Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

संत कान्हो पाठक अभंग गाथा एकूण ६ अभंग

Sant Kanho Pathak maharaj Pabal Pune Alandi
संत कान्हो पाठक महाराज पाबळ आळंदी पुणे

02-A कान्हो पाठक महाराज ALL ग्रंथ
—-🕉️संत कान्हो पाठक अभंग एकूण ६
संत कान्हो पाठक अभंग गाथा –
एकूण ६ अभंग

संत कान्हो पाठक अभंग – १.
गाये तो गाणु नाचे तो नाचणु ।
परिसे तो जाणु भेदवादी ॥१॥
नव्हे तो संतु योगी ना भक्तु ।
जो लोकातु डंव करी ॥धृ॥
पढे तो पढता उपलवी भक्ता ।
कवित्व करिता ख्याती लागी ॥३॥
पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिके ।
जव जीव सात्त्विके विनटेना ॥४॥

संत कान्हो पाठक अभंग – २.
कान्हो जन्मूनिया उत्तम कुळी ।
केली संसाराची होळी ॥१॥
पैका जमूनिया फार ।
पोशी दारा आणि कुमर ॥२॥
सदा निंदी साधुसंता ।
नेणे धर्म कर्म व्रता ॥३॥
कान्हो पाठक कथितो नर ।
अंती भोगी नरक घोर ॥४॥

संत कान्हो पाठक अभंग – ३.
जरी तुज देवाची चाड । तरी न करी बडबड ।
बहुत बोलता वाड । पडसी पतनी ॥१॥
जरी तुज देवाची बाधा । तरी न करी वेवादा ।
वाद करिता निंदा । घडती दोष ॥२॥
जरी तुज देवाचा छंद । तरी सांडी कामक्रोध ।
तेणे परमानंद । होउनी ठासी ॥३॥
जरी तुज देवचि व्हावा । तरी मौन धरी पा जिव्हा ।
जेणे तू अनुभवा । पावसील ॥४॥
जरी तुज देवाचा सांगात । होता अखंडित ।
तरी बैस पा निवांत । साधुसंगी ॥५॥
जरी तुज देवाचा विश्वास । तरी हृदयी धरी नागेश ।
म्हणे कान्हो पाठक । अरे जना ॥६॥
४.
जेथे जेथे मन जाय । तेथे नागनाथ आहे ॥१॥
म्हणवोनि पाहे । मन गुंतले नागेश पाये ॥२॥
सुखसोहळा भोगियले । भोग भोगणे नागेश जेणे ॥३॥
कान्हो पाठक आनंदला । सद्गुरु नागेश भेटला ॥४॥
५.
पेंधा म्हणे हृषीकेशी । आरुष बोबडे हे परियेसी ॥१॥
या रे नाचो अवघे जन । गावो हरिनाम कीर्तन ॥२॥
कान्हो पाठक बागडा । प्रेमे नाचे वैष्णवा पुढा ॥३॥
६.
वेद गणिता मर्यादला । तरि तू अगाध बा विठ्ठला ॥१॥
येवढे माप कैचे थोर । ज्याणे उमाणे तुमचा पार ॥धृ॥
शेष वर्णिता श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ॥३॥
म्हणौनि कान्हो पाठक उगा । मौने मवी पांडुरंगा ॥४॥

-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची

वारकरी ग्रंथ सूची

Exit mobile version