शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 2: Sankhya Yoga:
Sartha Dnyaneshwari Adhyay 2 Sankhya Yoga:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
अध्याय दुसरा:- सांख्ययोग:
एकून श्लोक : 72 धृतराष्ट्राचे श्लोक : 1 संजयाचे, श्लोक
अर्जुनाचे श्लोक: भ. श्रीकृष्णाचे श्लोक
एकूण ओव्या : 375
॥ॐ सार्थ ज्ञानेश्वरी: भावार्थदीपिका ॐ॥
। अथ द्वितीयोऽध्यायः अध्याय दुसरा ।। साङ्ख्ययोगः ।
अध्याय दुसरा
संजय उवाच :
तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवा च मधुसूदनः ॥2.1॥
भावार्थ :-
संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, दुःखाने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असे बोलले. ॥1॥
1-2
मग संजयो म्हणे रायाते । आइके तो पार्थु तेथे । शोकाकुल रुदनाते । करितुसे ॥1॥
(अर्जुनाची शोक-अवस्था) मग संजय धृतराष्टरास म्हणाला, ऐका. महाराज तो अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला.
2-2
ते कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनले अद्भुत । तेणे द्रवले असे चित्त । कवणेपरी ॥2॥
तो आपल्या कुळातील सर्वाना पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर,
3-2
जैसे लवण जळे झळंबले । ना तरी अभ्र वाते हाले । तैसे सधीर परी विरमले । हृदय तयाचे ॥3॥
ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्याने मेघ हालतात, (नाहीसे होतात) त्याप्रमाणे अर्जुन धैर्यवान,(खंबीर) असून देखील त्याचे ह्रदय त्या वेळी करुणेने द्रवले.
4-2
म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमी रुपला । राजहंस ॥4॥
म्हणून व्याकुळ झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेला होता.
5-2
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहे अतिजर्जरु । देखोनि । शार्गङधरु । काय बोले ॥5॥
पंडूचा पुत्र अर्जुन अतिमोहाने असा ग्रस्त झालेला पाहून शारंगधार (भगवान श्रीकृष्णा) काय म्हणाले, ते ऐका..
श्रीभगवानुवाच :
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥2.2॥
भावार्थ :-
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ” हे अर्जुना ! श्रेष्ठ लोकांना अमान्य, स्वर्गप्राप्ती साठी विघ्न करणारा (आड येणारा), असलेली किर्ती नाहीशी (घालविणारा) हा मोह तुझ्या मनात या युधाच्या वेळी कोठून उद्भवला. (निर्माण झाला)
6-2
म्हणे अर्जुना आदि पाही । हे उचित काय इये ठायी । तू कवण हे कायी । करीत आहासी ॥6॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना !, ह्या ठिकाणी असे करणे योग्य आहे का ? तू कोण आहेस, आणि काय करीत आहेस, याचा आगोदर (प्रारंभी) विचार कर.
7-2
तुज सांगे काय जाहले । कवण उणे आले । करिता काय ठेले । खेदु कायिस ॥7॥
( हे पार्थ ! )सांग, तुला काय झाले आहे ? कोणता कमीपणा आला आहे (कमी पडले) ? तुझे काय करायचे राहिले ? एव्हडा खेद कशाकरिता ? ?
8-2
तू अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी । तुझेनि नामे अपयशी । दिशा लंघिजे ॥8॥
तु अनुचित गोष्टीकडे लक्ष देत नाहीस; कधीही आपले (धैर्य) धीर सोडत नाहीस; आणि केवळ (अर्जूना) तुझ्या नावाचा उच्चारानेच अपयश दाही दिशांच्या पलीकडे निघून जाते.
9-2
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजी रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिही लोकी ॥9॥
तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. आणि तूझ्या शौर्याचा डंका (दबदबा) तर तिन्ही लोकात (त्रैलोक्यात) गाजत आहे.
10-2
तुवा संग्रामी हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवा केला । गंधर्वासी ॥10॥
तू युद्धामध्ये श्रीशंकरांनाही जिंकले आहेस. निवातकवचांचा ठावठिकाणा नाहीसा केलास; गंधर्वांनी पोवाडे गायिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-2
हे पाहता तुझेनि पाडे । दिसे त्रैलोक्यही थोकडे । ऐसे पौरुष चोखडे । पार्था तुझे ॥11॥
हे अर्जुना ! तुझ्या पराक्रमाचा विचार केला असता, हे त्रैलोक्यही लहान वाटते. असा तुझा पराक्रम उत्कृष्ट आहे.
12-2
तो तू की आजि एथे । सांडुनिया वीरवृत्तीते । अधोमुख रुदनाते । करितु आहासी ॥12॥
(पण) तोच तू, आज या ठिकाणी (रणांगणात) आपली वीरवृत्ती टाकून, खाली मान घालून रडत बसला आहेस. !!
13-2
विचारी तू अर्जुनु । की कारुण्ये कीजसी दीनु । सांग पा अंधकारे । भानु ग्रासिला आथी ॥13॥
विचार कर, अर्जुना ! करुणेने तुला दीन करून सोडावे ! तूच सांग बरें, अंधकाराने सूर्याला कधी गिळले आहे काय ? ?
14-2
ना तरी पवनु मेघासी बिहे । की अमृतासी मरण आहे । पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकाते ॥14॥
वारा कधी मेघाला घाबरला आहे का ? ? अमृताला कधी मरण आहे का ? अरे विचार कर, लाकडाने कधी अग्नीला गिळून टाकले आहे का ?
15-2
की लवणेचि जळ विरे । संसर्गे काळकूट मरे । सांग महाफणी दर्दुरे । गिळिजे कायी ॥15॥
किंवा मिठाने पाणी कधी विरघळेल का ? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूठ वीष मरेल का ? तूच सांग !! बेडूक कधी महासर्पाला गिळील का ?
16-2
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी का जाहला । परी तो त्वा साच केला । आजि एथ ॥16॥
कोल्हा स्वतःहून सिंहा बरोबर झोंबी (लढाई, युद्ध) करील का ? ? अशा अशक्य गोष्टी कधी शक्य झाले आहेत का ? पण तू मात्र (अघटित गोष्ट) अश्यक्य गोष्ट शक्य करून दाखविलास.
17-2
म्हणोनि अझुनि अर्जुना । झणे चित्त देसी या हीना । वेगी धीर करूनिया मना । सावधान होई ॥17॥
म्हणून हे अर्जूना ! अजून तरी या अनुचित (हीन) गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, तू लवकर मनाला धीर दे आणि सावध हो.
18-2
सांडी हे मूर्खपण । उठी घे धनुष्यबाण । संग्रामी हे कवण । कारुण्य तुझे ॥18॥
आता हा वेडेपणा सोडून दे, उठ, धनुष्यबाण हाती घे, कारण या युद्धाच्या प्रसंगी (रणभूमीवर तुझ्या) करूणेचा काय उपयोग. ?
19-2
हा गा तू जाणता । तरी न विचारीसी का आता । सांगे झुंजावेळे सदयता । उचित कायी ॥19॥
हे अर्जूना !!, तू जाणता आहेस; तर आत्ता विचार करून का पाहत नाहीस ? युद्धप्रसंगी क्षत्रिया कारुण्य (दया करणे हा गुण) योग्य आहे का तूच सांग बरें ?
20-2
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनाते ॥20॥
भगवान श्रीकृष्ण(जगन्निवास) अर्जुनास म्हणाले, हे युद्धाच्या प्रसंगीचे (दयाळूपणा) कारुण्य तुझ्या आजपर्यंतच्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकाला मुकविणारे आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥2.3॥
भावार्थ ::-हे पार्था ! हा दुबळेपणा धरू नकोस; हे तुला शोभत नाही. असा मनाचा क्षुद्र ढिलेपणा (दुर्बलपणा) टाकून देऊन, हे अर्जुना, युद्धासाठी उठ. ॥3॥
21-2
म्हणौनि शोकु न करी । तू पुरता धीरु धरी । हे शोच्यता अव्हेरी । पंडुकुमरा ॥21॥
म्हणून हे अर्जुना ! तू शोक करू नकोस.पूर्ण धीर धर. खेदाचा त्याग कर. ॥21॥
22-2
तुज नव्हे हे उचित । येणे नासेल जोडले बहुत । तू अझुनी वरी हित । विचारी पा ॥22॥
तुला असा खेद करणे शोभा देत नाही.आज पर्यंत जी मोठी किर्ती तू संपादित केलीस, त्याचा यामुळे नाश होईल. म्हणून अजून तरी आपले हित कशात आहे याचा विचार कर. ॥22॥
23-2
येणे संग्रामाचेनि अवसरे । एथ कृपाळूपण नुपकरे । हे आताचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥23॥
या युद्धप्रसंगी (संग्रमाच्या) प्रसंगी तुझा हा कृपाळूपणा (दयाळूपणा) काहीच कामाचा (उपयोगाचा)नाही. हे (कौरावांना उद्देशून) आत्ताच तुझे सोयरे(नातलग) झाले काय ? ? ॥23॥
24-2
तू आधीचि काय नेणसी ? । की हे गोत्रज नोळखसी ? । वायाचि काय करिसी । अतिशो आता ? ॥24॥
(हे अर्जुना !), हे तुझे नातलग (आप्तजन,गोत्रज) आहेत, तू येथे येण्यापूर्वी जाणत नव्हतास काय ? या भाऊबंधीची (संबंधाची) तुला ओळख नव्हती का ? तर आताच या तुझ्या (दयाळू) करुणेचा अतिरेक का बरे करतोस ? ॥24॥
25-2
आजिचे हे झुंज । काय जन्मा नवल तुज ? । हे परस्परे तुम्हा व्याज । सदाचि आथी ॥25॥
आजचा हा युद्धप्रसंग तुला जन्मल्यापासून नवीनच आहे काय ? कारण यापूर्वी देखील तुम्हा दोघांमध्ये (कौरव आणि पांडव) युद्ध करण्याची निमित्ते अनेक वेळा निर्माण झाली आहेत. ॥25॥
26-2
तरी आता काय जाहले । कायि स्नेह उपनले । हे नेणिजे परी कुडे केले । अर्जुना तुवा ॥26॥
तर मग आताच (यांक्षणी) असे काय झाले, हा मोह कोठून उत्पन्न झाला, (हे मला काही कळत नाही) परंतू हे अर्जुना !! हे तू वाईट केलेस. ॥26॥
27-2
मोहो धरिलीया ऐसे होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेसी ॥27॥
जर या प्रसंगी (युद्ध) तू चित्तामध्ये मोह ठेवलास, तर तुझी असणारी (आजपर्यँतची)प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि इहलोकसह परलोकासही तू अंतरशील. (गमलवशील) ॥27॥
28-2
हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हे संग्रामी पतन जाण । क्षत्रियांसी ॥28॥
युद्धप्रसंगी हा तुझा मनाचा दुबळेपणा (ढिलेपणा)तुझ्यासाठी हिताचे नाही. कारण, युद्धाच्या वेळी दुबळेपणा ठेवल्याने क्षत्रियांचे अधःपतन होते, हे लक्षात ठेव. ॥28॥
29-2
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥29॥
अशाप्रकारे (परम कृपाळू) भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विविध प्रकारे समजावले.मग हे सर्व ऐकून अर्जुन पुढे म्हणाला. ॥29॥
अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥2.4॥
भावार्थ ::-अर्जुन म्हणाला, ” हे मधुसूदना, पितामह भीष्मावर आणि गुरू द्रोणाचर्य यांच्यावर कसा बरा बाण सोडू ? हे शत्रूनाशका, ते दोघेही पूजनीय आहेत. ॥4॥
30-2
देवा हे येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारी । आधी तूचि चित्ती विचारी । संग्रामु हा ॥30॥
देवा ! ऐका, तू मला एवढे समजावून सांगतोस; पण आधी तूच विचार कर. हे युद्ध आहे का ? ? ॥30॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-2
हे झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥31॥
हे युद्ध नव्हे; मोठा अपराध आहे. हे करण्यास आम्ही तयार झालो,तर हा दोष आहे. एव्हडेच नाही; तर आम्ही उघड उघड आराध्यदेवतांचा उच्छेद करीत आहोत. ॥31॥
32-2
देखे मातापितरे अर्चिजती । सर्वस्वे तोष पावविजती । तिये पाठी केवी वधिजती । आपुला हाती ॥32॥
पाहा, माता-पितांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करावे आणि पुढे आपल्या हाताने त्यांचा वध कसा बरे करावा ? ? ॥32॥
33-2
देवा संतवृंदु नमस्कारिजे । का घडे तरी पूजिजे । हे वाचूनि केवी निंदिजे । स्वये वाचा ॥33॥
देवा ! साधूसंतांना नमस्कार करावे, शक्य असेल (घडलें) तर त्यांची पुजा करावी. पण हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा कशी कराव ? ? ॥33॥
34-2
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हा नियमांचे । मज बहुत भीष्मद्रोणांचे । वर्ततसे ॥34॥
भीष्मादिक आमचे गोत्रज आणि द्रोणादी आमचे गुरू आहेत. ते आम्हला सदैव पुजनीय आहेत. पितामह भीष्म व गुरू द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे ! ॥34॥
35-2
जयालागी मने विरु । आम्ही स्वप्नीही न शको धरू । तया प्रत्यक्ष केवी । घातु देवा ॥35॥
हे देवा !! ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात ही वैर धरू शकत नाही, तर मग त्यांचा आम्ही प्रत्येक्ष घात कसा बरे करावा ? ? ॥35॥
36-2
वर जळो हे जियाले । एथ आघवेयांसी हेचि काय जाहले । जे यांचा वधी अभ्यासिले । मिरविजे आम्ही ॥36॥
आज सर्वाना काय झाले ? ज्यांच्या कडून आम्ही ज्या शस्त्रविद्देचा अभ्यास केला, त्याच विद्धेचा उपयोग त्यांचे वध करण्यासाठी करावा, आणि प्रतिष्ठा प्राप्त करावी. यांपेक्षा आग लागो या जगण्याला !! ॥36॥
37-2
मी पार्थु द्रोणाचा केला । येणे धनुर्वेदु मज दिधला । तेणे उपकारे काय आभारैला । वधी तयाते ॥37॥
मी अर्जुन, पण गुरू द्रोणाचार्यांनी मला (धनूर्विद्धेत निपूण) बनविले. या त्यांच्या उपकाराने मी (दडपलेला) भारभूत झालो आहे, तर त्यांचा वध मी करावा काय ? ॥37॥
38-2
जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेचि मने व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥38॥
अर्जुन म्हणाला ! ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला, त्यांच्या विषयीच मनात पाप आणावे, असा प्रकारचा मी काय भस्मासूर आहे का ? ? ॥38॥
39-2
गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके ।
हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥2.5॥
भावार्थ :-
महान परपूज्य गुरूंना न मारता यालोकी भिक्षा मागून जीवन जगणे (उदरनिर्वाह करणे) हे कल्याणकारी आहे.कारण गुरूजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगांनाच भोगावे लागणार.
39-2
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनी नेणिजे । द्रोणाचिये ॥39॥
देवा, समुद्र गंभीर आहे असे (ऐकतो) म्हणतो. पण त्याचे गांभीर्य वरवरचे आहे.कारण अनेक वेळा तो क्षुब्ध(रागावतो) होतो. परंतु गुरू द्रोणाचार्यांच्या मनात राग निर्माण झालेले कधी माहित नाही. ॥39॥
40-2
हे अपार जे गगन । वर तयाही होईल मान । परि अगाध भले गहन । हृदय यांचे ॥40॥
हे आकाश अमर्याद आहे खरे, पण एखाद्या वेळी त्याचे मोजमापही येईल. परंतू द्रोणाचार्यांचे हृदय ज्ञानाने गहन (अंतःकरण इतके विचारपूर्ण)आणि सखोल आहे. त्यामुळे त्याचे मोजमाप करता येणार नाही. ॥40॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-2
वरी अमृतही विटे । की काळवशे वज्र फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥41॥
एकवेळ अमृत आंबेल (विटेल) किंवा वज्र ही फुटेल; पण द्रोणाचार्यांचे मनात क्रोधादि विकार उत्पन्न (निर्माण) करण्याचा कसालाही प्रयत्न केला तरी तरी त्यांचे हे (विशाल हृदय) मन धर्म (अविकारी होणार) सोडणार नाही.
42-2
स्नेहालागी माये । म्हणिपे ते कीरु होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणी इये ॥42॥
स्नेह,(ममता,प्रेम)हे आईनेच करावे असे म्हणतात, हे खरे आहे. पण गुरू द्रोणाचार्याच्या ठिकाणी (गुरू द्रोण हे) मूर्तिमंत ममता (प्रेम) आहे.
43-2
हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥43॥
अर्जून म्हणाला ! गुरू द्रोणाचार्य हे जणू दयेचे(कारुण्याचे) उगमस्थान आहेत. सर्व सद्गूणांचे भांडार आहेत आणि विद्देचे अमर्याद सागर आहेत.
44-2
हा येणे माने महंतु । वरी आम्हालागी कृपावंतु । आता सांग पा येथ घातु । चिंतू येईल ॥44॥
अशा प्रकारे ते (गुरू द्रोण) सर्व गुणांनी श्रेष्ठ असून, त्यांची आमच्या वर कृपा आहे !! तर मग देवा ! तूच सांग, त्यांचा घात करण्याचे विचार देखील माझ्या मनात आणता येईल का ?
45-2
ऐसे हे रणी वधावे । मग आपण राज्यसुख भोगावे । ते मना न ये आघवे । जीवितेसी ॥45॥
अशांना (द्रोणाचार्या सारख्या) रणांगणात मारून आपण राज्यसुख भोगावे. ही गोष्ट माझ्या मनात देखील येवू शकत नाही.
46-2
हे येणे माने दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागता भली ॥46॥
इतके हे कार्यकठीण आहे, आणि यापेक्षा राज्यभोग श्रेष्ट असेल, तर ते असू दे, मला तर त्या भोग सुखा पेक्षा भीक मागून जगणे बरे वाटते.
47-2
ना तरी देशत्यागे जाइजे । का गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आता न धरिजे । इयांवरी ॥47॥
अथवा, देशत्याग करावा, डोंगर दर्यात जाऊन रहावे. पण यांचे (द्रोणाचार्य आणि इतर) घात (वध) करण्यासाठी शस्त्रे हाती धरू नये.
48-2
देवा नवनिशती शरी । वावरोनि यांचा जिव्हारी । भोग गिवसावे रुधिरी । बुडाले जे ॥48॥
देवा ! नविन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून, यांच्या रक्तात बुडालेले ते भोग आम्ही भोगवेत, हे योग्य नाही.
