भारुड १ :- अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना संपूर्ण भारुड संत एकनाथ
धनंजय महाराज मोरे
BHARUD 1 ARE KRUSHNA ARE KANHA MANRANJAN MOHAN 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।। आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ? ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे? गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।। हे संपूर्ण भारुड पहा
खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे. संत एकनाथांचे सर्व भारुड पहा व लिहून घ्या. Sant knathanche Sarv Bharud Paha V Lihun Ghya. See and Write Down All The Bharudas of Saint Eknath. Bharud 1 :– Abab.. Vinchu Chavala Vrushchik chavala Sampoorn Bharud Sant Ekanaath
Bhaarud 1 :- Are Krshna Are Kaanha Manaranjan Mohana Sampoorn Bhaarud Sant Ekanaath
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।। आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ? ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे? गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे? चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे? भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे? आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी? सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी? मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा? नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा? घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ? एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ? अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
अर्थ :-
खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।