्मज्ञाने चोखटे । जाणती ते ॥390॥
ज्यांना यथार्थ आत्मबोध झाला आहे त्यांच्या दृष्टीने, शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा कधी वाढतही नाही, किंवा घटतही नाही; तसाच तो काही चेष्टा करीतहि नाही किंवा करवीतही नाही. 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-15
आणि ज्ञानही आपैते होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल । सकळ शास्त्रांचे येईल । सर्वस्व हाता ॥391॥
इतर ज्ञानाची गोष्ट घेतली तर, ते स्वाधीन होणे शक्य आहे, इतके की, त्यायोगे पृथ्वीचे परमाणूही मोजता येतील आणि सकल शास्त्रसार करतलामलकवत् ग्रहण होईल, 91
392-15
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसी । तरी सर्वात्मका मजसी । नव्हेचि भेटी ॥392॥
परंतु इतका व्युत्पन्न व ज्ञानसंपन्न होऊनही, जर अत:करणात वैराग्याचा प्रवेश नसेल तर, सर्वात्मक जो मी, त्या माझी भेट (ज्ञान) त्याला होणारच नाही. 92
393-15
पै तोंड भरो का विचारा । आणि अंतःकरणी विषयासि थारा । तरी नातुडे धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥393॥
आणखीही असे की, सर्व शास्त्रे मुखोद्गत असूनही अंत:करणात विषयलालसा असेल, तरीही, अर्जुना, माझी त्याला कालत्रयी प्राप्ति होणार नाही. 93
394-15
हा गा वोसणतयाच्या ग्रंथी । काई तुटती संसारगुंती ? । की परिवसिलिया पोथी । वाचिली होय ? ॥394॥
अरे, झोपेत बरळल्या गेलेल्या ग्रंथांतील वाक्यांनी कोणी संसारमुक्त झाला आहे काय ? किंवा पोथीचे नुसते रक्षण अगर तिची पूजा करून ती वाचल्याचे श्रेय येते काय ? 94
395-15
नाना बांधोनिया डोळे । घ्राणी लाविजती मुक्ताफळे । तरी तयांचे काय कळे । मोल मान ? ॥395॥
किंवा डोळे बांधुन परीक्षेसाठी मोती नाकास लाविले तर त्यांचे मुल्य अगर महत्व कळेल काय ? 95
396-15
तै सा चित्ती अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे माते ॥396॥
त्याप्रमाणे, चित्तांत अहंकाराचे बिऱ्हाड, (पक्के ठाण) आणि जिव्हेवर सर्व शास्त्रे खेळती, असे कोट्यवधी जन्म गेले तरी मत्प्राप्ति होणे नाही. 96
397-15
जो एक मी का समस्ती । व्यापकु असे भूतजाती । ऐक तिये व्याप्ती । रूप करू ॥397॥
एक असणारा जो मी, त्या माझी, सर्व भूतांत कधी व्याप्ति आहे तिची तुला फोड करून सांगू. 97
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥15. 12॥
398-15
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंती आहे ॥398॥
सूर्य आणि ही सर्व विश्वरचना ज्या प्रकाशाने दिसते तो सर्व प्रकाश माझा आहे असे समज. तोच विश्वरचनेच्या आधी व नंतरही आहेच. 98
399-15
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्री पंडुसुता । ज्योत्स्ना माझी ॥399॥
अर्जुना, सूर्य, जळ शोषण करून गेल्यावर, तेथे, मागाहून ओलावा पुरविणारी जी चंद्रप्रभा, ती माझी होय. 99
400-15
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जे निरवधी । ते हुताशी तेजोवृद्धी । माझीचि गा ॥400॥
आणि, दहन किंवा पाचन करण्याची जी अग्नीच्या ठिकाणची अमर्याद शक्ति, तेही माझेच तेज होय. 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥15. 13॥
401-15
मी रिगालो असे भूतळी । म्हणौनि समुद्र महाजळी । हे पासूचि ढेपुळी । विरेचिना ॥401॥
मी पृथ्वीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून, समुद्रासारख्या महाजलाशयात, ही रजःकणांनी बनलेली पृथ्वीरूप ढेपळी विरून जात नाही. 1
402-15
आणी भूतेही चराचरे । हे धरितसे जिये अपारे । तिये मीचि धरी धरे । रिगोनिया ॥402॥
आणि ही पृथ्वी, जी असंख्य स्थावरजंगमभूते आपल्यावर धारण करते त्या पृथ्वीमध्ये प्रवेशून मीच तिला धारण करतो. 2
403-15
गगनी मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसे अमृता । भरला जालो चालता । सरोवरु ॥403॥
अर्जुना, मी गगनांत चंद्राच्या रूपाने जणु काही अमृताचे चालते सरोवर झालो आहे. 3
404-15
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरित असे मी ॥404॥
तेथून (चंद्रापासून) अमृतश्राव करणारी किरणे फांकतात. त्यांचे ओघ बनवून सर्व औषधींच्या वनाचे मी पोषण करितों. 4
405-15
ऐसेनि सस्यादिका सकळा । करी धान्यजाती सुकाळा । दे अन्नद्वारा जिव्हाळा । भूतजाता ॥405॥
अशाप्रकारे सर्व जातीच्या धान्यादि पिकांचे पोषण करून, त्यांचा सुकाळ करितो व अन्नद्वारा सर्व भूतांचे मी रक्षण करतो. 5
406-15
आणि निपजविले अन्न । तरी तैसे कैचे दीपन । जेणे जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥406॥
आणि अन्न जरी तयार केले तरी ते पचवून जीवांना समाधान होईल अशी त्यांच्या ठिकाणी दीपक (पाचक) शक्ति कोठची असणार ? 6
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥15. 14॥
407-15
म्हणौनि प्राणिजातांच्या घटी । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरीही किरीटी । मीचि जालो ॥407॥
म्हणुन (पचन व्हावे म्हणून) प्राणिजातांच्या शरीरात नाभिकंदावर आगटी ठेवून अर्जुना, जठराग्नीही मीच झालो. 7
408-15
प्राणापानाच्या जोडभाती । फुंकफुंकोनिया अहोराती । आटीतसे नेणो किती । उदरामाजी ॥408॥
प्राण व अपान या वायूच्या जोड भात्याने अहोरात्र ती शेगडी फुंकून, फुंकून उदरामध्ये किती अन्न जिरविले असेल ते सांगता नये. 8
409-15
शुष्के अथवा स्निग्धे । सुपक्वे का विदग्धे । परी मीचि गा चतुर्विधे । अन्ने पची ॥409॥
ओली, सुकी, शिजलेली, भाजलेली वगैरे चारी प्रकारची अन्ने मीच पचवितों. 9
410-15
एवं मीचि आघवे जन । जना निरविते मीचि जीवन । जीवनी मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥410॥
अशाप्रकारे सर्व प्राणी मीच आहे, त्यांच्यानिर्वाहास लागणारे अन्न मीच आहे; व अन्न पचविण्याचे मुख्य साधन जो जठराग्नि तोही मीच आहे, 410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-15
आता ऐसियाहीवरी काई । सांगो व्याप्तीची नवाई । येथ दुजे नाहीचि घेई । सर्वत्र मी गा ॥411॥
आता याहीपेक्षा माझ्या व्यापकपणाची नवाई तुला काय सांगू ? अरे, जगात दुसरे असे काही नाहीच; सर्वत्र मीच आले असे जाणः 11
412-15
तरी कैसेनि पा वेखे । सदा सुखिये एके । एके तिये बहुदुःखे । क्रांत भूते ॥412
( पुढील दोन ओव्यात अर्जुनाच्या संभाव्य शंकेचे देव आपणच उत्थापन करून म्हणतात. ) तर मग काही भूतांचे आकार (मनुष्यादि) सुखी असावे व काहीचे (पश्वादि) सदा दुःखाक्रान्त असावे असे का ? 12
413-15
जैसी सगळिये पाटणी । एकेचि दीपे दिवेलावणी । जालिया का न देखणी । उरली एके ॥413॥
जसे सर्व नगरांत एकाच जातीचे दिवे लावल्यास त्यातील काही प्रकाशतात, काही प्रकाशतच नाहीत असे होईल का ? 13
414-15
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसी की । तरी परिस तेही निकी । शंका फेडु ॥414॥
अर्जुना, तुझ्या मनात असे तर्कवितर्क येत असणारच; पण त्या शंकेचेही निरसन करितो ते ऐक. 14
415-15
पै आघवा मीचि असे । येथ नाही कीर अनारिसे । परी प्राणियांचिया उल्लासे । बुद्धि ऐसा ॥415॥
हे पहा सर्वत्र माझी व्याप्ति आहे अथवा सर्व मीच आहे ह्याबद्दल विवादच नाही; परंतु, विचित्रता दिसण्याचे कारण प्राण्यांच्या बुद्धि उपाधींचे वैचित्र्य होय. (माझ्यात बदल नाही. ) 15
416-15
जैसे एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषी आनानी । वाजावे पडे भिन्नी । नादांतरी ॥416॥
आकाशाचा ध्वनि सदा एकरूप असूनही, भिन्न भिन्न वाद्यांच्या उपाधिद्वारा श्रवणावर येऊ लागला म्हणजे आकाशाच्या ध्वनीतच भिन्नता आहे अस वाटते. 16
417-15
का लोकचेष्टी वेगळाला । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥417॥
उगवलला एकच सूय किंवा सूर्यप्रकाश जस लोकांच्या भिन्नभिन्न व्यापाराला उपयोगी पडतो. 17
418-15
नाना बीजधर्मानुरूप । झाडी उपजविले आप । तैसे परिणमले स्वरूप । माझे जीवा ॥418॥
किंवा पाणी तेच; पण त्या त्या बीजधर्मानुसार वृक्षांमध्ये भिन्न भिन्न परिणाम पावते, तसे मी नित्य एकरूप असता उपाधीच्या योगे भिन्न भिन्न स्वरूपाचा वाटतो. 18
419-15
अगा नेणा आणि चतुरा । पुढा निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वे जाला येरा । सुखालागी ॥419॥