49-2
ते काढूनि काय कीजती । लिप्त केवी सेविजती । मज न ये हे उपपत्ति । याचिलागी ॥49॥
ते प्राप्त करून तरी काय उपयोग आहे ? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे उपभोग तरी कसा घ्यायचा ? याकरिता युद्ध करण्याचा तुमचा युक्तिवाद पसंद नाही.
50-2
ऐसे अर्जुन तिये अवससरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारी । परि ते मना न येचि मुरारी । आइकोनिया ॥50॥
(याप्रकारे बोलून झाल्या नंतर)
” हे कृष्ण ऎक ” असे अर्जुन म्हणाला, परन्तु एव्हडे सगळे सांगून सुद्धा आपले बोलणे श्रीकृष्णास पटत नाही, हे त्याने (अर्जुनाने) जाणले
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-2
हे जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलो लागला । म्हणे देवो का चित्त या बोला । देतीचिना ॥51॥
(आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत), हे लक्षात आल्यावर अर्जुन मनात गोंधळला (,घाबरला). मग पुनः बोलू लागला. तो म्हणाला, देवा ! माझ्या या बोलण्याकडे आपण का लक्ष देत नाही ? ?
न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥2.6॥
भावार्थ :-
आम्हाला या युद्धात जय मिळेल, अथवा ते आम्हाला जिंकतील ? या दोन्हीमध्ये कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे, हे आम्हाला समजत नाही.ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही, तेच कौरव युद्धाला सज्ज होऊन आमच्या समोर उभे आहेत. ॥6॥
52-2
येर्हवी माझ्या चित्ती जे होते । ते मी विचारूनि बोलिलो एथे । परि निके काय यापरौते । ते तुम्ही जाणा ॥52॥
अजून जे जे काही विचार माझ्या मनात होते ते मी आपणा समोर स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा काय चांगले आहे, ते तुम्हासच ठाऊक !!
53-2
पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजे । उभे आहाती ॥53॥
ज्यांच्याशी (आप्तजांना उद्देशुन) वैर करण्याची गोष्ट ऐकूनच (ऐकल्याबरोबर) आम्ही प्राण त्याग करावा, तेच या रणांगणावर युद्ध करण्यासाठी आमच्यासमोर उभे आहेत.
54-2
आता ऐसेयाते वधावे । की अव्हेरुनिया निघावे । या दोहोमाजी काइ करावे । ते नेणो आम्ही ॥54॥
(समोर उभे असलेल्या) अशांचा वध करावा, कि युद्ध सोडून निघून जावे ?;या दोहोमध्ये चांगली गोष्ट कोणती, ते आम्हाला मुळीच समजत नही.
कार्पण्यदोषोपहत्स्वभावः
पृच्छामि त्वा धर्मसंमूढचेताः ।
यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वा प्रपन्नम् ॥2.7॥
भावार्थ :-
कारुण्याने व्याप्त दोषाने माझे हे मन धर्म-अधर्म काही जाणेना, चित्त मोहित झालेला मी आपणास विचारीत आहे की,जे निःसंशय श्रेयस्कर असेल ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे. तुला शरण आलेल्या मला आपण उपदेश करा. ॥7॥
55-2
आम्हा काय उचित । ते पाहता न स्फुरे एथ । जे मोहे येणे चित्त । व्याकुळ माझे ॥55॥
आम्हाला काय उचित आहे आणि काय करणे अनुचित आहे, हे विचार करून पाहिले तरी स्फुरत (सुचत,समजत) नाही. कारण या मोहाने माझे चित्त व्याकूळ झाले आहे.
56-2
तिमिराविरुद्ध जैसे । दृष्टीचे तेज भ्रंशे । मग पासीच असता न दिसे । वस्तुजात ॥56॥
जसे अंधाराने डोळ्याचे तेज संपले. (दिसेनासे झाले)की दृष्टीचे तेज लोप पावते, आणिे मग जवळची वस्तूही दिसत नाही.
57-2
देवा मज तैसे जाहले । जे मन भ्रांती ग्रासिले । आता काय हित आपुले । तेही नेणे ॥57॥
हे देवा !, तशी माझी अवस्था झाली आहे.माझे मन भ्रांतीने (मोहाने) ग्रासले आहे, त्यामुळे माझे हित कशात आहे ते ही समजेनासे झाले आहे.
58-2
तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे । निके ते आम्हा सांगावे । जे सखा सर्वस्व आघवे । आम्हासी तू ॥58॥
म्हणून हे श्रीकृष्णा ! आमचे कल्याण कशात आहे, हे आपण विचार करून पहावे, आणि योग्य मार्ग सुचवावा. कारण आमचा सखा, मित्र आमचे सर्वकाही तूच आहेस.
59-2
तू गुरु बंधु पिता । तू आमची इष्ट देवता । तूचि सदा रक्षिता । आपदी आमुते ॥59॥
तूच आमचा गुरू, बंधू, पिता आहेस. तूच आमची (कुलदैवत) इष्टदेवता आहेस.आणि नेहमीच संकट समयी आमचे रक्षण करणारा ही तूच आहेस.
60-2
जैसा शिष्याते गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु । की सरितांते सागरु । त्यजी केवी ॥60॥
ज्याप्रमाणे गुरू शिष्याला कधिही अव्हेर (दूर) करत नाही, किंवा समुद्र कधी नद्यांचा (त्याग) अव्हेर करत नाही, त्याप्रमाणे तुही आम्हाला अव्हेरु शकत नाहीस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-2
नातरी अपत्याते माये । सांडुनि जरी जाये । तरी ते कैसेनि जिये । ऐके कृष्णा ॥61॥
देवा ऐका ! जर आई आपल्या लहान बाळाला सोडून निघून गेली, तर ते लहान बाळ (आई विना) कसे जगू शकेल. ?
62-2
तैसा सर्वापरी आम्हासी । देवा तूचि एक आहासी । आणि बोलिले जरी न मानिसी । मागील माझे ॥62॥
त्याप्रमाणे देवा, सर्व दृष्टींनी विचार केला, तर तूच आम्हला एक आधार आहेस, आत्ता पर्यंतचे माझे बोलणे जर तुम्हाला पटत नसेल,
63-2
तरी उचित काय आम्हा । जे व्यभिचरेना धर्मा । ते झडकरी पुरुषोत्तमा । सांगे आता ॥63॥
तर हे पुरूषोत्तमा ! जी गोष्ट आम्हाला करण्यासाठी उचित आहे, व ती धर्मविरूद्ध पण नाही तर ती (गोष्ट) ताबडतोब सांगा पाहू.
भग्वद्गीता अध्याय 2 रा श्लोक 8 वा
न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥2.8॥
भावार्थ :-
भूलोकवरील निष्कटंक (काटे नसलेला) व समृद्ध असे राज्य आणि देवाचे आधिपत्य (इंद्रलोक) ही मिळाले. तरीहि माझ्या इंद्रियांचे शोषण करून टाकणारा माझा शोक दूर होईल,असे मला दिसत नाही.
64-2
हे सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनी । तो तुझिया वाक्यावाचुनि । न जाय आणिके ॥64॥
हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो मात्र आपल्या उपदेशाशिवाय दूर होणार नाही.
65-2
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हे महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल । मानसीचा ॥65॥
या वेळी पृथ्वीचे संपूर्ण राज्य जरी मला मिळाले किंबहुना, इंद्रपद जरी मिळाले तरी, माझ्या मनात जो मोह उत्पन्न झाला आहे, तो दूर होणार नाही.
66-2
जैसी बीजे सर्वथा आहाळली । तरी सुक्षेत्री जर्ही पेरिली । तरी न विरुढती सिंचली । आवडे तैसी ॥66॥
जसे पूर्ण भाजलेले (करपलेले) बी चांगल्या सुपिक जमिनीत जरी पेरले आणि त्यास योग्य प्रमाणात पाणी घातले, तरी ते उगवत नाही.
67-2
ना तरी आयुष्य पुरले आहे । तरी औषधे काही नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥67॥
जिथे सर्व आयुष्यच सरलेले(मृत्यू पूर्वीची शेवटची वेळ) असेल, त्यावेळी कोणत्याही औषधाचा काहीच उपयोग होत नाही, तेथे फक्त परमामृतच (भगवंताची प्रार्थना,श्रद्धा करणे) उपयोगी पडेल,.
68-2
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझे ॥68॥
अगदी तसेच, माझ्या मोहित झालेल्या या बुध्दीला(स्वतःला उद्देशून)सर्व राज्यभोग, समृद्धी याचा मूळीच उपयोग होणार नाही. हे कृपानिधे ! (कृपा करणारा), तुझ्या कृपेचा जिव्हाळाच मला उपयोगी पडेल.
69-2
ऐसे अर्जुन तेथ बोलिला । जव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणे ॥69॥
जेंव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती (माया) दूर झाली, तेव्हा अर्जुन असे बोलला; परंतु पून्हा त्याला मायेच्या लहरींने व्यापले.
70-2
की मज पाहता उर्मी नोहे । हे अनारिसे गमत आहे । तो ग्रासिला महामोहे । काळसर्पे ॥70॥
(अर्जूनाची रणांगणावर झालेली स्तिथीवर श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात की), ही मोहाची लहर नसून महामोहरूपी (अविद्या रूपी मोहानेच) काळसर्पानेच अर्जूनास ग्रासलेले (दंश केलेला) असावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-2
सवर्म हृदयकल्हारी । तेथ कारुण्यवेळेचा भरी । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥
अतिशय कोमल मर्माचे स्थान जे हृदयरुपी कमळाचे ठिकाणी आणि करुण्यरूपी संध्याकाळी (ऐन दुपारी) (म्हणजे ह्रदयात कारूण्य भाव उत्पन्न झाला) अशी संधी साधून त्या महामोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केला.त्यामूळे (भ्रमरूपी, मोहरुपी, किंवा निर्माण झालेले अज्ञान) या लहरी उतरत नव्हते.
72-2
हे जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवे विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला की ॥72॥
अशा (सर्पदंश झाल्यामुळे) त्या विषाची तिव्रता जाणून, ज्याच्या कृपादृष्टीने या (मोहरूपी सर्पाच्या) विषाची तिव्रता नष्ट (दूर) करतो,तो श्रीहरि रूपी गारूडी अर्जूनाच्या हाकेसरसा त्याच्या रक्षणासाठी धावून आला.
73-2
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशे अवलीळा । रक्षील आता ॥73॥
तशा त्या शोकाने, मोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ भगवान श्रीकृष्ण (गारुडी श्रीहरि)शोभत होता. आपल्या कृपादृष्टीने (आपला प्रिय मित्राचे) सहजच रक्षण करील.
74-2
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्या म्हणितला हा हेतु । जाणोनिया ॥74॥
(कृष्ण भगवान अर्जुनाचे रक्षण करणारच) हे कारण जाणूनच अर्जुनाला मोहरुपी सर्पाने दंश केला. असे मी येथे कथन केले.
75-2
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपडळी भानु । आच्छादिजे ॥75॥
जसे सूर्य ढगांनी आच्छादिला जातो; त्याप्रमाणेच त्या प्रसंगी अर्जून मोहाने (गोंधळून जाणे,अज्ञान)आच्छादिला गेला होता असे समजा..
76-2
(दुसरे उदाहरणं देऊन माऊली सांगत आहेत)
तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरु । वणवला का ॥76॥
किंवा कडक उन्हाळ्यात (तीव्र उन्हामुळे जंगलात लागलेली आग) मोठा पर्वत वणव्याने व्यापला जावा. तसा तो धूनर्धारी अर्जून दुःखाने अगदी जर्जर (पिडीत) झाला होता.
77-2
म्हणोनि सहजे सुनिळु । कृपामृते सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥77॥
म्हणून जो सहजच नीलवर्ण आहे आणि स्वभावाने कृपामृताने भरलेला असा श्रीगोपाळ रुपी (महामेघ कृपेचा वर्षाव करण्यासाठी) अर्जूनाकडे वळला.
78-2
तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥78॥
त्याठिकाणी (श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी) शुभ्र दातांची कांती हिच जणू काही चमकणारी वीज होती.आणि त्याचे गंभीर बोलणे हाच मेघ गर्जनेचा (गडगडाटाचा) थाट होता.
79-2
आता तो उदार कैसा वर्षेल । तेणे अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ॥79॥
आता तो श्रीकृष्णरूपी कृपाळु (उदार)मेघ कसा वर्षाव (शब्दांचा) वर्षाव करेल आणि दुःखाने पेटलेला अर्जून रूपी (मोठा) पर्वत कसा शांत होईल,आणि ब्रम्हज्ञानाचा नवीन अंकूर त्याच्या ठिकाणी कसा फूटेल,
80-2
ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥80॥
ती कथा समाधान वृत्तीने, (शांत चित्ताने, मन हळुवार असायला हवं) श्रवण करा. आणि पुढे काय घडते ते पाहा, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्रीज्ञानदेव म्हणाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
। अध्याय पहिला ।
श्रीज्ञानदेव म्हणतात,
57-1
तियापरी श्रोता । अनुभवावी हे कथा । अति हळूवारपण चित्ता । अणुनिया ॥57॥
त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे भगवदगीतेचा अनुभव घ्यावा. ॥57॥
श्रीज्ञानदेव श्रोत्यांना उद्देशून इथं म्हणतात गीता त्यांनी कशी ऐकावी हे ते सांगत आहेत. ते श्रोत्यांना विश्वासात घेतात त्यांच्या रासिकतेला आवाहन करतात, ते म्हणतात, ” हा मोठा आल्हाद देणारा विषय आहे, तो ऐकण्यात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, सौंदर्याचं आगळंवेगळं दर्शन तुम्हाला घडणार आहे. सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मन हळुवार असायला हवं, कस हळुवार हवं ? तर ज्ञानदेव खूप सुंदर उत्तर देतात, ते म्हणतात, शरद ऋतूतील रात्र आहे. स्वच्छ अशा आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशमान झाला आहे. त्या चंद्राचे शीतल किरण पृथ्वीवर बरसत आहेत. सगळीकडं टिपूर चांदण पडलेल आहे. चकोर पक्षी चांदण पिऊन जगतो म्हणतात. चकोरची छोटीछोटी पिलं चंद्ररकिरणांचे जणू अमृताचे असावेत असे कोवळे कण जमिनीवरून अलगदपणे टिपून घेतात. तसं आपलं मन श्रोत्यांनी अगदी हळुवार करावं आणि या गीतासंवादरूप कथेत भगवान श्रीकृष्णा जे काही सांगत आहेत त्याचा अनुभव घ्यावा…
संजय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप ।
न योत्स्य इति गोविंमुक्त्वा तूष्णी बभूव ह ॥2.9॥
भावार्थ :-
संजय म्हणाला, ” हे राजा धृतराष्टरा, अर्जुन अंतर्यामी श्रीकृष्णाला असे बोलून पुनः त्या श्रीगोविंदला ‘मी युद्ध करणार नाही’ असे स्पष्ट सांगून स्तब्ध राहिला.
81-2
ऐसे संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥81॥
याप्रमाणे संजयाने धृतराष्टरास सांगितले. तो म्हणाला, हे राजा, तो अर्जुन पुनः शोकाकुल होऊन काय म्हणाला. ते ऐका !!
82-2
आइके सखेदु बोले श्रीकृष्णाते । आता नाळवावे तुम्ही माते । मी सर्वथा न झुंजे एथे । भरवसेनी ॥82॥
तो खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णास म्हणाला, आत्ता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका, काहीही झाले तरी यावेळी मी युद्ध करणार नाही, हे निश्चित !!
83-2
ऐसे येकि हेळा बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयाते ॥83॥
याप्रमाणे एकदम बोलला, पुढे काही न बोलता तो स्तब्ध (मौन) राहिला. ही त्याची अवस्था पाहून श्रीकृष्णास आश्चर्य वाटले.
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरूभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥2.10॥
भावार्थ :-
हे भरतवंशी धृतराष्टरा ! दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करत बसलेल्या (अर्जुनास) त्याला श्रीकृष्ण प्रसन्न मुखाने असे म्हणाले की..
84-2
मग आपुला चित्ती म्हणे । एथ हे कायी आदरिले येणे । अर्जुन सर्वथा काही नेणे । काय कीजे ॥84॥
भगवान मनात म्हणाले, अर्जुनाने याप्रसंगी हे भलतेच काय सुरु केले आहे ? याला मुळीच काही कळत नाही. काय करावे ? ?
85-2
हा उमजे आता कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी । जैसा ग्रहाते पंचाक्षरी । अनुमानी का ॥85॥
आता याला कोणत्या उपायाने (काय केल्याने) समजेल ? कशाने धीर धरील ? जसा एखादा मांत्रिक (भूतबाधा घालविताना) विचार करतो;
86-2
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥86॥
किंवा असाध्य रोग झाले असता, वैद्य ज्याप्रमाणे शेवटचा उपाय म्हणून अमृतासमान दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो,
87-2
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥87॥
त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने आपले शोक टाकील ?(भ्रम कसा सोडून देईल) याचा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, भगवान श्रीकृष्ण विचार करत होते.
88-2
ते कारण मनी धरिले । मग सरोष बोलो आदरिले । जैसे मातेच्या कोपी थोकुले । स्नेह आथी ॥88॥
तो मोह, भ्रम कसा नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि अर्जुनास रागाने बोलण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे आई रागाने बोलली तरी तिच्या मनात प्रेम असते.
याआधी अर्जुनास समजावण्याचा प्रयत्न श्रीकृष्णांनी अनेक प्रकारे केला पण गोड शब्दांनी अर्जुन ऐकत नाही, हे भगवंताच्या ध्यानी आले म्हणून रागावण्याचं नाटक त्यांना करावं लागलं. (किंवा अर्जुनाच्या मनातील अविचार घालवण्यासाठी भगवंतांनी केलेली युक्ती समजावी)
89-2
की औषधाचिया कडुवटपणी । जैसी अमृताची पुरवणी । ते आहाच न दिसे परी गुणी । प्रकट होय ॥89॥
किंवा औषधाची चव कडू असली तरी त्यामध्ये अमृताचा साठा असतो; हे वरून पहिले तर दिसत नाही, पण (त्याचे सेवन केल्यानंतर) गुणांच्या रुपाने ते नंतर स्पष्ट होते,
90-2
तैसी वरिवरी पाहता उदासे । आत तरी अतिसुरसे । तिये वाक्ये हृषीकेशे । बोलो आदरिली ॥90॥
त्याप्रमाणे श्रीकृष्णाची वाणी वरकरणी कठोर, पण आत हितकर (हिताचा उपदेश देणारे शब्द) असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥2.11॥
भावार्थ :-
श्रीभगवान म्हणाले, ” शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक करत आहेस. आणि पांडित्याच्या गोष्टी बोलत आहेस.पण(विद्वान) विवेकी लोक (मृत्यू)मेलेल्या बद्दल किंवा न मेलेल्या बद्दल (जिवंत) शोक करत नाहीत.
