
२३ नोव्हेंबर, दिवस ३२७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ९५१ ते ९७५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९१३ ते ३९२४
“२३ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 23 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २३ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२३ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ९५१ ते ९७५ ,
951-18
का नाव जैसी उदधी । महारोगी दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥951॥
अथवा समुद्रांत पडलेल्याने नाव सोडू नये ? किंवा महारोग्याने दिव्यौषधीचा त्याग करू नये, त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये. 51
952-18
मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा । तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥952॥
मग हे कपिध्वजा; याच सत्कर्मरूप महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर, तम व रज या गुणांचा नाश करून 12
953-18
शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा । भवस्वर्ग काळकूटा । ऐसे दावी ॥953॥
आपल्या उत्कंठेला शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला लावितो; आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषाप्रमाणे आहेत, असे वाटावयास लावतो. नंतर 53
954-18
जिये वैराग्य येणे बोले । मागा संसिद्धी रूप केले । किंबहुना ते आपुले । मेळवी खागे ॥954॥
पूर्वी वैराग्य या शब्दाने संसिद्धि या शब्दाचे जे वर्णन केले ते आपले वैराग्यरूप स्थान तो मिळवितो. 54
955-18
मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । का जालाही जे लाहे । ते आता सांगो ॥955॥
मग ही वैराग्यभूमिका जिंकल्यावर ती त्याची योग्यता होते किंवा पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो, ते आता सांगतो. 55
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः ।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥18. 49॥
956-18
तरी देहादिक हे संसारे । सर्वही मांडलेसे जे गुंफिरे । तेथ नातुडे तो वागुरे । वारा जैसा ॥956॥
वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडे जातांना अडकत नाही, तसा देह आदिकरून जे संसार पाश त्यात तो असून हि सांपडत नाही. 56
957-18
पै परिपाकाचिये वेळे । फळ देठे ना देठु फळे । न धरे तैसे स्नेह खुळे । सर्वत्र होय ॥957॥
हे पहा, पिकलेले फळ जसे देठाला धरीत नाही, किंवा देठहि त्याला धरीत नाही, तसे संसारादिकांवरील सर्व प्रेम निर्जीव होते. (लुळे पडते. ) 57
958-18
पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र । माझे न म्हणे पात्र । विषाचे जैसे ॥958॥
ज्याप्रमाणे विषाचे पात्र माझे आहे असे कोणी म्हणत नाही, त्याप्रमाणे पुत्र, वित्त व स्त्री ही जरी आपल्या इच्छेप्रमाणे वागत असली तरी ती माझी आहेत असे म्हणत नाही. 58
959-18
हे असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती । पाउले घेऊनि एकांती । हृदयाच्या रिगे ॥959॥
फार काय सांगावे, कढत पदार्थाच्या योगे हातालाः चटका बसतांच जसा हात मनुष्य माग घेतो, तशी त्याची बुद्धि विषयांपासून मागे परतून आत्मविचाराकडे लागते. 59
960-18
ऐसया अंतःकरण । बाह्य येता तयाची आण । न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥960॥
ज्याप्रमाणे दासी स्वामीच्या भीतीने त्याची आज्ञा मोडीत नाही, त्याप्रमाणे अंतःकरण विषयाकडे बाहेर येऊन आम्याची शपथ मोडीत नाही. 960
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
961-18
तैसे ऐक्याचिये मुठी । माजिवडे चित्त किरीटी । करूनि वेधी नेहटी । आत्मयाच्या ॥961॥
तसे अर्जुना, ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून त्याला आत्म्याच्या छंदास लावतो; 61
