
१४ एप्रिल, दिवस १०४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १२३७ ते १२४८
“१४ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १४ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १४ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१४ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी २७६ ते ३००,
276-9
जया ॐकाराचिये कुशी । अक्षरे होती अउमकारेसी । जिये उपजत वेदेसी । उठली तिन्ही ॥276॥
ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् अशी अक्षरे उत्पन्न होतात, व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले,
277-9
म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु । एंव मीचि कुलक्रमू । शब्दब्रह्माचा ॥277॥
ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् अशी अक्षरे उत्पन्न होतात, व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले, म्हणून ऋक्, यजु व साम हे तिन्ही वेदही मीच, व ज्याप्रमाणे वेदांची वंशपरंपराही मीच होय, असे श्रीकृष्ण म्हणाले.
गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् ।
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥9. 18॥
278-9
हे चराचर आघवे । जिये प्रकृती आत साठवे । ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥278॥
हे सर्व स्थावर जंगम विश्व ज्या प्रकृतीच्या आत भरलेले आहे, ती प्रकृति श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते ते उत्तम स्थान मी;
279-9
आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणे अधिष्ठिली विश्व विये । जो येऊनि प्रकृती इये । गुणाते भोगी ॥279॥
आणि ज्याच्यामुळे ही प्रकृति वांचते ज्याच्या आश्रयाने विश्व प्रसवते व जो प्रकृतीच्या निमीत्ताने सत्व, रज, तम या गुणांचा उपभोग घेतो,
280-9
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पंडुसुता । मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा ॥280॥
तो विश्वलक्ष्मीचा पति मीच; आणि अर्जुना, सर्व त्रैलोक्याचा स्वामी मीच.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-9
आकाशे सर्वत्र वसावे । वायूने नावभरी उगे नसावे । पावके दहावे । वर्षावे जळे ॥२८१॥
आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायुने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळावे, मेघाने वृष्टि करावी,
282-9
पर्वती बैसका न संडावी । समुद्री रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूते वाहावी । हे आज्ञा माझी ॥२८२॥
पर्वतांनी आपली जागा सोडु नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडु नये व पृथ्वीने सर्व भूतांचा भार वहावा, ही आज्ञा माझी आहे.
283-9
म्या बोलविल्या वेदु बोले । म्या चालविल्या सूर्यु चाले । म्या हालविल्या प्राणु हाले । जो जगाते चाळिता ॥२८३॥
मी बोलविल्याने वेद बोलतात मी चालविल्याने सुर्य चालतो, सर्व जगाचा मालक जो प्राण, तोही मी हालविल्याने हालतो;
284-9
मियाचि नियमिलासांता । काळु ग्रासितसे भूता । इये म्हणियागते पंडुसुता । सकळे जयाची ॥२८४॥
आणि मीच आज्ञा दिली असता भुतांना काळ ग्रासतो. अर्जुना, याप्रमाणे हाच सर्व ज्यांची आज्ञाधारक असून
285-9
ऐसा जो समर्थु । तो मी जगाचा नाथु । आणि गगनाऐसा साक्षिभूतु । तोहि मीचि ॥२८५॥
आपापली कामे करतात असा जो समर्थ, तो जगाचा नाथ मी; व आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणी असुन साक्षीभूत असणारा तोही मीच.
286-9
इही नामरुपी आघवा । जो भरला असे पांडवा । आणि नामरुपाहि वोल्हावा । आपणचि जो ॥२८६॥
हे पांडवा, याप्रमाणे या नामरूपांनी जो सर्वत्र भरलेला आहे, आणि जो आपणच नामरूपांचाही जिव्हाळा आहे,
287-9
जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळ आथी जळ । ऐसेनि वसवितसे सकळ । तो निवासु मी ॥२८७॥
ज्याप्रमाणे लाटा पाण्यातच उत्पन्न होतात आणि लाटांतही पाणी असते, त्याप्रमाणे जग माझ्यात व मी जगात आहे.
