वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय | ओवी संख्या |
|---|---|---|
| ग्रामगीता अध्याय बारावा- 12 Gram Gita Chapter १२ – 12 | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book | १०५ |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने | हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १२ ग्राम शुध्दी
ग्राम शुध्दी
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय बारावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १२
Gram Gita Chapter XII Commencement
—-🕉ग्रामगीता अध्याय १२ ग्राम शुध्दी
ग्राम शुध्दी
एका सज्जने विचारिले । म्हणे ग्रामराज्यात काय ठेविले ! जिकडे तिकडे गोंधळ चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥१॥
कागदी पुस्तकात, काव्यात । खेडयाचे वर्णन दिव्य बहुत । परि वस्तुस्थिति पाहता तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥२॥
रस्ते सर्व घाणीनी भरले । आजूबाजूस डबके साचले । एकहि काम न निभे तेथले । शहराविण ॥३॥
” खेडयाकडे चला ” म्हणता । परि एकहि सोय नसे पाहता । घरे कसली ? हुडेचि तत्त्वता । डुकरखोपडे खुराडे ॥४॥
नाही कसले मनोरंजन । दंढारी-तमाशावाचून । उगेचि का करावे वर्णन । खेडे उत्तम म्हणोनि ? ॥५॥
मित्रा ! तुझे म्हणणे ऐकिले । माझ्या मनी योग्य ते पटले । त्याचे कारण तेहि ऐकिले । पाहिजे श्रोती ॥६॥
जेव्हा कार्यकर्ते होती आळसी । त्यात उपभोगाची वाढे खुशी । तेव्हाच अंतर पडे कार्यासि । गावशिवेच्या ॥७॥
एकदा चुकले तरि चाले । पण नेहमी चुकतचि गेले । त्यानेच राज्याचेहि मरण ओढवले । गति काय गावाची ? ॥८॥ .
कार्यकर्त्यानीच घेतली निशा । काय पाहता मग गावाची अवदशा । सुरू झाला गुंडांचाचि तमाशा । लोक झाले भलतैसे ॥९॥
वतनदार इजारदार । ग्रामजोशी वेशकर । पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार । चुकले त्यांच्या हातूनिया ॥१०॥
चुकलियावरीहि कोणीच बघेना । मग लोक काढती वाटा नाना । जैसा ज्यास वाटे धिंगाणा । करू लागती हौसेने ॥११॥
कोणी हौसेने घर बांधले । मार्गावरीच ओटे वाढले । कोणाचे छप्पर पुढे आले । गाडी काही जाईना ॥१२॥
कोणी घाण नाली सोडूनि दिली । ती सर्व मार्गावरि आली । माणसे ढोरे सारी फसली । घराभोवती बिचार्याच्या ॥१३॥
काहीनी सांडपाणी साचविले । मच्छर जंतु अति वाढले । रोगराईनी बेजार झाले । शेजारी सगळे ॥१४॥
काहीनी सडकेवरि गुरे बांधली । त्यातहि मारकुंडीच निघाली । मार्गस्थांची फजीती झाली । सांगता येना ॥१५॥
काहीनी दारी दगड ठेविले । जाणाराचे गाडेचि उलटले । काही ठोकर लागोनि पडले । अंधारामाजी ॥१६॥
काहीनी टाकला पुंजाणा । केरकैचणी कांचखिळे नाना । बोचती येणार्या-जाणार्यांना । बोलूच नका ॥१७॥