91-2
मग अर्जुनाते म्हणितले । आम्ही आजि हे नवल देखिले । जे तुवा एथ आदरिले । माझारीचि ॥91॥
श्रीकृष्ण म्हणाले, ” तू युद्ध करण्याचे सोडून हे जे तू मधेच आरंभिले (सुरु केले) आहेस, हे आश्चर्य आम्ही पाहत आहोत.
92-2
तू जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेते न संडिसी । आणि शिकवू म्हणो तरी बोलसी । बहुसाल नीति ॥92॥
तू स्वतःला ज्ञानी (विद्वान) तर म्हणवितोस, पण अज्ञानाच्या (मूर्खपणा) गोष्टी मात्र सोडत नाहीस. बरे तुला काही शिकवायचे म्हंटले की, मोठमोठ्या (पांडित्याच्या) गोष्टी सांगतोस.!!
93-2
जात्यंधा लागे पिसे । मग ते सैरा धावे जैसे । तुझे शहाणपण तैसे । दिसतसे ॥93॥
जन्मांधाला वेड लागले म्हणजे, ते जसे सैरावैरा धावते, तसे तुझे हे शहाणपण (बोलणे) दिसते आहे.
94-2
तू आपणपे तरी नेणसी । परी या कौरवाते शोचू पहासी । हा बहु विस्मय आम्हासी । पुढतपुढती ॥94॥
तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवाबद्दल शोक करतोस, याचा मला वारंवार(विस्मय)आश्चर्य वाटत आहे.
95-2
तरी सांग पा अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? । हे अनादि विश्वरचना । ते लटके कायी ? ॥95॥
हे अर्जुना ! मला सांग, तुझ्यामूळे या त्रिभूवनाचे अस्तित्व आहे काय. ?या विश्वाची रचना अनादि आहे, ते खोटे आहे काय. ?
96-2
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूते होती । तरी हे वायाचि काय बोलती । जगामाजी ? ॥96॥
या विश्वाला चालविणारा सर्वज्ञानी, सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून पंचमहाभूते, प्राणी उत्पन्न होतात, असे जे हे साधू संत (बोलतात) सांगतात, ते खोटे आहे काय. ?
97-2
हो का सांप्रत ऐसे जाहले । जे हे जन्ममृत्यु तुवा सृजिले । आणि नाशु पावे नाशिले । तुझेनि कायी ॥97॥
आज यामध्ये काही बदल झाला आहे काय. ? या विश्वातील जन्म-मृत्यू चे चक्र तू निर्माण केले आहेस काय ? आणि तू मारले, तरच त्यांचा नाश होणार आहे काय. ?
98-2
तू भ्रमलेपणे अहंकृती । यासि घातु न धरिसी चित्ती । तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥98॥
तू (अज्ञानाने) अहंकारामुळे झालेल्या भ्रमाणे तू कौरवांचा नाश करण्याचा मनात आणले नाहीस, तर मला सांग, ते चिरंजीव होतील का. ?
99-2
की तू एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणे चित्ता । येवो देसी ॥99॥
किंवा तू एक मारणारा आणि बाकी सगळे लोक मरणारे, असा भ्रम कदाचित तुझ्या चित्ताला होईल, त ते होऊ देऊ नकोस.
100-2
अनादिसिद्ध हे आघवे । होत जात स्वभावे । तरी तुवा का शोचावे । सांगे मज ॥100॥
हे सगळे आपोआप होते व जातें. असा हा क्रम अनादि कालापासून असाच अव्यहात चालू आहे, तर मग तू शोक का कारावास ? मला सांग.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-2
परी मूर्खपणे नेणसी । न चिंतावे ते चिंतीसी । आणि तूचि नीति सांगसी । आम्हाप्रति ॥101॥
या अज्ञानामुळे (मोहाने, मूर्खपणामुळे) तुला या गोष्टी समजत नाहीत. ज्याची चिंता करू नये, त्या गोष्टींची चिंता करत आहेस, मनात आणू नये ते तू आणतो आहेस; आणि उलट तूच आम्हाला नीतीच्या गोष्टी सांगत आहेस !!
102-2
(आश्चर्यकारक)
देखै विवेकी जे होती । ते दोहीतेही न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनिया ॥102॥
(हे पार्थ !) हे पहा, जन्म आणि मृत्यू हा केवळ भ्रम आहे, जे (ज्ञानी विद्वान,विवेकी) विचारवंत आहेत ते या दोनोंचाहि शोक करत नाहीत.
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥2.12॥
भावार्थ :-
एक लक्षात घे, मी, तू आणि हे सर्व राजे पूर्वी (भूतकाळात) नव्हतो असे नाही. भविष्यकाळात (आपल्या या देहाच्या मृत्यू नंतर) आपण सर्वजण असणार नाही, असेंहि नाही.
103-2
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥103॥
अर्जुना !! आणखी ऐक सांगतो, ते तू ऐक, पाहा येथे जमलेले आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे सगळेच, (आपण जे आहोत)
104-2
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाही ॥104॥
(आता आपण जसे आहोत तसेच) ते सर्वकाळ (निरंतर) असेच राहू किंवा लय (नाश होईल) पावू, याची (चिंता)भ्रांती सोड, कारण (मुळामध्ये,वास्तविक पाहता)या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत.
105-2
हे उपजे आणि नाशे । ते मायावशे दिसे । एर्हवी तत्त्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि ॥105॥
(मायेमुळे, भ्रांतीला वश झाल्यामुळे) जन्म आणि मृत्यू हे अनुभवास येतात, एरव्ही खरोखर (म्हणजेच वास्तवात) आत्मवस्तु (आत्मा) जी आहे, ती अविनाशी आहे.
106-2
जैसे पवने तोय हालविले । आणि तरंगाकार जाहले । तरी कवण के जन्मले । म्हणो ये तेथ ? ॥106॥
जसे वाऱ्यामुळे पाणी हलविले (जर वाऱ्यामुळे निर्माण झालेले तरंग) त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले; तर मग या ठिकाणी कोणाला व कुठें जन्म आला, असे म्हणता येईल. ? ?
107-2
तेचि वायूचे स्फुरण ठेले । आणि उदक सहज सपाट जाहले । तरी आता काय निमाले । विचारी पा ॥107॥
पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप (शांत) सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला ? ? याचा तूच विचार कर.
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥2.13॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे जीवाला बाल्य, तरुण, आणि वार्धक्य या अवस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते, (असे असल्यामुळे जो आत्मा हा अविनाशी आहे हे जाणतो) त्यामुळे धैर्यवान (विद्वान)पुरुषाला(मोहित होत नाही) जन्ममरणाची भ्रांती उत्पन्न होत नाही.
108-2
आइके शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ॥108॥
आणखी असे पाहा कीं, शरीर तर एकच आहे, परन्तु वयोमानाप्रमाणे त्यास अनेक अवस्था प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा तूच पाहा.
109-2
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ॥109॥
या शरीरावर बालपण उमटलेले दिसते, मग तारुण्यात तेच बालपण नाहीसे होते. अशा अवस्था बदलत असतात, पण(शरीर) तोच असतो, त्याचा नाश होत नाही.
110-2
तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही । ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदुःख ॥110॥
त्याचप्रमाणे हे पाहा, एका अविनाशी अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीर येतात व जातात, असे जो जाणतो (ज्याला समजते,), त्याला भ्रांतिजन्य (अपूर्ण ज्ञानामुळे झालेले त्रास,दुःख) दुःख कधीहि होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥2.14॥
भावार्थ :-
हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की, शीत-उष्ण, सुख-दुःख, इत्यादी द्वंद्व (अंतःकरणात) निर्माण होते (किंवा देणारे आहेत); उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत; म्हणून हे भारता ! त्यांना तू सहन केले पाहिजे.
111-2
एथ नेणावया हेचि कारण । जे इंद्रिया आधीनपण । तिही आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥111॥
इंद्रियांच्या आधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही(किंवा इंद्रियावर संयम राहिले नाही की), हेच एक कारण आहे आणि ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवितात; (किंवा आपल्यावर अधिकार गाजवतात)म्हणून (मानवाला) त्याला भ्रम निर्माण होते.
112-2
इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतर आप्लविती । संगे येणे ॥112॥
सुरुवातीस (प्रारंभी) इंद्रिये विषयांचे सेवन करतात. त्यामुळे सुख- दुःखे उत्पन्न होतात. मग ती (मिळालेली) सुख- दुःखे आपल्या संसर्गाने मानवाच्या अंतःकरणात (ग्रासून टाकतात) भ्रम निर्माण करतात.
113-2
जया विषयांच्या ठायी । एकनिष्ठता कही नाही । तेथ दुःख आणि काही । सुखही दिसे ॥113॥
ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयापासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते.
114-2
देखे शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारे ॥114॥
असे पाहा कीं, स्तुती आणि निंदा ही शब्दांची व्याप्ती आहे. कानांनी जर स्तुती ऐकली तर आनंद मिळतो पण, निंदा ऐकताच (अंतःकरणात) द्वेष निर्माण होतो.
115-2
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगे कारण । संतोषखेदा ॥115॥
मृदूता आणि कठीणता, हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत; परंतु त्वचेच्या (ठिकाणी भासल्यास) संयोगाने संतोषाला आणि खेदाला कारण होतात.
116-2
भ्यासुर आणि सुरेख । हे रूपाचे स्वरूप देख । जे उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारे ॥116॥
तसेच, भेसूर आणि सुरेख ही दोन लक्षणे रूप या विषयीची आहेत. पण नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात.
117-2
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगे विषादु । तोषु देता ॥117॥
सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुखदुःख उत्पन्न करतात.
118-2
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥118॥
त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस असतो. एकातुन त्रास (नावड) आणि एकातून प्रीती (आवड) निर्माण होते. म्हणून विषयांची संगती मानवाला अधोगतीला (घेऊन जाते) नेणारी आहे.
119-2
देखे इंद्रिया आधीन होईजे । तै शीतोष्णाते पाविजे । आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपे ॥119॥
असे पाहा की, माणूस ज्यावेळी इंद्रियांच्या ताब्यात जातो, तेंव्हा त्याला शितोष्णाचा (द्वंद्वे निर्माण होणे) अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो सुखदुःखाच्या चक्रात सापडतो.
120-2
या विषयांवाचूनि काही । आणीक सर्वथा रम्य नाही । ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ॥120॥
पाहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की, त्यांना या विषयावाचून दुसरे काहीच (म्हणून आपण गुंतत जातो) गोड वाटत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-2
हे विषय तरी कैसे । रोहिणीचे जळ जैसे । का स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥121॥
मग हे (इंद्रियांचे स्वभाव)विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक (म्हणजे खरे नसते, कल्पना) किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती, वगैरे जसा केवळ भासमय असतो.
122-2
देखै अनित्य तियापरी । म्हणौनि तू अव्हेरी । हा सर्वथा संगु न धरी । धनुर्धरा ॥122॥
अशाप्रकारे हे विषय क्षणभंगुर आहेत; याकरिता हे धनुर्धरा, तू त्यांचा (विषयांचा) त्याग कर. त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. (संगती करू नकोस)
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥2.15॥
हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना !! ज्याला इंद्रिय आणि विषयसंबंध व्याकुळ करीत नाहीत, त्याला सुख-दुःख समान (होतात) आहेत.असा तो विवेकवंत (धीर) पुरुष मोक्षप्राप्तीला योग्य होतो.
123-2
हे विषय जयाते नाकळिती । तया सुखदुःखे दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाही तया ॥123॥
जो पुरुष या विषयांच्या आधीन (तावडीत) होत नाही, त्याला सुखदुःख ही दोन्ही होत नाहीत.(सुखदुःख या दोन्ही वेळी सारखाच (संयमी) असणारा), त्याला पुनः गर्भवास सोसावे लागत नाही. (म्हणजेच मोक्षप्राप्ती).
124-2
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥124॥
जो या इंद्रियांचे जे विषय (त्यांच्या आधीन न होणारा) त्या दुष्टचक्रात सापडत नाही, (अशा मानवास) हे पार्था, तो पूर्णपणे ब्रम्हरूप आहे असे जाणावे.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥2.16॥
अविद्यमान (अस्तित्वात नसलेल्या) वस्तूला अस्तित्व कधी नसते,आणि विद्यमान गोष्टीला कधी आभाव नसतो. विद्यमान व अविद्यमान या दोन्हीचाहि निर्णय तत्वज्ञानी लोकांनी जाणला आहे.
125-2
आता अर्जुना काही एक । सांगेन मी आईक । जे विचारपर लोक । वोळखिती ॥125॥
आता अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे, ऐक. जी ज्ञानी पुरुष विचारांनी जाणतात.
126-2
या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत । ते तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥126॥
या विश्वामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे.(असे गुप्त रुपाने असलेले चैतन्य जे) तत्व जाणणारे (तत्वज्ञानी) संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.
127-2
सलिली पय जैसे । एक होऊनि मीनले असे । परी निवडूनि राजहंसे । वेगळे कीजे ॥127॥
ज्याप्रमाणे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात मिसळून गेलेलं असते, तरी पण राजहंस ज्याप्रमाणे पाण्यातून दूध निवडून वेगळे करतो.
128-2
की अग्निमुखे किडाळ । तोडोनिया चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥128॥
किंवा (सोनार) सुवर्णजाणकार अग्नीच्या साहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात;.
129-2
ना तरी जाणिवेच्या आयणी । करिता दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणी । दिसे जैसे ॥129॥
अथवा, चतुरपणाने दही घुसळल्यानंतर (दह्यातून लोणी वेगळी करण्याची प्रक्रिया), ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते.
130-2
की भूस बीज एकवट । उपणिता राहे घनवट । तेथ उडे ते फलकट । जाणो आले ॥130॥
किंवा एकत्र झालेले (धान्यात मिसळलेला टरफल, व्यर्थ केर) भूस व धान्य उफणले (पाकडल्यानंतर) धान्य खाली राहून (व्यर्थ कचरा) फोलकट निघून जाते. (धान्य निवडण्याची प्रक्रिया).
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-2
तैसे विचारिता निरसले । ते प्रपंचु सहजे सांडवले । मग तत्त्वता तत्त्व उरले । ज्ञानियासि ॥131॥
याप्रमाणे विचार केला, तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो आणि मग ज्ञानी पुरुषांना एक तत्व (ब्रम्ह) मात्र उरते.
132-2
म्हणौनि अनित्याच्या ठायी । तया आस्तिक्यबुद्धि नाही । निष्कर्षु दोहीही । देखिला असे ॥132॥
म्हणून ज्यांनी (ज्ञानी पुरुषांनी) सत आणि असत या दोन्हीमधील सार ओळखले (निष्कर्ष जाणला), त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी, त्या नित्य आहेत, असा निश्चय नसतो.
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥2.17॥
ज्याने हे सारे विश्व व्यापलेले आहे, ते अविनाशी आहे आणि त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही.
133-2
देखे सारासार विचारिता । भ्रांति ते पाही असारता । तरी सार ते स्वभावता । नित्य जाणे ॥133॥
पाहा सारसाराचा (सूक्ष्म) विचार केला असता, असारता ही भ्रांती आहे आणि सार हे स्वभावतः नित्य आहे, असे जाण.
134-2
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाही ॥134॥
या तिन्ही लोकात ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार, अशी काही (लक्षणे) नाहीत.
135-2
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥135॥
जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश कधीहि होणार नाही.
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥2.18॥
नित्य, अविनाशी व अगम्य अशा जिवात्म्याचे हे देह, त्या सर्व देहास नाशवंत म्हंटले आहे. म्हणून हे अर्जुना या नाशवंत देहाचा विचार मनात न आणता तू युद्ध कर.
136-2
आणि शरीरजात आघवे । हे नाशिवंत स्वभावे । म्हणौनि तुवा झुंजावे । पंडुकुमरा ॥136॥
शरीर म्हणून जेवढे आहे, तेवढे सगळे नाशवंत आहे. म्हणून हे अर्जुना ! तू युद्ध करावे हे हिताचे आहे.
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥2.19॥
हा आत्मा मारणारा आहे असे जो समजतो. मरणारा आहे असे जो समजतो, त्या दोघांनाही खरे कळत नाही, हा कोणाला मारीत नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही.
137-2
तू धरूनि देहाभिमानाते । दिठी सूनि शरीराते । मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥137॥
तू देहाच्या जागी मी असा अभिमान ठेवला आहेस. दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत, अशा दृष्टी तू ठेवली आहेस. मी मारणारा आहे आणि हे कौरव मरणारे आहेत, असे तू म्हणत आहेस.
138-2
तरी अर्जुना तू हे नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तू नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥138॥
तरी अर्जुना, तुला खरे सत्य समजत नाही. जर तू ज्ञानाने सूक्ष्म विचार करून पाहशील, तर मारणारा नाहीस आणि हे मारले जाणार नाहीत, हे तुझ्या लक्षात येईल.
न जायते म्र्यिते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥2.20॥
हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा एकदा उत्पन्न होऊन पुनः नाश होणारा आहे, असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित व अनादि आहे. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही.
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥2.21॥
हे पार्था ! या आत्म्याला जो नाशरहित, जन्मरहित, नित्य व क्षयरहित असे जाणतो, तो आत्मज्ञानी पुरुष कोणाला मारणार तरी कसा ? व कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा ? ?
139-2
जैसे स्वप्नामाजी देखिजे । ते स्वप्नीचि साच आपजे । मग चेऊनिया पाहिजे । तव काही नाही ॥139॥
ज्याप्रमाणे स्वप्नात जे काही दिसते ते स्वप्नातच खरे वाटते, पण मग जागे होऊन जेंव्हा पाहतो, त्या वेळी ते काहिच दिसत नाही.
140-2
तैसी हे जाण माया । तू भ्रमतु आहासी वाया । शस्त्रे हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे ॥140॥
त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ (या मायेच्या)भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे एखाद्या शस्त्राने देहाच्या सावलीला मारल्यास शरीराला घाव लागत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-2
का पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाही नासला । तयासवे ॥141॥
किंवा पाण्याने भरलेला घडा पालथे केल्यावर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहिसे झालेले दिसते; पण खरा सूर्य नाहिसा झालेला नसतो.
142-2
ना तरी मठी आकाश जैसे । मठाकृती अवतरले असे । तो भंगलिया आपैसे । स्वरूपचि ॥142॥
किंवा, ज्याप्रमाणे आकाश हे मठामध्ये मठाच्या आकाराचे झालेले दिसते;.(मठाच्या आकृतीचा झालेला दिसतो);पण मठ मोडल्या नंतर (तो आकार नष्ट होत नाही) ते आकाश आपल्या मूळ रूपात राहते.
