Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १३ वा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः

सार्थ ज्ञानेश्वरी अक्षर, शब्द शोध Adhyay 13 Word Search Sartha Dnyaneshwari 96 Kuli Maratha Warkari Rojnishi

सार्थ ज्ञानेश्वरी अक्षर, शब्द शोध Adhyay 13 Word Search Sartha Dnyaneshwari 96 Kuli Maratha Warkari Rojnishi

शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 13: KSHETRAKSHTRADNYAYOG:
Sartha Dnyaneshwari Adhyay 13 KSHETRA KSHTRADNYA YOG:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ त्रयोदशोऽध्यायःअध्याय तेरावा ॥ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः॥
भग्वद्गीतगीता श्लोक :- 34 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 1170 ॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ त्रयोदशोऽध्यायःअध्याय तेरावा ॥ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अध्याय तेरावा
(श्रीगुरुस्तवन व साहित्य = 1-6)
1-13
आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥1॥
ज्या चरणांचे अत्यंत परम आदराने स्मरण केले असता पुरुष संपूर्ण विद्येचे वसतिस्थान होतो, त्याच श्रीगुरूच्या चरणांना आता नमस्कार करू.
2-13
जयांचेनि आठवे । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवे । जिव्हेसि ये ॥2॥
ज्या चरणांचे स्मरण झाले असता इष्ट अर्थ प्रगट करणारे शब्दभांडार स्वाधीन होते आणि वाणीच्या ठिकाणी संपूर्ण रसाळ वत्कृत्व प्रगट होते.
3-13
वक्तृत्वा गोडपणे । अमृताते पारुखे म्हणे । रस होती वोळंगणे । अक्षरांसी ॥3॥
रसाळवत्कृत्वाच्या गोडपणापुढे अमृतही फिके वाटते आणि नवरस अक्षरांना धरूनच राहतात.
4-13
भावाचे अवतरण अवतरविती खूण । हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेद ॥4॥
आत्मबोधाचे रहस्य प्रगट करणारी खूण ठिकठिकाणी भावार्थाला प्रगट करते आणि त्यामुळे अंतःकरणात आत्मबोध पूर्णपणे यथार्थ अवगत होतो.
5-13
श्रीगुरूंचे पाय । जै हृदय गिंवसूनि ठाय । तै येवढे भाग्य होय । उन्मेखासी ॥5॥
जेव्हा श्रीगुरूचे पाय आपल्या ह्रदयात राहतात, तेव्हाच ज्ञानाचे एवढे सद्भाग्य प्राप्त होते.
6-13
ते नमस्कारूनि आता । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसे म्हणे ॥6॥
म्हणून त्या चरणांना आम्ही आता नमस्कार करतो; जो ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा पती होय तो भगवान श्रीकृष्ण पुढे असे म्हणाला.

श्रीभगवानुवाच ।
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥13. 1॥
अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, हे कौतेया, या शरीराला ‘क्षेत्र ” असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला ‘क्षेत्रज्ञ ” असे क्षेत्रक्षेत्रज्ञास जाणणारे लोक म्हणतात.
7-13
तरी पार्था परिसिजे । देह हे क्षेत्र म्हणिजे । जो हे जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथे ॥7॥
तरी हे अर्जुना ! ऐक देहाला क्षेत्र म्हणतात व देहाला जो जाणतो त्यालाच येथे क्षेत्रज्ञ म्हटले आहे.

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्त्रयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम ॥13. 2॥
अर्थ हे भरतकुलोत्पन्ना, सर्व क्षेत्रांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ, तो मी आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असे माझे मत आहे.
8-13
तरि क्षेत्रज्ञु जो एथे । तो मीचि जाण निरुते । जो सर्व क्षेत्राते । संगोपोनि असे ॥8॥
शरीरात जो क्षेत्रज्ञ म्हणून येथे सांगितला आहे व जो सर्व सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात व्यापून आहे, तो खरोखर मीच आहे असे जाण.
9-13
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते । जाणणे जे निरुते । ज्ञान ऐसे तयाते । मानू आम्ही ॥9॥
क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ कोण हे यथार्थ जाणणे यालाच आम्ही ज्ञान म्हणतो.

तत् क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे श्रुणु ॥13. 3॥
अर्थ ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता, हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर (क्षेत्र व क्षेत्रज्ञ कोण ते ब्रह्मादिकांनाही कळत नाही. = 7-26)
10-13
तरि क्षेत्र येणे नावे । शरीर जेणे भावे । म्हणितले ते आघवे । सांगो आता ॥10॥
तर आता हे शरीर ज्या उद्देशाने क्षेत्र या नावाने संबोधिले जाते तो उद्देश आम्ही आता सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-13
हे क्षेत्र का म्हणिजे । केसे के हे उपजे । कवण कवणी वाढविजे । विकारा एथ ॥11॥
शरीराला क्षेत्र का म्हणतात ? ते कसे व कशापासून उत्पन्न होते ? कोणकोणत्या कार्यरूपाने त्याची वाढ होते ?
12-13
हे औट हात मोटके । की केवढे पा केतुके । बरड की पिके । कोणाचे हे ॥12॥
हे एवढेसे साडे तीन हातच आहे किंवा केवढे मोठे आहे ? व त्याची मर्यादा किती ! ते नापीक आहे किंवा पिकणारे आहे आणि ते कोणाचे आहे ?
13-13
इत्यादि सर्व । जे जे याचे भाव । ते बोलिजेती सावेव । अवधान देई ॥13॥
इत्यादि जे सर्व भाव असतील ते संपूर्ण सांगतो, लक्ष देऊन ऐक.
14-13
पै याची स्थळाकारणे । श्रुति सदा बोबाणे । तर्कु येणेचि ठिकाणे । तोंडाळु केला ॥14॥
उपनिषदांनी आक्रोश करून या क्षेत्रांविषयीच विचार सांगितला आणि याच स्थळाने तर्काला बडबड करायला लावली.
15-13
चाळिता हेचि बोली । दर्शन शेवटा आली । तेवीचि नाही बुझाविली । अझुनि द्वंदे ॥15॥
या क्षेत्राची चर्चा करण्यातच दर्शनांचा शेवट झाला, तरी त्यांच्यातील परस्पर विरोध नाहीसा झाला नाही.


16-13
शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेचि एके । याचेनि एकवंके । जगासि वादु ॥16॥
या एका क्षेत्रामुळेच निर्णयशास्त्रांच्या सोयरीक संबंधात बिघाड उत्पन्न झाला आणि क्षेत्राचे ठिकाणीच एकनिष्ठ झाल्यामुळे जगात वाद माजला.
17-13
तोंडेसी तोंडा न पडे । बोलेसी बोला न घडे । इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥17॥
एकाचे तोंड दुसर्‍याच्या तोंडासमोर होत नाही व एकाचा युक्तिवाद दुसर्‍यास पटत नाही. अशा युक्तिवादामुळे बडबडण्याची सीमा झाली.
18-13
नेणो कोणाचे हे स्थळ । परि कैसे अभिलाषाचे बळ । जे घरोगरी कपाळ । पिटवीत असे ॥18॥
हे शरीर कोणाच्या मालकीचे आहे, हे सांगता येत नाही, तरीपण याची आसक्ती इतकी प्रबळ आहे की, घरोघर याच्या करिताच कपाळपिटी होत असते.
19-13
नास्तिका द्यावया तोंड । वेदांचे गाढे बंड । ते देखोनि पाखांड । आनचि वाजे ॥19॥
नास्तिकांच्या कुतर्कांचे खंडन करण्याकरिता त्यांना तोंड देऊन वेदांनी त्यांच्याविरुध्द थोर बंड उभारले, हे पाहून पाखंड्यांनी भलतेच बोलायला सुरुवात केली.
नास्तिक— म्हणजे देहालाच चेतन आत्मा समजणारे. ते ईश्वर, वेद, वेदाचे ईश्वरप्रणितत्व, पापपुण्यकर्मे, कर्मानुसार गती, परलोक, पुनर्जन्म, मोक्ष इत्यादि श्रुतिमान्य सिध्दात आहेत ते मुळीच मानीत नाहीत.
नास्तिका द्यावया तोंड— म्हणजे नास्तिकांची अविचारमूलक मते खोडून काढण्याकरिता.
वेदांचे गाढे बंड — म्हणजे वेदाने अनुमान व अनुभव यांच्या भक्कम आधारावर उभारलेले युक्तिसिध्द विचार. पाखंडी— वेदादि शास्त्रांच्या युक्तिअनुभवसिध्द विचारांचा व सिध्दान्ताचा त्याग करून, विचारास न पटणारे व अनुभवास कधी न येणारे स्वकपोलकल्पित सिध्दान्त प्रतिपादन करणार्‍यांना पाखंडी म्हणतात.
20-13
म्हणे तुम्ही निर्मूळ । लटिके हे वाग्जाळ । ना म्हणसी तरी पोफळ । घातले आहे ॥20॥
(वेद प्रमाण मानणार्‍या अस्तिकाला पाखंडी म्हणतो) तुमचे म्हणणे निराधार व केवळ वायफळ पांडित्य आहे. ” नाही ! आमचे म्हणणेच यथार्थ आहे ” असे म्हणत असाल, तर ही आम्ही प्रतिज्ञेची सुपारी ठेविली आहे – म्हणजे पैेजेने आम्ही आपले म्हणणे सिध्द करून देऊ शकतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-13
पाखांडाचिये कडे । नागवी लुंचिती मुंडे । नियोजिली वितंडे । तळासि येती ॥21॥
असे हे, पाखंडाचे डफ वाजवून नागवे राहतात व डोक्याचे केस उपटतात आणि आपले मत प्रतिपादन करण्याकरिता स्विकारलेल्या वितंडवादानेच ते सर्वाच्या खाली येतात म्हणजे आपणच आपली मते निराधार ठरवितात.
22-13
मृत्युबळाचेनि माजे । हे जाईल वीण काजे । ते देखोनिया व्याजे । निघाले योगी ॥22॥
मृत्यूचे सामर्थ्य अनिवार असल्यामुळे हे क्षेत्र व्यर्थच मृत्यूच्या स्वाधीन होईल, हे जाणून योगी देहाच्या आसक्तीने आयुमर्यादा वाढविण्यास निघाले.
23-13
मृत्युने आधिधिले । तिही निरंजन सेविले । यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥23॥
देहांच्या आसक्ती मृत्यूला पाहून घाबरलेले ते एकांतात जाऊन राहिले व त्यांनी नाना प्रकारच्या यमनियमांचे समुदाय आचरणात आणले.
24-13
येणेचि क्षेत्राभिमाने । राज्य त्यजिले ईशाने । गुंति जाणोनि स्मशाने । वासु केला ॥24॥
या देहाचा अभिमान धरूनच कैलासाचे राज्य करण्यात बंधन आहे, हे जाणून भगवान शंकराने कैलासाचा त्याग केला व स्मशानात वास केला.
25-13
ऐसिया पैजा महेशा । पांघुरणे दाही दिशा । लांचकर म्हणोनि कोळसा । कामु केला ॥25॥
अशा त्याग करण्याच्या या प्रतिज्ञेनेच शंकराला दिशा पांघराव्या लागल्या- म्हणजे दिगंबर होऊन राहावे लागले व कामोत्पादक वनशोभेची लाच देऊ पाहणार्‍या मदनाला जाळून शंकराने त्याचा कोळसा केला.
26-13
पै सत्यलोकनाथा । वदने आली बळार्था । तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥26॥
बुद्धीचे सामर्थ्य वाढवून क्षेत्रक्षेत्रज्ञाचा विचार करण्याकरिता ब्रह्मदेवाला चार तोंडे प्राप्त झाली, तरी त्याला क्षेत्राचा निर्णय करता आला नाही.

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥13. 4॥
अर्थ हे (क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान) ऋषींनी आणि छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वर्णन केले आहे. वेदातील बृहत्सामसूत्रांनी (ब्रह्मसूत्रांनी) व हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. ॥14॥
(जीववादी लोकांचे मत)
27-13
एक म्हणती हे स्थळ । जीवाचेचि समूळ । मग प्राण हे कूळ । तयाचै एथ ॥27॥
एक म्हणतात क्षेत्र हे स्थळ जीवाच्याच मालकीचे आहे आणि प्राण हा जीवरूपी मालकाची शेती वाहणारे कूळ आहे.
ज्याप्रमाणे जमिनीचा मालक माझी जमीन म्हणतो, म्हणून तो मालक होतो आणि जमिनीची वाही कूळ करते, त्याप्रमाणे जीव माझा देह म्हणतो, म्हणून येथे जीवाला देहाचा मालक म्हटले आहे आणि प्राण आहे तोपर्यंत देहाचे व्यापार चालतात, म्हणून प्राणाला कूळ म्हटले आहे.
हे स्थळ जीवाचेच समूळ – म्हणजे जीव हा क्षेत्राचा भोक्ता आहे. (कर्ता – म्हणजे कर्म करून कर्माप्रमाणे शरीर प्राप्त करून घेणारा व भोक्ता – म्हणजे कर्माप्रमाणे त्या शरीराचे द्वारा सुखदुःखाचा भोग भोगणारा. )
याप्रमाणे वस्तुतः असंग असलेल्या क्षेत्राज्ञाला कर्ता-भोक्ता मानून त्याच्याशी जडविनाशी क्षेत्राचा कधी नाहीसा न होणारा संबंध, मिमांसा दर्शनाने स्विकारला आहे.
28-13
जया प्राणाचा घरी । अंगे राबती भाऊ चारी । आणि मना ऐसा आवरी । कुळवाडीकर ॥28॥
ज्या प्राणाचे, अपान, व्यान, उदान, समान हे चार भाऊ अंगाने घरीच राबतात आणि येथे जीव, या मालकाच्या तर्फे शेतीची देखरेख करून शेती करणारे मन, हे वहिवाटदार आवारी आहे.
29-13
तयाते इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसी पहाटी । विषयक्षेत्री आटी । काढी भली ॥29॥
त्याच्या(मनाचे)जवळ ज्ञानेंद्रियरूप व कर्मेंद्रियरूप बैलाच्या जोड्या असून त्यांच्या सहाय्याने रात्र व दिवस न पाहता शब्दस्पर्शादि विषयरूप शेतात खूप श्रम करतो.
30-13
मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचे बीज वाफवी । कुकर्माचा करवी । राबु जरी ॥30॥
शास्त्रोक्तकर्मरूपी बीजाला ऊब न देता निषिध्दकर्मरूपी बीजालाच ऊब देऊन वाढविले व अशा रीतीने इंद्रियाकडून कुकर्म करण्याचे जर श्रम करविले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-13
तरी तयाचिसारिखे । असंभड पाप पिके । मग जन्मकोटी दुःखे । भोगी जीवु ॥31॥
तर त्या कुकर्मानुसार पापाचेच अपार पीक येऊन कोटीजन्मपर्यंत जीव दुःखच भोगित राहील.
32-13
नातरी विधीचिये वाफे । सत्क्रिया बीज आरोपे । तरी जन्मशताची मापे । सुखचि मवीजे ॥32॥
किंवा शास्रानुसार आचरणरूपी उचित सत्क्रियारूप बीज पेरले, तर शेकडो जन्माच्या मापाने जीव सुखच मोजित राहील.
33-13
तव आणिक म्हणती हे नव्हे । हे जिवाचेचि न म्हणावे । आमुते पुसा आघवे । क्षेत्राचे या ॥33॥
हे ऐकून दुसरे कित्येक म्हणतात, हे तुमचे म्हणणे बरोबर नाही. हे शरीर जीवाच्या मालकीचे आहे, असे म्हणू नका. या क्षेत्राविषयी जे काय विचारायचे आहे ते सर्व आम्हाला विचारा.
34-13
अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जाता । आणि प्राणु हा बलौता । म्हणौनि जागे ॥34॥
अहो ! जीव हा वाटेने जात असता या शरीराचे ठिकाणी घटकाभर वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा वतनदार असल्यामुळे क्षेत्रात जागल्याचे काम करतो. (जीव हा मुळात प्रकृतीहून निराळा असा असंग आहे; पण तो अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पावून जन्ममरणाच्या वाटेने जाताना क्षेत्राचा आश्रय करतो, हे ” वाटे जाता ” पदाने सुचविले आहे.
उखिता वस्तीकार – विवेकज्ञान उत्पन्न होईपर्यंतच त्याचा (जीवाचा) व देहाचा संबंध असतो हे ” उखिता वस्तीकार ” या पदाने सांगितले आहे.
35-13
अनादि जे प्रकृती । सांख्य जियेते गाती । क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा ॥35॥
सांख्य जिला प्रकृती म्हणतात ती अनादि असून क्षेत्र हे तिचे राहण्याचे ठिकाण आहे.
(सांख्यशास्राप्रमाणे मूळप्रकृती अनादि व अव्यक्त असल्यामुळे ती आपल्या मूळ अव्यक्त अवस्थेत गोचर होऊ शकत नाही. क्षेत्ररूप कार्यरूपानेच ती गोचर होते- म्हणजे प्रकृतिच क्षेत्ररूपाने प्रकट होते. )
36-13
आणि इयेतेचि आघवा । आथी घरमेळावा । म्हणौनि ते वाहिवा । घरी वाहे ॥36॥
आणि तिचे काम करण्याचा सर्व मेळावा घरचाच आहे; म्हणून ती घरीच सर्व वाहित करते.
37-13
वाह्याचिये रहाटी । जे का मुद्दल तिघे इये सृष्टी । ते इयेच्याचि पोटी । जहाले गुण ॥37॥
क्षेत्राची वाही करण्याच्या कामामध्ये मूलभूत जे या सृष्टीत तीन गुण आहेत, ते या प्रकृतीच्या पोटी उत्पन्न झाले आहेत.
38-13
रजोगुण पेरी । तेतुले सत्त्व सोंकरी । मग एकले तम करी । संवगणी ॥38॥
रजोगुण, कर्मरूपी बीजाची पेरणी करतो, सत्वगुण, जितकी पेरणी झाली तितक्याचे रक्षण करतो आणि मग यथाकाळी तमोगुण हा त्याची कापणी करतो. (प्रकृती ही आपल्या सत्व, रज, तम या तीन गुणांच्या द्वारा क्षेत्राची उत्पत्ती, स्थिती, लय करते, असा अर्थ)
39-13
रचूनि महत्तत्त्वाचे खळे । मळी एके काळुगेनि पोळे । तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भली ॥39॥
पुढे त्यापासून महत् तत्वाचे म्हणजे समष्टिबुध्दीचे खळे निर्माण होते आणि काळरूपी एकट्या बैलाने त्याची मळणी केली जाते. हे करीत असताना शेवटी अव्यक्तरूपी संध्याकाळ होते. (ज्याप्रमाणे खळ्यात धान्य एकत्र करून व त्याची मळणी करून धान्य व भूस निराळे केले जातात, त्याप्रमाणे बुद्धीच्या सहाय्याने बरे-वाईट, पुण्य-पाप अशी कर्माची विभागणी करून त्यांचे सृष्टीत कालांतराने सुखदुःखरूप फळ, प्रकृती पुरुषाला प्राप्त करून देते, असे होत होत शेवटी सर्व सृष्टी अव्यक्त प्रकृतीत लीन होते. या सांख्यमतांत पुरुष चेतन व असंग आहे. तो कर्म करीत नाही ! पण त्याच्या सान्निध्याने प्रकृतीकर्म करते व त्याच्या ठिकाणी अविवेक आहे, तोपर्यंत क्षेत्रान्तर्गतसुखदुःखाचा संबंध व विवेक झाल्यानंतर सुखाचा संबंध मानला असल्यामुळे त्याच्या(पुरुषाच्या) असंगत्वाला बाधा येते; म्हणून वेदान्त दृष्टीने पाहता, या मतातही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा योग्य झाला नाही, असे माऊलिंचे म्हणणे आहे. )
40-13
तव एकी मतिवंती । याबोलाचिया खंती । म्हणितलेया ज्ञप्ती । अर्वाचीना ॥40॥
हे सांख्यांचे मत ऐकून व त्या प्रतिपादनाची खंत वाटून बुद्धीमान योगी म्हणतात, अहो ! हे सर्व तुमचे ज्ञान अलीकडील आहे. (येथून आता माऊलि योगशास्त्राचे मत सांगत आहेत. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-13
हा हो परतत्त्वाआंतु । के प्रकृतीची मातु । हा क्षेत्र वृत्तांतु । उगेचि आइका ॥41॥
अहो; परतत्व म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या असंग अशा पुरुषाचे ठिकाणी संबंध कसा राहील ? ह्या क्षेत्राच्या उत्पत्तीचा वृत्तांत निवान्तपणे ऐका.
42-13
शून्यसेजेशालिये । सुलीनतेचिये तुळिये । निद्रा केली होती बळिये । संकल्पे येणे ॥42॥
शून्यसेजशालिये म्हणजे शून्यमय अव्यक्तदशेच्या शय्यागृहात भगवंताच्या सृष्टी निर्माण करणार्‍या इच्छारूप संकल्पाने लीनतेच्या गादीवर निद्रा केली होती.
(संसारतप्त जीवांचा, ज्ञानोपदेशद्वारा उध्दार करण्याकरिता आवश्यक असलेली शास्त्रे व बुद्धी, मन, इंद्रिये इत्यादि कार्यसृष्टीचा संहार होऊन पुनः ती निर्माण व्हावी म्हणून भगवान ” शुध्दसत्वात्मिकचित्त मी ग्रहण करीन ” असा संकल्प करतात व सृष्टीचा संहार होऊन त्या सृष्टी बरोबर भगवंताचा संकल्पही प्रकृतीच्या साम्यभावाला प्राप्त होतो- म्हणजे प्रकृतीत लीन होतो नंतर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मी सकाळी चार वाजता उठून अमुक काम करीन असा संकल्प करून निजतो व त्या संकल्पानुसार तो जागा होऊन ठरलेले काम करतो, त्याप्रमाणे प्रलयाचा अवधी संपल्यावर प्रकृतीत लीन असलेला हा भगवंताचा संकल्प अद्भूत होऊन भगवान सर्व सृष्टी निर्माण करतात. )
43-13
तो अवसांत चेइला । उद्यमी सदैव भला । म्हणौनि ठेवा जोडला । इच्छावशे ॥43॥
तो सर्गारंभी अकस्मात् जागा झाला आणि प्रयत्न करण्यात तो सदा तत्पर असल्यामुळे त्याने क्षेत्राचा ठेवा इच्छेने प्राप्त करून घेतला.
44-13
निरालंबीची वाडी । होती त्रिभुवनायेवढी । हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥44॥
ही अव्यक्तदशेची वाडी त्रिभुवनाएवढीच असल्यामुळे संकल्पाच्या सहाय्याने ती त्रिभुवनरूप कार्यरूपाने व्यक्त झाली.
45-13
मग महाभूतांचे एकवाट । सैरा वेटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥45॥
मग पंचमहाभूतरूप पडीत जमीन संपूर्ण एकत्र करून जीवाचे चार भाग निर्माण केले.
46-13
यावरी आदी । पांचभूतिकांची मांदी । बांधली प्रभेदी । पंचभूतिकी ॥46॥
यानंतर आधी पांचभौतिकाचा समुदाय पांचभौतिकरूपानेच निरनिराळ्या भेदाने विभागला गेला.
47-13
कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसके बरडे । राने केली ॥47॥
मनुष्यशरीररूपी क्षेत्राच्या दोहो बाजूला कर्म-अकर्मरूपी दगडांचे बांध घातले आणि ‘नपूंसकें’ – म्हणजे मनुष्याव्यतिरिक्त प्राणी नापीक जमीन बनविली.
(कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे ।
कर्माकर्म म्हणजे विधिनिषेध. हे कर्माकर्म मनुष्यप्राण्यांकरिताच सांगितले आहेत. मनुष्य, विहित कर्माप्रमाणे आचरण करून त्या पुण्याचे उत्कर्षरूप पीक प्राप्त करून घेतो व अकर्माचे आचरण करून पापजन्य दुर्गतिरूप पीक घेतो
नपुंसके बरडे । राने केली ॥नपूंसकें- म्हणजे मानवयोनी नाहीत अशा वृक्षादियोनी
बरडे राने केली -म्हणजे ज्यात क्रियमाण कर्म उत्पन्न होत नाही, अशा केल्या
मानवयोनिव्यतिरिक्त इतर पशुपक्ष्यादि योनीतील जीवांना, शास्त्राने कर्माकर्माचे किंवा धर्माधर्माचे विधान लागू केले नसल्यामुळे त्या योनीतील जीवांकडून पुण्यपापरूप क्रियमाण कर्म होत नाही; म्हणून त्या योनीतील कर्माने सूखदुःखरूप फळही मिळत नाही. केवळ प्रारब्धरूप झालेल्या पूर्वीच्या पापकर्मांचे सुखदुःखरूप फळ भोगणार्‍या त्या योनी आहेत, असा अर्थ.
48-13
तेथ येरझारेलागी । जन्ममृत्यूची सुरंगी । सुहाविली निलागी । संकल्पे येणे ॥48॥
मग जेथे लाग नाही त्या स्थितीत पुनः पुनः जन्ममरणाची येरझार करण्याकरिता या संकल्पाने जन्ममृत्यूंचे भुयार तयार केले.
49-13
मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविले बुद्धि । चराचर ॥49॥
मग आयुष्य आहे तोपर्यंत हा संकल्प अहंकाराशी ऐक्य करून बुद्धीकडून चराचराची वहिवाट करवितो-म्हणजे क्षेत्रज्ञाला कर्माच्या कर्तृत्वाचा व त्या कर्मानुसार सुखदुःखरूप फळाच्या भोगाचा अनुभव घ्यायला लावतो.
50-13
यापरी निराळी । वाढे संकल्पाची डाहाळी । म्हणौनि तो मुळी । प्रपंचा यया 50॥
याप्रमाणे शून्यरूपी अव्यक्तदशेत संकल्पाची डहाळी वाढली; म्हणून प्रपंचाला संकल्प मूळ कारण आहे.
(याप्रमाणे योगमतांत सत्वगुण, इच्छा, संकल्प, सृष्टी इत्यादि पदार्थ सत्य मानून त्यांचा क्षेत्रज्ञाशी संबंध मानला आहे; पण वेदान्तदर्शनाने क्षेत्रज्ञाला अद्वैतस्वरूप ठरवून तद्व्यतिरिक्त सर्वच मिथ्या मानले आहे. म्हणून वेदान्तदृष्टीने पाहता योगमतांतही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर झाला असे दिसत नाही. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-13
यापरी मत्तमुगुतकी । तेथ पडिघायिले आणिकी । म्हणती हा हो विवेकी । कैसे तुम्ही ॥51॥
याप्रमाणे निराधार मतांची मौक्तिके मुखातून बाहेर काढणार्‍यावर दुसर्‍यांनी प्रहार केले. ते म्हणतात, ” अहो ! तुम्ही कसा विचार करता ? “
52-13
परतत्त्वाचिया गावी । संकल्पसेज देखावी । तरी का पा न मनावी । प्रकृति तयाची ? ॥52॥
प्रकृतीच्या पलीकडे असणार्‍या तत्वांच्या ठिकाणी तुम्ही जर संकल्पशय्या पाहता तर मग त्याची प्रकृतीच का मानू नये ?
53-13
परि असो हे नव्हे । तुम्ही या न लगावे । आताचि हे आघवे । सांगिजैल ॥53॥
पण असो. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या मताचे भ्रांतीत पडू नये हे सर्व आता आम्ही सांगतो.
54-13
तरी आकाशी कवणे । केली मेघाची भरणे । अंतरिक्ष तारांगणे । धरी कवण ? ॥54॥
आकाशामध्ये मेघांचा भरणा कोण करतो ?अंतरिक्षात नक्षत्रे कोण धारण करतो ?
55-13
गगनाचा तडावा । कोणे वेढिला केधवा । पवनु हिंडतु असावा । हे कवणाचे मत ? ॥55॥
हे आकाशाचे छत कोणी केव्हा ताणून लावले ? वार्‍याने वाहत असावे ही कोणाची आज्ञा होय ?
56-13
रोमा कवण पेरी । सिंधू कवण भरी । पर्जन्याचिया करी । धारा कवण ॥56॥
शरीराचे ठिकाणी रोमरंध्रे कोण करतो ? समुद्र कोण भरतो ? पावसाच्या धारा कोण करतो ?
57-13
तैसे क्षेत्र हे स्वभावे । हे वृत्ती कवणाची नव्हे । हे वाहे तया फावे । येरा तुटे ॥57॥
याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतः कोणाच्या मालकीचे नसताना त्याची जो मालकी वागवितो, त्याला ते प्राप्त होते, जो मालकी वागवित नाही त्याचा संबंध तुटतो.
( ” ईश्वरः कारणं पुरुषकर्माफल्यदर्शनात् ” न्या. सू. 19-4-1 पुरुषाचे प्रयत्नरूप कर्म निष्फळ होताना दिसत असल्यामुळे ईश्वर निमित्तकारण आहे
न्यायमतांत परमेश्वर सृष्टीचे निमित्तकारण आहे व त्याच्या इच्छामात्रेकरून चतुर्विध भूतांच्या परमाणूंचा संयोग होऊन द्रव्याणुकादि क्रमाने सृष्टी उत्पन्न होते, असे मानले जाते.
याही मतांत शरीरादिक क्षेत्र सत्य असून त्याचा असंग अशा क्षेत्रज्ञाशी संबंध होतो व क्षेत्रज्ञाचे ठिकाणी इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख हे धर्म मानले असल्यामुळे या मतांतही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा योग्य विवेक झाला नाही. )
यानंतर माउलि क्षेत्राविषयी वैशेषिकांचे मत सांगत आहेत.
58-13
तव आणिके एके । क्षोभे म्हणितले निके । तरी भोगिजे एके । काळे केवी हे ? ॥58॥
तेव्हा हे ऐकून, दुसरे कित्येक क्षुब्ध होऊन म्हणतात, तुमचे म्हणणे जर खरे मानले, तर ते क्षेत्र एका काळाचेच स्वाधीन का दिसून येते ?
59-13
तरी ययाचा मारु । देखताति अनिवारु । परी स्वमती भरु । अभिमानियां ॥59॥
या काळाचा सर्वावर अचूक घाला पडतो; पण ते अभिमानाने आपल्या मतांवरच भर देतात.
60-13
हे जाणो मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा । परी काय वांजटा । पूरिजत असे ॥60॥
शरीर हे मृत्यूरूपी क्रुध्द सिंहाच्या राहण्याची दरी आहे, हे आपण सर्व जाणतो, पण काय करावे ? व्यर्थ बडबड करणार्‍याशी कधी पुरे पडता येते काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-13
महाकल्पापरौती । कव घालूनि अवचिती । सत्यलोकभद्रजाती । आंगी वाजे ॥61॥
या मृत्यूरूपी काळाने महाकल्पाच्या पलिकडेही अकस्मात मिठी मारून ब्रह्मलोकरूपी जो हत्ती त्याच्या ठिकाणीही तो प्राप्त झाला आहे.
62-13
लोकपाळ नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे । स्वर्गींचिये आडवे । रिगोनि मोडी ॥62॥
स्वर्गरूपी अरण्यात शिरून नवे लोकपाळ व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो.
63-13
येर ययाचेनि अंगवाते । जन्ममृत्यूचिये गर्ते । निर्जिवे होऊनि भ्रमते । जीवमृगे ॥63॥
बाकीचे जीवरूपी पशु यांच्या अंगच्या वार्‍यानेच निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या खोड्यात भ्रमत राहतात.
64-13
न्याहाळी पा केव्हडा । पसरलासे चवडा । जो करूनिया माजिवडा । आकारगजु ॥64॥
कालरूपी सिंहाने संपूर्ण आकाररूपी हत्ती आत साठवून केवढा मोठा चवडा पसरला आहे, पहा !
65-13
म्हणौनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता । ऐसे वाद पंडुसुता । क्षेत्रालागी ॥65॥
म्हणून या क्षेत्रावर काळाचीच सत्ता आहे, हेच म्हणणे योग्य आहे. अर्जुना ! या प्रमाणे क्षेत्राविषयी मते आहेत.
66-13
हे बहु उखिविखी । ऋषी केली नैमिषी । पुराणे इयेविषी । मतपत्रिका ॥66॥
असा हा पुष्कळ प्रकारचा वादविवाद ऋषींनी नैमिषारण्यात केला असून पुराणेही, या विषयीची मते दर्शविणार्‍या पत्रिका आहेत- म्हणजे पुराणांतूनही ही भिन्न भिन्न मते दर्शविली आहेत.
67-13
अनुष्टुभादि छंदे । प्रबंधी जे विविधे । ते पत्रावलंबन मदे । करिती अझुनी ॥67॥
(पुराणादि) प्रबंधांतून अनुष्टुभादि अनेक छंदांनी ह्या ज्या मतपत्रिका ग्रंथित केलेल्या आहेत, त्यांचे लोक आग्रहाने अवलंब करतात.
68-13
वेदींचे बृहत्सामसूत्र । जे देखणेपणे पवित्र । परी तयाही हे क्षेत्र । नेणवेचि ॥68॥
(ज्यात इंद्रादिकांचे परमेश्वररूपाने वर्णन आले तें. ) सामवेदांतील बृहत्सामसूत्र ईश्वराला अनुलक्षून स्तवन करणारे असल्यामुळे सर्व धर्मांपेक्षा ते अत्यंत पवित्र करणारे आहे, हे खरे; पण त्यालाही या क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर समजला नाही.
69-13
आणीक आणीकीही बहुती । महाकवी हेतुमंती । ययालागी मती । वेचिलिया ॥69॥
आणखी उपपत्तिपूर्वक प्रतिपादन करणार्‍या पुष्कळ महान् कवींनी या क्षेत्राचा ऊहापोह करण्यात आपली बुद्धी चालविली आहे.
70-13
परी ऐसे हे एवढे । की अमुकेयाचेचि फुडे । हे कोणाही वरपडे । होयचिना ॥70॥
पण क्षेत्र हे असे आहे, एवढे आहे किंवा अमक्याचे आहे, हे कोणालाही निःसंशय कळून आले नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-13
आता यावरी जैसे । क्षेत्र हे असे । तुज सांगो तैसे । साद्यंतु गा ॥71॥
अर्जुना ! आता यानंतर हे क्षेत्र जसे आहे तसे तुला संपूर्ण सांगतो.

महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥13. 5॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥13. 6॥
अर्थ पाच महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त (मूलप्रकृती) दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादि दहा विषय, ॥13-5॥
अर्थ इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे. ॥13-6॥
(क्षेत्राची सामान्य माहिती, छत्तीस तत्वांनी क्षेत्र बनले आहे)
72-13
तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥72॥
तरी पाच सूक्ष्म महाभूते आणि एक अहंकार, बुद्धी, अव्यक्त व दहा इंद्रिये,
73-13
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु । सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥73॥
आणखी एक मन दहा इंद्रियांचे दहा विषय, द्वेष, सुख, दुःख, संघात, इच्छा,
74-13
आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती । सांगितली तुजप्रती । आघवीची ॥74॥
चेतना व धृती याप्रमाणे क्षेत्राचे संपूर्ण स्वरूप सांगितले.
75-13
आता महाभूते कवणे । कवण विषयो कैसी करणे । हे वेगळालेपणे । एकैक सांगो ॥75॥
आता महाभूते कोणती, विषय कोणते व इंद्रिये कशी आहेत हे तुला एक एक वेगवेगळेपणाने सांगतो.
76-13
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इये तुज । सांगितली बुझ । महाभूते पांचे ॥76॥
तरी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही तुला सांगितलेली पाच महाभूते होत, असे समज.
77-13
आणि जागतिये दशे । स्वप्न लपाले असे । नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥77॥
आणि ज्याप्रमाणे जागृतीअवस्थेत स्वप्न लपलेले असते किंवा अमावास्येला चंद्र गुप्त असतो,
78-13
नाना अप्रौढबाळकी । तारुण्य राहे थोकी । का न फुलता कळिकी । आमोदु जैसा ॥78॥
अथवा प्रौढ दशेला न आलेल्या मुलाचे ठिकाणी तारूण्य दडलेले असते किंवा न फुललेल्या कळीचे ठिकाणी सुगंध जसा गुप्त असतो.
79-13
किंबहुना काष्ठी । वन्हि जेवी किरीटी तेवी प्रकृतिचिया पोटी । गोप्यु जो असे ॥79॥
एवढेच नाही, तर लाकडांचे ठिकाणी, अर्जुना अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे मूळ प्रकृतीच्या ठिकाणी जो गुप्त असतो,
80-13
जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचे मिष पहातु । मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी ॥80॥
ज्याप्रमाणे धातूगत ज्वर केवळ कुपथ्याचे निमित्त पाहत असतो आणि मग कुपथ्य झाल्याबरोबर शरीराच्या आत-बाहेर तो व्यापतो
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-13
तैसी पाचाही गाठी पडे । जै देहाकारु उघडे । तै नाचवी चहूकडे । तो अहंकारु गा ॥81॥
त्याप्रमाणे पाचही भूतांची एकत्र गाठ पडून, जेव्हा देहाचा आकार व्यक्त होतो, तेव्हा जो जीवाला चहूकडून नाचवितो, तोच अहंकार होय
82-13
नवल अहंकाराची गोठी । विशेषे न लगे अज्ञानापाठी । सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥82॥
या अहंकाराची अशी गंमत आहे की तो विशेषतः अज्ञान्याच्या पाठीस लागत नाही; पण तो सज्ञान्याच्या कंठास झोंबून नाना संकटात पाडतो.
83-13
आता बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशिया चिन्ही जाणिजे । बोलिले यदुराजे । ते आइके सांगो ॥83॥
आता जिला बुद्धी म्हणतात, ती अशा लक्षणावरून जाणावी, असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले, तेच आता सांगतो, ऐक.
84-13
तरी कंदर्पाचेनि बळे । इंद्रियवृत्तीचेनि मेळे । विभांडूनि येती पाळे । विषयांचे ॥84॥
प्रबळ झालेल्या कामवासनेने इंद्रिये, वृत्तीच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकून येतात म्हणजे विषयांचा भोग घेऊन येतात.
85-13
तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उगाणो लागे जीवा । तेथ दोहीसी बरवा । पाडु जे धरी ॥85॥
जीवाला ज्या सुखदुःखांच्या लुटीचा अनुभव येतो, त्या दोघांचा जी अगदी बरोबर भेद दाखविते,
86-13
हे सुख हे दुःख । हे पुण्य हे दोष । का हे मैळ हे चोख । ऐसे जे निवडी ॥86॥
हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे मलीन, हे शुध्द अशी जी निवड करते,
87-13
जिथे अधमोत्तम सुझे । जिये साने थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विषो जीवे ॥87॥
जिला उत्तम, कनिष्ठ हे समजते, जिला लहान, मोठे समजते, अशा रीतीने जिच्या दृष्टीच्या सहाय्याने जीव विषयाची परीक्षा करतो,
88-13
जे तेजतत्त्वांची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी । जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे जे ॥88॥
जी ज्ञानेंद्रियांचे कारण आहे, जी सत्वगुणाचा उत्कर्ष होय आणि जी आत्मा व जीव यांच्या संधीत राहते, (जीवाच्या ठिकाणी जी जाणीवरूप ज्ञानवृत्ती स्फुरते, ती बुध्दी होय, असे येथे बुध्दीचे लक्षण केले आहे. या बुध्दीत सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे मी मुळात निर्मळ आहे. म्हणूनच तिच्यात ज्ञानरूप आत्मा प्रतिबिंबित होतो. त्या ज्ञानप्रकाशाने युक्त असलेली बुद्धीवृत्ती आपल्या पलीकडे असलेल्या शुद्ध आत्मस्थितीला व अलीकडे असलेल्या जीवस्थितीला जाणत असते, म्हणूनच ती आत्मा व जीव यांच्या संधीत असते, असे म्हटले आहे. )
89-13
अर्जुना ते गा जाण । बुद्धि तू संपूर्ण । आता आइके वोळखण । अव्यक्ताची ॥89॥
अर्जुना ! ही सर्व बुध्दी आहे, असे जाण. आता अव्यक्ताची ओळख ऐक.
90-13
पै सांख्यांचिया सिद्धांती । प्रकृती जे महामती । तेचि एथे प्रस्तुती । अव्यक्त गा ॥90॥
हे बुद्धीमान अर्जुना ! सांख्यवाद्यांनी आपल्या सिद्धांतात जडविनाशी क्षेत्राचे कारण म्हणून जी प्रकृती मानली आहे, तीच येथे प्रस्तुत ‘अव्यक्त’ या शब्दाने सांगितली आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-13
आणि सांख्ययोगमते । प्रकृती परिसविली तूते । ऐसी दोही परी जेथे । विवंचिली ॥91॥
सांख्य व योग यांच्या मताप्रमाणे प्रकृतीचे स्वरूप तुला ऐकविलेच आहे आणि तेथे, ती दोन प्रकारची आहे, हेही सांगितले गेले.
92-13
तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा । येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा ॥92॥
तेथे दुसरी जी जीवदशा म्हणून पराप्रकृती सांगितली, तिलाच हे वीरश्रेष्ठा ! येथे ‘अव्यक्त’ हा पर्यायी शब्द आहे.
93-13
तऱ्ही पाहालया रजनी । तारा लोपती गगनी । का हारपे अस्तमानी । भूतक्रिया ॥93॥
रात्र संपून उजाडल्यावर आकाशात तारे नाहीसे होतात किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यापार बंद पडतात.
94-13
नातरी देहो गेलिया पाठी । देहादिक किरीटी । उपाधि लपे पोटी । कृतकर्माच्या ॥94॥
किंवा हे अर्जुना ! देह नाहीसा झाला की, पूर्वी केलेल्या कर्माच्या पोटातच देहादिक उपाधी लीन होतात,
95-13
का बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । का वस्त्रपणे तंतु । दशे राहे ॥95॥
किंवा बीजाच्या आकारातच संपूर्ण वृक्ष गुप्त असतो किंवा सुताच्या दशेत वस्त्रपण गुप्त राहते,
96-13
तैसे सांडोनिया स्थूळधर्म । महाभूते भूतग्राम । लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥96॥
त्याप्रमाणे संपूर्ण पंचमहाभूते व सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून देऊन व सूक्ष्म होऊन जेथे लय पावतात,
97-13
अर्जुना तया नांवे । अव्यक्त हे जाणावे । आता आइके आघवे । इंद्रियभेद ॥97॥
अर्जुना ! त्या स्थितीला ‘अव्यक्त’ या नावाने जाण. आता इंद्रियांचे संपूर्ण भेद ऐक.
98-13
तरी श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन । इये जाणे ज्ञान- । करणे पांचे ॥98॥
तरी कान, डोळे, त्वचा, घ्राण, जिह्वा, ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे जाण.
99-13
इये तत्त्वमेळापंकी । सुखदुःखांची उखिविखी । बुद्धि करिते मुखी । पांचे इही ॥99॥
या छत्तीस तत्वांच्या समुदायरूपी चिखलात या पाच ज्ञानेंद्रियरूप मुखांच्या द्वारा बुद्धी सुखदुःखाचा निवाडा करते.
100-13
मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार । पांच आणिक ॥100॥
मग वाणी, हात, पाय, गुदद्वार, उपस्थ असे आणखी पाच प्रकार आहेत,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


101-13
कर्मेंद्रिये म्हणिपती । ती इये जाणिजती । आइके कैवल्यपती । सांगतसे ॥101॥
कैवल्य देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. अर्जुना ! ऐक. ज्यांना कर्मेंद्रिंय म्हणतात, ती ही जाण.
102-13
पै प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरी । तियेचि रिगिनिगी द्वारी । पांचे इही ॥102॥
प्राणाची पत्नी म्हणून जी क्रियाशक्ती या शरीराचे ठिकाणी आहे. जिचे आत येणे व बाहेर जाणे या पाच कर्मेंद्रियांच्या द्वारा होत असते.
103-13
एवं दाहाही करणे । सांगितली देवो म्हणे । परिस आता फुडेपणे । मन ते ऐसे ॥103॥
देव म्हणतात, याप्रमाणे तुला दहा इंद्रिये कोणती ती सांगितली. आता मन स्पष्टपणे असे आहे, ते ऐक.
104-13
जे इंद्रिया आणि बुद्धि । माझारिलिये संधी । रजोगुणाच्या खांदी । तरळत असे ॥104॥
जे मन इंद्रिये आणि बुद्धि यांच्या मधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर (आश्रयावर) चंचलपणे असते,
105-13
नीळिमा अंबरी । का मृगतृष्णालहरी । तैसे वायाचि फरारी । वावो जाहले ॥105॥
आकाशात जसा निळा रंग किंवा मृगाला तहानेमुळे भासणारी जशी जलाची लहरी, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ स्फुरण झाले (त्यालाच मन हे नाव आहे. )
106-13
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळता पांचांचा बांधा । वायुतत्त्व दशधा । एकचि जाहले ॥106॥
आणि पुरुषाचे रेत व स्रियांचे शोणित यांचे मिश्रण होऊन पाच महाभूतांचा बांधा जे शरीर ते उत्पन्न झाले असता एकच वायूतत्व दहा प्रकारचे होते.
107-13
मग तिही दाहे भागी । देहधर्माच्या खैवंगी । अधिष्ठिले आंगी । आपुलाल्या ॥107॥
मग त्या दहा भागांनी आपापल्या अंगाचा, देहधर्माच्या सामर्थ्याला आश्रय दिला.
108-13
तेथ चांचल्य निखळ । एकले ठेले निढाळ । म्हणौनि रजाचे बळ । धरिले तेणे ॥108॥
तेथे त्या मनाचे ठिकाणी एक निव्वळ चंचलताच राहिली, म्हणून ते एकटेच राहिले त्याने रजोगुणाचेच बळ धरले.
109-13
ते बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । ऐसा ठायी माझारी । बळियावले ॥109॥
ते बुध्दीच्या नंतर व अहंकाराच्या पूर्वी असे मध्यसंधीत बळकट झाले आहे. (ते बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । – कल्पना करणारे मन बुध्दीच्या ज्ञानाने जाणले जाऊन बुध्दीचा विषय होते, म्हणून ते बुध्दीच्या बाहेर आणि कल्पनारूप मन स्फुरल्यानंतर त्याचा अहंकार धरला जातो, म्हणून उरावर अहंकाराच्या पूर्वी, असे बुध्दीच्या आणि अहंकाराच्या संधीत मनाची शक्ती बळकट होते, असे सांगितले आहे. )
110-13
वाया मन हे नांव । एऱ्हवी कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगे जीव- । दशा वस्तु ॥110॥
त्याला मन हे व्यर्थच नाव आहे. खरोखर मन म्हणजे कल्पनाच होय. ज्याच्या संगतीने परब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-13
जे प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ । जे अखंड सूये छळ । अहंकारासी ॥111॥
जे सर्व कर्मप्रवृत्तीचे कारण आहे, ज्याच्यामुळे कामवासना ही बलवान होते आणि जी अहंकाराला नेहमी उसळविते,
112-13
जे इच्छेते वाढवी । आशेते चढवी । जे पाठी पुरवी । भयासि गा ॥112॥
जे इच्छा वाढविते, आशेची वृध्दी करते, जे भयाला वाढविते,
113-13
द्वैत जेथे उठी । अविद्या जेणे लाठी । जे इंद्रियाते लोटी । विषयांमजी ॥113॥
केवळ ज्याच्या योगाने द्वैत भासते, ज्याच्या योगाने आत्मविस्मृतिरूप अविद्या दृढ होते, जे इंद्रियांना विषयात घालते,
114-13
संकल्पे सृष्टी घडी । सवेचि विकल्पूनि मोडी । मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥114॥
जे नुसत्या संकल्पाने म्हणजे ‘आहे’ या कल्पनेने- सृष्टी उत्पन्न करते व लगेच नाही अशी कल्पना करून सृष्टी नाहीशी करते, याप्रमाणे नानाप्रकारच्या मनोरथांच्या उतरंडी रचते व खाली करते,
115-13
जे भुलीचे कुहर । वायुतत्त्वाचे अंतर । बुद्धीचे द्वार । झाकविले जेणे ॥115॥
जे भ्रमाचे कोठार असून वायुतत्वाचे आतील अंग आहे आणि बुध्दीचे आत्मज्ञानरूपी द्वारे ज्याने झाकले आहे,
116-13
ते गा किरीटी मन । या बोला नाही आन । आता विषयाभिधान । भेदू आइके ॥116॥
अर्जुना, ते मन होय. यात अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक.
117-13
तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रसु गंधु । हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा ॥117॥(विषय 117 पासून)
तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेद्रिंयांचे पाच प्रकारचे विषय आहेत.
118-13
इही पांचैं द्वारी । ज्ञानासि धाव बाहेरी । जैसा का हिरवे चारी । भांबावे पशु॥118॥
या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते, ते कसे ? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामधे जनावरे भांबावतात (तसे ज्ञान भांबावते).
119-13
मग स्वर वर्ण विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु । संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥119॥
मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे, अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे
120-13
हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच । जे बांधोनिया माच । क्रिया धावे ॥120॥
हे पाच कर्मेद्रिंयांचे पाच प्रकारचे विषय खरे आहेत व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू रहातो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
(याप्रमाणे हे दहा विषय या देहामधे आहेत. इच्छा = 121-पासून)
121-13
ऐसे हे दाही । विषय गा इये देही । आता इच्छा तेही । सांगिजैल ॥121॥
याप्रमाणे हे दहा विषय या देहामधे आहेत. व आता इच्छा काय, तेही सांगण्यात येईल.
122-13
तरि भूतले आठवे । का बोले कान झांकवे । ऐसियावरि चेतवे । जेगा वृत्ती ॥122॥
तर मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसर्‍याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात, अशाने जी वृत्ती जागी होते
123-13
इंद्रियाविषयांचिये भेटी । सरसीच जे गा उठी । कामाची बाहुटी । धरूनिया ॥123॥
इंद्रिये व विषय यांची भेट होताक्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते
124-13
जियेचेनि उठिलेपणे । मना सैंघ धावणे । न रिगावे तेथ करणे । तोंडे सुती ॥124॥
जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात,
125-13
जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी । विषया जिया गोडी । ते गा इच्छा ॥125॥
ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा (असे तू समज).
126-13
आणी इच्छिलिया सांगडे । इंद्रिया आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥126॥(द्वेष = 126)
आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती, तिला द्वेष असे म्हणतात.
127-13
आता यावरी सुख । ते एवंविध देख जेणे एकेचि अशेख । विसरे जीवु ॥127॥(सुख व दु:ख = 127)
आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो,
128-13
मना वाचे काये । जे आपुली आण वाये । देहस्मृतीची त्राये । मोडितजे ये ॥128॥
जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, (व्यापार बंद करते) आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते,
129-13
जयाचेनि जालेपणे । पांगुळा होईजे प्राणे । सात्त्विकासी दुणे । वरीही लाभु ॥129॥
जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा (शांत) होतो व सात्विकवृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीचे वर चढत जाते,
130-13
का आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचिया एकांती व । थापटूनि सुषुप्ती । आणी जे गा ॥130॥
आणि अर्जुना, जे सर्व इंद्रियवृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थापटून निद्रा आणते
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-13
किंबहुना सोये । जीवआत्म्याचीलागे । तेथ जे होये । तया नाम सुख ॥131॥
फार काय सांगावे ?जीवाला आत्म्याचा लाभ(ऐक्य)जेथे प्राप्त होतो, तेथे जी स्थिती होते, त्या स्थितीला सुख हेनाव आहे.
132-13
आणि ऐसी हे अवस्था । न जोडता पार्था । जे जीजे तेचि सर्वथा । दुःख जाणे ॥132॥
आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दु:ख आहे असे समज.
133-13
ते मनोरथसंगे नव्हे । एऱ्हवी सिद्धी गेलेचि आहे । हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥133॥
ते सुख मनोरथांच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी (मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की) ते स्वत: सिद्ध आहेच. हे दोनच उपाय (मनाची स्थिरता व मनाची चंचलता) सुखदुखाला कारणीभूत आहेत.
134-13
आता असंगा साक्षिभूता । देही चैतन्याची जे सत्ता । तिये नाम पंडुसुता । चेतना येथे ॥134॥
(चेतना = 134)अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामधे जी सत्ता आहे, तिला येथे चेतना हे नाव आहे.
135-13
जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरी । जे तिही अवस्थांतरी । पालटेना ॥135॥
जी पायांच्या नखापासून तो मस्तकाच्या केसापर्यंत नेहेमी खडखडीत जागी असते आणि जी तिन्ही अवस्थांमधे बदलत नाही,
136-13
मनबुद्ध्यादि आघवी । जियेचेनि टवटवी । प्रकृतिवनमाधवी । सदाचि जे ॥136॥
मन व बुद्धी जिच्या योगाने प्रसन्न असतात. व जी नेहेमी प्रकृती(शरीर) रूपी वनाचा वसंतऋतू आहे,
137-13
जडाजडी अंशी । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसी । लटिके नाही ॥137॥
बद️ जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते, ती अर्जुना चेतना होय, हे मी तुला खोटे सांगत नाही.
138-13
पै रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । का चंद्राचेनि पूर्णपणे । सिंधू भरती ॥138॥
आपला लवाजमा वगैरे किती आहे, जे राजास ठाऊक नसताही त्याचीआज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते, अथवा पूर्ण चंद्राच्या योगाने समुद्रास जशी भरती येते (पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते)
139-13
नाना भ्रामकाचे सन्निधान । लोहो करी सचेतन । का सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥139॥
अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास सचेतन करते (हालचाल करावयास लावते) अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते,
140-13
अगा मुख मेळेविण । पिलियाचे पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवी ॥140॥
अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पहाण्याने करते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-13
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरी । सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥141॥
अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती, ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते, (म्हणजे जडाला चेतनदशेला आणते).
142-13
मग तियेते चेतना । म्हणिपे पै अर्जुना । आता धृतिविवंचना । भेदू आइक ॥142॥
याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतनदशेला आणल्याकारणाने त्या आत्मसत्तेला ‘चेतना ” असे म्हटले जाते.
(धैर्य = 142) आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक.
143-13
तरी भूता परस्परे । उघड जातिस्वभाववैरे । नव्हे पृथ्वीते नीरे । न नाशिजे ॥143॥
तर पंचमहाभूतांमधे एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करत नाही काय ?
144-13
नीराते आटी तेज । तेजा वायूसि झुंज । आणि गगन तव सहज । वायू भक्षी ॥144॥
पाण्याला तेज आटवून टाकते, तेजाचे व वायूचे वैर आहे आणि आकाश तर सहज (स्वभावत:च) वायूला नाहीसा करते.
145-13
तेवीचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे । आंतु रिगोनि वेगळे । आकाश हे ॥145॥
त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमधे शिरून पुन्हा सर्वाहून स्वरूपत: अलग असते ते आकाश होय.
146-13
ऐसी पांचही भूते । न साहती एकमेकांते । की तियेही ऐक्याते । देहासी येती ॥146॥
अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत, असे त्यांचे स्वभावत: वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात.
147-13
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकी । एकेकाते पोखी । निजगुणे गा ॥147॥
म्हणजे द्वंद्वाची उखीविखी (वैराविषयी वादविवाद) सोडून एकोप्याने रहातात. इतकेच नाही तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसर्‍याला पोषित असतो.
148-13
ऐसे न मिळे तया साजणे । चळे धैर्ये जेणे । तया नांव म्हणे । धृती मी गा ॥148॥
याप्रमाणे ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याचे नाव धृति असे मी म्हणतो.
149-13
आणि जीवेसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पै गा ॥149॥
आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय हा समुदाय येथे छत्तिसावे संघात नावाचे तत्व जाणावे.
150-13
एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलियाते प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥150॥
या छत्तीस तत्वांनी युक्त ते क्षेत्र = याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र असे म्हणतात हे प्रसिद्ध आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-13
रथांगांचा मेळावा । जेवी रथु म्हणिजे पांडवा । का अधोर्ध्व अवेवा । नांव देहो ॥151॥
चाक, जू वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास, अर्जुना, ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा (शरीराच्या) वरच्या व खालच्या अवयवांना एकत्र मिळून जसे देह हे नाव येते,
152-13
करीतुरंगसमाजे । सेना नाम निफजे । का वाक्ये म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥152॥
हत्ती, घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्ये म्हणतात
153-13
का जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोका सकळा । नाम जग ॥153॥
अथवा ढगांचा समुदाय, आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते,
154-13
का स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानी । धरिजे तो जनी । दीपु होय ॥154॥
अथवा तेल, वात व अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो,
155-13
तैसी छत्तीसही इये तत्त्वे । मिळती जेणे एकत्वे । तेणे समूह परत्वे । क्षेत्र म्हणिपे ॥155॥
त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते.
156-13
आणि वाहतेनि भौतिके । पाप पुण्य येथे पिके । म्हणौनि आम्ही कौतुके । क्षेत्र म्हणो ॥156॥
लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पाप-पुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो.
157-13
आणि एकाचेनि मते । देह म्हणती ययाते । परी असो हे अनंते । नामे यया॥157॥
कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत.
158-13
पै परतत्त्वाआरौते । स्थावराआंतौते । जे काही होते जाते । क्षेत्रचि हे ॥158॥
परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय.
159-13
परि सुर नर उरगी । घडत आहे योनिविभागी । ते गुणकर्मसंगी । पडिले साते ॥159॥
परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते.
160-13
हेचि गुणविवंचना । पुढा म्हणिपैल अर्जुना । प्रस्तुत आता तुज ज्ञाना । रूप दावू ॥160॥
ज्ञान = अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे (अध्याय 14 मधे) सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-13
क्षेत्र तव सविस्तर । सांगितले सविकार । म्हणौनि आता उदार । ज्ञान आइके ॥161॥
क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले. म्हणून आता उदार ज्ञान ऐक.
162-13
जया ज्ञानालागी । गगन गिळिताती योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥162॥
ज्ञानाकरता केले जाणारे प्रयत्न = ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात. (म्हणजे मूर्ध्निआकाशाचा लय करतात).
163-13
न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगा{ऐ}से दुवाड । हेळसिती ॥163॥
(ज्या ज्ञानाकरता योगी) सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात.
164-13
तपोदुर्गे वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥164॥
(ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक) तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यवधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानांतून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापालथ करून (आचरण करून) त्याचा त्याग करतात.
165-13
नाना भजनमार्गी । धावत उघडिया आंगी । एक रिगताति सुरंगी । सुषुम्नेचिये ॥165॥
अथवा (ज्या ज्ञानाकरता) कित्येक उघड्या अंगांनी (अंतर्बाह्य परिग्रह टाकून) भजनमार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात.
166-13
ऐसी जिये ज्ञानी । मुनीश्वरांची उतान्ही । वेदतरूच्या पानोवानी । हिंडताती ॥166॥
याप्रमाणे मुनीश्वरांस ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात (म्हणजे संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात)
167-13
देईल गुरुसेवा । इया बुद्धि पांडवा । जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे ॥167॥
अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात, (जन्मभर गुरुसेवा करतात).
168-13
जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणे आणी । जीवा आत्मया बुझावणी । मांडूनि दे ॥168॥
ज्ञानाचे कार्य = 168ऱ्ह्या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो,
169-13
जे इंद्रियांची द्वारे आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जे दैन्यचि फेडी । मानसाचे ॥169॥
जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते
170-13
द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचे सुयाणे होये । जया ज्ञानाची सोये । ऐसे करी. ॥170॥
द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-13
मदाचा ठावोचि पुसी । जे महामोहाते ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाष उरो ॥171॥
जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व (जे) आपले आणि दुसर्‍याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही,
172-13
जे संसाराते उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी । अनावराते वेटाळी । ज्ञेयाते जे ॥172॥
अर्जुना जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते.
173-13
जयाचेनि जालेपणे । पांगुळा होईजे प्राणे । जयाचेनि विंदाणे । जगहे चेष्टे ॥173॥
जे ज्ञान प्राप्त झाले असता प्राणही स्थिर होतो व ज्या ज्ञानाच्या सत्तेने जगातील व्यापार चालतात.
173-13
जयाचेनि उजाळे । उघडती बुद्धीचे डोळे । जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥173अ॥
ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो
175-13
ऐसे जे ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळले मन । चोख कीजे ॥175॥
असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे(जे प्राप्त झाले असता)(विषयाने)विटाळलेले मन शुद्ध करता येते
176-13
आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥176॥
देह बुद्ध्यादि अनात्म पदार्थ मी आहे (म्हणजे मी जीव आहे) असा (भ्रमाचा) क्षयरोग आत्म्याला जो झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो.
177-13
ते अनिरूप्य की निरूपिजे । ऐकता बुद्धी आणिजे । वाचूनि डोळा देखिजे । ऐसे नाही ॥177॥
(ज्ञान दाखवता येत नाही. लक्षणांवरून ओळखावे लागते. ) ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला जाणता येईल. त्याशिवाय डोळ्यांनी पहाता येईल असे ते ज्ञान नाही.
178-13
मग तेचि इये शरीरी । जै आपुला प्रभावो करी । तै इंद्रियांचिया व्यापारी । डोळाहि दिसे ॥178॥
मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रगट करते, तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते.
179-13
पै वसंताचे रिगवणे । झाडाचेनि साजेपणे । जाणिजे तेवी करणे । सांगती ज्ञान ॥179॥
वसंताचा प्रवेश झाडाच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात.
180-13
अगा वृक्षासि पाताळी । जळ सांपडे मुळी । ते शाखांचिये बाहाळी । बाहेर दिसे ॥180॥
अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमधे पाणी सापडते. (ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही)तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-13
का भूमीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचारगौरव । सुकुलीनाचे ॥181॥
अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो.
182-13
अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्ति । का दर्शनाचिये प्रशस्ती । पुण्यपुरुष ॥182॥
अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो किंवा दर्शनाने होणार्‍या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो.
183-13
नातरी केळी कापूर जाहला । जेवी परिमळे जाणो आला । का भिंगारी दीपु ठेविला । बाहेरी फाके ॥183॥
अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो
184-13
तैसे हृदयीचेनि ज्ञाने । जिये देही उमटती चिन्हे । तिये सांगो आता अवधाने । चागे आइक ॥184॥
त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक.