अरे, अज्ञ आणि तज्ज्ञ (अशा दोन पुरुषांपुढे पडलेला एकच दोन पदरी नीलमण्यांचा हार पहिल्याला सर्पभ्रांतीमुळे दुःखाला कारण झाला तर दुसऱ्याला (तज्ज्ञाला) हार अशी प्रज्ञा होऊन सुखास कारण झाला. 19
420-15
हे असो स्वातीचे उदक । शुक्ती मोती व्याळी विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तो अज्ञानांसी ॥420॥
किंवा आणखी दृष्टांत एकाच स्वातिनक्षत्राचे पाणी शुक्तीत पडले तर मोती होते, सर्प मुखात पडले तर आणि विष रूपाने परिणाम पावते, त्याप्रमाणे ज्ञान्यांना सुखरूप जो मी, तो सुखाला कारण होतो व तोच सुखरूप मी अज्ञान्याला दुःखाला कारण होतो. 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ॥15. 15॥
421-15
एऱ्हवी सर्वाच्या हृदयदेशी । मी अमुका आहे ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशी । ते वस्तु गा मी ॥421॥
अरे, थोडक्यात माझी खूण अशी आहे. ” मी म्हणून एक असा आहे ” असे जे स्फुरण (ज्ञान) प्राण्यांच्या ठिकाणी रात्रंदिवस असते, ते माझे स्वरूप होय. 21
422-15
परी संतासवे वसता । योगज्ञानी पैसता । गुरुचरण उपासिता । वैराग्येसी ॥422॥
परंतु (ते वस्तु, (मत्स्वरूप, ) यथार्थत्वाने केव्हा कळणार ? तर, ) संत समागम करशील, योग आणि ज्ञान अथवा ज्ञानयोगाचा अभ्यास करशील व वैराग्ययुक्त होत्साता सद्गुरू ह्या बुद्धीने त्यांची सेवा करशील 22
423-15
येणेचि सत्कर्मे । अशेषही अज्ञान विरमे । जयांचे अहं विश्रामे । आत्मरूपी ॥423॥
तेव्हां, आणि ह्याच एका पुण्याचरणाने (माझ्या प्राप्तीच्या आड येणारें, ) अज्ञान समूळ नाश पावतें; (त्याची खूण काय ?) ज्यांचा अहंकार, त्याला प्रकाशित करणाऱ्या आत्मस्वरूप दर्शनाने विश्रांतीला गेला आहे, (म्हणजे बाधित होऊन ज्याचे पूर्वस्वरूप गेले आहे) 23
424-5
ते आपेआप देखोनि देखी । मिया आत्मेनि सदा सुखी । येथे मीवाचून अवलोकी । आन हेतु असे ? ॥424॥
त्यांना आत्मदर्शन म्हणजे सुखरूप जो मी त्या माझेच दर्शन झाल्यामुळे, ते सदा सुखी असतात. मग हे पहा ! या व्यवहारांत त्यांच्या सुखाचा माझ्यावाचून अन्य कोणता हेतु आहे ? 24
425-15
अगा सूर्योदयो जालिया । सूर्ये सूर्यचि पहावा धनंजया । तेवी माते मिया जाणावया । मीचि हेतु ॥425॥
अर्जुना, दिवस उगवल्यावर, सूर्याच्या तेजानेच सूर्य पहावा लागतो, त्याप्रमाणे, माझे ज्ञाननही माझ्या सहाय्यानेच (मजकडूनच) होत असते. 25
426-15
ना शरीरपराते सेविता । संसारगौरवचि ऐकता । देही जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥426॥
अथवा, देहात्मबुद्धिवानांची सेवा करून, संसाराचे कोडकौतुक, ऐकून, ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणीच दृढ झाला आहे. 26
427-15
ते स्वर्गसंसारालागी । धावता कर्ममार्गी । दुःखाच्या सेलभागी । विभागी होती ॥427॥
ते, स्वर्गातील किंवा संसारांतील विषयसुखासाठी कर्ममार्गाच्या मार्गे लागून अखेर शेलक्या म्हणजे गाळीव किंवा सुखलेशरहित दुःखाचे वांटेकरी होतात. 27
428-15
परी हेही होणे अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेते होय ॥428॥
पण ह्या अज्ञानी जीवांना ही स्थिति प्राप्त होण्यालाही, मुळात कारण ज्ञान स्वरूप जो मी, तोच होय; जसा जागा पुरुषच स्वप्नाला व निर्देला हेतु म्हणजे आधार असतो. 28
429-15
पै अभ्रे दिवसु हरपला । तोहि दिवसेचि जाणो आला । तेवी मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूती ॥429॥
सूर्य मेघांनी आच्छादिला आहे हेही सूर्याच्या सत्तेने (प्रकाशाने) जाणता आलें; तसे मला नेणणे व विषय जाणणे हा प्राण्यांचा व्यवहारही माझ्या सत्तेवरच होतो. 29
430-15
एवं निद्रा का जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवी ज्ञाना अज्ञाना जीवा या । मीचि मूळ ॥430॥
अर्जुना, निजलेला मनुष्यच जर जागा होतो तर, ह्या दोन्ही अवस्थाना हेतुभूत असणारी ” नित्यजागृति ” (प्रबोधता ) मुळात असतेच, त्याप्रमाणे या जीवांच्या जाणण्याच्या किंवा नेणण्याच्या दोन्ही व्यवहारांना केवल असा मीच मूळहेतु आहे. 30
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-15
जैसे सर्पत्वा का दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियाचि सिद्धु ॥431॥
सर्पभास होवो, की दोरीचे ज्ञान होवो, दोन्ही ज्ञाने जशी एका दोरीच्या सत्तेवरच होतात त्याप्रमाणे, व्यवहार ज्ञानाचा घडो की अज्ञानाचा घडो, तो, ज्ञानस्वरूप जो मी त्या माझ्याच आधारावर होतो.
432-15
म्हणौनि जैसा असे तैसया । माते नेणोनि धनंजया । वेदु जाणो गेला तव तया । जालिया शाखा ॥432॥
म्हणून माझे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे, वेद ते जाणण्याचा उद्योग करू लागला, तेव्हा त्याच्या शाखा झाल्या (भाग झाले) 32
433-15
तरी तिही शाखाभेदी । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥433॥
तरी, त्याच्या त्या तिन्ही शाखांनी (ऋक्, यजु, साम) खरोखर माझेच स्वरूप वर्णिले आहे; उदा. अशी नदी पूर्ववाहिनी असो की पश्चिमवाहिनी असो; अखेर मिळणार समुद्रालाच. 33
434-15
आणि महासिद्धांतापासी । श्रुति हारपती शब्देंसी । जैसिया सगंधा आकाशी । वातलहरी ॥434॥
आणि, पृथ्वीचा गंध घेऊन वाहणाऱ्या वाऱ्याच्या, लहरी ज्याप्रमाणे आकाशाच्या पोटांत मावळतात, त्याप्रमाणे, माझे वर्णन करीत महासिद्धांत प्रमेयापाशी (लक्ष्यार्थापाशी) येतांच त्यांची वाणी कुंठित होऊन त्या मौनावल्या. 34
435-15
तैसे समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसे निवांत । ते मीचि करी यथावत । प्रकटोनिया ॥435॥
तसेच, माझ्या वर्णनांत सर्व श्रुति लज्जित (असमर्थ) होऊन त्यांनी मौन धरिले ते योग्यच होय, हे स्वप्रकाशत्वाने प्रगट होऊन मला दाखवावे लागते. (स्वप्रकाशत्व म्हणजे वेद्य न होता अपरोक्षत्व असणे; मग अवेद्यरूप श्रुतींना वर्णिता आले नाही तर नवल काय ? ) 35
436-15
पाठी श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष । ते निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥436॥
आणि, सर्व श्रुतींसह जग जेथे पार लय पावते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणाराही मीच आहे. 36
437-15
जैसे निदेलिया जागिजे । तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे । परी एकत्वही देखो पाविजे । आपलेचि ॥437॥
निद्रिस्त पुरुष जागा झाल्यावर स्वप्नातील सर्व द्वैतव्यवहार तर जागृतीत नसतोच, पण, स्वप्नातही दुसरे काहीही नसून आपण एकटेच होतो असा निश्चय होतो 37
438-15
तैसे आपले अद्वयपण । मी जाणतसे दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥438॥
तसाच माझा एकीएकपणा, दुजेपणाचा स्पर्शही होऊ न देता मी जाणतो आणि ह्याही स्वरूपबोधाला कारण ज्ञानरूप जो मी तोच. 38
439-15
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणे नाही वीरा । जयापरी ॥439॥
अर्जुना, कापूर जळल्यावर जशी मागे काजळी रहात नाही व अग्नीही रहात नाही. 39
440-15
तेवी समूळ अविद्या खाये । ते ज्ञानही जै बुडोनि जाये । तऱ्ही नाही कीर नोहे । आणि न साहे असणेही ॥440॥
त्याप्रमाणे समूळ अविद्येचा ग्रास करणारे जे ज्ञान, ते ज्ञानही जेव्हा लय पावते वेळीं, ” काही नाहीं” असा अत्यंताभाव तर नाहीच, पण म्हणून ” आहे ” असे म्हणाल तर ” नाही ” ह्याच्या अपेक्षेने रूढ असलेले “आहे ” हे पद तरी, केवल अस्तिता=सत्तारूप असलेल्या वस्तूबद्दल कसे सहन होईल ? 440
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-15
पै विश्व घेऊनि गेला मागेसी । तया चोराते कवण के गिंवसी ? । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥441॥
(अज्ञान किंवा मूलाविद्या हे जगताचे उपादान कारण आहे; त्याचे नाशक असे एकच साधन म्हणजे अंतःकरणवृत्तिस्थ शुद्ध शास्त्रीय ब्रह्मज्ञान होय; ह्याच्या उदयाने उपादानकारण जे अज्ञान त्याचा ग्रास होत असल्याने तत्कार्य जे जगत् याचा कोठे मागमूसही उरत नाही; तसेच अज्ञाननाश झाल्यावर हे ब्रह्मज्ञान पुढे काही कर्तव्य उरले नाही म्हणून स्वभावत: आपले मूलस्वरूप मे सामान्यज्ञान त्यात लय पावते, तेव्हा त्याला शुद्ध ब्रह्मता आली. ह्या दोन्ही अभिप्रायांनी महाराज म्हणतात, असा जो अलौकिक चोर, की ज्याने सर्व विश्व त्यातील वाटांसह चोरून नेऊन त्या चोरीचा काही मागमूसही ठेविला नाही त्या चोराचा कोण व कसा पत्ता लावणार ? अशा ह्या लोकोत्तर चोराचे जे मूलस्थान हेच माझे शुद्धस्वरूप होय. 41