143-2
तैसे शरीराचा लोपी । सर्वथा नाशु नाही स्वरूपी । म्हणऊनि तू हे नारोपी । भ्रांति बापा ॥143॥
त्याच प्रमाणे शरीर नाश पावले, तरी मूळ आत्म्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून बाबा ! तू स्वरूपाच्या ठिकाणी (आत्मा जन्माला आला आणि आत्मा मरण पावला)जन्म- मरण हा भ्रांतीचा आरोप करू नकोस.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥2.22॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून दुसरे नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा हा जीर्ण झालेले शरीर (टाकून देऊन) सोडून देतो आणि दुसरे नवीन शरीर धारण करतो.
144-2
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्यनाथे ॥144॥
(मनुष्य) ज्याप्रमाणे, जूनी कपडे टाकून देतो आणि नवीन वस्त्रे घालतो धारण करतो, त्या प्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा जीर्ण देह टाकून दुसर्या नवीन देहाचा स्विकार करतो.
नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥2.23॥
भावार्थ :-
या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत,अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही.
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥2.24॥
भावार्थ :-
हा आत्मा तोडता, जाळता, भिजवता,आणि सुकवताही येत नाही. हा निःसंशय (आत्मा) नित्य, सर्वव्यापी,स्थिर,अचल आणि सनातन आहे.
145-2
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकी छेदु । न घडे यया ॥145॥
हा आत्मा जन्म-मरणरहित असून नित्य (शाश्वत असणारा) उपाधिरहित व अत्यंत शुद्ध आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांनी ही घात करता येत नाही.
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥2.25॥
भावार्थ :-हा आत्मा अव्यक्त :- (इंद्रियांना अगोचर, अदृश्य), अचिंत्य :- (मनाने न समजणारा, किंवा ज्याचा विचार किंवा तर्क करता येत नाही, गूढ), अविकारी :- (विकाररहित, कधीहि न बदलणारा) असे आहे.म्हणून अशा प्रकारच्या आत्म्याला जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही.
146-2
हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥146॥
हा आत्मा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही. हा अग्नीने जळणारा नाही. तसेच वायूमध्ये देखील याला शुष्क करण्याची शक्ती नाही.
147-2
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥147॥
म्हणून हे अर्जुना ! हा आत्मा नित्य, स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी (स्वयंप्रकाशित) परिपूर्ण व्यापक रूपाने भरलेला आहे.
148-2
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥148॥
आत्मा हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नाही, ध्यान तर या आत्म्यास भेटण्यासाठी उत्कंठित (उत्कट इच्छा) झालेले असते.
149-2
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥149॥
हे अर्जुना ! हा आत्मा मनास नेहमीच दूर्लभ (म्हणजे मनाने जाणता येत नाही), कोणत्याही साधनाने प्राप्त न होणारा आहे. हे पुरषोत्तमा, हा आत्मा अनंत आहे.
150-2
हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु । अनादि अविकृतु । सर्वरूप ॥150॥
हा आत्मा तीन गुणांनी (सत्व, रज,तम) रहित आहे, अनादि आहे, विकाररहित आहे, आणि आकाराच्या पलीकडचा विकार न पावणारा सर्वव्यापी असा आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-2
अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा ॥151॥
हे अर्जुना,(आत्मा) हा असा आहे हे लक्षात घे. हे जाणावे आणि (आत्मा) हा सर्वत्र समप्रमाणात आहे, हे पाहावे. म्हणजे तुझा हा सगळा शोक की आपोआप नाहीसा होईल.
अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥2.26॥
भावार्थ :-
हे महाबाहो अर्जुना !! हा आत्मा नेहमी जन्म घेत असतो आणि मृत्यू पावत असतो, असे जरी तू मानलेस तरीदेखील शोक करणे उचित नाही.
152-2
अथवा ऐसा नेणसी । तू अंतवंतचि हे मानिसी । तर्ही शोचू न पवसी । पंडुकुमरा ॥152॥
अर्जुना हा आत्मा अविनाशी (अमर) आहे, हे तुला समजत नसेल तर; हा आत्मा नाशवंत आहे असे जरी तू मानत असशील, तरीदेखील अर्जुन तूला शोक करण्याचे कारण नाही.
153-2
जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥153॥
कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्या प्रमाणे अविच्छिन्न (अखंड) आहे, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा क्रम अखंडच (नित्य घडत आहे) आहे.
154-2
(या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व नित्य आहे.)
ते आदि नाही खंडले । समुद्री तरी असे मिनले । आणि जातचि मध्ये उरले । दिसे जैसे ॥154॥
ते गंगेचे पाणी उगमाचे ठिकाणी खंड पावलेले नसते.पुढे ते समुद्रात जाऊन एकसारखे मिळत असते. (उगम आणि संगम यामध्ये असलेले जल) सदैव वाहत असलेले दिसते.
155-2
इये तिन्ही तयापरी । सरसीच सदा अवधारी । भूतांसी कवणी अवसरी । ठाकती ना ॥155॥
त्या प्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही (प्राणिमात्राच्या ठिकाणी) नेहमी बरोबरच असतात. हे लक्षात ठेव आणि ह्या तिन्हीचा प्रवाह कोणालाही थांबविता येत नाही.
156-2
म्हणोनि हे आघवे । एथ तुज न लगे शोचावे । जे स्थितीची हे स्वभावे । अनादि ऐसी ॥156॥
म्हणून हे अर्जुना, तुला या सर्वाबद्दल (कोणा विषयीच) शोक करण्याची गरजच नाही, कारण स्वभावतःच (उत्पत्ती आणि लय) असा सृष्टीचा क्रम आनादि कालापासून चालत आलेला आहे.
157-2
ना तरी हे अर्जुना । न येचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥157॥
या विश्वातील सर्व प्राणीमात्र जन्ममरण च्या आधिन आहेत, असे पाहून (ऐकून सुद्धा) (वरील म्हणणे) जर हे म्हणने तुझ्या मनाला पटत नसेल तर;
158-2
तरी येथ काही । तुज शोकासि कारण नाही । जे जन्ममृत्यु हे पाही । अपरिहर ॥158॥
तरीपण (यातील कोणा विषयीच) तुला शोक करण्याचे कारण नाही; कारण हे जन्ममृत्यु चे हे चक्र (अटळ) टाळता न येणारे आहे.
जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥2.27॥
भावार्थ :-
कारण जो जन्मला आहे, त्याला मृत्यू निःश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे, त्याला निःसंशय जन्म आहे. म्हणून (हे पार्थ) या अटळ गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही.
159-2
उपजे ते नाशे । नाशले पुनरपि दिसे । हे घटिकायंत्र तैसे । परिभ्रमे गा ॥159॥
जे उत्पन्न होते (जन्मास आले) ते नाश पावणारच आणि जे नाश पावले ते पून्हा नवीन रूपात (जन्माला येणारच) दिसू लागते.हे रहाडगाडग्याप्रमाणे सतत हा क्रम सुरु असतो.
160-2
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे । हे जन्ममरण तैसे । अनिवार जगी ॥160॥
अथवा, (सूर्याचा, दिवसाचा) उदय आणि अस्त हे आपोआप निरंतर होत असते, त्याप्रमाणे या (देहाचे, पाणीमात्राचे) जन्म-मरण अखंड होत असते, या विश्वात जन्म -मरण (अपरिहार्य आहे) चुकविता येणारे नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-2
महाप्रळय अवसरे । हे त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥
महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होतो, म्हणून (हे अर्जुना लक्षात घे कोणत्याही वस्तूची) उत्पत्ती व नाश हा क्रम टळत नाही.
162-2
तू जरी हे ऐसे मानसी । तरी खेदु का करिसी । काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ॥162॥
हे जर तुला पटत असेल, (हे म्हणजे आत्म्याला अदि व अंत असेलच)तर मग व्यर्थ शोक का करतोस ? अर्जुना तू शहाणा असून वेड्यासारखे असे का बरे करतोस ? ?
163-2
एथ आणिकही एक पार्था । तुज बहुती परी पाहता । दुःख करावया सर्वथा । विषो नाही ॥163॥
हे अर्जुना ! तूला आणखी एक गोष्ट सांगतो, कोणत्याही बाजूने विचार करून पहिले, तरी तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही.
अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥2.28॥
अर्जुना, सर्व प्राणिमात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. मध्येच फक्त व्यक्त (दृश्य) (पंचमहाभूतात्मक शरीर मूर्त होऊन दिसते) होतात व पुन्हा मृत्यू नंतर अव्यक्तच बनतात. तर मग शोक कसला ?
164-2
जे समस्ते इये भूते । जन्मा आदि अमूर्ते । मग पातली व्यक्तीते । जन्मलेया ॥164॥
(भगवान श्रीकृष्ण अर्जुनास आता दुसऱ्या पद्धतीने समजावतात ते कसे, पाहा !)कारण, सर्व जीव हे जन्मापूर्वी निराकार होते, मग जन्मल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला,
165-2
तिये क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती । देखे पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥165॥
(मृत्यूनंतर) हे नाश होऊन जेथे कोठे जातात, तेथे ते निःसंशय वेगळे नसतात, तर ते आपल्या मूळ (निराकार, अव्यक्त) अवस्थेला प्राप्त होतात.
166-2
येर मध्ये जे प्रतिभासे । ते निद्रिता स्वप्न जैसे । तैसा आकारु हा मायावशे । सत्स्वरूपी ॥166॥
आता मध्यंतरी (म्हणजे जन्म-मृत्यू या दोन अवस्थांच्या मधे जो व्यक्त प्रत्यक्ष धारण केलेला आकार, मूर्त शरीर) दिसतो, तो झोपेतल्या स्वप्नसारखेच होय. त्याप्रमाणे सत्स्वरूपाच्या (निराकार रूपाच्या) ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार दिसतो.
167-2
ना तरी पवने स्पर्शिले नीर । पढियासे तरंगाकार । का परापेक्षा अळकांर- । व्यक्ति कनकी ॥167॥
(वाऱ्यामुळे ज्याप्रमाने) वाऱ्याच्या स्पर्शाने पाण्यावर लाटा तयार होतात, किंवा सोनाऱ्याच्या स्पर्शाने सोन्याला दागिन्यांचा आकार येतो.
168-2
तैसे सकळ हे मूर्त । जाण पा मायाकारित । जैसे आकाशी बिंबत । अभ्रपटल ॥168॥
ज्याप्रमाणे आकाशात ढगांचे आवरण तयार होते, त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत, असे समज.
169-2
तैसे आदीचि जे नाही । तयालागी तू रुदसि कायी । तू अवीट ते पाही । चैतन्य एक ॥169॥
जे मुळात उत्पन्नच होत नाही, त्याबद्दल तू का दुःखाने रडत बसला आहेस ? त्यापेक्षा निर्विकार, नित्य असे जे ब्रम्ह चैतन्य आहे, त्याकडे तू पूर्ण लक्ष दे.
170-2
जयाचि आर्तीचि भोगित । विषयी त्यजिले संत । जयालागी विरक्त । वनवासिये ॥170॥
ज्या विश्व चैत्यन्याच्या प्राप्तीची (प्रत्येक्ष अनुभव घेण्यासाठी)तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच, त्या संतांना विषय सोडून जातात. जे विरक्त आहेत, ते त्या आत्म्याचा लाभाकरिता वनवास स्वीकारतात.
171-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिठी सूनि जयाते । ब्रह्मचर्यादि व्रते । मुनीश्वर तयाते आचरताती ॥171
त्याच्यावर (ब्रम्हचैतण्याकडे) दृष्टी एकाग्र करून श्रेष्ठ मुनि-महात्मे ब्रम्हचर्यादि व्रतांचे आणि तापाचे आचरण करतात.
आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥2.29॥
भावार्थ :-
कोणी एखादा या आत्म्याला अदभुत समजतो, तर दुसरा कोणी आश्चर्यकारक आहे, असे वर्णन करतो.(म्हणजे देहाला विसरतो). तर कोणी त्याचे अलौकिक गुणगान ऐकतो.पण याप्रमाणे पाहून, वर्णन करून, ऐकुनहि (यापैकी) कोणी जाणत नाही.
172-2
एक अंतरी निश्चळ । जे निहाळिता केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥172॥
कित्येक जण तर (आत्म्याचा) विचार करत करत अंतःकरण शांत करतात आणि संसार विसरून जातात.
173-2
एका गुणानुवादु करिता । उपरती होऊनि चिता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥173॥
कित्येकांना तर त्याचे (परब्रम्हाचे) वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होवून, अमर्याद व अखंड तन्मयता पावतात.(चित्तात दीर्घकाळ तल्लीनता प्राप्त होणे)
174-2
एक ऐकताचि निवाले । ते देहभावी सांडले । एक अनुभवे पातले । तद्रुपता ॥174॥
कित्येक साधक तर त्या ब्रम्हचैतन्याचे स्वरूपाचे वर्णन ऐकूनच शांत होतात. (देहाचे भान) देहभाव संपून जातो. ते अनुभवाने तद्रुपता प्राप्त करतात.(त्याच ठिकाणी एकरूप तेचा अनुभव)
175-2
जैसा सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत । परी माघौते न समात । परतले नाही ॥175॥
ज्या प्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात; परंतु समुद्रात पाणी मावत नाही म्हणून, नदीचे पाणी परत (माघारी) फिरले नाही.
(म्हणजे, या ओवी मध्ये समुद्र हा परमात्मा आहे आणि नदी आत्मा) एकरूप झाल्यावर येणारा अनुभव.
176-2
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवे एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥176॥
त्या प्रमाणे थोर योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते.मग ते योगी पुनः विचार करूनदेखील देहबोधावर (संसारात किंवा देहादि मायाजालात) येत नाहीत.
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥2.30॥
भावार्थ :-
हे अर्जुना, सर्वाच्या देहामध्ये असणारा हा आत्मा सर्वदा अमर आहे; म्हणून तू कोणत्याही प्राणिमात्राबद्दल शोक करू नकोस.
177-2
जे सर्वत्र सर्वही देही । जया करिताही घातु नाही । ते विश्वात्मक तू पाही । चैतन्य एक ॥177॥
अर्जुना, जे सर्वत्र,सर्वच देहा मध्ये आहे, कोणत्याही प्रयत्नाने त्याचा घात(नाश) होत नाही, ते चैत्यन्य विश्वामध्ये सम प्रमाणात भरलेले आहे, हे तू लक्षात घे.
178-2
याचेनिचि स्वभावे । हे होत जात आघवे । तरी सांग काय शोचावे । एथ तुवा ॥178॥
हे सर्व जग विश्वचैतन्याच्या सत्येने (मर्जीने) उत्पन्न होते आणि नाहीसे होते, तर मग तू का म्हणून शोक करावास ? ते सांग.
179-2
एर्हवी तरी पार्था । तुज का नेणो न मने चित्ता । परी किडाळ हे शोचिता । बहुती परी ॥179॥
अर्जुना, विचार करून पाहिले तर तूझ्या मनाला (आत्म्याच्या अमर तत्वाचा) विचार का पटत नाही, ते मलाही कळत नाही. परंतू या गोष्टीचा शोक करणे हे विविध प्रकाराने वाईट आहे, हे सिद्ध होते.
स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥2.31॥
भावार्थ :-
आणि स्वधर्माचा विचार केला, तर या युद्धापासून परावृत्त होणे तुला योग्य नाही.(व्याकुळ होणे). कारण क्षेत्रीयांला कर्तव्यप्राप्त (धर्मयुद्धा) युद्धाशिवाय दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही.
180-2
तू अझुनि का न विचारिसी । काय हे चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावे जेणे ॥180॥
तू अजून (ह्याचा) का बरे विचार करत नाहीस ? ? काय हे मनात घेऊन बसला आहेस ? ? या भवसागरातून तारून नेणारा (आपला धर्म) स्वधर्म तू का विसरला आहेस ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-2
या कौरवा भलते जाहले । अथवा तुजचि काही पातले । की युगचि हे बुडाले । जर्ही एथ ॥181॥
या कौरवाचे वाटेल ते झाले,किंवा युद्ध करताना तुझ्यावरच काही संकट आले अथवा हे युग जरी बुडाले, (युगांत जरी झाला) (तरी हे अर्जुना)
182-2
तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहे । कृपाळुपणे ॥182॥
स्वधर्म म्हणून जो एक आहे, तो कोणत्याही कारणाने त्यागणे योग्य नाही. (स्वधर्म मुळीच टाकता येत नाही). मग अस असताना येथे लक्षात घ्यावे :- अर्जुन हा क्षत्रिय आहे,आणि क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध करणे,पण अर्जुनाच्या मनात गोंधळ उत्पन्न झाल्याने कौरवांच्या (आप्तजन) विरूद्ध युद्ध करण्यास नकार देत असल्याने】तूझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे, यामूळे तू तरला जाशील काय ? याचा विचार कर.
183-2
अर्जुना तुझे चित्त । जर्ही जाहले द्रवीभूत । तर्ही हे अनुचित । संग्रामसमयी ॥183॥
हे अर्जुना ! तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले; तरी तसे होणे या युद्ध प्रसंगी अयोग्य आहे.(स्वधर्म विसरणे योग्य नाही, किंवा आपले कर्तव्य विसरून जाणे)
184-2
अगा गोक्षीर जरी जाहले । तरी पथ्यासि नाही म्हणितले । ऐसेनिहि विष होय सुदले । नवज्वरी देता ॥184॥
जसे गायीचे दूध हे पवित्रच, (मनात आप्तजनाबद्दल दयाभाव उत्पन्न होणे हे योग्य जरी असेल) पण वैद्याने पथ्य सांगितले असतानाही, (म्हणजे घेऊ नये असे सांगितले) ते दूध (आग्रहाने) नवज्वारांत दिले, तर ते विषासमान मारक होते.
185-2
तैसे आनी आन करिता । नाशु होईल हिता । म्हणऊनि तू आता । सावध होई ॥185॥
त्या प्रमाणे भलत्या ठिकाणी भलते कर्माचरण (आचरण) केले, तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो.
186-2
(त्याच्या :- आपले कर्त्यव्य पार न पडणारा)
वायाचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाही । जो आचरिता बाधु नाही । कवणे काळी ॥186॥
तू विनाकारण (व्यर्थ)शोकाकुल का होतोस,(मोहाने का बरे व्याकुळ होतोस) ज्याचे आचरण केले असता केंव्हाही दोष लागत नाही; त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे.