962-18
तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे । निमणे जालेचि आहे । आगी दडपलिया धुये । राहिजे जैसे ॥962॥
त्या वेळेस, जसा अग्नी राखेत पुरला म्हणजे धूर आपोआप राहतो, तशी इहपर विषयांची इच्छा सहजच नष्ट होते. 62
963-18
म्हणौनि नियमिलिया मानसी । स्पृहा नासौनि जाय आपैसी । किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥963॥
म्हणून मनाचा निग्रह झाला म्हणजे इच्छा आपोआप नाहीशी होते. फार सांगून काय करावयाचे आहे ? अशी भूमिका साधकाला प्राप्त होते. 63
964-18
पै अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा । बोधमात्रीचि जीवा । ठावो होय ॥964॥
हे बघ अर्जुन, विपरीत बोध सगळा मावळून त्याला खरा बोधच प्राप्त होतो. 64
965-18
धरवणी वेचे सरे । तैसे भोगे प्राचीन पुरे । नवे तव नुपकरे । काहीचि करू ॥965॥
जसे सांचविलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते, तसे प्रारब्धकर्म हे भोगांती सरते आणि अहंकर्तृत्वभावना नसत्यामुळे नवीन कर्म उपन्न होत नाही. 65
966-18
ऐसी कर्मे साम्यदशा । होय तेथ वीरेशा । मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥966॥
अर्जुन, अशाप्रकारे सर्व कर्माची क्षीणदशा झाली म्हणजे मग श्रीगुरूंची आपोआप भेट होते. 66
967-18
रात्रीची चौपाहरी । वेचलिया अवधारी । डोळ्या तमारी । मिळे जैसा ॥967॥
हे पहा, रात्रीचे चार प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य दृष्टीस पडतो 67
968-18
का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥968॥
अथवा, फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवितो, त्याप्रमाणे श्रीगुरु हे भेट्न जिज्ञासूची कर्मकर्तृत्ववाची खटपट बंद करतात. 68
969-18
मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा । तैसे होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥969॥
मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचे ठिकाणी कलेचा कमीपणा मुळीच राहात नाही, त्याप्रमाणे, हे श्रेष्ठवीरा, गुरुकृपा झाली म्हणजे जिज्ञासूला कोणतीहि उणीव राहात नाही. 69
970-18
तेव्हा अबोधुमात्र असे । तो तव तया कृपा नासे । तेथ निशीसवे जैसे । आंधारे जाय ॥970॥
त्या वेळी अज्ञान म्हणून जेवढे असते, तेव्हढे तर त्यांच्या कृपेनेच नष्ट होते, आणि रात्र गेल्यावर अंधार नहीसा होतो, 970
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
971-18
तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी । त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥971॥
याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याच्या पोटात जी कर्ता, कर्म आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीहि नाश पावते. जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळा मारावा लागत नाही, तो आपोआपच मरतो. 71
972-18
तैसेचि अबोधनाशासवे । नाशे क्रियाजात आघवे । ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥972॥
तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्मांचा नाश होतो. अशा प्रकारे सर्व कमचा समूळ नाश होणे यालाच संन्यास म्हणतात तोच त्याला प्राप्त होतो. 72
973-18
येणे मुळाज्ञानसंन्यासे । दृश्याचा जेथ ठावो पुसे । तेथ बुझावे ते आपैसे । तोचि आहे ॥973॥
त्यामुळे ज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्ट झाले म्हणजे मग जाणावयाचे जे ते तो आपण स्वतःच आहे. 73
974-18
चेइलियावरी पाही । स्वप्नीचिया तिये डोही । आपणयाते काई । काढू जाइजे ? ॥974॥
असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यानंतर आपण डोहांत बुडत असल्याच जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता, तो ! सत्य मानून त्यातून आपल्याला काढण्याविषयी तो खटपट करील काय ?