442-15
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करिता कैवल्यपती । ठी केली निरुपहिती । आपुल्या रूपी ॥442॥
कैवल्यपति भगवान् श्रीकृष्ण, ह्यांनी स्थावरजंगमांमध्ये असलेल्या आपल्या ओतप्रोत व्याप्तीन्हे निरूपण करीत करीत ह्याप्रकारे आपल्या निरुपाधिक स्वरूपाच्या मुक्कामापर्यंत येऊन पोचले. 42
443-15
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनी उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवी ॥443॥
आकाशांतील चंद्राचे क्षीरार्णवांत जसे स्पष्ट प्रतिबिंब व्हावे तसा या सर्व बोधाचा अर्जुनाच्या चित्तावर एकदम ठसा उमटला. 43
444-15
का प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुने आणि वैकुंठे । नांदतसे बोधु ॥444॥
एका भिंतीवरील चित्र, समोरच्या आरशा सारख्या शुद्ध भितींत तंतोतंत उमटून, जसे दोन ठिकाणी नांदते असे दिसते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान् ह्यांच्या ठिकाणचा एकच बोध, शुद्ध भित्तिस्थान असलेल्या अर्जुनाच्या अंतःकरणात जसाच्या तसा उमटलेला दिसत होता. 44
445-15
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तव तव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥445॥
पण, महाराज, वस्तुमहिमाच असा आहे ! जशी ती अनुभवाला चढावी (अनुभव दृढ व्हावा) तशी तिजविषयींची गोडी वाढते, म्हणून, अशा जातीच्या भाग्यवंतांतील श्रेष्ठ अर्जुन म्हणाला. 45
446-15
जी व्यापकपण बोलता । निरुपाधिक जे आता । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥446॥
देवा, आपले व्यापकपण सांगता सांगता, प्रसंगानुरोधानेच, शेवटी आपल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचे जे वर्णन केले, 46
447-15
ते एक वेळ अव्यंगवाणे । कीजो का मजकारणे । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भले केले ॥447॥
ते पुन्हा एक वेळ माझ्यासाठी संपूर्णतया सांगावे अशी इच्छा आहे ! हे ऐकून देव म्हणाले, अर्जुना, शाबास शाबास ! 47
448-15
पै अर्जुना आम्हाहि वाडेकोडे । अखंडा बोलो आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसते ऐसे ॥448॥
खरे सांगू का ? (पै) अर्जुना, आम्हालाही ह्या गोष्टीची फार आवड आहे ! तिच्याच अखंड गोष्टी कराव्या असे वाटते; पण काय करावे ? कोणी विचारणाराच भेटत नाही रे. 48
449-15
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तू केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसो ॥449॥
आज मात्र माझे मनोरथ फळले; आणि ते केवळ तुझ्यामुळे हो ! का म्हणशील तर काहीही आशंका न घरिता केवळ ह्याच म्हणजे निरुपाधिक स्वरूपाविषयींचा प्रश्न केलास म्हणून. 49
450-15
जे अद्वैताहीवरी भोगिजे । ते अनुभवीच तू विरजे । पुसोनि मज माझे । देतासि सुख ॥450॥
(अद्वैतरूपतेनंतर) अद्वैतप्राप्तीच्या सुखाचा जो एक भोग आहे, तो देण्यास तू मला साह्य झाला आहेस. कारण, तुझा प्रश्न माझ्या निरुपाधिक स्वरूपाचा असल्याने माझ्या सुखाचाच मला पुन्हा भोग घडवीत आहेस. 450
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
451-15
जैसा आरिसा आलिया जवळा । दिसे आपणपे आपला डोळा । तैसा संवादिया तू निर्मळा । शिरोमणी ॥451॥
आरसा जवळ आणिला असता जसे आपले मुख आपल्यास दिसते, त्याप्रमाणे, शुद्धस्वरूपवस्तुविषयक संवाद करणारांमध्ये श्रेष्ठ असा तू, मला जणू आरसाच भेटल्यामुळे माझ्या सुखरूपतेचा त्यात मला पुन्हा भोग घडणार आहे. 51
452-15
तुवा नेणोनि पुसावे । मग आम्ही परिसऊ बैसावे । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥452॥
अर्जुना, तुला माहित नाही म्हणून तू विचारीत आहेस, आणि म्हणून आम्ही सांगतो अशातला हा प्रकार नाही. 52
453-15
ऐसे म्हणौनि आलिंगिले । कृपादृष्टी अवलोकिले । मग देवो काय बोलिले । अर्जुनेसी ॥453॥
असे म्हणून देवांनी अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याजकडे कृपादृष्टीने पाहून पुढे त्याला म्हणाले, 53
454-15
पै दोही वोठी एक बोलणे । दोही चरणी एक चालणे । तैसे पुसणे सांगणे । तुझे माझे ॥454॥
अरे, दोन ओठा मिळून शब्द एक, दोन पायांनी होणारे चालणे एक, त्याचप्रमाणे तुझे पुसणेआणि माझे सांगणे हा प्रकार आहे (प्रश्न आणि उत्तर दोही मिळून निष्पत्ति एक आत्मज्ञानच. ) 54
455-15
एवं आम्ही तुम्ही येथे । देखावे एका अर्थाते । सांगते पुसते येथे । दोन्ही एक ॥455॥
एकंदरीत, त्या विषयाबद्दल तुझी व माझी अर्थदृष्टि एकच आहे, म्हणून, मी सांगणारा व तू विचारणारा असे दिसले, तरी आपण दोघे एकच म्हटले पाहिजेत. 55
456-15
ऐसा बोलत देवो भुलला मोहे । अर्जुनाते आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहे । आवडी हे ॥456॥
असे बोलणे चालले असता स्नेहाने मोहित होऊन गहिंवरून देवांनी अर्जुनाला पोटाशी आलिंगून धरिले व तसेच बसले; व थोडयाच वेळांत वृत्तीवर येऊन स्वतःशीच म्हणाले, ह्या प्रसंगी इतका मोह कामाचा नाही 56
457-15
जाले इक्षुरसाचे ढाळ । तरी लवण देणे किडाळ । जे संवादसुखाचे रसाळ । नासेल थिते ॥457॥
का की, उसाच्या रसाच्या ठेपीस नासू नये म्हणून क्षाराचे मिश्रण लागते. तसेच संवादसुख नुसते गोठू दिले तर नासेल. त्यालाही द्वैताचा, क्षार दिला तरच गोडी टिकेल. 57
458-15
आधीच आम्हा यया काही । नरनारायणासी भिन्न नाही । परी आता जिरो माझ्या ठाई । वेगु हा माझा ॥458॥
आम्हा नरनारायणात मूळचा भेद नाहीच; तरीही ह्या वेळी मला आलेला प्रेमाचा वेग माझ्या ठिकाणी जिरविलाच पाहिजे. 58
459-15
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पै गा तो तुवा कैसा । प्रश्नु केला ? ॥459॥
असा विचार करून, देव सावध झाल्यासारखे करून एकदम म्हणाले, अर्जुना, आतांच तू मला काय प्रश्न केलास रे ? 59
460-15
जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता । तो परतोनि मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐको आला ॥460॥
इकडे अर्जुनाची वृत्तीही श्री कृष्णरूप होत होती, तो देवांच्या ह्या प्रश्नने देहभानावर येऊन, आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला. 460
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-15
तेथ सद्गदे बोले । अर्जुने जी जी म्हणितले । निरुपाधिक आपुले । रूप सांगा ॥461॥
व सद्गदित वाणीने म्हणाला, “ हो, हो, देवा, आपले निरुपाधिक रूप सांगा” असे मी म्हटले होते. 61
462-15
यया बोला तो शारङ्गी । तेचि सांगावयालागी । उपाधी दोही भागी । निरूपीत असे ॥462॥
अर्जुनाचे हे भाषण ऐकून, ते निरुपाधिक रूप सांगण्यासाठी भगवंतांनी प्रथम उपाधींचे दोन प्रकारे निरूपण केले. 62
463-15
पुसिलिया निरुपहित । उपाधि का सांगे येथ । हे कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥463॥
आपले निरुपाधिक रूपवर्णन ऐकण्याची इच्छा अर्जुनाने दर्शविली असता, देवांनी प्रथम उपाधींचे वर्णन का केले अशी जर कोणास शंका येईल. 63
464-15
तरी ताकाचे अंश फेडणे । याचि नांव लोणी काढणे । चोखाचिये शुद्धी तोडणे । कीडचि जेवी ॥464॥
तर असे पहा, की दह्यातील तक्रांश (तक) काढून टाकणे ह्याचेच नांव लोणी काढणे. (ती काही स्वतंत्र क्रिया नहीं) होय; किंवा शुद्ध सोने पाहिजे असेल तेव्हा त्यातील अशुद्ध धातु जाळून नाहीशी करणे हेच होय. 64
465-5
बाबुळीचि सारावी हाते । परी पाणी तव असे आइते । अभ्रचि जावे गगन ते । सिद्धचि की ॥465॥
शेवाळ बाजूला करणे ह्याचाच अर्थ पाणी शुद्ध करणे होय; (हे तर प्रथमच शुद्ध असते, करावे लागत नाही) अथवा, अभ्र मावळले की आकाश मूळचेच स्वच्छ आहे. 65
466-15
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेता विरंगोळा । असे काई ? ॥466॥
अशुद्धता आणणाच्या वरील कोंडयाचे वेष्टन बाजूस झाडून टाकले की शुद्ध धान्य प्राप्तीला वेळ कसला ? 66
467-15
तैसा उपाधि उपहिता । शेवटु जेथ विचारिता । ते कोणातेही न पुसता । निरुपाधिक ॥467॥
(उपहित चैतन्य विचाराचा विषय होऊ शकतें; शुद्ध चैतन्य नव्हे उपहितांतीलही केवळ उपाधीच विचारार्ह आहे, चैतन्य नव्हे म्हणून ) उपाधियुक्त वस्तूतील उपाधीचा जेथे विचाराने शेवट अंत होतो, त्याच्या पलिकडे जे राहिले ते निरुपाधिक; ते स्वप्रकाश आहे त्याला कोणाची संमंति नको. 67
468-15