187-2
(ज्याचे :- आपल् कर्त्यव्य पार पडणारा)
जैसे मार्गेचि चालता । अपावो न पवे सर्वथा । का दीपाधारे वर्तता । नाडळिजे ॥187॥
ज्या प्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता; कधीही अपाय होत नाही किंवा (रात्रीच्या समयी) दिव्याच्या उजेडात चालले असता ठेच लागत नाही;
188-2
तयापरी पार्था । स्वधर्मे राहाटता । सकळ कामपूर्णता । सहजे होय ॥188॥
त्याप्रमाणे हे पार्था स्वधर्माने वागले असता (त्याच्या) सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात.
189-2
म्हणोनि यालागी पाही । तुम्हा क्षत्रिया आणीक काही । संग्रामावाचूनि नाही । उचित जाणे ॥189॥
म्हणून तू ऐक, तूम्हा क्षत्रियांना युद्धवाचून दूसरे काहीही (तारून जाण्यासाठी) योग्य नाही, हे लक्षात घे.
190-2
निष्कपटा होआवे । उसिणा घाई जुंझावे । हे असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी ॥190॥
निष्कपट भावाने (मनात कपट न धरता),समोरासमोर उभे राहून शौर्याने युद्ध करावे, पण हे बोलणे राहूदे,(तूही हे सगळे जाणतोस), (आत्ता तर) प्रत्यक्ष युद्धाची वेळ आली आहे, तेंव्हा जास्त काय सांगावे ! ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥2.32॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! सहजपणे प्राप्त झालेला हे युद्ध म्हणजे आपोआप उघडलेले स्वर्गाचे द्वार होय; असे हे युद्ध भाग्यशाली क्षित्रियांनाच हे प्राप्त होते.
191-2
अर्जुना झुंज देखे आताचे । हे हो काय दैव तुमचे । की निधान सकळ धर्माचे । प्रगटले असे ॥191॥
हे अर्जुना ! आताचे हे युद्ध म्हणजे तूमचे पूर्व जन्मीचं भाग्य होय. अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यापुढे प्रकटलेला आहे.
192-2
हा संग्रामु काय म्हणिपे । की स्वर्गुचि येणे रूपे । मूर्त का प्रतापे । उदो केला ॥192॥
याला काय साधे युद्ध म्हणावे ? ? अरे या युद्धाच्या (निमित्ताने) रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे. अथवा, तुझा मूर्तिमंत प्रताप प्रकटला आहे. (अवतरला आहे)
193-2
ना तरी गुणाचेनि पतिकरे । आर्तिचेनि पडिभरे । हे कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥193॥
किंवा तुझ्या शौर्यगुणांचा लौकिक ऐकून तूझ्यावर आसक्त होवून कीर्तिरूप स्त्री उत्कट इच्छेने तुला वरण्यास (लग्न करण्यास) आली आहे.
194-2
क्षत्रिये बहुत पुण्य कीजे । ते झुंज ऐसे हे लाहिजे । जैसे मार्गे जाता आडळिजे । चिंतामणीसी ॥194॥
(अर्जुना ! असे हे धर्मयुद्ध सहज प्राप्त होत नाही,कारण) क्षत्रिया ने पुष्कळ पुण्य करावे,तेंव्हा त्याचा जिवनात असे धर्मयुद्ध करावयास मिळते. जसे सहज रस्त्याने जाताना ठेच लागावी काय लागले म्हणून पाहताच मनातील इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी सापडावा,
195-2
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटे पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥195॥
किंवा जांभाई देण्यासाठी तोंड उघडावे; आणि अचानक अमृत येऊन तोंडात पडावे. त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध प्रसंग अनायासे आला आहे, असे समज.
अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसि ॥2.33॥
भावार्थ :-
आता असे धर्माला अनुकूल युद्ध करणार नसशील, तर स्वधर्म आणि कीर्ती यांचा त्याग करून पाप मात्र मिळवशील.
196-2
आता हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचू बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेया ॥196॥
आता, असा हा संग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास; तर आपणच आपला घात केल्यासारखे होईल.
197-2
पूर्वजांचे जोडले । आपणचि होय धाडिले । जरी आजि शस्त्र सांडिले । रणी इये ॥197॥
आज जर तू या (धर्म) युद्धात शस्त्र टाकून दिलेस; तर तूझीच नाही, तर तूझ्या पूर्वजांनी मिळविलेली पुण्यकीर्ति आपणच घालविल्यासारखे होईल.
198-2
असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥198॥
इतकेच नाही तर तुझी असलेली कीर्तिं संपून जाईल, सगळे जग तुझी निंदा करेल, तुला नावे ठेवील आणि महापातके तुझ्याजवळ राहण्यासाठी तुझा शोध घेत येतील.
199-2
जैसी भ्रतारेहीन वनिता । उपहृती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेवीण ॥199॥
ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्रीचा सर्वाकडून अपमान होत असतो. त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण न केल्याने (स्वधर्माचा त्याग केल्याने) जिवाची तशी दशा होते.
(त्याकाळची प्रथे नुसार लिहिले आहे, बदला नुसार ओव्यांचे योग्य अर्थ आपण येथे समजून घेऊ, भाव समजून घ्यावे)
200-2
ना तरी रणी शव सांडिजे । ते चौमेरी गिधी विदारिजे । तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषी ॥200॥
किंवा रणभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला (मृत शरीराला) ज्याप्रमाणे चोहोबाजुनी गिधाडे टोचे मारीत असतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष त्रास देत असतात.
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥2.34॥
भावार्थ :-
आणि सर्व लोक अनेक दिवस तुझी अपकीर्ती बोलत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मारणापेक्षाही अधिक दुःखकारक असते.
201-2
म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश ते न वचेल । कल्पांतावरी ॥201॥
(एवढ्याच करीता अर्जुना आपला धर्म टाकू नको)
म्हणून स्वधर्मचा त्याग करशील, तर निश्चितच पापाला पात्र होशील,आणि कल्पांतपर्यंत (योगानुयुगे) अपकीर्तिचा डाग नाहिसा होणार नाही.
202-2
जाणतेनि तवचि जियावे । जव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पा केवी निगावे । एथोनिया ॥202॥
अपकीर्ति जोपर्यँत अंगाला स्पर्श करीत नाही, तोपर्यंतच शहाण्याने (व्यवहारी आणि सज्जनांनी) जगावे; असे असताना तू सांग, की युद्धातून कसे बरे निघून जावे ? ?
203-2
तू निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता । परी ते गति समस्ता । न मनेल यया ॥203॥
तू मत्सररहित (कौरवांनी दिलेला त्रास त्याबद्दल आलेला राग विसरून) दयायूक्त (आप्तजना बद्दल मायेमुळे निर्माण झालेले प्रेम) अंतःकरणाने रणागणातून परत फिरशील.पण (तू कशामुळे माघारी फिरत आहेस) ही भूमिका सर्वाना कळणार नाही.
204-2
हे चहूकडून वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणे ॥204॥
हे कौरव तुला चोहोबाजुंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था ! तुझा या दयाळूूपणामुळे तूझी सुटका होणार नाही.
205-2
ऐसेनिही प्राणसंकटे । जरी विपाये पा निघणे घटे । तरी ते जियालेही वोखटे । मरणाहुनी ॥205॥
आणि जरी (मोठ्याकष्टाने) कदाचित तुझी या प्राणसंकटातून तूझी सुटका झाली, तरी ते तसे जगणे मरणापेक्षा वाईटच आहे.
भयाद् रणादुपरं मंस्यते त्वा महारथाः ।
येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥2.35॥
भावार्थ :-
हे सर्व महारथी, रणागणातून तू भयामुळे परत गेलास (पळून गेलास) असे मानतील. ज्यांना तुझ्याविषयी अभिमान वाटत होता, ते तुला तुच्छ मानतील.
206-2
तू आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमे झुंजो आलासी । आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी ॥206॥
तू आणखी एक गोष्टीचा विचार करत नाहीस; तू या ठिकाणी मोठय़ा उत्साहाने लढण्यासाठी (आत्मविश्वासाने) आलास.आणि जर दया उत्पन्न झाल्याने परत माघारी फिरलास;
207-2
तरी तुझे ते अर्जुना । या वैरिया दुर्जना । का प्रत्यया येईल मना । सांगे मज ॥207॥
तर हे अर्जुना ! हे तुझे दयाळूपण, या दुष्ट वैऱ्यांच्या (कौरवांच्या) मनाला समजेल काय (कौरवांना खरे वाटेल काय) ? ? सांग बरे मला.
अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः ।
निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम् ॥2.36॥
भावार्थ :-
तुझे शत्रू तुला अनेक अपशब्द बोलतील. तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. (सामर्थ्यवाण पुरुषाला निंदा ही मारणापेक्षा जास्त वाईट आहे.) याहून अधिक दुःख कोणते ?
208-2
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हा बिहाला । हा सांगे बोलु उरला । निका कायी ॥208॥
हे कौरव म्हणतील, ” हा पळाला रे पळाला ” ! अर्जुन आम्हाला भिऊन युद्ध सोडून पळून गेला ” . असा दोष सदैव तुझ्यावर राहिला, तर ते चांगले आहे का ? तूच सांग.
209-2
लोक सायासे करूनि बहुते । का वेचिती आपुली जीविते । परी वाढविती कीर्तीते । धनुर्धरा ॥209॥
लोक अनेक प्रकारचे कष्ट करतात किंवा प्रसंगी आपला प्राणही गमावतात; पण, हे धनुर्धरा, आपली किर्ती वाढवितात.
210-2
ते तुज अनायसे । अनकळित जोडिली असे । हे अद्वितीय जैसे । गगन आहे ॥210॥
ती कीर्ती तुला (आपोआप) अनायासे लाभलेली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे;
211-2
तैसी कीर्ती निःसीम । तुझां ठायी निरुपम । तुझे गुण उत्तम । तिही लोकी ॥211॥
त्याप्रमाणे अमर्याद व उपमारहित अशी तुझी किर्ती आहे. त्रैलोक्यात तुझ्या गुणांची प्रसिद्धी आहे.
212-2
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥212॥
दाही दिशांचे राजे रजवाडे, भाट (स्तुतिपाठक) होऊन तुझ्या गुणांचे वर्णन गातात. ती ऐकून यमादिक देखिल दचकतात.
213-2
ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट । जया देखी जगी सुभट । वांठ जाहली ॥213॥
अशी तुझी किर्ती असून, ती गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे. आणि ती पाहून, ऐकून जगातील मी मी म्हणणारे योद्धां पण चकित होतात.त्यांना ज्ञानसंपादन करण्याची प्रेरणा मिळते. (मार्गदर्शन लाभते)
214-2
ते पौरुष तुझे अद्भुत । आइकोनिया हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेसी ॥214॥
असा तूझा अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून, हे सर्व कौरव आपल्या जीविताची आशा सोडली आहे.
215-2
जैसा सिंहाचिया हाका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवा अशेखा । धाकु तुझा ॥215॥
ज्या प्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून उन्मत्त हत्तीला ही प्रलयकाळच जवळ आला आहे,असे वाटते. त्याप्रमाणे या कौरवांना तूझा धाक बसला आहे.
216-2
जैसे पर्वत वज्राते । ना तरी सर्प गरुडाते । तैसा अर्जुना हे तूते । मानिती सदा ॥216॥
ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरूडाला (भीतीच्या भावना) समजतात, त्याप्रमाणे (अर्जुना)हे कौरव सैन्य तुला घाबरतात.
217-2
ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥217॥
(असे असून सुद्धा) जर तू युद्ध न करता माघारी फिरशील; तर ही तूझी (मिळवलेली, अनायासे प्राप्त झालेली) किर्ती नाहीशी होईल, आणि मग तूझ्या अंगी हीनत्व प्राप्त होईल.
218-2
आणि हे पळता पळो नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकता तुज ॥218॥
बरे ! (विचार करून किंवा यांच्या प्रेमापोटी) पळून जाऊ लागलास, तरी हे कौरव तुला पळून जाऊ देणार नाहीत. तूला पकडून तुझी (कारण न जाणता) फजिती करतील आणि तूझ्यासमोर (तोंडावर) तूझी अमर्याद निंदा करतील.
219-2
मग ते वेळी हिये फुटावे । आता लाठेपणे का न झुंजावे । हे जिंतले तरी भोगावे । पृथ्वीतल ॥219॥
ते (मर्मभेदक शब्द,) निंदेचे शब्द ऐकून, मग तुझे अंतःकरण विदीर्ण होईल. त्यापेक्षा आत्ताच शौर्याने का बरे लढत नाहीस ? आणि जर तू यांना (कौरवांना) जिंकलेस, तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥2.37॥
भावार्थ :-
हे कौंतेय !! जर या युद्धात मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील; अथवा विजय प्राप्त झाला, तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून (हे अर्जुना) दृढ निश्चयाने युध्दासाठी उभा राहा.
220-2
ना तरी रणी एथ । झुंजता वेचले जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥220॥
अथवा ह्या रणांगणावर युद्ध करताना तुझे प्राण खर्ची पडले; तर स्वर्गातील सुख तुला त्रासावाचून प्राप्त होईल.
221-2
म्हणोनि ये गोठी । विचारु न करी किरिटी । आता धनुष्य घेऊनि उठी । झुंजे वेगी ॥221॥
म्हणून हे अर्जुना ! युद्ध करावे अथवा करू नये, या गोष्टीचा विचार करत बसू नकोस, तर ऊठ हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास सुरुवात कर.
222-2
देखे स्वधर्मु हा आचरता । दोषु नासे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥222॥
असे पाहा की, या स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नष्ट होतात. असे असताना युद्धामुळे तुला पातक लागेल हा समज तूझ्या मनात कसा निर्माण झाला ? ?
223-2
सांगे प्लवेचि काय बुडिजे । का मार्गी जाता आडळिजे । परी विपाये चालो नेणिजे । तरी तेही घडे ॥223॥
तुच सांग अर्जुना, नावेत बसून जाणारा कोणी बुडेल का ? किंवा चांगल्या रस्त्यावरून चालताना ठेच लागेल का ? पण, जर नीट चालता येत नसेल तर होईल ही तसे.
224-2
अमृते तरीचि मरीजे । जरी विखेसी सेवीजे । तैसा स्वधर्मे दोषु पाविजे । हेतुकपणे ॥224॥
अमृतासमान असणाऱ्या गोष्टी विषासह सेवन केल्या, (दूध पिल्याने मृत्यू होणार नाही, पण दूधात विषाचे ही सेवन झाले तर मृत्यू येईल) तर मृत्यू प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, स्वधर्माचे फलाच्या अपेक्षेने आचरण केल्याने दोष मात्र लागतील.
225-2
म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा । क्षात्रवृत्ती झुंजता । पाप नाही ॥225॥
म्हणून हे अर्जुना ! सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे तुला मुळीच पाप (पातकाचा लेशहि तुला) लागणार नाही.
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥2.38॥
भावार्थ :-
सुखदुःख, लाभ-हानी, जय-पराजय, याना समान मानून तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला पाप लागणार नाही.
226-2
सुखी संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावे । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजी ॥226॥
अर्जुना, सुखाच्या वेळी संतोष मानू नको, दुःखाच्या वेळी खेद करू नकोउ.आणि मनात लाभ किंवा हानी याचा (कसलाही) विचार करू नकोस.
227-2
एथ विजयपण होईल । का सर्वथा देह जाईल । हे आधीचि काही पुढील । चिंतावेना ॥227॥
या युद्धात आपल्याला जय मिळेल किंवा देहच नाहिसा होईल, या पुढील गोष्टींचे युद्धपूर्वी (आगोदरच) चिंतन करत बसू नको.
228-2
आपणया उचिता । स्वधर्मातेचि रहाटता । जे पावे ते निवांता । साहोनि जावे ॥228॥
आपल्या विहित स्वधर्माने वागत असताना, जे काही (आपले बरे-वाईट) प्रसंग आपल्याला येतील ते (शांतपणे) निमूटपणे सहन करावे
229-2
ऐसेया मने होआवे । तरी दोषु न घडे स्वभावे । म्हणोनि आता झुंजावे । निभ्रांत तुवा ॥229॥
अशी मनाची तयारी होईल.(मन शांत होईल) मन शांत झाल्यामुळे स्वभावतःच तुझ्याकडून पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल झुंज देण्यास तयार व्हावे.
एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥2.39॥
भावार्थ :-
अर्जुना !! आतापर्यँत तुला सांख्यविषयक (आत्मज्ञान – विचार) ज्ञान सांगितले. आता निष्काम कर्मयोगासबंधी ज्ञान सांगतो. त्याने तू कर्मबंधनापासून मुक्त होशील.
230-2
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ । आता बुद्धियोगु निश्चित । अवधारी पा ॥230॥
आत्तापर्यंत तुला आत्मज्ञान (ज्ञानमार्ग) संक्षिप्तपणे सांगितला, आता निश्चित असा निष्काम कर्मयोग सांगतो, तो तू ऐक.
231-2
जया बुद्धियुक्ता । आहालिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥231॥
हे अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याने आचरली. त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही.
232-2
जैसे वज्रकवच लेईजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता ॥232॥
ज्याप्रमाने अंगात वज्रकवच (चिलखत)घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करता येते.इतचेच नव्हे तर (अंगाला शस्त्र स्पर्शहि)न करता विजय मिळवून राहता येते.
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥2.40॥
भावार्थ :-
या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. यात कोणताही दोष नाही. या धर्माचे थोडे अनुष्ठानही मोठ्या भयापासून रक्षण करते.
233-2
तैसे ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥233॥
त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वी पासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने सुरु असलेले दिसून येते. त्या कर्मयोगात ऐहिक सुखांचा नाश तर होत नाहीच, शिवाय मोक्षसुख ही तर ठेवलेलाच आहे.(प्राप्त होते)
234-2
कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥234॥
म्हणून निष्काम कर्म करीत रहावे. परंतू कर्माच्या फळावर नजर ठेऊ नये. जसे मंत्र जाणणाऱ्यास भुताची बाधा होत नाही,
235-2
तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि । हा असताचि उपाधि । आकळू न सके ॥235॥
त्याप्रमाणे अंतःकरणात आसक्ती न ठेवता (अनासक्त) भावाने कर्म करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली,.हा उपाधित (देह धारण करून देखील) असूनही उपाधी त्याला बाधा करू शकत नाही.
236-2
जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥236॥
ज्या बुद्धीत (योगी, संत, परमतत्व स्वरूप ब्रम्हस्थितीस प्राप्त झालेले असे) कर्मफळांचा प्रवेश होत नाही. जी सूक्ष्म व निश्चल झालेली आहे आणि जिला (सात्विक, राजस, तामस) तीन गुणांचा मूळीच स्पर्श होत नाही,
237-2
अर्जुना ते पुण्यवशे । जरी अल्पचि हृदयी बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥237॥
अर्जुना ! सद्बुद्धी जर अनंत जन्मीच्या पुण्याईने थोडीशीच अंतःकरणात (प्रकाशित) प्रगट झाली, तर तेवढ्यानेच संसाराचे संपूर्ण भिती नाहिसे होते.