288-9
जो मज होय अनन्य शरण । त्याचे निवारी मी जन्म मरण । यालागी शरणागता शरण्य । मीचि एकु ॥२८८॥
जो मला एकनिष्ठपणे शरण येतो, त्याला जन्ममरणापासून मी मुक्त करतो. म्हणून शरणागताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे.
289-9
मीचि एक अनेकपणे । वेगळालेनि प्रकृतीगुणे । जीत जगाचेनि प्राणे । वर्तत असे ॥२८९॥
प्रकृतीच्या वेगळाल्या गुणांनी मी एक असून अनेकपणाने जगांतील प्राणिमात्रांत प्राणरूपाने असतो.
290-9
जैसा समुद्र थिल्लर न म्हणता । भलतेथ बिंबे सविता । तैसा ब्रह्मादि सर्वा भूता । सुहृद तो मी ॥२९०॥
ज्याप्रमाणे, हा समुद्र किंवा हा नाला असे न म्हणता सुर्य सर्व ठिकाणी प्रकाशित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मापासून चिलटापर्यंत प्राणिमात्राला आवडता म्हणून जो आहे तो मीच.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-8
मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासी वोलावा । सृष्टिक्षयप्रभावा । मूळ ते मी ॥291॥
हे पांडवा, या त्रिभुवनाचे जिवन, आणि उत्पत्ति, स्थिति, लय ह्या तिन्ही अवस्थांस जो मुळ तो मीच
292-9
बीज शाखाते प्रसवे । मग ते रुखपण बीजी सामावे । तैसे संकल्पे होय आघवे । पाठी संकल्पी मिळे ॥292॥
बीजापासुन वृक्ष व शाखा उत्पन्न होतात, पुढे ती झाडेच बीजांत समावेश पावतात; त्याप्रमाणे, आदिसंकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ति होऊंन पुनः ते जग आदिसंकल्पातच लय पावते.
293-9
ऐसे जगाचे बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारुपु । तया कल्पांती जेथ निक्षेपु । होय ते मी ॥293॥
असे अव्यक्त वासनारूप जगाचे बिज जो संकल्प, त्याला कल्पांती जेथे राहण्यास ठिकाण मिळते, ते मीच.
294-9
इये नामरुपे लोटती । वर्णव्यक्ती आटती । जातीचे भेद फिटती । जै आकाश नाही ॥294॥
जेंव्हा निराकार स्वरूप प्रकट होते, तेंव्हा ही सर्व नाना रूपे लय पावतात, वर्णव्यक्ति नाहीतशा होतात, व जातीचे भेदही राहत नाहीत;
295-9
तै संकल्पु वासनासंस्कार । माघौते रचावया आकार । जेथ राहोनि असती अमर । ते निधान मी ॥295॥
तेव्हा पुनः जग निर्माण करण्याकरिता संस्काररूप वासनाशक्ति धारण करून ज्या ठिकाणी देव राहातात, ते ठिकाणही मीच.
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन 9. 19॥
296-9
मी सूर्याचेनि वेषे । तपे तै हे शोषे । पाठी इंद्र होऊनि वर्षे । तै पुढती भरे ॥296॥
मी सुर्याच्या रुपाने ज्या वेळेस तापतो, त्या वेळेस हे जग कोरडे होते, आणि पुनः इंद्राच्या रूपाने पाऊस पाडतो,
297-9
अग्नि काष्ठे खाये । ते काष्ठचि अग्नि होये । तेवि मरते मारिते पाहे । स्वरुप माझे ॥297॥
तेव्हा पुनः समृद्धि होते. ज्याप्रमाणे अग्नीने काष्ठ भक्षण केल्यावर तेच काष्ठ पुनः अग्नी होते,
298-9
यालागी मृत्यूचा भागी जे जे । तेही पै रुप माझे । आणि न मरते तव सहजे । अविनाशु मी ॥298॥
त्याचप्रमाणेच मरणारे स्वरुप माझेच आहे. यावरुन, मृत्युच्या भागातील जी जी रूपे आहेत, ती ती माझीच आहे, आणि न मरणारीही रुपे सहज माझीच आहेत.