जैसे न सांगणेवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणे विवरी । अचर्चाते ॥468॥
लग्न झालेली लहान मुलगी (घोडनवरी नव्हे) जे नांव घेतले असता होय किंवा नही काही न म्हणता, खाली मान घालून उगी रहाते, हे तिच्या पतीचे नांव तिच्या मनाने ठरले त्याप्रमाणे त्या शुद्ध, निरुपाधिक, अनिदं स्वरूपाच्या वर्णनात श्रुतीने मौन पत्करून त्यांचे “आवाङ्मनसगोचरत्व ” दर्शित केले. 68
469-15
पै सांगणेया जोगे नव्हे । तेथीचे सांगणे ऐसे आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदी ॥469॥
म्हणून जे शब्दाने सांगण्यासारखे नसते त्याचे असे आजूबाजूने वर्णन करावे लागते, हे मनात आणून लक्ष्मीपति भगवंताने प्रथम उपाधीचे वर्णन केले. 69
470-15
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवी औपाधिका । बोली इया ॥470॥
शुद्ध प्रतिपदेच्या चंद्रदर्शनार्थ जसा एखाद्या खांदीचा (फांदीचा) आधार दृष्टीला द्यावा लागतो, त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करितांना ते उपाधिद्वारांच करावे लागते. 470
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥15. 16॥
471-15
मग तो म्हणे गा सव्यसाची । पै इये संसारपाटणीची । वस्ती साविया टांची । दुपुरुषी ॥471॥
देव म्हणाले, अर्जुना, या संसाररूप नगरांत, फक्त दोनच पुरुषांची वस्ती आहे. (क्षर व अक्षर) 71
472-15
जैसी आघवाचि गगनी । नांदत दिवोरात्री दोन्ही । तैसे संसार राजधानी । दोन्हीचि हे ॥472॥
ज्याप्रमाणे, सर्व आकाशांत दिवस आणि रात्र ही दोनच नांदतात त्याप्रमाणे ह्या संसार राजधानीत हे दोनच पुरुष नांदतात. 72
473-15
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहीचे नांव न साहे । जो उदेला गावेसी खाये । दोहीते यया ॥473॥
आणखीही एक तिसरा पुरुष आहे, पण त्याच्या पुढे या दोन पुरुषांचे नुसते नांवही घेण्याची सोय नाही; तो प्रगट झाला की, ह्या दोघांचा त्यांच्या नगरासह ग्रास करून टाकतो. 73
474-15
परी ते तव गोठी असो । आधी दोन्हीची हे परियेसो । जे संसारग्रामा वसो । आले असती ॥474॥
पण ह्या तिसन्या पुरुषाची गोष्ट तूर्त राहू दे; ह्या संसारग्रामात प्रथम वस्तीला आलेले जे दोन पुरुष यांची गोष्ट ऐक. 74
475-15
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगे पुरता चांगु । परी ग्रामगुणे संगु । घडला दोघा ॥475॥
त्यातील एक आंधळा, वेडा व पंगु असून दुसरा सर्वागपूर्ण व चांगला आहे; पण एकाच गावात आल्याने ही विषम मैत्री जडली. 75
476-15
तया एका नाम क्षरु । येराते म्हणती अक्षरु । इही दोहीचि परी संसारु । कोंदला असे ॥476॥
त्यातील पहिल्याचे नांव क्षर; व दुसऱ्याचे नांव अक्षर. या दोघांनीच हे संसारनगर व्यापून टाकले आहे. 76
477-15
आता क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु । हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचू गा ॥477॥
आता ह्यातील क्षर कोणता व अक्षराचे लक्षण काय, ही सर्व तुला विशद करून सांगतो. 77
478-15
तरी महदहंकारा- । लागुनिया धनुर्धरा । तृणांतीचा पांगोरा- । वरी पै गा ॥478
तरी, अर्जुना महत्तत्त्व व अहंकारापासून गवताच्या काडीपर्यंत. 78
479-15
॥ जे काही साने थोर । चालते अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धीसि जे ॥479॥
जे काही लहान थोर, स्थावर जंगम, किंवा मन व बुद्धि यांचा विषय होऊ शकणारे 79
480-15
जेतुले पांचभौतिक घडते । जे नामरूपा सांपडते । गुणत्रयाच्या पडते । कामठा जे ॥480॥
जे पंचमहाभूताचे कार्य आहे; नामरूपात सांपडले, व तीन गुणांच्या कक्षेत येते. 480
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-15
भूताकृतीचे नाणे । घडत भांगारे जेणे । काळासि जू खेळणे । जिही कवडा ॥481॥
ज्या पंचमहाभूतरूप सुवर्णाने अनंत आकृतीचे प्राणीरूप नाणे पाडले गेले आहे, व ज्या आकाररूप कवड्यांनी काळाचा जुगार नित्य चालू आहे. 81
482-15
जाणणेचि विपरीते । जे जे काही जाणिजेते । जे प्रतिक्षणी निमते । होऊनिया ॥482॥
जे जे काही विपरीत ज्ञानाचा विषय असते, व प्रतिक्षणी उपन्न होऊन नाश पावते. 82
483-15
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचे आंग । हे असो बहु जग । जया नाम ॥483॥
अरे, भ्रांतिरूप काष्ठांनी बनविलेला सृष्टीचा सांगाडा, हे असो; थोडक्यात म्हणजे जे जग या नांवाने प्रसिद्ध आहे. 83
484-15
पै अष्टधा भिन्न ऐसे । जे दाविले प्रकृतिमिसे । जे क्षेत्रद्वारा छत्तिसे । भागी केले ॥484॥
जे सातव्या अध्यायात अष्टधा प्रकृतिरूपाने वर्णिले आहे व ज्यांचे तेराव्यात छत्तीस प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन आहे. 84
485-15
हे मागील सांगो किती । अगा आताचि जे प्रस्तुती । वृक्षाकार रूपाकृती । निरूपिले ॥485॥
हे मागील वर्णन कशाला ? आतांच ह्याच अध्यायात वृक्षाच्या रूपाने तुला जे वर्णन करून सांगितलें; 85
486-15
ते आघवेचि साकारे । कल्पुनी आपणपया पुरे । जाले असे तदनुसारे । चैतन्यचि ॥486॥
त्या सर्व साकारवस्तु ह्या आपल्या वास्तव्याच्या जागा आहेत असे कल्पून. त्या त्या आकाराने हे चैतन्यच नटले आहे. 86
487-15
जैसा कुहा आपणचि बिंबे । सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे । मग क्षोभला समारंभे । घाली तेथ ॥487॥
ज्याप्रमाणे सिंह विहिरीत आपलेच प्रतिबिंब पाहून, त्यायोगे दुसऱ्या सिंहाच्या शंकेने क्रुद्ध होतो व त्या भरांत आत उडी घेतो. 87
488-15
का सलिली असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसे । अद्वैत होऊनि तैसे । द्वैत घेपे ॥488॥
(आकाश सर्वव्यापक असल्यामुळे त्याच्या प्रतिबिंबाला वावच नाही तरीही ) जल ह्या उपाधीने युक्त असलेल्या आकाशांत पुन्हा आकाशाचेच प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे अद्वैत आमचैतन्य हे कधींही द्वैत होणे शक्य नसून उपाधियोगे द्वैत बनल्यासारखे दिसते, 88
489-15
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरी । आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥489॥
अर्जुना, याप्रमाणे, साकार नगराची कल्पना करून आत्मा तेथे स्वस्वरूपविस्मृतीची निद्रा घेतो. 89
490-15
पै स्वप्नी सेजार देखिजे । मग पहुडणे जैसे तेथ कीजे । तैसे पुरी शयन देखिजे । आत्मयासी ॥490॥
स्वतः अंथरुणावर असतांनाच स्वप्नात पुन्हा जसे अंथरूण तयार करून त्यावर झोप घ्यावी, त्याप्रमाणे, सर्वगत आत्मा अज्ञानउपाधीने पुन्हा शरीररूप नगर उत्पन्न करून तेथे झोप घेतो. 490
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-15
पाठी तिये निद्रेचेनि भरे । मी सुखी दुःखी म्हणत घोरे । अहंममतेचेनि थोरे । वोसणाये सादे ॥491॥
मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी, मी दुःखी असे म्हणत घोरत पडतो व त्याच घोरांत मी आणि माझे असे मोठघाने बरळत असतो 91
492-15
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझे हे ना ॥492॥
हा पहा, माझा पिता, ही आई हा पहा मी गोरा आहे, काळा आहे, अव्यंग आहे, आणि हा मुलगा, ही स्त्री, हे द्रव्य, ही माझीच नव्हत का ? 92
493-15
ऐसिया वेघोनि स्वप्ना । धावत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥493॥
अशा स्वप्नावर आरूढ होऊन स्वर्गसंसारादि अरण्यात धावा ठोकणारे जे चैतन्य त्याला, अर्जुना, क्षर पुरुष म्हणतात. 93
494-15
आता ऐक क्षेत्रज्ञु येणे । नामे जयाते बोलणे । जग जीवु का म्हणे । जिये दशेते ॥494॥
त्याचा स्पष्ट अर्थ अस की, मागे जो क्षेत्रज्ञ म्हणून सांगितला किंवा येथे जगात ज्याला जीव असे म्हणतात. 94
495-15
जो आपुलेनि विसरे । सर्व भूतत्वे अनुकरे । तो आत्मा बोलिजे क्षरे । पुरुष नामे ॥495॥
जो स्वस्वरूप विस्मृतीने सर्व भूतांसारखा होतो (म्हणजे ज्या ज्या उपाधीशी तादात्म्य पावेल ती मीच आहे असे म्हणतों) त्या जीवाम्याला क्षरपुरुष असे म्हणतात. 95
496-15
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता । वरी देहपुरी निदैजता । पुरुषनामे ॥496॥
त्याच्या “ पुरुषतेची” उपपत्ति दोन तऱ्हेने लागते वस्तुस्थितीने तो परिपूर्ण आहे म्हणून तो ” पुरुष ” आहेच; किंवा देहपुरीमध्ये शयन करणारा अशा अर्थानेही त्याला “ पुरुषता ” आहे 96
497-15
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधीचि आतला । म्हणौनिया ॥497॥