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥13. 7॥
अर्थ अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्वसहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, (आंतर व बाह्य) शुद्धि, स्थैर्य, अंत:करणनिग्रह –
185-13
तरी कवणेही विषयींचे । साम्य होणे न रुचे । संभावितपणाचे । वोझे जया ॥185॥
तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे, त्याला आवडत नाही, आणि मोठेपणाचेही त्याला ओझे वाटते.
186-13
आथिलेचि गुण वानिता । मान्यपणे मानिता । योग्यतेचे येता । रूप आंगा ॥186॥
त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर अथवा लोकांनी मागण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर,
187-13
तै गजबजो लागे कैसा । व्याधे रुंधला मृगु जैसा । का बाही तरता वळसा । दाटला जेवी ॥187॥
त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरीण घाबरे होते अथवा हातांनी पोहून जात असता, तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवर्‍यात सापडावा.
188-13
पार्था तेणे पाडे । सन्माने जो सांकडे । गरिमेते आंगाकडे । येवोचि नेदी ॥188॥
अर्जुना, तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही.
189-13
पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानी नायकावी । हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोका ॥189॥
आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये, हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये.
190-13
तेथ सत्काराची के गोठी । के आदरा देईल भेटी । मरणेसी साटी । नमस्कारिता ॥190॥
असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे ? (म्हणजे अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल ?) असा मनुष्य आदराला भेट कशी देईल ? (म्हणजे आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल ? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-13
वाचस्पतीचेनि पाडे । सर्वज्ञता तरी जोडे । परी वेडिवेमाजी दडे । महिमेभेणे ॥191॥
बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्वाच्या भीतीने तो वेडात लपतो.
192-13
चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनि ॥192॥
आपले ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो, आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो. व मोठ्या आवडीने वेडेपण लोकात दाखवतो.
193-13
लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । उगेपणी चांगु । आथी भरु ॥193॥
लोकात होणार्‍या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगी राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो.
194-13
जगे अवज्ञाचि करावी । संबंधी सोयचि न धरावी । ऐसी ऐसी जीवी । चाड बहु ॥194॥
लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये (आपल्या नादी लागू नये) अशा प्रकारची ज्याच्या जीवामधे फार इच्छा असते.
195-13
तळौटेपण बाणे । आंगी हिणावो खेवणे । ते तेचि करणे । बहुतकरुनी ॥195॥
ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वत:च्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्याच गोष्टी बहुतेक तो करतो.
196-13
हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणे भावे । तैसे जिणे होआवे । ऐसी आशा ॥196
ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते.
197-13
पै चालतु का नोहे । की वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसे होईजे ॥197॥
पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही, किंवा वार्‍यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे त्यास वाटते.
198-13
माझे असतेपण लोपो । नामरूप हारपो । मज झणे वासिपो । भूतजात ॥198॥
माझ्या असतेपणाचा लोप व्हावा (म्हणजे मी एक अमुक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये). माझे नाव व रूप नाहीसे व्हावे (म्हणजे माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळयांसमोर येऊ नये), कदाचित मला पाहून प्राणिमात्र भितील तर तसे होऊ नये
199-13
ऐसी जयाची नवसिये । जो नित्य एकांता जातु जाये । नामेचि जो जिये । विजनाचेनि ॥199॥
याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामधे जात असतो व एकांताच्या नावानेच तो जगतो (म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो).
200-13
वायू आणि तया पडे । गगनेसी बोलणे आवडे । जीवे प्राणे झाडे । पढियंती जया ॥200॥
वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते. (त्यास बोलण्याचा कंटाळा असतो) व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-13
किंबहुना ऐसी । चिन्हे जया देखसी । जाण तया ज्ञानेसी । शेज जाहली ॥13-201॥
फार काय सांगावे ? अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज.
202-13
पै अमानित्व पुरुषी । ते जाणावे इही मिषी । आता अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवो ॥13-202॥
साधकामधे असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा.
2) अदंभित्व, आता अदंभाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो.
203-13
तरी अदंभित्व ऐसे । लोभियाचे मन जैसे । जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो ॥13-203॥
तर ऐक. अदंभित्व असे आहे, ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही.
204-13
तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटी । तरी सुकृत न प्रकटी । आंगे बोले ॥13-204॥
अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही.
205-13
खडाणे आला पान्हा । पळवी जेवी अर्जुना । का लपवी पण्यांगना । वडिलपण ॥13-205॥
खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयाने रहाते काय ? तर नाही, मग ती आपले उतार वय झाकते.
206-13
आढ्यु आतुडे आडवी । मग आढ्यता जेवी हारवी । नातरी कुळवधू लपवी । अवेवांते ॥13-206॥
श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते,
207-13
नाना कृषीवळु आपुले । पांघुरवी पेरिले । तैसे झांकी निपजले । दानपुण्य ॥13-207॥
अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो, तसेच तो आपण केलेले दान पुण्य झाकून ठेवतो.
208-13
वरिवरी देहो न पूजी । लोकाते न रंजी । स्वधर्मु वाग्ध्वजी । बांधो नेणे ॥13-208॥
वरवर देहाची पूजा करत नाही, (लोकांना फसवणारा बाह्यवेष धारण करून देहाला सजवीत नाही) व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही.
209-13
परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिले । न शकेविकू जोडले । स्फीतीसाठी ॥13-209॥
आपण दुसर्‍यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करत नाही, आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही,
210-13
शरीर भोगाकडे । पाहता कृपणु आवडे । एऱ्हवी धर्मविषयी थोडे । बहु न म्हणे ॥13-210॥
तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल. परंतु धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास कमीपणा करत नाही थोडेफार असे म्हणत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-13
घरी दिसे सांकड । देहीची आयती रोड । परी दानी जया होड । सुरतरूसी ॥13-211॥
घरामधे सर्व गोष्टीची टंचाई दिसते, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो.
212-13
किंबहुना स्वधर्मी थोरु । अवसरी उदारु । आत्मचर्चे चतुरु । एऱ्हवी वेडा ॥13-212॥
फार काय सांगावे ? स्वधर्मामधे तो थोर असतो. योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात हुशार असतो. एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो.
213-13
केळीचे दळवाडे । हळू पोकळ आवडे । परी फळोनिया गाढे । रसाळ जैसे ॥13-213॥
केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते.
214-13
का मेघांचे आंग झील । दिसे वारेनि जैसे जाईल । परी वर्षती नवल । घनवट ते ॥13-214॥
अथवा मेघाचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वार्‍याने नाहीसे होईल असे वाटते, पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले की जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात.
215-13
तैसा जो पूर्णपणी । पाहता धाती आयणी । एऱ्हवी तरी वाणी । तोचि ठावो ॥13-215॥
त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे.
216-13
हे असो या चिन्हांचा । नटनाचु ठायी जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हाता चढे ॥13-216॥
हे वर्णन पुरे. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याचे ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज.
217-13
पै गा गति अदंभपण । म्हणितले ते हे जाण । आता आईक खूण । अहिंसेची ॥13-217॥
अर्जुना अदंभपण ते हे समज.
3) अहिंसा, पूर्वमीमांसेने सांगितलेली अहिंसा -आता अहिंसेचे लक्षण ऐक.
218-13
तरी अहिंसा बहुती परी । बोलिली असे अवधारी । आपुलालिया मतांतरी । निरूपिली ॥13-218॥
आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे. ऐक.
219-13
परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनिया शाखा । मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे ॥13-219॥
परंतु त्यांनी सांगितलेली ही अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी त्या वृक्षाच्या रक्षणार्थ कुंपण करावे तशी आहे.
220-13
का बाहु तोडोनि पचविजे । मग भूकेची पीडा राखिजे । नाना देऊळ मोडोनि कीजे । पौळी देवा ॥13-220॥
किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-13
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पै पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥13-221॥
त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्वमीमांसेने केला आहे.
222-13
जे अवृष्टीचेनि उपद्रवे । गादले विश्व आघवे । म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥13-222॥
पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन त्यामुळे सर्व प्राणी जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे पर्जन्येष्टी यज्ञ करावेत.
223-13
तव तिये इष्टीचिया बुडी । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैची दिसे ? ॥13-223॥
तर प्राण्यांच्या बचावाकरता करावयाच्या यज्ञामधे आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात, अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार ?
224-13
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकाचा ॥13-224॥
नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय ? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे.
225-13
आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा । जे जीवाकारणे करावा । जीवघातु ॥13-225॥
आयुर्वेदीय अहिंसा : आणि सर्व आयुर्वेदही (वैद्यकशास्त्रही) अर्जुना याच धोरणचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसर्‍या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.
226-13
नाना रोगे आहाळली । लोळती भूते देखिली । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा का ॥13-226॥
नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली.
227-13
तव ते चिकित्से पहिले । एकाचे कंद खणविले । एका उपडविले । समूळी सपत्री ॥13-227॥
तो औषधयोजनेत पहिल्याप्रथम कित्येक झाडाचे कंद खाणवले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले.
228-13
एके आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एके गर्भिणी उकडविली । पुटामाजी ॥13-228॥
काही झाडे मध्येच मोडली (म्हणजे त्याच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला. ) काही झाडाची साल काढवली व काही फळ देण्य़ाच्या बेतात असलेल्या वनस्पती, त्यावर क्षाराचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या
229-13
अजातशत्रु तरुवरा । सर्वागी देवविल्या शिरा । ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥13-229॥
ज्यांनी) कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही, म्हणून ज्यांना शत्रु उत्पन्न झाला नाही अशा बिचार्‍या झाडाना (त्याचा चीक काढण्याकरता) त्यांच्या सर्वागावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले.
230-13
आणि जंगमाही हात । लाऊनि काढिले पित्त । मग राखिले शिणत । आणिक जीव ॥13-230॥
आणि हालचाल करणार्‍या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसर्‍या जीवाचे रक्षण केले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
हास्यास्पद अहिंसा
231-13
अहो वसती धवळारे । मोडूनि केली देव्हारे । नागवूनि वेव्हारे । गवांदी घातली ॥13-231॥
अहो रहाती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून, लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले.
232-13
मस्तक पांघुरविले । तव तळवटी उघडे पडले । घर मोडोनि केले । मांडव पुढे ॥13-232॥
डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो, अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले
233-13
नाना पांघुरणे । जाळूनि जैसे तापणे । जाले आंगधुणे । कुंजराचे ॥13-233॥
अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंगधुणे झाले (हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलीन होतो)
234-13
नातरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा । इया करणी की चेष्टा ? । काइ हसो ॥13-234॥
बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य करणे म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात ? का याला हसावे ?
दैनंदिन हिंसा
235-13
एकी धर्माचिया वाहणी । गाळू आदरिले पाणी । तव गाळितया आहाळणी । जीव मेले ॥13-235॥
बा कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले.
236-13
एक न पचवितीचि कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा ॥13-236॥
कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत (तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यास पचत नसल्यामुळे) त्यांचे प्राण कासावीस होतात, हीच हिंसा होय.
237-13
एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडी हा ऐसा । सिद्धांतु सुमनसा । वोळखे तू ॥13-237॥
बा, याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव.
238-13
पहिले अहिंसेचे नांव । आम्ही केले जव । तव स्फूर्ति बांधली हाव । इये मती ॥13-238॥
अहिंसेविषयी निरनिराळी मते सांगण्याचे जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीला हाव झाली,
239-13
तरि कैसेनि इयेते गाळावे । म्हणौनि पडिले बोलावे । तेवीचि तुवांही जाणावे । ऐसा भावो ॥13-239॥
तर या मतांना कसे गाळावे ? म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याच प्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्याचा आमचा हेतु होता.
240-13
बहुतकरूनि किरीटी । हाचि विषो इये गोठी । एऱ्हवी का आडवाटी । धाविजैल गा ? ॥13-240॥
अर्जुना, बहुतकरून या अहिंसे संबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच (वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसांचा) विषय आढळतो. (म्हणून आम्ही त्याची चर्चा केली). नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आडवाटेला कशाला जावे लागले असते ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-13
आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनिया धनुर्धरा । प्राप्ता मतांतरा । निर्वेचु कीजे ॥13-241॥
आणि अर्जुना, आपल्या स्वत:च्या मताच्या निश्चयाकरता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे.
242-13
ऐसी हे अवधारी । निरूपिती परी । आता ययावरी । मुख्य जे गा ॥13-242॥
याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धति आहे असे समज. कारण अहिंसेविषयी ज्ञानेशांचे मत
243-13
आता अर्जुना, यानंतर मुख्य जे, ते स्वमत बोलिजैल । अहिंसे रूप किजैल । जेणे उठलिया आंतुल । ज्ञान दिसे ॥13-243॥
ते आमचे मत सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना येईल, असे लक्षण करण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रगट झाली असता त्या ज्ञान आहे असे दिसेल.
244-13
परी ते अधिष्ठिलेनि आंगे । जाणिजे आचरतेनि बगे । जैसी कसवटी सांगे । वानियाते ॥13-244॥
पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याच्या कसाला सांगते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा रहात आहे असे जाणले जाते.
245-13
तैसे ज्ञानामनाचिये भेटी । सरिसेचि अहिंसेचे बिंब उठी । तेचि ऐसे किरीटी । परिस आता ॥13-245॥
त्याप्रमाणे ज्ञानामनाच्या भेटीबरोबरच (मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर) अहिंसेचे चित्र उमटते, ते चित्र असे असते. अर्जुना, ऐक.
246-13
तरी तरंगु नोलांडितु । लहरी पाये न फोडितु । सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥13-246॥
अहिंसकाचे चालणे = तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज (खळखळ) न मोडू देता
247-13
वेगे आणि लेसा । दिठी घालूनि आंविसा । जळी बकु जैसा । पाउल सुये ॥13-247॥
वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टि ठेऊन बगळा जसा पाण्यात पाय घालतो,
248-13
का कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ॥13-248॥
अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात,
249-13
तैसे परमाणु पा गुंतले । जाणूनि जीव सानुले । कारुण्यामाजी पाउले । लपवूनि चाले ॥13-249॥
त्याप्रमाणे परमाणूंमधे लहान जीव आहेत असे जाणून दयेमधे आपली पाऊले लपवून चालतो.
250-13
ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु । जीवातळी आंथरितु । आपुला जीवु ॥13-250॥
तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते, ती दिशाच प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वत:चा प्राण अंथरतो (मग त्यावर चालतो).
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-13
ऐसिया जतना । चालणे जया अर्जुना । हे अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥13-251॥
अर्जुना, अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही.
252-13
पै मोहाचेनि सांगडे । लासी पिली धरी तोंडे । तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे ॥13-252॥
जेव्हा मांजरी मोहाच्या योगाने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात (मांजरीने दातांनी पिल्लू जरी बळकट धरलेले असते, त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दाताची टोके लागत नाहीत)
253-13
का स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे । तिये दिठी आहे । हळुवार जे ॥13-253॥
अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पहाते, त्या दृष्टीमधे जो नाजुकपणा असतो,
254-13
नाना कमळदळे । डोलविजती ढाळे । तो जेणे पाडे बुबुळे । वारा घेपे ॥13-254॥
अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फूल हळू हळू हलवले असता, त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुबुळास मोठा सुखकर वाटतो (बुबुळास खुपत नाही)
255-13
तैसेनि मार्दवे पाय । भूमीवरी न्यसीतु जाय । लागती तेथ होय । जीवा सुख ॥13-255॥
तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो. ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते.
256-13
ऐसिया लघिमा चालता । कृमि कीटक पंडुसुता । देखे तरी माघौता । हळूचि निघे ॥13-256॥
अर्जुना, अशा हळूवारपणाने चालत असतांना कृमीकीटक पाहिले तर, हळूच माघारा फिरतो.
257-13
म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल । रचलेपणा पडैल । झोती हन ॥13-257॥
तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर (सर्व भूतांना व्यापून असलेल्या) प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल.
258-13
इया काकुळती । वाहणी घे माघौती । कोणेही व्यक्ती । न वचे वरी ॥13-258॥
या करुणेने मागे परततो वकोणत्याही व्यक्तीवर (प्राण्यावर) पाय ठेवीत नाही.
259-13
जीवाचेनि नांवे । तृणातेही नोलांडवे । मग न लेखिता जावे । हे के गोठी ? ॥13-259॥
गवताच्या काडीत जीव आहे असे समजून ती ओलांडीत नाही (तुडवून जात नाही). मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल ही गोष्ट कोठली ?
260-13
मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे । तैसा भेटलिया न करवे । अतिक्रमु ॥13-260॥
मुंगीला ज्याप्रमाणे मेरु पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने उल्लंघन करवत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-13
ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली । देखसी जियाली । दया वाचे ॥13-261॥
अहिंसकाचे बोलणे याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली, व जेथे वाचेमधे दया जगलेली तू पहाशील.
262-13
स्वये श्वसणेचि सुकुमार । मुख मोहाचे माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥13-262॥
स्वत: श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणुकाय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत !
263-13
पुढा स्नेह पाझरे । माघा चालती अक्षरे । शब्द पाठी अवतरे । कृपा आधी ॥13-263॥
(तो कोणाशी बोलत असताना) पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रगट होते व शब्द मागून प्रगट होतात.
264-13
तव बोलणेचि नाही । बोलो म्हणे जरी काही । तरी बोल कोणाही । खुपेल का ॥13-264॥
अगोदर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोलू म्हणेल (बोलण्याचे मनात आणेल) तर आपले बोलणे कोणाला खुपेल का (लागेल का) (अशी त्याच्या मनात शंका येते).
265-13
बोलता अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मी न लगे । आणि कोण्हासि न रिघे । शंका मनी ॥13-265॥
(त्याला असे वाटत असते की) यदा कदाचित बोलतांना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना ? आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना ?
266-13
मांडिली गोठी हन मोडैल । वासिपैल कोणी उडैल । आइकोनिचि वोवांडिल । कोण्ही जरी ॥13-266॥
कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करील.
267-13
तरी दुवाळी कोणा नोहावी । भुंवई कवणाची नुचलावी । ऐसा भावो जीवी । म्हणौनि उगा ॥13-267॥
तरी आपल्या बोलण्याने कोणासही क्लेश होऊ नयेत (अथवा रागाने) कोणाचीही भिवई उचलू नये, असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो.
268-13
मग प्रार्थिला विपाये । जरी लोभे बोलो जाये । तरी परिसतया होये । मायबापु ॥13-268॥
मग आपण बोलावे, अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यास, तो प्रेमाने बोलायला लागला, तर त्याचे बोलणे जे ऐकतात, त्यांना तो आपला आईबापच आहे की काय ? असे वाटते.
269-13
का नादब्रह्मचि मुसे आले । की गंगापय असलले । पतिव्रते आले । वार्धक्य जैसे ॥13-269॥
त्याचे बोलणे म्हणजे जणु काय नादब्रह्मच आकार धरून आले, असे मधुर, किंवा गंगेचे पाणीच उसळले असे पवित्र, अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे
270-13
तैसे साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥13-270॥
त्याप्रमाणे खरे आणि मऊ (कोणास न खुपणारे) मोजके परंतु सरळ, त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-13
विरोधु वादुबळु । प्राणितापढाळु । उपहासु छळु । वर्मस्पर्शु ॥13-271॥
उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे शब्द बोलणे,
172-13
आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । हे संन्यासिले अवगुणु । जया वाचा ॥13-272॥
हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी (वगैरे) हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वाचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो.
273-13
आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी । सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया ॥13-273॥
अहिंसकाची दृष्टी = आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्या टाकलेल्या आहेत म्हणजे ज्याने रागाने भिवया चढवल्या नाहीत
274-13
का जे भूती वस्तु आहे । तिये रुपो शकेविपाये । म्हणौनि वासु न पाहे । बहुतकरूनी ॥13-274॥
प्राणिमात्रामधे वस्तु (परब्रह्म) आहे, तिला कदाचित आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे म्हणून बहुतकरून तो कोणाकडे पहात नाही.
275-13
ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि बळे । उघडोनिया डोळे । दृष्टी घाली ॥13-275॥
असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली.
276-13
तरी चंद्रबिंबौनि धारा । निघता नव्हती गोचरा । परि एकसरे चकोरा । निघती दोंदे ॥13-276॥
तर चंद्रबिंबातून निघणार्‍या अमृताच्या धारा जरी निघतांना डोळ्याना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षांना एकसारखी दोंदे निघतात, (चकोर पक्षी पुष्ट होतात).
277-13
तैसे प्राणियासि होये । जरी तो कही वासु पाहे । तया अवलोकनाची सोये । कूर्मीही नेणे ॥13-277॥
त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते. त्या पहाण्याचा प्रकार कासवीसुद्धा जाणत नाही.
278-13
किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी । करही देखसी । तैसेचि ते ॥13-278॥
फार काय सांगावे ? याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल
279-13
तरी होऊनिया कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ । तैसे जयाचे हात । निर्व्यापार ॥13-279॥
अहिंसकाची कृती = सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन रहातात. (म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते) त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात. (व्यापाररहित असतात).
280-13
अक्षमे आणि संन्यासिले । की निरिंधन आणि विझाले । मुकेनि घेतले । मौन जैसे ॥13-280॥
अगोदरच आंधळा, आणखी त्याने पहाण्याचे टाकले, अथवा आधीच काष्ठरहित अग्नि, आणि पुन्हा तो विझलेला किंवा मुळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले. .
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-13
तयापरी काही । जया करा करणे नाही । जे अकर्तयाच्या ठायी । बैसो येती ॥13-281॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाचे ठिकाणी ते राहावयास येतात.
282-13
आसुडैल वारा । नख लागेल अंबरा । इया बुद्धी करा । चळो नेदी ॥13-282॥
वार्‍याला झटका बसेल वआकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही
283-13
तेथ आंगावरिली उडवावी । का डोळा रिगते झाडावी । पशुपक्ष्या दावावी । त्रासमुद्रा ॥13-283॥
(अशी जेथे स्थिती आहे) तेथे अंगावर बसलेले (माशा, डास वगैरे प्राणी) उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा.
284-13
इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी । मग शस्त्राचे किरीटी । बोलणे के ? ॥13-284॥
या गोष्टी कोठल्या ? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे, तर मग अर्जुना हातात शस्त्र घेण्याचे बोलणे कोठले ?
285-13
लीलाकमळे खेळणे । का पुष्पमाळा झेलणे । न करी म्हणे गोफणे । ऐसे होईल ॥13-285॥
सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या (हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना) गोफणीप्रमाणे होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही.
286-13
हालवतील रोमावळी । यालागी आंग न कुरवाळी । नखांची गुंडाळी । बोटांवरी ॥13-286॥
अंगावर केसांच्या रांगा हलतील (व त्यायोगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल) याकरता जो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतात.
287-13
तव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे प्रस्तावो । तरी हाता हाचि सरावो । जे जोडिजती ॥13-287॥
आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत.
288-13
का नाभिकारा उचलिजे । हातु पडिलिया देइजे । नातरी आर्ताते स्पर्शिजे । अळुमाळु ॥13-288॥
अथवा ‘भिऊ नकोस ” असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्यास हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा.
289-13
हेही उपरोधे करणे । तरी आर्तभय हरणे । नेणती चंद्रकिरणे । जिव्हाळा तो ॥13-289॥
तरी दु:खाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे, हे देखील तो मोठ्या जुलुमाने करतो, पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो.
290-13
पावोनि तो स्पर्शु । मलयानिळु खरपुसु । तेणे माने पशु । कुरवाळणे ॥13-290॥
त्याच्या ह्स्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍याचा स्पर्श कडक भासेल. इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदु व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते.
291-13
जे सदा रिते मोकळे । जैशी चंदनांगे निसळे । न फळतांही निर्फळे । होतीचिना ॥13-291॥
जे हात नेहेमी रिकामे व मोकळे असतात (परंतु) ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही.
292-13
आता असो हे वाग्जाळ । जाणे ते करतळ । सज्जनांचे शीळ । स्वभाव जैसे ॥13-292॥
आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात, त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज.
293-13
आता मन तयाचे । सांगो म्हणो जरी साचे । तरी सांगितले कोणाचे । विलास हे ? ॥13-293॥
अहिंसकाचे मन =
आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे ?
294-13
काइ शाखा नव्हे तरु ? । जळेवीण असे सागरु ? । तेज आणि तेजाकारु । आन काई ? ॥13-294॥
फांद्या म्हणजेच झाड नव्हे काय ? समुद्र हा जलाशिवाय आहे काय ? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय ?
295-13
अवयव आणि शरीर । हे वेगळाले कीर ? । की रसु आणि नीर । सिनानी आथी ? ॥13-295॥
शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय ? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय ?
296-13
म्हणौनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव । ते मनचि गा सावयव । ऐसे जाणे ॥13-296॥
म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. (वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत).
297-13
जे बीज भुई खोंविले । तेचि वरी रुख जाहले । तैसे इंद्रियाद्वारी फाकले । अंतरचि की ॥13-297॥
ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी, तेच तर पुढे वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे.
298-13
पै मानसीचि जरी । अहिंसेची अवसरी । तरी कैची बाहेरी । वोसंडेल ? ॥13-298॥
परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल ?
299-13
आवडे ते वृत्ती किरीटी । आधी मनौनीचि उठी । मग ते वाचे दिठी । करासि ये ॥13-299॥
अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते.
300-13
वाचूनि मनीचि नाही । ते वाचेसि उमटेल काई ? । बीजे वीण भुई । अंकुर असे ? ॥13-300॥
याशिवाय जे मनातच नाही, ते वाचेत प्रगट होईल काय ? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-13
म्हणौनि मनपण जै मोडे । तै इंद्रिय आधीचि उबडे । सूत्रधारेवीण साइखडे । वावो जैसे ॥13-301॥
म्हणून (ज्यावेळी) मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे रहातात. (म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते). ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते
302-13
उगमीचि वाळूनि जाये । ते वोघी कैचे वाहे । जीवु गेलिया आहे । चेष्टा देही ? ॥13-302॥
हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते (नदीच्या) ओघामधे कोठून वाहील ? (शरीरातून) जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय ?
303-13
तैसे मन हे पांडवा । मूळ या इंद्रियभावा । हेचि राहटे आघवा । द्वारी इही ॥13-303॥
अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व या इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच या सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते.
304-13
परी जिये वेळी जैसे । जे होऊनि आंतु असे । बाहेरी ये तैसे । व्यापाररूपे ॥13-304॥
परंतु ज्यावेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापाररूपाने बाहेर येते.
305-13
यालागी साचोकारे । मनी अहिंसा थांवे थोरे । पिकली द्रुती आदरे । बोभात निघे ॥13-305॥
ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर येतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रियव्यापारातून दिसून येते.
306-13
म्हणौनि इंद्रिये तेचि संपदा । वेचिता ही उदावादा । अहिंसेचा धंदा । करिते आहाती ॥13-306॥
म्हणून (ही सर्व) इंद्रिये (मनात) असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात. (म्हणजे अहिंसेचा इंद्रियाकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसारूप भांडवल संपत नाही).
307-13
समुद्री दाटे भरिते । तै समुद्रचि भरी तरियाते । तैसे स्वसंपत्ती चित्ते । इंद्रिया केले ॥13-307॥
समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो त्याप्रमाणे (चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे) चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते.
308-13
हे बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥13-308॥
फार बोलणे राहू दे. पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो.
309-13
तैसे दयाळुत्व आपुले । मने हातापाया आणिले । मग तेथ उपजविले । अहिंसेते ॥13-309॥
त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापायास आणिले व मग तेथे (म्हणजे हातापायांचे ठिकाणी) मनानेच अहिंसेला उत्पन्न केले.
310-13
याकारणे किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचिये राहाटी । रूप केले ॥13-310॥
म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणूकीचे स्पष्ट वर्णन केले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-13
ऐसा मने देहे वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । जाहला ठायी जयाचा । देखशील ॥13-311॥
याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल
312-13
तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचे वेळाउळ । हे असो निखळ । ज्ञानचि तो ॥13-312॥
तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय.
313-13
जे अहिंसा काने ऐकिजे । ग्रंथाधारे निरूपिजे । ते पाहावी हे उपजे । तै तोचि पाहावा ॥13-313॥
जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण (वर्णन) करतो, ती अहिंसा पहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा त्या पुरुषालाच पहावे.
314-13
ऐसे म्हणितले देवे । ते बोले एके सांगावे । परी फांकला हे उपसाहावे । तुम्ही मज ॥13-314॥
व्याख्यान लांबल्याबद्दल परिहार =
(ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात) असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी.
315-13
म्हणाल हिरवे चारी गुरू । विसरे मागील मोहर धरू । का वारेलगे पांखिरू । गगनी भरे ॥13-315॥
कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चार्‍यात (गाय, म्हैस वगैरे) जनावर सुटले असता ते जसे चार्‍याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वार्‍‍याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो.
316-13
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ती । वाहविला मती । आकळेना ॥13-316॥
त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वहावत गेली, ती आवरत नाही.
317-13
तरि तैसे नोहे अवधारा । कारण असे विस्तारा । एऱ्हवी पद तरी अक्षरा । तिहीचेचि ॥13-317॥
विस्तार का केला ?
तर ऐका, महाराज, तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे. नाही तर अहिंसा हे पद तीन अक्षरांचेच आहे.
318-13
अहिंसा म्हणता थोडी । परी ते तैचि होय उघडी । जै लोटिजती कोडी । मताचिया ॥13-318॥
अहिंसा म्हणावयास थोडी आहे. परंतु जेव्हा कोट्यवधी मतांचा विचार करून त्यांचे खंडण करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते.
319-13
एऱ्हवी प्राप्ते मतांतरे । थातंबूनि आंगभरे । बोलिजैल ते न सरे । तुम्हापाशी ॥13-319॥
एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता अंगच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही.
320-13
रत्नपारखियांच्या गावी । जाईल गंडकी तरी सोडावी । काश्मीरी न करावी । मिडगण जेवी ॥13-320॥
रत्न पारखणार्‍या लोकांच्या गावात (गंडकी कसोटीचा शालिग्रामासारखा दगड) रत्न म्हणून विकली जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी व सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-13
काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा । तिये साते ? ॥13-321॥
ऐका जेथे (ज्या बाजारात) कापराला वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात (कापूर म्हणून) पिठाची विक्री कशी होईल ?
322-13
म्हणौनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभे । लाग सरू न लभे । बोला प्रभु ॥13-322॥
म्हणून महाराज या सभेमधे (नुसत्या) बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक (पसंती) मिळणार नाही.
323-13
सामान्या आणि विशेषा । सकळै कीजेल देखा । तरी कानाचेया मुखा- । कडे न्याल ना तुम्ही ॥13-323॥
सर्व साधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधी विशेष कल्पना, यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही.
324-13
शंकेचेनि गदळे । जै शुद्ध प्रमेय मैळे । तै मागुतिया पाउली पळे । अवधान येते ॥13-324॥
शंकारूपी कचर्‍याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाऊलीच पळेल.
325-13
का करूनि बाबुळियेची बुंथी । जळे जिये ठाती । तयांची वास पाहाती । हंसु काई ? ॥13-325॥
किंवा ज्या पाण्यात शेवाळाच्या गुंडाळ्या (दाठ शेवाळें) झाल्या आहेत त्या पाण्याकडे हंस कधी दृष्टी देतात काय ?
326-13
का अभ्रापैलीकडे । जै येत चांदिणे कोडे । तै चकोरे चांचुवडे । उचलितीना ॥13-326॥
किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्यावेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत.
327-13
तैसे तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरी कोपाल । जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण ॥13-327॥
त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्विवाद (शंकारहित) होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही, इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल.
328-13
न बुझाविता मते । न फिटे आक्षेपाचे लागते । ते व्याख्यान जी तुमते । जोडूनि नेदी ॥13-328॥
निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. (त्यामधे शंकेच्या पुष्कळ जागा रहातील) व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही.
329-13
आणि माझे तव आघवे । ग्रथन येणेचि भावे । जे तुम्ही संती होआवे । सन्मुख सदा ॥13-329॥
आणि माझे ग्रंथ रचणे याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहेमी प्रसन्न असावे.
330-13
एऱ्हवी तरी साचोकारे । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरे । धरिली मिया ॥13-330॥
श्रोत्यांची स्तुती =
सहज विचार करून पाहिले तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात, असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-13
जे आपुले सर्वस्व द्याल । मग इयेते सोडवूनि न्याल । म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे ॥331॥
जी आपली सर्व मालमत्ता (पूर्ण कृपा) आहे ती द्याल व हिला गीतेला सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे तारण आहे.
332-13
का सर्वस्वाचा लोभु धरा । वोलीचा अव्हेरु करा । तरी गीते मज अवधारा । एकचि गती ॥332॥
अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेर कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा.
333-13
किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागी व्याज । ग्रंथाचे केले ॥333॥
फार काय सांगावे ? मला तुमच्या कृपेशी काम आहे व या कृपेकरता मी हे ग्रंथाचे निमित्त केले.
334-13
तरी तुम्हा रसिकांजोगे । व्याख्यान शोधावे लागे । म्हणौनि जी मतांगे । बोलो गेलो ॥334॥
तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली.
335-13
तव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला । कीजो क्षमा यया बोला । अपत्या मज ॥335॥
तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला, या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी.
336-13
आणि घांसा आंतिल हरळु । फेडिता लागे वेळु । ते दूषण नव्हे खडळु । सांडावा की ॥336॥
आणि (जेवीत असताना) घासातील खडा काढताना वेळ लागतो, तर जेवणार्‍याला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यास उशीर केला तर त्यात जेवणार्‍याचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे.
337-13
का संवचोरा चुकविता । दिवस लागलिया माता । कोपावे की जीविता । जिताणे कीजे ? ॥337॥
अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठमोहर्‍या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी !
338-13
परी यावरील हे नव्हे । तुम्ही उपसाहिले तेचि बरवे । आता अवधारिजो देवे । बोलिले ऐसे ॥338॥
परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे (शाबासकी देण्यासारखे) नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे. तर आता महाराज, ऐका. देव असे बोलले.
339-13
म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होई अर्जुना । करू तुज ज्ञाना । वोळखी आता ॥339॥
भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तमदृष्टी असणार्‍या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे.
340-13
तरी ज्ञान गा ते एथे । वोळख तू निरुते । आक्रोशेवीण जेथे । क्षमा असे ॥340॥
तर जेथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-13
अगाध सरोवरी । कमळिणी जियापरी । का सदैवाचिया घरी । संपत्ति जैसी ॥341॥
?ञफार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल (विपुल वाढतात) अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती (अलोट येत असते),
342-13
पार्था तेणे पाडे । क्षमा जयाते वाढे । तेही लक्षे ते फुडे । लक्षण सांगो ॥342॥
अर्जुना, त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते, ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो.
343-13
तरी पढियंते लेणे । आंगी भावे जेणे । धरिजे तेवी साहणे । सर्वचि जया ॥343॥
ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो.
344-13
त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवाचे मेळावे । वरी पडिलिया नव्हे । वाकुडा जो ॥344॥
आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत, ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले तथापि जो डगमगत नाही.
345-13
अपेक्षित पावे । ते जेणे तोषे मानवे । अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥345॥
इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो.
346-13
जो मानापमानाते साहे । सुखदुःख जेथ सामाये । निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥346॥
जो मान व अपमान (मनाच्या सारख्या स्थितीने) सहन करतो व सुखदु:खे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात, (सारखी मानली जातात) व निंदा आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती दोन प्रकारची (सुखाची व दु:खाची) होत नाही.
347-13
उन्हाळेनि जो न तपे । हिमवंती न कांपे । कयसेनिही न वासिपे । पातलेया ॥347॥
उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही.
348-13
स्वशिखरांचा भारु । नेणे जैसा मेरु । की धरा यज्ञसूकरु । वोझे न म्हणे ॥348॥
मेरु पर्वत आपल्या शिखराचे जसे ओझे मानीत नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही,
349-13
नाना चराचरी भूती । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती । घामेजेना ॥349॥
ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदु:खादि द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही.
350-13
घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट । करी वाड पोट । समुद्र जेवी ॥350॥
पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वाचा समावेश करुन घेतो,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
351-13
तैसे जयाचिया ठायी । न साहणे काहीचि नाही । आणि साहतु असे ऐसेही । स्मरण नुरे ॥351॥
त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याचे ठिकाणी रहात नाही,
352-13
आंगा जे पातले । ते करूनि घाली आपुले । येथ साहतेनि नवले । घेपिजेना ॥352॥
जे जे काही सुखदु:खादि भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याचेवर बसत नाही.
353-13
हे अनाक्रोश क्षमा । जयापाशी प्रियोत्तमा । जाण तेणे महिमा । ज्ञानासि गा ॥353॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, दात, ओठ न चावता स्वभावत:च असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज.
354-13
तो पुरुषु पांडवा । ज्ञानाचा वोलावा । आता परिस आर्जवा । रूप करू ॥354॥
अर्जुना तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो ऐक.
355-13
तरी आर्जव ते ऐसे । प्राणाचे सौजन्य जैसे । आवडे तयाही दोषे । एकचि गा ॥355॥
अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे आहे की ज्याप्रमाणे प्राणाचे प्रेम कोणासंबंधीही असेना का ? ते सर्वावर एकसारखेच असते.
356-13
का तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवी चंडांशु । जगा एकचि अवकाशु । आकाश जैसे ॥356॥
अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देतो.
357-13
तैसे जयाचे मन । माणुसाप्रति आन आन । नव्हे आणि वर्तन । ऐसे पै ते ॥357॥
त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते
358-13
जे जगेचि सनोळख । जगेसी जुनाट सोयरिक । आपपर हे भाख । जाणणे नाही ॥358॥
की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही
359-13
भलतेणेसी मेळु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखी आडळु । नेघे चित्त ॥359॥
त्याचे वाटेल त्याच्याशीही पटते आणि पाण्याच्या सारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही.
360-13
वारियाची धाव । तैसे सरळ भाव । शंका आणि हाव । नाही जया ॥360॥
वार्‍याचे वहाणे जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-13
मायेपुढे बाळका । रिगता न पडे शंका । तैसे मन देता लोका । नालोची जो ॥361॥
आईपुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागेपुढे पहात नाही.
362-13
फांकलिया इंदीवरा । परिवारु नाही धनुर्धरा । तैसा कोनकोपरा । नेणेचि जो ॥362॥
ज्याप्रमाणे उमलेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही. (म्हणजे ज्याच्या अंत:करणाला गुप्त जागा माहीत नसते.
363-13
चोखाळपण रत्नाचे । रत्नावरी किरणाचे । तैसे पुढा मन जयाचे । करणे पाठी ॥363॥
रत्नाचा निर्मळपण असतो, (पण) त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक पुढे असतो, त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते.
364-13
आलोचू जो नेणे । अनुभवचि जोगावणे । धरी मोकळी अंतःकरणे । नव्हेचि जया ॥364॥
जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभावात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही.
365-13
दिठी नोहे मिणधी । बोलणे नाही संदिग्धी । कवणेसी हीनबुद्धी । राहाटीजे ना ॥365॥
ज्याची दृष्टी कपटी (अथवा ओशाळी) नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही.
366-13
दाही इंद्रिये प्रांजळे । निष्प्रपंचे निर्मळे । पांचही पालव मोकळे । आठही पाहर ॥13-366॥
ज्याची दहाही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात.
367-13
अमृताची धार । तैसे उजू अंतर । किंबहुना जो माहेर । या चिन्हांचे ॥367॥
अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंत:करण सरळ असते. फार काय सांगावे ? जो या चिन्हाचे माहेर असतो.
368-13
तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवटा । जाण तेथेचि घरटा । ज्ञाने केला ॥368॥
अर्जुना, तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले रहावयाचे ठिकाण केले आहे असे समज.
369-13
आता ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगो गा अवधारी । चतुरनाथा ॥369॥
आचार्योपासना
आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा तो तू ऐक.
370-13
आघवियाचि दैवा । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातेहि ॥370॥
ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-13
हे आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसो दे एकपांती । अवधानाची ॥371॥
ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. मात्र तू तिकडे एकसारखे लक्ष दे.
372-13
तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा निघाली उदधी । की श्रुति हे महापदी । पैठी जाहाली ॥372॥
तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात,
373-13
नाना वेटाळूनि जीविते । गुणागुण उखिते । प्राणनाथा उचिते । दिधले प्रिया ॥373॥
अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वत:ला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले,
374-13
तैसे सबाह्य आपुले । जेणे गुरुकुळी वोपिले । आपणपे केले । भक्तीचे घर ॥374॥
त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनादिक व बाह्य इंद्रियादिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे,
375-13
गुरुगृह जये देशी । तो देशुचि वसे मानसी । विरहिणी का जैसी । वल्लभाते ॥375॥
ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरूचे घर असते, तो देश ज्याच्या मनामधे असतो.
376-13
तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धावे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजे कीजो ॥376॥
गुरूच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वार्‍याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, “आपण माझ्या घरी यावे”.
377-13
साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली । जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृही जो ॥377॥
सद्गुरूविषयीच्या खर्‍या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरूच्या घरात मिरासदार करून ठेवतो.
378-13
परी गुरुआज्ञा धरिले । देह गावी असे एकले । वासरुवा लाविले । दावे जैसे ॥378॥
परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरूची आज्ञा हेच कोणी एक दावे, त्याने देहास बांधून टाकल्यामुळे, त्याला एकट्याला आपल्या गावी राहाणे पडून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही.
379-13
म्हणे कै हे बिरडे फिटेल । कै तो स्वामी भेटेल । युगाहूनि वडील । निमिष मानी ॥379॥
जो म्हणतो, ही गुरुआज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो गुरु भेटेल ? तो (गुरूच्या वियोगात जाणार्‍या) निमिषाला युगाहून मोठे मानतो.
380-13
ऐसेया गुरुग्रामीचे आले । का स्वये गुरूंनीचि धाडिले । तरी गतायुष्या जोडले । आयुष्य जैसे ॥380॥
अशात जर कोणी गुरूच्या गावचे आले अथवा स्वत: गुरूनेच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषास आयुष्य प्राप्त व्हावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-13
का सुकतया अंकुरा- । वरी पडलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकीचा सागरा । आला मासा ॥381॥
अथवा सुकणार्‍या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात अथवा थोड्याशा पाण्यातला मासा जसा समुद्रात यावा.
382-13
नातरी रंके निधान देखिले । का आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आले । इंद्रपद ॥382॥
अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकार्‍याला जसे इंद्रपद मिळावे.
383-13
तैसे गुरुकुळाचेनि नांवे । महासुखे अति थोरावे । जे कोडेंही पोटाळवे । आकाश का ॥383॥
त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू.
384-13
पै गुरुकुळी ऐसी । आवडी जया देखसी । जाण ज्ञान तयापासी । पाइकी करी ॥384॥
ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पहाशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज.
385-13
आणि अभ्यंतरीलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरूंचे रूपडे । उपासी ध्यानी ॥385॥
आणि आतल्या बाजूकडे (अंत:करणात) प्रेमाच्या जोराने श्रीगुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो.
386-13
हृदयशुद्धीचिया आवारी । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी । मग सर्व भावेसी परिवारी । आपण होय ॥386॥
अंत:करणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामधे आराधना करण्याला योग्य जो गुरू, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग काया, वाचा, मनाने श्रीगुरूचा लवाजमा आपण बनतो.
387-13
का चैतन्यांचिये पोवळी- माजी आनंदाचिया राउळी । श्रीगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥387॥
अथवा ज्ञानाच्या आवारात असणार्‍या आनंदाच्या देवळामधे गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो.
388-13
उदयिजता बोधार्का । बुद्धीची डाल सात्त्विका । भरोनिया त्र्यंबका । लाखोली वाहे ॥388॥
बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विकभाव भरून तो त्यांची लाखोली श्रीगुरुरूपी शंकराला वहातो.
389-13
काळशुद्धी त्रिकाळी । जीवदशा धूप जाळी । न्यानदीपे वोवाळी । निरंतर ॥389॥
पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा, त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो.
390-13
सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय । आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥390॥
गुरूला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहेमी अर्पित रहातो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरूला शंकराची पिंडी करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-13
नातरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे । ऐसी प्रेमाचेनि भोजे । बुद्धी वाहे ॥391॥
अथवा जीवरूपी शय्येवर गुरूला पती करून भोगतो, अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते.
392-13
कोणेएके अवसरी । अनुरागु भरे अंतरी । की तया नाम करी । क्षीराब्धी ॥392॥
कोणा एका वेळी मनात गुरूविषयी प्रेम भरले की त्याला (त्या प्रेमाला) क्षीरसमुद्र असे नाव देतो.
393-13
तेथ ध्येयध्यान बहु सुख । तेचि शेषतुका निर्दोख । वरी जलशयन देख । भावी गुरु ॥393॥
त्या प्रेमरूपी क्षीरसागरामधे ध्येय जे गुरू, त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते (सुखच) शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर (श्रीविष्णूप्रमाणे) जलशयन करणारे श्रीगुरू आहेत असे समजतो.
394-13
मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥394॥
श्रीगुरूरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा रहातो.
395-13
नाभीं आपणचि जन्मे । ऐसे गुरुमूर्तिप्रेमे । अनुभवी मनोधर्मे । ध्यानसुख ॥395॥
आपणच श्रीगुरुरूपी विष्णूच्या नाभीकमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अंत:करणात अनुभवतो.
396-13
एखादेनि वेळे । गुरु माय करी भावबळे । मग स्तन्यसुखे लोळे । अंकावरी ॥396॥
एखादेवेळी आपल्या भावाच्या बळाने गुरूला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो.
397-13
नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटी । गुरु धेनु आपण पाठी । वत्स होय ॥397॥
अथवा अर्जुना, चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरूला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो.
398-13
गुरुकृपास्नेहसलिली । आपण होय मासोळी । कोणे एके वेळी । हेचि भावी ॥398॥
गुरूच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो. कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो.
399-13
गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचे होय रोप । ऐसेसे संकल्प । विये मन ॥399॥
माझे श्रीगुरू कृपारूप अमृताची दृष्टी असून त्याखाली मी, सेवावृत्तिरूप रोप आहे; याप्रमाणे त्याचे मन अनेक प्रकारचे संकल्प करीत असते.
4000-13
चक्षुपक्षेवीण । पिलू होय आपण । कैसे पै अपारपण । आवडीचे ॥400॥
डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे (पक्ष्याचे) पिल्लू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण असे आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
401-13
गुरूते पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी । गुरु तारू धरी । आपण कास ॥401॥
गुरूला पक्षिणी करतो व आपण (पिल्लू बनलेला) तिच्या चोचेतून चारा घेतो. गुरूला पोहणारा करून आपण त्यांच्या कासेला लागतो.
402-13
ऐसे प्रेमाचेनि थावे । ध्यानचि ध्यानाते प्रसवे । पूर्णसिंधु हेलावे । फुटती जैसे ॥402॥
ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते.
403-13
किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरी । भोगी आता अवधारी । बाह्यसेवा ॥403॥
फार काय सांगावे ? याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंत:करणात भोगतो. आता त्याची बाहेरील (शारीरिक) सेवा ऐक.
404-13
तरी जिवी ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निके । जैसे गुरु कौतुके । माग म्हणती ॥404॥
गुरूंची शारीरिक सेवा –
तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरूचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरू मला प्रेमाने ‘माग ” म्हणून म्हणतील.
405-13
तैसिया साचा उपास्ती । गोसावी सुप्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करी न ॥405॥
तशा खर्‍या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील, त्या वेळी मी अशी विनंती करीन.
406-13
म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । तेतुले रूपे होआवा । मीचि एकु ॥406॥
मी असे म्हणेन की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे.
407-13
आणि उपकरती आपुली । उपकरणे आथि जेतुली । माझी रूपे तेतुली । होआवी जी ॥407॥
आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे (पूजेची भांडी वगैरे वस्तू) आहेत, महाराज, तेवढे सर्व मी व्हावे.
408-13
ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती श्रीगुरु । मग तो परिवारु । मीचि होई न ॥408॥
असा मी (श्रीगुरूला) वर मागेन, की ते हो म्हणतील मग मी त्यांच्या परिवाराचा होईन.
409-13
उपकरणजात सकळिक । ते मीचि होईन एकैक । तेव्हा उपास्तीचे कवतिक । देखिजैल ॥409॥
श्रीगुरूच्या सेवेमध्ये जेवढीं उपकरणे लागतात, त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईन तेव्हाच मला सेवेचे सुख प्राप्त होईल. तेंव्हाच माझ्या उपासनेचे खरे कौतुक होईल.
410-13
गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये । तैसे करूनि आण वाये । कृपे तिये ॥410॥
श्रीगुरू हे पुष्कळांची आई आहेत पण ते माझी एकट्याची आई होऊन रहातील असे करून (म्हणजे अनन्यभावाने त्यांची सेवा करून) त्यांच्या कृपेकडून शपथ वाहवीन.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-13
तया अनुरागा वेधु लावी । एकपत्नीव्रत घेववी । क्षेत्रसंन्यासु करवी । लोभाकरवी ॥411॥
श्रीगुरूंच्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एकपत्नीव्रत घेववीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसंन्यास करवीन, (म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन),
412-13
चतुर्दिक्षु वारा । न लाहे निघो बाहिरा । तैसा गुरुकृपे पांजिरा । मीचि होईन ॥412॥
वारा कितीही धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन.
413-13
आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिणी । हे असो होईन गंवसणी । मीचि भक्तीसी ॥413॥
गुरुसेवा जी माझी मालकीण तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन, हे असो. (एवढेच काय पण) गुरुभक्तीला मीच गवसणी होईन.
414-13
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटी । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥414॥
गुरूंच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे मनोरथांच्या अनंत सृष्टीला तयार करतो.
415-13
म्हणे श्रीगुरूंचे भुवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिचे ॥415॥
तो म्हणतो, गुरूंचे रहाते घर, मी स्वत: होईन व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन.
416-13
निर्गमागमी दातारे । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि द्वारे । द्वारपाळु ॥416॥
श्रीगुरू बाहेर जाते वेळी व घरात येतेवेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मीच होईन. आणि घराची द्वारे व द्वारांवरील राखण करणारे गडी मीच होईन.
417-13
पाउवा मी होईन । तिया मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । बारीपण ॥417॥
श्रीगुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्याचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन.
418-13
मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता । स्वामीपुढे खोलता । होईन मी ॥418॥
श्रीगुरूंना खालीवर जाणवणारा (चोपदार) मीच होईन, त्यांच्यावर चवरी धरणारा मीच होईन, त्यांना हात देणारा मीच होईन व श्रीगुरूंपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन.
419-13
मीचि होईन सागळा । करू सुईन गुरुळा । सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥419॥
श्रीगुरूंचा झारी धरणारा शागीर्द मीच होईन व त्यास चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन.
420-13
हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन । उळिग मी करीन । आंघोळीचे ॥420॥
श्रीगुरूला विडा देण्याची सेवा मीच करीन, त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-13
होईन गुरूंचे आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥421॥
गुरूंचे आसन मी होईन, त्यांचे अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादि उपचार मीच होईन.
422-13
मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु । आपणपे श्रीगुरु । वोवाळी न ॥422॥
श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा मी आचारी होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूंस ओवाळीन.
423-13
जे वेळी देवो आरोगिती । तेव्हा पांतीकरु मीचि पांती । मीचि होईन पुढती । देईन विडा ॥423॥
श्रीगुरू जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व (भोजन झाल्यानंतर त्यांना) मीच पुढे होईन आणि विडा देईन.
424-13
ताट मी काढीन । सेज मी झाडीन । चरणसंवाहन । मीचि करीन ॥424॥
श्रीगुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय चेपीन.
425-13
सिंहासन होईन आपण । वरी श्रीगुरु करिती आरोहण । होईन पुरेपण । वोळगेचे ॥425॥
मी स्वत: सिंहासन होईन, त्यावर श्रीगुरू बसतील व सेवेचे पुरेपण होईन (म्हणजे संपूर्ण सेवा करीन).
426-13
श्रीगुरुंचे मन । जया देईल अवधान । ते मी पुढा होईन । चमत्कारु ॥426॥
श्रीगुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन, असा चमत्कार करीन.
427-13
तया श्रवणाचे आंगणी । होईन शब्दांचिया आक्षौहिणी । स्पर्श होईन घसणी । आंगाचिया ॥427॥
श्रीगुरूंच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मी होईन.
428-13
श्रीगुरूंचे डोळे । अवलोकने स्नेहाळे । पाहाती तिये सकळे । होईन रूपे ॥428॥
श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पहातील त्या सर्व मीच होईन.
429-13
तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्या होईजैल । गंधरूपे कीजेल । घ्राणसेवा ॥429॥
त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन.
430-13
एवं बाह्यमनोगत । श्रीगुरुसेवा समस्त । वेटाळीन वस्तुजात । होऊनिया ॥430॥
याप्रमाणे सर्व वस्तूमात्र मी होऊन श्रीगुरूंची सर्व बाह्य सेवा करीन. असे त्याचे मनोगत असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-13
जव देह हे असेल । तव वोळगी ऐसी कीजेल मग देहाती नवल । बुद्धि आहे ॥431॥
हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमधे धरीन. (ती अशी)
432-13
इये शरीरीची माती । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण उभे ठाती । आराध्याचे ॥432॥
जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे रहातील, त्या जागी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन.
433-13
माझा स्वामी कवतिके । स्पर्शीजति जिये उदके । तेथ लया नेईन निके । आपी आप ॥433॥
माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी मी लयाला नेईन.
434-13
श्रीगुरु वोवाळिजती । का भुवनी जे उजळिजती । तया दीपांचिया दीप्ती । ठेवीन तेज ॥434॥
ज्या दिव्यांनी गुरूस ओवाळतात अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात लावतात, त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन.
435-13
चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा । मग आंगाचा वोळंगणा । होईन मी ॥435॥
श्रीगुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे त्या चवरीत व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन. व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन.
436-13
जिये जिये अवकाशी । श्रीगुरु असती परिवारेसी । आकाश लया आकाशी । नेईन तिये ॥436॥
ज्या ज्या पोकळीत गुरू आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन.
437-13
परी जीतु मेला न संडी । निमेषु लोका न धडी । ऐसेनि गणाविया कोडी । कल्पांचिया ॥437॥
परंतु जिवंत असतांना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषही (एक निमिषभर गुरूंची सेवा) लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यवधी कल्पनांचा काल मोजला तरी ती चालू राहील.
438-13
येतुलेवरी धिंवसा । जयाचिया मानसा । आणि करूनियाहि तैसा । अपारु जो ॥438॥
येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो. (म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते).
439-13
रात्री देवो नेणे । थोडे बहु न म्हणे । म्हणियाचेनि दाटपणे । साजा होय ॥439॥
(गुरुसेवेपुढे) तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो.
440-13
तो व्यापारु येणे नांवे । गगनाहूनि थोरावे । एकला करी आघवे । एकेचि काळी ॥440॥
गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूची सर्व सेवा एकाच काळी करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-13
हृदयवृत्ती पुढा । आंगचि घे दवडा । काज करी होडा । मानसेशी ॥441॥
त्याच्या अंत:करणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते, त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते.
442-13
एकादिया आळामाळा । श्रीगुरुचिया खेळा । लोण करी सकळा । जीविताचे ॥442॥
श्रीगुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला आपल्या सर्व जीविताचे लोण करतो (म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो).
443-13
जो गुरुदास्ये कृशु । जो गुरुप्रेमे सपोषु । गुरुआज्ञे निजवासु । आपणचि जो ॥443॥
जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वत: श्रीगुरूच्या आज्ञेचे स्वत:च्या रहाण्याचे ठिकाण असतो,
444-13
जो गुरु कुळे सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्ये सुजनु । जो गुरुसेवाव्यसने सव्यसनु । निरंतर ॥444॥
जो श्रीगुरूच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधुवरील स्नेहाचे योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहेमी गुरुसेवेच्या छंदामुळे व्यसनी असतो.
445-13
गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम । गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचे गा ॥445॥
गुरुसंप्रदायाचे जे आचार असतात, ते ज्याचे वर्णाश्रम विहितकर्मे असतात, अरे गुरुसेवा हे ज्याचे नित्यकर्म असते.
446-13
गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता । जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणे ॥446॥
गुरू हेच क्षेत्र, गुरू हीच देवता, गुरूच माता, गुरूच पिता, तो गुरुपूजेपलीकडील दुसरा मार्ग जाणत नाही.
447-13
श्रीगुरूचे द्वार । ते जयाचे सर्वस्व सार । गुरुसेवका सहोदर । प्रेमे भजे ॥447॥
श्रीगुरूचे द्वार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे व गुरुसेवकांना तो सख्या भावाच्या प्रेमाने भजतो.
448-13
जयाचे वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र । गुरुवाक्यावाचूनि शास्त्र । हाती न शिवे ॥448॥
ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते, व गुरुवाक्यावाचून दुसर्‍या शास्त्राला हात लावत नाही,
449-13
शिवतले गुरुचरणी । भलते जे पाणी । तया तीर्थयाञे आणी । तीर्थे त्रैलोक्यींची ॥449॥
ज्या कोणत्याही पाण्याला श्रीगुरुचरणांचा स्पर्श झाला आहे, त्या पाण्याला तीर्थे समजून त्या तीर्थाच्या यात्रेला त्रैलोक्यातील तीर्थे आणतो म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे समजतो.
450-13
श्रीगुरूचे उशिटे । लाहे जै अवचटे । तै तेणे लाभे विटे । समाधीसी ॥450॥
त्याला जेव्हा श्रीगुरूंचे उच्छिष्ट अकस्मात प्राप्त होते, तेव्हा त्या लाभाने तो समाधीस विटतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
451-13
कैवल्यसुखासाठी । परमाणु घे किरीटी । उधळती पायांपाठी । चालता जे ॥451॥
अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते त्यातील रज:कण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या किंमतीचे समजतो.
452-13
हे असो सांगावे किती । नाही पारु गुरुभक्ती । परी गा उत्क्रांतमती । कारण हे ॥452॥
हे राहू दे, मी गुरुभक्तीसंबंधाने किती सांगू ? गुरूवरील प्रेमाला अंत नाही परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली, हेच या विस्ताराचे कारण आहे.
453-13
जया इये भक्तीची चाड । जया इये विषयीचे कोड । जो हे सेवेवाचून गोड । न मनी काही ॥453॥
ज्याला या भक्तीची इच्छा आहे ज्याला याविषयी कौतुक आहे व जो या सेवेवाचून दुसरे काही चांगले मानत नाही,
454-13
तो तत्त्वज्ञानाचा ठावो । ज्ञाना तेणेचि आवो । हे असो तो देवो । ज्ञान भक्तु ॥454॥
तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभ्रत असते. हे वर्णन पुरे. अशी गुरूची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे.
455-13
हे जाण पा साचोकारे । तेथ ज्ञान उघडेनि द्वारे । नांदत असे जगा पुरे । इया रीती ॥455॥
ह्या रीतीने खरोखर तेथे (त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी) जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते, हे तू खरोखर समज.
456-13
जिये गुरुसेवेविखी । माझा जीव अभिलाखी । म्हणौनि सोयचुक॥ बोली केली ॥456॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) ह्या गुरुसेवेविषयी माझ्या अंत:करणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले.
457-13
एऱ्हवी असता हाती खुळा । भजनावधानी आंधळा । परिचर्येलागी पांगुळा- । पासूनि मंदु ॥457॥
नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा, मला डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याच्या कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे.
458-13
गुरुवर्णनी मुका । आळशी पोशिजे फुका । परी मनी आथि निका । सानुरागु ॥458॥
वाचा असून गुरुवर्णनाविषयी मी मुका आहे व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामधे गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे.
459-13
तेणेचि पै कारणे । हे स्थळ पोखणे । पडले मज म्हणे । ज्ञानदेवो ॥459॥
त्याच कारणामुळे ह्या (आचार्योपास्ति) पदाचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात.
460-13
परि तो बोलु उपसाहावा । आणि वोळगे अवसरु देयावा । आता म्हणेन जी बरवा । ग्रंथार्थुचि ॥460॥
तरी ते माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-13
परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभारसहिष्णु । तो बोलतसे विष्णु । पार्थु ऐके ॥461॥
ऐका ! ऐका ! भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे.
462-13
म्हणे शुचित्व गा ऐसे । जयापाशी दिसे । आंग मन जैसे । कापुराचे ॥462॥
श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूंनी स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंत:करण ही शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचे शुचित्व ज्याचे ठिकाणी असते.
463-13
का रत्नाचे दळवाडे । तैसे सबाह्य चोखडे । आत बाहेरि एके पाडे । सूर्यु जैसा ॥463॥
जसे रत्नाचे स्वरूप आतबाहेर चोख असते, अथवा सूर्य जसा आतबाहेर एकसारखा (प्रकाशमय) असतो.
464-13
बाहेरी कर्मे क्षाळला । भितरी ज्ञाने उजळला । इही दोही परी आला । पाखाळा एका ॥464॥
तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे व आतून तो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे.
465-13
मृत्तिका आणि जळे । बाह्य येणे मेळे । निर्मळु होय बोले । वेदाचेनी ॥465॥
वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी, ह्यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते.
466-13
भलतेथ बुद्धीबळी । रजआरिसा उजळी । सौंदणी फेडी थिगळी । वस्त्रांचिया ॥466॥
बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने (मातीने) स्वच्छ करता येतो व परिटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते.
467-13
किंबहुना इयापरी । बाह्य चोख अवधारी । आणि ज्ञानदीपु अंतरी । म्हणौनि शुद्ध ॥467॥
फार काय सांगावे ? ऐक. याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञानरूपी दिवा असतो. म्हणून अंतर शुद्ध असते असे समज.
468-13
एऱ्हवी तरी पंडुसुता । आत शुद्ध नसता । बाहेरि कर्म तो तत्त्वता । विटंबु गा ॥468॥
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आत मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्मे करणे, ही विटंबना होय.
469-13
मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थी न्हाणिला । कडुदुधिया माखिला । गुळे जैसा ॥469॥
प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुध्या भोपळा जसा गुळाने चोपडला.
470-13
वोस गृही तोरण बांधिले । का उपवासी अन्ने लिंपिले । कुंकुमसेंदुर केले । कांतहीनेने ॥470॥
ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवेने कुंकू व शेंदूर लावला
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-13
कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील ते झळाळ । काय करू चित्रीव फळ । आंतु शेण ॥471॥
आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात त्यांच्या वरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन, जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करायचे आहे ? कारण त्यांच्या आत शेण आहे.
472-13
तैसे कर्मवरिचिलेकडा । न सरे थोर मोले कुडा । नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगे ॥472॥
आत शुद्ध नसून केवल बाह्यात्कारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही.
473-13
म्हणौनि अंतरी ज्ञान व्हावे । मग बाह्य लाभेल स्वभावे । वरी ज्ञान कर्मे संभवे । ऐसे के जोडे ? ॥473॥
म्हणून मनामधे ज्ञान असावे, मग बाह्य शुद्धि सहजच प्राप्त होईल. शिवाय ज्ञान व कर्म या दोहोंनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल ?
474-13
यालागी बाह्य विभागु । कर्मे धुतला चांगु । आणि ज्ञाने फिटला वंगु । अंतरीचा ॥474॥
याकरता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला (शुद्ध केलेला) आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे.
475-13
तेथ अंतर बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहले । किंबहुना उरले । शुचित्वचि ॥475॥
त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली, फार काय सांगावे ? केवल एक शुचित्व मात्र राहिले.
476-13
म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत । जे स्फटिकगृहीचे डोलत । दीप जैसे ॥476॥
म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालतांना जसे बाहेरून दिसतात, तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर (इंद्रियांद्वारा) प्रगट झालेल्या दिसतात.
477-13
विकल्प जेणे उपजे । नाथिली विकृति निपजे । अप्रवृत्तीची बीजे । अंकुर घेती ॥477॥
ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्मांची बीजे अंकुर घेतात (ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ती होते).
478-13
ते आइके देखे अथवा भेटे । परी मनी काहीचि नुमटे । मेघरंगे न काटे । व्योम जैसे ॥478॥
अशा ज्या गोष्टी, त्या ऐकल्या, पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामधे काही विकार उत्पन्न होत नाहीत.
479-13
एऱ्हवी इंद्रियांचेनि मेळे । विषयांवरी तरी लोळे । परी विकाराचेनि विटाळे । लिंपिजेना ॥479॥
एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकाराच्या विटाळाने लिप्त होत नाही.
480-13
भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी । तेथ नातळे तियापरी । राहाटो जाणे ॥480॥
वाटेवरून ब्राह्मण स्त्री अथवा महाराची स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही वा दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोहोंपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याची त्यास माहिती असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-13
का पतिपुत्रांते आलिंगी । एकचि ते तरुणांगी । तेथ पुत्रभावाच्या आंगी । न रिगे कामु ॥481॥
एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते. परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो.
482-13
तैसे हृदय चोख । संकल्पविकल्पी सनोळख । कृत्याकृत्य विशेख फुडे जाणे ॥482॥
त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प या दोहोंची त्या अंत:करणास ओळख असते, विशेषत: कृत्य व अकृत्य काय आहे हे ते अंत:करण पक्के जाणते.
483-13
पाणिये हिरा न भिजे । आधणी हरळु न शिजे । तैसी विकल्पजाते न लिंपिजे । मनोवृत्ती ॥483॥
जसा हिरा पाण्याने भिजत नाही व आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ती लिप्त होत नाही.
484-13
तया नांव शुचिपण । पार्था गा संपूर्ण । हे देखसी तेथ जाण । ज्ञान असे ॥484॥
अर्जुना, यास पुरे शुचित्व असे म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पहाशील तेथे ज्ञान आहे असे समज.
485-13
आणि स्थिरता साचे । घर रिगाली जयाचे । तो पुरुष ज्ञानाचे । आयुष्य गा ॥485॥
8) स्थैर्य
आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे.
486-13
देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसीची ॥486॥
त्या पुरुषाचा देह वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो परंतु मनातील स्थिरता विस्कटतत नाही.
487-13
वत्सावरूनि धेनूचे । स्नेह राना न वचे । नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग ॥487॥
गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही (वासरावरून हलत नाही), सती जाणार्‍या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादि उपचार ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते, ते भोगांकडे येत नाही.
488-13
का लोभिया दूर जाये । परी जीव ठेविलाचि ठाये । तैसा देहो चाळिता नव्हे । चळु चित्ता ॥488॥
अथवा लोभी पुरुष दूर जातो, परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी रहातो. त्याप्रमाणे त्या स्थिर चित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते.
489-13
जातया अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । भ्रमणचक्री न भंवे । ध्रुव जैसा ॥489॥
इकडून तिकडे फिरणार्‍या मेघाबरोबर आकाश धावत नाही, अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही,
490-13
पांथिकाचिया येरझारा । सवे पंथु न वचे धनुर्धरा । का नाही जेवी तरुवरा । येणे जाणे ॥490॥
अर्जुना, वाटसरूंच्या येण्या-जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षास जाणे येणे नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-13
तैसा चळणवळणात्मकी । असोनि ये पांचभौतिकी । भूतोर्मी एकी । चळिजेना ॥491॥
त्याप्रमाणे चलन वलन करणार्‍या या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणार्‍या क्षुधादि षडूर्मींपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही.
492-13
वाहुटळीचेनि बळे । पृथ्वी जैसी न ढळे । तैसा उपद्रव उमाळे । न लोटे जो ॥492॥
वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्यांनी तो वाहवला जात नाही.
493-13
दैन्यदुःखी न तपे । भवशोकी न कंपे । देहमृत्यु न वासिपे । पातलेनी ॥493॥
दारिद्र्यापासून होणार्‍या त्रासामुळे दु:खी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यू आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही.
494-13
अर्ति आशा पडिभरे । वय व्याधी गजरे । उजू असता पाठिमोरे । नव्हे चित्त ॥494॥
कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांचे भाराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही.
495-13
निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी । परी रोमा नव्हे वांकुडी । मानसाची ॥495॥
निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही.
496-13
आकाश हे वोसरो । पृथ्वी वरि विरो । परि नेणे मोहरो । चित्तवृत्ती ॥496॥
आकाश नाहीसे होवो आथवा पृथ्वी विरघळून जावो, परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीत नसते.
497-13
हाती हाला फुली । पासवणा जेवी न घाली । तैसा न लोटे दुर्वाक्यशेली । शेलिला सांता ॥497॥
हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही.
498-13
क्षीरार्णवाचिया कल्लोळी । कंपु नाही मंदराचळी । का आकाश न जळे जाळी । वणवियाच्या ॥498॥
क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही.
499-13
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी । किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतीही ॥499॥
त्याप्रमाणे शोकमोहादि षडूर्मींच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामधे (चित्तस्थिरतेमधे) गडबड उडत नाही. फार काय सांगावे ? कल्पांतसमय आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो.
500-13
परी स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष । ते हे दशा गा देख । देखणया ॥500॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज.
501-13
हे स्थैर्य निधडे । जेथ आंगे जीवे जोडे । ते ज्ञानाचे उघडे । निधान साचे ॥501॥
हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे, तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे.
502-13
आणि इसाळु जैसा घरा । का दंदिया हतियेरा । न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥502॥
9) आत्मविनिग्रह
आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा (आपले धन असलेल्या) घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही.
503-13
का एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका । मधुविषी मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥503॥
एकुलत्या एका मुलावर जशी आई पडून रहाते (म्हणजे त्याला कधी विसंबत नाही) अथवा जशी मधमाशी मधाला लोभी असते.
504-13
अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी । नेदी उभे ठाको द्वारी । इंद्रियांच्या ॥504॥
अर्जुना, याप्रमाणे जो आपल्या अंत:करणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंत:करणाला उभे राहू देत नाही.
505-13
म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखैल । तरि जीवा टेकैल । म्हणौनि बिहे ॥505॥
तो म्हणतो की माझे अंत:करण जर इंद्रियाच्या द्वारात गेल्याचे, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले, तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंत:करणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण. तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीण, ही अंत:करणाला इंद्रियांच्या द्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटील. मग जीवावरच येऊन बेतेल, म्हणून तो पुरुष भितो.
506-13
बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसी ॥506॥
ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणार्‍या स्त्रीला तिचा दांडगा नवरा (ती बिघडण्याचा संभव असतो म्हणून) बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो.
507-13
सचेतनी वाणेपणे । देहासकट आटणे । संयमावरी करणे । बुझूनि घाली ॥507॥
चित्ताचा संकोच होण्याकरता देहसुद्धा झिजतो. व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो.
508-13
मनाच्या महाद्वारी । प्रत्याहाराचिया ठाणांतरी । जो यम दम शरीरी । जागवी उभे ॥508॥
या शरीरात मनरूपी महाद्वारात, अंतर्मुखतेच्या पहार्‍याच्या जागेत जो यम व दम यास उभे जागे ठेवतो.
509-13
आधारी नाभी कंठी । बंधत्रयाची घरटी । चंद्रसूर्य संपुटी । सुये चित्त ॥509॥
गुद व मेढ्र यांच्या मध्यभागी आधारचक्राचे ठिकाणी मूळबंधाची व नाभीमधे मणिपूर चक्राचे ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठामधे विशुद्ध चक्राचे ठिकाणी जालंदर बंधाची याप्रमाणे तीन बंधांची गस्त घालतो (अथवा घर करतो). आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो.
510-13
समाधीचे शेजेपासी । बांधोनि घाली ध्यानासी । चित्त चैतन्य समरसी । आंतु रते ॥510॥
समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांचे समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
511-13
अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हे जाणिजो । हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पै ॥511॥
अर्जुना अंत:करण-निग्रह जो म्हणतात तो हा, हे समज. व जेथे हा (अंत:करण-निग्रह) आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे.
512-13
जयाची आज्ञा आपण । शिरी वाहे अंतःकरण । मनुष्याकारे जाण । ज्ञानचि तो ॥512॥
ज्याची आज्ञा अंत:करणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्यरूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज.