299-9
आता बहु बोलोनि सांगावे । ते एकिहेळा घे पा आघवे । तरी सतासतही जाणावे । मीचि पै गा ॥299॥
आता फार बोलून काय सांगावे ? सर्व तुला एकदाच सांगतो की, व्यक्त आणि अव्यक्त रुपे ही माझीच आहेत असे जाण
300-9
म्हणोनि अर्जुना मी नसे । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचे दैव कैसे । जे न देखती माते ॥300॥
म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे ? परंतु प्राणिमात्राचे दैव काय चमत्कारिक आहे, की ते मला पहात नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १०४ वा, १४, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२३७ ते १२४८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १२३७
तुज मज नाही भेद । केला सहज विनोद ॥१॥
तू माझा आकार । मी तो तूचि निर्धार ॥धृपद॥
मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगे सेवा ॥२॥
मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझे बळ ॥३॥
तू बोलसी माझ्या मुखे । मी तो तुजमाजी सुखे ॥४॥
तुका म्हणे देवा । विपरीत ठायी नावा ॥५॥
अर्थ
देवा तसे पाहिले तर तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही परंतु तुझ्याशी कल्पित भेद ठेवून मी भक्तीचा विनोद केला आहे. माझा आकार म्हणजे स्वरूप, तूच आहेस आणि मी ज्याला “मी” म्हणतो ते ही तूच आहेस. देवा मी आणि तू एकच आहेस तरीही तुझी सेवा माझ्याकडून तू करून घेत आहेस. मी तुझ्या स्वरूपाशी अचल आहे आणि माझ्या ठिकाणी जे बळ आहे ते तुझेच आहे. माझ्या मुखाने तूच बोलत आहे आणि मी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सुखाने स्थित आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आणि मी नाम रूपाने, नाम आणि रूपाने वेगळे आहोत पण स्वरूपात: तू आणि मी एकच आहोत.
अभंग क्र. १२३८
वैराग्याचे भाग्य । संतसंग हाचि लाग ॥१॥
संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥धृपद॥
तोचि देवभक्त । भेदाभेद नाही ज्यात ॥२॥
तुका प्रेमे नाचे गाये । गाणियात विरोन जाय ॥३॥
अर्थ
संतांच्या संगतीत लाभ होणे हेच खरे वैराग्याचे भाग्य आहे. संत म्हणजे कृपेचे दिप आहेत. ते साधकांना निष्पाप करतात. ज्यांच्या हृदयात भेदाभेद नाही तोच खरा देव भक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी प्रेमाने नसतो हरीचे गुण गातो आणि गाता गाता त्यातच विरूनही जातो.
अभंग क्र. १२३९
जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठल कीर्त्तनामाजी उभा ॥१॥
राहे माझ्या मना दृढ या वचनी । आणिक ते मनी न धरावे ॥धृपद॥
कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनिया ॥२॥
तुका म्हणे मुक्ती हरीदासांच्या घरी । वोळगती चारी ॠद्धीसिद्धि ॥३॥
अर्थ
विठ्ठलाची प्राप्ती करण्याकरिता कोणत्याही प्रकारची जप, तप, ध्यान, धारणा करण्याची गरज नाही. कारण विठ्ठलाची प्राप्ती हरिकीर्तनाने होते, हरी कीर्तनात तो नेहमी उभा असतो. माझ्या मनामध्ये असा दृढ विश्वास आहे की विठ्ठल कीर्तनात उभा राहतो. त्यामुळे विठ्ठलाच्या प्राप्तीकरता हरिकीर्तन शिवाय इतर कोणतेही साधन करू नये व मनातदेखील आणू नये. कीर्तनामध्ये समाधी, ध्यान, मुद्रा ही साधने आश्रय धरून असतात. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्तांच्या घरी चारही मुक्ती व रिद्धी सिद्धी चाकरी करत असतात.