साहेब चाले मोटारींनी । काही जाती जोडे घालोनि । गरीबास विचारीना कोणी । पाय त्याचे फुटले तरी ॥१८॥
सडकी फळे शेंग टरफले । कुजके सोप मार्गीच टाकले । आजूबाजूस पाहोनि फेकले । ढोबर त्यावरि माऊलीने ॥१९॥
गावचे मार्ग विष्टेने व्यापले । आड कोने घाणीनी भरले । ठायींठायी उकिरडे साचले । गाव वेढले गोदरींनी ॥२०॥
घराघरांचे कुंप सडले । काटे रस्त्यावरीच पडले । फास आणणारासहि न कळले । साफ करावे म्हणोनिया ॥२१॥
गावी खंडार्यात माजले रान । विंचू-सर्प राहती लपोन । पडक्या गढीचे हूडे भयाण । तेथील घाण पुसू नये ॥२२॥
विहिरी कोणी बांधून ठेविल्या । त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या । घुणार्या घाण करीतचि गेल्या । सडला पाण्यात पाचोळा ॥२३॥
कोणी रस्त्यावर टाकिला गाळ । विहिरी मोर्या उपसोनि ओंगळ । टाकोले हीर, फुटके खपरेल । मेलेले उंदीरहि त्यावरि ॥२४॥
श्रीमंतांचे वाढले गोठे । रस्त्यावरीच आले ओटे । मार्गीच लाकडे विटा गोटे । कोण बोले तयांना ॥२५॥
गावातील पंच झोपले । ” काय म्हणावे ? नातलग मित्र आपले ! ” म्हणोनि त्यांनी डोळे लाविले । गाव झाले डोंगर हे ॥२६॥
ऐसीच विचित्र गावाची स्थिति । हे आले माझ्या अनुभवाप्रति । म्हणोनीच वाटे लावावी सुसंगति । गावोगावी आतातरी ॥२७॥
हे सगळेचि दुरुस्त कराया । शहाण्यांनी जावे खेडयांकडे या । आदर्श ग्राम हाचि पाया । राष्ट्राचा असे म्हणोनि ॥२८॥
जे जे गावी शहाणे झाले । शक्तियुक्तींनी पुढे निघाले । ते सर्व शहराकडे धावले । म्हणोनि माजले रान येथे ॥२९॥
भंगी साफ करिती शहर । तैसे पूर्वी कामदार महार । झाडीत होते गावगल्ली सुंदर । पुढे केवळ पाटलांची ॥३०॥
पवित्र ठेवावा देवाचा मार्ग । हा भाविकाचा जाणोनि ओघ । देव मांडिले होते जागोजाग । तेथेहि माजले उकिरडे ॥३१॥
नगरप्रदक्षिणेची प्रथा । ती प्रिय होती अनेक पंथा । तीहि गेली लयाला आता । उरले सगळे करंटेपण ॥३२॥
दिंडया-मिरवणुकी होत्या मागे । उत्सव, दहीकाल्याच्या प्रसंगे । त्यातहि शिरले बेढंगे । नाचगाणे, दंढारी ॥३३॥
लोक दिंडया-मिरवणूकी काढती । परि त्याचे तत्त्वचि आता न जाणती । म्हणोनि वाढली गलिच्छता अति । दारोदारी घरोघरी ॥३४॥
कधीकाळी काढिती भजन । घरोघरी बोलावया जाऊन । तुटका वीणा टाळ दोन । मृदंग गेला कामातूनि ॥३५॥
मग राहिले वाजंत्रीबाजे । त्यातहि तालस्वर अंदाजे । कसेतरी लाविती, साजे । लग्नमौंज म्हणोनिया ॥३६॥
कर्णा शंख घंटया नगारे एकचि गोंधळ करिती सारे । बेताल होता कोठूनि भरे । ताल जीवनी गावाच्या ॥३७॥
ऐसा झाला तालतितंबा । विस्कळित झाल्या कीर्तने, सभा । म्हणती ” दयायावी रुक्मिणीवल्लभा ” । आपुली शुध्दचि नाही ॥३८॥
गाव-देवळाची पालखी निघे । जो तो तमाशा म्हणोनि बघे । कसली भावना ? खिदळती तुंगे । आयाबाया पाहोनि ॥३९॥
चालतांना शिस्त नाही । जनलोकांची अजीव घाई । कोणाचाहि पायपोस नाही । पायी कोणाच्या ॥४०॥