पण, असा हा “ पुरुष ” उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्याजवर क्षरपणाच नसता आळ आला. 97
498-15
जैसी खळाळीचिया उदका- । सरसी आंदोळे चंद्रिका । तैसा विकारा औपाधिका । ऐसाचि गमे ॥498॥
खळाळीच्या पाण्याच्या हालचालीने जसा आतील चंद्रही हलत आहे असे दिसते, (वस्तुतः ते हलणे फक्त जलाचे आहे) त्याप्रमाणे, उपाधींच्या विकारांमुळे हाही विकारी आहे असे वाटते. 98
499-15
का खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तै सरिसीच भ्रंशे । तैसा उपाधिनाशी न दिसे । उपाधिकु ॥499॥
ते खळाळीचे पाणी आटले की त्यातील प्रतिबिंबही त्याच क्षणी नाश पावते, त्याप्रमाणे उपाधीच्या नाशाने औपाधिक (उपाधि युक्त) क्षरचैतन्यही प्रतीतीला येत नाही. 95
500-15
ऐसे उपाधीचेनि पाडे । क्षणिकत्व याते जोडे । तेणे खोंकरपणे घडे । क्षर हे नाम ॥500॥
ह्याप्रमाणे, उपाधीच्या योगाने चैतन्याला क्षणिकत्व येऊन त्यालाच न्यूनतादर्शक क्षर असे नांव प्राप्त झाले; 500
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
501-15
एवं जीवचैतन्य आघवे । हे क्षर पुरुष जाणावे । आता रूप करू बरवे । अक्षरासी ॥501॥
ह्याप्रमाणे, जेवढे म्हणून जीवचैतन्य, तो क्षर पुरुष असे जाण. आता पुढे, अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतो. 1
502-15
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पै धनुर्धरा । तो मध्यस्थु गा गिरिवरा । मेरु जैसा ॥502॥
अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष म्हणून आहे तो, पर्वतश्रेणींमध्ये मेरू पर्वत जसा मध्यभागी आहे तसा मध्यस्थ आहे. (म्हणजे एका टोंकास शुद्ध परमात्मा व दुसच्या टोकास अशुद्ध व क्षणिक जगत असे जे ” मध्यस्थ ” परमात्मविषयक अज्ञान ते आहे उपाधि ज्या चैतन्याला व अक्षर पुरुष होय=मायाविशिष्ट चैतन्य ) 2
503-15
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी । इही न भेदे तिही भागी । तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी । पडेना जो ॥503॥
तो मेरूपर्वत, स्वर्ग, पृथ्वी व पाताळ ह्या तीन लोकांपैकी अमक्या लोकातला असे म्हणता न येता जसा सर्वत्र समच आहे, तसा हा अक्षर पुरुष शुद्ध ज्ञानही नव्हे किंवा अज्ञानकार्य जगत् तद्रूपही नव्हे असा मध्यस्थ आहे. 3
504-15
ना यथार्थज्ञाने एक होणे । ना अन्यथात्वे दुजे घेणे । ऐसे निखिळ जे नेणणे । तेचि ते रूप ॥504॥
ज्या स्थितीत जीवाला यथार्थं ब्रह्मौक्य ज्ञानही नसते, किंवा विक्षेपकार्य जो व्यवहार तद्रूपही तो नसतो, अशी जी त्याची मध्यस्थ घनसुषुप्त अवस्था, ते अक्षर पुरुषाचे रूप होय. 4
505-15
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये । तया मृत्पिंडा ऐसे आहे । मध्यस्थ जे ॥505॥
ढेपूळता तर निःशेष मोडलेली, पण अद्याप घडयागाडग्यांच्या आकाराला न आलेला असा जो मध्यस्थ मृत्पिंड (मातीचा गोळा) तसे ह्या अक्षर पुरुषाचे स्वरूप जाणावे. 5
506-15
पै आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ॥506॥
ज्या स्थलावरील समुद्राचे पाणी ओहोटून ओसरले आहे, त्या स्थलाच्या निराकार दशेप्रमाणे जी स्थिति (निराकारता अशी की, त्या स्थलाला समुद्र म्हणावे, तर लाटाही नाहीत व पाणीही नाही; पृथ्वीचे क्षेत्र म्हणावे, तर, पुढल्या क्षणाला समुद्र तेथे आपला अंमल गाजवणार). 6
507-15
पार्था जागणे तरी बुडे । परी स्वप्नाचे काही न मांडे । तैसिये निद्रे सांगडे । न्याहाळणे जे ॥507॥
पार्था, जागृति लोप पावली आहे आणि स्वप्नादि व्यवहार बंद आहे अशी जी झोप याप्रमाणे हे समजावे. 7
508-15
विश्व आघवेचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे । तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥508॥
सर्व विश्वदर्शन मावळले आहे पण आत्मबोधाचा तर उदय नाही अशी जी केवळ अज्ञानावस्था तिला “अक्षर” असे नांव आहे. 8
509-15
सर्वा कळी सांडिले जैसे । चंद्रपण उरे अंवसे । रूप जाणावे तैसे । अक्षराचे ॥509॥
सर्व कलाशून्य (गडद अंधकाररूप) अमावास्येच्या चंद्राप्रमाणे ” अक्षराचे रूप समजावे. 9
510-15
पै सर्वोपाधिविनाशे । हे जीवदशा जेथ पैसे । फळपाकांत जैसे । झाड बीजी ॥510॥
पक्वफळाच्या बीजांत तरु जसा सूक्ष्मरूपाने असतो त्याप्रमाणे जागृदादि सर्व उपाधिनाशानंतर ही जीवदशा ज्या ठिकाणी लीन होऊन असते. 510
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
511-15
तैसे उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ । तयाते अव्यक्त । बोलती गा ॥511
तसेच उपाधि व उपाधीने युक्त असणारे जेथे लीन होतात त्या स्थानाला ” अव्यक्त ” असे म्हणतात. 11
512-15
॥ घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥512॥
गाढ अज्ञानरूप जी सुषुप्त्यवस्था तिला ” बीजभाव ” म्हणतात व दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती हा तिचा फलभाव होय. 12
513-15
जयासी का बीजभावो । वेदांती केला ऐसा आवो । तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥513॥
वेदान्तांत ज्या स्थितीला ” बीजभाव ” असे म्हणतात ते त्या अक्षर पुरुषाचे स्थान होय. ( तोच अक्षर पुरुष होय. ) 13
514-15
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न । नानाबुद्धीचे रान । रिगाले असे ॥514॥
जेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन ते जागृति, स्वप्न व नाना तऱ्हेचे बुद्धितरंग या रूपांनी विस्तारते. 14
515-15
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी । ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥515॥
अर्जुना, जीवत्व आणि विश्व ह्यांचा उदय जेथून होतो व हे दोन भेद पुन्हा शेवटी जेथे ऐक्य किंवा लय पावतात त्या अज्ञानोपहित चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात. 15
516-15
येरु क्षर पुरुषु का जनी । जिही खेळे जागृती स्वप्नी । तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥516॥
दुसरा जो क्षर पुरुष म्हणून म्हणतात व ज्याचा व्यवहार जागृति व स्वप्न ह्या अवस्थांत चालतो व त्या दोन्ही अवस्था जेथून उत्पन्न होतात. 16
517-15
पै अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे का ख्याती । या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥517॥
किंवा गाढ अज्ञानदशा जी, लोकात “सुषुप्ति ” ह्या नांवाने प्रसिद्ध आहे व जिला ब्रह्मा का म्हणू नये याला एकच कारण आहे. 17
518-15
साचचि पुढती वीरा । जरी न येता स्वप्न जागरा । तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणो येता ॥518॥
अर्जुना, खरोखर, ह्या सुषुप्त्यवस्थेतून जीव स्वप्न व जागृति ह्या अवस्थाना येताच ना, तर त्या सुषुप्तीलाच आम्ही ब्रह्मस्थिति असे म्हटले असते. 18
519-15
परी प्रकृतिपुरुषे दोनी । अभ्रे जाली जिये गगनी । क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नी । देखिला जिये ॥519॥
पण त्या सुषुप्तिरूप ज्ञानशून्य गगनांत प्रकृति व पुरुष असे दोन ढग येऊन क्षेत्र व क्षेत्रज्ञ असे भेद जिच्या स्वप्नात दिसतात. ( म्हणून सुषुप्त्यवस्थेला ब्रह्मस्थिति म्हणता येत नाही. ) 19
520-15
हे असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा । मूळ ते रूप पुरुषा । अक्षराचे ॥520॥
हे राहू दे, अधःशाख ( खाली खांद्या असलेला ) अशा ह्या संसारवृक्षाचे जो प्रथम मूळ ( वस्तूच्या ठिकाणी अज्ञानाचे आर घेणे ) तो हा अक्षर पुरुष होय. 520
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
521-15
हा पुरुषु का म्हणिजे । जे पूर्णपणेचि निजे । पै मायापुरी पहुडिजे । तेणेही बोले ॥521॥
आता ह्याला पुरुष का म्हणतात ? तर- ” पूर्णतया शेते ” गाढ निद्रा घेतो म्हणून किंवा “ मायापुऱ्या शेते” मायापुरीमध्ये शयन करितो म्हणूनही पुरुष म्हणावा. 21
522-15
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे जिये माझारी । ते सुषुप्ती गा हा ॥522॥
विपरीत ज्ञानाचे खेळ जे विकारादि ते ज्या अवस्थेत मुळींच नसतात ती सुषुप्ति (व तोच अक्षर पुरुष होय. )
523-15
म्हणौनि यया आपैसे । क्षरणे या नसे । आणिकेही हा न नाशे । ज्ञानाउणे ॥523॥
त्या अक्षर पुरुषाच्या अज्ञानोपाधीचा स्वभावतः किंवा ज्ञानावाचून अन्य कशानेही नाश होणे शक्य नाही.