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम् ॥2.41॥
भावार्थ :-
हे अर्जुना, येथे (कर्मयोगात) निश्चयात्मक (इश्वरनिष्ठ) बुद्धी एकच असते. (अज्ञानी, चंचल, सकामी) अनिश्चित व्यक्तींची बुद्धी (वृक्षाच्या शाखेप्रमाणे) अनेक भेदानी युक्त अशा अनंत बुद्धी असतात.
238-2
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजाते प्रगटी । तरी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणो नये ॥238॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असते, पण, तिचा मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे अंतःकरणातील निष्काम कर्माची सद्बुद्धी (अल्प जरी असली तरी तीला) लहान (म्हणजेच महान आहे) आहे, असे म्हणू नये.
239-2
पार्था बहुती परी । हे अपेक्षिजे विचारशूरी । जे दुर्लभ चराचरी । सद्वासना ॥239॥
हे अर्जूना ! विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण या चाराचात सद्बुद्धी ही सहज प्राप्त होणे (शक्य नाही) ही दूर्लभ आहे.
240-2
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । का अमृताचा लेशु । दैवगुणे ॥240॥
ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, पण ‘परीस’ काही मिळत नाही, किंवा ‘लेशमात्र अमृत’ सापडण्यास तसाच दैवयोग लागतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-2
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥241॥
त्याप्रमाणेच, परमेश्वराशी एकरूपता प्राप्त (परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय) अशी ही सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी संगरालाच मिळते,
242-2
तैसी ईश्वरावाचूनि काही । जिये आणिक लाणी नाही । ते एकचि बुद्धि पाही । अर्जुना जगी ॥242॥
त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून दुसरे आश्रयस्थान नाही, (ईश्वरप्राप्ती शिवाय इतर काहीही प्राप्त करणे नाही) (किंवा अंतिम ध्येय ईश्वर प्राप्तीच करणे) अर्जुना, अशी या जगामध्ये जगात एकच सद्बुद्धी आहे, हे जाण.
243-2
येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥243॥
(सद्बुद्धी शिवाय,) इतर त्या दूर्बुद्धीच आहेत.अशा दूर्बुद्धीत अनेक विकार (अविचार) उत्पन्न होतात. आणि आशा बुद्धीच्या ठिकाणी अविचारी लोक रममाण (रमून गेलेले असतात) होतात.
244-2
म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाही ॥244॥
म्हणून हे पार्था ! आशा (अविवेकी, अविचारी) लोकांना स्वर्ग, संसार किंवा नरकावस्था हे प्राप्त हातात.परंतू त्यांना आत्मसुखाच (आत्मानंदाचे अनुभव) मुळीच दर्शन होत नाही.
यामिना पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥2.42॥
भावार्थ :-
हे अर्जुना, वेदांच्या नुसत्या बाह्य अर्थवादात रममाण झालेले अविवेकी लोक (स्वर्गसुख व त्याचे साधन जे कर्म याशिवाय) सकाम कर्मशिवाय दुसरे काही नाही, अशी शोभायुक्त (मनोहर दिसते) दिखाऊ वाणी (वेदांची पुष्पित, किंवा रोचक वाणी तिच्या) च्या आधाराने बोलतात.
245-2
वेदाधारे बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळी आसक्ती । धरूनिया ॥245॥
असे (अविचारांच्या अधिन) असणारे लोक वेदांतील वाचनाचा आधारा घेऊन बोलतात. (केवळ फलाची अपेक्षा ठेवूनच कर्म करतात) केवळ कर्मभागाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, कर्मफळाची आसक्ती, लोभ त्यांच्या हृदयात असते.
246-2
म्हणती संसारी जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥246॥
ते म्हणतात, मृत्यूलोकी जन्माला यावे, यज्ञादि कर्मे करावीत व आल्हाददायक असे मनोहर स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा.
247-2
एथ हे वाचूनि काही । आणिक सर्वथा सुखचि नाही । ऐसे अर्जुना बोलती पाही । दुर्बुद्धि ते ॥247॥
मृत्युलोकी, (इहलोकी)उपभोगाच्या सुखासारखे दुसरे सुख नाही, असे द्रूबुद्धी असलेले लोक नेहमी असे (बोलतात) म्हणतात. अर्जुना हे तू जाण.
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविषेश्बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥2.43॥
भावार्थ :-
विषयभोगाविषयी तत्पर व स्वर्गसुखाच्या मागे लागलेले, भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसंबंधाने जीच्यामध्ये अनेक कर्माचे वर्णन केले आहे. जी जन्मरूप कर्मफल देणारी अशी बोली बोलणारे,
248-2
देखे कामना अभिभूत । होऊनि कर्मे आचरत । ते केवळ भोगी चित्त । देऊनिया ॥248॥
असे पाहा की, हे अविचारी लोक सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून (कामना आसक्त होवून) (भोगजण्य सुखावर), फळाची इच्छा मनात धरून ते कर्मे करतात.
249-2
क्रियाविशेषे बहुते । न लोपिती विधीते । निपुण होऊनि धर्माते । अनुष्ठिती ॥249॥
शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे अनेक प्रकारची (अनुष्ठाने मनलावून) कर्मे करतात. आणि त्यात निपुण होऊन यत्किंचितहि चूक न होऊ देता अगदी दक्षतेने धर्माचरण करतात.
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥2.44॥
भावार्थ :-
त्या वाणीद्वारा ज्यांचे चित्त हरण केलेले आहे, तसेच भोग व ऐश्वर्य यांची आसक्ती असणाऱ्या (ज्यांची विवेकबुद्धी झाकलेली आहे) अशा पुरुषांच्या अंतःकरणांमध्ये भगवंताशी एकरूप असणारी सद्बुद्धी असत नाही. (उदभवत नाही)
250-2
परि एकचि कुडे करिती । जे स्वर्गकामु मनी धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥250॥
अर्जूना, हे लोक एकच गोष्ट फार वाईट करतात, ती ही की, ते मनामध्ये स्वर्गसुखाची इच्छा धरतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा, त्यालाच नेमके विसरतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-2
जैसा कर्पुराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे । का मिष्टानी संचरविजे । काळकूट ॥ 251 ॥
ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे.
252-2
दैवे अमृतकुंभ जोडला । तो पाये हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणे ॥ 252 ॥
किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात.
253-2
सायासे पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखे ॥ 253 ॥
मोठ्या सायासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी ? पण पहा, ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे ?
254-2
जैसे रांधवणी रससोय निकी । करुनिया मोले विकी । तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु ॥ 254 ॥
ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात.
255-2
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तया वेदवादरता । मनी वसे ॥255॥
म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामधे मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव.
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥2-45॥
अर्थहे अर्जुना, वेद त्रिगुणात्मक (संसाराचे) प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत हो, द्वंद्वरहित हो, नित्य सत्वगुणी हो, योगक्षेमरहित हो आणि आत्मनिष्ठ हो. आत्मसुखाला विसरू नकोस.
256-2
तिन्ही गुणी आवृत्त । हे वेद जाणे निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्विक ते ॥256॥
तू असे नि:संशय समज की वेद हे सत्व, रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत.
257-2
येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥257॥
आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत.
258-2
म्हणोनि तू जाण । हे सुखदुःखासीच कारण । एथ झणे अंतःकरण । रिगो देसी ॥ 258 ॥
म्हणून हे केवळ सुखदु:खाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस.
259-2
तू गुणत्रयाते अव्हेरी । मी माझे हे न करी । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणी ॥ 259 ॥
तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझेपण धरू नकोस. पण अंत:करणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस.
यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः॥ 2.46 ॥
260-2
जरी वेदे बहुत बोलले । विविध भेद सूचिले । तर्ही आपण हित आपुले । तेचि घेपे ॥ 260 ॥
जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत.अनेक प्रकारचे साधन मार्ग सूचविले आहेत, तरी *आपण त्यातिल आपले हित ज्यात आहे तेच घ्यावे.
261-2
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥261॥
जसे सूर्योदय झाला की, सर्वच रस्ते दिसू लागतात; म्हणून त्या सर्वच मार्गांनी आपण जाऊ शकतो काय ? सांग बरे मला.
262-2
का उदकमय सकळ । जर्ही जाहले असे महीतळ । तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगे ॥262॥
अथवा, पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले, तरी आपण आपल्याला हवे तेवढे पाणी घेतो.
263-2
तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती । मग अपेक्षित ते स्वीकारिती । शाश्वत जे ॥263॥
त्याप्रमाणेच जे ज्ञानी आहेत, (ते विचारवान मुमुक्षू आहेत).ते वेदार्थाचा विचार करतात आणि आपल्याला अपेक्षित अशा शाश्वत परब्रम्हतत्वाचाच फक्त स्विकार करतात.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥2.47॥
भावार्थ :-
अर्जुना ! तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मफळांचा अधिकारी तू कधी होऊ नकोस. कर्माच्या फळाची इच्छादेखील धारण करू नकोस आणि कर्म न करण्याविषयीही आग्रह धरू नकोस.
264-2
म्हणौनि आइके पार्था । याचिवरी पाहता । तुज उचित होय आता । स्वकर्म हे ॥264॥
म्हणून अर्जूना, ऐक. या सर्व गोष्टींचा विचार करून पाहिले, असता तूला आता स्वकर्मच करणे उचित (निश्चित फलप्रद)आहे.
265-2
आम्ही समस्तही विचारिले । तव ऐसेचि हे मना आले । जे न संडिजे तुवा आपुले । विहित कर्म ॥265॥
आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पहिला, त्यावेळी असे दृष्टिस आले की आपले विहीत कर्म आपण कधीही सोडू नये.
266-2
आम्ही समस्तही विचारिले । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥266॥
मात्र हे (विहीत कर्म करताना) या कर्माचे फल मिळेल ही इच्छा ठेवू नये. आणि निषिद्ध कर्माचे आचरण होऊ नये. म्हणून या सत्कर्माचेच निष्काम वृत्तीने आचरण करावेस.
योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥2.48॥
भावार्थ :-
हे धनंजया ! तू आसक्तीचा त्याग करून पूर्ण व अपूर्ण यामध्ये समान बुद्धी ठेऊन योगस्थ स्थितीने कर्मे कर. असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग् म्हणतात.
267-2
तू योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देऊनी । करी कर्मे ॥267॥
अर्जूना तू समतारुपी योगाने युक्त हो, फलाची इच्छा टाकून मन एकाग्र करून कर्मे कर.
268-2
परी आदरिले कर्म दैवे । जरी समाप्तीते पावे । तरी विशेषे तेथ तोषावे । हेही नको ॥268॥
आणि आरंभिलेले कर्म दैवयोगानेच यथासांग पूर्ण झाले.तरी त्याचा विशेष संतोष मानू नकोस.
269-2
का निमित्ते कोणे एके । ते सिद्धी न वचता ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखे । क्षोभावे ना ॥269॥
किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस गेले नाही, अर्थवट राहिले, तरी त्याबद्दल मनात असंतोष मानू नकोस व मनाला त्रासहि करून घेऊ नकोस.
270-2
आचरता सिद्धी गेले । तरी काजाचि कीर आले । परी ठेलियाही सगुण जहाले । ऐसेचि मानी ॥270॥
कर्म करताना जर ते शेवटास गेले (सफल झाले) तर ते खरोखर आपल्या उपयोगाला आले; परंतू कदाचित काही विघ्ने येऊन जर कर्म अपुरे राहिले, तरीही ते सफलच झाले, असे समजावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-2
देखे जेतुलाले कर्म निपजे । तेतुले आदिपुरुषीं जरी अर्पिजे । तरी परीपूर्ण सहजे । जहाले जाणे ॥271॥
कारण असे पाहा की, जेवढे म्हणुन आपल्या हातून कर्म होईल, ते सर्वच ईश्वरचरणी अर्पण केले, म्हणजे सहजच परिपूर्ण झाले, असे समज.
272-2
देखे संतासंती कर्मी । हे जे सरिसेपण मनोधर्मी । तेचि योगस्थिति उत्तमी । प्रशंसिजे ॥272॥
अर्जूना हे पाहा ! पूर्ण आणि अपूर्ण (किंवा चांगले – वाईट) कर्माविषयी (बाबतीत आपले मन) मनाचा समतोलपणा राखणे, हीच योगस्थिति होय. याच योग्यस्तिथीची प्रशंसा करतात.
दूरेण ह्यत्वरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विछ कृपणाः फलहेतवः ॥2.49॥
भावार्थ :-
हे अर्जुना, निष्काम बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मपेक्षा (फळाच्या इच्छेने) सकाम कर्म अत्यन्त निकृष्ट होय. तू समत्वबुद्धीचा आश्रय घे. फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे दीन होत.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत्दुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं ॥2.50॥
भावार्थ :-
समत्वबुद्धियुक्त मनुष्य या लोकीच पुण्य व पाप या दोन्हीचा त्याग करतो. म्हणून समत्वबुद्धीयोग साध्य करून घेण्याचा प्रयत्न कर. कारण योग म्हणजे कर्माचे कौशल्य होय. (म्हणजेच प्रम्यात्म्याच्या चरणी कर्म अर्पण करणे)
273-2
अर्जुना समत्व चित्ताचे । तेचि सार जाण योगाचे । जेथ मना आणि बुद्धीचे । ऐक्य आथी ॥273॥
अर्जूना ! यशपयशी चित्ताची समता हे योगाचे सार आहे.या योगात मन (क्रिया)व बुद्धी (ज्ञान) यांचे ऐक्य असते. (म्हणजे मनाचा संकल्प, व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो हे वैशिष्ट्य)
274-2
तो बुद्धियोग विवरिता । बहुते पाडे पार्था । दिसे हा अरुता । कर्मभागु ॥274॥
पार्था ! या बुद्धीयोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली, तर अनेक प्रमानांनी सकाम कर्मयोग कमी प्रतीचा वाटतो.
275-2
परि तेचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जे कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥275॥
परंतु सुरुवातीला तेच सकाम कर्म जेंव्हा करावे तेंव्हाच (पुढे) निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. त्या कर्माचे (निरहंकार व निष्काम बुद्धीने आचरण केले तरच हा बुद्धीयोग साध्य होतो) या कर्माची (शेवटची अवस्था) उत्तरावस्था तीच योगस्थिती होय.
276-2
म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनि करी अव्हेरु । फळहेतूचा ॥276॥
म्हणून हे अर्जुन ! बुद्धीयोगच श्रेष्ठ आहे, म्हणुन फलेच्छा न धरता या योगाचे ठिकाणी तू निश्चल हो. (स्थिर हो.) आपले मन स्थिर कर.
277-2
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इही उभय संबंधी सांडिले । पापपुण्यी ॥277॥
ज्यांची बुद्धीयोगाकडे प्रवृत्ती झाली, तेच (संसार रुपी)भवांतून पार पडले.आणि तेच पाप व पूण्य या दोन्हीच्या बंधनातून सुटले.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥2.51॥
भावार्थ :-
बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करतात. म्हणून ते ते जन्म- मृत्यू च्या बंधनातून मुक्त होऊन व परमपदाला प्राप्त होतात.
278-2
ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति लोपती । अर्जुना तया ॥278॥
अर्जूना, त्यांनी कर्म जरी केली, तरी त्यांच्या मनात कर्माच्या फलाची इच्छा धरीत नाहीत. त्यामुळे त्यांची जन्ममरणाच्या फेर्यातुन नेहमीचीच सुटका होते.
279-2
मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥279॥
हे धनुर्धरा ! मग हे बुद्धीयोगी लोक सर्वोपद्रव रहित, ब्रम्हानंद भरित, अढळ, अविनाशी, अशा परमात्म-स्वरूपाला प्राप्त होतात.
यदा ते मोहकलिलं बुद्धुर्व्यतितरिष्यति ।
तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥2.52॥
भावार्थ :-
जेंव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकांतून पूर्णपणे तरुन जाईल, त्यावेळी तू जे ऐकलेले आहेस आणि जे तुला ऐकावयाचे आहे, त्याबद्दल तू सहज विरक्त होशील.
280-2
तू ऐसा तै होसी । जै मोहाते या सांडिसी । आणि वैराग्य मानसी । संचरेल ॥280॥
अर्जुना, ज्या वेळी (तू स्वजनांचा) मोहाचा त्याग करशील, त्या वेळी (तुझ्या मनात) आपोआपच वैराग्य (उत्पन्न) संचार होईल आणि तू मुक्त होशील. (मगच तू बुद्धीयोगयुक्त स्थितीत प्राप्त होशील.)
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-2
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणे निचाडे होईल मन । अपैसे तुझे ॥281॥
त्यामुळे तुला निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान (तुझ्या ठिकाणी) उत्पन्न होईल व तुझे अंतःकरण सर्वप्रकारे सहजच निरिच्छ होईल. (कोणतीच इच्छा नसलेले)
282-2
तेथ आणिक काही जाणावे । का मागिलाते स्मरावे । हे अर्जुना आघवे । पारुषेल ॥282॥
अर्जूना ! अशी तुझ्या मनाची स्तिथी झाल्यावर आणखी काही मिळवावे, काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टीचे स्मरण करावे, या सर्वच (क्रिया) गोष्टी थांबतात.
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥2.53॥
भावार्थ :-
वेदांतील विविध कर्मफलाच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याचे स्वरूपी ज्या वेळी स्थिर होईल, त्या वेळी तुला समत्वरूप प्राप्त होईल.
283-2
इंद्रियांचिया संगती । जिये पसरु असे मती । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपी ॥283॥
इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी विषयाकडे पसरलेली असते., ती बुद्धी आत्मस्वरूपाला प्राप्त झाली, की सहजपणे स्थिर होते.
284-2
समाधिसुखी केवळ । जै बुद्धि होईल निश्चळ । तै पावसी तू सकळ । योगस्थिति ॥284॥
समाधीसुखात(शुद्ध आत्मसुखाचे) ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तेंव्हा तुला योगस्थिती (निष्काम कर्मयोग) प्राप्त होईल.
अर्जुन उवाच:
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम् ॥2.54॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, हे केशवा ! अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत ? तो स्थिरबुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो ? कसा असतो ? आणि कर्म कसे करतो ?
285-2
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आता सांगावा । कृपानिधि ॥285॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा ! हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो; हे करूणासागरा, आपण तो स्पष्टपणे सांगावा.