अभंग क्र. १२४०
नाही तुज काही मागत संपत्ती । आठवण चित्ती असो द्यावी ॥१॥
सरलिया भोग येईन सेवटी । पायापे या भेटी अनुसंधाने ॥धृपद॥
आता मजसाठी याल आकारास । रोकडी हे आस नाही देवा ॥२॥
तुका म्हणे मुखी असो तुझे नाम । देईल तो श्रम देवो काळ ॥३॥
अर्थ
देवा मी तुला काही संपत्ती वगैरे मागत नाही केवळ माझ्या चित्तामध्ये तुझी आठवण राहू द्यावी हे एवढेच मला पाहिजे. देवा माझे भोग संपले की मग तुझ्या पायाच्या भेटीच्या अनुसंगाने तुझ्या स्वरूपाला मी प्राप्त होईल. देवा तुम्ही माझ्या भेटीसाठी सगुण साकार रूप धारण करावे मग माझी रोखीची भाषा माझ्या ठिकाणी राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या मुखा मध्ये सतत तुझे नाम असू द्यावा हीच माझी इच्छा आहे मग हा कळिकाळ मला काय त्रास देईल ते देऊ.
अभंग क्र. १२४१
हितावरी यावे । कोणी बोलिलो या भावे ॥१॥
नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥धृपद॥
केली अटाअटी । अक्षरांची देवासाठी ॥२॥
तुका म्हणे खिजो । नका जागा येथे निजो ॥३॥
अर्थ
काही मनुष्य स्वतःच्या स्वहिताचा विचार करून आमच्याकडे येतात मग आम्ही त्यांना उपदेश करतो. मी लोकांचे मनोरंजन करण्याकरिता विनोदाने काहीही बोलत नाही. मी जो काही अक्षरांचा म्हणजे पाठांतराचा खटाटोप केला आहे तो देवासाठी केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला जो काही उपदेश करत आहे तो तुम्ही ग्रहण करावा कठोर शब्दात काही बोलत असेल तर त्याचा राग मानून घेऊ नका आणि त्याकडे दुर्लक्षही करू नका.
अभंग क्र. १२४२
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण ॥१॥
नाही आम्हासी संबंधु । जरा मरण काही बाधु ॥धृपद॥
द्वैताद्वैतभावे । अवघे व्यापियेले देवे ॥२॥
तुका म्हणे हरी । आम्हामाजी क्रीडा करी ॥३॥
अर्थ
माझे सर्व प्रारब्ध, संचित, क्रियामाण नारायण स्वरूप झाले आहेत. आता आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. जरा, जन्म, मरण हेही आम्हाला बाधू शकत नाही. देवानेच द्वैत व अद्वैत हे व्यापून टाकले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा हरी आमच्यामध्ये नित्य सर्व काळ क्रीडा करतो म्हणजे व्यवहार करतो.
अभंग क्र. १२४३
नेणे करू सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥
धावे बुडतो मी काढी । सत्ता आपुलिया ओढीं ॥धृपद॥
क्रियाकर्महीन । जालो इंद्रिया अधीन ॥२॥
तुका विनंती करी । वेळोवेळा पाय धरी ॥३॥
अर्थ
हे कृपाळू पांडुरंगा तुझी सेवा कशी करावी हे हि मी जाणत नाही. त्यामुळे हे पांडुरंगा तू माझ्याकडे लवकर धाव घे आणि मी या भवसागरात बुडत आहे तू तुझ्या सत्तेने मला यातून ओढून काढ. देवा मी क्रिया कर्महीन झालो आहे कारण मी इंद्रियांच्या अधीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझे पाय धरून तुला वेळोवेळी विनंती करत आहे की तू माझा या भवसागरातून उद्धार कर.
अभंग क्र. १२४४
जयापासोनि सकळ । महीमंडळ जाले ॥१॥
तो एक पंढरीचा राणा । नये अनुमाना श्रुतीसी ॥धृपद॥
विवादती जयासाठी । जगजेटी तो विठ्ठल ॥२॥
तुका म्हणे तो आकळ । आहे सकळव्यापक ॥३॥
अर्थ
ज्याच्यापासून हे महीमंडळ, पृथ्वी मंडळ निर्माण झाले तोच हा पंढरीनाथ आहे की ज्याच्या स्वरूपाचे अनुमान श्रुती म्हणजे वेदाला देखील कळत नाही. सहाही शास्त्रे ज्याच्या स्वरूपाविषयी वाद-विवाद करतात, तो हा विठ्ठल आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा पंढरीनाथ कोणालाही न कळणारा आहे तो कोणालाही कळणार नाही परंतु तो सर्वत्र व्यापक आहे.