524-15
यालागी हा अक्षरु । ऐसा वेदांती डगरु । केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥524॥
म्हणूनच वेदान्त सिद्धान्ताच्या प्रदेशात ह्याला “ अक्षर ” अशी संज्ञा दिली आहे. 24
525-15
ऐसे जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण । अक्षर पुरुषु जाण । चैतन्य ते ॥525॥
ज्या चैतन्याशी असलेला मायेचा संबंध जीवत्वदशा व जगत् कार्यं ह्यांना कारण आहे ते मायोपहित चैतन्य अक्षर पुरुष जाण. 25
उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ॥
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥15. 17॥
526-15
आता अन्यथाज्ञानी । या दोनी अवस्था जया जनी । तया हरपती घनी । अज्ञानतत्त्वी ॥526॥
आता अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे जगात रूढ असलेल्या जागृति व स्वप्न ह्या दोन्ही अवस्था ज्या मूलाज्ञानात लय पावतात. 26
527-15
ते अज्ञान ज्ञानी बुडालिया । ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनिया । स्वये जळे ॥527॥
त्या अज्ञानाचा, जसा अग्नि, काष्ठ जाळून आपणही स्वतः जळतो म्हणजे स्वरूपात शांत होतो; तसा ज्ञानाने ग्रास करून ते ज्ञानही (काही कर्तव्य नाही म्हणून) मागल्या पावली निघून गेले. (शांत झालें) 27
528-15
तैसे अज्ञान ज्ञाने नेले । आपण वस्तु देऊनि गेले । ऐसे जाणणेनिवीण उरले । जाणते जे ॥528॥
ज्ञानाने समूळ अज्ञान नाहीसे होते, व अज्ञाननाशाचा क्षण तोच वस्तुप्राप्तीचा क्षण असल्याने वस्तुदर्शनही ज्ञानामुळेच होतें; व अज्ञाननाशाबरोबर ज्ञाताज्त्रयादि व्यवहाराचा लोप होत असल्याने ज्ञानाचे जीवनच जाऊन तेही अंग टाकतें. म्हणजे सामान्यज्ञानरूप किंवा द्रह्मरूप होतें; ही अवस्था जाणण्यात म्हणजे येणारी नसून स्वसंवेद्य आहे म्हणून काही निर्देशच करणे तर तेथे ‘जाणण्याशिवाय नुसते जाणणे’ म्हणजे ज्ञानमात्र स्थित असते असा उपचार करावा लागतो. 28
529-15
ते तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय का निष्कर्षु । दोहीहून आणिकु । मागिला जो ॥529॥
ही स्थिति तो उत्तम पुरुष होय. मागील क्षराक्षर पुरुषांच्या अपेक्षेने त्याला तिसरा असे म्हटले, तो शेवटचा शुद्ध परमात्मा होय. 29
530-15
सुषुप्ती आणि स्वप्ना- । पासूनि बहुवे अर्जुना । जागणे जैसे आना । बोधाचेचि ॥530॥
अर्जुना, सुषप्ति आणि स्वप्न ह्यापेक्षा जागृतीतील बोध जसा फार वेगळा असतो. 530
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
531-15
का रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा । अफाटु तेवी वेगळा । उत्तमु गा ॥531॥
किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ यांहून सूर्य मंडल जसे फारच वेगळे, तसाच हा उत्तम पुरुष क्षराक्षराहून अत्यंत वेगळा आहे. 31
532-15
हे ना काष्ठीचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही । तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो ॥532॥
किंवा याहूनही, काष्ठांतीलच वन्हि जसा काष्ठाहून भिन्न असतो; तसा क्षराक्षरांत असूनही हा उत्तम पुरुष त्याहून वेगळाच आहे. 32
533-15
पै ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदा । उठी कल्पांती उदावादा । एकार्णवाचा ॥533॥
कल्पांतकाळचा एकार्णव (व्यापक समुद्र) जशी आपली मर्यादा ओलांडून नदीनद जसे सर्व एकरूप म्हणजे जलमय करितो. 33
534-15
तैसे स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी । जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजे ॥534॥
प्रलयकालच्या तेजोमय स्थितीत जसा दिवस आणि रात्र हा भेद उरत नाही, तशी, ह्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी, सुषुप्ति, स्वप्न किंवा जागृति अशा अवस्थाभेदांची गोष्टच बोलणे नको. 34
535-15
मग एकपण ना दुजे । असे नाही हे नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथे ॥535॥
मग ? ते द्वैत किं अद्वैत आहे, हे किंवा नाही काहीच सांगण्याची सोय नाही व त्रिपुटीच्या अभावी हा उत्तम पुरुषाचे ठिकाणी अनुभवही भयाने बुडी देऊन रहातो. 35
536-15
ऐसे आथि जे काही । ते तो उत्तम पुरुषु पाही । जे परमात्मा इही । बोलिजे नामी ॥536॥
असे जे काही तत्व आहे, तो उत्तम पुरुष जाणावा; त्यालाच परमात्मा असे म्हणतात. 36
537-15
तेही एथ न मिसळता । बोलणे जीवत्वे पंडुसुता । जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ॥537॥
अर्जुना, हे वर्णनही या उत्तम पुरुषस्थितीच्या बाहेर असलेला जीवभाव पत्करून करून बोलावे लागते. बुडालेल्याची वार्ता काठावरील मनुष्य सांगू शकेल, बुडालेला नव्हे. 37
538-15
तैसे विवेकाचिये कांठी । उभे ठाकलिया किरीटी । परावराचिया गोठी । करणे वेदा ॥538॥
त्याप्रमाणे अर्जुना, विचाराच्या तीरावरच जोपर्यंत वेद उभे आहेत तोंवरच त्यास अक्षर अलीकडले, उत्तमपुरुष यांच्या हि पलीकडला ” वगैरे अलिकडच्या पलिकडल्या गोष्टी करत आल्या. 38
539-15
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवरु । याते म्हणती परु । आत्मरूप ॥539॥
म्हणून. क्षर व अक्षरपुरुष हे‘ अवर’ म्हणजे कनिष्ठ आहेत असे पाहून ह्या उत्तम पुरुषाला ” पर ” म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा म्हणजे परमात्मा असे म्हणतात. 39
540-15
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी । सूचिजे गा अवधारी । पुरुषोत्तमु ॥540॥
अर्जुना ह्याप्रमाणे परमात्मा ह्या शब्दाने पुरुषोत्तम (उत्तमपुरुष) अते सुचविले आहे असे समज. 540
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
541-15
एऱ्हवी न बोलणेचि बोलणे । जेथिचे सर्व नेणिवा जाणणे । काहीच न होनि होणे । जे वस्तु गा ॥541॥
आणखी त्या विषयी मौन धरणे हेच तद्विषयक बोलणे होय, जे कोणत्याही समजेत न येणे हेच त्याचे जाणणे ( अविजानता विज्ञातं = ज्यांनी ब्रम्ह जाणले नाही त्यानिंच खरे जाणले) ते होन्या जाण्यातले नाही असा समज हेच त्याचे होणे 41
542-15
सोऽहं तेही अस्तवले । जेथ सांगतेचि सांगणे जाले । द्रष्टत्वेसी गेले । दृश्य जेथ ॥542॥
सोऽहं ही बुद्धि जेथे मावळली व सर्वाधिष्ठानत्वामुळे सांगणाराच सांगणेरूप झाला व दृङमात्र स्वरूपनिश्चयात द्रष्टत्व लोपले व त्यामुळे दृश्यही आटलें. 42
543-15
आता बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजी कैची हे म्हणो नये प्रभा ? । जऱ्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ॥543॥
कोणत्याही प्रकारे ती प्रतीतीला आली नाही तरी बिंब आणि प्रतिबिंब ह्यांच्यामध्ये बिंबाची सूक्ष्म आकृति नाही असे कसे म्हणता येईल ? 43
544-15
का घ्राणा फुला दोही । द्रुती असे जे माझारिला ठायी । ते न दिसे तरी नाही । ऐसे बोलो नये ॥544॥
किंवा प्राण आणि फुले ह्या दोघांच्यामधील प्रदेशांतही त्यांचा गंध, तो आपल्यास आहे असा वाटला नाही । तरी, आहे असे म्हटले पाहिजे. 44
545-15
तैसे द्रष्टा दृश्य हे जाये । मग कोण म्हणे काय आहे । हेचि अनुभवे तेचि पाहे । रूप तया ॥545॥
तसे द्रष्टेपणा व त्याच्याबरोबर दृश्यवस्तु ह्यांचा लोप झाल्यावर तेथे अमुक एक आहे असे कोणी म्हणावे ? पण अशीच ती वस्तु आहे हे अनुभवानेच जाणावयाचे असते किंवा अनुभवी तेच जाणोतो; असे उत्तम पुरुषाचे रूप आहे.