975-18
तै मी नेणे आता जाणेन । हे सरले तया दुःस्वप्न । जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥975॥
त्याप्रमाणे मला कळत नाही, मी आता समजून घेईन, हे त्याचे दुःस्वप्त नष्ट होते; आणि • ज्ञेय व ज्ञाता हे जाऊन तो केवळ चिदाकाश म्हणजे ज्ञानमात्र होतो. 75
दिवस ३२७ वा. २३, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९१३ ते ३२४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३९१३ (डांकाचेरूपक)
विनंति घातली अवधारी । मज देई वो अभय करी । पीडिलो खेचरी । आणीक वारी नावांची ॥१॥
रंगा येई वो । एकला रंग वोढवला । हरीनामे उठिला । गजर केला हाकारा ॥धृपद॥
देवाचे दैवते । तुज नमिले आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धावत ॥२॥
न लवी आता वेळ । आइती सारीली सकळ । तूका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥
अर्थ
हे विठाई तू हात वर करुन मला अभयाचे आश्वासन दयावेस. देवा मला काम, क्रोधरुपी भूतांनी फार त्रास दिला आहे. अजूनही असे वेगवेगळया नावाचे पंचमहाभूत आहे त्यांनी मला खूप त्रास दिला आहे त्या सर्वाचे तू निवारण कर. हे श्रीरंगा आज कीर्तनाचा रंग खूप वाढला आहे त्यामुळे तू एकटयानेच यावे. आज येथे कीर्तना मध्ये हरीनामाचा गजर उठला आहे आणि मी तुला हाक मारीत आहे. देवतांचे दैवत असलेल्या आदिनाथा मी तुला नमन करत आहे. हे कृपावंते माझे भोग नष्ट करण्यासाठी तू धावत माझ्याकडे यावे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझे विठाबाई आता तू येण्यास वेळ लावू नकोस मी पूजेची सर्व तयारी केली आहे. हे माझ्या कुळदैवते मी अशी तुम्हाला विनंती करत आहे. ”
1:05
अभंग क्र. ३९१४ (डांकाचेरूपक)
माझा देव्हारा साचा । नाही आणीक कोणाचा । त्रिभुवनी याचा । ठसा न लगे पुसावे ॥१॥
या रे लोटांगणी । काही करा विनवणी । करील झाडणी । भूत काढील संसार ॥धृपद॥
पडिले विषयांचे गोंधळी । ते त्रिगुण आकळी । हरीनाम आरोळी । कानी पडता ते उठी ॥२॥
घेतला अहंकारे । काम क्रोध या मत्सरे । पळती प्रेमभरे । अवघे ठाव सांडुनी ॥३॥
घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥
तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । काही कोठे हिंडावे ॥५॥
अर्थ
माझा देव्हारा खरा आहे आणि माझ्या देव्हा-यासारखा देव्हाराही कोणाचा नाही माझ्या दैवताचा ठसा त्रैलोक्यात पसरलेला आहे त्यामुळे माझ्या देव्हा-यामध्ये कोणता देव आहे हे पुसणेच नको. त्यामुळे तुम्ही लोटांगण घालीत माझ्या देवापुढे या आणि त्याला काहीतरी विनवणी करा. तो तुमच्या सर्व दु:खाची झाडणी करील आणि तुमच्या अंगामध्ये जे संसाररुपी भूत आहे ते देखील तो बाहेर काढील. विविध विषयांमध्ये जे पडलेले असतात विषयांच्या गोंधळांमुळे ते लोक त्रिगुणात गुंतून पडतात. हरीनामाची आरोळी एकदा कानावर पडली की, ते त्रिगुण उठून जातात. अहंकार, काम, क्रोध, मत्सर यांनी तुम्हाला घेरले आहे. प्रेमाने हरीचे नाम घ्या मग हे सर्व विकार तुम्हाला सोडून पळून जातील तुमच्या ठिकाणी हे विकारच राहणार नाही. माया, ममता, आसरा यांनी ज्यांना त्रास दिला आहे, ते सर्व माझ्या कीर्तनाचा रंग पाहून एकदमच पळून जातील. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या दैवताला तुम्ही तुमचा एकनिष्ठ भक्तिभाव अर्पण करा मग तुमचा सर्व संदेह नाहीसा होईल. मग इतर