कोणी कोणाचे ऐकेना । पुढे घासावयासि करी धिंगाणा । याचे शिक्षणचि नाही कोणा । कैसे चालावे मार्गाने ॥४१॥
नाही चालणारासि शिस्त । चालती जैसी जनावरे समस्त । माणसाचे चालणेचि स्वस्थ । विसरले लोक ॥४२॥
मार्गी लागती ठोकरा । कितीकांच्या बोटांचा झाला चुरा । रेटा बसे मागे-सामोरा । करिता प्रदक्षिणा ही सारी ॥४३॥
सध्याची ऐसी प्रदक्षिणा । ही प्रदक्षिणेची विटंबना । मार्गाची घाण साफ होईना । प्रदक्षिणा काय कामाची ? ॥४४॥
म्हणोनीच काढली रामधून । व्हावयासि गावाचे पुनर्निर्माण । सेवामंडळ संस्थेतून । उदय केला कार्याचा ॥४५॥
मित्रहो ! रामधून नाही आजची । ही आहे परंपरा प्रदक्षिणेची । प्रदक्षिणेत योजना होती कार्याची । तीच आहे रामधून ॥४६॥
मी समजतो गावहि शरीर । त्यास राखावे नेहमी पवित्र । त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गावी ॥४७॥
जैसे आपण स्नान करावे । तैसे गावहि स्वच्छ ठेवीत जावे । सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावे । श्रेय गावाच्या उन्नतीचे ॥४८॥
आपण तेवढे स्वच्छ राहावे । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावे । याने सुमंगलता कधी न पावे । तनमन होई दूषित ॥४९॥
म्हणोनि स्वच्छ ठेवावे दुकानघर । नाल्यामोर्या सडका चौफेर । मग रामधूनची फेरी सुंदर । काढावी आबालवृध्दांनी ॥५०॥
रामधूनपूर्वी गाव पूर्ण । व्हावे स्वच्छ सौंदर्यवान । कोणहि घरी गलिच्छपण । न दिसावे कोठे ॥५१॥
त्यात व्हावयासि मदत । घ्यावेत सेवाभावियांचे हात । ज्यांना सेवा हेचि व्रत । पसंत आहे ॥५२॥
मिळोनि करावी ग्रामसफाई । नालीमोरी ठायींठायी । हस्तेपरहस्ते साफ सर्वहि । चहूकडे मार्ग ॥५३॥
त्यात जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गावापासून । अस्ताव्यस्त न देता फेकून । नीट व्यवस्था लावावी ॥५४॥
त्यासाठी करावे खतखड्डे । गावाबाहेर जागी उजडे । जनावरांचे मलमूत्र सापडे । तेहि त्यातहि भरावे ॥५५॥
तैसेचि करावे चरसंडास । मळ दिसोचि न द्यावा कोणास । आपुल्या मळाची आपणास । व्यवस्था लावणे सोयीचे ॥५६॥
नदीकिनारी वा बोरंगांत । शौचासि जाती स्त्रियादि समस्त । ती कुचंबणा आणि घाण निश्चित । दूर होईल चरसंडासे ॥५७॥
तेथे बसलिया शौचास । माती झोकावी सावकाश । मलमूत्र येवोनि खतरूपास । कारणी लागो म्हणोनिया ॥५८॥
सर्व गावाचि ऐसी रीति । जे जे सांगती करोनि घेती । त्यावरीच प्रसन्न राहे क्षिति । खताने तृप्ति होवोनिया ॥५९॥
एरव्ही तो वांढाळ गडी । जो वाटेल तिकडे मळा सांडी । ते खतद्रव्यांची करिती नासाडी । वानर जैसे ॥६०॥
अहो ! ही निसर्गाची रचना । समजलीच पाहिजे सर्वजना । खाद्यचि होते खत जाणा । खतापासोनि खाद्योत्पत्ति ॥६१॥
आपण जे जे काही खातो । रसरक्तमांस तेणे जमवितो । त्यातूनि वाचले ते खत म्हणतो । भूमिवरि घालावया ॥६२॥