इंद्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥13-8॥
अर्थ इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य, (कर्माचे विषयी) अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यू -जरा, व्याधी यांच्या ठिकाणी दु:खाचे व दोषाचे अनिदर्शन
513-13
आणि विषयाविखी । वैराग्याची निकी । पुरवणी मानसी की । जिती आथी ॥513॥
इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो,
514-13
वमिलेया अन्ना । लाळ न घोटी जेवी रसना । का आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥514॥
ओकलेल्या अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता कोणीही अंग पुढे करत नाही.
515-13
विष खाणे नागवे । जळत घरी न रिगवे । व्याघ्रविवरा न वचवे । वस्ती जेवी ॥515॥
जसे (कोणालाही) विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमधे वस्ती करण्यास जाववत नाही.
516-13
धडाडीत लोहरसी । उडी न घालवे जैसी । न करवे उशी । अजगराची ॥516॥
रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामधे जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही,
517-13
अर्जुना तेणे पाडे । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोंडे । काहीच जावो ॥517॥
अर्जुना तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने (मनाकडे) कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही.
518-13
जयाचे मनी आलस्य । देही अतिकार्श्य । शमदमी सौरस्य । जयासि गा ॥518॥
ज्याच्या मनात विषयवासनेचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो (म्हणजे ते करण्यात ज्याला आनंद वाटतो).
519-13
तपोव्रतांचा मेळावा । जयाच्या ठायी पांडवा । युगांत जया गावा- । आंतु येता ॥519॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलयकालाप्रमाणे संकट वाटते.
520-13
बहु योगाभ्यासी हाव । विजनाकडे धाव । न साहे जो नांव । संघाताचे ॥520॥
योगाभ्यासाविषयी ज्याची अती उत्कट इच्छा असते व एकांतात रहाण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते, व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
521-13
नाराचांची आंथुरणे । पूयपंकी लोळणे । तैसे लेखी भोगणे । ऐहिकीचे ॥521॥
बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो.
522-13
आणि स्वर्गाते मानसे । ऐकोनि मानी ऐसे । कुहिले पिशित जैसे । श्वानाचे का ॥522॥
स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे मांस आहेत.
523-13
ते हे विषयवैराग्य । जे आत्मलाभाचे सभाग्य । येणे ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥523॥
वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात.
524-13
ऐसा उभयभोगी त्रासु । देखसी जेथ बहुवसु । तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तू ॥524॥
जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज.
525-13
आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्ते करी । परी केलेपण शरीरी । वसो नेदी ॥525॥
11) अनहंकार
आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु ती केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही.
526-13
वर्णाश्रमपोषके । कर्मे नित्यनैमित्तिके । तयामाजी काही न ठके । आचरता ॥526॥
वर्णाश्रमधर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असता त्यात काहीही रहात नाही.
527-13
परि हे मिया केले । की हे माझेनि सिद्धी गेले । ऐसे नाही ठेविले । वासनेमाजी ॥527॥
परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्यामुळे हे सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमधे ठेवला नाही.
528-13
जैसे अवचितपणे । वायूसि सर्वत्र विचरणे । का निरभिमान उदैजणे । सूर्याचे जैसे ॥528॥
ज्याप्रमाणे अहंकारावाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे हे जसे निरभिमान असते.
529-13
का श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेविण चाले । तैसे अवष्टंभहीन भले । वर्तणे जयाचे ॥529॥
अथवा वेद जसे स्वभावत: बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतूवाचून वहाते त्याप्रमाणे अहंकारावाचून ज्याचे चांगले वागणे असते.
530-13
ऋतुकाळी तरी फळती । परी फळलो हे नेणती । तया वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मी सदा ॥530॥
वृक्षास तर योग्य ऋतुकाळात फळे येतात परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाहीत. त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमधे त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहेमी असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
531-13
एवं मनी कर्मी बोली । जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढिली । दोरी जैसी ॥531॥
ज्याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते.
532-13
संबंधेवीण जैसी । अभ्रे असती आकाशी । देही कर्मे तैसी । जयासि गा ॥532॥
ज्याप्रमाणे आकशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्यशिवाय ती कर्मे असतात.
533-13
मद्यपाआंगीचे वस्त्र । लेपाहातीचे शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधले आहे ॥533॥
मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते.
534-13
तया पाडे देही । जया मी आहे हे सेचि नाही । निरहंकारता पाही । तया नांव ॥534॥
त्याप्रमाणे ज्याला आपण देहामधे आहो अशी आठवण नसते, त्याच्या त्या स्थितीला निरहंकारिता हे नाव आहे, असे समज.
535-13
हे संपूर्ण जेथे दिसे । तेथेचि ज्ञान असे । इयेविषी अनारिसे । बोलो नये ॥535॥
ही निरहंकारिता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये.
536-13
आणि जन्ममृत्युजरादुःखे । व्याधिवार्धक्यकलुषे । तिये आंगा न येता देखे । दुरूनि जो ॥536॥
जन्म-मृत्यू-जरा-व्याधी- व दोषाचे अनुदर्शन
जन्म = आणि जन्म, मृत्यू, दु:ख, रोग, जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच दुरून प्राप्त होण्याच्या आधीपासूनच पहातो.
537-13
साधकु विवसिया । का उपसर्गु योगिया । पावे उणेयापुरेया । वोथंबा जेवी ॥537॥
जसे ठेव्यावर असलेल्या पिशाचाचा प्रतिबंध दूर करण्याविषयी साधक मांत्रिक किंवा ठेवा काढणारा मनुष्य जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यास येणार्‍या अडथळ्यासंबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा भिंत वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो.
538-13
वैर जन्मांतरीचे । सर्पा मनौनि न वचे । तेवी अतीता जन्माचे । उणे जो वाहे ॥538॥
जसे सर्पाच्या मनातून जन्मजन्मांतरीचे वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो.
539-13
डोळा हरळ न विरे । घाईं कोत न जिरे । तैसे काळीचे न विसरे । जन्मदुःख ॥539॥
डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही म्हणजे सारखा खुपत रहातो अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही तर एकसारखे खुपत रहाते, त्याप्रमाणे जो मागील जन्माचे दु:ख विसरत नाही.
540-13
म्हणे पूयगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रे निघाला । कटा रे मिया चाटिला । कुचस्वेदु ॥540॥
तो म्हणतो, हाय, हाय, मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरेरे स्तनावरील घाम मी चाटला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
541-13
ऐसाइसिया परी । जन्माचा कांटाळा धरी । म्हणे आता ते मी न करी । जेणे ऐसे होय ॥541॥
याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व म्हणतो की ज्या योगाने असे होईल (जन्म घ्यावा लागेल) ते मी यापुढे करणार नाही.
542-13
हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । की वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥542॥
पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा माणूस जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो.
543-13
मारिलियाचेनि रागे । पाठीचा जेवी सूड मागे । तेणे आक्षेपे लागे । जन्मापाठी ॥543॥
(वडील भावाला) मारल्याचे रागाने जसा पाठचा भाऊ सूड मागतो (सूड घेण्यास खटपट करतो) तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो.
544-13
परी जन्मती ते लाज । न सांडी जयाचे निज । संभाविता निस्तेज । न जिरे जेवी ॥544॥
परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याची लाज केव्हाही सोडीत नाही.
545-13
आणि मृत्यु पुढा आहे । तोचि कल्पांती का पाहे । परी आजीचि होये । सावधु जो ॥545॥
मृत्यू =आणि पुढे कल्पांती येणारा असा इतका दूर जरी मृत्यू असला तथापि तो आजच आला आहे असे समजून तो सावध असतो.
546-13
माजी अथांव म्हणता । थडियेचि पंडुसुता । पोहणारा आइता । कासे जेवी ॥546॥
नदीमधे अथांग पाणी आहे असे म्हणतात, अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो.
547-13
का न पवता रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो । वोडण सुइजे घावो । न लागताचि ॥547॥
अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी,
548-13
पाहेचा पेणा वाटबंधा । तव आजीचि होईजे सावधा । जीवु न वचता औषधा । धाविजे जेवी ॥548॥
उद्याच्या मुक्कामावर वाटमारा आहे असे कळल्यावर जसे आजच सावध व्हायला पाहिजे, प्राण जाण्याचे पूर्वीच औषधाकरिता वैद्याकडे धावत गेले पाहिजे.
549-13
येऱ्हवी ऐसे घडे । जो जळता घरी सांपडे । तो मग न पवाडे । कुहा खणो ॥549॥
नाहीतर, ज्याप्रमाणे जळत्या घरात सापडलेला मनुष्य विहीर खणून पाण्याने आग विझवू शकत नाही, त्याप्रमाणे होईल.
550-13
चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । तो बोंबेहिसकट निमाला । कोण सांगे ॥550॥
खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो ‘मी बुडतो ” अशा ओरडण्यासह मेला, आता तो याप्रमाणे तो मेला असे कोण सांगेल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
551-13
म्हणौनि समर्थेंसी वैर । जया पडिले हाडखाइर । तो जैसा आठही पाहर । परजून असे ॥551॥
म्हणून समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे, तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो.
552-13
नातरी केळवली नोवरी । का संन्यासी जियापरी । तैसा न मरता जो करी । मृत्युसूचना ॥552॥
अथवा लग्नाचा निश्चय घेऊन गडंगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याचे अगोदरच तो पुढे येणार्‍या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो.
553-13
पै गा जो ययापरी । जन्मेचि जन्म निवारी । मरणे मृत्यु मारी । आपण उरे ॥553॥
अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्यजन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो.
554-13
तया घरी ज्ञानाचे । सांकडे नाही साचे । जया जन्ममृत्युचे । निमाले शल्य ॥554॥
अशा रीतीने ज्याच्या अंत:करणात जन्ममृत्यू हे काट्यासारखे सलत रहातात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते.
555-13
आणि तयाचिपरी जरा । न टेकता शरीरा । तारुण्याचिया भरा- । माजी देखे ॥555॥
जरा = आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणार्‍या म्हातारपणाबद्दल विचार करतो.
556-13
म्हणे आजिच्या अवसरी । पुष्टि जे शरीरी । ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥556॥
तो म्हणतो, आजच्या वेळी (भर तारुण्यात) ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल.
557-13
निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय । अमंत्र्या राजाची परी आहे । बळा यया ॥557॥
दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातापायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती, प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे.
558-13
फुलांचिया भोगा- । लागी प्रेम टांगा । ते करेयाचा गुडघा । तैसे होईल ॥558॥
फुलांच्या (सुवासाच्या) भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ होईल.
559-13
वोढाळाच्या खुरी । आखरु आते बुरी । ते दशा माझ्या शिरी । पावेल गा ॥559॥
ओढाळ गुरांच्या खुरांनी जसी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते (म्हणजे त्यात कोठे गवत उगवते व कोठे उगवत नाही) त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल.
560-13
पद्मदळेसी इसाळे । भांडताति जे हे डोळे । ते होती पडवळे । पिकली जैसी ॥560॥
कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
561-13
भंवईची पडळे । वोमथती सिनसाळे । उरु कुहिजैल जळे । आंसुवाचेनि ॥561॥
भुवईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल.
562-13
जैसे बाभुळीचे खोड । गिरबडूनि जाती सरडे । तैसे पिचडी तोंड । सरकटिजैल ॥562॥
ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरडा गिरबिडून टाकतात, सरड खोडावरुन खालीवर जात राहतो त्यामुळे डिंक पायाला लागून खोड गुळगुळीत होते त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल.
563-13
रांधवणी चुलीपुढे । पऱ्हे उन्मादती खातवडे । तैसीचि ये नाकाडे । बिडबिडती ॥563॥
स्वयंपाक करण्याच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात (उष्टे पाणी साचून) जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील.
564-13
तांबुले वोठ राऊ । हासता दात दाऊ । सनागर मिरऊ । बोल जेणे ॥564॥
ज्या मुखाचे ओठ मी विड्याने (तारुण्यावस्थेत रंगवतो) व ज्यातील दात हसताना दाखवतो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो,
565-13
तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दातांसहित ॥565॥
त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील.
566-13
कुळवाडी रिणे दाटली । का वांकडिया ढोरे बैसली । तैसी नुठी काही केली । जीभचि हे ॥566॥
शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा वाकडीच्या पावसाने (झडीच्या पावसाने) जशी एकदा गुरे बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठत नाही.
567-13
कुसळे कोरडी । वारेनि जाती बरडी । तैसा आपत्य तोंडी । दाढियेसी ॥567॥
माळजमिनीतील वाळलेली कुसळे जशी वार्‍याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते.
568-13
आषाढीचेनि जळे । जैसी झिरपती शैलाची मौळे । तैसे खांडीहूनि लाळे । पडती पूर ॥568॥
आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वहातील.
569-13
वाचेसि अपवाडु । कानी अनुघडु । पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥569॥
वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य रहाणार नाही, कानाची कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हातार्‍या माकडासारखे बेडौल होईल.
570-13
तृणाचे बुझवणे । आंदोळे वारेनगुणे । तैसे येईल कापणे । सर्वागासी ॥570॥
गवताचे बुजगावणे जसे वार्‍याने हालते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वागात कापरे भरेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
571-13
पाया पडती वेगडी । हात वळती मुरकुंडी । बरवेपणा बागडी । नाचविजैल ॥571॥
पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी सोंगासारखा नाचवला जाईल. म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन देहाची आकृती सोंगासारखी होईल.
572-13
मळमूत्रद्वारे । होऊनि ठाकती खोंकरे । नवसिये होती इतरे । माझिया निधनी ॥572॥
मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील.
573-13
देखोनि थुंकील जगु । मरणाचा पडैल पांगु । सोइरिया उबगु । येईल माझा ॥573॥
अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील व मला मरण लवकर येणार नाही आणि सोयर्‍या-धायर्‍या लोकांना माझा कंटाळा येईल.
574-13
स्त्रिया म्हणती विवसी । बाळे जाती मूर्छी । किंबहुना चिळसी । पात्र होईन ॥574॥
बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिऊन मूर्च्छित होतील. फार काय सांगावे ? मी सर्वाच्या किळसेला पात्र होईन.
575-13
उभळीचा उजगरा । सेजारिया साइलिया घरा । शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांते हा ॥575॥
शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणार्‍या जागरणामुळे, हा म्हातारा पुष्कळांना शिणवील ” असे ते म्हणतील.
576-13
ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणी । देखे मग मनी । विटे जो गा ॥576॥
असा पुढे येणार्‍या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पहातो आणि मग तो ज्याविषयी मनात विटतो.
577-13
म्हणे पाहे हे येईल । आणि आताचे भोगिता जाईल । मग काय उरेल । हितालागी ? ॥577॥
तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय उरणार आहे ?
578-13
म्हणौनि नाइकणे पावे । तव आईकोनि घाली आघवे । पंगु न होता जावे । तेथ जाय ॥578॥
म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो, आपण पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे (देवस्थान, तीर्थ वगैरे ठिकाणी) जावयाचे असेल तेथे जातो.
579-13
दृष्टी जव आहे । तव पाहावे तेतुले पाहे । मूकत्वा आधी वाचा वाहे । सुभाषिते ॥579॥
जेथपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलायचे ते बोलून घेतो.
580-13
हात होती खुळे । हे पुढील मोटके कळे । आणि करूनि घाली सकळे । दानादिके ॥580॥
हात लुळे होतील, ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादि सर्व सत्कृत्ये करून टाकतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
581-13
ऐसी दशा येईल पुढे । तै मन होईल वेडे । तव चिंतूनि ठेवी चोखडे । आत्मज्ञान ॥13-581॥
अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो.
582-13
जै चोर पाहे झोंबती । तव आजीचि रुसिजे संपत्ती । का झांकाझांकी वाती । न वचता कीजे ॥582॥
जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी,
583-13
तैसे वार्धक्य यावे । मग जे वाया जावे । ते आताचि आघवे । सवते करी ॥583॥
त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. जे करावयाचे ते सर्व केले.
584-13
आता मोडूनि ठेली दुर्गे । का वळित धरिले खगे । तेथ उपेक्षूनि जो निघे । तो नागवला की ? ॥584॥
आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी (ऐन संध्याकाळी) जर एखादा प्रवासी प्रवास करत आला असता व त्या वेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय ? (तो नागवला जात नाही. )
585-13
तैसे वृद्धाप्य होये । आलेपण ते वाया जाये । जे तो शतवृद्ध आहे । नेणो कैचा ॥585॥
तसे म्हातारपण येईल व जन्माला आलेपण व्यर्थ जाईल, कारण (शंभर वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणाणारा) तो तरी शतायु आहे काय ? (की नाही) कोणास ठाऊक ?
586-13
झाडिलीचि कोळे झाडी । तया न फळे जेवी बोंडी । जाहला अग्नि तरी राखोंडी । जाळील काई ? ॥586॥
तीळाचे कोळ (तीळाचे उपटलेले झाड) एकदा झाडून त्यातील सगले तीळ निघून गेल्यावर जर ती कोळे झाडली तर त्या कोळाच्या बोंडामधून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नी जरी असला, पण तो एकदा राखुंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय ?
587-13
म्हणौनि वृद्धाप्याचे आठवे । वृद्धाप्या जो नागवे । तयाच्या ठायी जाणावे । ज्ञान आहे ॥587॥
(त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील ?) असे वृद्धावस्थेत होणार्‍या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे.
588-13
तैसेचि नाना रोग । पडिघाती जव पुढा आंग । तव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥588॥
व्याधी = त्याचप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो.
589-13
सापाच्या तोंडी । पडली जे उंडी । ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥589॥
सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो,
590-13
तैसा वियोगे जेणे दुःखे । विपत्ति शोक पोखे । ते स्नेह सांडूनि सुखे । उदासु होय ॥590॥
त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दु:खे, विपत्ति व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधानवृत्ती ठेऊन उदास होऊन रहातो,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
591-13
आणि जेणे जेणे कडे । दोष सूतील तोंडे । तया कर्मरंध्रा गुंडे । नियमाचे दाटी ॥591॥
आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचुप्रवेश करतील त्या त्या कर्म करणार्‍या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो.
592-13
ऐसाइसिया आइती । जयाची परी असती । तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा ॥592॥
अशा अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच अर्जुना, ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज.
593-13
आता आणीकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन आइक । धनंजया ॥593॥
आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना, ऐक.