1:06
अभंग क्र. ३९१५ (डांकाचेरूपक)
पुढे येते देवी । तिची जती चालो द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥
एकवीरा आली अंगा । आता निवारील रोगा । माझ्या भक्तापाशी सांगा । पूजा भावे करावी ॥धृपद॥
मेंढा मारावा लोहाळ । पूजा पावली सकळ । तुम्ही केले बळ । मग मी ठायी न पडे ॥२॥
तुका म्हणे मुळी । लागली ते आली कुळी । वंदुनी सकळी । जीवे भावो ओवाळा ॥३॥
अर्थ
देवीची बारी सतत चालू ठेवावी म्हणजे देवी पुढे येते. मागे तुम्ही या देवीपुढे जे काही नवस बोलले आहेत ते सर्व तुम्ही पूर्ण करा नाहीतर ही देवी तुमच्या आयुष्यरुपी मायेला हिसका देईन. आता माझ्या अंगामध्ये एकवीरा संचरली आहे माझ्या सर्व रोगाचे निवारण ती करेन. ती म्हणते आहे की, “माझ्या भक्तांना सांग माझी पूजा मनोभावे करावी. ” मनरुपी पुष्कळ केस असलेला मेंढा माझ्यापुढे मारावा तरच मला पूजा प्राप्त होईल. नाही तर तुम्ही कितीही वेळा प्रयत्न केले तरीपण मी तुम्हाला कुठेच सापडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मूळत:च जी देवी माझ्या कुळामध्ये आली आहे. या देवीला वंदन करुन सर्वानी जीवाभावाने ओवाळा. ”
1:06
अभंग क्र. ३९१६ (डांकाचेरूपक)
अवघ्या जेष्ठादेवी । कोण पूजनाचा ठाव । धरिताचि भाव । कोठे नाहीसे झाले ॥१॥
दिसे सारिखे सारिखे । परि ते कारणी पारिखे । तळी गेले देखे । वरी टोले न साहाती ॥धृपद॥
पट एका शिरी । यथाविधीने त्या येरी । बसकोळ्या घागरी । डेरे रांझण गाडगी ॥२॥
तुका म्हणे माना । येथे कोणी रुसावे ना । आपुलाल्या स्थाना । जेथे त्याचि शोभल्या ॥३॥
अर्थ
सर्व देवता श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत तर मग पूजा करण्यासाठी योग्य ठिकाण व देव कोणता आहे ? एका देवाच्या ठिकाणी भक्तिभाव धरला तर दुस-या देवाच्या ठिकाणी भक्तिभाव नाहीसा होतो. दिसायला जरी सर्व देव सारखेसारखे असले तरी आपआपल्या गुणामुळे ते वेगवेगळे आहेत. जसे घराचे बांधकाम करत असताना तळाला म्हणजे पायामध्ये गेलेले दगड यांना कोणत्याही प्रकारचे घाव बसलेले नसतात. परंतु बांधकाम करत असताना वरती आलेल्या दगडांना टाकीचे घाव सोसावे लागतात म्हणजे सर्व दगड सारखे आहेत परंतु ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार वेगवेगळे प्रकार होतात. माणसे हे सर्वत्र सारखे आहेत परंतु ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्यांच्यामधे अंतर आहे म्हणजे एकाच्या डोक्यावर मुकुट असतात तर बाकीचे सर्व सामान्य असतात. माती हा एकच प्रकार आहे परंतु त्या मातीपासून वेगवेगळे मडकी, घागरे, रांजण, डेरे, लक्ष्मी तयार होत असते काही ठिकाणी मडक्यांचा उपयोग भाद्रपदामध्ये महालक्ष्मी म्हणून केला जातो तशी बाकीची नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे या क्षेत्रामध्ये मान घेण्यासाठी कोणीही रुसून बसू नये. आपआपल्या स्थानावरच जे ते देव देवी शोभून दिसत असतात. ”
1:06
अभंग क्र. ३९१७ (डांकाचेरूपक)
खेचर खडतर । काळ कापती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणी ॥१॥