286-2
मग अच्युत म्हणे सुखे । जे किरीटी तुज निके । ते पूस पा उन्मेखे । मनाचेनि ॥286॥
त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, ” अर्जुना ! जे तुला विचारायचे आहे, ते समाधानी मनाने विचारावे. “
287-2
या बोला पार्थे । म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते । काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते । वोळखो केवी ॥287॥
हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा ! स्थितप्रज्ञ (ज्याची बुद्धी स्थिर आहे तो) कोणाला म्हणावे.व त्यास ओळखावे कसे ? हे उघड करून सांगा बरे !
288-2
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसा चिन्ही जाणिजे । जो समाधिसुख भुंजिजे । अखंडित ॥288॥
ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली आहे. (ज्याला स्थिरबुद्धी म्हणतात), व जो नेहमी समाधीसुखात रममाण झाला आहे, (असतो) त्याला कोणत्या लक्षणानी ओळखावे.
289-2
तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे । देवा सांगावे हे ऐसे । लक्ष्मीपती ॥289॥
हे लक्ष्मीपती देवा ! तो कोणत्या स्थितीत असतो ? व कोणत्या प्रकारे आचरण करत असतो ? हे कृपा करून मला सांगावे.
290-2
तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥290॥
तेव्हा षड्गुण एश्वर्य संपन्न 【यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आणि ऎश्वर्य 】 या सहा गुणांचा (अधिष्ठान व परब्रम्ह) आश्रयस्थान असा जो भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. (ते ऐकावे)
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्रीभगवानुवाच:
प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥2.55॥
भावार्थ :-
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना जेंव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो व स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, तेंव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात.
291-2
म्हणे अर्जुना परियेसी । हा अभिलाषु प्रौढ मानसी । तो अंतराय स्वसुखेसी । करीत असे ॥291॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! ऐक, मनामध्ये जी उत्कट विषयासक्ती असते, तीच आत्मनंदानुभवाला प्रतिबंध (विघ्ने)निर्माण करते.
292-2
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु । परि विषयामाजि पतितु । जेणे संगे कीजे ॥292॥
जो सर्वदा सुखतृप्त असतो, ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते; परंतु अशा जिवात्म्याचेही ज्याच्या (कामाच्या) संगतीने पुरूष विषयासक्त होऊन पतन होते.
293-2
तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषी मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥293॥
ज्याचा मनातुन कामेच्छा पूर्णपणे निघून जाते, ज्याचे मन आत्मसंतोषात रममाण असते, तोच पुरूष स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धि होय असे जाण.
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते ॥2.56॥
भावार्थ :-
दुःखे आली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असता जो त्याच्या विषयी निरिच्छ असतो. ज्याच्या अंथकरणातून काम, भय आणि क्रोध गेलेली असतात, असा जो मुनी, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे.
294-2
नाना दुःखी प्राप्ती । जयासी उद्वेगु नाही चित्ती । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥294॥
नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या मनात उद्वेग्न उत्पन्न होत नाही, आणि जो सुखाच्या इच्छेमध्ये अडकला जात नाही,
295-2
अर्जुना तयाच्या ठायी । कामक्रोधु सहजे नाही । आणि भयाते नेणे कही । परिपूर्ण तो ॥295॥
अर्जुना, त्या सत्पुरूषाचे अंतःकरणात काम क्रोध सहजच नाहिसे झालेले असतात, तो सर्वकाळी भयमुक्त असतो. विश्वचैतन्याशी एकरूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो.
296-2
ऐसा जो निरवधि । तो जाण पा स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥296॥
असा जो अमर्याद आणि सर्व प्रकारच्या उपधींचा त्याग करून भेदराहित झालेला असतो, तो स्थिरबुद्धी होय, असे समज.
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिननंदंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2.57॥
भावार्थ :-
ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे.
297-2
जो सर्वत्रा सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु का जैसा । अधमोत्तम प्रकाशा – । माजी न म्हणे ॥297॥
(स्थिरबुद्धी पुरूष लक्षणे) पौर्णिमेचा चंद्र जसा आपला प्रकाश देताना चांगला अथवा वाईट असा भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने (प्रेमाचा वर्षाव करीत) वागत असतो.
298-2
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतामत्री सदयता । आणि पालटु नाही चित्ता । कवणे वेळे ॥298॥
अशी ज्याची सर्व भूतमात्राविषयी अखंड समता आणि दयाळू भाव असतो.त्याच्या शुद्ध चित्ताची स्थिती कधीही बदलत नाही.
299-2
गोमटे काही पावे । तेणे संतोषे तेणे नाभिभवे । जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥299॥
काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्टी प्राप्त झाल्यामुळे तो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही. (प्रतिकूल विषयाच्या प्राप्ती नंतरही दुःखाच्या तावडीत सापडत नाही)
300-2
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो पा जाण प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥300॥
याप्रमाणे जो हर्षशोक रहित असतो व नेहमी आत्मानुभिती संपन्न असतो.तोच स्थिरबुद्धी होय, असे अर्जुना जाण.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः ।
इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2.58॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजुंनी आपल्या इच्छेप्रमाणे आत ओढुन घेतो, त्याप्रमाणे (तो) पुरुष जेंव्हा आपली इंद्रिये, इंद्रियांच्या विषयापासून आवरून धरतो, तेंव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.
301-2
का कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना इच्छावशे आवरी । आपुले आपण ॥301॥
किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव जसे पसरते, अथवा मनाला वाटेल तेव्हा आपले अवयव आपणच आवरून घेते,
302-2
तैसी इंद्रिये आपैती होती । जयाचे म्हणितले करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥302॥
त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन (स्वतःच्या ताब्यात) असतात व ही इंद्रिये त्याच्या इच्छेनुसार (आज्ञा करीन तशी) वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, असे समजावे.
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥2.59॥
भावार्थ :-
आहार न घेणाऱ्या पुरुषांचे (रसविषय सोडून) विषय नाहीसे होतात. त्यांच्या ठिकाणी फक्त प्रीती उरते. पण परब्रह्मचे ज्ञान झाल्यावर (निर्माण झालेला हा रसविषय) विषयांची गोडीदेखील नाहीशी होते.
303-2
आता अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐके कवतिक । या विषयाते साधक । त्यजिती नियमे ॥303॥
अर्जुना !, आता आणखी एक कौतुकाची गोष्ट सांगतो, ऐक, जे साधक नित्य नियमाने निग्रहाने विषयांचा त्याग करतात,
304-2
श्रोत्रादि इंद्रिये आवरती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयी इही ॥304॥
श्रोत्रादि विषयापासून इंद्रियांना आवरतात, परंतु जिभेला मात्र आळा घालीत नाहीत, त्यांना हर विषय हजारो प्रकारांनी गुंतवून टाकतात.
305-2
जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळी उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥305॥
ज्या प्रमाणे एखाद्या झाडाची फक्त वर वरची पाने, पालवी खुडून टाकली आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घातले; तर त्या झाडाचा संपूर्ण नाश कसा बरे होईल ? ?
306-2
तो उदकाचेनि बळे अधिके । जैसा आडवोनि आंगे फांके । तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारे ॥306॥
ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे जसा आडव्या अंगाने अधिकच विस्तार पावू लागते त्या प्रमाणे ह्या (जिभेच्या) रसेंद्रियांच्या द्वाराने (हवा तसा अन्नरस घेतला असता) अंतःकरणात विषयवासना पोसल्या जाऊन अधिकच वाढत राहतात.
307-2
येरा इंद्रिया विषय तुटे । तैसा नियमू न ये रस हटे । जे जीवन हे न घटे । येणेविण ॥307॥
ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय (निग्रहाने) प्रयत्नाने कमी करता येतात; पण त्याप्रमाणेच जिभेचा विषय प्रयत्नाने कमी करता येत नाही. कारण त्यावाचून (शरिराच्या क्रिया चालत नाहीत) जगणे शक्य नाही.
308-2
मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमाते पावे । जै परब्रह्म अनुभवे । होऊनि जाईजे ॥308॥
पण अर्जुना ! (मग या रसनेद्रियाचा (जिभेचा)विषय तुटावा कसा ? तर माऊली म्हणतात) जो साधक परब्रम्हाशी एकरूपतेचा (अनुभवाद्वारा) ब्रम्हरूप होईल, तेव्हाच रसनेद्रियाची लालसा शिथिल होईल. मग आशा वेळी रसनेचे नियमन होऊ शकते.
309-2
तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती । सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥309॥
ज्या वेळी ते ब्रह्म मीच आहे, असा साक्षात्कारात्मक अनुभव येतो.त्यावेळी शरिराचे व्यवहार नाहिसे होतात आणि इंद्रिये ही आपआपल्या विषयांना विसरुन जातात.
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥2.60॥
भावार्थ :-
कारण हे अर्जुना ! (रसबुद्धि शिल्लक राहिल्यामुळे) बुद्धिमान पुरुष इंद्रियांचा विषयांशी संयोग न होऊ देण्याकरिता (बुद्धी स्थिर होण्याकरिता) कितीही प्रयत्न करीत असला, तरी अतिशय बलवान इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने (विषयांकडे ओढतात) मोहित करतात.
310-2
येर्हवी तरी अर्जुना । हे आया नये साधना । जे रहाटताती जतना । निरंतर ॥310॥
एरव्ही अर्जुना ! (ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत) यांना (इंद्रियांना) जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात (स्वाधीन ठेवण्याकरिता खटपट करतात), त्यांनादेखील ही इंद्रिये स्वाधीन करता येत नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-2
जयाते अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती ॥311॥
जे साधक आपल्या भोवती (इंद्रियांना कोंडून ठेवण्यासाठी) साधनेची घरटी बांधतात, यमनियमाचे मनाला कुंपन घालतात आणि मनाला सदैव मुठीत धरून बसतात,
312-2
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञाते विवसी । भुलवी का ॥312॥
अशा साधकाला सुद्धा ही इंद्रिये विषय (भोगण्याकरीता)व्याकुळ करतात, एवढा या इंद्रियांचा प्रताप आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकाला एखादी हडळदेखील फसवीत असते,
313-2
देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषे । मग आकळती स्पर्शे । इंद्रियांचेनि ॥313॥
त्याप्रमाणे पाहा, हे विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने (साधनेच्या तपाच्या माध्यमातून) प्राप्त होतात. व इंद्रिया संबंधद्वारा योग्यांचीही मने गुरफटून टाकतात.
314-2
तिये संधी मन जाये । मग अभ्यासा ठोठावले ठाये । ऐसे बळकटपण आहे । इंद्रियांचे ॥314॥
अशा कचाट्यात मग हे मन (इंद्रियांच्या)सापडले की, (अभ्यास जागच्या जागी राहतो) अभ्यासदेखील जागृत होत नाही, इंद्रियांचा जोर हा असा आहे.
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2.61॥
भावार्थ :-
कर्मयोगी साधकाने सर्व इंद्रियांना वश करून मन माझ्याकडे ” (परमात्मा श्रीकृष्णा) ” स्थिर करावे. ज्याने इंद्रियांवर विजय मिळविला आहे, त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.
315-2
म्हणोनि आइके पार्था । याते निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयी आस्था । सांडूनिया ॥315॥
म्हणून अर्जुना, ऐक. (अगदी मनापासून) अंतःकरणापासून जो सर्व विषयांची आसक्ती सोडून (इच्छा सोडून या इंद्रियांना सर्वतोपरी दमन करून)इंद्रियावर विजय मिळवतो, (इंद्रिये आपल्या स्वाधीन ठेवतो),
316-2
तोचि तू जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखे । अंतःकरण झकवेना ॥316॥
ज्याचे अंतःकरण विषयाचे सुखाने भूलुन (फसले) जात नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य अधिकारी आहे.
317-2
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो माते हृदयाआंतु । विसंबेना ॥317॥
त्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते, तो (नेहमी आत्मज्ञानाने संपन्न होवून राहतो) अंतःकरणात मला कधीच विसरत नाही.
318-2
एर्हवी बाह्य विषय तरी नाही । परी मानसी होईल जरी काही । तरी साद्यंतुचि हा पाही । संसारु असे ॥318॥
एर्हवी जरी एखाद्या साधकाने (शब्दादि) बाह्य़ विषयाचा त्याग केला, पण मनात जर विषयाची थोडीशीही वासना (विषय उपभोगण्याची लालसा) असेल, तर त्याला संसाराची बंधने जखडून ठेवतात. (जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. म्हणून विषयाची किंचित ही अभिलाषा नसावी)
319-2
जैसा का विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥319॥
ज्याप्रमाणे (मनात एखादा लालसा निर्माण करणारा विचार) विषाचा एक थेंब जरी घेतला, (फार होतो जीवन नष्ट करायला) तरी तो सर्व शरीरात पसरून जीवनाचा नाश करतो.
320-2
तैसी या विषयांची शंका । मनी वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥320॥
त्याप्रमाणे पाहा, या विषयातून सुख मिळते काय, (मनात विषयांची सूक्ष्म संस्काररूप थोडी जरी इच्छा राहिली) अशी शंका जरी मनात निर्माण झाली, तरी अंतःकरणातील विवेकाचा ती घात करते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ध्यायतो विषयान्पुंसः सङगस्तेषूपजायते ।
सङगात्संजायते कामः कामात्क्रोधोभिजायते ॥2.62॥
क्रोधाद् भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥2.63॥
भावार्थ :-
विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्ती मूळे काम, (इच्छा) उत्पन्न होते, (इच्छेच्या आड) कामामुळे क्रोध उत्पन्न होतो, क्रोधापासून अविवेकी, संमोह, समोहापासून स्मरणशक्ती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती भ्रष्ट झाल्यामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे मानवाचे पतन होऊन मानवाचा दानव बनतो. (त्या मानवाचा नाश होतो, दुष्ट विचार मनात उत्पन्न होतात)
321-2
जरी हृदयी विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥321॥
अरे ! अंतःकरणात जर विषयांची नुसती आठवण जरी असेल (किंवा झाली) (भोग घ्यावा अस फक्त वाटल) तरी, विरक्तालाही (जो सगळ्या गोष्टी पासून विरक्त झाला आहे असा तो) पुनः त्या विषयाची ओढ उत्पन्न होते. त्या आसक्तीमुळे (विषयसक्तीनेच काम), विषयप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते.
322-2
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधीचि आला । क्रोधी असे ठेविला । संमोह जाणे ॥322॥
जेथे काम उत्पन्न झाला, तेथे क्रोध आधिच आलेला असतो : (क्रोधाचे बिऱ्हाड आगोदरच ठेवलेले असते) आणि या दोहोंच्या बरोबरच तेथे अविचाराचा भ्रम निर्माण होतो.
323-2
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चंडवाते ज्योति । आहत जैसी ॥323॥
ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्याने दिवा नाहिसा होतो, तसेच संमोह झाला की अविचाराने स्मृती नाश पावते,
324-2
का अस्तमानी निशी । जैसी सूर्यतेजाते ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशी । प्राणियांसी ॥324॥
सूर्य मावळण्यांची वेळ होताच रात्र जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते, त्या प्रमाणे स्मृतिभ्रंश झाल्यावर मनुष्याची तशी दयनीय (दुर्देशा) दशा होते.
325-2
मग अज्ञानांध केवळ । तेणे आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजी ॥325॥
मग सर्वत्र (ज्ञानाचा लोप होतो) अज्ञानाने केवळ अंधार होतो आणि तो शरीरातील सर्व गोष्टींना बुडविते. त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाहीत आणि अंतरातील बुद्धी ही व्याकुळ होऊन जाते.
326-2
जैसे जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धावे । तैसे बुद्धीसि होती भवे । धनुर्धरा ॥326॥
जसे जन्मांधाला काही कारणामुळे पळण्याची वेळ आली की तो अगतिकपणे (गोंधळुन जातो) दीन होऊन सैरावैरा (दिशाहीन)धावू लागतो.त्याप्रमाणे अर्जुना बुद्धिला भ्रांती होते.
327-2
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हे उपडे । ज्ञानजात ॥327॥
अशा प्रकारे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजुंनी (घोटाळ्यात पडते, कुचंबणा होते) चक्रात सापडते. त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते.
328-2
चैतन्याचां भ्रंशी । शरीरा दशा जैशी । पुरुषा बुद्धिनाशी । होय देखे ॥328॥
शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे देहाची शरीराची जशी दशा होते. तशीच स्थिती बुद्धी नष्ट झाल्यावर त्या जिवाची होते.
329-2
म्हणोनि आइके अर्जुना । जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना । मग प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरो शके ॥329॥
म्हणून अर्जुना ! ऐक. जळणाला (ज्वलनशील पदार्थाला) एखादी लहान ठिनगी (मनात एखादा दुष्ट विचार, अविचार,) जर लाकडाला लागली व ती एकदा का भडकली (मोठा अग्नी प्रज्वलित होतो) मग तीच लहान ठिनगी त्रिभुवनाला देखील जाळण्यास समर्थ होते.
330-2
तैसे विषयांचे ध्यान । जरी विपाये वाहे मन । तरी येसणे हे पतन । गिंवसीत पावे ॥330॥
त्याच प्रमाणे मनाकडून नकळत देखील विषयांचे स्मरण, चिंतन अंतःकरणात (चुकून यत्किंचितही जरी झाले,) तरी एवढा (अनर्थ,) पतन त्यास शोधित येतें.
331-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
रागद्वेषवियुकतैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥2.64॥
भावार्थ :-
ज्या पुरुषाने आपले अंतःकरण ताब्यात ठेवले आहे, जो प्रीति व द्वेष रहित आहे, त्याने (त्याने म्हणजे कोण ? आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी असा तो) विषयाचा उपभोग घेतला असता अशा पुरुषास अंतःकरणाची (मनाची) प्रसन्नता अखंड राहते.
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावे । नाशतील ॥331॥
म्हणून (साधकाने) हे सर्व विषय मनातून काढून टाकावे. (अर्थातच विषयातील अनित्यत्व, जडत्व, मिथ्यात्वादि दोषदर्शनाने त्यापासून परावृत्त व्हावे.) म्हणजे राग, प्रिती, आणि द्वेष हे आपोआपच नाहीसे होतील.
332-2
पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष । तरी इंद्रिया विषयी बाधक । रमता नाही ॥332॥
पार्था ! आणखी एक गोष्ट ऐक. राग आणि द्वेष नाहिसे झाल्यावर, जरी इंद्रिये विषयाचे ठिकाणी कदाचित रममाण झाली तरी ते विषय साधकाला बाधक होत नाही.