त्या खताची झाली जोपासना । तीच फळते काढाया उत्पन्ना । खत नसता भूमिची दैना । होऊ लागे ॥६३॥
मूत्रविष्टाहड्डी मिसळली । त्याने भूमीस स्फूर्ति चढली । पुन्हा पेरणी करिता उदभवली । प्रचंड कणसे ॥६४॥
परि गाव हे समजेना । याचे ज्ञानचि नुरले कोणा । करिती विष्टेचा धिंगाणा । आपणासहित गुरांच्या ॥६५॥
गोवर्या करोनि जाळिती । ते महालाभास आंचवती । शेणात आहे लक्ष्मीची वसती । धर्मग्रंथीहि वचन ऐसे ॥६६॥
म्हणोनि सर्व गावाचे मलमूत्र । जमवोनि झाकावे जाणोनि तंत्र । त्याने गावाची जमीन सर्वत्र । खतवोनि द्यावी ॥६७॥
याने दूर होईल घाण । थांबेल रोगराईचे नुकसान । आणि पिकेल अधिक धान्य । अनेक लाभ एकामाजी ॥६८॥
हे समजाविण्याहि पाहिजे कमेटी । तिने करोनि नाना आटाआटी । जनता जागृत करोनि शेवटी । उत्पन्न द्यावे वाढवोनि ॥६९॥
गोखरू तरोटा तालीमखाना । ज्यांनी भूमि विढिली जाणा । त्यांचेहि खत कराया सर्वाना । लावोनि पीक वाढवावे ॥७०॥
मुबलक खत मुबलक पाणि । मुबलक श्रम मुबलक बी-भरणी । मुबलक उत्पन्न गगनासि भेदूनि । दिसावे गावी ॥७१॥
हेचि खरी आहे सेवा । हेचि आवडे देवाधिदेवा । उगीच मोठेपणाचा कांगावा । मिरवावा कासयासि ? ॥७२॥
सर्वानी गाव स्वच्छ करावे । तेणे आरोग्य नांदेल बरवे । घाण-खतातूनि नवनवे । वैभव येईल उदयासि ॥७३॥
ग्रामसफाई झालियावरि । रामधून काढावी नाम-गजरी । स्वच्छतेसवेच पावित्र्यहि भारी । वातावरणी यावयासि ॥७४॥
प्रात:काळी सामुदायिक नामगजर । सुखस्वराज्य तो टिकवी सुंदर । त्यासाठीच ब्राह्ममुहूर्त रामप्रहर । वेदहि म्हणे ॥७५॥
यावरि श्रोते विचारती प्रश्न । कैसी प्रदक्षिणेची रामधून ? जेणे घडेल ईश्वर-भजन । आरोग्य हेहि संपादे ॥७६॥
रामधूनची ऐका रीति । आधी करा ग्रामशुध्दि ती । जेणे स्नान घडे गावाप्रति । आरोग्यदायी ॥७७॥
निघण्यापूर्वी सूर्यनारायण । करावे सडासंमार्जन । सर्व गावाने मार्ग झाडोन । आनंदभुवन निर्मावे ॥७८॥
जिकडे तिकडे पाणी शिंपावे । मार्ग रांगोळयांनी सजवावे । ठायी ठायी ठेवोनि द्यावे । फोटो संतां-थोरांचे ॥७९॥
सुंदर बांधावे आम्रतोरण । ठिकठिकाणी शोभवावे मैदान । आपुलाल्या श्रमाचे प्रदर्शन । दारादारात ठेवावे ॥८०॥
मग जमोनि सकल सेवकजने । रामधून काढावी गांभीर्याने । प्रथम रांग चातुर्याने । सजवावी शोभे ऐसी ॥८१॥
लहान मुले मुलामाजी । तरुण युवक तरुणामाजी । वयोवृध्द सहजासहजी । वृध्दांमाजी योजावे ॥८२॥
स्वतंत्र चालवाव्या महिला मुली । मार्गी आणावी शोभा चांगली । गीते म्हणणारांची योजना केली । पाहिजे मधामधातूनि ॥८३॥
बाजूनी चालवावे सेवकजन । सेवक-गणवेषांत परिपूर्ण । त्यांनी सांभाळावी सेवकांची लैन । दोन दोन चालवावे ॥८४॥
एकाने धरावी घंटा हाती । दोन ठोके द्यावेत घाटेवरती । चालू लागेल ठरलिया पध्दती । रामधून जागेहूनि ॥८५॥
” रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम । ” म्हणावे गायकाने प्रथम । मग म्हणावे सर्वानी ॥८६॥
अतिधीराची चाल धरावी । ओळ शिस्त सांभाळावी । मग गीते गायकांनी म्हणावी । राष्ट्र-भक्ति-भावनेची ॥८७॥
काही म्हणावी ग्रामावर । काही म्हणावी भक्तिपर । काही म्हणावी निरंतर । चारित्र्यवान करणारी ॥८८॥
चौकातूनि दारातूनि । जात असता शांतपणी । जयघोष गर्जवावे भेदूनि । गगन सारे ॥८९॥
गुरुदेवाच्या जयजयकारे । भारतमातेच्या नामोच्चारे । साधुसंतांच्या घोषे उदगारे । जागृति करावी आनंदे ॥९०॥
मार्गी थोरामोठयांचे चित्रदर्शन । वंदावे उभ्यानेचि हात जोडोन । थांबू नये मार्गातून । रामधून सोडोनिया ॥९१॥
ऐसी फेरी पूर्ण करावी । गुरुदेव-चौकी स्थिरावोनि घ्यावी । आधीच सेवकांनी लैन लावावी । लोकापुढे येवोनि ॥९२॥
मग तैसेचि लोक उभे करावे । मोकळे मोकळे ओळीत बरवे । लहान लहानात ठेवावे । तरुण वृध्द ऐसेचि ॥९३॥
महिलांची अलग रांग । करावी सुंदर यथासांग । ऐसा साजवावा लोकसंघ । चौकामाजी वा मैदानी ॥९४॥
मग सूचकाने सूचना द्यावी । जी ” सक्रियपाठी ” लिहिली बरवी । प्रार्थना, भाषण, प्रणाम योजावी । योजनेपरी ॥९५॥
भाषणी हेच सांगत जावे । जनतेने नीटनेटके राहावे । सहकार्याने वागत असावे । गावामाजी ॥९६॥
जेव्हा वाढेल मार्गी घाण । तेव्हा होईल मलीन मन । तयायोगे विकास पूर्ण । राहील अडोन जीवांचा ॥९७॥
सर्वानी स्वच्छ शिस्तबध्द व्हावे । परस्पराशी प्रेम करावे । तरीच गाव स्वर्ग व्हावे । सर्वतोपरी ॥९८॥
भाषणानंतरि जयघोष करून । मार्गी वळवावे सकळ जन । शांतपणे चालाया सांगोन । रामधून संपवावी ॥९९॥
शेवटी जावे सेवकजने । अतिप्रसन्न होवोनि मने । स्वर्ग उतरेल या योजनेने । ग्रामामाजी ॥१००॥
लोकांना मार्गी चालताहि नये । म्हणोनि काढला हा उपाय । गरीब-अमीर-अनपढ सर्व हे । शिकती चालणे यामाजी ॥१०१॥
दोघादोघांच्या करिती रांगा । एकामागूनि एकाची जागा । गाव पवित्र करी भजनगंगा । वाढे संघटना गावाची ॥१०२॥
सहजचि चालणे बोलणे येते । शिस्तीने बसणे उठणे कळते । गाणे वाजविणेहि कळो लागते । गावच्या दरबारी ॥१०३॥
घराघरांची होय दुरुस्ती । सौंदर्याची वाढे प्रीति । अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ति । वाढे वृत्ति सहकार्याची ॥१०४॥
” आपण एक ” ही वाढे भावना । दिगंती जाई आळसीपणा । कोणी न वाटे अधिक-उणा । गुणप्रदर्शना वाव मिळे ॥१०५॥
सर्वाचे सर्वाकरिता वाढे मन । लोक राहती अतिप्रसन्न । ऐशी आहे रामधून । सहकार्याची बोधशाळा ॥१०६॥
ऐशा योजना घेवोनि हाती । करावी खेडयांची दुरुस्ती । तेणे आनंद लाभेल सकळांप्रति । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । ग्रामस्नान-रामधून वर्णित । बारावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
ग्रामगीता अध्याय बारावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.