546-15
जो प्रकाश्येवीण प्रकाशु । ईशितव्येवीण ईशु । आपणेनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥546॥
जो प्रकाश्य वस्तूवाचून प्रकाशरूप आहे, नियम्य वस्तूवाचून जो स्वरूपतः ईश आहे व जो सर्व अवकाश व्यापून आपणच आहे. 46
547-15
जो नादे ऐकिजता नादु । स्वादे चाखिजता स्वादु । जो भोगिजतसे आनंदु । आनंदेचि ॥547॥
जो नादाचाही नाद (नादपणा ज्या सत्तेवर नांदतो आहे) तसाच जो स्वादाचाही स्वाद असून जो आपल्या आनंदस्वरूपानेच आनंदाचा भोग घेत असतो. 47
548-15
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु । विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथे ॥548॥
जो पूर्णतेचा अंत ( किंवा परिणाम पावलेली अगर अवतरलेली अशी मूर्त पूर्णता ) सर्वपुरुषश्रेष्ठ व विश्रांतीचेही विश्रामस्थान. 48
549-15
सुखासि सुख जोडिले । जे तेज तेजासि सांपडले । शून्यही बुडाले । महाशून्यी जिये ॥549॥
जेथे सुखालाच सुखाची जोड, तेजालाच तेजोलाभ अगर महाशून्यामध्येच शून्याचा लय. 49
550-15
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेही ग्रासूनि पुरता । जो बहुते पाडे बहुता- । पासूनि बहु ॥550॥
जो विकास संपून अवधिभूत असणारा, ग्रासाचाही ग्रास करून पूर्णत्वाने असणारा, जो सर्व बहुत्वाहुनही बहु म्हणजे श्रेष्ठ आहे. 550
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
551-15
पै नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती । रुपे न होनि शुक्ती । दावी जेवी ॥551॥
किंवा, ज्याप्रमाणे, शुक्ति स्वतः रूपे न होता नेणत्याला रुप्याचा भास होण्यास कारण होते 51
552-15
का नाना अलंकारदशे । सोने न लपत लपाले असे । विश्व न होनिया तैसे । विश्व जो धरी ॥552॥
नित्य प्रकट असणारे सोने अलंकाररूपाने स्थित असले म्हणजे नेणत्यांना लपाल्यासारखे होऊन त्यांना फक्त अलंकारच दिसतात; याप्रमाणे उत्तम पुरुष आपण केव्हांही विश्व न होता नेणत्यांच्या दृष्टीला दिसणाऱ्या विश्वाचा आधार आहे. 52
553-15
हे असो जलतरंगा । नाही सिनानेपण जेवी गा । तेवी दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥553॥
हे असो. जल व त्यावरील लाटा ह्यात जशी भिन्नता नसते (पाण्याच्या अस्तित्वावरच लाटांचे अस्तित्व असते) त्याप्रमाणे, उत्तम पुरुषाच्या अस्तितेवरच नांदनारे जगत् (अन्वयदृष्टीने) त्याहून वेगळे नाही 53
554-15
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा । हा जळी चंद्र हन जैसा । समग्र गा ॥554॥
केवळ चंद्राच्या संकोच विकासावरच जसा त्याच्या प्रतिबिंबाचा संकोच विकास अवलंबून आहे, त्याप्रमाणे आत्म्याचे प्रगट होणे अगर स्वरूपावस्थान असणे ह्यावर विश्वाचा प्रकटपणा अगर लोप अवलंबून आहे. 54
555-15
तैसा विश्वपणे काही होये । विश्वलोपी कही न जाये । जैसा रात्री दिवसे नोहे । द्विधा रवि ॥555॥
तसाच विश्वस्थितीत तो काही होतही नाही अगर विश्वाच्या लोपाने तो कोठे जातही नाही. (आहे तसाच असतो ) ह्याला उदाहरण, रात्र आणि दिवस हे सूर्याच्या ठिकाणी भेद उत्पन्न करू शकत नाहीत. 55
556-15
तैसा काहीचि कोणीकडे । कायिसेनिहि वेची न पडे । जयाचे सांगडे । जयासीचि ॥556॥
याप्रमाणे तो कशांतही नसतो, कशानेहि न्यूनता पावत नाही; म्हणून तो कसा आहे हे सांगणे झाल्यास त्याच्यासारखाच तो आहे असे म्हणावे लागते. 56
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥15. 18॥
557-15
जो पापियाचा आपणपेचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया । काय बहु बोलो जया । नाही दुजे ॥557॥
अन्यप्रकाशनिरपेक्ष जो आपला आपणच प्रकाश करितो (स्वप्रकाशरूप आहे) तो, अर्जुना, काय सांगावे ? केवल एकरूप आहे. त्यावांचुन दुसरे काही नाहीच. 57
558-15
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥558॥
असा क्षराक्षराहून उत्तम किंवा श्रेष्ठ जो मी, हे माझे निरुपाधिक स्वरूप होय; म्हणूनच वेदांनी व लोकांनी ह्यांचे पुरुषोत्तम असे वर्णन केले आहे. 58
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥15. 19॥
559-15
परी हे असो ऐसिया । मज पुरुषोत्तमाते धनंजया । जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे ॥559॥
परंतु हे असो, अर्जुना, असा जो भी पुरुषोत्तम त्याला तोच एक पाहू शकतो की, ज्याच्या अंतःकरणात यथार्थ ज्ञानसूर्याचा उदय झाला आहे. 59
560-15
चेइलिया आपुले ज्ञान । जैसे नाहीचि होय स्वप्न । तैसे स्फुरते त्रिभुवन । वावो जाले ॥560॥
जागे झाल्यावर स्वप्नव्यवहार जसा नाहीसा होतो, तसेच ” चेइलिया आपुले ज्ञान ” म्हणजे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर दिसणारे विश्व स्वप्नवत् वाव होते. 560
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
561-15
का हाती घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कांटाळा । तैसा माझेनि बोधे टवाळा । नागवे तो ॥561॥
जिच्यावर सर्पभ्रम झाला होता ती माळच हाती घेतल्यावर (अपरोक्ष झाल्यावर) जसा सर्पभ्रम व भीति नाहीशी होते, तसे ज्याला माझे ज्ञान झाले आहे तो ह्या टवाळ म्हणजे मिथ्या जगदाभासाने फसत नाही. (दृढमिथ्यात्वनिश्चयामुळे) 61
562-15
लेणे सोनेचि जो जाणे । तो लेणेपण ते वावो म्हणे । तेवी मी जाणोनि जेणे । वाळिला भेदु ॥562॥
अलंकाराला ज्याने सुवर्णत्वाने जाणले तो जसा अलंकार म्हणून काही स्वतंत्र वस्तु मानीत नाही त्याप्रमाणे ज्याला माझे ज्ञान झाले त्याची, अलंकाराच्या दृष्टांताप्रमाणे, भेदबुद्धि पार नाहींशी अगर बाधित होते. 62
563-15
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु । जो आपणेनसी भेदु । नेणोनिया जाणे ॥563॥
मग, असा भेदबुद्धि बाधित झालेला पुरुष, स्वतःसिद्ध सच्चिदानंदस्वरूप असा मीच सर्वत्र आहे असे म्हणतो; व आपल्या स्वतःलाही दुजेपणाने न पहाता मला जाणतो. 63
564-15
तेणेचि सर्व जाणितले । हेही म्हणणे थेंकुले । जे तया सर्व उरले । द्वैत नाही ॥564॥
आता त्याला त्या पुरुषालाच सर्व ज्ञान झाले हेही म्हणणे अपुरे म्हणजे वस्तुस्थितिदर्शक नाही; कारण, त्याला सर्व म्हणून काही द्वैत उरलेच नाही. 64
565-15
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना । गगन जैसे आलिंगना । गगनाचिया ॥565॥
म्हणून, अर्जुना, माझे भजन करावयास तोच (मद्रूप झालेला) एक योग्य होय; अरे ! गगनाला आलिंगन देण्याची योग्यता एका गगनाचीच आहे, अन्याची नव्हे. 65
566-15
क्षीरसागरा परगुणे । कीजे क्षीरसागरचिपणे । अमृतचि होऊनि मिळणे । अमृती जेवी ॥566॥
क्षीरसागराचा पाहुणचार क्षीरसागरानेच करणे अथवा अमृतत्वानेच अमृतास मिळणे जसे योग्य 66
567-15
साडेपंधरा मिसळावे । तै साडेपंधरेचि होआवे । तेवी मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥567॥
उत्तम सुवर्णात तद्रूप होण्यास जसे उत्तम सुवर्णच पाहिजे, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला यालाच माझी भक्ति करणे शक्य व योग्य आहे. 67
568-15
हा गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? । म्हणौनि मी न होता भक्ती । अन्वयो आहे ? ॥568॥
गंगा सिंधूहून जर भिन्न असती तर ती सिंधुरूप कशी झाली असती ? म्हणून “मी न होता “ म्हणजे माझी सर्वव्यापकता न बाणता परिच्छिन्न बुद्धी केलेली भक्ति खरी किंवा सार्थ होईल काय ? 68
569-15
ऐसियालागी सर्व प्रकारी । जैसा कल्लोळु अनन्यु सागरी । तैसा माते अवधारी । भजिन्नला जो ॥569॥
ह्यासाठी, समुद्राच्याच्या लाटा जशा समुद्राशी सर्वथैव अनन्य (अभिन्न) आहेत, त्याप्रमाणे माझे भजन करणारा अनन्य असा, अगर अनन्य असेल त्यानेच खरे भजन केले असे जाण. 69
570-15
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणे लोभे । तो पाडु मानू लाभे । भजना तया ॥570॥
सूर्य आणि प्रभा यांचे जसे नित्य ऐक्य आहे तशी वरील अनन्यभजनाची योग्यता आहे. 570
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात् कृतकृत्यश्च भारत ॥15. 20॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥15॥
अर्थ : ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तमयोग नावाचा हा पंधरावा अध्याय समाप्त झाला. ॥15॥
571-15
एवं कथिलयादारभ्य । हे जे सर्व शास्त्रैकलभ्य । उपनिषदा सौरभ्य । कमळदळा जेवी ॥571॥
ह्याप्रमाणे अध्यायाला आरंभ केल्यापासून येथवर जे सर्व सांगितले ते केवळ शास्त्रांपासूनच प्राप्त होत असते; आणि कमलांना सुगंध ही जशी शोभा, तसे हे गीताशास्त्र हे उपनिषद्रूप कमलांचा सुगंध होय. 71