333-2
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरी जगाते स्पर्शतु । तरी संगदोषे काय लिंपतु । तेथिचेनि ॥333॥
ज्याप्रमाणे सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी सार्या जगाला स्पर्श करतो, परंतु त्यांच्या संगदोषाने सूर्य लिप्त होतो काय ? (तर नाही)
334-2
तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥334॥
त्याप्रमाणे जो (ज्ञानी) विविध विषयांचे ठिकाणी उदासीन, अनासक्त असतो, आत्मनंदात रंगून गेलेला असतो, कामक्रोधा पासून अलिप्त असतो,
335-2
तरी विषयातुही काही । आपणपेवाचुनि नाही । मग विषय कवण कायी । बाधीतील कवणा ॥335॥
आणि ज्याला सर्व विषयामध्ये आपल्या आत्मस्वरूपाहून भिन्न असे दुसरे काही दिसत नाही, मग त्याला विषय कोणते, कोणाला आणि कशी बाधा करतील ? ?
336-2
जरी उदके उदकी बुडीजे । का अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगे आप्लविजे । परिपूर्ण तो ॥336॥
जसे पाण्यात पाणी बुडाले (बुडत नाही) किंवा अग्नीच्या ज्वालेने अग्नी पोळला गेला, (अग्नित अग्नि जळत नाही). तसेच परिपूर्ण (आत्मज्ञानाने परिपूर्ण) अवस्थेला पावलेला पुरूष विषयांचे संगतीने लिप्त होत नाही.
337-2
ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ । तयाचि प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानी ॥337॥
असा जो विश्वचैतन्याशी एकरूप होऊन राहतो (शुद्ध आत्मस्वरूप) होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, (स्थिरबुद्धि) असे तू निःसंशय समज.
338-2
प्रसादे सर्वदुःखाना हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥2.65॥
भावार्थ :-
चित्त प्रसन्न झाले, म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो. चित्त प्रसन्न असणाऱ्या साधकाची बुद्धी प्ररमात्मास्वरूपी लवकर स्थिर होते.
देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथे रिगणे नाही समस्ता । संसारदुःखा ॥338॥
असे पहा की, ज्याच्या चित्तात अखंड प्रसन्नता (मनाची निरंतर पूर्ण शांती) भरलेली आहे, तेथे कोणत्याही प्रकारचे संसार सुखदुःखांचा प्रवेश होत नाही.
339-2
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृष्णेचा अडदरु । कहीचि नाही ॥339॥
अरे ! ज्याच्या उदरात अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे, त्याला कधीही तहान-भुकेची (कधी पीडा अथवा) भीती नसते.
340-2
तैसे हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचे के आहे । तेथ बुद्धि आपैसी राहे । परमात्मरूपी ॥340॥
त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण परिपूर्ण प्रसन्न झाले आहे, त्याला दुःख कसले, आणि कोणाला होणार ? कारण तेथे त्याची बुद्धी आपोआपच परमात्मस्वरूपी स्थिर झालेली असते.
341-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥341॥
ज्याप्रमाणे निवार्यातील दिव्यांची ज्योत मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त म्हणजे जो स्थिरबुद्धि पुरुष (आत्मस्वरूप समाधीमध्ये) सत्स्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेला असतो.
342-2
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम् ॥2.66॥
भावार्थ :-
जो साधना करीत नाही, त्या पुरुषाच्या अंतःकरणात सद्बुद्धी नसते, आस्तिकभाव नसतो. अशा पुरुषाला शांती नसते; त्यामुळे त्याला सुख तरी कोठून मिळणार. (म्हणजेच ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती लाभणार नाही मग समाधान कसे प्राप्त होईल.)
ये युक्तीचि कडसणी । नाही जयाचां अंतःकरणी । तो आकळिला जाण गुणी । विषयादिकी ॥342॥
योगयुक्त होऊन राहण्याचा (म्हणजे योगबुद्धीचा) विचार ज्याच्या अंतःकरणात नाही, त्याला शब्दादिक विषय आपले पाशाने जखडून टाकतात.
343-2
तया स्थिरबुद्धि पार्था । कही नाही सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥343॥
हे अर्जुना ! स्थिरतेची इच्छा ज्याचा अंतःकरणात कधी उत्पन्न होत नाही, त्याची बुद्धी कधी स्थिर नसते. (स्थिरता लाभावी असे त्याची बुद्धी इच्छा सुद्धा करत नाही)
344-2
निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखे मना । तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥344॥
ज्या स्थिरपणाची नुसती भावनाही ज्याच्या मनाला शिवत नाही, तर अर्जुना त्याला शांतीचा लाभ कसा होणार ? ? (शांतीच लाभणार नाही)
345-2
आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाही । तेथ सुख विसरोनि न रिगे कही । जैसा पापियाचा ठायी । मोक्षु न वसे ॥345॥
जसे पापी मनुष्याकडे मोक्ष चुकूनदेखील पाहत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये शांती नाही, तेथे सुख नजर चुकीने सुद्धा (नकळत सुद्धा) प्रवेश करत नाही.
346-2
देखे अग्निमाजी धापती । तिये बीजे जरी विरुढती । तरी अशांत सुखप्राप्ती । घडो शके ॥346॥
असे पहा की ! विस्तवावर घातलेली (भाजलेली, करपलेली) धान्याची बी जर उगवली (नाही उगवणार) तसच हृदयात शांती नसलेल्या मनुष्यास सुखप्राप्ती होऊ शकेल. (तर नाहीच घडणार)
348-2
म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेचि सर्वस्व दुःखाचे । या कारणे इंद्रियांचे । दमन निके ॥347॥
म्हणूनच मनाचे चंचलत्व (त्यांचे नियमन न करणे) हेच सर्वतोपरी दुःखाचे कारण आहे. ह्या करीता (साधकाने) इंद्रियांचा दृढ निग्रह करणे हे आवश्यक आहे. (करणे हे चांगले आहे)
348-2
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥2.67॥
भावार्थ :-
कारण जे मन विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांच्या मागे धावत राहते, ते मन पाण्यातील नावेला वारा ज्याप्रमाणे भलतीकडे घेऊन जात असतो, त्याप्रमाणे मानवाच्या बुद्धीला वेगळ्याच मार्गाकडे घेऊन जातो.
ये इंद्रिये जे जे म्हणती । ते तेचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरिती । विषयसिंधु ॥348॥
(जे पुरूष) इंद्रिये जे जे म्हणतात तेच ते पुरुष करत असतात. (इंद्रियांच्या इच्छेनुसार वागतात), ते या विषयरूपी सागरातून आपण तरलो आहोत, असे त्यांना वाटते (असे म्हणत असतील) तरी, ते तरले नाहीत, असे समजावे.
349-2
जैसी नाव थडिये ठाकिता । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥349॥
जर एखादी नाव तीराजवळ आली आणि (त्याच वेळी प्रचंड वादळात सापडली गेली), त्याच वेळी प्रचंड वादळ उत्पन्न झाले, ती ज्या संकटांना चुकवून तीरापर्यंत आली त्याच आपत्तीत (संकटात) पुन्हा सापडते. (तोच अपाय तिला पोचतो)
350-2
तैसी प्राप्तेही पुरुषे । इंद्रिये लाळिली जरी कौतुके । तरी आक्रमिला देख दुःखे । सांसारिके ॥350॥
पाहा, आत्मप्राप्ती झालेल्या (पारमार्थिक पुरुषाने)(ज्ञानसंपन्न) पुरूषाने सहजपणे इंद्रियांचे कौतुकाने लाड केले, लाड पुरविले तरी तो पुन्हा संसार दुःखाच्या चक्रात पुन्हा सापडला जातो, असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तस्माद् यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2.68॥
भावार्थ :-
म्हणून हे महाबाहो, ज्या मानवाची इंद्रिये, इंद्रियांच्या विषयापासून संपूर्णपणे आवरलेली (अलिप्त) असतात, त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली, असे समज.
351-2
म्हणोनि आपुली आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया । तरी अधिक काही धनंजया । सार्थक असे ॥351॥
म्हणून हे धनंजया ! आपली ही इंद्रिये आपल्याच स्वाधीन झाली, (इंद्रियावर विजय प्राप्त केला,) तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे ? ? (याहुन मोठे मिळवावयाचे आहे काय ? ?)
352-2
देखे कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । ना तरी इच्छावशे आवरी । पापियाचा आपणपेचि ॥352॥
असे पाहा की, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले (हातपाय इत्यादी) अवयव पसरते किंवा मनात आले, तर अवयव आवरून घेत असते. (स्वइच्छेने)
353-2
तैसी इंद्रिये आपैती होती । जयाचे म्हणितले करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥353॥
त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये ताब्यात असतात (स्वाधीन), व तो म्हणेल त्या आज्ञेनुसार वागतात, त्यांची बुद्धी स्थिरत्वास पावली आहे, असे समज.
354-2
आता आणिक एक गहन । पूर्णाचे चिन्ह । अर्जुना तुज सांगेन । परिस पा ॥354॥
अर्जुना ! आता स्थिरबुद्धी प्राप्त झालेल्या (पूर्णावस्थेस प्राप्त झालेल्या) पुरुषाला ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म गूढ (सहसा लक्षात न येणारी) लक्षण तुला सांगतो. ऐक हो.
या निशा सर्वभूताना तस्या जागर्ति संयमी ।
यस्या जाग्रति भूताना सा निशा पश्यतो मुनेः ॥2.69॥
भावार्थ :-
सर्व भूतमात्रांची जी रात्र आहे, अशा वेळी संयमी पुरुष जागरूक असतो व ज्याठिकाणी प्राणिमात्र जागृत असतात त्यावेळी ज्ञानवान मुनि निद्रेत असतो. (म्हणजेच क्षणभंगूर अशा सांसारिक सुखामध्ये सर्व भूतमात्र जगतात, ती ज्ञानी मुनींची रात्र असते.)
355-2
देखे भूतजात निदेले । तेथेचि जया पाहले । आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रित तो ॥355॥
सर्व प्राणीमात्र ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी निजलेले (अज्ञानी) असतात. (स्थिरबुद्धि पुरूषांना) त्याठिकाणी ज्याला (आत्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्याला) उजाडलेले असते; आणि जीव ज्या (व्यवहारिक, देहादि विषयसुखाच्या) प्रपंचाच्या प्राप्ती साठी (प्राणीमात्र) जागे असतात, त्या विषयसुखाचे ठिकाणी जो (स्थिरबुद्धी पुरुष) निजलेला असतो.(विषयसुखात रस नसलेला)]
356-2
तैसा तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि । तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ॥356॥
हे अर्जुना ! तोच खरा उपाधिरहित (आत्मज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसते) होय.त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच मुनी विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो. (तोच मुनींश्वर आहे) असे समज.
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥2.70॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे समुद्रात, सर्व बाजुंनी किंवा समुद्र चोहो बाजुंनी भरत असतानाही जो आपली मर्यादा सोडत नाही, तो स्थिर असतो. त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये सर्व भोग कसल्याच प्रकारचा विकार उत्पन्न न करता प्रवेश करतात, तोच पुरुष परम शांती प्राप्त करतो. भोगांची (विषयांची) इच्छा करणारा मात्र अशांत असतो.
357-2
पार्था आणिकही परी । तो जाणो येईल अवधारी । जैसी अक्षोभता सागरी । अखंडित ॥357॥
पार्था ! स्थिरप्रज्ञ मनुष्य ओळखता येईल अशी अजूनही एक खूण आहे ती ऐक, समुद्राचे ठिकाणी जशी (चोहो बाजुंनी भरत असताना सुद्धा) अखंड शांतता असते, (तशी शांतता या पुरूषाचे ठायी असते)
358-2
जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥358॥
जरी समुद्रात अनेक नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून मिळतात, तरी त्यामुळे तो किंचित ही मोठा होत नाही व आपल्या मर्यादेचे उल्लंघन करीत
359-2
नाही;
ना तरी ग्रीष्मकाळी सरिता । शोषूनि जाति समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥359॥
किंवा उन्हाळ्यात सर्व नद्यांचे प्रवाह आटले,तरी पण हे अर्जुन, तो सागर जसा मुळीच कमी होत नाही.
360-2
तैसा प्राप्ती ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाही बुद्धी । आणि न पवता न बाधी । अधृति तयाते ॥360॥
त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असतानाही त्या पुरूषाचे बुद्धीला हर्ष होत नाही, आणि त्या प्राप्त (रिद्धी- सिद्धी) नाही झाल्या तरी त्याला (असंतुष्टता) विषाद होत नाही आणि त्याचे धैर्य कमी होत नाही.
361-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सांगे सूर्याचा घरी । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारी । कोंडेल तो ॥361॥
सांग बरे, सूर्याच्या घरी दिवा लावला तर प्रकाश असतो आणि दिवा नाही लावला, तर तो सूर्य अंधारात कोंडला जातो काय ? ? ?
362-2
देखे ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरी । महासुखी ॥362॥
त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरूषाचे घरी ऋद्धिसिद्धि आल्या काय नी गेल्या काय, त्याचे त्याला भानही नसते; कारण तो अंतःकरणाने महासुखात (परमात्मसुखात किंवा स्वस्वरूपात) निमग्न (रमून गेलेला असतो) झालेला असतो.
363-2
जो आपुलेनि नागरपणे । इंद्रभुवनाते पाबळे म्हणे । तो केवि रंजे पालविणे । भिल्लांचेनि ॥363॥
जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो, तो भिल्लाच्या पालांच्या झोपडीत कसा रमेल ? ?
364-2
जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥364॥
जो अमृताला नांवे ठेवतो, तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पीत नाही, त्याप्रमाणे आत्मानंदाचा अनुभव घेणारा, क्षुल्लक ऋद्धिसिद्धिच्या ऐहिक ऐश्वर्याचा उपभोग घेत नाही.
365-2
पार्था नवल हे पाही । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही । तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥365॥
अर्जुना ! काय आश्चर्य आहे पाहा, ज्या पुरुषांना स्वर्गसुखाची परवा नाही, तेथे त्याला क्षुल्लक (सामान्य) ऋद्धिसिद्धिची काय किंमत असणार ?
366-2
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः ।
निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति ॥2.71॥
भावार्थ :-
जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरिच्छ, ममत्वशून्य आणि अभिमान सोडून कर्तव्यकर्म करीत राहतो, त्याला शांती (स्थितप्रज्ञेला) प्राप्त होते.
ऐसा आत्मबोधे तोषला । जो परमानंदे पोखला । तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तू ॥366॥
असा जो आत्मज्ञानाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट (पोसलेला) झालेला आहे. तोच खरा (स्थिरबुद्धी) स्थितप्रज्ञ झाला आहे, असे तू जाण.
367-2
तो अहंकाराते दंडुनी । सकळ काम सांडोनि । विचरे विश्व होऊनि । विश्वाचिमाजी ॥367॥
तो स्थितप्रज्ञ दृढपणाने अहंकाराला दूर करून (आपले ठिकाणी असलेला मी पणा घालवुन), व मनातील सर्व कामनांचा त्याग करून (विषय वासना टाकून), (सर्वजग ब्रम्हरूप समजून) विश्वचैतन्याशी एकरूप होऊन विश्वात वावरतो. (जगात संचार करतो).
368-2
एष ब्राह्मो स्थितिः पार्थ नैना प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥2.72॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! हि ब्राम्हविषयक आस्था आहे.ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळीदेखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मांनदाप्रत पोचतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो
नाम द्वितीयोऽध्यायः ॥2॥
हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभविता निष्काम । पातले परब्रह्म । अनायासे ॥368॥
अशा प्रकारची ब्रम्हस्थिती आहे. जे निष्काम पुरूष या अमर्याद ब्रम्हस्थितीचा अनुभव घेतात ते अनायासेच परब्रम्हाशी एकरूप होतात.(परब्रम्हाला प्राप्त होतात)
369-2
जे चिद्रूपी मिळता । देहातीची व्याकुळता । आड ठाको न शकेचित्ता । प्राज्ञा जया ॥369॥
कारण की, चिद्रुपता प्राप्त होत असताना (ज्ञानस्वरूपी) देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता (चित्ताची तळमळ) ज्या ब्रम्हस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही, (स्थितप्रज्ञाच्या चिताच्या आड येऊ शकत नाही),
370-2
तेचि हे स्थिति । स्वमुखे श्रीपति । सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥370॥
तीच ही ब्राम्हस्वरूपाशी एकरूप होण्याची स्थिती, असे श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली, हे संजय धृतराष्ट्रास म्हणाला.
371-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ऐसे कृष्णवाक्य ऐकिले । तेथ अर्जुने मनी म्हणितले । आता आमुचियाचि काजा आले । उपपत्ति इया ॥371॥
असे श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुन मनात म्हणाला, आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचेच आयते कार्य झाले. (कोणते कार्य तर युद्ध न करण्याविषयीचे जे मत अर्जुनाने मांडले त्याला आधारच मिळाला असा त्याचा समज झाला)
372-2
जे कर्मजात आघवे । एथ निराकारिले देवे । तरी पारुषले म्या झुंजावे । म्हणूनिया ॥372॥
कारण, आत्मस्वरूपाचे वर्णन करताना श्रीकृष्णांनी सर्वच्या सर्व कर्माचा (आता पर्यंतच्या निरूपणात) निषेध केला आहे. आणि त्या निषेधामुळे माझे युद्ध करणे (हे कर्म) सहजच थांबले आहे.
(असा समज अर्जुनाने करून घेतला आहे. एकीकडे श्रीकृष्ण म्हणतात आत्मस्वरूप प्राप्त पुरूषांना कर्मात अडकण्याची गरज नाही. पण मला मात्र म्हणतात की, ” तू युद्ध कर. ” या द्विधा मनस्थितीत अर्जुन आला आहे.)
373-2
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्ती धनुर्धरु उवायिला । आता प्रश्नु करील भला । आशंकोनिया ॥373॥
ह्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुन अंतर मनात फारच आनंदित झाला. आता त्याची शंका तो उत्तम प्रश्नाच्या द्वारे प्रगट करील.
274-2
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु । की विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥374॥
(पुढं येणारा) तो प्रसंग फारच सुदंर असा आहे, जणू काही सर्व धर्माचे उत्पत्तीस्थान अथवा विचाररूपी अमृताचा अमर्याद असा सागरच आहे.
375-2
जो आपणपे सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु । ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तीदासु ॥375॥
त्या सुखसंवादाचे निरूपण सर्वज्ञांनाचा शिरोमणी सर्वश्रेष्ठ राजा श्रीअनंत ‘श्रीकृष्ण’ स्वतः करतील.ती ज्ञानकथा (ती हकीकत) निवृत्तीनाथांचा शिष्य (निवृत्तीदास) ‘ज्ञानदेव’ सांगेल.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया – सांख्ययोगोनाम्
द्वितीयोऽध्यायः ॥2॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 72 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 375 ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