श्लोक 9
असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥13. 9॥
अर्थ देहासंबधी अनासक्ती, स्त्रीपुत्रगृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व ढळू न देणे ॥13-9॥
594-13
तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी । उखिता जैसा बिढारी । बैसला आहे ॥594॥
अनासक्ती-
तर बिर्‍हाडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिर्‍हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वत:च्या शरीराविषयी उदास असतो.
595-13
का झाडाची साउली । वाटे जाता मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाही ॥595॥
अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते.
596-13
साउली सरिसीच असे । परी असे हे नेणिजे जैसे । स्त्रियेचे तैसे । लोलुप्य नाही ॥596॥
अलोलुपता
आपली सावली आपल्याबरोबरच नेहेमी असते. परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते,
597-13
आणि प्रजा जे जाली । तिये वस्ती कीर आली । का गोरुवे बैसली । रुखातळी ॥597॥
आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते (तसा तो ज्ञानी, प्रजेसंबंधी उदास असतो.
598-13
जो संपत्तीमाजी असता । ऐसा गमे पंडुसुता । जैसा का वाटे जाता । साक्षी ठेविला ॥598॥
अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टीविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो, तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते.
599-13
किंबहुना पुंसा । पांजरियामाजी जैसा । वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥599॥
फार काय सांगावे ? राघू जसा पिंजर्‍यात असतो, तसा जो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो.
600-13
एऱ्हवी दारागृहपुत्री । नाही जया मैत्री । तो जाण पा धात्री । ज्ञानासि गा ॥600॥
एरवी ज्याचे स्त्रीपुत्रगृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
601-13
महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसे । जयाच्या ठायी ॥601॥
15) चित्ताचे समत्व
आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय गोष्टी सारख्या असतात (म्हणजे प्रिय गोष्टींनी ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय गोष्टींनी ज्याला वाईट वाटत नाही.
602-13
का तिन्ही काळ होता । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखी चित्ता । भेदु नाही ॥602॥
अथवा सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे व दु:खाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंत:करण सुखी अथवा दु:खी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही.
603-13
जेथ नभाचेनि पाडे । समत्वा उणे न पडे । तेथ ज्ञान रोकडे । वोळख तू ॥603॥
कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी प्रिय वा अप्रिय वस्तूंच्या हानी अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज.

(श्लोक 10)
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥13. 10॥
अर्थ माझ्या ठिकाणी अनन्ययोगाने अव्यभिचारिणी भक्ती, एकांत प्रदेशात रहाणे व जनांच्या समुदायाची खंती ॥13-10॥
604-13
आणि मीवाचूनि काही । आणिक गोमटे नाही । ऐसा निश्चयोचि तिही ? जयाचा केला ॥604॥
अव्यभिचारिणी भक्ती
आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी (कायेने, वाचेने व मनाने) निश्चयच केलेला आहे.
605-13
शरीर वाचा मानस । पियाली कृतनिश्चयाचा कोश । एक मीवाचूनि वास । न पाहती आन ॥605॥
ज्याचे शरीर वाचा, वाचा व मन ह्या तिघांनी वरील प्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे (प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे) आणि एक माझ्यावाचून आणखी कशाचीही इच्छा ते करत नाहीत.
606-13
किंबहुना निकट निज । जयाचे जाहले मज । तेणे आपणया आम्हा सेज । एकी केली ॥606॥
फार काय सांगावे ! ज्याचे अंत:करण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे. (माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन राहिला आहे).
607-13
रिगता वल्लभापुढे । नाही आंगी जीवी सांकडे । तिये कांतेचेनि पाडे । एकसरला जो ॥607॥
पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंत:करणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे.
608-13
मिळोनि मिळतचि असे । समुद्री गंगाजळ जैसे । मी होऊनि मज तैसे । सर्वस्वे भजती ॥608॥
गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात.
609-13
सूर्याच्या होण्या होईजे । का सूर्यासवेचि जाइजे । हे विकलेपण साजे । प्रभेसि जेवी ॥609॥
सूर्याच्या उदयाबरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा (अनन्यता) प्रभेला जसा शोभतो.
610-13
पै पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुके । ते लहरी म्हणती लौकिके । एऱ्हवी ते पाणी ॥610॥
पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
611-13
जो अनन्यु यापरी । मी जाहलाही माते वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पै गा ॥611॥
जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे माझ्याशी ऐक्य पावूनही माझे भजन करतो, अर्जुना तोच ते मूर्तिमंत ज्ञान होय.
612-13
आणि तीर्थे धौते तटे । तपोवने चोखटे । आवडती कपाटे । वसवू जया ॥612॥
17) एकांत
आणि तीर्थे (नदी व समुद्र यांचे) पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास रहावयास आवडते,
613-13
शैलकक्षांची कुहरे । जळाशय परिसरे । अधिष्ठी जो आदरे । नगरा न ये ॥613॥
डोंगराच्या बगलेतील गुहामधे व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने रहातो आणि शहरात येत नाही,
614-13
बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदावरी खंती । जाण मनुष्याकारे मूर्ती । ज्ञानाची तो ॥614॥
ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकाचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपाने ज्ञानाची केवल मूर्तीच आहे असे समज.
615-13
आणिकहि पुढती । चिन्हे गा सुमती । ज्ञानाचिये निरुती- । लागी सांगो ॥615॥
हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो.