आता करी का रे हाकारा । सहस्रनामे एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगे धरूनी ॥धृपद॥
सीते झाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनी । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥
लाविले कावरे । प्रल्हादासी म्हैसासुरे । आली येकसरे । दात खात रंगासी ॥३॥
वसुदेवाची बाळे । सात खादली ज्या काळे । आली भोगवेळे । तया कारणे तेथे ॥४॥
पांडवे बापुडी । वांज केली फिरती वेडी । धावोनिया काढी । अंगसंगे त्राहाटविली ॥५॥
नामाचे चिंतन । तेथे धावते आपण । न विचारिता हीण । भाव देखे जयाचा ॥६॥
कुळींची कुळदेवता । तुका म्हणे आम्हा माता । काय भय भूता । काळ यमदूताचे ॥७॥
अर्थ
पंढरपूरमध्ये भीमातीराला एकच देवी नांदते जेव्हा आपण नांव तिचे घेतो त्यावेळी कितीही भयानक भूत असले किंवा असुर असले किंवा काळ जरी असला तरी ते थरथर कापतात. तुम्ही सर्वानी एकदमच सहस्त्रनामाने त्या देवीला हाका मारा. मग ती तुम्हाला जवळ घेईल आणि तुमचे संसाराचे भूत पळून लावील. सीतेला देखील एका रावण नावाच्या भूताने झपाटले होते त्यामुळे तिला अशोकवनात राहावे लागले. मग नंतर माझी जननी रामाच्या रुपाने तिथे मोकळे केस सोडून सीतेची सुटका करण्यासाठी गेले. प्रल्हादाला देखील हिरण्यकश्यपू नावाच्या एका दैत्याने फार वेड लावले होते सारखा विचारीत होता की, “तुझा देव कोठे आहे. ” तेथे देखील माझी विठाई महिषासूरमर्दिनी दात खातच स्तंभ फोडून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी धावली. वसुदेवाची सात बाळे जी कंस नावाच्या काळाने खाऊन टाकली, कंसाचे पाप इतके वा
1:07
अभंग क्र. ३९१८ (डांकाचेरूपक)
देवी देव झाले भोग सरले यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाही उरली ॥१॥
हरीनाम देवनाम तुम्ही गाऊनिया जागा । पेंठंवणी मागा नका ठेवू लिगाड ॥धृपद॥
शेवटी सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटी ॥२॥
गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरी आजि कोडी उगविली ॥३॥
अर्थ
आता देवी देव व सर्व प्रकारचे भोग संपलेले आहेत यापेक्षा दुसरे सांगण्यासाठी काहीही उरले नाही. हरीनाम व देवनाम घेत तुम्ही जागे राहा केलेल्या कामाची बिदागी मागा म्हणजे बक्षीस मागा त्याविषयी कोणतेही लचांड पाठीमागे ठेवू नका. शेवटी भक्तिप्रेमाच्या सुताने चांगले वेढे दया व डांक वाजवा व सर्व काही संपल्यानंतर जीव, ब्रम्ह, ऐक्याच्या अनुभवाशी मेळ घाला. तुकाराम महाराज म्हणतात, “आता देव्हारा गुंडाळून ठेवावा मानकरी संत आपआपला मान नेत आहेत आणि आज माझ्या देवाने खूप सा-या भक्तांचे कोडे उलगडवले आहे. ”
1:07
अभंग क्र. ३९१९ (पागुळ)
पागुळ झालो देवा नाही हात ना पाय । बैसलो जयावरी सैराट ते जाय ।
खेटिता कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाही मज कोणी । बाप ना माय ॥१॥
दाते हो दान करा । जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥धृपद॥
हिंडता गव्हाने गा । शिणलो येरझारी । न मिळेचि दाता कोणी । जन्मदुःख निवारी ।
कीर्ति हे संता मुखी । तोचि दाखवा हरी । पागळा पाय देतो । नांदे पंढरपुरी ॥२॥
या पोटाकारणे गा । झालो पागीला जना । न सरेचि बापमाय । भीक नाही खंडणा ।