अभंग क्र. १२४५
नाही रूप नाही नांव । नाही ठाव धराया ॥१॥
जेथे जावे तेथे आहे । विठ्ठल मायबहीण ॥धृपद॥
नाही आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥
नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥३॥
तुका म्हणे भावाविण । त्याचे मन वोळेना ॥४॥
अर्थ
या विठ्ठलाला रूप नाही नावं नाही. आणि त्याला धरायला शरीरही नाही जेथे जावे तेथे विठ्ठलच माय बहिण आहे. विठ्ठलाला कसलाही आकार नाही विकार नाही हा विठ्ठल सर्व चराचरामध्ये व्यापलेला आहे. विठ्ठल निर्गुणही नाही सगुणही नाही. कोण त्याच्या मूळ स्वरूपाला जाणू शकेल ? तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध भक्तिभावा वाचुन याचे मन कोठेही वळेनासे झाले आहे.
अभंग क्र. १२४६
आहे सकळा वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥१॥
खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥धृपद॥
आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥२॥
जेव्हा असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हा ॥३॥
तुका म्हणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥४॥
अर्थ
हा देव सर्व उपाधी पासून वेगळा आहे तरीही तो या जगामध्ये कोणालाही न कळू देता क्रिडा करत आहे. कळसूत्री बाहुलीप्रमाणे हा ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याची दोरी हलवीत असतो. तो सर्व उपाधी पासून वेगळा आहे तरीही तो सर्वाना कसा नाचवीत होते पहा. जेव्हा प्रारब्ध संपते ते हा देव आयुष्याची दोरी असडतो आणि देहरूपी बाहुली गतप्राण होते. तुकाराम महाराज म्हणतात असा हा परमात्मा याला जाणून घेऊन त्याला आपला सखा करावा.
अभंग क्र. १२४७
आता पुढे मना । चाली जाली नारायणा ॥१॥
येथे राहिले राहिले । कैसे गुंतोनि उगले ॥धृपद॥
भोवते भोंवनी । आलियांची जाली धणी ॥२॥
तुका म्हणे रंगे । रंगी रंगलो श्रीपांडुरंगे ॥३॥
अर्थ
हे नारायणा आता माझ्या मनाने पंच विषयांकडे कडे धाव घेणे थांबविले आहे. कारण ते तुझ्या पायाच्या ठिकाणी कसे शांत गुंतून राहिले आहे ते पहा. हे मन सर्वत्र फिरून आले आणि आता ते तुझ्या पाया जवळ आले आणि तृप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी या श्रीपांडुरंगाच्या रंगात रंगलो आहे.
अभंग क्र. १२४८
आळस पाडी विषय कामी । शक्ती देई तुझ्या नामी ॥१॥
आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणी ॥धृपद॥
हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनी ॥२॥
तुका म्हणे पाय डोळा । पाहे एरवी अंधळा ॥३॥
अर्थ
देवा मला विषय सेवनाविषयी आळस पडो दे आणि तुझे नाम घेण्याविषयी मला शक्ती दे. देवा इतर कोणत्याही विषयी बोलण्याकरिता माझी वाणी मुकी राहू द्या पण तुझे गुणगान करण्याविषयी माझी वाणी गर्जु द्या. देवा हीच विनवणी मी तुम्हाला केली आहे आणि ही विनवणी तुम्ही मनात आणा. तुकाराम महाराज म्हणतात मला तुझे पाय माझ्या डोळ्यांनी पाहता येईल असे कर एरवी ते आंधळे झाले तरी चालेल.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