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥13. 11॥
अर्थ अध्यात्मज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तेथे दृष्टी स्थित होणे, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. या खेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय.
616-13
तरी परमात्मा ऐसे । जे एक वस्तु असे । ते जया दिसे । ज्ञानास्तव ॥616॥
(18) अध्यात्मज्ञानाचे नित्यत्व मानणे.
तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते.
617-13
ते एकवाचूनि आने । जिये भवस्वर्गादि ज्ञाने । ते अज्ञान ऐसा मने । निश्चयो केला ॥617॥
त्या अध्यात्मज्ञानावाचून, इतर जी स्वर्ग व संसारसंबंधाची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो,
618-13
स्वर्गा जाणे हे सांडी । भवविषयी कान झाडी । दे अध्यात्मज्ञानी बुडी । सद्भावाची ॥618॥
स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधाने कानावर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेऊन त्यात रममाण होतो.
619-13
भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे । निघिजे जेवी नीटे । राजपंथे ॥619॥
जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते, तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत, त्यांचा शोध करून मग जसे सरळ मार्गाने निघावे,
620-13
तैसे ज्ञानजाता करी । आघवेचि एकीकडे सारी । मग मन बुद्धि मोहरी । आत्मज्ञानी ॥620॥
त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यास अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
621-13
म्हणे एक हेचि आथी । येर जाणणे ते भ्रांती । ऐसी निकुरेसी मती । मेरु होय ॥621॥
तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरु (आधार) होते.
622-13
एवं निश्चयो जयाचा । द्वारी आध्यात्मज्ञानाचा । ध्रुव देवो गगनीचा । तैसा राहिला ॥622॥
याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव तार्‍याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो.
623-13
तयाच्या ठायी ज्ञान । या बोला नाही आन । जे ज्ञानी बैसले मन । तेव्हाचि ते तो ॥623॥
त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या (भगवंताच्या) बोलण्यात आडपडदा आहे असे अर्जुना तू म्हणशील (तर तुला स्पष्ट सांगतो की) जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला.
624-13
तरी बैसलेपणे जे होये । बैसताचि बोले न होये । तरी ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥624॥
तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाचे ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे.
625-13
आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जे एक फळ । ते ज्ञेयही वरी सरळ । दिठी जया ॥625॥
आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते, ते फल म्हणजे ज्ञेय (ब्रह्म) होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते.
626-13
एऱ्हवी बोधा आलेनि ज्ञाने । जरी ज्ञेय न दिसेचि मने । तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥626॥
वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही.
627-13
आंधळेनि हाती दिवा । घेऊनि काय करावा ? । तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायाचि जाय ॥627॥
आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा ? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो.
628-13
जरि ज्ञानाचेनि प्रकाशे । परतत्त्वी दिठी न पैसे । ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनी ॥628॥
जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याचे ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे, असे म्हणावयास हरकत नाही.
629-13
म्हणौनि ज्ञान जेतुले दावी । तेतुली वस्तुचि आघवी । ते देखे ऐशी व्हावी । बुद्धि चोख ॥629॥
म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहील अशी बुद्धी शुद्ध पाहिजे.
630-13
यालागी ज्ञाने निर्दोखे । दाविले ज्ञेय देखे । तैसेनि उन्मेखे । आथिला जो ॥630॥
याकरता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पहाते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
631-13
जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी । तो ज्ञान हे शब्दी । करणे न लगे ॥631॥
जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे, हे शब्दाने सांगावयास नको.
632-13
पै ज्ञानाचिये प्रभेसवे । जयाची मती ज्ञेयी पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वाते ॥632॥
एवढेच काय परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो.
633-13
तोचि ज्ञान हे बोलता । विस्मो कवण पंडुसुता ? । काय सवितयाते सविता । म्हणावे असे ? ॥633॥
अर्जुना तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे ? सूर्याला सूर्य म्हणावयाला पाहिजे काय ?
634-13
तव श्रोते म्हणती असो । संगतियेचा अतिसो । ग्रंथोक्ती तेथ आडसो । घालितोसी का ॥634॥
श्रोत्यांची प्रतिक्रिया
तेव्हा श्रोते म्हणाले, ‘ते राहू दे, त्या पुरुषाचे अतिशय वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस ?
635-13
तुझा हाचि आम्हा थोरु । वक्तृत्वाचा पाहुणेरु । जे ज्ञानविषो फारु । निरोपिला ॥635॥
आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला.
636-13
रसु होआवा अतिमात्रु । हा घेतासि कविमंत्रु । तरी अवंतूनि शत्रु । करितोसि का गा ? ॥636॥
आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळ अतिशय रसभरित करावे ही जी सामान्य कवींची क्लृप्ती, तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास.
637-13
ठायी बैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे । तियेचा येरु वोडव मिळे । कोणा अर्था ? ॥637॥
भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदरसत्काराचा काय उपयोग ?
638-13
आघवाचि विषयी भादी । परी सांजवणी टेको नेदी । ते खुरतोडी नुसधी । पोषी कवण ? ॥638॥
इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढण्याच्यावेळी जी कासेखाली बसू देत नाही (खाली बसल्याबरोबर लाथेचा फटकारा मारते), तर अशी ती नुसती लाथाडी गाय कोण पोशील ?
639-13
तैसी ज्ञानी मती न फाके । येर जल्पती नेणो केतुके । परि ते असो निके । केले तुवा ॥639॥
त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावताना (इतर कवी) ज्ञानावाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात, ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे. तू चांगले केलेस.
640-13
जया ज्ञानलेशोद्देशे । कीजती योगादि सायासे । ते धणीचे आथी तुझिया ऐसे । निरूपण ॥640॥
ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगादिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
641-13
अमृताची सातवांकुडी । लागो का अनुघडी । सुखाच्या दिवसकोडी । गणिजतु का ॥641॥
अमृताची झड एकसारखी सात दिवस लागेना का तिचा कंटाळा यावयाचा नाही. दु:खाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही, इतका मोठा वाटतो तसे सुखाचे दिवस कोट्यवधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का ?
642-13
पूर्णचंद्रेंसी राती । युग एक असोनि पहाती । तरी काय पाहात आहाती । चकोर ते ? ॥642॥
पूर्ण चंद्रासह रात्र, एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली, तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय ?
643-13
तैसे ज्ञानाचे बोलणे । आणि येणे रसाळपणे । आता पुरे कोण म्हणे ? । आकर्णिता ॥643॥
त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना कोण पुरे म्हणेल ?
644-13
आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये । तै सरो नेणे रससोये । ऐसे आथी ॥644॥
आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपायचे माहीत नसते असे असते. म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारणीचे मनात येतच नाही अशी स्थिती असते.
645-13
तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानी आम्हासि लागु । आणि तुजही अनुरागु । आथि तेथ ॥645॥
तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे (ज्ञानाचे ठिकाणी) प्रीती आहे.
646-13
म्हणौनि यया वाखाणा- । पासी से आली चौगुणा । ना म्हणो नयेसि देखणा ? । होसी ज्ञानी ॥646॥
म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ति आली. तू ज्ञानामधे डोळस आहेस, हे नाही म्हणता येत नाही,
647-13
तरी आता ययावरी । प्रज्ञेच्या माजघरी । पदे साच करी । निरूपणी ॥647॥
तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर.
648-13
या संतवाक्यासरिसे । म्हणितले निवृत्तिदासे । माझेही जी ऐसे । मनोगत ॥648॥
ज्ञानेशांचे उत्तर
या संतांच्या आज्ञेबरोबर ‘महाराज, माझाही हेतू असाच आहे ” असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले.
649-13
यावरी आता तुम्ही । आज्ञापिला स्वामी । तरी वाया वाग् मी । वाढो नेदी ॥649॥
माझाही मूळ हेतू असाच होता यावर महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही.
650-13
एवं इये अवधारा । ज्ञानलक्षणे अठरा । श्रीकृष्णे धनुर्धरा । निरूपिली ॥650॥
याप्रमाणे ज्ञानाची ही अठरा लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली, ऐका.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
651-13
मग म्हणे या नांवे । ज्ञान एथ जाणावे । हे स्वमत आणि आघवे । ज्ञानियेही म्हणती ॥651॥
यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले.
652-13
करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसे ज्ञान आम्ही डोळा । दाविले तुज ॥652॥
तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले.
653-13
आता धनंजया महामती । अज्ञान ऐसी वदंती । तेही सांगो व्यक्ती । लक्षणेसी ॥653॥
यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना, अज्ञान जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो.
654-13
एऱ्हवी ज्ञान फुडे जालिया । अज्ञान जाणवे धनंजया । जे ज्ञान नव्हे ते अपैसया । अज्ञानचि ॥654॥
अज्ञानाची लक्षणे = सामान्य लक्षण
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप कोणीही न सांगता अज्ञानच आहे
655-13
पाहे पा दिवसु आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे । वाचूनि काही तिसरे । नाही जेवी ॥655॥
अर्जुना असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते.
656-13
तैसे ज्ञान जेथ नाही । तेचि अज्ञान पाही । तरी सांगो काही काही । चिन्हे तिये ॥656॥
त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण ती काही लक्षणे सांगतो ऐक.
657-13
तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे । सत्कारे होये । तोषु जया ॥657॥
अज्ञानाची लक्षणे = प्रतिष्ठा, मान, गर्विष्ठपणा
तरी जो प्रतिष्ठेकरता जगतो, जो मानाची वाट पहातो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो.
658-13
गर्वे पर्वताची शिखरे । तैसा महत्त्वावरूनि नुतरे । तयाचिया ठायी पुरे । अज्ञान आहे ॥658॥
पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज.
659-13
आणि स्वधर्माची मांगळी बांधे । वाचेच्या पिंपळी । उभिला जैसा देउळी । जाणोनि कुंचा ॥659॥
आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज (मोळाची दोरी) सर्वाना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, (म्हणजे आपण केलेला धर्म वाचेने लोकांना सांगतो) अथवा जसे देवळात सर्वाना उघड दिसेल असे मोर्चेल जाणूनबुजून ठेवलेले असते.
660-13
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा । करी तेतुले मोहरा । स्फीतीचिया ॥660॥
विद्येचा पसारा, दुकान घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटवतो आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
661-13
आंग वरिवरी चर्ची । जनाते अभ्यर्चिता वंची । तो जाण पा अज्ञानाची । खाणी एथ ॥661॥
स्वत:च्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तर्‍हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्यास फसवीत रहातो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज.
662-13
आणि वन्ही वनी विचरे । तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे । तैसे जयाचेनि आचारे । जगा दुःख ॥662॥
अज्ञानाची लक्षणे = दुराचार, दुर्वचन
आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगास दु:ख होते,
663-13
कौतुके जे जे जल्पे । ते सबळाहूनी तीख रुपे । विषाहूनि संकल्पे । मारकु जो ॥663॥
अणि जो सहज जे बोलेल, ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो.
664-13
तयाते बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचे निधान । हिंसेसि आयतन । जयाचे जिणे ॥664॥
आणि ज्याचे वागणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे (इतकेच नव्हे) तर तोच अज्ञानाचा खजिना आहे.
665-13
आणि फुंके भाता फुगे । रेचिलिया सवेचि उफगे । तैसा संयोगवियोगे । चढे वोहटे ॥665॥
अज्ञानाची लक्षणे = चित्ताचे असमत्व
जसा भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो (संकोचित होतो) त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित व दु:खी होतो.
666-13
पडली वारयाचिया वळसा । धुळी चढे आकाशा । हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे ॥666॥
वार्‍याच्या भोवर्‍यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो.
667-13
निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके । थेंबे विरे वारोनि शोखे । चिखलु जैसा ॥667॥
जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून रहातो व जसा चिखल पाण्याच्या एकाक थेंबाने विरघळतो व थोड्याशा वार्‍याने तो वाळतो.
668-13
तैसा मानापमानी होये । जो कोण्हीहि उर्मी न साहे । तयाच्या ठायी आहे । अज्ञान पुरे ॥668॥
त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही प्रकारचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे.
669-13
आणि जयाचिया मनी गाठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी । आंगे मिळे जीवे पाठी । भलतया दे ॥669॥
अज्ञानाची लक्षणे = मनातून दुसर्‍याचा घात
आणि ज्याच्या मनामधे गाठ असते आपल्या मनातील गोष्ट दुसर्‍यास कधीही कळू देत नाही ज्याचे बोलणे व पहाणे वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो पण मनाने मात्र त्यास तोंडघशी पाडतो.
670-13
व्याधाचे चारा घालणे । तैसे प्रांजळ जोगावणे । चांगाची अंतःकरणे । विरु करी ॥670॥
पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते वरून पहाणारास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो, त्याप्रमाणे सरळ ज्याचे दुसर्‍यास पोसणे अथवा सांभाळणे असते पण ते केवळ त्या पोसले जाणार्‍या माणसाच्या घाताकरताच असते व जो चांगल्या माणसाची अंत:करणे विरुद्ध करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
671-13
गार शेवाळे गुंडाळली । का निंबोळी जैसी पिकली । तैसी जयाची भली । बाह्य क्रिया ॥671॥
शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते, (परंतु आत कडू असते) तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते
672-13
अज्ञान तयाचिया ठायी । ठेविले असे पाही । याबोला आन नाही । सत्य मानी ॥672॥
त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही, हे खरे मान.
673-13
अज्ञानाची लक्षणे = गुरूविषयी अश्रद्धा
आणि गुरुकुळी लाजे । जो गुरुभक्ती उमजे । विद्या घेऊनि माजे । गुरूसीचि जो ॥673॥
आणि गुरुकुळी ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरूपासून विद्या शिकून गुरूवरच उलटतो,
674-13
तयाचे नाम घेणे । ते वाचे शूद्रान्न होणे । परी घडले लक्षणे । बोलता इये ॥674॥
त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिव्हेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे. पण काय करावे ? अज्ञानाची लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले.
675-13
आता गुरुभक्तांचे नांव घेवो । तेणे वाचेसि प्रायश्चित देवो । गुरुसेवका नांव पहा वो । सूर्यु जैसा ॥675॥
म्हणून आता गुरूच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्यायोगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समजा.
676-13
येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा । जो गुरुतल्पगाचा । नामी झाला ॥676॥
एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला, तो घालवील,
677-13
हा ठायवरी । तया नामाचे भय हरी । मग म्हणे अवधारी । आणिके चिन्हे ॥677॥
गुरुभक्ताच्या नावाच्या उच्चार येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चरणाचे भय (दोष) हरण करतो, मग आणखी अज्ञानाची चिन्हे ऐक, असे देव म्हणाले.
अज्ञानाची लक्षणे = कर्म करण्य़ाविषयी आळस
678-13
तरि आंगे कर्मे ढिला । जो मने विकल्पे भरला । अडवीचा अवगळला । कुहा जैसा ॥678॥
तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय.
679-13
तया तोंडी कांटिवडे । आंतु नुसधी हाडे । अशुचि तेणे पाडे । सबाह्य जो ॥679॥
त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात (पाणी नसते). त्या आडाप्रमाणे जो आतबाहेर अमंगल असतो.
680-13
जैसे पोटालागी सुणे । उघडे झाकले न म्हणे । तैसे आपले परावे नेणे । द्रव्यालागी ॥680॥
ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
681-13
इया ग्रामसिंहाचिया ठायी । जैसा मिळणी ठावो अठावो नाही । तैसा स्त्रीविषयी काही । विचारीना ॥681॥
कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संगाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीसंगाविषयी जो काही विचार करत नाही.
682-13
कर्माचा वेळु चुके । का नित्य नैमित्तिक ठाके । ते जया न दुखे । जीवामाजी ॥682॥
विहित कर्मे करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याला मनात दु:ख वाटत नाही,
683-13
पापी जो निसुगु । पुण्याविषयी अतिनिलागु । जयाचिया मनी वेगु । विकल्पाचा ॥683॥
पाप करण्यास ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय नि:संग बनलेला असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते.
684-13
तो जाण निखिळा । अज्ञानाचा पुतळा । जो बांधोनि असे डोळा । वित्ताशेते ॥684॥
जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे असे समज.
685-13
आणि स्वार्थे अळुमाळे । जो धैर्यापासोनि चळे । जैसे तृणबीज ढळे । मुंगियेचेनी ॥685॥
आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो,
686-13
आणि स्वार्थे अळुमाळे । जैसे थिल्लर कालवे । तैसा भयाचेनि नांवे । गजबजे जो ॥686॥
डबक्यात पाय घातल्या बरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो.
687-13
मनोरथांचिया धारसा । वाहणे जयाचिया मानसा । पूरी पडिला जैसा । दुधिया पाही ॥687॥
वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दु:खाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दु:खाने पुरे व्यापले जाते,
688-13
वायूचेनि सावाये । धू दिगंतरा जाये । दुःखवार्ता होये । तसे जया ॥688॥
पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वहात जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्याओघाबरोबर ज्याचे मन भटकत असते असे समज.
689-13
वाउधणाचिया परी । जो आश्रो कहीचि न धरी । क्षेत्री तीर्थी पुरी । थारो नेणे ॥689॥
वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर रहात नाही व जो क्षेत्रात तीर्थांचे ठिकाणी अथवा सप्तपुर्‍यांपैकी कोण्या एका पुरीत कायम रहाण्याचे जाणत नाही.
690-13
का मातलिया सरडा । पुढती बुडुख पुढती शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥690॥
माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
691-13
जैसा रोविल्याविणे । रांजणु थारो नेणे । तैसा पडे तै राहणे । एऱ्हवी हिंडे ॥691॥
ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल, तरच तो एके ठिकाणी राहील, नाहीतर तो सारखा हिंडतो.
692-13
तयाच्या ठायी उदंड । अज्ञान असे वितंड । जो चांचल्ये भावंड । मर्कटाचे ॥692॥
जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे.
693-13
अणि पै गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा । नाही वोढावारा । संयमाचा ॥693॥
अज्ञानाची लक्षणे = निग्रह नाही आणि अर्जुना, ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंध नाही.
694-13
लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरंडा । तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो ॥694॥
ओहोळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानत नाही, तसा जो निषिद्ध कर्माला तोंड देण्यास भीत नाही,
695-13
व्रताते आड मोडी । धर्माते पाये वोलांडी । नियमाची आस तोडी । जयाची क्रिया ॥695॥
व्रतांना मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो, व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच रहात नाही.
696-13
नाही पापाचा कंटाळा । नेणे पुण्याचा जिव्हाळा । लाजेचा पेंडवळा । खाणोनि घाली ॥696॥
ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही व लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो.
697-13
कुळेसी जो पाठमोरा । वेदाज्ञेसी दुऱ्हा । कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे ॥697॥
जो आपल्या कुळातील आचार मानत नाही, जो वेदाची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास कर्म कोणते, यातील निवड जो जाणत नाही,
698-13
वसू जैसा मोकाटु । वारा जैसा अफाटु । फुटला जैसा पाटु । निरंजणी ॥698॥
अज्ञानाची लक्षणे= (विषयात गुंतलेला) सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट पाहिजे तिकडे वहात असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाट जसा पाहिजे तिकडे वहात असतो.
699-13
आंधळे हातिरू मातले । का डोंगरी जैसे पेटले । तैसे विषयी सुटले । चित्त जयाचे ॥699॥
आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो, अथवा डोंगरावर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते.
700-13
पै उबडा काय न पडे । मोकाटु कोणा नातुडे । ग्रामद्वारीचे आडे । नोलांडी कोण ॥700॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पण उघड्यावर काय काय पडत नाही ? मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही ? गावच्या वेशीचा उंबरा कोण ओलांडत नाही ?
701-13
जैसे सत्री अन्न जाले । की सामान्या बीक आले । वाणसियेचे उभले । कोण न रिगे ? ॥701॥
ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही ? अथवा वेश्येच्या उंबर्‍याचे आत कोण प्रवेश करणार नाही ?
702-13
तैसे जयाचे अंतःकरण । तयाच्या ठायी संपूर्ण । अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥702॥
त्याचप्रमाणे ज्याचे अंत:करण असते म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बर्‍या-वाईट कल्पनांनी व्यापले जाते त्या पुरुषाचे ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे.
703-13
आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी । स्वर्गीही खावया जोडी । येथूनिची ॥703॥
आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांवरील प्रेम सोडीत नाही व मेल्यानंतरही स्वर्गातही खावयास, भोगावयास मिळावे म्हणून जो येथूनच सामुग्री सकाम कर्मे करून ठेवतो.
704-13
जो अखंड भोगा जचे । जया व्यसन काम्यक्रियेचे । मुख देखोनि विरक्ताचे । सचैल करी ॥704॥
जो भोगाकरता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्यकर्म करण्याचे व्यसन असते व जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरेसह स्नान करतो,
705-13
विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे । कुहीला हाती खाये । कोढी जैसा ॥705॥
विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही. तो कसा तर जसा कोडी(कुष्ठरोग झालेला) पुरूष सडलेल्या हातांनी खातो पण त्याला जशी कुजलेल्या हाताची किळस येत नाही.
706-13
खरी टेको नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडे । तऱ्ही जेवी न काढे । माघौता खरु ॥706॥
ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगास स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्या जवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते, तरी पण तो गाढव मागे हटत नाही
707-13.
तैसा जो विषयांलागी । उडी घाली जळतिये आगी । व्यसनाची आंगी । लेणी मिरवी ॥707॥
जो विषयाकरता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिरवतो.
708-13
फुटोनि पडे तव । मृग वाढवी हाव । परी न म्हणे ते माव । रोहिणीची ॥708॥
हरीण हा पिण्याची तीव्र इच्छा इतकी वाढवतो की तो मृगजळाच्या मागे लागून उर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही व असे म्हणत नाही की मृगजल ही जलाची भ्रांती आहे.
709-13
तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विषयी त्रासिता बहुती परी । तऱ्ही त्रासु नेघे धरी । अधिक प्रेम ॥709॥
त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, तर उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो.
710-13
पहिलिये बाळदशे । आई बा हेचि पिसे । ते सरे मग स्त्रीमांसे । भुलोनि ठाके ॥710॥
पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई, बाबा असे आईबापाचे वेड असते, ते संपते, मग तारुण्यात स्त्रीच्या देहाने वेडा होतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
711-13
मग स्त्री भोगिता थावो । वृद्धाप्य लागे येवो । तेव्हा तोचि प्रेमभावो । बाळकासि आणी ॥711॥
मग तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असताना म्हातारपण येऊ लागते, त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळांवर आणून ठेवतो.
712-13
आंधळे व्याले जैसे । तैसा बाळे परिवसे । परि जीवे मरे तो न त्रासे । विषयासि जो ॥712॥
एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला की त्याची आई जशी आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे जो आपल्या मुलाबाळास धरून रहातो आणि महाराज, मरतो परंतु विषयांविषयी त्यास वीट येत नाही,
713-13
जाण तयाच्या ठायी । अज्ञानासि पारु नाही । आता आणीक काही । चिन्हे सांगो ॥713॥
त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असे समज. आता (अज्ञानाची) आणखी काही लक्षणे सांगतो.
714-13
तरि देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनिया कर्मा । आरंभु करी ॥714॥
<अज्ञानाची लक्षणे देहात्मवादी, अभिमान ताठा> तर देह हाच आत्मा आहे. देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास प्रारंभ करतो.
715-13
आणि उणे का पुरे । जे जे काही आचरे । तयाचेनि आविष्करे । कुंथो लागे ॥715॥
आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामधे तो पूर्ण झालेल्या कर्मामुळे गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंत करतो.
716-13
डोईये ठेविलेनि भोजे । देवलविसे जेवी फुंजे । तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥716॥
बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्रतंत्र करणाराच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो.
717-13
म्हणे मीचि एकु आथी । माझ्यांचि घरी संपत्ती । माझी आचरती रीती । कोणा आहे ॥717॥
तो म्हणतो, जगात काय तो एक मीच (महत्वाचा मनुष्य) आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसर्‍या कोणाला आहे ?
718-13
नाही माझेनि पाडे वाडु । मी सर्वज्ञ एकचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ॥718॥
माझ्यासारखा कोणी मोठा नाही. प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे. अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन रहातो.
719-13
व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाउ जैसा । निके न साहे जो तैसा । पुढिलांचे ॥719॥
रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत (दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते) त्याप्रमाणे जो लोकांचे बरे सहन करत नाही.
720-13
पै गुण तेतुला खाय । स्नेह की जाळितु जाय । जेथ ठेविजे तेथ होय । मसीऐसे ॥720॥
परंतु जसा एखादा दिवा वात ‘तेवढी खातो, तेल जाळून टाकतो व जेथे ठेवावा तेथे काजळासारखे काळे करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
721-13
जीवने शिंपिला तिडपिडी । विजिला प्राण सांडी । लागला तरी काडी । उरो नेदी ॥१३-७२१॥
पाणी शिंपडल्याने तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो. एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एक काडी उरू देत नाही.
722-13
आळुमाळ प्रकाशु करी । तेतुलेनीच उबारा धरी । तैसिया दीपाचि परी । सुविद्यु जो ॥१३-७२२॥
थोडासा प्रकाश करतो व तेवढ्याने उष्णता वाढवतो, त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण अवगुण बरेच असतात.
723-13
औषधाचेनि नांवे अमृते । जैसा नवज्वरु आंबुथे । का विषचि होऊनि परते । सर्पा दूध ॥१३-७२३॥
नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते.
724-13
तैसा सद्गुणी मत्सरु । व्युत्पत्ती अहंकारु । तपोज्ञाने अपारु । ताठा चढे ॥१३-७२४॥
त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सर असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो,
725-13
अंत्यु राणिवे बैसविला । आरे धारणु गिळिला । तैसा गर्वे फुगला । देखसी जो ॥१३-७२५॥
अत्यंजाला जसे राज्यावर बसवावे म्हणजे तो गर्वाने फुगतो अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो. त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल.
726-13
जो लाटणे ऐसा न लवे । पाथरु तेवी न द्रवे । गुणियासि नागवे । फोडसे जैसे ॥१३-७२६॥
जो लाटण्यासारखा लवत नाही, जसा दगडाला तसा त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही.
727-13
किंबहुना तयापाशी । अज्ञान आहे वाढीसी । हे निकरे गा तुजसी । बोलत असो ॥१३-७२७॥
फार काय सांगावे ? त्याच्याजवळ अर्जुना, अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे आम्ही तुला निक्षून सांगतो.
728-13
आणिक पाही धनंजया । जो गृहदेह सामग्रिया । न देखे कालचेया । जन्माते गा ॥१३-७२८॥
(अज्ञानाची लक्षणे = मागील जन्माची आठवण नाही, मृत्यूचे स्मरण नाही, विषयसुखात रममाण) अर्जुना, आणखी असे पहा की जो, शरीर सामग्रीच्या योगाने घर वगैरे पसार्‍यात गुंतल्याने मागील जन्माची आठवण ठेवीत नाही
729-13
कृतघ्ना उपकारु केला । का चोरा व्यवहारु दिधला । निसुगु स्तविला । विसरे जैसा ॥१३-७२९॥
मागील जन्माला कसा विसरतो हे माऊली दृष्टांताने सांगतात, कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले ते जसे तो विसरतो अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो
730-13
वोढाळिता लाविले । ते तैसेच कान पूंस वोले । की पुढती वोढाळु आले । सुणे जैसे ॥१३-७३०॥
कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरता शिरते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
731-13
बेडूक सापाचिया तोंडी । जातसे सबुडबुडी । तो मक्षिकांचिया कोडी । स्मरेना काही ? ॥731॥
बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय गिळतो पण ‘आपण मरतो ” ही आठवण ठेवीत नाही.
732-13
तैसी नवही द्वारे स्रवती । आंगी देहाची लुती जिती । जेणे जाली ते चित्ती । सलेना जया ॥733॥
त्याप्रमाणे शरीराची नाक तोंड वगैरे ही नऊ द्वारे मळाने पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ट अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली, ती गोष्ट ज्याच्या अंत:करणात सलत नाही,
733-13
मातृकोदरकुहरी । सूनि विष्ठेचा दाथरी । जठरी नवमासवरी । उकडला जो ॥733॥
आईच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांमधे घालून, त्या पोटात नऊ महिने पर्यंत ज्यावेळी शिजला.
734-13
ते गर्भीची जे व्यथा । का जे जाले उपजता । ते काहीचि सर्वथा । नाठवी जो ॥734॥
ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काळी झालेले कष्ट, ते काहीच जो मुळी आठवत नाही.
735-13
मलमूत्रपंकी । जे लोळते बाळ अंकी । ते देखोनि जो न थुंकी । त्रासु नेघे ॥735॥
विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो किळस घेत नाही व कंटाळत नाही.
736-13
कालचि ना जन्म गेले । पाहेचि पुढती आले । ऐसे हे काही वाटले । नाही जया ॥736॥
मागला जन्म नुकताच संपला नाही काय ? व लागलीच पुन: उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही.
737-13
आणि पै तयाची परी । जीविताची फरारी । देखोनि जो न करी । मृत्युचिंता ॥737॥
आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही,
738-13
जिणेयाचेनि विश्वासे । मृत्यु एक एथ असे । हे जयाचेनि मानसे । मानिजेना ॥738॥
जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की, येथे एक मृत्यू आहे, हे ज्याच्या मनाला पटत नाही.
739-13
अल्पोदकीचा मासा । हे नाटे ऐसिया आशा । न वचेचि का जैसा । अगाध डोहा ॥739॥
थोडक्या पाण्यातील मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही.
740-13
का गोरीचिया भुली । मृग व्याधा दृष्टी न घाली । गळु न पाहता गिळिली । उंडी मीने ॥740॥
अथवा पारध्याच्या गाण्याला भुलून हरिणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पहाता, गळास लावलेले आमीष माशाने गिळावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
741-13
दीपाचिया झगमगा । जाळील हे पतंगा । नेणवेचि पै गा । जयापरी ॥741॥
दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही.
742-13
गव्हारु निद्रासुखे । घर जळत असे ते न देखे । नेणता जेवी विखे । रांधिले अन्न ॥742॥
जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले, तरी तिकडे लक्ष न देता खातो.
743-13
तैसा जीविताचेनि मिषे । हा मृत्युचि आला असे । हे नेणेचि राजसे । सुखे जो गा ॥743॥
त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणार्‍या सुखामुळे जाणतच नाही.
744-13
शरीरीची वाढी । अहोरात्रांची जोडी । विषयसुखप्रौढी । साचचि मानी ॥744॥
शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा (आयुष्याचा) लाभ, विषयसुखाचे महत्व, ह्या सर्व गोष्टी जो खर्‍याच मानतो.
745-13
परी बापुडा ऐसे नेणे । जे वेश्येचे सर्वस्व देणे । तेचि ते नागवणे । रूप एथ ॥745॥
वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे, हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय त्याप्रमाणे राजससुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे. पण त्या बिचार्‍याच्या हे काहीच लक्षात येत नाही.
746-13
संवचोराचे साजणे । तेचि ते प्राण घेणे । लेपा स्नपन करणे । तोचि नाशु ॥746॥
आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रास स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश होय.
747-13
पांडुरोगे आंग सुटले । ते तयाचि नांवे खुंटले । तैसे नेणे भुलले । आहारनिद्रा ॥747॥
पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे, मग त्यातच पंडुरोग्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषयवृद्धीत खरी वृद्धी नसून खराखुरा नाशच आहे हे जाणत नाहीत.
748-13
सन्मुख शूला । धावतया पाये चपळा । प्रतिपदी ये जवळा । मृत्यु जेवी ॥748॥
समोर असलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो.
749-13
तेवी देहा जव जव वाढु । जव जव दिवसांचा पवाडु । जव जव सुरवाडु । भोगांचा या ॥749॥
त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल, जसजशी दिवसाची वाढ होते म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल,
750-13
तव तव अधिकाधिके । मरण आयुष्याते जिंके । मीठ जेवी उदके । घांसिजत असे ॥750॥
तसतसे अधिक अधिक मरण आयुष्याला जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसे अधिकाधिक घासले जाईल तसतसे विरघळत जाते
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
751-13
तैसे जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हे हातोहातीचे नव्हे । ठाउके जया ॥13-751॥
त्याप्रमाणे (वरील 750 ओवी. मीठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते म्हणजे मरण जवळ येते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही.
752-13
किंबहुना पांडवा । हा आंगीचा मृत्यु नीच नवा । न देखे जो मावा । विषयांचिया ॥752॥
अर्जुना, फार काय सांगावे ? हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही.
753-13
तो अज्ञानदेशीचा रावो । या बोला महाबाहो । न पडे गा ठावो । आणिकाचा ॥753॥
हे महाबाहो अर्जुना, तो पुरुष अज्ञानदेशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही, तर हे अज्ञानाचे पूर्ण वर्णन झाले.
754-13
पै जीविताचेनि तोखे । जैसा का मृत्यु न देखे । तैसाचि तारुण्ये पोखे । जरा न गणी ॥754॥
(अज्ञानाची लक्षणे = म्हातारपणाविषयी बेफिकीर) जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो.
755-13
कडाडी लोटला गाडा । का शिखरौनि सुटला धोंडा । तैसा न देखे जो पुढा । वृधाप्य आहे ॥755॥
डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला, म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पहात नाही. तसे पुढे म्हातारपण येणार आहे हे पहात नाही.
756-13
का आडवोहळा पाणी आले । का जैसे म्हैसयाचे झुंज मातले । तैसे तारुण्याचे चढले । भुररे जया ॥756॥
अथवा आडरानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते.
757-13
पुष्टि लागे विघरो । कांति पाहे निसरो । मस्तक आदरी शिरो । बागीबळ ॥757॥
शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होण्य़ास लागतो व शरीरातील तेज कमी होण्यास लागते व मस्तकास कापरे सुटते.
758-13
दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी । तरी जो करी । प्रियेचा पैसु ॥758॥
दाढी पांढरी होते, मान हलून नाही नाही अशी निर्वाणीची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूचा पसारा वाढवीत रहातो,
759-13
पुढील उरी आदळे । तव न देखे जेवी आंधळे । का डोळ्यावरले निगळे । आळशी तोषे ॥759॥
पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पहात नाही अथवा डोळ्यावर आलेल्या चिपाडाच्या योगाने डोळे उघडत नाहीत या सबबीवर अधिकच झोप घेण्यास संधी सापडते म्हणून आळशी मनुष्य किळस घेण्याऐवजी अधिकच संतुष्ट होतो.
760-13
तैसे तारुण्य आजिचे । भोगिता वृद्धाप्य पाहेचे । न देखे तोचि साचे । अज्ञानु गा ॥760॥
अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पहात नाही, तोच खरोखर अज्ञानी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
761-13
देखे अक्षमे कुब्जे । की विटावू लागे फुंजे । परी न म्हणे पाहे माझे । हेचि भवे ॥761॥
आंधळ्या माणसाकडे पाहून किंवा कुबड्या माणसांकडे पाहून त्यास गर्वाने वेडावू लागतो पण असे म्हणत नाही की माझीही उद्या हीच अवस्था होईल.
762-13
आणि आंगी वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची । परी जया तारुण्याची । भुली न फिटे ॥762॥
आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले परंतु ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही,
763-13
तो अज्ञानाचे घर । हे साचचि घे उत्तर तेवीचि परयेसी थोर चिन्हे आणिक ॥763॥
तो पुरुष अज्ञानाचे घर आहे, हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक.
764-13
तरि वाघाचिये अडवे । चरोनि एक वेळ आला दैवे । तेणे विश्वासे पुढती धावे । वसू जैसा ॥764॥
(अज्ञानाची लक्षणे = रोगादींची चिंता करत नाही, क्षणभंगुरता जाणत नाही)
तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळा सुरक्षितपणे पोळ (बैल) चरून आला, त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्याकडे धावतो.
765-13
का सर्पघराआंतु । अवचटे ठेवा आणिला स्वस्थु । येतुलियासाठी निश्चितु । नास्तिकु होय ॥765॥
ज्या जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले, एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो (म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही ही गोष्ट खोटी आहे असे मानतो.
766-13
तैसेनि अवचटे हे । एकदोनी वेळा लाहे । एथ रोग एक आहे । हे मानीना जो ॥766॥
त्याप्रमाणे आरोग्य, हे एखादे दुसरे वेळी चुकून मिळालेले असले, तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे, ही गोष्ट जो मानीतच नाही.
767-13
वैरिया नीद आली । आता द्वंद्वे माझी सरली । हे मानी तो सपिली । मुकला जेवी ॥767॥
शत्रूला झोप लागली एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडणतंटे संपले, असे मानून जो स्वस्थ रहातो, तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळासह नाश पावतो.
768-13
तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोवरी । तव जो न करी । व्याधी चिंता ॥768॥
त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे, तोपर्यंत जो रोगाची काळजी करीत नाही.
769-13
आणि स्त्रीपुत्रादिमेळे । संपत्ति जव जव फळे । तेणे रजे डोळे जाती । जयाचे ॥769॥
आणि स्त्री पुत्रादिकांच्या संगतीत जसजशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धूराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो,
770-13
सवेचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल । हे दुःख पुढील । देखेना जो ॥770॥
या स्त्रीपुत्रादि व संपत्ती यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल, हे पुढले दु:ख जो आगाऊ जाणत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
771-13
तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा । जो इंद्रिये अव्हासवा । चारी एथ ॥771॥
अर्जुना, तो अज्ञानी आहे, जो इंद्रियांना हवे ते बरे वाईट न पहाता विषय देतो, तो देखील अज्ञानीच समजावा.
772-13
वयसेचेनि उवाये । संपत्तीचेनि सावाये । सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥772॥
(अज्ञानाची लक्षणे = विषयाधीनता, अविचार) तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साह्याने जो सेवन करण्य़ास योग्य-अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो.
773-13
न करावे ते करी । असंभाव्य मनी धरी । चिंतू नये ते विचारी । जयाची मती ॥773॥
जे करू नये ते करतो व न होणार्‍या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते.
774-13
रिघे जेथ न रिघावे । मागे जे न घ्यावे । स्पर्शे जेथ न लागावे । आंग मन ॥774॥
जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग किंवा मन लागू देऊ नये त्यांना जाऊन खेटतो.
775-13
न जावे तेथ जाये । न पाहावे ते जो पाहे । न खावे ते खाये । तेवीचि तोषे ॥775॥
जेथे जाऊ नये, तेथे जातो, जे पाहू नये ते पहातो व खाऊ नये ते खातो व ह्या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता त्याविषयी आनंद मानतो.
776-13
न धरावा तो संगु । न लागावे तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥776॥
ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो व ज्या मार्गाचे आचरण करू नये, त्या मार्गाचे आचरण जो करतो.
777-13
नायकावे ते आइके । न बोलावे ते बके । परी दोष होतील हे न देखे । प्रवर्तता ॥777॥
जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे पहात नाही.
778-13
आंगा मनासि रुचावे । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवे । जो करणेयाचेनि नांवे । भलतेचि करी ॥778॥
शरीरास व मनास आवडेल एवढे असले म्हणजे झाले, मग ते कर्म करण्यास योग्य असो वा नसो, याचा काही तो विचार करत नाही व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो.
779-13
परि पाप मज होईल । का नरकयातना येईल । हे काहीचि पुढील । देखेना जो ॥779॥
परंतु यापासून मला पाप लागेल अथवा या योगाने नरकयातना भोगाव्या लागतील, या पुढील होणार्‍या गोष्टी जो काहीच पहात नाही.
780-13
तयाचेनि आंगलगे । अज्ञान जगी दाटुगे । जे सज्ञानाही संगे । झोंबो सके ॥780॥
त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
781-13
परी असो हे आइक । अज्ञान चिन्हे आणिक । जेणे तुज सम्यक् । जाणवे ते ॥781॥
परंतु ते राहू दे. आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक, ज्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख होईल.
782-13
तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरी । नवगंधकेसरी । भ्रमरी जैशी ॥782॥
तर ताज्या, सुवासिक कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून रहाते, त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पहाशील.
783-13
साकरेचिया राशी । बैसली नुठे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशी । जयाचे मन ॥783॥
साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, तेथून हलत नाही,
784-13
ठेला बेडूक कुंडी । मशक गुंतला शेंबुडी । जैसा ढोरु सबुडबुडी । रुतला पंकी ॥784॥
बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेंबडात गुंतलेले असते अथवा जनावर जसे चिखलात पूर्णपणे फसते,
785-13
तैसे घरीहूनि निघणे । नाही जीवे मने प्राणे । जया साप होऊनि असणे । भाटी तिये ॥785॥
त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व मेल्यावर तो त्या जागेत सर्प होऊन बसतो.
786-13
प्रियोत्तमाचिया कंठी । प्रमदा घे आटी । तैशी जीवेसी कोंपटी । धरूनि ठाके ॥786॥
नवर्‍याच्या गळ्याला जशी तरुण स्त्री मिठी घालते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून रहातो.
787-13
मधुरसोद्देशे । मधुकर जचे जैसे । गृहसंगोपन तैसे । करी जो गा ॥787॥
पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो.
788-13
म्हातारपणी जाले । मा आणिक एक विपाईले । तयाचे का जेतुले । मातापितरा ॥788॥
अज्ञानाची लक्षणे = स्त्रीप्रेम
म्हातारपणी झालेले एकुलते एक पुत्ररत्न, त्याचे आईबापास जितके प्रेम असते,
789-13
तेतुलेनि पाडे पार्था । घरी जया प्रेम आस्था । आणि स्त्रीवाचूनि सर्वथा । जाणेना जो ॥789॥
अर्जुना, तितक्या मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्रीवाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही.
790-13
तैसा स्त्रीदेही जो जीवे । पडोनिया सर्वभावे । कोण मी काय करावे । काही नेणे ॥13-790॥
त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय, हे काही जो समजत नाही
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
791-13
महापुरुषाचे चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहारजात । जयापरी ॥791॥
ब्रह्मनिष्ठांचे अंत:करण, ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेले असताना त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात,
792-13
हानि लाज न देखे । परापवादु नाइके । जयाची इंद्रिये एकमुखे । स्त्रिया केली ॥792॥
जो नुकसान, लाज पहात नाही, दुसर्‍यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयीच असते.
793-13
चित्त आराधी स्त्रीयेचे । आणि तियेचेनि छंदे नाचे । माकड गारुडियाचे । जैसे होय ॥793॥
ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते, तसा जो स्त्रीच्या चित्ताचे आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो,
794-13
आपणपेही शिणवी । इष्टमित्र दुखवी । मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ॥794॥
ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्ट मित्रास दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो.
795-13
तैसा दानपुण्ये खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हो नेदी ॥795॥
त्याप्रमाणे स्त्रीची भर करण्याकरता दान व पुण्य करण्याचे कमी करतो, तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची खाच भरीत असतो, तिची खाच भरण्याला कमी पडू देत नाही.
796-13
पूजिती दैवते जोगावी । गुरूते बोले झकवी । मायबापा दावी । निदारपण ॥796॥
पूजल्या जाणार्‍या देवतांची बिगार टाळल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरूला ठकवतो आणि आईबापांना दरिद्रपण दाखवतो.
797-13
स्त्रियेच्या तरी विखी । भोगुसंपत्ती अनेकी । आणी वस्तु निकी । जे जे देखे ॥797॥
तथापि स्त्रीच्या विषयी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्ये (साधने) व जी जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती ती आणतो.
798-13
प्रेमाथिलेनि भक्ते । जैसेनि भजिजे कुळदैवते । तैसा एकाग्रचित्ते । स्त्री जो उपासी ॥798॥
प्रेमळ भक्ताने जसे कुलदेवतेला भजावे, त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्रचित्ताने करतो.
799-13
साच आणि चोख । ते स्त्रियेसीचि अशेख । येरांविषयी जोगावणूक । तेही नाही ॥799॥
जे खरे चांगले असेल, ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगावणूक(देहरक्षण) देखील करीत नाही,
800-13
इयेते हन कोणी देखैल । इयेसी वेखासे जाईल । तरी युगचि बुडैल । ऐसे जया ॥800॥
हिला कोणी (वाकड्या दृष्टीने) पाहील हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल, तर युगांतच होईल असे ज्याला वाटते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
801-13
नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥801॥
ज्याप्रमाणे नायट्यांच्या भीतीने देवीची शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो.
802-13
किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागी प्रेम ॥802॥
अर्जुना, फार काय सांगावे ! ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचे प्रेम असते.
803-13
आणिकही जे समस्त । तियेचे संपत्तिजात । ते जीवाहूनि आप्त । मानी जो का ॥803॥
अरे तिची जी आणखीही चीजवस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो.
804-13
तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना त्याचेनि बळ । हे असो केवळ । तेचि रूप ॥804॥
तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते. हे बोलणे राहू दे. (फार काय सांगावे) तो अज्ञानाची मूर्तीच आहे.
805-13
आणि मातलिया सागरी । मोकललिया तरी । लाटांच्या येरझारी । आंदोळे जेवी ॥805॥
अज्ञानाची लक्षणे = द्वंद्वयुक्त
आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या-जाण्याने झोके खाते.
806-13
तेवी प्रिय वस्तु पावे । आणि सुखे जो उंचावे । तैसाचि अप्रियासवे । तळवटु घे ॥806॥
त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो.
807-13
ऐसेनि जयाचे चित्ती । वैषम्यसाम्याची वोखती । वाहे तो महामती । अज्ञान गा ॥807॥
याप्रमाणे ज्याच्या अंत:करणात अप्रिय वस्तूप्राप्तीने दु:ख व प्रिय वस्तूप्राप्तीने सुख याची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे.
808-13
आणि माझ्या ठायी भक्ती । फळालागी जया आर्ती । धनोद्देशे विरक्ती । नटणे जेवी ॥808॥
अज्ञानाची लक्षणे = व्यभिचारी भक्ती
आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते, पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, ती कशी तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे,
809-13
नातरी कांताच्या मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसी । जावयालागी ॥809॥
अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवर्‍याच्या अंत:करणात शिरून वागते.
810-13
तैसा माते किरीटी । भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विषो सूये ॥810॥
अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमधे विषय ठेवतो म्हणजे जो विषयप्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
811-13
आणि भजिन्नलियासवे । तो विषो जरी न पावे । तरी सांडी म्हणे आघवे । टवाळ हे ॥811॥
आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो,
812-13
कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥812॥
अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्याप्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो, तितक्या जोराने पुन्हा दुसर्‍या देवाचीही करतो.
813-13
तया गुरुमार्गा टेके । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥813॥
ज्या गुरूचा जास्त थाटमाट पहातो, त्या गुरूच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसर्‍याचा घेत नाही.
814-13
प्राणिजातेसी निष्ठुरु । स्थावरी बहु भरु । तेवीचि नाही एकसरु । निर्वाहो जया ॥814॥
सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते,
815-13
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनी बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥815॥
माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपर्‍यात बसवतो व आपण देवतेच्या यात्रेला जातो.
816-13
नित्य आराधन माझे । काजी कुळदैवता भजे । पर्वविशेषे कीजे । पूजा आना ॥816॥
दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसर्‍याच देवतेची पूजा करतो.
817-13
माझे अधिष्ठान घरी । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरी । पितरांचा होय ॥817॥
घरात माझी स्थापना असतांनाच दुसर्‍या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्यावेळी (श्राद्ध, पक्ष वगैरे काळी) पितरांचा भक्त होतो.
818-13
एकादशीच्या दिवशी । जेतुला पाडु आम्हासी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशी ॥818॥
एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो.
819-13
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥819॥
चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे (देवी) मी तुझा भक्त आहे असे म्हणतो.
820-13
नित्य नैमित्तिके कर्मे सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारी वाढी । बहिरवा पात्री ॥820॥
नित्य कर्मे व नैमित्तिक श्राद्धादिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रातील देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी भैरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
821-13
पाठी सोमवार पावे । आणि बेलेसी लिंगा धावे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥821॥
नंतर सोमवार आला की बेलासह शिवलिंगाकडे धावतो. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो.
822-13
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी । अवघेन गावद्वारी । अहेव जैसी ॥822॥
वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या, गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वाच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच रहाते, त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा रहात नाही (म्हणून ज्याचा भक्तपणा कायम असतो)
823-13
ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धावतु । जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो ॥823॥
त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पहाशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज.
824-13
आणि एकांते चोखटे । तपोवने तीर्थे तटे । देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥824॥
आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थांची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो, तो देखील अज्ञानीच आहे.
825-13
जया जनपदी सुख । गजबजेचे कवतिक । वानू आवडे लौकिक । तोहि तोची ॥825॥
ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते, तोही तोच अज्ञानी आहे.
826-13
आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥826॥
(अज्ञानाची लक्षणे अध्यात्मज्ञानाची नावड)
आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो (अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पढलेला) विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो.
827-13
उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानी जयाचे । मनचि नाही ॥827॥
जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही, आणि अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही.
828-13
आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥828॥
आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे, अशा समजुतीची भिंत (मर्यादा) पाडून ज्याची बुद्धि स्वैर भटकणारी झाली आहे,
829-13
कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणे । ज्योतिषी तो म्हणे । तैसेचि होय ॥829॥
तो सर्व कर्मकांड जाणतो, पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसे घडते.
830-13
शिल्पी अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण । विधि आथर्वण । हाती आथी ॥830॥
कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अति प्रवीण असतो, व अथर्वन वेदाचे विधि (मंत्रशास्त्राचे जारण-मारण-उच्चाटान वगैरे विधी) त्याला हस्तगत झालेले असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
831-13
कोकी नाही ठेले । भारत करी म्हणितले । आगम आफाविले । मूर्त होती ॥831॥
कामशास्त्रात त्याला काही जाणावयाचे शिल्लक राहिलेले नाही, भारत तर त्याला पाठ असते आणि मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते.
832-13
नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकी दुजे । चतुर नाही ॥832॥
नीतिसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात, वैद्यकशास्त्र जो जाणतो व काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही.
833-13
स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा । निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी ॥833॥
स्मृतीचा विचार त्याला कळतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर करतो.
834-13
पै व्याकरणी चोखडा । तर्की अतिगाढा । परी एक आत्मज्ञानी फुडा । जात्यंधु जो ॥834॥
तो व्याकरणशास्त्रात अति प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो. परंतु एक अध्यात्मशास्त्रात जो खरोखर जन्मांध आहे,
835-13
ते एकवाचूनि आघवा शास्त्री । सिद्धांत निर्माणधात्री । परी जळो ते मूळनक्षत्री । न पाहे गा ॥835॥
त्या एका अध्यात्म- ज्ञानावाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे, (असा जरी तो असला) तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी पाहू नये, तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस.
836-13
मोराआंगी अशेषे । पिसे असती डोळसे । परी एकली दृष्टि नसे । तैसे ते गा ॥836॥
मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पहातो ती एकटी दृष्टि त्या मोरास जर नसली तर त्या पिसांवरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही, त्याप्रमाणे अर्जुना, एका अध्यात्मज्ञानावाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही.
837-13
जरी परमाणूएवढे । संजीवनीमूळ जोडे । तरी बहु काय गाडे । भरणे येरे ? ॥837॥
परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतीच्या मुळ्या काय करावयाच्या आहेत ?
838-13
आयुष्येवीण लक्षणे । सिसेवीण अळंकरणे । वोहरेवीण वाधावणे । तो विटंबु गा ॥838॥
ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शीर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवरानवरिशिवाय जसा वर्धावा काढावा, ही जशी केवळ विटंबना आहे.
839-13
तैसे शास्त्रजात जाण । आघवेचि अप्रमाण । अध्यात्मज्ञानेविण । एकलेनी ॥839॥
त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचून ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज.
840-13
यालागी अर्जुना पाही । अध्यात्मज्ञानाच्या ठायी । जया नित्यबोधु नाही । शास्त्रमूढा ॥840॥
याकरता अर्जुना, असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी नित्य जागृति नाही
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
841-13
तया शरीर जे जाले । ते अज्ञानाचे बी विरुढले । तयाचे व्युत्पत्तितत्व गेले । अज्ञानवेली ॥841॥
त्याला शरीर जे प्राप्त झाले, ते अज्ञानाच्या बीजाचा अंकूरच होय. आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल (विस्तार) आहे.
842-13
तो जे जे बोले । ते अज्ञानचि फुलले । तयाचे पुण्य जे फळले । ते अज्ञान गा ॥842॥
तो जे जे बोलतो, ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे व, त्याची जी पुण्यकर्मे आहेत, ते अज्ञानच फळास आलेले आहे.
843-13
आणि अध्यात्मज्ञान काही । जेणे मानिलेचि नाही । तो ज्ञानार्थु न देखे काई । हे बोलावे असे ? ॥843॥
आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पहात नाही, हे सांगावयास पाहिजे काय ?
844-13
ऐलीचि थडी न पवता । पळे जो माघौता । तया पैलद्वीपीची वार्ता । काय होय ? ॥844॥
नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार ?
845-13
का दारवंठाचि जयाचे । शीर रोविले खाचे । तो केवी परिवरीचे । ठेविले देखे ? ॥845॥
अथवा घराच्या दाराच्या उंबर्‍यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहील ?
846-13
तेवी अध्यात्मज्ञानी जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई ? ॥846॥
त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याला विषय होईल काय ?
847-13
म्हणौनि आता विशेषे । तो ज्ञानाचे तत्त्व न देखे । हे सांगावे आंखेलेखे । न लगे तुज ॥847॥
म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पहात नाही, हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको.
848-13
जेव्हा सगर्भे वाढिले । तेव्हाचि पोटीचे धाले । तैसे मागिले पदे बोलिले । तेचि हो ॥848॥
अज्ञानाची लक्षणे = ज्ञानलक्षणांच्या उलट
जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्या मुलास निराळे वाढणे नको. त्याप्रमाणे वरती ज्ञानाचे जे वर्णन केले गेले, त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे.
849-13
वाचूनिया वेगळे । रूप करणे हे न मिळे । जेवी अवंतिले आंधळे । ते दुजेनसी ये ॥849॥
वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे वर्णन करावयास नको. आंधळा मनुष्य जेवावयाला बोलावला असता तो दुसर्‍या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचा तसेच हेही आहे असे समज.
850-13
एवं इये उपरती । ज्ञानचिन्हे मागुती । अमानित्वादि प्रभृती । वाखाणिली ॥850॥
याप्रमाणे ही अमानित्वादि ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
851-13
जे ज्ञानपदे अठरा । केलिया येरी मोहरा । अज्ञान या आकारा । सहजे येती ॥851॥
कारण की ज्ञानाची अठरा पदे उलट फिरवली उदा. अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात.
852-13
मागा श्लोकाचेनि अर्धार्धे । ऐसे सांगितले श्रीमुकुंदे । ना उफराटी इये ज्ञानपदे । तेचि अज्ञान ॥13-852॥
मागे (या अध्यायाच्या) अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसर्‍या अर्ध्यामधे श्रीमुकुंदाने (श्रीकृष्णाने) असे संगितले की ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय.
853-13
म्हणौनि इया वाहणी । केली म्या उपलवणी । वाचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ? ॥853॥
ज्ञानदेवांचा परिहार
म्हणून अशा रीतीने (अज्ञानं यदतोऽन्यथा या पदाचे) मी विस्तारपूर्वक वर्णन केले नाही, तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढावयाचे.
854-13
तैसे जी न बडबडी । पदाची कोर न सांडी परी । मूळध्वनीचिये वाढी । निमित्त जाहलो ॥854॥
महाराज, त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडीत नाही. परंतु मूळश्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो.
855-13
तव श्रोते म्हणती राहे । के परिहारा ठावो आहे ? । बिहिसी का वाये । कविपोषका ? ॥855॥
श्रोतेकृत ज्ञानदेव स्तुती =
तेव्हा श्रवणास बसलेली संतमंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कोठे राहिली आहे ? हे कविपोषका, तू व्यर्थ का भितोस ?
856-13
तूते श्रीमुरारी । म्हणितले आम्ही प्रकट करी । जे अभिप्राय गव्हरी । झाकिले आम्ही ॥856॥
जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर ” असे तुला श्रीमुरारींनी (श्रीकृष्णाने) सांगितले.
857-13
ते देवाचे मनोगत । दावित आहासी तू मूर्त । हेही म्हणता चित्त । दाटैल तुझे ॥857॥
देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रगट करावेस हे जे देवाचे मनोगत, ते तू आपल्या वक्तृत्वाने (अज्ञानाची लक्षणे सांगण्याने) स्पष्ट दाखवीत आहेस, असे म्हणण्याने देखील तुझे चित्त संतमंडळी माझी स्तुति करीत आहेत असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल.
858-13
म्हणौनि असो हे न बोलो । परि साविया गा तोषलो । जे ज्ञानतरिये मेळविलो । श्रवण सुखाचिये ॥858॥
म्हणून हे राहू दे, आम्ही हे बोलत नाही, परंतु अरे, आम्हास सहज संतोष झाला आहे. कारण की श्रवणसुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा (होडीचा) तू आम्हास योग करून दिला आहेस.
859-13
आता इयावरी । जे तो श्रीहरी । बोलिला ते करी । कथन वेगा ॥859॥
तर आता यानंतर तो श्रीहरी जे काही बोलला, ते लवकर सांग पटकन सांग.
860-13
इया संतवाक्यासरिसे । म्हणितले निवृत्तिदासे । जी अवधारा तरी ऐसे । बोलिले देवे ॥860॥
पुढील विषयाची प्रस्तावना =
असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तिदास (ज्ञानेश्वरमहाराज) म्हणाले की तर महाराज, ऐका, असे म्हणाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
861-13
म्हणती तुवा पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा । आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥861॥
अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज.
862-13
इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पै गा । ज्ञानविखी चांगा । दृढा होईजे ॥862॥
अर्जुना, या अज्ञानभागाकडे पाठ करून म्हणजे या अज्ञानभागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो.
863-13
मग निर्वाळिलेनि ज्ञाने । ज्ञेय भेदैल मने । ते जाणावया अर्जुने । आस केली ॥863॥
मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात (ब्रह्मवस्तूत) प्रवेश होईल ते ज्ञेयस्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली.
864-13
तव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणौनि तयाचा भावो । परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगो आता ॥864॥
तेव्हा सर्वज्ञांचे राजे, जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो.
ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा~मृतमश्नुते ।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥13. 12॥
भावार्थ ~> जे जाणले असता (मनुष्य) अमृतत्व पावतो, ते जे ज्ञेय, ते मी सांगतो ते हे की आदिरहित परब्रह्म होय ते सत् ही नाही व असत् ही नाही असे ज्ञाते म्हणतात.
865-13
तरि ज्ञेय ऐसे म्हणणे । वस्तूते येणेचि कारणे । जे ज्ञानेवाचूनि कवणे । उपाये नये ॥865॥
परब्रह्म वर्णन तर ब्रम्हाला
ज्ञेय म्हणावयाचे, ते एवढ्याकरता की ते (ब्रह्म) ज्ञानावाचून दुसर्‍या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही.
866-13
आणि जाणितलेयावरौते । काहीच करणे नाही जेथे । जाणणेचि तन्मयाते । आणी जयाचे ॥866॥
आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे रहात नाही व ज्याचे ज्ञान जाणणाराला ज्ञेयस्वरूप करते.
867-13
जे जाणितलेयासाठी । संसार काढूनिया कांठी । जिरोनि जाइजे पोटी । नित्यानंदाच्या ॥867॥
जे ज्ञेयस्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निरास करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंदरूप व्हावे.
868-13
ते ज्ञेय गा ऐसे । आदि जया नसे । परब्रह्म आपैसे । नाम जया ॥868॥
अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावत:च नाव आहे.
869-13
जे नाही म्हणो जाइजे । तव विश्वाकारे देखिजे । आणि विश्वचि ऐसे म्हणिजे । तरि हे माया ॥869॥
जे नाही म्हणायला जावे, तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि जे ब्रह्म विश्वच आहे, असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे.
870-13
रूप वर्ण व्यक्ती । नाही दृश्य दृष्टा स्थिती । तरी कोणे कैसे आथी । म्हणावे पा ॥870॥
त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप, रंग व आकार ही नाहीत व दृश्य (पहाण्याचा विषय) व द्रष्टा (पहाणारा) ही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे, हे कोणी व कसे म्हणावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
871-13
आणि साचचि जरी नाही । तरी महदादि कोणे ठाई । स्फुरत कैचे काई । तेणेवीण असे ? ॥871॥
आणि (असे आहे म्हणून) जर ते खरोखरच नाही असे म्हणावे, तर महतत्त्वादिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात ? व त्याच्यावाचून कोठले काय आहे ? त्याच्यावाचून दुसरे काहीच नाही).
872-13
म्हणौनि आथी नाथी हे बोली । जे देखोनि मुकी जाहली । विचारेसी मोडली । वाट जेथे ॥872॥
म्हणून जे ब्रह्म पाहून ‘आहे, नाही ” ही भाषा मुकी झाली, जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही.
873-13
जैसी भांडघटशरावी । तदाकारे असे पृथ्वी । तैसे सर्व होऊनिया सर्वी । असे जे वस्तु ॥873॥
डेरा, घागर व परळ यामधे माती जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाने जी वस्तु ब्रह्मवस्तु सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे.

सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो~क्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥13. 13॥
भावार्थ त्याचे हस्तपाद सर्वत्र आहेत (ते विश्वबाहू किंवा विश्वांघि आहे). त्याचे नेत्र-शिर-मुख सर्वत्र आहेत. त्याचे कान सर्वत्र आहेत, ते विश्वामधे सर्वाला व्यापून राहिले आहे आहे.
874-13
आघवाचि देशी काळी । नव्हता देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळी । तेचि हात जयाचे ॥874॥
परब्रह्म पुढे चालू)
ज्ञा – सर्व देशांमधे व सर्व कालांमधे देशकालाहून जी वस्तु वेगळी न होता, जी क्रिया स्थूल व सूक्ष्माकडून (देहाकडून व अंत:करणाकडून) होते तेच (ती क्रियाच) ज्याचे (ब्रह्माचे) हात आहेत.
875-13
तयाते याकारणे । विश्वबाहू ऐसे म्हणणे । जे सर्वचि सर्वपणे । सर्वदा करी ॥875॥
या कारणास्तव या वस्तूला विश्वबाहु असे म्हटलेले आहे. कारण की ती वस्तु सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते.
876-13
आणि समस्ताही ठाया । एके काळी धनंजया । आले असे म्हणौनि जया । विश्वाघ्रीनाम ॥876॥
आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे, म्हणून अर्जुना, त्यास ‘विश्वांघ्रिज्याचे चरण सर्वत्र आहेत असा, हे नाव आहे. 877-13 पै सवितया आंग डोळे । नाहीत वेगळे वेगळे । तैसे सर्वद्रष्टे सकळे । स्वरूपे जे ॥877॥ जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे नाहीत, तशी जी वस्तु ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वास पहाणारी आहे. 878-13 म्हणौनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूच्या ठायी पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥878॥ म्हणून ‘विश्वतचक्षु " (ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा) असा हा प्रकार, नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्य़ास वेद तयार झाला. 879-13 जे सर्वाचे शिरावरी । नित्य नांदे सर्वापरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥879॥ जे सर्वाच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास ‘विश्वमूर्धा " म्हटले जाते. 880-13 पै गा मूर्ति तेचि मुख । हुताशना जैसे देख । तैसे सर्वपणे अशेख । भोक्ते जे ॥880॥ अर्जुना, असे पहा कीश अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे, मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत 881-13 यालागी तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥881॥ या कारणाने अर्जुना त्यालाविश्वतोमुख ” म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला.
882-13
आणि वस्तुमात्री गगन । जैसे असे संलग्न । तैसे शब्दजाती कान । सर्वत्र जया ॥882॥
आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून असते त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत.
883-13
म्हणौनि आम्ही तयाते । म्हणो सर्वत्र आइकते । एवं जे सर्वाते । आवरूनि असे ॥883॥
म्हणून आम्ही त्यास, सर्व ठिकाणी ऐकणारे ” असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थमात्रास व्यापून आहे.
884-13
एऱ्हवी तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती । तयाचिया व्याप्ती । रूप केले ॥884॥
ब्रह्माचे द्वैताने वर्णन का केले ?
हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ‘विश्वतचक्षु ” या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले.
885-13
वाचूनि हस्त नेत्र पाये । हे भाष तेथ के आहे ? । सर्व शून्याचा न साहे । निष्कर्षु जे ॥885॥
एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या ठिकाणी (ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी) हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे ?
886-13
पै कल्लोळाते कल्लोळे । ग्रसिजत असे ऐसे कळे । परी ग्रसिते ग्रासावेगळे । असे काई ? ॥886॥
एका लाटेने दुसर्‍या लाटेला गिळून टाकले असे कळते (वाटते), परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणार्‍याहून वेगळे आहे काय ?
887-13
तैसे साचचि जे एक । तेथ के व्याप्यव्यापक ? । परी बोलावया नावेक । करावे लागे ॥887॥
त्याप्रमाणे खरोखर हे जे एक आहे तेथे व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो.
888-13
पै शून्य जै दावावे जाहले । तै बिंदुले एक पाहिजे केले । तैसे अद्वैत सांगावे बोले । तै द्वैत कीजे ॥888॥
शून्य (काही नाही) हे जेव्हा दाखवायचे असते, तेव्हा एक बिंदुले (पूज्य म्हणजे काही नाही, हे दाखवणारी आकृती) करावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते.
889-13
एऱ्हवी तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥889॥
अर्जुना, अव्दैताचे वर्णन करण्याकरता द्वैत केले, नाही तर गुरुशिष्यांच्या सन्मार्गाला (संप्रदायाला) पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल.
890-13
म्हणौनि गा श्रुती । द्वैतभावे अद्वैती । निरूपणाची वाहती । वाट केली ॥890॥
अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या सहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
891-13
तेचि आता अवधारी । इये नेत्रगोचरे आकारी । ते ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥891॥
ते ज्ञेय (ब्रह्म) ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामधे व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐक.