पुढारा म्हणती एक । तया नाही करुणा । श्वान हे लागे पाठी । आशा बहु दारुणा ॥३॥
काय मी चुकलो गा । मागे नेणवेचि काही । न कळेचि पाप पुण्य । तेथे आठव नाही ।
मी माजी भुललो गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव काही ॥४॥
दुरोनि आलो मी गा । दुःख झाले दारुण । यावया येथवरी होते । हेचि कारण ।
दुर्लभ भेटी तुम्हा । पायी झाले दरुषन । विनवितो तुका संता । दोन्ही कर जोडून ॥५॥
अर्थ
देवा मी परमार्थ करण्यासाठी पागूळ झालो आहे कारण माझ्याकडे विवेक नावाचे हात आणि वैराग्य नावाचे पाय नाहीत ज्या मनावर माझा विश्वास होता ते मन तर कोठेही सैराटवाणी धावत आहे. देवा हे माझे मन विविध प्रकारच्या विषयरुपी कुंपनातल्या काट्यांना, खुंटांना खेटत आहे नरकरूपी दरड देखील हे पाहात नाही अशा अवस्थेमध्ये मला कोणाचाही आधार नाही व परमार्थ करण्यात मला बापही व मायही अनुकूल नाही. त्यामुळे हे संतजन हो तुम्ही पंढरपुरला चालले आहात तर मला तिथपर्यंत नेण्याचे दान करा मला पंढरपूरपर्यंत घेऊन जा मला तेथे न्या कारण तुम्ही अक्षम म्हणजे पंग�
1:07
अभंग क्र. ३९२० (आंधळा)
देखत होतो आधी मागे पुढे सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ ।
तिमिर कोंदलेंसे वाढे वाढता प्रबळ । भीत मी झालो देवा काय ज्याल्याचे फळ ॥१॥
आता मज दृष्टी देई पांडुरंगा मायबापा । शरण आलो आता निवारूनिया पापा ।
अंजन लेववुनी करी मारग सोपा । जाईन सिद्धिपंथे अवघ्या चुकती खेपा ॥धृपद॥
होतसे खेद चित्ता काही नाठवे विचार । जात होतो जना मागे तोही सांडिला आधार ।
हा ना तोसा ठाव झाला अवघा पडिला अंधार । फिरली माझी मज कोणी न देती आधार ॥२॥
जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंद्रिये मावळलीं
आला बागुल आजा । कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ॥३॥
गुंतलो या संवसारे कैसा झालोसे अंध । मी माझे वाढवुनी मायातृष्णेचा बाध ।
स्वहित न दिसेचि केला आपुला वध । लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध ॥४॥
लागती चालता गा गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग झालो निराळा कैसा ।
पाहातो वास तुझी थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा ॥५॥
अर्थ
मी अगोदर सर्वत्र म्हणजे माझ्या मागे पुढे अगदी सगळीकडे देव आहे असेच पहात होतो परंतु भ्रमाचे पडळ माझ्या दृष्टीवर आले आणि माझी सर्वत्र देव पाहाण्याची दृष्टीच गेली. सर्वत्र अज्ञानाचा अंध:कार कोंदाटला आणि देवा त्यामुळे ते अज्ञान प्रबळ झाले व वाढल्याने वाढतच गेले व या कारणामुळे मी खूप भयभीत झालो आणि जन्माला येऊन आपण काय फळ प्राप्त करुन घेतले याविषयी मी विचार करु लागलो. त्यामुळे हे पाडूरंगा माझ्या मायबापा आता पुन्हा मला सर्वत्र देव पहाण्याची दृष्टी दे मी माझ्या सर्व पापाचे
1:07
अभंग क्र. ३९२१ (आंधळा)
आंधळ्यापागळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता ।
घडी मोडी हेळामात्रे पापपुण्यसंचिता । भवदुःखे कोण वारी तुजवाचुनि चिंता ॥१॥
धर्म गा जागो तुझा तूचि कृपाळू राजा । जाणसी जीवीचे गा न सांगता सहजा ॥धृपद॥
घातली लोळणी गा पुंडलीके वाळवंटी । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटी ।