572-15
हे शब्दब्रह्माचे मथिते । श्रीव्यासप्रज्ञेचेनि हाते । मथुनि काढिले आयिते । सार आम्ही ॥572॥
शब्दब्रह्मरूप जो वेदार्णव त्यापासून व्यासबुद्धिरूप रवीने मंथन करून आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढले आहे. 72
573-15
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥573॥
ही गीता ज्ञानामृताची गंगा, आनंदरूप चंद्राची सतरावी कला, अथवा विचाररूप क्षीरसागरांतून अवतरलेला नवीन लक्ष्मीचाच अवतार होय. 73
574-15
म्हणौनि आपुलेनि पदे वर्णे । अर्थाचेनि जीवेप्राणे । मीवाचोनि हो नेणे । आन काही ॥574॥
म्हणून ही, आपल्या प्रत्येक शब्दाने, वर्णनाने, आणि अर्थरूपी जिव्हाळयाने मजवाचून दुसरी कोणतीही गोष्ट जाणत नाही. 74
575-15
क्षराक्षरत्वे समोर जाले । तयांचे पुरुषत्व वाळिले । मग सर्वस्व मज दिधले । पुरुषोत्तमी ॥575॥
तिच्यासमोर क्षर व अक्षर असे दोन पुरुष आले असता (दर्शनानेच) त्यांचे पुरुषत्व तिने नाकारले, व मग, आपले सर्वस्व मज पुरुषोत्तमास अर्पिले. 75
576-15
म्हणौनि जगी गीता । मिया आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवा आता । आकर्णिली ॥576॥
म्हणून प्रस्तुत तुला जिचे श्रवण घडले ती ही गीता, मला आत्मारामाला वरिल्यामुळे सर्व जगामध्ये पतिव्रता आहे. 76
577-15
साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र । पै संसारु जिणते हे शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरे इये ॥577॥
अर्जुना, खरे सांगतों; नुसत्या वाक्पांडित्यासठ हे गीताशास्त्र निर्माण झाले नाही, तर संसारशत्रुचा नाश करणारे हे शस्त्र आहे, अथवा, ही गीताक्षरे म्हणजे निर्गुण आत्म्याला मूर्त रूपाने अवतरित व्हावयास लावणारे जणु मंत्र आहेत. 77
578-15
परी तुजपुढा सांगितले । ते अर्जुना ऐसे जाले । जे गौप्यधन काढिले । माझे आजि ॥578॥
जवळचा गुप्त ठेवा बाहेर काढावा, तशासारखेच, आज तुला गीता ऐकविली, हे झालं. 78
579-15
मज चैतन्यशंभूचा माथा । जो निक्षेपु होता पार्था । तया गौतमु जालासि आस्था- । निधी तू गा ॥579॥
शंकराच्या जटेत गुप्त असलेल्या गंगेचे गौतमाच्या तपाने जसे अवतरण झाले त्याप्रमाणे चैतन्यशंभु जो मी, त्या माझ्या अंतःकरणात गुप्त असलेली जी ज्ञानगंगा, तिला मुखवाटे शब्दरूप प्रवाहाने अवतरविणारा तू दुसरा आस्थावान् गौतमच भेटलास म्हणावयाचा ! 79
580-15
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हा ॥580॥
आपल्या स्वच्छपणामुळे आरसा जसा पुढील वस्तूचे प्रतिबिंब आपल्यात आणतो त्याप्रमाणे धनंजया, तू आमच्या समोरील आरसाच झाला आहेस. 580
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
581-15
का भरले चंद्रतारांगणी । नभ सिंधू आपणयामाजी आणी । तैसा गीतेसी मी अंतःकरणी । सूदला तुवा ॥581॥
किंवा चंद्रतारांगणांनी भरलेले आकाश, सिंधु जसे आपल्यात प्रतिबिंबित करून घेतो, त्याप्रमाणे गीते सह तु मला आपल्या हृदयात प्रतिबिंबित करून घेतलेस. 81
582-15
जे त्रिविधमळिकटा । तू सांडिलासि सुभटा । म्हणौनि गीतेसी मज वसौटा । जालासि गा ॥582॥
अर्जुना, तुझ्या चित्तातील तिन्ही सळ (सत्वरजतम) नाहीसे झाले आहेत म्हणून गीतेचे व माझे तू निवासस्थान झाला आहेस. 82
583-15
परी हे बोलो काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । जाणे तो समस्ता । मोहा मुके ॥583॥
ह्या गीतेची थोरवी काय बोलावी ! ही माझी ज्ञानवल्लीच होय. तिये ज्याला समग्र आकलन झाले तो सर्व मोहांपासून मुक्त होतो 83
584-15
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता । अमरपण उचिता । देऊनि घाली ॥584॥
अमृतगंगेचे पान केल्यावर रोग दवडून वर ती योग्य असे अमरत्व देते 84
585-15
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया । परी आत्मज्ञाने आपणापया । मिळिजे येथ ॥585॥
त्याप्रमाणे गीता जाणल्यावर मोहमुक्त होईल ह्यात आश्चर्य हे काय ? पण आत्मज्ञानाने आपली आपल्याला भेट होणे (अपरोक्षज्ञान होणे) हे तिये जाणणे होय. 85
586-15
जया आत्मज्ञानाच्या ठायी । कर्म आपुलेया जीविता पाही । होऊनिया उतराई । लया जाय ॥586॥
आजवरच्या आपल्या श्रमायै चीज झाले म्हणून कर्म, आत्मज्ञानप्राप्तीचे उतराई होऊन लय पावते
587-15
हरपले दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥587॥
हरवलेली जिन्नस शोधण्यासाठी ज्या खाणाखुणा अवश्य असतात त्यांची वस्तुप्राप्तीनंतर जशी गरज नसते त्याप्रमाणे कर्मरूप देवळाचा ज्ञान रूप कळस हाच शेवट होय. 87
588-15
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करू सरले देखा । ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥588॥
म्हणून ज्ञानवानाचे विधिकिंकरत्व ( कर्तव्यबुद्धीने कर्म करणे ) संपले असे अनाथाचे नाथ (रमा रंग) म्हणाले. 88
589-15
ते श्रीकृष्णवचनामृत । पार्थी भरोनि असे वोसंडत । मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥589॥
ते श्री कृष्णवचनरूपी अमृत पार्थाच्या चित्तांत भरून वर उचंबळू लागले. तेच व्यासांच्या कृपेने संजयास प्राप्त झाले. 89
590-15
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया । म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी ॥590॥
ते अमृत, संजयाने राया धृतराष्ट्रास पाजिले. म्हणून त्याला (धृतराष्ट्राला) अंत समय कठिण गेला नाही. 590
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
591-15
एऱ्हवी गीताश्रवण अवसरी । आवडो लागता अनधिकारी । परि सेखी तेचि उजरी । पातला भली ॥591॥
पाहू गेले तर गीताश्रवणाच्या वेळीं, धृतराष्ट्र हा श्रवणाचा अधिकारी नाही असे वाटत असे; परंतु अंती तो उपदेश त्याला कामाला आला. 91
592-15
जेव्हा द्राक्षी दूध घातले । तेव्हा वाया गेले गमले । परी फळपाकी दुणावले । देखिजे जेवी ॥592॥
द्राक्षाच्या वेलास खत म्हणून दूध घालतात तेव्हा ते व्यर्थ गेले असे वाटले, तरी त्याचा परिपाक होऊन उत्तम पीक आले म्हणजे दुप्पट फायदा झाला असे जसे अनुभवास येते. 92
593-15
तैसी श्रीहरीवक्त्रीची अक्षरे । संजये सांगितली आदरे । तिही अंधु तोही अवसरे । सुखिया जाला ॥593॥
त्याप्रमाणे, श्रीहरीच्या मुखातील अक्षरे (उपदेश) संजयानं धृतराष्ट्रास सांगितली त्याने तो अंध धृतराष्ट्रही अंती सुखी झाला. 93
594-15
तेचि मऱ्हाटेनि विन्यासे । मिया उन्मेषे ठसेंठोंबसे । जी जाणे नेणे तैसे । निरोपिले ॥594॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीच अक्षरे मराठी भाषेत माझ्या सामर्थ्याप्रमाणे मला समजली तशी ओबडधोबडपणे निरूपिली आहेत. 94
595-15
सेवंतीये अरिसि काही । आंग पाहता विशेषु नाही । परी सौरभ्य नेले तिही । भ्रमरी जाणिजे ॥595॥
शेवंतीच्या झाडाकडे पाहिले असता अरसिकला त्यात काही वैशिष्टय असेल असे वाटत नाही पण ते सुगंध सेवनाचे खरे अधिकारी जे भ्रमर त्यांनाच कळते 95
596-15
तैसे घडते प्रमेय घेइजे । उणे ते मज देइजे । जे नेणणे हेचि सहजे । रूप की बाळा ॥596॥
त्याप्रमाणे आपण धड म्हणजे सिद्धांताशौं पटणारे प्रमेय स्वीकारावे, प्रमाद घडले असतील ते माझे पदरांत टाकावे; कारण, मुले सहजच अजाण असावी हेच त्यांचे बालपण होय. 96
597-15
तरी नेणते जऱ्ही होये । तऱ्ही देखोनि बाप की माये । हर्ष केहि न समाये । चोज करिती ॥597॥
पण नेणत्या मुलाला पाहूनही आई व बाप ह्यांना अति हर्षे होऊन ते त्याचे कौतुक करितात. 97
598-15
तैसे संत माहेर माझे । तुम्ही मिनलिया मी लाडैजे । तेचि ग्रंथाचेनि व्याजे । जाणिजो जी ॥598॥
तसे संत हे माझे माहेर (आईबाप ) होय. तुमची भेट झाल्यावर मी लाडांत येतो ( हर्ष होतो ). ह्या हर्षातीलच ही कृति ( ग्रंथरचना ) असे समजावे. 98
599-15
आता विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वा{क्} पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥599॥
अध्याय समाप्तीला महाराज म्हणतात, विश्वात्मक असे माझे स्वामी श्रीनिवृत्तिराज ते माझी वाक्पूजा स्वीकारोत. 599
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां पुरुषोत्तमयोगोनाम पञ्चदशोऽध्यायः ॥15॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 20॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 599॥
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