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥13. 14॥
भावार्थ ~> सर्व चक्षु आदि इंद्रिये व सत्वादि गुण यांच्या आकाराने ते भासते (असे दिसते), पण ते स्वत: सर्व इंद्रियानी विरहित आहे. ते (सर्वत्र) असक्त आहे, तथापि सर्वभृत् आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे.
892-13
तरी ते गा किरीटी ऐसे । अवकाशी आकाश जैसे । पटी पटु होऊनि असे । तंतु जेवी ॥892॥
तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रामधे तंतू जसा वस्त्र होऊन आहे.
893-13
उदक होऊनि उदकी । रसु जैसा अवलोकी । दीपपणे दीपकी । तेज जैसे ॥893॥
पहा की पाण्यामधे रस, जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामधे दिवा होऊन जसे तेज असते,
894-13
कर्पूरत्वे कापुरी । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरी । कर्म जेवी ॥894॥
ज्याप्रमाणे कापुरामधे सुगंध, कापूर होऊन असतो अथवा शरीरामधे जसे कर्म शरीर होऊन असते.
895-13
किंबहुना पांडवा । सोनेचि सोनयाचा रवा । तैसे जे या सर्वा । सर्वागी असे ॥895॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा होऊन असतो, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वाच्या सर्व अंगात आहे.
896-13
परी रवेपणामाजिवडे । तव रवा ऐसे आवडे । वाचूनि सोने सांगडे । सोनया जेवी ॥896॥
येथून ब्रह्माची व्याप्ती जगामधे कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात). परंतु ते सोने तुकडेपणामधे असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर (तुकड्याच्या आकाराने असणारे) सोने हे सोन्यासारखेच आहे.
897-13
पै गा वोघुचि वाकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे की ॥897॥
हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही.
898-13
घटाकारे वेटाळे । तेथ नभ गमे वाटोळे । मठी तरी चौफळे । आये दिसे ॥898॥
घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामधे जसे वाटोळे आहे, असे वाटते व मठामधे सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते.
899-13
तरि ते अवकाश जैसे । नोहिजतीचि का आकाशे । जे विकार होऊनि तैसे । विकारी नोहे ॥899॥
परंतु आकाश हे जसे ते अवकाश (घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी) झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार (मनादि इंद्रिये अथवा सत्वादि गुणादिक) होऊन, जे विकारवान झाले नाही.
900-13
मन मुख्य इंद्रिया । सत्त्वादि गुणा यया- । सारिखे ऐसे धनंजया । आवडे कीर ॥900॥
अर्जुना ते ब्रह्म, मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वरजादि गुणांसारखे असल्याचे (वरवर) दिसते खरे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
901-13
परी पै गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसी गुण इंद्रिये फुडी । नाही तेथ ॥901॥
परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते, तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते, त्याप्रमाणे (गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्म वस्तु आहे तरी) ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत.
902-13
अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारे असे । परी क्षीरचि नोहे जैसे । कपिध्वजा ॥902॥
हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेमधे तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते.
903-13
तैसे जे इये विकारी । विकार नोहे अवधारी । पै आकारा नाम भोवरी । येर सोने ते सोने ॥903॥
त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असे समज. (ते कसे तर) ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सर्व सोने ते सोनेच आहे.
904-13
इया उघड मऱ्हाटिया । ते वेगळेपण धनंजया । जाण गुण इंद्रिया- । पासोनिया ॥904॥
अर्जुना, या उघड उघड मराठी (सोप्या) भाषेने सांगावयाचे म्हटले म्हणजे, तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज.
905-13
नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु । हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाही ॥995॥
नाम रूप, संबंध, जाति, क्रिया व भेद हे सर्व आकाराला बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही.
906-13
ते गुण नव्हे कही । गुणा तया संबंधु नाही । परी तयाच्याचि ठायी । आभासती ॥906॥
ते ब्रह्म कधी गुण होत नाही, आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात.
907-13
येतुलेयासाठी । संभ्रांताच्या पोटी । ऐसे जाय किरीटी । ना हेचि धरी ॥907॥
अर्जुना, एवढ्या मुळेच अज्ञानी लोकांच्या पोटात (मनात) असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते.
908-13
तरी ते गा धरणे ऐसे । अभ्राते जेवी आकाशे । का प्रतिवदन जैसे । आरसेनी ॥908॥
पण अर्जुना, त्या वस्तूचे गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो.
909-13
सूर्य प्रतिमंडल । जैसेनि धरी सलिल । का रश्मिकरी मृगजळ । धरिजे जेवी ॥909॥
पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते, अथवा सूर्याची किरणे जशी मृगजलाला धारण करतात.
910-13
तैसे गा संबंधेवीण । यया सर्वाते धरी निर्गुण । येरी ते वाया जाण । मिथ्यादृष्टी ॥910॥
अर्जुना त्याप्रमाणे वास्तविक संबंधावाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते. परंतु विकारास आधार आहे, हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
911-13
आणि यापरी निर्गुणे । गुणाते भोगणे । रंका राज्य करणे । स्वप्नी जैसे ॥911॥
आणि एखाद्या गरीब दरीद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय.
912-13
म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु । हा निर्गुणी लागु । बोलो नये ॥912॥
म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग, यांचा निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी संबंध आहे. हे बोलू नये. किंवा अयोग्य आहे.

बहिरंतश्च भूतानांमचरं चरमेव च ।
सूक्षमत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चांतिके च तत् ॥13. 15॥
भावार्थ ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे, चरही आहे, सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, ते दूर आहे, व जवळही आहे.
913-13
जे चराचर भूता- । माजी असे पंडुसुता । नाना वन्ही उष्णता । अभेदे जैसी ॥913॥
परब्रह्माचे वर्णन पुढे चालू
अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, त्याप्रमाने जे ब्रम्ह चराचर भुतांमध्ये असते.
914-13
तैसेनि अविनाशभावे । जे सूक्ष्मदशे आघवे । व्यापूनि असे ते जाणावे । ज्ञेय एथ ॥914॥
ह्या सर्व पदार्थाना सुक्ष्म स्थितीने व्यापुन नित्य अविनाश रुपाने {असंगत्वाने} असते. अशी जी वस्तु येथे ज्ञेय असे समझावे.
915-13
जे एक आंतुबाहेरी । जे एक जवळ दुरी । जे एकवाचूनि परी । दुजी नाही ॥915॥
जे एक (चराचरांच्या) आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्याच्या स्वरुपात कधीही तिळमाञ फरक होत नाही.
916-13
क्षीरसागराची गोडी । माजी बहु थडिये थोडी । हे नाही तया परवडी । पूर्ण जे गा ॥916॥
अर्जुना, क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार गोड व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याप्रमाणे ते नित्य सर्व बाजूंनी सारखे आहे.
917-13
स्वेदजादिप्रभृती । वेगळाल्या भूती । जयाचिये अनुस्यूती । खोमणे नाही ॥917॥
स्वेदजादिकरून वेगळाल्या प्राण्यात, ज्याच्या व्याप्तीत न्यूनता नाही. किंवा स्वेदज-अंडज-जारज आणि उद्भिज अशा चारही प्रकारच्या वेगवेगळ्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीस न्युनता नाही
918-13
पै श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेका- । माजी बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवी ॥918॥
हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरींमधे चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही, चंद्रबिंबास अनेकता येत नाही,
919-13
नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी । का कोडी एकी ऊसी । एकचि गोडी ॥919॥
मीठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते.

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।
भूतभर्तृ च तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥13. 16॥
भावार्थ ते तत्वत: अविभक्त असुनही, तरी भूतांचे ठिकाणी (नाना प्रकारच्या रूपांनी) विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे. संहारकाली भूतांचा ग्रास करणारे व निर्माणकाली उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे.
920-13
तैसे अनेकी भूतजाती । जे आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जे गा ॥920॥
परब्रह्मवर्णन पुढे चालू
त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमधे जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
921-13
म्हणौनि हा भूताकारु । जेथोनि तेचि तया आधारु । कल्लोळा सागरु । जियापरी ॥921॥
म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो, तेच ब्रह्म, त्या भूताकाराला आधार आहे.
922-13
बाल्यादि तिन्ही वयसी । काया एकचि जैसी । तैसे आदिस्थितिग्रासी । अखंड जे ॥922॥
बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था, या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड एकसारखे असते.
923-13
सायंप्रातर्मध्यान । होता जाता दिनमान । जैसे का गगन । पालटेना ॥923॥
सायंकाल, प्रात:काल व मध्यान्हकाल, या क्रमाने सबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही.
924-13
अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ति जे विष्णुनामा । पात्र जाहले ॥924॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीकाली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तिकाली जे विष्णू या नावाला प्राप्त झाले,
925-13
मग आकारु हा हारपे । तेव्हा रुद्र जे म्हणिपे । तेही गुणत्रय जेव्हा लोपे । तै जे शून्य ॥925॥
मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रजसत्वतमादि तीन गुण (उत्पत्ती, स्थिती व लय) ते देखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म शून्य (निर्धर्म) होऊन रहाते.
926-13
नभाचे शून्यत्व गिळून । गुणत्रयाते नुरऊन । ते शून्य ते महाशून्य । श्रुतिवचनसंमत ॥926॥
आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादि तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. अशा बद्दल वेदवचन प्रमाण आहे.

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ॥13. 17॥
भावार्थ त्यालाच तेजाचेही तेज व अंधाराच्या पलिकडील आहे असे (ज्ञाते म्हणतात). ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे, सर्व भूतमात्रांचे हृदयामधे तेच स्थित आहे.
927-13
जे अग्नीचे दीपन । जे चंद्राचे जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणे ॥927॥
परब्रह्माचे वर्णन पुढे चालू
जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन (चंद्राला अमृत देणारे) आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात.
928-13
जयाचेनि उजियेडे । तारांगण उभडे । महातेज सुरवाडे । राहाटे जेणे ॥928॥
ज्याच्या उजेडाने तारे (तार्‍यांचे समुदाय) प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो,
929-13
जे आदीची आदी । जे वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥929॥
जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे.
930-13
जे मनाचे मन । जे नेत्राचे नयन । कानाचे कान । वाचेची वाचा ॥930॥
जे मनाचे मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे व वाचेची वाचा आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
931-13
जे प्राणाचा प्राण । जे गतीचे चरण । क्रियेचे कर्तेपण । जयाचेनि ॥931॥
जे प्राणाचा प्राण आहे, जे गतीचा पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते.
932-13
आकारु जेणे आकारे । विस्तारु जेणे विस्तारे । संहारु जेणे संहारे । पंडुकुमरा ॥932॥
अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो.
933-13
जे मेदिनीची मेदिनी । जे पाणी पिऊनि असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणे तेजे ॥933॥
जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्या च्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो.
934-13
जे वायूचा श्वासोश्वासु । जे गगनाचा अवकाशु । हे असो आघवाची आभासु । आभासे जेणे ॥934॥
जे ब्रह्म वायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे. हे राहू दे, हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो.
935-13
किंबहुना पांडवा । जे आघवेचि असे आघवा । जेथ नाही रिगावा । द्वैतभावासी ॥935॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जे सर्वाच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही.
936-13
जे देखिलियाचिसवे । दृश्य द्रष्टा हे आघवे । एकवाट कालवे । सामरस्ये ॥936॥
ज्याचे दर्शन होण्याबरोबरच द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्यभावाला येते.
937-13
मग तेचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन । ज्ञाने गमिजे स्थान । तेहि तेची ॥937॥
मग ते ब्रह्माचे ज्ञान होते व ज्ञाता, ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणही तेच (ब्रह्म) आहे.
938-13
जैसे सरलिया लेख । आंख होती एक । तैसे साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥938॥
ज्याप्रमाणे हिशोब करण्याचे संपल्यावर हिशेबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनादिक हे ब्रह्माचे ठिकाणी ऐक्यास येतात.
939-13
अर्जुना जिये ठायी । न सरे द्वैताची वही । हे असो जे हृदयी । सर्वाच्या असे ॥939॥
अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो, जे ब्रह्म सर्वाच्या अंत:करणात असते.

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥13. 18॥
भावार्थ याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली, हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूप होतो.
आतापर्यंत क्षेत्र, ज्ञेय, ज्ञान व अज्ञान असे ब्रह्माचे चार प्रकार करून विचार सांगितला
940-13
एवं तुजपुढा ” । आदी क्षेत्र सुहाडा । दाविले फाडोवाडा । विवंचुनी ॥940॥
हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
941-13
तैसेचि क्षेत्रापाठी । जैसेनि देखसी दिठी । ते ज्ञानही किरीटी । सांगितले ॥941॥
त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याला दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले.
942-13
अज्ञानाही कौतुके । रूप केले निके । जव आयणी तुझी टेके । पुरे म्हणे ॥942॥
तुझी बुद्धी ‘पुरे ” म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले.
943-13
आणि आता हे रोकडे । उपपत्तीचेनि पवाडे । निरूपिले उघडे । ज्ञेय पै गा ॥943॥
आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले.
944-13
हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना । मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥944॥
अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूपसिद्धीला येतात.
945-13
देहादि परिग्रही । संन्यासु करूनिया जिही । जीवु माझ्या ठाई । वृत्तिकु केला ॥945॥
ज्यांनी देहादि परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला.
946-13
ते माते किरीटी । हेचि जाणौनिया शेवटी । आपणपया साटोवाटी । मीचि होती ॥946॥
अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपल्या मोबदला मला घेऊन, मद्रूपच होतात.
947-13
मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारी । सोहोपी सर्वापरी । रचिली आम्ही ॥947॥
अर्जुना, मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे.
948-13
कडा पायरी कीजे । निराळी माचु बांधिजे । अथावी सुइजे । तरी जैसी ॥948॥
डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायर्‍या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव (होडी) घालावी.
949-13
एऱ्हवी अवघेचि आत्मा । हे सांगो जरी वीरोत्तमा । परी तुझिया मनोधर्मा । मिळेल ना ॥949॥
सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे, हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता. म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता.
950-13
म्हणौनि एकचि संचले । चतुर्धा आम्ही केले । जे अदळपण देखिले । तुझिये प्रज्ञे ॥950॥
तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्याकारणाने एकच सर्व ठिकाणी भरलेले जे परब्रह्म ते आम्ही चार प्रकारचे केले.
951-13
पै बाळ जै जेवविजे । तै घासु विसा ठायी कीजे । तैसे एकचि हेचतुर्व्याजे । कथिले आम्ही ॥951॥
मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते, तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितले.
952-13
एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान । हे भाग केले अवधान । जाणौनि तुझे ॥952॥
तुझे लक्ष पाहून तुझी ग्र हणशक्ती पाहून, एकाच ब्रह्माचे, एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय व एक अज्ञान असे आम्ही चार भाग केले.
953-13
आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता । नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगो ॥953॥
(हाच विचार प्रकृति व पुरुष अशी दोन प्रकारे विभागणी करून सांगतील)
आणि अर्जुना असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू.
954-13
अवता चौठायी न करू । एकही म्हणौनि न सरू । आत्मानात्मया धरू । सरिसा पाडु ॥954॥
आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्म आहे असे करून संपवणार नाही. तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. (एकाच ब्रह्माचे आत्मा (पुरुष) व अनात्मा (प्रकृति) असे भाग सारखे करून सांगू.
955-13
परि तुवा येतुले करावे । मागो ते आम्हा देआवे । जे कानचि नांव ठेवावे । आपण पै गा ॥955॥
(अर्जुनाचे श्रवण =)
परंतु तू एवढे मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हास दिले पाहिजे. ते मागणे हे आहे की तू आपल्या स्वत:स कानाचे नाव ठेव. इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेऊन फक्त ऐकण्याचे काम चालू दे.
956-13
या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाहला । तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना ॥956॥
या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नको.
957-13
ऐसेनि तो येता वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु । प्रकृतिपुरुषविभागु । परिसे सांगो ॥957॥
अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून, श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृतिपुरुषाचा विभाग सांगतो ऐक.
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥13. 19॥
भावार्थ प्रकृति व पुरुष ही दोन्हीही अनादि आहेत, असे जाण. (देहेंद्रियादि) विकार आणि (सत्व इत्यादि) गुण हे प्रकृतिपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण.
सांख्यांचा प्रकृति-पुरुष विचार
958-13
जया मार्गाते जगी । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागी । मी कपिल जाहलो ॥958॥
या मार्गाला जगामधे योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्यमार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो.
959-13
तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनाते ॥959॥
तो प्रकृतिपुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले.
960-13
तरी पुरुष अनादि आथी । आणि तैचि लागोनि प्रकृति । संसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥960॥
तर दिवस आणि रा त्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी (चिकटलेली) आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादि आहे व प्रकृति ही त्यावेळेपासून (अनादि) आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
961-13
का रूप नोहे वाया । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया । कणेसी कोंडा ॥961॥
किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खर्‍या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहेमी जडवलेलीच असते किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व साररूप दाणे यासह वाढते.
962-13
तैसी जाण जवटे । दोन्ही इये एकवटे । प्रकृतिपुरुष प्रगटे । अनादिसिद्धे ॥962॥
त्याप्रमाणे उघड अनादिसिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृति-पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज.
963-13
पै क्षेत्र येणे नांवे । जे सांगितले आघवे । तेचि एथ जाणावे । प्रकृति हे गा ॥963॥
अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृति होय असे समजावे.
964-13
आणि क्षेत्रज्ञ ऐसे । जयाते म्हणितले असे । तो पुरुष हे अनारिसे । न बोलो घेई ॥964॥
आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही.
965-13
इये आनाने नांवे । परी निरूप्य आन नोहे । हे लक्षण न चुकावे । पुढतपुढती ॥965॥
ह्यास ही निरनिराळी नावे आहेत परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही हे वर्म तू वारंवार चुकू नकोस.
966-13
तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता । प्रकृतीते समस्ता । क्रिया नाम ॥966॥
अर्जुना, केवळ सत्ता (सदत्व) तिला पुरुष असे नाव आहे. आणि (संपूर्ण) क्रियेस प्रकृति हे नाव आहे.
967-13
बुद्धि इंद्रिये अंतःकरण । इत्यादि विकारभरण । आणि ते तिन्ही गुण । सत्त्वादिक ॥967॥
बुद्धि, इंद्रिये, अंत:करण इत्यादि विकारांचा समुदाय सत्वादि (सत्व, रज व तम) तिन्ही गुण.
968-13
हा आघवाचि मेळावा । प्रकृती जाहला जाणावा । हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥968॥
हा सर्व समुदाय प्रकृतिपासून झाला आहे असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू (कारण) आहे.

कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥13. 20॥
भावार्थ कार्य म्हणजे मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियाकडून होणारी क्रिया, कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ, इच्छित वस्तू कर्तृत्व. इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया) या सर्वास मूळ प्रकृति आहे असे म्हणतात. आणि सुखदु:खांच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात.
969-13
तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेसी आधी । मग तिया लाविती वेधी । कारणाच्या ॥969॥
(प्रकृतीच्या ठिकाणी) अगोदर इच्छा आणि बुद्धि ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग (इच्छा व बुद्धि) जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू (मिळवण्याच्या) नादी लावतात.
970-13
तेचि कारण ठाकावया । जे सूत्र धरणे उपाया । तया नांव धनंजया । कार्य पै गा ॥970॥
ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल, तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हालवावयाचे, अर्जुना, ह्या बाह्य प्रयत्नास ‘कार्य ” असे म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
971-13
आणि इच्छा मदाच्या थावी । लागली मनाते उठवी । ते इंद्रिये राहाटवी । हे कर्तृत्व पै गा ॥971॥
आणि मदाच्या (धुंदीच्या) आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियाकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणार्‍या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना, कर्तृत्व असे म्हणतात.
972-13
म्हणोनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥972॥
आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृति ही मूळ आहे असे समज. असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले.
973-13
एवं तिहीचेनि समवाये । प्रकृति कर्मरूप होये । परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥973॥
याप्रमाणे या तिघांच्या समुदायास प्रकृति कर्मरूप होते. परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल, त्यासारखी ती बनते.
974-13
जे सत्त्वगुणे अधिष्ठिजे । ते सत्कर्म म्हणिजे । रजोगुणे निपजे । मध्यम ते ॥974॥
ज्या कर्माचा सत्वगुण अंगिकार करतो, त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे.
975-13
जे का केवळ तमे । होती जिये कर्मे । निषिद्धे अधमे । जाण तिये ॥975॥
किंबहुना जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्ट प्रतीची अधर्म्य समजावीत.
976-13
ऐसेनि संतासंते । कर्मे प्रकृतीस्तव होते । तयापासोनि निर्वाळे ते । सुखदुःख गा ॥976॥
अरे, याप्रमाणे बरीवाईट कर्मे प्रकृतिपासून होतात. मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदु:ख होय.
977-13
असंती दुःख उपजे । सत्कर्मी सुख निफजे । तया दोहीचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥977॥
वाईट कर्मापासून दु:ख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोहीचा (सुखदु:खाचा) भोग पुरुषाला होतो असे म्हणतात.
978-13
सुखदुःखे जंववरी । निफजती साचोकारी । तव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी ॥978॥
सुख दु:ख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात, तोपर्यंत प्रकृति व्यापार करते व पुरुष भोगतो.
979-13
प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगता असंगडी । जे अंबुली जोडी । आंबुला खाय ॥979॥
प्रकृतिपुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता तो अघटित आहे. कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा आयते खातो.
980-13
आंबुला आंबुलिये । संगती ना सोये । की आंबुली जग विये । चोज ऐके ॥980॥
या प्रकृति-पुरुषरूप नवराबायकोचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो. परंतु बायको (प्रकृति) जग प्रसवते हे आश्चर्य नाही का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान् ।
कारणं गुण संगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥13. 21॥
भावार्थ प्रकृतीचे ठिकाणी स्थित असलेला (प्रकृतिपरतंत्र झालेला) पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्याच्या चांगल्या वाईट जन्मांना कारण होय ॥13-21॥
पुरुष वर्णन
981-13
जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥13-98॥
कारण की तो पुरुष अंगहीन (निराकार), पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुनापुराणा, अती म्हातार्‍यांपेक्षा म्हातारा आहे.
982-13
तया आडनांव पुरुषु । एऱ्हवी स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चयो नाही ॥982॥
त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्रीही नाही अथवा नंपुसकही नाही. फार काय सांगावे ? अमूक एक तो आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही.
983-13
तो अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु । रूप ना वर्णु । नाम आथी ॥983॥
त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव हे काही नाही.
984-13
अर्जुना काहीचि जेथ नाही । तो प्रकृतीचा भर्ता पाही । की भोगणे ऐसयाही । सुखदुःखांचे ॥984॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही, तो प्रकृतीचा नवरा आहे, असे समज. पण अशा नवर्‍यास (पुरुषासही) सुखदु:खे भोगावी लागतात.
985-13
तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता । परी इया पतिव्रता । भोगविजे ॥985॥
(प्रकृती वर्णन)
तो पुरुष तर अकर्ता, प्रीतिद्वेषशून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते.
986-13
जियेते अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥986॥
ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषास मोहित करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणार्‍या गोष्टी घडविते.
987-13
मा इये प्रकृती तव । गुणमयी हेचि नांव । किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥987॥
मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे, फार काय सांगावे ? प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत.
988-13
हे प्रतिक्षणी नित्य नवी । रूपा गुणाचीच आघवी । जडातेही माजवी । इयेचा माजु ॥988॥
ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त करतो. (म्हणजे जडाला हालचाल करावयास लावतो).
989-13
नामे इये प्रसिद्धे । स्नेहो इया स्निग्धे । इंद्रिये प्रबुद्धे । इयेचेनि ॥989॥
हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत.
990-13
कायि मन हे नपुंसक । की ते भोगवी तिन्ही लोक । ऐसे ऐसे अलौकिक । करणे इयेचे ॥990॥
मन हे नंपुसक नाही काय ? पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
991-13
हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचे रूप । विकार उमप । इया केले ॥991॥
ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केले आहेत.
992-13
हे कामाची मांडवी । हे मोहवनीची माधवी । इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम ॥992॥
ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव (आधार) आहे व ही मोहरूपी वनातील वसंतऋतु आहे व हिला दैवीमाया हे नाव प्रसिद्धच आहे.
993-13
हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी । प्रपंचाची धाडी । अभंग हे ॥993॥
ही शब्दसृष्टीची वृद्धी आहे, ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी धाडी (हल्ला) आहे.
994-13
कळा एथुनि जालिया । विद्या इयेच्या केलिया । इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥994॥
सर्व कला येथूनच झाल्या आहेत. विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे.
995-13
हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचे वेळाउळ । किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥995॥
ही नादाची टांकसाळ आहे (म्हणजे शब्दमात्र हिच्यापासून उत्पन्न झाले आहे), ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे ? सर्व खेळ हिचा आहे.
996-13
जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात । हे असो अद्भुत । मोहन हे ॥996॥
जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच. सकाळ, संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे.
997-13
हे अद्वयाचे दुसरे । हे निःसंगाचे सोयरे । निराळेसि घरे । नांदत असे ॥997॥
ही प्रकृती एकाकी असणार्‍या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणार्‍या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे.
998-13
इयेते येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी । म्हणौनि तया आवरी । अनावराते ॥998॥
हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा वाढला आहे म्हणून ही त्या अनावराला (पुरुषाला) आपल्या आटोक्यात आणते.
999-13
तयाच्या तव ठायी । निपटूनि काहीचि नाही । की तया आघवेही । आपणचि होय ॥999॥
त्याच्या (पुरुषाच्या) ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. (हेच पुढे सांगतात).
1000-13
तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावो तया ॥1000॥
त्या स्वत:सिद्ध असणार्‍या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे रहाणे व रहाण्याचे ठिकाण आपणच होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1001-13
तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती । तया अकुळाची जाती- । गोत होय ॥13-1001॥
त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते.
1002-13
तया अचर्चाचे चिन्ह । तया अपाराचे मान । तया अमनस्काचे मन । बुद्धीही होय ॥1002॥
ज्याच्या विषयी काही चर्चा करता येत नाही, अशा पुरुषाचे ही लक्षण होते, त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धी ही प्रकृती होते.
1003-13
तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु । निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥1003॥
त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते, त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकाररहित पुरुषाचा अहंकार ही होऊन रहाते.
1004-13
तया अनामाचे नाम । तया अजाचे जन्म । आपण होय कर्म- । क्रिया तया ॥1004॥
त्या नामरहिताचे ही नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया कर्म आपण होते.
1005-13
तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण । तया अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु ॥1005॥
त्या निर्गुणाचे गुण ही होते, त्या पायरहिताचे पाय ही होते. त्या कानरहिताचे कान ही होते व त्या नेत्ररहिताचे नेत्रही ही होते.
1006-13
तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव । किंबहुना होय सर्व । पुरुषाचे हे ॥1006॥
त्या भावातीताचे (जन्मादि सहा) भाव (विकार) ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचे ही अवयव होते. फार काय सांगावे ? ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते.
1007-13
ऐसेनि इया प्रकृती । आपुलिया सर्व व्याप्ती । तया अविकाराते विकृती- । माजी कीजे ॥1007॥
याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्वव्यापकपणामुळे अविकार जो पुरुष त्याला विकारवान करते.
1008-13
तेथ पुरुषत्व जे असे । ते ये इये प्रकृतिदशे । चंद्रमा अंवसे । पडिला जैसा ॥1008॥
तेथे (त्या पुरुषाचे ठिकाणी) जो पुरुषपणा आलेले आहे, ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अमवास्येस पडतो म्हणजे तेजोहीन होतो.
1009-13
विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका कसु होय पांचका । जयापरी ॥1009॥
अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो,
1010-13
का साधूते गोंधळी । संचारोनि सुये मैळी । नाना सुदिनाचा आभाळी । दुर्दिनु कीजे ॥1010॥
अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1011-13
जेवी पय पशूच्या पोटी । का वन्हि जैसा काष्ठी । गुंडूनि घेतला पटी । रत्नदीपु ॥1011॥
गाईच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही अथवा लाकडात अग्नी असतांना जसा तो चकचकीत दिसत नाही. किंवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही.
1012-13
राजा पराधीनु जाहला । का सिंहु रोगे रुंधला । तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ॥1012॥
राजा शत्रूच्या स्वाधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह जसा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की स्वत:च्या तेजाला मुकतो.
1013-13
जागता नरु सहसा । निद्रा पाडूनि जैसा । स्वप्नीचिया सोसा । वश्यु कीजे ॥1013॥
जागृत पुरुष जसा निद्रेने एकदम पडला असता म्हणजे झोपेच्या स्वाधीन झाला असता, तो स्वप्नातील हावेच्या भरीस पडून सुखदु:खभोगास पात्र केला जातो.
1014-13
तैसे प्रकृति जालेपणे । पुरुषा गुण भोगणे । उदास अंतुरीगुणे । आतुडे जेवी ॥1014॥
त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याकारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने (सुखदु:खाच्या फेर्‍यात) सापडला जातो.
1015-13
तैसे अजा नित्या होये । आंगी जन्ममृत्यूचे घाये । वाजती जै लाहे । गुणसंगाते ॥1015॥
जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते, तेव्हा तो स्वभावत: जन्मशून्य व नित्य असूनही, त्याच्या अंगावर मृत्यूचे तडाखे बसतात.
1016-13
परि ते ऐसे पंडुसुता । तातले लोह पिटिता । जेवी वन्हीसीचि घाता । बोलती तया ॥1016॥
परंतु अर्जुना ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात,
1017-13
का आंदोळलिया उदक । प्रतिभा होय अनेक । ते नानात्व म्हणती लोक । चंद्री जेवी ॥1017॥
अथवा पाणी हलले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी (अज्ञानी) लोक चंद्राचे ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात,
1018-13
दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसे ये मुखा । का कुंकुमे स्फटिका । लोहित्व ये ॥1018॥
आरशाच्या जवळपणामुळे पहाणार्‍याच्या मुखाला दुसरेपण येते अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो.
1019-13
तैसा गुणसंगमे । अजन्मा हा जन्मे । पावतु ऐसा गमे । एऱ्हवी नाही ॥1019॥
त्याप्रमाणे हा पुरुष स्वत: अजन्मा असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी (गुणांचा संबंध टाकून पाहिले तर) तो जन्म पावत नाही.
1020-13
अधमोत्तमा योनी । यासि ऐसिया मानी । जैसा संन्यासी होय स्वप्नी । अंत्यजादि जाती ॥1020॥
ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामधे अंत्यजादि होतो त्याप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1021-13
म्हणौनि केवळा पुरुषा । नाही होणे भोगणे देखा । येथ गुणसंगुचि अशेखा- । लागी मूळ ॥1021॥
म्हणून केवळ पुरुषाचा जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय.

उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥13. 22॥
भावार्थ :-
प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृतीकार्याहून आपणास वेगळा पहाणारा, अनुमोदन देणारा (शास्ता) भर्ता, उपभोग घेणारा, महेश्वर, या शरीरामधे परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष अशी ज्यासंबंधी वदंता आहे (तो हाच). पुरुष हा प्रकृतीपेक्षा
वेगळा आहे.
1022-13
हा प्रकृतिमाजी उभा । परी जुई जैसा वोथंबा । इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पाडु ॥1022॥
हा पुरुष प्रकृतीमधे उभा आहे खरा परंतु जुईच्या वेलास जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामधे जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामधे आहे.
1023-13
प्रकृतिसरितेच्या तटी । मेरु होय हा किरीटी । माजी बिंबे परी लोटी । लोटो नेणे ॥1023॥
अर्जुना, प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरुपर्वतासारखा हा असून तिच्यामधे याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वहात जात नाही.
1024-13
प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे । म्हणौनि आब्रह्माचे होये । शासन हा ॥1024॥
प्रकृती होते व जाते परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वाचे नियमन करणारा आहे.
1025-13
प्रकृति येणे जिये । याचिया सत्ता जग विये । इयालागी इये । वरयेतु हा ॥1025॥
प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हिला हा नवरा आहे.
1026-13
अनंते काळे किरीटी । जिया मिळती इया सृष्टी । तिया रिगती ययाच्या पोटी । कल्पांतसमयी ॥1026॥
अर्जुना, अनंतकालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात, त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात.
1027-13
हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोळ लाघवी । अपारपणे मवी । प्रपंचाते ॥1027॥
हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो, (म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो).
1028-13
पै या देहामाझारी । परमात्मा ऐसी जे परी । बोलिजे ते अवधारी । ययातेचि ॥1028॥
आणि या देहामधे परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज.
1029-13
अगा प्रकृतिपरौता । एकु आथी पंडुसुता । ऐसा प्रवादु तो तत्त्वता । पुरुषु हा पै ॥1029॥
अरे अर्जुना, प्रकृतीपलीकडे कोणी एक आहे, अशी जी वदंता आहे (असे जे लोक म्हणतात) तो वस्तुत: हाच पुरुष आहे.

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥13. 23॥
भावार्थ :-
पुरुष आणि प्रकृती, यांना जो जो (या त्यांच्या) गुणांसह याप्रमाणे (म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे) जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही.
1030-13
जो निखळपणे येणे । पुरुषते यया जाणे । आणि गुणांचे करणे । प्रकृतीचे ते ॥1030॥
अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1031-13
हे रूप हे छाया । पैल जळ हे माया । ऐसा निवाडु धनंजया । जेवी कीजे ॥13-1031॥
हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे (मृगजल) आहे, अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी.
1032-13
तेणे पाडे अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना । जयाचिया मना गोचर जाहली ॥1032॥
त्याप्रमाणे अर्जुना, प्रकृती व पुरुष यांच्या स्वरुपाचा यथार्थ विचार ज्याच्या मनाला कळला आहे. ।
1033-13
तो शरीराचेनि मेळे । करू का कर्मे सकळे । परी आकाश धुई न मैळे । तैसा असे ॥1033॥
तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीना का ? परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. सर्व कर्मे करीत असताना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही.
1034-13
आथिलेनि देहे । जो न घेपे देहमोहे । देह गेलिया नोहे पुनरपि तो ॥1034॥
देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलला जात नाही, तो देह पडल्यावर पुन: जन्म पावत नाही.
1035-13
ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुषविवेकु । उपकारु अलौकिकु । करी पै गा ॥1035॥
हा प्रकृतीपुरुषविचार, त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो.
1036-13
परी हाचि अंतरी । विवेक भानूचिया परी । उदैजे ते अवधारी । उपाय बहुत ॥1036॥
परंतु हाच विचार अंत:करणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते ऐक.