न देखे दुसरे गा । झाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥
आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटे । न देखे न चलवे जना चालते वाटे ।
घातली लोळणी गा हरीनाम बोभाटे । पावला त्याकारणे धाव घातली नेटे ॥३॥
बैसोनि खोळी शुक राहे गर्भी आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।
मागील सोसिले ते ना भी म्हणे गोपाळा । पावला त्याकारणे । लाज राखिली कळा ॥४॥
न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो नाठवी धना ।
आपपर ते ही नाही बंधुवर्ग सज्जना । तुकया तेचि परी झाली पावे नारायणा ॥५॥
अर्थ
परमार्थामध्ये आंधळया, पागळयांचा एक विठोबाच दाता आहे त्यानेच सर्व विश्वाला जन्म दिलेला असून तो सर्व जाणता आहे. देवा पाप पुण्याच्या संचितानुसार तू क्षणमात्रात घडामोडी करतोस राजाचा रंक करतोस, रंकाचा राजा करतोस आणि देवा भवदु:खाची चिंता तुझ्यावाचून दुसरे कोण निवारण करणार आहे ? देवा कृपा करण्याचा तुझा धर्म आहे तो असाच जागृत राहो जगामध्ये तूच एक कृपा करणारा कृपाळू राजा आहेस भक्ताने जरी काही सांगितले नाही तरी त्यांच्या मनातील सहज जाणणारा तू आहेस. नीराभिवरेच्या तीरी म्हणजेच्या चंद्रभागेच्या तीरी पंढरी नावाचे पुण्यक्षेत्र आहे तेथे पुंडलिकाने वाळवंटामध्ये लोळणी घा�
1:07
अभंग क्र. ३९२२ (आंधळा)
सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथे ।
मी माजी हारपले ठायी जेथीचा तेथे । अदृश्य तेचि जाले काही दृश्य जे होते ॥१॥
सुखी मी निजलो गा शून्य सारूनि तेथे । त्रिकूटशिखरी गा दान मिळे आइते ॥धृपद॥
टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।
न मागे मी भीक आता हाचि झाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणे पुरविली इच्छा ॥२॥
ऊर्ध्वमुखे आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपी मेळविले नांव ठेविला भेद ॥३॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागे येतील त्यासी ।
मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥
वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ते ठाव ।
म्हणोनि संग टाकी सेवी अद्वैत भाव । तुका म्हणे हाचि संती मागे केला उपाव ॥५॥
अर्थ
माझी दृष्टी नीज निराकार मार्गाकडे जात आहे त्यामुळे मी सहजच आंधळा झालो आहे माझ्या वृत्तीची, निवृत्ती झाली आहे त्यामुळे मला लोकच दिसत नाही. मी आणि माझे हा भ्रम आता जेथेच्या तेथेच नाहीशा झाला आहे त्यामुळे जे माझ्यासाठी दृश्य होते आता ते अदृश्य झाले आहे. सर्व शून्याला आणि त्रिकुटीला बाजूला सारुन मी सुखाने निजलो आहे मला तेथे आयते दान मिळाले आहे. मी आता धर्म, अधर्म, आशारुपी पात्र, झोळी टाकून दिली आहे संसाराचा कोल्हाळ चुकविला आहे आणि सत्व, रज, तम या त्रिगुणाचा वळसा देखील चुकविला आहे आता मी कुठेही भीक मागणार नाही याविषयी मला भरवसा झाला आहे आणि सतरावी जी ज�
1:09
अभंग क्र. ३९२३
भगवंता तुजकारणे मेलो जीताचि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाही तयेसी ।
न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणता न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥धृपद॥
भुक्तिमुक्ति तूचि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
सर्वस्वे त्याग केला धाव घातली आता । कृपादान देई देवा येउनि सामोरा आता ॥२॥
संसारसागरू गा भवदुःखाचे मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।
इंद्रिये वज्रघाते तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ ॥३॥
तिही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा । वेघलो वरी खोडा भाव धरूनि टेंका ।
जाणवी नरनारी जागो धर्म लोका । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥
नाठवे आपपर आता काय बा करू । सारिख दोहीसवा हारपला विचारू ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥
अर्थ
हे भगवंता तुझ्यावाचून आम्ही जीवंत असून मेल्यासारखे झालो आहोत, हे देवा आमची बुध्दी निष्काम झाली असून तिला कोणतेही चलनच राहिले नाही. देवा आमचे हातपायही आता चालत नाही आमची दृष्टी कशी फिरली आहे ते पहा आम्ही तुझे क्षर आणि अक्षर म्हणजे व्यापक आणि अलिप्त रुप जाणत आहोत तरी न जाणल्यासारखेच करतो तुझे ते रुप आम्ही माहित असून देखील पहात नाही. हे विठोबा तुझ्या नामासारखेच दान मला दे म्हणजे तुझ्या नामाची किर्ती जशी थोर वर्णन केलेली आहे तशाच प्रकारचे थोर दान तू मला दयावेस. देवा भुक्ति, मुक्ति, सिध्दीचा दाता तूच एक आहेस त्यामुळे तर आम्ही शोक, भय, लाज, चिंता टाकून दिली आहे. देवा मी स�
1:09
अभंग क्र. ३९२४
देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलो । करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो ।
पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो । परदेशी नाही कोणी अंध पागुळ झालो ॥१॥
आता माझी करी चिंता दान देई भगवंता । पाठी पोटी नाही कोणी निरवी सज्जन संता ॥धृपद॥
चालता वाट पुढे भय वाटते चित्ती । बहुत जन गेले नाही आले मागुती । न देखे काय झालें
कान तरी ऐकती । बैसलो संधिभागी तुज धरूनि चित्ती ॥२॥
भाकितो करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरे पोट कधी नाही निश्चळ पाव । हिंडता भागलो गा
लक्ष चौऱ्यांशी गाव । धरूनि राहिलो गा हाचि वसता ठाव ॥३॥
भरवसा आता काय कोण आणि अवचिता । तैसीच झाली कीर्ति तया मज बहुता ।
म्हणउनि मारी हाका सोयी पावे पुण्यवंता । लागली भूक थोरी तूचि कृपाळू दाता ॥४॥
संचित सांडवले काही होते जवळी । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी ।
निष्काम झालो देवा होते माझे कपाळी । तुका म्हणे तूचि आता माझा सर्वस्वे बळी ॥५॥
अर्थ
हा देश आणि हा वेश माझा नसून मी या मनुष्य देहामध्ये सहजच फिरत आलो आहे हा देह, मी आणि देहासंबंधी माझे हे कोणीही माझे नाही त्यामुळे मी सत्ता तरी कोणावर करु आणि कोणत्या ठिकाणी स्थिर राहू हे मला काही कळत नाही. पाय आणि डोळे यांना जर माझे म्हणावे तर त्यांनीच मला कसे दाखवून दिले आहे ते पहा. मी या परदेशामध्ये असा आंधळा, पागळा झालो आहे. हे भगवंता त्यामुळे आता तुम्ही माझी चिंता, काळजी करावी आणि माझ्या पाठीपोटीही कोणी नाही त्यामुळे मला संतांच्या स्वाधीन तुम्ही करावे हेच दान तुम्ही मला दयावे. संसाराच्या वाटेने पुढे चालत असताना माझे चि�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