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥13. 24॥
श्लोक भावार्थ :-
कित्येक आपल्या ठिकाणी आत्मानात्म्याच्या सरभेसळीत, आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास, आत्मध्यानाच्या योगाने आत्मानात्मविचाराने निवडून पहातात. दुसरे कोणी सांख्ययोगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात.
आत्मस्वरूपाला जाणण्याचे मार्ग
1037-13
कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटा । आत्मानात्मकिटा । पुटे देउनी ॥1037॥
हे चांगल्या योद्ध्या, अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्ममिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन,
1038-13
छत्तीसही वानी भेद । तोडोनिया निर्विवाद । निवडिती शुद्ध । आपणपे ॥1038॥
छत्तीसही अनात्मरूप प्रकारचे भेद नि:संशय जाळून म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात.
1039-13
तया आपणपयाच्या पोटी । आत्मध्यानाचिया दिठी । देखती गा किरीटी । पापियाचा आपणपेचि ॥1039॥
आत्मभावाच्या पोटात स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना, ते आपण आपल्यालाच पहातात.
1040-13
आणिक पै दैवबगे । चित्त देती सांख्ययोगे । एक ते अंगलगे । कर्माचेनी ॥1040॥
आणि कित्येक लोक दैववशात सांख्ययोगाच्या द्वारे (आत्म्याकडे) चित्त देतात, आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून (आत्म्यास) पहातात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

अन्ये त्वेवमजानंन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥13. 25॥
भावार्थ :-
दुसरे कोणी याप्रमाणे (आत्म्याला) न जाणणारे दुसर्‍यांपासून (म्हणजे आचार्यादिकांपासून) श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूला तरून जातात. म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त होतो. ॥13-25॥
(पुढे आपण आत्मस्वरुप जानुन घेऊ)
1041-13
येणे येणे प्रकारे । निस्तरती साचोकारे । हे भव भेउरे । आघवेचि ॥1041॥
याहून कित्येक दुसरे – स्वत: आत्म्याला न जाणणारे – या प्रकारांनीच सर्व संसारभय खरोखर निस्तरतात. (चांगल्या तर्‍हेने तरून जातात).
1042-13
परी ते करिती ऐसे । अभिमानु दवडूनि देशे । एकाचिया विश्वासे । टेकती बोला ॥1042॥
परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या (गुरूच्या) उपदेशावर विश्वासाने अवलंबून रहातात.
1043-13
जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती । पुसोनि शिणु हरिती । देती सुख ॥1043॥
जे गुरू हिताहित पहातात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दु:ख कशाने होते हे विचारून त्याचे दु:ख हरण करतात आणि सुख देतात,
1044-13
तयांचेनि मुखे जे निघे । तेतुले आदरे चांगे । ऐकोनिया आंगे । मने होती ॥1044॥
त्यांच्या (गुरूंच्या) मुखातून जेवढे निघेल, तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात.
1045-13
तया ऐकणेयाचि नांवे । ठेविती गा आघवे । तया अक्षरांसी जीवे । लोण करिती ॥1045॥
आपल्या सर्व कर्तव्यास, ऐकण्याचेच नाव ठेवतात. ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात. आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात.
1046-13
तेही अंती कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा- । पासूनि निघती वोजा । गोमटिया ॥1046॥
हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून (जन्ममरणपरंपरेपासून) चांगल्या रीतीने बाहेर पडतात.
1047-13
ऐसेसे हे उपाये । बहुवस एथे पाहे । जाणावया होये । एकी वस्तु ॥1047॥
एक परमात्मा जाणावयाला येथे असे हे पुष्कळ उपाय आहेत, पहा.
1048-13
आता पुरे हे बहुत । पै सर्वार्थाचे मथित । सिद्धांतनवनीत । देऊ तुज ॥1048॥
आता याविषयी बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो. आतापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थाचे तात्पर्य सांगतो.
1049-13
येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता । येर तव तुज होता । सायास नाही ॥1049॥
अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर (म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे) होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत.
1050-13
म्हणौनि ते बुद्धि रचू । मतवाद हे खांचू । सोलीव निर्वचू । फलितार्थुची ॥1050॥
म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥13. 26॥
श्लोक अर्थ:- हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो, तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असे जाण.
सृष्ट्युत्पत्ती
1051-13
तरी क्षेत्रज्ञ येणे बोले । तुज आपणपे जे दाविले । आणि क्षेत्रही सांगितले । आघवे जे ॥1051॥
तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले.
1052-13
तया येरयेरांच्या मेळी । होईजे भूती सकळी । अनिलसंगे सलिली । कल्लोळ जैसे ॥1052॥
वार्‍याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात (संबंधात) सर्व प्राणी उत्पन्न होतात.
1053-13
का तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥1053॥
अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध आला म्हणजे अर्जुना, मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो.
1054-13
नाना धाराधरधारी । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवी अंकुरी । नानाविधी ॥1054॥
अथवा पर्जन्याचा धारांनी वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमधे जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात.
1055-13
तैसे चराचर आघवे । जे काही जीवु नावे । ते तो उभययोगे संभवे । ऐसे जाण ॥1055॥
त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही चराचर आहे ते तर उभयतांच्या (क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या) मिलाफाने उत्पन्न होते असे समज.
1056-13
इयालागी अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- । पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥1056॥
अर्जुना या करता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्या पासून भिन्न नाहीत
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥13. 27॥
श्लोक भावार्थ- सर्व भूतांच्या ठिकाणी सारख्याच असणार्‍या व नाश पावणार्‍या भूतांमधे अविनाश असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो, तोच ज्ञान्यातील डोळस होय.
ज्ञानी मनुष्याची लक्षणे सर्व प्राणिमात्रात एकच परमात्मा आहे.
1057-13
पै पटत्व तंतु नव्हे । तरी तंतूसीचि ते आहे । ऐसा खोली डोळा पाहे । ऐक्य हे गा ॥1057॥
वस्त्र जे जरी सूत नाही, तरी पण वस्त्रपणा हा सूतावरच आहे. अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे.
1058-13
भूते आघवीचि होती । एकाची एक आहाती । परी तै प्रतीती । यांची घे पा ॥1058॥
सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पहाणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात.
1059-13
यांची नामेही आनाने । अनारिसी वर्तने । वेषही सिनाने । आघवेयांचे ॥1059॥
या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकीसुद्धा भिन्न भिन्न आहेत व या सर्वाचे वेषही भिन्न भिन्न आहेत.
1060-13
ऐसे देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटी । तरी जन्माचिया कोटी । न लाहसी निघो ॥1060॥
अर्जुना, असे पाहून तू जर आपल्या पोटात (मनात) द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता येणार नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1061-13
पै नानाप्रयोजनशीळे । दीर्घे वक्रे वर्तुळे । होती एकाचीच फळे । तुंबिणीयेची ॥1061॥
अनेक कारणांमुळे लांब व वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात.
1062-13
होतु का उजू वाकुडे । परी बोरीचे हे न मोडे । तैसी भूते अवघडे । परी वस्तु उजू ॥1062॥
बोरीचे झाडाची फांदी सरळ अथवा वाकडी असेना का, पण तिला बोरीचीच म्हणतात. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी (त्यात व्यापून असणारी) ब्रह्मवस्तू सरळच(एकच) आहे.
1063-13
अंगारकणी बहुवसी । उष्णता समान जैशी । तैसा नाना जीवराशी । परेशु असे ॥1063॥
निखार्‍याच्या पुष्कळ ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे.
1064-13
गगनभरी धारा । परी पाणी एकचि वीरा । तैसा या भूताकारा । सर्वागी तो ॥1064॥
अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकाराच्या सर्वागात तो परमात्मा आहे.
1065-13
हे भूतग्राम विषम । परी वस्तू ते एथ सम । घटमठी व्योम । जियापरी ॥1065॥
ज्याप्रमाणे घागरीत व घरात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूतसमुदाय जरी वेगवेगळे आहेत, तरी त्यात व्यापून असणारी जी वस्तू, ती एकसारखीच आहे.
1066-13
हा नाशता भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु । जैसा केयूरादिकी कसु । सुवर्णाचा ॥1066॥
ज्याप्रमाणे बाहुभूषणादिक अनेक अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयूरादिक अलंकारांची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे पण या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे.
1067-13
एवं जीवधर्महीनु । जो जीवेसी अभिन्नु । देख तो सुनयनु । ज्ञानियांमाजी ॥1067॥
याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवात व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो, तो ज्ञान्यांमधे चांगला डोळस आहे.
1068-13
ज्ञानाचा डोळा डोळसा- । माजी डोळसु तो वीरेशा । हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो ॥1068॥
अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत, त्यामधे तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो फारच भाग्यवान आहे.
समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥13. 28॥
श्लोकार्थ -::- ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वत:चा घात करत नाही. देह मी आहे असे समजत नाही. नंतर म्हणजे असे जाणल्यानंतर, तो श्रेष्ठ अभेदभावाने पहातो तो श्रेष्ठगती प्राप्त करतो.
1069-13
जे गुणेंद्रिय धोकोटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥1069॥
कारण की देह हा गुण व इंद्रिये यांची रहाण्याची धोकटी आहे, देह हा (कफ, वात व पित्त) या तीन धातूंपासून बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट आहे व भयंकर आहे.
1070-13
हे उघड पांचवेउली । पंचधा आगी लागली । जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥1070॥
हा देह म्हणजे उघड पांच नाग्यांची इंगळी आहे (अथवा) वेगवेगळ्या पाच ठिकाणी दंश करणारी आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरणाचे (रहाण्याचे) घरच सापडले आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1071-13
ऐसा असोनि इये शरीरी । कोण नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाच्या उदरी । दाटीचिना ॥1071॥
त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवीत नाही ? आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्यभावाचा नाश का करत नाही ? हे एक आश्चर्य आहे.
1072-13
परी इये देही असता । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखी पंडुसुता । तेथेचि मिळे ॥1072॥
येथेपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणार्‍या मूर्खाची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात). परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना (देहतादात्म्याने) आपल्या घातावर येत नाही. (म्हणजे आपला घात करून घेत नाही). आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो तेथे (ब्रह्मस्वरूपात मिळतो).
1073-13
जेथ योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनिया जन्मकोडी । न निगो इया भाषा बुडी । देती योगी ॥1073॥
कोट्यावधी जन्म ओलांडून, योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणारा नाही, अशा कृतनिश्चयाने, ज्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी बुडी देऊन रहातात.
1074-13
जे आकाराचे पैल तीर । जे नादाची पैल मेर । तुर्येचे माजघर । परब्रह्म जे ॥1074॥
जे आकाररूप नदीचा पलीकडला काठ आहे, (निराकार आहे) व जे ब्रह्म नादाची पलीकडली कड आहे (शब्दातीत आहे) व जे परब्रह्म तूर्यावस्थेचे मध्यघर (गाभा) आहे,
1075-13
मोक्षासकट गती । जेथे येती विश्रांती । गंगादि आपांपती । सरिता जेवी ॥1075॥
ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षसुद्धा सर्व साध्ये, जेथे (ब्रह्माच्या ठिकाणी) विश्रांतीला येतात.
1076-13
ते सुख येणेचि देहे । पाय पाखाळणिया लाहे । जो भूतवैषम्ये नोहे । विषमबुद्धी ॥1076॥
भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही (भेदाला पावत नाही) त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. (म्हणजे विपुल मिळाते).
1077-13
दीपांचिया कोडी जैसे । एकचि तेज सरिसे । तैसा जो असतुचि असे । सर्वत्र ईशु ॥1077॥
कोट्यवधि दिव्यात जसे एक तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र (चराचरात) भरलेला आहे
1078-13
ऐसेनि समत्वे पंडुसुता । जिये जो देखत साता । तो मरण आणि जीविता । नागवे फुडा ॥1078॥
अर्जुना, अशा समत्वाने चराचराकडे पहात असता जो जगतो, तो खरोखर जन्ममरणाच्या स्वाधीन होत नाही.
1079-13
म्हणौनि तो दैवागळा । वानीत असो वेळोवेळा । जे साम्यसेजे डोळा । लागला तया ॥1079॥
म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की त्याला अभेदभावरूपी बिछान्यावर डोळा लागला आहे. (तो अभेदभावात स्थिर झाला आहे).

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथाऽऽत्मामकर्तारं स पश्यति ॥13. 29॥
श्लोकार्थ -: :- सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय.
(आत्मा अकर्ता आहे. हे जो जाणतो तो ज्ञानी)
1080-13
आणि मनोबुद्धिप्रमुखे । कर्मेंद्रिये अशेखे । करी प्रकृतीचि हे देखे । साच जो गा ॥1080॥
आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते. असे जो खरोखर जाणतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1081-13
घरीची राहटती घरी । घर काही न करी । अभ्र धावे अंबरी । अंबर ते उगे ॥1081॥
घरातील माणसे घरात वागतात व घर काही एक करीत नाही व आकशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असते.
1082-13
तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणी विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥1082॥
याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे (सर्व कर्मात) आत्मा हा खांबासारखा (केवल आधारभूत) असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही.
1083-13
ऐसेनि येणे निवाडे । जयाच्या जीवी उजिवडे । अकर्तयाते फुडे । देखिले तेणे ॥1083॥
अशा या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले.

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥13. 30॥
श्लोकार्थ -: भूतांचा पृथग्भाव निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच आत्म्याचाच हा विस्तार आहे असे जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते.
(ज्ञानी पुढे चालू)
1084-13
एऱ्हवी तैचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जै या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ॥1084॥
सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता येईल.
1085-13
लहरी जैसिया जळी । परमाणुकणिका स्थळी । रश्मीकरमंडळी । सूर्याच्या जेवी ? ॥1085॥
लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर,
1086-13
नातरी देही अवेव । मनी आघवेचि भाव । विस्फुलिंग सावेव । वन्ही एकी ॥1086॥
अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या,
1087-13
तैसे भूताकार एकाचे । हे दिठी रिगे जै साचे । तैचि ब्रह्मसंपत्तीचे । तारू लागे ॥1087॥
त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील (खरोखर अनुभवाला येईल) त्याचवेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज (होडी) मिळेल.
1088-13
मग जया तयाकडे । ब्रह्मेचि दिठी उघडे । किंबहुना जोडे । अपार सुख ॥1088॥
मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे ? त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल.
1089-13
येतुलेनि तुज पार्था । प्रकृतिपुरुषव्यवस्था । ठाये ठावो प्रतीतिपथा । माजी जाहली ? ॥1089॥
अर्जुना, एवढ्याने प्रकृती-पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभावाच्या मार्गात आला. (तुला पूर्णपणे कळला).
1090-13
अमृत जैसे ये चुळा । का निधान देखिजे डोळा । तेतुला जिव्हाळा । मानावा हा ॥1090॥
अरे, चूळ भरावयास जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पहावा, त्याप्रमाणे हा प्रकृतीपुरुषविचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1091-13
जी जाहलिये प्रतीती । घर बांधणे जे चित्ती । ते आता ना सुभद्रापती । इयावरी ॥1091॥
अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावयाचे (म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा) ते आताच नाही तर यानंतर
1092-13
तरी एक दोन्ही ते बोल । बोलिजती सखोल । देई मनाते वोल । मग ते घेई ॥1092॥
आता या एकदोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे. आणि मग त्या घे. (म्हणजे ऐक).
1093-13
ऐसे देवे म्हणितले । मग बोलो आदरिले । तेथे अवधानाचेचि केले । सर्वाग येरे ॥1093॥
असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले.

अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥13. 31॥
श्लोकार्थ -: कौतेया, अनादि व गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो जरी शरीराचे ठिकाणी स्थित असला तरी (काही कर्म) करीत नाही. (सर्व कर्मांपासून) अलिप्त असतो
(आत्म्याचे अलिप्तत्व)आत्मा व देह वेगवेगळे आहेत.
1094-13
तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपे । जळी जळे न लिंपे । सूर्यु जैसा ॥1094॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला, तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात, तो प्रकृतीत असूनही, प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, (तो शुद्धच रहातो). अशा स्वरूपाचा तो आहे असे समज.
1095-13
का जे जळा आदी पाठी । तो असतुचि असे किरीटी । माजी बिंबे ते दृष्टी । आणिकांचिये ॥1095॥
कारण की अर्जुना, जळाच्या आधी व नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामधे तो प्रतिबिंबित होतो. ते दुसर्‍याच्या दृष्टीने. (वास्तविक सूर्य काही पाण्यात सापडलेला नाही).
1096-13
तैसा आत्मा देही । आथि म्हणिपे हे काही । साचे तरी नाही । तो जेथिचा तेथे ॥1096॥
त्याप्रमाणे आत्मा देहात आहे, असे जे म्हटले जाते, ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे.
1097-13
आरिसा मुख जैसे । बिंबलिया नाम असे । देही वसणे तैसे । आत्मतत्त्वा ॥1097॥
आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे देहामधे आत्मतत्वाचे राहणे आहे. (देहात आत्मतत्व प्रतिबिंबरूपाने असते).
1098-13
तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी । वारिया वाळुवे गाठी । केही आहे ? ॥1098॥
त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वार्‍याची व वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय ?
1099-13
आगी आणि पिसा । दोरा सुवावा कैसा । केउता सांदा आकाशा पाषाणेसी ? ॥1099॥
अग्नि आणि पीस यांना दोरा कसा घालायचा ? (म्हणजे दोघांचा संबंध कसा जोडायचा ?) आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडायचा ?
1100-13
एक निघे पूर्वेकडे । एक ते पश्चिमेकडे । तिये भेटीचेनि पाडे । संबंधु हा ॥1100॥
एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1101-13
उजियेडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभेया । तोचि गा आत्मया । देहा जाण ॥1101॥
उजेड व अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य आत्मा व देह यामधे आहे असे समज.
1102-13
रात्री आणि दिवसा । कनका आणि कापुसा । अपाडु का जैसा । तैसाचि हा ॥1102॥
रात्र व दिवस, सोने व कापूस, यामधे जितके असादृश्य आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामधे आहे.
1103-13
देह तव पांचांचे जाले । हे कर्माचे गुणी गुंथले । भंवतसे चाकी सूदले । जन्ममृत्यूच्या ॥1103॥
(देहाचे स्वरूप)
हा देह तर पंचमहाभूतांचा आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे.
1104-13
हे काळानळाच्या तोंडी । घातली लोणियाची उंडी । माशी पांखु पाखडी । तव हे सरे ॥1104॥
कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे. व माशी आपले पंख फडकावते तोच (तितक्या कालातच) हा देह नाश पावतो.
1105-13
हे विपाये आगीत पडे । तरी भस्म होऊनि उडे । जाहले श्वाना वरपडे । तरी ते विष्ठा ॥1105॥
हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते.
1106-13
या चुके दोही काजा । तरी होय कृमींचा पुंजा । हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा ॥1106॥
वरील या दोन परिणामाला जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे.
1107-13
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा । पै नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणे ॥1107॥
(आत्म्याचे स्वरूप)
या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावत: नित्य व सिद्ध आहे.
1108-13
सकळु ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु । कृश ना स्थुळु । निर्गुणपणे ॥1108॥
तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही वा लठ्ठही नाही.
1109-13
आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु । अल्प ना बहुवसु । अरूपपणे ॥1109॥
तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्यही नाही, तो प्रकाशयुक्त नाही अथवा प्रकाशरहितही नाही, थोडा नाही अथवा पुष्कळ नाही.
1110-13
रिता ना भरितु । रहितु ना सहितु । मूर्तु ना अमूर्तु । शून्यपणे ॥1110॥
तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने युक्त नाही. तो प्रगट नाही अथवा अप्रकट नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1111-13
आनंदु ना निरानंदु । एक ना विविधु । मुक्त ना बद्धु । आत्मपणे ॥1111॥
तो आत्मा असल्यामुळे आनंद (सुख) नाही अथवा आनंदरहित (दु:ख) नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही, तो मुक्त अथवा बद्ध नाही.
1112-13
येतुला ना तेतुला । आइता ना रचिला । बोलता ना उगला । अलक्षपणे ॥1112॥
तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही, तितका नाही, स्वत:सिद्ध नाही, अथवा तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही.
1113-13
सृष्टीच्या होणा न रचे । सर्वसंहारे न वेचे । आथी नाथी या दोहीचे । पंचत्व तो ॥1113॥
सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे.
1114-13
मवे ना चर्चे । वाढे ना खाचे । विटे ना वेचे । अव्ययपणे ॥1114॥
तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही अथवा खर्च होत नाही.
1115-13
एवं रूप पै आत्मा । देही जे म्हणती प्रियोत्तमा । ते मठाकारे व्योमा । नाम जैसे ॥1115॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात, ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे.
1116-13
तैसे तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृती । तो घे ना सांडी सुमती । जैसा तैसा ॥1116॥
त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात, पण अर्जुना, तो आत्मा देहाकृति घेत नाही व टाकीतही नाही, तर जशाचा तसाच असतो.
1117-13
अहोरात्रे जैशी । येती जाती आकाशी । आत्मसत्ते तैसी । देहे जाण ॥1117॥
आकाशामधे जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज.
1118-13
म्हणौनि इये शरीरी । काही करवी ना करी । आयताही व्यापारी । सज्ज न होय ॥1118॥
म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही व करवीत नाही व सहज घडून येणार्‍या व्यापाराचे ठिकाणी ‘तो व्यापार मी केला ” असे म्हणत नाही.
1119-13
यालागी स्वरूपे । उणा पुरा न घेपे । हे असो तो न लिंपे । देही देहा ॥1119॥
याकरता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास व पुरेपणास वश होत नाही. हे असो. तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही.

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथाऽऽत्मा नोपलिप्यते ॥13. 32॥
श्लोकार्थ -: :- ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामधे स्थित असला तरी लिप्त होत नाही. आत्मा व देह यात फरक आहे.
1120-13
अगा आकाश के नाही ? । हे न रिघेचि कवणे ठायी ? । परी कायिसेनि कही । गादिजेना जैसे ॥1120॥
अर्जुना, आकाश कोठे नाही ? व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही ? परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1121-13
तैसा सर्वत्र सर्व देही । आत्मा असतुचि असे पाही । परि संगदोषे एकेही । लिप्त नोहे ॥1121॥
तसा आत्मा सर्वत्र सर्व देहात आहेच आहे. (परंतु) पहा तो एकाही संबंधाच्या विकाराने किंवा (संसर्ग-दोषाने) विटाळला जाऊ शकत नाही.
1122-13
पुढतपुढती एथे । हेचि लक्षण निरुते । जे जाणावे क्षेत्रज्ञाते । क्षेत्रविहीना ॥1122॥
आत्म्याचे हेच खरे लक्षण आहे, असे वेळोवेळी (वांरवार) जानावे कि क्षेञज्ञ आत्मा या देहात राहुनही क्षेञ हे धर्मरहित आहे.
1123-13
संसर्गे चेष्टिजे लोहे । परी लोह भ्रामकु नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञा आहे । तेतुला पाडु ॥1123॥
लोहचुंबकाच्या सबंधाने लोखंड हालले जाते. पण लोहचुंबक कधि लोखंडाची जागा घेऊ शकत नाही किंवा लोखंड होऊ शकत नाही तसे क्षेत्रज्ञाच्या सत्तेवर क्षेञाचे व्यवहार होतात; पंरतु क्षेञज्ञ कधिही क्षेञ होऊ शकत नाही.
1124-13
दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरीची । परी वेगळीक कोडीची । दीपा आणि घरा ॥1124॥
दिव्याची प्रज्वलित झालेली ज्योत घरातील सर्व व्यवहार चालवते किंवा सर्व घर प्रकाशाने उजळविते. परंतु दिव्याची ज्योत आणि घर यांच्यात स्वभावत: अतिशय वेगळेपणा आहे.
1125-13
पै काष्ठाच्या पोटी । वन्हि असे किरीटी । परी काष्ठ नोहे या दृष्टी । पाहिजे हा ॥1125॥
अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी आहे पण अग्नी हा कधी लाकुड होत याप्रमाने क्षेञामध्ये क्षेञज्ञ आहे. पंरतु क्षेञज्ञ कधि क्षेञ होऊ शकत नाही या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक जाणून घ्यावा.
1126-13
अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा । तैसाचि हाही डोळा । देखावा पै ॥1126॥
आकाश व ढग यात जो भेद आहे, अथवा सूर्य व मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच हाही (देह व आत्मा यातील) भेद जर तू विवेकाच्या डोळ्याने पहाशील.

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥13. 33॥
श्लोकार्थ -::- हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व ब्रम्हांडाला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे एकटा आत्मा सर्व क्षेत्रांना (देहांना) एकटा क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो.
1127-13
हे आघवेचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु । प्रगटवी लोकु । नांवे नांवे ॥1127॥
ह्या सर्व उपमा राहू दे. आता मी एक गोष्ट सांगतो. ती अशी की आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी (दररोज) सर्व त्रैलोक्य प्रकाशमय करतो.
1128-13
एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा । यावरुते हे न पुसा । शंका नेघा ॥1128॥
त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला (प्रतीतीला) प्रकाशक आहे. यानंतर आत्मा व देह या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका.

क्षेत्रक्षेत्रज्त्रयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च विदुर्यान्ति ते परम् ॥13. 34॥
श्लोकार्थ -: :- याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणार्‍या प्रकृतीचा मोक्ष (म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अनात्मत्व) जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते महात्मे परब्रम्ह परमात्म्याला प्राप्त होतात.

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नाम त्रयोदशोऽध्यायः ॥13॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा हा तेरावा अध्याय समाप्त झाला. ॥13॥
1129-13
शब्दतत्त्वसारज्ञा । पै देखणे तेचि प्रज्ञा । जे क्षेत्रक्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥1129॥
हे शब्दांच्या खर्‍या खर्‍या स्वरूपाचे मर्म जाणणार्‍या अर्जुना, तीच बुद्धी डोळस, की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर जाणते.
1130-13
इया दोहीचे अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥1130॥
क्षेञ व क्षेञज्ञ या दोन्हीतील अंतर समजण्याकरता चतुर मुमुक्षू पुरुष ज्ञानी पुरुषांची द्वारी जाऊन त्यांची सेवा करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1131-13
याचिलागी सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांची दुभती । पोषिती घरी ॥1131॥
हे समजण्याकरता ते शांतीरुप संपत्ति स्वाधीन करुन घेऊन शास्ञाच्या दुभत्या गायी घरी पोसन्याचे काम करतात. म्हणजेच शास्राचे मनन, चिंतन आणि अध्ययन करतात.
1132-13
योगाचिया आकाशा । वळघिजे येवढा धिंवसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥1132॥
जे साधक हे समजन्याकरिताच अष्टांग योगरुप आकाश चढुन जाण्याची इच्छा मनात धरतात.
1133-13
शरीरादि समस्त । मनिताति तृणवत । जीवे संतांचे होत । वाहणधरु ॥1133॥
शरीरादि सर्व गोष्टी गवताप्रमाने तुच्छ मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे आपल्या मस्तकावर धारण करतात.
1134-13
ऐसैसिया परी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनिया अंतरी । निरुते होती ॥1134॥
अशा प्रकारच्या ज्ञान आत्मसात करण्याकरता वेगवेगळे प्रयत्न करुन ते ज्ञान मिळवतात. आणि त्यायोगे अंतःकरणात निश्चिंत होतात.
1135-13
मग क्षेत्रक्षेत्रज्ञाचे । जे अंतर देखती साचे । ज्ञाने उन्मेख तयांचे । वोवाळू आम्ही ॥1135॥
देह आणि आत्मा यामधिल अंतर जे खरोखर पाहतात. त्यांच्या ज्ञानावरुन आम्ही आमचे ज्ञान ओवाळुन टाकु.
1136-13
आणि महाभूतादिकी । प्रभेदली अनेकी । पसरलीसे लटिकी । प्रकृति जे हे ॥1136॥
पंचमहाभूतादि अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्याप्रकृती पसरली आहे.
1136-13
जे शुकनळिकान्याये । न लगती लागली आहे । हे जैसे तैसे होये । ठाउवे जया ॥1137॥
ज्याप्रमाने एखादा पोपट नळीवर येऊन बसतो तेव्हा त्या नळीच्या संयोगाने वास्तविक पाहता बद्ध न होता. तो आपल्या कल्पनेनेच बद्ध होतो, त्याप्रमाने ही प्रकृतीक्षेञज्ञ पुरुषाला न चिकटताच चिकटलेली आहे असे जानवते.
1138-13
जैसी माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळा । सर्पबुद्धि टवाळा । उखी होउनी ॥1138॥
ज्याप्रमाणे (माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी) मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पहातो.
1139-13
का शुक्ति ते शुक्ती । हे साच होय प्रतीती । रुपयाची भ्रांती । जाऊनिया ॥1139॥
प्रखर अशा उजेडात दुरवर पडलेले शिंपले आणि त्यावर मिथ्या रुपयाचे ज्ञान होते. पण बारीक विचाराने रुप्याची भ्रांती जाऊन शिंपले हे शिंपलेच आहे असे खरे ज्ञान प्राप्त होते.
1140-13
तैसी वेगळी वेगळेपणे । प्रकृति जे अंतःकरणे । देखती ते मी म्हणे । ब्रह्म होती ॥1140॥
त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंत:करणाने जे पहातात ते ब्रम्हरुप होतात, असे श्रीकृष्ण स्वःता म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1141-13
जे आकाशाहूनि वाड । जे अव्यक्ताची पैल कड । जे भेटलिया अपाडा पाड । पडो नेदी ॥1141॥
जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे, जे ब्रह्म प्रकृतीरूप नदीच्या पलीकडला काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्यासाम्य उरू देत नाही.
1142-13
आकारु जेथ सरे । जीवत्व जेथे विरे । द्वैत जेथ नुरे । अद्वय जे ॥1142॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे,
1143-13
ते परम तत्त्व पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था- ! राजहंसु ॥1143॥
अर्जुना असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात.
1144-13
ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णे तया पांडवा । उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥1144॥
श्रीकृष्ण व अर्जुन
(संजय धृतराष्ट्रास म्हणतो) महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास हा असा प्रकृती-पुरुष-विचाराचा सर्व हिशोब दिला.
1145-13
येर कलशीचे येरी । रिचविजे जयापरी । आपणपे तया श्रीहरी । दिधले तैसे ॥1145॥
ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसर्‍या घागरीत ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपल्या स्वत:ला (आपल्या बोधाला) त्या अर्जुनाला दिले. (आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत ओतला).
1146-13
आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण । वरी अर्जुनाते श्रीकृष्ण । हा मी म्हणे ॥1146॥
आणि कोण कोणाला देणारा आहे ? कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश होत. याशिवाय अर्जुनाला हा (अर्जुन) मी (श्रीकृष्ण) आहे असे, श्रीकृष्ण म्हणालेही.
1147-13
परी असो ते नाथिले । न पुसता का मी बोले । किंबहुना दिधले । सर्वस्व देवे ॥1147॥
परंतु संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलत आहे ? फार काय सांगावे ? श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले.
1148-13
की तो पार्थु जी मनी । अझुनी तृप्ती न मनी । अधिकाधिक उतान्ही । वाढवीतु असे ॥1148॥
(अर्जुनाचे श्रवण) तथापि तो अर्जुन मनामधे अजून तृप्ती मानीत नव्हता, तर उलट अधिकाधिकच ज्ञानश्रवणाची इच्छा वाढवीत होता.
1149-13
स्नेहाचिया भरोवरी । आंबुथिला दीपु घे थोरी । चाड अर्जुना अंतरी । परिसता तैसी ॥1149॥
भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली.
1150-13
तेथ सुगरिणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥1150॥
जेथे उत्तम स्वयंपाकीण असून तीच उदार वाढणारीही आहे व रसमर्मज्ञ असे जेवणारे भोक्तेही मिळाले आहेत तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1151-13
तैसे जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहता व्याख्यान चढले थांवा । चौगुणे वरी ॥1151॥
महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (श्रवण उत्सुकता पाहून त्यानांही सांगण्याला चौपटीपेक्षा जास्त जोर आला.
1152-13
सुवाये मेघु सांवरे । जैसा चंद्र सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरे । श्रोतयाचेनि ॥1152॥
अनुकूल वार्‍याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्र दर्शनाने समुद्राला भरती येते, ऐकनार्‍यानी आदर दाखविला की वक्त्यालाही वक्तव्य करण्यास स्फुरण चढते.
1153-13
आता आनंदमय आघवे । विश्व कीजेल देवे । ते राये परिसावे । संजयो म्हणे ॥1153॥
संजय धृतराष्ट्रास म्हणतो कि, आता देव आपल्या मंजुळ वाणीतुन निघालेल्या भाषणांनी संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, तो वृतांत महाराजांनी श्रवण करावा.
1154-13
एवं जे महाभारती । श्रीव्यासे आप्रांतमती । भीष्मपर्वी शांती । म्हणितली कथा ॥1154॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) याप्रमाणे अमर्याद आणि विशालबुद्धीच्या महर्षी व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामधे शांतिरसाने भरलेली कथा सांगितली.
1155-13
तो श्रीकृष्णार्जुनसंवादु । नागरी बोली विशदु । सांगोनि दाऊ प्रबंधु । ओवियेचा ॥1155॥
तो श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर भावपुर्ण शब्दांनी स्पष्टपणे करून दाखवितो.
1156-13
नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । जे शृंगाराच्या माथा । पाय ठेवीती ॥1156॥
केवळ शांतिरसाची कथा वाणीच्या रुपाने आपल्या समोर ठेवनार आहे. म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल पंरतु ती शृंगाररसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी शृंगाररसावर ताण आणनारी अशी कथा सांगितली जाईल.
1157-13
दाऊ वेल्हाळ देशी नवी । जे साहित्याते वोजवी । अमृताते चुकी ठेवी । गोडिसेपणे ॥1157॥
ज्या पद्धतिने देशी भाषा साहित्याला (अलंकाराला) सजविते व अमृताला देखिल आपल्या गोडपणाने मागे सारेल, अशा रीतीने अपूर्व उत्कृष्ट व सुंदर देशी भाषा (मराठी भाषा) उपयोगात आणू.
1158-13
बोल वोल्हावतेनि गुणे । चंद्रासि घे उमाणे । रसरंगी भुलवणे । नादु लोपी ॥1158॥
ज्या चंद्राच्या उदयापासुन चंद्रकांत मन्यालासुद्धा पाझर फुटतो, त्या चंद्रालाही माझ्या भावमधुर बोलांपासुन पाझर फुटेल. तसेच माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मधुर शक्तिने नादब्रम्हास झाकुन टाकतील.
1159-13
खेचराचियाही मना । आणी सात्त्विकाचा पान्हा । श्रवणासवे सुमना । समाधि जोडे ॥1159॥
माझे निघालेले शब्द हे अज्ञानी असणार्‍या माणसाच्या मनात देखिल अष्ट सात्विक भावाचा पान्हा फुटेल. आणि ज्ञानी जिज्ञासु आणि शुद्ध अंत:करणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल.
1160-13
तैसा वाग्विलास विस्तारु । गीतार्थेसी विश्व भरू । आनंदाचे आवारू । मांडू जगा ॥1160॥
असा गीतेचा अर्थ सांगेन की किंवा वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1161-13
फिटो विवेकाची वाणी । हो काना मना जिणी । देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची ॥1161॥
श्रवण केल्याने कानांचे आणि आत्म-साक्षात्काराने मनाचे जगणे सफल होईल. आणि त्यामुळे विचारांचे दैन्य फिटले जाईल. आणि चहुबाजुला ब्रह्मविद्देची खाण नजरेस पडेल.
1162-13
दिसो परतत्त्व डोळा । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोध सुकाळा- । माजी विश्व ॥1162॥
परब्रह्म तत्व सर्वाच्या दिव्यचक्षुस किंवा नजरेस दिसावा व सर्वञ आनंदाचा उत्सव उदयास येवो व सर्व विक्ष्वामध्ये ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश व्हावा.
1163-13
हे निफजेल आता आघवे । ऐसे बोलिजेल बरवे । जे अधिष्ठिला असे परमदेवे । श्रीनिवृत्ती मी ॥1163॥
हे सर्व आता घडावे, असे मी भावमधुर शब्दाने बोलेन; श्रेष्ठ देव जे निवृत्तिनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्याने हे सर्व वर दिल्या प्रमानेच होईल.
1164-13
म्हणोनि अक्षरी सुभेदी । उपमा श्लोक कोंदाकोंदी । झाडा देईन प्रतिपदी । ग्रंथार्थासी ॥1164॥
एवढ्याकरता मर्म स्पष्ट करणार्‍या शब्दांनी उपमा व काव्य यांची अर्थालंकारांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन.
1165-13
हा ठावोवरी माते । पुरतया सारस्वते । केले असे श्रीमंते । श्रीगुरुराये ॥1165॥
मला आमच्या श्रीमतं सद्गुरुनी येथपर्यंत डोक्यावर हात ठेऊन सर्व शास्ञामध्ये हुशार तरबेज केले आहे.
1166-13
तेणे जी कृपासावाये । मी बोले तेतुले सामाये । आणि तुमचिये सभे लाहे । गीता म्हणो ॥1166॥
महाराज, त्या कृपा आशिर्वादाने मी जितके बोलनार आहे, तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संतमंडळीमधे गितेचा भावार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे.
1167-13
वरी तुम्हा संतांचे पाये । आजि मी लाधलो आहे । म्हणोनि जी नोहे । अटकु काही ॥1167॥
ह्या शिवाय आणखी तुम्हा संतांच्या चरणकमलांजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण किंवा प्रतिबंध होऊ शकनार नाही.
1168-13
प्रभु काश्मिरी मुके । नुपजे हे काय कौतुके । नाही उणी सामुद्रिके । लक्ष्मीयेसी ॥1168॥
हे देवा, प्रभु, दयाळा सरस्वतीच्या पोटी सहज देखील मुके बालक उत्पन्न होणार नाही. किंवा येऊ शकत नाही. व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हाची कधीच कमतरता पडत नसते.
1169-13
तैसी तुम्हा संतांपासी । अज्ञानाची गोठी कायसी । यालागी नवरसी । वरुषेन मी ॥1169॥
त्याप्रमाने तुम्हा संतांजवळ आल्यावर अज्ञानाची गोष्ट कसली ? अज्ञान राहिलच कसे म्हणून मी आता गीतार्थाच्या द्वारे भावपुर्ण नवरसांचा वर्षाव करीन.
1170-13
किंबहुना आता देवा । अवसरु मज देयावा । ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु ॥1170॥
फार काय सांगावे ? देवा ! श्रीसद्गुरुराया ! मला गीतेचा भावार्थ सांगण्यास आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
हरि ॐ तत्सत् ॥
इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया क्षेञ-क्षेञज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥13॥ ॥
भग्वद्गीतगीता श्लोक :- 34 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 1170 ॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय

वारकरी ग्रंथ सूची

Exit mobile version